02 – देव

हे सर्वशक्तिमान देवाचे पवित्र शब्द आहेत.
माणसांच्या बोलण्यात आपल्याला रस नसतो.
देवावर प्रेम करणार् या प्रत्येकासाठी... याबद्दल देव असे म्हणतो: देव.

शीर्ष 3 सर्वात महत्वाचे श्लोक

‘प्रभू देव जो आहे’, जो होता आणि जो येणार आहे, ‘जो सर्वसमर्थ’ तो म्हणतो ‘मी अल्फा आणि ओमेगा आहे.’

ज्या देवाने जग व त्यातले अवघे निर्माण केले तो स्वर्गाचा व पृथ्वीचा प्रभू असून हातांनी बांधलेल्या इमारतीत राहत नाही.

आणि कोणतीही निर्मित गोष्ट त्याच्यापासून लपलेली नाही आणि ज्याच्यापाशी आम्हास सर्व गोष्टींचा हिशोब द्यावयाचा आहे, देवासमोर सर्व गोष्टी उघड व स्पष्ट अशा आहेत.

कॅनोनिकल क्रमातील प्रत्येक श्लोक - 187 परिच्छेद

देवाने आकाश व पृथ्वी निर्माण केली.

अब्राम नव्याण्णव वर्षांचा झाला तेव्हा परमेश्वर त्याच्याशी बोलला परमेश्वर म्हणाला, “मी सर्वशक्तिमान देव आहे; माझ्यासाठी पुढील प्रमाणे गोष्टी कर: माझ्या आज्ञा पाळ, आणि योग्य मार्गाने चाल व सात्विकतेने राहा.

मग मोशे देवाला म्हणाला, “परंतु मी जर इस्राएल लोकाकडे जाऊन म्हणालो, ‘तुमच्या पूर्वजांचा देव याने मला तुमच्याकडे पाठवले आहे;’ तर मग ते लोक विचारतील ‘त्याचे नाव काय आहे?’ मग मी त्यांना काय सांगू?” मग देव मोशेला म्हणाला, “त्याचे नाव ‘जो मी आहे तो मी आहे’असे आहे, हे त्यांना सांग. तू इस्राएल लोकाकंडे जाशील तेव्हा ‘मी आहे’ ने मला पाठवले आहे असे त्यांना सांग. देव मोशेला आणखी म्हणाला, याव्हे हा तुमच्या पूर्वजांचा म्हणजे अब्राहामचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव आहे असे तू त्यांना सांग. माझे नांव नेहमीच ‘याव्हे’ असेल. इस्राएल लोक पिढ्यन्पिढ्या मला त्याच नांवाने ओळखतील; ‘त्याच याव्हेने मला तुमच्याकडे पाठवले आहे’ असे त्यांना सांग!”

परमेश्वर माझे सामर्थ्य आहे. तो माझे रक्षण करितो. मी त्याची स्तुतिस्तोत्रे गाईन;परमेश्वर माझा देव आहे; तो माझ्या पूर्वजाचा देव आहे; मी त्याचे गौरव करीन. परमेश्वर महान योद्धा आहे; त्याचे नांव याव्हे आहे.

“हे परमेश्वर तुझा उजवा हात आश्चर्यकारकरीत्या बलशाली आहे; त्या हाताने तू शत्रूंचा चुराडा करून टाकलास.

परमेश्वर मोशेपुढून गेला व म्हणाला, “मी याव्हे म्हणजे प्रभु आहे; मी दयाळू, कनवाळू, मंदक्रोध (लवकर राग न येणारा,) महान प्रेमाने पुरेपूर भरलेला व विश्वास ठेवण्यास पात्र असा देव आहे. परमेश्वर हजारो लोकांवर दया करतो; तो लोकांच्या वाईट कर्माची त्यांना क्षमा करतो; परंतु तो दोषी लोकांना शिक्षा करावयास विसरत नाही; परमेश्वर फक्त लोकांनाच शिक्षा करतो असे नाही परंतु त्यांची मुले, त्यांची नातवंडे व पतवंडे ह्यांना म्हणजे त्यांच्या तिसऱ्या चौथ्या पिढीपर्यंत, त्यांच्या पूर्वजाच्यां अपराधाबद्दल शिक्षा भोगावयास लावतो.”

दुसऱ्या कोणत्याही दैवतांची पूजा करु नका; मी ‘याव्हे’ (कानाह) आहे; हे माझे नांव आहे; मी ईर्ष्यावान देव आहे.

पण मी तुला सत्य सांगतो. मी नक्कीच जिवंत आहे आणि माझी प्रभा नक्कीच साऱ्या पृथ्वीवर भरून आहे. हे जसे खरे आहे तसेच खरेपणाने मी तुला वचन देतो.

देव माणूस नाही. तो खोटे बोलणार नाही. देव म्हणजे काही माणूस नाही. त्याचे निर्णय बदलणार नाहीत. जर परमेश्वराने सांगितले की तो एखादी गोष्ट करील. तर तो ती करीलच. जर परमेश्वराने वचन दिले तर तो ते वचन दिलेली गोष्ट करीलच.

कारण मूर्तीपूजेचा त्याला तिटकारा आहे. परमेश्वर देव ईर्ष्यावान् असून तो क्षणात भस्म करणारा अग्नी आहे.

परमेश्वर हाच खरा देव आहे हे तुम्हाला कळावे म्हणून त्याने तुम्हाला हे दाखवले. त्याच्यासारखा दुसरा देव नाही. 3तुम्हाला शिकवण द्यावी म्हणून त्याने आकाशातून आपली वाणी ऐकवली. पृथ्वीवर आपला महान अग्नी त्याने दाखवला व त्यातून त्याचे शब्द तुम्ही ऐकले.

“हे इस्राएल लोकहो, ऐका! परमेश्वर हाच आपला देव आहे. परमेश्वर एकच आहे.

“तेव्हा लक्षात ठेवा तुमचा देव परमेश्वर हाच एक देव आहे. त्यावर विश्वास ठेवा. तो आपला करार पाळतो. त्याच्यावर प्रेम करणाऱ्या आणि त्याच्या आज्ञा पाळणाऱ्या लोकांवर व त्यांच्या पुढच्या हजार पिढ्यांवर तो दया करतो. पण त्याचा द्वेष करणाऱ्यांना तो शासन करतो. तो त्यांचा नाश करील. त्याचा द्वेष करणाऱ्यांना शासन करण्यास तो विलंब करणार नाही.

कारण परमेश्वर तुमचा देव आहे तो देवांचा देव व प्रभुंचा प्रभु आहे. तो महान परमेश्वर आहे. तो विस्मयकारी आहे. त्याला सर्व जण सारखेच आहेत. तो पक्षपात करत नाही की लाच घेत नाही. नवीन दगडी पाट्या

“तो आहे दुर्ग आणि त्याची कृती परिपूर्ण! कारण चोखाळतो तो उचित मार्ग! देवच खरा आणि विश्वासू न्यायी आणि सरळ.

देव सनातन आहे. तो तुझे आश्रयस्थान आहे. देवाचे सामर्थ्य सर्वकाळ चालते!. तो तुझे रक्षण करतो. तुझ्या शत्रूंना तो तुझ्या प्रदेशातून हुसकावून लावेल. ‘शत्रूंना नष्ट कर’ असे तो म्हणतो.

यहोवासारखा कोणी पवित्र नाही,कारम तुझ्यावाचून कोणी नाही;आमच्या देवासारखा कडकही कोणी नाही.

