28 – देवदूत

हे सर्वशक्तिमान देवाचे पवित्र शब्द आहेत.
माणसांच्या बोलण्यात आपल्याला रस नसतो.
देवावर प्रेम करणार् या प्रत्येकासाठी... याबद्दल देव असे म्हणतो: देवदूत.

शीर्ष 3 सर्वात महत्वाचे श्लोक

परमेश्वराचा दूत त्याच्या भक्तांभोवती छावणी बांधतो. परमेश्वराचा दूत त्यांचे रक्षण करतो व त्यांना संकट मुक्त करतो.

तो कोणत्याही दूताला असे म्हणाला नाही, तुझ्या वैऱ्याला तुझे पादासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस. सर्व देवदूत देवाच्या सेवेतील आत्मे नाहीत काय? आणि तारणाचा वारसा ज्यांना मिळेल त्यांना मदत करायला ते पाठवले जातात की नाही?

त्याचप्रमाणे पश्चात्ताप करणाऱ्या एका पाप्याबद्दल देवाच्या दूतासमोर आनंद होतो हे मी तुम्हास सांगतो.

कॅनोनिकल क्रमातील प्रत्येक श्लोक - 183 परिच्छेद

परमेश्वर देवाने मनुष्याला एदेन बाग सोडण्याठी भाग पाडले. नंतर परमेश्वराने एदेन बागेची राखण करण्यासाठी बागेच्या पूर्वेकडे करुब देवदूतांना पहारा करण्यास ठेवले. तसेच तेथे जीवनाच्या झाडाकडे जाणाऱ्या मार्गचे रक्षण करण्यासाठी गरगर फिरणारी अरनीची एक तलवार ठेवली.

परमेश्वराचा दूत आणखी म्हणाला, “तुझ्यापासून इतकी संतती होईल की ती मोजणे शक्य होणार नाहीं.” परमेश्वराचा दूत पुढे आणखी म्हणाला,“तू आता गरोदर आहेस आणि तुला मुलगा होईल त्याचे नांव तू इश्माएल म्हणजे ‘परमेश्वर एकतो’ असे ठेव कारण प्रभूने तुझ्या दु:खविषयी ऐकले आहे; (तो तुझे सहाय्य करील.) “इश्माएल जंगली गाढवासारखा रानटी आणि स्वतंत्र असेल. तो सर्वाविरुद्द व सर्व त्या विरुद्ध होतील; तो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी आपल्या भावांच्या जवळ तळ देत फिरेल, परंतु तो त्यांच्या विरुद्व असेल.”

काही काळानंतर परमेश्वराने अब्राहामाला पुन्हा दर्शन दिले. अब्राहाम तेव्हा मम्रेच्या एलोन झाडांच्या राईत राहात होता. एके दिवशी भर दुपारी कडक उन्हाच्या वेळी अब्राहाम आपल्या तंबूच्या दाराशी बसला होता. अब्राहामाने वर पाहिले तों आपल्या समोर तीन पुरुष उभे असलेले त्याला दिसले; त्यांना पाहून अब्राहाम धावत त्यांना सामोरा गेला आणि त्याने त्यांना लवून नमन केले;

त्या दोन पुरुषांनी दारा बाहेरील लोकांस आंधळे केले; म्हणून घरात घुसण्याचा प्रयत्न करणारे ते सर्व तरुण व म्हातारे आंधळे झाले, त्यामुळे अखेर पर्यंत त्यांना घराचे दार सापडलेच नाहीं. ते दोन पुरुष लोटाला म्हणाले, “तुझ्या कुटुंबातील व नात्यातील इतर कोणी लोक म्हणजे तुझे जांवई, मुलगे, मुली किवां इतर नातेवाईक या नगरात आहेत काय? तसे कोणी असतील तर त्यांना आता ताबडतोब हे शहर सोडून बाहेर पडण्यास सांग; कारण आम्ही या नगराचा नाश करणार आहोत. हे नगर किती वाईट आहे ते परमेश्वराने ऐकले आहे आणि म्हणून त्याने आम्हाला या नगराचा नाश करण्यासाठी पाठवले आहे.” म्हणून मग लोट बाहेर गेला व आपल्या जावयांस भेटला. तो त्यांना म्हणाला, “चला उठा, त्वरा करा, व हे शहर सोडून लवकर बाहेर पडा; कारण परमेश्वर या नगराचा नाश करणार आहे.” परंतु लोट गंमत करीत आहे असे त्याच्या जावयांस वाटले. दुसऱ्या दिवशी पहाटे ते दूत लोटाला घाईकरुन म्हणालें, “उठ, ह्या नगराला ताडण होणार आहे; तेव्हा तू तुझी बायको व तुझ्या जवळ असलेल्या तुझ्या दोन मुली यांस घेऊन ताबडतोब येथून नीघ; म्हणजे मग या नगराबरोबर तुमचा नाश होणार नाही, तर तुम्ही आपले जीव वाचवाल.”

परंतु तेवढ्यात, त्याच क्षणाला परमेश्वराच्या दूताने त्याला थांबवले; तो स्वर्गातून ओरडून त्याला म्हणाला,“अब्राहामा! अब्राहामा!”अब्राहामाने उत्तर दिले, “मी येथे आहे.” देवदूत म्हणाला, “तू आपल्या मुलाला मारु नकोस, किंवा त्याला कोणत्याही प्रकारची इजा करु नकोस; कारण आता मला खात्रीने समजले की तू देवाला घाबरतोस आणि त्याचा आदर करतोस; कारण तू माझ्यासाठी आपल्या एकुलत्या एका लाडक्या पुत्रालाही, अर्पण करावयास मागेपुढे न पाहता तयार झालास.”

नंतर स्वर्गातून परमेश्वराच्या दूताने अब्राहामास दुसऱ्यांदा हाक मारली. तो म्हणाला, “परमेश्वर म्हणतो की तू माझ्यासाठी तुझ्या एकुलत्या एका लाडक्या मुलाचा बळी द्यावयांस मागे पुढे न पाहता तयार झालास म्हणून मी परमेश्वर स्वत:ची शपथ घेऊन तुला वचन देती की मी खरोखर तुला आशीर्वाद देईन व तुझी वाढ करीन; मी तुला असंख्य वंशज देईन; तुझी संतती आकाशातील ताऱ्याइतकी, समुद्रकिनाऱ्यावरील वाळू इतकी होईल असे मी करीन; आणि तुझी संतनी आपल्या सर्व शत्रुंचा पराभव करुन त्यांना जिंकेल. पृथ्वीवरील प्रत्येक राष्ट्र तुझ्या वंशजाद्वारे आशीर्वाद पावेल; तू माझ्या सर्व आज्ञा पाळल्यास म्हणून मी हे करीन.”

तेव्हा त्याला एक स्वप्न पडले; स्वप्नात एक उंच शिडी आहे, तिचे एक टोक जमिनीवर व दुसरे टोक वर स्वर्गापर्यंत पाहोचलेले आहे असे त्याने पाहिले;

देवदूत माझ्याशी बोलला; त्याने मला, ‘याकोब’ म्हणून हाक मारली.मी उत्तर दिले, ‘काय आज्ञा आहे?’

याकोबानेही ते ठिकाण सोडले. तो प्रवास करीत असताना त्याला देवदूत भेटले. जेव्हा याकोबाने त्यांना पाहिले तेव्हा तो म्हणाला, “हा देवाचा तळ आहे.” म्हणून त्याने त्या जागेचे नाव ‘महनाइम’ ठेवले.

त्या डोंगरावर त्याने एका जळत्या झुडूपात परमेश्वरच्या दूताला पाहिले. मोशेन असे पाहिले की झुडूप जळत होते परंतु ते जळून खाक होत नव्हते तर जसेच्या तसेच होते. तेव्हा मोशे स्वत:शी म्हणाला, “हे झुडूप जळत असून जळून नष्ट का होत नाही हे मी जरा जवळ जाऊन पाहातो.”

इस्राएल लोकांना घेऊन जाण्यासाठी नेहमीप्रमाणे त्यांच्या पुढे चालणारा परमेश्वराचा दूत इस्राएल लोकांच्या मागे जाऊन उभा राहिला, तेव्हा तो उंच मेघस्तंभ इस्राएल लोकांच्या आघाडीवरून त्यांच्या पिछाडीस गेला. अशा रीतीने तो उंच ढग मिसरचे लोक व इस्राएल लोक यांच्यामध्ये उभा राहिला; तेव्हा इस्राएल लोकांना प्रकाश मिळाला परंतु मिसरच्या लोकांभोंवती अंधार राहिला; त्यामुळे त्या रात्री मिसरचे लोक इस्राएल लोकांना गाठण्यासाठी जराही त्यांच्या जवळ जाऊ शकले नाहीत.

देव म्हणाला, “मी एका दूताला तुमच्याकडे पाठवीत आहे तो तुमच्यापुढे चालून, मी तुमच्यासाठी जे ठिकाण तयार केले आहे तेथे तुम्हांस घेऊन जाईल; तो तुमचे संरक्षण करील.

देव म्हणाला, “माझा दूत तुमच्यापुढे चालून, अमोरी, हित्ती, परिज्जी, कनानी, हिव्वी व यबूसी अशा निरनिराव्व्या लोकांच्या देखत त्या देशात तुम्हाला घेऊन जाईल.

मग सोन्याचे घडीव काम करुन दोन करुब देवदूत करुन ते झाकणाच्या म्हणजे दयासनाच्या दोन्ही टोकांना ठेवावेत. एक देवदूत एका बाजूला व दुसरा, दुसज्या बाजूला असे दयासनाशी एकत्र जोडून अखण्ड सोन्याचे घडवावेत. त्या दूतांचे पंख आकाशाकडे वर पसरलेले असावेत व त्यांच्या पंखांनी दयासन झाकलेले असावे; त्याची तोंडे समोरासमोर असावीत व त्यांची दृष्टी दयासनाकडे लागलेली असावी. “मी तुला पवित्र कराराचा आज्ञापट देईन तो तू पवित्रकोशामध्ये ठेवावा; आणि दयासन त्याच्यावर ठेवावे. मी जेव्हा तुला भेटेन तेव्हा कराराच्या कोशावर ठेवलेल्या देवदतांच्यामधुन मी तुझ्याशी बोलेन; आणि तेथूनच मी इस्राएल लोकांसाठी माझ्या सर्व आज्ञा देईन.

तेव्हा तू आता खाली जा आणि मी सांगतो तेथे लोकांना घेऊन जा; माझा दूत तुजपुढे चालेल व तुला मार्ग दाखवील जेव्हा पाप केलेल्या लोकांना शिक्षा करण्याची वेळ येईल तेव्हा त्यांना शिक्षा केली जाईल.”

तुमच्यापुढे चालण्यास मी माझ्या दूताला पाठवीन आणि कनानी, अमोरी, हित्ती, परिज्जी, हिव्वी व यबूसी लोकांचा मी पराभव करीन व त्यांना तुमचा देश सोडावयास भाग पाडीन.

मोशे परमेश्वराशी बोलण्यासाठी दर्शनमंडपात गेला त्यावेळी त्याने परमेश्वराची वाणी त्याच्याशी बोलताना ऐकली. ती, पाणी आज्ञापटाच्या कोशावरील कोशावरील पवित्र दयासनावरुन दोन करुब दूतांच्या दरम्यान असलेल्या भागातून येत होती. अशा प्रकारे देव मोशेबरोबर बोलला.

पण आम्ही परमेश्वराकडे मदतीची याचना केली. परमेश्वराने आमची प्रार्थना ऐकली आणि आमच्या मदतीसाठी देवदूताला पाठविले. परमेशवराने आम्हाला मिसर देशातून बाहेर आणले.“आता आम्ही कादेशमध्ये आहोत. इथे तुझा प्रदेश सुरु होतो.

बलाम त्याच्या गाढवीवर बसला होता. त्याचे दोन नोकर त्याच्याबरोबर होते. बलाम प्रवास करीत होता तेव्हा देव त्याच्यावर रागावला. परमेश्वराचा दूत रस्त्यावर बलामपुढे येऊन उभा राहिला. देवदूत बलामला थांबवणारहोता. बलामच्या गाढवीने परमेश्वराच्या दूताला रस्त्यात उभे असलेले पाहिले. देवदूताने हातात तलवार घेतली होती. म्हणून गाढवी रस्ता सोडून शेतात गेली. बलामला देवदूत दिसू शकला नाही. म्हणून तो गाढवीवर खूप रागावला. त्याने गाढवीला मारले आणि जबरदस्तीने रस्त्यावर आणले. नंतर परमेश्वराचा दूत रस्ता जिथे अरुंद होता तिथे थांबला. हा दोन द्राक्षांच्या मव्व्यांच्या मधला भाग होता. रस्ताच्या दोन्ही बाजूला भिंती होत्या. गाढवीने पुन्हा परमेश्वराच्या दूताला पाहिले म्हणून ती एका भिंतीला चिकटून चालू लागली त्यामुळे बलामचा पाय भिंतीला लागून चिरडला गेला. म्हणून बलामने गाढवीला पुन्हा मारले. नंतर परमेश्वराचा दूत दुसऱ्या ठिकाणी उभा राहिला. अरुंद रस्ता असलेले हे दुसरे ठिकाण होते. येथे वळायला सुद्धा मुळीच जागा नव्हती गाढवीला त्याला वळसा घालून जाणे शक्य नव्हते. गाढवीने परमेश्वराच्या दूताला पाहिले म्हणून बलाम तिच्यावर बसला असतानाच ती खाली बसली त्यामुळे बलाम खूप रागावला आणि त्याने गाढवीला त्याच्या चालण्याच्या काठीने मारायला सुरुवात केली. नंतर परमेश्वराने गाढवीला बोलते केले. गाढवी बलामला म्हणाली, “तू माझ्यावर का रागावला आहेस? मी तुला काय केले आहे? तू मला तीन वेळा मारलेस.” बलामने गाढवीला उत्तर दिले, “तू मला मूर्ख बनवलेस. जर माझ्या हातात तलवार असती तर मी तुला मारुन टाकले असते.” पण गाढवी बलामला म्हणाली, “बघ मी तुझीच गाढवी आहे. खूप वर्षे तू माझ्यावर बसत आला आहेस. आणि या पूर्वी मी असे काही केले नाही हे तुला माहीत आहे.”‘हे खरे आहे’ बलाम म्हणाला.

