20 – प्रार्थना
हे सर्वशक्तिमान देवाचे पवित्र शब्द आहेत.
माणसांच्या बोलण्यात आपल्याला रस नसतो.
देवावर प्रेम करणार् या प्रत्येकासाठी... याबद्दल देव असे म्हणतो: प्रार्थना.
हे सर्वशक्तिमान देवाचे पवित्र शब्द आहेत.
माणसांच्या बोलण्यात आपल्याला रस नसतो.
देवावर प्रेम करणार् या प्रत्येकासाठी... याबद्दल देव असे म्हणतो: प्रार्थना.
कारण परमेश्वराचे डोळे नीतिमानांवर असतात व त्याचे कान त्यांच्या विनंतीकडे असतात पण वाईट करणार्यावर परमेश्वराची करडी नजर असते.”
”परमेश्वरा, माझे शब्द ऐक. मी जे सांगायचा प्रयत्न करत आहे ते समजून घे. माझ्या देवा! माझ्या राजा! माझी प्रार्थना ऐक. परमेश्वरा, मी रोज सकाळी तुला माझी भेट अर्पण करतो. मी तुइयाकडे मदतीच्या अपेक्षेने पाहातो आणि तू माझी प्रार्थना ऐकतोस.
”म्हणून तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुम्ही अशाप्रकारे प्रार्थना करावीः हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. जशी आम्ही आमच्या ऋण्यांस त्यांची ऋणे सोडली आहेत, तशीच तू आमची ऋणे आम्हांस सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास त्या दुष्टापासून सोडव. (कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरवही सर्वकाळ तुझीच आहेत.)
”मग अब्राहाम म्हणाला, “हे प्रभु, तुझ्या तुलनेने मी केवळ धूळ व राख आहे, तरी तुला एक प्रश्न विचारु दे;
”सेवक म्हणाला, “हे परमेश्वर देवा, तू माझा स्वामी अब्राहाम याचा परमेश्वर आहेस,; आजच त्याच्या मुलासाठी मला मुलगी सापडावी असे कर; कृपया, माझा मालक अब्राहाम ह्याच्यावर एवढी दया कर. मी येथे या विहिरीजवळ उभा राहात आहे. मी तर इसहाकासाठी योग्य मुलगी निवडण्याकरिता काही विशेष खुणेचा शोध करीत आहे; तर असे घडू दे, की मी ज्या मुलीस म्हणेन, ‘मुली तुझी पाण्याची घागर उतरुन मला प्यायला पाणी दे,’ आणि ती जर असे म्हणेल, ‘प्या बाबा, आणि मी तुमच्या उंटांसही पाणी पाजते;’ जर असे घडून येईल तर मग तीच इसहाकासाठी योग्य नवरी असल्याचे तू सिद्ध केले आहेस असे होईल आणि तू माझ्या स्वामीवर दया केली आहेस असे मला कळेल.” मग त्या सेवकाची प्रार्थना संपली नाहीं तोंच अब्राहामाचा भाऊ नाहोर याजपासून मिल्केला झालेल्या बथुवेलाची कन्या, रिबका नावाची एक तरुणी खांद्यावर घागर घेऊन विहिहीपाशी आली;
”इसहाकाच्या बायकोला मूलबाळ होईना म्हणून इसहाकाने रिबकेसाठी परमेश्वराची प्रार्थना केली; परमेश्वराने इसहाकाची प्रार्थना ऐकली आणि रिबका गर्भवती झाली.
”नदी उतरुन पलीकडे जाण्यात याकोब सर्वात शेवटी होता; परंतु नदी उतरुन जाण्यापूर्वी तो अद्याप एकटाच असताना एक पुरुष आला व त्याने याकोबाशी झोंबी केली. सूर्य उगवेपर्यंत त्याने त्याच्याशी झोंबी केली त्या माणसाने पाहिले की आपण याकोबावर मात करुन त्याचा पराभव करु शकत नाही म्हणून त्याने याकोबाच्या जांघेस स्पर्श केला तेव्हा याकोबाचा पाय जांघेच्या सांध्यातून निखळला. मग तो पुरुष याकोबास म्हणाला, “आता मला जपरंतु याकोब म्हणाला, “तू मला आशीर्वाद दिलाच पाहिजेस नाहीतर मी तुला जाऊ देणार नाही.” तो पुरुष त्याला म्हणाला, “तुझे नाव काय आहे?”आणि याकोब म्हणाला, “माझे नाव याकोब आहे.” तेव्हा तो पुरुष म्हणाला, “तुझे नाव याकोब असणार नाही. येथून पुढे तुझे नांव इस्राएल असेल. मी हे नांव तुला देत आहे कारण तू देवाशी व माणसांशी झोंबी केली आहेस आणि तू हरला नाहीस तर जिंकलास.” मग याकोबाने त्याला विचारले, “कृपया तुझे नाव मला सांग.”परंतु तो पुरुष म्हणाला, “तू माझे नाव का विचारतोस?” त्यावेळी तेथेच त्या पुरुषाने याकोबाला आशीर्वाद दिला. म्हणून याकोबाने त्या जागेचे नाव पनीएल ठेवले. याकोब म्हणाला, “ह्या ठिकाणी मी देवाला तोंडोतोंड पाहिले आहे परंतु माझा जीव वाचवला गेला.”
”मोशे तेथे परमेश्वराजवळ चाळीस दिवस व चाळीस रात्री राहिला; त्या दिवसात त्याने अन्न किंवा पाणी घेतले नाही; आणि मोशेने त्या पवित्रकराराची वचने - दहा आज्ञा - त्या दोन दगडी पाट्यांवर लिहिली.
”पण मोशे आणि अहरोन जमिनीवर पालथे पडले आणि ओरडले, “कृपा करुन या सगळयांवर रागावू नकोस, सर्वाच्या आत्म्यांच्या देवा! फकत एका माणसाने पाप केले आहे!”
”2परंतु तेथूनही तुम्ही परमेश्वराला, आपल्या देवाला काया वाचा मने शरण गेलात तर तो तुम्हाला पावेल. या सर्व गोष्टी घडतील, तुम्ही संकटात असाल तेव्हा तुम्ही पुन्हा त्याच्या कडेच परतून याल व त्याला शरण जाल. आपला परमेश्वर देव दयाळू आहे. तो तुम्हाला अंतर देणार नाही. तो तुमचा सर्वनाश होऊ देणार नाही. तो तुमच्या पूर्वजांशी त्याने केलेला पवित्रकरार तो विसरणार नाही.
”त्याचे असे झाले. परमेश्वराने तुमच्याशी केलेला पवित्र करार दगडी पाट्यांवर खोदून शब्दबद्ध केला होता. त्या पाट्या आणायला मी डोंगरावर चढून गेलो. तेथे मी चाळीस दिवस अन् चाळीस रात्री अन्नपाणी न घेता राहिलो.
”मग मी परमेश्वरापुढे जमिनीवर डोके टेकून पूर्वीप्रमाणेच चाळीस दिवस अन् चाळीस रात्र पालथा पडून राहिलो. तुमच्या घोर पापामुळे मी हे केले. परमेश्वराच्या दृष्टिने तुम्ही हे फार वाईट केले आणि परमेश्वराचा कोप ओढवून घेतलात.
”“तेव्हा मी त्याच्या पायाशी चाळीस दिवस अन् चाळीस रात्री पडून राहिलो. कारण तुमचा नाश करीन असे तो म्हणाला होता.
”“मी पहिल्यावेळेप्रमाणेच चाळीस दिवस आणि रात्र डोंगरावर राहिलो. याहीवेळी परमेश्वराने माझे ऐकले व तुमचा नाश न करायचे ठरविले.
”यहोशवाने आपले कपडे फाडले आणि तो व इस्त्राएलाचे वडील जन संध्याकाळपर्यत परमेश्वराच्या कोशापुढें पालथे पडून राहिले; आणि त्यांनी आपल्या डोक्यांत धूळ घातली.
”नंतर सर्व इस्राएलाचीं संतानें म्हणजे सर्व लोक देवाच्या मंदिराजवळ चढून येऊन रडले, आणि त्यानी तेथें परमेश्र्वरापुढें राहून त्या दिवसीं सांजपयंत उपास केला, आणि परमेश्र्वरापुढ होमे व शांतिकारक यज्ञ केले.
”आणि यहोवा येऊन उभा राहिला, आणि पबर्वीप्रमाणें त्यानें, शमुवेला, शमुवेला,अशी हाक मारली, रेव्हां शमुवेल म्ङमाला,बोल, कारण तुझा सेवक ऐकत आहे.
”आणि मी तुम्हांसाठी प्रार्थना करायची सोडून देण्याने मी यहोवाच्या विरूध्द पाप करावें हे माझ्यापासून दूरच असो, परंतु चांगला व सरळ मार्ग मी तुम्हांस शिकवीन,
”एवढे बोलून शलमोन परमेश्वराच्या वेदीपुढे उभा राहिला. सर्व लोक त्याच्या समोर होते. दोन्ही हात आकाशाच्या दिशेन पसरुन वर पाहात शलमोन म्हणाला, “हे इस्राएलच्या परमेश्वर देवा, तुझ्या सारखा दुसरा कोणी आकाशात किंवा पृथ्वीतलावर नाही. तू हा करार केलास कारण तुझे आमच्यावर प्रेम आहे. तू आपला करार पाळतोस. जे तू दाखवलेल्या मार्गाने जातात त्यांच्याविषयी तू दयाळू आणि एकनिष्ठ असतोस.
”शलमोनाने देवापुढे ही प्रार्थना केली तेव्हा तो वेदीसमोर गुडघे टेकून बसला होता आणि त्याने हात स्वर्गाच्या दिशेने उंच केले होते. प्रार्थना संपवून तो उभा राहिला.
”दुपारच्या यज्ञाची वेळ झाली. तेव्हा संदेष्टा एलीया वेदीपाशी गेला आणि त्याने प्रार्थना केली, “परमेश्वरा, अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांच्या देवा, तूच इस्राएलचा देव आहेस हे तू आता सिध्द करुन दाखवावेस अशी माझी तुला विनंती आहे. हे सर्व तूच माझ्याकडून करवून घेतलेस हे यांना कळू दे. मी तुझा सेवक आहे हे ही कळू दे. हे परमेश्वरा, माझ्या विनवणीकडे लक्ष दे. तूच खरा परमेश्वर देव आहेस हे यांना दाखव. म्हणजे तू त्यांना पुन्हा स्वत:जवळ घेत आहेस हे त्यांना पटेल.” तेव्हा परमेश्वराने अग्री पाठवला. यज्ञ, लाकडे, दगड, वेदीभोवतीची जमीन हे सर्व पेटले. भोवतीच्या चरातले पाणी सुध्दा त्या अग्नीने सुकून गेले. सर्वांच्या देखतच हे घडले. तेव्हा लोकांनी जमीनीवर पालथे पडून “परमेश्वर हाच देव आहे, परमेश्वर हाच देव आहे” असे म्हटले.
”परमेश्वरा, माझे म्हणणे ऐक आपले डोळे उघड आणि हे पत्र पाहा. सन्हेरीबची जिवंत परमेश्वराचा अवमान करणारी वचने पाहा.
”तेव्हा परमेश्वर देवा आता आम्हाला या राजापासून वाचव. म्हणजे तूच खरा परमेश्वर आहेस हे जगातील सर्व राज्यांना कळेल.”
”तेव्हा हिज्कीयाने आपले तोंड भिंतीकडे वळवले.परमेश्वराची प्रार्थना करुन तो म्हणाला, हिज्कीया मरणासन्न अवस्थेत “परमेश्वर, मी तुझी मन:पूर्वक सेवा केली आहे हे लक्षात असू दे. तुझ्या दृष्टीने जे उचित तेच मी केले.” एवढे बोलून तो ओक्साबोक्शी रडला.
”याबेसने इस्राएलाच्या देवाची प्रार्थना केली. याबेस म्हणाला, “तुझा माझ्यावर वरदहस्त असू दे. माझ्या प्रदेशाच्या सीमा वाढू देत. तू माझ्यासमीप राहा आणि कोणाकडूनही मला इजा पोहोंचू देऊ नकोस. म्हणजे मी सुखरुप राहीन.” देवानेही त्याला त्याने जे मागितले ते दिले.
”परमेश्वराचे स्तवन करा. त्याला हाक मारा. परमेश्वराने केलेली महान कृत्ये लोकांना सांगा.
”परमेश्वराकडे पाहा त्याचे सामर्थ्य बघा. मदतीसाठी त्याला शरण जा.
”लोक हो, परमेश्वराचे कृतज्ञतेने स्मरण करा, कारण तो चांगला आहे. त्याचे प्रेम चिरंतन आहे.
”ते रोज सकाळ-संध्याकाळ परमेश्वराचे आभार मानायला आणि त्याची स्तुती करायला उभे राहत.
”शलमोन परमेश्वराच्या वेदीसमोर उभा राहिला. तेथे जमलेल्या सर्व इस्राएल लोकांपुढे तो उभा होता. त्याने आपले बाहू पसरले. बाहेरच्या आवारात प्रत्येकी 7 1/2 फूट लांबी, रुंदी आणि उंची असलेला एक पितळी चौरंग शलमोनाने बसवला होता. त्यावर चढून तो समस्त इस्राएल लोकांसमोर गुडघे टेकून बसला आणि त्याने आकाशाकडे हात पसरले शलमोन म्हणाला,”हे इस्राएलच्या परमेश्वर देवा, स्वर्गात किंवा पृथ्वीवर तुझ्यासारखा दुसरा कोणीही देव नाही. तुझे जिवाभावाने अनुसरण करणाऱ्या आणि योग्य आचरण करणाऱ्या तुझ्या सेवकांना तुझे प्रेम आणि तुझी कृपा यांचे दिलेले वचन पाळणारा तू परमेश्वर आहेस.
”पण माझी एवढी प्रार्थना ऐक. मी करुणा भाकतो तिच्याकडे लक्ष दे. परमेश्वर देवा, माझी आर्त हाक ऐक. मी तुझा एक दास आहे. या मंदिराकडे अहोरात्र तुझी दृष्टी असो असे मी तुला कळकळीने विनवतो. तुझे नाव इथे राहील असे तू म्हणाला होतास. मी या मंदिराकडे तोंड करुन प्रार्थना करीन तेव्हा ती तू ऐक. तुझ्या इस्राएल लोकांनी तसेच मी केलेल्या प्रार्थना तू ऐक. या प्रार्थनास्थलाकडे तोंड करुन आम्ही प्रार्थना करु तेव्हा तिच्याकडे तू लक्ष दे. तुझ्या आकाशातील स्थानावरुन तुझे इथे लक्ष असू दे. आमच्या प्रार्थना ऐक आणि आम्हाला क्षमा कर.
”तुझे इस्राएल लोक तुझी करुणा भाकतील आणि प्रार्थना करतील. जो तो आपले क्लेश किंवा दु:ख ओळखून, या मंदिराच्या दिशेने बाहू उभारुन प्रार्थना करु लागेल. तेव्हा तू ते स्वार्गातून ऐक. तू स्वर्गात राहातोस. तू ऐकून त्यांना क्षमा कर. प्रत्येकाचा मनोदय तुला माहीत असल्यामुळे ज्याला जे योग्य असेल त्याला ते दे. मानवाचे मन फक्त तूच ओळखतोस. असे झाले म्हणजे तू आमच्या पूर्वजांना दिलेल्या या भूभागावर त्यांची वसती असेपर्यंत लोक तुझा धाक बाळगतील आणि तुझे ऐकतील.
”आता, हे परमेश्वरा, माझी तुला विनवणी आहे की तू तुझे कान आणि डोळे उघड. आम्ही इथे बसून जी प्रार्थना करणार आहोत ती लक्षपूर्वक ऐक.