“पण परमेश्वरा, तू खरोखरच इथे पृथ्वीवर आमच्यामध्ये कायम राहाशील का? हे विस्तीर्ण आकाश आणि स्वर्ग यांतही तू मावत नाहीस. तेव्हा हे मी बांधलेले मंदिरही तुझ्यासाठी अपुरेच आहे.

पण परमेश्वरालाच इस्राएलची दया आली. इस्राएलवर त्याने आपली कृपादृष्टी वळवली. अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांच्याशी त्याने केलेल्या करारामुळे त्याने हे केले. परमेश्वराला इस्राएल लोकांचा समूळ नाश करायचा नव्हता. त्याला त्यांना अद्याप टाकून द्यायचे नव्हते.

लोक हो, परमेश्वराचे कृतज्ञतेने स्मरण करा, कारण तो चांगला आहे. त्याचे प्रेम चिरंतन आहे.

“आणि शलमोना, माझ्या मुला, आपल्या वडीलांच्या देवाला जाणून घे. शुध्द मनाने देवाची सेवा कर. देवाच्या सेवेत मनोमन आनंद मान. कारण परमेश्वरच सर्वांच्या अंत:करणाचा ठाव घेतो. आपले सर्व विचार त्याला कळतात. आपण मदतीसाठी परमेश्वराकडे गेलो तर आपल्याला उत्तर मिळते. पण परमेश्वराकडे पाठ फिरवली तर मात्र तो आपल्याला कायमचा सोडून जातो.

महिमा, पराक्रम, शोभा, विजय आणि सन्मान ही सर्व तुझीच आहेत कारण स्वर्ग - पृथ्वीवर जे जे काही आहे ते तुझेच आहे. परमेश्वरा, हे राज्य तुझेच आहे. या सागळ्यांचा शास्ता आणि मुकुटमणी तूच आहेस. वैभव आणि सन्मान यांचा स्रोत तूच. सर्वांवर तुझा अधिकार आहे. सत्ता आणि सामर्थ्य तुझ्या हातांत एकवटले आहे. कोणालाही थोर आणि बलवान करणे तुझ्याच हातात आहे.

तो म्हणाला,“आमच्या पूर्वजांच्या परमेश्वर देवा, स्वर्गातील परमेश्वर तूच आहेस. सर्व राष्ट्रांमधल्या सर्व राज्यांचा तूच शास्त्ता आहेस. सगळे सामर्थ्य आणि सत्ता तुझ्या ठायी आहे. कोणीही तुझ्याविरुध्द जाऊ शकत नाही.

देवा, इस्राएलच्या परमेश्वरा, तू फार चांगला आहेस. तू आमच्यापैकी काहींना अजून जिवंत ठेवले आहेस. आम्ही अपराधी आहोत हे आम्हाला मान्य आहे. आमच्या पापाचारणामुळे आम्हाला तुझ्यापुढे उभे राहता येत नाही.

तू देव आहेस, परमेश्वरा, तूच फक्त देव आहेस. आकाश तू निर्माण केलेस. स्वर्ग आणि त्यातील सगळे काही तू केलेस. ही पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व काही तू निर्माण केलेले आहेस. सर्व समुद्र आणि त्यांच्यातील सगळयाचा तूच निर्माता आहेस! तू सगळयात जीव ओतलेस. स्वर्गातील देवदूत तुला वाकून अभिवादन करतात व तुझी उपासना करतात.

“ईयोब, तू देवाला खरोखरीच समजू शकतोस असे तुला वाटते का? त्या सर्वशक्तिमान देवाला समजणे अशक्य आहे.

“परमेश्वरा सर्वकाही तूच करु शकतोस ते मला माहीत आहे. तू योजना आखतोस आणि त्या प्रत्यक्षात येण्यास कोणीही आणि काहीही प्रतिबंध करु शकत नाही.

परंतु माझे स्वामी स्वर्गातील राजा त्या लोकांना हसतो.

देव चांगला न्यायाधीश आहे आणि तो त्याचा क्रोध केव्हाही व्यक्त करु शकतो.

दुष्ट माणूस मनातल्या मनात म्हणतो, “देव नाही” पापी लोक फार भयानक आणि कुजक्या गोष्टी करतात त्यांच्यातला एकही जण चांगल्या गोष्टी करीत नाही. परमेश्वर स्वर्गातून खाली पाहात होता. त्याला शहाणे लोक शोधायचे होते शहाणेलोक मदतीसाठी देवाकडे वळतात. परंतु प्रत्येकजण देवापासून दूर गेला आहे. सर्वलोक वाईट झाले आहेत. एकही माणूस चांगली गोष्ट करत नव्हता.

देवा, जे तुझ्यावर विश्वास ठेवतात त्यांना तू मदत करतोस. ते लोक तुझ्या उजवीकडे उभे राहतात तेव्हा आता तुझ्या एका भक्ताची प्रार्थना ऐक.

स्वर्ग देवाचा महिमा गातात. आणि आकाश देवाने आपल्या हाताने ज्या चांगल्या गोष्टी केल्या आहेत त्या दाखवते.

परमेश्वर माझा मेंढपाळ आहे, मला ज्याचीगरज आहे ते मला नेहमी मिळत राहील.

परमेश्वराच्या आवाजातून त्याची शक्ती कळते. त्याचा आवाज त्याचे गौरव दाखवते.

परमेश्वराने स्वर्गातून खाली पाहिले. त्याला सर्व लोक दिसले. त्याने त्याच्या सिंहासनावरुन पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांकडे पाहिले.

दुष्ट लोक चांगल्या माणसांविरुध्द वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखतात. दुष्ट लोक चांगल्या माणसांसमोर आपल्या रागाचे प्रदर्शन दात ओठ खाऊन करतात. परंतु आपला देव त्या दुष्टांना हसतो. त्यांचे काय होणार आहे ते त्याला माहीत आहे.

देव सर्व जगाचा राजा आहे. त्याच्या स्तुतिपर गाणे गा. देव त्याच्या पवित्र सिंहासनावर बसतो. तो सगळ्या देशांवर राज्य करतो.

मला दूर लोटू नकोस आणि तुझा पवित्र आत्मा माझ्यातून काढून घेऊ नकोस.

परमेश्वरा, तुझे प्रेम चांगले आहे. मला तुझ्या खऱ्या प्रेमाने उत्तर दे. तुझ्यातल्या सगळ्या दया बुध्दीने तू माझ्याकडे वळ आणि मला मदत कर.

त्याच्या गौरवपूर्ण नावाची सदैव स्तुती करा. त्याच्या गौरवाने सारे जग भरु द्या. आमेन आमेन.

प्रभु, तू चांगला आणि दयाळू आहेस. तुझी माणसे तुला मदतीसाठी हाका मारतात, तू त्या माणसांवर खरोखरच प्रेम करतो.

देवा, इथे तुझ्यासारखा कुणीही नाही. तू जे केलेस ते कोणीही करु शकणार नाही. प्रभु तूच प्रत्येकाला निर्माण केलेत. ते सर्व येतील आणि तुझी उपासना करतील आणि तुझ्या नावाला मान देतील अशी मी आशा करतो. देवा, तू महान आहेस. तू अद्भुत गोष्टी करतोस. तू आणि फक्त तूच देव आहेस.

प्रभु, तू दयाळू आणि कृपाळू देव आहेस. तू सहनशील निष्ठावान आणि प्रेमपूर्ण आहेस.

