18 – खोटे शिक्षक
हे सर्वशक्तिमान देवाचे पवित्र शब्द आहेत.
माणसांच्या बोलण्यात आपल्याला रस नसतो.
देवावर प्रेम करणार् या प्रत्येकासाठी... याबद्दल देव असे म्हणतो: खोटे शिक्षक.
हे सर्वशक्तिमान देवाचे पवित्र शब्द आहेत.
माणसांच्या बोलण्यात आपल्याला रस नसतो.
देवावर प्रेम करणार् या प्रत्येकासाठी... याबद्दल देव असे म्हणतो: खोटे शिक्षक.
पण त्या लोकात खोटे संदेष्टे झाले होते, तसे तुमच्यात खोटे शिक्षकही होतील; ते आपली विघातक मते चोरून लपवून आत आणतील आणि त्यांना ज्याने विकत घेतले आहे त्या स्वामीला ते नाकारतील व तसे करून ते आपल्या स्वतःवर शीघ्र नाश ओढवून घेतील. पुष्कळजण त्यांच्या कामातुरपणाचे अनुकरण करतील व सत्याच्या मार्गाची त्यामुळे निंदा होईल. आणि बनावट गोष्टी रचून ते लोभाने तुमच्यावर पैसे मिळवतील. त्यांच्याकरिता ठरलेला दंड पहिल्यापासूनच विलंब करीत नाही, अणि त्यांचा नाश डुलक्या घेत नाही.
”आणि त्याने आपल्या सर्व पत्रांत या गोष्टींचा उल्लेख केला आहे. त्यामध्ये समजण्यास कठिण अशा काही गोष्टी आहेत आणि जे अशिक्षित व अस्थिर माणसे इतर शास्त्रलेखांचा जसा विपरीत अर्थ करतात तसा ह्यांचाहि करतात; अशाने आपल्या स्वतःच्या नाशाला कारणीभूत होतात.
”“पण हा संदेष्टा मी न सांगितलेले ही काही माझ्या वतीन बोलला, तर त्याला मृत्युदंड दिला पाहिजे. इतर दैवतांच्या वतीने बोलणारा संदेष्टाही कदाचित् निपजेल. त्यालाही ठार मारले पाहिजे.
”परमेश्वर देवाने निर्माण केलेल्या सर्व वन्य प्राण्यांमध्ये सर्प हा अतिशय धूर्त आणि हुषार होता. त्याला स्त्रीची फसवणूक करायची होती. त्यावेळी सर्प त्या स्त्रीशी बोलला व तो तिला म्हणाला, “स्त्रिये, बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नको असे देवाने तुला खरोखरच सांगितले आहे काय?” स्त्रीने सर्पाला उत्तर दिले, “नाही. देवाने तसे म्हटले नाही बागेतल्या झाडांची फळे आम्ही खाऊ शकतो. परंतु असे एक झाड आहे की ज्याचे फळ आम्ही खाता कामा नये देवाने आम्हाला सांगितले, ‘बागेच्या मधोमध असलेल्या झाडाचे फळ तुम्ही मुळीच खाऊ नका. त्या झाडाला स्पर्शही करु नका. नाहीतर तुम्ही मराल.” परंतु सर्प त्या स्त्रीला म्हणाला, “तुम्ही खरोखर मरणार नाही. कारण देवाला हे माहीत आहे की जर तुम्ही त्या झाडाचे फळ खाल तर बरे व वाईट काय आहे हे तुम्हांला समजेल आणि तुम्ही देवासारखे व्हाल.”
”मग परमेश्वर त्या स्त्रीला म्हणाला, “तू हे काय केलेस?”ती स्त्री म्हणाली, “सर्पाने मला भुरळ घालून फसविले व म्हणून मी ते फळ खाल्ले.” म्हणून परमेश्वर सर्पाला म्हणाला,“तू हे फार वाईट केलेस म्हणून तुझे पण वाईट होईल. तू हे केलेस म्हणून इतर कोणत्याही प्राण्यापेक्षा तू अधिक शापित आहेस. तू पोटाने सरपटत चालशील आणि आयुष्यभर तू माती खाशील तू व स्त्री, यांस मी एकमेकांचे शत्रु करीन. तुझी संतती आणि तिची संतती एकमेकाचे शत्रू होतील तिच्या संततीच्या पायाची तू टाच फोडशील पण तो तुझे डोके ठेचील
”त्यांची उपासना करू नको; किंवा त्यांची सेवा करु नकोस; कारण मी परमेश्वर तुझा देव आहे;मी ईर्ष्यावान देव आहे, जे माझ्याविरुद्ध पाप करतात, माझा द्वेष करतात ते माझे शत्रू बनतात; मी त्यांना शिक्षा करीन; मी त्यांच्या मुलांना तिसऱ्या चौथ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अपराधाबद्दल शिक्षा करतो; परंतु जे माझ्यावर प्रेम करतात व माझ्या आज्ञा पाळतात अशांच्या हजारो पिढ्यांवर मी दया करतो.
”“इतर लोकांविरुद्ध खोट्या अफवा पसरवू नका; जर तुम्हाला कोर्टात साक्ष द्यावयाची असेल तर खोटे बोलणाऱ्या दुष्ट माणसाच्या मदतीसाठी खोटी साक्ष देण्यात सहभागी होऊ नका. “सर्वजण एखादी गोष्ट करतात म्हणून तुम्हीही ती खरी मानून करु नका. जर एखादा जनसमूह चुकीची गोष्ट करीत असेल तर तुम्ही त्याच्यांत सामील होउ नका; तुम्हीही चुकीची गोष्ट करावी म्हणून त्यांनी तुमचे मन वळविण्याचा प्रयत्न केला तरी त्यांचे मुळीच ऐकू नका; तुम्ही तर जे योग्य व न्याय्य आहे तेच करावे.
”“तुम्ही चोरी करु नये, कोणाला फसवू नये व एकमेकाशीं खोटे बोलू नये.
”इतर लोकाविषयी खोट्यानाट्या गोष्टी सांगत इकडे तिकडे फिरु नका; आपल्या शेजाऱ्याचा जीव धोक्यात येईल असे काही करु नका. मी परमेश्वर आहे. “आपल्या मनात आपल्या भावाचा द्वेष बाळगूं नका; आपल्या शेजाऱ्याने चुकीचे काही कृत्य केल्यास त्याची कान उघाडणी करावी, परंतु त्याच्या अपराधामध्ये सहभागी होऊ नये.
”देव माणूस नाही. तो खोटे बोलणार नाही. देव म्हणजे काही माणूस नाही. त्याचे निर्णय बदलणार नाहीत. जर परमेश्वराने सांगितले की तो एखादी गोष्ट करील. तर तो ती करीलच. जर परमेश्वराने वचन दिले तर तो ते वचन दिलेली गोष्ट करीलच.
”“बाआल पौराच्या जे नादी लागले त्यांना परमेश्वराने नष्ट केले.
”“तेव्हा परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे आपले आचरण राहील याची खबरदारी घ्या. त्यालाच अनुसरा.
”तसेच गेली चाळीस वर्षे आपल्या परमेश्वर देवाने तुम्हाला रानावनातून कसे चालवले, त्या प्रवासाची आठवण ठेवा. परमेश्वर तुमची परीक्षा पाहात होता. तुम्हाला नम्र करावे, तुमच्या अंत:करणातील गोष्टी जाणून घ्याव्या, तुम्ही त्याच्या आज्ञा पाळता की नाही ते बघावे म्हणून त्याने हे केले. परमेश्वराने तुम्हाला लीन केले, तुमची उपासमार होऊ दिली आणि मग, तुम्ही अन् तुमचे पूर्वज यांना माहीत नसलेला मान्ना तुम्हाला खाऊ घातला. माणूस फक्त भाकरीवर जगत नाही तर परमेश्वराच्या मुखातील वचनाने जगतो हे तुम्हाला कळावे म्हणून त्याने हे सर्व केले.
”तुमचा देव परमेश्वर ह्याने तुमच्यासाठी ह्या सर्व गोष्टी केल्या आहेत ह्याची आठवण तुम्ही ठेवलीच पाहिजे. बाप आपल्या मुलाला शिकवतो, त्याच्यावर संस्कार करतो तसा तुमचा देव परमेश्वर तुम्हाला आहे. “तुमचा देव परमेश्वर ह्याच्या आज्ञा पाळा, त्याला अनुसरा आणि त्याच्याबद्दल आदर बाळगा.
”“पण सांभाळा, गाफील राहू नका. या देवापासून परावृत होऊन इतर दैवतांचे भजन पूजन करु नका.
”“तेव्हा मी सांगतो तेच कटाक्षाने करा. त्यात अधिक उणे करु नका.
”“स्वप्नांचे अर्थ सांगणारा एखादा भोंदू संदेष्टा तुमच्याकडे एखाद्या वेळी येईल. आपण काही चिन्ह, किंवा चमत्कार दाखवतो असे तो म्हणेल. कदाचित् त्या चिन्हाचा तुम्हाला पडताळा येईल किंवा चमत्कार खराही ठरेल. मग तो, तुम्हाला अपरिचित अशा इतर दैवतांची सेवा करायला सुचवेल. पण त्याचे ऐकू नका. कारण तुमचा देव परमेश्वर तुमची परीक्षा पाहात असेल. हे लोक आपल्यावर मनापासून प्रेम करतात की नाही हे परमेश्वराला पाहायचे असेल.
”“पण हा संदेष्टा मी न सांगितलेले ही काही माझ्या वतीन बोलला, तर त्याला मृत्युदंड दिला पाहिजे. इतर दैवतांच्या वतीने बोलणारा संदेष्टाही कदाचित् निपजेल. त्यालाही ठार मारले पाहिजे.
”तुम्ही म्हणाल की अमुक वचन परमेश्वराचे नव्हे हे आम्हाला कसे कळणार? तर, परमेश्वराच्या वतीने म्हणून तो संदेष्टा काही बोलला व ते प्रत्येक्षात उतरले नाही तर समजा की ते परमेश्वराचे बोलणे नव्हे, तो संदेष्टा स्वत:चेच विचार बोलून दाखवत होता. त्याला तुम्ही घाबरायचे कारण नाही.
”कारण अवज्ञा जादुगिरीच्या पापासारखी आहे, आणि हट्ट हा मूर्तिपूजा व मूर्ति करणे यासारखा आहे; तूं यहोवाचें वचन धिक्कारलें, यामुळें राज्य करण्याविषयी त्यानें तुला धिक्कारलें आहे.
”मग त्यापैकी एकजण परमेश्वराकडे गेला आणि म्हणाला, ‘मी हे काम करीन.’ परमेश्वर त्याला म्हणाला, ‘तू अहाबची फसगत कशी करशील?’ यावर तो देवदूत म्हणाला, ‘मी अहाबच्या संदेष्ट्यांमध्ये गोंधळ माजवून देईन. त्यांना मी राजाशी खोटे बोलायला प्रवृत्त करीन संदेष्टे राजाला सांगतील ते खोटे असेल.’ यावर परमेश्वर म्हणाला, ‘हे चांगले झाले जा आणि अहाब राजाला या मोहात पाड तुला यश येईन.”‘ मीखायाचे सांगून झाले. मग तो म्हणाला, “तेव्हा खरी हकीकत अशी आहे. परमेश्वरानेच तुमच्या संदेष्ट्यांना खोटे बोलायला लावले आहे. तुमच्यावर मोठे संकट ओढवावे असे परमेश्वरालाच वाटते.”
”मग एक आत्मापुढे आला आणि परमेश्वरासमोर उभा राहून म्हणाला, ‘मी अहाबला फशी पाडतो.’ परमेश्वराने त्या आत्म्याला विचारले, ‘कसे बरे?’ तेव्हा तो म्हणाला, ‘अहाबच्या संदेष्ट्यांच्या तोंडून असत्य वदवणारा आत्मा असे मी रुप घेईन.’ तेव्हा परमेश्वर त्याला म्हणाला, ‘तू अहाबला मोहात पाडू शकशील. चल, जा आपल्या कामगिरीवर.’ “अहाब, आता तूच पाहा. परमेश्वराने तुझ्या संदेष्ट्यांच्या तोंडी असत्य बोलणाऱ्या आत्म्याचा संचार केला आहे. तुझ्यावर अरिष्ट येणार असे परमेश्वराने बोलून दाखवले आहे.”
”त्यांच्या पूर्वजांच्या परमेश्वर देवाने लोकांना सावध करण्यासाठी पुन्हापुन्हा संदेष्टे पाठवले. आपल्या प्रजेविषयी आणि मंदिराविषयी त्याच्या मनात करुणा होती म्हणून परमेश्वर असे वागला. त्यांचा अथवा मंदिराचा नाश होऊ नये असे परमेश्वराला वाटत होते. पण या परमेश्वराच्या प्रजेने मात्र संदेष्ट्यांची टर उडवली. त्यांनी देवाच्या संदेष्ट्यांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केले. देवाच्या संदेशांची हेटाळणी केली. अखेर देवाचा क्रोध अनावर झाला. आता त्याचा संताप थोपवता येणे अशक्य झाले.
”तुम्ही तिघेजण खोटे बोलून तुमचे अज्ञान लपवीत आहात. ज्या वैद्याला कुणालाही बरे करता येत नाही अशा निरुपयोगी वैद्यासारखे तुम्ही आहात.
”इतर राष्ट्रांचे लोक इतके का रागावले आहेत? ती राष्ट्रे अशा मूर्खासारख्या योजना का आखीत आहेत? त्यांचे राजे आणि पुढारी एकत्र येऊन परमेश्वराशी आणि त्याने निवडलेल्या राजांशी भांडले. ते पुढारी म्हणाले, “आपण देवाविरुध्द आणि त्याने निवडलेल्या राजाविरुदध्द उभे राहू आपण त्यांच्यापासून स्वतंत्र होऊ.” परंतु माझे स्वामी स्वर्गातील राजा त्या लोकांना हसतो.
”जे लोक खोटं बोलतात त्यांचा तू सर्वनाश करतोस. जे लोक दुसऱ्यांना त्रास देण्यासाठी गुप्त योजना आखतात ते परमेश्वराला आवडत नाहीत, परमेश्वर त्यांचा द्वेष करतो.
”ते लोक खरे बोलत नाहीत. ते खऱ्याचे खोटे करणारे खोटारडे आहेत त्यांची तोंडे रिकाम्या थडग्यासारखी आहेत ते लोकांशी चांगलं बोलतील पण तेही त्यांना सापळ्यात अडकवण्यासाठीच.
”दुष्ट माणूस मनातल्या मनात म्हणतो, “देव नाही” पापी लोक फार भयानक आणि कुजक्या गोष्टी करतात त्यांच्यातला एकही जण चांगल्या गोष्टी करीत नाही. परमेश्वर स्वर्गातून खाली पाहात होता. त्याला शहाणे लोक शोधायचे होते शहाणेलोक मदतीसाठी देवाकडे वळतात. परंतु प्रत्येकजण देवापासून दूर गेला आहे. सर्वलोक वाईट झाले आहेत. एकही माणूस चांगली गोष्ट करत नव्हता.
”ते वाईट लोक गर्व करतात. आणि चांगल्या माणसांविषयी खोटे सांगतात. ते वाईट लोक अतिशय गर्विष्ठ आहेत परंतु खोटं बोलणारे त्यांचे ओठ लवकरच गप्प होतील.
”त्याने वाईट गोष्टी बोलायला नकोत. त्याने खोटे बोलायला नको.
”देव दुष्ट लोकांना म्हणतो, “तुम्ही लोक माझ्या कायद्यांबद्दल बोलता. तुम्ही माझ्या कराराबद्दल बोलता. मी तुम्हाला योग्य ते बोला असे सांगतो तेव्हा तुम्ही त्याचा तिरस्कार का करता? मी सांगितलेल्या गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष का करता?
