09 – पश्चाताप

हे सर्वशक्तिमान देवाचे पवित्र शब्द आहेत.
माणसांच्या बोलण्यात आपल्याला रस नसतो.
देवावर प्रेम करणार् या प्रत्येकासाठी... याबद्दल देव असे म्हणतो: पश्चाताप.

शीर्ष 3 सर्वात महत्वाचे श्लोक

नाही, मी तुम्हास सांगतो जर तुम्ही पश्चात्ताप केला नाही तर तुम्ही सर्वजण त्यांच्यासारखे मराल.”

जर तुझा उजवा हात तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करीत असेल तर तो तोडून टाक. दोन हात असून नराकात न विझणाऱ्या अग्नीत जाण्यापेक्षा एक हात नसून जीवनात जाणे बरे.

कित्येक लोक ज्याला उशीर म्हणतात तसा उशीर प्रभू आपल्या वचनाविषयी करीत नाही. तर तो तुमच्याविषयी फार सहनशील आहे. कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चात्ताप करावा अशी आहे.

कॅनोनिकल क्रमातील प्रत्येक श्लोक - 517 परिच्छेद

परमेश्वराने मनुष्याला ही आज्ञा दिली; परमेश्वर म्हणाला, “बागेतील कोणत्याही झाडाचे फळ तू खुशाल खाऊ शकतो. परंतु बऱ्यावाईटाचे ज्ञान करुन देणाऱ्या झाडाचे फुळ तू खाऊ नको; जर त्या झाडाचे फळ तू खाशील तर तू नक्की मरशील.”

अब्राम नव्याण्णव वर्षांचा झाला तेव्हा परमेश्वर त्याच्याशी बोलला परमेश्वर म्हणाला, “मी सर्वशक्तिमान देव आहे; माझ्यासाठी पुढील प्रमाणे गोष्टी कर: माझ्या आज्ञा पाळ, आणि योग्य मार्गाने चाल व सात्विकतेने राहा.

मग मोशे लोकांना म्हणाला, “भिऊ नका! कारण परमेश्वर तुम्हावर प्रीती करतो हे दाखविण्यासाठी आणि तुम्ही त्याचा मान राखून त्याचे भय धरावे व पाप करु नये हे दाखविण्यासाठी तो आला आहे.”

तेव्हा मोशे छावणीच्या दाराजवळ उभा राहिला आणि म्हणाला, “ज्या कोणाला परमेश्वराच्या मागे यावयाचे असेल, त्याने मजकडे यावे,” आणि लगेच लेवी वंशाचे सर्व लोक मोशेकडे पळत गेले.

त्या माणसाने यज्ञपशूच्या डोक्यावर आपला हात ठेवावा म्हणजे तो पशू त्याच्याबद्दल प्रायश्चित म्हणून मान्य होईल.

तो अशा कोणत्याही गोष्टीविषयी दोषी ठरला तर त्याने पाप केलेली बाब कबूल करावी;

मग याजकाने तो मेंढा घेऊन परमेश्वरासमोर जावे व त्या माणसासाठी प्रायश्चित करावे; आणि मग ज्या अपराधामुळे तो दोषी ठरला असेल त्याची त्याला देव क्षमा करील.”

ह्या प्रकारे त्याने इस्राएल लोकांची अशुद्धता, त्यांचे अपराध व त्यांची पापे ह्या सर्वोबद्दल परमपवित्रस्थान पवित्र करावे; आणखी अशुद्ध लोकांच्या परिसरात मध्यभागी वसत असलेल्या दर्शनमंडपासाठीही त्याने असेच करावे.

कारण त्या दिवशी तुम्ही पापापासून शुद्ध व्हावे म्हणून याजक तुमच्यासाठी प्रायश्चित करील, मग परमेश्वरासमोर तुम्ही पापापासून शुद्ध ठराल.

कारण शरीराचे जीवन रक्तात असते आणि ते वेदीवर ओतण्याविषयी मी विधीनियम लावून दिले आहेत; तुम्ही घेतलेल्या जिवाच्या भरपाईबद्दल ते रक्त वेदीवर मला दिले पाहिजे; तुमच्या जिवाबद्दल प्रायश्चितासाठी ते वेदीवर ओतले पाहिजे.

“म्हणून पावन व्हा! आपणास पवित्र करा! कारण मी तुमचा देव परमेश्वर आहे!

त्या दिवशी तुम्ही कसलेही कामकाज करु नये कारण तो प्रायश्चिताचा दिवश आहे; त्या दिवशी तुमच्या परमेश्वरासमोर तुमच्यासाठी प्रायश्चित करण्यात येईल. “त्या दिवशी जो माणूस काही न खाता आपल्या जिवास दंडन करुन आपणाला नम्र करणार नाही त्याला आपल्या लोकांतून बाहेर टाकावे.

“परंतु कदाचित् ते आपली पापे व आपल्या वाडवडीलांची पापे कबूल करतील. ते माझ्याविरुद्ध गेले हेही ते कदाचित् कबूल करतील. त्यांनी माझ्याविरुद्ध पाप केले हेही ते कदाचित् मान्य करतील.

“इस्राएल लोकांना हे सांग की एखादा पुरुष वा स्त्री दुसऱ्याचा अपराध करील तर खरे पाहता तो परमेश्वराविरुद्धच पाप करील व म्हणून तो दोषी ठरेल.

लोक मोशेकडे आले आणि म्हणाले, “आम्ही तुझ्या विरुद्ध आणि परमेश्वराविरुद्ध बोललो तेव्हा आम्ही पाप केले हे आम्हाला माहीत आहे. तू परमेश्वराची प्रार्थना कर. हे साप आमच्या मधून काढून टाक.” तेव्हा मोशेने लोकांसाठी परमेश्वराची प्रार्थना केली.

2परंतु तेथूनही तुम्ही परमेश्वराला, आपल्या देवाला काया वाचा मने शरण गेलात तर तो तुम्हाला पावेल. या सर्व गोष्टी घडतील, तुम्ही संकटात असाल तेव्हा तुम्ही पुन्हा त्याच्या कडेच परतून याल व त्याला शरण जाल. आपला परमेश्वर देव दयाळू आहे. तो तुम्हाला अंतर देणार नाही. तो तुमचा सर्वनाश होऊ देणार नाही. तो तुमच्या पूर्वजांशी त्याने केलेला पवित्रकरार तो विसरणार नाही.

“तेव्हा परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे आपले आचरण राहील याची खबरदारी घ्या. त्यालाच अनुसरा.

आणि आपला देव परमेश्वर ह्यावर संपूर्ण अंत:करणाने, संपूर्ण मनाने व संपूर्ण शक्तीने प्रेम करा. मी आज दिलेल्या आज्ञा तुमच्या कायम लक्षात असू द्या. त्या आपल्या मुलाबाळांनाही शिकावा. घरी, दारी, झोपता-उठताना, त्याविषयी बोलत राहा. त्या लिहून आठवणीसाठी हाताला बांधा व कपाळावर चिकटवा. दरवाजाच्या खांबांवर व फाटकांवर त्या लिहून ठेवा.

त्यामा आदर ठेवा व त्याचीच सेवा करी. शपथ घेताना त्याच्या नावाने शपथ वाहा, खोट्या देवांच्या नावाने घेऊ नका.

कारण हे लोक तुमच्या मुलांना माझ्यापासून विचलीत करतील. त्यामुळे तुमची मुले अन्य दैवतांचे भजनपूजन करतील. अशाने परमेश्वराचा तुमच्यावर कोप होईल व तो तात्काळ तुमचा नाश करील.खोट्या देवांचा नाश करा “त्या देशात तुम्ही असे करा. त्यांच्या वेद्या पाडून टाका. त्यांचे स्मारकस्तंभ फोडून टाका. अशेरा दैवताचे स्तंभउपटून टाका, मूर्ती जाळून टाका. कारण तुम्ही परमेश्वराची पवित्र प्रजा आहात. जगाच्या पाठीवरील सर्व लोकांमधून त्याने आपली खास प्रजा म्हणून तुमचीच निवड केली आहे.

तुमचा देव परमेश्वर ह्याच्याशी विश्वासू असा.

तुमचा देव परमेश्वर तुम्हाला व तुमच्या पूर्वजांना आपल्याकडे वळवील आणि त्याच्यावर तुम्ही मन:पूर्वक प्रेम कराल व सुखाने जगाल.

तेव्हां इस्त्राएलाच्या संतानानी परमेश्वराला म्हटलें, ''आम्ही पाप केलें आहें; जें सर्व तुला बरें वाटेल, त्याप्रमाणें तूं आम्हास कर; केवळ आजच्या दिवसीं अगत्य आम्हास सोडीव.''

माझे आचरण शुध्द आणि निर्दोष आहे.

हे काम पार पाडल्यावर मात्र दावीदाला मनोमन लाज वाटली. तो परमेश्वराला म्हणाला, “माझ्याहातून हे मोठे पाप घडले आहे. या माझ्या अपराधाबद्दल मला क्षमा कर. माझा हा मोठाच मूर्खपणा झाला आहे.”

शलमोन म्हणाला, “हे इस्राएलच्या परमेश्वर देवा, तुझ्या सारखा दुसरा कोणी आकाशात किंवा पृथ्वीतलावर नाही. तू हा करार केलास कारण तुझे आमच्यावर प्रेम आहे. तू आपला करार पाळतोस. जे तू दाखवलेल्या मार्गाने जातात त्यांच्याविषयी तू दयाळू आणि एकनिष्ठ असतोस.

असे कधी झाल्यास, एकाने जरी आपल्या पापाची कबुली दिली व मंदिराकडे हात पसरुन क्षमा याचना केली. तरी त्याची प्रार्थना ऐक. आपल्या स्वार्गातील निवासस्थानातूनच ती ऐकून त्यांना क्षमा कर आणि मदत कर. लोकांच्या मनात काय आहे हे तूच फक्त जाणतोस. तेव्हा प्रत्येकाचा योग्य न्यायनिवाडा कर.

पृथ्वीवरील समस्त लोकहो, परमेश्वराचे स्तवन करा. परमेश्वराने आपल्याला वाचवल्याची शुभवार्ता रोज सर्वांना सांगा.

“आणि शलमोना, माझ्या मुला, आपल्या वडीलांच्या देवाला जाणून घे. शुध्द मनाने देवाची सेवा कर. देवाच्या सेवेत मनोमन आनंद मान. कारण परमेश्वरच सर्वांच्या अंत:करणाचा ठाव घेतो. आपले सर्व विचार त्याला कळतात. आपण मदतीसाठी परमेश्वराकडे गेलो तर आपल्याला उत्तर मिळते. पण परमेश्वराकडे पाठ फिरवली तर मात्र तो आपल्याला कायमचा सोडून जातो.

“पाप कोणाच्या हातून होत नाही? तेव्हा लोक तुझ्या विरुध्द पाप करतील तेव्हा तुझा त्यांच्यावर कोप होईल. तू शत्रूंकरवी त्यांचा पाडाव करशील, बंदी म्हणून त्यांना बळजबरीने इथून दूरच्या किंवा एखाद्या जवळच्या ठिकाणी नेले जाईल. पण तिथे त्यांचे ह्दयपरिवर्तन होऊन, परभूमीत कैदी होऊन पडलेले ते महणतील, ‘आम्ही चुकलो, आमच्या हातून पाप घडले आहे. आम्ही दुराचरण केले आहे.’ असतील तिथून ते अंतरीच्या उमाळ्याने तुला शरण येतील. या देशाच्या तू त्याच्या पूर्वजांना दिलेल्या देशाच्या दिशेने आणि तू निवडलेल्या नगराच्या दिशेने पाहात ते प्रार्थना करतील. तुझ्या नावाखातर मी बांधलेल्या या मंदिराच्या दिशेने पाहात ते प्रार्थना करतील. असे होईल तेव्हाही तू तुझ्या स्वर्गातील निवासस्थानातून ऐक. त्यांच्या विनवणीला कान दे, त्यांना मदत कर. ज्यांनी तुझ्या विरुध्द पाप केले आहे अशा तुझ्या लोकांना क्षमा कर.

नंतर एकदा रात्री परमेश्वराने शलमोनाला दर्शन दिले. तो शलमोनाला म्हणाला, “शलमोना तुझी प्रार्थना मी ऐकली आहे. हे स्थळ यज्ञगृह म्हणून मी निवडले आहे. कधी जर मी पर्जन्यवृष्टी होऊ नये म्हणून आकाशमार्ग बंद केला, धान्य फस्त करायला टोळधाड पाठवली किंवा रोगाराईचा प्रसार केला आणि अशावेळी लोकांनी नम्र होऊन माझा धावा करुन माझ्या दर्शनाची इच्छा बाळगली, दुराचाराचा त्याग केला तर मी स्वार्गातून त्यांच्या हाकेला ओ देईन. त्यांना त्यांच्या पापाची क्षम करीन आणि त्यांची भूमी संकटमुक्त करीन. आता माझी दृष्टी या ठिकाणी वळलेली आहे. इथे होणाऱ्या प्रार्थना ऐकायला माझे कान उत्सुक आहेत.

तिथे त्यांनी जिवाभावाने परमेश्वर देवाची सेवा करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांच्या पूर्वजांचाही देव हाच होता.

हे ऐकून मी उद्विग्र झालो. माझी मन:स्थिती प्रकट करायला मी माझा अंगरखा आणि वस्त्रे फाडली. डोक्यावरचे आणि दाढीचे केस उपटले. माझ्या मनाला धक्का बसल्यामुळे अस्वस्थ होऊन मी खाली बसलो. तेव्हा देवाच्या आज्ञा मानणाऱ्या सर्व लोकांचा भीतीने थरकाप झाला. बंदिवासातून आलेले इस्राएली लोक देवावर निष्ठा असणारे नव्हते म्हणून ते घाबरले; मला ही धक्का बसला; संध्याकाळच्या होमार्पणांची वेळ होईपर्यंत मी तिथे बसून राहिलो; सर्वजण माझ्याभोवती जमले. होमार्पणांची वेळ झाली तेव्हा मी उठलो; अंगावरची वस्त्रे आणि अंगरखा फाटलेला अशा स्थितीत मी गुडघे टेकून हात पसरुन देवापुढे बसलो. मी अतिशय लज्जित अशा अवस्थेत होतो.

एज्रा प्रार्थना करत असताना आणि पापांची कबुली देत असताना मंदिरापुढे पडून आक्रोश करत होता त्यावेळी इस्राएली बायका-पुरुष, मुले यांचा मोठा समुदाय त्याच्या भोवती जमला होता ते ही सर्वजण आक्रंदन करत होते

यरुशलेमच्या लोकांची आणि नगराच्या तटबंदीची ही हकीकत ऐकून मी अत्यंत उद्विग्न झालो. मी खाली बसलो व रडू लागलो. मला अतिशय दु:ख झाले. कित्येक दिवस मी उपवास केला आणि स्वर्गातील देवाची प्रार्थना केली. मी पुढीलप्रमाणे प्रार्थना केली.हे परमेश्वरा, स्वर्गातील देवा, तू मोठा सर्वशक्तीमान देव आहेस. तुझ्यावर प्रेम करणाऱ्या आणि तुझ्या आज्ञा पाळणाऱ्या लोकांशी केलेला प्रेमाचा करार पाळणारा तू परमेश्वर आहेस. तुझा सेवक अहोरात्र तुझी प्रार्थना करत आहे, ती तू कृपा करून डोळे आणि कान उघडे कर व ऐक. तुझ्या सेवकांच्या म्हणजेच इस्राएलींच्या वतीने मी प्रार्थना करत आहे. आम्ही इस्राएलींनी तुझ्याविरुध्द जी पापे केली त्यांची मी कबुली देत आहे. मी कबुल करतो की मी तुझ्याविरुध्द पाप केले तसेच माझ्यावडीलांच्या घराण्यातील लोकांनीही केले. आम्हा इस्राएलींची वर्तणूक तुझ्या दृष्टीने वाईट होती. तुझा सेवक मोशे याला तू दिलेल्या आज्ञा, शिकवण आणि नियम यांचे पालन आम्ही केले नाही.

मग ह्या सर्व लोकांनी देवापुढे विशेष शपथ घेतली. आणि जर आपण ही शपथ पाळली नाही तर दुर्घटना घडू देत अशी त्यांनी मागणी केली. या सर्व लोकांनी देवाचे नियमशास्त्र पाळायची शपथ वाहिली. देवाचे हे नियमाशास्त्र आम्हाला त्यांचा सेवक मोशे याच्या कडून मिळालेले आहे. या लोकांनी आपल्या परमेश्वराच्या देवाच्या सर्व आज्ञा, नियम, आणि शिकवण यांचे काळजीपूर्वक पालन करण्याचे वचन दिले. हे वचन पुढील लोकांनी दिले. वरिल लोकांखेरीज उरलेले सर्व लोक याजक, लेवी, द्वारपाल, गायक, मंदिराचे सेवक आणि अवतीभवतीच्या इतर लोकांपासून वेगळे झालेले इस्राएलमधील सर्व लोक देवाचे नियमशास्त्र पाळण्यासाठी ते आपण होऊन वेगळे झाले. त्याचबरोबर त्यांच्या सर्व बायका, आणि सावधानपणे ऐकू शकतील आणि समजू शकतील असे त्यांचे सर्व मुलगे आणि मुली. या सर्व लोकांनी आपले बांधव आणि महत्वाच्या व्यक्तर्ीसमवेत देवाचे नियमशास्त्र पाळण्याची शपथ घेतली. आणि जर आपण देवाचे हे नियमशास्त्र पाळले नाही तर आपल्यावर अरिष्टे कोसळण्यासबंधीचा शापही त्यांनी स्वीकारला.

मी किती पापे केली आहेत? मी काय चुका केल्या आहेत? तू मला माझी पापे आणि माझ्या चुका दाखव. देवा, तू मला का चुकवीत आहेस? आणि मला शत्रूसारखे का वागवीत आहेस?

मी जेव्हा माझे शरीर सोडून जाईन तेव्हा आणि माझी कातडी नष्ट होईल तेव्हा सुध्दा मी देवाला पाहू शकेन.

जर देव योग्य तागडी वापरेल तर त्याला समजेल की मी निरपराध आहे.

नंतर तो लोकांना कबुली देईल. तो म्हणेल, ‘मी पापकर्म केले. मी चांगल्याचे वाईट केले. पण देवाने मला जितकी वाईट शिक्षा करायला हवी होती तितकी केली नाही. देवाने माझ्या आत्म्याला मृत्युलोकात जाण्यापासून वाचवले. आता मी पुन्हा आयुष्य उपभोगू शकतो.’

“परमेश्वरा, मी तुझ्याबद्दल पूर्वी ऐकले होते. परंतु आता मी माझ्या डोळ्यांनी तुला बघतो आहे. आणि परमेश्वरा आता मलाच माझी लाज वाटते. मला पश्चात्ताप होत आहे. मी आता धुळीत आणि राखेतबसून माझे मन आणि माझे आयुष्य बदलण्याचे वचन देत आहे.”

परमेश्वर आपल्या चांगल्या माणसांचे ऐकतो हे तुम्हाला माहीत आहे म्हणून मी जेव्हा जेव्हा त्याची प्रार्थना करतो तेव्हा तेव्हा तो माझे एकतो.

परंतु परमेश्वर अनंत काळ राज्य करतो. त्याने त्याचे राज्य सामर्थ्यवान बनवले आहे, हे त्याने जगात न्यायव्यवस्था यावी म्हणून केले. परमेश्वर पृथ्वीवरील सर्वांनाच न्यायाने वागवतो आणि सर्व देशांनाही तो एकाच मापाने तोलतो.

ज्या लोकांना तुझे नाव माहीत आहे ते तुझ्यावर विश्वास ठेवतात. परमेश्वरा, जर लोक तुझ्याकडे आले, तर त्यांना मदत केल्याशिवाय परत पाठवू नकोस.

परमेश्वरा, मी तुझ्या प्रेमाखातर तुझ्या मदतीची अपेक्षा केली. तू मला वाचवलेस आणि मला सुखी केलेस.

मी त्याच्या समोर स्वत ला शुध्द आणि निरपराध राखले. मी वाईट गोष्टींपासून स्वतला राखले.

मला मार्ग दाखव आणि मला तुझे सत्य शिकव तू माझा देव आहेस, माझा तारणारा आहेस मी रोज तुझ्यावर विश्वास टाकतो.

माझे पाप आणि तरुणपणी मी ज्या वाईट गोष्टीकेल्या त्या लक्षात ठेवू नकोस परमेश्वरा, तुझ्या चांगल्या कीर्तीसाठी माझी प्रेमाने आठण ठेव.

परमेश्वरा, माझ्या यातांनकडे व संकटांकडे पाहा. मला माझ्या सर्व पापांबद्दल क्षमा कर.

परमेश्वाराची स्तुती करा आणि त्याच्या नावाचा आदर करा. तुमच्या खास कपड्यात त्याची उपासना करा.

परमेश्वरा आम्ही विश्वास ठेवू शकू असा देव तूच आहेस. मी माझे आयुष्य तुझ्या हाती सोपवले. मला तार!

ज्याच्या अपराधांना क्षमा केली गेली आहे तो अत्यंत सुखी आहे ज्याचे अपराध पुसले गेले आहेत तो फार सुखी आहे.

परंतु नंतर मी परमेश्वरा पुढे माझे अपराध कबूल करण्याचा निर्णय घेतला. परमेश्वरा, मी तुला माझे अपराध सांगितले. आणि तू मला माझ्या सर्व अपराधांबद्दल क्षमा केलीस.

पृथ्वीवरील प्रत्येकाने परमेश्वराची भीती बाळगली पाहिजे आणि त्याला मान दिला पाहिजे या जगात राहणाऱ्या प्रत्येकाने त्याला भ्यायला पाहिजे.

परमेश्वर चांगल्या लोकांचे रक्षण करतो. तो त्यांची प्रार्थना ऐकतो. परंतु परमेश्वर वाईट कृत्ये करणाऱ्या लोकांच्या विरुध्द आहे. तो त्यांचा सर्वनाश करतो. परमेश्वराची प्रार्थना करा, तो तुमचे ऐकेल. तो तुम्हाला तुमच्या सर्व संकटांतून वाचवेल. काही लोकांवर खूप संकटे येतात आणि ते गर्व करायचे थांबवतात. परमेश्वर अशा लोकांच्या जवळ असतो. तो त्या विनम्र लोकांचे रक्षण करतो.

परमेश्वर त्याच्या सेवकांच्या आत्म्यांना वाचवतो. ते लोक त्याच्यावर अवलंबून असतात तो त्यांचा विनाश होऊ देणार नाही.

परमेश्वरा, मी ज्या वाईट गोष्टी केल्या त्याबद्दल तुला सांगितले. मला माझ्या दुष्कर्माबद्दल दु:ख होत आहे.

मी म्हणालो, “परमेश्वरा, माझ्यावर दया कर. मी तुझ्या विरुध्द पाप केले, पण मला क्षमा कर आणि मला बरे कर.”

देवा, माझ्यावर दया कर, तुझ्या अतिशय प्रेमळ दयाळूपणाने आणि तुझ्या कृपेने माझी पापे पुसून टाक. देव माझे अपराधीपण खरवडून घालवून टाक. माझी पापे धुऊन टाक, मला पुन्हा स्वच्छ कर. मी पाप केले हे मला माहीत आहे. ती पापे मला नेहमी दिसतात. तू ज्या गोष्टी चुकीच्या आहेत असे सांगतोस त्याच मी केल्या. देवा मी तुझ्याविरुध्द पाप केले. मी त्या पापांची कबुली देतो म्हणजे लोकांना कळेल की मी चुकलो आणि तू बरोबर होतास. तुझे निर्णय योग्य आहेत.

मला शुध्द करण्यासाठी तू एजोब वनस्पती वापर आणि विधी कर. मला आंघोळ घाल म्हणजे मी बफर्पोक्षा शुभ्र होईन.

माझ्या पापांकडे बघू नकोस, ती पुसून टाक. देवा माझ्यात पवित्र ह्दय निर्माण कर. माझा आत्मा पुन्हा बलशाली कर. मला दूर लोटू नकोस आणि तुझा पवित्र आत्मा माझ्यातून काढून घेऊ नकोस.

देवा, मी मूर्खासारखा वागलो ते तुला माहीत आहे. मी माझी पापे तुझ्यापासून लपवून ठेवू शकत नाही.

देवा, तू खूप काळापासून आमचा राजा आहेस या देशात लढाया जिंकायला तू आम्हाला मदत केलीस.

त्यांनी देवाबरोबर झालेला त्यांचा करार पाळला नाही. त्यांनी त्याची शिकवण आचरायला नकार दिला.

देवा, कृपा करुन आमच्या पूर्वजांनी केलेल्या पापाची शिक्षा आम्हाला करु नकोस. आम्हांला लवकरात लवकर तुझी दया दाखव. आम्हांला तुझी खूप खूप गरज आहे. देवा, रक्षणकर्त्या, आम्हाला मदत कर. आम्हाला वाचव त्यामुळे तुझ्या नावाला गौरव प्राप्त होईल. आमची पापे तुझ्या नावाच्या भल्यासाठी पुसून टाक.

प्रभु, तू चांगला आणि दयाळू आहेस. तुझी माणसे तुला मदतीसाठी हाका मारतात, तू त्या माणसांवर खरोखरच प्रेम करतो.

परमेश्वर सहानुभूतिपूर्ण आणि दयाळू आहे. देव सहनशील आणि प्रेमाचा सागर आहे.

आम्ही देवाविरुध्द पाप केले पण त्याने आम्हाला त्या पापाला साजेशी शिक्षा केली नाही. देवाचे त्याच्या भक्तांबद्दलचे प्रेम हे स्वर्ग पृथ्वीव रजितक्या उंचीवर आहे तितके आमच्यावर आहे. आणि देवाने आमची पापे पूर्व आणि पश्चिम एकमेकींपासून जितक्या अंतरावर आहेत तितक्या अंतरावर नेऊन ठेवली.

परंतु परमेश्वराने त्याच्या भक्तांवर नेहमीच प्रेम केले आणि तो सदैव त्याच्या भक्तांवर प्रेम करीत राहाणार आहे. देव त्यांच्या मुलांशी आणि मुलांच्या मुलांशीदेखील चांगला वागणार आहे. जे लोक देवाचा करार पाळतात त्यांच्याशी देव चांगला असतो. जे त्याच्या आज्ञा पाळतात त्यांच्याशी देव चांगला असतो. देवाचे सिंहासन स्वर्गात आहे आणि तो सर्वांवर राज्य करतो.

आम्ही आमच्या पूर्वजांसारखेच पाप केले. आम्ही चुकलो. आम्ही दुष्कृत्ये केली.

शहाणपणाची सुरुवात देवाबद्दलच्या भीतीने आणि आदराने होते. जे लोक देवाचे आज्ञाधारक असतात ते शहाणे असतात. देवाला सदैव स्तुतिगीते गायली जातील.

