21 – पूजा
हे सर्वशक्तिमान देवाचे पवित्र शब्द आहेत.
माणसांच्या बोलण्यात आपल्याला रस नसतो.
देवावर प्रेम करणार् या प्रत्येकासाठी... याबद्दल देव असे म्हणतो: पूजा.
हे सर्वशक्तिमान देवाचे पवित्र शब्द आहेत.
माणसांच्या बोलण्यात आपल्याला रस नसतो.
देवावर प्रेम करणार् या प्रत्येकासाठी... याबद्दल देव असे म्हणतो: पूजा.
त्या ‘प्रत्येक जिवंत प्राण्याला सहा पंख होते’ व त्यांना सगळीकडे डोळे होते, त्यांच्या पंखावर आणि आतून डोळे होते, दिवस व रात्र न थांबता ते म्हणत होते. ‘पवित्र, पवित्र, पवित्र,’ हा प्रभू देव सर्वसमर्थ जो होता, जो आहे आणि जो येणार आहे. जो राजासनावर बसलेला आहे तो अनंतकाळपर्यंत जिवंत राहणार आहे त्याचे जेव्हा जेव्हा ते चार जिवंत प्राणी गौरव, सन्मान व उपकारस्तुती करीत होते, तेव्हा तेव्हा ते चोवीस वडील जो राजासनावर बसला आहे त्याच्यापुढे पालथे पडतात आणि जो युगानुयुग जिवंत आहे त्यास नमन करतात आणि आपले मुकुट राजासनासमोर ठेवून म्हणतात “हे प्रभू, आमच्या देवा, तू गौरव, सन्मान आणि सामर्थ्य प्राप्त करून घेण्यास योग्य आहेस, तू सर्व गोष्टी उत्पन्न केल्यास, कारण तू सर्वकाही अस्तित्वात आणले आणि तुझ्या इच्छेमुळे ते झाले आणि उत्पन्न केले.”
”ह्यामुळे देवाने त्यास सर्वांहून उंच केले आहे आणि सर्व नावांहून श्रेष्ठ नाव ते त्यास दिले आहे. ह्यात हेतू हा की, स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा, आणि हे देवपिताच्या गौरवासाठी प्रत्येक जीभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे.
”सर्वशक्तिमान परमेश्वरा, तुझे मंदिर खरोखरच सुंदर आहे. परमेश्वरा, मला वाट पाहाण्याचा मनस्वी कंटाळा आला आहे. मला तुझ्या मंदिरात यायचे आहे. माझ्यातला कण कण जिवंत देवाजवळ जायला उत्सुक आहे. सर्वशक्तिमान परमेश्वरा, माझ्या राजा, माझ्या देवा, चिमण्यांना आणि पाकोळ्यांना देखील घरे असतात. ते पक्षी तुझ्या सिंहासनाजवळ त्यांचे घरटे बांधतात आणि तिथे त्यांना पिल्ले होतात. तुझ्या मंदिरात राहाणारे लोक खूप सुखी असतात. ते नेहमी तुझी स्तुती करतात.
”एके दिवशी हनोख देवाबरोबर चालत होता; नंतर तो नाहिसा झाला कारण देवाने त्याला नेले.
”आणि परात्पर देवाचा याजक असलेला शालेमाचा राजा मलकीसदेकही भाकर व द्राक्षारस घेऊन अब्रामाला भेटण्यास आला. मलकीसदेकाने अब्रामाला आशीर्वाद देऊन म्हटले,“अब्रामा, आकाश व पृथ्वी यांचा उत्पन्नकर्ता परात्पर देव तुला आशीर्वाद देवो. त्या परात्पर देवाने तुझ्या शत्रूंचा पराभव करण्यास तुला मदत केली त्या परात्पर देवाचा आम्ही धन्यवाद करतो.”तेव्हा अब्रामाने लढाईच्या काळात त्याच्याजवळून जे जे घेतले होते त्याचा दहावा भाग मलकीसदेकाला दिला.
”परंतु अब्राम सदोमाच्या राजाला म्हणाला, “आकाश व पृथ्वीचा निर्माणकर्ता परमेश्वर, परात्पर देव याला मी वचन देतो की,
”मग अब्रामाने देवाला लवून नमन केले; देव त्याला म्हणाला,
”तेव्हा सेवकाने नमन करुन परमेश्वराची उपासना केली.
”त्यावेळी मी मस्तक लववून माझ्या धन्याच्या परमेश्वराची उपकारस्तुती केली, कारण त्याने मला माझ्या स्वामीच्या भावच्या मुलीला त्याच्या मुलाकडे नेण्याचा योग्य मार्ग दाखवला;
”अब्राहामाच्या सेवकाने हे शब्द ऐकले आणि भूमिपर्यंत लवून परमेश्वराला नमन केले;
”त्या डोंगरावर त्याने एका जळत्या झुडूपात परमेश्वरच्या दूताला पाहिले. मोशेन असे पाहिले की झुडूप जळत होते परंतु ते जळून खाक होत नव्हते तर जसेच्या तसेच होते.
”तेव्हा परमेश्वर म्हणाला, “तू आहेस तेथून झुडूपाजवळ येऊनकोस, तर तुझ्या पायातले पायतण काढ; कारण तू पवित्र भूमिवर उभा आहेस.
”मग देव मोशेला म्हणाला, “त्याचे नाव ‘जो मी आहे तो मी आहे’असे आहे, हे त्यांना सांग. तू इस्राएल लोकाकंडे जाशील तेव्हा ‘मी आहे’ ने मला पाठवले आहे असे त्यांना सांग.
”परंतु मी तुला एका हेतूने ठेवले आहे की मी तुला माझे सामर्थ्य दाखवावे. मग सर्व जगाला मी कोण आहे हे कळेल.
”दिवसा त्यांना मार्ग दाखविण्यासाठी उंच ढगाची व रात्री उंच अग्निस्तंभाची योजना करून परमेश्वर त्यांच्या पुढे चालत असे. लोकांना रात्रीही प्रवास करता यावा यासाठी तो ढग त्यांना रात्री प्रकाश देत असे. दिवसा तो उंच ढग व रात्री तो अग्निस्तंभ सतत त्या लोकांबरोबर असत.
”इस्राएल लोकांना घेऊन जाण्यासाठी नेहमीप्रमाणे त्यांच्या पुढे चालणारा परमेश्वराचा दूत इस्राएल लोकांच्या मागे जाऊन उभा राहिला, तेव्हा तो उंच मेघस्तंभ इस्राएल लोकांच्या आघाडीवरून त्यांच्या पिछाडीस गेला.
”नंतर मोशे व इस्राएल लोक परमेश्वराला हे गीत गाऊ लागले “मी परमेश्वराला गीत गाईन कारण त्याने महान कृत्ये केली आहेत; घोडा व स्वार यांना त्याने समुद्रात फेकून दिले आहे. परमेश्वर माझे सामर्थ्य आहे. तो माझे रक्षण करितो. मी त्याची स्तुतिस्तोत्रे गाईन;परमेश्वर माझा देव आहे; तो माझ्या पूर्वजाचा देव आहे; मी त्याचे गौरव करीन.
”“हे परमेश्वर तुझा उजवा हात आश्चर्यकारकरीत्या बलशाली आहे; त्या हाताने तू शत्रूंचा चुराडा करून टाकलास. तुझ्या वैभवशाली सामर्थ्याने तू तुझ्याविरुद्ध बंड करून उठणाऱ्यांचा नाश करतोस; अग्नीने वाळलेल्या गवताच्या काड्या जाळाव्या तसे तू त्यांना तुझ्या रागाने जाळून भस्म करतोस.
”“परमेश्वरासारखा, देवतांमध्ये कोण देव आहे का? नाही! परमेश्वरा तुझ्या समान कोणी देव नाही; तू आश्चर्यकारक, अति पवित्र देव आहेस! तुझे सामर्थ्य आश्चर्यकारक आहे! तू महान चमत्कार करतोस!
”परमेश्वर सदासर्वदा राज्य करो!”
”मग अहरोन सर्व इस्राएल लोकांशी बोलला. ते सर्वजण एके ठिकाणी जमले होते; अहरोन बोलत असताना सर्व लोकांनी वळून रानाकडे पाहिले; आणि त्यांना एका ढगात परमेश्वराचे तेज दिसले.
”आणि परमेश्वर मोशेला म्हणाला, “मी दाट ढगात येऊन तुझ्याशी बोलेन आणि माझे तुझ्याबरोबरचे बोलणे सर्व इस्राएल लोकांना ऐकू जाईल; मी हे ह्यासाठी करीन की त्यामुळे तू सांगितलेल्या सर्व गोष्टीवर ते नेहमी विश्वास ठेवतील.”
”तीन दिवसानंतर पर्वतावर विजांचा लखलखाट व गडगडाट झाला; पर्वतावर एक दाट ढग उतरला आणि रणशिंगाचा फार मोठा आवाज झाला. तेव्हा छावणीत राहाणारे सर्व लोक घाबरले. नंतर मोशेने लोकांना छावणीतून बाहेर काढून देवाला भेटावयास पर्वताजवळच्या जागी नेले. सीनाय पर्वत धुराने झाकून गेला. भट्टीतून येणाऱ्या धुरासारखा धूर पर्वतातून वर आला. परमेश्वर पर्वतावर अग्नीतून उत्तरला म्हणून असे झाले; आणि सर्व सीनाय पर्वत थरथरु लागला.
”मग मोशे पर्वतावर चढून गेला आणि ढगाने पर्वत झाकून टाकला; परमेश्वराचे तेज सीनाय पर्वतावर उतरले; ढगाने सहा दिवस पर्वताला झाकून टाकले; सातव्या दिवशी परमेश्वर मोशेबरोबर ढगातून बोलला. इस्राएल लोकांनी पर्वतावर परमेश्वराचे तेज पाहिले; ते पर्वताच्या शिखरावर भस्म करणाऱ्या धगधगत्या अग्नीसारखे होते. मोशे पर्वतावर चढून आणखी वर ढगात गेला; मोशे चाळीस दिवस व चाळीस रात्र तेथे होता.
”मी जेव्हा तुला भेटेन तेव्हा कराराच्या कोशावर ठेवलेल्या देवदतांच्यामधुन मी तुझ्याशी बोलेन; आणि तेथूनच मी इस्राएल लोकांसाठी माझ्या सर्व आज्ञा देईन.
”जेव्हा मोशे तंबूत जाई तेव्हा उंच ढग खाली उतरून येई आणि दर्शन मंडपाच्या दारापाशी तो उभा राही; ह्याप्रमाणे परमेश्वर मोशेशी बोलत असे. जेव्हा लोक दर्शन मंडपाच्या दारात ढग बघत तेव्हा ते आपापल्या तंबूच्या दारात उभे राहून देवाला नमन करीत. ज्याप्रमाणे एखादा माणूस आपल्या मित्राशी बोलतो त्याप्रमाणे परमेश्वर मोशेबरोबर समोरासमोरबोलत असे. परमेश्वराशी बोलल्यानंतर मोशे नेहमीआपल्या छावणीत माघारी जाई तरी मोशेचा मदतनीस. नूनाचा मुलगा यहोशवा हा तरुण मंडप सोडून बाहेर येत नसे.
”परमेश्वराने उत्तर दिले, “मी स्वत: तुझ्या बरोबर येईन व तुला विसावा देईन.”
”नंतर मोशे म्हणाला, “आता कृपा करून मला तुझे तेज दाखव.” मग परमेश्वराने मोशेला उत्तर दिले, “मी माझे सर्व चांगुलपण तुझ्यापुढे चालवीन; मी परमेश्वर आहे आणि हे माझे नांव मी जाहीर करीन म्हणजे तू ते ऐकशील कारण मी निवडलेल्या कोणावरही दया करीन व त्यांच्यावर प्रेम करीन. परंतु तू माझा चेहरा पाहू शकणार नाहीस, कारण माझा चेहरा पाहिलेला कोणीही माणूस जगणार नाही. “माझ्याजवळ ह्या ठिकाणी एक खडक आहे; तू त्यावर उभा राहा. माझे तेज त्या जागेजवळून पुढे जाईल तेव्हा मी तुला त्या खडकातील मोठ्या भेगेत ठेवीन; आणि मी निघून जाईपर्यत माझ्या हाताने तुला झाकीन; नंतर मी माझा हात काढून घेईन आणि तू माझी पाठपाहाशील; परंतु तू माझा चेहरा पाहाणार नाहीस.”
”मोशे पर्वतावर आल्यावर परमेश्वर एका ढगातून त्याच्याकडे खाली उतरला व तो मोशेपाशी उभा राहिला; तेव्हा मोशेने परमेश्वराचे नाव घेतले. परमेश्वर मोशेपुढून गेला व म्हणाला, “मी याव्हे म्हणजे प्रभु आहे; मी दयाळू, कनवाळू, मंदक्रोध (लवकर राग न येणारा,) महान प्रेमाने पुरेपूर भरलेला व विश्वास ठेवण्यास पात्र असा देव आहे. परमेश्वर हजारो लोकांवर दया करतो; तो लोकांच्या वाईट कर्माची त्यांना क्षमा करतो; परंतु तो दोषी लोकांना शिक्षा करावयास विसरत नाही; परमेश्वर फक्त लोकांनाच शिक्षा करतो असे नाही परंतु त्यांची मुले, त्यांची नातवंडे व पतवंडे ह्यांना म्हणजे त्यांच्या तिसऱ्या चौथ्या पिढीपर्यंत, त्यांच्या पूर्वजाच्यां अपराधाबद्दल शिक्षा भोगावयास लावतो.” मग मोशेने ताबडतोब भूमिपर्यंत वाकून परमेश्वराला नमन केले. मोशे म्हणाला,
”दुसऱ्या कोणत्याही दैवतांची पूजा करु नका; मी ‘याव्हे’ (कानाह) आहे; हे माझे नांव आहे; मी ईर्ष्यावान देव आहे.
”मग दर्शन मंडपावर मेघाने छाया केली व पवित्र निवास मंडप परमेश्वराच्या तेजाने भरून गेला. दर्शनमंडपावर मेघ राहिला व परमेश्वराच्या तेजाने पवित्र निवास मंडप भरून गेला म्हणून मोशेला आत जाता येईना.
”परमेश्वराचा मेघ दिवसा पवित्र निवास मंडपावर राही आणि रात्री त्यात अग्नी असे त्यामुळे सर्व इस्राएल लोकांना आपल्या प्रवासात तो दिसत असे.
”2मोशे व अहरोन दर्शन मंडपात गेले आणि बाहेर आल्यावर त्यांनी लोकांना आशीर्वाद दिला; तेव्हा परमेश्वराचे तेज सर्व लोकांना दिसले; तेव्हा परमेश्वरासमोरुन अग्नी निघाला व त्याने वेदीवरील होमार्पण व चरबी भस्म केली; हे पाहून सर्व लोकांनी जयजयकार केला व दंडवत घातले.
”तो म्हणाला, “तुझा भाऊ अहरोन ह्याला सांग की त्याने वाटेल त्यावेळी परमपवित्रस्थानात अंतरपटाच्या आत पवित्र कोशावर असलेल्या दयासनापुढे जाऊ नये; तेथे दयासनावरील ढगात मी दर्शन देत असतो; अहरोन जर तेथे जाईल तर तो मरेल!
”ज्या दिवशी पवित्र निवास मंडप म्हणजे कराराचा कोश असलेला तंबू उभा करण्यात आला त्या दिवशी परमेश्वराच्या ढगाने त्याच्यावर छाया केली; रात्री तो पवित्र निवास मंडपावरील ढग अग्नि सारखा दिसला. तो ढग सतत पवित्र निवास मंडपावर असे आणि रात्री तो अग्निसारखा दिसे.
”पण मी तुला सत्य सांगतो. मी नक्कीच जिवंत आहे आणि माझी प्रभा नक्कीच साऱ्या पृथ्वीवर भरून आहे. हे जसे खरे आहे तसेच खरेपणाने मी तुला वचन देतो.
”कोरहनेसुद्ध तंबूच्या दारात लोक जमा केले. नंतर प्रत्येकाला परमेश्वराची प्रभा दिसली.
”मोशे आणि अहरोन दर्शन मंडपाच्या दारात उभे होते. लोक मोशे आणि अहरोन विरुद्ध तक्रार करायला एकत्र जमले. पण जेव्हा त्यांनी दर्शन मंडपाकडे पाहिले तेव्हा ढंगानी त्याला झाकून टाकले आणि तिथे परमेश्वराचे तेज दिसू लागले.
”म्हणून मोशे आणि अहरोन लोकांची गर्दी सोडून दर्शन मंडपाच्या प्रवेशद्वाराशी गेले. त्यांनी जमिनीपर्यंत लवून नमस्कार केला आणि त्यांना परमेश्वराचे तेज दिसले.
”नंतर परमेश्वराने बलामाचे डोळे उघडले, तेव्हा त्याला परमेश्वराचा दूत दिसला. तो रस्त्यात तलवार घेऊन उभा होता. त्याने परमेश्वराच्या दूताला रस्त्यात जमिनीपर्यंत वाकून नमस्कार केला.
”मी हा निरोप देवाकडून ऐकला. परात्पर देवाने मला जे शिकविले ते मी शिकलो. सर्वशक्तिमान देवाने मला जे दाखविले ते मी पाहिले. मला जे स्पष्ट दिसते ते मी नतमस्तक होऊन सांगतो.
”परमेश्वर हाच खरा देव आहे हे तुम्हाला कळावे म्हणून त्याने तुम्हाला हे दाखवले. त्याच्यासारखा दुसरा देव नाही. 3तुम्हाला शिकवण द्यावी म्हणून त्याने आकाशातून आपली वाणी ऐकवली. पृथ्वीवर आपला महान अग्नी त्याने दाखवला व त्यातून त्याचे शब्द तुम्ही ऐकले.
”तेव्हा, वर आकाशात आणि खाली पृथ्वीवर परमेश्वर हाच देव आहे, दुसरा कोणीही नाही. हे आज तुम्ही नीट समजून घ्या व लक्षात ठेवा.
”आणि म्हणाले, ‘आमचा देव परमेश्वर ह्याने आम्हाला त्याचे तेज आणि महानता दाखवली आहे. त्याला प्रत्यक्ष अग्नीतून बोलताना आम्ही ऐकले. देव माणसाशी बोलला तरी माणूस जगू शकतो हे आम्ही पाहिले आहे.
”“हे इस्राएल लोकहो, ऐका! परमेश्वर हाच आपला देव आहे. परमेश्वर एकच आहे. आणि आपला देव परमेश्वर ह्यावर संपूर्ण अंत:करणाने, संपूर्ण मनाने व संपूर्ण शक्तीने प्रेम करा.
”कारण परमेश्वर तुमचा देव आहे तो देवांचा देव व प्रभुंचा प्रभु आहे. तो महान परमेश्वर आहे. तो विस्मयकारी आहे. त्याला सर्व जण सारखेच आहेत. तो पक्षपात करत नाही की लाच घेत नाही. नवीन दगडी पाट्या
”तुम्ही फक्त तुमचा देव परमेश्वर याचीच सेवा करा. त्याच्याबद्दल आदर बाळगा. त्याला धरुन राहा. शपथ वाहाताना त्याच्याच नावाने शपथ घ्या. फक्त परमेश्वराची स्तुती करा. तो तुमचा देव आहे. त्याने केलेले चमत्कार आणि थोर कृत्ये तुम्ही प्रत्यक्ष पाहिली आहेत.
”“या ग्रंथातील सर्व शिकवण व आज्ञा तुम्ही पाळा. प्रतापी आणि विस्मयकारी तुमचा देव परमेश्वर ह्याचा आदर करा. याप्रमाणे आचरण ठेवले नाहीत तर
”घोषणाकरीन मी परमेश्वराच्या नावाची. तुम्हीही परमेश्वराची महती गा! “तो आहे दुर्ग आणि त्याची कृती परिपूर्ण! कारण चोखाळतो तो उचित मार्ग! देवच खरा आणि विश्वासू न्यायी आणि सरळ.
”“तेव्हा आता पाहा, मीच खरा आणि एकमेव देव आहे. अन्य कोणी नाही. लोकांचा तारक मी आणि मारकही मीच, त्यांना घायाळ करणारा मी आणि त्यातून बरे करणाराही मीच. माझ्या समर्थ हातांमधून कोणीही कोणालाही सोडवू शकत नाही!
”“हे यशुरुन! देवासारखा कोणी नाही. तुझ्या साहाय्यासाठी, मेघांवर आरुढ होऊन तो आपल्या प्रतापाने आकाशातून तुझ्या मदतीला येतो. देव सनातन आहे. तो तुझे आश्रयस्थान आहे. देवाचे सामर्थ्य सर्वकाळ चालते!. तो तुझे रक्षण करतो. तुझ्या शत्रूंना तो तुझ्या प्रदेशातून हुसकावून लावेल. ‘शत्रूंना नष्ट कर’ असे तो म्हणतो.
”तो म्हणाला, नाही; मी येथें परमेश्वराचा सेनापती ह्या नात्यानें आलों आहें. तेव्हां यहोशवानें त्याला दंडवत घालून म्हटलें, स्वामीची आपल्या दासाला काय आज्ञा आहे? परमेश्वराचा सेनापती यहोशवाला म्हणाला, आपल्या पालांतले जोडे काढ; कारण ज्या जागी तूं उभा आहेस ती पवित्र आहे. तेव्हां यहोशवानें तसें केले.
”सात याजकांनी सात रणाशिगें घेऊन कोशापुढें चालावे; सातव्या दिवशीं तुम्हीं नगरला सात प्रदेक्षिणा घालाव्या आणि याजकानी रणशिगें फुंकलीं जात असताना त्याच्या दीर्घनाद कानी पडताच सर्व लोकांनी मोठा जयघोष करावा, म्हणजे नगराचा तट जागच्या जागी कोसळेल; मग तुम्ही प्रत्यकानें सरळ आत चलून जावें.
”तेव्हां लोकांनी जयघोष केला आणि रणशिंगें वाजत राहिलीं रणशिंगांचा आवाज ऐकतांच लोकांनी मोठ्याने जयघोष केला आणि तट जागच्याजागी कोसळला; लगेच लोकांनी आपआपल्यासमोर त्या नगरात सरळ चालून जाऊन तें हस्तगत केलें.
”यहोशवाने आपले कपडे फाडले आणि तो व इस्त्राएलाचे वडील जन संध्याकाळपर्यत परमेश्वराच्या कोशापुढें पालथे पडून राहिले; आणि त्यांनी आपल्या डोक्यांत धूळ घातली.
”राजेहो, ऐका; अधिपतींनो लक्ष द्दा, मी स्वतः परमेश्वराला गाईन; इस्त्राएलाचा देव परमेश्वर ह्याचीं स्तोत्रें गाईन.
”तेव्हां परमेश्वराचा दूत त्याला बोलला, ''तूं माझें नांव कशासाठीं विचारितोस? तें तर अपूर्व आहे.'' मग मानोहाने शेंरडांतले करडूं नैवेद्दासुध्दा घेऊन खडकावर परमेश्वराजवळ होम केला; तेव्हां मानोहा व त्याची स्त्री पाहत असतां, त्याने अपूर्व केलें. म्हणजे असें झालें कीं जेव्हां जाळ वेदीवरून आकाशांत चढला, तेव्हां परमेश्वराचा दूत त्या वेदीच्या जाळांत चढला, आणि मानोहा व त्याची स्त्री यानी पाहून आपलीं तोंडें भूमीस लावून नमस्कार केला.
”यहोवासारखा कोणी पवित्र नाही,कारम तुझ्यावाचून कोणी नाही;आमच्या देवासारखा कडकही कोणी नाही.
”तेव्हा देवदाराच्या लाकडापासून केलेली नानाविध वाद्ये आणि वीणा, सारंगी, डफ, डमरु, झांजा वाजवत दावीद आणि त्याच्या बरोबरचे सर्व इस्राएल लोक नाचत कोशापुढे चालू लागले.
”सुती एफोद घालून दावीद परमेश्वरापुढे नाच करत होता. दावीद आणि सर्व इस्राएल लोक आनंदाने बेभान झाले होते. नगरात कोश आणताना ते जयजयकार करत होते. शिंग वाजवत होते. शौलाची मुलगी मीखल हे सर्व खिडकीतून पाहात होती. कोश नगरात आणत असताना दावीद त्यापुढे नाचत. उड्या मारत होता. मीखलने हे पाहिले तेव्हा तिला खेद वाटला. दावीद स्वत:चे हसे करुन घेत आहे असे तिला वाटले.
”त्यांनी माझी चेष्टा केली. पण मी मदतीसाठी परमेश्वराचा धावा केला आणि शत्रूपासून माझा बचाव करण्यात आला.
”परमेश्वर आकाशातून गरजला त्याचा आवाज सर्वत्र दुमदुमला
”म्हणून मी राष्ट्राराष्ट्रांमध्ये आभारपूर्वक तुझी स्तुतिस्तोत्रे गाईन. तुझे नामसंकीर्तन करीन.
”अतिपवित्र गाभाऱ्यातहा पवित्र करारकोश ठेवल्यावर याजक तेथून बाहेर पडले. त्याबरोबर मंदिर मेघाने व्यापले. परमेश्वराच्या तेजाने मंदिर भरुन गेल्यामुळे याजकांना आपले काम चालू ठेवता येईना.
”एवढे बोलून शलमोन परमेश्वराच्या वेदीपुढे उभा राहिला. सर्व लोक त्याच्या समोर होते. दोन्ही हात आकाशाच्या दिशेन पसरुन वर पाहात शलमोन म्हणाला, “हे इस्राएलच्या परमेश्वर देवा, तुझ्या सारखा दुसरा कोणी आकाशात किंवा पृथ्वीतलावर नाही. तू हा करार केलास कारण तुझे आमच्यावर प्रेम आहे. तू आपला करार पाळतोस. जे तू दाखवलेल्या मार्गाने जातात त्यांच्याविषयी तू दयाळू आणि एकनिष्ठ असतोस.
”“पण परमेश्वरा, तू खरोखरच इथे पृथ्वीवर आमच्यामध्ये कायम राहाशील का? हे विस्तीर्ण आकाश आणि स्वर्ग यांतही तू मावत नाहीस. तेव्हा हे मी बांधलेले मंदिरही तुझ्यासाठी अपुरेच आहे.
”सर्वांच्या देखतच हे घडले. तेव्हा लोकांनी जमीनीवर पालथे पडून “परमेश्वर हाच देव आहे, परमेश्वर हाच देव आहे” असे म्हटले.
”इकडे परमेश्वराचे म्हणणे काय आहे ते मीखाया सांगतच होता. मीखाया म्हणाला, “ऐका परमेश्वर काय म्हणतो ते पाहा परमेश्वर स्वर्गात सिंहासनावर बसलेला मी पाहिला. त्याचे दूत त्याच्या शेजारी उभे आहेत.