”आणि अशावेळी लोकांनी नम्र होऊन माझा धावा करुन माझ्या दर्शनाची इच्छा बाळगली, दुराचाराचा त्याग केला तर मी स्वार्गातून त्यांच्या हाकेला ओ देईन. त्यांना त्यांच्या पापाची क्षम करीन आणि त्यांची भूमी संकटमुक्त करीन. आता माझी दृष्टी या ठिकाणी वळलेली आहे. इथे होणाऱ्या प्रार्थना ऐकायला माझे कान उत्सुक आहेत.
”रहबामने वाईट गोष्टी केल्या कारण परमेश्वराच्या आज्ञांचे पालन करण्याविषयी त्याने मनात निश्चय केला नव्हता.
”आसा आपल्या परमेश्वर देवाला हाक मारुन म्हणाला, “परमेश्वरा, या बलाढ्य सेनेपुढे दुर्बलांना तूच मदत करु शकतोस. तूच आमच्या मदतीला उभा राहा. आम्ही तुझ्यावर भरवंसा ठेवून आहोत. तुझे नाव घेऊनच आम्ही या विशाल सेनेला तोंड देणार आहोत. परमेश्वर देवा, तुझ्यावर कोणी विजय मिळवू नये.”
”तिथे त्यांनी जिवाभावाने परमेश्वर देवाची सेवा करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्यांच्या पूर्वजांचाही देव हाच होता.
”याजक व लेवी यांनी उठून लोकांना आशीर्वाद देण्याची परमेश्वराला प्रार्थना केली. परमेश्वराने त्यांचे ऐकले. त्यांची प्रार्थना स्वार्गातील आपल्या पवित्र स्थानी परमेश्वराला ऐकू गेली.
”यामुळे राजा हिज्कीया आणि आमोजचा मुलगा यशया संदेष्टा यांनी या प्रश्नावर स्वर्गाकडे तोंड करुन मोठ्याने प्रार्थना केली.
”तिथे अहवा नदी किनारी मी सर्वांनी उपवास करावा अशी घोषणा केली. देवापुढे नम्र व्हावे आणि आमची मुलंबाळे, साधनसंपत्ती यांच्यासह आमचा पुढचा प्रवास सुखरुप व्हावा हा आमचा उपवासामागचा होतू होता. प्रवासातल्या सुरक्षिततेसाठी राजाक़डे सैनिक आणि घोडेस्वार मागायचा मला संकोच वाटला. वाटचालीत शत्रूचा धोका होता. संरक्षण मागयचा संकोच वाटण्याचे कारण म्हणजे आम्ही राजा अर्तहशश्तला म्हणालो होतो, “जो देवावर विश्वास ठेवतो त्याची देव पाठराखण करतो. पण देवाकडे पाठ फिरवली तर देवाचा कोप होतो.” म्हणून आम्ही आमच्या प्रवासासाठी उपवास आणि देवाची प्रार्थना केली. परमेश्वरानेही आमचा धावा ऐकला.
”होमार्पणांची वेळ झाली तेव्हा मी उठलो; अंगावरची वस्त्रे आणि अंगरखा फाटलेला अशा स्थितीत मी गुडघे टेकून हात पसरुन देवापुढे बसलो. मी अतिशय लज्जित अशा अवस्थेत होतो. तेव्हा मी ही प्रार्थना केली:हे परमेश्वरा, तुझ्याकडे पाहायाची मला लाज वाटत आहे; मला लाज वाटते कारण आमच्या पापांची संख्या आमच्या मस्तकांच्या संख्येपेक्षा जास्त झाली आहे; आमचे अपराध वाढून स्वर्गापर्यंत पोचले आहेत.
”मग एज्रा मंदिराच्या समोरच्या भागातून उठून एल्याशीबचा मुलगा यहोहानान याच्या दालनात गेला. यहोहानाने एज्रा समोर अन्नपाण्याला स्पर्शही केला नाही. यरुशलेमहून परत आलेल्या इस्राएलींचा पापांनी तो व्यथित झाला होता.
”यरुशलेमच्या लोकांची आणि नगराच्या तटबंदीची ही हकीकत ऐकून मी अत्यंत उद्विग्न झालो. मी खाली बसलो व रडू लागलो. मला अतिशय दु:ख झाले. कित्येक दिवस मी उपवास केला आणि स्वर्गातील देवाची प्रार्थना केली. मी पुढीलप्रमाणे प्रार्थना केली.हे परमेश्वरा, स्वर्गातील देवा, तू मोठा सर्वशक्तीमान देव आहेस. तुझ्यावर प्रेम करणाऱ्या आणि तुझ्या आज्ञा पाळणाऱ्या लोकांशी केलेला प्रेमाचा करार पाळणारा तू परमेश्वर आहेस. तुझा सेवक अहोरात्र तुझी प्रार्थना करत आहे, ती तू कृपा करून डोळे आणि कान उघडे कर व ऐक. तुझ्या सेवकांच्या म्हणजेच इस्राएलींच्या वतीने मी प्रार्थना करत आहे. आम्ही इस्राएलींनी तुझ्याविरुध्द जी पापे केली त्यांची मी कबुली देत आहे. मी कबुल करतो की मी तुझ्याविरुध्द पाप केले तसेच माझ्यावडीलांच्या घराण्यातील लोकांनीही केले.
”एज्राने परमेश्वराची, थोर परमेश्वराची स्तुती केली तेव्हा सर्व लोकांनी आपले हात वर करून “आमेन! आमेन! आमेन!” असा उद्गार काढला. मग सर्वांनी खाली वाकून, मस्तक जमिनीपर्यंत लववून परमेश्वराला वंदन केले.
”त्याच महिन्याच्या चोविसाव्या दिवशी सर्व इस्राएल लोक उपवासासाठी एकत्र जमले. आपल्याला शोक झाला आहे हे सूचित करणारे कपडे त्यांनी घातले होते. तसेच आपली विमनस्कता दाखवण्यासाठी त्यांनी केसात राख घालून घेतली होती. मूळ इस्राएली लोक परकी लोकांमध्ये न मिसळता वेगळा गट करून उभे होते. इस्राएलींनी मंदिरात उभे राहून आपल्या तसेच आपल्या पूर्वजांच्या पापांची कबुली दिली.
”राजाचा हुकूम ज्या प्रांतात पोचला तिथे तिथे यहुद्यांमध्ये शोककळा पसरली आणि ते आक्रोश करु लागले. उपवास करून आणि मोठयाने ते आकांत करु लागले. डोक्यात राख घालून आणि शोकवस्त्रे घालून बहुतेक यहुदी राखेत पडून राहिले.
”“मर्दखय, शूशन मधील सर्व यहुद्यांना एकत्र घेऊन ये आणि माझ्यासाठी सर्वजण उपास करा. तीन दिवस आणि तीन रात्र काहीही खाऊ पिऊ नका. मी तुमच्यासारखाच उपास करीन, तसेच माझ्या दासीदेखील करतील. आपल्या उपवासानंतर मी राजाकडे जाईन. राजाने मला बोलावलेले नसताना त्याच्याकडे जाणे नियमाविरुध्द आहे हे मला माहीत आहे. पण तरी मी जाईन. मग मी मेले तर मेले.”
”ईयोबने जेव्हा हे ऐकले तेव्हा आपल्याला खुप दु:ख झाले आहे हे दाखविण्यासाठी त्याने आपले कपडे फाडले, डोक्यावरचे केस काढले व जमिनीवर पडून त्याने देवाची आराधना सुरु केली.
”पण ईयोब, मी जर तुझ्या जागी असतो तर देवाकडेच गेलो असतो. त्याला माझे गान्हाणे सांगितले असते. देव ज्या आश्र्चर्यकारक गोष्टी करतो त्या माणसाला समजत नाहीत. त्याच्या अद्भुत गोष्टींची सीमा नाही.
”परंतु ईयोब, आता तू त्याच्या कडे लक्ष दे आणि त्या सर्वशक्तिमान देवाची दयेसाठी आवर्जून प्रार्थना कर.
”“पण ईयोब फक्त देवाची सेवा करण्यासाठी तू तुझ्या मनाची तयारी केली पाहिजेस आणि तू तुझे हात त्याची उपासना करण्यासाठी त्याच्या दिशेने उचलले पाहिजेस.
”नंतर मला हाक मार. मी तुला ओ देईन किंवा मला बोलू दे आणि तू मला उत्तर दे.
”तू त्याची प्रार्थना करशील आणि तो तुझे ऐकेल आणि ज्या गोष्टी करण्याचे तू वचन दिले होतेस त्या गोष्टी तू करशील.
”“किंवा त्या वाईट माणसांनी देवाकडे मदत मागितली तरी देव त्यांना उत्तर देणार नाही. का? कारण ते लोक अतिशय गर्विष्ठ आहेत आपण फार मोठे आहोत. असे त्यांना अजूनही वाटते. देव त्यांच्या तुच्छ याचनेकडे लक्ष देणार नाही हे खरे आहे. सर्वशक्तिमान देव त्यांच्याकडे लक्ष देणार नाही.
”ईयोबाने त्याच्या मित्रांसाठी प्रार्थना केली आणि परमेश्वराने ईयोबाला पुन्हा यशस्वी केले. देवाने त्याला पूर्वी त्याच्याकडे होते त्यापेक्षा दुप्पट दिले.
”मी परमेश्वराची प्रार्थना करेन आणि तो मला त्याच्या पवित्र डोंगरावरून उत्तर देईल!
”माझ्या चांगल्या देवा, मी तुझी प्रार्थना करीन तेव्हा मला उत्तर दे माझी प्रार्थना ऐक आणि माझ्याशी दयाळू अंतकरणाने वाग. मला माझ्या संकटांपासून थोडी तरी मुक्ती दे.
”परमेश्वरा, माझे शब्द ऐक. मी जे सांगायचा प्रयत्न करत आहे ते समजून घे. माझ्या देवा! माझ्या राजा! माझी प्रार्थना ऐक. परमेश्वरा, मी रोज सकाळी तुला माझी भेट अर्पण करतो. मी तुइयाकडे मदतीच्या अपेक्षेने पाहातो आणि तू माझी प्रार्थना ऐकतोस.
”ज्या लोकांना तुझे नाव माहीत आहे ते तुझ्यावर विश्वास ठेवतात. परमेश्वरा, जर लोक तुझ्याकडे आले, तर त्यांना मदत केल्याशिवाय परत पाठवू नकोस.
”वाईट लोक देवाची प्रार्थना न करण्याइतके गर्विष्ठ आहेत ते त्यांच्या सर्व वाईट योजना आखतात आणि जगात देवच नसल्यासारखे वागतात.
”परमेश्वरा, न्यायासाठी, प्रामाणिकपणासाठी माझी प्रार्थना ऐक. माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे. माझी खरी प्रार्थना ऐक.
”देवा, मी जेव्हा जेव्हा तुला हाक मारली तेव्हा तेव्हा तू मला उतर दिलेस म्हणून आता तू माझे ऐक.
”सापळ्यात अडकल्यावर मी परमेश्वराचा धावा केला. होय, मी देवाला माझ्या मदतीसाठी बोलावले. देव त्याच्या मंदिरात होता. त्याने माझा आवाज ऐकला. त्याने माझी मदतीची हाक ऐकली.
”मला मार्ग दाखव आणि मला तुझे सत्य शिकव तू माझा देव आहेस, माझा तारणारा आहेस मी रोज तुझ्यावर विश्वास टाकतो.
”मला परमेश्वराजवळ फक्त एकाच गोष्टीची मागणी करायची आहे. मला हे मागायचे आहे, “मला आयुष्यभर परमेश्वराच्या मंदिरात बसू द्या म्हणजे मी परमेश्वराचे सौंदर्य बघेन आणि त्याच्या राजवाड्याला भेट देईनं.”
”परमेश्वरा, माझा आवाज ऐक मला उत्तर दे. माझ्याशी दयेने वाग. परमेश्वरा मला तुझ्याशी बोलायचे आहे. मला अगदी माझ्या ह्दयातून तुझ्याशी बोलायचे आहे. परमेश्वरा, मी तुझ्यासमोर तुझ्याशी बोलायला आलो आहे.
”परमेश्वराच्या मदतीची वाट बघ. सामर्थ्यवान आणि धीट हो व परमेश्वराच्या मदतीची वाट पहा.
”परमेश्वरा, तू माझा खडक आहेस. मी तुला मदतीसाठी बोलवीत आहे. माझ्या प्रार्थनेला तुझे कान बंद करु नकोस. तू जर माझ्या मदतीच्या हाकेला उत्तर दिले नाहीस तर मी थडग्यातल्या मेलेल्या माणसासारखा आहे असे लोकांना वाटेल. परमेश्वरा, मी माझे बाहू उभारुन तुझ्यापवित्र जागेकडे तोंड करुन प्रार्थना करतो. मी तुला साद घालीन त्यावेळी माझे ऐक माझ्यावर दया दाखव.
”परमेश्वरा, मी तुझ्यावर अवलंबून आहे, माझी निराशा करु नकोस मला वाचव व माझ्यावर दया कर. देवा, माझे ऐक त्वरीत येऊन मला वाचव माझा खडक हो. माझे सुरक्षित स्थळ हो. माझा किल्ला हो. माझे रक्षण कर.
”मी देवाकडे मदतीसाठी गेलो आणि त्याने माझे ऐकले. मला ज्या सर्व गोष्टींची भीती वाटत होती त्यापासून त्याने मला वाचवले. देवाकडे मदतीसाठी वळा तुमचा स्वीकार होईल लाज वाटून घेऊ नका. या गरीब माणसाने परमेश्वराकडे मदत मागितली आणि परमेश्वराने माझे ऐकले. त्याने माझी सर्व संकटांतून मुक्तता केली. परमेश्वराचा दूत त्याच्या भक्तांभोवती छावणी बांधतो. परमेश्वराचा दूत त्यांचे रक्षण करतो व त्यांना संकट मुक्त करतो. परमेश्वराचा अनुभव घ्या आणि तो किती चांगला आहे ते शिका जो परमेश्वरावर अवलंबून असतो तो खरोखरच सुखी होईल.
”परमेश्वर चांगल्या लोकांचे रक्षण करतो. तो त्यांची प्रार्थना ऐकतो. परंतु परमेश्वर वाईट कृत्ये करणाऱ्या लोकांच्या विरुध्द आहे. तो त्यांचा सर्वनाश करतो. परमेश्वराची प्रार्थना करा, तो तुमचे ऐकेल. तो तुम्हाला तुमच्या सर्व संकटांतून वाचवेल. काही लोकांवर खूप संकटे येतात आणि ते गर्व करायचे थांबवतात. परमेश्वर अशा लोकांच्या जवळ असतो. तो त्या विनम्र लोकांचे रक्षण करतो.
”परमेश्वरा, मोठ्या सभेत मी तुझी स्तुती करेन. मी सामर्थ्यवान लोकांबरोबर असेन तेव्हा तुझी स्तुती करेन.
”परमेश्वरावर विश्वास ठेव आणि त्याच्या मदतीची वाट पाहा दुष्ट लोक यशस्वी झाले तर वाईट वाटून घेऊ नको सदुष्ट लोक कुकर्म करण्याच्या योजना आखतील आणि त्यात यशस्वी होतील तेव्हा वाईट वाटून घेऊ नकोस.
”परमेश्वरा माझी प्रार्थना ऐक, मी तुझ्यासाठी जे शब्द आकांताने बोलतो ते ऐक माझे अश्रू बघ. या आयुष्यात तुझ्याबोरबर चालणारा मी केवळ एक प्रवासी आहे. माझ्या सर्व पूर्वजांप्रमाणे मी येथे केवळ थोड्याकाळासाठी राहाणार आहे.