परमेश्वरा, आम्हाला कुठलाही सन्मान मिळायला नको. सन्मान तुझा आहे, तुझ्या प्रेमामुळे आणि आमच्या तुझ्यावर असलेल्या विश्वासामुळे सन्मान तुझा आहे.

शुध्द आयुष्य जगणारे लोक सुखी आहेत. ते लोक परमेश्वराची शिकवण पाळतात. जे लोक परमेश्वराचा करार पाळतात ते सुखी आहेत. ते परमेश्वराच्या आज्ञा मानापासून पाळतात. ते लोक वाईट गोष्टी करीत नाहीत. ते परमेश्वराच्या आज्ञा पाळतात.

मी काळजीपूर्वक तुझी शिकवण अभ्यासतो. का? म्हणजे मी तुझ्याविरुध्द पाप करणार नाही.

लोक तुझ्या शिकवणुकी प्रमाणे वागत नाहीत म्हणून मी अश्रूंच्या नद्या वाहवल्या आहेत.

इस्राएल, परमेश्वरावर विश्वास ठेव.

जे लोक त्याची प्रार्थना करतात त्यांच्या बरोबर परमेश्वर आनंदी असतो. जे लोक त्याच्या खऱ्या प्रेमावर विश्वास ठेवतात त्यांच्याबरोबर देव आनंदी असतो.

पहिली गोष्ट म्हणजे माणसाने परमेश्वराला मान दिला पाहिजे आणि त्याची आज्ञा पाळली पाहिजे. नंतर त्याला खरे ज्ञान मिळायला सुरुवात होईल. पण ज्या लोकांना पाप आवडते ते शहाणपणाचा आणि योग्य शिकवणीचा तिरस्कार करतात.

परमेश्वरावर संपूर्ण विश्वास ठेव. तुझ्या स्वत:च्या ज्ञानावर अवलंबून राहू नकोस. तू जी प्रत्येक गोष्ट करशील ती करताना देवाचा विचार कर. म्हणजे तो तुला मदत करील. तुझ्या स्वत:च्या शहाणपणावर अवलंबून राहू नकोस. पण परमेश्वराला मान दे आणि वाईट गोष्टींपासून दूर राहा.

दुष्ट लोक जो मार्ग आचरतात त्यावरुन जाऊ नका. तसे जगू नका. त्यांच्यासारखे व्हायचा प्रयत्न करु नका. वाईटापासून दूर राहा. त्याच्या जवळ जाऊ नका. त्याच्या जवळून सरळ निघून जा.

जर एखादा माणूस परमेश्वराला मान देत असला तर तो वाईटाचा तिरस्कार करेल. मी (ज्ञान) गर्वाचा आणि जे लोक इतरांपेक्षा स्वत:ला मोठे समजतात अशा लोकांचा तिरस्कार करते. मी वाईट मार्ग आणि खोटे बोलणाऱ्या तोंडांचा तिरस्कार करते.

जर एखाद्याने देवाच्या शिकवणुकीकडे लक्ष द्यायला नकार दिला तर देव त्याची प्रार्थना ऐकायला नकार देईल.

माणसाने जर त्याची पापे लपवायचा प्रयत्न केला तर तो कधीही याशस्वी होणार नाही. पण जर त्याने त्याच्या पापांची कबुली दिली आणि लोकांना सांगितले की त्याचे चुकले तर देव आणि इतर लोक त्याला दया दाखवतील. जर एखाद्याने नेहमी परमेश्वराचा आदर केला तर त्याला आशीर्वाद मिळेल. पण जर तो हट्टी असला आणि त्याने परमेश्वराचा आदर करायला नकार दिला तर त्याच्यावर संकटे येतील.

या पृथ्वीवर सदैव चांगल्या गोष्टी करणारा आणि कधीही पाप न करणारा असा माणूस नाही.

आता या पुस्तकांतलिहिलेल्या सर्व गोष्टींकडून तुम्ही काय शिकणार आहात? माणसाला करता येण्यासारखी सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे देवाला मान देणे आणि त्याच्या आज्ञा पाळणे. का? कारण देवाला लोक करतात त्या सर्व गुप्त गोष्टी सुध्दा माहीत असतात. त्याला सर्व चांगल्या आणि वाईट गोष्टीं विषयी माहिती असते. लोकांनी केलेल्या गोष्टींचा तो न्यायनिवाडा करील.

“शुचिर्भूत व्हा. स्वच्छ व्हा. तुमची दुष्कृत्ये थांबवा. मला वाईट गोष्टी बघायच्या नाहीत. चुकीचे वागू नका.

परमेश्वर म्हणातो, “या, आपण या गोष्टींची चर्चा करू या. तुमची पातके कितीही काळीकुट्ट (शब्दश: शेंदरासारखी लाल) असली तरी ती धुता येतील आणि तुम्ही हिमाप्रमाणे पांढरेशुभ्र व्हाल. जरी तुमची पापे लाल असली तरी तुम्ही शुभ्र लोकरीसारखे व्हाल.

ते लोक चांगल्या गोष्टी वाईट आहेत व वाईट गोष्टी चांगल्या आहेत असे म्हणतात. ते प्रकाशाला अंधार व अंधाराला प्रकाश समजतात. त्यांना आंबट गोड लागते व गोड आंबट लागते. ते स्वत:ला फार चलाख समजतात. त्यांना वाटते आपण फार बुध्दिमान आहोत.

त्या निखांऱ्याचा स्पर्श त्याने माझ्या तोंडाला केला नंतर तो देवदूत म्हणाला, “हे बघ! ह्या निखाऱ्याच्या स्पर्शाने तुझी सर्व दुष्कृत्ये नाहिशी झाली आहेत. तुझी पापे आता पुसली गेली आहेत.”

मी, परमेश्वराने, तुला योग्य गोष्टी करण्यासाठी बोलाविले आहे. मी तुझा हात धरीन आणि तुझे रक्षण करीन. मी लोकांबरोबर केलेल्या कराराची तू खूण असशील. सर्वाना प्रकाश देणाऱ्या दिव्यासारखा तू असशील.

“मी, आणि फक्त मीच तुझी पापे धुतो. मी हे माझ्या आनंदासाठी करतो. मी तुझी पापे लक्षात ठेवणार नाही. पण तू मात्र माझी आठवण ठेवावीस आपण एकत्र येऊन योग्य काय ते ठरवावे. तू केलेल्या गोष्टी तू सांगाव्यास आणि त्या योग्य आहेत हे दाखवावे.

तुझी पापे मोठ्या ढगासारखी होती. पण मी ती सर्व पुसून टाकली. ढग हवेत विरून जातो तशी तुझी पापे दिसेनाशी झाली. मी तुला सोडविले आणि तुझे रक्षण केले. म्हणून तू माझ्याकडे परत ये.” परमेश्वराने महान गोष्टी केल्या म्हणून आकाश आनंदात आहे खोलवरची भूमीसुध्दा सुखात आहे. डोंगर गाण्यातून देवाचे आभार मानीत आहेत. रानातील सर्व वृक्ष आनंदात आहेत. का? कारण परमेश्वराने याकोबला वाचविले. परमेश्वराने इस्राएलसाठी फार मोठ्या गोष्टी केल्या.

त्या लोकांना माझ्याकडे यायला सांगा. ह्या सर्व गोष्टींबद्दल त्यांना एकत्रितपणे बोलू द्या.)“पुष्कळ वर्षांपूर्वी घडलेल्या गोष्टींबद्दल तुम्हाला कोणी सांगितले? फार पूर्वीपासून तुम्हाला या गोष्टी कोण सांगत आले आहे? मी, देवाने, एकमेव परमेश्वराने, तुम्हाला या गोष्टी सांगितल्या. मीच फक्त देव आहे. माझ्यासारखा आणखी दुसरा कोणी आहे का? चांगला दुसरा देव आहे का? दुसरा कोणी देव त्याच्या लोकांना वाचवितो का? नाही कोणीही दुसरा देव नाही. दूरदूरच्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांनी देवाचे अनुसरण करणे थांबवले. तुम्ही मला अनुसरावे व स्वत:चे रक्षण करून घ्यावे. मीच देव. दुसरा देव नाही. मीच फक्त देव आहे.

परमेश्वर त्याच्या लोकांचे रक्षण करील. ते आनंदाने सियोनला परततील. ते खूप खूप सुखी होतील. त्यांचे सुख त्यांच्या डोक्यांवरील मुकुटांप्रमाणे निरंतर राहील. ते आनंदाने गात राहतील. सर्व दु:ख कायमचे नाहीसे होईल.

पण आमच्या दुष्कृत्यांबद्दल त्याला दु:ख भोगावे लागले. आमच्या अपराधांमुळे तो भरडला गेला. आमचे कर्ज, आमची शिक्षा, त्याच्यावर लादली गेली. त्याने दु:ख सहन केले. म्हणून आम्ही बरे झालो. पण त्याने एवढे सगळे केल्यानंतरही आपण मेंढ्यांप्रमाणे भरकटत गेलो. आम्ही प्रत्येकजण स्वत:च्या मार्गाने गेलो परमेश्वराने आपल्याला अपराधातून मुक्त केल्यावर आणि आपले अपराध त्याच्या नावावर केल्यावर आपण असे वागलो.

म्हणून फार उशीर होण्याआधी परमेश्वराला शोधा. तो जवळ असतानाच त्याला बोलवा. दुष्टांनी दुष्टपणाने जगणे थांबवावे. त्यांनी वाईट विचार सोडून द्यावे. त्यांनी परमेश्वराला शरण यावे. मग परमेश्वर त्यांचे दु:ख हलके करील. आमचा देव क्षमाशील आहे म्हणून त्यांनी परमेश्वराला शरण जावे. परमेश्वर म्हणतो, “तुमचे विचार माझ्यासारखे नाहीत. तुमचे मार्ग माझ्या मार्गांसारखे नाहीत. स्वर्ग पृथ्वीपेक्षा उंच आहे. त्याचप्रमाणे माझे मार्ग आणि विचार तुमच्यापेक्षा उच्च आहेत.” परमेश्वर स्वत: असे म्हणाला.

देव अती उच्च व परम थोर आहे. देव चिरंजीव आहे. त्याचे नाव पवित्र आहे. देव म्हणतो, मी उंच आणि पवित्र जागी राहतो हे खरे पण मी दु:खी आणि लीन यांच्याबरोबरही असतो. मनाने नम्र असलेल्यांना आणि दु:खी लोकांना मी नवजीवन देईन.

परमेश्वराचा सेवक म्हणतो, “परमेश्वराने, माझ्या प्रभूने, त्याचा आत्मा माझ्यात घातला. गरीब लोकांना चांगली बातमी सांगण्यासाठी आणि दु:खी लोकांचे सांत्वन करण्यासाठी देवाने मला निवडले. बंदिवानांची आणि कैद्यांची मुक्तता झाली आहे हे सांगण्यासाठी देवाने मला पाठविले. परमेश्वराच्या कृपासमयाची घोषणा करण्यासाठी देवाने मला पाठविले. देव पापी लोकांना कधी शिक्षा करणार आहे हे त्यांना सांगण्यासाठी देवाने मला धाडले. दु:खी लोकांचे दु:ख हलके करण्यासाठी देवाने मला पाठविले. सियोनच्या दु:खी लोकांकडे देवाने मला पाठविले. मी त्यांना उत्सवासाठी तयार करीन. त्यांच्या डोक्यांवरची राख मी झटकून टाकीन आणि मी त्यांना मुकुट देईन. मी त्याचे दु:ख दूर करीन. त्यांना सुखाचे तेल देईन. मी त्यांचा शोक नाहीसा करीन आणि त्यांना सणासुदीची वस्त्रे घालायला देईन. देवाने मला त्या लोकांना ‘चांगले वृक्ष’ आणि ‘परमेश्वराची सुंदर रोपटी’ अशी नावे ठेवण्यासाठी पाठविले आहे.

आम्ही सगळे पापांनी मळीन झालो आहोत. आमचा सर्व चांगुलपणा जुन्या मळलेल्या कपड्यांप्रमाणे आहे. आम्ही सर्व पिकल्या पानांप्रमाणे आहोत. आमच्या पापांनी आम्हाला, वारा जसा पाचोळा दूर वाहून नेतो, तसे दूर नेले आहे.

मी स्वत:च सर्व गोष्टी निर्माण केल्या. मी घडविल्या म्हणून या सर्व गोष्टी येथे आहेत.” परमेश्वर असे म्हणाला, “मला सांगा, मी कोणत्या लोकांची काळजी घेतो? मी गरीब आणि नम्र लोकांची काळजी घेतो. हे लोक फार दु:खी आहेत. माझ्या शब्दांचे पालन करणाऱ्या लोकांची मी काळजी घेतो.

तुम्ही पाप केले आहे एवढे तुम्हाला समजले पाहिजे. तुम्ही परमेश्वराच्या, तुमच्या देवाच्या, विरुद्ध गेलात तेच तुमचे पाप आहे. तुम्ही दुसऱ्या राष्ट्रातील मूर्तींना प्रत्येक हिरव्या झाडाखाली पूजले. तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्या नाहीत.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश होता.

लज्जेचे आपण अंथरुण करु या आणि पांघरुणाने आपण शरीर झाकतो तशी लाज आपण पांघरु या. आम्ही आमच्या परमेश्वर देवाविरुद्ध जाऊन पाप केले. आम्ही आणि आमच्या वडिलांनी पाप केले. आम्ही लहान असल्यापासून परमेश्वर देवाच्या आज्ञा पाळल्या नाहीत.

यरुशलेममधील लोकांनो, तुमच्या मनातील पाप धुवून टाका. तुमची मने शुद्ध करा. मग तुम्ही वाचविले जाऊ शकता. दुष्ट बेत करीत बसू नका.

पृथ्वीवरच्या लोकांनो, ऐका! यहुदातील लोकांवर मी अरिष्ट आणणार आहे. का? कारण त्यांनी हेतूपूर्वक दुष्कृत्ये केली. माझ्या संदेशाकडे दुर्लक्ष केले, माझ्या आज्ञांचे पालन करण्याचे नाकारले.”

मी त्यांचे बोलणे लक्षपूर्वक ऐकले आहे. ते योग्य ते बोलत नाहीत. त्यांना त्यांच्या पापाबद्दल पश्र्चाताप वाटत नाही. त्यांनी केलेल्या वाईट कर्मांचा ते विचार करीत नाहीत. विचार केल्याशिवाय ते गोष्टी करतात. युद्धात दौडणाऱ्या घोड्यांसारखे ते आहेत.

परमेश्वराने ह्या प्रश्नांची उत्तरे दिली. तो म्हणाला, “माझ्या शिकवणुकीला अनुसरायचे यहूदाच्या लोकांनी सोडून दिले. मी त्यांना पाठ दिले. पण त्यानी ऐकायचे नाकारले. ते माझ्या शिकवणुकीप्रमाणे वागले नाहीत. यहूदातील लोक त्यांच्या मर्जीप्रमाणे जगले ते दुराग्रही होते. बआल या खोट्या देवाला ते अनुसरले. त्यांच्या वडिलांनी त्यांना खोट्या देवांना अनुसरायला शिकविले.”

या गोष्टींना आम्हीच जबाबदार आहोत, हे आम्हाला माहीत आहे. आम्ही आमच्याच पापाचे भोग भोगत आहोत. परमेश्वरा, तुझे नाव राखण्यासाठी आम्हाला मदत कर. कारण आम्ही तुझ्याशी खूप वेळा प्रतारणा केली, हे आम्हाला कबूल आहे. आम्ही तुझ्याशी पापाचरण केले,

परमेश्वरा, आम्ही पापी आहोत, ह्याची आम्हाला जाणीव आहे. आमच्या पूर्वजांनी दुष्कृत्ये केली. आम्ही तुझे अपराध केले.

परमेश्वरा, तू मला बरे केलेस, तर मी पूर्ण बरा होईन. तू मला वाचविलेस, तर मी खरोखच वाचेन. देवा, मी तुझी स्तुती करतो.

मला ओळखण्याची इच्छा मी त्यांच्यात निर्माण करीन. मग मी परमेश्वर आहे हे त्यांना समजेल. ते माझे होतील व मी त्यांचा देव होईन. बाबेलमधील हे सर्व कैदी अंत:करणापासून माझ्याकडे परत आले आहेत म्हणून मी त्यांच्यासाठी हे करीन.

परमेश्वराच्या प्रेम व दयेला अंत नाही. परमेश्वराची करुणा चिरंतन आहे. ती प्रत्येक दिवशी नवीन, ताजी असते. परमेश्वरा, तुझी विश्वासार्हता महान आहे.

आमच्या नृत्याचे रूपांतर आता मृतांच्या शोकात झाले आहे. आमच्या हृदयात आनंदाचा अंशही नाही. आम्ही पाप केल्यामुळे आमच्या डोक्यावरचा मुकुट खाली पडला आहे. आणि वाईट गोष्टी घडल्या. ह्या सर्व गोष्टीमुळे आमचे मन खचले आहे. आम्हाला डोळ्यांनी स्पष्टपणे दिसत नाही.

मी सर्वांना सारखेच वागवीन, मग ते आईवडील असोत वा मूल. जो पाप करील, तो मरेल.

पाप्यालाच मरण येईल. वडिलांच्या पापांबद्दल मुलाला शिक्षा होणार नाही. तसेच मुलाच्या पापांबद्दल वडिलांना शिक्षा होणार नाही. सज्जनाचा चांगुलपणा फक्त त्याच्या स्वत:चाच असतो. आणि वाईट माणसाचा वाईटपणा त्याच्या एकट्याचाच असतो.

“पण, वाईट माणूस, सुधारला, तर तो मरणार नाही. तो जगेल. त्याने पूर्वी केलेल्या वाईट गोष्टी तो करण्याचे सोडून देईल व माझे नियम काळजीपूर्वक पाळील तो सज्जन व प्रामाणिक होईल. तर मग देव त्याच्या दुष्कृत्यांचे स्मरण ठेवणार नाही. तो फक्त त्याचा चांगुलपणाच स्मरेल. मग तो माणूस जगेल.” परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो, “वाईट लोकांनी मरावे अशी माझी इच्छा नाही. त्यांनी आपले मार्ग बदलावे. मग ते जगू शकतील.

“कदाचित् भला माणूस चांगुलपणा सोडून देईल. वाईट माणसाने पूर्वी केलेली भयानक दुष्कृत्ये तो करील व सन्मार्ग सोडील. (असा माणूस जिवंत राहील का?) अशा रीतीने, त्या माणसाने वाईट मार्गाला लागून दुष्कृत्ये केल्यास, त्याच्या पूर्वीच्या सत्कृत्यांची आठवण देव ठेवणार नाही. तो देवाविरुद्ध वागून पापे करु लागला, हेच देवाच्या लक्षात राहील. म्हणून तो त्याच्या पापांचे फळ भोगेल. म्हणजेच मरेल.”

देव म्हणाला, “तुम्ही कदाचित् म्हणाला, ‘देव, आमचा प्रभू न्यायी नाही’ पण इस्राएलच्या लोकांनो, ऐका. तुम्हीच न्यायी नाही आहात.

जर सज्जन बिघडला व दुष्ट झाला, तर त्याने त्याच्या दुष्कृत्याबद्दल मेलेच पाहिजे.

पण वाईट माणूस सुधारला व सज्जन आणि प्रामणिक झाला, तर तो त्याचा जीव वाचवील. तो जिवंत राहील. तो किती वाईट होता. हे त्याचे त्यालाच कळेल व तो माझ्याकडे परत येईल. पूर्वीप्रमाणे वाईट गोष्टी तो करणार नाही. मग तो जगेल. तो मरणार नाही.”

इस्राएलचे लोक म्हणाले, “हे न्याय्य नाही. परमेश्वर, आमचा प्रभू, असा असूच शकत नाही!” देव म्हणाला, “मी न्यायी आहे तुम्ही लोकच न्यायी नाही आहात.

का? इस्राएलच्या लोकांनो, प्रत्येक माणसाच्या कर्माप्रमाणे मी त्या माणसाचा न्यायनिवाडा करतो.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला,“म्हणून माझ्याकडे परत या. वाईट गोष्टी करण्याचे सोडून द्या. त्या भयंकर गोष्टींना, (मूर्तींना) तुम्हास पाप करण्यास, प्रवृत्त करु देऊ नका. तुम्ही तयार केलेल्या भयानक गोष्टी (मूर्ती) फेकून द्या. त्यांच्यामुळेच तुम्ही पाप करण्यास धजावता. तुमचे ह्दयपरिवर्तन व आत्मपरिवर्तन होऊ द्या. इस्राएलच्या लोकांनो, स्वत:च स्वत:चा मृत्यू का ओढवून घेता? मला तुम्हाला ठार मारण्याची इच्छी नाही. कृपा करुन परत या व जगा” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.

तेथेच तुम्हाला अमंगळ करणाऱ्या तुमच्या वाईट कृत्यांची आठवण होऊन, तुम्ही शरमिंदे व्हाल.

जर सज्जन सत्कृत्ये सोडून दुष्कृत्ये करु लागला, तर त्याच्या पापामुळे तो मरेल. आणि जर दुष्टाने पाप करण्याचे सोडून दिले, तो चांगले जीवन जगू लागला, प्रामाणिक झाला, तर तो जगेल.

मग तुमच्यावर शुद्ध पाणी शिंपडून मी तुम्हाला शुद्ध करीन. तुमची घाण मी धुवून काढीन. त्या ओंगळ मूर्तीचीही घाण मी धुवून काढीन आणि तुम्हाला शुद्ध करीन.” देव म्हणाला, “मी तुमच्यात नवीन आत्मा घालून नवे ह्दय बसवीन तुमचे दगडाचे ह्दय बदलून त्या जागी माणसाचे कोमल ह्दय बसवीन.

मग मी देव माझा प्रभू,याची प्रार्थना केली व कृपेची याचना केली. मी उपवास केला व शोकप्रदर्शक कपडे घातले. मी डोक्यात धूळ टाकून घेतली. मी परमेशवराची, माझ्या देवाची, प्रार्थना केली मी त्याच्याजवळ माझ्या पापांचा पाढा वाचला मी म्हणालो परमेशवरा तू महान आणि भीतिदायक देव आहेस. तुझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांवर दया व प्रेम करून तू तुझा करार पाळतोस तुझ्या आज्ञा पाळणाऱ्या लोकांबरोबरही तू कराराचे पालन करतोस. पण परमेश्वरा आम्ही पाप केले,आम्ही चुकीचे वागलो आम्ही दुष्कृत्ये केली. आम्ही तुझ्याकडे पाठ फिरविली, तुझ्या आज्ञा आणि न्याय निर्णय यांच्यापासून आम्ही दूर गेलो. आम्ही संदेष्ट्यांचे ऐकले नाही. ते तुझे सेवक होते. ते तुझ्यावतीने आमच्या राजाशी, नेत्यांशी, थोर मंडळींशी बोलले. इस्राएलमधील सर्व लोकांशी ते बोलले पण आम्ही त्या संदेष्ट्यांचे ऐकले नाही.

“परमेश्वरा, आम्हा सर्वांना लाज वाटली पहिजे. आमच्या सर्व राजांनी नेत्यांनी आणि आमच्या पूर्वजांनी लाजेने मान खाली घातल्या पाहिजेत. का? कारण परमेश्वरा, त्यांनी तुझ्याविरुध्द पाप केले.

“पण, परमेश्वरा, तू दयाळू आहेस. लोकांनी वाईट गोष्टी केल्या तरी तू क्षमा करतोस. आम्ही खरोखरच तुझ्याविरुध्द वागलो. आम्ही आमच्या परमेश्वर देवाचे ऐकले नाही परमेशवराने त्याच्या सेवका मार्फत संदेष्ट्यांमार्फत आम्हाला नियम सांगितले पण आम्ही त्या नियमांचे पालन केले नाही.

मी देवाजवळ ही प्रार्थना करीत होतो, मी त्याला माझ्या आणि इस्राएलच्या लोकांच्या पापांबद्दल सांगत होतो, मी परमेश्वराच्या पवित्र पर्वतासाठी प्रार्थना करीत होतो.

पृथ्वीवरील खूप मृत व पुरलेले उठतील. काहींना चिरंजीवित्व लाभेल पण काहींना कायमची अप्रतिष्ठा व तिरस्कार लाभेल.

इस्राएला, तू पडलास. तू परमेश्वराविरुध्द पाप केलेस. पण आता परमेश्वराकडे, तुझ्या परमेश्वराकडे, परत ये.

परमेश्वराचा संदेश पुढीलप्रमाणे आहे: “मनापासून माझ्याकडे परत या. तुम्ही दुष्कृत्ये केलीत. रडा, शोक करा आणि उपवास करा. तुमचे कपडे फाडू नका, तर ह्रदये फाडा”परमेश्वराकडे, तुमच्या परमेश्वराकडे परत या. तो कृपाळू व दयाळू आहे. तो शीघ्रकोपी नाही. तो खूप प्रेमळ आहे. त्याने योजलेली कडक शिक्षा कदाचित् तो बदलेलही.

निर्णयाच्यादरीत पुष्कळशी माणसे आहेत. परमेश्वराचा विशेष दिवस जवळ आला आहे.

तर नीनवेतल्या मनुष्यांनी देवाला विश्वसिले, आणि उपासाची सूचना गाजविली, आणि मोठ्यापासून लहानपर्यंत गोनताट नेशिले. कारण कि नीनवेच्या राज्याकडे वर्तमान पोहोंचले होते,तेव्हा त्याने सिहांसानावरून उठून आपला झगा आपल्या अंगातून काढून ठेविला.मग तो गोणताट नेसून राखेवर बसला. आणि राजाने आणि त्याच्या प्रधानाच्या ठरावाने नीनवेत गाजवून सांगितले, कि मनुष्यांनी अथवा पशूंनी,गुरांनी,अथवा मेंढरांनी काही चाखू नये. परंतु मनुष्य आणि पशु गोणताट नेसोत; आणि देवाकडे मनापासून हाक मारोत आणि प्रत्येक कुमार्गापासून आणि जो बलात्कार त्यांच्या मुठी असेल त्या पासून फिरोत. आम्ही नाश पावू नये म्हणून देव वळेल,अनुतापेल,आणि आपल्या संतप्त क्रोधापासून फिरेल कि नाही?हे कोण जाणे? तर ते आपल्या कुमार्गापासून फिरेले,अशी त्यांची कर्मे देवाने पहिली आणि ज्या संकटाविषयी देव बोलला होता,कि मी त्यास नाश करीन,त्याविषयी तो अनुतापला आहे,आणि त्याने ने केले नाही.

मी परमेश्वराविरुध्द पाप केले. म्हणून तो माझ्यावर रागावला. पण न्यायालयात तो माझ्यासाठी माझ्या दाव्यात वाद घालेल. माझ्यासाठी योग्य गोष्टी तो करील. मग तो मला बाहेर उजेडात आणील. मग मला त्याचे बरोबर आहे हे कळेल.