”परमेश्वराची प्रार्थना करुन हिज्कीया म्हणाला. “परमेश्वर देवा, करुबांच्यावर राजासनी बसणारा तूच इस्राएलचा देव आहेस. पृथ्वीच्या पाठीवरील सर्व राज्यांचा तू आणि एकमेव तूच नियंता आहेस. आकाश आणि पृथ्वीचा तू निर्माता आहेस,
”दावीद आणि इस्राएल लोक देवापुढे जल्लोष करत चालले. देवाची स्तुतिगीते गात, वीणा, सतार, डफ झांजा, कर्णे इत्यादी वाद्ये वाजवत ते चालले होते.
”दावीदाने लेवी प्रमुखांना आपल्या गायकबंधूंना बोलावून घ्यायला सांगितले. सतार, वीणा, झांजा ही वाद्ये आणून त्यांना मंगलगीते म्हणायला सांगितले.
”करारकोश वाहून नेणाऱ्या सर्व लेवींनी तलम वस्त्राचे अंगरखे घातले होते. गायकप्रमुख कनन्या आणि इतर सर्व गायक यांनी तलम झगे घातले होते. दावीदाचा अंगरखा देखील तलम कापडाचा होता. शिवाय त्याने तशाच कापडाचा एफोद सुध्दा घातला होता. अखेर सर्व इस्राएल लोकांनी करार कोश आणला. जयघोष करत रण-शिंगाच्या नादांत, कर्णे, झांजा, सतारी, वीणा वाजवत त्यांनी तो आणला. करार कोश दावीदनगरात पोहंचला तेव्हा शौलची मुलगी मीखल हिने खिडकीतून पाहिले. दावीद राजाला नाचताना, जल्लोष करताना पाहून त्याच्याबद्दलचा तिचा आदर नाहीसा झाला. तिला त्याचा तो वेडगळपणा वाटला.
”परमेश्वराचे स्तवन करा. त्याला हाक मारा. परमेश्वराने केलेली महान कृत्ये लोकांना सांगा. परमेश्वराची स्तोत्रे गा. त्यांचे स्तवन म्हणा. त्याचे चमत्कार इतरांना सांगा. परमेश्वराच्या पवित्र नावाचा अभिमान धरा. परमेश्वराकडे येणाऱ्या तुम्हा सर्वांना आनंद मिळो. परमेश्वराकडे पाहा त्याचे सामर्थ्य बघा. मदतीसाठी त्याला शरण जा.
”पृथ्वीवरील समस्त लोकहो, परमेश्वराचे स्तवन करा. परमेश्वराने आपल्याला वाचवल्याची शुभवार्ता रोज सर्वांना सांगा. परमेश्वराच्या गौरवाची कृत्ये सर्व राष्ट्रांना कळवा तो किती अद्भूत आहे ते सर्वांना सांगा. परमेश्वर थोर आहे. त्याची स्तुती केली पाजिजे इतर दैवतांपेक्षा परमेश्वराचा धाक अधिक आहे. का बरे? कारण जगातले इतर सगळी दैवते म्हणजे नुसत्या क्षुद्र मूर्ती पण परमेश्वराने आकाश निर्माण केले. परमेश्वराला महिमा आणि सन्मान आहे. देव तेजस्वी लखलखीत प्रकाशाप्रमाणे आहे. लोक हो, सहकुटुंब परमेश्वराच्या महिम्याची आणि सामर्थ्याची स्तुती करा. त्याचे माहात्म्या गा. त्याच्या नावाचा आदर करा. त्याच्यापुढे आपली अर्पणे आणा. त्याची आराधना करा आणि त्याच्या सात्विक सौंदर्याचे गुणगान करा. परमेश्वरासमोर सर्व पृथ्वीचा भीतीने थरकाप होतो पण त्याने पृथ्वीला खंबीरपणा दिला. हे जग असे हलणार नाही. पृथ्वी आणि आकाश आनंदी असो सर्वत्र लोक म्हणोत, “हे परमेश्वराचे साम्राज्य आहे.” समुद्र आणि त्यात सामावलेले सर्व काही आनंदाने गर्जना करो शेतमळ्यांची सृष्टी उल्हासित होवो. अरण्यातील वृक्ष परमेश्वरासमोर हर्षभरित होऊन गातील कारण साक्षात परमेश्वरच जगाला न्याय देण्यासाठी आलेला असेल. लोक हो, परमेश्वराचे कृतज्ञतेने स्मरण करा, कारण तो चांगला आहे. त्याचे प्रेम चिरंतन आहे. परमेश्वराला सांगा, “देवा, तूच आमचा त्राता आहेस. आमचे रक्षण कर, आम्हाला संघटित ठेव आणि इतर राष्ट्रांपासून आमचा बचाव कर. मग आम्ही तुझे नामसंकीर्तन करु. तुझा माहिमा गाऊ.” इस्राएलच्या परमेश्वर देवाचे अनादी काळापासून स्तवन केले जाते. त्याची स्तुतिस्तोत्रे अखंड गायिली जावोत.सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणून परमेश्वराचे स्तवन केले.
”ते रोज सकाळ-संध्याकाळ परमेश्वराचे आभार मानायला आणि त्याची स्तुती करायला उभे राहत.
”त्या समुदायापुढे दावीदाने परमेश्वराचे स्तुतिगीत म्हटले. ते असे:“हे परमेश्वर, इस्राएलच्या देवा, आमच्या पित्या, सदासर्वकाळ तू धन्य आहेस. महिमा, पराक्रम, शोभा, विजय आणि सन्मान ही सर्व तुझीच आहेत कारण स्वर्ग - पृथ्वीवर जे जे काही आहे ते तुझेच आहे. परमेश्वरा, हे राज्य तुझेच आहे. या सागळ्यांचा शास्ता आणि मुकुटमणी तूच आहेस. वैभव आणि सन्मान यांचा स्रोत तूच. सर्वांवर तुझा अधिकार आहे. सत्ता आणि सामर्थ्य तुझ्या हातांत एकवटले आहे. कोणालाही थोर आणि बलवान करणे तुझ्याच हातात आहे. देवा, आम्ही तुझे आभार मानतो आणि तुझ्या प्रतापी नावाची स्तुती करतो.
”एवढे झाल्यावर याजक गाभाऱ्यातून बाहेर आले. ते सर्व शुचिर्भूत झाले होते. ते सर्व नेमके कोणकोणत्या गटातले होते हे यावेळी महत्वाचे नव्हते. आतून बाहेर आल्यावर ते पुन्हा पवित्र झाले. मग सर्व लेवी गायक वेदीच्या पूर्वेला उभे राहिले. आसाफ, हेमान आणि यदुथूनचे सर्व गायक वर्ग हजर होते. त्यांची मुले आणि भाऊबंददेखील आले होते. यासर्वांनी शुभ्र तलम वस्त्रे घातली होती. झांजा, सारंग्या आणि वीणा ही वाद्ये त्यांनी हातात घेतली होती. या लेवी गायकांबरोबर 120 याजक होते आणि ते कर्णे वाजवत होते. गायन आणि वादन एका सुरात चालले होते. एका सुरात त्यांनी परमेश्वराचे स्तवन केले आणि त्याला धन्यवाद दिले. कर्णे, झांजा इत्यादी वाद्यांचा एक जल्लोष उडाला. त्यांच्या गाण्याचा आशय असा होता: परमेश्वराची स्तुती कारण तो चांगला आहे. त्याची खरी प्रीति सर्वकाळ राहाते.तेव्हा परमेश्वराचे सर्व मंदिर मेघाने भरुन गेले. त्या मेघामुळे याजकांना तेथे सेवेला उभे राहता येईना, इतके परमेश्वराच्या तेजाने देवाचे मंदिर भरुन गेले होते.
”शलमोन परमेश्वराच्या वेदीसमोर उभा राहिला. तेथे जमलेल्या सर्व इस्राएल लोकांपुढे तो उभा होता. त्याने आपले बाहू पसरले. बाहेरच्या आवारात प्रत्येकी 7 1/2 फूट लांबी, रुंदी आणि उंची असलेला एक पितळी चौरंग शलमोनाने बसवला होता. त्यावर चढून तो समस्त इस्राएल लोकांसमोर गुडघे टेकून बसला आणि त्याने आकाशाकडे हात पसरले शलमोन म्हणाला,”हे इस्राएलच्या परमेश्वर देवा, स्वर्गात किंवा पृथ्वीवर तुझ्यासारखा दुसरा कोणीही देव नाही. तुझे जिवाभावाने अनुसरण करणाऱ्या आणि योग्य आचरण करणाऱ्या तुझ्या सेवकांना तुझे प्रेम आणि तुझी कृपा यांचे दिलेले वचन पाळणारा तू परमेश्वर आहेस.
”“परमेश्वर पृथ्वीवर लोकांमध्ये वस्ती करु शकत नाही ही गोष्ट, हे देवा, आम्हाला माहीत आहे. आकाश आणि त्या पुढचे अवकाशही तुला सामावून घ्यायला असमर्थ आहेत. या मी बांधलेल्या मंदिरातही तू मावू शकत नाहीस हे आम्ही जाणतो
”शलमोनाची प्रार्थना संपल्याबरोबर स्वर्गातून अग्नी खाली उतरला आणि त्याने होमबली आणि यज्ञार्पणे भस्मसात केली. परमेश्वराच्या लखलखीत तेजाने मंदिर भरुन गेले. त्या तेजाने दिपून याजकांनाही परमेश्वराच्या मंदिरात जाता येईना. थेट स्वर्गातून अग्री खाली येणे आणि परमेश्वराचे तेज मंदिरावर पसरणे या गोष्टी इस्राएलच्या समस्त लोकांनी पाहिल्या. तेव्हा त्यांनी जमिनीपर्यंत लवून नमन केले, परमेश्वराला धन्यवाद दिले आणि ते म्हणाले, “परमेश्वर चांगला आहे त्याची कृपा सर्वकाळ राहाते.”
”याजक आपल्या कामाला सिध्द झाले. परमेश्वराच्या भजनाची वाद्ये घेऊन लेवी ही उभे राहिले. राजा दावीदाने ही वाद्ये परमेश्वराच्या स्तवनासाठी करुन घेतली होती. “परमेश्वराचे स्तवन करा कारण त्याची कृपा चिरंतन आहे” असे याजक आणि लेवी गात होते. लेवींच्या समोर उभे राहून याजक कर्णे वाजवत होते. सर्व इस्राएल लोक तिथे उभे होते.
”मीखाया म्हणाला, “परमेश्वराचा संदेश काय आहे तो ऐका परमेश्वराला मी आपल्या सिंहासनावर बसलेले पाहिले. स्वार्गातील सर्व सेना त्याच्या भोवताली उभी होती.
”यहोशाफाटने लोकांना प्रोत्साहन दिले व सुचना दिल्या.परमेश्वराचे स्तवन करणारी माणसे त्याने निवडली. परमेश्वर पवित्र आणि कल्याणकारी आहे म्हणून त्याचे स्तवन करण्यासाठी त्याने या गायकांना नेमले. त्यानी सैन्यासमोर उभे राहून स्तुतिगीते म्हटली. ते म्हणाले, “परमेश्वराने स्तवन करा कारण त्याची प्रीति सर्वकाळ आहे.”
”हिज्कीया आणि सरदार यांनी लेव्यांना परमेश्वराची स्तोत्रे गाण्याची आज्ञा केली. तेव्हा त्यानी दावीद आणि द्रष्टा आसाफ यांनी रचलेली स्तोत्रे म्हटली. या स्तवनांनी ते आनंदित झाले. सर्वांनी लवून नमस्कार करुन देवाची आराधना केली.
”इस्राएलच्या प्रजेने यरुशलेममध्ये बेखमीर भाकरीचा उत्सव सात दिवस साजरा केला. लोक आनंदात होते. लेवी आणि याजक यांनी रोज मन:पूर्वक परमेश्वराची स्तुतिस्त्रोत्रे गाईली.
”मंदिराचा पाया घालण्याचे काम पूर्ण झाल्यावर याजकांनी आपला याजकीय पोषाख घातला आणि हाती कर्णे घेतले. आसाफाच्या मुलांनी झांजा घेतल्या. भजनासाठी ते आपापल्या जागी उभे राहिले. इस्राएलचा राजा दावीद याने पूर्वींच त्यांची ही व्यवस्था ठरवून दिली होती. ‘देवाची स्तुती करा कारण देव चांगला आहे, तो सर्वकाळ प्रेम करतो’ अशी स्तुतिगीते त्यांनी आळीपाळीनेगयिली. मंदिराचा पाया घातला गेला म्हणून त्यांनी परमेश्वराचा जयजयकार केला. त्यांनी मोठ्याने घोषणा दिल्या आणि परमेश्वराची स्तुती केली.
”होमार्पणांची वेळ झाली तेव्हा मी उठलो; अंगावरची वस्त्रे आणि अंगरखा फाटलेला अशा स्थितीत मी गुडघे टेकून हात पसरुन देवापुढे बसलो. मी अतिशय लज्जित अशा अवस्थेत होतो.
”एज्राने परमेश्वराची, थोर परमेश्वराची स्तुती केली तेव्हा सर्व लोकांनी आपले हात वर करून “आमेन! आमेन! आमेन!” असा उद्गार काढला. मग सर्वांनी खाली वाकून, मस्तक जमिनीपर्यंत लववून परमेश्वराला वंदन केले.
”मग लेवी जिन्यावर उभे राहिले. या लेवींची नावे पुढीलप्रमाणे: येशूवा, बानी, कदमीएल, शबन्या, बुन्नी, शेरेब्या बानी, आणि कनानी. त्यांनी खूप मोठयाने परमेश्वर देवाचा धावा केला. मग पुढील हे लेवी पुन्हा बोलले: येशुवा, बानी, कदमीएल, बानी, हशबन्या, शेरेब्या, होदीया, शबन्या आणि पथहग्र. ते म्हणाले, “उभे राहा आणि आपला परमेश्वर देव याचे स्तवन करा.”देवाचे अस्तित्व पहिल्यापासून आहे आणि परमेश्वर चिरकाल राहील. लोक तुझ्या वैभवशाली नावाचे स्तवन करोत. तुझे नाम स्तुती आणि आशीर्वाद यांच्या पलीकडे उंचावले जावो. तू देव आहेस, परमेश्वरा, तूच फक्त देव आहेस. आकाश तू निर्माण केलेस. स्वर्ग आणि त्यातील सगळे काही तू केलेस. ही पृथ्वी आणि तिच्यावरील सर्व काही तू निर्माण केलेले आहेस. सर्व समुद्र आणि त्यांच्यातील सगळयाचा तूच निर्माता आहेस! तू सगळयात जीव ओतलेस. स्वर्गातील देवदूत तुला वाकून अभिवादन करतात व तुझी उपासना करतात.
”तू कृपावंत आहेस. म्हणूनच तू त्यांना वाळवंटात सोडून दिले नाहीस. दिवसा तू त्यांच्यावरुन मेघस्तंभ काढून घेतला नाहीस. तू त्यांना मार्ग दाखवत राहिलास. रात्रीही तू त्यांच्यावरचा अग्निस्तंभ काढून टाकला नाहीस त्यांच्या पुढचा मार्ग उजळत तू त्यांना वाट दाखवत राहिलास.
”यरुशलेमची तटबंदीची भिंत लोकांनी अर्पण केली. त्यांनी सर्व लेव्यांना यरुशलेमला एकत्र आणले. यरुशलेमची भिंत अर्पण करायच्या समारंभासाठी हे लेवी आपापल्या गावांहून आले. देवाची स्तुतिगीते आणि धन्यवादगीते गाण्यासाठी ते आले. त्यांनी झांजा, सतार व वीणा ही वाद्ये वाजवली.
”(फार पूर्वी, दावीदच्या काळी आसाफ गायकांचा मुख होता. त्याच्याजवळ देवाची स्तुतिगीते आणि धन्यवादगीते पुष्कळ होती.
”ईयोबने जेव्हा हे ऐकले तेव्हा आपल्याला खुप दु:ख झाले आहे हे दाखविण्यासाठी त्याने आपले कपडे फाडले, डोक्यावरचे केस काढले व जमिनीवर पडून त्याने देवाची आराधना सुरु केली. तो म्हणाला:“मी जेव्हा या पृथ्वीवर आलो तेव्हा नागवाच होतो व माझ्याजवळ काहीही नव्हते. मी जेव्हा मरेन व हे जग सोडून जाईल तेव्हाही मी नागवाच असेन आणि माझ्याजवळ काहीही नसेल. परमेश्वर देतो व तोच ते परतही घेतो. परमेश्वराचे नाव धन्य असो.”
”पण ईयोब, मी जर तुझ्या जागी असतो तर देवाकडेच गेलो असतो. त्याला माझे गान्हाणे सांगितले असते. देव ज्या आश्र्चर्यकारक गोष्टी करतो त्या माणसाला समजत नाहीत. त्याच्या अद्भुत गोष्टींची सीमा नाही.
”“ईयोब, तू देवाला खरोखरीच समजू शकतोस असे तुला वाटते का? त्या सर्वशक्तिमान देवाला समजणे अशक्य आहे.
”“पण ईयोब फक्त देवाची सेवा करण्यासाठी तू तुझ्या मनाची तयारी केली पाहिजेस आणि तू तुझे हात त्याची उपासना करण्यासाठी त्याच्या दिशेने उचलले पाहिजेस.
”माझा बचाव करणारा कोणी तरी आहे याची मला खात्री आहे. तो हयात आहे हे मला माहीत आहे. आणि शेवटी तो या पृथ्वीतलावर येऊन उभा राहील आणि माझा बचाव करील. मी जेव्हा माझे शरीर सोडून जाईन तेव्हा आणि माझी कातडी नष्ट होईल तेव्हा सुध्दा मी देवाला पाहू शकेन. मी देवाला माझ्या डोळ्यांनी बघेन. अन्य कुणी नाही, तर मी स्वत:च त्याला पाहीन. आणि त्यामुळे मी किती हुरळून गेलो आहे ते मी सांगू शकत नाही.
”सर्वशक्तिमान देवच तुझे सोने असू दे. त्यालाच तुझा चांदीचा ढीग समज. नंतर तू सर्वशक्तिमान देवाला अनुभवू शकशील. तू त्याच्याकडे बघू शकशील.
”“देवाजवळ खूप शक्ती आहे. तो जागातला सगळ्यात मोठा गुरु आहे. काय करावे ते देवाला कुणी सांगू शकत नाही ‘देवा तू अयोग्य केलेस’ असे कुणी त्याला म्हणू शकत नाही. “देवाने जे काही केले त्याबद्दल नेहमी त्याची स्तुती करायची आठवण ठेव. लोकांनी देवाच्या स्तुतीवर अनेक गाणी रचली आहेत.
”“गडगडाट व वीजा ह्यांची मला भिती वाटते. तेव्हा माझ्या ह्दयाची धडथड वाढते. प्रत्येक जण लक्षपूर्वक ऐका! देवाचा आवाज गडगडाटासारखा वाटतो. देवाच्या मुखातून येणारा गडगडाटासारखा आवाज ऐका. देव त्याच्या विजेला सर्व आकाशात चमकण्यासाठी पाठवतो. ती सर्व पृथ्वीभर चमकते. वीज चमकते तेव्हा देव गडगडाटी आवाज काढतो. देव त्याच्या अद्भुत आवाजात गर्जतो. वीज चमकल्यानंतर देवाची गर्जना ऐकू येते. “देवाचा गडगडाटी आवाज अद्भुत आहे. देव आपल्याला न काळणाऱ्या महान गोष्टी करत असतो.
”ढग आकाशात कसे तरंगतात ते तुला कळते का? देव ज्या अद्भुत गोष्टी करतो त्याचे ढग हे केवळ एक उदाहरण आहे. आणि देवाला त्याबद्दल सारे माहीत आहे.
”आणि देवसुध्दा तसाच आहे. देवाची सुवर्णप्रभा दक्षिणेकडील पर्वतावरुनचमकते. देवाच्या भोवती तेजोवलय असते. तो सर्वशक्तिमान देव महान आहे. आपण त्याला समजू शकत नाही. तो सामर्थ्यवान आहे. परंतु तो आपल्याशी चांगला आणि न्यायाने वागतो. देवाला आपल्याला त्रास द्यायची इच्छा नसते.
”परंतु माझे स्वामी स्वर्गातील राजा त्या लोकांना हसतो.
”यामुळे ते दुसरे पुढारी भयभीत झाले आहेत.
”मी परमेश्वराची स्तुती करतो, कारण तो चांगला आहे मी त्या सर्वशक्तिमान परमेश्वराच्या नावाची स्तुती करतो
”परमेश्वरा, माझ्या स्वामी तुझे नाव पृथ्वीवरील नावात सर्वात चांगले आहे, थोर आहे. तुझ्या नावाने तुला स्वर्गात गौरव प्राप्तकरुन दिला आहे.
”परमेश्वरा, आमच्या स्वामी तुझे नाव पृथ्वीवरील सर्व नावात अतिशय चांगले आहे, अद्भुत आहे.
”मी अगदी मनापासून परमेश्वराची स्तुती करतो. परमेश्वरा, तू ज्या अद्भुत गोष्टी केल्या आहेस त्याबद्दल मी सांगेन. तू मला खूप सुखी करतोस. सर्वशक्तिमान देवा, मी तुझ्या नामाचा महिमा गातो.
”सीयोनमध्ये राहाणाऱ्या लोकांनो, तुम्ही परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराने ज्या महान गोष्टी केल्या त्याबद्दल इतर देशांना सांगा.
”नंतर यरुशलेमच्या द्वारात परमेश्वरा, मी तुझी स्तुती गाईन. तू माझे रक्षण केलेस म्हणून मी खूप आनंदात असेन.”
”त्या लोकांना तुझ्या भूमीतून घालवून दे.
”परमेश्वर त्याच्या पवित्र राजप्रासादात राहतो. तो स्वर्गात त्याच्या सिंहासनावर बसतो आणि जे काही घडते ते तो बघतो परमेश्वर त्याच्या डोळ्यांनी लोकांकडे अगदी बारकाईने पाहातो ते चांगले आहेत की वाईट आहेत ते तो बघत असतो.
”मी परमेश्वरासाठी आनंदाचे गाणे गातो कारण त्याने माझ्यासाठी कितीतरी चांगल्या गोष्टी केल्या आहेत.
”तुझ्या डोळ्यातल्या बुब्बुळाप्रमाणे माझे रक्षण कर. मला तुझ्या पंखाच्या सावली खाली लपव.
”तो म्हणाला, “परमेश्वरा, तू माझे सामर्थ्य आहेस मी तुझ्यावर प्रेम करतो.” परमेश्वर माझा खडक माझा किल्ला माझी संरक्षक जागा आहे. माझा देव माझा खडक आहे. मी माझ्या रक्षणासाठी त्याच्याकडे धाव घेतो. देव माझी ढाल आहे. त्याची शक्ती नेहमी माझे रक्षण करते.परमेश्वर माझी उंच डोंगरावरची लपण्याची जागा आहे. त्यांनी माझी चेष्टा केली. परंतु मी ज्याची स्तुती केली जावी अशा परमेश्वराचा धावा केला आणि शत्रूंपासून माझे रक्षण झाले.
”परमेश्वराने ढगामधून गडगडाट केला, त्या सर्वशक्तिमान देवाने आपला आवाज ऐकवला तेथे गारा पडल्या आणि विजांचा कडकडाट झाला.
”देवाची शक्ती परिपूर्ण आहे. परमेश्वराच्या शब्दांची परीक्षा घेतली गेली आहे. जे त्याच्यावर विश्वास टाकतात त्यांचे तो रक्षण करतो. परमेश्वराखेरीज इतर कुठलाही देव नाही. आपल्या देवाखेरीज इतर खडक इथे नाहीत.
”परमेश्वर जिवंत आहे, मी माझ्या खडकाची स्तुती करतो देव मला वाचवतो तो महान आहे.
”स्वर्ग देवाचा महिमा गातात. आणि आकाश देवाने आपल्या हाताने ज्या चांगल्या गोष्टी केल्या आहेत त्या दाखवते.
”हे देवा, तुझ्या सामर्थ्याने उच्चपदाला चढ आपण परमेश्वराच्या महानतेचे गाणे गाऊ या.
”देवा, पवित्र असा केवळ तूच आहेस तू राजा म्हणून बसतोस तूच इस्राएलची प्रशांसा आहेस.
”परमेश्वरा, मी माझ्या भावांना तुझ्याबद्दल सांगेन. सभेत मी तुझे गुणगान गाईन. जे लोक परमेश्वराची उपासना करतात त्यांनी त्याची स्तुतीही करावी. इस्राएलाच्या वंशजांनो, परमेश्वराला मान द्या. इस्राएलाच्या वंशजांनो, परमेश्वराची भीती बाळगा आणि त्याचा आदर करा. का? कारण परमेश्वर संकटात सापडलेल्या गरीब लोकांना मदत करतो. परमेश्वराला त्यांची लाज वाटत नाही. परमेश्वर त्यांचा तिरस्कार करत नाही. जर लोकांनी परमेश्वराला मदतीसाठी बोलावले तर तो त्यांच्यापासून लपून बसणार नाही. परमेश्वरा, मोठ्या सभेतले माझे गुणगान तुझ्यापासूनच आले. त्या सगळ्या भक्तांसमोर मी ज्या ज्या गोष्टींचे वचन दिले त्या सर्व मी करीन. गरीब लोक खातील आणि समाधानी राहातील. जे लोक परमेश्वराला शोधत आहे, त्यांनी त्याची स्तुती करावी. तुमचे ह्दय सदैव आनंदी राहो. दूरदूरच्या परदेशातील लोकांना परमेश्वराची आठवण येवो. आणि ते परमेश्वराकडे परत येवोत. सगळ्या परक्या देशांतील लोक परमेश्वराची उपासना करोत. का? कराण परमेश्वराच राजा आहे तो सगळ्या देशांवर राज्य करतो. बलवान व निरोगी लोक भोजन करुन देवापुढे नतमस्तक झाले आहेत. तसं पाहिलं तर जे सर्व लोक मरणार आहेत व जे आधीच मेलेले आहेत ते सर्वजण देवापुढे नतमस्तक होतील.
”वेशींनो, आपले मस्तक उंच करा. जुन्या दरवाजांनो, उघडा म्हणजे तो गौरवशाली राजा आत येईल. तो गौरशाली राजा कोण आहे? परमेश्वरच तो राजा आहे. तोच बलवान सैनिक आहे परमेश्वरच तो राजा आहे, तोच युध्दातला नायक आहे. वेशींनो, तुमची मस्तके उंच करा. प्राचीन दरवाजांनो, उघडा म्हणजे तो गौरवशाली राजा आत येईल. तो गौरवशाली राजा कोण आहे? सर्वशक्तिमान परमेश्वरच तो राजा आहे तोच तो गौरवशाली राजा आहे.
