13 – समलैंगिकता
हे सर्वशक्तिमान देवाचे पवित्र शब्द आहेत.
माणसांच्या बोलण्यात आपल्याला रस नसतो.
देवावर प्रेम करणार् या प्रत्येकासाठी... याबद्दल देव असे म्हणतो: समलैंगिकता.
हे सर्वशक्तिमान देवाचे पवित्र शब्द आहेत.
माणसांच्या बोलण्यात आपल्याला रस नसतो.
देवावर प्रेम करणार् या प्रत्येकासाठी... याबद्दल देव असे म्हणतो: समलैंगिकता.
अनीतिमानास देवाचे राज्य वतन मिळणार नाही, हे तुम्ही जाणत नाही काय? फसू नका; कोणीही व्यभिचारी, मूर्तिपुजक किंवा व्यभिचारी, विपरीत संभोग करू देणारे किंवा विपरीत संभोग करणारे, चोर, लोभी, दारूबाज, निंदा करणारे किंवा लुबाडणारे ह्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. आणि तुम्ही कित्येकजण तसे होता; पण तुम्ही धुतले गेला आहा, तुम्ही पवित्र केले गेला आहात आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने व आपल्या देवाच्या आत्म्याकडून तुम्ही नीतिमान ठरवले गेला आहात.
”या कारणामुळे देवाने त्यांना दुर्वासनांच्या स्वाधीन केले; कारण त्यांच्या स्त्रियांनीही आपला नैसर्गिक उपभोग सोडून अनैसर्गिक प्रकार स्वीकारले; आणि तसेच पुरुषांनीही स्त्रियांचा नैसर्गिक उपभोग सोडून ते आपल्या वासनांत एकमेकांविषयी कामसंतप्त होऊन पुरुषांनी पुरुषांशी अयोग्य कर्म केले आणि त्यांनी आपल्या संभ्रमाचे योग्य प्रतिफळ आपल्याठायी भोगले. आणि त्यांना देवाला स्मरणात ठेवणेही न आवडल्यामुळे देवाने त्यांना अनुचित गोष्टी करीत राहण्यास विपरीत मनाच्या स्वाधीन केले.
”“स्त्रीगमनाप्रमाणे पुरुषगमन करु नको! ते भयंकर पाप आहे! “कोणत्याही पशूशी गमन करु नको! त्यामुळे तू मात्र अमंगळ होशील! त्याचप्रमाणे स्त्रीने पशूशी गमन करावयासाठी त्याच्यापाशी जाऊ नये; ते कृत्य निसर्गविरुद्ध आहे!
”तेव्हा देवाने आपल्या प्रतिरुपाचा मनुष्य निर्माण केला; देवाचे प्रतिरुप असा तो निर्माण केला; नर व नारी अशी ती निर्माण केली.
”म्हणून मनुष्य आपल्या आईबापांस सोडून आपल्या बायकोला जडून राहील आणि ते दोघे एक देह होतील.
”मग परमेश्वर म्हणाला, “सदोम व गमोरा येथील लोक फार दुष्ट आहेत असे मी पुष्कळ वेळा ऐकले आहे. म्हणून मी स्वत: प्रत्यक्ष जाऊन परिस्थीती पाहीन व मग त्यांची दुष्ट करणी ऐकल्याप्रमाणे खरोखर आहे की काय हे मला नक्की समजेल.” मग ते पुरुष सदोमाकडे वळून चालू लागले, परंतु अब्राहाम परमेश्वरा पुढे तसाच उभा राहिला. मग अब्राहामाने परमेश्वराजवळ जाऊन विचारले, “परमेश्वर तू दुष्ट लोकांचा नाश करताना चांगल्या लोकांचाही नाश करणार काय? आणि जर कदाचित त्या नगरात पन्नास लोक चांगले व नीतिमान असतील तर? तरी ही त्या नगराचा तू नाश करणार काय? तू खात्री ने नगरात राहाणाऱ्या पन्नास नीतिमान लोकांसाठी नगराचा बचाव करशील. तू नक्की नगराचा नाश करणार नाहीस; दुष्ट लोकांना मारण्यासाठी तू पन्नास नीतिमान लोकंना मारणार नाहीस; आणि जर तसे झाले तर मग चांगले व वाईट अशा लोकांची गत सारखीच होणार; त्या दोन्ही प्रकारच्या लोकांना शिक्षा होणार; तू सर्व पृथ्वीचा न्यायाधीश आहेस, तू योग्य तेच करशील हे मला माहीत आहे.” नंतर परमेश्वर बोलला, “या सदोम शहरात मला पन्नास चांगले लोक आढळले तर त्यांच्यासाठी मी संपूर्ण शहराची गय करीन, व सर्व शहर वाचवीन.” मग अब्राहाम म्हणाला, “हे प्रभु, तुझ्या तुलनेने मी केवळ धूळ व राख आहे, तरी तुला एक प्रश्न विचारु दे; समजा कदाचित् जर पाच लोक कमी असतील म्हणजे फक्त पंचेचाळीसच चांगले लोक असतील तर? त्या पाच कमी असलेल्या लोकांकरिता तू सर्व नगराचा नाश करशील काय?”