परमेश्वरा तुझ्यासारखा दुसरा देव नाही. पापी लोकांनाही तू क्षमा करतोस. तुझ्या वाचलेल्या लोकांनाही तू क्षमा करतोस. परमेश्वर अनंतकाळ क्रोधाविष्ट राहणारा नाही. का? कारण त्याला दयाळू व्हायला आवडते. तो परत येईल व आमचे सांत्वन करील. तो आमच्या पापांचा चुराडा करील आणि आमची पापे खोल समुद्रात फेकून देईल.

ती पुत्राला जन्म देईल आणि तू त्याचे नाव येशू ठेव, तो आपल्या लोकांस त्यांच्या पापांपासून तारील.”

“पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य जवळ आले आहे.”

तेव्हा यरुशलेम शहर, सर्व यहूदीया प्रांत व यार्देन नदीच्या आसपासचा संपुर्ण प्रदेश त्याच्याकडे आला. ते आपआपली पापे पदरी घेत असता, त्यांना त्याच्या हाताने यार्देन नदीत बाप्तिस्मा देण्यात आला.

परंतु परूशी व सदूकी यांच्यापैकी अनेक लोकांस आपणाकडे बाप्तिस्म्यासाठी येताना पाहून तो त्यांना म्हणाला, “अहो विषारी सापांच्या पिलांनो, येणाऱ्या क्रोधापासून पळावयास तुम्हास कोणी सावध केले? तर पश्चात्तापाला शोभेल असे योग्य ते फळ द्या;

आणि झाडांच्या मुळांशी आताच कुऱ्हाड ठेवलेली आहे; जे प्रत्येक झाड चांगले फळ देत नाही ते तोडले जाईल व अग्नीत टाकले जाईल. मी तुमचा बाप्तिस्मा पश्चात्तापासाठी पाण्याने करत आहे; परंतु माझ्यामागून येणारा आहे तो माझ्याहून अधिक सामर्थ्यवान आहे आणि त्याच्या चपला उचलून घेवून चालण्याची देखील माझी योग्यता नाही; तो तुमचा बाप्तिस्मा पवित्र आत्म्याने व अग्नीने करणार आहे. त्याच्या हातात त्याचे सूप आहे, तो आपले खळे अगदी स्वच्छ करील व आपले गहू कोठारात साठवील; पण भूस न विझणाऱ्या अग्नीने जाळून टाकील.”

यानंतर येशू गालील प्रांताहून यार्देन नदीवर योहानाच्या हातून बाप्तिस्मा घेण्याकरीता त्याच्याकडे आला; परंतु योहान त्यास थांबवत म्हणाला, मला तुझ्या हातून बाप्तिस्मा घेण्याची गरज आहे, असे असता तू माझ्याकडे येतो हे कसे? येशूने त्यास उत्तर दिले, “आता हे होऊ दे; कारण याप्रकारे सर्व न्यायीपण पूर्णपणे करणे हे आपणास योग्य आहे.” तेव्हा त्याने ते होऊ दिले.

जे लोक काळोखांत बसत होते त्यांनी, मोठा प्रकाश पाहिला. मरणाचे सावट असलेल्या सावलीत दव प्रदेशात राहणाऱ्या लोकांवर, ज्योति उदय पावली आहे.” तेव्हापासून येशूने उपदेश करणे सुरु केले व तो म्हणू लागला की; “पश्चात्ताप करा, कारण स्वर्गाचे राज्य तुमच्या जवळ आले आहे.”

“जे आत्म्याने ‘दीन’ ते धन्य आहेत, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. ‘जे शोक करतात’, ते धन्य आहेत, कारण ‘त्यांचे सांत्वन करण्यात येईल.’ ‘जे सौम्य’ ते धन्य आहेत, कारण ‘त्यांना पृथ्वीचे वतन मिळेल.’ जे न्यायीपणाचे भुकेले व तान्हेले ते धन्य आहेत, कारण ते संतुष्ट होतील. जे दयाळू ते धन्य आहेत, कारण त्यांच्यावर दया करण्यात येईल. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य आहेत, कारण ते देवाला पाहतील. जे शांती करणारे ते धन्य आहेत, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील. न्यायीपणाकरता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य आहेत, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे.

कारण मी तुम्हास खरे सांगतो, आकाश व पृथ्वी ही नाहीशी होतील, परंतु सर्वकाही पूर्ण झाल्याशिवाय, नियमशास्त्रातील एकही काना किंवा मात्रा रद्द होणार नाही. यास्तव जो कोणी या लहान आज्ञातील एखादी आज्ञा रद्द करील व त्याप्रमाणे लोकांस शिकवील त्यास स्वर्गाच्या राज्यात अगदी लहान म्हणतील; पण जो कोणी त्या पाळील व शिकवील त्यास स्वर्गाच्या राज्यात महान म्हणतील. म्हणून मी तुम्हास सांगतो, शास्त्री व परूशी यांच्या न्यायीपणापेक्षा तुमचे न्यायीपण अधिक झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यांत तुमचा प्रवेश होणारच नाही.

तुझा उजवा डोळा तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करीत असेल तर तो उपट आणि फेकून दे; कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात टाकले जावे यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे. तुझा उजवा हात तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करीत असेल तर तो तोडून टाकून दे; कारण तुझे संपूर्ण शरीर नरकात पडावे, यापेक्षा तुझ्या एका अवयवाचा नाश व्हावा हे तुझ्या हिताचे आहे.

यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता परिपूर्ण आहे तसे तुम्ही परिपूर्ण व्हा.

म्हणून तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुम्ही अशाप्रकारे प्रार्थना करावीः हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. जशी आम्ही आमच्या ऋण्यांस त्यांची ऋणे सोडली आहेत, तशीच तू आमची ऋणे आम्हांस सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास त्या दुष्टापासून सोडव. (कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरवही सर्वकाळ तुझीच आहेत.)

कारण जर तुम्ही इतरांचे अपराध क्षमा कराल तर तुमचा स्वर्गातील पिता तुम्हासही क्षमा करील; पण जर तुम्ही इतरांच्या अपराधांची क्षमा करणार नाही, तर तुमचा पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही.

डोळा शरीराचा दिवा आहे. म्हणून जर तुमचे डोळे निर्दोष असतील तर तुमचे संपुर्ण शरीर प्रकाशमय होईल. पण जर तुमचे डोळे सदोष असतील, तर तुमचे संपुर्ण शरीर अंधकारमय होईल. जर तुम्हाठायी असणारा प्रकाश हा वास्तविक अंधकार आहे, तर खरोखरचा अंधार किती असणार!

कोणालाही दोन धन्यांची चाकरी एकावेळी करणे शक्य नाही. तो एकाचा तिरस्कार करील तर दुसऱ्यावर प्रीती करील किंवा तो एका धन्याशी एकनिष्ठ राहील व दुसऱ्याला तुच्छ लेखेल. तसेच तुम्हास देवाची आणि पैशाची (धनाची) सेवा एकाच वेळी करता येणार नाही.

तर पहिल्याने तुम्ही देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्याचा प्रयत्न करा म्हणजे त्याबरोबर या सर्व गोष्टीही तुम्हास मिळतील.

अरुंद दरवाजाने आत जा कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रूंद व मार्ग प्रशस्त आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ लोक आहेत. पण जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग अडचणीचा आहे आणि ज्यांस तो सापडतो ते फारच थोडके आहेत.

त्याचप्रमाणे चांगले झाड चांगले फळ देते, परंतु वाईट झाड वाईट फळ देते. चांगल्या झाडाला वाईट फळे येणार नाहीत आणि वाईट झाडाला चांगली फळे येणार नाहीत. जे झाड चांगले फळ देत नाही ते तोडण्यात येते व अग्नीत टाकले जाते. यास्तव त्यांना तुम्ही त्यांच्या फळांवरून ओळखाल.

मला प्रभू, प्रभू म्हणणारा प्रत्येकजण स्वर्गाच्या राज्यात जाईलच असे नाही; तर माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे जो वागतो त्याचाच प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल. त्यादिवशी मला अनेक जण म्हणतील, हे प्रभू, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिले, तुझ्या नावाने भूते काढली व तुझ्या नावाने पुष्कळ चमत्कार केले नाहीत काय? तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की, मी तुम्हास ओळखत नाही. अहो दुराचार करणाऱ्यांनो, माझ्यापासून चालते व्हा.

माझ्या नावामुळे सर्व तुमचा व्देष करतील. पण शेवटपर्यंत जो टिकेल तोच तरेल.

जे शरीराला वधतात पण आत्म्याचा वध करू शकत नाहीत त्यांना भिऊ नका, तर त्यापेक्षा आत्म्याला व शरीराला जो मारू शकतो व नरकात टाकू शकतो त्यास भ्या.

जो कोणी मनुष्यांसमोर मला स्वीकारील त्यास मीसुद्धा माझ्या स्वर्गातील पित्यासमोर स्वीकारीन. पण जो कोणी मनुष्यांसमोर मला नाकारील त्यास मीसुद्धा माझ्या स्वर्गातील पित्यासमोर नाकारीन.

जो माझ्यापेक्षा स्वतःच्या पित्यावर किंवा आईवर अधिक प्रीती करतो, तो मला योग्य नाही. जो माझ्यापेक्षा आपल्या मुलावर, मुलीवर अधिक प्रीती करतो, तो मला योग्य नाही. जो आपला वधस्तंभ घेऊन माझ्यामागे येण्याचे नाकारतो, तो मला योग्य नाही. जो आपला जीव मिळवतो तो त्यास गमवील पण जो माझ्याकरिता आपला जीव गमावतो तो त्यास मिळवील.

तेव्हा ज्या नगरांमध्ये त्याने सर्वात जास्त चमत्कार केले होते त्या नगरातील लोकांनी पश्चात्ताप केला नाही, म्हणून येशूने त्यांना दोष दिला.

कारण वाईट विचार, खून, व्यभिचार, जारकर्मे, खोट्या साक्षी, निंदा ही अंतःकरणातून बाहेर निघतात.

जर मनुष्याने सर्व जग मिळविले आणि आपला जीव गमावला तर त्यास काय लाभ? किंवा मनुष्य आपल्या जीवाचा काय मोबदला देईल?

आणि म्हटले, “मी तुम्हास खरे सांगतो, तुमच्यात बदल होऊन तुम्ही बालकासारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही.

परंतु जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या या लहानातील एकाला अडखळण आणील त्याच्या गळ्यात जात्याची मोठी तळी बांधून त्यास समुद्राच्या खोल पाण्यात बुडविणे हे त्याच्या हिताचे आहे.

जर तुमचा उजवा हात किंवा पाय तुम्हास पाप करण्यासाठी प्रवृत्त करीत असेल तर तो कापून टाका व फेकून द्या. दोन हात व दोन पाय असून सर्वकाळच्या कधीही न विझणाऱ्या अग्नीत (नरकात) तुम्ही टाकले जाण्यापेक्षा व्यंग किंवा लंगडे होऊन सार्वकालिक जीवनात जावे जास्त बरे होईल. जर तुमचा डोळा तुम्हास पाप करण्यासाठी प्रवृत्त करीत असेल तर तो उपटून फेकूनच द्या कारण एकच डोळा असला आणि तुम्हास सार्वकालिक जीवन मिळाले तर ते जास्त बरे आहे. दोन डोळ्यासह तुम्ही नरकात टाकले जाण्यापेक्षा ते जास्त बरे आहे.

नंतर पेत्र येशूकडे आला आणि त्याने विचारले, “प्रभू, जर माझा भाऊ माझ्यावर अन्याय करीत राहिला तर मी त्यास किती वेळा क्षमा करावी? मी त्यास सात वेळा क्षमा करावी काय?” येशूने उत्तर दिले, “मी तुला सांगतो, फक्त सातच वेळा नाही तर उलट त्याने तुझ्यावर साताच्या सत्तरवेळा अन्याय केला तरी तू त्यास क्षमा करीत राहा.”

“जसे या राजाने केले तसेच माझा स्वर्गीय पिता तुमचे करील. तुम्ही आपल्या बंधूला मनापासून क्षमा केली नाही तर तुमचा स्वर्गीय पिताही तुम्हास क्षमा करणार नाही.”

ज्याने ज्याने माझ्यामागे येण्याकरता आपले घर, भाऊ, बहीण, आईवडील, मुले, शेतीवाडी सोडली असेल तर त्यास त्यापेक्षा कितीतरी जास्तपटीने लाभ होईल व त्यास सार्वकालिक जीवन मिळेल.

म्हणजे तुम्ही मनुष्याच्या पुत्रासारखे असले पाहिजे. जसा तो इतरांकडून सेवा करून घ्यायला आला नाही तर इतरांची सेवा करायला आणि अनेकांचे तारण व्हावे यासाठी आपला जीव खंडणी म्हणून देण्यासाठी आला.”

कारण योहान नीतिमत्त्वाच्या मार्गाने तुम्हाकडे आला, परंतु तुम्ही त्यावर विश्वास ठेवला नाही, पण जकातदार व वेश्या यांनी त्यावर विश्वास ठेवला आणि हे तुम्ही पाहिले पण तरी देखील तुम्ही आपले मन बदलण्यास आणि त्यावर विश्वास ठेवण्यास तयार झाला नाही.”

मग त्या सर्वांना भेटण्यास राजा तेथे आला. लग्नाचा पोशाख न केलेला एक मनुष्य राजाला तेथे आढळला. राजा त्यास म्हणाला, मित्रा, तू लग्नाचा पोशाख न घालता तू येथे कसा आलास? पण त्यास काही उत्तर देता येईना. तेव्हा राजाने चाकरांना सांगितले, या मनुष्याचे हात व पाय बांधा आणि त्यास बाहेर अंधारात टाका, तेथे रडणे आणि दात खाणे चालेल. कारण बोलावलेले पुष्कळ आहेत पण निवडलेले थोडके आहेत.

येशूने उत्तर दिले, प्रभू आपला देव याजवर तू आपल्या पूर्ण अंतःकरणाने, आपल्या पूर्ण जिवाने, आपल्या पूर्ण मनाने प्रीती कर. ही पहिली आणि मोठी आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी एक आहे जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. सर्व नियमशास्त्र आणि संदेष्ट्यांचे लिखाण या दोन आज्ञांवरच अवलंबून आहे.

पण जो मनुष्य शेवटपर्यंत टिकून राहिल तोच तारला जाईल.

तेव्हा त्यादिवसात स्वर्गाचे राज्य दहा कुमारींसारखे असेल, त्यांनी त्यांचे दिवे घेतले व वराला भेटण्यास गेल्या. त्यांच्यातल्या पाच मूर्ख होत्या आणि पाच शहाण्या होत्या. मूर्ख कुमारींनी आपले दिवे घेतले, पण दिव्यासाठी तेल घेतले नाही. शहाण्या कुमारींनी दिव्याबरोबर आपल्या भांड्यात तेल घेतले. आता वराला उशीर झाल्याने त्या सर्वांना डुलक्या लागल्या व त्या झोपी गेल्या मध्यरात्री कोणीतरी घोषणा केली, वर येत आहे! बाहेर जाऊन त्यास भेटा! सर्व कुमारिका जाग्या झाल्या आणि त्यांनी आपले दिवे तयार केले. तेव्हा मूर्ख शहाण्यांना म्हणाल्या, तुमच्या तेलातून आम्हास द्या. आमचे दिवे विझत आहेत. पण शहाण्यांनी उतर देऊन म्हणले ते तुम्हास आणि आम्हास कदाचित पुरणार नाही; त्यापेक्षा तुम्ही विकणाऱ्यांकडे जा आणि तुमच्यासाठी विकत घ्या. त्या तेल विकत घ्यायला गेल्या तेव्हा वर आला. तेव्हा ज्या तयार होत्या त्या मेजवानीसाठी त्याच्याबरोबर आत गेल्या. मग दरवाजा बंद झाला. नंतर दुसऱ्या कुमारींकाही आल्या आणि म्हणाल्या, प्रभूजी प्रभूजी आमच्यासाठी दरवाजा उघडा पण त्यांने उत्तर देऊन म्हटले, मी तुम्हास खरे सांगतो मी तुम्हास ओळखत नाही.

मनुष्याचा पुत्र जेव्हा त्याच्या स्वर्गीय गौरवाने आपल्या देवदूतांसह येईल तेव्हा तो त्याच्या गौरवी राजासनावर बसेल. मग सर्वं राष्ट्रे त्याच्यासमोर एकत्र जमतील. त्यांना तो एकमेकांपासून विभक्त करील. ज्याप्रमाणे मेंढपाळ मेंढरे शेरडांपासून वेगळी करतो. तो मेंढरांना आपल्या उजवीकडे बसवील पण शेरडांना तो डावीकडे बसवील. मग राजा जे त्याच्या उजवीकडे आहेत त्यांना म्हणेल, या, जे तुम्ही माझ्या पित्याचे धन्यवादित आहात! हे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुमच्यासाठी तयार केले आहे त्या राज्याचे वतनदार व्हा. हे तुमचे राज्य आहे कारण जेव्हा मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले. मी तहानेला होतो तेव्हा तुम्ही मला प्यावयास दिले. मी परका होतो आणि तुम्ही मला आत घेतले मी उघडा होतो तेव्हा तुम्ही मला कपडे दिलेत. मी आजारी होतो, तेव्हा तुम्ही माझी काळजी घेतलीत. मी तुरूंगात होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आलात. मग जे नीतिमान आहेत ते उत्तर देतील, प्रभू आम्ही तुला केव्हा भुकेला व तहानेला पाहिला आणि तुला खायला आणि प्यायला दिले? आम्ही तुला परका म्हणून कधी पाहिले आणि तुला आत घेतले किंवा आम्ही तुला केव्हा उघडे पाहिले व कपडे दिले? आणि तू आजारी असताना आम्ही तुला कधी भेटायला आलो? किंवा तुरूंगात असताना कधी तुझ्याकडे आलो? मग राजा त्यांना उत्तर देईल, मी तुम्हास खरे सांगतो येथे असलेल्या माझ्या बांधवातील अगदी लहानातील एकाला तुम्ही केले, तर ते तुम्ही मलाच केले. मग राजा आपल्या डाव्या बाजूच्यांना म्हणेल, माझ्यापासून दूर जा, तुम्ही शापित आहात, सार्वकालिक अग्नीत जा, हा अग्नी सैतान व त्याच्या दूतांसाठी तयार केला आहे. ही तुमची शिक्षा आहे कारण मी भुकेला होतो पण तुम्ही मला काही खायला दिले नाही, मी तहानेला होतो पण तुम्ही मला काही प्यावयास दिले नाही. मी प्रवासी असता माझा पाहुणचार केला नाही. मी वस्त्रहीन होतो. पण तुम्ही मला कपडे दिले नाहीत. मी आजारी आणि तुरूंगात होतो पण तुम्ही माझी काळजी घेतली नाही. मग ते लोकसुद्धा त्यास उत्तर देतील, प्रभू आम्ही कधी तुला उपाशी अगर तहानेले पाहिले किंवा प्रवासी म्हणून कधी पाहिले? किंवा वस्त्रहीन, आजारी किंवा तुरूंगात कधी पाहिले आणि तुला मदत केली नाही? मग राजा त्यांना उत्तर देईल, मी तुम्हास खरे सांगतोः माझ्या अनुयायांतील लहानातील लहानाला काही करण्याचे जेव्हा जेव्हा तुम्ही नाकारले, तेव्हा तेव्हा ते तुम्ही मला करण्याचे नाकारले. “मग ते अनीतिमान लोक सार्वकालिक शिक्षा भोगण्यास जातील, पण नीतिमान सार्वकालिक जीवन उपभोगण्यास जातील.”

कारण हे माझे कराराचे रक्त आहे. हे पापांच्या क्षमेसाठी पुष्कळांकरिता ओतले जात आहे.

तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागे राहा आणि प्रार्थना करीत राहा. आत्मा खरोखर उत्सुक आहे खरा पण देह अशक्त आहे.”

पुन्हा एकदा येशूने मोठ्याने आरोळी मारली आणि त्याचा प्राण सोडला. पाहा, परमेश्वराच्या भवनातील पडदा वरपासून खालपर्यंत दोन भागात फाटला गेला, भूमी कापली, खडक फुटले.

म्हणून तुम्ही जा आणि राष्ट्रांतील लोकांस माझे शिष्य करा. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावाने बाप्तिस्मा द्या.

त्याप्रमाणेच योहान आला, तो अरण्यांत बाप्तिस्मा देत होता आणि पापांच्या क्षमेसाठी पश्चात्तापाच्या बाप्तिस्म्याची घोषणा करीत होता. यहूदीया प्रांत व यरुशलेम शहरातील सर्व लोक योहानाकडे आले. त्यांनी आपली पापे कबूल करून त्याच्यापासून यार्देन नदीत बाप्तिस्मा घेतला.

तो म्हणाला, “आता योग्य वेळ आली आहे, देवाचे राज्य जवळ आले आहे, पश्चात्ताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा.”

आणि ज्याठिकाणी तुमचे स्वागत होणार नाही किंवा तुमचे ऐकणार नाहीत तेथून निघताना, त्यांना साक्ष व्हावी म्हणून आपल्या तळ पायाची धूळ तेथेच झाडून टाका.” मग शिष्य तेथून निघाले आणि लोकांनी पश्चात्ताप करावा म्हणून त्यांनी घोषणा केली.

आणखी तो म्हणाला, “जे मनुष्याच्या अंतःकरणातून बाहेर पडते ते मनुष्यास अशुद्ध करते. कारण आतून म्हणजे अंतःकरणातून वाईट विचार बाहेर पडतात. जारकर्म, चोरी, खून, व्यभिचार, लोभ, वाईटपणा, कपट, असभ्यता, मत्सर, शिव्यागाळी, अहंकार आणि मूर्खपणा, या सर्व वाईट गोष्टी आतून बाहेर पडतात आणि मनुष्यास अशुद्ध करतात.”

नंतर त्याने आपल्या शिष्यांसह लोकांस बोलावले व त्यांना म्हणाला, “जर कोणाला माझ्यामागे यायचे आहे तर त्याने स्वतःला नाकारावे. आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व माझ्यामागे यावे. जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो जीवाला मुकेल व जो कोणी माझ्यासाठी व सुवार्तेसाठी जिवाला मुकेल तो आपला जीव वाचवील. मनुष्याने सर्व जग मिळविले व आपल्या जीवाचा नाश करून घेतला तर त्यास काय लाभ? जीवाच्या मोबदल्यात मनुष्य काय देऊ शकेल?

देवाशी अप्रामाणिक आणि पापी पिढीत जो कोणी माझी व माझ्या वचनांची लाज धरतो तर मनुष्याचा पुत्रही जेव्हा तो आपल्या पित्याच्या गौरवात पवित्र दूतांसह येईल तेव्हा त्यांची लाज धरील.”

जर तुझा उजवा हात तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करीत असेल तर तो तोडून टाक. दोन हात असून नराकात न विझणाऱ्या अग्नीत जाण्यापेक्षा एक हात नसून जीवनात जाणे बरे.

आणि जर तुझा पाय तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करीत असेल तर तो काढून टाक. दोन पाय असून नरकात फेकले जावे यापेक्षा लंगडे होऊन जीवनात गेलेले बरे.

जर तुझा उजवा डोळा तुला पाप करण्यासाठी प्रवृत्त करीत असेल तर तो काढून टाक. दोन डोळे असून जेथे त्यांना खाणारे किडे मरत नाहीत आणि अग्नी विझत नाही अशा नरकात फेकले जावे यापेक्षा एक डोळा असून देवाच्या राज्यात जाणे हे बरे.

मी तुम्हास खरे सांगतो, जो कोणी बालकासारखा देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही त्याचा प्रवेश त्यामध्ये मुळीच होणार नाही.”

कारण मनुष्याचा पुत्रही सेवा करून घ्यावयास नाही तर तो सेवा करावयास आला आहे पुष्कळांच्या खंडणीकरिता आपला जीव देण्यासाठी आला आहे.”

जेव्हा तुम्ही प्रार्थना करीत उभे राहता तेव्हा तुमच्या मनात जर कोणाच्या विरुद्ध काही असेल तर त्याची क्षमा करा यासाठी की, तुमच्या स्वर्गातील पित्याने तुमच्या पापांची क्षमा करावी.

परंतु तुम्ही जर क्षमा करणार नाही तर तुमचा स्वर्गातील पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही.”

आणि माझ्या नावामुळे सर्वजण तुमचा व्देष करतील, पण जो शेवटपर्यंत टिकेल तोच तारला जाईल.

मग येशू म्हणाला, “हे माझे नव्या कराराचे रक्त आहे. पुष्कळांसाठी ते ओतले जात आहे.

तो म्हणाला, “अब्बा-पिता, तुला सर्वकाही शक्य आहे. हा प्याला मजपासून दूर कर तरी माझ्या इच्छेप्रमाणे नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे कर.”

जागृत राहा आणि प्रार्थना करा म्हणजे तुम्ही परीक्षेत पडणार नाही. आत्मा उत्सुक आहे पण देह अशक्त आहे.”

जो कोणी विश्वास धरतो आणि बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल, परंतु जो विश्वास ठेवत नाही तो शिक्षेस पात्र होईल.

जे त्याचे भय धरतात त्यांच्यावर त्याची दया पिढ्यानपिढ्या आहे

माझ्यासमोर पवित्रतेने व नीतिमत्त्वाने आयुष्यभर माझी सेवा निर्भयपणे कराल, असे मी करीन.

यासाठी की, त्याच्या लोकांस त्यांच्या पापांच्या क्षमेने तारणाचा अनुभव द्यावा.

तो यार्देनेच्या सभोवतालच्या सर्व परिसरात पापांच्या क्षमेसाठी पश्चात्ताप करून बाप्तिस्मा घ्यावा अशी घोषणा करत फिरला.

त्याच्याकडून बाप्तिस्मा करून घेण्यासाठी येणाऱ्या जमावाला योहान म्हणाला; “अहो, विषारी सापाच्या पिलांनो, येणाऱ्या क्रोधापासून सुटका करून घेण्यासाठी तुम्हास कोणी सावध केले? पश्चात्तापास योग्य अशी फळे द्या आणि आपल्या मनात असे म्हणू नका की, ‘अब्राहाम आमच्या पित्यासारखा आहे.’ कारण मी तुम्हास सांगतो की, अब्राहामासाठी या दगडापासून मुले निर्माण करण्यास देव समर्थ आहे. आताच झाडांच्या मुळांशी कुऱ्हाड ठेवलेली आहे. म्हणून प्रत्येक झाड जे चांगले फळ देत नाही ते तोडून अग्नीत टाकले जाईल.”

काही जकातदारही बाप्तिस्मा करून घ्यावयास आले होते. ते म्हणाले, “गुरुजी, आम्ही काय करावे?”

तेव्हा असे झाले की, जेव्हा सर्व लोकांचा बाप्तिस्मा योहानाद्वारे केला जात होता, तेव्हा येशूचा ही बाप्तिस्मा होऊन तो प्रार्थना करीत असता आकाश उघडले गेले.