”मला परमेश्वराजवळ फक्त एकाच गोष्टीची मागणी करायची आहे. मला हे मागायचे आहे, “मला आयुष्यभर परमेश्वराच्या मंदिरात बसू द्या म्हणजे मी परमेश्वराचे सौंदर्य बघेन आणि त्याच्या राजवाड्याला भेट देईनं.”
”माझ्या शत्रूंनी माझ्या भोवती वेढा घातला आहे. परंतु त्यांचा पराभव करायला परमेश्वर मला मदत करील नंतर मी त्याच्या डेऱ्यात बळी अर्पण करीन. मी बळी देताना आनंदाने ओरडेन. मी परमेश्वराला आदर दाखविण्यासाठी गाणीगाईन, वाद्ये वाजवीन. परमेश्वरा, माझा आवाज ऐक मला उत्तर दे. माझ्याशी दयेने वाग. परमेश्वरा मला तुझ्याशी बोलायचे आहे. मला अगदी माझ्या ह्दयातून तुझ्याशी बोलायचे आहे. परमेश्वरा, मी तुझ्यासमोर तुझ्याशी बोलायला आलो आहे.
”परमेश्वर माझी शक्ती आहे. तो माझी ढाल आहे. मी त्याच्यावर विश्वास ठेवला व त्याने मला मदत केली. मी खूप आनंदी आहे आणि मी त्याची स्तुती करणारी गाणी गातो.
”देवाच्या मुलांनो, परमेश्वराची स्तुती करा. त्याच्या गौरवाची व सामर्थ्याची स्तुती करा. परमेश्वाराची स्तुती करा आणि त्याच्या नावाचा आदर करा. तुमच्या खास कपड्यात त्याची उपासना करा. परमेश्वर समुद्रासमोर त्याचा आवाज चढवतो गौरवशाली देवाचा आवाज समुद्रावरील मेघ गर्जनेसारखा वाटतो. परमेश्वराच्या आवाजातून त्याची शक्ती कळते. त्याचा आवाज त्याचे गौरव दाखवते.
”परमेश्वराच्या आवाजाने हरणाला भीती वाटते तो जंगलांचा नाश करतो. परंतु त्याच्या राजवाड्यात लोक त्याच्या महानतेची स्तुती करतात. महापुराच्यावेळी परमेश्वर राजा होता आणि परमेश्वरच राजा राहणार आहे.
”देवाचे भक्त परमेश्राची स्तुती करतात. त्याच्या पवित्र नावाचा महिमा गातात.
”मी तुझी प्रार्थना केली आणि तू मला मदत केलीस. तू माझे रडणे नाचण्यात बदलवलेस. तू माझे दुखाचे कपडे काढून टाकलेस आणि मला सुखात गुडाळलेस. परमेश्वरा, माझ्या देवा मी तुझी सतत स्तुती करीन. अगदीच निशब्दता कधीच असू नये म्हणून मी हे करीन. तुझी स्तुती करण्यासाठी नेहमीच कुणीतरी असेल. 13
”चांगले लोकहो! परमेश्वरापाशी आंनद व्यक्त करा. न्यायी लोकांनो त्याची स्तुती करा. वीणा वाजवून परमेश्वराचे स्तवन करा. दहा तारांच्या वीणेवर परमेश्वराचे गुणगान गा. त्याच्यासाठी नवे गाणे गा. आनंदीहून चांगल्या रीतीने वाजवा.
”मी परमेश्वराला नेहमी धन्यवाद देईन. माझ्या ओठांवर नेहमी त्याची स्तुती असेल. विनम्र लोकांनो ऐका आणि आनंदी व्हा माझ्या मनाला परमेश्वराचा गर्व वाटतो. देवाच्या महानते बद्दल माझ्या बरोबर सांगत चला. आपण त्याच्या नावाला प्रतिष्ठा देऊ या.
”परमेश्वरा, मोठ्या सभेत मी तुझी स्तुती करेन. मी सामर्थ्यवान लोकांबरोबर असेन तेव्हा तुझी स्तुती करेन.
”काही लोकांना माझे चांगले व्हावे असे वाटते. ते सर्व लोक सुखी होवोत ते लोक नेहमी म्हणतात, “परमेश्वर महान आहे त्याच्या सेवकाचे भले व्हावे अशी त्याची इच्छा आहे.” म्हणून परमेश्वरा तू किती चांगला आहेस ते मी लोकांना सांगेन. मी रोज तुझी स्तुती करेन.
”परमेश्वराने माझ्या मुखात नवीन गाणे घातले. माझ्या देवाच्या स्तुतीचे गाणे. बरेच लोक माझ्या बाबतीत घडलेल्या घटना बघतील. ते देवाची उपासना करतील, ते देवावर विश्वास ठेवतील.
”परमेश्वरा, जे लोक तुझ्या शोधात आहेत त्यांना सुखी कर त्या लोकांना नेहमी “परमेश्वराची स्तुती करा” असे म्हणू दे. त्या लोकांना तुझ्याकडून रक्षणकरुन घेणे आवडते.
”मी निरपराध होतो आणि तू मला पाठिंबा दिला होतास. तू मला उभे राहू दे, मग मी सदैव तुझी चाकरी करीन. इस्राएलाच्या देवाचा जयजयकार असो. तो नेहमी होता आणि नेहमी राहील आमेन आमेन.
”हरणाला झऱ्याच्या पाण्याची तहान लागते. त्याचप्रमाणे देवा माझा आत्मा तुझ्यासाठी तहानेला आहे. माझा आत्मा जिवंत देवासाठी तहानेला आहे. मी त्याला भेटायला केव्हा जाऊ शकेन?
”दररोज व रात्रीही परमेश्वर त्याचे खरे प्रेम दाखवतो म्हणून माझ्याजवळ त्याच्यासाठी एक गीत आहे व एक प्रार्थना आहे.
”मी देवाच्या वेदीजवळ जाईन मला अत्यंत सुखी करणाऱ्या देवाकडे मी येईन. देवा, माझ्या देवा मी तुझी वीणा वाजवून स्तुती करीन.
”तुझी तलवार म्यानात ठेव हे सर्वशक्तीमान, तुझा गौरवशाली गणवेश परिधान कर. तू खूप अद्भूत दिसतोस जा आणि चांगल्यासाठी व न्यायासाठी होत असलेली लढाई जिंकून ये. तुझा बलवान उजवा हात विस्मयजनक गोष्टी करण्यासाठी वापर.
”देवातुझे सिंहासन नेहमीसाठी आहे. चांगुलपणा हा तुझा राजदंड आहे.
”मी तुझे नाव सदैव प्रसिध्द राहील असे करीन. लोक सदैव तुझी स्तुती करतील.
”देव म्हणतो, “शांत राहा आणि मी देव आहे हे लक्षात घ्या. मी राष्ट्रांचा पराभव करतो व जगाला ताब्यात ठेवतो.”
”लोकहो! तुम्ही टाळ्या वाजवा. तुम्ही सर्व लोक देवाशी आनंदाने जल्लोष करा. सर्वशक्तिमान परमेश्वर भीतिदायक आहे. तो सर्व पृथ्वीवरील महान राजा आहे.
”परमेश्वर बिगुलाच्या आणि तुतारीच्या आवाजात आपल्या सिंहासानाकडे जातो. देवाचे गुणगान करा. आपल्या राजाची स्तुतिपर गाणी गा. देव सर्व जगाचा राजा आहे. त्याच्या स्तुतिपर गाणे गा. देव त्याच्या पवित्र सिंहासनावर बसतो. तो सगळ्या देशांवर राज्य करतो. देशांचे प्रमुख अब्राहामाच्या देवाच्या लोकांना भेटतात. सर्व देशांचे प्रमुख देवाचे आहेत. देव त्या सगळ्यां पेक्षा थोर आहे.
”परमेश्वर थोर आहे आपल्या देवाच्या शहरात, त्याच्या पवित्र पर्वतावर लोक त्याची स्तुति करतात.
”देव खरोखरच नेहमी आपला देव असेल. तो आपल्याला सदैव मार्गदर्शन करेल.
”म्हणून तुमचे कृतज्ञता उपहार आणा आणि देवाबरोबर असण्यासाठी या तुम्ही सर्वशक्तिमान देवाला वचने दिली. तेव्हा आता कबूल केलेल्या वस्तू त्याला द्या. देव म्हणतो, “इस्राएलाच्या लोकांनो, तुम्ही संकटात असाल तेव्हा माझी प्रार्थना करा. मी तुम्हाला मदत करीन. आणि नंतर तुम्ही मला मान देऊ शकाल.”
”म्हणून जर एखाद्याने कृतज्ञता पूर्वक होमार्पण केले तर तो खरोखरच मला मान देतो. जर एखद्या माणसाने त्याचे आयुष्य बदलले आणि तो चांगले वागू लागला तर मी त्याला देवाच्या रक्षणाची शक्ती दाखवेन.”
”देवा, तूच माझा त्राता आहेस. तू किती चांगला आहेस ते सांगणारे गाणे मला गाऊ दे. प्रभु, मी माझे तोंड उघडीन आणि तुझे गुणगान करीन.
”देवा, तू स्वर्गापेक्षाही उंच आहेस आणि तुझा माहिमा सर्व पृथ्वीवर पसरला आहे.
”परंतु देव मला सुरक्षित ठेवील. तो मला साहसी करील. मी त्याचे गुणगान गाईन.
”परंतु मी तुझी स्तुती करणारे गाणे गाईन. रोज सकाळी मी तुझ्या प्रेमाचा आनंद घेईन का? कारण तू माझी उंच पर्वतावरची सुरक्षित जागा आहेस आणि संकटात मी तुझ्याकडे धाव घेऊ शकतो. मी तुझे गुणवर्णन करणारे गाणे गाईन. का? कारण तू माझी उंच पर्वतावरील सुरक्षित जागा आहेस. माझ्यावर प्रेम करणारा देव तूच आहेस.
”आणि मी तुझ्या नावाचा सदैव जयजयकार करीन. ज्या गोष्टी करण्याचे मी वचन दिले त्या मी रोज करीन.
”देवा, तू माझा देव आहेस आणि तू मला खूप हवा आहेस. माझा आत्मा आणि माझे शरीर तुझ्यासाठी शुष्क, बरड आणि पाणी विरहित जमिनी प्रमाणे तहाननेले आहे. होय, मी तुला तुझ्या मंदिरात पाहिले. मी तुझी शक्ती आणि तुझा गौरव पाहिला. तुझे प्रेम आयुष्यापेक्षा चांगले आहे. माझे ओठ तुझी स्तुती करतात. होय, मी जीवनात तुझी स्तुती करीन तुझ्या नावासाठी मी माझे बाहू प्रार्थनेत उभारीन. चांगले अन्न खाल्ल्याप्रमाणे मी तृप्त होईन आणि माझे तोंड तुझी स्तुती करील. अंथरुणावर झोपल्यावर मला तुझी आठवण येईल, मध्यरात्री मी तुझी आठवण काढेन.
”परंतु राजा त्याच्या देवाबरोबर आनंदात असेल आणि ज्या लोकांनी त्यांच्या आज्ञा पाळायचे वचन दिले ते त्याची स्तुती करतील का? कारण त्याने त्या खोटे बोलणाऱ्यांचा पराभव केला.
”सियोनातील देवा, मी तुझी स्तुती करतो. मी कबूल केल्याप्रमाणे तुला अर्पण करीत आहे.
”पृथ्वीवरील सारे काही आनंदाने देवाचा जय जयकार करीत आहे. देवाच्या गौरवी नावाचा जय जयकार करा. स्तुतिगीतांनी त्याचा सन्मान करा. त्याचे काम किती आश्चर्यजनक आहे, चांगले आहे ते त्याला सांगा. देवा, तुझी शक्ती महान आहे तुझे शत्रू तुझ्या पुढे नतमस्तक होतात. ते तुला घाबरतात. सगळ्या जगाला तुझी उपासना करु दे प्रत्येकाला तुझ्या नावाचा महिमा गाऊ दे.
”देव त्याच्या महान शक्तिमुळे जगावर राज्य करतो देव सगळीकडच्या लोकांवर लक्ष ठेवतो, त्याच्याविरुध्द कुणीही बंड करु शकत नाही. लोकहो! आमच्या देवाची स्तुती करा. त्याची स्तुती करणारी गीते मोठ्याने गा.
”देवासाठी गाणे म्हणा त्याच्या नावाचे गुणगान करा, देवासाठी रस्ता तयार करा. तो त्याच्या रथात बसून वाळवंटातून जातो त्याचे नाव यादे आहे. त्याच्या नावाची स्तुती करा.
”आणि भूमी थरथरली. देव, इस्राएलचा देव सिनाय डोंगरावर आला आणि आकाश वितळायला लागले.
”पृथ्वीवरच्या राजांनो, देवासाठी गाणे म्हणा, त्याच्यासाठी स्तुतिगीत गा. देवासाठी गाणे म्हणा देव पुरातन आकाशातून त्याचा रथ नेतो, त्याचा जोरदार आवाज ऐका. तुमच्या इतर देवांपेक्षा हा देव अधिक शक्तिमान आहे. इस्राएलाचा देव त्याच्या लोकांना अधिक शक्तिमान बनवतो. देव त्याच्या मंदिरात भीतिदायक दिसतो. इस्राएलचा देव त्याच्या लोकांना शक्ती आणि सामर्थ्य देतो. देवाचे गुणगान करा.
”मी गाण्यातून देवाच्या नावाची स्तुती करीन. मी त्याची धन्यवादाच्या गाण्यातून स्तुती करीन.
”देवाची स्तुती करा स्वर्ग आणि पृथ्वी, समुद्र आणि त्यातील सर्व गोष्टी तुम्ही सर्वानी त्याची स्तुती करा.
”जे लोक तुझी उपासना करतात ते खूप खूप सुखी व्हावेत असे मला वाटते. ज्या लोकांना तुझी मदत हवी आहे त्या लोकांना नेहमी तुझी स्तुती करणे शक्य होईल अशी मला आशा वाटते.
”जन्माला यायच्या आधीपासूनच मी तुझ्यावर अवलंबून आहे मी माझ्या आईच्या शरीरात होतो तेव्हा पासूनच तुझ्यावर विसंबून होतो मी नेहमीचतुझी प्रार्थना केली. तू माझ्या शक्तीचा ठेवा आहेस म्हणून मी दुसऱ्यांसाठी एक उदाहरण झालो. तू केलेल्या अद्भुत गोष्टींचे मी नेहमी गुणगान करीत असतो.
”नंतर मी तुझ्यावर नेहमीच विश्वास ठेवीन आणि मी तुझी जास्त स्तुती करीन.
”आणि मी तंतुवाद्य वाजवून तुझी स्तुती करीन. देवा, तुझ्यावर विश्वास टाकणे शक्य आहे असे गाणे मी गाईन. माझ्या तंतुवाद्यावर मी इस्राएलाच्या पवित्र देवासाठी गाणी वाजवीन. तू माझ्या आत्म्याचा उध्दार केलास. माझा आत्मा आनंदी होईल. मी माझ्या ओठांनी स्तुतिगीते गाईन.
”वाळवंटात राहाणाऱ्या सर्व लोकांना त्याच्या समोर मुजरे करु दे. त्याच्या सर्व शत्रूंना त्याच्यापुढे घाणीत तोंड घालून मुजरे करु दे.
”सागळ्या राजांना आमच्या राजासमोर मुजरे करु दे सगळी राष्ट्रे त्याच्या सेवेत राहू दे.
”राजाला सदैव प्रसिध्द होऊ द्या. जो पर्यंत सूर्य तळपतो आहे तो पर्यत लोकांना त्याची आठवण राहू द्या. त्याला लोकांना आशीर्वाद देऊ द्या आणि लोकांना त्याला आशीर्वाद देऊ द्या. परमेश्वर देवाची, इस्राएलाच्या देवाची स्तुती करा. फक्त देवच अशा अद्भूत गोष्टी करु शकतो. त्याच्या गौरवपूर्ण नावाची सदैव स्तुती करा. त्याच्या गौरवाने सारे जग भरु द्या. आमेन आमेन.
”परमेश्वराने काय केले ते मला आठवते आहे. देवा, खूप पूर्वी तू ज्या अद्भूत गोष्टी केल्यास त्या मला आठवतात. तू केलेल्या गोष्टींचा मी विचार केला. मी त्या गोष्टींबद्दल विचार केला. देवा, तुझे मार्ग पवित्र आहेत, देवा, तुझ्यासारखा महान कोणीही नाही. अद्भुत गोष्टी करणारा देव तूच आहेस. तू लोकांना तुझी महान शक्ती दाखवलीस.
”देव रोज त्यांना उंच मेघाच्या साहायाने दिवसा व रात्री अग्रीच्या प्रकाशात मार्ग दाखवीत नेत असे.
”देव त्यांचा खडक आहे याची आठवण त्यांना आली. सर्वशक्तिमान देवाने त्यांना वाचवले याची त्यांना आठवण झाली.
”आनंदी राहा आणि आमची शक्ती असलेल्या देवासमोर गाणे गा, इस्राएलाच्या देवासमोर आनंदाने ओरडा. संगीताची सुरुवात करा. डफ वाजवा. सतार आणि वीणा वाजवा.
”नंतर त्यांना तू देव आहेस हे कळेल. तुझे नाव यहोवा आहे हे त्यांना कळेल. तू सर्वशक्तिमान देवच सर्व जगाचा देव आहेस हे ही त्यांना कळेल.
”सर्वशक्तिमान परमेश्वरा, तुझे मंदिर खरोखरच सुंदर आहे. परमेश्वरा, मला वाट पाहाण्याचा मनस्वी कंटाळा आला आहे. मला तुझ्या मंदिरात यायचे आहे. माझ्यातला कण कण जिवंत देवाजवळ जायला उत्सुक आहे. सर्वशक्तिमान परमेश्वरा, माझ्या राजा, माझ्या देवा, चिमण्यांना आणि पाकोळ्यांना देखील घरे असतात. ते पक्षी तुझ्या सिंहासनाजवळ त्यांचे घरटे बांधतात आणि तिथे त्यांना पिल्ले होतात. तुझ्या मंदिरात राहाणारे लोक खूप सुखी असतात. ते नेहमी तुझी स्तुती करतात.
”प्रभु तूच प्रत्येकाला निर्माण केलेत. ते सर्व येतील आणि तुझी उपासना करतील आणि तुझ्या नावाला मान देतील अशी मी आशा करतो. देवा, तू महान आहेस. तू अद्भुत गोष्टी करतोस. तू आणि फक्त तूच देव आहेस. परमेश्वरा, मला तुझे मार्ग शिकव. मी तुझी सत्ये जाणे, तुझी सत्ये पाळीन. तुझ्या नावाचा जप ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट करायला मला मदत कर. देवा, माझ्या प्रभु मी अगदी मनापासून तुझी स्तुती करतो. मी तुझ्या नावाला सदैव मान देईन.
”देवाचे लोक यरुशलेमला खास सण साजरा करण्यासाठी जातात. ते खूप आनंदी आहेत. ते गाणी गातात, नाच करतात. ते म्हणतात, “सगळ्या चांगल्या गोष्टी यरुशलेम मधून येतात.”
”अति दुःखाने रडल्यामुळे माझे डोळे दुखत आहेत. परमेश्वरा, मी सतत तुझी प्रार्थना करीत आहे. माझे बाहू उभारुन मी तुझी प्रार्थना करत आहे.
”मी सदैव परमेश्वराच्या प्रेमाचे गाणे गाईन मी सदैव त्याच्या इमानदारीचे गाणे गाईन.
”परमेश्वरा, तू अद्भुत गोष्टी करतोस याबद्दल स्वर्ग तुझी स्तुती करतात. लोक तुझ्यावर अवलंबून राहू शकतात. पवित्र लोकांची सभा याबद्दलचे गाणे गाते. स्वर्गातला कोणीही परमेश्वरा समान नाही. “देवा” पैकी कुणाचीही परमेश्वराशील तुलना होऊ शकत नाही. देव पवित्र लोकांना भोटतो. ते देवदूत त्याच्या सभोवती असतात. ते देवाला घाबरतात आणि त्याला मान देतात. ते भयग्रस्त होऊन त्याच्या भोवती उभे राहातात.
”तुझे राज्य सत्य आणि न्याय यावर वसलेले आहे. प्रेम आणि सत्य तुझ्या सिंहासनासमोर सेवक आहेत.
”तू त्यांची अद्भुत शक्ती आहेस. त्यांची शक्ती तुझ्यापासूनच येते. परमेश्वरा, तू आमचा रक्षणकर्ता आहेस. इस्राएलचा पवित्र देव आमचा राजा आहे.
”प्रभु तू सदैव आमचे घर बनून राहिला आहेस. देवा, पर्वत जन्मण्याआधी आणि पृथ्वी व जग निर्माण होण्याआधी तूच देव होतास देवा, तू पूर्वी होतास आणि पुढे देखील असशील.
”तुम्ही लपण्यासाठी परात्पर देवाकडे जाऊ शकता. तुम्ही संरक्षणासाठी सर्वशक्तिमान देवाकडे जाऊ शकता.
”परमेश्वराची स्तुती करणे चांगले असते. परात्पर देवा, तुझ्या नावाचे उपकारस्मरण करणे चांगले असते.
”परमेश्वर राजा आहे. त्याने ऐश्वर्य आणि सामर्थ्य वस्त्राप्रमाणे पांघरले आहे. तो सज्ज आहे त्यामुळे सर्व जग सुरक्षित आहे. ते कंपित होणार नाही. देवा, तुझे राज्य कायमचे अस्तित्वात राहिले आहे. देवा, तू सदैव जीवंत आहेस. परमेश्वरा, नद्यांचा आवाज प्रचंड मोठा आहे. आदळणाऱ्या लाटांचा आवाज खूप मोठा आहे. समुद्राच्या आदळणाऱ्या लाटा फार ताकदवान आहेत आणि त्यांचा आवाज खूप मोठा आहे. परंतु वरचा परमेश्वर अधिक ताकदवान आहे. परमेश्वरा, तुझे नियम सदैव राहातील.तुझे पवित्र मंदिर खूप काळ उभे राहील.
”चला, परमेश्वराची स्तुती करु या. जो खडक आपल्याला वाचवतो त्याचे गुणगान करु या. परमेश्वराला धन्यावाद देणारी गाणे गाऊ या. त्याला आनंदी स्तुती गीते गाऊ या. का? कराण परमेश्वर मोठा देव आहे, इतर “देवांवर” राज्य करणारा तो महान राजा आहे.
”चला, आपण त्याची वाकून उपासना करु या. ज्या देवाने आपल्याला निर्माण केले त्याची स्तुती करु या.
”परमेश्वराने ज्या नवीन गोष्टी केल्या त्यांची स्तुती करण्यासाठी नवे गाणे गा. सगळ्या जगाने परमेश्वराच्या स्तुतीचे गाणे गावे. परमेश्वराला गाणे गा. त्याच्या नावाचा जयजयकार करा. चांगली बात्तमी सांगा. तो रोज आपला उध्दार करतो ते सांगा. लोकांना सांगा की देव खरोखरच अद्भुत आहे. देव सगळीकडे ज्या विस्मयजनक गोष्टीकरतो त्याबद्दल सांगा. परमेश्वर महान आहे आणि स्तुतीला योग्य आहे. तो इतर “देवांपेक्षा” भयंकर आहे. इतर देशांतले “देव” केवळ पुतळे आहेत. पण परमेश्वराने मात्र स्वर्ग निर्माण केला. त्याच्या समोर सुंदर तेजोवलय असते. देवाच्या पवित्र मंदिरात शक्ती आणि सौंदर्य असते. कुटुंबानो आणि राष्ट्रांनो, परमेश्वरासाठी स्तुतीपर आणि गौरवपर गीते गा. परमेश्वराच्या नावाचा जयजयकार करा. तुमची अर्पणे घेऊन मंदिरात जा. परमेश्वराची त्याच्या सुंदर मंदिरात उपासना करा. पृथ्वीवरचा प्रत्येक माणूस परमेश्वराची उपासना करो. सगळ्या राष्ट्रांना सांगा की परमेश्वर राजा आहे म्हणून जगाचा नाश होणार नाही. परमेश्वर लोकांवर न्यायाने राज्य करेल. स्वर्गांनो, सुखी राहा! पृथ्वीमाते आनंदोत्सव कर. समुद्र आणि त्यातील प्राण्यांनो आनंदोत्सव करा. शेते आणि त्यात उगवणारे सर्व सुखी व्हा. जंगलातल्या वृक्षांनो गा आणि सुखी व्हा. परमेश्वर येत आहे म्हणून आनंदी व्हा. परमेश्वर जगावर राज्य करायला येत आहे. तो जगावर न्यायाने आणि सत्याने राज्य करेल.
”परमेश्वर राज्य करतो आणि पृथ्वी आनंदित होते. दूरदूरचे प्रदेश आनंदित होतात. परमेश्वराच्या भोवती दाट काळे ढग आहेत. चांगुलपणा आणि न्याय त्याच्या राज्याला मजबुती आणतात.
”परमेश्वरा समोर पर्वत मेणासारखे वितळतात. ते पृथ्वीच्या मालकासमोर वितळतात. आकाशांनो, त्याच्या चांगुलपणा विषयी सांगा प्रत्येक माणसाला देवाचे वैभव बघू द्या.
”परात्पर परमेश्वरा, तू खरोखरच पृथ्वीचा राजा आहेस. तू इतर “देवापेक्षा” खूपच चांगला आहेस.
”परमेश्वराने नवीन आणि अद्भुत गोष्टी केल्या म्हणून त्याच्यासाठी नवीन गाणे गा.
”त्याच्या भक्तांना इस्राएलाच्या लोकांशी असलेला देवाचा प्रामाणिकपणा आठवला. दूरच्या प्रदेशातील लोकांना देवाची वाचवण्याची शक्ती दिसली. पृथ्वीवरच्या प्रत्येक माणसा, परमेश्वराचा जयजयकार कर. त्वरेने त्याचे गुणवर्णन करायला सुरुवात कर. वीणे, परमेश्वराची स्तुती करा. वीणेच्या झंकारांनो, त्याची स्तुती करा. कर्णे आणि शिंग वाजवून आपल्या राजाचे, परमेश्वराचे गुणवर्णन करा. समुद्र, पृथ्वी आणि त्यावरील सर्व वस्तूंना जोर जोरात गाऊ द्या.