परमेश्वर म्हणाला, “मला पंचेचाळीस लोक चांगले आढळले तर मी नगराचा नाश करणार नाही.” पुन्हा अब्राहाम परमेश्वराला म्हणाला, “आणि जर तेथे तुला चाळीसच चांगले लोक आढळले तर? संपूर्ण शहराचा तू नाश करशील काय?”परमेश्वर म्हणाला, “जर मला चाळीसच लोक चांगले आढळले तर मी शहराचा नाश करणार नाही.” मग अब्राहाम म्हणाला, “प्रभु, कृपा करुन माझ्या बोलण्याचा तुला राग न यावा; मला आणखी विचारण्याची परवानगी असावी; तेथे फक्त तीसच लोक चांगले असतील तर? तू त्या नगराचा नाश करशील काय?”परमेश्वर म्हणाला, “जर तीस चांगले लोक असतील तर मी तसे करणार नाही.” मग अब्राहाम म्हणाला, “प्रभु, थोडा त्रास देऊन पुन्हा विचारु का? समजा तेथे कदचित् वीसच लोक चांगले असतील तर?परमेश्वराने उत्तर दिले, “जर तेथे वीसच लोक चांगले असतील तर त्या वीसा करिता मी नगराचा नाश करणार नाही.” अब्राहाम म्हणाला, “प्रभु, कृपा करुन माझ्यावर रागावू नकोस, परंतु शेवटी एकदाच थोडा त्रासदायक प्रश्न विचारण्यास परवानगी असावी, कदाचित् तुला तेथे दहाच लोक चांगले आढळले तर तू काय करशील?”परमेश्वर म्हणाला, “जर मला नगरात दहाच लोक चांगले आढळले तर त्या दहाकरिता मी नगराचा नाश करणार नाहीं.”
”त्या दिवशी संध्याकाळी ते दोन देवदूत सदोम नगरात आले. नगराच्या वेशी जवळ बसलेल्या लोटाने त्यांस पाहिले; लोट उठून त्यांस सामोरा गेला आणि त्याने त्यांस आदराने लवून नमल केले. लोट त्यांस म्हणाला, “माझे स्वामी महाराज, कृपया माझ्या घरी या; मला आपली सेवा करु द्या; तेथे तुम्ही आपले पाय धुवा, आजची रात्र रहा; मग उद्या तुमच्या पुढील प्रवासास निघा.”त्या देवदूतांनी उत्तर दिले, “नाही नाही, आम्ही रात्री वेशीजवळील चौकात मुक्काम करु.” परंतु लोट त्यांना पुन्हा पुन्हा विनंती करीतच राहिला; तेव्हा देवदूतांनी त्याची विनंती मान्य केली व ते त्याच्या घरी मुक्कामास गेले. लोट याने त्यास पिण्यास पाणी दिले, त्याने त्यांच्यासाठी भाकरी केल्या व ते जेवले. त्या रात्री झोपण्याच्या वेळेपूर्वी त्या नगराच्या सर्व भागातून पुरुष तरुण आणि वृध्द असे सर्वच पुरुष लोटाच्या घरी आले; त्या सदोमकर पुरुषांनी लोटाच्या घराला गरडा घातला व त्यांनी लोटाला हाक मारत म्हटले. “आज रात्री तुझ्या घरी आलेले ते दोन पुरुष (देवदूत) कोठे आहेत? त्यांना आमच्याकडे बाहेर आण; म्हणजे आम्ही त्यांच्याशी समागम करु.” लोट घरातून बाहेर आला व त्याने आपल्यामागे घराचे दार बंद केले. लोट त्या सदोमकर लोकांना म्हणाला, “नाही, नाही, माझ्या बंधूनो! मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की तुम्ही असे भयंकर वाईट काम करु नका. पाहा, माझ्या