”मी परमेश्वराला बोलावले आणि त्याने माझी हाक ऐकली. त्याने माझे ओरडणे ऐकले.
”परमेश्वरा, देवा तू खरोखरच आश्र्चर्यजनक गोष्टी केल्या आहेस तू आमच्यासाठी आश्चर्यकारक योजना आखल्या आहेस. परमेश्वरा, तुझ्यासारखा कुणीही नाही. तू केलेल्या गोष्टीबद्दल मी पुन्हा पुन्हा सांगत राहीन, मोजण्यासाठी अशा असंख्य गोष्टी आहेत.
”परमेश्वरा, जे लोक तुझ्या शोधात आहेत त्यांना सुखी कर त्या लोकांना नेहमी “परमेश्वराची स्तुती करा” असे म्हणू दे. त्या लोकांना तुझ्याकडून रक्षणकरुन घेणे आवडते. प्रभु, मी केवळ एक गरीब, असहाय माणूस आहे. मला मदत कर. मला वाचव. माझ्या देवा, खूप उशीर करु नकोस.
”दररोज व रात्रीही परमेश्वर त्याचे खरे प्रेम दाखवतो म्हणून माझ्याजवळ त्याच्यासाठी एक गीत आहे व एक प्रार्थना आहे.
”देव म्हणतो, “शांत राहा आणि मी देव आहे हे लक्षात घ्या. मी राष्ट्रांचा पराभव करतो व जगाला ताब्यात ठेवतो.” तो सर्वशक्तिमान परमेश्वर आपल्याबरोबर आहे. याकोबाचा देव ही आपली सुरक्षित जागा आहे.
”म्हणून तुमचे कृतज्ञता उपहार आणा आणि देवाबरोबर असण्यासाठी या तुम्ही सर्वशक्तिमान देवाला वचने दिली. तेव्हा आता कबूल केलेल्या वस्तू त्याला द्या. देव म्हणतो, “इस्राएलाच्या लोकांनो, तुम्ही संकटात असाल तेव्हा माझी प्रार्थना करा. मी तुम्हाला मदत करीन. आणि नंतर तुम्ही मला मान देऊ शकाल.”
”देवा, मी खरोखरच प्रामणिक व्हावे असे वाटत असेल तर शहाणपण माझ्या आत खोलवर ठेव.
”देवा, माझी प्रार्थना ऐक कृपा करुन माझी दयेची प्रार्थना टाळू नकोस.
”मी देवाला मदतीसाठी हाक मारीन आणि परमेश्वर माझे रक्षण करील. मी देवाशी सकाळी, दुपारी आणि संध्याकाळी बोलतो. मी देवाला माझ्या तक्रारी सांगतो आणि तो त्या नीट ऐकतो.
”माझे शत्रू गोड बोलण्यात पटाईत आहेत. ते शांतीविषयी बोलतात आणि प्रत्यक्षात मात्र युध्दाच्या योजना आखतात. त्यांचे शब्द लोण्यासारखे मऊ असतात परंतु ते सुरीसारखे कापतात.
”देवा, तू माझी शक्ती आहेस. मी तुझी वाट पाहात आहे देवा, तू माझी उंच पर्वातावरील सुरक्षित जागा आहेस. देव माझ्यावर प्रेम करतो. आणि तो मला जिंकण्यासाठी मदत करतो. तो मला माझ्या शत्रूंचा पराभव करण्यासाठी मदत करील.
”देवा, माझे प्रार्थना गीत ऐक. माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे. मी कुठेही असलो कितीही अशक्त असलो तरी मी तुला मदतीसाठी हाक मारीन. तू मला अगदी उंचावरच्या सुरक्षित जागी घेऊन जा.
”देवाने माझा उध्दार करावा म्हणून मी धीराने वाट पहात आहे. माझे तारण त्याच्याकडूनच येते. देव माझा किल्ला आहे. तो मला तारतो. देव माझी उंच डोंगरावरची सुरक्षित जागा आहे. खूप मोठे सैन्यदेखील माझा पराभव करु शकणार नाही.
”मी अगदी धीर धरुन देवाने मला वाचवण्याची वाट बघत आहे. देव माझी एकुलती एक आशा आहे. देव माझा किल्ला आहे. देव मला तारतो, देव माझी उंच डोंगरावरील सुरक्षित जागा आहे. माझा गौरव आणि माझा विजय देवाकडूनच येतो तो माझा भक्म किल्ला आहे तो माझी सुरक्षित जागा आहे. लोक हो! देवावर सदैव विश्वास ठेवा. तुम्ही देवाला तुमच्या सर्व समस्या सांगा. देव आपली सुरक्षित जागा आहे.
”देवा, तू माझा देव आहेस आणि तू मला खूप हवा आहेस. माझा आत्मा आणि माझे शरीर तुझ्यासाठी शुष्क, बरड आणि पाणी विरहित जमिनी प्रमाणे तहाननेले आहे.
”मी त्याची प्रार्थना केली, मी त्याची स्तुती केली. माझे मन शुध्द होते म्हणून माझ्या प्रभुने माझे ऐकले. देवाने माझे ऐकले. त्याने माझी प्रार्थना ऐकली. देवाची स्तुती करा देव माझ्यापासून दूर गेला नाही. त्याने माझी प्रार्थना ऐकली. देवाने मला त्याचे प्रेम दाखवले.
”मी मदतीसाठी याचना करुन थकलो आहे. माझा घसा दुखत आहे. मी थांबलो आणि डोळे दुखेपर्यंत तुझ्या मदतीची वाट पाहिली.
”गरीबांनो तुम्ही देवाची उपासना करण्यासाठी आलात. या गोष्टी कळल्याने तुम्हाला आनंद होईल.
”देवा, आम्ही तुझी स्तुती करतो. आम्ही तुझी स्तुती करतो. तू जवळ आहेस आणि लोक तू करत असलेल्या अद्भुत गोष्टींबद्दल सांगतात.
”मी देवाला मदतीसाठी जोरात हाक मारली, देवा मी तुझी प्रार्थना करतो. माझ्याकडे लक्ष दे. माझ्या प्रभु, मी संकटात असतो तेव्हा तुझ्याकडे येतो. मी रात्रभर तुझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला. माझ्या आत्म्याने शांत व्हायला नकार दिला.
”परमेश्वर देव काय म्हणाला ते मी ऐकले. तो म्हणाला की त्याच्या लोकांसाठी येथे शांती असेल, जर ते त्यांच्या मूर्ख जीवन पध्दतीकडे परत वळले नाहीत तर त्याच्या भक्तांना शांती लाभेल.
”परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक. दयेसाठी माझी प्रार्थना ऐक. परमेश्वरा, मी तुझी संकट काळात प्रार्थना करीत आहे. तू मला उत्तर देशील हे मला माहीत आहे.
”परमेश्वरा, देवा, तू माझा तारणारा आहेस. मी रात्रांदिवस तुझी प्रार्थना करीत आहे. कृपा करुन माझ्या प्रार्थनेकडे लक्ष दे. दयेखातर माझी प्रार्थना ऐक.
”परमेश्वरा, मी तुला मदत करण्याविषयी विचारत आहे. प्रत्येक दिवशी पहाटे मी तुझी प्रार्थना करतो.
”आमचे आयुष्य खरोखरच किती छोटे आहे ते आम्हाला शिकव म्हणजे आम्ही खरेखुरे शहाणे बनू शकू.
”तुम्ही लपण्यासाठी परात्पर देवाकडे जाऊ शकता. तुम्ही संरक्षणासाठी सर्वशक्तिमान देवाकडे जाऊ शकता.
”माझे भक्त मला मदतीसाठी हाक मारतात आणि मी त्यांना ओ देतो. ते संकटात असतील तेव्हा मी त्यांच्याजवळ असेन. मी त्यांची सुटका करीन आणि त्यांना मान देईन.
”परमेश्वराची स्तुती करणे चांगले असते. परात्पर देवा, तुझ्या नावाचे उपकारस्मरण करणे चांगले असते. तुझ्या प्रेमा बद्दल सकाळी गाणे आणि रात्री तुझ्या इमानीपणाबद्दल जयजयकार करणे चांगले असते.
”चला, आपण त्याची वाकून उपासना करु या. ज्या देवाने आपल्याला निर्माण केले त्याची स्तुती करु या. तो आपला देव आहे आणि आपण त्याची माणसे. आपण जर त्याचा आवाज ऐकला तर आपण त्याची मेढरे होऊ. देव म्हणतो, “तू मरिबात आणि मस्साच्या वाळवंटात जसा हटवादी होतास तसा होऊ नकोस.
”परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक आणि माझ्या मदतीसाठी मारलेल्या हाकेकडे लक्ष दे. परमेश्वरा, मी संकटात असताना माझ्याकडे पाठ फिरवू नकोस. माझ्याकडे लक्ष दे. मी मदतीसाठी ओरडेन तेव्हा मला लगेच ओ दे.
”देवाने जिवंत ठेवलेल्या लोकांच्या प्रार्थनेला तो उत्तर देईल. देव त्यांची प्रार्थना ऐकेल.
”परमेश्वराच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा. तुम्ही लोक परमेश्वराला शोधत आला, सुखी व्हा. शक्तीसाठी परमेश्वराकडे जा. मदतीसाठी नेहमी त्याच्याकडे जा.
”मी भुकेला असल्यामुळे माझ्या गुडघ्यातली शक्ती क्षीण झाली आहे. माझे वजन घटते आहे आणि मी बारीक होत आहे.
”परमेश्वर माझी प्रार्थना ऐकतो ते मला खूप आवडते. मी त्याला मदतीसाठी हाक मारतो आणि ती तो ऐकतो ते मला खूप आवडते. मी जवळ जवळ मेलो होतो. मृत्यूचे दोर माझ्या भोवती आवळले गेले होते. माझ्या भोवती थडगे आवळले जात होते. मी खूप घाबरलो होतो आणि चिंतित झालो होतो. नंतर मी परमेश्वराचे नाव घेतले. मी म्हणालो, “परमेश्वरा, मला वाचव.”
”मी तुला धन्यवाद म्हणून स्तुति अर्पण करीन. मी परमेश्वराचे नामस्मरण करीन.
”मी संकटात होतो म्हणून परमेश्वराला मदतीसाठी हाक मारली. परमेश्वराने मला उत्तर दिले आणि मला सोडवले.
”परमेश्वरा, माझ्या प्रार्थनेला उत्तर दिलेस म्हणून मी तुला धन्यवाद देतो. तू माझा उध्दार केलास म्हणून मी तुला धन्यवाद देतो.
”जे लोक परमेश्वराचा करार पाळतात ते सुखी आहेत. ते परमेश्वराच्या आज्ञा मानापासून पाळतात.
”मी मनापासून देवाची सेवा करायचा प्रयत्न करतो. देवा, तुझ्या आज्ञा पाळण्यासाठी मला मदत कर.
”मी अगदी मनापासून तुला बोलावतो परमेश्वरा, मला उत्तर दे मी तुझ्या आज्ञा पाळीन. परमेश्वरा, मी तुला बोलावतो माझा उध्दार करआणि मी तुझा करार पाळीन. तुझी प्रार्थना करण्यासाठी मी सकाळी लवकर उठतो. तू ज्या गोष्टी सांगतोस त्यावर मी विश्वास ठेवतो. तुझ्या वचनाचा अभ्यास करण्यासाठी रात्रभर मी जागा राहिलो. तुझ्या सगळ्या प्रेमासकट माझ्याकडे लक्ष दे परमेश्वरा, ज्या गोष्टी योग्य आहेत असे तू सांगतोस त्या कर आणि मला जगू दे.
”परमेश्वरा, मी खूप मोठ्या संकटात आहे म्हणून मी तुला मदतीसाठी हाक मारीत आहे. माझ्या प्रभु, माझ्याकडे लक्ष दे. माझ्या मदतीच्या हाकेला ओ दे.
”मी मदतीसाठी परमेश्वराची वाट पाहतो आहे. माझा आत्मा त्याची वाट बघत आहे. परमेश्वर जे सांगतो त्यावर माझा विश्वास आहे. मी माझ्या प्रभुची वाट बघत आहे. मी सकाळ होण्याची खूप वाट पाहात असलेल्या रक्षकांसारखा आहे.
”परमेश्वराची स्तुती करा कारण तो चांगला आहे. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
”देवांच्या देवाची स्तुती करा. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
”परमेश्वरांच्या परमेश्वराची स्तुती करा. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
”परमेश्वरा, मी तुला मदतीसाठी हाक मारली. मी तुझी प्रार्थना करतो तेव्हा तू लक्ष दे त्वरा कर आणि मला मदत कर. परमेश्वरा, माझ्या प्रार्थनेचा स्वीकार कर. ती जळणाऱ्या धूपाप्रमाणे असू दे. ती संध्याकाळच्या अर्पणा प्रमाणे असू दे.
”मी परमेश्वराला मदतीसाठी हाक मारीन. मी परमेश्वराची प्रार्थना करीन. मी परमेश्वराला माझ्या समस्यांबद्दल सांगेन. मी परमेश्वराला माझ्या संकटांबद्दल सांगेन.
”परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक, माझ्या पार्थनेकडे लक्ष दे आणि नंतर माझ्या प्रार्थनेला उत्तर दे. तू खरोखरच चांगला आणि निष्ठावान आहेस हे मला दाखव.
”परमेश्वरा, सर्व प्राणीमात्र अन्नासाठी तुझ्याकडे बघतात. आणि तू त्यांना योग्य वेळी त्यांचे अन्न देतोस. परमेश्वरा, तू तुझे हात उघडतोस आणि तू प्रत्येक प्राणीमात्राला जे लागेल ते सर्व देतोस. परमेश्वर जे काही करतो ते सर्व चांगले असते. तो जे करतो ते सर्व तो किती चांगला आहे, ते दाखवते. जे कोणी परमेश्वराला मदतीसाठी बोलावतात, त्या सर्वांच्या तो खूप जवळ असतो. जो त्याची अगदी मनापासून प्रार्थना करतो, त्याच्या अगदी जवळ तो असतो. भक्तांना जे हवे असते ते परमेश्वर करतो. परमेश्वर त्याच्या भक्तांचे ऐकतो. तो त्यांच्या प्रार्थमेला उत्तर देतो आणि त्यांना वाचवतो.
”“या सर्व गोष्टी घडतील तेव्हा तुम्ही माझी मदत मागाल. पण मी तुम्हाला मदत करणार नाही. तुम्ही मला शोधाल पण मी तुम्हाला सापडणार नाही. मी मदत करणार नाही कारण तुम्हाला माझे ज्ञान नको होते. तुम्ही परमेश्वराची भीती बाळगायला आणि त्याला मान द्यायला नकार दिला. तुम्ही माझा सल्ला ऐकायला नकार दिलात. मी तुम्हाला योग्य मार्ग दाखवला तेव्हा तुम्ही माझे ऐकले नाही.
”मी (ज्ञान), माझ्यावर जे प्रेम करतात त्यांच्यावर प्रेम करते. आणि जे लोक मला शोधायचा खूप प्रयत्न करतात त्यांना मी हटकून सापडते.
”जर एखाद्याने देवाच्या शिकवणुकीकडे लक्ष द्यायला नकार दिला तर देव त्याची प्रार्थना ऐकायला नकार देईल.