तुझे राज्य सत्य आणि न्याय यावर वसलेले आहे. प्रेम आणि सत्य तुझ्या सिंहासनासमोर सेवक आहेत.

देवा, पर्वत जन्मण्याआधी आणि पृथ्वी व जग निर्माण होण्याआधी तूच देव होतास देवा, तू पूर्वी होतास आणि पुढे देखील असशील.

परात्पर परमेश्वरा, तू खरोखरच पृथ्वीचा राजा आहेस. तू इतर “देवापेक्षा” खूपच चांगला आहेस.

परमेश्वर राजा आहे म्हणून राष्ट्रांना भीतीने थरथरु द्या. देव करुबांच्यावर राजा म्हणून बसतो म्हणून जगाला भीतीने थरथरु द्या.

त्याच्या पवित्र पर्वतासमोर वाका आणि त्याची प्रार्थना करा. परमेश्वर, आपला देव खरोखरच पवित्र आहे.

परमेश्वर चांगला आहे. त्याचे प्रेम चिरंजीव आहे. आपण त्याच्यावर कायम विश्वास टाकू शकतो.

तू खूप पूर्वी जग निर्माण केलेस. तू तुझ्या हातांनी आकाश निर्माण केलेस. जग आणि आकाश संपेल पण तू मात्र सदैव असशील. ते कापडाप्रमाणे जीर्ण होतील आणि कपड्यांसारखे तू त्यांना बदलशील ते सगळे बदलले जातील. पण देवा, तू मात्र कधीच बदलला जाणार नाहीस. तू सर्वकाळ राहाशील.

परमेश्वर सहानुभूतिपूर्ण आणि दयाळू आहे. देव सहनशील आणि प्रेमाचा सागर आहे.

देवाचे त्याच्या भक्तांबद्दलचे प्रेम हे स्वर्ग पृथ्वीव रजितक्या उंचीवर आहे तितके आमच्यावर आहे. आणि देवाने आमची पापे पूर्व आणि पश्चिम एकमेकींपासून जितक्या अंतरावर आहेत तितक्या अंतरावर नेऊन ठेवली.

परंतु परमेश्वराने त्याच्या भक्तांवर नेहमीच प्रेम केले आणि तो सदैव त्याच्या भक्तांवर प्रेम करीत राहाणार आहे. देव त्यांच्या मुलांशी आणि मुलांच्या मुलांशीदेखील चांगला वागणार आहे. जे लोक देवाचा करार पाळतात त्यांच्याशी देव चांगला असतो. जे त्याच्या आज्ञा पाळतात त्यांच्याशी देव चांगला असतो. देवाचे सिंहासन स्वर्गात आहे आणि तो सर्वांवर राज्य करतो.

माझ्या आत्म्या, परमेश्वराची स्तुती कर. परमेश्वरा, माझ्या देवा, तू खूप महान आहेस. तू तेज आणि गौरव पांघरले आहेस. माणसाने अंगरखा घालावा तसा तू प्रकाश घालतोस. तू आकाशाला पडद्या प्रमाणे पसरवितोस.

परमेश्वराला धन्यावाद द्या. कारण तो चांगला आहे. त्याचे प्रेम कायम राहाणार आहे.

परमेश्वर सगळ्या देशांपेक्षा उंच आहे. त्याचे तेज आकाशापेक्षा उंच जाते.

देव स्वर्गात आहे आणि त्याला हवे ते तो करतो.

परमेश्वर त्याला हवे ते पृथ्वीवर आणि स्वर्गात समुद्रात आणि खोल महासागरात करत असतो.

परमेश्वराची स्तुती करा कारण तो चांगला आहे. त्याचे खरे प्रेम सदैव असते.

परमेश्वरांच्या परमेश्वराची स्तुती करा. त्याचे खरे प्रेम सदैव असते.

ज्याने आकाश निर्माण करण्यासाठी शहाणपणा वापरला त्याची, देवाची स्तुती करा. त्याचे खरे प्रेम सदैव असते.

स्रवर्गातल्या देवाची स्तुती करा. त्याचे खरे प्रेम सदैव असते.

मी जिथे जातो तिथे तिथे तुझा आत्मा असतो. परमेश्वरा, माझी तुझ्यापासून सुटका नाही. परमेश्वरा, मी जर स्वर्गात गेलो तर तिथे तू असतोस मी जर खाली मृत्यूलोकात गेलो तर तिथे ही तू असतोस.

परमेश्वर महान आहे लोक त्याची खूप स्तुती करतात. त्याने केलेल्या महान गोष्टींची आपण मोजदाद करु शकत नाही.

तुझे राजवैभव आणि तेज अद्भुत आहे. मी तुझ्या अद्भुत चमत्काराबद्दल सांगेन.

परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे. परमेश्वर सहनशील आणि प्रेमळ आहे.

परमेश्वर जे काही करतो ते सर्व चांगले असते. तो जे करतो ते सर्व तो किती चांगला आहे, ते दाखवते. जे कोणी परमेश्वराला मदतीसाठी बोलावतात, त्या सर्वांच्या तो खूप जवळ असतो. जो त्याची अगदी मनापासून प्रार्थना करतो, त्याच्या अगदी जवळ तो असतो.

परमेश्वराने स्वर्ग आणि पृथ्वी निर्माण केली. परमेश्वराने समुद्र आणि त्यातल्या सर्व गोष्टी निर्माण केल्या. परमेश्वर त्यांचे सदैव रक्षण करील. खी कष्टी आहेत. त्यांच्यासाठी परमेश्वर योग्य गोष्टी करतो. तो भुकेल्यांना अन्न देतो. तुरुंगात बंद असलेल्यांना तो सोडवतो.

देव तारे मोजतो आणि त्याला प्रत्येक ताऱ्याचे नाव माहीत असते. आपला प्रभु खूप मोठा आहे. तो फार शक्तीवान आहे. त्याला माहीत असलेल्या गोष्टींना मर्यादा नाही.

मी (ज्ञान), माझ्यावर जे प्रेम करतात त्यांच्यावर प्रेम करते. आणि जे लोक मला शोधायचा खूप प्रयत्न करतात त्यांना मी हटकून सापडते.

सगळीकडे काय चालले आहे ते परमेश्वर बघतो. परमेश्वर सगळ्या माणसांना बघत असतो. चांगल्या आणि वाईट.

स्वार्गातल्या गोष्टीबद्दल आजपर्यंत कोणीही काहीही शिकला नाही. कोणीही वाऱ्याला कधी हातात पकडू शकला नाही. कोणीही पाण्याला कपड्यात पकडू शकला नाही. पृथ्वीच्या सीमा कोणालाही माहीत नाहीत. जर कोणी ह्या गोष्टी करु शकला तर तो कोण असेल? त्याचे कुटुंब कुठे असेल.?

येथून चालते व्हा. कडेकपारीमागे धुळीत लपून बसा. तुम्ही परमेश्वराची भीती बाळगली पाहिजे आणि त्याच्या महान सामर्थ्यापासून लपून राहिले पाहिजे.

ते देवदूत एकमेकांशी बोलत होते. ते म्हणत होते, “पवित्र, पवित्र, पवित्र सर्वशक्तिमान परमेश्वर परमपवित्र आहे. त्याची प्रभा सगळ्या पृथ्वीला व्यापून राहिली आहे.” देवदूतांचे आवाज फार मोठे होते.