दोन मुली आहेत; त्यांचा अद्याप कोणाही पुरुषाशी संबंध आला नाही; त्या शुद्ध कुमारी आहेत; मी त्यांना तुमच्या स्वाधीन करतो. तुमच्या मर्जीस येईल तसे तुम्ही त्यांच्याशी वागा; परंतु ह्या पुरुषांना (देवदूतांना) काहीही करु नका; ते माझ्या घरी पाहुणे म्हणून आले आहेत आणि त्यांचे रक्षण करणे माझे प्रथम कर्तव्य आहे.” तेव्हा सभोंवतालचे घेरा टाकलेले लोक म्हणाले, “चल हो बाजूला.” नंतर ते आपापसात म्हणू लागले, “हा लोट आमच्या नगरात पाहुणा म्हणून आला आणि आता आम्ही काय करावे हे हा उपरा आम्हाला शिकवू पाहतो काय?” मग ते लोक लोटाला म्हणाले, “अरे, आम्ही त्या पाहुण्यांशी जेवढे दुष्टपणे वागूं त्यापेक्षा अधिक दुष्टतेने व वाईट रीतीने तुझ्याशी वागू, समजलास!” तेव्हा ते लोक लोटाच्या अधिक जवळ जवळ येऊ लागले व घराचा दरवाजा तोडण्यास ते पुढे सरसावले. परंतु लोटाच्या घरातील त्या दोन पाहुण्यांनी दार उघडले व लोटाला मागे ओढून घरात घेतले, आणि दार बंद केले. त्या दोन पुरुषांनी दारा बाहेरील लोकांस आंधळे केले; म्हणून घरात घुसण्याचा प्रयत्न करणारे ते सर्व तरुण व म्हातारे आंधळे झाले, त्यामुळे अखेर पर्यंत त्यांना घराचे दार सापडलेच नाहीं.
”ते दोन पुरुष लोटाला म्हणाले, “तुझ्या कुटुंबातील व नात्यातील इतर कोणी लोक म्हणजे तुझे जांवई, मुलगे, मुली किवां इतर नातेवाईक या नगरात आहेत काय? तसे कोणी असतील तर त्यांना आता ताबडतोब हे शहर सोडून बाहेर पडण्यास सांग; कारण आम्ही या नगराचा नाश करणार आहोत. हे नगर किती वाईट आहे ते परमेश्वराने ऐकले आहे आणि म्हणून त्याने आम्हाला या नगराचा नाश करण्यासाठी पाठवले आहे.” म्हणून मग लोट बाहेर गेला व आपल्या जावयांस भेटला. तो त्यांना म्हणाला, “चला उठा, त्वरा करा, व हे शहर सोडून लवकर बाहेर पडा; कारण परमेश्वर या नगराचा नाश करणार आहे.” परंतु लोट गंमत करीत आहे असे त्याच्या जावयांस वाटले. दुसऱ्या दिवशी पहाटे ते दूत लोटाला घाईकरुन म्हणालें, “उठ, ह्या नगराला ताडण होणार आहे; तेव्हा तू तुझी बायको व तुझ्या जवळ असलेल्या तुझ्या दोन मुली यांस घेऊन ताबडतोब येथून नीघ; म्हणजे मग या नगराबरोबर तुमचा नाश होणार नाही, तर तुम्ही आपले जीव वाचवाल.” परंतु लोट एकदम गोंधळून गेला व दिरंगाई करु लागला; तेव्हा त्या दोन पुरुषांनी (देवदूतांनी) लोट, त्याची बायको आणि त्याच्या दोन मुली यांचे हात धरुन त्यांस सुरक्षितपणे नगराबाहेर नेले. परमेश्वराने अशा रीतीने लोट व त्याच्या कुटुंबियावर दया केली. नगराबाहेर आल्यावर त्या देवदूतापैकी एक जण म्हणाला, “आता पळा व तुमचे जीव वांचवा, नगराकडे मागे वळून पाहू नका आणि या खोऱ्यात कोणत्याही ठिकाणी थांबू नका; पर्वतावर जाईपर्यंत पळत राहा जर का मधे कोठे थांबला, तर नगराबरोबर तुमचाही नाश होईल.”
”आणि परमेश्वराने सदोम व गमोरा या नगरांचा नाश करायला सुरुवात केली; त्याने आकाशातून त्या नगरावर गंधक व अग्नी यांचा वर्षाव केला;
”लोट व त्याचे कुटुंबीय नगरातून पळून जात असताना लोटाच्या बायकोने मागे वळून जळणाऱ्या नगराकडे पाहिले तेव्हा तत्काळ ती मिठाचा खांब झाली.