”देवाला वचन देताना तुम्ही काळजी घ्या. देवाशी बोलताना काळजी घ्या. भावनाशील होऊन लगेच बोलायला सुरुवात करू नका. देव स्वर्गात असतो आणि तुम्ही पुथ्वीवर. म्हणून देवाला फक्त काही मोजक्या गोष्टीच सांगायची आवश्यकता असते. ही म्हण खरी आहे:
”तुमच्या मासिक सभा व मेळावे यांची मला मनापासून घृणा वाटते. ह्या सभांचे मला ओझे झाले आहे. मी ह्याला कंटाळलो आहे. “प्रार्थना करण्यासाठी उचललेल्या तुमच्या हाताकडे मी लक्ष देणार नाही. तुम्ही कितीही प्रार्थना केली तरी ऐकणार नाही. का? कारण तुमचे हातरक्ताने माखले आहेत. “शुचिर्भूत व्हा. स्वच्छ व्हा. तुमची दुष्कृत्ये थांबवा. मला वाईट गोष्टी बघायच्या नाहीत. चुकीचे वागू नका.
”तो करार असा:परमेश्वराने आपल्याला मदत करावी म्हणून मी वाट पाहीन. याकोबच्या वंशजांची परमेश्वराला लाज वाटते. तो त्यांच्याकडे पाहण्याचे नाकारतो. पण मी परमेश्वराची प्रतीक्षा करीन. तो आम्हाला वाचवील.
”प्रत्येक रात्रीबरोबर तुझ्याशी एकरूप होण्याची आमची इच्छा आहे, आणि प्रत्येक पहाटेबरोबर माझ्यातील आत्मा तुझ्याशी समरस होऊ इच्छितो. जेव्हा तू न्याय देशील तेव्हा लोकांना जगण्याचा योग्य मार्ग सापडेल.
”यरूशलेमच्या सियोन डोंगरावर परमेश्वराची माणसे राहतील. तुमचा शोक थांबेल तुमचे रडणे परमेश्वर ऐकेल व तुमचे सांत्वन करील. परमेश्वर तुमचे म्हणणे ऐकेल आणि तुम्हाला मदत करील.
”पण परमेश्वरावर विश्वास ठेवणारे, ज्याप्रमाणे गरूड पंख पसरून वर उडतात, त्याप्रमाणे पुन्हा सामर्थ्यशाली होतात. ही माणसे न दमता धावतात व न थकता चालतात.
”म्हणून फार उशीर होण्याआधी परमेश्वराला शोधा. तो जवळ असतानाच त्याला बोलवा.
”परमेश्वर म्हणतो, “मी त्या लोकांना माझ्या पवित्र डोंगरावर आणीन. माझ्या प्रार्थनाघरात मी त्यांना सुखी करीन. त्यांनी मला अर्पण करण्यासाठी आणलेले होमबली आणि मला वाहण्यासाठी आणलेल्या वस्तू मला आवडतील. का? कारण माझे मंदिर सर्व राष्ट्रांचे प्रार्थनाघर होईल.”
”त्या विशेष दिवसांत उपास करून आपल्या शरीरांना लोकांनी क्लेश दिलेले पाहण्याची माझी इच्छा आहे असे तुम्हाला वाटते का? मला लोकांना दु:खी असलेले पाहावेसे वाटते असे तुम्हाला वाटते का? लोकांनी वाळलेल्या झाडांप्रमाणे माना झुकवाव्या व शोकप्रदर्शक कपडे घालावे अशी माझी इच्छा आहे; असे तुम्हाला वाटते का? लोकांनी राखेत बसून त्यांचे दु:ख मला दाखवावे अशी माझी इच्छा आहे, असे तुम्हाला वाटते का? विशेष दिवसांत उपास करून तुम्ही हे सर्व करता, परमेश्वराला हेच पाहिजे असे तुम्हाला वाटते का? “मला कोणत्या प्रकारचा दिवस अभिप्रेत आहे ते मी तुम्हाला सांगीन. तो दिवस लोकांच्या मुक्ततेचा असावा, त्या दिवशी लोकांची ओझी तुम्ही हलकी करावी, अडचणीत असलेल्या लोकांना त्यातून सोडवावे, त्यांच्या खांद्यावरची ओझी तुम्ही उतरवावी.
”तुमच्या पापांनी देवाचे तोंड लपवले आहे. त्यामुळे तो तुमचे बोलणे ऐकत नाही.
”परमेश्वर म्हणतो, “माझ्याकडे सल्ला मागण्याकरिता न आलेल्या लोकांनाही मी मदत केली. जे मला शोधत नव्हते, त्यांनाही मी सापडलो. माझे नाव धारण न करणाऱ्या राष्ट्रबरोबर मी बोललो. मी म्हणालो, ‘मी येथे आहे! मी येथे आहे!’
”त्यांनी मागण्या आधीच त्यांना काय पाहिजे ते मला समजेल. आणि त्यांचे मागणे पुरे होण्याआधीच मी त्यांना मदत करीन.
”म्हणू परमेश्वर म्हणतो, “मी यहूदाच्या लोकांना कसल्यातरी भयंकर संकटात टाकीन. त्यातून त्यांना त्यांची सुटका करुन घेता येणार नाही. त्यांना दु:ख होईल आणि मदतीसाठी ते माझा धावा करतील. पण मी त्यांचे ऐकणार नाही. यहूदातील व यरुशलेममधील लोक त्या मूर्तीकडे जातील. त्यांची प्रार्थना करुन मदत मागतील ते त्या मूर्तीपुढे धूप जाळतात. पण त्या भयंकर संकटकाळी लोकांना मदत करणे त्या मूर्तीना शक्य होणार नाही.
”तुमच्याविषयीच्या योजना मला माहीत असल्याने मी असे म्हणतो.” हा परमेश्वराचा संदेश आहे “तुमच्यासाठी मी चांगल्या योजना आखल्या आहेत. तुम्हाला दु:खविण्याचा माझा बेत नाही. तुम्हाला आशा आणि उज्वल भविष्य देण्याचे मी योजले आहे. मग तुम्ही माझा धावा कराल. माझ्याकडे याल. माझी प्रार्थना कराल. मग मी तुमच्या हाकेला ओ देईन. तुम्ही मला शोधाल आणि तुम्ही जेव्हा मनापासून मला शोधाल, तेव्हा मी तुम्हाला सापडेन. मी स्वत:ला तुमच्याकडून सापडवून घेईल.” हा परमेश्वराचा संदेश आहे “मी तुमची कैदेतून सुटका करीन. मी तुम्हाला ही जागा सोडायला लावली आता मी तुम्हाला ज्या ज्या राष्ट्रांत आणि प्रदेशात पाठविले होते तेथून गोळा करीन.” हा परमेश्वराचा संदेश आहे. “आणि जेथून तुम्हाला मी कैदी म्हणून पकडून दूर नेण्यास भाग पाडले होते त्या जागी परत आणीन.”
”“यहूदा, माझा धावा कर. मी ओ देईन. मी तुला महत्वाची रहस्ये सांगीन. ह्या गोष्टी तू पूर्वी कधीच ऐकल्या नसशील.
”म्हणून तू परमेश्वराच्या मंदिरात जावेस असे मला वाटते. उपवासाच्या दिवशी तेथे जा आणि लोकांना पट वाचून दाखव. मला आलेले परमेश्वराचे संदेश मी तुला सांगितले व ते तू लिहून घेतलेस. ते तू सर्व लोकांना वाचून दाखव. यहूदाच्या शहरांतून यरुशलेममध्ये आलेल्या सर्व लोकांना तू ते संदेश वाचून दाखव. कदाचित् ते लोक देवाकडे मदतीसाठी धावा करतील. कदाचित् प्रत्येकजण दुष्कर्मे करण्याचे सोडून देईल. परमेश्वर त्या लोकांवर फार रागावल्याचे परमेश्वराने जाहीर केलेच आहे!”
”परमेश्वर म्हणतो, “त्या वेळी इस्राएलचे व यहूदाचे लोक एकत्र येतील. ते एकत्र येऊन रडतील, आणि एकत्रितपणेच त्यांच्या परमेश्वर देवाचा शोध घेतील. ते सियोनची वाट विचारतील, व ते त्या दिशेने चालायला सुरवात करतील. लोक म्हणतील, ‘चला, आपण स्वत: परमेश्वराला जाऊन मिळू या, अखंड राहणारा एक करार करु या. आपण कधीही विसरणार नाही असा करार करु या.’
”परमेश्वराची वाट पाहणाऱ्यांवर व त्याला शोधणाऱ्यांवर तो कृपा करतो. परमेश्वराने आपले रक्षण करावे म्हणून मुकाट्याने वाट पाहणे केव्हाही चांगले.
”स्वर्गातील परमेश्वराकडे आपण आपले हृदय व हात उंचावू या.
”देव मला म्हणाला, “मानवपुत्रा, ह्या भयंकर गोष्टी बघतो आहेस ना? माझ्याबरोबर ये म्हणजे तुला ह्यापेक्षा वाईट गोष्टी दिसतील.” मग त्याने मला परमेश्वराच्या मंदिरातील आतल्या अंगणात नेले. तेथे पंचवीसजण नतमस्तक होऊन पूजा करीत होते. ते द्वारमंडप व वेदी यांच्यामध्ये होते. पण त्यांची तोंडे चुकीच्या दिशेला होती. पवित्रस्थळाकडे त्यांच्या पाठी होत्या. ते नतमस्तक होऊन सूर्याची पूजा करीत होते. मग देव म्हणाला, “मानवपुत्रा, हे पाहतो आहेस ना? यहुदाच्या लोकांना माझे मंदिर अशी भयंकर कृत्ये करण्याएवढे क्षुद्र वाटते. हा देश हिंसेने भरला आहे. ते मला संतापविणारी कृत्ये सतत करीत आहेत. पाहा! खोट्या देवाप्रमाणेच चंद्राला मान देण्यासाठी नाकांत नथनी घालीत आहेत. मी माझा राग त्यांच्यापाशी प्रकट करीन. मी त्यांना अजिबात दया दाखविणार नाही. मला त्यांच्याबद्दल वाईट वाटणार नाही. ते मला हाका मारतील पण मी त्यांचे मुळीच ऐकणार नाही.”
”तो काळ आणि ऋ तू बदलतो. आणि राजेही बदलतो. तोच राजांना सत्ता देतो. आणि तोच त्यांची सत्ता काढून घेतो. लोकांनी शहाणे व्हावे म्हणून तो त्यांना शहाणपण देतो, त्यांनी ज्ञानी व्हावे म्हणून तो त्यांना सर्व गोष्टी शिकू देतो. समजण्यास अतिशय कठीण असलेली, गुप्त रहस्ये त्याला माहीत असतात. प्रकाश त्याच्याबरोबर असल्यामुळे, अंधारात आणि गुप्त जागी काय आहे ते त्याला कळते. माझ्या पूर्वजांच्या देवा, मी कृतज्ञ आहे, मी तुझी स्तुती करतो. तू मला ज्ञान व शक्ती दिलीस. मी विचारलेल्या गोष्टी सांगितल्यास. तूच मला राजाच्या स्वप्नाबद्दल सांगितलेस.”
”एक ठराव करण्याबाबत पर्यवेक्षक मुलकी अधिकारी, प्रांताधिकारी,सल्लागार व राज्यपाल यांचे एकमत झाले आहे. आमच्या मते राजा तू असा हुकूम काढावास की तुझ्याशिवाय, इतर दैवतांची वा माणसाची प्रार्थना जो कोणी पुढील 30 दिवसांत करील त्याला सिंहाच्या गुहेत (पिंजऱ्यात) टाकण्यात येईल. सर्वांनी हा कायदा पाळलाच पाहिजे. तेव्हा राजा आताच्या आता हुकूम लिहून त्याच्यावर शिक्कामोर्तब कर. म्हणजे तो कोणीही बदलू शकणार नाही का? कारण मेदी का पारसी यांचे कायदे रद्द होऊ शकत नाहीत किवा बदलूही शकत नाहीत.” मग दारयावेश राजाने असा लेखी कायदा करून त्यावर सही केली.
”दानीएल दररोज तीन वेळा देवाची प्रार्थना करीत असे. दिवसातून तीन वेळा गुडघे टेकून तो देवाची प्रार्थना करी व स्तुतिस्तोत्र गाईर् नव्या कायद्याविषयी ऐकताच, दानीएल आपल्या घरी गेला. त्याने छतावरच्या त्याच्या खोलीची यरुशलेमच्या बाजूची खिडकी उघडली आणि नेहमीप्रमाणे गुडघे टेकून प्रार्थना केली. मग ते सगळे लोक एकत्र जमले व त्यांनी दानीएलला देवाची प्रार्थना करताना आणि करूणा भाकताना पकडले. मग ते राजाकडे गेले. राजाशी त्याने केलेल्या कायद्याविषयी ते बोलले. ते म्हणाले दारयावेश राजा पुढील 30 दिवसात,तुझ्याशिवाय, देवताची वा माणसाची जो कोणी प्रार्थना करील, त्याला सिंहाच्या गुहेत (पिजंऱ्यात) टाकण्यात येईल, असा लेखी कायदा करून त्यावर तू सही केलीस हे खरे की नाही?राजा म्हणाला “हो! मी त्यावर सही केली आणि मेदी व पारसी यांचे कायदे रद्द होऊ शकत नाहीत वा त्यात बदल होऊ शकत नाही.” मग ते लोक राजाला म्हणाले,”दानीएल तुझ्याकडे दुर्लक्ष करीत आहे राजा! तो यहूदाच्या कैद्यांपैकी एक आहे, तो तु केलेल्या कायद्याकडे लक्ष देत नाही अजूनही दिवसातून तीन वेळा तो त्याच्या देवाची प्रार्थना करतो.”
”मग मी देव माझा प्रभू,याची प्रार्थना केली व कृपेची याचना केली. मी उपवास केला व शोकप्रदर्शक कपडे घातले. मी डोक्यात धूळ टाकून घेतली. मी परमेशवराची, माझ्या देवाची, प्रार्थना केली मी त्याच्याजवळ माझ्या पापांचा पाढा वाचला मी म्हणालो परमेशवरा तू महान आणि भीतिदायक देव आहेस. तुझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांवर दया व प्रेम करून तू तुझा करार पाळतोस तुझ्या आज्ञा पाळणाऱ्या लोकांबरोबरही तू कराराचे पालन करतोस. पण परमेश्वरा आम्ही पाप केले,आम्ही चुकीचे वागलो आम्ही दुष्कृत्ये केली. आम्ही तुझ्याकडे पाठ फिरविली, तुझ्या आज्ञा आणि न्याय निर्णय यांच्यापासून आम्ही दूर गेलो.
”आता परमेश्वरा, माझी प्रार्थना ऐक.मी तुझा दास आहे, माझी मदतीसाठी केलेली प्रार्थना ऐक, तुझ्या पवित्र स्थानाचे भले कर. तुझे पवित्र स्थान ओसाड पडले आहे. पण प्रभु तुझ्या चांगल्यासाठी ह्या चांगल्या गोष्टी कर. माझ्या देवा, माझा धावा, ऐक. डोळे उघडून आमच्यावर आलेली भयानक संकटे पाहा. तुझ्या नावाने प्रसिध्द असलेल्या नगरीची काय अवस्था झाली आहे ती पाहा.”आम्ही चांगले आहोत” असे मी म्हणत नाही. त्याकरिता मी ह्या गोष्टी मागत नाही, तर तू दयाळू आहेस हे मला ठाऊक आहे म्हणून मी तुझ्याकडे ह्या गोष्टी मागत आहे. परमेशवरा, माझे ऐक आम्हाला क्षमा कर. परमेश्वरा, आमच्याकडे लक्ष दे आणि आमच्यासाठी काहीतरी कर.आता वाट पाहू नकोस! आताच काहीतरी कर. तुझ्या चांगल्यासाठी काहीतरी कर. परमेश्वरा तुझ्या नावाने प्रसिध्द असलेल्या नगरीसाठी आणि तुझ्या लोकांसाठी काहीतरी आताच कर!”