”परमेश्वर राजा आहे म्हणून राष्ट्रांना भीतीने थरथरु द्या. देव करुबांच्यावर राजा म्हणून बसतो म्हणून जगाला भीतीने थरथरु द्या. सियोन मधला परमेश्वर महान आहे. तो सर्व लोकांवरचा महान नेता आहे. सर्व लोकांना तुझ्या नावाचा जयजयकार करु दे. देवाचे नाव भीतीदायक आहे. देव पवित्र आहे. बलवान राजाला न्यायीपणा आवडतो. देवा, तू चांगुलपणा निर्माण केलास तू चांगुलपणा आणि प्रमाणिकपणा याकोबमध्ये (इस्राएलमध्ये) आणलास. परमेश्वर, आपला देव त्याची स्तुती करा आणि त्याच्या पवित्र पादासनाजवळ त्याची उपासना करा.
”त्याच्या पवित्र पर्वतासमोर वाका आणि त्याची प्रार्थना करा. परमेश्वर, आपला देव खरोखरच पवित्र आहे.
”हे पृथ्वी, परमेश्वरासाठी गा. परमेश्वराची सेवा करताना आनंदी राहा. परमेश्वरासमोर आनंदी गाणी घेऊन या. परमेश्वरच देव आहे हे लक्षात घ्या. त्यानेच आपल्याला निर्माण केले. आपण त्याची माणसे आहोत. आपण त्याची मेंढरे आहोत. त्याच्या शहरात धन्यवादाची गाणी घेऊन या. त्याच्या मंदिरात स्तुतिगीते घेऊन या. त्याला मान द्या. त्याच्या नावाचा जयजयकार करा. परमेश्वर चांगला आहे. त्याचे प्रेम चिरंजीव आहे. आपण त्याच्यावर कायम विश्वास टाकू शकतो.
”मी प्रेम आणि न्याय याबद्दल गाईन, परमेश्वरा, मी तुला गाण्यातून आळवीन.
”लोक परमेश्वराच्या नावाची उपासना करतील. देवा, पृथ्वीवरील सर्व राजे तुला मान देतील. परमेश्वर सियोन पुन्हा बांधेल लोक पुन्हा त्याचे गौरव बघतील.
”तू खूप पूर्वी जग निर्माण केलेस. तू तुझ्या हातांनी आकाश निर्माण केलेस. जग आणि आकाश संपेल पण तू मात्र सदैव असशील. ते कापडाप्रमाणे जीर्ण होतील आणि कपड्यांसारखे तू त्यांना बदलशील ते सगळे बदलले जातील. पण देवा, तू मात्र कधीच बदलला जाणार नाहीस. तू सर्वकाळ राहाशील.
”माझ्या आत्म्या परमेश्वराचा जयजयकार कर. माझ्या शरीराच्या प्रत्येक भागाला त्याच्या पवित्र नावाची स्तुती करु दे. माझ्या आत्म्या, परमेश्वराचा जयजयकार कर आणि तो खोखरच दयाळू आहे हे विसरु नकोस.
”देवाचे सिंहासन स्वर्गात आहे आणि तो सर्वांवर राज्य करतो.
”देवदूतांनो, परमेश्वराची स्तुती करा. देवदूतांनो, तुम्ही देवाची आज्ञा पाळणारे सामर्थ्यवान सैनिक आहात. तुम्ही देवाचे ऐकता आणि त्याची आज्ञा पाळता. परमेश्वराच्या सगळ्या सैन्यांनो देवाची स्तुती करा. तुम्ही त्याचे सेवक आहात. देवाला जे हवे ते तुम्ही करा. परमेश्वराने सगळीकडच्या सर्व वस्तू केल्या. देव चराचरावर राज्य करतो आणि त्या सगळ्यांनी परमेश्वराची स्तुती केली पाहिजे. माझ्या आत्म्या परमेश्वराची स्तुती कर.
”माझ्या आत्म्या, परमेश्वराची स्तुती कर. परमेश्वरा, माझ्या देवा, तू खूप महान आहेस. तू तेज आणि गौरव पांघरले आहेस. माणसाने अंगरखा घालावा तसा तू प्रकाश घालतोस. तू आकाशाला पडद्या प्रमाणे पसरवितोस.
”परमेश्वरा, तू अनेक अद्भुत गोष्टी केल्या आहेस. तू केलेल्या गोष्टींनी पृथ्वी भरली आहे. तू केलेल्या गोष्टींत आम्हाला तुझे शहाणपण दिसते. समुद्राकडे बघ, तो किती मोठा आहे! आणि त्यात किती तरी गोष्टी राहातात. तिथे लहान मोठे प्राणी आहेत. मोजता न येण्याइतके.
”परमेश्वराचे वैभव सदैव राहो! परमेश्वराला त्याने केलेल्या गोष्टींपासून आनंद मिळो. परमेश्वराने पृथ्वीकडे नुसते बघितले तरी ती थरथर कापते. त्याने पर्वताला नुसता हात लावला तरी त्यातून धूर येईल. मी आयुष्यभर परमेश्वराला गाणे गाईन. मी जिवंत असे पर्यंत परमेश्वराचे गुणगान करीन. मी ज्या गोष्टी बोललो त्यामुळे त्याला आनंद झाला असेल असे मला वाटते. मी परमेश्वराजवळ आनंदी आहे. पाप पृथ्वीवरुन नाहीसे होवो. दुष्ट लोक कायमचे निघून जावोत. माझ्या आत्म्या परमेश्वराची स्तुती कर. परमेश्वराची स्तुती कर.
”परमेश्वराला धन्यावाद द्या. त्याच्या नावाचा धावा करा. राष्ट्रांना तो करत असलेल्या अद्भुत गोष्टींबद्दल सांगा. परमेश्वराला गाणे गा. त्याची स्तुतिगीते गा. तो ज्या अद्भुत गोष्टी करतो त्याबद्दल सांगा. परमेश्वराच्या पवित्र नावाचा अभिमान बाळगा. तुम्ही लोक परमेश्वराला शोधत आला, सुखी व्हा. शक्तीसाठी परमेश्वराकडे जा. मदतीसाठी नेहमी त्याच्याकडे जा. तो ज्या आश्चर्यकारक गोष्टी करतो त्याची आठवण ठेवा त्याचे चमत्कार आणि त्याचे शहाणपणाचे निर्णय याची आठवण ठेवा.
”परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वर चांगला आहे म्हणून त्याला धन्यवाद द्या. देवाचे प्रेम सदैव राहील. परमेश्वर खरोखरच किती महान आहे याचे वर्णन कुणीही करु शकणार नाही. देवाची जितकी स्तुती करायला हवी तितकी कुणीही करु शकणार नाही.
”परमेश्वरा, देवा आमचे रक्षण कर इतर देशातून आम्हाला गोळाकर म्हणजे आम्ही तुझ्या पवित्र नावाचे आभार मानू आणि तुझे गुणगान करु. परमेश्वराला, इस्राएलाच्या देवाला धन्यवाद द्या. देव नेहमी राहात आला आहे आणि तो सदैव राहाणार आहे. आणि सगळे लोक म्हणाले, “आमेन! परमेश्वराची स्तुती करा.”
”परमेश्वराला धन्यावाद द्या. कारण तो चांगला आहे. त्याचे प्रेम कायम राहाणार आहे.
”देवाची मोठ्या सभेत स्तुती करा. वयोवृध्द प्रमुख एकत्र येतात तेव्हा त्याची स्तुती करा.
”देवा, मी तयार आहे. मी गुणगान गायला मनापासून तयार आहे. वीणांनो आणि सतारींनो, आपण सुर्याला जाग आणू या. परमेश्वरा, आम्ही तुझी इतर देशांत स्तुती करु. आम्ही इतर लोकांत तुझी स्तुती करु. परमेश्वरा, तुझे प्रेम आकाशापेक्षाही उंच आहे. तुझे प्रेम सर्वांत उंच अशा ढगापेक्षाही उंच आहे. देवा, स्वार्गाच्याही वर उंच जा. सर्व जगाला तुझे वैभव पाहू दे.
”मी परमेश्वराला धन्यवाद दिले. खूप लोकांसमोर मी त्याची स्तुती केली.
”परमेश्वराची स्तुती करा जिथे चांगले लोक एकत्र येतात त्या सभेत मी परमेश्वराला अगदी मनापासून धन्यवाद दिले. परमेश्वर अद्भुत गोष्टी करतो देवाकडून येणाऱ्या चांगल्या गोष्टीलोकांना हव्या असतात. देव खरोखरच तेजस्वी उत्कृष्ट आणि अद्भुत गोष्टी करतो. त्याचा चांगुलपणा सदैव असतो.
”देव आपल्या माणसांना वाचवतो. देवाने आपला करार सर्वकाळासाठी केला, देवाचे नाव भीतिदायक आणि पवित्र आहे. शहाणपणाची सुरुवात देवाबद्दलच्या भीतीने आणि आदराने होते. जे लोक देवाचे आज्ञाधारक असतात ते शहाणे असतात. देवाला सदैव स्तुतिगीते गायली जातील.
”परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराच्या सेवकांनो त्याची स्तुती करा. परमेश्वराच्या नावाचे गुणगान करा. परमेश्वराचे नाव आता आणि सदैव धन्य व्हावे असे मला वाटते. पूर्वेला सूर्य उगवतो तिथपासून ते तो जिथे मावळतो तिथपर्यंत परमेश्वराच्या नावाचे गुणगान व्हावे असे मला वाटते.
”परमेश्वर सगळ्या देशांपेक्षा उंच आहे. त्याचे तेज आकाशापेक्षा उंच जाते. कुणीही माणूस आमचा देव, जो परमेश्वर आहे त्याच्यासारखा नाही. देव स्वर्गात उंच बसतो. देव आमच्या वर इतका उंच आहे की त्याला आकाश आणि पृथ्वी यांकडे खाली वाकून बघावे लागते.
”परमेश्वरा, आम्हाला कुठलाही सन्मान मिळायला नको. सन्मान तुझा आहे, तुझ्या प्रेमामुळे आणि आमच्या तुझ्यावर असलेल्या विश्वासामुळे सन्मान तुझा आहे.
”पण आता आम्ही परमेश्वराला धन्यवाद देतो आणि आम्ही त्याला सदैव धन्य मानू. परमेश्वराची स्तुती करा.
”मी तुला धन्यवाद म्हणून स्तुति अर्पण करीन. मी परमेश्वराचे नामस्मरण करीन. मी कबूल केलेल्या गोष्टी परमेश्वराला देईन. आता मी त्याच्या सर्व लोकांसमोर जाईन. मी यरुशलेम मध्या मंदिरात जाईन. परमेश्वराचा जयजयकार करा.
”सर्व देशांनो, परमेश्वराची स्तुती करा. सर्व लोकांनो परमेश्वराची सुती करा. देव आपल्यावर खूप प्रेम करतो आणि देव आपल्याशी सदैव खरा वागतो. परमेश्वराचा जयजयकार करा!
”परमेश्वराची उपासना करणाऱ्या लोकांनो, म्हणा, “त्याचे खरे प्रेम सदैव चालू राहील.”
”परमेश्वराचे हात विजयामुळे उंचावले आहेत. परमेश्वराने पुन्हा त्याच्या महान ताकतीचेदर्शन घडवले.
”परमेश्वरा, माझ्या प्रार्थनेला उत्तर दिलेस म्हणून मी तुला धन्यवाद देतो. तू माझा उध्दार केलास म्हणून मी तुला धन्यवाद देतो. इमारत बांधणाऱ्यांना जो दगड नको होता तो कोनाशिला झाला. हे परमेश्वराने घडवून आणले आहे आणि ते अतिशय अद्भुत आहे असे आम्हाला वाटते. आजचा दिवस परमेश्वरानेच घडवला आहे. आपण आज मौज करु आणि सुखी होऊ.
”परमेश्वरा, तू माझा देव आहेस आणि मी तुला धन्यवाद देतो. तुझी स्तुती करतो. परमेश्वर चांगला आहे म्हणून त्याची स्तुती करा. त्याचे खरे प्रेम सदैव टिकणारे आहे.
”मी जेव्हा तुझा चांगलुपणा आणि न्यायीपणा यांचा अभ्यास करीन तेव्हा मी तुला खरोखरच मान देईन.
”मी मध्यरात्री तू घेतलेल्या तुझ्या चांगल्या निर्णयांबद्दल तुला धन्यवाद देण्यासाठी उठतो.
”मी दिवसातून सात वेळा तुझ्या चांगल्या नियमांसाठी मी तुझी स्तुती करतो.
”तू मला तुझे नियम शिकवलेस म्हणून मी एकदम गुणगान गायला सुरुवात केली.
”आपण पवित्र तंबूत जाऊ. या देव ज्या पादासनावर आपले पाय विसाव्यासाठी ठेवतो त्या पादासनाजवळ आपण प्रार्थना करु या.
”सेवकांनो, तुमचे बाहू उभारा आणि परमेश्वराचे स्तोत्र गा.
”परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराच्या नावाची स्तुती करा. परमेश्वराच्या सेवकांनो, त्याची स्तुती करा. त्यांचे गुणवर्णन करा. परमेश्वराच्या मंदिरात उभे राहाणाऱ्या लोकांनो, आमच्या देवाच्या मंदिराच्या अंगणात उभे राहाणाऱ्यांनो, त्याची स्तुती करा. परमेश्वर चांगला आहे म्हणून त्याची स्तुती करा. त्याच्या नावाचे गुणगान करा. कारण तो चांगला आहे.
”परमेश्वराला सियोनहून त्याचे घर असलेल्या यरुशलेममधून धन्यवाद मिळोत. परमेश्वराची स्तुती करा.
”देवांच्या देवाची स्तुती करा. त्याचे खरे प्रेम सदैव असते. परमेश्वरांच्या परमेश्वराची स्तुती करा. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
”स्रवर्गातल्या देवाची स्तुती करा. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
”देवा, मी अगदी मनापासून तुझी स्तुती करतो. मी सर्व देवांसमोर तुझे गाणे गाईन. देवा, मी तुझ्या पवित्र मंदिरासमोर नतमस्तक होतो. मी तुझ्या नावाची, तुझ्या खऱ्या प्रेमाची आणि तुझ्या इमानदारीची स्तुती करतो. तू तुझ्या शब्द सामर्थ्याबद्दल प्रसिध्द आहेस. आता तर तू ते अधिकच वाढवले आहेस. देवा, मी तुला मदतीसाठी हाक मारली आणि तू मला होकार दिलीस. तू मला शक्ती दिलीस. परमेश्वरा, पृथ्वीवरचे सर्व राजे तुझे बोलणे ऐकतील तेव्हा ते तुझी स्तुती करतील. ते परमेश्वराच्या पध्दतीचे गुणगान करतील कारण परमेश्वराची महिमा अगाध आहे.
”परमेश्वरा, मी तुझी स्तुती करतो. तू मला अद्भुत आणि अतिशय सुंदररीतीने निर्मिलेस तू जे केलेस ते खूपच अद्भुत आहे हे मला चांगलेच माहीत आहे.
”परमेश्वरा, मी माझे बाहू उभारुन तुझी प्रार्थना करतो. तहानेली जमीन जशी पावसाची वाट बघते तशी मी तुझ्या मदतीची वाट बघत आहे.
”परमेश्वरा, मी तू करत असलेल्या अद्भुत गोष्टींबद्दलचे नवे गाणे गाईन. मी तुझी स्तुती करेन आणि दहा तारांची वीणा वाजवेन.
”देवा, राजा, मी तुझी स्तुती करतो. मी तुझ्या नावाला सदैव धन्यवाद देतो. मी तुझी रोज स्तुती करतो. तुझ्या नावाचे रोज गुणगान करतो. परमेश्वर महान आहे लोक त्याची खूप स्तुती करतात. त्याने केलेल्या महान गोष्टींची आपण मोजदाद करु शकत नाही. परमेश्वरा, लोक तुझी तू केलेल्या गोष्टींबद्दल सदैव स्तुती करतील. तू महान गोष्टी करतोस त्याबद्दल ते सांगतील. तुझे राजवैभव आणि तेज अद्भुत आहे. मी तुझ्या अद्भुत चमत्काराबद्दल सांगेन. परमेश्वरा तू ज्या चमत्कारपूर्ण गोष्टी करतोस त्याबद्दल लोक सांगतील. तू ज्या महान गोष्टी करतोस त्याबद्दल मी सांगेन. तू ज्या चांगल्या गोष्टी करतोस त्याबद्दल लोक सांगतील. लोक तुझ्या चांगुलपणाचे गाणे गातील.
”परमेश्वरा, तू ज्या गोष्टी करतोस त्यामुळे तुला गौरव प्राप्त होतो. तुझे भक्त तुला धन्यवाद देतात. तुझे राज्य किती महान आहे हे ते सांगतात. तू किती महान आहेस हे ते सांगतात. म्हणून परमेश्वरा, तू ज्या महान गोष्टी करतोस त्याबद्दल इतर लोकांनाही कळते. तुझे राज्य किती महान आणि अद्भुत आहे हे त्या लोकांना कळते. परमेश्वरा, तुझे राज्य सदैव राहील. तू सदैव राज्य करशील.
”मी परमेश्वराची स्तुती करेन. प्रत्येकाने त्याच्या पवित्र नावाचा सतत जयजयकार करावा असे मला वाटते.
”परमेश्वराची स्तुती करा. माझ्या आत्म्या, परमेश्वराची स्तुती कर. मी आयुष्यभर परमेश्वराची स्तुती करीन. मी आयुष्यभर त्याचे गुणगान करीन.
”परमेश्वर सदैव राज्य करील सियोन तुझा देव सदैव राज्य करीत राहील परमेश्वराची स्तुती करा.
”परमेश्वर चांगला आहे म्हणून त्याची स्तुती करा. आपल्या देवाचे गुणगान करा. त्याची स्तुती करणे चांगले आणि आल्हाददायक आहे.
”देव तारे मोजतो आणि त्याला प्रत्येक ताऱ्याचे नाव माहीत असते. आपला प्रभु खूप मोठा आहे. तो फार शक्तीवान आहे. त्याला माहीत असलेल्या गोष्टींना मर्यादा नाही. परमेश्वर नम्र लोकांना मदत करतो. परंतु तो वाईट लोकांना अडचणीत टाकतो. परमेश्वराला धन्यावाद द्या. आपल्या देवाची वीणेवर स्तुती करा.
”परमेश्वराची स्तुती करा. स्वर्गातल्या देवदूतांनो स्वर्गातून परमेश्वराची स्तुती करा. सर्व देवदूतांनो परमेश्वराची स्तुती करा. त्याच्या सर्व सैनिकांनो, त्याची स्तुती करा. सूर्य - चंद्रांनो परमेश्वराची स्तुती करा. त्याऱ्यांनो आणि आकाशातील दिव्यांनो, त्याची स्तुती करा. सर्वांत उंचावरच्या स्वर्गातल्या परमेश्वराची स्तुती करा. आकाशावरील जलाशयांनो, त्याची स्तुती करा. परमेश्वराच्या नावाचा जयघोष करा. का? कारण देवाने आज्ञा केली आणि आपली सर्वांची निर्मिती झाली. देवाने या सगळ्या गोष्टींची निर्मिती त्या सदैव राहाव्यात म्हणून केली. देवाने कधीही न संपणारे नियम केले.
”पृथ्वीवरच्या सर्व गोष्टींनो, परमेश्वराची स्तुती करा. महासागरातल्या सागरी प्राण्यांनो, परमेश्वराची स्तुती करा. देवाने अग्न्नी आणि गारा, बर्फ आणि धूर आणि सर्व वादळे निर्माण केली. देवाने टेकड्या आणि पर्वत फळ झाडे आणि देवदार वृक्ष निर्मिले. देवाने सर्व जंगली प्राणी आणि पशू सरपटणारे प्राणी आणि पक्षी निर्माण केले. देवाने पृथ्वीवरचे राजे आणि देश निर्माण केले. त्यानेच नेते आणि न्यायाधीश निर्मिले. देवाने तरुण आणि तरुणी निर्मिल्या. देवाने वृध्द आणि तरुण माणसे निर्माण केली. परमेश्वराच्या नावाचा गुणगौरव करा. त्याच्या नावाला सदैव मान द्या. स्वर्गातल्या आणि पृथ्वीवरच्या सर्वांनो त्याची स्तुती करा.
”परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वराने ज्या नवीन गोष्टी केल्या त्याबद्दलचे नवे गाणे गा. ज्या सभेत त्याचे भक्त भेटतात त्या सभेत त्याचे गुणगान करा. इस्राएलाच्या लोकांना त्यांच्या निर्मात्याबरोबर आनंदोत्सव साजरा करु द्या. सियोनच्या लोकांना त्यांच्या राजाबरोबर आनंद उपभोगू द्या. त्या लोकांना डफाच्या आणि वीणेच्या तालावर नाच करुन देवाची स्तुती करु द्या. परमेश्वर त्याच्या लोकांबरोबर सुखी आहे. देवाने त्याच्या विनम्र लोकांसाठी अद्भुत गोष्ट केली, त्याने त्याचा उध्दार केला. देवाच्या भक्तांनो तुमच्या विजयाबद्दल आनंदी व्हा. झोपी गेल्यावरही आनंदी राहा. लोकांना देवाजवळ त्याचे गुणगान करु द्या आणि त्यांना त्यांच्या तलवाडी हातात घेऊ द्या.
”परमेश्वराची स्तुती करा देवाची त्याच्या मंदिरात स्तुती करा. त्याच्या सामर्थ्याची स्वर्गात स्तुती करा. देव ज्या महान गोष्टी करतो त्याबद्दल त्याची स्तुती करा. त्याच्या सर्व मोठेपणाबद्दल त्याची स्तुती करा. तुतारी आणि कर्णा वाजवून देवाचे गुणगान करा. सतारीवर आणि वीणेवर त्याचे गुणगान करा. डफ वाजवून आणि नाचून देवाची स्तुती करा. तंतुवाद्यावर आणि बासरीवर त्याचे गुणगान करा. जोर जोरात टाळ वाजवून देवाची स्तुती करा. झणझणणाऱ्या झांजांवर त्याचे गुणगान करा. स्तुती कर. परमेश्वराची स्तुती कर.
”परमेश्वराचा आदर करणे ही ज्ञान मिळवण्याची पहिली पायरी आहे. परमेश्वराविषयी ज्ञान मिळवणे ही समजूतदारपणा मिळवणाची पहिली पायरी आहे.
”स्वार्गातल्या गोष्टीबद्दल आजपर्यंत कोणीही काहीही शिकला नाही. कोणीही वाऱ्याला कधी हातात पकडू शकला नाही. कोणीही पाण्याला कपड्यात पकडू शकला नाही. पृथ्वीच्या सीमा कोणालाही माहीत नाहीत. जर कोणी ह्या गोष्टी करु शकला तर तो कोण असेल? त्याचे कुटुंब कुठे असेल.?
”चुंबनांनी मला झाकून टाक कारण तुझे प्रेम द्राक्षरसापेक्षा चांगले आहे. तुझ्या अत्तराचा खूप चांगला वास येत आहे, पण तुझे नाव मात्र उत्तम अत्तरापेक्षाही गोड आहे. त्यामुळेच तरुणी तुझ्यावर प्रेम करतात. मला तुझ्याबरोबर ने. आपण पळून जाऊ.राजाने मला त्याच्या खोलीत नेले.आम्ही आनंदोत्सव करु आणि तुझ्यासाठी आनंदित होऊ. तुझे प्रेम द्राक्षारसापेक्षा चांगले आहे हे लक्षात ठेव. तरुणी तुझ्यावर योग्य कारणासाठी प्रेम करतात.
”खूप लोकांच्या समूहाबरोबर वाळवंटातूनयेणारी ही स्त्री कोण आहे? गंधरस व ऊद आणि इतर धूवासिक द्रव्ये गाळल्यानंतर होणाऱ्या घुरासारखे त्यांच्या मागे धुळीचे लोट उडत आहेत.
”उत्तरेकडच्या वाऱ्या, ऊठ! दक्षिणवाऱ्या ये, माझ्या बागेवरुन वाहा. तिचा गोड सुगंध सर्वत्र पसरव. माझ्या सख्याला त्याच्या बागेत प्रवेश करु दे आणि तिथली गोड फळे चाखू दे.
”येथून चालते व्हा. कडेकपारीमागे धुळीत लपून बसा. तुम्ही परमेश्वराची भीती बाळगली पाहिजे आणि त्याच्या महान सामर्थ्यापासून लपून राहिले पाहिजे.
”लोक कडेकपारीच्या मागे व जमिनीच्या भेगांत लपून बसतील. लोकांना परमेश्वर व त्याचे सामर्थ्य ह्यांचे भय वाटेल. जेव्हा परमेश्वर भूकंप घडवून आणील तेव्हा हे असे घडेल.
”मग परमेश्वराला व त्याच्या सामर्थ्याला भिऊन सर्व कडेकपारीत लपतील. हे सर्व परमेश्वराने घडवून आणलेल्या भूकंपाच्या वेळी घडून येईल.
”ह्यावेळी आपण आपल्या लोकांच्या पाठीशी उभे आहोत हे देव सिध्द करील. दिवसा तो धुराचा ढग तयार करील व रात्री अग्नीचा झगझगीत प्रकाश निर्माण करील. प्रत्येक इमारतीवरच्या आकाशात आणि सीयोनच्या डोंगरावरील मेळाव्याच्या जागेवर देवाच्या कृपेच्या ह्या निशाण्या दिसतील. संरक्षणासाठी प्रत्येक माणसावर आच्छादन असेल.
”सर्वशक्तिमान परमेश्वर प्रामाणिकपणाने योग्य न्याय करील आणि लोकांना त्याची महानता कळेल. पवित्र देव योग्य त्याच गोष्टी करेल आणि लोक त्याचा आदर करतील.
”उज्जीया राजाच्या मृत्यूच्या वर्षीच मी माझ्या प्रभूला पाहिले. तो एका उच्च व विलक्षण सुंदर सिंहासनावर बसला होता. त्याच्या पायघोळ पोशाखाने सर्व मंदिर भरून गेले होते. देवदूत परमेश्वराभोवती उभे होते. प्रत्येक देवदूताला सहा पंख होते. त्यातील दोन पंखांनी ते चेहरा झाकीत. दोनने पाय झाकीत व उरलेल्या दोन पंखांनी उडत. ते देवदूत एकमेकांशी बोलत होते. ते म्हणत होते, “पवित्र, पवित्र, पवित्र सर्वशक्तिमान परमेश्वर परमपवित्र आहे. त्याची प्रभा सगळ्या पृथ्वीला व्यापून राहिली आहे.” देवदूतांचे आवाज फार मोठे होते. त्यांच्या आवाजाने मंदिराच्या दाराची चौकट हादरली नंतर मंदिर धुराने भरून गेले. मी फारच घाबरलो. मी म्हणालो, “हाय रे देवा! आता माझा नाश होणार देवाशी संवाद करण्याइतका मी पवित्र किंवा शुध्द नाही आणि मी ज्या माणसांत राहतो, तीही देवाशी प्रत्यक्ष बोलण्याइतकी शुध्द नाहीत.तरीसुध्दा राजाधिराज, सर्वशक्तिमान परमेश्वराला मी पाहिले आहे.”