”तू मूर्खासारख्या योजना आखतोस आणि तुझी जीभ धारदार वस्तऱ्यासारखी भयंकर आहे. तू नेहमी खोटे बोलतोस आणि कुणाची तरी फसवणूक करण्याच्या बेतात असतोस. तू चांगल्यापेक्षा वाईटावर अधिक प्रेम करतोस. तुला खरे बोलण्यापेक्षा खोटे बोलणे अधिक आवडते. तुला आणि तुझ्या खोटे बोलणाऱ्या जिभेला लोकांना त्रास द्यायला आवडते. म्हणून देव तुझा कायमचा नाश करेल. तो तुला पकडून तुझ्या घरातून बाहेर खेचेल. तो तुला मारुन टाकेल आणि तुझा निर्वंश करेल.
”माझे शत्रू त्यांच्या मित्रांवर हल्ले करतात. ज्या गोष्टी करण्याचे त्यांनी कबूल केलेले असते त्या ते करत नाहीत.
”ते दुष्ट लोक शाप देतात आणि खोटे बोलतात. ते ज्या गोष्टी बोलले त्याबद्दल त्यांना शिक्षा कर. त्यांचा अंहकार त्यांना सापळ्यात अडकवू दे.
”मी खोटे बोलणाऱ्यांना माझ्या घरात थारा देणार नाही. मी खोटारड्यांना माझ्याजवळ फिरकू देणार नाही.
”परमेश्वरा, तुझे नियम मोडणाऱ्या पत्येकाला तू परत पाठव. का? कारण जेव्हा त्यांनी तुझ्यासांगण्या प्रमाणे वागायचे कबूल केले तेव्हा ते खोटे बोलले.
”मला खोटे आवडत नाही. मला त्याचा वीट आहे पण परमेश्वरा, मला तुझी शिकवण आवडते.
”पहिली गोष्ट म्हणजे माणसाने परमेश्वराला मान दिला पाहिजे आणि त्याची आज्ञा पाळली पाहिजे. नंतर त्याला खरे ज्ञान मिळायला सुरुवात होईल. पण ज्या लोकांना पाप आवडते ते शहाणपणाचा आणि योग्य शिकवणीचा तिरस्कार करतात.
”“तुम्ही लोक मूर्ख आहात. तुम्ही आणखी किती काळ मूर्ख गोष्टी करीत राहाणार आहात? तुम्ही ज्ञानाची थट्टा किती काळ करीत राहाणार आहात? तुम्ही ज्ञानाचा किती काळ तिरस्कार करणार आहात? तुम्ही माझ्या सल्ल्याकडे आणि शिकवणुकीकडे लक्ष दिले असते तर मला जे माहित आहे ते सर्व मी तुम्हाला सांगितले असते. मला जे सर्व माहित आहे ते तुम्हाला सांगितले असते. मी माझे सर्व ज्ञान तुम्हाला दिले असते.
”परमेश्वरावर संपूर्ण विश्वास ठेव. तुझ्या स्वत:च्या ज्ञानावर अवलंबून राहू नकोस. तू जी प्रत्येक गोष्ट करशील ती करताना देवाचा विचार कर. म्हणजे तो तुला मदत करील. तुझ्या स्वत:च्या शहाणपणावर अवलंबून राहू नकोस. पण परमेश्वराला मान दे आणि वाईट गोष्टींपासून दूर राहा.
”सत्याला वाकवू नकोस आणि खऱ्या नसलेल्या गोष्टी सांगू नकोस. खोटे बोलू नकोस.
”तुझ्या समोर असलेल्या चांगल्या आणि शहाण्या ध्येयांपासून दूर जाऊ नकोस. तू जे करशील त्या बाबतीत सावध राहा. चांगले आयुष्य जग. सरळ मार्ग सोडू नकोस. चांगला आणि योग्य मार्ग धर पण वाईटा पासून नेहमी दूर राहा.
”परमेश्वर या सहा, नाही सात गोष्टींचा तिरस्कार करतो. डोळे, जे माणूस गर्विष्ठ आहे हे दाखवतात. जीभ, जी खोटे बोलते, हात, जे निरपराध्यांना ठार मारतात. ह्रदय जे वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखते. पाय जे वाईट गोष्टी करायला धाव घेतात. माणूस जो खोटे बोलतो आणि कोर्टात खऱ्या नसलेल्या गोष्टी सांगतो. माणूस जो वादविवादाला सुरुवात करतो आणि दुसऱ्यांमध्ये भांडणे लावून देतो.
”जर तुम्ही गर्विष्ठ माणसाला तो चुकत आहे हे सांगण्याचा प्रयत्न केला तर तो तुमच्यावर केवळ टीका करेल. तो माणूस देवाच्या शहाणपणाची चेष्टा करतो. जर तुम्ही दुष्ट माणसाला तो चुकत आहे असे सांगितले तर तो तुमची चेष्टा करेल. म्हणून जर एखादा माणूस तो इतरांपेक्षा चांगला आहे असे म्हणत असेल तर त्याला तो चुकतो आहे असे सांगू नका. तो त्या बद्दल तुमचा तिरस्कार करेल. पण जर तुम्ही शहाण्या माणसाला मदत करण्याचा प्रयत्न केलात तर तो तुमचा आदर करेल. जर तुम्ही शहाण्या माणसाला शिकवलेत तर तो अधिक शहाणा होईल. जर तुम्ही शहाण्या माणसाला शिकवलेत तर तो अधिक शिकेल.
”परमेश्वराचा आदर करणे ही ज्ञान मिळवण्याची पहिली पायरी आहे. परमेश्वराविषयी ज्ञान मिळवणे ही समजूतदारपणा मिळवणाची पहिली पायरी आहे.
”जर माणूस खोटे बोलला तर त्याचे शब्द लगेचच वाया जातात. पण सत्य मात्र सदैव राहाते.
”परमेश्वर खोटं बोलणाऱ्यांचा तिरस्कार करतो. पण परमेश्वर खरे बोलणाऱ्या लोकांबरोबर आनंदी असतो.
”सत्यावादी माणूस खोटे बोलत नाही. तो चांगला साक्षीदार असतो. पण ज्या माणसावर विश्वास टाकणे शक्य नसते तो कधीच खरे सांगत नाही. तो वाईट साक्षीदार असतो. जे लोक देवाची थट्टा करतात ते ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न करतील, पण त्यांना ते कधीच मिळत नाही. ज्यांचा देवावर विश्वास आहे ते खरोखर शहाणे आहेत. त्यांच्याजवळ ज्ञान सहजपणे येते. मूर्खाशी मैत्री करु नका. तो तुम्हाला काहीही शिकवू शकणार नाही.
”जो माणूस खरे सांगतो तो इतरांना मदत करतो. जो खोटे बोलतो तो इतरांना दु:ख देतो.
”मूर्खाला तो चुकत आहे हे सांगितलेले आवडत नाही. आणि तो माणूस शहाण्या माणसाला माहिती विचारायला नकार देतो.
”दुष्ट माणूस इतर लोक वाईट गोष्टी सांगतात त्या ऐकतो. जे लोक खोटे बोलतात ते खोटे ऐकतात सुध्दा.
”जो माणूस दुसऱ्याबद्दल खोटे सांगेल त्याला शिक्षा होईल. तो माणूस खोटे सांगतो तो सुरक्षित राहाणार नाही.
”जो माणूस खोटे बोलतो त्याला शिक्षा होईल. आणि जो खोटे बोलणे चालूच ठेवतो त्याचा सत्यानाश होईल.
”जर एखादा माणूस स्वत:ला इतरांपेक्षा चांगला समजत असेल तर त्याला जबरदस्तीने जायला भाग पाडा. जेव्हा तो माणूस जाईल तेव्हा त्याच्याबरोबर संकटही जाईल. नंतर वाद आणि फुशारक्याही बंद होतील.
”काही चांगले कारण असल्याशिवाय कुणाच्याही विरुध्द बोलू नका. खोटे सांगू नका.
”उघड टीका ही गुप्त प्रेमापेक्षा चांगली असते. मित्र तुम्हाला कधीतरी दु:ख देईल पण त्याची तसे करायची इच्छा नसते. शत्रू वेगळा असतो. शत्रू जरी तुमच्याशी कधी दयाबुध्दीने वागला तरी त्याला तुम्हाला दु:ख द्यायचीच इच्छा असते.
”राजाने जर खोट्या गोष्टींवर विश्वास ठेवला तर त्याचे सगळे अधिकारी वाईट ठरतील.
”देवाने म्हटलेला प्रत्येक शब्द परिपूर्ण असतो. जे लोक देवाकडे जातात त्यांच्यासाठी देव म्हणजे एक सुरक्षित जागा असते. म्हणून देव ज्या गोष्टी सांगतो त्या बदलण्याचा प्रयत्न करु नका. तुम्ही जर तसे केलेत तर तो तुम्हाला शिक्षा करेल आणि तुम्ही खोटे बोलता हे सिध्द करेल.
”चांगले नाव (मान मरातब) असणे हे चांगले अत्तर जवळ असण्यापेक्षा अधिक चांगले असते. ज्या दिवशी माणूस मरतो तो दिवस, ज्या दिवशी तो जन्मतो त्या दिवसापेक्षा चांगला असतो.
”हे स्वर्गा आणि हे पृथ्वी, परमेश्वर काय म्हणतो ते ऐका. परमेश्वर म्हणतो,“मी माझ्या मुलांचे पालनपोषण केले त्यांना लहानाचे मोठे केले. पण तीच मुले माझ्यावर उलटली. गाय आपल्या मालकाला ओळखते. गाढवालासुध्दा, आपला मालक आपल्याला कोठे खायला देणार ते, कळते. पण इस्राएल लोक मला जाणत नाहीत. माझ्या लोकांना काही समजत नाही.” इस्राएल हे राष्ट्र पापांनी भरले आहे. अन्याय, दुष्कृत्ये ह्यांचा बोजा त्यांच्यावर पडला आहे. पापी कुटुंबातील दुर्वर्तनी मुलांप्रमाणे इस्राएल लोक वागत आहेत. त्यांनी परमेश्वराचा त्याग केला आहे. इस्राएलच्या पवित्र देवाचा त्यांनी अपमान केला आहे. त्यांनी त्याचा त्याग केला व त्याला एखाद्या परक्या माणसाप्रमाणे वागवले. देव म्हणतो, “मला तुम्हाला सतत शिक्षा का करावी लागावी? मी तुम्हाला शिक्षा केली तरी तुम्ही सुधारत नाही. तुम्ही माझ्याविरूध्द बंड करीतच राहता. सध्या प्रत्येकाचे डोके व हृदय कमकुवत झाले आहे.
”पण सर्व गुन्हेगारांचा आणि पापी लोकांचा नाश होईल. (हे लोक परमेश्वराचे ऐकणारे नाहीत.)
”ते लोक चांगल्या गोष्टी वाईट आहेत व वाईट गोष्टी चांगल्या आहेत असे म्हणतात. ते प्रकाशाला अंधार व अंधाराला प्रकाश समजतात. त्यांना आंबट गोड लागते व गोड आंबट लागते. ते स्वत:ला फार चलाख समजतात. त्यांना वाटते आपण फार बुध्दिमान आहोत.
”सर्वशक्तिमान परमेश्वर हाच असा आहे की त्याचे भय मानावे. त्याचाच फक्त आदर करावा. त्यालाच फक्त पवित्र मानावे. तु जर परमेश्वराचा मान राखलास, तो पवित्र आहे असे मानलेस, तर तो तुला अभय देईल, पण जर तू त्याचा अनादर केलास, तर देव रस्त्यावरील दगडाप्रमाणे होईल आणि तुम्ही लोक त्यावर ठेचकाळून पडाल. इस्राएलच्या दोन घराण्यांना तो दगड अडखळवतो. यरूशलेमच्या सर्व लोकांचा परमेश्वरच सापळा आहे.
”तुम्ही शिकवणुकीप्रमाणे वागा व कराराचे पालन करा. तुम्ही ह्या आज्ञांचे पालन केले नाही तर तुम्ही चुकीच्या आज्ञांचे पालन कराल. (चुकीच्या आज्ञा म्हणजे ज्योतिषी व जादूटोणा करणारे ह्यांनी दिलेल्या आज्ञा होत. त्या आज्ञांना काही अर्थ नाही. त्या आज्ञांचे पालन करून तुम्हाला काहीही मिळणार नाही.)
”तू प्रभात ताऱ्याप्रमाणे होतास, पण आता तू आकाशातून खाली पडला आहेस. पूर्वी सर्व राष्ट्रे तुझ्यापुढे नेहमीच वाकत होती, पण आता तू संपला आहेस. तू नेहमीच स्वत:ला सांगायचास, “मी परात्पर देवासारखा होईन. मी आकाशात उंच जाईन. देवाच्या तांरागणाच्यावर उच्चस्थानी मी माझे सिंहासन स्थापन करीन. मी पवित्र साफोन डोंगरवरच्या देवसभेत बसून देवांना भेटीन. मी मेघांवर आरोहण करून वेदीवर जाईन. मी परात्पर देवासारखा होईन.” पण तसे घडले नाही. तू देवाबरोबर आकाशात गेला नाहीस. तुला अधोलोकात, पाताळात आणले गेले. लोक तुझ्याकडे निरखून पाहतील व तुझ्याबद्दल विचार करतील. तू एक कलेवर आहेस हे ते पाहतील आणि म्हणतील, “पृथ्वीवर सगळीकडे ज्याने प्रचंड भय निर्माण केले होते तो हाच का?
”मिसरच्या लोकांचे बेत मी उधळून टाकीन. मिसरवासी गोंधळून जातील. ते काय करावे याबाबत त्यांचे खोटे देव, चाणाक्ष लोक, जादूगार, मांत्रिक यांचा सल्ला घेतील. पण त्याचा काहीही उपयोग होणार नाही.
”पण सध्या ते नेते मद्याने धुंद झाले आहेत. याजक व संदेष्टे सर्वच जण द्राक्षरस व मद्य पिऊन धुंद झाले आहेत. ते अडखळून पडतात. संदेष्टे आपली स्वप्ने पाहताना मद्याच्या नशेत असतात. न्यायधीश न्यायनिवाडा करताना मद्याच्या धुंदीत असतात.
”माझा प्रभू म्हणतो, “हे लोक, माझ्यावर त्यांचे प्रेम आहे, असे म्हणतात ते शब्दांनी माझ्याबद्दलचा आदर व्यक्त करतात. पण त्यांची मने माझ्यापासून फार दूर आहेत. त्यांचा माझ्याबद्दलचा आदर, म्हणजे फक्त त्यांनी पाठ केलेले व माणसांनी घालून दिलेले नियम आहेत.
”तुम्ही गोंधळलेले आहात. तुम्हाला वाटते की चिखल व कुंभार सारखेच. तुम्हाला वाटते की एखाद्याने तयार केलेली वस्तूच त्या तयार करणाऱ्याला सांगेल, “तू मला घडवले नाहीस.” असे म्हणणे म्हणजे मातीच्या भांड्याने कुंभाराला “तुला काही समजत नाही” असे सांगण्यासारखेच होय.
”ह्यातील पुष्कळांना काही कळत नव्हते म्हणून त्यांनी चुकीच्या गोष्टी केल्या. त्यांना काही समजले नाही पण ते धडा शिकतील.”
”पालकांचे न ऐकणाऱ्या मुलांसारखे हे लोक आहेत. ते खोटे बोलतात आणि परमेश्वराच्या शिकवणुकीकडे लक्ष देण्यास नकार देतात.