नंतर परमेश्वराने बलामाचे डोळे उघडले, तेव्हा त्याला परमेश्वराचा दूत दिसला. तो रस्त्यात तलवार घेऊन उभा होता. त्याने परमेश्वराच्या दूताला रस्त्यात जमिनीपर्यंत वाकून नमस्कार केला. परमेश्वराच्या दूताने बलामला विचारले, “तू तुझ्या गाढवीला तीनदा का मारलेस? तुला थांबवण्यासाठी मी आलो आहे. पण अगदी ऐनवेळी तुझ्या गाढवीने मला पाहिले आणि ती दूर गेली. असे तीन वेळा घडले. जर गाढवी वळली नसती तर आतापर्यंत मी तुला मारले असते आणि तुझ्या गाढवीला जिवंत राहू दिले असते.” तेव्हा बलाम परमेश्वराच्या दूताला म्हणाला, “मी पाप केले आहे. तू रस्त्यात उभा आहेस हे मला माहीत नव्हते. मी जर चूक करीत असेन तर मी घरी परत जाईन.” तेव्हा परमेश्वराचा दूत बलामला म्हणाला, “नाही! तू या लोकांबरोबर जाऊ शकतोस. पण सावध रहा. मी जे सांगेन तेच शब्द बोल.” म्हणून बलाम बालाकाने पाठवलेल्या पुढाऱ्यांबरोबर गेला.

यहोशवानें यरीहोजवळ असतांना समोर पहिलें तों कोणी पुरुष आपल्या हातीं उपसलेली तरवार घेऊन पुढे उभा आहे असें त्याच्या नजरेस पडलें यहोशवानें जवळ जाऊन वीचारलें, तूं आमच्या पक्षाचा कीं आमच्या वैऱ्यांच्या पक्षाचा? तो म्हणाला, नाही; मी येथें परमेश्वराचा सेनापती ह्या नात्यानें आलों आहें. तेव्हां यहोशवानें त्याला दंडवत घालून म्हटलें, स्वामीची आपल्या दासाला काय आज्ञा आहे? परमेश्वराचा सेनापती यहोशवाला म्हणाला, आपल्या पालांतले जोडे काढ; कारण ज्या जागी तूं उभा आहेस ती पवित्र आहे. तेव्हां यहोशवानें तसें केले.

परमेश्वराचा दूत सगळ्या इस्त्राएल लोकांना हें म्हणाला त़ेव्हा त्यांनी मोठा आक्रोश केला

आकाशांतून तारे लढले; त्यांनीं आपआपल्या कक्षांतून सीसराशीं लढाई केली.

आणि परमेश्वराचा दूत त्याला दर्शन देऊन त्याला बोलला, "हे पराक्रमी, वीरा, परमेश्वर तुला अनुकूळ आहे.''

तेव्हा परमेश्वराच्या दूताने आपल्या हातांतल्या काठीचा अग्रभाग सागोतीला व बेखमीर भाकरीला लाविला; मग खडकांतून अग्नि निघाला, आणि त्या अग्नीने सागोती व बेखमीर भाकरी जाळून टाकल्या; परमेश्वराचा दूतहि त्याच्या दृष्टींतून गेला. तेव्हां गिदोनाने पाहिलें कीं तो परमेश्वराचा दूत होता; मग गिदोन बोलला, ''हें प्रभू परमेश्वरा, हाय हाय; कारण कीं म्या परमेश्वराचा दूत तोंडोतोंड पाहिला आहे.

तेव्हां त्या स्त्रीने जाऊन आपल्या नव-याला असें सांगितलें कीं, "देवाचा माणूस माझ्याजवळ आला, आणि त्याचें स्वरूप देवाच्या दूताच्या स्वरूपासारिखें फार भयंकर होतें; यास्तव तो कोठला. हें म्या त्याजवळ विचारिलें नाहीं, आणि त्याने आपलें नांव मला सांगितलें नाहीं.

तेव्हां परमेश्वराचा दूत त्याला बोलला, ''तूं माझें नांव कशासाठीं विचारितोस? तें तर अपूर्व आहे.'' मग मानोहाने शेंरडांतले करडूं नैवेद्दासुध्दा घेऊन खडकावर परमेश्वराजवळ होम केला; तेव्हां मानोहा व त्याची स्त्री पाहत असतां, त्याने अपूर्व केलें. म्हणजे असें झालें कीं जेव्हां जाळ वेदीवरून आकाशांत चढला, तेव्हां परमेश्वराचा दूत त्या वेदीच्या जाळांत चढला, आणि मानोहा व त्याची स्त्री यानी पाहून आपलीं तोंडें भूमीस लावून नमस्कार केला.

तेव्हा परमेश्वराने इस्राएलवर रोगराई ओढवू दिली. सकाळी तिची सुरुवात होऊन नेमलेल्या काळपर्यंत ती राहिली. दान पासून बैरशेबापर्यंत सत्तर हजार माणसे मृत्युमुखी पडली. यरुशलेमच्या संहारासाठी देवदूताचा हात उंचावला पण झाल्या गोष्टीबद्दल परमेश्वराला फार वाईट वाटले. लोकांचा संहार करणाऱ्या देवदूताला परमेश्वर म्हणाला, “आता पुरे तुझा हात खाली घे.” तेव्हा हा देवदूत अरवना यबूसी याच्या खळ्याजवळ होता. लोकांना मारणाऱ्या देवदूताला दावीदाने पाहिले. दावीद परमेश्वराला म्हणाला, “माझे चुकले माझ्या हातून पाप घडले आहे. पण हे लोक मेंढरांसारखे माझ्या मागून आले. त्यांचे काहीच चुकले नाही. तेव्हा तू मला आणि माझ्या कुटुंबियांना शिक्षा कर.”

एका झाडाखाली तो आडवा झाला आणि त्याला झोप लागली. तेव्हा एक देवदूत तिथे आला एलीयाला स्पर्श करुन म्हणाला, “उठ खाऊन घे.” एलीया उठून पाहतो तर निखाऱ्यावर भाजलेली गोड भाकर आणि पाण्याचे मडके शेजारी ठेवलेले होते. एलीयाने ते खाल्ले, पाणी प्याला आणि तो पुन्हा झोपी गेला. आणखी काही वेळाने तो देवदूत पुन्हा त्याच्याजवळ आला त्याने त्याला स्पर्श केला आणि त्याला म्हणाला, “ऊठ आणि थोडे खाऊन घे, नाहीतर पुढचा मोठा प्रवास करायला तुला शक्ती राहाणार नाही.” तेव्हा एलीया उठला त्याने खाल्ले आणि पाणी प्याला. त्याबळावर पुढे तो चाळीस दिवस आणि रात्री चालत राहिला. देवाचा डोंगर होरेब येथपर्यंत तो चालला.

इकडे परमेश्वराचे म्हणणे काय आहे ते मीखाया सांगतच होता. मीखाया म्हणाला, “ऐका परमेश्वर काय म्हणतो ते पाहा परमेश्वर स्वर्गात सिंहासनावर बसलेला मी पाहिला. त्याचे दूत त्याच्या शेजारी उभे आहेत.

तेव्हा परमेश्वराचा दूत एलीयाला म्हणाला, “या सरदारबरोबर. जा व त्याला भिऊ नकोस.”तेव्हा एलीया त्या सरदाराबरोबर राजा अहज्याला भेटायला गेला.

एलीया आणि अलीशा बोलत बोलत पुढे चालले होते. तेवढयात अचानक काही घोडे आणि एक रथ तेथे अवतीर्ण झाले आणि त्यांनी एलीया आणि अलीशाला एकमेकांपासून दूर केले. तो रथ आणि घोडे अग्नीप्रमाणे होते नंतर एका वावटळीमधून एलीया स्वर्गात गेला. अलीशाने ते पाहिले आणि तो ओरडू लागला, “माझ्या बापा! माझ्या बापा! काय हा इस्राएलचा रथ आणि हे स्वर्गीय घोडे स्वार!”अलीशाला एलीयाचे पुन्हा कधीच दर्शन झाले नाही. अलीशाने दु:खाच्या भरात आपले कपडे फाडले.

आणि अलीशाने प्रार्थना केली. तो म्हणाला, “परमेश्वर, माझ्या सेवकाचे डोळे उघड म्हणजे त्याला नीट दिसेल.”परमेश्वराने त्या सेवकाचे डोळे उघडले. तेव्हा त्याला अलीशाच्या भोवती अग्रीचे घोडे आणि रथ डोंगरावर पसरलेले दिसले.

परमेश्वराची प्रार्थना करुन हिज्कीया म्हणाला. “परमेश्वर देवा, करुबांच्यावर राजासनी बसणारा तूच इस्राएलचा देव आहेस. पृथ्वीच्या पाठीवरील सर्व राज्यांचा तू आणि एकमेव तूच नियंता आहेस. आकाश आणि पृथ्वीचा तू निर्माता आहेस,

त्या रात्री परमेश्वराचा दूत बाहेर पडला आणि त्यांने अश्शूरांच्या छावणीतली एक लक्ष पंच्याऐशी हजार माणसे मारली. सकाळी लोक उठून पाहतात तर सर्वत्र प्रेतांचा खच पडलेला.

तेव्हा परमेश्वराने इस्राएलभर रोगराई पसरवली. त्यात 70,000 लोक मृत्युमुखी पडले. यरुशलेमचा नाश करायला देवाने दूत पाठवला. पण त्याने यरुशलेमच्या संहाराला सुरुवात केली तेव्हा परमेवराला ते अरिष्ट पाहून वाईट वाटले. परमेश्वराने हा संहार थांबवायचे ठरवले. परमेश्वर त्या संहारक दूताला म्हणाला, “थांब, पुरे झाले त्या वेळी” परमेश्वराचा दूत अर्णान यबूसी याच्या खळ्याजवळ होत. दावीदाने वर पाहिले तेव्हा त्याला परमेश्वराचा दूत आकाशात उभा असलेला दिसला. त्याने आपली तलवार यरुशलेम नगरावर उपसलेली होती. दावीद आणि पुढाऱ्यांनी नम्रपणे वाकून अभिवादन केले. या सर्वांनी दुखववड्याच्या वेळी घालतात तसे शोक प्रदर्शित करणारे कपडे घातलेले होते.

(पवित्र निवासमंडप आणि होमार्पणाची वेदी, त्याकाळी गिबोनमध्ये उच्च स्थानावर होती. इस्राएल लोक वाळवंटात असताना मोशेने तो पवित्र निवासमंडप बांधला होता. परमेश्वराच्या दूताच्या तलवारीच्या धाकाने दावीद देवापुढे पवित्र निवासमंडपाकडे जाण्यास घाबरत होता.)

अत्यंत पवित्र गाभाऱ्यात बसवण्यासाठी शलमोनाने दोन करुब घडवले. हे करुबही कारागिरांनी सोन्याने मढवले. करुबांच्या एकेका पंखाची लांबी 5 हात होती. त्यांची एकंदर लांबी 20 हात एवढी होती. पाहिल्या करुबाचा एक पंख दालनाच्या एका बाजूच्या भिंतीला स्पर्श करत होता तर दुसरा पंख दुसऱ्या करुबाच्या एका पंखाला.

कोशावरती करुबांच्या पखांनी आपले छत्र धरले होते. कोश आणि त्याचे दांडे त्यांनी झाकले.

यामुळे राजा हिज्कीया आणि आमोजचा मुलगा यशया संदेष्टा यांनी या प्रश्नावर स्वर्गाकडे तोंड करुन मोठ्याने प्रार्थना केली. तेव्हा अश्शूरच्या राजाच्या छावणीवर परमेश्वराने आपला दूत पाठवला. या दूताने अश्शूरांचे सगळे सैन्य, त्यातील सरदार आणि अधिकारी यांना मारुन टाकले. एवढे झाल्यावर अश्शूरचा राजा माघार घेऊन आपल्या देशात परत गेला. त्याच्या प्रजेला त्याची शरम वाटली. राजा त्याच्या दैवताच्या देवळात गेला. तिथे त्याच्या पोटच्या मुलांनी तलवारीने त्याला ठार केले.

तू देव आहेस, परमेश्वरा, तूच फक्त देव आहेस. आकाश तू निर्माण केलेस. स्वर्ग आणि त्यातील सगळे काही तू केलेस. ही पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व काही तू निर्माण केलेले आहेस. सर्व समुद्र आणि त्यांच्यातील सगळयाचा तूच निर्माता आहेस! तू सगळयात जीव ओतलेस. स्वर्गातील देवदूत तुला वाकून अभिवादन करतात व तुझी उपासना करतात.

नंतर एके दिवशी देवपुत्र (देवदूत) परमेश्वराला भेटायला आहे. त्यांच्याबरोबर सैतानही होता.

आणखी एके दिवशी देवपुत्र परमेश्वराला भेटायला आले. त्यांच्याबरोबर सैतानही होता. सैतान परमेश्वराला भेटायला आला होता.

जेव्हा ते घडले तेव्हा पहाटेच्या ताऱ्यांनी गायन केले आणि देवपुत्रांनी आनंदाने जयजयकार केला.

लोक तुला इतके महत्वाचे का वाटतात? तू त्यांची आठवण तरी का ठेवतोस? लोकतुझ्यासाठी इतके महत्वाचे का आहेत? तू त्यांची दखल तरी का घेतोस? परंतु लोक तुला महत्वाचे वाटतात. तू त्यांना जवळ जवळ देवच बनवलेस आणि तू लोकांना गौरवाचे आणि मानाचे मुकुट चढवितोस.

परमेश्वराचा दूत त्याच्या भक्तांभोवती छावणी बांधतो. परमेश्वराचा दूत त्यांचे रक्षण करतो व त्यांना संकट मुक्त करतो.

त्या लोकांना वाऱ्यावर उडूनजाणारा कोंडा बनव. परमेश्वराच्या दूतांकरवी त्यांचा पाठलाग होऊ दे. परमेश्वरा, त्यांचा मार्ग अंधारमय आणि निसरडा होऊ दे. परमेश्वराचा दूत त्यांचा पाठलाग करु दे. मी काहीही चूक केली नाही तरी त्या लोकांनी मला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न केला.

परमेश्वर पवित्र सियोन पर्वतावर येतो. त्याच्या मागे त्याचे लाखो रथ असतात.

आकाशाचे दरवाजे उघडावेत तसा हा प्रकार होता आणि आकाशातील गोदामातून धान्याचा वर्षाव होत राहिला. लोकांनी देवदूताचे अन्न खाल्ले. देवाने त्यांचे समाधान करण्यासाठी भरपूर अन्न पाठवले.

देवाने मिसरच्या लोकांना आपला राग दाखवला. त्याने त्याचे विध्वंसक दूत त्यांच्याविरुध्द पाठवले.

देव तुमच्यासाठी त्याच्या दूतांना आज्ञा देईल आणि तुम्ही जिथे जिथे जाल तिथे ते तुमचे रक्षण करतील. तुम्हाला दगडाची ठेच लागू नये म्हणून ते त्यांच्या हातांनी तुम्हाला धरतील.