”मी देवाजवळ ही प्रार्थना करीत होतो, मी त्याला माझ्या आणि इस्राएलच्या लोकांच्या पापांबद्दल सांगत होतो, मी परमेश्वराच्या पवित्र पर्वतासाठी प्रार्थना करीत होतो. तेवढ्यात गाब्रिएल माझ्याकडे आला दृष्टान्तात मी ज्याला पाहिले होते तोच हा गाब्रिएल. तो घाईघाईने उडत माझ्याकडे आला. संध्याकाळच्या अर्पणाच्या वेळेला तो आला. मला जाणून घ्यावयाच्या होत्या त्या गोष्टी समजावून घेण्यास गाब्रिएलने मला मदत केली. तो म्हणाला,”दानीएला, मी तुला ज्ञान देण्यासाठी व समजावून सांगण्यासाठी आलो आहे. तू प्रार्थनेला सुरवात करता क्षणीच, आज्ञा मिळाली व ती तुला सांगायला मी आलो. देव तुझ्यावर खूप प्रेम करतो तूला ही आज्ञा व दुष्टान्त समजेल.
”दानीएल म्हणतो,”त्या वेळी मी, दानीएल, तीन आठवडे, खूप दुःखी होतो. त्या तीन आठवड्यांमध्ये मी आवडते जेवण केले नाही मांस अजिबात खाल्ले नाही, मी मद्य प्यायलो नाही, स्वत:ला तेल लावले नाही तीन आठवडे मी असे केले.
”मग मला एका हाताचा स्पर्श जाणवला. तो स्पर्श होताच मी हात गुडघे ह्यावर भार टाकून ओणवा झालो मी इतका घाबरलो होतो की थरथर कापत होतो. दृष्टान्तातील माणस मला म्हणाला ‘दानीएला, देव तुझ्यावर खूप प्रेम करतो मी तुझ्याशी बोलेन त्यावर काळजीपूर्वक विचार कर. उभा राहा मला तुझ्याकडेच पाठविले आहे. तो असे म्हणताच मी उभा राहिलो भीतीमुळे अजूनही मी थरथर कापत होतो. मग दृष्टान्तातील माणस पुन्हा बोलू लागला तो म्हणाला, ‘दानीएला, घाबरू नकोस ज्या दिवसापासून तू ज्ञान मिळविण्याचे व देवापुढे नम्र होण्याचे ठरविलेस, त्या दिवसापासून तो तुझी प्रार्थना ऐकत आहे. तू प्रार्थना करीत असल्यामुळेच मी तुझ्याकडे आलो. पण पारसचा राजपुत्र (देवदूत) 21 दिवस माझ्याशी लढत होता व मला त्रास देत होता. पण महत्वाच्या राजपुत्रांपैकी (देवदूतांपैकी) एक मिखाएल माझ्या मदतीला आला. कारण मी तेथे अडकुन पडलो होतो भविष्यात तुझ्या लोकांच्या बाबतीत काय घडणार आहे, हे तुला समजावून सांगायला मी येथे आलो आहे. दानीएला, हा दृष्टान्त भविष्यकाळासंबंधी आहे.’ तो माणूस माझ्याशी बोलत असताना, मी खाली वाकून जमिनीवर डोके टेकविले. मी बोलू शकत नव्हतो.
”लोक त्यांचा अपराध कबूल करेपर्यंत आणि माझा शोध घेईपर्यंत मी माझ्या जागी परत जाईन. हो! त्यांच्या अडचणीच्या वेळी ते माझी कसून शोध करतील.”
”‘उपवासाची एक विशिष्ट वेळ असेल’, असे लोकांना सांगा. खास सभेसाठी लोकांना एकत्र बोलवा. देशात राहणाऱ्या लोकांना व नेत्यांना एकत्र गोळा करा. त्यांना प्रभूच्या, तुमच्या परमेश्वराच्या मंदिरात आणा, व परमेश्वराची प्रार्थना करा.
”परमेश्वराचा संदेश पुढीलप्रमाणे आहे: “मनापासून माझ्याकडे परत या. तुम्ही दुष्कृत्ये केलीत. रडा, शोक करा आणि उपवास करा. तुमचे कपडे फाडू नका, तर ह्रदये फाडा”परमेश्वराकडे, तुमच्या परमेश्वराकडे परत या. तो कृपाळू व दयाळू आहे. तो शीघ्रकोपी नाही. तो खूप प्रेमळ आहे. त्याने योजलेली कडक शिक्षा कदाचित् तो बदलेलही.
”आणि योना ने परमेश्वर जो आपला देव त्याची प्रार्थना मास्याच्या पोटात केली आणि म्हटले म्या आपल्या संकटामुळे परमेश्वराकडे हाक मारली, तेव्हां त्याने मला उत्तर दिले;म्या मृत्लोकाच्या पोटातून आरोळी मारिली,तेव्हा तू माझा शब्द ऐकिला.
”तेव्हा माझा जीव माज्या ठाई मुर्चीत झला;तेव्हा मी परमेश्वराला स्मरले आणि माझी विनंती तुझ्या पवित्र देवळात पोहंचली.
”तर नीनवेतल्या मनुष्यांनी देवाला विश्वसिले, आणि उपासाची सूचना गाजविली, आणि मोठ्यापासून लहानपर्यंत गोनताट नेशिले. कारण कि नीनवेच्या राज्याकडे वर्तमान पोहोंचले होते,तेव्हा त्याने सिहांसानावरून उठून आपला झगा आपल्या अंगातून काढून ठेविला.मग तो गोणताट नेसून राखेवर बसला. आणि राजाने आणि त्याच्या प्रधानाच्या ठरावाने नीनवेत गाजवून सांगितले, कि मनुष्यांनी अथवा पशूंनी,गुरांनी,अथवा मेंढरांनी काही चाखू नये. परंतु मनुष्य आणि पशु गोणताट नेसोत; आणि देवाकडे मनापासून हाक मारोत आणि प्रत्येक कुमार्गापासून आणि जो बलात्कार त्यांच्या मुठी असेल त्या पासून फिरोत. आम्ही नाश पावू नये म्हणून देव वळेल,अनुतापेल,आणि आपल्या संतप्त क्रोधापासून फिरेल कि नाही?हे कोण जाणे? तर ते आपल्या कुमार्गापासून फिरेले,अशी त्यांची कर्मे देवाने पहिली आणि ज्या संकटाविषयी देव बोलला होता,कि मी त्यास नाश करीन,त्याविषयी तो अनुतापला आहे,आणि त्याने ने केले नाही.
”आता, तुम्ही कदाचित परमेश्वराची प्रार्थना कराल. पण तो तुम्हाला ओ देणार नाही. नाही, परमेश्वर तुमच्यापासून तोंड लपवेल. का? कारण तुम्ही दुष्कृत्ये करता.”
”म्हणून मी मदतीसाठी परमेश्वराकडे पाहतो. परमेश्वराने माझे रक्षण करावे म्हणून मी वाट पाहतो. माझा परमेश्वर माझे ऐकेल.
”सर्व दीन लोकांनो, परमेश्वराला शरण या! त्याचे विधिनियम पाळा. सत्कृत्य करायला शिका. नम्र होण्यास शिका. मग कदचित् परमेश्वर जेव्हा क्रोध प्रकट करील, तेव्हा तुम्ही सुरक्षित राहाल.
”“याजकांना आणि या देशातील इतर लोकांना सांग की तुम्ही 70 वर्षे प्रत्येक वर्षांच्या पाचव्या आणि सातव्या महिन्यात उपवास केलात व शोक प्रकट केलात. पण हा उपवास खरोखरीच माझ्यासाठी होता का? नाही!
”निरनिराळ्या गावातील लोक एकमेकांना भेटतील. ते म्हणतील, ‘आम्ही सर्व शक्तिमान परमेश्वराची उपासना करण्यास जात आहोत.’ आणि इतरलोक म्हणतील, ‘आम्हालासुध्दा यावेसे वाटते.”‘ पुष्कळ लोक आणि बलिष्ठ राष्ट्रे, सर्व शक्तिमान परमेश्वराच्या शोधात आणि त्याची उपासना करण्यासाठी यरुशलेमला येतील.
”मग वाचलेल्यांची मी परीक्षा घेईन. मी त्यांना खूप त्रास देईल. चांदीची शुध्दता सिध्द करण्यासठी तिला आगीत टाकले जाते. त्या आगीप्रमाणे संकटे येतील. सोन्याची पारख करतात तसा मी त्यांना पारखीन. मग ते माझा धावा करतील आणि मी त्यांना प्रतिसाद देईन. मी म्हणेण, ‘तुम्ही माझे लोक आहात.’ आणि ते म्हणतील, ‘परमेश्वर आमचा देव आहे.”‘
”चाळीस दिवस आणि चाळीस रात्री उपवास केल्यानंतर येशूला भूक लागली.
”मी तर तुम्हास सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा.
”जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा ढोंग्यांसारखे होऊ नका कारण आपण लोकांस दिसावे म्हणून ते सभास्थानांमध्ये व रस्त्याच्या कोपऱ्यांवर उभे राहून प्रार्थना करणे त्यांना आवडते. मी तुम्हास खरे सांगतो की, त्यांना आपले प्रतिफळ प्राप्त झाले आहे. पण तू जेव्हा प्रार्थना करतो तेव्हा आतल्या खोलीत जावून दरवाजा लावून घे व जो तुझा पिता गुप्तवासी आहे त्याची प्रार्थना कर. मग तुझा स्वर्गीय पिता जो गुप्तदर्शी आहे तो तुला प्रतिफळ देईल. आणि जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा परराष्ट्रीय लोकांसारखी निरर्थक बडबड करू नका कारण आपण फार बोलल्याने आपले म्हणणे ऐकले जाईल असे त्यांना वाटते. तर तुम्ही त्यांच्यासारखे असू नका कारण तुम्हास कशाची गरज आहे हे तुमच्या पित्याला तुम्ही त्याच्याकडे मागण्यापूर्वीच ठाऊक आहे.
”म्हणून तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुम्ही अशाप्रकारे प्रार्थना करावीः हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे. जशी आम्ही आमच्या ऋण्यांस त्यांची ऋणे सोडली आहेत, तशीच तू आमची ऋणे आम्हांस सोड. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास त्या दुष्टापासून सोडव. (कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरवही सर्वकाळ तुझीच आहेत.)
”जेव्हा तुम्ही उपवास करता तेव्हा तुम्ही ढोंगी लोकांसारखे उदास चेहऱ्याचे राहू नका कारण आपण उपवास करीत आहोत हे लोकांस दिसावे म्हणून ते आपली मुखे उदास करतात. मी तुम्हास खरे सांगतो त्यांना त्यांचे प्रतिफळ प्राप्त झाले आहे. तू जेव्हा उपवास करतो तेव्हा आपल्या डोक्याला तू तेल लाव आणि आपले तोंड धुवा. यासाठी की, तू उपवास करता हे लोकांस दिसू नये तर तुमच्या गुप्त पित्याला दिसावे. मग तुमचा गुप्त पिता तुम्हास उघडपणे प्रतिफळ देईल.
”‘आम्ही काय खावे’ किंवा ‘काय प्यावे’, अथवा ‘आम्ही काय पांघरावे’ असे म्हणून काळजीत करु नका. कारण या सर्व गोष्टी मिळवण्याची धडपड परराष्ट्रीय करत असतात, कारण तुमच्या स्वर्गातील पित्याला तुम्हास या गोष्टींची गरज आहे हे ठाऊक आहे. तर पहिल्याने तुम्ही देवाचे राज्य व त्याचे नीतिमत्त्व मिळविण्याचा प्रयत्न करा म्हणजे त्याबरोबर या सर्व गोष्टीही तुम्हास मिळतील.
”मागा म्हणजे तुम्हास देण्यात येईल. शोधा म्हणजे तुम्हास सापडेल, ठोका म्हणजे तुमच्यासाठी उघडले जाईल. कारण प्रत्येकजण जो मागतो त्यास मिळते, जो शोधतो त्यास सापडते आणि जो ठोठावतो, त्याच्यासाठी दरवाजा उघडले जाते. तुमच्यामध्ये कोण मनुष्य असा आहे, जो आपल्या मुलाने भाकर मागितली तर त्यास दगड देईल? किंवा त्याने मासा मागितला असता, त्याऐवजी त्यास साप देईल? वाईट असूनही जर तुम्हास आपल्या मुलांना चांगल्या गोष्टी देण्याचे कळते तर तुमच्या स्वर्गातील पित्याकडे जे मागतात, त्यांच्या गरजा तो किती चांगल्या प्रकारे भागवील?
”मग योहानाचे शिष्य त्याच्याकडे आले आणि त्यांनी त्यास विचारले, “आम्ही व परूशी पुष्कळ उपवास करतो. पण तुझे शिष्य उपवास करीत नाहीत. ते का?” येशूने त्यांना उत्तर दिले, “जेव्हा वर सोबत असतो तेव्हा त्याच्या वऱ्हाड्यांना दुःखी कसे राहता येईल? परंतु अशी वेळ येईल जेव्हा वराला त्यांच्यापासून दूर केले जाईल तेव्हा ते उपवास करतील.
”मग येशू म्हणाला, हे पित्या, आकाशाच्या व पृथ्वीच्या प्रभू मी तुझे उपकार मानतो कारण तू या गोष्टी ज्ञानी व बुद्धीमान लोकांपासून गुप्त ठेवून बालकासारखे अशिक्षित आहेत त्यांना तू प्रकट केल्या.
”लोकांस पाठवून दिल्यावर तो प्रार्थना करण्यास एकांत ठिकाणी डोंगरावर गेला, रात्र झाली तेव्हा तो तेथे एकटाच होता.
”तसेच मी तुम्हास खरे सांगतो की, जर पृथ्वीवर तुमच्यापैकी दोघांचे कोणत्याही गोष्टीविषयी एकमत झाले तर त्याकरता एकत्रित होऊन विनंती करतील तर ती. माझ्या स्वर्गातील पित्याकडून त्यांच्यासाठी केली जाईल; कारण जिथे दोघे किंवा तिघे जर माझ्या नावाने एकत्र जमले असतील तेथे त्यांच्यांमध्ये मी आहे.
”येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हास खरे सांगतो, जर तुम्हास विश्वास असेल आणि तुम्ही संशय धरला नाही तर मी जे अंजिराच्या झाडाबाबतीत केले तेच नव्हे, तर या डोंगराला उपटून समुद्रात पड असे म्हणालात तरी ते घडेल. जर तुमचा विश्वास असेल तर जे काही तुम्ही प्रार्थनेत विश्वासाने मागाल ते तुम्हास मिळेल.”
”नंतर येशूने प्याला घेतला. त्याबद्दल देवाचे उपकार मानले आणि तो त्यांना दिला. येशू म्हणाला, “तुम्ही सर्वांनी यांतील प्यावे.