”ते संदेष्ट्यांना म्हणतात, “आम्ही काय करावे हे तुम्ही दिव्य दृष्टीने पाहू नका. आम्हाला सत्य सांगू नका. आम्हाला बऱ्यावाटतील, आवडतील अशाच गोष्टी सांगा, आमच्यासाठी फक्त चागंल्याच गोष्टी तुमच्या दिव्य दृष्टीने बघा. खऱ्या घडणाऱ्या गोष्टी बघायचे टाळा. आमच्या रस्त्यातून दूर व्हा. इस्राएलच्या पवित्र देवाबद्दल आमच्याशी बोलू नका.” इस्राएलचा पवित्र देव म्हणतो, “परमेश्वराने दिलेला संदेश तुम्ही स्वीकारायचे नाकारले आहे. तुम्ही लोक जुलूम व कपट यांवर विसंबून राहता. लढाया व खोटेपणा करून तुम्ही अपराध केला आहे म्हणून तडे गेलेल्या उंच भिंतीप्रमाणे तुमची स्थिती होईल ही भिंत पडेल व तिचे तुकडे तुकडे होतील.
”खोटे संदेष्टे खोट्या गोष्टी सांगतात. पण परमेश्वर त्यांचा खोटेपणा उघड करतो. जादूटोणा करणाऱ्यांना परमेश्वर मूर्ख बनवितो. शहाण्यांनासुध्दा परमेश्वर गोंधळात टाकतो. त्यांना वाटते आपल्याला फार समजते पण देव त्यांना हास्यास्पद बनवितो. 26लोकांना संदेश देण्यासाठी परमेश्वर त्याच्या सेवकांना पाठवितो. आणि परमेश्वर त्या संदेशातील गोष्टी खऱ्या करून दाखवितो. लोकांनी काय करावे हे सांगण्यासाठी परमेश्वर दूत पाठवितो आणि त्यांचा सल्ला योग्य आहे हे परमेश्वर दाखवून देतो.
”रक्षक (संदेष्टे) आंधळे आहेत. ते काय करीत आहेत ते त्यांना समजत नाही. न भुंकणाऱ्या कुत्र्यांप्रमाणे ते आहेत. ते फक्त आडवे पडून झोपा काढतात. हो! त्यांना झोपायला आवडते. ते भुकेल्या कुत्र्यांप्रमाणे आहेत. त्यांचे कधीच समाधान होत नाही. मेंढपाळांना आपण काय करीत आहोत हे माहीत नाही. ते त्यांच्या भटकल्या गेलेल्या मेंढ्यांप्रमाणे आहेत. ते हावरट आहेत. त्यांना फक्त स्वत:चा लाभ हवा आहे.
”तुम्ही दुष्ट आणि खोटारडी मुले आहात. तुम्ही माझी चेष्टा करता. तुम्ही मला वेडावून दाखविता. तुम्ही मला जीभ काढून दाखविता.
”यहूदा व इस्राएल येथील घराणी, प्रत्येक बाबतीत, माझा विश्वासघात करीत आली आहेत.” हा परमेश्वराचा संदेश आहे. “हे लोक परमेश्वराबद्दल खोटे बोलले. ते म्हणाले आहेत, ‘परमेश्वर आम्हाला काही करणार नाही. आमचे काही वाईट होणार नाही. आमच्यावर हल्ला झालेला आम्ही कधी पाहणार नाही. आम्ही कधी उपाशी राहणार नाही.’ “खोटे संदेष्टे पोकळ वाऱ्या प्रमाणे आहेत. देवाचे शब्द त्यांच्याजवळ नाहीतत्यांचे वाईट होईल.”
”परमेश्वर म्हणतो, “यहूदात भयानक व धक्कादायक गोष्ट घडली आहे. संदेष्टे खोटे सांगतात, जे काम करण्यासाठी याजकांची निवड केली आहे, ते काम ते करणार नाहीत. आणि माझ्या लोकांना हे आवडते! पण तुमची शिक्षा जवळ आल्यावर तुम्ही काय कराल?”
”“इस्राएलमधल्या सर्व लोकांना जास्तीच जास्त पैसा पाहिजे. अति महत्वाचे व अति सामान्य, सर्व सारखेच आहेत. संदेष्ट्यांपासून याजकापर्यंत सर्व खोटे बोलतात. माझे लोक अतिशय वाईटरीतीने दुखवले जात आले आहेत. संदेष्ट्यांनी आणि याजकांनी त्यांच्या जखमा बांधाव्यात. पण ते तर त्या जखमावर, किरकोळ खरचटल्यावर करतात त्याप्रमाणे इलाज करतात. ते म्हणतात, ‘ठीक आहे, ठीक आहे ‘पण हे ठीक नाही.
”प्रत्येकजण आपल्या शेजाऱ्याशी खोटे बोलतो, कोणीही खरे बोलत नाही. यहूदाच्या लोकांनी आपल्या जिभांना खोटे बोलण्यास शिकविले आहे त्यांना परत येणे अशक्य होईपर्यंत त्यांनी पाप केले. एका वाईट गोष्टीमागून दुसरी वाईट गोष्ट आली. खोट्यामागून खोटे आले. लोकांनी मला जाणून घ्यायचे नाकारले.” परमेश्वराने ह्या सर्व गोष्टी सांगितल्या.
”यहूदाच्या लोकांच्या जिभा टोकदार बाणाप्रमाणे आहेत. ते खोटे बोलतात. प्रत्येकजण शेजाऱ्याशी वरवर चांगले बोलतो. पण गुप्तपणे तो शेजाऱ्यावर हल्ला करण्याचा बेत आखत आहे.
”मग परमेश्वर मला म्हणाला, “यिर्मया, माझ्या नावावर हे संदेष्टे असत्य कथन करतात. मी त्यांना पाठविलेले नाही. मी त्यांना आज्ञा केली नाही वा त्यांच्याशी बोललोही नाही. ते लोकांपुढे खोटे दृष्टान्त सांगतात, त्यांना मोहजालात फसवितात व स्वत:चे स्वप्नरंजन करतात. माझ्या नावावर प्रवचने देणाऱ्या संदेष्ट्यांबद्दल बोलायचे झालेच तर, मी त्यांना पाठविले नाही. ते म्हणतात ‘या देशावर कोणीही हल्ला करणार नाही.’ ह्या देशाची कधीही उपासमार होणार नाही.’ पण ते संदेष्टेच उपासमारीने मरतील. शत्रू त्यांना ठार करील.
”परमेश्वर म्हणतो, “जे दुसऱ्या लोकांवर विश्वास ठेवतात, त्यांचे वाईट होईल. सामर्थ्यासाठी जे दुसऱ्यावर विसंबतात, त्याचे भले होणार नाही. का? कारण त्यांनी परमेश्वरावर विश्वास ठेवणे सोडून दिले.
”“माणसाचे मन फार कपटी असते. त्याच्यावर काही औषध नाही. म्हणूनच कोणालाही मनाचे खरे आकलन होत नाही. पण मी प्रत्यक्ष परमेश्वर असल्याने, मी माणसाच्या मनात डोकावू शकतो मी माणसाच्या मनाची परीक्षा घेऊ शकतो. प्रत्येकाला काय हवे ते मी ठरवू शकतो प्रत्येकाला त्याच्या कर्माचे योग्य फळ मी देऊ शकतो.
”संदेष्ट्यांना संदेश: मी फार दु:खी आहे. माझे हृदय विदीर्ण झाले आहे. माझी सर्व हाडे धरधरत आहेत. माझी (यिर्मयाची) स्थिती मद्यप्यासारखी झाली आहे. का? परमेश्वरामुळे व त्याच्या पवित्र शब्दांमुळे.
”“संदेष्टेच काय, पण याजकसुद्धा पापी आहेत. माझ्या मंदिरात दुष्कृत्ये करताना मी त्यांना पाहिले आहे.” हा परमेश्वराचा संदेश आहे. “मी माझा संदेश त्यांच्याकडे पाठविण्याचे बंद करीन. मग त्यांची स्थिती अंधारात चालणाऱ्यांसारखी होईल. मी असे केल्यास संदेष्टे व याजक ह्यांच्यासाठी वाट जणू निसरडी होईल. ते त्या अंधारात पडतील मी त्यांच्यावर अरीष्ट आणीन. मी त्यांना शिक्षा करीन.” हा देवाकडून आलेला संदेश आहे.
”आता मी यहूदाच्या संदेष्ट्यांना यरुशलेममध्ये भयंकर गोष्टी करताना पाहिले आहे. ते व्यभिचाराचे पाप करतात. ते खोट्या गोष्टी एकतात आणि खोट्या शिकवणुकीचे पालन करतात. ते दुष्टांना दुष्कृत्ये करायला प्रोत्साहन देतात. म्हणून लोक पाप करीतच राहतात. ते सदोममधील माणसाप्रमाणे आहेत. यरुशलेम आता मला गमोऱ्यासारखे वाटते.” सर्वशक्तिमान परमेश्वर संदेष्ट्यांबद्दल म्हणतो, “मी त्या संदेष्ट्यांना शिक्षा करीन. विषमिश्रित अन्न खाण्यासाखी वा जहरमिश्रित पाणी पिण्यासारखी ती शिक्षा असेल. संदेष्ट्यांनी हा आध्यात्मिक आजार आणला व तो सर्व देशात पसरला म्हणून मी त्यांना शिक्षा करीन. हा आजार यरुशलेममधील संदेष्ट्यांकडून आला.”
”सर्वशक्तिमान परमेश्वर ह्या गोष्टी सांगतो: “हे संदेष्टे तुम्हाला जे काय सांगतात त्याकडे लक्ष देऊ नका. ते तुम्हाला मूर्ख बनविण्याचा प्रयत्न करतात. ते दृष्टांन्ताबद्दल बोलतात. पण हे दृष्टांन्त त्यांना माझ्याकडून घडत नाहीत, तर ते त्यांच्या मनाचेच असतात. काही लोक परमेश्वराकडून आलेल्या खऱ्या संदेशाला नाके मुरडतात म्हणून हे संदेष्टे त्या लोकांना निराळ्याच गोष्टी सांगतात. ते म्हणतात, ‘तुम्हाला शांती लाभेल’ काही लोक फार हट्टी आहेत. ते त्यांना पाहिजे त्याच गोष्टी करतात. मग ते संदेष्टे त्याना म्हणतात, ‘तुमच्यावर कोणतीच आपत्ती येणार नाही.’
”परमेश्वराने जे करण्याचे ठरविले आहे, ते पूर्ण होईपर्यंत परमेश्वराचा राग शांत होणार नाही. पुढील दिवसांत तुम्हाला हे स्पष्टपणे समजेल. मी त्या संदेष्ट्यांना पाठविले नाही, पण तेच संदेश द्यायला धावले. मी त्यांच्याशी बोललो नाही, पण तेच माझ्यावतीने उपदेश करतात.
”“काही संदेष्टे माझ्या नावाने खोटा उपदेश करतात. ते म्हणतात, ‘मला स्वप्न पडले आहे! मला स्वप्न पडले आहे!’ मी त्याना असे म्हणताना ऐकले आहे. हे किती काळ चालणार? ते खोट्याचाच विचार करतात आणि त्याच खोट्या, असत्य गोष्टी लोकांना शिकवितात. हे संदेष्टे, यहूदाच्या लोकांना माझे विस्मरण व्हावे असा प्रयत्न करीत आहेत. एकमेकांना खोट्या स्वप्नाबद्दल सांगून ते हे करीत आहेत. त्याचे पूर्वज जसे माझे नाव विसरले, तसेच आता ह्या लोकांनी मला विसरावे म्हणून ते प्रयत्न करीत आहेत. ह्यांचे पूर्वज मला विसरले आणि त्यांनी खोटे दैवत बआलची पूजा केली, काडी म्हणजे गहू नव्हे. जर एखाद्या माणसाला त्याच्या स्वप्राबद्दल सांगायचे असेल, तर सांगू द्या. पण जो कोणी माझा संदेश ऐकतो, त्याला सत्य सांगू द्यावे. माझा संदेश अग्नीप्रमाणे आहे.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “तो खडक फोडणाऱ्या हातोड्याप्रमाणे आहे.
”मी त्यांच्याविरुद्ध आहे.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “ते त्यांचे स्वत:चे शब्द वापरतात आणि ते माझेच शब्द आहेत असे भासवितात. खोट्या स्वप्नांबद्दल सांगणाऱ्या खोट्या संदेष्ट्यांच्या मी विरुद्ध आहे.” हा परमेश्वराचा संदेश आहे. “ते त्यांच्या खोट्या बोलण्याने व चुकीच्या शिकवणुकीने माझ्या लोकांना चुकीच्या मार्गांने नेतात. लोकांना शिकविण्यासाठी मी त्यांना पाठविलेले नाही. मी त्यांना माझ्यासाठी काही करण्याची आज्ञा कधीही दिलेली नाही. ते यहूदाच्या लोकांना मुळीच मदत करु शकत नाहीत.” हा परमेश्वराचा संदेश आहे.
”कदाचित् एखादा संदेष्टा वा एखादा याजक किंवा एखादा माणूस म्हणेल ‘परमेश्वराची घोषणा ही आहे.’ तो खोटे बोलला. मी त्याला व त्याच्या सर्व कुटुंबाआला शिक्षा करीन. तुम्ही एकमेकांना असे विचारु शकता, ‘परमेश्वराने काय उत्तर दिले?’ किंवा ‘परमेश्वर काय म्हणाला?’ पण तुम्ही कधीही ‘परमेश्वराची घोषणा (भारी बोजा) असा वाक्प्रचार वापरु नये.’ कारण परमेश्वराचा संदेश हा कोणालाही भारी बोजा वाटता कामा नये. पण तुम्ही आमच्या देवाचे शब्द बदलता. तो जीवंत, सर्वशक्तिमान परमेश्वर आहे.
”पण ‘परमेश्वराची घोषणा (भारी बोजा) काय आहे?’ असे म्हणून नका. जर तुम्ही असे शब्द वापराल, तर परमेश्वर तुम्हाला म्हणेल, ‘तुम्ही माझ्या संदेशाला ‘परमेश्वराची घोषणा (भारी बोजा) असे म्हणू नेय.’ हे शब्द वापरु नका असे मी बजावले. पण तुम्ही माझ्या संदेशाला ‘भारी बोजाच’ म्हणालात. म्हणून मी तुम्हाला. मोठ्या ओझ्याप्रमाणे वर उचलून माझ्यापासून लांब फेकून देईन. मी तुमच्या पूर्वजांना यरुशलेम नगरी दिली. पण मी तुम्हाला आणि त्या नगरीला माझ्यापासून दूर फेकीन. मी तुम्हाला अप्रतिष्ठित करीन आणि ही बदनामी (हा ओशाळवाणेपणा) तुम्ही कधीही विसरु शकणार नाही.”
”तेव्हा तुम्ही तुमच्या संदेष्ट्यांचे ऐकू नका. भविष्य सांगण्यासाठी जादूचा उपयोग करणाऱ्या लोकांचे ऐकू नका. स्वप्नांचे अर्थ लावणाऱ्या लोकांचे ऐकू नका. मृतांशी बोलणाऱ्या व जादू करणाऱ्या लोकांचे ऐकू नका. हे सर्वजण तुम्हाला “तुम्ही बाबेलच्या राजाचे दास होणार नाही’ असे सांगतात.” पण ते खोटे बोलत आहेत. तुमच्या जन्मभूमीपासून तुम्हाला दूर नेण्यास ते कारणीभूत होतील. मी तुम्हाला तुमची घरे सोडायला भाग पाडीन. तुम्ही दुसऱ्या देशात मराल.
”पण खोटे संदेष्टे सांगतात की तुम्हाला कधीच बाबेलचे गुलाम व्हावे लागणार नाही.“त्यांचे मुळीचे ऐकू नका. कारण ते तुम्हाला खोटा उपदेश करतात. मी त्या संदेष्ट्यांना पाठविलेले नाही.” हा परमेश्वराचा संदेश आहे. “ते खोटे सांगतात व तो माझा संदेश आहे असे म्हणतात म्हणून मी तुम्हा लोकांना दूर पाठवीन. तुम्ही मराल आणि तुम्हाला खोटे सांगणारे ते संदेष्टेही मरतील.” नंतर मी (यिर्मया) याजकांना व सर्व लोकांना म्हणालो, “परमेश्वर म्हणतो ते खोटे संदेष्टे म्हणतात ‘खास्द्यांनी परमेश्वराच्या मंदिरातून खूप गोष्टी घेतल्या आहेत. त्या सर्व लवकरच परत आणल्या जातील. ते संदेष्टे खोटे सांगतात.’ म्हणून त्यांचे ऐकू नका.
”सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, “तुमचे संदेष्टे आणि जादू करणारे लोक ह्यांच्याकडून फसू नका. त्यांना पडलेली स्वप्ने ऐकू नका. ते खोटा उपदेश करीत आहेत, व तो संदेश असून तो मी पाठविल्याचे सांगत आहेत. पण मी त्यांना पाठविलेला नाही.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.
”“माझे लोक चुकलेल्या मेंढराप्रमाणे आहेत. त्यांच्या मेंढपाळांनी (नेत्यांनी) त्यांना चुकीच्या मार्गाने नेले. त्यांना डोंगर टेकड्यांतून भटकायला लावले. ते त्यांच्या विश्रांतीची जागा विसरले.
”जर मी म्हणालो ‘हा वाईट माणूस मरेल,’ तर तू त्या माणसाला इशारा दिलाच पाहिजेस. तू त्याला त्याचा जीवनक्रम बदलायला आणि दुष्कृत्ये करण्याचे टाळायला सांगितले पाहिजेस. जर तू त्याला इशारा केला नाहीस, तर तो मरेल. त्याने पाप केले, म्हणून तो मरेल. पण तरीसुद्धा त्याच्या मृत्यूसाठी मी तुला जबाबदार धरीन. का? कारण तू त्याच्याकडे जाऊन त्याला वाचविले नाहीस. “कदाचित् असेही होईल की तू एखाद्याला सावध करशील, त्याला त्याचा मार्ग बदलायला सांगशील, दुष्कृत्ये न करण्याचे आवाहन करशील. पण त्याने तुझे ऐकले नाही, तर तो मरेल. तो त्याच्या पापामुळे मृत्यू पावेल, पण तू त्याला सावध केले होतेस, म्हणून तुझा स्वत;चा जीव वाचेल. “किंवा एखादा सज्जन चांगले वागणे सोडून देईल. मी त्याच्या मार्गात असे काही ठेवीन की तो पडेल (पाप करील). तो दुष्कृत्ये करायला लागेल, म्हणून मरेल. तो पाप करीत होता व तू त्याला सावध केले नाहीस म्हणून तो मरेल. अशा वेळी त्याच्या मृत्यूबद्दल मी तुला जबाबदार धरीन. त्याने केलेली चांगली कृत्ये लोक विसरुन जातील. “पण तू सज्जन माणसाला सावध केलेस आणि पाप न करण्याबद्दल सांगितलेस आणि त्याने पाप करण्याचे सोडून दिले, तर तो मरणार नाही. का? कारण तू सांगितले आणि त्याने ऐकले. अशा प्रकारे तू तुझा स्वत:चाच जीव वाचविला.”
”“ह्या पुढे इस्राएलला खोटे दृष्टान्त दिसणार नाहीत, हे मात्र अगदी खरे आहे. खोटेनाटे सांगणारे जादूगार तेथे असणार नाहीत.
”त्यानंतर परमेश्वराचा संदेश मला मिळाला. तो म्हणाला, “मानवपुत्रा, माझ्यावतीने इस्राएलच्या संदेष्ट्यांशी बोल. ते संदेष्टे खरे म्हणजे माझ्यावतीने बोलत नसून त्यांना पाहिजे ते सांगतात म्हणून तू त्यांच्याशी बोल. त्यांना पुढील गोष्टी सांग. ‘परमेश्वराकडून आलेला हा संदेश ऐका. परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणतो की दुष्ट संदेष्ट्यांनो, तुमचे वाईट होईल. तुम्ही दृष्टान्तांत पाहिलेल्या गोष्टी लोकांना न सांगता, तुमच्या मनाचेच सांगता.
”“इस्राएल, ओसाड, पडक्या वास्तूंतून धावणाऱ्या कोल्ह्यांप्रमाणे तुझे संदेष्टे असतील. नगरीच्या तटबंदीच्या भगदाडांजवळ तू सैनिक ठेवले नाहीस वा इस्राएलवासीयांच्या रक्षणासाठी भिंतही बांधली नाहीस. तेव्हा परमेश्वराने तुला शिक्षा करायची वेळ येताच, तू युद्धात हरशील. “खोट्या संदेष्ट्यांनी दृष्टान्त पाहिल्याचे सांगितले. ते जादू करतात आणि भविष्यात घडणाऱ्या गोष्टी सांगतात. पण ते खोटे बोलतात. त्यांना परमेश्वराने पाठविल्याचे ते सांगतात. पण ते खोटे आहे. खोटे खरे ठरावे म्हणून ते अजूनही वाट पाहत आहेत. “खोट्या संदेष्ट्यांनो, तुम्ही पाहिलेले दुष्टान्त खरे नाहीत. तुम्ही जादू केली व असे घडेल म्हणून सांगितले. पण तुम्ही खोटे बोललात, परमेश्वराने असे सांगितले असे तुम्ही म्हणालात. पण मी तुमच्याशी बोललोच नाही.”
”पण आता परमेश्वर, माझ्या प्रभु, खरोखरच बोलेल. तो म्हणतो, “तुम्ही खोट्या गोष्टी सांगितल्या, तुम्ही खोटे दुष्टान्त पाहिले. म्हणून मी (देव) तुमच्याविरुद्ध आहे.” परमेश्वराने, माझ्या प्रभूने, असे म्हटले.
”परमेश्वर म्हणतो, “खोटे दृष्टान्त पाहणाऱ्या आणि खोटे बोलणाऱ्या संदेष्ट्यांना मी शिक्षा करीन. माझ्या लोकांतून मी त्यांना बाजूला काढीन. इस्राएलच्या वंशजांच्या नामावळीत त्यांची नावे असणार नाहीत. ते इस्राएलच्या भूमीत परत येणार नाहीत. मगच तुम्हाला मी परमेश्वर व प्रभू असल्याचे कळेल. “ते खोटे संदेष्टे पुन्हा पुन्हा माझ्या लोकांशी खोटे बोलले. त्यांनी ‘शांती प्रस्थापित होईल.’ असे सांगितले. पण तेथे शांती नाही. भिंतीची चांगली दुरुस्ती करुन लोकांनी लढायला सज्ज होण्याची जरुरी आहे. पण त्याऐवजी लोक भिंतीना फक्त गिलावा करतात. मी त्यांच्यावर गारांचा वर्षांव करीन आणि मुसळधार पाऊस (शत्रू - सैन्य) पाडीन, असे तू त्यांना सांग. जोराचे वारे वाहतील आणि तुफान येईल. मग तटबंदी पडेल. भिंत पडेल आणि लोक संदेष्ट्यांना विचारतील ‘तुम्ही गिलावा केला होता, त्याचे काय झाले?” परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो, “मी तुमच्यावर रागावलो आहे म्हणून मी वादळ उत्पन्न करीन, मुसळधार पाऊस पाडीन, गारांचा वर्षाव करीन आणि तुमचा संपूर्ण नाश करीन. तुम्ही भिंतीला गिलावा करता. पण संपूर्ण तटबंदीच मी उद्ध्वस्त करीन. ती मी जमीनदोस्त करीन. ती तुमच्या अंगावर पडेल आणि मग तुम्हाला कळून चुकेल की मीच परमेश्वर आहे. मी माझा सगळा राग त्या तटबंदीवर व तिच्यावर गिलावा देणाऱ्या लोकांवर ओतून टाकीन. मग मी म्हणेन ‘आता भिंतही नाही आणि तिच्यावर गिलावा करणारेही राहिले नाहीत.’ “ह्या सर्व गोष्टी इस्राएलच्या खोट्या संदेष्ट्यांबाबत घडतील. ते यरुशलेमच्या लोकांशी बोलतात. ते शांतीचे भाकीत करतात. पण शांती मिळत नाही.” परमेश्वराने, माझ्या प्रभुने, हे सांगितले.
”देव म्हणाला, “मानवपुत्रा, इस्राएल मधील स्त्री संदेष्ट्यांकडे पाहा. त्या माझ्यावतीने बोलत नाहीत. त्या त्यांच्या मनाचेच सांगतात. म्हणून तू माझ्यावतीने त्यांच्याविरुद्ध बोल. तू त्यांना पुढील गोष्टी सांगितल्या पाहिजेस.
”“तुमचे संदेष्टे खोट्या गोष्टी सांगतात. सज्जनांना त्याचा त्रास होतो. मला हे पंसत नाही. तुम्ही वाईट लोकांना पठिंबा देता, त्यांना उत्तेजन देता. त्यांना त्यांचे मार्ग बदलायला सांगत नाही. त्यांचे जीव वाचवायचा प्रयत्न करीत नाही. तेव्हा ह्यापुढे तुम्हाला तुमचे निरर्थक दृष्टान्त दिसणे बंद होईल तुम्ही जादूही करणार नाही. तुमच्यापासून मी माझ्या लोकांचे रक्षण करीन. मग तुम्हाला कळेल की मीच खरा परमेश्वर आहे.”
”“संदेष्टे लोकांना ताकीद देत नाहीत. ते सत्य झाकून ठेवतात. हे संदेष्टे, तटबंदीची दुरुस्ती न करता, वरवर गिलावा देऊन भगदाडे बुजविणाऱ्या, कामगारांप्रमाणे आहेत. त्यांना फक्त खोटेच दिसते. ते मंत्र-तंत्राच्या आधारे भविष्य जाणून घेतात, पण लोकांशी फक्त खोटेच बोलतात. ते म्हणतात ‘परमेश्वर, माझा देव, पुढील गोष्टी सांगतो.’ पण हे सर्व खोटे आहे. परमेश्वर त्यांच्याशी बोललेला नाही.
”“म्हणून परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो:सोर, तू स्वत:ला देवासारखी मसजतेस! मी परक्यांना तुझ्याविरुद्ध लढण्यासाठी आणीन. ते राष्ट्रांमध्ये सर्वांत भयंकर आहेत. ते तलवारी उपसतील आणि तुझ्या शहाणपणाने मिळविलेल्या सर्व सुंदर गोष्टींचा नाश करतील. तुझे वैभव ते लयाला घालवितील.
”पहारेकऱ्याने शत्रूसैनिकांस येताना पाहिल्यास, तो तुतारी फुंकून लोकांना सावध करतो. जर लोकांनी तुतारीचा आवाज ऐकूनही त्याकडे दुर्लक्ष केले, तर शत्रू त्यांना पकडतील व कैदी म्हणून घेऊन जातील. अशा वेळी मृत्यूला ज्याचा तोच जबाबदार असेल. जर एखाद्याने तुतारीचा आवाज ऐकूनही दुर्लक्ष केले. तर त्याच्या मृत्यूची जबबादारी त्याची त्याच्यावरच असेल. तो जर तुतारीच्या आवाजाने सावध झाला असता, तर वाचू शकला असता. “पण, कदाचित्, असेही होईल की शत्रूसैनिकांना पाहूनही पहारेकरी तुतारी फुंकणार नाही. त्याने लोकांना सावध न केल्याने, शत्रूसैनिक त्यांना पकडतील व कैदी म्हणून घेऊन जातील. त्यांनी पाप केले होते म्हणून ते पकडले जातील हे खरे, पण जर ते ठार मारले गेले, तर त्यांच्या मृत्यूला पहारेकरीही जबाबदार असेल.’
”“आता, मानवपुत्रा, इस्राएल लोकांचा पहारेकरी म्हणून मी तुझी निवड करीत आहे. माझ्याकडून संदेश मिळताच, माझ्यावतीने तू लोकांना जागृत केलेच पाहिजेस. मी कदाचित् तुला सांगीन ‘हा दुष्ट मनुष्य मरेल,’ तर तू माझ्यावतीने त्याच्याकडे जाऊन त्याला सावध केलेच पाहिजेस. जर तू त्या दुष्ट माणसाकडे जाऊन त्याला सावध केले नाहीस, त्याचा मार्ग बदलण्याबद्दल त्याला सांगितले नाहीस, तर त्याच्या पापामुळे तो मरेल, पण त्याच्या मृत्यूची जबाबदारी तुझ्यावरही येईल. पण तू त्या पाप्यास सावध करुन कुमार्ग सोडून सन्मार्ग धरण्यास सांगितलेस आणि त्याने ह्यास नकार दिला, तर तो माणूस त्याच्या पापामुळे मरेल. पण तू वाचशील.
”“किंवा मी दुष्टाला ‘तू मरशील’ असे सांगीन. पण तो कदाचित त्याचा जीवनमार्ग बदलेल. तो पाप करण्याचे सोडून देऊन चांगल्या रीतीने जगू लागेल. तो सज्जन व प्रामाणिक होईल. त्याने कर्ज देताना गहाण म्हणून ठेवून घेतलेल्या वस्तू तो कदाचित परत करेल. त्याने चोरलेल्या वस्तूंची किंमत तो चुकती करील. जीवनातील नियमाप्रमाणे तो चालू लागेल, तो वाईट गोष्टी करण्याचे सोडून देईल, तर तो नक्कीच जगेल. तो मरणार नाही.
”“पण तुझी माणसे म्हणतात, ‘हे योग्य नाही, परमेश्वर, माझा प्रभू, असा असूच शकत नाही.’“पण ते लोक प्रामाणिक नाहीत. त्यांनी बदललेच पाहिजे. जर सज्जन सत्कृत्ये सोडून दुष्कृत्ये करु लागला, तर त्याच्या पापामुळे तो मरेल. आणि जर दुष्टाने पाप करण्याचे सोडून दिले, तो चांगले जीवन जगू लागला, प्रामाणिक झाला, तर तो जगेल. पण मी न्यायी नाही असे तुम्ही अजूनही म्हणता. पण मी तुम्हाला सत्य सांगत आहे. इस्राएलच्या लोकांनो, प्रत्येकाच्या कर्मांचा मी न्याय करीन.”
”“मानवपुत्रा, माझ्यावतीने इस्राएलच्या मेंढपाळांविषयी (नेत्यांविषयी) बोल. माझ्यासाठी त्यांच्याबरोबर बोल. त्यांना सांग की परमेश्वर, माझा प्रभू पुढील गोष्टी सांगतो. ‘तुम्ही इस्राएलचे मेंढपाळ स्वत:च फक्त चरत आहात. त्यामुळे तुमचे वाईट होईल. तुम्ही कळपाला खायला का घालत नाही? तुम्ही धष्टपुष्ट मेंढ्या खाता, त्यांच्या लोकरीचा उपयोग स्वत:ला कपडे करण्याकरिता करता. तुम्ही धष्टपुष्ट मेंढ्या मारता. पण कळपाला खायला घालीत नाही. तुम्ही दुर्बळांना सबळ केले नाही. तुम्ही आजारी मेंढ्यांची काळजी घेतली नाही. जखमींना मलमपट्टी केली नाही. काही मेंढ्या भरकटल्या पण तुम्ही जाऊन त्यांना परत आणले नाही. तुम्ही त्यांना शोधायला गेला नाहीत. नाही! तुम्ही फारच दुष्ट आणि निष्ठुर होता. आणि मेंढ्यांनाही तुम्ही दुष्टपणाने व निष्ठुरतेनेच वागविण्याचा प्रयत्न केला. “आणि कोणीच मेंढपाळ नसल्याने मेंढ्या आता विखुरल्या आहेत. त्या हिंस्र पशूंचे भक्ष्य झाल्या आहेत, कारण त्या पसरल्या गेल्या. माझा कळप सर्व डोंगरांतून व सर्व टेकड्यांवरुन भटकला, जगाच्या पाठीवरील प्रत्येक ठिकाणी विखुरला आणि त्याचा शोध घेण्यास कोणीही नव्हते.”