परमेश्वर राजा आहे म्हणून राष्ट्रांना भीतीने थरथरु द्या. देव करुबांच्यावर राजा म्हणून बसतो म्हणून जगाला भीतीने थरथरु द्या.

देवदूतांनो, परमेश्वराची स्तुती करा. देवदूतांनो, तुम्ही देवाची आज्ञा पाळणारे सामर्थ्यवान सैनिक आहात. तुम्ही देवाचे ऐकता आणि त्याची आज्ञा पाळता. परमेश्वराच्या सगळ्या सैन्यांनो देवाची स्तुती करा. तुम्ही त्याचे सेवक आहात. देवाला जे हवे ते तुम्ही करा.

देवा, तू तुझ्या दूतांना वाऱ्यासारखे बनवलेस आणि तुझ्या सेवकांना78 अग्रीसारखे.

सर्व देवदूतांनो परमेश्वराची स्तुती करा. त्याच्या सर्व सैनिकांनो, त्याची स्तुती करा.

उज्जीया राजाच्या मृत्यूच्या वर्षीच मी माझ्या प्रभूला पाहिले. तो एका उच्च व विलक्षण सुंदर सिंहासनावर बसला होता. त्याच्या पायघोळ पोशाखाने सर्व मंदिर भरून गेले होते. देवदूत परमेश्वराभोवती उभे होते. प्रत्येक देवदूताला सहा पंख होते. त्यातील दोन पंखांनी ते चेहरा झाकीत. दोनने पाय झाकीत व उरलेल्या दोन पंखांनी उडत. ते देवदूत एकमेकांशी बोलत होते. ते म्हणत होते, “पवित्र, पवित्र, पवित्र सर्वशक्तिमान परमेश्वर परमपवित्र आहे. त्याची प्रभा सगळ्या पृथ्वीला व्यापून राहिली आहे.” देवदूतांचे आवाज फार मोठे होते. त्यांच्या आवाजाने मंदिराच्या दाराची चौकट हादरली नंतर मंदिर धुराने भरून गेले. मी फारच घाबरलो. मी म्हणालो, “हाय रे देवा! आता माझा नाश होणार देवाशी संवाद करण्याइतका मी पवित्र किंवा शुध्द नाही आणि मी ज्या माणसांत राहतो, तीही देवाशी प्रत्यक्ष बोलण्याइतकी शुध्द नाहीत.तरीसुध्दा राजाधिराज, सर्वशक्तिमान परमेश्वराला मी पाहिले आहे.” तेथे वेदीवर अग्नी प्रज्वलित केलेला होता एका सराफ देवदूताने चिमट्याने त्यातील निखारा उचलला. सराफ देवदूत तो निखारा घेऊन माझ्याकडे उडत आला. त्या निखांऱ्याचा स्पर्श त्याने माझ्या तोंडाला केला नंतर तो देवदूत म्हणाला, “हे बघ! ह्या निखाऱ्याच्या स्पर्शाने तुझी सर्व दुष्कृत्ये नाहिशी झाली आहेत. तुझी पापे आता पुसली गेली आहेत.”

सर्वशक्तिमान परमेश्वरा, इस्राएलच्या देवा, करूब देवदूतांचा राजा म्हणून तू सिंहासनी बसतोस. देवा, तुझी आणि तुझीच सत्ता पृथ्वीवरील सर्व राज्यांवर चालते. तूच स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केलीस.

देव म्हणतो:मी ह्या शहराचे रक्षण करीन. आणि त्याला वाचवीन. मी हे माझ्यासाठी आणि माझा सेवक दाविदासाठी करीन.” मग परमेश्वराच्या दूताने जाऊन अश्शूरच्या तळावरील 185,000 माणसांना ठार मारले. सकाळी उठून लोक पाहतात तो त्यांच्या सभोवती प्रेते पडलेली.

उत्तरेकडून एक धुळीचे वादळ येताना मी (यहेज्केलने) पाहिले. तो एक मोठा ढग होता आणि त्यातून आगीचा झोत बाहेर पडत होता. त्याच्याभोवती प्रकाशाची प्रभा फाकली होती. आगीत धगधगणाऱ्या तप्त धातू प्रमाणे तो दिसत होता. त्यामध्ये चार प्राणी होते. ते मनुष्यप्राण्याप्रमाणे दिसत होते. पण त्या प्रत्येक प्राण्याला चार तोंडे आणि चार पंख होते. त्यांचे पाय सरळ होते. त्यांच्या पायांचे तळवे गाईच्या खुरांप्रमाणे होते. ते चकाकी दिलेल्या पितळेप्रमाणे चमकत होते. त्यांच्या पंखाखाली मानवी हात होते. ते चार प्राणी होते. त्या प्रत्येकाला चार तोंडे व चार पंख होते. त्यांचे पंख एकमेकांना स्पर्श करत होते. ते चालताना वळत नव्हते. ते ज्या दिशेकडे पाहत, त्याच दिशेला जात होते. प्रत्येक प्राण्याला चार तोंडे होती. प्रत्येकाचे समोरचे तोंड माणसाचे होते. उजव्या बाजूला सिंहाचे, डाव्या बाजूला बैलाचे व मागच्या बाजूला गरुडाचे तोंड होते. ते चारहीजण दिसायला अगदी सारखे होते. ते प्राणी पंखांचा उपयोग स्वत:ला झाकण्यासाठी करीत. दोन पंखांनी ते जवळ असलेल्या प्राण्याला स्पर्श करीत. ते दोन पंखांनी अंग झाकीत. ते पाहत होते त्याच दिशेने जात होते. वाराजेथे नेईल, तेथे ते गेले. पण चालताना ते वळत तव्हते. ते प्राणी असे दिसत होते: प्राण्यांच्या मध्थेन काहीतरी जळत्या निखाऱ्याप्रमाणे होते. लहान लहान मशाली प्राण्यांमधून आणि त्यांच्या सभोवती फिराव्या तसा तो अग्नी दिसत होता. तो प्रकाश झगझगीतपणे चमकत होता आणि त्यातून वीज चमकत होती.

मी प्राण्यांकडे पाहात होतो तेव्हा मला जमिनीला टेकलेली चार चाके दिसली. प्रत्येक प्राण्यासाठी एक चाक होते. सर्व चाके सारखीच दिसत होती. ती तेजस्वी वैदुर्यापासून केल्याप्रमाणे दिसत होती. एकात दुसरे चाक असल्याप्रमाणे ती दिसत होती. चाके चालताना कुठल्याही दिशेला वळत पण चाके चालताना प्राणी वळत नव्हते. चाकांच्या धावा उंच आणि भयंकर होत्या. चारही चाकांच्या धावांवर सर्वत्र डोळे होते. चाके त्या प्राण्यांबरोबरच फिरत. जर ते प्राणी आकाशात उडाले, तर त्यांच्याबरोबर चाकेही उचलली जात. वारा नेईल तिकडे ते जात व त्याप्रमाणे चाकेही जात. का? कारण प्राण्यांचा वारा (शक्ती) चाकांत होता. म्हणून जर प्राणी हालले, तर चाकेही फिरत. प्राणी थांबले की चाकेही थांबत. जर चाके हवेत उडाली, तर प्राणीही वर जात. का? कारण वारा चाकांत होता.

त्या प्राण्यांच्या डोक्यांवर विलक्षण असे काहीतरी होते. वाडगापालथा घालावा तसे ते दिसत होते. तो वाडगा स्फटिकाप्रमाणे स्वच्छ होता. ह्या वाडग्याखाली, प्रत्येक प्राण्याला पंख होते आणि ते जवळच्या दुसऱ्या प्राण्यापर्यंत पोहोचू शकत होते. दोन पंख एका बाजूला व दोन पंख दुसऱ्या बाजूला पसरवून ते अंग झाकीत. मग मी पंखांचा आवाज ऐकला. प्राण्यांनी हालचाल करताच पंखाचा प्रचंड आवाज होई. तो आवाज प्रचंड पाण्याच्या खळखळाटाप्रमाणे होता. सर्वशक्तिमान देव चालताना व्हावा, तसा तो आवाज मोठा होता. सैन्याच्या आवाजाप्रमाणे अथवा लोकांच्या प्रचंड गर्दीच्या आवाजासारखा तो आवाज होता. प्राणी थांबताच, त्यांचे पंख त्यांच्या बाजूला खाली येत. ते प्राणी थांबले व त्यांनी आपले पंख खाली केले. मग दुसरा एक खूप मोठा आवाज झाला. त्या प्राण्यांच्या डोक्यांवरील वाडग्यातून तो आवाज आला. त्या प्राण्यांच्या डोक्यांवरील वाडग्यातून तो आवाज आला.

मग त्या प्राण्यांचे पंख फडफडले. पंख एकमेकांना भिडताना प्रचंड आवाज झाला. त्यांच्या पुढील चाकांचा खडखडाट झाला. तो आवाज गडगडाटाप्रमाणे होता.

मग मी करुब दूतांवर असलेल्या वाडग्याकडे पाहिले. तो इंद्रनीलाप्रमाणे नितळ निळा दिसत होता. आणि त्यावर सिंहासनासारखे काहीतरी होते. नंतर सिंहासनावर जो बसलेला होता तो तागाचे कपडे घातलेल्याला देव म्हणाला, “करुब दूताच्या खाली असलेल्या चाकांच्या मधल्या जागेतपाऊल टाक. त्यांच्या मधून थोडे निखारे घे. व ते यरुशलेमवर भिरकावून दे.”तो माणूस माझ्या जवळून पुढे गेला. तो करुबाकडे गेला तेव्हा करुब मंदिराच्या दक्षिणेकडील भागात उभे होते. ढगाने आतले अंगण व्यापले. मग करुब दूतांवरुन परमेश्वराची प्रभा फाकली आणि मंदिराच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचली. मग ढगाने मंदिरच व्यापले आणि परमेश्वराच्या प्रभेतून निघालेल्या तेजस्वी प्रकाशाने सर्व अंगणच व्यापले. मग करुबांच्या पंखाचा आवाज ऐकला. सर्वशक्तिमान देव बोलू लागताच होणाऱ्या गडगडाटी आवाजासारखा तोही आवाज प्रचंड होता. बाहेरच्या अंगणापर्यंत तो सहज ऐकू येऊ शकत होता. करुबांच्या मध्ये असलेल्या चाकातल्या दरम्यान जाऊन निखारे आणण्याची आज्ञा देवाने तागाचे कपडे घातलेल्या माणसाला दिली. मग तो त्या ढगात शिरला व एका चाकाजवळ उभा राहिला. मग एका करुबाने हात लांब करुन, त्यांच्यामधील काही धगधगते निखारे उचलले आणि त्या माणसाच्या हाती दिले. मग तो माणूस निघून गेला. (करुबांच्या पंखाखाली माणसाच्या हाताप्रमाणे दिसणारा अवयव होता.)

मग तेथे चार चाके असल्याचे माझ्या लक्षात आले. प्रत्येक करुबाजवळ एक चाक होते. ती चाके नितळ तृणमण्याप्रमाणे दिसत होती. ती चारही चाके सारखीच होती. चाकात चाक असल्याप्रमाणे ती दिसत होती. ती चालताना कोठत्याही दिशेने जात. पण करुब चालताना कोणत्याही बाजूला वळत नसत. ज्या बाजूस त्यांचे डोके होते, त्या बाजूसच ते जात. ते इकडे तिकडे वळत नसत. त्यांच्या सर्वांगावर म्हणजेच पाठींवर, हातांवर, पंखांवर डोळे होतेच पण त्याशिवाय चाकांवरही डोळे होते. “चाकांच्या मधली जागा” असे त्या चाकांना म्हटलेले मी ऐकले. प्रत्येक करुब दूताला चार तोंडे होती. पहिले करुबाचे तोंड, दुसरे माणसाचे तोंड, तिसरे सिंहाचे तोंड व चवथे गरुडाचे तोंड खबार कालव्याजवळच्या दृष्टान्तात मी पाहिलेले प्राणी म्हणजे करुब दूतच होते. मग करुब हवेत उडाले; खबार नदीच्या तीरी पहिला तो हा प्राणी होय. आणि चाकेही त्यांच्याबरोबर वर गेली. जेव्हा करुब पंख पसरुन हवेत उडत, तेव्हा चाके दिशा बदलत नसत. करुब हवेत उडाले, तर चाकेही उडत. ते स्थिर उभे राहिले, तर चाकेही स्थिर राहात. का? कारण प्राण्यांचा वारा (शक्ती) त्यांच्यात होता.

मग परमेश्वराची प्रभा मंदिराच्या उंबरठ्यावरुन करुबांच्या वर जाऊन थांबली. मग करुबांनी पंख पसरले व ते हवेत उडाले. मी त्यांना मंदिर सोडून जाताना पाहिले. चाकेही त्यांच्याबरोबर गेली मग ते देवाच्या मंदिराच्या पूर्वेकडच्या प्रवेशद्वाराशी थांबले. इस्राएलच्या देवाची प्रभा त्यांच्या वरच्या बाजूला होती. मग मी खबार कालव्याजवळ इस्राएलच्या देवाच्या प्रभेखाली पाहिलेल्या प्राण्याला ओळखले आणि माझ्या लक्षात आले की ते प्राणी म्हणजे करुब दूतच होते. प्रत्येक प्राण्याला चार तोंड व चार पंख होते. पंखाखाली मानवी हाताप्रमाणे दिसणारा अवयव होता. खबार कालव्याजवळ पाहिलेल्या चार तोंडाप्रमाणेच करुब दूतांची तोंडे होती. ते जात असलेल्या दिशेकडेच सरळ पाहात होते.

ह्यानंतर करुब दूतांनी पंख पसरले व ते हवेत उडाले. चाकेही त्यांच्याबरोबर गेली. इस्राएलच्या देवाची प्रभा त्यांच्यावर होती.