”नंतर गेथशेमाने नावाच्या जागी येशू आपल्या शिष्यांसह गेला. येशू त्यांना म्हणाला, “मी थोडा पुढे जाऊन प्रार्थना करीपर्यंत येथेच थांबा.” येशूने पेत्र आणि जब्दीचे दोन पुत्र यांना आपल्याबरोबर यायला सांगितले. यानंतर येशू मनातून फार दुःखी व कासावीस होऊ लागला. येशू पेत्राला व जब्दीच्या दोघा पुत्रांना म्हणाला, “माझा जीव फार दुःखीत व मरणप्राय झाला आहे. येथे थांबा व माझ्याबरोबर जागे राहा.” तो थोडे अंतर पुढे गेला आणि जमिनीवर ओणवून प्रार्थना करू लागला, “हे माझ्या पित्या, शक्य झाले तर हा दुःखाचा प्याला माझ्यापुढून जाऊ दे, तथापि, माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे.” मग तो शिष्यांकडे परत गेला तेव्हा ते झोपी गेले आहेत असे त्यास आढळले. येशू पेत्राला म्हणाला, “तुम्हा लोकांस माझ्याबरोबर एखादा तासही जागे राहता येत नाही काय? तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागे राहा आणि प्रार्थना करीत राहा. आत्मा खरोखर उत्सुक आहे खरा पण देह अशक्त आहे.” नंतर दुसऱ्यांदा जाऊन येशू प्रार्थना करू लागला, “हे माझ्या पित्या, जर दुःखाचा हा प्याला मी प्याल्याशिवाय टळून जात नाही तर तुझी इच्छा असेल तसे होवो.”
”पाहा, परमेश्वराच्या भवनातील पडदा वरपासून खालपर्यंत दोन भागात फाटला गेला, भूमी कापली, खडक फुटले.
”मग त्याने अगदी पहाटेस अंधार असतानाच घर सोडले आणि एकांत स्थळी जाऊन तेथे त्याने प्रार्थना केली.
”जेव्हा योहानाचे शिष्य व परूशी उपवास करीत होते तेव्हा काहीजण येशूकडे आले आणि त्यास म्हणाले, “योहानाचे शिष्य व परूशी लोक उपवास करतात परंतु तुझे शिष्य उपवास का करीत नाहीत?” येशू त्यांना म्हणाला, “वऱ्हाड्यांबरोबर वर आहे तोपर्यंत त्यांनी उपवास करणे त्यांना शक्य आहे काय? वर बरोबर आहे तोपर्यंत त्यांना उपवास करणे शक्य नाही. परंतु असे दिवस येतील की, वर त्यांच्यापासून घेतला जाईल आणि नंतर ते त्यादिवशी उपवास करतील.
”लोकांस निरोप देऊन तो प्रार्थना करण्यास डोंगरावर गेला.
”येशू त्यास म्हणाला, “शक्य असेल तर, असे कसे म्हणतोस? विश्वास ठेवणाऱ्याला सर्वकाही शक्य आहे.” तेव्हा लागलेच मुलाचे वडील मोठ्याने ओरडून म्हणाले, “मी विश्वास करतो, माझा अविश्वास घालवून टाका.”
”येशू त्यांना म्हणाला, “ही जात प्रार्थनेवाचून दुसऱ्या कशानेही निघणे शक्य नाही.”
”मी तुम्हास खरे सांगतो की, जो कोणी या डोंगराला ‘उपटून समुद्रात टाकाला जा’ असे म्हणेल व तो आपल्या मनात संशय धरणार नाही आपण जे म्हणतो तसे घडेलच असा विश्वास धरील तर त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. म्हणून मी तुम्हास सांगतो तो जे काही तुम्ही प्रार्थनेत मागाल ते मिळालेच आहे असा विश्वास धरा आणि ते तुम्हास मिळेल.
”जेव्हा तुम्ही प्रार्थना करीत उभे राहता तेव्हा तुमच्या मनात जर कोणाच्या विरुद्ध काही असेल तर त्याची क्षमा करा यासाठी की, तुमच्या स्वर्गातील पित्याने तुमच्या पापांची क्षमा करावी. परंतु तुम्ही जर क्षमा करणार नाही तर तुमचा स्वर्गातील पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही.”
”नंतर ते गेथशेमाने म्हटलेल्या जागी आले, तेव्हा येशू त्याच्या शिष्यांना म्हणाला, “मी प्रार्थना करीपर्यंत येथे बसा.” येशूने आपल्याबरोबर पेत्र, याकोब व योहान यांना घेतले. दुःख व वेदनांनी त्याचे मन भरून आले. तो त्यांना म्हणाला, “माझा जीव मरण्याइतका वेदना सोशीत आहे. येथे राहा व जागृत असा.” त्यांच्यापासून थोडे दूर अंतरावर जाऊन तो जमिनीवर पडला आणि त्याने प्रार्थना केली की, “शक्य असेल तर ही घटका मजपासून टळून जावो.” तो म्हणाला, “अब्बा-पिता, तुला सर्वकाही शक्य आहे. हा प्याला मजपासून दूर कर तरी माझ्या इच्छेप्रमाणे नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे कर.” नंतर येशू आला आणि त्यांना झोपलेले पाहिले. तो पेत्राला म्हणाला, “शिमोना, तू झोपी गेलास काय? तासभर तुझ्याच्याने जागे राहवत नाही काय? जागृत राहा आणि प्रार्थना करा म्हणजे तुम्ही परीक्षेत पडणार नाही. आत्मा उत्सुक आहे पण देह अशक्त आहे.”
”तेव्हा परमेश्वराच्या भवनातील पडदा वरपासून खालपर्यंत फाटला व त्याचे दोन भाग झाले.
”कारण देवाला कोणतीही गोष्ट अशक्य नाही.
”ती चौऱ्याऐंशी वर्षांची विधवा होती व परमेश्वराचे भवन सोडून न जाता उपवास व प्रार्थना करून ती रात्रंदिवस निरंतर उपासना करीत असे. तिने त्याचवेळी जवळ येऊन देवाचे आभार मानले. जे यरुशलेमेच्या सुटकेविषयी वाट पाहत होते त्या सर्वांना तिने त्याच्याविषयी सांगितले.
”तेव्हा असे झाले की, जेव्हा सर्व लोकांचा बाप्तिस्मा योहानाद्वारे केला जात होता, तेव्हा येशूचा ही बाप्तिस्मा होऊन तो प्रार्थना करीत असता आकाश उघडले गेले.
”तेथे सैतानाने त्याची चाळीस दिवस परीक्षा घेतली. त्यादिवसात येशूने काहीही खाल्ले नाही आणि ती वेळ संपल्यानंतर येशूला भूक लागली.
”परंतु येशू रानांमध्ये एकांतात जाऊन प्रार्थना करीत असे.
”ते त्यास म्हणाले, योहानाचे शिष्य नेहमी उपवास आणि प्रार्थना करतात आणि परूश्यांचे शिष्यसुद्धा तसेच करतात, पण तुझे शिष्य तर खातपीत असतात. येशू त्यांना म्हणाला, “कोण असे करेल? वऱ्हाडाबरोबर वर आहे तोपर्यंत तुम्हास त्यांना उपवास करावयास लावता येईल काय? पण असे दिवस येत आहेत की, वराला त्यांच्यापासून घेतले जाईल आणि त्यादिवसात ते उपवास करतील.”
”त्यादिवसात असे झाले की, येशू प्रार्थना करण्यासाठी डोंगरावर गेला. त्याने ती रात्र देवाची प्रार्थना करण्यात घालवली.
”परंतु तुम्हा ऐकणाऱ्यांस मी सांगतो, तुमच्या शत्रूंवर प्रीती करा. जे तुमचा व्देष करतात, त्यांचे चांगले करा. जे तुम्हास शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या. जे तुमचा अपमान करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा.
”आणि या गोष्टी सांगितल्यानंतर सुमारे आठ दिवसानी असे झाले की, पेत्र व योहान व याकोब यांना बरोबर घेऊन तो प्रार्थना करायला डोंगरावर गेला. तेव्हा तो प्रार्थना करीत असता त्याच्या मुखाचे रूप पालटले व त्याचे वस्त्र पांढरे शुभ्र लखलखीत झाले.
”मग असे झाले की, तो एका ठिकाणी प्रार्थना करीत होता. ती संपल्यावर शिष्यांपैकी एकजण त्यास म्हणाला, “प्रभू, जसे योहानाने त्याच्या शिष्यांना शिकवले; त्याचप्रमाणे तुम्ही देखील आम्हास प्रार्थना करायला शिकवा.” मग तो त्यांना म्हणाला, “जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा असे म्हणाः हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो तुझे राज्य येवो, आमची दररोजची लागणारी भाकर आम्हास दे, आमच्या पापांची आम्हास क्षमा कर, कारण आम्हीही आमच्या प्रत्येक अपराध्याला त्यांच्या अपराधांची क्षमा करतो आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास वाईटापासून सोडव.”
”मग येशू त्यास म्हणाला, “समजा तुमच्यापैकी असा कोण आहे ज्याला मित्र आहे आणि तो त्याच्याकडे मध्यरात्री गेला व त्यास म्हणाला, ‘मित्रा, मला तीन भाकरी उसन्या दे, कारण माझा मित्र नुकताच प्रवास करून माझ्याकडे आला आहे आणि त्यास वाढायला माझ्याजवळ काहीही नाही.’ आणि तो मनुष्य आतून म्हणाला, ‘मला त्रास देऊ नको! मी अगोदरच दरवाजा लावलेला आहे आणि माझी मुले माझ्याजवळ झोपलेली आहेत. मी तुला भाकर देण्यासाठी उठू शकत नाही.’ मी तुम्हास सांगतो की, जरी तो उठून त्यास काही देण्यासाठी टाळाटाळ करीत असेल तरी त्याच्या मित्राच्या आग्रहामुळे तो खात्रीने उठून त्यास जितक्या भाकरींची गरज आहे तितक्या त्यास देईल.
”आणि म्हणून मी तुम्हास सांगतो, मागा म्हणजे तुम्हास दिले जाईल. शोधा म्हणजे तुम्हास सापडेल आणि ठोका म्हणजे तुम्हासाठी उघडले जाईल. कारण जो कोणी मागतो त्यास मिळेल. जो कोणी शोधतो त्यास सापडेल आणि जो कोणी ठोकतो त्याच्यासाठी दरवाजा उघडला जाईल. तुम्हामध्ये असा कोण पिता आहे की, त्याच्या मुलाने त्यास मासा मागितला असता त्यास माशाऐवजी साप देईल? किंवा जर मुलाने अंडे मागितले तर कोणता पिता त्यास विंचू देईल? जर तुम्ही वाईट असतांनाही तुम्हास तुमच्या मुलांना चांगल्या देणग्या देण्याचे कळते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती विशेषकरून पवित्र आत्मा देईल?”
”लग्नाच्या मेजवानीवरुन परतणाऱ्या मालकाची वाट पाहणाऱ्या लोकांसारखे व्हा जेणेकरून, तो परत येतो व दरवाजा ठोकावतो तेव्हा त्याच्यासाठी त्यांनी ताबडतोब दरवाजा उघडावा. मालक परत आल्यावर जे नोकर त्यास जागे व तयारीत असलेले आढळतील ते धन्य. मी तुम्हास खरे सांगतो, तो स्वतः त्यांची सेवा करण्यासाठी कंबर कसेल, त्यांना मेजावर बसायला सांगून त्यांची सेवा करील.
”निराश न होता नेहमी प्रार्थना कशी करावी हे शिष्यांनी शिकावे म्हणून त्याने त्यांना एक दाखला सांगितला. तो म्हणाला, एका नगरात एक न्यायाधीश होता. तो देवाला भीत नसे व लोकांचीही भीड धरीत नसे. त्या नगरात एक विधवा होती. ती नेहमी येऊन न्यायधिशाला म्हणत असे, ‘माझ्या विरोधकांविरुद्ध माझा न्याय करा!’ त्याची इच्छा काही काळ नव्हती पण शेवटी तो मनात म्हणाला, ‘मी जरी देवाला भीत नाही व लोकांस मान देत नाही, तरीही विधवा मला त्रास देते म्हणून मी तिचा न्याय करीन, नाही तर ती नेहमी येऊन मला अगदी त्रासून सोडेल.’ मग प्रभू म्हणाला, “लक्ष्य द्या अन्यायी न्यायाधीश काय म्हणाला. आणि मग जे देवाचे निवडलेले लोक दिवसरात्र त्याचा धावा करतात त्यांचा तो न्याय करणार नाही काय? तो त्यांना मदत करण्यास वेळ लावेल का? मी तुम्हास सांगतो, तो त्यांचा न्याय लवकर करील, तरीही जेव्हा मनुष्याचा पुत्र येईल, तेव्हा त्यास पृथ्वीवर विश्वास आढळेल काय?”
”“दोन जण प्रार्थना करण्यास वर परमेश्वराच्या भवनात गेले. एक परूशी होता आणि दुसरा जकातदार होता. परूशी उभा राहिला आणि त्याने अशी प्रार्थना केली, ‘हे देवा, मी तुझे उपकार मानतो कारण, मी इतर लोकांसारखा म्हणजे चोर, अन्यायी, व्यभिचारी व या जकातदारासारखा नाही. उलट मी आठवड्यातून दोनदा उपवास करतो आणि माझ्या सर्व उत्त्पन्नाचा दहावा भाग देतो.’ परंतु जकातदार दूर अंतरावर उभा राहून वर स्वर्गाकडे दृष्टी लावण्यास देखील न धजता आपला ऊर बडवत म्हणाला, ‘हे देवा मज पाप्यावर दया कर.’ मी तुम्हास सांगतो हा मनुष्य त्या दुसऱ्या मनुष्यापेक्षा न्यायी ठरुन घरी गेला कारण जो कोणी स्वतःला उंच करतो त्यास कमी केले जाईल आणि जो कोणी स्वतःला कमी करतो त्यास उंच केले जाईल.”
”यास्तव तुम्ही या सर्व होणाऱ्या गोष्टी चुकवायला व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहायला सबळ असावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागे राहा.
”परंतु शिमोना, तुझा विश्वास ढळू नये, म्हणून मी तुझ्यासाठी प्रार्थना केली आहे आणि तू पुन्हा माझ्याकडे वळलास म्हणजे तुझ्या भावांस स्थिर कर.”
”तेव्हा त्याठिकाणी आल्यावर त्याने त्यांना म्हटले, “तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा.” तो त्यांच्यापासून दगडाच्या टप्प्याइतका दूर गेल्यानंतर त्याने गुडघे टेकले आणि अशी प्रार्थना केली, “पित्या, जर तुझी इच्छा असेल तर हा प्याला माझ्यापासून दूर कर. तरी माझ्या इच्छेप्रमाणे नाही तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे.” स्वर्गातून एक देवदूत आला व तो त्यास सामर्थ्य देत राहिला दु:खाने ग्रासलेला असतांना त्याने अधिक कळकळीने प्रार्थना केली आणि त्याचा घाम रक्ताच्या थेंबासारखा जमिनीवर पडत होता. आणि जेव्हा प्रार्थना करून तो उठला आणि शिष्यांकडे आला तो पहा ते खिन्न झाल्यामुळे झोपी गेलेले त्यास आढळले. तो त्यांना म्हणाला, “तुम्ही का झोपत आहात? उठा आणि परीक्षेत पडू नये म्हणून प्रार्थना करा.”
”नंतर येशू म्हणाला, “हे पित्या, त्यांची क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही.” त्यांनी चिठ्ठ्या टाकून त्याचे कपडे वाटून घेतले.
”आणि परमेश्वराच्या भवनातील पडदा मधोमध फाटला आणि त्याचे दोन भाग झाले.
”येशूने त्या पाच भाकरी घेतल्या आणि त्याने उपकार मानल्यावर त्या बसलेल्याना वाटून दिल्या. तसेच त्या मासळ्यांतून त्यांना हवे होते तितके दिले.
”देवापासून असणारा देवाची वचने ऐकतो. तुम्ही देवापासून नाही म्हणून तुम्ही ऐकत नाही.”
”आपल्याला हे माहीत आहे की, देव पापी लोकांचे ऐकत नाही, तर जो मनुष्य देवाचा उपासक आहे आणि जो त्याच्या इच्छेप्रमाणे करतो त्याचे तो ऐकतो.