”असामान्य बालकाच्या जन्माच्यावेळी ह्या गोष्टी घडतील. देव आम्हाला पुत्र देईल. हा पुत्र लोकांच्या नेतृत्वाची जबाबदारी घेईल. त्याचे नाव असेल “अदभुत सल्लागार, सामर्थ्यशाली देव, चिरंजीव पिता, शांतीचा राजपुत्र.” त्याच्या राज्यात सामर्थ्य आणि शांती नांदेल. आणि दाविदच्या वंशाच्या ह्या राजाच्या काळात ती वाढतच जाईल. हा राजा सदासर्वकाळ सदाचार आणि प्रामाणिक न्यायबुध्दीने राज्य करील.सर्वशक्तिमान परमेश्वराला त्याच्या लोकांबद्दल अतिशय प्रेम आहे. ह्या प्रेमापोटीच ह्या सर्व गोष्टी घडून येतील.
”परमेश्वराचा आत्मा त्या मुलात असेल. तो आत्मा त्याला सुज्ञपणा, समजूत, मार्गदर्शन आणि सामर्थ्य देईल. हा आत्मा परमेश्वराला जाणून घेण्यास व श्रध्दा ठेवण्यास त्या मुलाला शिकवील.
”म्हणजे सुखी व्हाल आणि म्हणाल, “परमेश्वराची स्तुती असो. त्याच्या नावाची उपासना करा. त्याच्या करणीची माहिती लोकांना सांगा.” परमेश्वराचे स्तुतिस्तोत्र गा कारण त्याने महान कार्य केले आहे. देवबाद्दल ही वार्ता सर्व जगात पसरवा सर्व लोकांना हे कळू द्या. सीयोनवासीयांनो, तुम्ही गजर करा. कारण इस्राएलचा एकमेव पवित्र देव समर्थपणे तुमच्यामध्ये आहे. तेव्हा आनंदी व्हा.
”त्या वेळी लोक देवाकडे म्हणजे आपल्या जन्मदात्याकडे पाहतील. त्यांना इस्राएलच्या पवित्र देवाचे दर्शन होईल.
”वाचलेले लोक आरडाओरड सुरू करतील. त्यांचा आवाज महासागराच्या गर्जनेपेक्षा मोठा असेल. परमेश्वराची महानता पाहून ते आनंदित होतील. ते लोक म्हणतील, “पूर्वेकडच्या लोकांनो, परमेश्वराचे स्तवन करा. दूरच्या देशांतील लोकांनो, इस्राएलच्या परमेश्वर देवाचे स्तवन करा.”
”प्रभू, तू माझा परमेश्वर आहेस. मला तुझ्याबद्दल आदर वाटतो व तुझे मी स्तवन करतो. तू आश्चर्य घडवली आहेस. तू पूर्वी केलेले भाकीत पूर्णपणे खरे ठरले आहे. तू सांगितलेली प्रत्येक गोष्ट जशीच्या तशी घडली आहे. तू ज्या शहराचा नाश केलास, ते शहर मजबूत तटबंदीने सुरक्षित केलेले होते. पण आता तेथे फक्त दगडांचा खच पडला आहे परकीयांचा राजवाडा जमीनदोस्त केला गेला आहे. तो परत कधीच बांधला जाणार नाही. बलाढ्य राष्ट्रातील लोक तुला मान देतील. क्रूर राष्ट्रांतील शहरे तुला घाबरतील.
”म्हणून नेहमी परमेश्वरावर विश्वास ठेवा, कारण परमेश्वर हा तुमच्यासाठी निरंतर सुरक्षित आसरा आहे.
”त्या वेळेला, सर्वशक्तिमान परमेश्वर स्वत: “सुंदर फुलांचा मुकुट” होईल. जे काही देवाला अनुसरणारे लोक म्हणजेच देवाचे लोक मागे उरले असतील, त्यांच्याकरिता देव “सुंदर फुलांचा मुकुट” होईल.
”त्या वेळेला तुम्ही आनंदगीते गाल. सुटीच्या दिवसातील रात्रीप्रमाणे हा काळ असेल. परमेश्वराच्या डोंगरावर जाताना तुम्हाला आनंद वाटतो, इस्राएलच्या खडकाकडे जाताना (परमेश्वराच्या उपासनेला जाताना) बासरीचा स्वर ऐकून तुम्हाला हर्ष होतो, तसाच हा आनंद असेल. परमेश्वर आपला प्रचंड आवाज लोकांना ऐकायला भाग पाडील. परमेश्वराचा शक्तिशाली हात रागाने खाली पृथ्वीवर येताना पाहण्यास परमेश्वर लोकांना भाग पाडेल. सर्व जाळून टाकणाऱ्या अग्नीप्रमाणे हा हात असेल. मुसळधार पाऊस व गारपीट करणाऱ्या वादळाप्रमाणे देवाचे सामर्थ्य असेल.
”तुम्ही स्वत:च्या डोळ्यांनी राजाला (देवाला) त्याच्या सुंदर रूपात पाहाल. तुम्ही महान भूमी पाहाल.
”कारण परमेश्वर आमचा न्यायाधीश आहे. परमेश्वरच आमचे कायदे करतो. परमेश्वर आमचा राजा आहे. तो आमचे रक्षण करतो. म्हणून तो आम्हाला खूप संपत्ती देईल. पंगूनासुध्दा युध्दात खूप धन मिळेल.
”देव त्याच्या लोकांना मुक्त करील आणि ते लोक त्याला शरण येतील. सियोनमध्ये येताना लोक गात येतील. त्यांना कायमचा आनंद मिळेल. तो आनंद त्यांच्या डोक्यावरील मुकुटाप्रमाणे असेल. ते आनंदाने व हर्षांने भारून जातील. दु:ख आणि शोक दूर सरेल.
”मी म्हणतो, “परमेश्वराने माझे रक्षण केले. म्हणून आम्ही आयुष्यभर परमेश्वराच्या मंदिरात गाऊ व वाद्य वाजवू.”
”मग देवाची प्रभा फाकेल आणि सर्व लोक एकत्रितपणे परमेश्वराचे तेज पाहतील. हो! स्वत: परमेश्वराने हे सर्व सांगितले आहे.”
”आपल्या ओंजळीने समुद्राचे पाणी कोणी मोजले? आकाशाचे मोजमाप करण्यासाठी कोणी आपला हात वापरला? पृथ्वीवरची धूळ वाडग्याने कोणी मापली? डोंगर आणि टेकड्या तराजूने कोणी तोलल्या? हे सर्व करणारा परमेश्वर होता.
”तुम्हाला सत्य नक्कीच माहीत आहे. नाही का? तुम्ही नक्कीच त्याबद्दल ऐकले आहे. फार पूर्वी नक्कीच कोणीतरी तुम्हाला ते सांगितले आहे. ही पृथ्वी कोणी निर्मिली हे तुम्ही जाणता. परमेश्वरच खरा देव आहे तो पृथ्वीगोलावर स्थानापन्न होतो. त्याच्या तुलनेत लोक म्हणजे नाकतोडे आहेत. त्याने कापडाच्या गुंडाळीप्रमाणे आकाश उलगडून उघडले. आकाशाखाली बसण्यासाठी त्याने ते तंबूच्या कनातीप्रमाणे ताणले. तो अधिपतींना निरूपयोगी करतो आणि जगातील न्यायाधीशांना पूर्णपणे कवडीमोल ठरवितो.
”आकाशाकडे पाहा. हे तारे कोणी निर्मिले? ही आकाशातील ‘सेना’ कोणाची निर्मिती आहे. प्रत्येक ताऱ्याला त्याच्या नावाने कोण ओळखतो? खरा देव फार बलवान व सामर्थ्यवान आहे. म्हणून त्यातील एकही तारा हरवत नाही.”
”परमेश्वर देव फार सुज्ञ आहे, हे तुम्ही नक्कीच ऐकले आहे व तुम्हाला ते माहीतही आहे. देवाला ज्ञान असलेली प्रत्येक गोष्ट माणूस शिकू शकत नाही. परमेश्वर कधी दमत नाही, आणि त्याला विश्रांतीची गरज नाही. जगातील दूरदूरची स्थळे परमेश्वरानेच निर्मिली. परमेश्वर चिरंजीव आहे.
”तुम्ही त्या फेकून द्याल आणि वाऱ्याबरोबर वाहत जाऊन त्या सगळीकडे विखुरल्या जातील. नंतर तुम्ही परमेश्वराबद्दल आनंद मानाल. तुम्हाला इस्राएलच्या पवित्र (देवाबद्दल) अभिमान वाटेल.”
”“मी परमेश्वर आहे माझे नाव यहोवा, मी माझे गौरव दुसऱ्यांना देणार नाही. माझ्याकरिता असलेली स्तुती मी मूर्तीच्या (खोट्या देवांच्या) वाट्याला येऊ देणार नाही. काही गोष्टी घडतील असे मी सुरवातीलाच सांगितले होते त्या गोष्टी घडल्या आणि आता काही गोष्टी घडायच्या पूर्वीच मी त्याबद्दल सांगत आहे आणि भविष्यात तसेच घडेल.” परमेश्वरासाठी नवीन स्तोत्र गा. दूरवरच्या देशांतील सर्व लोकांनो, समुद्रावरून सफर करणाऱ्या सर्वानो, समुद्रातील सर्व प्राण्यांनो, दूरच्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांनो, परमेश्वराची स्तुती करा. वाळवंटांनो, नगरांनो, केदार मधील शेतांनो, परमेश्वराचे स्तुतिस्तोत्र गा. सेलातील लोकांनो, आनंदाने गा. तुमच्या उंच डोंगरकड्यावरून गा. परमेश्वराचा गौरव करा. दूरवरच्या देशातील लोकांनो, त्याची स्तुती करा.
”जी माणसे माझी आहेत, जी माझे नाव लावतात, त्या सर्वांना माझ्याकडे आण. मी त्या लोकांना माझ्यासाठी निर्मिले आहे मीच त्यांना घडविले व ते माझे आहेत.”
”परमेश्वर म्हणतो, “तुम्ही लोक माझे साक्षीदार आहात. मी निवडलेले तुम्ही लोक माझे सेवक आहात माझ्यावर विश्वास ठेवायला लोकांना तुम्ही मदत करावी म्हणून मी तुम्हाला निवडले आहे. ‘मीच तो आहे,’ मीच खरा देव आहे. हे तुम्हाला कळावे म्हणून मी तुमची निवड केली. माझ्याआधी कोणी देव नव्हता आणि माझ्यानंतर कोणी देव नसेल. मी स्वत:च परमेश्वर आहे मी एकमेव आहे. दुसरा कोणीही तारणकर्ता नाही. मीच एकटा आहे.
”मी परमेश्वर तुमचा पवित्र देव आहे. मी इस्राएल निर्मिले. मी तुमचा राजा आहे.”
”ह्या लोकांना मी निर्मिले आहे. ते माझी स्तुतिस्तोत्रे गातील.
”परमेश्वर इस्राएलचा राजा आहे सर्वशक्तिमान परमेश्वर इस्राएलला वाचवितो. परमेश्वर म्हणतो, “मीच फक्त देव आहे. दुसरे कोणीही देव नाहीत. मीच आरंभ आहे आणि मीच अंत आहे.
”परमेश्वराने महान गोष्टी केल्या म्हणून आकाश आनंदात आहे खोलवरची भूमीसुध्दा सुखात आहे. डोंगर गाण्यातून देवाचे आभार मानीत आहेत. रानातील सर्व वृक्ष आनंदात आहेत. का? कारण परमेश्वराने याकोबला वाचविले. परमेश्वराने इस्राएलसाठी फार मोठ्या गोष्टी केल्या.
”मी परमेश्वर आहे मीच फक्त देव आहे दुसरा कोणीही देव नाही. मी तुला वस्त्रे घातली, पण तरीही तू मला ओळखत नाहीस. “मी एकटाच देव आहे. हे मी ह्या सर्व गोष्टी करतो, त्यावरून लोकांना कळेल. मीच परमेश्वर आहे, दुसरा कोणीही देव नाही’ हे पूर्वेपासून पश्चिमेपर्यत सर्व लोकांना कळेल. मी प्रकाश निर्माण केला आणि अंधारही. मी शांती निर्माण केली तशी संकटेही. मी परमेश्वर आहे व ह्यासर्व गोष्टी मी करतो.
”परमेश्वरच फक्त देव आहे. त्यानेच आकाश व पृथ्वी निर्मिली. परमेश्वराने पृथ्वीला तिच्या जागी ठेवले. परमेश्वराने पृथ्वी निर्मिली तेव्हा त्याला ती रिकाती नको होती. ती पुढे जगावी म्हणून त्याने ती निर्मिली. तिच्यावर राहता यावे म्हणून त्याने ती निर्माण केली “मीच परमेश्वर आहे दुसरा कोणीही देव नाही.
”दूरदूरच्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांनी देवाचे अनुसरण करणे थांबवले. तुम्ही मला अनुसरावे व स्वत:चे रक्षण करून घ्यावे. मीच देव. दुसरा देव नाही. मीच फक्त देव आहे. “मी माझ्या सामर्थ्याच्या जोरावर वचन देईन. आणि जेंव्हा मी एखादी गोष्ट व्हावी म्हणून मी हूकूम देतो तेंव्हा ती होतेच. मी वचन देतो की प्रत्येकजण माझ्यापुढे (देवापुढे) नमन करेल. प्रत्येकजण मला अनुसरण्याचे वचन देईल.
”पूर्वी घडलेल्या गोष्टी आठवा. मी देव आहे हे लक्षात ठेवा. दुसरा कोणताच देव नाही. ते खोटे देव माझ्यासारखे नाहीत. अखेरीला काय होणार हे मी तुम्हाला आरंभीच सांगितले, फार वर्षांपूर्वी, ज्या गोष्टी घडल्या नव्हत्या, त्या मी तुम्हाला सांगितल्या म्हणजेच त्या गोष्टी घडण्यापूर्वी अनेक वर्षे मी त्या घडणार असल्याचे तुम्हाला सांगितले. मी योजतो, तसेच घडते मला पाहिजे ते मी घडवून आणतो.
”“माझे लोक म्हणतात, ‘देवाने आम्हाला वाचविले. त्याचे नाव आहे सर्वशक्तिमान परमेश्वर. इस्राएलचा पवित्र एकमेव देव.”
”“याकोबा, माझे ऐक, इस्राएल, मी तुला माझे होण्यासाठी बोलाविले, तेव्हा माझे ऐक. मीच आरंभ आहे आणि मीच अंत आहे. मी माझ्या हाताने पृथ्वी निर्माण केली. माझ्या उजव्या हाताने आकाश निर्माण केले आणि मी जर त्यांना हाक मारली तर ती माझ्यासमोर गोळा होतील.
”परमेश्वर, इस्राएलचा पवित्र देव, इस्राएलला वाचवितो देव म्हणतो, “माझा सेवक नम्र आहे. तो अधिपतींची सेवा करतो पण लोक त्याचा तिरस्कार करतात पण राजे त्याला पाहतील आणि उभे राहून त्याला मान देतील. मोठे नेते त्याच्यापुढे वाकतील.” परमेश्वराला, इस्राएलच्या पवित्र देवाला हे व्हायला पाहिजे आहे म्हणून असे घडेल, परमेश्वर विश्वासू आहे. ज्याने तुला निवडले तोच तो आहे.
”हे स्वर्गा आणि हे पृथ्वी, आनंदित व्हा. डोंगरांनो, आनंदाचा कल्लोळ करा. का? कारण परमेश्वर लोकांचे दु:ख हलके करतो. गरिबांवर तो दया करतो.
”टेहळणी करणारेआरडाओरडा करतात. ते सर्व मिळून आनंद व्यक्त करीत आहेत का? कारण त्यांच्यातील प्रत्येकाने परमेश्वराला सियोनला परत येताना पाहिले आहे. यरूशलेमा, तुझ्या नाश झालेल्या इमारती पुन्हा आनंदित होतील. तुम्ही सर्व मिळून आनंद साजरा कराल का? कारण परमेश्वराने त्याच्या लोकांना सुखी केले आहे. त्याने यरूशलेमला मुक्त केले आहे.
”कारण तुझा पती हा तुझा निर्माता म्हणजेच देव आहे. त्याचे नाव सर्वशक्तिमान परमेश्वर आहे. इस्राएलला वाचविणारा एक तोच आहे तो इस्राएलचा पवित्र देव आहे. आणि त्याला सर्व पृथ्वीचा पवित्र देव म्हटले जाईल.
”माझे शब्द आनंदाने बाहेर जातील आणि शांती घेऊन येतील. डोंगर आणि टेकड्या आनंदाने नाचू लागतील. शेतांतील झाडे आनंदाने टाळ्या वाजवतील.
”देव अती उच्च व परम थोर आहे. देव चिरंजीव आहे. त्याचे नाव पवित्र आहे. देव म्हणतो, मी उंच आणि पवित्र जागी राहतो हे खरे पण मी दु:खी आणि लीन यांच्याबरोबरही असतो. मनाने नम्र असलेल्यांना आणि दु:खी लोकांना मी नवजीवन देईन.
”“या पुढे तुला रात्रंदिवस चंद्र सूर्य नव्हे तर परमेश्वर प्रकाश देईल. परमेश्वर तुझा चिरकालाचा प्रकाश होईल. तुझा देवच तुझे वैभव असेल. “तुझा ‘सूर्य’ कधी मावळणार नाही आणि ‘चंद्राचा’ क्षय होणार नाही. कारण परमेश्वर तुझा अक्षय प्रकाश असेल. तुझा दु:खाचा काळ संपेल. “तुझे सर्व लोक सज्जन असतील. त्यांना कायमची भूमी मिळेल. मी त्या लोकांना निर्माण केले. मी माझ्या स्वत:च्या हातांनी तयार केलेली ती सुंदर रोपटी आहेत.
”सियोनच्या दु:खी लोकांकडे देवाने मला पाठविले. मी त्यांना उत्सवासाठी तयार करीन. त्यांच्या डोक्यांवरची राख मी झटकून टाकीन आणि मी त्यांना मुकुट देईन. मी त्याचे दु:ख दूर करीन. त्यांना सुखाचे तेल देईन. मी त्यांचा शोक नाहीसा करीन आणि त्यांना सणासुदीची वस्त्रे घालायला देईन. देवाने मला त्या लोकांना ‘चांगले वृक्ष’ आणि ‘परमेश्वराची सुंदर रोपटी’ अशी नावे ठेवण्यासाठी पाठविले आहे.
”परमेश्वराने मोशेला उजव्या हाताने पुढे नेले. परमेश्वराने आपल्या विलक्षण सामर्थ्याचा उपयोग मोशेला पुढे नेण्यासाठी केला. लोकांना समुद्रातून पलीकडे जाता यावे म्हणून परमेश्वराने पाणी दुभंगविले. असे चमत्कार घडवून देवाने आपली कीर्ती वाढविली.
”हे बघ! तू आमचा पिता आहेस. अब्राहामला आम्ही माहीत नाही. इस्राएल (याकोब) आम्हाला ओळखत नाही. परमेश्वरा, तूच आमचा पिता आहेस. आम्हाला नेहमी वाचविणारा तूच एक आहेस.
”पण, परमेश्वरा, तू आमचा पिता आहेस. आम्ही मातीप्रमाणे आहोत आणि तू कुंभार आहेस. तुझ्या हातांनी आम्हाला घडविले आहे.
”देव असे म्हणाला, “आकाश माझे सिंहासन आहे आणि पृथ्वी हे माझे पाय ठेवण्याचे आसन आहे. मग तुम्ही माझ्यासाठी घर बांधू शकाल असे तुम्हाला वाटते का? नाही. तुम्हाला ते शक्य नाही. तुम्ही मला विश्रांतीसाठी जागा देऊ शकाल का? नाही. तुम्ही जागा देऊ शकणार नाही.
”“मी नवे जग निर्माण करीन आणि नवा स्वर्ग व नवी पृथ्वी अक्षय राहतील. त्याचप्रमाणे तुमची नावे आणि मुले नेहमी माझ्याबरोबर असतील. प्रत्येक पूजेच्या दिवशी, सर्व लोक माझी उपासना करण्यासाठी येतील. ते प्रत्येक शब्बाथला आणि महिन्याच्या पहिल्या दिवशी येतील.
”खरोखर तुम्हाला माझी भिती वाटते.” हा परमेश्वराचा संदेश आहे.“माझ्यापुढे तुम्ही भीतीने थरथर कापावे. समुद्राला सीमा असावी म्हणून समुद्रकिनारे निर्माण करणारा मी एकमेव आहे. पाणी अखंड जागच्या जागी राहावे म्हणून मी असे केले. लाटा कधी किनाऱ्यावर आक्रमण करतात. पण त्या किनाऱ्याचा नाश करीत नाहीत. लाटा गर्जना करीत कधी कधी आत येतात, पण त्या किनाऱ्याच्या बाहेर जाऊ शकत नाहीत.
”पण परमेश्वरच फक्त खरा देव आहे. खरा सजीव असा केवळ देवच आहें शाश्वत शासन करणारा असा तो राजा आहें त्याला राग आल्यास पृथ्वी कंप पावते. त्याचा कोप देशांतील लोक सहन करु शकत नाहीत.
”परमेश्वराचे स्तवन करा. परमेश्वराची स्तुती करा. परमेश्वर गरिबांचे रक्षण करतो. तो दुष्टापासून त्यांना वाचवितो.
”एखादा माणूस माझ्यापासून लपण्याचा प्रयत्न करीलही, पण त्याला शोधणे मला अगदी सोपे आहे. का? कारण मी स्वर्ग आणि पृथ्वी ह्यांमध्ये सगळीकडे आहे.” परमेश्वर असे म्हणाला.
”माझा संदेश अग्नीप्रमाणे आहे.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “तो खडक फोडणाऱ्या हातोड्याप्रमाणे आहे.
”तुम्ही मला शोधाल आणि तुम्ही जेव्हा मनापासून मला शोधाल, तेव्हा मी तुम्हाला सापडेन.
”“परमेश्वर देवा, तू आकाश आणि पृथ्वी निर्माण केलीस. तुझ्या सामर्थ्याच्या बळावर आणि पसरलेल्या हातामुळे तू ते निर्माण केलेस. तुला आश्र्चर्य कारक वाटण्याजोगे काहीही नाही. तुला काहीही असाध्य नाही. परमेश्वर, तू हजारो लोकांची निष्ठा सांभाळणारा व त्यांच्यावर कृपा करणारा आहेस. पण तूच वडिलांच्या पापांची शिक्षा मुलांना करतोस. सर्वश्रेष्ठ व सामर्थ्यवान देवा, तुझे नाव आहे सर्वशक्तिमान परमेश्वर.
”“यिर्मया, मी परमेश्वर आहे पृथ्वीवरच्या प्रत्येक माणसाचा मी देव आहे. यिर्मया, मला काहीच अशक्य नाही, हे तुला माहीत आहेच.”
”तेथे सुखाचे व आनंदाचे कल्लोळ उठतील. नव-वर-वधूंचे सुखसंवाद ऐकू येतील. परमेश्वराला अर्पण करण्यासाठी भेटी घेऊन परमेश्वराच्या मंदिरात येणाऱ्या लोकांचे आवाज ऐकू येतील. ते लोक म्हणतील, ‘परमेश्वर देवाची स्तुती करा. परमेश्वर चांगला आहे. परमेश्वराची कृपा चिरंतन आहे!’ मी यहूदासाठी चांगल्या गोष्टी करीन. म्हणून लोक असे म्हणतील. ते सर्व सुरुवातीला जसे होते तसे असेल.” देवाने ह्या गोष्टी सांगितल्या.
”ऊठ! रात्री आक्रोश कर. रात्रीच्या प्रत्येक प्रहराच्या आरंभाला रड. आपण पाणी ओततो. तसे मन मोकळे कर. परमेश्वरापुढे मन मोकळे कर. परमेश्वरापुढे हात जोड. तुज्या मुलांच्या प्राणरक्षणासाठी परमेश्वराजवळ प्रार्थना कर. कारण तुझी मुले उपासमारीने मूर्छित पडत आहेत. नगराच्या रस्त्या-रस्त्यावर ती बेशुध्द होऊन पडत आहेत.
”स्वर्गातील परमेश्वराकडे आपण आपले हृदय व हात उंचावू या.
”पण परमेश्वरा, तुझी सत्ता चिरंतन आहे. तुझे राजसिंहासन चिरकाल राहील.
”मग मी पंखांचा आवाज ऐकला. प्राण्यांनी हालचाल करताच पंखाचा प्रचंड आवाज होई. तो आवाज प्रचंड पाण्याच्या खळखळाटाप्रमाणे होता. सर्वशक्तिमान देव चालताना व्हावा, तसा तो आवाज मोठा होता. सैन्याच्या आवाजाप्रमाणे अथवा लोकांच्या प्रचंड गर्दीच्या आवाजासारखा तो आवाज होता. प्राणी थांबताच, त्यांचे पंख त्यांच्या बाजूला खाली येत. ते प्राणी थांबले व त्यांनी आपले पंख खाली केले. मग दुसरा एक खूप मोठा आवाज झाला. त्या प्राण्यांच्या डोक्यांवरील वाडग्यातून तो आवाज आला. त्या प्राण्यांच्या डोक्यांवरील वाडग्यातून तो आवाज आला. त्या वाडग्यावर काहीतरी होते. ते सिंहासनाप्रमाणे दिसत होते. ते इंद्रनीलाप्रमाणे गर्द निळे होते. त्यावर माणसाप्रमाणे दिसणारी आकृती बसलेली होती. मी त्याचा कमरेवरचा भाग पाहिला. तो तप्त धातू प्रमाणे दिसत होता. त्याच्या भोवती आगीचा लोळ असल्याप्रमाणे दिसत होते. मी त्याच्या कमरेखालच्या भागाकडे पाहिले. तो आगीप्रमाणे दिसत होता. त्याच्या सभोवती प्रभा फाकली होती. त्याच्या भोवती फाकलेले तेज इंद्रधनुष्याप्रमाणे होते. ते परमेश्वराच्या वैभवाच्या तेजाप्रमाणे दिसत होते. म्हणून मी ते पाहाताच जमिनीवर पालथे पडून, मस्तक टेकवून वंदन केले. त्या नंतर, माझ्याशी कोणीतरी बोलत असल्याचे मला ऐकू आले.
”मग वाऱ्याने मला उचलले. नंतर मला माझ्यामागून आवाज आला. तो आवाज गडगडाटाप्रमाणे प्रचंड होता. त्यांतून “परमेश्वराच्या वैभवाचा धन्यावाद असो” असे शब्द आले.
”मग मी उठलो आणि दरीकडे गेलो. खबार कालव्याजवळ पाहिली होती तशीच परमेश्वराची प्रभा तेथे होती. तेव्हा मी नतमस्तक झालो.