सर्वशक्तिमान परमेश्वर हाच असा आहे की त्याचे भय मानावे. त्याचाच फक्त आदर करावा. त्यालाच फक्त पवित्र मानावे.

असामान्य बालकाच्या जन्माच्यावेळी ह्या गोष्टी घडतील. देव आम्हाला पुत्र देईल. हा पुत्र लोकांच्या नेतृत्वाची जबाबदारी घेईल. त्याचे नाव असेल “अदभुत सल्लागार, सामर्थ्यशाली देव, चिरंजीव पिता, शांतीचा राजपुत्र.”

परमेश्वराचा आत्मा त्या मुलात असेल. तो आत्मा त्याला सुज्ञपणा, समजूत, मार्गदर्शन आणि सामर्थ्य देईल. हा आत्मा परमेश्वराला जाणून घेण्यास व श्रध्दा ठेवण्यास त्या मुलाला शिकवील.

तुमच्यावर दया करण्याची परमेश्वराची इच्छा आहे. परमेश्वर वाट पाहत आहे. परमेश्वराला प्रकट होऊन तुमचे सांत्वन करायचे आहे. परमेश्वर देव न्यायी आहे. त्याच्या मदतीची इच्छा करणाऱ्या प्रत्येक माणसाला तो आशीर्वाद देईल.

कारण परमेश्वर आमचा न्यायाधीश आहे. परमेश्वरच आमचे कायदे करतो. परमेश्वर आमचा राजा आहे. तो आमचे रक्षण करतो. म्हणून तो आम्हाला खूप संपत्ती देईल. पंगूनासुध्दा युध्दात खूप धन मिळेल.

तुलनेने देवापुढे जगातील सर्व राष्ट्रे म्हणजे काहीच नाहीत. देवाच्या तुलनेत जगातील सर्व राष्ट्रांची किंमत शून्य आहे. देवाची तुलना तुम्ही कशाशी करू शकता का? नाही. तुम्ही देवाचे चित्र काढू शकता का? नाही.

परमेश्वरच खरा देव आहे तो पृथ्वीगोलावर स्थानापन्न होतो. त्याच्या तुलनेत लोक म्हणजे नाकतोडे आहेत. त्याने कापडाच्या गुंडाळीप्रमाणे आकाश उलगडून उघडले. आकाशाखाली बसण्यासाठी त्याने ते तंबूच्या कनातीप्रमाणे ताणले.

परमेश्वर देव फार सुज्ञ आहे, हे तुम्ही नक्कीच ऐकले आहे व तुम्हाला ते माहीतही आहे. देवाला ज्ञान असलेली प्रत्येक गोष्ट माणूस शिकू शकत नाही. परमेश्वर कधी दमत नाही, आणि त्याला विश्रांतीची गरज नाही. जगातील दूरदूरची स्थळे परमेश्वरानेच निर्मिली. परमेश्वर चिरंजीव आहे.

“मी परमेश्वर आहे माझे नाव यहोवा, मी माझे गौरव दुसऱ्यांना देणार नाही. माझ्याकरिता असलेली स्तुती मी मूर्तीच्या (खोट्या देवांच्या) वाट्याला येऊ देणार नाही.

परमेश्वर म्हणतो, “तुम्ही लोक माझे साक्षीदार आहात. मी निवडलेले तुम्ही लोक माझे सेवक आहात माझ्यावर विश्वास ठेवायला लोकांना तुम्ही मदत करावी म्हणून मी तुम्हाला निवडले आहे. ‘मीच तो आहे,’ मीच खरा देव आहे. हे तुम्हाला कळावे म्हणून मी तुमची निवड केली. माझ्याआधी कोणी देव नव्हता आणि माझ्यानंतर कोणी देव नसेल. मी स्वत:च परमेश्वर आहे मी एकमेव आहे. दुसरा कोणीही तारणकर्ता नाही. मीच एकटा आहे.

परमेश्वर इस्राएलचा राजा आहे सर्वशक्तिमान परमेश्वर इस्राएलला वाचवितो. परमेश्वर म्हणतो, “मीच फक्त देव आहे. दुसरे कोणीही देव नाहीत. मीच आरंभ आहे आणि मीच अंत आहे.

तू आता आहेस तसा तुला परमेश्वराने बनविले. तू आईच्या गर्भात असताना परमेश्वराने हे केले. परमेश्वर म्हणतो, “मी, परमेश्वराने प्रत्येक गोष्ट निर्माण केली. मी स्वत: आकाश तेथे ठेवले आणि माझ्यासमोर जमीन पसरली.”

“मी एकटाच देव आहे. हे मी ह्या सर्व गोष्टी करतो, त्यावरून लोकांना कळेल. मीच परमेश्वर आहे, दुसरा कोणीही देव नाही’ हे पूर्वेपासून पश्चिमेपर्यत सर्व लोकांना कळेल. मी प्रकाश निर्माण केला आणि अंधारही. मी शांती निर्माण केली तशी संकटेही. मी परमेश्वर आहे व ह्यासर्व गोष्टी मी करतो.

परमेश्वरच फक्त देव आहे. त्यानेच आकाश व पृथ्वी निर्मिली. परमेश्वराने पृथ्वीला तिच्या जागी ठेवले. परमेश्वराने पृथ्वी निर्मिली तेव्हा त्याला ती रिकाती नको होती. ती पुढे जगावी म्हणून त्याने ती निर्मिली. तिच्यावर राहता यावे म्हणून त्याने ती निर्माण केली “मीच परमेश्वर आहे दुसरा कोणीही देव नाही.

त्या लोकांना माझ्याकडे यायला सांगा. ह्या सर्व गोष्टींबद्दल त्यांना एकत्रितपणे बोलू द्या.)“पुष्कळ वर्षांपूर्वी घडलेल्या गोष्टींबद्दल तुम्हाला कोणी सांगितले? फार पूर्वीपासून तुम्हाला या गोष्टी कोण सांगत आले आहे? मी, देवाने, एकमेव परमेश्वराने, तुम्हाला या गोष्टी सांगितल्या. मीच फक्त देव आहे. माझ्यासारखा आणखी दुसरा कोणी आहे का? चांगला दुसरा देव आहे का? दुसरा कोणी देव त्याच्या लोकांना वाचवितो का? नाही कोणीही दुसरा देव नाही. दूरदूरच्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांनी देवाचे अनुसरण करणे थांबवले. तुम्ही मला अनुसरावे व स्वत:चे रक्षण करून घ्यावे. मीच देव. दुसरा देव नाही. मीच फक्त देव आहे.

पूर्वी घडलेल्या गोष्टी आठवा. मी देव आहे हे लक्षात ठेवा. दुसरा कोणताच देव नाही. ते खोटे देव माझ्यासारखे नाहीत. अखेरीला काय होणार हे मी तुम्हाला आरंभीच सांगितले, फार वर्षांपूर्वी, ज्या गोष्टी घडल्या नव्हत्या, त्या मी तुम्हाला सांगितल्या म्हणजेच त्या गोष्टी घडण्यापूर्वी अनेक वर्षे मी त्या घडणार असल्याचे तुम्हाला सांगितले. मी योजतो, तसेच घडते मला पाहिजे ते मी घडवून आणतो.

कारण तुझा पती हा तुझा निर्माता म्हणजेच देव आहे. त्याचे नाव सर्वशक्तिमान परमेश्वर आहे. इस्राएलला वाचविणारा एक तोच आहे तो इस्राएलचा पवित्र देव आहे. आणि त्याला सर्व पृथ्वीचा पवित्र देव म्हटले जाईल.