“प्रभूचा आत्मा मजवर आला आहे, कारण, यासाठी की, गरिबांना सुवार्ता सांगण्यास त्याने मला अभिषेक केला आहे. कैदी म्हणून नेलेल्यांस स्वातंत्र्याची घोषणा करण्यासाठी, आणि आंधळ्यांना दृष्टि पुन्हा मिळावी, ज्यांच्यावर जुलूम झाला आहे त्यांची सुटका करण्यासाठी

हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, “प्रभू, माझ्यापासून दूर जा कारण मी पापी मनुष्य आहे.”

जसा तुमचा स्वर्गीय पिता दयाळू आहे तसे तुम्हीही दयाळू व्हा. दुसऱ्यांचा न्याय करू नका, म्हणजे तुमचाही न्याय होणार नाही. दुसऱ्यांना दोषी ठरवू नका म्हणजे तुम्हास दोषी ठरवले जाणार नाही. दुसऱ्यांची क्षमा करा म्हणजे तुमचीही क्षमा केली जाईल.

परंतु परूशी व नियमशास्त्राचे शिक्षक यांनी त्याच्यापासून बाप्तिस्मा न घेऊन आपल्या संबंधीची देवाची योजना धिक्कारली.

तू माझ्या डोक्याला तेल लावले नाही, परंतु हिने माझ्या पायांना सुगंधी तेल लावले आहे. या कारणासाठी मी तुला सांगतो, हिची जी पुष्कळ पापे त्यांची क्षमा झाली आहे; कारण हिने पुष्कळ प्रीती केली; परंतु ज्याला थोडक्याची क्षमा होते तो थोडकी प्रीती करतो.” तेव्हा येशूने तिला म्हटले, “तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.”

आणि तो सर्वांना म्हणाला, “जर कोणी माझ्यामागे येऊ इच्छितो तर त्याने स्वतःला नाकारावे व दररोज आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व माझ्यामागे चालावे. कारण जो कोणी आपला जीव वाचवू इच्छितो तो त्यास गमावील, परंतु जो कोणी माझ्याकरिता आपला जीव गमावील तो त्यास वाचवील. कारण मनुष्याने सगळे जग मिळवून स्वतःला गमावले किंवा स्वतःचा नाश करून घेतला तर त्यास काय लाभ होईल?

जो कोणी माझ्याविषयीची व माझ्या वचनाविषयी लाज धरील त्यांच्याविषयीची लाज मनुष्याचा पुत्र जेव्हा आपल्या स्वतःच्या, पित्याच्या व पवित्र दूतांच्या गौरवाने येईल तेव्हा धरील.

पण येशूने त्यास म्हटले, जो कोणी नांगराला आपला हात घातल्यावर मागील गोष्टींकडे पाहत राहतो असा कोणीही देवाच्या राज्याला उपयोगी नाही.

मग तो त्यांना म्हणाला, “जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा असे म्हणाः हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो तुझे राज्य येवो, आमची दररोजची लागणारी भाकर आम्हास दे, आमच्या पापांची आम्हास क्षमा कर, कारण आम्हीही आमच्या प्रत्येक अपराध्याला त्यांच्या अपराधांची क्षमा करतो आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडव.”

जो मला इतर लोकांसमोर स्वीकारतो, त्या प्रत्येक मनुष्यास देवाच्या दूतासमोर मनुष्याचा पुत्रही स्वीकारील. परंतु जो मला इतर लोकांसमोर नाकारतो, तो देवदूतांसमोरही नाकारला जाईल.

त्याने त्यांना उत्तर दिले, “या गालीलकरांनी हे जे दुःख भोगले त्यावरुन ते इतर गालीलकरांपेक्षा जास्त पापी होते, असे तुम्हास वाटते का? मी तुम्हास सांगतो की असे नाही, जर तुम्ही पश्चात्ताप केला नाही तर ते जसे मरण पावले तसे तुम्हीही मराल. किंवा ज्यांच्यावर शिलोहाचा बुरुज पडला व त्याखाली दबून मारले गेलेले ते अठराजण यरुशलेम शहरात राहणाऱ्या इतर सर्व लोकांपेक्षा अधिक पापी होते असे तुम्हास वाटते का? नाही, मी तुम्हास सांगतो जर तुम्ही पश्चात्ताप केला नाही तर तुम्ही सर्वजण त्यांच्यासारखे मराल.”

त्याप्रमाणे ज्यांना पश्चात्तापाची गरज नाही अशा नव्याण्णव नीतिमानांबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चात्ताप करणाऱ्या एका पापी मनुष्याबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल, हे मी तुम्हास सांगतो.

त्याचप्रमाणे पश्चात्ताप करणाऱ्या एका पाप्याबद्दल देवाच्या दूतासमोर आनंद होतो हे मी तुम्हास सांगतो.

मग येशू म्हणाला, एका मनुष्यास दोन पुत्रहोते. त्या दोघांपैकी धाकटा पुत्र म्हणाला, “बाबा, मालमत्तेतला माझा वाटा मला द्या.” आणि मग त्यांच्या वडिलांनी आपली संपत्ती दोघा मुलांमध्ये वांटून दिली. त्यानंतर काही दिवसानंतर लागलीच धाकट्या मुलाने आपले सर्व गोळा केले आणि तो दूरदेशी निघून गेला. तेथे त्याने त्याची सर्व संपत्ती चैनीत व मौजमजेचे जीवन जगून उधळून टाकली. त्याने सर्व पैसे खर्चून टाकले आणि मग त्या देशात भयंकर दुष्काळ पडला व त्यास गरज भासू लागली. त्या देशातील एका नागरिकाजवळ तो गेला आणि त्याचा आश्रय धरुन राहीला. त्या नागरीकाने त्यास आपल्या शेतात डुकरे चारावयास पाठवले. तेव्हा कोणी त्यास काहीही न दिल्याने, डुकरे ज्या शेंगा खातात त्या खाऊन तरी आपले पोट भरावे अशी त्यास फार इच्छा होई. नंतर तो शुद्धीवर आला व स्वतःशीच म्हणाला, “माझ्या पित्याच्या घरी कितीतरी नोकरांना पुरुन उरेल इतके अन्न आहे आणि पाहा मी तर येथे भूकेने मरत आहे! आता, मी उठून आपल्या पित्याकडे जाईन आणि त्यास म्हणेन, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध (देवाविरुद्ध) आणि तुमच्याविरुध्द पाप केले आहे. तुमचा मुलगा म्हणवून घेण्याच्या योग्यतेचा मी राहीलो नाही. मला आपल्या रोजंदारीवरील एखाद्या नोकरासारखे ठेवून घ्या.” मग तो धाकटा मुलगा उठला व आपल्या पित्याकडे गेला. तो त्याच्या घरापासून दूर असतांनाच, त्याच्या पित्याने त्यास पाहिले आणि त्यास त्याचा कळवळा आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात पडला व त्याचे पुष्कळ मुके घेतले. मुलगा त्यास म्हणाला, “बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्याविरुध्द पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणवून घेण्याचा मला अधिकार नाही.” परंतु पिता आपल्या नोकरांस म्हणाला, “त्वरा करा, चांगला झगा आणून त्यास घाला. त्याच्या हातात अंगठी आणि पायात जोडे घाला. आणि मोठी मेजवानी करा, आपण खाऊ आणि आनंद करू! कारण हा माझा मुलगा मरण पावला होता पण जिवंत झाला आहे! तो हरवला होता, पण आता सापडला आहे व ते आनंद करू लागले.” यावेळेस, त्याचा वडील मुलगा शेतात होता. तो घराकडे परतला आणि घराजवळ आल्यावर, त्याने गायनवादन व नाचण्याचा आवाज ऐकला. त्याने एका नोकराला बोलावून विचारले, हे सर्व काय चालले आहे? तो नोकर त्यास म्हणाला, “तुमचा भाऊ आला आहे. तो तुमच्या पित्याला सुखरुप परत मिळाला म्हणून त्यांनी मोठी मेजवानी ठेवली आहे.” तेव्हा तो रागे भरला आणि तो आत जाईना. तेव्हा त्याचा पिता बाहेर येऊन त्यास समजावू लागला. परंतु त्याने पित्याला उत्तर दिले, पाहा, इतकी वर्षे मी तुमची सेवाचाकरी केली आहे व कधीही तुमची आज्ञा मोडली नाही! मित्रांबरोबर आनंद करण्यासाठी तुम्ही मला कधी साधे करडूसुद्धा दिले नाही. आणि ज्याने तुमची सर्व संपत्ती वेश्यांवर उधळली तो तुमचा मुलगा परत आला तेव्हा तुम्ही त्याच्यासाठी मोठी मेजवानी केली. तेव्हा पित्याने त्यास म्हणाले, बाळा, तू नेहमीच माझ्याबरोबर आहेस आणि जे माझे आहे ते सर्व तुझे आहे. परंतु आज आपण आनंद आणि उत्सव केला पाहिजे कारण हा तुझा भाऊ मरण पावला होता तो जिवंत झाला आहे. तो हरवला होता, तो सापडला आहे.

तो श्रीमंत मनुष्य म्हणाला, नाही, हे पित्या अब्राहामा, मरण पावलेल्यामधून कोणी माझ्या भावांकडे गेला तर ते पश्चात्ताप करतील. अब्राहाम त्यास म्हणाला, जर ते मोशेचे आणि संदेष्टयांचे ऐकत नाहीत तर मरण पावलेल्यातून जर कोणी उठला तरी त्यांची खात्री होणार नाही.

स्वतःकडे लक्ष द्या! जर तुमचा भाऊ पाप करतो तर त्यास धमकावा आणि जर तो पश्चात्ताप करतो तर त्यास माफ करा. जर तो दिवसातून सात वेळा तुझ्याविरुद्ध पाप करतो आणि सात वेळा तुझ्याकडे येतो व म्हणतो, मी पश्चात्ताप करतो, तरीही तू त्यास माफ कर.

परंतु जकातदार दूर अंतरावर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावण्यास देखील न धजता आपला ऊर बडवत म्हणाला, ‘हे देवा मज पाप्यावर दया कर.’

कारण मनुष्याचा पुत्र जे हरवलेले ते शोधण्यास आणि तारण्यास आला आहे.”

नंतर त्याने भाकर घेऊन व उपकारस्तुती करून ती मोडली आणि त्यांना देऊन म्हटले, “हे माझे शरीर आहे जे तुम्हासाठी दिले जात आहे. माझ्या आठवणीसाठी हे करा.” त्याचप्रमाणे त्यांचे भोजन झाल्यावर त्याने प्याला घेतला आणि म्हणाला, “हा प्याला माझ्या रक्तात नवा करार आहे, जो तुमच्यासाठी ओतला जात आहे.

तेव्हा त्याठिकाणी आल्यावर त्याने त्यांना म्हटले, “तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा.”

“पित्या, जर तुझी इच्छा असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर. तरी माझ्या इच्छेप्रमाणे नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे.”

तेथे खिळलेल्या एका गुन्हेगाराने त्याची निंदा केली. तो म्हणाला, तू ख्रिस्त नाहीस काय? स्वतःला व आम्हासही वाचव! पण दुसऱ्या गुन्हेगाराने त्यास दटावले आणि म्हणाला, “तुला देवाचे भय नाही का? तुलाही तीच शिक्षा झाली आहे. पण आपली शिक्षा योग्य आहे कारण आपण जे केले त्याचे योग्य फळ आपणास मिळत आहे. पण या मनुष्याने काहीही अयोग्य केले नाही.” नंतर तो म्हणाला, “येशू, तू आपल्या राज्यात येशील तेव्हा माझी आठवण कर.” येशू त्यास म्हणाला, “मी तुला खरे सांगतो, आज तू मजबरोबर सुखलोकात असशील.”

मग तो त्यांना म्हणाला, “असे लिहिले आहे की, ख्रिस्ताने दुःख भोगावे आणि मरण पावलेल्यातून तिसऱ्या दिवशी उठावे, आणि यरुशलेम शहरापासून आरंभ करून सर्व राष्ट्रास त्याच्या नावाने पश्चात्ताप व पापांची क्षमा घोषित करण्यात यावी.

पण जितक्यांनी त्याचा स्वीकार केला, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवला, तितक्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. त्यांचा जन्म रक्त किंवा देहाची इच्छा किंवा मनुष्याची इच्छा यापासून झाला नाही, तर देवापासून झाला.

दुसर्‍या दिवशी येशूला आपल्याकडे येताना पाहून योहान म्हणाला, “हा पाहा, जगाचे पाप हरण करणारा देवाचा कोकरा!

येशू त्यास म्हणाला, “मी तुम्हास खरे खरे सांगतो, पुन्हा जन्मल्यावांचून कोणालाही देवाचे राज्य पाहता येत नाही.”

येशूने त्यास उत्तर दिले, “मी तुम्हास खरे खरे सांगतो, पाण्यापासून व आत्म्यापासून जन्म घेतल्यावांचून कोणीही देवाच्या राज्यांत प्रवेश करू शकत नाही. देहापासून जन्मलेले देह आहेत आणि आत्म्यापासून जन्मलेले आत्मा आहेत. तुम्ही पुन्हा जन्मले पाहिजे, असे मी तुम्हास सांगितले याचे आश्चर्य मानू नका.

जसा मोशेने अरण्यात पितळेचा सर्प उंच केला होता तसे मनुष्याच्या पुत्रालाही उंच केले पाहिजे, यासाठी की, जो कोणी विश्वास ठेवतो त्यास त्याच्याठायी सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे.” कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्यास सार्वकालिक जीवन मिळावे. कारण देवाने पुत्राला जगात पाठवले ते जगाचा न्याय करायला नाही, पण त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवले. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा न्याय होणार नाही, पण जो विश्वास ठेवत नाही त्याचा न्याय झालेलाच आहे; कारण, त्याने देवाच्या एकुलत्या एक पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही. आणि न्याय हाच आहे की, जगात प्रकाश आला आहे; पण मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली, कारण त्यांची कृत्ये वाईट होती; कारण जो कोणी वाईट कृत्ये करतो तो प्रकाशाचा द्वेष करतो आणि आपली कृत्ये उघडकीस येऊ नयेत म्हणून प्रकाशाकडे येत नाही. पण जो सत्य आचरतो तो प्रकाशाकडे येतो यासाठी की, आपली कृत्ये देवाच्या ठायी केलेली आहेत हे उघड व्हावे.

यानंतर येशू व त्याचे शिष्य यहूदियाच्या प्रांतात आले आणि तेथे त्यांच्याबरोबर राहून तो बाप्तिस्मा करत होता.

जो पुत्रावर विश्वास ठेवतो त्यास सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे; परंतु जो पुत्राचे ऐकत नाही त्याच्या दृष्टीस जीवन पडणार नाही, पण देवाचा क्रोध त्याच्यावर राहतो.”

देव आत्मा आहे; आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे.”

त्यानंतर तो येशूला परमेश्वराच्या भवनात भेटला तेव्हा तो त्यास म्हणाला, “पाहा, तू बरा झाला आहेस, आतापासून पाप करू नकोस, करशील तर तुझे पूर्वीपेक्षा अधिक वाईट होईल.”

मी तुम्हास खरे खरे सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्यास सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही; तो मरणातून जीवनात पार गेला आहे.

त्याचे आश्चर्य करू नका; कारण जेव्हा कबरात असलेले सर्व त्याचा आवाज ऐकतील अशी घटका येत आहे, आणि ज्याने सत्कर्मे केली ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी व ज्यांनी दुष्कर्मे केली ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील.

पिता जे मला देतो ते सर्व माझ्याकडे येईल आणि माझ्याकडे जो येतो त्यास मी कधीच घालवणार नाही.

माझ्या पित्याची इच्छा हीच आहे की, जो कोणी पुत्राला पाहून त्याच्यावर विश्वास ठेवतो, त्यास सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे; त्यास मीच शेवटच्या दिवशी उठवीन.”

ज्याने मला पाठवले आहे त्या पित्याने आकर्षिल्याशिवाय कोणीही माझ्याकडे येऊ शकत नाही. त्यास शेवटल्या दिवशी मी उठवीन. संदेष्ट्यांच्या ग्रंथात लिहीले आहे की, ‘ते सगळे देवाने शिकवलेले असे होतील’, जो पित्याकडून ऐकून शिकला आहे तो माझ्याकडे येतो.

मी तुम्हास खरे खरे सांगतो, जो विश्वास ठेवतो त्यास सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे.

स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्वकाळ जगेल. जी भाकर मी देईन ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे.”

यावरुन येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हास खरे खरे सांगतो, तुम्ही मनुष्याच्या पुत्राचा देह खाल्ला नाही व त्याचे रक्त प्याला नाही तर तुमच्यामध्ये जीवन नाही. जो माझा देह खातो आणि माझे रक्त पितो त्यास सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि मीच त्यास शेवटल्या दिवशी पुन्हा उठवीन. कारण माझा देह खरे खाद्य आहे आणि माझे रक्त खरे पेय आहे. जो माझा देह खातो आणि माझे रक्त पितो तो माझ्यात राहतो आणि मी त्याच्यात राहतो. जसे जिवंत पित्याने मला पाठवले आणि मी जसा पित्यामुळे जगतो, तसे जो मला खातो तोसुध्दा माझ्यामुळे जगेल. स्वर्गातून उतरलेली भाकर हीच आहे. तुमच्या पूर्वजांनी भाकर खाल्ली तरी ते मरण पावले. हे तसे नाही. ही भाकर जो खातो तो सर्वकाळ जगेल.”

पुढे येशू पुन्हा त्यांना म्हणाला, “मीच जगाचा प्रकाश आहे; जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.”

म्हणून मी तुम्हास सांगितले की, तुम्ही तुमच्या पापात मराल; कारण, मी तो आहे असा तुम्ही विश्वास न धरल्यास तुम्ही आपल्या पापात मराल.”

ज्या यहूद्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना येशू म्हणाला, “तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहात. तुम्हास सत्य समजेल आणि सत्य तुम्हास बंधनमुक्त करील.”

आपल्याला हे माहीत आहे की, देव पापी लोकांचे ऐकत नाही, तर जो मनुष्य देवाचा उपासक आहे आणि जो त्याच्या इच्छेप्रमाणे करतो त्याचे तो ऐकतो.

या मेंढवाड्यातली नाहीत अशी माझी दुसरी मेंढरे आहेत; तीही मला आणली पाहिजेत आणि ती माझी वाणी ऐकतील. मग एक कळप आणि एक मेंढपाळ असे होईल.

तरी तुम्ही विश्वास ठेवत नाही, कारण तुम्ही माझ्या मेंढरांपैकी नाही. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्यामागे येतात. मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो; त्यांचा कधीही नाश होणार नाही आणि कोणी त्यांना माझ्या हातातून हिसकावून घेणार नाही.

येशूने तिला म्हटले, “पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मरण पावला असला तरी जगेल. आणि जिवंत असलेला प्रत्येकजण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही, यावर तू विश्वास ठेवतेस काय?” ती त्यास म्हणाली, “होय, प्रभूजी, जगात येणारा जो देवाचा पुत्र ख्रिस्त तो आपणच आहात असा विश्वास मी धरला आहे.”

जो आपल्या जीवावर प्रीती करतो तो त्यास मुकेल आणि जो या जगांत आपल्या जीवाचा व्देष करतो तो त्याचे सार्वकालिक जीवनासाठी रक्षण करील.

तरी यहूदी अधिकार्‍यांतूनही पुष्कळांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, परंतु आपणांस सभास्थानाच्या बाहेर घालवू नये म्हणून परूश्यांमुळे ते तसे कबूल करीत नव्हते. कारण त्यांना देवाकडील गौरवापेक्षा मनुष्याकडील गौरव अधिक प्रिय वाटले.

जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवतो त्याने अंधकारात राहू नये म्हणून मी जगात प्रकाश असा आलो आहे.

जो माझा अवमान करतो आणि माझी वचने स्वीकारीत नाही त्याचा न्याय करणारे कोणी आहे. जे वचन मी सांगितले, तेच शेवटल्या दिवशी, त्याचा न्याय करील.

येशूने त्यास म्हटले, “मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्याशिवाय पित्याकडे कोणी येत नाही.

माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल.

जशी मी तुम्हावर प्रीती केली तशीच तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी अशी माझी आज्ञा आहे. आपल्या मित्रांसाठी आपला जीव द्यावा यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही.

आणि तो आल्यावर तो जगाची पापाविषयी, नीतिमत्त्वाविषयी आणि न्यायाविषयी खात्री करील. पापाविषयी; कारण ते माझ्यावर विश्वास ठेवत नाहीत. नीतिमत्त्वाविषयी; कारण मी माझ्या पित्याकडे जातो आणि पुढे तुम्हास मी दिसणार नाही. आणि न्यायाविषयी; कारण या जगाच्या शासकाचा न्याय झाला आहे.

तू त्यांना सत्यात पवित्र कर. तुझे वचन हेच सत्य आहे.

येशूने त्यास म्हटले, “तू मला पाहिले आहे म्हणून विश्वास ठेवला आहे. पाहिल्यावांचून विश्वास ठेवणारे आहे ते धन्य!” आणि या पुस्तकात लिहिली नाहीत अशी दुसरीही पुष्कळ चिन्हे येशूने आपल्या शिष्यांसमोर केली. पण ही ह्यासाठी लिहिली आहेत की, येशू हा देवाचा पुत्र ख्रिस्त आहे, असा तुम्ही विश्वास ठेवावा आणि तुम्ही विश्वास ठेवल्याने तुम्हास त्याच्या नावात जीवन मिळावे.

तेव्हा असे होईल की जो कोणी परमेश्वराच्या नावाने त्याचा धावा करील तो तरेल.

पेत्र त्यांना म्हणाला, “पश्चात्ताप करा आणि तुमच्या पापांची क्षमा व्हावी, म्हणून तुम्ही प्रत्येकजण येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा घ्या, म्हणजे तुम्हास पवित्र आत्म्याचे दान प्राप्त होईल.

तेव्हा ज्यांनी त्याच्या संदेशाचा स्वीकार केला त्यांचा बाप्तिस्मा झाला, आणि त्यादिवशी त्यांच्यांत सुमारे तीन हजार मनुष्यांची भर पडली. ते प्रेषितांच्या शिक्षणात आणि सहवासात, भाकर मोडण्यांत व प्रार्थना करण्यांत तत्पर असत.

तर तुमची पापे पुसून टाकली जावी, म्हणून पश्चात्ताप करा, व फिरा अशासाठी की विसाव्याचे समय प्रभूच्या समक्षतेपासून यावे;

आणि तारण दुसऱ्या कोणामध्ये नाही कारण जेणेकरून आपले तारण होईल; असे दुसरे कोणतेही नाव आकाशाखाली मनुष्यामध्ये दिलेले नाही.”

त्याने इस्राएलाला पश्चात्ताप व पापांची क्षमा ही देणगी देण्याकरता देवाने त्यास आपल्या उजव्या हाताशी अधिपती व तारणारा असे उच्चपद दिले.

परंतु जेव्हा देवाचे राज्य व येशू ख्रिस्ताचे नाव ह्याविषयी फिलिप्पाने त्या लोकांस सुवार्ता सांगत असता त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, त्याचवेळी त्यांनी बाप्तिस्मा घेतला, त्यांच्यात जसे पुरूष होते तशा स्त्रियाही होत्या. स्वतः शिमोनाने विश्वास ठेवला: आणि त्याचा बाप्तिस्मा झाल्यावर, तो फिलिप्पबरोबर राहू लागला; आणि झालेले चमत्कार आणि अद्भूत चिन्हे पाहून, शिमोन आश्चर्याने थक्क झाला.

तू ज्या या वाईट गोष्टी केल्या आहेत, त्यासाठी पश्चात्ताप कर, प्रभूला प्रार्थना कर, कदाचित तुइया अंतःकरणातील कल्पनेची तो तुला क्षमा करील.

ते दोघे प्रवास करीत असताना, एका तळ्याजवळ आले; तेव्हा अधिकारी म्हणाला, “पाहा, येथे पाणी आहे; माझा बाप्तिस्मा करायला कोणती अडचण आहे?” फिलिप्पाने म्हटले, जर आपण आपल्या सर्व अंतःकरणाने विश्वास धरता तर योग्य आहे, त्याने उत्तर दिले, येशू ख्रिस्त देवाचा पुत्र आहे असा मी विश्वास धरतो.

लागलीच खपल्यासारखे काहीतरी शौलाच्या डोळ्यावरून खाली पडले, आणि त्यास पुन्हा दृष्टी आली शौल तेथून उठल्यावर त्याचा बाप्तिस्मा करण्यात आला.

पेत्राने बोलायला सुरुवात केली मला आता हे खरोखर समजले आहे की, “देवाला प्रत्येक मनुष्य सारखाच आहे. प्रत्येक राष्ट्रात जो कोणी त्याची भक्ति करतो आणि योग्य ते करतो, त्यास देव स्वीकारतो, व्यक्ति कोणत्या देशाची आहे, हे महत्त्वाचे नाही.

येशूने आम्हास ‘लोकांस उपदेश करायला सांगितले, जिवंतांचा आणि मरण पावलेल्यांचा न्याय करण्यासाठी देवाने त्यास आपल्याला आहे’ हे सांगण्यासाठी त्याने आम्हास आज्ञा केली. जो कोणी येशूवर विश्वास ठेवतो, त्यास क्षमा केली जाईल, येशूच्या नावामध्ये देव त्या व्यक्तिच्या पापांची क्षमा करील, सर्व संदेष्टे हे खरे आहे असे म्हणतात.”

म्हणून पेत्राने कर्नेल्य, त्याचे नातेवाईक आणि मित्र यांना येशू ख्रिस्ताच्या नावाने बाप्तिस्मा देण्याची आज्ञा केली, मग पेत्राने आणखी काही दिवस त्यांच्याबरोबर रहावे अशी त्या लोकांनी त्यास विनंती केली.

जेव्हा त्यांनी या गोष्टी ऐकल्या, तेव्हा ते शांत राहिले, त्यांनी देवाची स्तुती केली आणि म्हणाले, “तर मग देवाने परराष्ट्रीयांसही जीवन मिळावे म्हणून पश्चात्तापबुद्धी दिली आहे.”

याच दाविदाच्या वंशजातून देवाने इस्राएल लोकांचा तारणारा आणिला, तो वंशज येशू आहे, देवाने हे करण्याचे अभिवचन दिले होते. येशू येण्यापूर्वी सर्व इस्राएली लोकांस योहानाने उपदेश केला, त्यांच्या अंतःकरणात बदल व्हावा म्हणून योहानाने लोकांस सांगितले की, त्यांनी बाप्तिस्मा घेतला पाहिजे.

बंधुनो, आम्ही जी घोषणा करीत आहोत ते तुम्ही समजून घेतले पाहिजेः या एकाकडूनच तुमच्या पापांची क्षमा तुम्हास मिळू शकते. मोशेचे नियमशास्त्र तुम्हास तुमच्या पापांपासून मुक्त करणार नाही, पण प्रत्येक व्यक्ति जी त्याच्यावर विश्वास ठेवते, ती त्याच्याद्वारे त्या सर्वांविषयी न्यायी ठरविली जाते.