शद्रख, मेशख, अबेद्नगो भट्टीत पडले. त्यांना अगदी घट्ट बांधले होते. मग नबुखद्नेस्सरने एड्ढदम उडी मारली. तो आश्चर्यचकीत झाला. त्याने आपल्या सल्लागारांना विचारले “आपण तिघांनाच बांधले आणि तिघांनाच भट्टीत टाकले खरे ना?” सल्लागार उत्तरले,” हो महाराज!” मग राजा म्हणाला,” पाहा! मला अग्नीमध्ये चार माणसे चालताना दिसतात. ते बांधलेले नाहीत व जळलेलेही नाहीत. चौथा देवदूताप्रमाणेदिसत आहे.” मग नबुखद्नेस्सर तापलेल्या भट्टीच्या तोंडाजवळ गेला. तो ओरडला,’ शद्रख, मेशख, अबेद्नगो, बाहेर या. परात्पर देवाच्या सेवकांनो, इकडे या. मग ती तिघे आगीतून बाहेर आले. ते बाहेर येताच, प्रांताधिकारी, मुलकी अधिकारी, राजाचे सल्लागार राज्यपाल ह्यांनी त्यांच्याभोवती गर्दो केली. आगीने शद्रख, मेशख व अबेद्नगो जळाले नाही हे त्यांनी पाहिले होते. त्याचे अंग,केस किंवा वस्त्रे काहीच जळाले नव्हते. एवढेच नव्हे तर ते आगीत असूनसुध्दा त्यांच्या अंगाला जळकट वास येत नव्हता. मग नबुखद्नेस्सर म्हणाला शद्रख मेशख व अबेद्नगो यांच्या देवाचे स्तवन करा.त्याने देवदूताला पाठवून आपल्या सेवकांचे आगीपासून रक्षण केले. ह्या तिघांनी आपल्या देवावर निष्ठा ठेवली त्यांनी माझा हुकूम मानला नाही आणि दुसऱ्या दैवताला भजण्या-पूजण्याऐवजी ते मरण्यास तयार झाले.

मी झोपलो असताना, दृष्टान्तात हे सर्व पाहात होतो. मग मी पवित्र देवदूताला स्वर्गातून खाली येताना पाहिले.

त्या पवित्र देवदूतांनी अशी शिक्षा मोठ्याने सुनावली. का? कारण परात्पर देवाचेच प्रभुत्व मानवांच्या सर्व राज्यांवर आहे हे पृथ्वीवरील सर्व लेकांना कळावे, देव त्याच्या इच्छेप्रमाणे ही राज्ये त्याला वाटेल त्या माणसांच्या हाती सोपवितो.त्या राज्यांवर राज्य करण्यासाठी तो नम्र लोकांची निवड करतो.

माझ्या देवाने मला वाचविण्यासाठी, देवदूताला पाठविले देवदूताने सिंहाची तोंडे बंद केली. मी निरपराधी आहे,” हे माझ्या देवाला माहीत आहे म्हणूनच सिंहानी मला मारले नाही. राजा, मी तुझे कधीही काहीही वाईट केले नाही.

प्राचीन राजाच्या समोरून अग्नीची नदी वाहत होती करोडो लोक त्याची सेवा करीत होते. कोट्यावधी लोक त्याच्यासमोर उभे होते. हे दृश्य, न्यायालय सुरू होण्याच्या तयारीत आहे व सर्वांची खाती आत्म उघडली जाणार आहेत, अशा प्रकारचे होते.

मग मला माणसाचा आवाज ऐकू आला. तो उलई नदीवरून आला, तो आवाज मोठ्याने म्हणाला, गाब्रीएल ह्या माणसाला दृष्टान्ताचा अर्थ स्पष्ट कर.” मग माणसाप्रमाणे दिसणारा गाब्रीएल देवदूत माझ्याजवळ आला. मी खूप घाबरलो. मी जमिनीवर पडलो. पण गाब्रीएल मला म्हणाला,” मुला हा दृष्टान्त क्रोधाच्या शेवटच्या वेळेसंबंधी आहे हे समजून घे.”

तेवढ्यात गाब्रिएल माझ्याकडे आला दृष्टान्तात मी ज्याला पाहिले होते तोच हा गाब्रिएल. तो घाईघाईने उडत माझ्याकडे आला. संध्याकाळच्या अर्पणाच्या वेळेला तो आला. मला जाणून घ्यावयाच्या होत्या त्या गोष्टी समजावून घेण्यास गाब्रिएलने मला मदत केली. तो म्हणाला,”दानीएला, मी तुला ज्ञान देण्यासाठी व समजावून सांगण्यासाठी आलो आहे.

मग मला एका हाताचा स्पर्श जाणवला. तो स्पर्श होताच मी हात गुडघे ह्यावर भार टाकून ओणवा झालो मी इतका घाबरलो होतो की थरथर कापत होतो. दृष्टान्तातील माणस मला म्हणाला ‘दानीएला, देव तुझ्यावर खूप प्रेम करतो मी तुझ्याशी बोलेन त्यावर काळजीपूर्वक विचार कर. उभा राहा मला तुझ्याकडेच पाठविले आहे. तो असे म्हणताच मी उभा राहिलो भीतीमुळे अजूनही मी थरथर कापत होतो. मग दृष्टान्तातील माणस पुन्हा बोलू लागला तो म्हणाला, ‘दानीएला, घाबरू नकोस ज्या दिवसापासून तू ज्ञान मिळविण्याचे व देवापुढे नम्र होण्याचे ठरविलेस, त्या दिवसापासून तो तुझी प्रार्थना ऐकत आहे. तू प्रार्थना करीत असल्यामुळेच मी तुझ्याकडे आलो. पण पारसचा राजपुत्र (देवदूत) 21 दिवस माझ्याशी लढत होता व मला त्रास देत होता. पण महत्वाच्या राजपुत्रांपैकी (देवदूतांपैकी) एक मिखाएल माझ्या मदतीला आला. कारण मी तेथे अडकुन पडलो होतो भविष्यात तुझ्या लोकांच्या बाबतीत काय घडणार आहे, हे तुला समजावून सांगायला मी येथे आलो आहे. दानीएला, हा दृष्टान्त भविष्यकाळासंबंधी आहे.’

तो माणूस माझ्याशी बोलत असताना, मी खाली वाकून जमिनीवर डोके टेकविले. मी बोलू शकत नव्हतो. मग माणसाप्रमाणे दिसणाऱ्या एकाने माझ्या ओठांना स्पर्श केला मग मी तोंड उघडले व बोलू लागलो. माझ्यासमोर उभ्या असणाऱ्याला मी म्हणालो,”महाराज दृष्टान्तात मी जे काही पाहिले, त्याने मी अस्वस्थ झालो आहे आणि घाबरलो आहे मी असहाय आहे. “महाराज, मी दानीएल तुमचा सेवक.मी तुमच्याशी कसा बोलू शकेन? माझा धीर खचला आहे व वास घेणेही मला कठीण आहे.” माणसाप्रमाणे दिसणाऱ्याने मला पुन्हा स्पर्श केला त्या स्पर्शाने मला शक्ती आली. मग तो म्हणाला, ‘दानीएला घाबरू नकोस, देवाचे तुझ्यावर खूप प्रेम आहे, तुला शांती लाभो! धीर धर! धीर धर!’ “त्याच्या बोलण्याने मला धीर आला मग मी म्हणालो, महाराज तुम्ही मला धीर दिलात आता तुम्ही बोलू शकता. 2 मग तो म्हणाला, “दानीएला, मी तुझ्याकडे का आलो, तुला माहीत आहे का? लवकरच पारसच्या राजपुत्राशी (देवदूताशी) लढायला मला परत गेले पाहिजे. मी जाईल तेव्हा ग्रीसचा राजपुत्र (देवदूत) येईल. पण दानीएल, जाण्याआधी. प्रथम सत्याच्या ग्रंथात काय लिहिले आहे ते मी तुला सांगितले पाहिजे, त्या दुष्ट देवदूतांच्या विरोधात माझ्या बाजूने मीखाएलशिवाय कोणीही उभा राहणार नाही. मीखाएल तुझ्या लोकांवर राज्य करणारा राजपुत्र (देवदूत) आहे.

“दुष्टान्तातील माणूस म्हणाला, ‘त्या वेळी, महान राजपुत्र (देवदूत) मिखाएल उभा राहील. मिखाएल तुझ्या लोकांचा, यहूद्यांचा प्रमुख आहे, तेव्हा खूप संकटाचा काळ असेल. पृथ्वीवर राष्ट्र निर्माण झाल्यापासून असा काळ कधी आला नसेल, पण दानीएल, त्या वेळी तुझ्या लोकांपैकी ज्यांची नावे जीवनाच्या ग्रंथात नोंदविली गेली असतील, ते सर्व वाचतील.

सियोन वरुन रणशिंग फुंका! माझ्या पवित्र पर्वतावरून मोठ्याने इषारा द्या. ह्या देशात राहणाऱ्या लोकांचा भीतीने थरकाप उडू द्या. परमेश्वराचा खास दिवस येत आहे. परमेश्वराचा खास दिवस अगदी जवळ आला आहे. तो काळोखा, विषण्ण दिवस असेल. तो अंधकारमय व ढगाळ दिवस असेल. सूर्याेदयाच्या वेळी, तुम्हाला पर्वतावर सैन्य पसरलेले दिसेल. ते सैन्य प्रचंड न शक्तिशाली असेल. यापूर्वाे कधी झाले नाही आणि यापुढे पुन्हा असे कधी होणार नाही. धगधगती आग जसा नाश करते, तसा देशाचा नाश हे सैन्य करील. त्यांच्यासमोरची भूमी एदेनच्या बागेसारखी असेल, पण त्यांच्या मागे निर्जन वाळवंट असेल.त्यांच्या तावडीतून काहीही सुटणार नाही. ते घोड्यांप्रमाणे दिसतात सैन्यातील घोड्याप्रमाणे ते धावतात. त्यांचा आवाज ऐका. तो आवाज, पर्वतावर चढणाऱ्या रथांच्या खडखडाटाप्रमाणे आहे. फोलकटे जाळणाऱ्या आगीप्रमाणे तो आवाज आहे. ते बलवान आहेत. ते युध्दासाठी सज्ज आहेत. ह्या सैन्यापुढे लोक भीतीने थरथर कापतात आणि त्यांचे चेहेरे पांढरेफटक पडतात. सैनिक जोरात पळतात. ते तटांवर चढतात. प्रत्येक सैनिक सरळ पुढे कूच करतो. ते आपला मार्ग सोडीत नाहीत. ते एकमेकांना रेटीत नाहीत. प्रत्येकजण आपल्या वाटेने जातो. जरी एकावर वार होऊन तो पडला, तरी दुसरे कूच करीतच राहतात. ते नगरीकडे धाव घेतात. ते त्वरेने तटावर चढतात. ते घरात शिरतात. चोराप्रमाणे ते खिडक्यांतून शिरतात. त्यांच्यापुढे धरणी व आकाश कापते, चंद्र-सूर्य काळे पडतात आणि तारे तळपत नाहीत. परमेश्वर त्याच्या सैन्याला मोठ्याने हाक मारतो. त्याचा तळ फार मोठा आहे. सैन्य त्याच्या आज्ञा पाळते. ते सैन्य खूप बलशाली आहे. परमेश्वराचा खास दिवस हा विलक्षण आणि भयंकर आहे. तो कोण सहन करू शकेल?

रात्री, तांबड्या घोड्यावर आरुढ झालेला एक माणूस मी पाहिला. तो दरीमध्ये हादस्सीमच्या झुडुपांत उभा होता. त्याच्या मागे तांबड्या, तपकिरी आणि पांढऱ्या रंगाचे घोडे होते. मी विचारले, “महाराज, हे घोडे इकडे कशाकरिता?” तेव्हा माझ्याशी बोलत असलेला देवदूत म्हणाला, “हे घोडे इकडे कशाकरिता आलेत हे मी तुला दाखवीन.” मग हादस्सीमच्या झुडुपांत उभा असलेला माणूस म्हणाला, “पृथ्वीवर इकडे तिकडे संचार करायला परमेश्वराने हे घोडे पाठविलेत.” नंतर ते घोडे हादस्सीमच्या झुडुपांत उभ्या असलेल्या परमेश्वराच्या दूताशील बोलले. ते म्हणाले, “आम्ही पृथ्वीवर इकडे तिकडे फिरलो. सर्वत्र स्थैर्य व शांतता आहे.” मग परमेश्वराच्या दूताने विचारले, “परमेश्वरा, यरुशलेमची आणि यहूदाच्या नगरीचे तू समाधान करण्यापूर्वी त्यांची दु:खातून मुक्तता होण्यास आणखी किती वेळ आहे? गेली सत्तर वर्षे तू या नगरींवर कोपला आहेस.” माझ्याशी बोलत असलेल्या परमेश्वराच्या दूताला मग परमेश्वराने उत्तर दिले. परमेश्वर चांगल्या व सांत्वनपर शब्दांत बोलला. मग परमेश्वराच्या दूताने मला पुढील गोष्ट लोकांना कळविण्यास सांगितल्यासर्व शक्तिमान परमेश्वर म्हणतो:“मला यरुशलेम व सियोन यांच्याबद्दल अत्यंत प्रेम वाटते.

मग मी नजर वर वळविली, तेव्हा मला मोजमापाची दोरी घेतलेला एक माणूस दिसला. मी त्याला विचारले, “तू कोठे चाललास?”तो मला म्हणाला, “मी यरुशलेमची मोजणी करायाला चाललोय मला यरुशलेमची लांबी - रुंदी पाहायची आहे.” मग माझ्याशी बोलत असलेला देवदूत निघून गेला. आणि दुसरा देवदूत त्याच्याशी बोलायला गेला. दुसरा देवदूत त्या पहिल्या देवदूताला म्हमाला, “धावत जा, आणि त्या तरुणाला सांग की यरुशलेम मोजमाप करण्यापलीकडे होईल. त्याला पुढील गोष्टी सांग:“यरुशलेम ही तटबंदी नसलेली नगरी असेल. कारण तेथे खूप माणसांचे व प्राण्यांचे वास्तव्य असेल.’ परमेश्वर म्हणतो, ‘मी तिचे रक्षण करणारा अग्नीची भिंत बनेन. तिला वैभव प्राप्त व्हावे म्हणून मी स्वत: तेथे राहीन.”

मग देवदूताने मला मुख्यायाजक यहोशवा दाखविला. योशीया परमेश्वराच्या दूताच्या पुढे होता. सैतान योशीयच्या उजव्या बाजूस उभा होता. सैतान योशीयावर वाईट कृत्ये करीत असल्याचा आरोप करण्यासाठी आला होता. मग परमेश्वराचा दूत म्हणाला, “सैताना, परमेश्वर तुला दोष देतो, आणि तो तुला दोष देतच राहील. परमेश्वराने, त्याची खास नगरी म्हणून यरुशलेमची निवड केली आहे. आगीतून पेटलेल्या काटकीला ओढून काढावे, तसे देवाने यरुशलेमला वाचविले.” यहोशवा देवदूतापुढे उभा होता. त्याने मळकी वस्त्रे घातली होती. मग जवळ उभ्या असलेल्या इतर देवदूतांना हा देवदूत म्हणाला, “यहोशवाची मळकी वस्त्रे काढून घ्या.” नंतर तो देवदूत योशीयाशी बोलला. तो म्हणाला, “आता, मी तुझी सर्व पापे काढून घेतली आहेत. आणि वस्त्रबदल म्हणून तुला नवीन वस्त्रे देत आहे.” मग मी म्हणालो, “त्याच्या डोक्याला स्वच्छ फेटा बांधा” त्याप्रमाणे त्यांनी यहोशवाला स्वच्छ फेटा बांधला. परमेश्वराचा दूत तेथे उभा असतानाच त्यांनी त्याला स्वच्छ वस्त्रेसुध्दा घातली. मग परमेश्वराच्या दूताने यहोशवाला पुढील गोष्टी सांगितल्या: सर्व शक्तिमान परमेश्वर असे म्हणाला, “मी सांगतो त्या प्रमाणे जीवन जग. मी सांगितलेल्या गोष्टी कर. मग माझ्या मंदिराचा तूच मुख्य अधिकारी होशील. मंदिराच्या पटांगणाची तू निगा राखशील. येथे उभ्या असलेल्या देवदूतांप्रमाणे तुलाही माझ्या मंदिरात कोठेही वावरायला मोकळीक असेल.