”पण इस्रएलच्या देवाची प्रभाही तेथे होती. खबार कालव्याजवळ मला झालेल्या दृष्टान्तातील प्रभेप्रमाणेच ही प्रभा होती.
”मग करुब दूतांवरुन परमेश्वराची प्रभा फाकली आणि मंदिराच्या उंबरठ्यापर्यंत पोहोचली. मग ढगाने मंदिरच व्यापले आणि परमेश्वराच्या प्रभेतून निघालेल्या तेजस्वी प्रकाशाने सर्व अंगणच व्यापले. मग करुबांच्या पंखाचा आवाज ऐकला. सर्वशक्तिमान देव बोलू लागताच होणाऱ्या गडगडाटी आवाजासारखा तोही आवाज प्रचंड होता. बाहेरच्या अंगणापर्यंत तो सहज ऐकू येऊ शकत होता.
”मग परमेश्वराची प्रभा मंदिराच्या उंबरठ्यावरुन करुबांच्या वर जाऊन थांबली. मग करुबांनी पंख पसरले व ते हवेत उडाले. मी त्यांना मंदिर सोडून जाताना पाहिले. चाकेही त्यांच्याबरोबर गेली मग ते देवाच्या मंदिराच्या पूर्वेकडच्या प्रवेशद्वाराशी थांबले. इस्राएलच्या देवाची प्रभा त्यांच्या वरच्या बाजूला होती.
”ह्यानंतर करुब दूतांनी पंख पसरले व ते हवेत उडाले. चाकेही त्यांच्याबरोबर गेली. इस्राएलच्या देवाची प्रभा त्यांच्यावर होती. परमेश्वराची प्रभा वर गेली व तिने यरुशलेम सोडले. ती क्षणभरच यरुशलेमच्या पूर्वेकडच्या टेकडीवरथांबली.
”मग मी किती थोर आहे ते दाखवीन. मी पवित्र आहे हे सिद्ध करीन. पुष्कळ राष्ट्रे माझी कृत्ये पाहतील व मग त्यांना ‘मी कोण आहे’ हे कळू येईल. मग त्यांना पटेल की मीच देव आहे.”
”पूर्वेकडून तेथे इस्राएलच्या देवाची प्रभा फाकली. समुद्राच्या गर्जनेप्रमाणे देवाचा आवाज प्रचंड होता. त्याच्या प्रभेने भूमी उजळली होती. मी खबार कालव्याजवळ पाहिलेल्या दृष्टान्तासारखाच हा दृष्टान्त होता मी जमिनीला डोके टेकवून नमस्कार केला. परमेश्वराची प्रभा पूर्वेच्या दारातून मंदिरात आली. मग वाऱ्यानेमला उचलले आणि आतल्या अंगणात आणले. मंदिर परमेश्वराच्या प्रभेने भरुन गेले. मंदिराच्या आतून कोणीतरी माझ्याशी बोलत असल्याचे मला जाणवले. तो माणूस माझ्या शेजारीच बोलत असल्याचे मला जाणवले. तो माणूस माझ्या शेजारीच उभा होता. मंदिरातील आवाज मला म्हणाला, “मानवपुत्रा, ही माझ्या सिंहासनाची व चरणासनाची जागा आहे. येथे मी इस्राएलच्या लोकांमध्ये कायमचा राहीन. इस्राएलचे लोक माझ्या पवित्र नावाला पुन्हा कलंक लावणार नाहीत. राजे आणि राजघराण्यातील लोक, व्याभिचाराचे पाप करुन अथवा राजांची प्रेते ह्या जागी पुरुन पुन्हा कधीही माझ्या नावाला बट्टा लावणार नाहीत.
”मग त्या माणसाने मला उत्तरेकडच्या दारातून मंदिरासमोर आणले. मी पाहिले तर काय, परमेश्वराची प्रभा, परमेश्वराच्या मंदिरात, पसरत होती. मी जमिनीला डोके टेकवून नमस्कार केला.
”रात्री, देवाने दानीएलला दृष्टान्त देऊन सर्व रहस्य उलगडून सांगितले. मग दानीएलने स्वर्गातील देवाचे स्तुतिस्तोत्र गायले. तो म्हणाला, “सदासर्वकाळ देवाच्या नावाची स्तुती करा. सामर्थ्य व ज्ञान त्याच्यापाशीच आहे. तो काळ आणि ऋ तू बदलतो. आणि राजेही बदलतो. तोच राजांना सत्ता देतो. आणि तोच त्यांची सत्ता काढून घेतो. लोकांनी शहाणे व्हावे म्हणून तो त्यांना शहाणपण देतो, त्यांनी ज्ञानी व्हावे म्हणून तो त्यांना सर्व गोष्टी शिकू देतो. समजण्यास अतिशय कठीण असलेली, गुप्त रहस्ये त्याला माहीत असतात. प्रकाश त्याच्याबरोबर असल्यामुळे, अंधारात आणि गुप्त जागी काय आहे ते त्याला कळते. माझ्या पूर्वजांच्या देवा, मी कृतज्ञ आहे, मी तुझी स्तुती करतो. तू मला ज्ञान व शक्ती दिलीस. मी विचारलेल्या गोष्टी सांगितल्यास. तूच मला राजाच्या स्वप्नाबद्दल सांगितलेस.”
”चौथ्या राजाच्या कारकिर्दीत, स्वर्गातला देव आणखी एक राज्य निर्माण करील. ते कायमचे राहील. त्याचा कधीही नाश होणार नाही. ते दुसऱ्या घराण्याकडे सोपविता येणार नाही. हे राज्य इतर राज्यांना चिरडून टाकील, त्यांचा शेवट करील पण ते राज्य सदासर्वकाळ टिकून राहील.
”ह्या काळाच्या अखेरीला मी नबुखद्नेस्सरने स्वर्गाकडे पाहिले आणि माझे मन ताव्व्यावर आले मग मी परात्पर देवाचे स्तवन केले. त्या चिरंतनाचा मी मान ठेवला त्याचे उपकार मानले.देवाचे प्रभुत्व अंखड आहे. त्याचे राज्य पिढ्यान्पिढ्या राहणारे आहे.
”आता मी नबुखद्नेस्सर, स्वर्गाच्या राजाची स्तुतिस्तोत्रे गातो, त्याचा गौरव करतो, त्याचे उपकार मानतो. तो करतो ती प्रत्येक गोष्ट बरोबरच; असते तो नेहमीच न्याय मार्ग स्वीकारतो आणि गर्विष्ठांना तो नम्र करतो.
”“मी पाहतो तर आपापल्या जागी सिंहासने मांडली गेली व त्यावर प्राचीन राजा त्याच्या सिंहासनावर बसला. त्याचे कपडे व केस कापसाप्रमाणे सफेद होते. त्याचे सिंहासन अग्नीचे होते. व सिंहासनाची चाके ज्वालांची केलेली होती. प्राचीन राजाच्या समोरून अग्नीची नदी वाहत होती करोडो लोक त्याची सेवा करीत होते. कोट्यावधी लोक त्याच्यासमोर उभे होते. हे दृश्य, न्यायालय सुरू होण्याच्या तयारीत आहे व सर्वांची खाती आत्म उघडली जाणार आहेत, अशा प्रकारचे होते.
”माझ्या रात्रीच्या दृष्टान्तात मला मनुष्यप्राण्याच्या आकृतीसारखे काहीतरी दिसले. तो ढगांवरून येत होता. तो प्राचीन राजाकडे आला. त्याला राजासमोर आणण्यात आले. “मग त्या मनुष्यप्राण्याप्रमाणे दिसणाऱ्याला अधिकार, वैभव व संपूर्ण सत्ता देण्यात आली सर्व लोक राष्ट्रे व निरनिराळे भाषा बोलणारे सर्व त्याची सेवा करणार होते. त्याची सत्ता चिरंतन होती. त्याचे राज्य कायमचे होते. त्याचा कधीही नाश होणार नव्हता.
”ती पृथ्वीतून उदयास येतील पण देवाच्या खास लोकांनाच राज्य मिळेल आणि ते सदासर्वकाळ राहील.’
”मग देवाचे खास लोक राज्य करतील. ते पृथ्वीवरच्या सर्व राज्यांतील सर्व लोकांवर राज्य करतील. हे राज्य कायम राहील. व इतर राज्यातील लोक त्याला मान देतील, त्याची सेवा करतील.”
”त्यानंतर इस्राएलचा राज्यकर्ता परमेश्वराच्या सामर्थ्याने उभा राहील. त्याचा देव परमेश्वर याच्या विस्मयकारीक नांवाल उभा राहील आणि कळपाला चारील. ते शांतीने राहातील. का? कारण त्या वेळी परमेश्वराची महानता पृथ्वीच्या टोकापर्यंत पोहोचेल.
”परमेश्वर येईल तेव्हा पर्वतांचा भीतीने थरकाप होईल टेकड्या वितळून जातील परमेश्वर येईल तेव्हा धरणी भयभीत होऊन थरथर कापेल. एवढेच नाही तर, हे जग आणि त्यातील प्रत्येक माणूस भीतीने कापेल.
”मग मात्र सर्वच लोकांना परमेश्वराचे वैभाने (गौरवाने) कळेल. समुद्राच्या पसरणाऱ्या पाण्याप्रमाणे ही वार्ता सगळीकडे पसरेल.
”तेमानहून देव येत आहे. पारान पर्वतावरुन पवित्र परमेश्वर येत आहे. परमेश्वराच्या तेजाने स्वर्ग व्यापला जातो आणि स्तुतीने पृथ्वी व्यापली जाते. ते तेज तेजस्वी, चमकदार प्रकाशाप्रमाणे आहे त्याच्या हातातून किरण निघतात. त्या हातात मोठे सामर्थ्य लपले आहे.
”तुला पाहून पर्वत कापले भूमीतून पाणी उसळले. समुद्राच्या पाण्याने प्रचंड गर्जना केली. जणू काही त्याने आपली भूमीवरील सत्ता गमावल्यामुळे ते आकांत करीत होते.
”मी राष्ट्रांना धक्का देईन आणि मग प्रत्येक राष्ट्र तुमच्याकडे संपत्ती घेऊन येईल मग हे मंदिर वैभवाने भरुन टाकीन. सर्वशक्तिमान परमेश्वर हे सांगत आहे.
”परमेश्वर म्हणतो, ‘मी तिचे रक्षण करणारा अग्नीची भिंत बनेन. तिला वैभव प्राप्त व्हावे म्हणून मी स्वत: तेथे राहीन.”
”मग त्याने मला सांगितले “हा जरुब्बाबेलला परमेश्वराचा संदेश आहे. तो असा: ‘तुझ्या बलाने अथवा शक्तीने नव्हे तर माझ्या आत्म्याद्वारे तुला मदत मिळेल.’ सर्व शक्तिमान परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या आहेत.
”तो परमेश्वराचे मंदिर बांधून गौरव प्राप्त करील. स्वत:च्या सिंहासनावर बसून तो राज्य करील. त्याच्या सिंहासनाजवळ याजक उभे राहतील. ते दोघे एकत्रितपणे, शांतपणे काम करतील.’
”सियोन, आनंदोत्सव कर! यरुशलेमवासीयांनो, आनंदाने जल्लोश करा! पाहा! तुमचा राजा तुमच्याकडे येत आहे. तो विजयी व चांगला राजा आहे. पण तो विनम्र आहे. एका गाढवीच्या शिंगरावर, तो स्वार झाला आहे.
”त्यावेळी, तो यरुशलेमच्या पूर्वेला असलेल्या जैतून पर्वतावर उभा राहील. जैतुन पर्वत दुभंगेल पर्वताचा काही भाग उत्तरेकडे व काही दक्षिणेकडे सरकेल. पूर्वेकडून पश्चिमेपर्यंत एक खोल दरी निर्माण होईल.
”त्यावेळी, परमेश्वर सर्व पृथ्वीचा राजा असेल. परमेश्वर एकच आहे व त्याचे नावही “एक”च आहे.
”देवाचे अनुयायी एकमेकांशी बोलले व परमेश्वराने ते ऐकले. त्याच्या समोर पुस्तक आहे. त्यामध्ये देवाच्या अनुयायांची नावे आहेत. हेच लोक देवाच्या नावाला मान देतात.
”“पाहा कुमारी गर्भवती होईल व पुत्राला जन्म देईल, आणि त्यास इम्मानुएल हे नाव देतील.” या नावाचा अर्थ, “आम्हाबरोबर देव.”
”“यहूद्यांचा राजा जन्मला आहे तो कोठे आहे? आम्ही पूर्वेला त्याचा तारा पाहीला आणि त्यास नमन करावयास आलो आहोत.”
”नंतर ते त्या घरात गेले आणि ते बाळक आपली आई मरीया हिच्याजवळ असलेले त्यांनी पाहीले व खाली वाकून त्यांनी त्यास नमन केले. त्यांनी आपल्या द्रव्यांच्या थैल्या उघडून सोने, ऊद व गंधरस ही दाने अर्पण केली.
”मग येशूचा बाप्तिस्मा झाल्यावर, येशू पाण्यातून वर आला आणि पाहा, त्याच्यासाठी आकाश उघडले; तेव्हा त्याने देवाच्या आत्म्याला कबुतरासारखे उतरताना व आपणावर येताना पाहीला, आणि आकाशातून वाणी झाली की, “हा माझा प्रिय ‘पुत्र’ आहे, याच्याविषयी मी फार संतुष्ट आहे.”
”तुमचा प्रकाश इतरांसमोर याप्रकारे प्रकाशू द्या की जेणेकरून त्यांनी तुमची चांगली कामे पाहावी आणि तुमचा पिता जो स्वर्गात आहे त्याचे गौरव करावे.
”म्हणून तुम्ही प्रार्थना करता तेव्हा तुम्ही अशाप्रकारे प्रार्थना करावीः हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो. तुझे राज्य येवो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे होवो.
”आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस तर आम्हास त्या दुष्टापासून सोडव. (कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरवही सर्वकाळ तुझीच आहेत.)
”तेव्हा त्या मनुष्यांना फार आश्चर्य वाटले व ते म्हणाले, “हा कोणत्या प्रकारचा मनुष्य आहे की वारे व लाटा ही याचे ऐकतात.”
”मी तुम्हास सांगतो की, परमेश्वराच्या भवनापेक्षा महान असा कोणीतरी येथे आहे.
”तेव्हा जे शिष्य होडीत होते ते त्यास नमन करून म्हणाले, “तुम्ही खरोखर देवाचे पुत्र आहात.”
”मुके बोलू लागले, व्यंग असलेले चांगले झाले, लंगडे चालू लागले, आंधळे पाहू लागले. हे पाहून लोक थक्क झाले आणि त्यांनी इस्राएलाच्या देवाचे गौरव केले.
”कारण मनुष्याचा पुत्र आपल्या पित्याच्या वैभवात आपल्या स्वर्गदूतांसहित येईल त्यावेळी आणि तेव्हा तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कामाप्रमाणे मोबदला देईल.
”तेव्हा त्यांच्यादेखत त्याचे रूप पालटले. त्याचे तोंड सूर्यासारखे प्रकाशले आणि त्याची वस्त्रे प्रकाशासारखी पांढरी शुभ्र झाली.
”तो बोलत आहे तो, पाहा, इतक्यात, एका तेजस्वी मेघाने त्यांच्यावर सावली केली आणि त्या मेघातून अशी वाणी झाली की, “हा माझा प्रिय पुत्र आहे, याजविषयी मी संतुष्ट आहे, याचे तुम्ही ऐका.” येशूबरोबर असलेल्या शिष्यांनीही वाणी ऐकली. तेव्हा ते जमिनीवर पालथे पडले कारण ते फार घाबरले होते.
”येशूने आपल्या शिष्यांकडे पाहिले आणि तो म्हणाला, “मनुष्यांना हे अशक्य आहे, पण देवासाठी सर्व गोष्टी शक्य आहेत.”
”येशू म्हणाला, “मी तुम्हास खरे सांगतो, नव्या युगात जेव्हा मनुष्याचा पुत्र त्याच्या गौरवी राजासनावर बसेल तेव्हा तुम्ही जे सर्व माझ्यामागे आलात ते सर्व बारा राजासनावर बसाल आणि इस्राएलाच्या बारा वंशाचा न्याय कराल.
”“सियोनेच्या कन्येला सांगा, पाहा, तुझा राज लीन होऊन गाढवावर म्हणजे गाढवीच्या शिंगरावर बसून तुझ्याकडे येत आहे.”
”येशूच्या पुढे चालणारा लोकसुदाय आणि मागे चालणारे. मोठ्याने जयघोष करू लागले, “दाविदाच्या पुत्राला होसान्ना. प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित आहे. परम उंचामध्ये होसान्ना!”
”परंतु जेव्हा मुख्य याजकांना व नियमशास्त्राचे शिक्षक यांनी येशूने केलेल्या आश्चर्यकारक गोष्टी आणि परमेश्वराच्या भवनाच्या आवारात लहान मुलांना, “दाविदाच्या पुत्राला होसान्ना.” अशी घोषणा देताना पाहिले, तेव्हा त्यांना संताप आला. त्यांनी त्यास विचारले, “ही मुले काय म्हणत आहे हे तुम्ही ऐकता ना?” येशूने त्यांना उत्तर दिले, “होय परंतु तू बालके व तान्हुली यांच्या मुखातून स्तुती पूर्ण करवली आहे. हे तुमच्या वाचण्यात कधी आले नाही काय?”
”येशूने उत्तर दिले, प्रभू आपला देव याजवर तू आपल्या पूर्ण अंतःकरणाने, आपल्या पूर्ण जिवाने, आपल्या पूर्ण मनाने प्रीती कर. ही पहिली आणि मोठी आज्ञा आहे.
”तेव्हा मनुष्याच्या पुत्राच्या येण्याचे चिन्ह आकाशात दिसेल. तेव्हा जगातील सर्व वंश आपले ऊर बडवून घेतील. मनुष्याच्या पुत्राला आकाशांतल्या मेघांवर आरूढ होऊन सामर्थ्याने आणि मोठ्या गौरवाने येताना पाहतील. मनुष्याचा पुत्र कर्ण्याच्या मोठ्या नादात आपले देवदूत पृथ्वीभोवती पाठवून देईल. ते पृथ्वीच्या चारही कोपऱ्यातून, आकाशाच्या एका सीमेपासून दुसऱ्या सीमेपर्यंत निवडलेल्यांना गोळा करतील.
”मनुष्याचा पुत्र जेव्हा त्याच्या स्वर्गीय गौरवाने आपल्या देवदूतांसह येईल तेव्हा तो त्याच्या गौरवी राजासनावर बसेल. मग सर्वं राष्ट्रे त्याच्यासमोर एकत्र जमतील. त्यांना तो एकमेकांपासून विभक्त करील. ज्याप्रमाणे मेंढपाळ मेंढरे शेरडांपासून वेगळी करतो.
”मग त्यांनी एक स्त्रोत्रगीत गाईल्यावर ते जैतूनाच्या डोंगरावर निघून गेले.
”येशू त्यांना म्हणाला, “होय, मी आहे. जसे तू म्हणालास. तरी मी तुम्हास सांगतोः यापुढे मनुष्याच्या पुत्राला तुम्ही सामर्थ्याच्या उजवीकडे बसलेले व आकाशातून येताना पाहाल.”
”मग राज्यपाल पिलातापुढे येशू उभा राहिला तेव्हा पिलाताने त्यास प्रश्न विचारले. तो म्हणाला, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?” येशूने उत्तर दिले, “होय, मी आहे, जसे तुम्ही म्हणता.”
”आणि “हा यहूद्यांचा राजा येशू आहे” असे लिहिलेले आरोपपत्रक डोक्याच्या वरच्या बाजूला लावले.
”मग पाहा; येशू त्यांना भेटला आणि तो त्यांना म्हणाला, “शांती असो.” त्या त्याच्याजवळ आल्या. त्यांनी त्याचे पाय धरले आणि त्यास नमन केले.
”आणि त्यांनी त्यास बघितले तेव्हा त्यांनी त्याची उपासना केली. पण काहींना संशय आला. तेव्हा येशू त्यांच्याकडे आला आणि म्हणाला, “स्वर्गात आणि पृथ्वीवर मला सर्व अधिकार देण्यात आला आहे.
”परंतु ते अतिशय घाबरले आणि एकमेकास म्हणाले, “हा आहे तरी कोण, वारा आणि समुद्रदेखील याचे ऐकतात.” असा हा आहे तरी कोण?
”देवाशी अप्रामाणिक आणि पापी पिढीत जो कोणी माझी व माझ्या वचनांची लाज धरतो तर मनुष्याचा पुत्रही जेव्हा तो आपल्या पित्याच्या गौरवात पवित्र दूतांसह येईल तेव्हा त्यांची लाज धरील.”
”तेव्हा एक ढग आला आणि त्याने त्यांच्यावर छाया केली आणि मेघातून एक वाणी झाली, “हा माझा प्रिय पुत्र आहे याचे तुम्ही ऐका.”
”त्यांच्याकडे पाहून येशू म्हणाला, “मनुष्यांना हे अशक्य आहे पण देवाला नाही कारण देवाला सर्व गोष्टी शक्य आहेत.”
”पुढे चालणारे व मागून येणारे घोषणा देऊ लागले, “होसान्ना, प्रभूच्या नावाने येणारा धन्यवादित असो. आमचा पूर्वज दावीद याचे येणारे राज्य धन्यवादित असो. स्वर्गात होसान्ना.”
”येशूने उत्तर दिले, “पहिली महत्त्वाची आज्ञा ही, ‘हे इस्राएला, ऐक, प्रभू आपला देव एकच प्रभू आहे. तू आपल्या संपूर्ण अंतःकरणाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण मनाने आणि संपूर्ण शक्तीने तुझा देव प्रभू याच्यावर प्रीती कर.’
”आणि लोक मनुष्याचा पुत्राला मेघांरूढ होऊन मोठ्या सामर्थ्यानिशी आणि वैभवाने येताना पाहतील.
”स्वर्ग आणि पृथ्वी नाहीशी होतील पण माझी वचने नाहीशी होणारच नाहीत.
”नंतर त्यांनी उपकारस्तुतीचे गीत गाईले व ते जैतुनाच्या डोंगराकडे निघून गेले.
”येशू म्हणाला, “मी आहे, आणि तुम्ही मनुष्याच्या पुत्राला सर्वसमर्थ देवाच्या उजवीकडे बसलेले व आकाशातील मेघांसह येताना पाहाल.”
”पिलाताने त्यास विचारले, तू यहूद्यांचा राजा आहेस काय? येशूने उत्तर दिले, तू म्हणतोस तसेच.
”आणि त्याच्यावर त्याच्या दोषारोपाचा लेख, “यहूद्यांचा राजा” असा लिहिला होता.
”मग प्रभू येशू त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर तो स्वर्गात घेतला गेला आणि देवाच्या उजव्या बाजूस जाऊन बसला.
”पाहा! तू गरोदर राहशील आणि तुला मुलगा होईल त्याचे नाव तू येशू ठेव. तो महान होईल व त्यास थोर देवाचा पुत्र म्हणतील आणि प्रभू देव त्यास त्याचा पिता दावीद याचे राजासन देईल. तो याकोबाच्या घराण्यावर सर्वकाळासाठी राज्य चालवील आणि त्याच्या राज्याचा अंत होणार नाही.” तेव्हा मरीया दूताला म्हणाली, हे कसे होईल? कारण मला पुरूष ठाऊक नाही. देवदूत तिला म्हणाला, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि थोर देवाचे सामर्थ्य तुझ्यावर सावली करील आणि म्हणून जे पवित्र बाळ जन्मास येईल, त्यास देवाचा पुत्र म्हणतील.
”कारण देवाला कोणतीही गोष्ट अशक्य नाही.
”मरीया म्हणाली, “माझा जीव प्रभूला थोर मानतो, आणि देव जो माझा तारणारा याच्या ठायी माझा आत्मा आनंदीत झाला आहे.
”कारण जो सर्वसमर्थ आहे त्याने माझ्यासाठी मोठी कामे केली आहेत; आणि त्याचे नाव पवित्र आहे.
”माझ्यासमोर पवित्रतेने व नीतिमत्त्वाने आयुष्यभर माझी सेवा निर्भयपणे कराल, असे मी करीन.
”मग एकाएकी आकाशातल्या सैन्यांचा समुदाय त्या देवदूताजवळ आला आणि देवदूत देवाची स्तुती करत म्हणाले, “परम उंचामध्ये देवाला गौरव आणि पृथ्वीवर ज्या मनुष्यांसंबंधी तो संतुष्ट आहे त्यांच्यामध्ये शांती.”
”नंतर ते मेंढपाळ त्यांना सांगण्यात आले होते त्याप्रमाणे त्या सर्व गोष्टी ऐकून व पाहून देवाचे गौरव व स्तुती करीत माघारी गेले.
”येशूने उत्तर दिले, “पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे. प्रभू तुझा देव याचीच उपासना कर आणि केवळ त्याचीच सेवा कर.”
”हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, “प्रभू, माझ्यापासून दूर जा कारण मी पापी मनुष्य आहे.”
”तेव्हा तो त्यांना म्हणाला, तुमचा विश्वास कोठे आहे? आणि ते भयभीत होऊन थक्क झाले व एकमेकांना म्हणाले, हा आहे तरी कोण? की, वारा व पाणी यांना देखील हा आज्ञा करतो व ती यांचे ऐकतात.
”जो कोणी माझ्याविषयीची व माझ्या वचनाविषयी लाज धरील त्यांच्याविषयीची लाज मनुष्याचा पुत्र जेव्हा आपल्या स्वतःच्या, पित्याच्या व पवित्र दूतांच्या गौरवाने येईल तेव्हा धरील.
”मग देवाचे हे महान सामर्थ्य पाहून सर्व लोक थक्क झाले आणि तो जी कामे करीत होता त्या सर्वांवरून सर्वजण आश्चर्य करीत असता तो आपल्या शिष्यांना म्हणाला,
”त्या क्षणी तो पवित्र आत्म्यात आनंदीत झाला आणि म्हणाला, “हे पित्या, स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या प्रभू मी तुझी स्तुती करतो, कारण तू या गोष्टी ज्ञानी आणि बुद्धीमान लोकांपासून लपवून ठेवून त्या लहान बाळकांस प्रकट केल्या आहेस. होय, पित्या कारण तुला जे योग्य वाटले ते तू केलेस.
”तो म्हणाला, “तू तुझा देव प्रभू याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण आत्म्याने, पूर्ण शक्तिने प्रीती कर.” व स्वतःवर जशी प्रीती करतोस तशी तू आपल्या शेजाऱ्यावरही प्रीती कर.