”“स्त्रीगमनाप्रमाणे पुरुषगमन करु नको! ते भयंकर पाप आहे! “कोणत्याही पशूशी गमन करु नको! त्यामुळे तू मात्र अमंगळ होशील! त्याचप्रमाणे स्त्रीने पशूशी गमन करावयासाठी त्याच्यापाशी जाऊ नये; ते कृत्य निसर्गविरुद्ध आहे!
”“एखाद्या पुरुषाने स्त्रीगमनाप्रमाणे पुरुषगमन केले तर ते भयंकर पाप त्या दोघांनी केले आहे म्हणून त्या दोघांनाही अवश्य जिवे मारावे; त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्याच्याच माथीं राहील.
”“बायकांनी पुरुषांचा किंवा पुरुषांनी बायकोचा पेहेराव करु नये. तुमचा देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने ते निंद्य आहे.
”येशूने उत्तर दिले, “पवित्र शास्त्रात असे लिहिलेले तुमच्या वाचनात निश्चितच आले असेल की, जेव्हा देवाने जग उत्पन्न केले, आणि देव म्हणाला, ‘म्हणून पुरूष आपल्या आई-वडीलांना सोडून व आपल्या पत्नीला जडून राहील. ती दोघे एकदेह होतील.’ म्हणून दोन व्यक्ति या दोन नाहीत तर एक आहेत. देवाने त्या दोघांना एकत्र जोडले आहे. म्हणून कोणाही व्यक्तिने त्यांना वेगळे करू नये.”
”परंतु उत्पत्तीच्या आरंभापासून देवाने त्यांना पुरूष व स्त्री असे निर्माण केले. या कारणामुळे पुरूष आपल्या आई-वडीलांना सोडून आपल्या पत्नीशी जडून राहील. आणि ती दोघे एकदेह होतील. म्हणून यापुढे ती दोन नाहीत तर एकदेह आहेत. यासाठी देवाने जे जोडले आहे, ते मनुष्याने तोडू करू नये.”
”त्याचप्रमाणे पश्चात्ताप करणाऱ्या एका पाप्याबद्दल देवाच्या दूतासमोर आनंद होतो हे मी तुम्हास सांगतो.
”तर तुमची पापे पुसून टाकली जावी, म्हणून पश्चात्ताप करा, व फिरा अशासाठी की विसाव्याचे समय प्रभूच्या समक्षतेपासून यावे;
”म्हणून त्यांना आपल्या शरीराचा त्यांचा त्यांच्यातच दुरुपयोग करण्यास देवानेदेखील त्यांना त्यांच्या अंतःकरणातील वासनांद्वारे अमंगळपणाच्या स्वाधीन केले. त्यांनी देवाच्या सत्याच्या ऐवजी असत्य घेतले आणि निर्माणकर्त्याच्या जागी निर्मितीची उपासना व सेवा केली. तो निर्माणकर्ता तर युगानुयुग धन्यवादित देव आहे. आमेन. या कारणामुळे देवाने त्यांना दुर्वासनांच्या स्वाधीन केले; कारण त्यांच्या स्त्रियांनीही आपला नैसर्गिक उपभोग सोडून अनैसर्गिक प्रकार स्वीकारले; आणि तसेच पुरुषांनीही स्त्रियांचा नैसर्गिक उपभोग सोडून ते आपल्या वासनांत एकमेकांविषयी कामसंतप्त होऊन पुरुषांनी पुरुषांशी अयोग्य कर्म केले आणि त्यांनी आपल्या संभ्रमाचे योग्य प्रतिफळ आपल्याठायी भोगले. आणि त्यांना देवाला स्मरणात ठेवणेही न आवडल्यामुळे देवाने त्यांना अनुचित गोष्टी करीत राहण्यास विपरीत मनाच्या स्वाधीन केले. ते सर्व प्रकारच्या अनीतीने, दुष्टतेने, लोभाने आणि कुवृत्तीने भरलेले असून मत्सर, खून, कलह, कपट, दुष्ट भाव, ह्यांनी पूर्ण भरलेले; कानगोष्टी करणारे, निंदक, देवद्वेष्टे, टवाळखोर, गर्विष्ठ, प्रौढी मिरवणारे, वाईट गोष्टी शोधून काढणारे, आई-वडीलांचा अवमान करणारे, निर्बुद्ध, वचनभंग करणारे, दयाहीन व निर्दय झाले. आणि या गोष्टी करणारे मरणाच्या शिक्षेस पात्र आहेत हा देवाचा न्याय त्यांना कळत असून ते त्या करतात एवढेच केवळ नाही, पण अशा गोष्टी करणार्यांना ते संमतीही देतात.