माझ्याशी बोलणाऱ्या देवदूताला मी विचारले, “महाराज, ह्या गोष्टींचा अर्थ काय?” देवदूत म्हणाला, “ते चार प्रकारचे वारेआहेत. जगन्नियंत्याससोरुन ते आत्ताच आलेत.

तो या गोष्टींविषयी विचार करीत असता, त्यास स्वप्नात प्रभूच्या दूताने दर्शन देऊन म्हटले, “योसेफा, दावीदाच्या पुत्रा, तू मरीयेला आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास घाबरू नकोस, कारण जो गर्भ तिच्या पोटी राहीला आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. ती पुत्राला जन्म देईल आणि तू त्याचे नाव येशू ठेव, तो आपल्या लोकांस त्यांच्या पापांपासून तारील.” प्रभूने संदेष्ट्यांच्याद्वारे जे सांगितले होते ते परिपूर्ण व्हावे यासाठी हे सर्व झाले, ते असे, “पाहा कुमारी गर्भवती होईल व पुत्राला जन्म देईल, आणि त्यास इम्मानुएल हे नाव देतील.” या नावाचा अर्थ, “आम्हाबरोबर देव.” तेव्हा झोपेतून उठल्यावर प्रभूच्या दूताने आज्ञा दिली होती तसे योसेफाने केले, त्याने तिचा आपली पत्नी म्हणून स्वीकार केला,

ते गेल्यावर, प्रभूचा दूत योसेफास स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, “ऊठ, बाळक व त्याची आई यांना घेऊन मिसर देशात पळून जा आणि मी तुला सांगेपर्यंत तेथेच राहा कारण बाळकाचा घात करण्यासाठी हेरोद राजा त्याचा शोध करणार आहे.”

पुढे हेरोद राजा पावल्यावर, पाहा प्रभूचा दूत मिसर देशात योसेफास स्वप्नात दर्शन देऊन म्हणाला, “उठ, बाळकास व त्याच्या आईस घेऊन इस्राएल देशास जा कारण बाळकाचा जीव घ्यावयास जे पाहात होते ते मरून गेले आहेत.”

आणि त्यास म्हणाला, “जर तू देवाचा पुत्र आहेस तर खाली उडी घे, कारण शास्त्रात असे लिहिले आहे की; ‘देव त्याच्या दूतांना तुझ्यासाठी आज्ञा करील आणि तुझे पाय दगडावर आपटू नयेत म्हणून ते तुला आपल्या तळहातावर झेलून घेतील.’”

मग सैतान येशूला सोडून निघून गेल्यावर देवदूत येऊन त्याची सेवा करू लागले.

ते पेरणारा शत्रू हा सैतान आहे; कापणीही युगाची समाप्ती आहे; आणि कापणारे हे देवदूत आहेत; तेव्हा जसे निदण गोळा करून अग्नीत जाळतात तसे युगाच्या समाप्तीस होईल. मनुष्याचा पुत्र आपल्या देवदूतांना पाठवील आणि त्याच्या राज्यातून अडखळण करणाऱ्या सर्व वस्तू व अन्याय करणार्‍यांना जमा करील, आणि त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील; तेथे रडणे व दात खाणे चालेल.

तसे युगाच्या समाप्तीस होईल; देवदूत येऊन नीतिमानातून दुष्टांना वेगळे करतील. आणि त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील; तेथे रडणे व दात खाणे चालेल.

कारण मनुष्याचा पुत्र आपल्या पित्याच्या वैभवात आपल्या स्वर्गदूतांसहित येईल त्यावेळी आणि तेव्हा तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कामाप्रमाणे मोबदला देईल.

सावध असा. ही लहान मुले यांना कमी समजू नका कारण मी तुम्हास सांगतो की, स्वर्गात त्यांचे देवदूत माझ्या स्वर्गातील पित्याचे मुख नेहमी पाहतात.

तुम्हास समजले पाहिजे की, पुनरुत्थानानंतरच्या जीवनात लोक लग्न करणार नाहीत किंवा करून देणार नाहीत, उलट ते स्वर्गात देवदूतासारखे असतील.

मनुष्याचा पुत्र कर्ण्याच्या मोठ्या नादात आपले देवदूत पृथ्वीभोवती पाठवून देईल. ते पृथ्वीच्या चारही कोपऱ्यातून, आकाशाच्या एका सीमेपासून दुसऱ्या सीमेपर्यंत निवडलेल्यांना गोळा करतील.

पण त्या दिवसाविषयी आणि त्या घटकेविषयी पित्यशिवाय कोणीही काही जाणत नाही. स्वर्गातील देवदूतही जाणत नाही किंवा खुद्द पुत्रही जाणत नाही.

मनुष्याचा पुत्र जेव्हा त्याच्या स्वर्गीय गौरवाने आपल्या देवदूतांसह येईल तेव्हा तो त्याच्या गौरवी राजासनावर बसेल.

मी माझ्या पित्याला सांगितले तर तो देवदूतांच्या सहा हजार सैन्याची एक अशा बारा पेक्षा अधिक पलटणी पाठवील, हे तुम्हास कळत नाही काय?

त्यावेळी पाहा, तेथे मोठा भूकंप झाला. परमेश्वराचा दूत स्वर्गातून उतरून तेथे आला. त्याने कबरेच्या तोंडावरची धोंड बाजूला लोटली व तो तीवर बसला. त्याचे रूप चमकणाऱ्या विजेसारखे व त्याचे कपडे बर्फासारखे शुभ्र होते. पहारा करणारे शिपाई खूप घाबरले, ते थरथर कापू लागले आणि ते मरण पावलेल्या मनुष्यांसारखे झाले. देवदूत त्या स्त्रियांना म्हणाला, “भिऊ नका, कारण मी जाणतो की, ज्याला वधस्तंभावर खिळले होते त्या येशूला तुम्ही शोधत आहात. पण तो इथे नाही कारण तो म्हणाला होता, त्याप्रमाणे त्यास मरणातून उठविण्यात आले आहे. या आणि जेथे त्यास ठेवले होते ती जागा पाहा. आता लवकर जा आणि त्याच्या शिष्यांना सांगा, तो मरणातून उठला आहे आणि बघा, तो तुमच्यापुढे गालील प्रांतात जात आहे आणि तुम्ही त्यास तेथे पाहाल. पाहा, मी तुम्हास सांगितले आहे.”

सैतान त्याची परीक्षा पाहत असता तो अरण्यांत चाळीस दिवस राहीला. तो वनपशूंमध्ये होता. आणि देवदूत येऊन त्याची सेवा करीत होते.

देवाशी अप्रामाणिक आणि पापी पिढीत जो कोणी माझी व माझ्या वचनांची लाज धरतो तर मनुष्याचा पुत्रही जेव्हा तो आपल्या पित्याच्या गौरवात पवित्र दूतांसह येईल तेव्हा त्यांची लाज धरील.”

कारण जेव्हा लोक मरण पावलेल्यातून उठतील तेव्हा ते लग्न करणार नाहीत व करून देणार नाहीत त्याऐवजी ते स्वर्गातील देवदूताप्रमाणे असतील.

नंतर तो आपल्या देवदूतास पाठवील व चार दिशातून, पृथ्वीच्या सीमेपासून ते आकाशाच्या सीमेपर्यंत त्याच्या निवडलेल्या लोकांस एकत्र करील.

त्या दिवसाविषयी किंवा त्या घटकेविषयी कोणालाही ठाऊक नाही. स्वर्गातील देवदूतांनाही नाही व पुत्रासही नाही. फक्त पित्याला ठाऊक आहे.

त्या कबरेत आत गेल्या तेव्हा त्या चकित झाल्या. त्यांना एक तरुण पुरूष उजव्या बाजूस बसलेला आढळला. त्याने पांढरा शुभ्र झगा घातला होता. तो त्यांना म्हणाला, भयभीत होऊ नका, तुम्ही नासरेथकर येशू जो वधस्तंभावर खिळला होता त्याचा शोध करीत आहात. पण तो उठला आहे. येथे नाही. त्यांनी त्यास ठेवले होते ती जागा पाहा. जा आणि त्याच्या शिष्यांना व पेत्रालाही सांगा की, तो तुमच्या अगोदर गालील प्रांतात जात आहे, त्याने तुम्हास सांगितल्याप्रमाणे तेथे तो तुम्हास दृष्टीस पडेल.

तेव्हा परमेश्वराचा दूत, धूपवेदीच्या उजव्या बाजूला उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला. त्यास पाहून जखऱ्या भयभीत झाला. परंतु देवदूत त्यास म्हणाला, जखऱ्या भिऊ नको, कारण तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे आणि तुझी पत्नी अलीशिबा हिच्याकडून तुला पुत्र होईल, तू त्याचे नाव योहान ठेव. तेव्हा तुला आनंद व उल्लास होईल आणि त्याच्या जन्माने पुष्कळ लोक हर्षित होतील. कारण तो परमेश्वराच्या दृष्टीने महान होईल आणि तो द्राक्षारस किंवा मद्य कधीच पिणार नाही व तो आईच्या गर्भात असतांनाच पवित्र आत्म्याने भरलेला असेल. तो इस्राएलाच्या संतानांतील अनेकांना, प्रभू त्यांचा देव याच्याकडे वळविण्यास कारणीभूत ठरेल. आणि देवासाठी सिद्ध झालेले असे लोक तयार करायला, वडिलांची अंतःकरणे मुलांकडे आणि आज्ञा न मानणार्‍यांना नीतिमानांच्या ज्ञानाकडे वळवून प्रभूसाठी तयार केलेली प्रजा उभी करावयाला तो एलियाच्या आत्म्याने आणि सामर्थ्याने त्यांच्यापुढे चालेल. मग जखऱ्या देवदूताला म्हणाला, “हे घडणारच असे मी कशावरुन समजू? कारण मी वृद्ध मनुष्य आहे आणि माझी पत्नीसुद्धा उतारवयात आहे.” देवदूताने त्यास उत्तर दिले, “मी देवाच्या पुढे उभा राहणारा गब्रीएल आहे आणि तुझ्याशी बोलायला व तुलाही सुवार्ता सांगायला मला पाठविण्यात आले आहे. पाहा, हे घडेपर्यंत तुला बोलता येणार नाही व तू मुका राहशील कारण माझे शब्द जे योग्यवेळी पूर्णपणे खरे ठरणार आहेत त्या माझ्या शब्दांवर तू विश्वास ठेवला नाहीस.”

अलीशिबेच्या गरोदरपणाच्या सहाव्या महिन्यात देवाने गब्रीएल दूताला गालील प्रांतातील नासरेथ नावाच्या गावी, एका कुमारीकडे पाठवले. तिची दाविदाच्या घराण्यातील योसेफ नावाच्या मनुष्याशी मागणी झाली होती आणि त्या कुमारीचे नाव मरीया होते. देवदूत तिच्याकडे येऊन म्हणाला, अभिवादन! तुझ्यावर कृपा झालेली आहे. प्रभू तुझ्याबरोबर आहे. परंतु ती त्याच्या शब्दाने अस्वस्थ झाली आणि या अभिवादनाचा अर्थ काय असावा याचे ती नवल करू लागली. देवदूत तिला म्हणाला, “मरीये, भिऊ नकोस, देवाने तुझ्यावर कृपा केली आहे. पाहा! तू गरोदर राहशील आणि तुला मुलगा होईल त्याचे नाव तू येशू ठेव. तो महान होईल व त्यास थोर देवाचा पुत्र म्हणतील आणि प्रभू देव त्यास त्याचा पिता दावीद याचे राजासन देईल. तो याकोबाच्या घराण्यावर सर्वकाळासाठी राज्य चालवील आणि त्याच्या राज्याचा अंत होणार नाही.” तेव्हा मरीया दूताला म्हणाली, हे कसे होईल? कारण मला पुरूष ठाऊक नाही. देवदूत तिला म्हणाला, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि थोर देवाचे सामर्थ्य तुझ्यावर सावली करील आणि म्हणून जे पवित्र बाळ जन्मास येईल, त्यास देवाचा पुत्र म्हणतील. बघ, तुझी नातेवाईक अलीशिबा ही सुद्धा म्हातारपणात गरोदर असून तिला पुत्रगर्भ राहीला आहे आणि जिला वांझ म्हणले जाई तिला आता सहावा महिना आहे. कारण देवाला कोणतीही गोष्ट अशक्य नाही. मरीया म्हणाली, खरोखर “मी प्रभूची दासी आहे, आपल्या म्हणण्याप्रमाणे मला होवो.” मग देवदूत तिच्यापासून निघून गेला.

त्याच भागांत, मेंढपाळ रात्रीच्या वेळी रानात राहून आपले कळप राखीत होते. अचानक, देवाचा एक दूत त्यांच्यासमोर प्रकट झाला व प्रभूचे तेज त्यांच्याभोवती पसरले आणि ते खूप भ्याले. देवदूत त्यांना म्हणाला भिऊ नका; जो मोठा आनंद सर्व लोकांस होणार आहे त्याची सुवार्ता मी तुम्हास सांगतो. दावीदाच्या नगरात आज तुमच्यासाठी तारणारा जन्मला आहे! तो ख्रिस्त प्रभू आहे. तुमच्यासाठी ही खूण असेल की, बालक बाळंत्याने गुंडाळून गव्हाणीत निजवलेले तुम्हास आढळेल. मग एकाएकी आकाशातल्या सैन्यांचा समुदाय त्या देवदूताजवळ आला आणि देवदूत देवाची स्तुती करत म्हणाले, “परम उंचामध्ये देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्या मनुष्यांसंबंधी तो संतुष्ट आहे त्यांच्यामध्ये शांती.” मग असे झाले की देवदूत त्यांच्यापासून स्वर्गास गेले, तेव्हा मेंढपाळ एकमेकांना म्हणाले, चला, आपण बेथलेहेमापर्यंत जाऊ आणि घडलेली ही जी गोष्ट परमेश्वराने आम्हास कळवली ती बघू या.