”“मी शपथपूर्वक प्रतिज्ञा करतो. हिंस्र पशूंनी माझ्या मेंढ्या पकडल्या. खरंच! माझ्या मेंढ्या वन्य प्राण्यांचे भक्ष्य झाल्या. का? कारण त्यांना खरा मेंढपाळ नव्हता. माझ्या मेंढपाळांनी माझ्या कळपावर लक्ष ठेवले नाही. नाही! त्यांनी फक्त मेंढ्या मारल्या व स्वत:ची पोटे भरली. त्यांनी माझ्या कळपाला खाऊ घातले नाही.” तेव्हा, मेंढपाळांनो, परमेश्वराचे म्हणणे ऐका. परमेश्वर म्हणतो, “मी त्या मेंढपाळांच्याविरुद्ध आहे. मी माझ्या मेंढ्या त्यांच्याकडून परत मागीन. मी त्यांच्यावर तोंडसुख घेईन. ह्यापुढे ते माझे मेंढपाळ असणार नाही. मग ते स्वत:च्या तुंबड्या भरु शकणार नाहीत. आणि त्यांच्यापासून मी माझ्या कळपाला वाचवीन. मग माझ्या मेंढ्या त्यांचे भक्ष्य होणार नाहीत.”
”परमेश्वर, माझा प्रभू, पुढील गोष्टी सांगतो, तू माझ्या कळपा “मी माझ्या कळपातील मेंढ्या - मेंढ्यात, एडका व बोकड ह्यांच्यात न्यायनिवाडा करीन.
”म्हणून, परमेश्वर, माझा प्रभू, त्यांना म्हणतो, “मी स्वत: लठ्ठ मेंढी आणि बारीक मेंढी ह्यांच्यात निवाडा करीन. तुम्ही बाजूने व खांद्याने ढकलता. तुमच्या शिंगांनी तुम्ही दुर्बळ मेंढ्यांना खाली पाडता. तुम्ही, त्यांना ढकलून दूर घालवून देता. म्हणून, मी माझ्या कळपाला वाचवीन. यापुढे हिंस्र पशू त्यांना पकडणार नाहीत. मी मेंढ्या - मेंढ्यात न्यायनिवाडा करीन.
”तुला गर्व झाला होता आणि तू माझ्याविरुद्ध बोललास. तू अनेक वेळा माझ्याविरुद्ध बोललास, आणि मी खरेच सांगतो की मी प्रत्येक शब्द ऐकला.”
”“माझ्या लोकांचा अज्ञानामुळे नाश झाला. तुम्ही शिकण्याचे नाकारले आहे. म्हणून मी तुम्हाला माझ्या सेवेत याजक होण्यास नकार देईन. तुम्ही तुमच्या देवाचा नियम विसरलात, म्हणून मी तुमच्या मुलांना विसरेन.
”माझी माणसे लाकडाच्या तकड्यांना सल्ला विचारीत आहेत. त्यांना वाटते की त्या काटक्या त्यांना उत्तर देतील. का? कारण ते वेश्यांप्रमाणे त्या खोट्या देवाच्या मागे धावले. त्यांनी त्यांच्या देवाचा त्याग केला व ते वेश्येप्रमाणे वागले.
”भोंदू वा खोटे संदेष्टे परमेश्वराच्या लोकांना खोट्यागोष्टी सांगत आहेत. परमेश्वर ह्या संदेष्ट्यांबद्दल पुढीलप्रमाणे उद्गार काढतो.“हे संदेष्टे पोटाद्वारे चालतात. जर लोकांनी ह्या संदेष्ट्यांना खायला घातले तर ते ओरडतात, शांती नांदेल. पण जर लोकांनी त्यांना खायला दिले नाही तर हे संदेष्टे किंचाळतात, “युध्दाला तयार राहा!” म्हणून ही जणू काही तुमची रात्र आहे. म्हणूनच तुम्हाला दृष्टांन्त होत नाहीत. भविष्यात काय घडणार हे तुम्ही पाहू शकत नाही, म्हणून तुम्ही जणू अंधारातच आहात. संदेष्ट्यांच्या माथ्यांवरचा सूर्य मावळला आहे. तेव्हा भविष्यात घडणाऱ्या गोष्टी ते पाहू शकत नाहीत. म्हणजेच त्यांच्यापुढे जणू अंधार पसरलाय! द्रष्टे लज्जित झालेत ज्योतिषी ओशाळलेत. ते काहीच बोलणार नाहीत. का? कारण परमेश्वर त्यांच्याशी बोलणार नाही.
”यरुशलेमचे न्यायाधीश, न्यायालयात कोणी जिंकायचे, हे ठरविण्यासाठी लाच घेतात. यरुशलेममधील याजकांना लोकांना शिकवण देण्यापूर्वी लोकांनी पैसे द्यावेच लागतात. भविष्य बघण्यापूर्वीच संदेष्ट्यांना पैसे चारावे लागतात. आणि मग हे नेते अपेक्षा करतात की परमेश्वराने त्यांना मदत करावी. ते म्हणतात, “आपले काहीही वाईट होणार नाही. कारण परमेश्वर आपल्याबरोबरच राहतो!”
”पण तुम्हाला पुढील गोष्टी करणे भाग आहे! तुमच्या शेजाऱ्यांना सत्य सांगा. न्यायालयात निर्णय घेतेवेळी जे सत्य आणि योग्य अशाच गोष्टी करा. त्यामुळे शांतता येईल. आपल्या शेजाऱ्यांना त्रास देण्यासाठी कट करु नका. खोटी आश्वासने देऊ नका. अशा वाईट गोष्टीत आनंद मानू नका. का? कारण या गोष्टींची मला चीड आहे.” परमेश्वराने या गोष्टी सांगितल्या आहेत.
”लोक, भविष्य जाण्यासाठी, त्यांच्याकडील लहान मूर्तीचा व जादूटोण्याचा उपयोग करतात. पण ते सर्व व्यर्थ आहे. त्यांना दृष्टांन्त होतात आणि ते त्यांना पडलेल्या स्वप्नांबद्दल सांगतात. पण ते सर्व केवळ अर्थहीन थोतांड आहे. लोकांची स्थिती मदतीसाठी रडत सैरभैर फिरणाऱ्या मेंढ्यांसारखी आहे. पण त्यांना वळविणारा कोणीही मेंढपाळ नाही.
”हे माझ्या कुचकामी मेंढपाळा, तू माझ्या मेंढ्यांना टाकून गेलास! त्याला शिक्षा करा! त्याच्या उजव्या खांद्यावर व उजव्या डोळ्यावर तलवारीने वार करा. म्हणजे त्याचा उजवा खांदा निकामी होईल आणि तो उजव्या डोळ्याने अंधळा होईल.
”सर्व शक्तिमान परमेश्वर म्हणतो, “त्या वेळी जगातील सर्व मूर्तींचे मी उच्चाटन करीन. लोकांना त्यांची नावेसुध्दा आठवणार नाहीत. मी ढोंगी संदेष्ट्यांचा आणि अशुध्द आत्म्यांचा नायनाट करीन. एखाद्याने भविष्य वर्तविणे चालूच ठेवले, तर त्याला शिक्षा केली जाईल. त्याचे स्वत:चे आई - वडील त्याला म्हणतील, ‘परमेश्वराच्या नावाने तू खोटे बोललास तेव्हा तुला मरणाशिवाय गत्यंतर नाही.’ भविष्य वर्तविल्याबद्दल त्याचे आई - वडील त्याला भोसकतील. त्यावेळी संदेष्ट्यांना स्वत:च्या दृष्टान्तांची आणि संदेशाची लाज वाटेल. ज्यावरुन संदेष्टा ओळखाला जातो असे सणाचे कापड ते वापरणार नाहीत. भविष्याच्या नावाखाली खोटेनाटे सांगून लोकांना फसविण्यासाठी ते असे कपडे घालणार नाहीत. ‘मी संदेष्टा नाही. मी शेतकरी आहे मी लहानपणापासून शेतीच करीत आलोय.’ असे ते सांगतील.
”परमेश्वराची शिकवण याजकांना माहीत असली पाहिजे. लोकांना याजकांकडून देवाची शिकवण घेता यावी. याजक लोकांसाठी देवाचा दूत असावा.” परमेश्वर म्हणाला, “तुम्ही याजकांनी मला अनुसरायचे सोडून दिले. तुम्ही अनेक लोकांना चुकीने वागण्यासाठी आपल्या शिकवणुकीचा उपयोग केलात. लेवीबरोबरच्या कराराचा तुम्ही भंग केलात.” सर्वशक्तिमान परमेश्वर हे म्हणाला. “तुम्ही मी सांगितलेल्या मार्गाने जात नाही. माझी शिकवण लोकांना सांगत असता तुम्ही पक्षपात केलात. म्हणून मी तुम्हाला महत्वहीन करीन. लोक तुम्हाला मान देणार नाहीत.”
”न्यायीपणाकरता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य आहेत, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जेव्हा लोक माझ्यामुळे तुमचा अपमान करतात व छळ करतात आणि तुमच्याविरुध्द सर्वप्रकारचे वाईट लबाडीने बोलतात तेव्हा तुम्ही धन्य आहात. आनंद व उल्लास करा, कारण तुम्हास स्वर्गात मोठे प्रतिफळ आहे कारण तुमच्यापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचाही लोकांनी अशाचप्रकारे छळ केला.
”नियमशास्त्र किंवा संदेष्ट्यांचे ग्रंथ रद्द करावयास मी आलो आहे असा विचार करु नका; मी ते रद्द करावयास नव्हे तर ते पूर्ण करावयास आलो आहे. कारण मी तुम्हास खरे सांगतो, आकाश व पृथ्वी ही नाहीशी होतील, परंतु सर्वकाही पूर्ण झाल्याशिवाय, नियमशास्त्रातील एकही काना किंवा मात्रा रद्द होणार नाही. यास्तव जो कोणी या लहान आज्ञातील एखादी आज्ञा रद्द करील व त्याप्रमाणे लोकांस शिकवील त्यास स्वर्गाच्या राज्यात अगदी लहान म्हणतील; पण जो कोणी त्या पाळील व शिकवील त्यास स्वर्गाच्या राज्यात महान म्हणतील.
”तू आपल्या डोळ्यातील मुसळ लक्षात न घेता आपल्या भावाच्या डोळ्यातील कुसळ का पाहतोस? अथवा ‘तुझ्या डोळ्यांतले कुसळ मला काढू दे’ असे तू आपल्या भावाला कसे म्हणशील? पाहा, तुझ्या स्वतःच्या डोळ्यात तर मुसळ आहे. अरे ढोंग्या, पहिल्याने आपल्या डोळ्यांतले मुसळ काढून टाक म्हणजे आपल्या भावाच्या डोळयांतले कुसळ काढण्यासाठी तुला स्पष्टपणे पाहता येईल. जे पवित्र आहे ते कुत्र्यांना टाकू नका आणि आपले मोती डुकरांपुढे टाकू नका; टाकाल तर कदाचित ती त्यांना पायदळी तुडवतील व नंतर ती उलटून येवून तुम्हासही फाडतील.
”अरुंद दरवाजाने आत जा कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रूंद व मार्ग प्रशस्त आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ लोक आहेत. पण जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग अडचणीचा आहे आणि ज्यांस तो सापडतो ते फारच थोडके आहेत.
”खोट्या संदेष्ट्यांविषयी सावध असा. ते मेंढरांच्या वेषात घेऊन तुमच्याकडे येतात. पण खरे सांगायचे तर ते क्रूर लांडग्यांसारखे आहेत.
”जे झाड चांगले फळ देत नाही ते तोडण्यात येते व अग्नीत टाकले जाते. यास्तव त्यांना तुम्ही त्यांच्या फळांवरून ओळखाल.
”मला प्रभू, प्रभू म्हणणारा प्रत्येकजण स्वर्गाच्या राज्यात जाईलच असे नाही; तर माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे जो वागतो त्याचाच प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल. त्यादिवशी मला अनेक जण म्हणतील, हे प्रभू, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिले, तुझ्या नावाने भूते काढली व तुझ्या नावाने पुष्कळ चमत्कार केले नाहीत काय? तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की, मी तुम्हास ओळखत नाही. अहो दुराचार करणाऱ्यांनो, माझ्यापासून चालते व्हा.
”एखादा मनुष्य जर मनुष्याच्या पुत्राविरुद्ध काही बोलेल तर त्यास क्षमा करण्यात येईल पण जो कोणी पवित्र आत्म्याविरूद्ध बोलेल त्यास क्षमा होणार नाही. त्यास या युगातही क्षमा होणार नाही व येणाऱ्या युगातही होणार नाही. ज्या गोष्टी तुम्ही करता त्या तुम्ही कोण आहात हे दाखवितात.
”यास्तव मी त्याच्याबरोबर दाखल्यांनी बोलतो; कारण ते पाहत असता पाहत नाहीत आणि ऐकत असता ऐकत नाहीत व त्यांना समजतही नाही. यशयाचा संदेश त्याच्याविषयी पूर्ण होत आहे, तो असा की, तुम्ही ऐकाल तर खरे, परंतु तुम्हास समजणारच नाही, व पाहाल तर खरे, परंतु तुम्हास दिसणारच नाही;
”आता तुम्ही पेरणाऱ्याचा दाखला ऐकून घ्या. वाटेवर पेरलेला तो हा आहे की, कोणी राज्याचे वचन ऐकतो पण ते त्यास समजत नाही, तेव्हा तो दुष्ट येऊन त्याच्या अंतःकरणात पेरलेले ते हिरावून घेतो; खडकावरील पेरलेला तो हा आहे की, तो वचन ऐकतो व ते लगेच आनंदाने स्वीकारतो; परंतु त्यास मूळ नसल्याकारणाने तो थोडाच वेळ टिकतो आणि वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे तो लागलाच अडखळतो. काटेरी झाडामध्ये पेरलेला तो हा आहे की, तो वचन ऐकतो, परंतु संसाराची चिंता व द्रव्याचा मोह ही वचनाची वाढ खुंटवतात आणि तो निष्फळ होतो. चांगल्या जमिनीत पेरलेला तो हा आहे की, तो वचन ऐकून ते समजतो; तो फळ देतोच देतो; कोणी शंभरपट, कोणी साठपट, तर कोणी तीसपट असे देतो.
”येशूने त्यास उत्तर देऊन म्हटले, तुम्ही तुमच्या परंपरा चालवण्यासाठी देवाची आज्ञा का मोडता?
”हे लोक, ओठांनी माझा सन्मान करतात. पण त्यांचे अंतःकरण माझ्यापासून दूर आहे. आणि ते मनुष्याचे नियम आपली धर्मतत्त्वे म्हणून शिकवतात आणि व्यर्थच माझी उपासना करतात.
”पण त्याने उत्तर देऊन म्हटले, “प्रत्येक रोप जे माझ्या स्वर्गातील पित्याने लावले नाही ते उपटले जाईल. त्यांना जाऊ द्या. ते आंधळे वाटाडे आहेत. जर एका आंधळ्याने दुसऱ्या आंधळ्याला वाट दाखवण्याचा प्रयत्न केला तर दोघेही खड्ड्यात पडतील.”
”मी भाकरी विषयी तुम्हास बोललो नाही, तर परूशी व सदूकी यांच्या खमिराविषयी सावध राहा, असे म्हणालो, हे तुम्हास कसे समजत नाही?” तेव्हा त्यांना समजले की, त्याने त्यांना भाकरीच्या खमिराविषयी सावध राहण्यास सांगितले नव्हते तर परूशी आणि सदूकी यांच्या शिकवणुकीविषयी सावधान राहायला सांगितले होते.