”मग तो त्यांना म्हणाला, “जेव्हा तुम्ही प्रार्थना करता तेव्हा असे म्हणाः हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावो तुझे राज्य येवो,
”जेव्हा त्यांच्यातील एकाने पाहिले की आपण बरे झालो आहोत तेव्हा तो परत आला व तो मोठ्याने ओरडून देवाचे गौरव करू लागला. तो येशूच्या पायाजवळ खाली पडला व त्याने त्यास नमन केले. तसेच त्याने त्याचे उपकार मानले. तो एक शोमरोनी होता.
”तो म्हणाला, “ज्या गोष्टी मनुष्यांना अशक्य आहेत त्या देवाला शक्य आहेत.”
”ताबडतोब त्यास दिसू लागले आणि तो देवाचे गौरव करीत येशूच्या मागे गेला. सर्व लोकांनी हे पाहिले आणि देवाची स्तुती केली.
”तो जेव्हा जैतून डोंगराच्या उतरावर आला तेव्हा सर्व शिष्यसमुदाय, त्यांनी जे चमत्कार पाहिले होते त्याबद्दल मोठ्या आनंदाने देवाची स्तुती करू लागला. ते म्हणाले, “प्रभूच्या नावाने येणारा राजा धन्यवादित असो! स्वर्गात शांती आणि ऊर्ध्वलोकी गौरव.” जमावातील काही परूशी येशूला म्हणाले, “गुरुजी, आपल्या शिष्यांना गप्प राहण्यास सांगा.” त्याने उत्तर दिले, “मी तुम्हास सांगतो, जर ते शांत बसतील तर हे धोंडे ओरडतील.”
”नंतर ते मनुष्याच्या पुत्राला सामर्थ्याने आणि वैभवाने ढगांत येताना पाहतील.
”आकाश व पृथ्वी नाहीशी होतील पण माझी वचने मुळीच नाहीशी होणार नाही.
”पण आतापासून मनुष्याचा पुत्र सर्वसमर्थ देवाच्या उजवीकडे बसलेला असेल.” ते सर्व म्हणाले, तर मग तू देवाचा पुत्र आहेस काय? त्याने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही म्हणता की, मी आहे.”
”मग पिलाताने येशूला विचारले, तू यहूद्यांचा राजा आहेस काय? येशू म्हणाला, “आपण म्हणता तसेच.”
”त्याच्यावर असे लिहिले होते “हा यहूदी लोकांचा राजा आहे.”
”नंतर तो म्हणाला, “येशू, तू आपल्या राज्यात येशील तेव्हा माझी आठवण कर.”
”नंतर त्यांनी त्याची उपासना केली व ते मोठ्या आनंदाने यरुशलेम शहरास परतले. आणि ते परमेश्वराच्या भवनात देवाचा धन्यवाद सतत करत राहिले.
”सर्वकाही त्याच्याद्वारे झाले आणि जे काही झाले ते त्याने केल्यावांचून झाले नाही.
”शब्द देह झाला व त्याने आमच्यात वस्ती केली आणि आम्ही त्याचे गौरव पाहीले, ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे असे कृपेने व सत्याने परिपूर्ण होते.
”नथनेलाने उत्तर दिले, “रब्बी, आपण देवाचे पुत्र आहा, आपण इस्राएलाचे राजे आहात.”
”त्याची वृद्धी व्हावी व माझा ऱ्हास व्हावा हे अवश्य आहे. जो वरून येतो तो सर्वांच्या वर आहे. जो पृथ्वीवरचा आहे तो पृथ्वीचा आहे आणि पृथ्वीवरचे बोलतो. (जो स्वर्गातून येतो तो सर्वांच्या वर आहे.)
”येशू तिला म्हणाला, “मुली, माझ्यावर विश्वास ठेव की अशी घटका येत आहे; तुम्ही या डोंगरावर आणि यरुशलेम शहरात पण पित्याची उपासना करणार नाही, तुम्ही ज्याला ओळखीत नाही अशाची उपासना करता; आम्हास ठाऊक आहे अशाची उपासना आम्ही करतो, कारण यहूद्यांतूनच तारण आहे. तरी खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने स्वर्गीय पित्याची उपासना करतील अशी वेळ येत आहे, किंबहुना आलीच आहे; कारण आपले उपासक असेच असावेत, अशी पित्याची इच्छा आहे. देव आत्मा आहे; आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे.”
”यासाठी की जसा पित्याचा सन्मान करतात तसा पुत्राचाही सन्मान सर्वांनी करावा. जो पुत्राचा सन्मान करत नाही तो, ज्याने मला पाठवले, त्या पित्याचा सन्मान करत नाही.
”पुढे येशू पुन्हा त्यांना म्हणाला, “मीच जगाचा प्रकाश आहे; जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.”
”येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हास खरे खरे सांगतो, अब्राहामाचा जन्म झाला त्यापुर्वी मी आहे.”
”तो म्हणाला, “प्रभूजी, मी विश्वास ठेवतो.” आणि त्याने त्यास नमन केले.
”मी आणि पिता एक आहोत.”
”येशूने तिला म्हटले, “तू विश्वास ठेवशील तर तू देवाचे गौरव पाहशील असे मी तुला सांगितले नव्हते काय?”
”दुसर्या दिवशी सणास आलेले पुष्कळ लोक येशू यरुशलेम शहरास येत आहे असे ऐकून, खजुरीच्या झावळ्या घेऊन त्याच्या भेटीस घ्यायला बाहेर निघाले आणि गजर करीत म्हणाले, “होसान्ना! प्रभूच्या नावाने येणारा इस्राएलाचा राजा!” धन्यवादित असो. आणि येशूला एक शिंगरु मिळाल्यावर तो त्यावर बसला. ‘हे सियोनेच्या कन्ये, भिऊ नको, पाहा, तुझा राजा गाढवीच्या शिंगरावर बसून येत आहे.’ या शास्त्रलेखाप्रमाणे हे घडले.
”येशूने त्यांना म्हटले, “मनुष्याच्या पुत्राचे गौरव होण्याची वेळ आली आहे.
”हे पित्या, तू आपल्या नावाचे गौरव कर” तेव्हा आकाशवाणी झाली, “मी ते गौरविले आहे आणि पुन्हाही गौरवीन.”
”तो बाहेर गेल्यावर येशू म्हणाला, “आता मनुष्याच्या पुत्राचे गौरव झाले आहे आणि त्याच्याठायी देवाचे गौरव झाले आहे; देव आपल्याठायी त्याचे गौरव करील. तो त्याचे लवकर गौरव करील.
”पुत्राच्या ठायी पित्याचे गौरव व्हावे म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन.
”तुम्ही विपुल फळ दिल्याने माझ्या पित्याचे गौरव होते; आणि तुम्ही माझे शिष्य व्हाल.
”या गोष्टी बोलल्यावर येशू वर आकाशाकडे दृष्टी लावून म्हणाला, हे पित्या, वेळ आली आहे; पुत्राने तुझे गौरव करावे म्हणून तू आपल्या पुत्राचे गौरव कर. जे तू त्यास दिले आहेत त्या सर्वांना त्याने सार्वकालिक जीवन द्यावे, म्हणून तू त्यास सर्व मनुष्यांमात्रावर अधिकार दिला आहेस. सार्वकालिक जीवन हेच आहे की, तू जो एकच, खरा देव त्या तुला आणि ज्याला तू पाठवलेस त्या येशू ख्रिस्ताला ओळखावे. जे तू काम मला करावयाला दिलेस ते पूर्ण करून मी पृथ्वीवर तुझे गौरव केले आहे. तर आता, हे माझ्या पित्या, हे जग होण्याआधी तुझ्याबरोबर मला जे गौरव होते त्याच्यायोगे तू आपणा स्वतःबरोबर माझे गौरव कर.
”त्यांनी त्यास उत्तर दिले, “नासरेथकर येशूला.” तो त्यांना म्हणाला, “तो मी आहे.” आणि ज्या यहूदाने त्यास धरून दिले देखील त्यांच्याबरोबर उभा होता, ‘तो मीच आहे’ असे म्हणताच ते मागे सरकून जाऊन जमिनीवर पडले.
”म्हणून पिलात पुन्हा सरकारवाड्यांत गेला; आणि त्याने येशूला बोलावून म्हणाला, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?”
”येशूने उत्तर दिले, “माझे राज्य या जगाचे नाही. माझे राज्य या जगाचे असते तर यहूद्यांच्या हाती मी दिला जाऊ नये म्हणून माझ्या सेवकांनी लढाई केली असती; पण माझे राज्य येथले नाही.” म्हणून पिलात त्यास म्हणाला, “तर तू राजा आहेस काय?” येशूने उत्तर दिले, “मी राजा आहे असे आपण म्हणता. मी यासाठी जन्मलो आहे आणि यासाठी मी जगात आलो आहे. मी सत्याची साक्ष द्यावी. जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो.”
”पण तुमच्यासाठी वल्हांडण सणांत मी एकाला सोडावे अशी तुमच्यात रीत आहे; तर तुमच्यासाठी मी यहूद्यांच्या राजाला सोडावे अशी तुमची इच्छा आहे काय?”
”आणि पिलाताने एक फलक लिहून तो वधस्तंभावर लावला; ‘यहूद्यांचा राजा नासोरी येशू’ असे लिहिले होते. येशूला वधस्तंभावर खिळले होते ते ठिकाण नगराच्या जवळ होते. म्हणून पुष्कळ यहूद्यांनी तो फलक वाचला. तो इब्री, रोमी व ग्रीक भाषांत लिहिला होता. तेव्हा यहुद्यांचे मुख्य याजक लोक पिलाताला म्हणाले, “यहूद्यांचा राजा असे लिहू नका तर याने म्हणले ‘मी यहूद्यांचा राजा आहे’ असे लिह.” पिलाताने उत्तर दिले, “मी लिहिले ते लिहिले.”
”आणि थोमाने त्यास म्हटले, “माझा प्रभू आणि माझा देव!”
”म्हणून तो देवाच्या उजव्या हाताकडे बसविलेला आहे त्यास पवित्र आत्म्याविषयीचे वचन पित्यापासून प्राप्त झाले आहे, आणि तुम्ही जे पाहता व ऐकता त्याचा त्याने वर्षाव केला आहे.
”म्हणून, इस्राएलाच्या सर्व घराण्याने हे निश्चयपूर्वक समजून घ्यावे की, ज्या येशूला तुम्ही वधस्तंभावर खिळून मारले त्यास देवाने प्रभू व ख्रिस्त असे करून ठेवले आहे.
”आणि तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला, आणि तो चालत व उड्या मारत व देवाची स्तुती करत त्याच्याबरोबर परमेश्वराच्या भवनात गेला.
”त्याने इस्राएलाला पश्चात्ताप व पापांची क्षमा ही देणगी देण्याकरता देवाने त्यास आपल्या उजव्या हाताशी अधिपती व तारणारा असे उच्चपद दिले.
”कारण प्रभूने त्यास म्हटले, ‘तू आपल्या पायातले जोडे काढ, कारण ज्या जागेवर तू उभा आहेस ती पवित्र भूमी आहे.
”परंतु पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याने आकाशाकडे निरखून पाहिले, तेव्हा देवाचे तेज व देवाच्या उजवीकडे येशू उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला. आणि त्याने म्हटले, “पाहा, आकाश उघडलेले व मनुष्याचा पुत्र देवाच्या उजवीकडे उभा असलेला मला दिसत आहे.”
”देव इस्राएली लोकांशी बोलला, देवाने त्यांना सुवार्ता पाठविली की, येशू ख्रिस्ताद्वारे शांती जगात आली आहे, येशू सर्वांचा प्रभू आहे.
”मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सीला हे प्रार्थना करीत असता व गाणे गाऊन देवाची स्तुती करीत असता बंदिवान त्यांचे ऐकत होते. तेव्हा एकाएकी असा मोठा भूमिकंप झाला की बंदिशाळेचे पाये डगमगले, सर्व दरवाजे लागलेच उघडले व सर्वांची बंधने तुटली.
”ज्या देवाने जग व त्यातले अवघे निर्माण केले तो स्वर्गाचा व पृथ्वीचा प्रभू असून हातांनी बांधलेल्या इमारतीत राहत नाही.
”व पवित्रतेच्या आत्म्याच्या दृष्टी प्रमाणे मरण पावलेल्यातून पुन्हा उठण्याने तो सामर्थ्याने देवाचा पुत्र ठरवला गेला; तो येशू ख्रिस्त आपला प्रभू आहे.
”कारण जगाच्या उत्पत्तीपासून करण्यात आलेल्या गोष्टींवरून त्याचे सर्वकाळचे सामर्थ्य व देवपण या त्याच्या अदृश्य गोष्टी समजत असल्याने स्पष्ट दिसतात, म्हणून त्यांना काही सबब नाही.
”पूर्वज त्यांचे आहेत; त्यांच्यापासून दैहिक दृष्ट्या ख्रिस्त आला; तो सर्वांवर असलेला देव युगानुयुग धन्यवादित असो; आमेन.
”अहाहा! देवाच्या सुज्ञतेच्या व ज्ञानाच्या धनाची खोली किती? त्याचे न्याय किती अतर्क्य आहेत? आणि त्याचे मार्ग किती अलक्ष्य आहेत? असे नियमशास्त्रात लिहिले आहे; ‘कारण प्रभूचे मन कोणी ओळखले आहे? किंवा त्याचा सल्लागार कोण होता?
”कारण सर्व गोष्टी त्याच्याकडून, त्याच्याद्वारे व त्याच्यासाठी आहेत; त्यास युगानुयुग गौरव असो. आमेन.
”म्हणून बंधूंनो देवाची दया स्मरून मी तुम्हास विनंती करतो की, तुम्ही आपली शरीरे ‘पवित्र व देवाला संतोष देणारे जिवंत ग्रहणीय’ यज्ञ म्हणून सादर करावीत; ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे.
”कारण असे लिहिले आहे की, ‘प्रभू म्हणतो, मी जिवंत आहे म्हणून, प्रत्येक गुडघा मला नमन करील, आणि प्रत्येक जीभ देवाचे स्तवन करील.’
”म्हणजे, जो, आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव आणि पिता आहे त्याचे तुम्ही एकमनाने व एकमुखाने गौरव करावे. म्हणून देवाच्या गौरवाकरता जसा ख्रिस्तानेही आपला स्वीकार केला तसाच तुम्ही एकमेकांचा स्वीकार करा. कारण मी म्हणतो की, ख्रिस्त देवाच्या सत्याकरता सुंता झालेल्यांचा सेवक झाला; म्हणजे पूर्वजांना दिलेल्या त्याच्या वचनांचे त्याने त्यांना प्रमाण द्यावे, आणि देवाच्या दयेकरता परराष्ट्रीय त्याचे गौरव करावे कारण असे नियमशास्त्रात लिहिले आहे की, ‘म्हणून मी राष्ट्रांत तुझी स्तुती करीन, आणि तुझ्या नावाची स्तोत्रे गाईन.’ आणि पुन्हा तो म्हणतो की, ‘अहो परराष्ट्रांनो, त्याच्या प्रजेबरोबर आनंद करा.’ आणि पुन्हा ‘सर्व परराष्ट्रांनो, परमेश्वराचे स्तवन करा, सर्व लोक त्याची स्तुती करोत.’
”पण आता प्रकट करण्यात आले आहे व संदेष्ट्यांच्या शास्त्रलेखावरून सनातन देवाच्या आज्ञेप्रमाणे विश्वासाच्या आज्ञापालनासाठी सर्व राष्ट्रांना कळवले आहे त्या रहस्याच्या प्रकटीकरणानुसार जो तुम्हास स्थिर करण्यास समर्थ आहे, त्या अनन्य ज्ञानी देवाला येशू ख्रिस्ताद्वारे युगानुयुग गौरव असो. आमेन.
”कारण तुम्हास मोल देऊन विकत घेतले आहे; म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा.
”परंतु आमच्यासाठी फक्त एकच देव जो पिता तो आहे. ज्याच्यासाठी आपण जगतो आणि ज्याच्यापासून सर्वकाही निर्माण झाले आणि फक्त एकच प्रभू येशू ख्रिस्त आहे. ज्याच्या द्वारे सर्व गोष्टी अस्तित्वात येतात व ज्याच्या द्वारे आपण जगतो.
”म्हणून खाताना, पिताना किंवा काहीही करताना सर्वकाही देवाच्या गौरवासाठी करा.
”त्याच्या अंतःकरणातील गुपिते माहीत होतात आणि मग तो पालथा पडतो आणि देवाची उपासना करतो व म्हणतो “खरोखर देव तुमच्यामध्ये आहे” तुमच्या भेटींनी मंडळीला मदत व्हावी.
”कारण ज्या देवाने प्रकाशाला अंधारामधून प्रकाशण्यास सांगितले तो आमच्या अंतःकरणात, येशू ख्रिस्ताच्या मुखावरील, देवाच्या गौरवाच्या ज्ञानाचा प्रकाश पाडण्यासाठी प्रकाशला आहे.
”आपल्या देवपित्याच्या इच्छेप्रमाणे, या आताच्या दुष्ट युगातून आपल्याला सोडवण्यास, प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या पापांबद्दल, स्वतःला दिले. देवपित्याला युगानुयुग गौरव असो. आमेन.
”आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या पित्याला धन्यवाद असो; स्वर्गीय गोष्टीविषयी प्रत्येक आत्मिक आशीर्वाद देऊन ज्या देवाने आम्हास ख्रिस्ताकडून आशीर्वादित केले आहे.
”त्याने हे सर्व देवाच्या गौरवी कृपेची स्तुती व्हावी म्हणून केले. ही कृपा त्याने त्याच्या प्रिय पुत्राद्वारे आम्हास भरपूर केली.
”ह्यासाठी की ख्रिस्ताच्या गौरवाची स्तुती यहूदी आमच्याकडून व्हावी, ज्याच्यावर आम्ही आधीच आशा ठेवली. ख्रिस्ताद्वारे तुम्हीसुद्धा खऱ्या वचनाची आणि तुमच्या तारणाची सुवार्ता ऐकली आहे आणि त्यावर विश्वास ठेवला, तेव्हा पवित्र आत्म्याच्या अभिवचनाचा तुम्हावर शिक्का मारण्यात आलेला आहे. त्याच्या प्रियजनांची खंडणी भरून मिळवलेल्या मुक्तीसाठी हा पवित्र आत्मा आपल्या वतनाचा पुरावा आहे जेणेकरून देवाच्या गौरवाची स्तुती व्हावी.
”मी अशी प्रार्थना करतो की, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव, गौरवी पिता, ह्याने तुम्हास आपल्या ओळखीच्या ज्ञानाचा व प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा; म्हणजे तुमच्या मनाचे डोळे प्रकाशित होऊन तुम्हास हे समजावे की, त्याच्या बोलवण्याच्या आशेची निश्चितता काय आहे, त्याच्या वतनाच्या गौरवाची संपत्ती पवित्र लोकात किती आहे, आणि आपण जे विश्वास ठेवणारे त्या आपल्यासाठी त्याच्या सामर्थ्याचे अपार महत्त्व ते काय ते तुम्ही त्याच्या शक्तीशाली पराक्रमाच्या कामावरून ओळखून घ्यावे. त्याने ती कृती ख्रिस्ताच्याद्वारे करून त्यास मरणातून उठविले आणि स्वर्गात देवाच्या उजव्या बाजूला बसविले. त्याने त्यास सर्व अधिपती, अधिकारी, सामर्थ्य, प्रभूत्व आणि प्रत्येक सामर्थ्याचे नाव जे याकाळी नव्हे तर येणाऱ्या काळीही दिले जाईल त्या सर्वांपेक्षा फार उंच केले. देवाने सर्वकाही ख्रिस्ताच्या पायाखाली केले आणि त्यास सर्वांवर मंडळीचे मस्तक म्हणून दिले. हेच ख्रिस्ताचे शरीर. जो सर्वांनी सर्वकाही भरतो त्याने ते भरलेले आहे.
”या कारणासाठी मी पित्यासमोर गुडघे टेकतो, ज्याच्यामुळे प्रत्येक वंशाला स्वर्गात आणि पृथ्वीवर निर्माण करून नाव देण्यात आले आहे. त्याच्या गौरवाच्या विपुलतेनुसार त्याने तुम्हास असे द्यावे, देवाच्या आत्म्याद्वारे सामर्थ्य मिळून तुम्ही आपल्या अंतर्यामी बलवान व्हावे. विश्वासाद्वारे ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणात रहावे ह्यासाठी की, तुम्ही प्रीतीत मुळावलेले व खोलवर पाया घातलेले असावे यासाठी की, जे पवित्रजन आहेत त्यांच्यासह ख्रिस्ताच्या प्रीतीची रुंदी, लांबी, उंची आणि खोली किती आहे हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणजे तुम्हास समजावे ख्रिस्ताची महान प्रीती जी सर्वांना मागे टाकते, यासाठी की तुम्ही देवाच्या पूर्णत्वाने परिपूर्ण भरावे. आणि आता देव जो आपल्या सामर्थ्यानुसार आपल्यामध्ये कार्य करतो इतकेच नव्हे तर आम्ही मागणी किंवा आमच्या कल्पनेपेक्षा अधिक काम करण्यास तो समर्थ आहे, त्यास मंडळी आणि ख्रिस्त येशूमध्ये सर्व पिढ्यानपिढ्या सदासर्वकाळ गौरव असो. आमेन.
”एकच देव जो सर्वांचा पिता, तो सर्वांवर आणि सर्वांमधून आणि सर्वांमध्ये आहे.
”जो खाली उतरला तोच वर सर्व स्वर्गांहून उंच ठिकाणी चढला. यासाठी की सर्व गोष्टी त्याने भरून काढाव्या.
”सर्व प्रकारची स्तोत्रे, गीते आणि आत्मिक गीतांनी त्याची स्तुती करा. एकमेकाबरोबर सुसंवाद साधा, गीत गा आणि आपल्या अंतःकरणाने परमेश्वराची स्तुती करा. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात देव जो आपला पिता आहे त्याचे सर्व गोष्टीबद्दल नेहमी उपकार माना.
”आणि देवाचे गौरव व स्तुती व्हावी म्हणून येशू ख्रिस्ताच्या द्वारे जे नीतिमत्त्वाचे फळ त्याने भरून जावे.
”ह्यामुळे देवाने त्यास सर्वांहून उंच केले आहे आणि सर्व नावांहून श्रेष्ठ नाव ते त्यास दिले आहे. ह्यात हेतू हा की, स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा, आणि हे देवपिताच्या गौरवासाठी प्रत्येक जीभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे.
”कारण आपण जे देवाच्या आत्म्याने देवाची उपासना करतो, जे ख्रिस्त येशूविषयी अभिमान बाळगणारे आणि देहावर विश्वास न ठेवणारे ते आपण सुंता झालेलेच आहोत.
”आपला देवपिता ह्याला युगानुयुग गौरव असो. आमेन.
”ख्रिस्त अदृश्य देवाचा प्रतिरूप आहे आणि सर्व उत्पत्तीत ज्येष्ठ आहे. कारण स्वर्गात व पृथ्वीवर, दृश्य आणि अदृश्य, राजासने किंवा शासने, सत्ता किंवा शक्ती, अशा सर्व गोष्टी त्याच्याद्वारे केल्या गेल्या; सर्व गोष्टी त्याच्याद्वारे व त्याच्यामध्ये केल्या गेल्या. तो सर्वांच्या आधीचा आहे आणि त्याच्यामध्ये सर्वकाही अस्तित्वात आहे. तो शरीराचे मस्तक म्हणजे मंडळीचे मस्तक आहे. तो आरंभ आहे आणि मृतांतून प्रथम जन्मलेला आहे, म्हणजे त्यास सर्व गोष्टींत प्राधान्य असावे. हे यासाठी की, त्याच्यात देवाची सर्व पूर्णता वसावी या निर्णयात त्यास संतोष होता. आणि आपण त्याच्या वधस्तंभाच्या रक्ताद्वारे शांती करून, पृथ्वीवर किंवा स्वर्गात असलेल्या सर्व गोष्टींचा, त्याच्याद्वारे आपल्या स्वतःशी समेट करावा हे देवाला बरे वाटले.
”त्या रहस्याच्या गौरवाची संपत्ती परराष्ट्रीयांमध्ये काय आहे, हे आपल्या पवित्रजनांना कळविणे देवाला बरे वाटले; गौरवाची आशा असा जो ख्रिस्त तुम्हांमध्ये आहे तो ते रहस्य आहे.
”कारण ख्रिस्ताच्या ठायीच देवपणाची सर्व पूर्णता शरीरधारी होऊन त्याच्यात राहते. तो सर्व सत्ता व शक्ती ह्यांवर मस्तक असून त्याच्याठायी तुम्ही पूर्ण झाला आहा,
”म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेला आहात तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे तेथल्या वरील गोष्टी मिळविण्याचा प्रयत्न करा. वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका; कारण तुम्ही मृत झला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. आपले जीवन जो ख्रिस्त तो प्रकट केला जाईल तेव्हा तुम्हीही त्याच्याबरोबर गौरवात प्रकट केले जाल.
”ख्रिस्ताचे वचन तुम्हांमध्ये भरपूर राहो. तुम्ही सर्व ज्ञानीपणाने एकमेकांस शिकवा व बोध करा; आपल्या अंतःकरणात देवाला स्तोत्रे, गीते व आत्मिक गीते कृपेच्या प्रेरणेने गा. आणि बोलणे किंवा करणे जे काही तुम्ही कराल, ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा; आणि त्याच्याद्वारे देव जो पिता त्याचे उपकारस्तुती करा.
”त्यामध्ये त्याने तुम्हास आमच्या सुवार्तेच्या द्वारे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे गौरव प्राप्त करून घेण्यासाठी पाचारण केले आहे.
”आता सर्वकाळचा राजा जो अविनाशी व अदृश्य आहे अशा एकाच देवाला सन्मान आणि गौरव सदासर्वकाळासाठी असो. आमेन.
”जो धन्यवादीत, एकच सार्वभौम, राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू, ज्या एकालाच अमरत्व आहे, जो अगम्य प्रकाशात राहतो ज्याला कोणा मनुष्याने पाहिले नाही आणि कोणाच्याने पाहवत नाही, तो ते त्याचे प्रकट होणे यथाकाली दाखवील, त्यास सन्मान व सार्वकालिक सामर्थ्य आहे. आमेन.
”प्रभू मला प्रत्येक वाईट कामापासून सोडवील व आपल्या स्वर्गीय राज्यात घेण्यासाठी तारील. त्यास सदासर्वकाळपर्यंत गौरव असो. आमेन.