असे लिहिले आहे की, ‘तुझे रक्षण करण्यास तो आपल्या दूतास तुझ्याविषयी आज्ञा करील, आणि तुझा पाय दगडावर आपटू नये म्हणून ते तुला आपल्या हातावर झेलून धरतील.’”

जो कोणी माझ्याविषयीची व माझ्या वचनाविषयी लाज धरील त्यांच्याविषयीची लाज मनुष्याचा पुत्र जेव्हा आपल्या स्वतःच्या, पित्याच्या व पवित्र दूतांच्या गौरवाने येईल तेव्हा धरील.

जो मला इतर लोकांसमोर स्वीकारतो, त्या प्रत्येक मनुष्यास देवाच्या दूतासमोर मनुष्याचा पुत्रही स्वीकारील. परंतु जो मला इतर लोकांसमोर नाकारतो, तो देवदूतांसमोरही नाकारला जाईल.

त्याप्रमाणे ज्यांना पश्चात्तापाची गरज नाही अशा नव्याण्णव नीतिमानांबद्दल होणाऱ्या आनंदापेक्षा पश्चात्ताप करणाऱ्या एका पापी मनुष्याबद्दल स्वर्गात अधिक आनंद होईल, हे मी तुम्हास सांगतो.

त्याचप्रमाणे पश्चात्ताप करणाऱ्या एका पाप्याबद्दल देवाच्या दूतासमोर आनंद होतो हे मी तुम्हास सांगतो.

मग असे झाले की, तो गरीब मनुष्य मरण पावला व देवदूतांनी त्यास अब्राहामाच्या ऊराशी नेऊन ठेवले. नंतर श्रीमंत मनुष्यही मरण पावला व त्यास पुरले गेले.

आणि ते मरणार नाहीत, कारण ते देवदूतासारखे आहेत. ते पुनरुत्थानाचे पुत्र असल्यामुळे ते देवाचे पुत्रही आहेत.

स्वर्गातून एक देवदूत आला व तो त्यास सामर्थ्य देत राहिला

यामुळे त्या अवाक झाल्या असतानाच, अचानक लखलखीत कपडे घातलेले दोन पुरूष त्यांच्या बाजूला उभे राहिले. तेव्हा अतिशय भयभीत होऊन त्यांनी आपले चेहरे जमिनीकडे केली असता ते त्यांना म्हणाले, जो जिवंत आहे त्याचा शोध तुम्ही मरण पावलेल्यांमध्ये का करता? तो येथे नाही; तो उठला आहे! तो गालील प्रांतात असताना त्याने तुम्हास काय सांगितले याची आठवण करा. ते असे की, मनुष्याच्या पुत्राला धरुन पापी लोकांच्या हाती द्यावे, त्यास वधस्तंभावर खिळावे आणि तिसऱ्या दिवशी त्याने उठावे.

परंतु त्यांना त्याचे शरीर सापडले नाही. त्यांनी येऊन आम्हास सांगितले की, त्यांना देवदूतांचे दर्शन झाले आणि देवदूतांनी सांगितले की, तो जिवंत आहे.

आणखी तो त्यास म्हणाला, “मी तुम्हास खरे खरे सांगतो, तुम्ही यापुढे आकाश उघडलेले आणि देवदूतांना चढताना व मनुष्याच्या पुत्रावर उतरत असताना पहाल.”

यरुशलेम शहरास, ‘मेंढरे’ दरवाज्याजवळ एक तळे आहे, ज्याला इब्री भाषेत बेथेसदा म्हणतात, त्याच्याजवळ पाच पडव्या आहेत. त्यामध्ये रोगी, आंधळे, लंगडे, लुळे यांचा मोठा समुदाय पडलेला असे. कारण की देवदूत वेळोवेळी तळ्यांत उतरून पाणी हलवत असे आणि पाणी हलवल्यानंतर त्यामध्ये प्रथम जो जाईल त्यास कोणताही रोग असला तरी तो बरा होत असे.

पण इकडे मरीया बाहेर कबरेजवळ रडत उभी राहिली होती आणि ती रडता रडता तिने ओणवून कबरेत पाहिले; आणि जेथे येशूचे शरीर आधी ठेवलेले होते तेथे ते शुभ्र वस्त्रे परिधान केलेले दोन देवदूत एक डोक्याकडील बाजूस आणि एक पायांकडील बाजूस बसलेले दिसले. आणि ते तिला म्हणाले, “बाई, तू का रडतेस?” ती त्यांना म्हणाली, “त्यांनी माझ्या प्रभूला नेले आणि त्यास कोठे ठेवले हे मला माहीत नाही.”

असे सांगितल्यावर त्यांच्या डोळ्यासमोर तो वर घेतला गेला, आणि मेघांनी त्यास दृष्टीआड केले. नंतर तो जात असता ते आकाशाकडे निरखून पाहत होते, तेव्हा पाहा, शुभ्र वस्त्रे परिधान केलेले दोन पुरूष त्यांच्याजवळ उभे राहिले. आणि ते असे बोलले, “अहो गालीलकारांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिले आहात? हा जो येशू तुम्हापासून वर आकाशात घेतला गेला आहे? तुम्ही त्यास जसे आकाशात जातांना पाहता तसाच तो परत येईल.”

आणि त्यांनी आपले हात प्रेषितांवर टाकून त्यांना सार्वजनिक बंदिशाळेत ठेवले. परंतु त्यारात्री प्रभूच्या दूताने तुरुंगाचे दरवाजे उघडले व त्यांना बाहेर आणून म्हटले, “जा, आणि परमेश्वराच्या भवनात उभे राहून या जीवनाचा सर्व संदेश लोकांस सांगा.”

अशा तुम्हास देवदूतांच्या योगे योजलेले नियमशास्त्र प्राप्त झाले होते, पण तुम्ही ते पाळले नाही.”

परमेश्वराचा दूत फिल्लीपाशी बोलला तो म्हणाला, “ऊठ आणि यरुशलेम शहराहून गज्जा शहराकडे जाते त्या वाटेने दक्षिणेकडे जा.” तो रस्ता वाळवंटातून जातो.

एके दिवशी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास, कर्नेल्याला दृष्टांत झाला, त्याने तो स्पष्टपणे पाहिला, त्या दृष्टांतांत देवाचा एक दूत त्याच्याकडे आला आणि त्यास म्हणाला, “कर्नेल्या!” कर्नेल्य देवदूताकडे पाहून भयभीत होऊन आणि म्हणाला. “काय आहे, प्रभू?” देवदूत कर्नेल्याला म्हणाला, “देवाने तुझी प्रार्थना ऐकली आहे, ज्या गोष्टी तू गरीबांना दिल्या आहेत, त्या देवाने पाहिल्या आहेत देवाला तुझी आठवण आहे.”

म्हणून पेत्राला तुंरूगात ठेवण्यात आले, पण मंडळी सातत्याने पेत्रासाठी देवाकडे प्रार्थना करीत होती. पेत्र दोन शिपायांच्यामध्ये झोपला होता, त्यास दोन साखळ्यांनी बांधले होते, तुरुंगाच्या दाराजवळ आणखी काही शिपाई पहारा देत होते, ती रात्रीची वेळ होती व हेरोदाने असा विचार केला की, दुसऱ्या दिवशी पेत्राला लोकांसमोर आणावे. तेव्हा पाहा, अचानक परमेश्वराचा दूत तेथे उभा राहिला, तुरुंगाच्या खोलीत एकदम प्रकाश पडला, देवदूताने पेत्राच्या कुशीला स्पर्श करून त्यास उठवले, देवदूत म्हणाला, “लवकर ऊठ!” तेव्हा पेत्राच्या हातातील साखळ्या गळून पडल्या. देवदूत पेत्राला म्हणाला, “कपडे घाल व तुझ्या वहाणा घाल,” मग पेत्राने कपडे घातले, मग देवदूत म्हणाला, “तुझा झगा अंगात घाल व माझ्यामागे ये.” मग देवदूत बाहेर पडला व पेत्र त्याच्यामागे चालला, पेत्राला कळत नव्हते की, हे खरोखर काय करीत आहे, त्यास वाटले आपण दृष्टांत पाहत आहोत. पहिल्या व दुसऱ्या फेऱ्यातील पहारेकऱ्यांना ओलांडून पेत्र व देवदूत लोखंडी दाराजवळ येऊन पोहोचले, ते त्यांच्यासाठी आपोआप उघडले, पेत्र व देवदूत दरवाजामधून बाहेर पडले, त्यांनी एक रस्ता पार केला आणि अचानक देवदूत पेत्राला सोडून निघून गेला.

पेत्राला मग कळले की नक्की काय घडले आणि तो म्हणाला, “आता मला समजले की प्रभूने खरोखर त्याचा दूत माझ्याकडे पाठविला व त्याने मला हेरोदाच्या हातातून व यहूदी लोकांचा संपूर्ण अपेक्षाभंग करून मला सोडवले आहे.” या गोष्टींची जाणीव झाल्यावर पेत्र मरीयेच्या घरी गेला, ती योहानाची आई होती, (योहानाला मार्क असेही म्हणत) पुष्कळ लोक त्याठिकाणी जमले होते, ते सर्व प्रार्थना करीत होते. पेत्राने फाटकाचा दरवाजा ठोठावला, तेव्हा रुदा नावाची दासी फाटक उघडण्यासाठी आली. तिने पेत्राचा आवाज लगेच ओळखला आणि ती खूप आनंदित झाली, ती फाटक उघडण्याचेसुद्धा विसरून गेली, ती आतमध्ये पळाली आणि लोकांस तिने सांगितले, “पेत्र दाराजवळ उभा आहे.” विश्वास ठेवणारे रुदाला म्हणाले, “तुला वेड लागले आहे!” परंतु पेत्र दाराजवळ उभा आहे, असे रुदा परत परत अगदी कळकळीने सांगू लागली, म्हणून लोक म्हणाले, “तो पेत्राचा दूत असला पाहिजे.” पण पेत्र बाहेरून फाटक सारखे ठोठावत होता, जेव्हा विश्वास ठेवणाऱ्यांनी फाटक उघडले, तेव्हा त्यांनी पेत्राला पाहिले, ते चकित झाले होते.

हेरोदाने त्यांना भेटण्यासाठी एक दिवस ठरवला, त्यादिवशी हेरोदाने आपला सुंदर दरबारी पोशाख घातला होता, तो न्यायासनावर बसून लोकांसमोर भाषण करू लागला. लोक मोठ्याने आरोळी करून म्हणाले, “ही तर देवाची वाणी आहे, मनुष्याची नव्हे!” हेरोदाने या स्तुतीचा स्वीकार केला. आणि त्याने देवाला गौरव दिला नाही, म्हणून परमेश्वराच्या दूताने त्यावर प्रहार केला, तो किडे पडून मरण पावला.

कारण पुनरुत्थान नाही आणि देवदूत व आत्माही नाही, असे सदूकी म्हणतात; परूशी तर या दोन्ही गोष्टी मान्य करतात.

मी ज्या देवाचा सेवक आहे आणि ज्याची उपासना मी करतो, त्याचा दूत काल रात्री माझ्या बाजूला उभा राहीला. आणि तो दूत म्हणाला, “पौला भिऊ नको! तुला कैसरापुढे उभे राहिलेच पाहिजे, तुझ्याबरोबर प्रवास करणारे सर्व लोक देवाने त्याच्या दयेने तुला दिले आहेत.

आपण देवदूतांचा न्याय करणार आहोत, हे तुम्हास माहित नाही काय? तर या जीवनासंबंधीचा न्याय किती विशेषेकरून आम्ही करू शकणार नाही?

ह्याकारणामुळे देवदूतांकरिता स्त्रीने आपल्यावर असलेल्या अधिकाराचे चिन्ह मस्तकावर धारण करावे हे योग्य आहे.

मी मनुष्यांच्या आणि देवदूतांच्या भाषेत बोललो पण माझ्याठायी प्रीती नसली, तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज असा आहे.

तर जे शुभवर्तमान आम्ही तुम्हास सांगितले त्याच्याहून निराळे शुभवर्तमान जर आम्ही सांगितले किंवा स्वर्गातील आलेल्या देवदूतानेही सांगितले, तरी तो शापित असो.

लीन म्हणवून घेण्याच्या इच्छेने व देवदूतांची उपासना करणाऱ्या, स्वतःला दिसलेल्या गोष्टीवर अवलंबून राहणाऱ्या व दैहिक मनाने विनाकारण गर्वांने फुगणाऱ्या कोणा मनुष्यास तुम्हास तुमच्या बक्षिसास मुकवू देऊ नका;

कारण आज्ञा करणाऱ्या गर्जणेने, आद्यदेवदूतांची वाणी आणि देवाच्या कर्ण्याचा आवाज येईल, तेव्हा प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तात मरण पावलेले प्रथम उठतील.

देवाने कोणत्याही देवदूताला म्हणले नाही कीः “तू माझा पुत्र आहेस; आज मी तुझा पिता झालो आहे?” आणि पुन्हा, ‘मी त्याचा पिता होईन, व तो माझा पुत्र होईल?’

आणि पुन्हा, देव जेव्हा त्याच्या पुत्राला जगामध्ये आणतो, तो म्हणतो, “देवाचे सर्व देवदूत त्यास नमन करोत.”

देवदूताविषयी देव असे म्हणतो, “तो त्याच्या देवदूतांना वायु बनवतो, आणि त्याच्या सेवकांना तो अग्नीच्या ज्वाला बनवतो.”

तो कोणत्याही दूताला असे म्हणाला नाही, तुझ्या वैऱ्याला तुझे पादासन करीपर्यंत तू माझ्या उजवीकडे बैस. सर्व देवदूत देवाच्या सेवेतील आत्मे नाहीत काय? आणि तारणाचा वारसा ज्यांना मिळेल त्यांना मदत करायला ते पाठवले जातात की नाही?

आम्ही ज्या भावी जगाविषयी बोलत आहोत, त्याचे सत्ताधीश म्हणून देवाने देवदूतांची निवड केली नाही. पवित्र शास्त्रामध्ये एका ठिकाणी असे लिहिले आहे “मनुष्य कोण आहे की ज्याची तुला चिंता वाटते? किंवा मनुष्याचा पुत्र कोण आहे की ज्याचा तू विचार करावा? थोड्या काळासाठी तू त्यास देवदूतांपेक्षा कमी केले तू त्यास गौरव व सन्मान यांचा मुकुट घातला आहेस

कारण खरे पाहता, तो देवदूतांच्या साहाय्यास नाही, तर अब्राहामाचे जे वंशज आहेत त्यांना तो मदत करतो,

या कोषावर गौरवाचे करूबीम दयासनावर सावली करीत होते. परंतु आता याबाबत सविस्तर सांगत नाही.