परमेश्वर म्हणतो, “तुमचे विचार माझ्यासारखे नाहीत. तुमचे मार्ग माझ्या मार्गांसारखे नाहीत. स्वर्ग पृथ्वीपेक्षा उंच आहे. त्याचप्रमाणे माझे मार्ग आणि विचार तुमच्यापेक्षा उच्च आहेत.” परमेश्वर स्वत: असे म्हणाला.

देव अती उच्च व परम थोर आहे. देव चिरंजीव आहे. त्याचे नाव पवित्र आहे. देव म्हणतो, मी उंच आणि पवित्र जागी राहतो हे खरे पण मी दु:खी आणि लीन यांच्याबरोबरही असतो. मनाने नम्र असलेल्यांना आणि दु:खी लोकांना मी नवजीवन देईन.

देव असे म्हणाला, “आकाश माझे सिंहासन आहे आणि पृथ्वी हे माझे पाय ठेवण्याचे आसन आहे. मग तुम्ही माझ्यासाठी घर बांधू शकाल असे तुम्हाला वाटते का? नाही. तुम्हाला ते शक्य नाही. तुम्ही मला विश्रांतीसाठी जागा देऊ शकाल का? नाही. तुम्ही जागा देऊ शकणार नाही.

पण परमेश्वरच फक्त खरा देव आहे. खरा सजीव असा केवळ देवच आहें शाश्वत शासन करणारा असा तो राजा आहें त्याला राग आल्यास पृथ्वी कंप पावते. त्याचा कोप देशांतील लोक सहन करु शकत नाहीत.

ज्याने आपल्या सामर्थ्याने पृथ्वी निर्माण केली असा एकमेव देवच आहे. आपल्या ज्ञानाचा उपयोग करुन त्याने जग निर्माण केलें आपल्या समंजसपणाच्या आधारे पृथ्वीवर आकाश पांघरले.

परमेश्वर म्हणतो “म्हणून त्या मूर्ती बनविणाऱ्या लोकांना मी धडा शिकवीन. प्रथम मी त्यांना माझ्या शक्तीची व सामर्थ्याची जाणीव करुन देईन. मग त्यांना कळेल की मीच खरा देव, मीच खरा परमेश्वर आहे.”

एखादा माणूस माझ्यापासून लपण्याचा प्रयत्न करीलही, पण त्याला शोधणे मला अगदी सोपे आहे. का? कारण मी स्वर्ग आणि पृथ्वी ह्यांमध्ये सगळीकडे आहे.” परमेश्वर असे म्हणाला.

खूप लांबून परमेश्वर लोकांना दर्शन देईल. परमेश्वर म्हणतो, “लोकांनो, मी तुमच्यावर प्रेम करतो आणि ते चिरंतर राहील. तुमची निष्ठ मी कायमची सांभाळीन.

लोकांना, त्यांच्या शेजाऱ्यांना आणि नातेवाईकांना परमेश्वराची ओळख करुन द्यावी लागणार नाही. का? कारण सर्वजण, लहानापासून थोरापर्यंत राजापासून रंकापर्यंत, मला ओळखत असतील.” हा परमेश्वराचा संदेश आहे. “त्यांनी केलेल्या दुष्कृत्यांबद्दल मी त्यांना क्षमा करीन. मी त्यांच्या पापांचे स्मरण ठेवणार नाही.”

“परमेश्वर देवा, तू आकाश आणि पृथ्वी निर्माण केलीस. तुझ्या सामर्थ्याच्या बळावर आणि पसरलेल्या हातामुळे तू ते निर्माण केलेस. तुला आश्र्चर्य कारक वाटण्याजोगे काहीही नाही. तुला काहीही असाध्य नाही. परमेश्वर, तू हजारो लोकांची निष्ठा सांभाळणारा व त्यांच्यावर कृपा करणारा आहेस. पण तूच वडिलांच्या पापांची शिक्षा मुलांना करतोस. सर्वश्रेष्ठ व सामर्थ्यवान देवा, तुझे नाव आहे सर्वशक्तिमान परमेश्वर.

“यिर्मया, मी परमेश्वर आहे पृथ्वीवरच्या प्रत्येक माणसाचा मी देव आहे. यिर्मया, मला काहीच अशक्य नाही, हे तुला माहीत आहेच.”

“सदासर्वकाळ देवाच्या नावाची स्तुती करा. सामर्थ्य व ज्ञान त्याच्यापाशीच आहे. तो काळ आणि ऋ तू बदलतो. आणि राजेही बदलतो. तोच राजांना सत्ता देतो. आणि तोच त्यांची सत्ता काढून घेतो. लोकांनी शहाणे व्हावे म्हणून तो त्यांना शहाणपण देतो, त्यांनी ज्ञानी व्हावे म्हणून तो त्यांना सर्व गोष्टी शिकू देतो. समजण्यास अतिशय कठीण असलेली, गुप्त रहस्ये त्याला माहीत असतात. प्रकाश त्याच्याबरोबर असल्यामुळे, अंधारात आणि गुप्त जागी काय आहे ते त्याला कळते.

आणि मी (परमेश्वर) तुला माझी चिरंतन वधू करीन. मी चांगुलपणा, न्याय,प्रेम व दया यांच्यासह तुला वधू करून घेईन.

हो, खरेच, यहोवा सैन्यांचा परमेश्वर आहे. त्याचे नाव यहोवा (परमेश्वर)असे आहे.

मी कोण आहे? पर्वत निर्माण करणारा मीच तो एकमेव! मी तुमच्या मनाची निर्मिती केली. मीच लोकांना कसे बोलायचे ते शिकविले. मीच पहाटेचे अंधारात परिवर्तन करतो. मी पृथ्वीवरील पर्वत माझ्या पायाखाली तुडवतो मी कोण आहे? माझे नाव याव्हे मी सैन्याचा परमेश्वर आहे.”

परमेश्वर हा ईर्षावान देव आहे परमेश्वर अपराध्यांना शिक्षा करतो आणि तो खूप रागावतो परमेश्वर त्याच्या शत्रूंना शिक्षा करतो. तो त्याच्या शत्रूंवर रागावलेला असतो. परमेश्वर जसा सहनशील आहे, तसाच सामर्थ्यवान आहे परमेश्वर अपराधी लोकांना शिक्षा करील. त्यांना मोकळे सोडणार नाही परमेश्वर वाईट माणसांना शिक्षा करण्यासाठी येत आहे झंझावात आणि वादळ यांच्याद्धारे तो आपली शक्ती दाखवील माणूस जमिनीवर धूळीतून चालतो, तर परमेश्वर ढगांवरून चालतो.

मग मात्र सर्वच लोकांना परमेश्वराचे वैभाने (गौरवाने) कळेल. समुद्राच्या पसरणाऱ्या पाण्याप्रमाणे ही वार्ता सगळीकडे पसरेल.

परमेश्वर तुझा देव, तुमच्याबरोबर आहे. तो बलवान वीराप्रमाणे आहे. तो तुला वाचवील. तो तुझ्यावर किती प्रेम करतो, हे तो तुला दाखवून देईल. तुझ्याबरोबर तो किती सुखी आहे, हेही तुला दिसेल.