”अनीतिमानास देवाचे राज्य वतन मिळणार नाही, हे तुम्ही जाणत नाही काय? फसू नका; कोणीही व्यभिचारी, मूर्तिपुजक किंवा व्यभिचारी, विपरीत संभोग करू देणारे किंवा विपरीत संभोग करणारे, चोर, लोभी, दारूबाज, निंदा करणारे किंवा लुबाडणारे ह्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. आणि तुम्ही कित्येकजण तसे होता; पण तुम्ही धुतले गेला आहा, तुम्ही पवित्र केले गेला आहात आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने व आपल्या देवाच्या आत्म्याकडून तुम्ही नीतिमान ठरवले गेला आहात.
”आणि आपल्याला हे ठाऊकच आहे की, नियमशास्त्र हे नीतिमान लोकांसाठी केलेले नाही तर आज्ञाभंग करणाऱ्या आणि विद्रोही, पापी, भक्तिहीन, अधर्मी, अशुद्ध, वडिलांना ठार मारणारे व आईला ठार मारणारे, मनुष्यघातक जारकर्मी, समलैंगीक, मनुष्यांचा व्यापार करणारे, खोटारडे, खोटी शपथ वाहणारे यांच्यासाठी आहे आणि शुद्ध शिकवणीविरुद्ध जर काही दुसरे असेल तर त्यासाठीही आहे.
”कारण जर देवाने पाप करणार्या देवदूतांनाही राखले नाही पण नरकात लोटून, गडद काळोखाच्या खाडयात न्यायासाठी अटकेत ठेवले; जर त्याने पहिले जग राखले नाही पण अभक्तांच्या त्या जगावर जलप्रलय आणून, नीतिमत्त्वाचा उपदेशक नोहा ह्यालाच केवळ इतर सात जणांसहित सुरक्षित ठेवले; जर त्याने सदोम व गमोरा या नगरांची राख करून त्यांना नाशाची शिक्षा दिली व पुढे जे लोक अभक्तीने वागतील त्यांच्यासाठी त्यांचे उदाहरण ठेवले, आणि तेथील दुराचार्यांचे, कामातुरपणाचे वागणे पाहून त्रस्त झालेल्या नीतिमान लोटाला त्याने सोडवले; कारण तो नीतिमान मनुष्य त्यांच्यात राहून पाहत असता व ऐकत असता, त्यांच्या स्वैराचाराची कृत्ये पाहून, दिवसानुदिवस, त्याच्या नीतिमान जिवाला यातना होत होत्या; तर जे धार्मिकांना त्यांच्या परीक्षेतून कसे सोडवावे व जे अनीतिमान लोकांस शिक्षा भोगत न्यायाच्या दिवसासाठी कसे राखून, ठेवावे हे प्रभूला कळते. विशेषतः अमंगळपणाच्या वासनेने देहोपभोगाच्या पाठीस लागणारे व अधिकार तुच्छ मानणारे ह्यांना कसे राखून ठेवावे हे प्रभूला कळते. स्वैर, स्वच्छंदी असे हे लोक, सत्तांविषयी वाईट बोलण्यात हे कचरत नाहीत.
”कित्येक लोक ज्याला उशीर म्हणतात तसा उशीर प्रभू आपल्या वचनाविषयी करीत नाही. तर तो तुमच्याविषयी फार सहनशील आहे. कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चात्ताप करावा अशी आहे.
”आणि ज्या देवदूतांनी आपले अधिकारपद न सांभाळता आपले स्वतःचे योग्य वस्तीस्थान सोडले त्यांना त्याने सर्वकाळच्या बंधनामध्ये निबीड काळोखामध्ये महान दिवसाच्या न्यायाकरिता राखून ठेवले आहे; सदोम व गमोरा आणि त्यांच्या आसपासची इतर नगरे, ह्यांनी त्यांच्याप्रमाणेच जारकर्मे केली व परदेहाच्या मागे लागली आणि ती उदाहरण म्हणून, सर्वकाळच्या अग्नीची शिक्षा भोगीत ठेवली आहेत. तसेच हे, स्वप्न पाहणारेही देहाला विटाळवतात, ते अधिकार तुच्छ मानतात व स्वर्गदुतांची निंदा करतात.
”पण भेकड, अविश्वासू, अमंगळ, खुनी, जारकर्मी, चेटकी, मूर्तिपुजक आणि सगळे लबाड ह्यांना अग्नीने आणि गंधकाने जळणार्या सरोवरात वाटा मिळेल; हे दुसरे मरण होय.”
”