”त्याच्यासाठी द्वारपाल दरवाजा उघडतो आणि मेंढरे त्याची वाणी ऐकतात. तो आपल्या मेंढरांना ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारतो आणि त्यांना बाहेर नेतो; आणि आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर तो त्यांच्यापुढे चालतो आणि मेंढरे त्याच्यामागे चालतात; कारण ती त्याचा वाणी ओळखतात.
”या मेंढवाड्यातली नाहीत अशी माझी दुसरी मेंढरे आहेत; तीही मला आणली पाहिजेत आणि ती माझी वाणी ऐकतील. मग एक कळप आणि एक मेंढपाळ असे होईल.
”माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्यामागे येतात.
”तेव्हा त्यांनी धोंड काढली; आणि येशूने डोळे वर करून म्हणाला, “हे पित्या, तू माझे ऐकले म्हणून मी तुझे उपकार मानतो. मला माहीत आहे की, तू माझे नेहमी ऐकतोस, तरी जे लोक सभोवती उभे आहेत त्यांच्याकरिता मी बोललो, यासाठी की, तू मला पाठवले आहे असा त्यांनी विश्वास धरावा.” असे म्हटल्यावर त्याने मोठ्याने हाक मारली, “लाजरा, बाहेर ये.”
”पुत्राच्या ठायी पित्याचे गौरव व्हावे म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन. तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर मी ते करीन. माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल. मी पित्याला विनंती करीन, मग तो तुम्हास दुसरा कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा देईल. अशासाठी की, त्याने तुम्हाबरोबर सर्वकाळ रहावे. तो सत्याचा आत्मा आहे, जग त्यास ग्रहण करू शकत नाही, कारण ते त्यास पाहत नाही अथवा त्यास ओळखीत नाही; तुम्ही त्यास ओळखता, कारण तो तुम्हाबरोबर राहतो आणि तो तुम्हामध्ये वस्ती करील.
”तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हास सर्वकाही शिकवील आणि ज्या गोष्टी मी तुम्हास सांगितल्या त्या सर्वाची तुम्हास आठवण करून देईल.
”तुम्ही माझ्यामध्ये राहीला आणि माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हास पाहिजे असेल ते मागा म्हणजे ते तुम्हास मिळेल.
”तुम्ही मला निवडले नाही, तर मी तुम्हास निवडले आणि नेमले आहे; यामध्ये हेतू हा आहे की, तुम्ही जाऊन, फळ द्यावे, तुमचे फळ टिकावे आणि जे काही तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ मागाल ते त्याने तुम्हास द्यावे.
”पण तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हास मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल, कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही; तर जे ऐकेल तेच सांगेल आणि होणार्या गोष्टी तुम्हास कळवील.
”आणि त्यादिवशी तुम्ही मला काही प्रश्न विचारणार नाही. मी तुम्हास खरे खरे सांगतो, तुम्ही पित्याजवळ काही मागाल तर तो ते तुम्हास माझ्या नावाने देईल. तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितले नाही; मागा म्हणजे तुम्हास मिळेल, यासाठी की, तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा.
”या गोष्टी बोलल्यावर येशू वर आकाशाकडे दृष्टी लावून म्हणाला, हे पित्या, वेळ आली आहे; पुत्राने तुझे गौरव करावे म्हणून तू आपल्या पुत्राचे गौरव कर. जे तू त्यास दिले आहेत त्या सर्वांना त्याने सार्वकालिक जीवन द्यावे, म्हणून तू त्यास सर्व मनुष्यांमात्रावर अधिकार दिला आहेस. सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच, खरा देव त्या तुला आणि ज्याला तू पाठवलेस त्या येशू ख्रिस्ताला ओळखावे. जे तू काम मला करावयाला दिलेस ते पूर्ण करून मी पृथ्वीवर तुझे गौरव केले आहे. तर आता, हे माझ्या पित्या, हे जग होण्याआधी तुझ्याबरोबर मला जे गौरव होते त्याच्यायोगे तू आपणा स्वतःबरोबर माझे गौरव कर. जे लोक तू मला जगातून दिले त्यांना मी तुझे नाव प्रकट केले. ते तुझे होते आणि ते तू मला दिलेस आणि त्यांनी तुझे वचन पाळले आहे. आता त्यांना समजले आहे की, तू ज्या गोष्टी मला दिल्यास त्या सर्व तुझ्यापासून आहेत. कारण तू मला जी वचने दिलीस ती मी त्यांना दिली आहेत; ती त्यांनी स्वीकारली, मी तुझ्यापासून आलो हे त्यांनी खरोखर ओळखले आणि तू मला पाठवले. असा त्यांनी विश्वास ठेवला. त्यांच्यासाठी मी विनंती करतो, मी जगासाठी विनंती करीत नाही, तर जे तू मला दिले आहेत त्यांच्यासाठी मी विनंती करतो, कारण ते तुझे आहेत. जे माझे ते सर्व तुझे आहे आणि जे तुझे ते सर्व माझे आहे आणि त्यांच्याठायी माझे गौरव झाले आहे. आणि आता, यापुढे मी जगात नाही; पण ते जगात आहेत आणि मी तुझ्याकडे येत आहे. हे पवित्र पित्या, तू मला दिलेल्या तुझ्या नावात त्यांना राख यासाठी की, जसे आपण एक आहोत तसे त्यांनीही एक व्हावे. जोपर्यंत मी त्यांच्याबरोबर होतो तोपर्यंत तू मला दिलेल्या तुझ्या नावात मी त्यांना राखले; मी त्यांचा सांभाळ केला आणि नाशाच्या पुत्राशिवाय त्यांच्यातून कोणाचा नाश झाला नाही. हा शास्त्रलेख पूर्ण व्हावा म्हणून असे झाले. पण आता मी तुझ्याकडे येत आहे आणि माझा आनंद त्यांच्याठायी परिपूर्ण व्हावा म्हणून मी जगात या गोष्टी बोलतो. मी त्यांना तुझे वचन दिले आहे, जगाने त्यांचा व्देष केला आहे; कारण जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत. तू त्यांना जगातून काढून घ्यावे अशी मी विनंती करीत नाही, तर तू त्यांना दुष्टापासून राखावे अशी मी विनंती करतो. जसा मी जगाचा नाही, तसे तेही जगाचे नाहीत. तू त्यांना सत्यात पवित्र कर. तुझे वचन हेच सत्य आहे. जसे तू मला जगात पाठवले तसे मीही त्यांना जगात पाठवले आहे. आणि त्यांनीही सत्यांत पवित्र व्हावे म्हणून मी त्यांच्याकरिता स्वतःला पवित्र करतो. मी केवळ त्यांच्यासाठी नाही, तर त्यांच्या शब्दावरून जे माझ्यावर विश्वास ठेवतात त्यांच्यासाठीही विनंती करतो की, त्या सर्वांनी एक व्हावे; हे माझ्या पित्या, जसा तू माझ्यामध्ये आहेस व मी तुझ्यामध्ये आहे तसे त्यांनीही तुझ्यामाझ्यामध्ये (एक) व्हावे, कारण तू मला पाठवले असा जगाने विश्वास धरावा. तू जे गौरव मला दिले आहे, ते मी त्यांना दिले आहे, यासाठी की, जसे आपण एक आहोत तसे त्यांनी एक व्हावे; म्हणजे मी त्यांच्यामध्ये आणि तू माझ्यामध्ये; यासाठी की, त्यांनी एक होऊन पूर्ण व्हावे आणि, त्यावरून जगाने समजून घ्यावे की, तू मला पाठवले आणि जशी तू माझ्यावर प्रीती केली तशी त्यांच्यावरही प्रीती केली. हे माझ्या पित्या, माझी अशी इच्छा आहे की, तू जे मला दिले आहेत त्यांनीही जेथे मी असेन तेथे माझ्याजवळ असावे, यासाठी की, जे माझे गौरव तू मला दिले आहे ते त्यांनी पाहावे; कारण जगाचा पाया घातला त्यापुर्वी तू माझ्यावर प्रीती केली. हे “न्यायसंपन्न पित्या, जगाने तुला ओळखले नाही, मी तुला ओळखले आहे आणि तू मला पाठवले असे त्यांनी ओळखले आहे. मी तुझे नाव त्यास कळवले आहे आणि मी कळवीन, यासाठी की, जी प्रीती तू माझ्यावर केली ती त्यांच्यामध्ये असावी आणि मी त्यांच्यामध्ये असावे.”
”हे सर्वजण आणि त्यांच्यासह कित्येक स्त्रिया, येशूची आई मरीया, व त्याचे भाऊ एकचित्ताने एकसारखे प्रार्थना करत होते.
”नंतर पेन्टेकॉस्ट म्हणजे पन्नासावा दिवस आला तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना. अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला, व ज्या घरात ते वसले होते ते सर्व त्याने भरले. आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जीभांसारख्या जीभा त्यांना दिसल्या, व प्रत्येकावर त्या एकएक अशा बसल्या. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली, तसतसे ते निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले.
”ते ऐकून ते एकचित्त होऊन देवाला उच्च वाणीने म्हणाले, “हे प्रभू, आकाश, पृथ्वी, समुद्र व त्यातील सर्वकाही ज्याने निर्माण केले तो तूच आहे.
”आणि त्यांनी प्रार्थना केल्यावर ज्या जागेमध्ये ते एकत्र जमले होते ती हालली, आणि ते सर्व पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन, देवाचे वचन धैर्याने बोलू लागले.
”पेत्र व योहान जेव्हा आले, तेव्हा त्यांनी शोमरोनी विश्वास ठेवणाऱ्यांना पवित्र आत्मा मिळावा म्हणून, प्रार्थना केली.
”कर्नेल्य म्हणाला, “चार दिवसांपूर्वी, माझ्या घरांमध्ये मी प्रार्थना करीत होतो, बरोबर याच वेळेला म्हणजे दुपारचे तीन वाजता मी प्रार्थना करीत होतो, अचानक एक मनुष्य माझ्यासमोर उभा राहिला, त्याने लखलखीत, चमकदार कपडे घातले होते.” तो मनुष्य म्हणाला, “कर्नेल्या देवाने तुझी प्रार्थना ऐकली आहे, गरीब लोकांस ज्या वस्तु तू दिल्या आहेत ते देवाने पाहिले आहे, देव तुझी आठवण करतो.
”म्हणून पेत्राला तुंरूगात ठेवण्यात आले, पण मंडळी सातत्याने पेत्रासाठी देवाकडे प्रार्थना करीत होती. पेत्र दोन शिपायांच्यामध्ये झोपला होता, त्यास दोन साखळ्यांनी बांधले होते, तुरुंगाच्या दाराजवळ आणखी काही शिपाई पहारा देत होते, ती रात्रीची वेळ होती व हेरोदाने असा विचार केला की, दुसऱ्या दिवशी पेत्राला लोकांसमोर आणावे. तेव्हा पाहा, अचानक परमेश्वराचा दूत तेथे उभा राहिला, तुरुंगाच्या खोलीत एकदम प्रकाश पडला, देवदूताने पेत्राच्या कुशीला स्पर्श करून त्यास उठवले, देवदूत म्हणाला, “लवकर ऊठ!” तेव्हा पेत्राच्या हातातील साखळ्या गळून पडल्या.
”म्हणून मंडळीने उपवास व प्रार्थना केल्या, त्यांनी बर्णबा व शौल यांच्या डोक्यांवर हात ठेवून प्रार्थना केली, मग त्यांना पाठवून दिले.
”पौल व बर्णबाने प्रत्येक मंडळीत वडीलजनांची नेमणूक केली, त्यांनी या वडिलांसाठी उपवास आणि प्रार्थना केल्या, प्रभू येशूवर विश्वास असलेले असे सर्व वडीलजन होते म्हणून पौलाने व बर्णबाने त्यांना प्रभूच्या हाती सोपवले.
”मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सीला हे प्रार्थना करीत असता व गाणे गाऊन देवाची स्तुती करीत असता बंदिवान त्यांचे ऐकत होते. तेव्हा एकाएकी असा मोठा भूमिकंप झाला की बंदिशाळेचे पाये डगमगले, सर्व दरवाजे लागलेच उघडले व सर्वांची बंधने तुटली.
”आणि जेव्हा पौलाने त्याचे हात त्यांच्यावर ठेवले, तेव्हा पवित्र आत्मा त्यांच्यावर आला आणि ते निरनिराळ्या भाषा बोलू लागले व भविष्य सांगू लागले.
”आणि हे बोलल्यावर पौलाने गुडघे टेकले आणि प्रार्थना केली.
”तर आता उशीर का करितोस? ऊठ, त्याच्या नावाचा धावा करून बाप्तिस्मा घे आणि आपल्या पापांचे क्षालन कर.
”असे बोलल्यानंतर पौलाने भाकर घेतली आणि सर्वांच्या समक्ष देवाचे उपकार मानले, ती भाकर मोडून तो खाऊ लागला.
”त्याचप्रमाणे आपल्या अशक्तपणात पवित्र आत्माही आपल्याला सहाय्य करतो, कारण आपण प्रार्थना केली पाहिजे तशी कशासाठी करावी हे आपण जाणत नाही. पण ज्यांचा उच्चार करता येत नाही अशा कण्हण्यांनी आत्मा स्वतः आपल्यासाठी मध्यस्थी करतो. आणि, जो अंतःकरणे शोधून पाहतो तो पवित्र आत्म्याचे मन जाणतो, कारण तो पवित्र जनांसाठी देवाच्या इच्छेस येईल अशी मध्यस्थी करतो.
”बंधूंनो, त्यांचे तारण व्हावे, ही माझ्या मनाची कळकळीची इच्छा व माझी त्यांच्याकरिता देवाजवळ विनंती आहे.
”आशेत आनंद करणारे, संकटात धीर धरणारे, प्रार्थनेत ठाम राहणारे,
”जो दिवस मानतो त्याने प्रभूसाठी मानावे आणि जो खातो तोसुध्दा प्रभूसाठी खातो, कारण तो देवाचे उपकार मानतो; त्याचप्रमाणे जो खात नाही तो प्रभूसाठी खात नाही आणि देवाचे उपकार मानतो.
”पण, मी आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याकरिता व आत्म्याच्या प्रीती करिता, बंधूंनो, तुम्हास विनंती करतो की, माझ्या लढ्यात, तुम्ही माझ्याकरिता देवाला प्रार्थना करण्यात माझे साथीदार व्हा;
”ज्याला इतर भाषांमध्ये बोलण्याचे दान आहे तो खरे पाहता मनुष्यांबरोबर बोलत नाही तर देवाबरोबर बोलतो कारण तो काय बोलतो हे कोणालाही कळत नाही. पवित्र आत्म्याच्याद्वारे तो गुढ गोष्टी बोलतो.
”ज्याला दुसऱ्या भाषेत बोलण्याचे दान आहे, तो स्वतःचीच आध्यात्मिकदृष्ट्या उन्नती करून घेतो, पण ज्याला संदेश देण्याचे दान आहे तो संपूर्ण मंडळीची उन्नती करतो.
”म्हणून, जो अन्य भाषेत बोलतो त्याने तो जे बोलला आहे त्याचा अर्थ सांगता यावा म्हणून प्रार्थना करावी. कारण जर मी अन्य भाषेतून प्रार्थना केली तर माझा आत्माही प्रार्थना करतो पण माझी बुद्धी निष्फळ राहते. मग काय केले पाहिजे? मी माझ्या आत्म्याने प्रार्थना करीन पण त्याचप्रमाणे मी माझ्या बुद्धीनेही प्रार्थना करीन. कारण जर तू तुझ्या आत्म्याने देवाचे धन्यवाद करशील तर जो ऐकणारा सामान्य व्यक्ती तेथे बसला असेल तर तो तुझ्या उपकारस्तुतीच्या प्रार्थनेत “आमेन” कसे म्हणेल? कारण तू काय म्हणतोस ते त्यास कळत नाही. कारण तू उपकारस्ती चांगली करतोस, खरे हे चांगले आहे तरी त्याने दुसर्याची उन्नती होत नाही. मी देवाचे उपकार मानतो, कारण मी तुम्हा सर्वांपेक्षा अधिक भाषा बोलतो. पण मी मंडळीत अन्य भाषेत दहा हजार शब्द बोलण्यापेक्षा, दुसर्यांनाही शिकवावे म्हणून, मी माझ्या बुद्धीने पाच शब्द बोलावे हे मला बरे वाटते.