मी तर तुम्हास सांगतो शपथ वाहूच नका; स्वर्गाची नका, कारण ते देवाचे आसन आहे; पृथ्वीचीही वाहू नका, कारण ती त्याचे पादासन आहे; यरुशलेमेचीहि वाहू नका कारण ती थोर राजाची नगरी आहे.

यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता परिपूर्ण आहे तसे तुम्ही परिपूर्ण व्हा.

म्हणून तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुम्ही अशाप्रकारे प्रार्थना करावीः हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो.

आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास त्या दुष्टापासून सोडव. (कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरवही सर्वकाळ तुझीच आहेत.)

मग येशू म्हणाला, हे पित्या, आकाशाच्या व पृथ्वीच्या प्रभू मी तुझे उपकार मानतो कारण तू या गोष्टी ज्ञानी व बुद्धीमान लोकांपासून गुप्त ठेवून बालकासारखे अशिक्षित आहेत त्यांना तू प्रकट केल्या.

येशूने आपल्या शिष्यांकडे पाहिले आणि तो म्हणाला, “मनुष्यांना हे अशक्य आहे, पण देवासाठी सर्व गोष्टी शक्य आहेत.”

ते असे की, मी अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव आणि याकोबाचा देव आहे, तो मरण पावलेल्यांचा देव नाही तर जिवंताचा देव आहे.

मनुष्याचा पुत्र जेव्हा त्याच्या स्वर्गीय गौरवाने आपल्या देवदूतांसह येईल तेव्हा तो त्याच्या गौरवी राजासनावर बसेल. मग सर्वं राष्ट्रे त्याच्यासमोर एकत्र जमतील. त्यांना तो एकमेकांपासून विभक्त करील. ज्याप्रमाणे मेंढपाळ मेंढरे शेरडांपासून वेगळी करतो.

तेव्हा येशू त्यांच्याकडे आला आणि म्हणाला, “स्वर्गात आणि पृथ्वीवर मला सर्व अधिकार देण्यात आला आहे. म्हणून तुम्ही जा आणि राष्ट्रांतील लोकांस माझे शिष्य करा. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावाने बाप्तिस्मा द्या.

त्यांच्याकडे पाहून येशू म्हणाला, “मनुष्यांना हे अशक्य आहे पण देवाला नाही कारण देवाला सर्व गोष्टी शक्य आहेत.”

येशूने उत्तर दिले, “पहिली महत्त्वाची आज्ञा ही, ‘हे इस्राएला, ऐक, प्रभू आपला देव एकच प्रभू आहे.

येशू म्हणाला, “मी आहे, आणि तुम्ही मनुष्याच्या पुत्राला सर्वसमर्थ देवाच्या उजवीकडे बसलेले व आकाशातील मेघांसह येताना पाहाल.”

येशू पवित्र आत्म्याने पूर्ण भरून यार्देन नदीहून परतला. मग आत्म्याने त्यास अरण्यात नेले.

जसा तुमचा स्वर्गीय पिता दयाळू आहे तसे तुम्हीही दयाळू व्हा.

त्या क्षणी तो पवित्र आत्म्यात आनंदीत झाला आणि म्हणाला, “हे पित्या, स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभू मी तुझी स्तुती करतो, कारण तू या गोष्टी ज्ञानी आणि बुद्धीमान लोकांपासून लपवून ठेवून त्या लहान बाळकांस प्रकट केल्या आहेस. होय, पित्या कारण तुला जे योग्य वाटले ते तू केलेस.

मग तो त्यांना म्हणाला, “जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा असे म्हणाः हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो तुझे राज्य येवो,

प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. तोच प्रारंभी देवासह होता. सर्वकाही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याने केल्यावांचून झाले नाही.

कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्यास सार्वकालिक जीवन मिळावे.

पिता पुत्रावर प्रीती करतो आणि त्याने सर्वकाही त्याच्या हाती दिले आहे.

देव आत्मा आहे; आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे.”

तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “मीच जीवनाची भाकर आहे. माझ्याकडे जो येतो त्यास कधीही भूक लागणार नाही आणि जो माझ्यावर विश्वास ठेवतो त्यास कधीही तहान लागणार नाही.

मीच जीवनाची भाकर आहे.

स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्वकाळ जगेल. जी भाकर मी देईन ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे.”

पुढे येशू पुन्हा त्यांना म्हणाला, “मीच जगाचा प्रकाश आहे; जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.”

मी स्वतःविषयी साक्ष देणारा आहे आणि ज्या पित्याने मला पाठवले आहे तोसुध्दा माझ्याविषयी साक्ष देतो.”

तो त्यांना म्हणाला, “तुम्ही खालचे आहात, मी वरचा आहे; तुम्ही या जगाचे आहा, मी या जगाचा नाही.

येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हास खरे खरे सांगतो, अब्राहामाचा जन्म झाला त्यापुर्वी मी आहे.”

मी उत्तम मेंढपाळ आहे; उत्तम मेंढपाळ मेंढरांकरिता आपला जीव देतो.

येशूने तिला म्हटले, “पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मरण पावला असला तरी जगेल.

येशूने त्यास म्हटले, “मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्याशिवाय पित्याकडे कोणी येत नाही. मी कोण आहे हे तुम्ही ओळखले असते तर माझ्या पित्यालाही ओळखले असते. आतापासून पुढे तुम्ही त्यास ओळखता आणि तुम्ही त्यास पाहिलेही आहे.”

तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हास सर्वकाही शिकवील आणि ज्या गोष्टी मी तुम्हास सांगितल्या त्या सर्वाची तुम्हास आठवण करून देईल.

आपल्या मित्रांसाठी आपला जीव द्यावा यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही.

‘तो मीच आहे’ असे म्हणताच ते मागे सरकून जाऊन जमिनीवर पडले.

मग त्यांनी अशी प्रार्थना केली, “हे सर्वाची हृदये जाणणाऱ्या प्रभू,

तथापि जो परात्पर तो हातांनी बांधलेल्या घरात राहत नाही; संदेष्ट्याने म्हणले आहे. प्रभू म्हणतो, ‘आकाश माझे राजासन आहे, पृथ्वी माझे पादासन आहे. तुम्ही माझ्यासाठी कशा प्रकारचे घर बांधणार? किंवा माझ्या विसाव्याचे स्थान कोणते?

ज्या देवाने जग व त्यातले अवघे निर्माण केले तो स्वर्गाचा व पृथ्वीचा प्रभू असून हातांनी बांधलेल्या इमारतीत राहत नाही.

वास्तविक जी माणसे अभक्ती, सत्य दाबतात अशा लोकांच्या अनीतीवर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रकट होतो. कारण देवाविषयी प्राप्त होणारे ज्ञान त्यांच्यात दिसून येते; कारण देवाने स्वतः त्यांना ते प्रकट केले आहे. कारण जगाच्या उत्पत्तीपासून करण्यात आलेल्या गोष्टींवरून त्याचे सर्वकाळचे सामर्थ्य व देवपण या त्याच्या अदृश्य गोष्टी समजत असल्याने स्पष्ट दिसतात, म्हणून त्यांना काही सबब नाही.

पण आपण पापी असताना ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला, ह्यात देव त्याची आपल्यावरील प्रीती प्रस्थापित करतो.

कारण माझी खात्री आहे की, मरण किंवा जीवन, देवदूत किंवा सत्ता, आताच्या गोष्टी किंवा येणार्‍या गोष्टी किंवा बले, किंवा उंची किंवा खोली किंवा दुसरी कोणतीही निर्मिती आपला प्रभू ख्रिस्त येशू ह्याच्याठायी असलेल्या देवाच्या प्रीतीपासून आपल्याला वेगळे करू शकणार नाही.