परंतु तुम्ही सियोन पर्वताजवळ आणि जिवंत देवाचे नगर म्हणजे स्वर्गीय यरुशलेम, लाखो देवदूत स्वर्गातील यादीतल्या ज्येष्ठांचा समाज व मंडळी, सर्वांचा न्यायाधीश देव व पूर्ण केलेल्या नीतिमानांचे आत्मे,

लोकांचा पाहुणचार करण्याचे विसरू नका. असे करण्याने काहींनी त्यांच्या नकळत देवदूतांचे स्वागत केले आहे.

त्यांना प्रकट झाले होते की, स्वर्गातून खाली पाठवलेल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने, तुम्हास शुभवर्तमान सांगणार्‍यांनी आता ज्या गोष्टी तुम्हास सांगितल्या, त्यामध्ये ते स्वतःची नाही, पण तुमची सेवा करीत होते. त्या गोष्टी न्याहाळून पाहण्याची इच्छा देवदूतांना आहे.

तो स्वर्गात गेला असून देवाच्या उजवीकडे आहे आणि देवदूत, अधिकारी व सत्ताधीश त्याच्या अधीन आहेत.

पण त्याच्यापेक्षा शक्तीने व सामर्थ्याने मोठे असलेले देवदूतसुद्धा, त्यांच्याविरुद्ध परमेश्वरापुढे निंदा करून त्यांना दोषी ठरवत नाहीत.

प्रियांनो, प्रत्येक आत्म्यावर विश्वास ठेवू नका परंतु ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाहीत याची परीक्षा करा कारण जगात पुष्कळ खोटे संदेष्टे निघाले आहेत. अशाप्रकारे तुम्ही देवाचा आत्मा ओळखा “येशू ख्रिस्त देह धारण करून आला.” हे जो प्रत्येक आत्मा कबूल करतो तो देवापासून आहे.

परंतु आद्यदूत मिखाएल ह्याने जेव्हा मोशेच्या शरीराविषयी सैतानाशी वाद केला तेव्हा तो त्याच्यावर निंदायुक्त आरोप करण्यास धजला नाही तर त्याऐवजी ‘प्रभू तुला धमकावो’, असे म्हणाला.

जे सात तारे तू माझ्या हातात पाहिलेस आणि ज्या सात सोन्याच्या दीपसमया तू पाहिल्यास त्यांचा ‘गुपित’ अर्थ हा आहे की सात समया या सात मंडळ्या आहेत आणि सात तारे हे सात मंडळ्यांचे देवदूत आहेत.

जो विजय मिळवतो, तो अशा रीतीने शुभ्र वस्त्रे परिधान करील, मी त्याचे नाव ‘जीवनाच्या पुस्तकातून’ ‘खोडणारच’ नाही; पण माझ्या पित्यासमोर व त्याच्या दूतांसमोर त्याचे नाव स्वीकारीन,

राजासनाभोवती चोवीस आसने होती आणि त्या आसनांवर शुभ्र कपडे घातलेले व डोक्यावर सोन्याचा मुकुट असलेले चोवीस वडील बसले होते. राजासनापासून विजा, वाणी व मेघगर्जना निघत होत्या. राजासनासमोर सात दिवे जळत होते. ते देवाचे सात आत्मे होते.

तसेच राजासनासमोर काचेच्या समुद्रासारखे काहीतरी दिसत होते. ते ‘स्फटिकासारखे’ स्पष्ट होते. मध्यभागी व राजासनाभोवती चार जिवंत प्राणी होते आणि ते मागून पुढून डोळ्यांनी पूर्ण भरलेले होते. ‘पहिला जिवंत प्राणी सिंहासारखा’ होता ‘दुसरा बैलासारखा होता’ ‘तिसऱ्याचा चेहरा मनुष्यासारखा होता,’ आणि ‘चौथा उडत्या गरुडासारखा होता.’ त्या ‘प्रत्येक जिवंत प्राण्याला सहा पंख होते’ व त्यांना सगळीकडे डोळे होते, त्यांच्या पंखावर आणि आतून डोळे होते, दिवस व रात्र न थांबता ते म्हणत होते. ‘पवित्र, पवित्र, पवित्र,’ हा प्रभू देव सर्वसमर्थ जो होता, जो आहे आणि जो येणार आहे. जो राजासनावर बसलेला आहे तो अनंतकाळपर्यंत जिवंत राहणार आहे त्याचे जेव्हा जेव्हा ते चार जिवंत प्राणी गौरव, सन्मान व उपकारस्तुती करीत होते, तेव्हा तेव्हा ते चोवीस वडील जो राजासनावर बसला आहे त्याच्यापुढे पालथे पडतात आणि जो युगानुयुग जिवंत आहे त्यास नमन करतात आणि आपले मुकुट राजासनासमोर ठेवून म्हणतात “हे प्रभू, आमच्या देवा, तू गौरव, सन्मान आणि सामर्थ्य प्राप्त करून घेण्यास योग्य आहेस, तू सर्व गोष्टी उत्पन्न केल्यास, कारण तू सर्वकाही अस्तित्वात आणले आणि तुझ्या इच्छेमुळे ते झाले आणि उत्पन्न केले.”

आणि मी एक सामर्थ्यशाली देवदूत पाहिला. तो देवदूत मोठ्या आवाजात म्हणाला, “गुंडाळीचे शिक्के तोडून ती उघडण्यास कोण योग्य आहे?”

राजासनाच्या आणि चार जिवंत प्राण्यांच्या व त्या वडीलांच्या मध्यभागी ‘कोकरा’ उभा असलेला मी पाहिला, तो वधलेल्यासारखा होता, त्यास सात शिंगे आणि सात डोळे होते आणि हे ते सर्व पृथ्वीवर पाठविण्यात आलेले देवाचे सात आत्मे होते. तो गेला आणि त्याने जो, ‘राजासनावर बसला होता’, त्याच्या उजव्या हातातून ती गुंडाळी घेतली. आणि जेव्हा त्याने ती गुंडाळी घेतली तेव्हा चार जिवंत प्राणी व चोवीस वडीलजन कोकऱ्यासमोर उपडे पडले, प्रत्येकाजवळ वीणा व प्रत्येकाच्या हातात सुवासिक ‘धूपाने’ भरलेल्या सोन्याच्या वाट्या होत्या, त्या वाट्या म्हणजे पवित्रजनांच्या ‘प्रार्थना’ होत्या.

मग मी पाहिले राजासन आणि, चार जिवंत प्राणी व वडीलजन यांच्यासभोवती अगणित देवदूतांची वाणी ऐकली, त्यांची संख्या ‘अयुतांची अयुते व हजारो हजार होती.’ देवदूत मोठ्या आवाजात म्हणाले, जो वधलेला कोकरा, सामर्थ्य, धन, ज्ञान, बल, सन्मान, गौरव व उपकारस्तुती ही घेण्यास योग्य आहे. प्रत्येक निर्माण केलेली वस्तु आकाशात व पृथ्वीवर, पृथ्वीखाली व समुद्रातील अवघ्याना मी असे गाताना ऐकले की, “जो राजासनावर बसतो त्यास व कोकऱ्याला स्तुती, सन्मान, गौरव आणि सामर्थ्य युगानुयुगापर्यंत असो!” चार जिवंत प्राणी म्हणाले, “आमेन!” मग वडीलजनांनी खाली पडून त्यास अभिवादन केले.

आणि त्यानंतर मी चार देवदूत ‘पृथ्वीच्या चार कोनावर’ उभे राहीलेले पाहीले, त्यांनी पृथ्वीतील चार वाऱ्यास असे घट्ट धरून ठेवले होते की पृथ्वीवर व समुद्रावर आणि कोणत्याही झाडावर वारा वाहू नये. मी दुसरा एक देवदूत पूर्वेकडून वर चढताना पाहिला, त्याच्याजवळ जिवंत देवाचा शिक्का होता; ज्या चार देवदूतांकडे पृथ्वीला व समुद्राला नुकसान करण्याचे सोपवून दिले होते त्यांना तो मोठ्याने ओरडून म्हणाला, “आमच्या देवाचे दास यांच्या कपाळावर आम्ही शिक्का मारीपर्यंत पृथ्वीला व समुद्राला आणि झाडासही नुकसान करू नका.”

तेव्हा राजासन व वडील आणि चार जिवंत प्राणी यांच्यासभोवती सर्व देवदूत उभे होते आणि ते राजासनासमोर पालथे पडून देवाला नमन करीत म्हणाले, आमेन; स्तुती, गौरव, ज्ञान, उपकारस्तुती, सन्मान, सामर्थ्य व बळ ही युगानुयुग आमच्या देवाची आहेत; आमेन.

नंतर देवासमोर सात देवदूत उभे राहिलेले मी पाहिले आणि त्यांना सात कर्णे देण्यात आले. दुसरा एक देवदूत येऊन, ‘वेदीपुढे उभा राहिला.’ त्याच्याजवळ सोन्याचे धुपाटणे होते; राजासनासमोरच्या सोन्याच्या वेदीवर सर्व पवित्रजनांच्या ‘प्रार्थनांसह धुप’ ठेवण्याकरिता त्याच्याजवळ पुष्कळ ‘धूप’ दिला होता. देवदूताच्या हातातून ‘धूपाचा’ धूर पवित्रजनांच्या ‘प्रार्थनांसह’ देवासमोर वर चढला. तेव्हा देवदूताने ‘धुपाटणे’ घेऊन त्यामध्ये ‘वेदीवरचा अग्नी भरून’ पृथ्वीवर टाकला आणि ‘मेघांचा गडगडाट व गर्जना’ झाल्या, ‘विजा’ चमकल्या व भूमिकंप झाला. ज्या सात देवदूतांजवळ सात कर्णे होते ते आपआपले कर्णे वाजवण्यास तयार झाले.

पहिल्या देवदूताने कर्णा वाजवताच ‘रक्तमिश्रित गारा व अग्नी ही आली. ती पृथ्वीवर’ टाकण्यात आली यासाठी की, पृथ्वीचा तिसरा भाग व झाडांचा तिसरा भाग जळून गेला; आणि सर्व हिरवे गवत जळून गेले. दुसऱ्या देवदूताने कर्णा वाजवला आणि तेव्हा अग्नीने पेटलेल्या मोठ्या डोंगरासारखे काहीतरी समुद्रात टाकले गेले आणि समुद्राच्या तिसऱ्या भागाचे रक्त झाले. समुद्रातील तिसरा भाग जिवंत प्राणी मरण पावले आणि तसेच तिसरा भाग जहाजांचा नाश झाला. तिसऱ्या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा मशालीसारखा पेटलेला मोठा ‘तारा आकाशातून खाली पडला.’ तो नद्यांच्या व झऱ्यांच्या तिसऱ्या भाग पाण्यावर पडला; त्या ताऱ्याचे नाव कडूदवणा आणि पाण्याच्या तिसऱ्या भागाचा कडूदवणा झाला; आणि त्या पाण्याने मनुष्यांपैकी पुष्कळ माणसे मरण पावली; कारण ते पाणी कडू झाले होते. चौथ्या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा सूर्याचा तिसरा भाग, चंद्राचा तिसरा भाग व ताऱ्यांचा तिसरा हिस्सा मारला गेला; त्यांचा तिसरा भाग अंधकारमय झाला आणि दिवसाचा व रात्रीचाही तिसरा भाग प्रकाशित झाला नाही. आणि मी पाहिले, तेव्हा एक गरूड आकाशाच्या मध्यभागी उडत होता; आणि मी त्यास मोठ्याने असे म्हणताना ऐकले की, जे तीन देवदूत कर्णे वाजवणार आहेत त्यांच्या कर्ण्याच्या होणाऱ्या आवाजाने पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांवर अनर्थ, अनर्थ, अनर्थ येणार‍!

मग पाचव्या देवदूताने कर्णा वाजवला, तेव्हा एक तारा आकाशातून पृथ्वीवर पडलेला मला दिसला; त्या ताऱ्याला अगाधकूपाची किल्ली दिली होती.

मग सहाव्या देवदूताने कर्णा वाजवला, तेव्हा देवासमोरच्या सोन्याच्या वेदीच्या चार कोपऱ्यांच्या शिंगांमधून आलेली एक वाणी मी ऐकली. ज्या सहाव्या देवदूताजवळ कर्णा होता त्यास ती वाणी म्हणाली, मोठ्या ‘फरात नदीजवळ’ बांधून ठेवलेले जे चार दूत त्यांना मोकळे सोड. तेव्हा मनुष्यांपैकी तिसरा भाग जिवे मारायला तो नेमलेला तास व दिवस व महिना व वर्ष यासाठी जे चार दूत तयार केलेले होते ते सोडण्यात आले. घोडदळांची संख्या वीस कोटी होती; ही त्यांची संख्या मी ऐकली.

मी आणखी एक बलवान देवदूत स्वर्गातून उतरतांना पाहिला; तो मेघ पांघरलेला असून त्याच्या डोक्यावर मेघधनुष्य होते, त्याचे तोंड सूर्यासारखे व त्याचे, पाय अग्निस्तंभासारखे होते, त्याच्याहाती एक उघडलेली लहानशि गुंडाळी होती; त्याने आपला उजवा पाय समुद्रावर व डावा पाय भूमीवर ठेवला; आणि सिंहगर्जनेप्रमाणे तो मोठ्याने ओरडला; आणि जेव्हा तो ओरडला तेव्हा सात मेघगर्जनांनी आपआपले शब्द काढले. त्या सात मेघगर्जनांनी शब्द काढले तेव्हा मी लिहिणार होतो; इतक्यात स्वर्गातून झालेली वाणी मी ऐकली; ती म्हणालीः सात मेघगर्जनांनी काढलेले ‘शब्द गुप्त ठेव,’ ते लिहू नको. ज्या देवदूताला समुद्रावर व भूमीवर उभे राहिलेले मी पाहिले, त्याने ‘आपला उजवा हात स्वर्गाकडे वर केला, आणि जो युगानुयुग जिवंत आहे, ज्याने आकाश व त्यामध्ये जे आहेत, पृथ्वी व तिच्यावर जे आहे ते आणि समुद्र व त्यामध्ये जे आहे ते निर्माण केले, त्याची शपथ वाहून म्हटलेः’ आणखी उशीर होणार नाही; परंतु सातव्या देवदूताची वाणी होईल त्यादिवसात म्हणजे तो देवदूत कर्णा वाजविण्याच्या व बेतात असेल, तेव्हा देवाने ‘आपले दास संदेष्टे’ ह्यांना जाहीर केल्यानुसार ‘त्याचे गूज’ पूर्ण होईल.