”आणि आपल्या धन्य आशेची, म्हणजे आपला महान देव व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या गौरवी आगमनाची प्रतीक्षा करावी;
”परंतु या शेवटच्या दिवसात तो आपल्याशी त्याच्या पुत्राद्वारे बोलला आहे, त्याने पुत्राला सर्व गोष्टींचा वारस म्हणून नेमले. देवाने पुत्राकरवीच विश्व निर्माण केले. पुत्र हा देवाच्या गौरवाचे तेज आहे. तो देवाच्या स्वभावाचे तंतोतंत प्रतिरूप असा आहे. पुत्र आपल्या सामर्थ्यशाली शब्दाने सर्व गोष्टी राखतो. पुत्राने लोकांस त्यांच्या पापांपासून शुद्ध केले, नंतर तो स्वर्गातील सर्वश्रेष्ठ देवाच्या उजव्या बाजूला बसला.
”आणि पुन्हा, देव जेव्हा त्याच्या पुत्राला जगामध्ये आणतो, तो म्हणतो, “देवाचे सर्व देवदूत त्यास नमन करोत.” देवदूताविषयी देव असे म्हणतो, “तो त्याच्या देवदूतांना वायु बनवतो, आणि त्याच्या सेवकांना तो अग्नीच्या ज्वाला बनवतो.” पुत्राविषयी तर तो असे म्हणतोः हे देवा, तुझे राजासन सदासर्वकाळासाठी आहे, आणि तुझे राज्य युगानुयुगीचे आहे आणि “तुझा राजदंड न्यायीपणाचा राजदंड आहे.
”परंतु आपण येशूला पाहतो, ज्याला काही काळासाठी देवदूतांपेक्षा किंचीत कमी केले होते. आता आम्ही त्याला, त्याने सहन केलेल्या मरणामुळे, गौरव व सन्मान यांचा मुकुट घातल्याचे पाहत आहोत कारण देवाच्या कृपेमुळे येशूने सर्व मानवजातीसाठी मरण सोसले.
”तो म्हणतो, मी तुझ्या नावाची थोरवी माझ्या बंधूंना सांगेन मी मंडळीसमोर तुझी स्तुती गाईन.
”म्हणून, ज्याअर्थी आम्हास येशू देवाचा पुत्र हा महान महायाजक लाभला आहे व जो स्वर्गात गेला आहे, असा जो विश्वास आपण गाजवितो तो अखंडपणे भक्कम धरून राहू या. कारण आपल्याला लाभलेला महायाजक असा नाही, जो आपल्या अशक्तपणाबद्दल सहानुभूती दर्शवण्यास असमर्थ आहे. पण आपल्याला असा याजक लाभला आहे की, जो आमच्यासारखाच सर्व प्रकारच्या मोहाच्या अनुभवातून गेला. तरीही तो पूर्णपणे पापविरहीत राहिला. तर मग आपण देवाच्या कृपेच्या राजासनाजवळ निर्धाराने जाऊ या. यासाठी की, आमच्या गरजेच्या वेळी साहाय्य मिळावे म्हणून आम्हास दया व कृपा प्राप्त व्हावी.
”म्हणून अगदी असाच महायाजक आपल्याला असणे योग्य होते. तो पवित्र, निष्कपट आणि निष्कलंक आहे; दोषविरहित आणि शुद्ध आहे, तो पाप्यांपासून वेगळा केलेला आहे. त्यास आकाशाहूनही उंच केलेले आहे.
”आम्ही जे सांगत आहोत त्याचा मुद्दा असा आहे की, जो स्वर्गामध्ये देवाच्या राजासनाच्या उजव्या बाजूस बसलेला असा महायाजक आम्हास लाभलेला आहे,
”बकरे किंवा वासरु यांचे रक्त घेऊन नव्हे, तर आपले स्वतःचेच रक्त घेऊन; व त्याने सार्वकालिक खंडणी मिळवून एकदाच परमपवित्रस्थानात गेला;
”परंतु आपल्या पापांबद्दल सर्वकाळासाठी एकदाच ख्रिस्ताने अर्पण केले व तो आता देवाच्या उजवीकडे बसला आहे.
”म्हणून बंधूनो, येशूच्या रक्ताद्वारे आपल्याला परमपवित्रस्थानात जाण्याचे धैर्य आहे.
”जो आमचे विश्वासात नेतृत्व करतो आणि पूर्णत्वास नेतो त्या येशूवर आपले लक्ष केद्रित करू या. जो आनंद त्याच्यासमोर होता त्यासाठी येशूने वधस्तंभ सहन केला होता. वधस्तंभावरील निंदास्पद मरणाला त्याने तुच्छ मानले आणि आता त्याने देवाच्या राजासनाजवळील उजवीकडे जागा घेतली आहे.
”म्हणून, आम्हास अढळ असे राज्य कृपेने देण्यात येत असताना आपण त्याविषयी कृतज्ञता बाळगू या आणि आदराने व भयभीत होऊन देवाला मान्य होईल अशी त्याची सेवा करू; कारण आपला “देव भस्म करणारा अग्नी आहे.”
”येशू ख्रिस्त काल, आज आणि युगानुयुग सारखाच आहे.
”म्हणून त्याचे नाव पत्करणाऱ्या “ओठांचे फळ असा स्तुतीचा यज्ञ आपण येशूद्वारे देवाला नित्य अर्पण करावा.”
”ज्या शांतीच्या देवाने आपल्या मेंढरांचा मेंढपाळ, आपला प्रभू येशू ख्रिस्त याला रक्ताच्या सर्वकालच्या नव्या कराराद्वारे उठवले. त्याची इच्छा पूर्ण करायला तुम्हास चांगल्या गोष्टींनी सिद्ध करो आणि येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्यास संतोष देणारे काम आपल्यामध्ये करो. त्यास सदासर्वकाळ गौरव असो. आमेन.
”तुमच्यातील कोणी संकटात आहे काय? त्याने प्रार्थना करावी. कोणी आनंदी आहे काय? त्याने स्तुतिगान करावे.
”तो स्वर्गात गेला असून देवाच्या उजवीकडे आहे आणि देवदूत, अधिकारी व सत्ताधीश त्याच्या अधीन आहेत.
”जो भाषण करतो त्याने आपण देवाची वचने बोलत आहोत असे बोलावे व जो सेवा करतो त्याने आपण आपली सेवा देवाने दिलेल्या शक्तीने करीत आहोत अशी करावी. म्हणजे, येशू ख्रिस्ताद्वारे, सर्व गोष्टींत देवाचे गौरव करावे, त्यास गौरव व पराक्रम ही युगानुयुग असोत. आमेन.
”ख्रिस्ती म्हणून जर कोणाला दुःख सहन करावे लागत असेल तर त्यास लाज वाटू नये; त्या नावामुळे देवाचे गौरव करावे.
”पण तुम्हास ज्याने ख्रिस्ताद्वारे, आपल्या सनातन गौरवात बोलावले आहे तो सर्व कृपेचा देव, तुम्ही अल्पकाळ सोसल्यानंतर, स्वतः तुम्हास परिपूर्ण करील, स्थिर करील आणि दृढ करील. त्याचा पराक्रम युगानुयुग आहे. आमेन.
”कारण चातुर्याने कल्पिलेल्या कथास अनुसरून आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे सामर्थ्य व येण्याविषयी जे तुम्हास कळवले असे नाही तर आम्ही त्याचे ऐश्वर्य, प्रत्यक्ष पाहणारे होतो. कारण त्यास देवपित्याकडून सन्मान व गौरव मिळाले; तेव्हा ऐश्वर्ययुक्त गौरवाच्याद्वारे अशी वाणी झाली की, “हा माझा प्रिय पुत्र, मला परमप्रिय आहे, ह्याच्याविषयी मी संतुष्ट आहे.”
”आणि आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या कृपेत व ज्ञानात वाढत जा. त्यास आता आणि सर्वकाळपर्यंत गौरव असो. आमेन.
”असा जो एकच देव आपला तारणारा त्यास येशू ख्रिस्त आपला प्रभू ह्याच्याद्वारे गौरव, महिमा, पराक्रम आणि अधिकारही युगांच्या आधीपासून, आता आणि युगानुयुग आहेत. आमेन.
”आणि येशू ख्रिस्त ‘विश्वासू साक्षी’ जो ‘मरण पावलेल्यांमधून प्रथम जन्मलेला’ आणि ‘पृथ्वीवरील राजांचा तो अधिपती’ आहे आणि ज्या येशूने आमच्यावर प्रीती केली आणि ज्याने आपल्या रक्ताने आमच्या ‘पापांतून आम्हास मुक्त केले;’ ज्याने आम्हास त्याच्या देवपित्यासाठी एक ‘राज्य’ आणि याजक बनविले त्यास गौरव व सामर्थ्य युगानुयुग असोत, आमेन. ‘पहा, येशू ढगांसह येत आहे’ प्रत्येक डोळा त्यास ‘पाहील’ ज्यांनी त्यास ‘भोकसले तेसुध्दा त्यास पाहतील पृथ्वीवरील सर्व वंश त्याच्यामुळे आकांत करतील होय’ असेच होईल, आमेन.
”‘प्रभू देव जो आहे’, जो होता आणि जो येणार आहे, ‘जो सर्वसमर्थ’ तो म्हणतो ‘मी अल्फा आणि ओमेगा आहे.’
”माझ्याबरोबर बोलत असलेली वाणी पाहण्यासाठी मी मागे वळलो, मागे वळून पाहतो, तो सोन्याच्या सात दीपसमया पाहिल्या. त्या समयांच्या मध्यभागी ‘मनुष्याच्या पुत्रासारखा’ व लांब पायघोळ झगा घातलेला, छातीवर ‘सोन्याचा’ ‘पट्टा बांधलेला’, असा कोणीएक माझ्या दृष्टीस पडला. ‘त्याचे डोके’ आणि ‘केस बर्फासारख्या पांढऱ्या लोकरीप्रमाणे’ शुभ्र होते त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते; ‘त्याचे पाय’ जणू काय भट्टीतून काढलेल्या जळजळीत ‘सोनपितळेसारखे होते आणि त्याची वाणी अनेक जलप्रवाहांच्या ध्वनीसारखी होती.’ त्याच्या उजव्या हातात सात तारे होते; त्याच्या तोंडातून दोन्ही बाजूंनी तीक्ष्ण धार असणारी तरवार निघाली होती. त्याचा चेहरा दिवसाच्या अतिशय प्रखर ‘तेजाने’ प्रकाशणाऱ्या ‘सूर्यासारखा’ दिसत होता. मी त्यास पाहिले तेव्हा मी मरण पावल्यासारखा त्याच्या पायाजवळ पडलो त्याने त्याचा उजवा हात माझ्यावर ठेवला आणि म्हणाला, “घाबरू नको! मी पहिला आणि शेवटला आणि जो जिवंत तो मी आहे; मी मरण पावलो होतो, पण तरी पाहा, मी युगानुयुग जिवंत आहे! आणि माझ्याजवळ मरणाच्या व मृतलोकाच्या किल्ल्या आहेत.
”त्याच क्षणी आत्म्याने माझा ताबा घेतला. तेथे स्वर्गात ‘माझ्यासमोर राजासन होते कोणीएक त्यावर बसला होता.’ त्यावर जो बसला होता तो यास्फे व सार्दी या रत्नांसारखा होता आणि ‘राजासनाभोवती’ पाचूसारखे दिसणारे ‘मेघधनुष्य होते.’ राजासनाभोवती चोवीस आसने होती आणि त्या आसनांवर शुभ्र कपडे घातलेले व डोक्यावर सोन्याचा मुकुट असलेले चोवीस वडील बसले होते.
”राजासनापासून विजा, वाणी व मेघगर्जना निघत होत्या. राजासनासमोर सात दिवे जळत होते. ते देवाचे सात आत्मे होते. तसेच राजासनासमोर काचेच्या समुद्रासारखे काहीतरी दिसत होते. ते ‘स्फटिकासारखे’ स्पष्ट होते. मध्यभागी व राजासनाभोवती चार जिवंत प्राणी होते आणि ते मागून पुढून डोळ्यांनी पूर्ण भरलेले होते.
”त्या ‘प्रत्येक जिवंत प्राण्याला सहा पंख होते’ व त्यांना सगळीकडे डोळे होते, त्यांच्या पंखावर आणि आतून डोळे होते, दिवस व रात्र न थांबता ते म्हणत होते. ‘पवित्र, पवित्र, पवित्र,’ हा प्रभू देव सर्वसमर्थ जो होता, जो आहे आणि जो येणार आहे. जो राजासनावर बसलेला आहे तो अनंतकाळपर्यंत जिवंत राहणार आहे त्याचे जेव्हा जेव्हा ते चार जिवंत प्राणी गौरव, सन्मान व उपकारस्तुती करीत होते, तेव्हा तेव्हा ते चोवीस वडील जो राजासनावर बसला आहे त्याच्यापुढे पालथे पडतात आणि जो युगानुयुग जिवंत आहे त्यास नमन करतात आणि आपले मुकुट राजासनासमोर ठेवून म्हणतात “हे प्रभू, आमच्या देवा, तू गौरव, सन्मान आणि सामर्थ्य प्राप्त करून घेण्यास योग्य आहेस, तू सर्व गोष्टी उत्पन्न केल्यास, कारण तू सर्वकाही अस्तित्वात आणले आणि तुझ्या इच्छेमुळे ते झाले आणि उत्पन्न केले.”
”परंतु वडीलांपैकी एकजण मला म्हणाला, “रडू नकोस! पहा, ‘यहूदा’ वंशाचा सिंह, दाविदाचा अंकुर हा विजयी झाला आहे. तो गुंडाळी उघडण्यास व तिचे सात शिक्के उघडण्यास समर्थ आहे.” राजासनाच्या आणि चार जिवंत प्राण्यांच्या व त्या वडीलांच्या मध्यभागी ‘कोकरा’ उभा असलेला मी पाहिला, तो वधलेल्यासारखा होता, त्यास सात शिंगे आणि सात डोळे होते आणि हे ते सर्व पृथ्वीवर पाठविण्यात आलेले देवाचे सात आत्मे होते. तो गेला आणि त्याने जो, ‘राजासनावर बसला होता’, त्याच्या उजव्या हातातून ती गुंडाळी घेतली. आणि जेव्हा त्याने ती गुंडाळी घेतली तेव्हा चार जिवंत प्राणी व चोवीस वडीलजन कोकऱ्यासमोर उपडे पडले, प्रत्येकाजवळ वीणा व प्रत्येकाच्या हातात सुवासिक ‘धूपाने’ भरलेल्या सोन्याच्या वाट्या होत्या, त्या वाट्या म्हणजे पवित्रजनांच्या ‘प्रार्थना’ होत्या. आणि त्यांनी ‘नवे गाणे गाईलेः’ “तू गुंडाळी घेण्यास आणि तिचे शिक्के उघडण्यास योग्य आहेस, कारण तुला वधण्यात आले आणि तू आपल्या रक्ताने खंडणी भरून प्रत्येक वंशातून, वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक आणि राष्ट्रांतून ‘देवासाठी’ माणसे विकत घेतली आहेत. तू त्यांना आमच्या देवासाठी एक ‘राज्य’ आणि ‘याजक’ बनविले आणि नंतर ते पृथ्वीवर राज्य करतील.”
”मग मी पाहिले राजासन आणि, चार जिवंत प्राणी व वडीलजन यांच्यासभोवती अगणित देवदूतांची वाणी ऐकली, त्यांची संख्या ‘अयुतांची अयुते व हजारो हजार होती.’ देवदूत मोठ्या आवाजात म्हणाले, जो वधलेला कोकरा, सामर्थ्य, धन, ज्ञान, बल, सन्मान, गौरव व उपकारस्तुती ही घेण्यास योग्य आहे. प्रत्येक निर्माण केलेली वस्तु आकाशात व पृथ्वीवर, पृथ्वीखाली व समुद्रातील अवघ्याना मी असे गाताना ऐकले की, “जो राजासनावर बसतो त्यास व कोकऱ्याला स्तुती, सन्मान, गौरव आणि सामर्थ्य युगानुयुगापर्यंत असो!” चार जिवंत प्राणी म्हणाले, “आमेन!” मग वडीलजनांनी खाली पडून त्यास अभिवादन केले.
”या यानंतर मी पाहिले, तो प्रत्येक राष्ट्र, वंश, लोक व भाषा यांच्यातील कोणाच्याने मोजला जाऊ शकणार नाही एवढा मोठा समुदाय, तो राजासनापुढे व कोकऱ्याच्यापुढे उभा होता. शुभ्र झगे घातलेले आणि त्यांच्या हातात झावळ्या होत्या. ते मोठ्याने ओरडून म्हणत होतेः ‘राजासनावर बसलेल्या’ आमच्या देवाकडून व कोकऱ्याकडून, तारण आहे. तेव्हा राजासन व वडील आणि चार जिवंत प्राणी यांच्यासभोवती सर्व देवदूत उभे होते आणि ते राजासनासमोर पालथे पडून देवाला नमन करीत म्हणाले, आमेन; स्तुती, गौरव, ज्ञान, उपकारस्तुती, सन्मान, सामर्थ्य व बळ ही युगानुयुग आमच्या देवाची आहेत; आमेन.
”म्हणून ते देवाच्या राजासनासमोर आहेत आणि ते रात्रंदिवस त्याच्या भवनात सेवा करतात. जो ‘राजासनावर बसलेला’ आहे तो आपला मंडप त्यांच्यावर घालील.
”मग सातव्या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा स्वर्गात मोठ्याने आवाज झाला, त्यांचे शब्द असे होतेः ‘जगाचे राज्य हे आमच्या प्रभूचे आणि त्याच्या ख्रिस्ताचे झाले आहे; तो युगानुयुग राज्य करील.’ तेव्हा देवासमोर आपल्या आसनांवर बसलेले चोवीस वडील उपडे पडून देवाला नमन करून म्हणाले ‘हे प्रभू देवा, हे सर्वसमर्था, जो तू आहेस आणि होतास, त्या तुझे आम्ही उपकार मानतो, कारण तुझे महान सामर्थ्य तू आपल्याकडे घेतले आहेस आणि राज्य चालविण्यास सुरूवात केलीस.
”आणि मी स्वर्गात एक मोठा आवाज ऐकला; त्याचे शब्द असे होते, आता आमच्या देवाचे तारण आणि सामर्थ्य आणि राज्य आले आहे. आणि त्याच्या ख्रिस्ताचा अधिकार हे प्रकट झाले आहेत; कारण आमच्या भावांना दोष देणारा आमच्या देवापुढे स्वर्गात जो त्यांच्यावर रात्रंदिवस आरोप करीत असे, तो खाली टाकण्यात आला आहे.
”आणि ‘अनेक जलप्रवाहांच्या ध्वनीसारखी’ व मेघ गडगडाटाच्या ध्वनीसारखी स्वर्गातून निघालेली वाणी मी ऐकली आणि जसे वीणावादक आपल्या वीणा वाजवत आहेत अशी ती होती. ते राजासनासमोर आणि त्या चार प्राणी व वडिलांसमोर जणू ‘एक नवे गीत गात होते;’ पृथ्वीवरून विकत घेतलेले जे एक लक्ष चौवेचाळीस हजार जण तेथे होते त्यांच्याशिवाय कोणीही मनुष्य ते गीत शिकू शकला नाही. स्त्रीसंगाने विटाळले न गेलेले ते हेच आहेत, ते शुद्ध आहेत. जेथे कोठे कोकरा जातो तेथे त्याचे अनुसरण करणारे ते आहेत. मानवजातीतून खंडणी भरून मुक्त केलेले, हे देवाला व कोकर्याला प्रथमफळ असे आहेत. त्यांच्या ‘मुखात काही असत्य आढळले नाही;’ ते निष्कलंक आहेत.
”तो मोठ्या आवाजात म्हणत होता, देवाचे भय धरा आणि त्यास गौरव करा; कारण न्यायाची वेळ आली आहे आणि ‘ज्याने आकाश, पृथ्वी आणि समुद्र आणि पाण्याचे झरे हे उत्पन्न केले त्यास नमन करा.’
”तेव्हा मी बघितले आणि पाहा, एक पांढरा ढग आणि ‘मनुष्याच्या पुत्रासारखा’ कोणी त्या ढगावर बसला होता. त्याच्या मस्तकावर सोन्याचा मुकुट आणि त्याच्या हातात एक धारदार विळा होता.
”‘देवाचा दास मोशे ह्याचे गीत व कोकर्याचे गीत गात होते.’ सर्वसमर्थ देवा, परमेश्वरा, तुझ्या कृती महान आणि आश्चर्यकारक आहेत. हे ‘प्रभू’ देवा, तू सर्वांवर राज्य करतो तुझे मार्ग योग्य आणि खरे आहेत. ‘हे प्रभू, तुला कोण भिणार नाही? आणि तुझ्या नावाचे गौरव कोण करणार नाही?’ कारण तू एकच ‘पवित्र’ आहेस; कारण ‘सगळी राष्ट्रे येऊन तुझ्यापुढे नमन करतील. कारण तुझ्या नीतिमत्त्वाची कृत्ये प्रकट झाली आहेत.’
”आणि देवाच्या सामर्थ्यापासून व तेजापासून जो धूर निघाला, त्याने परमपवित्रस्थान भरून गेले आणि त्या सात देवदूतांच्या ‘सात पीडा’ पूर्ण होईपर्यंत कोणीही आत जाऊ शकला नाही.
”ते कोकर्याशी युद्ध करतील आणि कोकरा त्यांना जिंकील कारण तो ‘प्रभूंचा प्रभू आणि राजांचा राजा आहे;’ आणि जे त्याच्याबरोबर आहेत ते बोलावलेले, निवडलेले आणि विश्वासू आहेत.”
”या गोष्टींनंतर मी जणू एक, विशाल समुदायाची मोठी वाणी स्वर्गात ऐकली; ती म्हणाली ‘हालेलूया,’ तारण, गौरव आणि सामर्थ्य आमच्या देवाचीच आहेत,
”तेव्हा ते चोवीस वडील व चार जिवंत प्राणी पालथे पडले, त्यांनी ‘राजासनावर बसलेल्या’ देवाला नमन केले आणि ते म्हणालेः आमेन; ‘हालेलूया.’ आणि राजासनाकडून एक वाणी आली; ती म्हणालीः ‘तुम्ही सर्व त्याचे दास, दोन्ही लहानमोठे आणि सामर्थ्यवान त्यास भिणारे, आपल्या देवाची स्तुती करा.’ आणि, मी जणू एका, विशाल समुदायाची वाणी, ऐकली; ती वाणी महापूराच्या आणि मेघांच्या मोठ्या गडगडाटांच्या आवाजासारखी होती. ती म्हणाली, ‘हालेलूया; कारण,’ आमचा ‘प्रभू’ सर्वसत्ताधारी देव हा ‘राज्य करीत आहे. या, आपण आनंद’ करू, ‘हर्ष करू,’ आणि त्यास गौरव देऊ; कारण कोकर्याचे लग्न निघाले आहे, आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजविले आहे.
”‘त्याचे डोळे अग्नीच्या’ ज्वालेसारखे होते व त्याच्या डोक्यावर पुष्कळ मुकुट होते आणि त्याचे एक नाव लिहिलेले होते; ते त्याच्याशिवाय कोणी जाणत नाही. त्याने एक, रक्तात भिजवीलेला झगा घातला होता; आणि ‘देवाचा शब्द’ हे नाव त्यास देण्यात आले आहे; आणि स्वर्गातल्या सेना पांढर्या घोड्यांवर बसून शुभ्र, स्वच्छ, तलम तागाची वस्त्रे परिधान करून त्याच्या मागोमाग जात होत्या. आणि त्याने राष्ट्रांवर प्रहार करावा म्हणून त्याच्या तोंडामधून एक धारदार तरवार निघते, ‘तो त्यांच्यावर लोहदंडाने सत्ता चालवील;’ तो सर्वसमर्थ देवाच्या अतीकोपाचे द्राक्षकुंड तुडवील.
”त्याच्या झग्यावर व त्याच्या मांडीवर ‘राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू’ असे नाव लिहिलेले आहे.
”तेव्हा मी एक, मोठे, शुभ्र ‘राजासन’ आणि त्यावर जो ‘बसला’ होता त्यास बघितले. त्याच्या उपस्थितीतून पृथ्वी व आकाशही ‘पळून गेली; आणि त्यांना कोठेच जागा मिळाली नाही.’ मग मी मृतांना, लहान व मोठे ह्यांना राजासनासमोर उभे राहिलेले बघितले; तेव्हा ‘पुस्तके उघडली गेली;’ नंतर आणखी एक ‘पुस्तक’ उघडले गेले. ते ‘जीवनाचे’ पुस्तक होते; आणि त्या पुस्तकात लिहिलेल्या गोष्टींवरून ज्यांच्या त्यांच्या कामांप्रमाणे मृतांचा न्याय करण्यात आला.
”आणि मी नवे आकाश आणि नवी पृथ्वी ही बघितली कारण पहिले आकाश व पहिली पृथ्वी ही निघून गेली होती आणि समुद्रही राहिला नव्हता. आणि मी ती ‘पवित्र नगरी, नवे यरुशलेम,’ देवाकडून स्वर्गातून खाली येत असलेली बघितली. ती वरासाठी साज चढवून ‘सजविलेल्या वधूप्रमाणे’ दिसत होती; आणि मी राजासनातून एक मोठी वाणी ऐकली; ती म्हणालीः “पाहा, देवाचा ‘मंडप’ मनुष्यांत आहे, तो त्यांच्याबरोबर वस्ती करील; ते त्याचे लोक होतील आणि देव स्वतः ‘त्यांच्याबरोबर राहील’
”आणि मी तेथे भवन बघितले नाही; कारण सर्वसमर्थ प्रभू देव आणि कोकरा हेच तिचे भवन आहेत. आणि त्या नगरीला प्रकाश द्यायला सूर्याची किंवा चंद्राची गरज नव्हती; कारण ‘देवाचे तेज’ तिला प्रकाश देते आणि कोकरा तिचा दिवा आहे,
”नंतर देवदूताने मला जीवनाच्या पाण्याची एक नदी दाखविली. ती नदी स्फटिकासारखी स्वच्छ होती. ती नदी देवाच्या आणि कोकऱ्यांच्या राजासनापासून उगम पावत होती आणि नगराच्या रस्त्यांच्या मधोमध वाहत होती. नदीच्या ‘दोन्ही काठांवर’ बारा जातीची फळे देणारे जीवनाचे झाड होते, ‘ते प्रत्येक महिन्यास आपले फळ’ देते. झाडांची ‘पाने’ राष्ट्राच्या ‘आरोग्यासाठी’ उपयोगी पडतात, ‘त्या नगरात यापुढे कसलाही शाप असणार नाही;’ त्याच्यामध्ये देवाचे व त्याच्या कोकऱ्याचे राजासन राहिल. त्याचे दास त्याची सेवा करतील. आणि ‘ते त्याचे मुख पाहतील’ व त्यांच्या कपाळावर देवाचे नाव लिहिलेले असेल.
”‘मी’ अल्फा व ओमेगा, ‘पहिला व अखेरचा,’ आरंभ आणि शेवट आहे.
”