अहाहा! देवाच्या सुज्ञतेच्या व ज्ञानाच्या धनाची खोली किती? त्याचे न्याय किती अतर्क्य आहेत? आणि त्याचे मार्ग किती अलक्ष्य आहेत? असे नियमशास्त्रात लिहिले आहे; ‘कारण प्रभूचे मन कोणी ओळखले आहे? किंवा त्याचा सल्लागार कोण होता? किंवा कोणी त्यास आधी दिले आणि ते त्यास परत दिले जाईल?’ कारण सर्व गोष्टी त्याच्याकडून, त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी आहेत; त्यास युगानुयुग गौरव असो. आमेन.

जेणेकरून तुमचा विश्वास मानवी ज्ञानावर नव्हे तर देवाच्या सामर्थ्यावर असावा.

कारण देवाचे राज्य बोलण्यावर अवलंबून नसते तर सामर्थ्यावर असते.

परंतु आमच्यासाठी फक्त एकच देव जो पिता तो आहे. ज्याच्यासाठी आपण जगतो आणि ज्याच्यापासून सर्वकाही निर्माण झाले आणि फक्त एकच प्रभू येशू ख्रिस्त आहे. ज्याच्या द्वारे सर्व गोष्टी अस्तित्वात येतात व ज्याच्या द्वारे आपण जगतो.

त्याने ती कृती ख्रिस्ताच्याद्वारे करून त्यास मरणातून उठविले आणि स्वर्गात देवाच्या उजव्या बाजूला बसविले. त्याने त्यास सर्व अधिपती, अधिकारी, सामर्थ्य, प्रभूत्व आणि प्रत्येक सामर्थ्याचे नाव जे याकाळी नव्हे तर येणाऱ्या काळीही दिले जाईल त्या सर्वांपेक्षा फार उंच केले. देवाने सर्वकाही ख्रिस्ताच्या पायाखाली केले आणि त्यास सर्वांवर मंडळीचे मस्तक म्हणून दिले. हेच ख्रिस्ताचे शरीर. जो सर्वांनी सर्वकाही भरतो त्याने ते भरलेले आहे.

पण देव खूप दयाळू आहे कारण त्याच्या महान प्रीतीने त्याने आमच्यावर प्रेम केले.

कारण येशूच्याद्वारे, आम्हा दोघांचा एका पवित्र आत्म्यात देवाजवळ प्रवेश होतो.

एकच देव जो सर्वांचा पिता, तो सर्वांवर आणि सर्वांमधून आणि सर्वांमध्ये आहे.

आणि देवाच्या पवित्र आत्म्याला दुःखी करू नका कारण तुम्हास खंडणी भरून मुक्तीच्या दिवसासाठी त्याच्याकडून तुम्हास शिक्का मारलेले असे आहात.

ह्यामुळे देवाने त्यास सर्वांहून उंच केले आहे आणि सर्व नावांहून श्रेष्ठ नाव ते त्यास दिले आहे. ह्यात हेतू हा की, स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा, आणि हे देवपिताच्या गौरवासाठी प्रत्येक जीभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे.

ख्रिस्त अदृश्य देवाचा प्रतिरूप आहे आणि सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे. कारण स्वर्गात व पृथ्वीवर, दृश्य आणि अदृश्य, राजासने किंवा शासने, सत्ता किंवा शक्ती, अशा सर्व गोष्टी त्याच्याद्वारे केल्या गेल्या; सर्व गोष्टी त्याच्याद्वारे व त्याच्यामध्ये केल्या गेल्या. तो सर्वांच्या आधीचा आहे आणि त्याच्यामध्ये सर्वकाही अस्तित्वात आहे. तो शरीराचे मस्तक म्हणजे मंडळीचे मस्तक आहे. तो आरंभ आहे आणि मृतांतून प्रथम जन्मलेला आहे, म्हणजे त्यास सर्व गोष्टींत प्राधान्य असावे. हे यासाठी की, त्याच्यात देवाची सर्व पूर्णता वसावी या निर्णयात त्यास संतोष होता.

कारण ख्रिस्ताच्या ठायीच देवपणाची सर्व पूर्णता शरीरधारी होऊन त्याच्यात राहते. तो सर्व सत्ता व शक्ती ह्यांवर मस्तक असून त्याच्याठायी तुम्ही पूर्ण झाला आहा,

आता सर्वकाळचा राजा जो अविनाशी व अदृश्य आहे अशा एकाच देवाला सन्मान आणि गौरव सदासर्वकाळासाठी असो. आमेन.

ज्या एकालाच अमरत्व आहे, जो अगम्य प्रकाशात राहतो ज्याला कोणा मनुष्याने पाहिले नाही आणि कोणाच्याने पाहवत नाही, तो ते त्याचे प्रकट होणे यथाकाली दाखवील, त्यास सन्मान व सार्वकालिक सामर्थ्य आहे. आमेन.

देव प्राचीन काळांमध्ये आपल्या पूर्वजांशी संदेष्ट्यांच्या द्वारे अनेक वेळेस वेगवेगळ्या मार्गांनी बोलला, परंतु या शेवटच्या दिवसात तो आपल्याशी त्याच्या पुत्राद्वारे बोलला आहे, त्याने पुत्राला सर्व गोष्टींचा वारस म्हणून नेमले. देवाने पुत्राकरवीच विश्व निर्माण केले. पुत्र हा देवाच्या गौरवाचे तेज आहे. तो देवाच्या स्वभावाचे तंतोतंत प्रतिरूप असा आहे. पुत्र आपल्या सामर्थ्यशाली शब्दाने सर्व गोष्टी राखतो. पुत्राने लोकांस त्यांच्या पापांपासून शुद्ध केले, नंतर तो स्वर्गातील सर्वश्रेष्ठ देवाच्या उजव्या बाजूला बसला.

पुत्राविषयी तर तो असे म्हणतोः हे देवा, तुझे राजासन सदासर्वकाळासाठी आहे, आणि तुझे राज्य युगानुयुगीचे आहे आणि “तुझा राजदंड न्यायीपणाचा राजदंड आहे.

आणि कोणतीही निर्मित गोष्ट त्याच्यापासून लपलेली नाही आणि ज्याच्यापाशी आम्हास सर्व गोष्टींचा हिशोब द्यावयाचा आहे, देवासमोर सर्व गोष्टी उघड व स्पष्ट अशा आहेत.

कारण आपला “देव भस्म करणारा अग्नी आहे.”

येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे.

प्रत्येक उत्तम दान व परिपूर्ण देणगी देवाकडून आहे. जो बदलत नाही व फिरण्याने छायेत नाही अशा स्वर्गीय प्रकाश असणाऱ्या पित्यापासून ते उतरते.

एकच देव आहे, असा विश्वास तू धरतोस काय? भूतेसुद्धा विश्वास धरतात व थरथर कापतात.

तो स्वर्गात गेला असून देवाच्या उजवीकडे आहे आणि देवदूत, अधिकारी व सत्ताधीश त्याच्या अधीन आहेत.

कारण त्यास देवपित्याकडून सन्मान व गौरव मिळाले; तेव्हा ऐश्वर्ययुक्त गौरवाच्याद्वारे अशी वाणी झाली की, “हा माझा प्रिय पुत्र, मला परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे.”