स्वर्गातून झालेली जी वाणी मी ऐकली होती ती माझ्याबरोबर पुन्हा बोलताना मी ऐकली. ती म्हणाली, जा आणि समुद्रावर व भूमीवर उभे राहिलेल्या देवदूताच्या हातातली उघडलेली गुंडाळी जाऊन घे. तेव्हा मी त्या देवदूताकडे जाऊन, “ती लहान गुंडाळी” मला दे असे म्हटले. तो म्हणाला, “हि घे आणि खाऊन टाक; ती तुझे पोट कडू करील तरी तुझ्या तोंडाला मधासारखे गोड लागेल.” तेव्हा मी देवदूताच्या हातातून ‘ती लहान गुंडाळी’ घेतली व खाऊन टाकली, ती माझ्या तोंडाला मधासारखी गोड लागली, तरी खाल्ल्यावर माझे पोट कडू झाले. तेव्हा ते मला म्हणाले, अनेक लोक, राष्ट्रे, निरनिराळ्या भाषा बोलणारे व राजे यांच्याविषयी तू पुन्हा ‘संदेश दिला पाहिजे.’

मग सातव्या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा स्वर्गात मोठ्याने आवाज झाला, त्यांचे शब्द असे होतेः ‘जगाचे राज्य हे आमच्या प्रभूचे आणि त्याच्या ख्रिस्ताचे झाले आहे; तो युगानुयुग राज्य करील.’ तेव्हा देवासमोर आपल्या आसनांवर बसलेले चोवीस वडील उपडे पडून देवाला नमन करून म्हणाले ‘हे प्रभू देवा, हे सर्वसमर्था, जो तू आहेस आणि होतास, त्या तुझे आम्ही उपकार मानतो, कारण तुझे महान सामर्थ्य तू आपल्याकडे घेतले आहेस आणि राज्य चालविण्यास सुरूवात केलीस.

आणि स्वर्गात युद्ध झाले; ‘मिखाएल’ व त्याचे दूत हे अजगराबरोबर लढले आणि अजगर व त्याचे दूत हे सुद्धा त्यांच्याशी लढले. पण अजगर जिंकण्यास तितका बलवान नव्हता आणि त्यापुढे स्वर्गात त्यास व त्याच्या दूतांना स्थान उरले नाही.

ते राजासनासमोर आणि त्या चार प्राणी व वडिलांसमोर जणू ‘एक नवे गीत गात होते;’ पृथ्वीवरून विकत घेतलेले जे एक लक्ष चौवेचाळीस हजार जण तेथे होते त्यांच्याशिवाय कोणीही मनुष्य ते गीत शिकू शकला नाही.

यानंतर मला आणखी एक देवदूत आकाशाच्या मध्यभागी उडताना दिसला. त्याच्याजवळ, पृथ्वीवर राहणार्‍या प्रत्येक राष्ट्र, वंश, भाषा बोलणार्‍यांना व प्रत्येक समाजाला सुवार्ता सांगायला, सार्वकालिक सुवार्ता होती. तो मोठ्या आवाजात म्हणत होता, देवाचे भय धरा आणि त्यास गौरव करा; कारण न्यायाची वेळ आली आहे आणि ‘ज्याने आकाश, पृथ्वी आणि समुद्र आणि पाण्याचे झरे हे उत्पन्न केले त्यास नमन करा.’ मग आणखी एक देवदूत त्याच्या मागोमाग आला आणि म्हणाला, “पडली, मोठी बाबेल पडली! कारण तिने सर्व राष्ट्रांना तिच्या व्यभिचाराचा क्रोधरूपी द्राक्षारस पाजला आहे.” आणि तिसरा देवदूत दुसऱ्या दोन देवदूतांच्या मागोमाग आला आणि म्हणाला, जर कोणी त्या पशूला किंवा त्याच्या मूर्तीला नमन करील आणि आपल्या कपाळावर किंवा हातावर त्याची खूण करून घेईल तोसुध्दा ‘देवाच्या क्रोधाचा प्याल्यात निरा घातलेला,’ त्याचा क्रोधरुपी ‘द्राक्षारस पिईल’ आणि पवित्र दूतांसमोर आणि कोकर्‍यासमोर त्यास ‘अग्नी आणि गंधक’ ह्यापासून पीडला जाईल.

मग परमेश्वराच्या भवनातून आणखी एक देवदूत बाहेर आला आणि जो ढगावर बसला होता त्यास त्याने मोठ्या आवाजात म्हटले, “विळा चालव आणि कापणी कर कारण तुझ्या कापणीची वेळ आली आहे; कारण पृथ्वीचे पीक पिकून गेले आहे.” मग जो ढगावर बसला होता त्याने पृथ्वीवर विळा चालवला आणि पृथ्वीची कापणी झाली.

मग आणखी एक देवदूत स्वर्गातील परमेश्वराच्या भवनामधून बाहेर आला; त्याच्याजवळही एक धारदार विळा होता. मग आणखी एक देवदूत वेदीतून बाहेर आला; त्यास अग्नीवर अधिकार होता; आणि ज्याच्याजवळ धारदार विळा होता त्यास त्याने मोठ्या आवाजात ओरडून म्हटले, “तुझा धारदार विळा घे आणि पृथ्वीवरील द्राक्षवेलीचे घड गोळा कर; कारण तिची द्राक्षे पिकली आहेत.” तेव्हा त्या देवदूताने पृथ्वीवर विळा चालवला आणि पृथ्वीच्या द्राक्षवेलीचे पीक गोळा करून ते देवाच्या क्रोधाच्या मोठ्या द्राक्षकुंडात टाकले. यानंतर ते ‘द्राक्षकुंड नगराबाहेर तुडवले गेले;’ व द्राक्षकुंडामधून रक्त वर आले; ते घोड्याच्या लगामापर्यंत चढले आणि शंभर कोसांच्या परिसरात पसरले.

यानंतर मी स्वर्गात आणखी एक महान व आश्चर्यकारक चिन्ह बघितले; ज्यांच्याजवळ ‘सात पीडा’ होत्या, असे सात देवदूत मी पाहिले त्या शेवटल्या पीडा होत्या, कारण देवाचा क्रोध त्यानंतर पूर्ण होणार होता.

आणि त्या भवनातून सात देवदूत बाहेर आले; त्यांच्याजवळ सात पीडा होत्या. त्यांनी स्वच्छ, शुभ्र तागाची वस्त्रे परिधान केली होती आणि आपल्या छातीभोवती सोन्याचे पट्टे बांधले होते. तेव्हा त्या चार प्राण्यांतील एकाने त्या सात देवदूतांना, जो युगानुयुग जिवंत आहे त्या देवाच्या रागाने भरलेल्या, सात सोन्याच्या वाट्या दिल्या. आणि देवाच्या सामर्थ्यापासून व तेजापासून जो धूर निघाला, त्याने परमपवित्रस्थान भरून गेले आणि त्या सात देवदूतांच्या ‘सात पीडा’ पूर्ण होईपर्यंत कोणीही आत जाऊ शकला नाही.

मी परमपवित्रस्थानातून एक मोठी ‘वाणी’ ऐकली; ती त्या सात देवदूतांना म्हणाली, “जा आणि देवाच्या रागाच्या या सात वाट्या पृथ्वीवर ओता.” मग पहिला देवदूत गेला आणि त्याने आपली वाटी पृथ्वीवर ओतली आणि ज्या लोकांवर त्या पशूचे चिन्ह होते व जे त्याच्या मूर्तीला नमन करीत असत त्यांना अतिशय कुरूप आणि त्रासदायक फोड आले. नंतर, दुसर्‍या देवदूताने आपली वाटी समुद्रात ओतली आणि त्याचे मरण पावलेल्या मनुष्याच्या रक्तासारखे रक्त झाले आणि समुद्रात जगणारे सर्व जिव मरण पावले. तिसर्‍या देवदूताने आपली वाटी नद्यांवर व पाण्याच्या झर्‍यांवर ओतली, “आणि त्यांचे रक्त झाले” आणि माझ्या कानी आले की, जलाशयांचा देवदूत म्हणाला, ‘तू’ ‘जो पवित्र आहेस’ आणि होतास तो तू नीतिमान आहेस, कारण तू असा न्याय केलास. कारण त्यांनी पवित्रजनांचे आणि संदेष्ट्यांचे ‘रक्त पाडले,’ आणि तू ‘त्यांना रक्त प्यायला’ दिलेस; कारण ते याच लायकीचे आहेत. वेदीने उत्तर दिले, ते मी ऐकले की, ‘हो, हे सर्वसमर्थ देवा, परमेश्वरा, तुझे न्याय खरे आणि नीतीचे आहेत.’ चौथ्या देवदूताने आपली वाटी सूर्यावर ओतली आणि त्यास लोकांस अग्नीने जाळून टाकण्याची परवानगी देण्यात आली होती. लोक भयंकर उष्णतेने जळाले व त्यांनी या पीडांवर ज्याला अधिकार आहे त्या देवाच्या नावाची निंदा केली आणि त्यास गौरव द्यायला त्यांनी पश्चात्ताप केला नाही. पाचव्या देवदूताने आपली वाटी त्या पशूच्या राजासनावर ओतली आणि त्याचे राज्य ‘अंधकारमय झाले,’ आणि त्या क्लेशांत लोकांनी आपल्या जीभा चावल्या; त्यांनी आपल्या क्लेशांमुळे आणि आपल्या फोडांमुळे ‘स्वर्गीय देवाची’ निंदा केली आणि आपल्या कृतींचा पश्चात्ताप केला नाही. सहाव्या देवदूताने आपली वाटी महान फरात नदीवर ओतली आणि पूर्वेकडील राजांचा मार्ग तयार व्हावा म्हणून तिचे ‘पाणी आटवले गेले.’

सातव्या देवदूताने आपली वाटी अंतराळात ओतली व परमेश्वराच्या भवनामधून, राजासनाकडून एक मोठा आवाज आला; तो म्हणाला, “झाले.”

मग त्या सात वाट्या घेणारे जे सात देवदूत होते त्यांच्यातला एक येऊन माझ्याशी बोलला आणि म्हणाला, “ये, त्या अनेक जलांवर जी बसली आहे त्या महावेश्येचा न्यायनिवाडा मी तुला दाखवतो. पृथ्वीच्या राजांनी ‘तिच्याबरोबर जारकर्म केले’ आणि पृथ्वीवर राहणारे ‘तिच्या’ जारकर्माच्या द्राक्षारसाने मस्त झाले.” तेव्हा दूताने मला पवित्र आत्म्यामध्ये अरण्यात नेले; आणि मला एका किरमिजी रंगाच्या पशूवर बसलेली एक स्त्री दिसली. तो देवनिंदात्मक नावांनी भरलेला होता आणि त्यास सात डोकी व ‘दहा शिंगे’ होती.

ह्यानंतर मी दुसऱ्या एका देवदूताला स्वर्गातून खाली उतरतांना पाहिले. त्यास मोठा अधिकार होता; ‘आणि त्याच्या तेजाने पृथ्वी प्रकाशित झाली.’

मग एका बलवान देवदूताने मोठ्या जात्याच्या तळीसारखा एक दगड घेतला, तो समुद्रात फेकला आणि तो म्हणाला, अशीच ती मोठी नगरी बाबेल जोरात खाली टाकण्यात येईल, आणि पुन्हा मुळीच सापडणार नाही.

तेव्हा ते चोवीस वडील व चार जिवंत प्राणी पालथे पडले, त्यांनी ‘राजासनावर बसलेल्या’ देवाला नमन केले आणि ते म्हणालेः आमेन; ‘हालेलूया.’

आणि मी बघितले की, एक देवदूत सूर्यात उभा होता; तो आकाशात ‘उडणार्‍या सर्व पक्ष्यांना’ मोठ्या आवाजात ओरडून म्हणालाः या आणि देवाच्या मोठ्या ‘भोजनासाठी जमा व्हा;

आणि मी बघितले की, एक देवदूत आकाशामधून खाली आला; त्याच्या हातात अगाधकूपाची किल्ली व एक मोठी साखळी होती. आणि ज्याला ‘दियाबल’ आणि ‘सैतान’ म्हणतात त्या पुरातन ‘सर्पाला’ म्हणजे त्या अजगराला त्याने धरले, एक हजार वर्षांसाठी त्यास बांधले,

मग ज्या सात देवदूतांनी त्या सात शेवटल्या पीडांनी भरलेल्या, सात वाट्या घेतल्या होत्या त्यांच्यातला एक येऊन माझ्याशी बोलला आणि मला म्हणाला, “इकडे ये, मी तुला वधू, कोकर्‍याची नवरी दाखवतो.” तेव्हा त्याने ‘मला’ आत्म्याने एका मोठ्या ‘उंच डोंगरावर नेले आणि त्याने मला ती पवित्र नगरी यरुशलेम’ देवाकडून स्वर्गातून खाली उतरतांना दाखवली.

आणि त्याने ‘तटाचे माप घेतले’ ते मनुष्याच्या म्हणजे त्या दूताच्या हाताप्रमाणे एकशे चव्वेचाळीस हात भरले;

ज्या मनुष्याने या गोष्टी ऐकल्या आणि पाहिल्या तो मनुष्य मी, योहान आहे. मी जेव्हा या गोष्टी ऐकल्या आणि पाहिल्या, तेव्हा या गोष्टी मला दाखवीत असलेल्या देवदूताच्या पायाशी नमन करण्यास मी पालथा पडलो. परंतु तो देवदूत मला म्हणाला, “असे करू नको. मी तुझ्याबरोबर आणि तुझे भाऊ संदेष्टे, जे या पुस्तकात नमूद केलेल्या वचनांचे पालन करतात, त्यांच्याबरोबर काम करणारा देवाचा एक दास आहे. देवाला नमन कर.”

“तुमच्या आपापल्या मंडळ्यांसाठी याबाबतीत साक्ष देण्याकरिता आपला देवदूत मी, येशूने पाठविलेला आहे. मी दाविदाच्या कुळातील एक ‘अंकुर’ व वंशज आणि पहाटेचा तेजस्वी तारा आहे.”

Marathi - मराठी - MR

MRIRV'17 - Marathi Indian Revised Version - 2017

This Bible text is from Marathi Indian Revised Version IRV 2019
https://open.bible/bibles/marathi-bridge-text-bible/
provided by: Bridge Connectivity Solutions Pvt Ltd, available by Creative Commons CC-BY-SA-4.0,
and this new compilation is shared as www.creativecommons.org/licenses/by-sa/4.0.
Languages are made available to you by www.ipedge.net