”परंतु तो वळून पेत्राला म्हणाला, “अरे सैताना, माझ्यामागे हो, तू मला अडखळण आहेस कारण तू देवाच्या गोष्टींकडे लक्ष लावीत नाहीस तर मनुष्यांच्या गोष्टींकडे लक्ष लावतोस.”
”जर तुझा भाऊ तुझ्यावर अन्याय करील, तर जा अणि त्यास तुझ्यावर काय अन्याय झाला ते एकांतात सांग. जर त्यांने तुझे ऐकले तर त्यास आपला बंधू म्हणून परत मिळवला आहेस. पण जर तो किंवा ती तुझे ऐकत नसेल तर एकाला किंवा दोघांना तुझ्याबरोबर घे, यासाठी की जे काही झाले त्याविषयी साक्ष द्यायला दोन किंवा तीन जण तेथे असतील, जर तो मनुष्य लोकांचेही ऐकणार नाही तर मंडळीलाही गोष्ट कळव. जर तो मनुष्य मंडळीचेही ऐकणार नाही, तर मग तो तुला परराष्ट्रीय किंवा एखाद्या जकातदारासारखा समज.
”येशूला त्यांचा दुष्ट उद्देश माहीत होता, म्हणून तो म्हणाला, “ढोंग्यांनो, तुम्ही माझी परीक्षा का घेत आहात?
”येशू लोकांशी व त्याच्या शिष्यांशी बोलला, तो म्हणाला, नियमशास्त्राचे शिक्षक व परूशी हे मोशेच्या आसनावर बसले आहेत. म्हणून ते जसे सांगतात तसे तुम्ही करा आणि पाळा. पण तुम्ही त्यांच्या कृतीप्रमाणे तसे करू नका. याचे कारण ते सांगतात पण त्याप्रमाणे करत नाहीत. वाहावयास अवघड असे ओझे ते बांधतात व लोकांच्या खांद्यांवर देतात पण स्वतः ते ओझे उचलायला एक बोटदेखील लावत नाहीत. ते त्यांचे सर्व कामे लोकांनी पाहावे म्हणून करतात कारण ते आपली स्मरणपत्रे रूंद करतात आणि आपल्या झग्यांचे काठ मोठे करतात.
”मेजवानीच्या ठिकाणी आपल्याला विशेष मानाची जागा मिळावी असे त्यांना वाटते. तसेच यहूद्यांच्या सभास्थानात मोक्याच्या जागी बसायला त्यांना फार आवडते. बाजारातील मुख्य रस्त्याने जाता येता लोकांनी आपल्याला मान द्यावा याची त्यांना फार आवड असते आणि लोकांनी त्यांना ‘रब्बी’ म्हणावे असे त्यांना वाटते. परंतु तुम्ही स्वतःला ‘रब्बी’ म्हणवून घेऊ नका. तुम्ही सर्व एकमेकांचे भाऊ आहात, तुमचा गुरू एकच आहे. आणि जगातील कोणालाही पिता म्हणू नका कारण तुमचा पिता एकच आहे व तो स्वर्गात आहे. तुम्ही स्वतःला मालक म्हणून घेऊ नका. तुमचा मालक ख्रिस्त आहे. तुमच्यातील जो सेवक बनून तुमची सेवा करतो तो तुमच्यात सर्वात मोठा होय. जो स्वतःला मोठा समजेल त्यास कमी लेखले जाईल. स्वतःला लहान समजणारा प्रत्येकजण मोठा गणला जाईल.
”अहो, परूश्यांनो आणि नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्हास हाय, तुम्ही ढोंगी आहात! तुम्ही स्वर्गाच्या राज्याचा रस्ता लोकांसाठी बंद करता, तुम्ही स्वतः तर आत जात नाहीच, पण जे आत जाण्याचा प्रयत्न करतात त्यांनाही आत जाऊ देत नाहीत. अहो परूश्यांनो व नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, ढोंग्यांनो तुमची केवढी दुर्दशा होणार कारण तुम्ही विधवांची घरे खाऊन टाकता व ढोंगाने लांब लांब प्रार्थना करता; यामुळे तुम्हास अधिक शिक्षा होइल. परूश्यांनो व नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दुःखी व्हाल. तुम्ही ढोंगी आहात कारण तुम्ही एक मतानुसारी करण्यासाठी समुद्र व भूमी पालथी घालता आणि तुम्हास तो मिळाला म्हणजे तुम्ही त्यास आपल्याहून दुप्पट नरकपुत्रासारखे करून टाकता.
”परूश्यांनो, नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दुःखी व्हाल. तुम्ही ढोंगी आहात! तुमचे जे काही आहे त्याचा दशांश तुम्ही देवाला देता; पुदिना, शेप, जिरे यांचा देखील दशांश देता. पण नियमशास्त्राच्या महत्त्वाच्या गोष्टी म्हणजे: न्याय, दया व विश्वास या गोष्टी तुम्ही सोडल्या आहेत; पण तुम्ही या करायच्या होत्या आणि त्या सोडावयाच्या नव्हत्या. तुम्ही आंधळे वाटाडे आहात. तुम्ही डास गाळून काढता व उंट गिळून टाकता. अहो परूश्यांनो, नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दुःखी व्हाल, तुम्ही ढोंगी आहात! तुम्ही आपल्या ताट व वाट्या बाहेरून साफ करता पण ते आतून अपहार आणि असंयम यांनी त्या आतून भरल्या आहेत. अहो परूश्यांनो, तुम्ही आंधळे आहात! अगोदर तुमची वाटी आतून घासा व धुवा म्हणजे ती बाहेरून देखील खरोखर साफ होईल. अहो परूश्यांनो नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दुःखी व्हाल. तुम्ही ढोंगी आहात! रंगसफेदी केलेल्या कबरांसारखे तुम्ही आहात. त्यावरून चांगल्या दिसतात पण आतून मरण पावलेल्या मनुष्यांच्या हाडांनी भरल्या आहेत. तुम्ही सर्व लोकांस बाहेरून नीतिमान दिसता पण तुम्ही आतून ढोंग व दुष्टपणा यांनी भरलेले आहात.
”अहो, परूश्यांनो, नियमशास्त्राच्या शिक्षकांनो, तुम्ही दुःखी व्हाल. तुम्ही ढोंगी आहात! तुम्ही संदेष्ट्यांच्या कबरा बांधता आणि जे लोक नीतिमान जीवन जगले त्यांच्या कबरा सजवता. आणि तुम्ही म्हणता जर आम्ही आमच्या वाडवडिलांच्या काळात जिवंत असतो तर संदेष्ट्यांच्या रक्तात त्यांचे भागीदार झालो नसतो. पण ज्यांनी ज्यांनी संदेष्ट्यांना जिवे मारले, त्यांचेच तुम्ही वंशज आहात असा स्वतःविषयी पुरावा तुम्ही देता. पुढे व्हा आणि तुमच्या वाडवडिलांनी सुरू केलेली पापी कामे पूर्ण करा. तुम्ही साप व विषारी सापाची पिल्ले आहात. तुम्ही नरकाच्या शिक्षेपासून कसे पळाल? मी तुम्हास सांगतो की मी तुमच्याकडे संदेष्टे, ज्ञानी लोक आणि शिक्षक पाठवत आहे. त्यांच्यातील काहींना तुम्ही जिवे माराल. त्यांपैकी काहींना वधस्तंभावर खिळाल. त्यांच्यातील काहींना तुमच्या सभास्थानात फटके माराल आणि एका नगरातून दुसऱ्या नगरात तुम्ही त्यांचा पाठलाग कराल. म्हणजे नीतिमान हाबेल याच्या रक्तापासून तुम्ही ज्याला वेदी आणि पवित्रस्थान यांच्यामध्ये ठार मारले तो बरख्याचा पुत्र जखऱ्या याच्या रक्तापर्यंत, सर्व नीतिमान लोकांचे रक्त पृथ्वीवर पाडण्यात आले आहे त्यांचा दोष तुमच्यावर यावा.
”येशूने त्यांना उत्तर दिले, सांभाळ कोणीही तुम्हास फसवू नये. कारण माझ्या नावाने पुष्कळजण येतील आणि म्हणतील, मी ख्रिस्त आहे आणि ते पुष्कळ लोकांस फसवतील.
”मग पुष्कळांना अडथळा होईल. ते एकमेकांविरुद्ध उठतील आणि एकमेकांचा व्देष करतील. अनेक खोटे संदेष्टे उठतील आणि, ते पुष्कळांना फसवतील. सतत वाढणाऱ्या दुष्टाईमुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल.
”खोटे ख्रिस्त आणि खोटे संदेष्टे उदयास येतील. ते महान आश्चर्यकारक चिन्हे दाखवतील. देवाच्या निवडलेल्या लोकांस ते चिन्हे दाखवतील व लोकांस एवढेच नव्हे तर देवाच्या निडवलेल्यांना फसविण्याचा प्रयत्न करतील. या गोष्टी होण्याअगोदरच मी तुम्हास सावध केले आहे.
”आकाश आणि पृथ्वी नाहीशी होतील पण माझी वचने कधीही नष्ट होणार नाहीत.
”तेव्हा येशू त्यांच्याकडे आला आणि म्हणाला, “स्वर्गात आणि पृथ्वीवर मला सर्व अधिकार देण्यात आला आहे. म्हणून तुम्ही जा आणि राष्ट्रांतील लोकांस माझे शिष्य करा. पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावाने बाप्तिस्मा द्या. आणि जे काही मी तुम्हास शिकविले आहे ते त्या लोकांस पाळायला शिकवा आणि पाहा, युगाच्या शेवटापर्यंत मी सदोदित तुमच्याबरोबर आहे.”
”पेरणारा वचन पेरतो. वाटेवर वचन पेरले जाते तेथील लोक हे आहेत की, त्यांनी ऐकल्याबरोबर सैतान येऊन त्यांच्यातले पेरलेले वचन हिरावून घेतो. तसेच खडकाळ जमिनीत पेरलेले हे आहेत की, वचन ऐकताच ते आनंदाने ग्रहण करतात; तथापि त्यांच्यामध्ये मूळ नसल्याकारणाने ते थोडा काळच टिकाव धरतात; मग वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे ते लगेच अडखळतात. काटेरी झुडपांमध्ये पेरलेले हे आहेत की, ते वचन ऐकून घेतात, परंतु संसाराची चिंता, संपत्तीचा मोह व इतर गोष्टींचा लोभ ही त्यांच्यामध्ये शिरून वचनाची वाढ खुंटवतात आणि ते निष्फळ होते. चांगल्या जमिनीत पेरलेले हे आहेत की, ते वचन ऐकून ते स्वीकारतात मग कोणी तीसपट, कोणी साठपट, कोणी शंभरपट असे पीक देतात.”
”येशू त्यांना म्हणाला, “यशयाने जेव्हा तुम्हा ढोंगी लोकांविषयी भविष्य केले तेव्हा त्याचे बरोबरच होते. यशया लिहितो, ‘हे लोक ओठांनी माझा सन्मान करतात परंतु त्याची अंतःकरणे माझ्यापासून दूर आहेत. ते व्यर्थ माझी उपासना करतात कारण ते लोकांस शास्त्र म्हणून जे शिकवतात ते मनुष्यांनी केलेले नियम असतात.’
”तुम्ही देवाच्या आज्ञांचा त्याग केला असून, आता तुम्ही मनुष्याची परंपरा पाळत आहात.” आणखी तो त्यांना म्हणाला, “तुम्ही आपल्या परंपरा पाळण्याकरता देवाची आज्ञा मोडण्यासाठी सोयीस्कर पद्धत शोधून काढली आहे.
”कारण काही लोक आपण खोटे ख्रिस्त किंवा खोटे संदेष्टे असल्याचा दावा करतील आणि शक्य झाले तर ते निवडलेल्या लोकांस फसवण्यासाठी चिन्हे व आश्चर्यकर्म करतील. पहा, तेव्हा तुम्ही सावध राहा. मी काळापूर्वीच तुम्हास सर्वकाही सांगून ठेवले आहे.
”स्वर्ग आणि पृथ्वी नाहीशी होतील पण माझी वचने नाहीशी होणारच नाहीत.
”येशूने त्यास उत्तर दिले, पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, मनुष्य फक्त भाकरीनेच जगेल असे नाही.
”जेव्हा सर्व तुमच्याविषयी चांगले बोलतील तेव्हा तुम्हास दुःख होवो कारण त्यांच्या वाडवडिलांनी खोट्या संदेष्ट्यांना असेच केले.
”त्याने त्यांना एक दाखला सांगितला, “एक आंधळा दुसऱ्या आंधळ्याला मार्ग दाखवू शकेल काय? ते दोघेही खड्डयात पडणार नाहीत काय? कोणताही शिष्य त्याच्या गुरुपेक्षा थोर नाही. पण प्रत्येक शिष्य जेव्हा पूर्ण शिकतो तेव्हा तो गुरुसारखाच होतो.
”तर दाखला हा आहे बी हे देवाचे वचन आहे. आणि जे वाटेवरचे ते ऐकणारे आहेत, पण त्यानंतर सैतान येतो आणि त्यांनी विश्वास धरून तारण पावू नये म्हणून त्यांच्या अंतःकरणातून वचन काढून घेतो. आणि जे खडकाळीवरचे हे आहेत की, ते ऐकतात तेव्हा वचन आनंदाने घेतात, पण त्यांना मूळ नसते; ते काही वेळेपर्यंत विश्वास धरतात व परीक्षेच्या वेळी गळून पडतात. आणि काटेरी झाडांमध्ये पडणारे बी हे ऐकणारे आहेत, पण पुढे जाता जाता चिंता व धन व या जीवनातली सुखे यांनी गुदमरून जातात व भरदार फळ देत नाहीत. पण चांगल्या जमिनीत पडणारे बी हे असे आहेत, की ते वचन ऐकून ते भल्या व चांगल्या अंतःकरणात घट्ट धरून ठेवतात आणि धीराने पीक देत जातात.
”कारण प्रकट होणार नाही असे काही झाकलेले नाही किंवा कळणार नाही व उघडकीस येणार नाही असे काही गुप्त नाही. म्हणून तुम्ही कसे ऐकता यांविषयी जपा, कारण ज्याच्याजवळ आहे त्यास दिले जाईल आणि ज्याच्याजवळ नाही त्याच्याजवळ जे आहे म्हणून त्यास वाटते ते देखील त्याच्यापासून काढून घेतले जाईल.
”नियमशास्त्राचा एकही काना किंवा मात्रा नाहीसा होण्यापेक्षा आकाश व पृथ्वीचे नाहीसे होणे सोपे आहे.
”येशू म्हणाला, “तुम्हास कोणी फसवू नये म्हणून सावध राहा कारण माझ्या नावाने पुष्कळ येतील आणि ‘तो मी आहे’ असे म्हणतील आणि ते म्हणतील, ‘वेळ जवळ आली आहे. त्यांच्यामागे जाऊ नका!’
”आकाश व पृथ्वी नाहीशी होतील पण माझी वचने मुळीच नाहीशी होणार नाही.
”असे असले तरी येशू त्यांना ओळखून असल्यामुळे त्यास स्वतःला त्यांच्यावर विश्वास नव्हता. शिवाय, मनुष्याविषयी कोणीही साक्ष द्यावी याची त्यास गरज नव्हती; कारण मनुष्यात काय आहे हे तो ओळखीत होता.
”जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा न्याय होणार नाही, पण जो विश्वास ठेवत नाही त्याचा न्याय झालेलाच आहे; कारण, त्याने देवाच्या एकुलत्या एक पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही. आणि न्याय हाच आहे की, जगात प्रकाश आला आहे; पण मनुष्यांनी प्रकाशापेक्षा अंधाराची आवड धरली, कारण त्यांची कृत्ये वाईट होती; कारण जो कोणी वाईट कृत्ये करतो तो प्रकाशाचा द्वेष करतो आणि आपली कृत्ये उघडकीस येऊ नयेत म्हणून प्रकाशाकडे येत नाही.