आणि त्यांनी तेथील शिष्यांना येशूवरील विश्वासात बळकट केले, त्यांनी आपल्या विश्वासांत अढळ रहावे म्हणून उत्तेजन दिले, ते म्हणाले, “अनेक दुःखांना तोंड देत आपण देवाच्या राज्यात प्रवेश केला पाहिजे.”

आणि त्यांना बाहेर काढून म्हणाला “साहेब, माझे तारण व्हावे म्हणून मला काय केले पाहीजे?” ते म्हणाले, “प्रभू येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल.” त्यांनी त्यास व त्याच्या घरांतील सर्वांना प्रभूचे वचन सांगितले. मग रात्रीच्या त्याच घटकेस त्याने त्यांना जवळ घेऊन त्यांच्या जखमा धुतल्या; आणि तेव्हांच त्याने व त्याच्या घरच्या सर्व मनुष्यांनी बाप्तिस्मा घेतला.

अज्ञानाच्या काळांकडे देवाने डोळेझाक केली, परंतु आता सर्वांनी सर्वत्र पश्चात्ताप करावा अशी तो मनुष्यांना आज्ञा करतो. त्याने असा एक दिवस नेमला आहे की, ज्या दिवशी तो आपण नेमलेला मनुष्य येशू याच्याद्वारे जगाचा न्यायनिवाडा नीतिमत्त्वाने करणार आहे; त्याने त्यास मरण पावलेल्यातून उठवून ह्याविषयीचे प्रमाण सर्वास पटवले आहे.

त्या सभास्थानाचा क्रिस्प हा पुढारी होता, क्रिस्पने व त्याच्या घरातील सर्वांनी प्रभूवर विश्वास ठेवला, करिंथ येथील पुष्कळ लोकांनी पौलाचे बोलणे ऐकले आणि विश्वास ठेवला, करिंथ येथील पुष्कळ लोकांनी पौलाचे बोलणे ऐकले आणि विश्वास ठेवला आणि त्यांचा बाप्तिस्मा करण्यात आला.

पौल म्हणाला, “योहानाचा बाप्तिस्मा पश्चात्तापाचा होता, त्याने लोकांस सांगितले की, त्यानंतर जो येत आहे, त्याच्यावर लोकांनी विश्वास ठेवावा, तो येणारा म्हणजे येशू होय.” जेव्हा त्यांनी हे ऐकले, तेव्हा त्यांनी प्रभू येशूच्या नावात बाप्तिस्मा घेतला.

पुष्कळसे विश्वास ठेवणारे पापकबुली देऊ लागले व ज्या वाईट गोष्टी त्यांनी केल्या होत्या, त्या सांगू लागले.

पश्चात्ताप करून देवाकडे वळण्याविषयी आणि आपल्या प्रभू येशूवरील विश्वासाविषयी यहूदी व ग्रीक लोकांस सारखीच साक्ष दिली.

तुमची स्वतःची व देवाच्या सर्व लोकांची, ज्याना देवाने तुम्हास दिलेले आहे, त्यांची काळजी घ्या, कळपाची (देवाच्या लोकांची) काळजी घेण्याचे काम पवित्र आत्म्याने तुम्हास दिलेले आहे, तुम्ही मंडळीसाठी मेंढपाळासारखे असले पाहिजे, ही मंडळी देवाने स्वतःचे रक्त देऊन विकत घेतली.

तर आता उशीर का करितोस? ऊठ, त्याच्या नावाचा धावा करून बाप्तिस्मा घे आणि आपल्या पापांचे क्षालन कर.

मी तुला त्यांच्याकडे पाठवतो, ह्यासाठी की, त्यांनी अंधारांतून निघून उजेडाकडे व सैतानाच्या अधिकारातून देवाकडे वळावे, म्हणून तू त्यांचे डोळे उघडावे आणि त्यांना पापाची क्षमा व्हावी व माझ्यावरील विश्वासाने पवित्र झालेल्या लोकांमध्ये वतन मिळावे.

म्हणून देवाचे हे तारण परराष्ट्रीयांकडे लोकांकडे पाठविण्यात आले आहे, हे तुम्हा यहूदी लोकांस कळावे, ते ऐकतील.

कारण मला सुवार्तेची लाज वाटत नाही कारण विश्वास ठेवणार्‍या प्रत्येकाला तारणासाठी, ती देवाचे सामर्थ्य आहे; प्रथम यहूद्याला आणि ग्रीकालाही.

आणि त्यांना देवाला स्मरणात ठेवणेही न आवडल्यामुळे देवाने त्यांना अनुचित गोष्टी करीत राहण्यास विपरीत मनाच्या स्वाधीन केले. ते सर्व प्रकारच्या अनीतीने, दुष्टतेने, लोभाने आणि कुवृत्तीने भरलेले असून मत्सर, खून, कलह, कपट, दुष्ट भाव, ह्यांनी पूर्ण भरलेले; कानगोष्टी करणारे, निंदक, देवद्वेष्टे, टवाळखोर, गर्विष्ठ, प्रौढी मिरवणारे, वाईट गोष्टी शोधून काढणारे, आई-वडीलांचा अवमान करणारे, निर्बुद्ध, वचनभंग करणारे, दयाहीन व निर्दय झाले. आणि या गोष्टी करणारे मरणाच्या शिक्षेस पात्र आहेत हा देवाचा न्याय त्यांना कळत असून ते त्या करतात एवढेच केवळ नाही, पण अशा गोष्टी करणार्‍यांना ते संमतीही देतात.

पण आपल्याला माहीत आहे की, अशा गोष्टी करणार्‍यांविरुद्ध, देवाचा सत्यानुसार न्यायनिवाडा आहे. तर अशा गोष्टी करणार्‍यांना दोष लावणार्‍या आणि आपण स्वतः त्याच गोष्टी करणार्‍या, अरे बंधू, तू स्वतः देवाच्या न्यायनिवाड्यातून सुटशील असे मानतोस काय? किंवा देवाची दया तुला पश्चात्तापाकडे घेऊन जात आहे हे न ओळखून तू त्याच्या ममतेचे, क्षमाशीलतेचे आणि सहनशीलतेचे धन तुच्छ मानतोस काय? पण तू आपल्या हटवादीपणाने व आपल्या पश्चात्तापहीन मनाने आपल्या स्वतःसाठी देवाच्या क्रोधाच्या व यथोचित न्यायाच्या प्रकटीकरणाच्या दिवसासाठी क्रोध साठवून ठेवत आहेस. तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे प्रतिफळ देईल. म्हणजे जे धीराने सत्कर्मे करीत राहून गौरव, सन्मान व अक्षयता ही मिळवू पाहतात त्यांना तो सार्वकालिक जीवन देईलच; परंतु जे तट पाडणारे सत्याला न मानता अनीतीला मानतात त्यांना भयानक क्रोध व भयानक कोप. संकट व क्लेश हे येतील. म्हणजे दुष्कृत्य करणारा मनुष्य प्रथम यहूदी आणि मग हेल्लेणी अशा प्रत्येकाच्या जीवावर ती येतील. पण प्रत्येक चांगले करणार्‍या प्रथम यहूद्याला आणि मग ग्रीकास गौरव, शांती व सन्मान ही मिळतील. कारण देवाजवळ पक्षपात नाही.

देव, माझ्या सुवार्तेप्रमाणे जेव्हा मनुष्यांच्या गुप्त गोष्टींचा ख्रिस्त येशूकडून न्याय करील त्यादिवशी हे दिसून येईल.

शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘नीतिमान कोणी नाही, एकही नाही. ज्याला समजते असा कोणी नाही, जो झटून देवाचा शोध करतो असा कोणी नाही,

त्यांच्या डोळ्यांपुढे देवाचे भय नाही.’ आता आपण हे जाणतो की नियमशास्त्र जे काही सांगते ते नियमशास्त्राधीन असलेल्यांस सांगते म्हणजे प्रत्येक तोंड बंद केले जावे आणि सर्व जग देवासमोर अपराधी म्हणून यावे.

कारण देवाच्या दृष्टीपुढे नियमशास्त्राच्या कृतींकडून कोणीही मनुष्य नीतिमान ठरणार नाही, कारण नियमशास्त्राकडून पापाचे ज्ञान होते.

कारण सर्वांनी पाप केले आहे आणि ते देवाच्या गौरवाला अंतरले आहेत; देवाच्या कृपेने ख्रिस्त येशूने खंडणी भरून प्राप्त केलेल्या मुक्तीच्या द्वारे ते विनामुल्य नीतिमान ठरतात. त्याच्या रक्ताकडून विश्वासाद्वारे प्रायश्चित्त होण्यास देवाने त्यास पुढे ठेवले, कारण देवाच्या मागे झालेल्या पापांच्या क्षमेमुळे सहनशीलपणात आणि त्याने आपले नीतिमत्त्व प्रकट करावे;

म्हणून, नियमशास्त्राच्या कर्मांवाचून मनुष्य विश्वासाने नीतिमान ठरतो हे आपण पाहतो.

‘ज्यांच्या अपराधांची क्षमा झाली आहे, ज्यांची पापे झाकली गेली आहेत ते धन्य होत.

तो प्रभू येशू आपल्या अपराधांसाठी धरून देण्यात आला व आपण नीतिमान ठरावे म्हणून तो जिवंत करण्यात आला आहे.

आता आपण विश्वासाने नीतिमान ठरवले गेलो आहोत म्हणून आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे देवाबरोबर शांती आहे. आपण उभे आहोत त्या कृपेतही त्याच्याद्वारे विश्वासाने आपल्याला प्रवेश मिळाला आहे व आपण देवाच्या गौरवाच्या आशेत अभिमान मिरवतो. आणि इतकेच नाही तर आपण संकटांतही अभिमान मिरवतो; कारण आपण जाणतो की संकट धीर उत्पन्न करते, आणि धीर प्रचीती व प्रचीती आशा उत्पन्न करते. आणि आशा लज्जित करीत नाही; कारण आपल्या अंतःकरणात आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्याद्वारे देवाची प्रीती ओतली जात आहे.

पण आपण पापी असताना ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला, ह्यात देव त्याची आपल्यावरील प्रीती प्रस्थापित करतो. मग आता आपण त्याच्या रक्ताने नीतिमान ठरवले गेलो आहोत, तर त्याहून अधिक हे आहे की त्याच्याद्वारे आपण देवाच्या क्रोधापासून तारले जाऊ. कारण आपण वैरी होतो, तेव्हा जर आपला देवाबरोबर, त्याच्या पुत्राच्या मरणाने समेट केला गेला, तर त्याहून अधिक हे आहे की, आपला समेट केला गेल्यामुळे त्याच्या जीवनाने आपण निश्चित तारले जाऊ. इतकेच नाही, पण आता ज्याच्या द्वारे आपण समेट स्वीकारला आहे तो आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे आपण देवाच्या ठायी अभिमान मिरवतो.

शिवाय, अपराध वाढावा म्हणून नियमशास्त्र आत आले. पण जेथे पाप वाढले तेथे कृपा अधिक विपुल झाली. म्हणजे, जसे पापाने मरणाच्या योगे राज्य चालविले तसे कृपेने नीतिमत्त्वाच्या योगे प्राप्त होणार्‍या सार्वकालिक जीवनासाठी आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे राज्य चालवावे.

तर आता आपण काय म्हणावे? कृपा अधिक व्हावी म्हणून आपण पापात रहावे काय? कधीच नाही! आपण जे पापाला मरण पावलो आहोत ते त्यामध्ये ह्यापुढे कसे राहणार? किंवा आपण जितक्यांनी ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला, त्या आपण त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला हे तुम्ही जाणत नाही काय?

म्हणून आपण त्याच्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरले गेलो, ते ह्यासाठी की जसा ख्रिस्त पित्याच्या गौरवामुळे मरण पावलेल्यांमधून उठवला गेला तसेच आपणही जीवनाच्या नवेपणात चालले पाहिजे. कारण जर त्याच्या मरणाच्या रूपात आपण त्याच्याशी जोडलेले आहोत तर त्याच्या पुन्हा उठण्याच्या रूपात आपण त्याच्याशी जोडलेले होऊ. आपण जाणतो की आपल्यामधील जुना मनुष्य त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळला गेला आहे, म्हणजे पापाचे शरीर नष्ट होऊन आपण पुढे पापाचे दास्य करू नये. कारण जो मरण पावला आहे तो पापापासून मुक्त होऊन न्यायी ठरवलेला आहे.

कारण जो मरण पावला आहे तो पापापासून मुक्त होऊन न्यायी ठरवलेला आहे. पण आपण जर ख्रिस्ताबरोबर मरण पावलो असलो, तर आपण त्याच्याबरोबर जिवंतही राहू असा आपण विश्वास ठेवतो. कारण आपण हे जाणतो की, मरण पावलेल्यांमधून उठलेला ख्रिस्त पुन्हा मरणार नाही. त्याच्यावर मरणाची सत्ता अजिबात राहिली नाही. कारण तो मरण पावला तो पापासाठी एकदाच मरण पावला, पण जिवंत आहे तो देवासाठी जिवंत आहे. तसेच आपण ख्रिस्त येशूमध्ये खरोखर पापाला मरण पावलेले पण देवाला जिवंत आहोत असे तुम्ही स्वतःला माना.

तसेच आपण ख्रिस्त येशूमध्ये खरोखर पापाला मरण पावलेले पण देवाला जिवंत आहोत असे तुम्ही स्वतःला माना. म्हणून तुम्ही आपल्या मरणाधीन शरीरात त्याच्या वासनांच्या अधीन होण्यास पापाला राज्य चालवू देऊ नका. आणि तुम्ही आपले अवयव अनीतीची साधने म्हणून पापाला समर्पण करू नका. पण तुम्ही आपल्या स्वतःला मरण पावलेल्यातून जीवंत झालेले असे देवाला समर्पण करा आणि आपले स्वतःचे अवयव नीतिमत्त्वाची साधने म्हणून तुम्ही देवाला समर्पण करा. तुमच्यावर पापाची सत्ता चालणार नाही कारण तुम्ही नियमशास्त्राधीन नाही, पण कृपेखाली आणले गेला आहात.

पण देवाला धन्यवाद कारण तुम्ही पापाचे दास असतानाही तुम्ही ज्या शिक्षणाच्या शिस्तीखाली ठेवला गेला त्याच्या तुम्ही मनापासून आज्ञा पाळल्या, आणि पापापासून मुक्त केले जाऊन नीतिमत्त्वाचे दास झाला. मी तुमच्या देहाच्या अशक्तपणामुळे मनुष्यांच्या व्यवहारास अनुसरून बोलतो कारण जसे तुमचे अवयव अमंगळपणाला व अनाचाराला अनाचारासाठी दास होण्यास समर्पित केलेत तसेच आता तुमचे अवयव नीतिमत्त्वाला पवित्रीकरणासाठी दास होण्यास समर्पण करा.

पण आता तुम्ही पापापासून मुक्त केले जाऊन देवाचे दास झाला असल्यामुळे, आता तुम्हास पवित्रीकरण हे फळ आहे आणि शेवटी सार्वकालिक जीवन आहे. कारण पापाचे वेतन मरण आहे, पण आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे सार्वकालिक जीवन हे देवाचे कृपादान आहे.

कारण आपण देहाधीन असताना नियमशास्त्रामुळे उद्भवलेल्या आपल्या पापांच्या भावना आपल्या अवयवात, मरणाला फळ देण्यास कार्य करीत होत्या. पण आपण ज्याच्या बंधनात होतो त्यास आपण मरण पावलो असल्यामुळे आपण आता नियमशास्त्रापासून मुक्त झालो आहोत, ते ह्यासाठी की, आपण आत्म्याच्या नवेपणाने सेवा करावी, शास्त्रलेखाच्या जुनेपणाने नाही.

पण पापाने आज्ञेची संधी घेऊन माझ्यात सर्व प्रकारचा लोभ उत्पन्न केला कारण नियमशास्त्राशिवाय पाप निर्जीव होते.

कारण आपण हे जाणतो की, नियमशास्त्र हे आत्मिक आहे, पण मी दैहिक आहे; पापाला विकलेला आहे. कारण मी काय करीत आहे ते मला कळत नाही; कारण मी ज्याची इच्छा करतो ते मी करीत नाही पण मी ज्याचा द्वेष करतो ते मी करतो. मग मी जे इच्छीत नाही ते जर मी करतो, तर नियमशास्त्र चांगले आहे हे मी कबूल करतो. मग आता मी ते करीत नसून माझ्यात राहणारे पाप ते करते. कारण मी जाणतो की, माझ्यात (म्हणजे माझ्या देहात) काहीच चांगले वसत नाही कारण इच्छा करणे माझ्याजवळ आहे, पण चांगले करीत राहणे नाही. कारण मी जे चांगले करण्याची इच्छा करतो ते मी करीत नाही, पण मी ज्याची इच्छा करीत नाही ते वाईट मी करतो. मग आता मी जे इच्छीत नाही ते जर मी करतो, तर मी ते करीत नसून माझ्यात राहणारे पाप ते करते.

मग मी चांगले करू इच्छीत असता वाईट माझ्याजवळ हाताशी असते, हा नियम आढळतो. कारण मी माझ्या अंतर्यामी देवाच्या नियमाने आनंदित होतो; पण मला माझ्या अवयवात दुसरा एक असा नियम दिसतो; तो माझ्या मनातील नियमाशी लढून, मला माझ्या अवयवात असलेल्या पापाच्या नियमाच्या स्वाधीन करतो. मी किती कष्टी मनुष्य! मला या मरणाच्या शरीरात कोण सोडवील? मी आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे देवाचे उपकार मानतो. म्हणजे मग मी स्वतः मनाने देवाच्या नियमाचे दास्य करतो पण देहाने पापाच्या नियमाचे दास्य करतो.

म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असणाऱ्यांना दंडाज्ञा नाही. ते देहाप्रमाणे नाही तर आत्म्याप्रमाणे चालतात. कारण, ख्रिस्त येशूतील जीवनाच्या पवित्र आत्म्याच्या नियमाने मला पापाच्या व मरणाच्या नियमातून मुक्त केले. कारण देहामुळे नियमशास्त्र दुर्बळ झाल्याने त्यास जे अशक्य झाले, त्यासाठी देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राला पापासाठी पापमय देहाचे रूप देऊन पाठवले व पापाला देहात दंडाज्ञा ठरविली. म्हणजे आपण जे देहाला अनुसरून नाही पण आत्म्याला अनुसरून चालणारे आहोत त्या आपल्यात नियमशास्त्राची आज्ञा पूर्ण व्हावी. कारण देहाला अनुसरून चालणारे दैहिक गोष्टींवर मन ठेवतात; पण आत्म्याला अनुसरून चालणारे आत्मिक गोष्टींवर मन ठेवतात. देहस्वभावाचे चिंतन हे मरण आहे पण आत्मिक मनाचे होणे म्हणजे जीवन व शांती. कारण देहस्वभावाचे चिंतन हे देवाशी वैर आहे; कारण ते देवाच्या नियमाला अंकित होत नाही आणि त्यास खरोखर, होता येत नाही. म्हणून जे देहाचे आहेत ते देवाला संतोषवू शकत नाहीत.

पण तुमच्यात जर देवाचा आत्मा वास करतो, तर तुम्ही देहाचे नाही, पण आत्म्याचे आहात कारण ख्रिस्ताचा आत्मा जर कोणात नसेल तर तो त्याचा नाही. पण जर तुमच्यात ख्रिस्त आहे, तर शरीर पापामुळे मरण पावलेले आहे, पण नीतिमत्त्वामुळे आत्मा जीवन आहे. पण ज्याने येशूला मरण पावलेल्यातून उठवले त्याचा आत्मा जर तुमच्यात वास करतो, तर ज्याने ख्रिस्त येशूला मरण पावलेल्यातून उठवले तो तुमच्यात राहणार्‍या, आपल्या आत्म्याच्याद्वारे तुमचीही मरणाधीन शरीरे जिवंत करील.

म्हणून बंधूंनो आपण देणेकरी आहोत; पण देहानुसार जगण्यास देहाचे नाही कारण तुम्ही जर देहानुसार जगाल तर तुम्ही मराल, पण तुम्ही आत्म्याच्या योगे शरीराच्या कृती मारून टाकल्या तर तुम्ही जिवंत रहाल. कारण देवाचा आत्मा जितक्यांना चालवतो ते देवाचे पुत्र आहेत. कारण तुम्हास पुन्हा भय धरण्यास दासपणाचा आत्मा मिळाला नाही; पण आपण ज्यायोगे ‘अब्बा-पित्या’ अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हास मिळाला आहे. तो पवित्र आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की, आपण देवाची लेकरे आहोत. आणि, जर मुले तर वारीस, देवाचे वारीस, ख्रिस्ताबरोबर जोडीचे वारीस आहोत. म्हणजे, त्याच्याबरोबर आपले गौरवही व्हावे, म्हणून त्याच्याबरोबर आपण दुख तर सोसले वारीस आहोत.

कारण मी मानतो की, या चालू काळातील दुःखे ही आपल्यासाठी जे गौरव प्रकट होईल, त्याच्यापुढे काही किमतीची नाहीत. कारण, सृष्टीची उत्कट अपेक्षा देवाच्या पुत्रांच्या प्रकट होण्याची प्रतीक्षा करीत आहे.

आणि ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्राला राखले नाही, पण आपल्या सर्वांसाठी त्यास दिले, तो आपल्याला त्याच्याबरोबर सर्व गोष्टीही का देणार नाही? देवाच्या निवडलेल्यांवर दोषारोप कोण आणील? देव नीतिमान ठरविणारा आहे. दंडाज्ञा ठरविणारा कोण आहे? जो ख्रिस्त येशू मरण पावला, हो, जो मरण पावलेल्यातून उठवला गेला व देवाच्या उजवीकडे बसला आहे, तो तर आपल्यासाठी मध्यस्थी करीत आहे. ख्रिस्ताच्या प्रीतीपासून कोण आपल्याला वेगळे करील? संकट किंवा दुःख, पाठलाग, भूक किंवा नग्नता, आपत्ती किंवा तरवार करील काय? कारण असे लिहिले आहे की, ‘तुझ्याकरता आम्ही दिवसभर मारले जात आहोत, आम्ही वधाच्या मेंढराप्रमाणे गणलेले आहोत.’ पण ज्याने आपल्यावर प्रीती केली, त्याच्याद्वारे या सर्व गोष्टींत आपण महाविजयी ठरतो.

कारण तो मोशेला म्हणतो, ‘मी ज्याच्यावर दया करतो त्याच्यावर दया करीन आणि मी ज्याच्यावर उपकार करतो त्याच्यावर उपकार करीन.’ तर मग जो इच्छा धरतो त्याच्यामुळे नाही किंवा जो धावतो त्याच्यामुळे नाही, पण जो देव दया करतो त्याच्यामुळे हे आहे.

कारण ते देवाच्या नीतिमत्त्वाविषयी अज्ञानी असता आणि स्वतःचे नीतिमत्त्व प्रस्थापित करू पाहत असता ते देवाच्या नीतिमत्त्वाला वश झाले नाहीत. कारण ख्रिस्त हा विश्वास ठेवणार्‍या प्रत्येकाला नीतिमत्त्वासाठी नियमशास्त्राचा शेवट आहे.

कारण येशू प्रभू आहे असे जर तू आपल्या मुखाने कबूल करशील आणि देवाने त्यास मरण पावलेल्यांमधून उठवले असा आपल्या अंतःकरणात विश्वास ठेवशील तर तुझे तारण होईल. कारण जो अंतःकरणाने विश्वास ठेवतो तो नीतिमान ठरतो व जो मुखाने कबूल करतो त्याचे तारण होते. म्हणून शास्त्रलेख म्हणतो की, ‘जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो तो लज्जित होणार नाही.’ यहूदी व हेल्लेणी ह्यांच्यात फरक नाही, कारण तोच प्रभू सर्वांवर असून जे त्याचा धावा करतात त्या सर्वांसाठी तो संपन्न आहे, ‘कारण जो कोणी प्रभूच्या नावाचा धावा करील त्याचे तारण होईल.’

तर मग ऐकण्यामुळे विश्वास होतो आणि ख्रिस्ताच्या वचनामुळे ऐकणे होते.

पण देवाचे उत्तर त्यास काय मिळाले? ‘ज्यांनी बआलाच्या मूर्तीपुढे गुडघा टेकला नाही, असे एकंदर सात हजार लोक मी माझ्यासाठी राखले आहेत.’ मग त्याचप्रमाणे या चालू काळातही त्या कृपेच्या निवडीप्रमाणे एक अवशेष आहे.

कारण, जर देवाने मूळच्या फाट्यांची गय केली नाही तर तो तुझीही गय करणार नाही. तर तू देवाची दया आणि छाटणी बघ. जे पडले त्यांच्यावर छाटणी, पण, तू जर दयेत राहिलास तर तुझ्यावर दया; नाही तर, तूही छाटला जाशील.

आणि मी त्यांची पापे दूर करीन. तेव्हा माझा त्यांच्याबरोबर हा करार होईल.’

म्हणून बंधूंनो देवाची दया स्मरून मी तुम्हास विनंती करतो की, तुम्ही आपली शरीरे ‘पवित्र व देवाला संतोष देणारे जिवंत ग्रहणीय’ यज्ञ म्हणून सादर करावीत; ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. आणि या जगाशी समरूप होऊ नका पण तुमच्या मनाच्या नविनिकरणाने तुमचे रूपांतर होऊ द्या; म्हणजे देवाची उत्तम व त्यास संतोष देणारी परिपूर्ण इच्छा काय आहे ती तुम्ही ओळखावी.

वाईटाने जिंकला जाऊ नकोस; पण बऱ्याने वाईटाला जिंक.

आणि हे आताच समय ओळखून करा, कारण आताच तुमची झोपेतून उठण्याची घटका आली आहे कारण आपण विश्वास ठेवला तेव्हापेक्षा आता आपले तारण अधिक जवळ आले आहे.

तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्त परिधान करा आणि देहवासनांसाठी काही तरतुद करू नका.

मग तू आपल्या बंधूला दोष का लावतोस? किंवा तू आपल्या बंधूला तुच्छ का लेखतोस? कारण, आपण सगळे जण देवाच्या न्यायासनासमोर उभे राहणार आहोत. कारण असे लिहिले आहे की, ‘प्रभू म्हणतो, मी जिवंत आहे म्हणून, प्रत्येक गुडघा मला नमन करील, आणि प्रत्येक जीभ देवाचे स्तवन करील.’ तर मग आपल्यातला प्रत्येकजण देवाला आपआपला हिशोब देईल.

आणि आता आशेचा देव तुम्हास तुमच्या विश्वासाद्वारे आनंदाने व शांतीने भरो, म्हणजे पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तुम्ही आशेत वाढत जावे.