जो संदेश आम्ही त्याच्यापासून ऐकला आहे तोच आम्ही तुम्हास सांगत आहोत, देव प्रकाश आहे आणि त्याच्याठायी मुळीच अंधार नाही.

जो प्रीती करीत नाही, तो देवाला ओळखत नाही कारण देव प्रीती आहे.

आणि म्हणून आम्ही ओळखतो आणि त्या प्रीतीवर आम्ही विश्वास ठेवतो की, जी देवाने आमच्यावर केली. देव प्रीती आहे आणि जो प्रीतीत राहतो तो देवामध्ये राहतो आणि देव त्यामध्ये राहतो.

आत्मा हा साक्ष देणारा आहे कारण आत्मा सत्य आहे. साक्ष देणारे तीन साक्षीदार आहेत. आत्मा, पाणी आणि रक्त, या तिघांची एकच साक्ष आहे.

पण आम्हास माहीत आहे की देवाचा पुत्र आला आहे व त्याने आम्हास समजबुद्धी दिलेली आहे, यासाठी की, जो खरा आहे त्यास आम्ही ओळखावे आणि जो खरा आहे त्याच्याठायी म्हणजे त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्याठायी, आपण आहोत. हाच खरा देव आहे आणि तो सार्वकालिक जीवन आहे.

असा जो एकच देव आपला तारणारा त्यास येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्याद्वारे गौरव, महिमा, पराक्रम आणि अधिकारही युगांच्या आधीपासून, आता आणि युगानुयुग आहेत. आमेन.

‘प्रभू देव जो आहे’, जो होता आणि जो येणार आहे, ‘जो सर्वसमर्थ’ तो म्हणतो ‘मी अल्फा आणि ओमेगा आहे.’

सार्दीस येथील मंडळीच्या दूताला लिही; ज्याच्याजवळ देवाचे सात आत्मे व सात तारे आहेत त्याचे हे शब्द आहेत. मला तुमची कामे माहीत आहेत, तू जिवंत आहेस अशी तुझी किर्ती आहे. पण तुम्ही मरण पावलेले आहात.

त्याच क्षणी आत्म्याने माझा ताबा घेतला. तेथे स्वर्गात ‘माझ्यासमोर राजासन होते कोणीएक त्यावर बसला होता.’ त्यावर जो बसला होता तो यास्फे व सार्दी या रत्नांसारखा होता आणि ‘राजासनाभोवती’ पाचूसारखे दिसणारे ‘मेघधनुष्य होते.’ राजासनाभोवती चोवीस आसने होती आणि त्या आसनांवर शुभ्र कपडे घातलेले व डोक्यावर सोन्याचा मुकुट असलेले चोवीस वडील बसले होते. राजासनापासून विजा, वाणी व मेघगर्जना निघत होत्या. राजासनासमोर सात दिवे जळत होते. ते देवाचे सात आत्मे होते. तसेच राजासनासमोर काचेच्या समुद्रासारखे काहीतरी दिसत होते. ते ‘स्फटिकासारखे’ स्पष्ट होते. मध्यभागी व राजासनाभोवती चार जिवंत प्राणी होते आणि ते मागून पुढून डोळ्यांनी पूर्ण भरलेले होते. ‘पहिला जिवंत प्राणी सिंहासारखा’ होता ‘दुसरा बैलासारखा होता’ ‘तिसऱ्याचा चेहरा मनुष्यासारखा होता,’ आणि ‘चौथा उडत्या गरुडासारखा होता.’ त्या ‘प्रत्येक जिवंत प्राण्याला सहा पंख होते’ व त्यांना सगळीकडे डोळे होते, त्यांच्या पंखावर आणि आतून डोळे होते, दिवस व रात्र न थांबता ते म्हणत होते. ‘पवित्र, पवित्र, पवित्र,’ हा प्रभू देव सर्वसमर्थ जो होता, जो आहे आणि जो येणार आहे. जो राजासनावर बसलेला आहे तो अनंतकाळपर्यंत जिवंत राहणार आहे त्याचे जेव्हा जेव्हा ते चार जिवंत प्राणी गौरव, सन्मान व उपकारस्तुती करीत होते, तेव्हा तेव्हा ते चोवीस वडील जो राजासनावर बसला आहे त्याच्यापुढे पालथे पडतात आणि जो युगानुयुग जिवंत आहे त्यास नमन करतात आणि आपले मुकुट राजासनासमोर ठेवून म्हणतात “हे प्रभू, आमच्या देवा, तू गौरव, सन्मान आणि सामर्थ्य प्राप्त करून घेण्यास योग्य आहेस, तू सर्व गोष्टी उत्पन्न केल्यास, कारण तू सर्वकाही अस्तित्वात आणले आणि तुझ्या इच्छेमुळे ते झाले आणि उत्पन्न केले.”

राजासनाच्या आणि चार जिवंत प्राण्यांच्या व त्या वडीलांच्या मध्यभागी ‘कोकरा’ उभा असलेला मी पाहिला, तो वधलेल्यासारखा होता, त्यास सात शिंगे आणि सात डोळे होते आणि हे ते सर्व पृथ्वीवर पाठविण्यात आलेले देवाचे सात आत्मे होते.

प्रत्येक निर्माण केलेली वस्तु आकाशात व पृथ्वीवर, पृथ्वीखाली व समुद्रातील अवघ्याना मी असे गाताना ऐकले की, “जो राजासनावर बसतो त्यास व कोकऱ्याला स्तुती, सन्मान, गौरव आणि सामर्थ्य युगानुयुगापर्यंत असो!”

तो मोठ्या आवाजात म्हणत होता, देवाचे भय धरा आणि त्यास गौरव करा; कारण न्यायाची वेळ आली आहे आणि ‘ज्याने आकाश, पृथ्वी आणि समुद्र आणि पाण्याचे झरे हे उत्पन्न केले त्यास नमन करा.’

आणि, मी जणू एका, विशाल समुदायाची वाणी, ऐकली; ती वाणी महापूराच्या आणि मेघांच्या मोठ्या गडगडाटांच्या आवाजासारखी होती. ती म्हणाली, ‘हालेलूया; कारण,’ आमचा ‘प्रभू’ सर्वसत्ताधारी देव हा ‘राज्य करीत आहे.

त्याच्या झग्यावर व त्याच्या मांडीवर ‘राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू’ असे नाव लिहिलेले आहे.

आणि मी तेथे भवन बघितले नाही; कारण सर्वसमर्थ प्रभू देव आणि कोकरा हेच तिचे भवन आहेत. आणि त्या नगरीला प्रकाश द्यायला सूर्याची किंवा चंद्राची गरज नव्हती; कारण ‘देवाचे तेज’ तिला प्रकाश देते आणि कोकरा तिचा दिवा आहे,

‘मी’ अल्फा व ओमेगा, ‘पहिला व अखेरचा,’ आरंभ आणि शेवट आहे.

Marathi - मराठी - MR

MRIRV'17 - Marathi Indian Revised Version - 2017

This Bible text is from Marathi Indian Revised Version IRV 2019
https://open.bible/bibles/marathi-bridge-text-bible/
provided by: Bridge Connectivity Solutions Pvt Ltd, available by Creative Commons CC-BY-SA-4.0,
and this new compilation is shared as www.creativecommons.org/licenses/by-sa/4.0.
Languages are made available to you by www.ipedge.net