”म्हणून इतर भाषांमध्ये बोलण्याचे दान हे विश्वास ठेवणाऱ्यांसाठी नसून अविश्वासणाऱ्यांसाठी चिन्हादाखल आहे. म्हणून जर संपूर्ण मंडळी एकत्र येते व प्रत्येकजण दुसऱ्या भाषेत बोलत असेल आणि जर एखादा बाहेरचा किंवा अविश्वासणारा आत आला, तर तुम्ही वेडे आहात असे ते तुम्हास म्हणणार नाही का? परंतु जर प्रत्येकजण संदेश देऊ लागला आणि जर अविश्वासणारा किंवा बाहेरचा आत आला, तर सर्वजण जे बोलत असतील त्यामुळे त्या ऐकणाऱ्याला त्याच्या पापाची जाणीव होते, ते सर्व त्याचा न्याय करतात; त्याच्या अंतःकरणातील गुपिते माहीत होतात आणि मग तो पालथा पडतो आणि देवाची उपासना करतो व म्हणतो “खरोखर देव तुमच्यामध्ये आहे” तुमच्या भेटींनी मंडळीला मदत व्हावी.
”जर कोणी अन्य भाषेत बोलणार असेल तर दोघांनी किंवा जास्तीत जास्त तिघांनी बोलावे, एकावेळी एकानेच बोलावे आणि एका व्यक्तीने त्या बोलण्याचा अर्थ सांगावा. जर मंडळीत अर्थ सांगणारा कोणी नसेल तर अन्य भाषा बोलणाऱ्याने सभेत गप्प बसावे, स्वतःशी व देवाशी बोलावे.
”म्हणून माझ्या बंधूनो संदेश देण्यासाठी उत्सुक असा, अन्य भाषेत बोलणाऱ्याला मना करू नका.
”मीही तुमच्यासाठी देवाला धन्यवाद देण्याचे आणि माझ्या प्रार्थनेत तुमची आठवण करण्याचे थांबवले नाही. मी अशी प्रार्थना करतो की, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव, गौरवी पिता, ह्याने तुम्हास आपल्या ओळखीच्या ज्ञानाचा व प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा;
”कारण येशूच्याद्वारे, आम्हा दोघांचा एका पवित्र आत्म्यात देवाजवळ प्रवेश होतो.
”आणि आता देव जो आपल्या सामर्थ्यानुसार आपल्यामध्ये कार्य करतो इतकेच नव्हे तर आम्ही मागणी किंवा आमच्या कल्पनेपेक्षा अधिक काम करण्यास तो समर्थ आहे, त्यास मंडळी आणि ख्रिस्त येशूमध्ये सर्व पिढ्यानपिढ्या सदासर्वकाळ गौरव असो. आमेन.
”सर्व प्रकारची स्तोत्रे, गीते आणि आत्मिक गीतांनी त्याची स्तुती करा. एकमेकाबरोबर सुसंवाद साधा, गीत गा आणि आपल्या अंतःकरणाने परमेश्वराची स्तुती करा. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात देव जो आपला पिता आहे त्याचे सर्व गोष्टीबद्दल नेहमी उपकार माना.
”प्रत्येक प्रार्थना आणि विनंतीद्वारे सर्व प्रसंगी आत्म्यात प्रार्थना करा आणि चिकाटीने उत्तराची वाट पहा व सर्व पवित्र जनांसाठी प्रार्थना करीत जागृत राहा.
”मला तुमची जी एकंदर आठवण आहे तिच्यावरून मी आपल्या देवाचे आभार मानतो. माझ्या प्रत्येक प्रार्थनेत मी तुमच्यामधील सर्वांसाठी आनंदाने प्रार्थना करतो;
”मी अशी प्रार्थना करतो की, तुमची प्रीती ज्ञानात व पूर्ण सारासार विचारात आणखी अधिकाधिक वाढत जावी, यासाठी की जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे आणि तुम्ही ख्रिस्ताच्या दिवसासाठी निर्मळ व निर्दोष असावे. आणि देवाचे गौरव व स्तुती व्हावी म्हणून येशू ख्रिस्ताच्या द्वारे जे नीतिमत्त्वाचे फळ त्याने भरून जावे.
”कशा हि विषयाची काळजी करू नका पण प्रार्थना आणि विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा; म्हणजे सर्व बुद्धीसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील.
”आणि मला जो सामर्थ्य देतो त्याच्याकडून मी सर्वकाही करावयास शक्तिमान आहे. पण माझ्या दुःखात तुम्ही सहभागी झालात हे तुम्ही चांगले केलेत.
”माझा देव आपल्या संपत्यनुरूप तुमची गरज ख्रिस्त येशूच्या ठायी गौरवाच्याद्वारे पुरवील.
”आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतो, तेव्हा आम्ही नित्य देवाचे, म्हणजे आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या पित्याचे उपकार मानतो
”म्हणून, हे ऐकले त्या दिवसापासून, आम्हीदेखील खंड पडून देता, तुमच्यासाठी प्रार्थना करतो आणि मागतो की, तुम्हास सर्व आत्मिक ज्ञान व बुद्धी प्राप्त होऊन त्याच्या इच्छेविषयीच्या ज्ञानाने तुम्ही भरावे.
”प्रार्थनेत तत्पर असा व तिच्यांत उपकारस्तुती करीत जागृत रहा. आणखी आम्हासाठी देखील प्रार्थना करा; अशी की, कारण ख्रिस्ताच्या ज्या रहस्यामुळे मी बंधनातही आहे ते सांगावयास देवाने आम्हांसाठी वचनाकरिता द्वार उघडावे.
”ख्रिस्त येशूचा दास एपफ्रास जो तुमच्यातलाच आहे तो तुम्हास सलाम सांगतो; तो आपल्या प्रार्थनांमध्ये सर्वदा तुम्हासाठी जीव तोडून विनंती करीत आहे की, देवाच्या संपूर्ण इच्छेनुसार तुम्ही परिपूर्ण असून तुमची पूर्ण खात्री होऊन स्थिर असे उभे रहावे.
”आम्ही आपल्या प्रार्थनांमध्ये तुमची आठवण करीत सर्वदा तुम्हा सर्वांविषयी देवाची उपकारस्तुती करतो.
”सदोदित आनंद करा. नित्य प्रार्थना करा. प्रत्येक गोष्टींत उपकार माना कारण तुमच्यासंबधी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे.
”बंधूंनो, आमच्यासाठी प्रार्थना करा.
”शेवटी बंधूनो, आता इतकेच सांगणे आहे की, आम्हासाठी प्रार्थना करीत जा की, जशी तुमच्यामध्ये झाली त्याप्रमाणे प्रभूच्या वचनाची लवकर प्रगती व्हावी व त्याचे गौरव व्हावे;
”तर सर्वांत प्रथम मी हा बोध करतो की, मागण्या, प्रार्थना, विनंत्या व आभारप्रदर्शन सर्व लोकांसाठी कराव्या. आणि विशेषतः राजांकरता आणि जे मोठे अधिकारी आहेत त्या सर्वांकरीता प्रार्थना करा, यासाठी की आपण पूर्ण सुभक्तीत व गंभीरपणात शांतीचे व स्थिरपणाचे असे जीवन जगावे.
”म्हणून माझी अशी इच्छा आहे की सर्व ठिकाणी पुरुषांनी राग व भांडण सोडून पवित्र हात वर करून प्रार्थना करावी.
”तर देवाने अस्तित्वात आणलेली प्रत्येक वस्तू चांगली आहे आणि उपकारस्तुती करून घेतले असता काहीही वर्ज्य नाही. कारण प्रत्येक वेळी ती देवाच्या शब्दाने आणि प्रार्थनेने पवित्र केली जाते.
”तर जी खरोखरी विधवा आहे व तिची काळजी घेण्यासाठी कोणी नाही तिने देवावर आपली आशा ठेवली आहे व ती रात्रंदिवस देवाकडे प्रार्थना व विनंत्या करीत राहते.
”माझ्या पूर्वजांप्रमाणे ज्या देवाची मी शुद्ध विवेकभावाने सेवा करतो, त्या देवाचे मी उपकार मानतो आणि रात्रंदिवस माझ्या प्रार्थनेत तुझी नेहमी आठवण करतो.
”मी आपल्या प्रार्थनांमध्ये सर्वदा तुझी आठवण करून, माझ्या देवाची उपकारस्तुती करतो;
”देव प्राचीन काळांमध्ये आपल्या पूर्वजांशी संदेष्ट्यांच्या द्वारे अनेक वेळेस वेगवेगळ्या मार्गांनी बोलला, परंतु या शेवटच्या दिवसात तो आपल्याशी त्याच्या पुत्राद्वारे बोलला आहे, त्याने पुत्राला सर्व गोष्टींचा वारस म्हणून नेमले. देवाने पुत्राकरवीच विश्व निर्माण केले.
”पवित्र शास्त्रात असे म्हणले आहे; “आज जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल, तेव्हा इस्त्राइल लोकांनी देवाविरुद्ध बंड केले; तशी आपली अंतःकरणे कठीण करू नका.”
”त्यांच्यासाठी देवाने पुन्हा एक वेळ निश्चीत केली असून त्यास तो “आज” हा एक असा दिवस ठरवतो आणि अगोदर सांगितल्याप्रमाणे इतक्या काळानंतर तो दावीदाच्या द्वारे असे म्हणतो, “आज, जर तुम्ही त्याची वाणी ऐकाल, तर आपली अंतःकरणे कठीण करू नका.”
”तर मग आपण देवाच्या कृपेच्या राजासनाजवळ निर्धाराने जाऊ या. यासाठी की, आमच्या गरजेच्या वेळी साहाय्य मिळावे म्हणून आम्हास दया व कृपा प्राप्त व्हावी.
”येशूने आपल्या देहाच्या दिवसात देवाकडे मोठ्याने ओरडून आणि रडून प्रार्थना व विनंत्या केल्या. जो देव त्यास मृत्युपासून वाचवू शकत होता आणि देवाविषयीच्या त्याच्या सदभक्तीमुळे येशूच्या प्रार्थना ऐकण्यात आल्या. जरी तो देवाचा पुत्र होता, तरी त्याने जे दुःख सोसले त्यापासून तो आज्ञाधारकपणा शिकला.
”म्हणून बंधूनो, येशूच्या रक्ताद्वारे आपल्याला परमपवित्रस्थानात जाण्याचे धैर्य आहे.
”पण विश्वासाशिवाय त्यास संतोषवणे अशक्य आहे, कारण जो त्याच्याकडे येतो त्याने विश्वास ठेवला पाहिजे की, तो आहे आणि जे त्यास झटून शोधतात त्यांना प्रतिफळ देणारा आहे.
”म्हणून त्याचे नाव पत्करणाऱ्या “ओठांचे फळ असा स्तुतीचा यज्ञ आपण येशूद्वारे देवाला नित्य अर्पण करावा.”
”म्हणून जर तुमच्यातील कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने देवाकडे मागावे म्हणजे ते त्यास मिळेल कारण तो दोष न लावता सर्वांस उदारपणे देतो. पण त्याने विश्वासाने मागावे व संशय धरू नये कारण जो संशय धरतो तो वाऱ्यामुळे लोटलेल्या व उचबंळलेल्या समुद्रातील लाटेसारखा आहे.
”तुम्ही मागता आणि तुम्हास मिळत नाही; कारण तुम्ही वाईट वासना बाळगून मागता, म्हणजे आपण आपल्या चैनीसाठी खर्चावे म्हणून मागता.
”तुम्ही देवाच्या जवळ या म्हणजे तो तुमच्याजवळ येईल. अहो पाप्यांनो, तुम्ही हात शुद्ध करा; अहो द्विमनाच्या मनुष्यांनो, अंतःकरणे शुद्ध करा. दुःखी व्हा, शोक करा आणि रडा; तुमच्या हसण्याचा शोक होवो; तुमच्या आनंदाची खिन्नता होवो. परमेश्वरासमोर नम्र व्हा, म्हणजे तो तुम्हास उच्च करील.
”तुमच्यातील कोणी संकटात आहे काय? त्याने प्रार्थना करावी. कोणी आनंदी आहे काय? त्याने स्तुतिगान करावे. तुमच्यापैकी कोणी आजारी आहे काय? त्याने मंडळीतील वडीलांना बोलवावे व त्यांना त्याच्यासाठी प्रार्थना करण्यास सांगावे आणि प्रभूच्या नावाने त्याच्यावर तेल लावावे विश्वासाने केलेली प्रार्थना आजारी मनुष्यास बरे करील व प्रभू त्यास उठवील. जर त्याने पापे केली असतील तर प्रभू त्याची क्षमा करील. म्हणून एकमेकांकडे आपल्या पापांची कबुली द्या आणि एकमेकांसाठी प्रार्थना करा. यासाठी की, तुम्ही बरे व्हावे. नीतिमान मनुष्याची प्रार्थना सामर्थ्ययुक्त व परिणामकारक असते. एलीया हा आपल्यासारख्या स्वभावाचा मनुष्य होता. पाऊस पडू नये म्हणून त्याने कळकळीने प्रार्थना केली आणि नंतर साडेतीन वर्षे देशात पाऊस पडला नाही. मग त्याने पुन्हा प्रार्थना केली व आकाशाने पाऊस दिला आणि पृथ्वीने आपले धान्य उपजवले.
”कारण परमेश्वराचे डोळे नीतिमानांवर असतात व त्याचे कान त्यांच्या विनंतीकडे असतात पण वाईट करणार्यावर परमेश्वराची करडी नजर असते.”
”पण सर्व गोष्टींचा शेवट जवळ आला आहे म्हणून समंजस मनाचे व्हा आणि प्रार्थनेसाठी सावध रहा;
”तुम्ही आपली सर्व चिंता त्याच्यावर टाका, कारण तो तुमची काळजी करतो.
”जर आपण आपली पापे कबूल करतो, तर तो विश्वासू व न्यायी आहे म्हणून आपल्या पापांची क्षमा करील आणि आपल्याला सर्व अनीतीपासून शुद्ध करील.
”आणि आपण जे काही मागतो ते त्याच्यापासून आपल्याला मिळते कारण आपण त्याच्या आज्ञा पाळतो आणि त्यास जे आवडते ते करतो.
”आणि आम्हास देवामध्ये धैर्य आहे की, आपण त्याच्या इच्छेप्रमाणे काही मागितले तर तो आपले ऐकेल. आणि आपण जे काही मागतो ते तो ऐकतो, हे आपल्याला ठाऊक आहे म्हणून ज्या मागण्या आपण त्याच्याजवळ केल्या आहेत त्या आपल्याला मिळाल्या आहेत हेही आपल्याला ठाऊक आहे.
”प्रिय बंधू, जसा तुझा आत्मा सुस्थितीत आहे तसे तुला सर्व गोष्टीत सुस्थिती व आरोग्य असावे, अशी मी प्रार्थना करतो.
”आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको.
”आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको.
”आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको.
”आत्मा मंडळ्यास काय म्हणतो, हे ज्याला कान आहेत तो ऐको.”
”