तोच तुम्हास शेवटपर्यंत दृढ देखील राखील, जेणेकरून आपल्या प्रभू येशूच्या ख्रिस्ताच्या दिवशी तुम्ही निर्दोष असावे.

कारण ज्यांचा नाश होत आहे अशांसाठी वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे, परंतु ज्यांचे तारण होत आहे, अशांसाठी तो देवाचे सामर्थ्य आहे.

यासाठी की कोणाही मनुष्याने देवासमोर बढाई मारू नये. कारण तो ख्रिस्त येशूमध्ये तुमच्या जीवनाचा उगम आहे व तो देवाची देणगी म्हणून आपले ज्ञान, आपले नीतिमत्त्व, आपले पवित्रीकरण आणि आपली मुक्ती असा झाला आहे.

तुम्ही देवाचे निवासस्थान आहात आणि देवाचा आत्मा तुमच्यामध्ये निवास करतो हे तुम्हास माहीत नाही काय? जर कोणी देवाच्या निवासस्थानाचा नाश करतो तर देव त्या व्यक्तीचा नाश करील; कारण देवाचे निवास्थान पवित्र आहे आणि ते तुम्ही आहात.

पण आता, मी तुम्हास लिहिले आहे की, ख्रिस्तात बंधू म्हणलेला असा कोणी जर व्यभिचारी, लोभी किंवा मूर्तिपुजक, निंदक, पिणारा किंवा लुबाडणारा असेल तर त्याच्याशी संबंध ठेवू नका; अशा मनुष्यांबरोबर जेवूही नका. (कारण जे मंडळीच्या बाहेर आहेत त्यांचा न्याय करण्याचा माझा काय संबंध?) त्याऐवजी जे मंडळीत आहेत त्यांचा न्याय तुम्ही करीत नाही काय? पण देव बाहेरच्यांचा न्याय करतो म्हणून ‘तुम्ही आपल्यामधून त्या दुष्ट मनुष्यास बाहेर काढा.’

अनीतिमानास देवाचे राज्य वतन मिळणार नाही, हे तुम्ही जाणत नाही काय? फसू नका; कोणीही व्यभिचारी, मूर्तिपुजक किंवा व्यभिचारी, विपरीत संभोग करू देणारे किंवा विपरीत संभोग करणारे, चोर, लोभी, दारूबाज, निंदा करणारे किंवा लुबाडणारे ह्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. आणि तुम्ही कित्येकजण तसे होता; पण तुम्ही धुतले गेला आहा, तुम्ही पवित्र केले गेला आहात आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने व आपल्या देवाच्या आत्म्याकडून तुम्ही नीतिमान ठरवले गेला आहात.

व्यभिचारापासून दूर पळा. जे दुसरे कोणतेही पाप मनुष्य करतो ते त्याच्या शरीराबाहेर होते पण व्यभिचार करणारा आपल्या स्वतःच्या शरीराविरुद्ध पाप करतो. किंवा तुम्ही हे जाणत नाही का की, तुमचे शरीर हे देवाकडून मिळालेल्या व तुमच्यात असलेल्या पवित्र आत्म्याचे निवासस्थान आहे? आणि तुम्ही आपले स्वतःचे नाही? कारण तुम्हास मोल देऊन विकत घेतले आहे; म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा.

कारण सुंता झालेला असणे काही नाही किंवा बेसुंता असणे काही नाही; पण देवाच्या आज्ञांचे पालन करणे हे सर्वकाही आहे.

देवाने तुम्हास मोल देऊन विकत घेतले आहे, म्हणून तुम्ही मनुष्यांचे दास होऊ नका.

ज्याप्रमाणे त्यांच्यातील काहीजणांनी केले तसे व्यभिचार आपण करू नये. त्याचा परिणाम असा झाला की, एका दिवसात तेवीस हजार लोक मरण पावले. आणि त्यांच्यातील काहीजणांनी पाहिली तशी आपण ख्रिस्ताची परीक्षा पाहू नये. याचा परिणाम असा झाला की, ते सापांकडून मारले गेले. कुरकुर करू नका, ज्याप्रमाणे त्यांच्यातील काहीजणांनी केली, याचा परिणाम असा झाला की, ते मृत्युदूताकडून मारले गेले. या गोष्टी त्यांच्याबाबतीत उदाहरणार्थ होत्या म्हणून घडल्या व त्या गोष्टी लिहिल्या गेल्या यासाठी की आम्ही ज्यांच्यावर युगाचा शेवट आला आहे अशा आपणासाठी त्या इशारा अशा व्हाव्यात म्हणून मी खंबीरपणे उभा आहे असा जो विचार करतो त्याने आपण पडू नये म्हणून जपावे.

जे मनुष्यास सामान्य नाही अशा कोणत्याही परीक्षेने तुम्हास घेरले नाही. परंतु देव विश्वसनीय आहे. तुम्हास सहन करता येते त्यापलीकडे तो तुमची परीक्षा घेणार नाही. परंतु त्या परीक्षेबरोबर, त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही तयार करील. म्हणजे तुम्हास सहन करणे शक्य होईल.

कारण आपण यहूदी किंवा ग्रीक होतो, दास किंवा स्वतंत्र होतो तरी एका आत्म्याने आपण सर्वाचा एका शरीरात बाप्तिस्मा झाला आहे आणि सर्वांना एकाच पवित्र आत्म्याने भरण्यात आले.

कारण जे मला पहिल्यांदा सांगण्यात आले ते मी तुम्हास सांगून टाकले, त्यापैकी महत्त्वाचे हे आहे की, शास्त्रलेखाप्रमाणे ख्रिस्त तुमच्याआमच्या पापांसाठी मरण पावला. त्यास पुरण्यात आले व शास्त्रलेखाप्रमाणे तिसऱ्या दिवशी त्यास पुन्हा उठविण्यात आले.

फसू नका, “वाईट सोबतीने चांगल्या सवयी बिघडतात.” नीतिमत्त्वासंबंधाने शुद्धीवर या आणि पाप करीत जाऊ नका कारण तुम्हापैकी काहीजण देवाविषयी अज्ञानी आहेत. हे मी तुम्हास लाजविण्यासाठी बोलतो.

मरणाची नांगी पाप आहे आणि पापाचे सामर्थ्य नियमशास्त्रापासून येते.

पण आमची सुवार्ता आच्छादली गेली असेल तर ज्यांचा नाश होत आहे त्यांच्यासाठी ती आच्छादली गेली आहे. जो ख्रिस्त देवाचे प्रतिरूप आहे त्याच्या गौरवाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांना प्रकाशमान होऊ नये म्हणून, असे जे विश्वास ठेवत नाहीत, त्यांची मने या युगाच्या दुष्ट दैवताने आंधळी केलीली आहेत.

आम्ही निरंतर आमच्या शरीरात येशूचे मरण घेऊन जात असतो; यासाठी की, आमच्या शरीरात येशूचे जीवनही प्रकट व्हावे. कारण आम्ही जे जिवंत आहोत ते येशूकरता मरणाच्या सतत स्वाधीन केले जात आहोत; म्हणजे आमच्या मरणाधीन देहात येशूचे जीवनही प्रकट व्हावे.

कारण हे जे हलके दुःख केवळ तात्कालिक आहे ते आमच्यासाठी फार अधिक मोठ्या अशा सार्वकालिक गौरवाचा भार तयार करते. आता आम्ही दिसणार्‍या गोष्टींकडे पाहत नाही पण न दिसणार्‍या गोष्टींकडे पाहतो कारण दिसणार्‍या गोष्टी क्षणिक आहेत पण न दिसणार्‍या गोष्टी सार्वकालिक आहेत.

कारण आपल्याला, प्रत्येक जणाला, ख्रिस्ताच्या न्यायासनापुढे प्रकट झाले पाहिजे; ह्यासाठी की, शरीरात केलेल्या गोष्टींबद्दल प्रत्येक मनुष्यास त्याने जे जे केले असेल त्याचे प्रतिफळ मिळावे. ते चांगले असेल किंवा वाईट असेल.

आणि सर्वांसाठी तो ह्यासाठी मरण पावला की, ह्यापुढे जे जगतील त्यांनी आपल्या स्वतःसाठी नाही, पण त्यांच्यासाठी जो स्वतः मरण पावला आणि पुन्हा उठला त्याच्यासाठी त्यांनी जगावे.

म्हणून कोणी मनुष्य ख्रिस्तात असेल तर तो नवी उत्पत्ती आहे; जुने होऊन गेले आहे, बघा, ते नवे झाले आहे;

तर मग आम्ही ख्रिस्ताच्या वतीने वकील झालो आहो; जणू तुम्हास आमच्याद्वारे देव विनंती करीत आहे; ख्रिस्ताच्या वतीने आम्ही तुम्हास विनवणी करतो की, तुम्ही देवाशी समेट केलेले असे व्हा. कारण जो पाप जाणत नव्हता त्यास त्याने आपल्यासाठी पाप असे केले, म्हणजे आपण त्याच्याठायी देवाचे नीतिमत्त्व असे व्हावे.

कारण तो म्हणतो, ‘मी अनुकूल समयी तुझे ऐकले, आणि तारणाच्या दिवशी तुझे सहाय्य केले.’ पाहा, आता अनुकूल समय आहे, पाहा, आता तारणाचा दिवस आहे.

विश्वास न ठेवणार्‍यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका; कारण नीतिमान व अनाचार ह्यांची भागी कशी होणार? प्रकाश व अंधकार ह्यांचा मिलाप कसा होणार?

आणि म्हणून ‘प्रभू म्हणतो की, त्यांच्यामधून बाहेर या आणि वेगळे व्हा; अशुद्ध त्यास शिवू नका; म्हणजे मी तुम्हास स्वीकारीन. आणि मी तुम्हास पिता होईन आणि तुम्ही माझे पुत्र व्हाल, असे सर्वसमर्थ प्रभू म्हणतो.’

प्रियांनो, आपल्यालाही अभिवचने मिळाली आहेत, म्हणून आपण देहाच्या व आत्म्याच्या प्रत्येक अशुद्धतेपासून स्वतःला शुद्ध करू आणि देवाच्या भयात राहून आपल्या पवित्र्याला पूर्ण करावे.

तरी आता मी आनंद करतो, तुम्हास दुःख झाले ह्यामुळे नव्हे, तर पश्चात्ताप होण्याजोगे दुःख झाले ह्यामुळे, कारण देवानुसार तुमचे हे दुःख दैवी होते, आमच्याकडून तुमची कसलीही हानी होऊ नये म्हणून असे झाले. कारण देवप्रेरित दुःख तारणदायी पश्चात्तापास कारणीभूत होतो त्याबद्दल वाईट वाटत नाही, पण जगीक दुःख मरणास कारणीभूत होते. कारण पाहा, तुमचे हे दुःख दैवी होते, या एकाच गोष्टीने तुमच्यामध्ये केवढी कळकळ, केवढे दोषनिवारण, केवढा संताप, केवढे भय, केवढी उत्कंठा, केवढी आस्था, केवढी शिक्षा करण्याची बुद्धी, उत्पन्न झाली! या बाबतीत तुम्ही सर्व प्रकारे निर्दोष आहात ह्याचे प्रमाण तुम्ही पटवून दिले आहे.

या सेवेच्या कसोटीमध्ये, ख्रिस्ताच्या शुभवर्तमानाच्या अंगिकाराबाबत तुमच्या आज्ञांकितपणामुळे आणि त्यांच्यासाठी व इतरांसाठी तुम्ही उदारपणे दिलेल्या दानामुळे ते देवाचे गौरव करतात;

कारण मला भीती वाटते की, मी येईन तेव्हा, मी अपेक्षा करीत असेन तसे, कदाचित्, तुम्ही मला आढळणार नाही; आणि तुम्ही अपेक्षा करणार नाही असा मी तुम्हास आढळेन. कदाचित्, तुमच्यात कलह, ईर्ष्या, राग, विरोध, स्वार्थी महत्त्वकांक्षा, कुरकुरी, गर्व, अफवा व गोंधळ मला आढळून येतील. किंवा मी पुन्हा येईन तेव्हा माझा देव तुमच्यासमोर मला लीन करील आणि ज्यांनी पाप केले असून आपण केलेल्या अमंगळपणाचा, व्यभिचाराचा व कामातुरपणाचा ज्यांनी पश्चात्ताप केलेला नाही अशा पुष्कळ जणांसाठी मला शोक करावा लागेल.

तुम्ही विश्वासात आहात किंवा नाही म्हणून आपली स्वतःची परीक्षा करा. आपली स्वतःची पारख करा. तुम्हास आपल्यात येशू ख्रिस्त आहे हे कळत नाही काय? नसेल तर मग, तुम्ही पसंतीस न उतरलेले आहात.

तरी मनुष्य नियमशास्त्रातील कृत्यांनी नीतिमान ठरत नाही तर येशू ख्रिस्तावरील विश्वासाच्याद्वारे ठरतो, हे ओळखून आम्हीही ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवला; ह्यासाठी की, विश्वासाने मनुष्य नीतिमान ठरवला जातो, म्हणून आम्हीही येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवला; म्हणजे आम्ही ख्रिस्तावरील विश्वासाने नीतिमान ठरावे, नियमशास्त्रातील कृत्यांनी पाळून नाही, कारण नियमशास्त्रातील कृत्यांनी मनुष्यजातीपैकी कोणीही नीतिमान ठरणार नाही.

मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे आणि ह्यापुढे मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्याठायी जगतो आणि आता देहामध्ये जे माझे जगणे आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्याद्वारे आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरिता दिले.

आपल्याबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपणाला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडविले; असा शास्त्रलेख आहे ‘जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे’, असा शास्त्रलेख आहे.

ह्यांवरून आपण विश्वासाने नीतिमान ठरविले जावे म्हणून नियमशास्त्र आपल्याला ख्रिस्ताकडे पोहचवणारे बालरक्षक होते.

कारण ख्रिस्तात तुम्हामधील जितक्यांचा बाप्तिस्मा झाला आहे तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केले आहे.

पण काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठवले; तो स्त्रीपासून जन्मास आला, नियमशास्त्राधीन असा जन्मास आला, ह्यात उद्देश हा होता की, नियमशास्त्राखाली असलेल्यांना त्याने खंडणी भरून सोडवावे; म्हणजे आपल्याला पुत्र होण्याचा हक्क मिळावा.

म्हणून मी म्हणतो, आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहाची वासना पूर्ण करणारच नाही. कारण देहवासना देवाच्या आत्म्याविरुद्ध आहे आणि आत्मा देहवासनेविरुद्ध आहे; हे परस्परांस विरूद्ध आहेत, यासाठी की जे काही तुम्ही इच्छिता ते तुम्ही करू नये. तुम्ही देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने चालवलेले आहात तर तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही.

आता देहाची कामे उघड आहेत आणि ती हीः व्यभिचार, अमंगळपणा, कामातुरपणा, मूर्तिपूजा, जादूटोणा, वैर, कलह, ईर्ष्या, राग, विरोध, फुटी, गट, मत्सर, धुंदी, दंगल आणि ह्यांसारखी आणखी; ह्यांविषयी मी जसे पूर्वी सांगितले होते तसे आता आधी सांगतो की, या गोष्टी करणार्‍यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही.

पवित्र आत्म्याच्याद्वारे निष्पन्न होणारे फळही आहेत प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन हे आहे; अशांविरूद्ध नियमशास्त्र नाही.

जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी देहाच्या भावना व वासनांसहित देहस्वभावाला वधस्तंभावर खिळले आहे. आपण जर देवाच्या आत्म्याच्या सामर्थ्याने जगतो तर आपण आत्म्याच्या प्रेरणेनेच चालावे.

फसू नका, देवाचा उपहास होणार नाही कारण मनुष्य जे काही पेरतो तेच पीक त्यास मिळेल. कारण जो आपल्या देहाकरता पेरतो त्यास देहाकडून नाशाचे पीक मिळेल, पण जो देवाच्या आत्म्याकरता पेरतो त्यास आत्म्याकडून सार्वकालिक जीवनाचे पीक मिळेल.

कारण सुंता होण्यात किंवा सुंता न होण्यात काही नाही, तर नवी उत्पत्ती हीच काय ती होय.

आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पित्याला धन्यवाद असो; स्वर्गीय गोष्टीविषयी प्रत्येक आत्मिक आशीर्वाद देऊन ज्या देवाने आम्हास ख्रिस्ताकडून आशीर्वादित केले आहे. देवाने ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवणाऱ्यांना जगाच्या रचनेपूर्वीच निवडले यासाठी की आम्ही त्याच्या समक्षतेत पवित्र आणि निर्दोष असावे. देवाच्या प्रीतीप्रमाणे, येशू ख्रिस्ताद्वारे त्याचे स्वतःचे पुत्र होण्याकरता आम्हास दत्तक घेण्यासाठी पूर्वीच आमची नेमणूक केली. त्याने हे सर्व देवाच्या गौरवी कृपेची स्तुती व्हावी म्हणून केले. ही कृपा त्याने त्याच्या प्रिय पुत्राद्वारे आम्हास भरपूर केली. त्या प्रिय पुत्राच्या ठायी रक्ताने खंडणी भरून आम्हास मुक्त करण्यात आले आहे, देवाच्या कृपेच्या विपुलतेने आम्हास आमच्या पापांची क्षमा मिळाली आहे. देवाची ही कृपा आम्हास सर्व ज्ञानाने आणि विवेकाने भरपूर पुरवण्यात आली आहे.

देवाचे लोक म्हणून आम्ही पूर्वीच ख्रिस्तामध्ये त्याच्या योजनेप्रमाणे नेमले गेलो होतो, जो सर्व गोष्टी हेतुपूर्वक त्याच्या इच्छेप्रमाणे करतो, ह्यासाठी की ख्रिस्ताच्या गौरवाची स्तुती यहूदी आमच्याकडून व्हावी, ज्याच्यावर आम्ही आधीच आशा ठेवली. ख्रिस्ताद्वारे तुम्हीसुद्धा खऱ्या वचनाची आणि तुमच्या तारणाची सुवार्ता ऐकली आहे आणि त्यावर विश्वास ठेवला, तेव्हा पवित्र आत्म्याच्या अभिवचनाचा तुम्हावर शिक्का मारण्यात आलेला आहे. त्याच्या प्रियजनांची खंडणी भरून मिळवलेल्या मुक्तीसाठी हा पवित्र आत्मा आपल्या वतनाचा पुरावा आहे जेणेकरून देवाच्या गौरवाची स्तुती व्हावी.

आणि तुम्ही आपले अपराध आणि पापामुळे मरण पावला होता, ज्यामध्ये तुम्ही पूर्वी चालत होता, हे तुमचे कृत्य जगाच्या चालिरीतीप्रमाणे अंतरीक्षाचा राज्याधिपती जो सैतान, म्हणजे आज्ञा मोडणाऱ्या लोकात आता कार्य करणाऱ्या दुष्ट आत्म्याचा अधिपती, ह्याच्या वहीवाटीप्रमाणे असे होते. आम्ही सर्व यापूर्वी या अविश्वासणाऱ्यांमध्ये आपल्या शारीरिक वासनेने वागत होतो, शरीर आणि मनाच्या इच्छेप्रमाणे करत होतो व आम्ही स्वभावाने इतरांप्रमाणे राग येणारे लोक होतो. पण देव खूप दयाळू आहे कारण त्याच्या महान प्रीतीने त्याने आमच्यावर प्रेम केले. आम्ही आमच्या अपराधामुळे मरण पावलेले असता त्याने आम्हास ख्रिस्ताबरोबर नवीन जीवन दिले. तुमचे तारण कृपेने झाले आहे. आणि आम्हास त्याच्याबरोबर उठवले आणि स्वर्गीय स्थानात ख्रिस्त येशूसोबत बसविले. यासाठी की, येशू ख्रिस्तामध्ये त्याची आम्हांवरील प्रीतीच्याद्वारे येणाऱ्या युगात त्याची महान कृपा दाखविता यावी. कारण देवाच्या कृपेने विश्वासाच्याद्वारे तुम्हास शिक्षेपासून वाचवले आहे आणि ते आमच्याकडून झाले नाही, तर हे दान देवापासून आहे, आपल्या कर्मामुळे हे झाले नाही यासाठी कोणी बढाई मारू नये. कारण आम्ही देवाच्या हाताची कृती आहोत जी ख्रिस्तामध्ये आहे जेणेकरूण आम्ही जीवनात चांगली कामे करावी जे देवाने आरंभीच योजून ठेवले होते.

तर तुमचा जुना मनुष्य त्यास काढून टाकावा कारण तो तुमच्या पूर्वीच्या आचरणासंबंधी जो जुना कपटाच्या वाईट वासनांनी भरलेला असून त्याचा नाश होत आहे, यासाठी तुम्ही आत्म्याद्वारे मनात नवे केले जावे, आणि जो नवा मनुष्य, जो देवानुसार नीतिमान आणि खऱ्या पवित्रतेत निर्माण केलेला आहे. तो धारण करावा.

आणि देवाच्या पवित्र आत्म्याला दुःखी करू नका कारण तुम्हास खंडणी भरून मुक्तीच्या दिवसासाठी त्याच्याकडून तुम्हास शिक्का मारलेले असे आहात.

एकमेकांबरोबर दयाळू आणि कनवाळू व्हा आणि देवाने ख्रिस्तामध्ये मुक्तपणे क्षमा केली तशी एकमेकांना क्षमा करा.

जारकर्म, कोणत्याही प्रकारची अशुद्धता किंवा अधाशीपणा याचे तुमच्यामध्ये नाव व विचार येऊ नये, हे पवित्र जनासांठी योग्य नाही. तसेच कोणतेही लाजिरवाणे भाषण, मूर्खपणाचे बोलणे किंवा घाणेरडे विनोद तुमच्यात असू नयेत. ते योग्य नाही. परंतु त्याऐवजी उपकारस्तुती असावी. कारण तुम्ही हे समजा की, जो कोणी मनुष्य जारकर्मी, अशुद्ध किंवा लोभी म्हणजे मूर्तिपुजक आहे त्यास ख्रिस्ताच्या व देवाच्या राज्यात वतन नाही. पोकळ भाषणाने कोणी तुम्हास फसवू नये कारण या कारणामुळे आज्ञा मोडणाऱ्या मुलांवर देवाचा क्रोध येणार आहे.

यासाठी की, त्याने तिला देवाच्या वचनरुपी पाण्याने धुऊन स्वच्छ करून पवित्र करावे. यासाठी की, तो मंडळीला स्वतःसाठी गौरवी वधू म्हणून सादर करील, तिला कोणताही डाग नसेल किंवा सुरकुती किंवा कोणत्याही प्रकारची अपूर्णता नसेल तर ती पवित्र व निर्दोष असेल.

आणि ज्याने तुमच्यात चांगले काम आरंभले तो ते येशू ख्रिस्ताच्या दिवसापर्यंत पूर्णतेस नेईल हा माझा विश्वास आहे.

कारण माझी उत्कट अपेक्षा व आशा आहे की, मी कशानेही लाजणार नाही तर पूर्ण धैर्याने, नेहमीप्रमाणे आतादेखील जगण्याने किंवा मरण्याने माझ्या शरीराद्वारे ख्रिस्ताचा महिमा होईल. कारण मला तर जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हे लाभ आहे.

कारण त्याच्यावर विश्वास ठेवावा इतकेच केवळ नव्हे, तर ख्रिस्ताच्या वतीने त्याच्याकरता तुम्हास दुःख ही सोसावे अशी कृपा तुमच्यावर झाली आहे.

म्हणून माझ्या प्रियांनो, जे तुम्ही सर्वदा आज्ञापालन करीत आला आहा, ते तुम्ही मी जवळ असता केवळ नव्हे तर विषेशकरून आता, म्हणजे मी जवळ नसताही, भीत व कांपत आपले तारण साधून घ्या.

कारण आपण जे देवाच्या आत्म्याने देवाची उपासना करतो, जे ख्रिस्त येशूविषयी अभिमान बाळगणारे आणि देहावर विश्वास न ठेवणारे ते आपण सुंता झालेलेच आहोत.

कारण मी तुम्हास, पुष्कळ वेळा, सांगितले आणि आता रडत सांगतो की, पुष्कळजण असे चालतात की, ते ख्रिस्ताच्या वधस्तंभाचे वैरी आहेत. नाश हा त्यांचा शेवट, पोट हे त्यांचे दैवत, त्यांचा निर्लज्जपणा हे त्यांचे भुषण आहे, ते जगिक गोष्टींवर चित्त ठेवतात. आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे; तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे; त्याची आपण वाट पाहात आहोत. तो ज्या सामर्थ्याने तो सर्वकाही आपल्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे त्या सामर्थ्यांने तो तुमचे आमचे नीच स्थितीचे शरीर आपल्या गौरवीच्या शरीरासारखे व्हावे म्हणून त्यांचे रूपांतर करील.

आणि मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्वकाही करावयास शक्तिमान आहे.

त्याने आपल्याला अंधकाराच्या सत्तेतून सोडवून त्याच्या प्रिय पुत्राच्या राज्यात आणले आहे, आणि त्याच्याठायी त्याच्या रक्ताच्याद्वारे आपल्याला मुक्ती म्हणजे पापांची क्षमा मिळाली आहे.

आणि तुम्ही जे एकेकाळी देवाशी परके होता आणि तुमच्या दुष्ट वासनांमुळे, मनाने वैरी झाला होता, त्या तुमचा, त्याने त्याच्या दैहिक शरीरात त्याच्या मरणाद्वारे, आता, स्वतःशी समेट केला आहे. म्हणजे त्याने तुम्हास त्याच्या दृष्टीपुढे पवित्र, निष्कलंक व निर्दोष असे सादर करावे.

आणि ख्रिस्ताच्या सुंताविधीने तुमचे पापमय दैहिक शरीर काढले जाऊन, कोणी हातांनी न केलेल्या सुंताविधीने तुमचीही त्यांच्यात सुंता झाली आहे. त्याच्याबरोबर तुम्ही बाप्तिस्म्यात पुरले गेला व ज्याने त्यास मरण पावलेल्यातून उठवले त्या देवाच्या कृतीवरील विश्वासाद्वारे तुम्ही त्यामध्येच त्याच्याबरोबर उठवले गेला, आणि तुम्ही जे तुमच्या अपराधांमुळे व देहस्वभावाची सुंता न झाल्यामुळे मरण पावलेले होता त्या तुम्हास देवाने त्याच्याबरोबर जिवंत केले आहे. त्याने आपल्या अपराधांची क्षमा केली आहे;

वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका; कारण तुम्ही मृत झला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. आपले जीवन जो ख्रिस्त तो प्रकट केला जाईल तेव्हा तुम्हीही त्याच्याबरोबर गौरवात प्रकट केले जाल.

तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जारकर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ ह्याला मूर्तिपूजा म्हणावे, हे जिवे मारा. त्यामुळे देवाचा कोप होतो. तुम्हीही पूर्वी त्या वासनांत जगत होता तेव्हा त्यांमध्ये तुम्ही चालत होता. परंतु आता तुमच्यातील क्रोध, राग व दुष्टपण, निंदा आणि तुमच्या मुखाने शिवीगाळ करणे, हे सर्व आपणापासून दूर करा. एकमेकांशी खोटे बोलू नका कारण तुम्ही जुन्या मनुष्यास त्याच्या कृतींसहित काढून टाकले आहे

तेव्हा तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात, म्हणून करूणायुक्त हृदय, दया, सौम्यता, लीनता व सहनशीलता धारण करा. एकमेकांचे सहन करा आणि कोणाचे कोणाशी भांडण असल्यास एकमेकांची क्षमा करा; प्रभूने तुमची क्षमा केली तशी एकमेकांची क्षमा करा. पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीती ती या सर्वांवर धारण करा.

कारण अन्याय करणाऱ्याने जो अन्याय केला तोच त्यास मिळेल आणि पक्षपात होणार नाही.

ह्यासाठी की, आपला प्रभू येशू आपल्या सर्व पवित्र जनांसह येईल त्यावेळेस त्याने तुमची अंतःकरणे देव आपला पिता ह्याच्यासमोर पवित्रतेत निर्दोष होण्यासाठी स्थिर करावी.

कारण देवाची इच्छा ही आहे की, तुमचे पवित्रीकरण व्हावे, म्हणजे तुम्ही जारकर्मापासून दूर रहावे आणि तुमच्यातील प्रत्येकाला समजावे की, ज्याने त्याने आपल्या देहाला पवित्रतेने व आदरबुद्धीने आपल्या स्वाधीन कसे करून घ्यावे.

कारण आपल्यावर क्रोध व्हावा म्हणून नव्हे तर आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे आपले तारण व्हावे म्हणून देवाने आपल्याला नेमले आहे.

सर्व गोष्टींची पारख करा. जे चांगले आहे ते मजबूत धरा. वाईटाच्या प्रत्येक प्रकारापासून दूर रहा. आणि स्वतः शांतीचा देव तुम्हास पूर्ण पवित्र करो; आणि आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याचे येणे होईल तेव्हा तुमचा आत्मा, जीव आणि शरीर पूर्ण निर्दोष राहो.

प्रभूच्या प्रियजनांनो, तुम्हाविषयी आम्ही देवाची उपकारस्तुती नेहमी केली पाहिजे कारण पवित्र आत्म्याच्याद्वारे होणाऱ्या पवित्रीकरणात व सत्यावरच्या विश्वासात देवाने तुम्हास प्रथमफळ म्हणून तारणासाठी निवडले आहे;

आणि आपल्याला हे ठाऊकच आहे की, नियमशास्त्र हे नीतिमान लोकांसाठी केलेले नाही तर आज्ञाभंग करणाऱ्या आणि विद्रोही, पापी, भक्तिहीन, अधर्मी, अशुद्ध, वडिलांना ठार मारणारे व आईला ठार मारणारे, मनुष्यघातक जारकर्मी, समलैंगीक, मनुष्यांचा व्यापार करणारे, खोटारडे, खोटी शपथ वाहणारे यांच्यासाठी आहे आणि शुद्ध शिकवणीविरुद्ध जर काही दुसरे असेल तर त्यासाठीही आहे.

ही गोष्ट विश्वसनीय व पूर्ण अंगीकार करण्यास योग्य आहे की, ख्रिस्त येशू पापी लोकांस तारावयला जगात आला आणि त्या पापी लोकांपैकी मी मुख्य पापी आहे. परंतु केवळ याच हेतूने माझ्यावर दया दाखविण्यात आली की माझ्यासारख्या अत्यंत वाईट पाप्यावर ख्रिस्त येशूने सहनशीलता दाखवली त्या उदाहरणावरून, पुढील काळात जे त्याजवर विश्वास ठेवतील त्यांना सर्वकाळचे जीवन मिळावे.

त्याची इच्छा आहे की सर्व लोकांचे तारण व्हावे आणि त्यांनी खरेपणाच्या पूर्ण ज्ञानास पोहचावे.

कारण एकच देव आहे आणि देव व मनुष्य यांच्यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे. त्याने सर्वांच्या खंडणीकरिता स्वतःला दिले. याविषयीची साक्ष योग्यवेळी देणे आहे.

देवाचा आत्मा स्पष्ट म्हणतो की, नंतरच्या काळात काहीजण विश्वास सोडतील, ते भविष्य सांगणारे आत्मे, जे फसविणारे आहेत त्यांच्याकडे लक्ष देतील, ज्या मनुष्यांची सद्सदविवेकबुद्धी तर डाग दिल्यासारखीच आहे आणि भूतापासून येणाऱ्या शिक्षणाकडे आणि ढोंगी फसवीणाऱ्यांकडे लक्ष देतील.

त्यांनी निर्दोष व्हावे म्हणून त्यांना या गोष्टी आज्ञारूपाने लोकांस सांग

आपला प्रभू येशू ख्रिस्त प्रकट होईपर्यंत निष्कलंक आणि निर्दोष रहावे म्हणून ही आज्ञा पाळ.

म्हणून आपल्या प्रभूविषयी साक्ष देण्यासाठी लाज धरु नको किंवा मी जो त्याच्यासाठी कैदी झालो त्या माझी लाज धरू नको. तर सुवार्तेसाठी देवाच्या सामर्थ्याप्रमाणे तू माझ्याबरोबर दुःखाचा वाटा घे. त्याने आम्हास तारले आणि पवित्र पाचारण केले. आम्ही काही सत्कृत्ये केली म्हणून नाही तर त्याच्या स्वतःच्या हेतूने व कृपेने केले. ही कृपा युगाच्या सुरुवातीलाच देवाने ख्रिस्त येशूमध्ये आम्हास दिली होती. पण जी आता आम्हास आमचा तारणारा ख्रिस्त येशू याच्या प्रकट होण्याने दाखवली गेली आहे. ख्रिस्ताने मरणाचा नाश केला आणि सुवार्तेद्वारे अविनाशीपण व जीवन प्रकाशात आणले.

ह्यामुळे देवाच्या निवडलेल्यांसाठी मी सर्वकाही धीराने सोशीत आहे, म्हणजे त्यांनाही ख्रिस्त येशूद्वारे मिळणारे तारण व सर्वकाळचे गौरव प्राप्त व्हावे. हे वचन विश्वसनीय आहे की, जर आम्ही त्याच्यासह मरण पावलो, तर त्याच्याबरोबर जिवंतही राहू जर आम्ही दुःख सहन केले तर आम्ही त्याच्याबरोबर राज्यसुद्धा करू जर आम्ही त्यास नाकारले, तर तोसुध्दा आम्हास नाकारील

तथापि देवाने घातलेला पाया स्थिर राहीला आहे, त्यास हा शिक्का आहे की, “प्रभू जे त्याचे आहेत त्यांना ओळखतो,” आणि “जो कोणी प्रभूचे नाव घेतो त्याने अनीतीपासून दूर रहावे.”

देवाच्या सेवकाने भांडू नये, तर सर्व लोकांशी सौम्यतेने वागावे, तसेच शिक्षणात कुशल व सहनशील असावे. जे त्यास विरोध करतात, त्यांना लीनतेने शिक्षण द्यावे कदाचित त्यांनी खरेपण जाणावे म्हणून देव त्यांना पश्चात्ताप करण्याची बुद्धी देईल. आणि सैतानाने आपल्या इच्छेप्रमाणे पकडून नेलेले त्याच्या फासातून सुटून शुद्धीवर येतील.

लोक स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ठ, निंदा करणारी, आई-वडीलांची आज्ञा न मानणारी, अनुपकारी, अधार्मिक इतरांवर प्रीती न करणारी, क्षमा न करणारी, चहाडखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी. विश्वासघातकी, उतावीळ, गर्वाने फुगलेली, देवावर प्रीती करण्यापेक्षा चैनीची अधिक आवड धरणारी अशी होतील; ते देवाच्या सेवेचे बाहेरचे स्वरूप चांगले राखतील परंतु त्याचे सामर्थ्य नाकारतील. त्यांच्यापासून नेहमी दूर राहा.

खरे पाहता, जे जे ख्रिस्त येशूमध्ये शुद्ध जीवन जगू इच्छितात, त्या सर्वांचा छळ होईल.

प्रत्येक शास्त्रलेख देवाच्या प्रेरणेने लिहिला असल्यामुळे तो शिकवण्यास, वाईटाचा निषेध करण्यास, चुका सुधारण्यास व योग्य जीवन जगण्याचे मार्गदर्शन करण्यास उपयुक्त आहे. यासाठी की, देवाचा मनुष्य तरबेज होऊन पूर्णपणे प्रत्येक चागंल्या कामासाठी सज्ज व्हावा.

आता पुढे माझ्यासाठी जो नितीमत्वाचा मुकुट ठेवला आहे, तो त्यादिवशी नीतिमान न्यायाधीश प्रभू मला देईल आणि केवळ मलाच नव्हे, तर त्याचे प्रकट होणे ज्यांना प्रिय आहे त्या सर्वांनाही देईल.

प्रभू मला प्रत्येक वाईट कामापासून सोडवील व आपल्या स्वर्गीय राज्यात घेण्यासाठी तारील. त्यास सदासर्वकाळपर्यंत गौरव असो. आमेन.

जे सर्वकाळचे जीवन ज्याला असत्य बोलवत नाही त्या देवाने युगाच्या काळापूर्वी देऊ केले,

कारण, सर्व लोकांस तारणारी देवाची कृपा प्रकट झाली आहे. ती आपल्याला असे शिकवते की, अभक्तीचा व जगीक वासनांचा त्याग करून, आपण या आताच्या युगात संयमाने, नीतिने व सुभक्तीने वागले पाहिजे. आणि आपल्या धन्य आशेची, म्हणजे आपला महान देव व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या गौरवी आगमनाची प्रतीक्षा करावी; आपल्यासाठी त्याने स्वतःचे दान केले ते ह्यासाठी की, आपली सर्व अनाचारातून सुटका करावी आणि चांगल्या कामात आवेशी असलेले आपले स्वतःचे लोक आपणासाठी शुद्ध करावेत.

तेव्हा आपण केलेल्या, नीतिमत्त्वाच्या कामांमुळे नाही, पण त्याने आपल्याला त्याच्या दयेमुळे, नव्या जन्माचे स्नान घालून पवित्र आत्म्याच्या नविनिकरणाने तारले.

म्हणजे आपण त्याच्या कृपेने नीतिमान ठरून सार्वकालिक जीवनाच्या आशेप्रमाणे वारीस व्हावे.

या कारणास्तव ज्या सत्याविषयी आपण ऐकलेले आहे त्याकडे आपण अधिक काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे. यासाठी की, आपण त्यापासून भरकटून जाऊ नये. कारण नियमशास्त्र जे देवदूतांकरवी सांगितले गेले ते इतके प्रभावी होते आणि जर प्रत्येक आज्ञाभंगाच्या व प्रत्येक अवमानाच्या कृत्याला योग्य ती शिक्षा होते. तर आपण अशा महान तारणाकडे दुर्लक्ष केल्यास, मग आपण शिक्षेपासून कसे सुटू? या तारणाची पहिली घोषणा प्रभूने केली. ज्यांनी प्रभूचे ऐकले त्यांच्याकडून याची खात्री पटली

कारण ज्याअर्थी येशूला स्वतः परीक्षेला व दुःखसहनाला तोंड द्यावे लागले, त्याअर्थी ज्यांना आता परीक्षेला तोंड द्यावे लागत आहे त्यांना मदत करण्यास तो समर्थ आहे.

बंधुजनहो, जिवंत देवाला सोडून देण्याइतके अविश्वासाचे दुष्ट मन तुम्हातील कोणाचेही असू नये म्हणून जपा.

जोपर्यंत, “आज” म्हटलेला काळ आहे तोपर्यंत, प्रत्येक दिवशी एकमेकांना उत्तेजन द्या, यासाठी की तुमच्यापैकी कोणाचीही पापामुळे फसगत होऊन तुमची अंतःकरणे कठीण होऊ नयेत.

पवित्र शास्त्रात असे म्हणले आहे; “आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल, तेव्हा इस्त्राइल लोकांनी देवाविरुद्ध बंड केले; तशी आपली अंतःकरणे कठीण करू नका.”

आणि कोणतीही निर्मित गोष्ट त्याच्यापासून लपलेली नाही आणि ज्याच्यापाशी आम्हास सर्व गोष्टींचा हिशोब द्यावयाचा आहे, देवासमोर सर्व गोष्टी उघड व स्पष्ट अशा आहेत. म्हणून, ज्याअर्थी आम्हास येशू देवाचा पुत्र हा महान महायाजक लाभला आहे व जो स्वर्गात गेला आहे, असा जो विश्वास आपण गाजवितो तो अखंडपणे भक्कम धरून राहू या. कारण आपल्याला लाभलेला महायाजक असा नाही, जो आपल्या अशक्तपणाबद्दल सहानुभूती दर्शवण्यास असमर्थ आहे. पण आपल्याला असा याजक लाभला आहे की, जो आमच्यासारखाच सर्व प्रकारच्या मोहाच्या अनुभवातून गेला. तरीही तो पूर्णपणे पापविरहीत राहिला. तर मग आपण देवाच्या कृपेच्या राजासनाजवळ निर्धाराने जाऊ या. यासाठी की, आमच्या गरजेच्या वेळी साहाय्य मिळावे म्हणून आम्हास दया व कृपा प्राप्त व्हावी.

कारण ज्यांना एकदा प्रकाश मिळाला, ज्यांनी स्वर्गीय दानांचा अनुभव घेतला आहे व जे पवित्र आत्म्याचे भागीदार झाले आहेत, आणि ज्यांनी देवाच्या वचनाची व येणाऱ्या युगाच्या सामर्थ्याची रुची अनुभवली आहे, त्यानंतर ख्रिस्तापासून जर ते दूर गेले तर त्यांना पश्चात्तापाकडे वळवणे अशक्य आहे, कारण त्यांच्या स्वतःच्या हानिकरता ते देवाच्या पुत्राला पुन्हा वधस्तंभावर खिळतात व लोकांच्या अवकृपेच्या समोर त्यास आणतात.

म्हणून, जे त्याच्याद्वारे देवाकडे येतात त्यांना तो अनंतकाळासाठी तारण्यास समर्थ आहे कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास तो सदैव जिवंत आहे.

त्या दिवसानंतर मी इस्राएल लोकांबरोबर असा करार करीन; तो हा मी माझे नियम त्यांच्या अंतःकरणात घालीन, त्यांच्या हृदयांवर ते लिहीन, मी त्यांचा देव होईन, ते माझे लोक होतील.

कारण मी त्यांच्या अनीतीच्या कृत्यांविषयी दयाशील होईन. आणि त्यांची पापे मी ह्यापुढे आठवणारच नाही.

बकरे किंवा वासरु यांचे रक्त घेऊन नव्हे, तर आपले स्वतःचेच रक्त घेऊन; व त्याने सार्वकालिक खंडणी मिळवून एकदाच परमपवित्रस्थानात गेला;

ख्रिस्त याकरिता नव्या कराराचा मध्यस्थ आहे की, पहिल्या करारासंबंधी जी उल्लंघने झाली त्यापासून खंडणी भरून मिळवलेली सुटका होण्यासाठी आपले मरण झाल्याने, जे बोलावलेले त्यांना सार्वकालिक वतनाचे वचन मिळावे.

खरे पाहता, नियमशास्त्राप्रमाणे रक्ताने सर्वकाही शुद्ध होते आणि रक्त ओतल्यावाचून पापक्षालन होत नाही.

ज्याअर्थी लोकांस एकदाच मरणे व नंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे, तसाच ख्रिस्त हि, पुष्कळांची पापे वाहून नेण्यास एकदाच अर्पिला गेला आणि त्याची वाट पाहणाऱ्यांस पापासंबंधात नव्हे तर तारणासाठी दुसऱ्याने दिसेल.

देवाच्या इच्छेनुसार येशू ख्रिस्ताच्या एकदाच झालेल्या देह अर्पणाद्वारे आपण पवित्र करण्यात आलो आहोत.

परंतु आपल्या पापांबद्दल सर्वकाळासाठी एकदाच ख्रिस्ताने अर्पण केले व तो आता देवाच्या उजवीकडे बसला आहे.

कारण जे पवित्र केले जात आहेत त्यांना त्याने एकाच अर्पणाने सर्वकाळासाठी पूर्ण केले. पवित्र आत्माही याबाबत आपल्याला साक्ष देतो. पहिल्यांदा तो असे म्हणतो, परमेश्वर म्हणतो, “त्या दिवसानंतर त्यांच्याशी मी करार करीन तो हा; मी माझे नियम त्यांच्या मनात घालीन आणि ते त्यांच्या हृदयपटांवर लिहीन.” “आणि मी त्यांची पापे व अधर्म कृत्ये कधीही आठवणारच नाही.” जेथे या पापांची क्षमा झाली आहे, तेथे पापाबद्दल अर्पण व्हायचे नाही.

म्हणून बंधूनो, येशूच्या रक्ताद्वारे आपल्याला परमपवित्रस्थानात जाण्याचे धैर्य आहे. त्याने पडद्यामधून म्हणजे आपल्या स्वतःच्या देहातून, आपल्यासाठी ती नवीन व जिवंत वाट स्थापित केली आहे. कारण देवाच्या घरावर आपल्याला महान असा मुख्य याजक मिळाला आहे. म्हणून आपली हृदये दुष्ट विवेकभावापासून मुक्त होण्यासाठी शिंपडलेली आणि आपले शरीर निर्मळ पाण्याने धुतलेले असे आपण खऱ्या अंतःकरणाने विश्वासाच्या पूर्ण खात्रीने जवळ यावे.

सत्याचे ज्ञान प्राप्त झाल्यानंतरसुद्धा जर आपण जाणूनबुजून पाप करीत राहिलो, तर मग पापांसाठी यापुढे आणखी अर्पण करण्याचे बाकी राहिले नाही. पण जे देवाला विरोध करतात त्यांना भयंकर अशा न्यायनिवाड्याशिवाय व भयंकर अशा भस्म करणाऱ्या अग्नीशिवाय दुसरे काही शिल्लक राहिले नाही. जो कोणी मोशेचे नियमशास्त्र नाकारतो त्यास दोघा किंवा तिघांच्या साक्षीच्या आधारे कसलीही दया न दाखविता मरणदंड होतो. तर मग ज्याने देवाच्या पुत्राला पायाखाली तुडवले, कराराच्या ज्या रक्ताने त्यास पवित्र केले त्या रक्ताला अपवित्र ठरवले आणि ज्याने कृपेच्या आत्म्याचा अपमान केला, तो मनुष्य किती अधिक दंडास पात्र ठरेल म्हणून तुम्हास वाटते? कारण त्यास ओळखतो तो म्हणतो, “सूड घेणे माझ्या हाती आहे; मी परतफेड करीन.” पुन्हा तो असे म्हणतो, “प्रभू आपल्या लोकांचा न्याय करील.” जिवंत देवाच्या हाती सापडणे किती भयंकर गोष्ट आहे.

विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री असा आहे.

पण विश्वासाशिवाय त्यास संतोषवणे अशक्य आहे, कारण जो त्याच्याकडे येतो त्याने विश्वास ठेवला पाहिजे की, तो आहे आणि जे त्यास झटून शोधतात त्यांना प्रतिफळ देणारा आहे.

म्हणून, आपण एवढया मोठया साक्षीरुपी मेघाने वेढलेले आहोत म्हणून आपणही सर्व भार व सहज अडवणारे पाप टाकून, आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे.

तुम्ही पापाविरुद्ध झगडत असता रक्त सांडेपर्यंत अजून प्रतिकार केला नाही.

सर्व लोकांबरोबर शांतीने राहण्याचा व ज्यावाचून कोणालाही प्रभूला पाहता येत नाही ते पवित्रीकरण मिळवण्याचा झटून प्रयत्न करा.

नंतर तुम्हास माहीत आहे जेव्हा त्यास वारसाहक्काने आशीर्वाद अपेक्षित होता, तेव्हा तो नाकारण्यात आला. जरी त्याने रडून आशीर्वाद मिळविण्याचा प्रयत्न केला, तरी पश्चात्तापाने आपल्या वडिलांचे मन तो बदलू शकला नाही.

सर्वांनी लग्नाचा आदर करावा व अंथरूण निर्दोष असावे कारण जे व्यभिचारी व जारकर्मी आहेत अशा लोकांचा देव न्याय करील.

म्हणून त्याचे नाव पत्करणाऱ्या “ओठांचे फळ असा स्तुतीचा यज्ञ आपण येशूद्वारे देवाला नित्य अर्पण करावा.”

ज्या शांतीच्या देवाने आपल्या मेंढरांचा मेंढपाळ, आपला प्रभू येशू ख्रिस्त याला रक्ताच्या सर्वकालच्या नव्या कराराद्वारे उठवले.

म्हणून जर तुमच्यातील कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने देवाकडे मागावे म्हणजे ते त्यास मिळेल कारण तो दोष न लावता सर्वांस उदारपणे देतो.

जो परीक्षा सोसतो तो धन्य आहे कारण परीक्षेत उतरल्यावर जो जीवनाचा मुकुट प्रभूने आपल्यावर प्रीती करणाऱ्यांस देऊ केला आहे तो त्यास मिळेल. कोणाची परिक्षा होत असता, तेव्हा त्याने असे म्हणू नये की “देवाने मला मोहात घातले.” कारण देवाला वाईट गोष्टींचा मोह पडणार नाही आणि तो कोणालाही मोहात पाडत नाही.

तर प्रत्येकजण त्याच्या स्वतःच्या इच्छेनुसार मोहात पडतो व भुलवला जातो. मग इच्छा गर्भवती होऊन पापाला जन्म देते व पापाची पूर्ण वाढ झाल्यावर मरणाला उपजवते.

म्हणून तुमच्यासभोवतीच्या सर्व अमंगळ गोष्टींपासून पूर्णपणे स्वतःची सुटका करून घ्या आणि जी तुमच्या आत्म्याचे तारण करण्यास समर्थ आहे ती देवाची शिकवण तुमच्या अंतःकरणात मुळावलेली आहे ती लीनतेने स्वीकारा. वचनाप्रमाणे आचरण करणारे असा व फक्त ऐकणारेच असू नका तर त्याप्रमाणे करा कारण जर तुम्ही फक्त ऐकता तर तुम्ही स्वतःची फसवणूक करता.

कारण कोणीही मनुष्य संपूर्ण नियमशास्त्र पाळतो आणि एखाद्या नियमाविषयी अडखळतो, तरी तो सर्वांविषयी दोषी ठरतो.

माझ्या बंधूंनो, कोणी मनुष्य म्हणत असेल की “माझ्याजवळ विश्वास आहे”; पण त्याच्याजवळ जर कृती नाही, तर त्यास काय लाभ? विश्वास त्यास तारू शकेल काय? जर कोणी भाऊ उघडा असेल किंवा कोणी बहीण उघडी असेल आणि रोजच्या अन्नाच्या अडचणीत असेल, आणि तुमच्यातील कोणी त्यांना म्हणेल की, “शांतीने जा, ऊब घ्या आणि तृप्त व्हा,” पण शरीरासाठी लागणार्‍या गोष्टी जर तुम्ही त्यांना पुरवीत नाही, तर काय लाभ? म्हणून कृतींशिवाय विश्वास निर्जीव आहे.

तर तुम्ही हे पाहता की, कोणी मनुष्य केवळ विश्वासाने नाही, पण कृतीनी नीतिमान ठरतो.

कारण ज्याप्रमाणे आत्म्याशिवाय शरीर निर्जीव आहे त्याचप्रमाणे कृतीशिवाय विश्वास निर्जीव आहे.

हे देवाशी अप्रामाणिक पिढी! जगाशी मैत्री म्हणजे देवाशी वैर हे तुम्ही जाणत नाही काय? म्हणून जो कोणी जगाचा मित्र होऊ इच्छितो तो देवाचा वैरी आहे. किंवा ‘आपल्यात राहणारा पवित्र आत्मा ईर्षावान’, असे शास्त्रलेख व्यर्थ म्हणतो, असे तुम्हास वाटते काय? पण तो अधिक कृपा करतो, म्हणून शास्त्रलेख असे म्हणतो की, “देव गर्विष्ठांना विरोध करतो, पण लीनांवर कृपा करतो.” म्हणून देवाच्या अधीन रहा; आणि सैतानाला आडवा, म्हणजे तो तुमच्यापासून दूर पळून जाईल. तुम्ही देवाच्या जवळ या म्हणजे तो तुमच्याजवळ येईल. अहो पाप्यांनो, तुम्ही हात शुद्ध करा; अहो द्विमनाच्या मनुष्यांनो, अंतःकरणे शुद्ध करा. दुःखी व्हा, शोक करा आणि रडा; तुमच्या हसण्याचा शोक होवो; तुमच्या आनंदाची खिन्नता होवो. परमेश्वरासमोर नम्र व्हा, म्हणजे तो तुम्हास उच्च करील.

म्हणून चांगले करणे कळत असून, जो ते करीत नाही त्यास ते पाप आहे.

विश्वासाने केलेली प्रार्थना आजारी मनुष्यास बरे करील व प्रभू त्यास उठवील. जर त्याने पापे केली असतील तर प्रभू त्याची क्षमा करील. म्हणून एकमेकांकडे आपल्या पापांची कबुली द्या आणि एकमेकांसाठी प्रार्थना करा. यासाठी की, तुम्ही बरे व्हावे. नीतिमान मनुष्याची प्रार्थना सामर्थ्ययुक्त व परिणामकारक असते.

माझ्या बंधूंनो, जर तुमच्यापैकी कोणी चुकला किंवा सत्यापासून दूर भटकला असेल आणि जर कोणी त्यास परत आणले तर पापी मनुष्यास चुकीच्या मार्गावरून तो परत आणतो. तो त्याचा जीव मरणापासून तारील व पापांची रास झाकील.

आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव आणि पिता धन्यवादित असो! त्याने आपल्या महादयेने येशू ख्रिस्ताला मृतांतून उठवून आपल्याला एका जिवंत आशेत पुन्हा जन्म दिला आहे, आणि त्याद्वारे मिळणारे अविनाशी, निर्मळ व अक्षय वतन स्वर्गात तुमच्यासाठी राखून ठेवले आहे, आणि शेवटच्या काळात प्रकट करण्याकरता सिद्ध केलेल्या तारणासाठी तुम्ही देवाच्या सामर्थ्याने विश्वासाद्वारे, राखलेले आहात.