”तरी खरे उपासक आत्म्याने व खरेपणाने स्वर्गीय पित्याची उपासना करतील अशी वेळ येत आहे, किंबहुना आलीच आहे; कारण आपले उपासक असेच असावेत, अशी पित्याची इच्छा आहे. देव आत्मा आहे; आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे.”
”त्यावरून येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, “माझी शिकवण माझी नाही तर ज्याने मला पाठविले त्याची आहे. जो कोणी त्याच्या इच्छेप्रमाणे करण्याची इच्छा बाळगील त्यालाही शिकवण देवापासून आहे किंवा मी आपल्या मनाचे बोलतो हे समजेल.
”मोशेने तुम्हास नियमशास्त्र दिले की नाही? तर तुम्ही कोणीही नियमशास्त्र पाळीत नाही. तुम्ही मला ठार मारायला का पाहता?” लोकांनी त्यास उत्तर देऊन म्हटले, “तुला भूत लागले आहे. तुला ठार मारायला कोण पाहतो?”
”तोंड पाहून न्याय करू नका तर यथार्थ न्याय करा.”
”पुढे येशू पुन्हा त्यांना म्हणाला, “मीच जगाचा प्रकाश आहे; जो मला अनुसरतो तो अंधारात चालणारच नाही, तर त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.”
”ज्या यहूद्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना येशू म्हणाला, “तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहात. तुम्हास सत्य समजेल आणि सत्य तुम्हास बंधनमुक्त करील.”
”तुम्ही माझे बोलणे का समजून घेत नाही? याचे कारण हेच की, तुमच्याकडून माझे वचन ऐकवत नाही. तुम्ही आपला पिता सैतान यापासून झाला आहात आणि तुमच्या पित्याच्या वासनांप्रमाणे करू पाहता. तो प्रारंभापासून मनुष्य घात करणारा होता आणि तो सत्यात टिकला नाही, कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो जेव्हा खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचे बोलतो, कारण तो लबाड व लबाडीचा पिता आहे.
”देवापासून असणारा देवाची वचने ऐकतो. तुम्ही देवापासून नाही म्हणून तुम्ही ऐकत नाही.”
”तेव्हा येशू म्हणाला, “मी न्यायनिवाड्यासाठी या जगात आलो आहे; यासाठी की, ज्यांना दिसत नाही त्यांना दिसावे आणि ज्यांना दिसते त्यांनी आंधळे व्हावे.” तेव्हा परूश्यांतील जे त्याच्याबरोबर होते त्यांनी या गोष्टी ऐकल्या; आणि ते त्यास म्हणाले, “आम्ही पण आंधळे आहोत काय?” येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही आंधळे असता तर तुम्हास पाप नसते, परंतु तुम्ही म्हणता की, ‘आम्हास आता दिसते’, म्हणून तुमचे पाप तसेच राहते.”
”मी तुम्हास खरे खरे सांगतो, जो मेंढवाड्यांत दरवाजातून न जातां दुसरीकडून चढून जातो, तो चोर आणि लुटारू आहे जो दरवाजाने आत जातो तो मेंढपाळ आहे. त्याच्यासाठी द्वारपाल दरवाजा उघडतो आणि मेंढरे त्याची वाणी ऐकतात. तो आपल्या मेंढरांना ज्याच्या त्याच्या नावाने हाक मारतो आणि त्यांना बाहेर नेतो; आणि आपली सर्व मेंढरे बाहेर काढल्यावर तो त्यांच्यापुढे चालतो आणि मेंढरे त्याच्यामागे चालतात; कारण ती त्याचा वाणी ओळखतात. ती परक्याच्या मागे कधीच जाणार नाहीत, तर ती त्याच्यापासून पळतील; कारण ती परक्यांची वाणी ओळखीत नाहीत.
”जो मेंढपाळ नाही तर मोलकरीच आहे आणि ज्याची स्वतःची मेंढरे नाहीत, तो लांडग्याला येत असलेले पाहून मेंढरे सोडून पळून जातो; आणि लांडगा त्यांच्यावर झडप घालून धरतो त्यांची दाणादाण करतो. मोलकरी पळून जातो कारण तो मोलकरीच आहे आणि त्यास मेंढरांची काळजी नाही.
”त्याने त्यांच्यासमोर इतकी चिन्हे केली असतांही त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही; हे यासाठी झाले की, यशया संदेष्ट्याने जे वचन सांगितले होते ते पूर्ण व्हावे, ते असेः ‘प्रभू, आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे? परमेश्वराचा भूज कोणास प्रकट झाला आहे?’ म्हणून त्यांना विश्वास ठेवता आला नाही; या कारणाने यशया पुन्हा म्हणाला, ‘त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, अंतःकरणाने समजू नये, वळू नये व मी त्यांना बरे करू नये म्हणून त्याने त्यांचे डोळे आंधळे केले व अंतःकरण कठीण केले आहे.’
”जो माझा अवमान करतो आणि माझी वचने स्वीकारीत नाही त्याचा न्याय करणारे कोणी आहे. जे वचन मी सांगितले, तेच शेवटल्या दिवशी, त्याचा न्याय करील.
”येशूने त्यास म्हटले, “मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्याशिवाय पित्याकडे कोणी येत नाही.
”माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल.
”तो सत्याचा आत्मा आहे, जग त्यास ग्रहण करू शकत नाही, कारण ते त्यास पाहत नाही अथवा त्यास ओळखीत नाही; तुम्ही त्यास ओळखता, कारण तो तुम्हाबरोबर राहतो आणि तो तुम्हामध्ये वस्ती करील.
”तरी ज्याला पिता माझ्या नावाने पाठवील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हास सर्वकाही शिकवील आणि ज्या गोष्टी मी तुम्हास सांगितल्या त्या सर्वाची तुम्हास आठवण करून देईल.
”पण जो पित्यापासून निघतो, ज्याला मी पित्यापासून तुम्हाकडे पाठवीन तो कैवारी म्हणजे सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो माझ्याविषयी साक्ष देईल.
”पण तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हास मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल, कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही; तर जे ऐकेल तेच सांगेल आणि होणार्या गोष्टी तुम्हास कळवील.
”तू त्यांना सत्यात पवित्र कर. तुझे वचन हेच सत्य आहे.
”तेव्हा पेत्र म्हणाला, हनन्या, तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावी आणि जमिनीच्या किंमतीतून काही ठेवून घ्यावे म्हणून सैतानाने तुझे मन का भरले आहे? ती होती तोपर्यंत तुझी स्वतःची नव्हती काय? आणि ती विकल्यानंतर त्याची आलेली किंमत तुझ्याच स्वाधीन नव्हते काय? ही गोष्ट तू आपल्या मनात का आणली? तू मनुष्याशी नाही, तर देवाशी लबाडी केली आहे.
”अहो ताठ मानेच्या आणि हृदयांची व कानांची सुंता न झालेल्या, लोकांनो तुम्ही तर पवित्र आत्म्याला; सर्वदा विरोध करता जसे तुमचे पूर्वज तसेच तुम्हीही.
”तुमची स्वतःची व देवाच्या सर्व लोकांची, ज्याना देवाने तुम्हास दिलेले आहे, त्यांची काळजी घ्या, कळपाची (देवाच्या लोकांची) काळजी घेण्याचे काम पवित्र आत्म्याने तुम्हास दिलेले आहे, तुम्ही मंडळीसाठी मेंढपाळासारखे असले पाहिजे, ही मंडळी देवाने स्वतःचे रक्त देऊन विकत घेतली.
”मला माहीत आहे की, मी गेल्यावर तुमच्यामध्ये भयंकर असे दुष्ट लांडगे येतील, ते कळपाला सोडणार नाहीत. तुमच्यामधूनसुद्धा लोक उठून शिष्यांना, चुकीचे असे शिकवून आपल्यामागे घेऊन जातील. यासाठी सावध राहा, तुम्हातील प्रत्येकाला गेले तीन वर्षे डोळ्यांत अश्रू आणून सावध करण्याचे मी कधीच थांबविले नाही हे आठवा.
”मी तुला त्यांच्याकडे पाठवतो, ह्यासाठी की, त्यांनी अंधारांतून निघून उजेडाकडे व सैतानाच्या अधिकारातून देवाकडे वळावे, म्हणून तू त्यांचे डोळे उघडावे आणि त्यांना पापाची क्षमा व्हावी व माझ्यावरील विश्वासाने पवित्र झालेल्या लोकांमध्ये वतन मिळावे.
”वास्तविक जी माणसे अभक्ती, सत्य दाबतात अशा लोकांच्या अनीतीवर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रकट होतो.
”कारण जगाच्या उत्पत्तीपासून करण्यात आलेल्या गोष्टींवरून त्याचे सर्वकाळचे सामर्थ्य व देवपण या त्याच्या अदृश्य गोष्टी समजत असल्याने स्पष्ट दिसतात, म्हणून त्यांना काही सबब नाही. कारण त्यांनी देवाला ओळखले असता त्यांनी त्याचे देव म्हणून गौरव केले नाही किंवा उपकार मानले नाहीत. पण ते स्वतःच्या कल्पनांत विचारहीन झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकारमय झाले.
”स्वतःला ज्ञानी म्हणता म्हणता ते मूर्ख बनले.
”त्यांनी देवाच्या सत्याच्या ऐवजी असत्य घेतले आणि निर्माणकर्त्याच्या जागी निर्मितीची उपासना व सेवा केली. तो निर्माणकर्ता तर युगानुयुग धन्यवादित देव आहे. आमेन.
”कारण नियमशास्त्राचे श्रवण करणारे देवापुढे नीतिमान आहेत असे नाही, पण नियमशास्त्राचे आचरण करणारे नीतिमान ठरतील.
”कधीच नाही! देव खरा व प्रत्येक मनुष्य खोटा ठरो. शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘तुझ्या बोलण्यात तू नीतिमान ठरावेस, आणि तुझा न्याय होत असता विजयी व्हावेस.’
”ज्याला समजते असा कोणी नाही, जो झटून देवाचा शोध करतो असा कोणी नाही, ते सगळे बहकले आहेत, ते सगळे निरुपयोगी झाले आहेत; सत्कर्म करणारा कोणी नाही, एकही नाही. त्यांचा घसा एक उघडलेले थडगे आहे. ते आपल्या जीभांनी कपट योजतात, त्यांच्या ओठांखाली सर्पाचे विष असते.
”म्हणून नियमशास्त्र पवित्र आहे, तशीच आज्ञा पवित्र, न्याय्य आणि चांगली आहे.
”मी ख्रिस्तात खरे सांगतो, मी खोटे बोलत नाही आणि माझा विवेक पवित्र आत्म्यात, साक्ष देत आहे
”कारण त्यांच्याविषयी मी साक्ष देतो की, त्यांना देवाविषयी ईर्ष्या आहे, पण ती ज्ञानामुळे नाही. कारण ते देवाच्या नीतिमत्त्वाविषयी अज्ञानी असता आणि स्वतःचे नीतिमत्त्व प्रस्थापित करू पाहत असता ते देवाच्या नीतिमत्त्वाला वश झाले नाहीत. कारण ख्रिस्त हा विश्वास ठेवणार्या प्रत्येकाला नीतिमत्त्वासाठी नियमशास्त्राचा शेवट आहे.
”तर मग ऐकण्यामुळे विश्वास होतो आणि ख्रिस्ताच्या वचनामुळे ऐकणे होते.
”कारण नियमशास्त्रात असे लिहिले आहे की, ‘देवाने त्यांना या दिवसापर्यंत सुस्तीचा आत्मा दिला आहे; त्यांनी पाहू नये असे डोळे आणि त्यांनी ऐकू नये असे कान दिले आहेत.’
”जो विश्वासात दुर्बळ आहे त्याचा स्वीकार करा, पण त्याच्या मतभेदाविषयी वाद करण्यास नाही.
”आता, बंधूंनो, मी तुम्हास विनंती करतो की, तुम्ही शिकलेल्या शिकवणीविरुद्ध जे फुटी व अडथळे निर्माण करतात त्यांच्यावर लक्ष ठेवून त्यांना टाळा. कारण असे लोक जो ख्रिस्त आपला प्रभू आहे त्याची सेवा करीत नाहीत पण आपल्या पोटाची सेवा करतात आणि गोड भाषणे व प्रशंसा करून भोळ्या मनुष्यांची मने बहकवतात;
”म्हणून, देवाचे ज्ञान असतानाही, या जगाला स्वतःच्या ज्ञानाने देवाला ओळखता आले नाही, तेव्हा आम्ही जो “मूर्खपणाचा” संदेश गाजवितो त्यामुळे जे विश्वास ठेवणारे आहेत त्यांचे तारण करण्याचे देवाला बरे वाटले. कारण अनेक यहूदी लोक चमत्काराची चिन्हे विचारतात आणि ग्रीक लोक ज्ञानाचा शोध घेतात, परंतु आम्ही वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवितो. हा संदेश यहूदी लोकांसाठी अडखळण आणि ग्रीकांसाठी मूर्खपणा असा आहे. परंतु ज्यांना बोलावलेले आहे, अशा यहूदी व ग्रीक दोघांसही ख्रिस्त हा संदेश आहे तो देवाचे सामर्थ्य व देवाचे ज्ञान असाही आहे. तथापि ज्यांस तुम्ही देवाचा “मूर्खपणा” म्हणता ते मानव प्राण्याच्या शहाणपणापेक्षा अधिक शहाणपणाचे आहे आणि ज्यांस तुम्ही देवाचा “दुर्बळपणा” समजता ते मानव प्राण्याच्या सशक्तपणाहून अधिक शक्तिशाली आहे.
”बंधूनो, जेव्हा मी तुमच्याकडे आलो तेव्हा मी देवाविषयीचे सत्य रहस्य मानवी ज्ञानाने किंवा उत्कृष्ट भाषण करून सांगत आलो असे नाही. कारण तुमच्यामध्ये असताना फक्त येशू ख्रिस्त आणि तोसुध्दा वधस्तंभावर खिळलेला, याशिवाय कशाचेही ज्ञान मला असू नये असा मी ठाम निश्चय केला आहे. आणि मी तुमच्याकडे अशक्त, भयभीत व थरथर कापत आलो. माझे भाषण व घोषणा हे मन वळविणाऱ्या मानवी ज्ञानाद्वारे दिलेले नव्हते पण ते आत्मा आणि त्याचे सामर्थ्य यांच्या द्वारे होते. जेणेकरून तुमचा विश्वास मानवी ज्ञानावर नव्हे तर देवाच्या सामर्थ्यावर असावा.
”तरीपण, जे आत्मिक परीपक्व आहेत त्यांना आम्ही ज्ञान सांगतो परंतु ते ज्ञान या जगाचे नाही आणि या युगाचे नाहीसे होणारे जे अधिकारी त्यांचेही नाही. तर देवाचे रहस्यमय ज्ञान आम्ही सांगतो ते गुप्त ठेवलेले होते, ते देवाने युगाच्या पूर्वी तुमच्याआमच्या गौरवासाठी नेमले होते. हे ज्ञान या युगाच्या कोणाही अधिकाऱ्याला माहीत नव्हते कारण जर त्यांना कळले असते, तर त्यांनी गौरवी प्रभूला वधस्तंभावर खिळले नसते.
”कारण मनुष्याच्या आत्म्याशिवाय मनुष्याच्या गोष्टी ओळखणारा दुसरा कोण मनुष्य आहे? त्याप्रमाणेच देवाच्या आत्म्याशिवाय देवाचे खोल विचार कोणीच ओळखू शकत नाही. परंतु आम्हास जगाचा आत्मा मिळाला नाही, तर देवापासूनचा आत्मा मिळाला आहे. यासाठी की, देवाने आपल्याला जे कृपेने दिले ते आपण ओळखून घ्यावे. मानवी ज्ञानाने शिकवलेल्या शब्दांनी आम्ही या गोष्टी सांगत नाही, तर आत्म्याने शिकवलेल्या शब्दांनी, आत्मिक शब्द उपयोगात आणून आध्यात्मिक गोष्टींचे स्पष्टीकरण करतो.