आणि या कारणास्तव, आताच्या काळात, निरनिराळया प्रकारच्या परीक्षांमुळे तुम्हास थोडा वेळ भाग पडल्यास तुम्ही दुःख सोशीत असताही आनंदित होता. म्हणजे, नाशवंत सोन्याची परीक्षा अग्नीने करतात, त्या सोन्याहून मोलवान असलेल्या तुमच्या विश्वासाची परीक्षा, येशू ख्रिस्ताचे येणे होईल त्यावेळी, प्रशंसेला, गौरवाला व मानाला कारण व्हावी. तुम्ही त्यास बघितले नसताही तुम्ही त्याच्यावर प्रीती करता आणि त्यास पाहिले नसताही त्याच्यावर विश्वास ठेवून, तुम्ही अवर्णनीय, गौरवी आनंदाने उल्लसीत होता. कारण, तुमच्या विश्वासाचे प्रतिफळ, म्हणजे तुमच्या आत्म्याचे तारण तुम्ही मिळवत आहात.

तुम्ही आज्ञांकित मुले होऊन, तुमच्या पूर्वीच्या अज्ञानातील वासनांप्रमाणे स्वतःला वळण लावू नका. परंतु तुम्हास ज्याने पाचारण केले तो जसा पवित्र आहे तसे तुम्ही आपल्या सर्व वागण्यात पवित्र व्हा. कारण असे जे पवित्र शास्त्रात लिहिले आहे की, “तुम्ही पवित्र असा कारण मी पवित्र आहे.”

आणि पक्षपात न करता, जो प्रत्येक मनुष्याचा कामाप्रमाणे न्याय करतो त्यास तुम्ही जर पिता म्हणून हाक मारता, तर तुमच्या प्रवासाच्या काळात तुम्ही भय धरून वागले पाहिजे. कारण तुम्हास माहीत आहे की, तुमच्या पूर्वजांनी लावून दिलेल्या निरर्थक आचरणातून चांदीसोन्यासारख्या नाशवंत गोष्टीद्वारे, तुमची सुटका केली गेली नाही. निष्कलंक व निर्दोष कोकरा झालेल्या ख्रिस्ताच्या मोलवान रक्ताद्वारे तुम्ही मुक्त झाला आहात.

तुम्ही जर आत्म्याच्याद्वारे, सत्याचे आज्ञापालन करून, निष्कपट बंधुप्रेमासाठी आपले जीव शुद्ध केले आहे, तर तुम्ही आस्थेने एकमेकांवर मनापासून प्रीती करा. कारण तुम्ही नाशवंत बीजाकडून नाही पण अविनाशी बीजाकडून, म्हणजे देवाच्या, जिवंत टिकणार्‍या वचनाच्याद्वारे तुमचा पुन्हा जन्म पावलेले आहात. कारण पवित्रशास्त्रात असे लिहिले आहे, “सर्व मानवजाती गवतासारखी आहे व तिचे सर्व वैभव गवताच्या फुलासारखे आहे गवत वाळते व त्याचे फूल गळते, परंतु परमेश्वराचे वचन सर्वकाळ टिकते.” तुम्हास त्याच वचनाचे शुभवर्तमान तुम्हास सांगण्यात आले ते तेच आहे.

त्याने स्वतः तुमची आमची पापे स्वदेही वाहून वधस्तंभावर नेली, ह्यासाठी की, आपण पापाला मरून नीतिमत्त्वाला जिवंत रहावे; त्यास बसलेल्या माराने तुम्ही निरोगी झाला आहात. कारण तुम्ही मेंढरांसारखे बहकत होता; पण जो तुमच्या जीवांचा मेंढपाळ व रक्षक आहे, त्याच्याकडे आता परत आला आहात.

कारण, आपल्याला देवाकडे आणण्यास ख्रिस्तसुद्धा पापांसाठी, नीतिमान अनीतिमान लोकांसाठी, एकदा मरण पावला. तो देहाने मारला गेला, पण आत्म्याने जिवंत केला गेला.

आतासुद्धा, त्याचे प्रतिरूप असा बाप्तिस्मा (देहाचा मळ काढून नाही, पण चांगल्या विवेकाने देवाला दिलेले वचन म्हणून) येशू ख्रिस्ताच्या पुनरुत्थानाकडून आपल्याला तारतो. तो स्वर्गात गेला असून देवाच्या उजवीकडे आहे आणि देवदूत, अधिकारी व सत्ताधीश त्याच्या अधीन आहेत.

म्हणून ख्रिस्ताने देहाने दुःख सोसले आणि तुम्हीही त्याच्या वृत्तीची शस्त्रसामग्री परिधान करा कारण ज्याने देहात सोसले आहे तो पापापासून दूर झाला आहे. म्हणून अशा मनुष्याने आपल्या देहातील पुढील आयुष्य, मनुष्यांच्या वासनांसाठी नाही, पण देवाच्या इच्छेसाठी जगावे. कारण परराष्ट्रीयांच्या इच्छेप्रमाणे करण्यास गेलेला काळ पुरे झाला. तेव्हा तुम्ही कामातुरपणात, वासनांत, दारूबाजीत, दंगलीत, तसेच बदफैली व अमंगळ मूर्तिपूजेत आपल्या मार्गाने गेलात.

पण सर्व गोष्टींचा शेवट जवळ आला आहे म्हणून समंजस मनाचे व्हा आणि प्रार्थनेसाठी सावध रहा; आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट ही की आपल्यात वाढती प्रीती ठेवा, कारण प्रीतीने पापांची रास झाकली जाते.

प्रियांनो, तुमच्या परीक्षेसाठी, तुमची अग्निपरीक्षा होण्यात तुम्हास काही अपूर्व झाले, असे वाटून त्याचे नवल मानू नका. उलट तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखात भागीदार होत आहात म्हणून आनंद करा. म्हणजे त्याचे गौरव प्रकट होईल तेव्हाही फार मोठ्या आनंदाने तुम्ही उल्लासित व्हावे.

कारण देवाच्या घराण्यापासून न्यायनिवाड्यास आरंभ होण्याची वेळ आता आली आहे आणि तो जर प्रथम आपल्यापासून झाला, तर जे देवाचे शुभवर्तमान मानीत नाहीत त्यांचा शेवट काय होईल? नीतिमान जर कष्टाने तर जो भक्तिहीन व पापी ह्याला ठिकाण कोठे मिळेल?

म्हणून जे देवाच्या इच्छेप्रमाणे सोसतात त्यांनी चांगले करीत राहून, जो विश्वासू निर्माणकर्ता आहे त्याच्याहाती आपले जीव सोपवावेत.

तुम्ही विश्वासात स्थिर राहून त्याच्याविरुध्द उभे रहा कारण तुम्ही जाणता की, जगात असलेल्या तुमच्या बांधवांवर तशीच दुःखे आणली जात आहेत. पण तुम्हास ज्याने ख्रिस्ताद्वारे, आपल्या सनातन गौरवात बोलावले आहे तो सर्व कृपेचा देव, तुम्ही अल्पकाळ सोसल्यानंतर, स्वतः तुम्हास परिपूर्ण करील, स्थिर करील आणि दृढ करील.

म्हणून बंधूंनो, तुमचे पाचारण व तुमची निवड अढळ करण्यासाठी विशेष प्रयत्न करा. या गोष्टी तुम्ही केल्या तर तुम्ही कधी अडखळणार नाही. आणि तशा प्रकारे आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या सार्वकालिक राज्यात जयोत्सावाने तुमचा प्रवेश होईल.

तर जे धार्मिकांना त्यांच्या परीक्षेतून कसे सोडवावे व जे अनीतिमान लोकांस शिक्षा भोगत न्यायाच्या दिवसासाठी कसे राखून, ठेवावे हे प्रभूला कळते.

कित्येक लोक ज्याला उशीर म्हणतात तसा उशीर प्रभू आपल्या वचनाविषयी करीत नाही. तर तो तुमच्याविषयी फार सहनशील आहे. कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चात्ताप करावा अशी आहे.

म्हणून प्रियजनहो, या गोष्टींची वाट पाहता असता, तुम्ही त्याच्या दृष्टीने निर्दोष व निष्कलंक असे शांतीत असलेले आढळावे म्हणून होईल तितका प्रयत्न करा.

जर आम्ही म्हणतो की, आमची देवाबरोबर सहभागिता आहे पण पापाच्या अंधारामध्ये आम्ही जगतो तर आम्ही खोटे बोलत आहोत व सत्याला अनुसरत नाही. पण जसा तो प्रकाशात आहे तसे जर आपण प्रकाशात चालत असलो तर आपली एकमेकांबरोबर सहभागिता आहे आणि त्याचा पुत्र येशू ह्याचे रक्त आपल्याला सर्व पापांपासून शुद्ध करते. जर आम्ही असे म्हणतो की, आमच्यामध्ये कोणतेही पाप नाही, तर आम्ही स्वतःला फसवतो आणि आपल्याठायी सत्य नाही. जर आपण आपली पापे कबूल करतो, तर तो विश्वासू व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील आणि आपल्याला सर्व अनीतीपासून शुद्ध करील. जर आम्ही म्हणतो की आम्ही पाप केले नाही तर आम्ही त्यास लबाड ठरवतो आणि त्याचे वचन आपल्याठायी नाही.

माझ्या प्रिय मुलांनो, तुम्ही पाप करू नये यासाठी मी तुम्हास या गोष्टी लिहीत आहे, पण जर तुम्हांपैकी एखादा पाप करतो तर त्याच्यासाठी पित्याजवळ आपला कैवारी येशू ख्रिस्त जो नीतिमान तो आहे. तो केवळ आमच्याच पापासाठी नव्हे तर सगळ्या जगाच्याही पापांबद्दल प्रायश्चित्त झाला आहे. जर आम्ही त्याच्या आज्ञा पाळतो तर आम्ही त्यास खऱ्या अर्थाने ओळखले आहे. जो कोणी असे म्हणतो, “मी देवाला ओळखतो!” परंतु त्याच्या आज्ञा पाळत नाही तर तो खोटे बोलत आहे; आणि त्याच्याठायी सत्य नाही. पण जर कोणी त्याच्या वचनाप्रमाणे चालतो, तर त्यांच्यामध्ये देवाची प्रीती पूर्णत्वास गेली आहे. ह्यावरून आपल्याला कळून येते की, आपण त्याच्याठायी आहोत. मी देवामध्ये राहतो असे म्हणणाऱ्याने, जसा येशू ख्रिस्त चालला तसे चालले पाहिजे.

प्रिय मुलांनो, मी तुम्हास लिहीत आहे कारण ख्रिस्ताच्या नावामुळे तुमच्या पापांची तुम्हास क्षमा झालेली आहे.

जगावर किंवा जगातील गोष्टींवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करीत असेल तर त्याच्याठायी पित्याची प्रीती नाही. कारण जगात जे सर्व आहे ते, म्हणजे देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराविषयीची फुशारकी ही पित्यापासून नाहीत, तर जगापासून आहेत. जग व जगातील वासना नाहीशा होत आहेत. पण जो देवाच्या इच्छेप्रमाणे करतो तो सर्वकाळपर्यंत जगेल.

तुम्हास सत्य कळत नाही म्हणून मी तुम्हास लिहीले आहे असे नाही, तुम्हास ते कळते म्हणून आणि कोणतीही लबाडी सत्यापासून नाही, म्हणून लिहिले आहे. येशू हा ख्रिस्त आहे असे नाकारणारा लबाड नाही काय? जो पित्याला आणि पुत्राला नाकारतो तोच ख्रिस्तविरोधी आहे. जो कोणी पुत्राला नाकारतो त्यास पिता लाभत नाही पण जो पुत्राला स्वीकारतो त्यास पिता लाभला आहे.

आणि देवाने आम्हास जे देण्याचे अभिवचन दिले आहे ते म्हणजे सार्वकालिक जीवन होय. जे तुम्हास फसविण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांच्याविषयी मी तुम्हास या गोष्टी लिहीत आहे.

म्हणून आता, प्रिय मुलांनो, ख्रिस्तामध्ये राहा, यासाठी की, जेव्हा ख्रिस्त प्रकट होइल, तेव्हा आम्हास धैर्य मिळेल व जेव्हा तो परत येतो तेव्हा त्याच्याद्वारे आम्ही लज्जित केले जाणार नाही. जर तुम्हास माहीत आहे की, ख्रिस्त नीतिमान आहे तर जे लोक चांगले काम करतात ते देवाचे पुत्र आहेत हे देखील तुम्हास कळेल.

आणि ज्या प्रत्येकाने ही आशा ख्रिस्तावर ठेवली आहे, जसा ख्रिस्त शुद्ध आहे, तसा तो आपणाला शुद्ध करतो.

प्रत्येकजण जो पाप करतो तो नियमशास्त्राचे उल्लंघन करतो कारण पाप हे नियमशास्त्राचे उल्लंघन आहे. तुम्हास माहीत आहे की, पापे हरण करण्यासाठी तो प्रकट झाला; त्याच्याठायी पाप नाही. जो कोणी त्याच्याठायी राहतो तो पाप करीत नाही. जो कोणी पाप करीतो त्याने त्यास पाहिले नाही आणि त्यास ओळखलेही नाही. प्रिय मुलांनो, तुम्हास कोणी फसवू नये. तो जसा नीतिमान आहे तसा ख्रिस्त नीतीने चालणाराही न्यायसंपन्न आहे. जो पाप करतो तो सैतानाचा आहे कारण सैतान आरंभापासून पाप करीत आहे आणि सैतानाची कामे नष्ट करण्यासाठीच देवाचा पुत्र प्रकट झाला. जो कोणी देवापासून जन्मलेला आहे तो पाप करीत नाही कारण त्याचे बीज त्यांच्यामध्ये राहते. त्यामुळे तो पापात राहू शकत नाही कारण तो देवापासून जन्मला आहे. ह्यावरून देवाची मुले व जी सैतानाची मुले उघड दिसून येतात. जो कोणी नीतिमत्त्वाने वागत नाही तो देवाचा नाही व जो आपल्या भावावर प्रीती करीत नाही तोही नाही.

आणि आपण जे काही मागतो ते त्याच्यापासून आपल्याला मिळते कारण आपण त्याच्या आज्ञा पाळतो आणि त्यास जे आवडते ते करतो.

तो आम्हास अशी आज्ञा आहे की, त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्या नावावर आम्ही विश्वास ठेवावा आणि त्याने आपल्याला आज्ञा दिल्याप्रमाणे एकमेकांवर प्रीती करावी. जो देवाची आज्ञा पाळतो तो त्याच्यामध्ये राहतो आणि देव त्याच्यात राहतो आणि त्याने जो पवित्र आत्मा आपल्याला दिला, त्यावरून आपल्याला कळून येते की, तो आपल्याठायी राहतो.

प्रियांनो, आपण एकमेकांवर प्रीती करावी कारण प्रीती देवाकडून आहे आणि जो कोणी प्रीती करतो तो प्रत्येकजण देवापासून जन्मला आहे आणि देवाला ओळखतो. जो प्रीती करीत नाही, तो देवाला ओळखत नाही कारण देव प्रीती आहे.

जर कोणी “येशू हा देवाचा पुत्र आहे” हे कबूल करतो तर त्याच्याठायी देव राहतो आणि देव त्यांच्यामध्ये राहतो.

“मी देवावर प्रीती करतो,” असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा व्देष करील, तर तो लबाड आहे कारण डोळ्यांपुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो प्रीती करीत नाही तर त्यास न पाहिलेल्या देवावर प्रीती करता येणे शक्य नाही. जो देवावर प्रीती करतो त्याने आपल्या बंधूवरही प्रीती करावी, ही ख्रिस्ताची आपल्याला आज्ञा आहे.

येशू हा ख्रिस्त आहे, असा जो कोणी विश्वास धरतो तो देवापासून जन्मलेला आहे आणि जो कोणी जन्म देणाऱ्यावर प्रीती करतो. तो त्याच्यापासून जन्मलेल्यावरही प्रीती करतो. देवावर प्रीती करण्याने व त्याच्या आज्ञा पाळण्याने आम्ही ओळखतो की आम्ही देवाच्या मुलांवर प्रीती करतो. देवावर प्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञापालन करणे आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत. कारण प्रत्येकजण जो देवापासून जन्मला आहे तो जगावर विजय मिळवतो आणि ज्याने जगावर जय मिळवला तो म्हणजे आपला विश्वास. येशू हा देवाचा पुत्र आहे असा विश्वास धरणाऱ्याशिवाय जगावर विजय मिळविणारा कोण आहे?

जो कोणी देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याच्या स्वतःमध्ये ही साक्ष आहे. जो देवाच्या साक्षीवर विश्वास ठेवत नाही, त्याने देवाला लबाड ठरवले आहे कारण देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राबाबत दिलेल्या साक्षीवर त्याने विश्वास ठेवला नाही. आणि देवाची जी साक्ष आहे तीही आहे की, देवाने आपल्याला सार्वकालिक जीवन दिले आहे आणि हे जीवन त्याच्या पुत्राच्या ठायी आहे. ज्याच्याजवळ पुत्र आहे त्यास जीवन आहे पण ज्याच्याजवळ पुत्र नाही त्यास जीवन नाही.

जे देवाच्या पुत्राच्या नावावर विश्वास ठेवतात त्यांना मी या गोष्टी लिहीत आहे, यासाठी की, तुम्हास सार्वकालिक जीवन लाभले आहे, याविषयी तुम्हास कळावे.

आणि आम्हास देवामध्ये धैर्य आहे की, आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकेल.

आम्ही जाणतो की, जो कोणी देवाचे मूल झाला आहे तो पाप करीत रहात नाही. जो देवापासून जन्मला आहे. देव स्वतः त्याचे संरक्षण करतो आणि सैतान त्यास हात लावू शकत नाही.

ख्रिस्ताच्या शिक्षणाला चिकटून न राहता जो पुढेपुढेच जातो त्यास देव प्राप्त झाला नाही. जो ख्रिस्ताच्या शिक्षणाला धरून राहतो त्यास पिता व पुत्र या दोघांची प्राप्ती झाली आहे. हे शिक्षण न देणारा कोणी तुम्हाकडे आला तर त्यास घरात घेऊ नका किंवा त्यास सलामही करू नका. कारण जो कोणी त्याचे स्वागत करतो तो त्याच्या दुष्कर्मांचा भागीदार होतो.

तुम्ही सर्वकाळच्या जीवनासाठी आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या दयेची प्रतीक्षा करीत स्वतःला देवाच्या प्रीतीत राखा. जे संशय धरतात त्यांच्यावर तुम्ही दया करा; आणि काहींना अग्नीतून ओढून काढून वाचवा. काही जणांवर तुम्ही भीत भीत दया करा; पण हे करताना देहामुळे डागाळलेल्या वस्त्रांचाही द्वेष करा. आता, तुम्हास अढळ राखण्यास आणि आपल्या गौरवी समक्षतेत हर्षाने, निष्कलंक उभे करण्यास जो समर्थ आहे

आणि येशू ख्रिस्त ‘विश्वासू साक्षी’ जो ‘मरण पावलेल्यांमधून प्रथम जन्मलेला’ आणि ‘पृथ्वीवरील राजांचा तो अधिपती’ आहे आणि ज्या येशूने आमच्यावर प्रीती केली आणि ज्याने आपल्या रक्ताने आमच्या ‘पापांतून आम्हास मुक्त केले;’

तरीही तुझ्याविरुद्ध माझे म्हणणे आहे तू आपली पहिली प्रीती सोडली आहेस. म्हणून तू कोठून पडलास याची आठवण कर, पश्चात्ताप कर व प्रथम जी कामे केलीस ती पुन्हा कर. जर तू पश्चात्ताप केला नाहीस, तर मी येईन आणि तुझी समई तिच्या ठिकाणाहून काढून टाकीन.

म्हणून पश्चात्ताप करा! नाही तर मी लवकरच तुमच्याकडे येईन आणि आपल्या तोंडातील तरवारीने त्यांच्याशी लढेन.

मी तिला पश्चात्ताप करण्यासाठी वेळ दिला आहे परंतु ती आपल्या व्यभिचाराचा पश्चात्ताप करू इच्छीत नाही.

जो विजय मिळवतो, तो अशा रीतीने शुभ्र वस्त्रे परिधान करील, मी त्याचे नाव ‘जीवनाच्या पुस्तकातून’ ‘खोडणारच’ नाही; पण माझ्या पित्यासमोर व त्याच्या दूतांसमोर त्याचे नाव स्वीकारीन,

मला तुझी कामे माहीत आहेत, ती अशी की, तू थंड नाहीस व गरमही नाहीस. तू थंड किंवा गरम असतास तर बरे झाले असते. पण, तू तसा नाहीस, कोमट आहेस, तू थंड नाहीस किंवा गरम नाहीस. म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे.

तू म्हणतो मी सधन आहे, मी ‘संपत्ती मिळविली आहे,’ आणि मला कशाची गरज नाही, पण तू कष्टी, दयनीय, गरीब, आंधळा व नग्न आहेस हे तुला कळत नाही. मी तुम्हास सल्ला देतो की, अग्नीत शुद्ध केलेले सोने माझ्याकडून विकत घे. म्हणजे तू श्रीमंत होशील आणि तुमची लज्जास्पद नग्नता दिसू नये म्हणून नेसावयाला शुभ्र वस्त्रे विकत घे आणि स्पष्ट दिसावे म्हणून डोळ्यांत घालण्यास अंजन विकत घे. ज्यांच्यावर मी प्रेम करतो, त्यांना शिकवण देतो व त्यांनी कसे रहावे याची शिस्त लावतो, म्हणून झटून प्रयत्न करा आणि पश्चात्ताप करा.

पाहा, मी दाराजवळ उभा आहे व दरवाजा ठोकीत आहे. जर कोणी माझा आवाज ऐकतो आणि दरवाजा उघडतो, तर मी आत येईन आणि त्याच्याबरोबर जेवीन व तोसुध्दा माझ्याबरोबर जेवेल.

ज्याप्रमाणे मी विजय मिळवला आणि माझ्या पित्याच्या राजासनावर बसलो आहे तसा जो विजय मिळवील त्यास मी माझ्या राजासनावर बसण्याचा अधिकार देईन.

मी त्यास म्हटले, “प्रभू, तुला माहित आहे.” आणि तो मला म्हणाला जे मोठ्या ‘संकटातून’ येतात ते हे आहेत; त्यांनी ‘आपले झगे’ कोकऱ्याच्या समर्पणाच्या ‘रक्तात धुऊन’ शुभ्र केले आहेत.

त्यांनी कोकर्‍याच्या रक्ताद्वारे, आपल्या साक्षीच्या वचनाद्वारे, त्याच्यावर विजय मिळवला आहे. आणि त्यांना मरावे लागले तरी त्यांनी आपल्या जीवावर प्रीती केली नाही.

त्यांच्या ‘मुखात काही असत्य आढळले नाही;’ ते निष्कलंक आहेत.

जे देवाच्या आज्ञा व येशूचा विश्वास धीराने पालन करतात त्या पवित्र जनांची सहनशीलता येथे आहे.

‘हे प्रभू, तुला कोण भिणार नाही? आणि तुझ्या नावाचे गौरव कोण करणार नाही?’ कारण तू एकच ‘पवित्र’ आहेस; कारण ‘सगळी राष्ट्रे येऊन तुझ्यापुढे नमन करतील. कारण तुझ्या नीतिमत्त्वाची कृत्ये प्रकट झाली आहेत.’

तेव्हा मी एक, मोठे, शुभ्र ‘राजासन’ आणि त्यावर जो ‘बसला’ होता त्यास बघितले. त्याच्या उपस्थितीतून पृथ्वी व आकाशही ‘पळून गेली; आणि त्यांना कोठेच जागा मिळाली नाही.’ मग मी मृतांना, लहान व मोठे ह्यांना राजासनासमोर उभे राहिलेले बघितले; तेव्हा ‘पुस्तके उघडली गेली;’ नंतर आणखी एक ‘पुस्तक’ उघडले गेले. ते ‘जीवनाचे’ पुस्तक होते; आणि त्या पुस्तकात लिहिलेल्या गोष्टींवरून ज्यांच्या त्यांच्या कामांप्रमाणे मृतांचा न्याय करण्यात आला.

‘तो त्यांच्या डोळ्यांतले सर्व अश्रू पुसेल;’ आणि ह्यापुढे मरण राहणार नाही; ‘दुःख, आक्रोश,’ किंवा क्लेशही होणार नाहीत; कारण ‘पहिल्या गोष्टी’ होऊन गेल्या आहेत.” ‘तेव्हा राजासनावर बसलेला’ म्हणालाः पाहा, मी सर्वकाही नवीन करतो आणि तो मला म्हणाला, लिही; कारण ही वचने विश्वसनीय आणि खरी आहेत. आणि तो मला म्हणालाः “या गोष्टी झाल्या आहेत. मी अल्फा आणि ओमेगा, आरंभ आणि शेवट आहे. जो ‘तान्हेला असेल त्यास मी जीवनाच्या’ झर्‍याचे ‘पाणी फुकट’ देईन. जो विजय मिळवतो तो या सर्व गोष्टी वारशाने मिळवील; ‘मी त्यांचा देव होईन आणि तो माझा पुत्र होईल.’ पण भेकड, अविश्वासू, अमंगळ, खुनी, जारकर्मी, चेटकी, मूर्तिपुजक आणि सगळे लबाड ह्यांना अग्नीने आणि गंधकाने जळणार्‍या सरोवरात वाटा मिळेल; हे दुसरे मरण होय.”

जो मनुष्य अनीतिमान आहे, तो अनीतिमान राहो, जो अमंगळ आहे, तो अमंगळ राहो. जो नीतिमान आहे तो नैतीक आचरण करीत राहो. जो पवित्र आहे, त्यास आणखी पवित्रपणाने चालू दे.”

आपल्याला ‘जीवनाच्या झाडावर’ अधिकार मिळावा व वेशीतून नगरीत आपले जाणे व्हावे म्हणून जे आपले ‘झगे धुतात’ ते धन्य आहेत.

आत्मा आणि नवरी असे म्हणतात की, “ये,” आणि जो कोणी हे ऐकतो, तो असे म्हणो की, “ये,” आणि जो तहानेला आहे, तो येवो, ज्या कोणाला पाहिजे, तो ‘फुकट दिले जाणारे जीवनी पाणी घेवो.’

या पुस्तकात भविष्यकाळाबाबत नमूद केलेली वचने जो ऐकतो, त्यास मी गंभीरपणे सावधान करतोः जर कोणी ‘ह्यामध्ये भर घालील, तर या पुस्तकात लिहिलेल्या’ पीडा देव त्याच्यावर आणील; ‘आणि’ जो कोणी भविष्यकाळाबाबत संदेश देणाऱ्या या पुस्तकामधून काही ‘काढून टाकील’ त्याचा ज्यांच्याबाबत या पुस्तकात लिहिले आहे, त्या जीवनाच्या झाडाचा आणि पवित्र नगराचा वाटा देव काढून घेईल.

Marathi - मराठी - MR

MRIRV'17 - Marathi Indian Revised Version - 2017

This Bible text is from Marathi Indian Revised Version IRV 2019
https://open.bible/bibles/marathi-bridge-text-bible/
provided by: Bridge Connectivity Solutions Pvt Ltd, available by Creative Commons CC-BY-SA-4.0,
and this new compilation is shared as www.creativecommons.org/licenses/by-sa/4.0.
Languages are made available to you by www.ipedge.net