”स्वाभाविक मनुष्य देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारत नाही कारण त्या त्यास मूर्खपणाच्या वाटतात आणि तो त्या मानीत नाही, कारण त्या आत्म्याने समजायच्या असतात. जो आत्मिक आहे तो तर सर्व गोष्टी समजतो तरी त्याची स्वतःची पारख कोणाकडूनही होत नाही. कारण पवित्र शास्त्र म्हणते, “प्रभूचे मन कोण जाणतो? जो त्यास शिकवू शकेल?” परंतु आपल्याला तर ख्रिस्ताचे मन आहे.
”येशू ख्रिस्त हा जो घातलेला पाया आहे, त्याच्यावाचून इतर कोणीही दुसरा पाया घालू शकत नाही.
”कोणीही स्वतःला फसवू नये, जर कोणी स्वतःला या जगाच्या दृष्टीने ज्ञानी समजत असेल तर त्याने खरोखर ज्ञानी होण्यासाठी “मूर्ख” व्हावे. कारण या जगाचे ज्ञान देवाच्या दृष्टीने मूर्खपणाचे आहे; कारण असे पवित्र शास्त्रात लिहिले आहे की, “देव ज्ञान्यांना त्यांच्याच धूर्तपणात धरतो.” आणि पुन्हा “परमेश्वर जाणतो की, ज्ञान्यांचे विचार व्यर्थ आहेत.”
”तर मग माझे वेतन काय? एवढेच की, मी शुभवर्तमान सांगताना, ते फुकट सांगावे आणि शुभवर्तमानाविषयीच्या माझ्या अधिकाराचा मी दुरुपयोग करू नये.
”आणि त्यांच्यातील काहीजणांनी पाहिली तशी आपण ख्रिस्ताची परीक्षा पाहू नये. याचा परिणाम असा झाला की, ते सापांकडून मारले गेले.
”जर कोणाला वाद घालायचा असेल तर मला दाखवून द्या की, आमची अशी रीत नाही व देवाच्या मंडळ्यांचीही नाही.
”प्रथम, मी ऐकतो की, जेव्हा मंडळीमध्ये तुम्ही एकत्र जमता, तेथे तुमच्यामध्ये फुटी असतात आणि काही प्रमाणात त्यावर विश्वास ठेवतो. यासाठी की, जे तुमच्यामध्ये स्वीकृत आहेत ते प्रकट व्हावे म्हणून तुम्हामध्ये पक्षभेद असलेच पाहिजे.
”म्हणून जो कोणी अयोग्य रीतीने प्रभूची भाकर खाईल किंवा प्याला पिईल तो प्रभूच्या शरीराविषयी आणि रक्ताविषयी दोषी ठरेल. म्हणून मनुष्याने स्वतःची परीक्षा करावी आणि नंतर त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यातून प्यावे. कारण जर तो प्रभूच्या शरीराचा अर्थ न जाणता ती भाकर खातो व पितो तर तो खाण्याने आणि पिण्याने स्वतःवर दंड ओढवून घेतो. याच कारणामुळे तुम्हातील अनेक जण आजारी आहेत आणि काहीजण मरण पावले आहेत. परंतु जर आम्ही आमची परीक्षा करू तर आमच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही. परंतु प्रभूकडून आमचा न्याय केला जातो तेव्हा आम्हास शिस्त लावण्यात येते, यासाठी की, जगातील इतर लोकांबरोबर आम्हासही शिक्षा होऊ नये.
”पण मी मंडळीत अन्य भाषेत दहा हजार शब्द बोलण्यापेक्षा, दुसर्यांनाही शिकवावे म्हणून, मी माझ्या बुद्धीने पाच शब्द बोलावे हे मला बरे वाटते. बंधूनो, तुम्ही विचार करण्यात मुलासारखे असू नका. त्याऐवजी दुष्टतेच्या बाबतीत लहान बाळासारखे निरागस परंतु आपल्या विचारात प्रौढ व्हा. नियमशास्त्र म्हणते, “इतर भाषा बोलणाऱ्याचा उपयोग करून व अन्य भाषेने मी या लोकांशी बोलेन तरीसुद्धा ते माझे ऐकणार नाहीत.” हे असे प्रभू म्हणतो.
”कारण देव हा बेशिस्तपणा आणणारा नसून, शांती आणणारा देव आहे. जशा सर्व मंडळ्या देवाच्या पवित्र लोकांच्या बनलेल्या असतात, स्त्रियांनी मंडळीत शांत रहावे, कारण त्यांना मंडळीत बोलण्याची परवानगी देण्यात आलेली नाही, कारण नियमशास्त्रसुद्धा असेच म्हणते. त्यांना जर काही शिकायचे असेल तर त्यांनी स्वतःच्या पतीला घरी विचारावे कारण स्त्रीने मंडळीत बोलणे हे तिला लज्जास्पद आहे. देवाचे वचन तुम्हांपासून निघाले आहे काय? किंवा ते फक्त तुमच्यापर्यंतच आले आहे काय? एखादा जर स्वतःला संदेष्टा समजत असेल किंवा जर तो आत्मिक मनुष्य असेल तर त्याने हे ओळखले पाहिजे की, जे मी तुम्हास लिहित आहे ती परमेश्वराकडून देण्यात आलेली आज्ञा आहे. परंतु जर कोणी हे मानत नसेल, तर न मानो.
”आता बंधूंनो मी तुम्हास आठवण करून देतो, की जे शुभवर्तमान मी तुम्हास गाजवले व जे तुम्ही स्वीकारलेत व ज्याच्यात तुम्ही स्थिरही आहात. ज्याच्या द्वारे तुम्हास तारण मिळाले आहे तेच शुभवर्तमान मी तुम्हास कळवतो. ज्या वचनाने तुम्हासही शुभवर्तमान सांगितले त्या वचनानुसार ते तुम्ही दृढ धरले असल्यास त्याच्या योगे तुमचे तारणही होत आहे; नसल्यास तुमचा विश्वास व्यर्थ आहे.
”फसू नका, “वाईट सोबतीने चांगल्या सवयी बिघडतात.” नीतिमत्त्वासंबंधाने शुद्धीवर या आणि पाप करीत जाऊ नका कारण तुम्हापैकी काहीजण देवाविषयी अज्ञानी आहेत. हे मी तुम्हास लाजविण्यासाठी बोलतो.
”यासाठी सैतानाने आपल्याला ठकवू नये; कारण आपण त्याच्या दुष्ट योजना जाणत नाही असे नाही.
”पण देवाचे आभार मानतो जो ख्रिस्तामध्ये नेहमी आम्हास विजयाने नेतो आणि त्याच्याविषयीच्या ज्ञानाचा सुगंध प्रत्येक ठिकाणी आमच्याद्वारे सगळीकडे पसरवितो. कारण ज्यांचे तारण होत आहे अशा लोकात आणि ज्यांचा नाश होत आहे अशा लोकात आम्ही देवाला ख्रिस्ताचा सुवास आहोत. ज्या लोकांचा नाश होत आहे, मृत्युचा मरणसूचक वास आणि जे तारले गेले आहेत, जीवनाकडे नेणारा जीवनाचा वास आहोत आणि या गोष्टींसाठी कोण लायक आहे? कारण दुसर्या कित्येकांसारखे देवाच्या वचनाची भेसळ करणारे आम्ही नाही पण आम्ही शुद्ध भावाने, देवाचे म्हणून देवाच्या दृष्टीपुढे ख्रिस्तात बोलतो.
”त्याने आम्हास नव्या कराराचे सेवक होण्यास पात्र केले. तो लेखाद्वारे केलेला नाही, पण पवित्र आत्म्याद्वारे केलेला आहे कारण लेख मारून टाकतो पण पवित्र आत्मा जिवंत करतो.
”पण त्यांची मने कठीण केली गेली कारण आजवर ते आच्छादन, तसेच जुन्या कराराच्या वाचनात, न काढलेले राहिले आहे; ते ख्रिस्तात नाहीसे झाले आहे. पण आजपर्यंत ते आच्छादन, ते मोशेचे ग्रंथ वाचन करीत असता, त्यांच्या मनावर घातलेले असते. पण ते जेव्हा प्रभूकडे वळेल तेव्हा ते आच्छादन काढले जाईल.
”आम्ही लज्जास्पद गुप्त गोष्टी आम्ही सोडल्यात; आम्ही कपटाने वागत नाही किंवा आम्ही देवाचे वचन फसवेपणाने हाताळीत नाही तर देवाच्या दृष्टीसमोर खरेपण प्रकट करण्यास आम्ही आपणांसमोर सर्व लोकांच्या सद्सदविवेकबुद्धीला पटवितो. पण आमची सुवार्ता आच्छादली गेली असेल तर ज्यांचा नाश होत आहे त्यांच्यासाठी ती आच्छादली गेली आहे. जो ख्रिस्त देवाचे प्रतिरूप आहे त्याच्या गौरवाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांना प्रकाशमान होऊ नये म्हणून, असे जे विश्वास ठेवत नाहीत, त्यांची मने या युगाच्या दुष्ट दैवताने आंधळी केलीली आहेत.
”कारण आमच्या लढाईची शस्त्रे दैहिक नाहीत, तर देवासाठी तटबंदी नाश करण्यास ती समर्थ आहेत. चुकीच्या वादविवादातून काहीच निष्पन्न होत नाही. तर्कवितर्क व देवविषयक ज्ञानाविरूद्ध उंच उभारलेले असे सर्वकाही पाडून टाकून आम्ही प्रत्येक विचार अंकित करून तिला ख्रिस्ता पुढे मान झुकवण्यास लावतो. आणि तुम्ही आज्ञापालनांत पूर्ण व्हाल तेव्हा सर्व आज्ञाभंगाबद्दल शासन करण्यास आम्ही सिद्ध आहोत.
”पण मला भीती वाटते की जसे हव्वेला सर्पाने कपट करून फसवले तसे तुमचे विचार कसे तरी बिघडून ती ख्रिस्ताची शुद्ध भक्ती व सरळपण ह्यापासून भ्रष्ट होतील. कारण, जर कोणीही येऊन, आम्ही ज्याची घोषणा केली नाही अशी दुसर्या येशूची घोषणा केली किंवा तुम्हास मिळाला नव्हता असा दुसरा आत्मा तुम्ही स्वीकारता किंवा तुम्ही स्वीकारले नाही असे दुसरे शुभवर्तमान तुम्ही स्वीकारता तर तुम्ही त्यांचे सहन करता.
”कारण असे लोक खोटे प्रेषित आहेत, ते फसविणारे कामगार आहेत, ख्रिस्ताच्या प्रेषितांचे सोंग घेणारी अशी आहेत. आणि यामध्ये आश्चर्य नाही कारण सैतानदेखील तेजस्वी दूताचे रुप धारण करतो. म्हणून त्याचे सेवकही जर न्यायीपणाच्या सेवकाचे रुप धारण करतात त्यामुळे त्यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखे काही नाही, त्यांचा शेवट त्यांच्या कार्याप्रमाणे होईल.
”तुम्ही विश्वासात आहात किंवा नाही म्हणून आपली स्वतःची परीक्षा करा. आपली स्वतःची पारख करा. तुम्हास आपल्यात येशू ख्रिस्त आहे हे कळत नाही काय? नसेल तर मग, तुम्ही पसंतीस न उतरलेले आहात.
”मला आश्चर्य वाटते की, ज्याने तुम्हास ख्रिस्ताच्या कृपेत पाचारण केले त्याच्यापासून, इतक्या लवकर, तुम्ही दुसर्या शुभवर्तमानाकडे वळला आहात. दुसरे कोणतेही शुभवर्तमान नाही; पण तुम्हास घोटाळ्यात पाडणारे आणि ख्रिस्ताचे शुभवर्तमान विपरीत करण्याची इच्छा असणारे असे कित्येक आहेत.
”तर जे शुभवर्तमान आम्ही तुम्हास सांगितले त्याच्याहून निराळे शुभवर्तमान जर आम्ही सांगितले किंवा स्वर्गातील आलेल्या देवदूतानेही सांगितले, तरी तो शापित असो. आम्ही अगोदर सांगितले आहे तसेच आता मी पुन्हा सांगतो की, कोणी तुम्हास, जे तुम्ही स्वीकारले त्याच्यापेक्षा, निराळे शुभवर्तमान कोणी तुम्हास सांगितल्यास तो शापित असो.
”मी आता मनुष्याची किंवा मी देवाची मनधरणी करावयास पाहत आहे? मी मनुष्यांना संतुष्ट करावयास पाहत आहे काय? मी अजूनपर्यंत मनुष्यांना संतोषवीत असतो, तर मी ख्रिस्ताचा दास नसतो. कारण, बंधूंनो, मी तुम्हास सांगतो की, मी ज्या शुभवर्तमानाची घोषणा केली ती मनुष्याच्या सांगण्याप्रमाणे नाही. कारण ती मला मनुष्याकडून मिळाली नाही तसेच ती मला कोणी शिकवलीही नाही; पण येशू ख्रिस्ताच्या प्रकटीकरणाने ती मला प्राप्त झाली.
”आणि गुप्तपणे आत आणलेल्या खोट्या बंधूमुळे देखील भाग पाडण्यात आले नाही; ते आम्हास दास्यात घालण्याकरता, ख्रिस्त येशूमध्ये जी मोकळीक आपल्याला आहे ते हेरण्यास, चोरून आत आले होते. शुभवर्तमानाचे सत्य तुमच्याकडे रहावे म्हणून आम्ही त्यांना घटकाभरही वश होऊन त्यांच्या अधीन झालो नाही.
”आणि त्यानंतर, केफा अंत्युखियास आला असता, मी त्याच्यासमोर त्यास आडवा आलो, कारण तो दोषीच होता. कारण याकोबापासून कित्येकजण येण्याअगोदर तो अन्यजाती लोकांबरोबर जेवत असे; पण ते आल्यावर तो सुंता झालेल्या लोकांस भिऊन त्याने माघार घेऊन वेगळा राहू लागला. तेव्हा तसेच दुसर्या यहूदी विश्वास ठेवणाऱ्यांनीही त्याच्याबरोबर ढोंग केले; त्यामुळे बर्णबादेखील त्यांच्या ढोंगाने ओढला गेला. पण मी जेव्हा हे बघितले की, शुभवर्तमानाच्या सत्याप्रमाणे ते नीट चालत नाहीत, तेव्हा सर्वांसमोर मी केफाला म्हटले, “तू स्वतः यहूदी असून तू जर परराष्ट्रीयाप्रमाणे राहतोस आणि यहूद्यांप्रमाणे वागत नाहीस, तर जे परराष्ट्रीयांनी यहूद्यांसारखे वागावे म्हणून तू त्याच्यावर जुलूम करितोस हे कसे?”
”अहो बुद्धीहीन गलतीकरांनो, वधस्तंभावर खिळलेला येशू ख्रिस्त ज्यांच्या डोळ्यांपुढे वर्णन करून ठेवला होता, त्या तुम्हास कोणी भुलविले आहे?
”बंधूंनो, कोणी मनुष्य एखाद्या अपराधात सापडला, तर तुम्ही जे आत्मिक आहात ते त्यास सौम्यतेच्या आत्म्याने पुनःस्थापित आणा; तू स्वतःही परीक्षेत पडू नये म्हणून स्वतःकडे लक्ष दे. तुम्ही एकमेकांची ओझी वाहा म्हणजे अशाने ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल. कारण आपण कोणी नसता कोणीतरी आहोत असे मानतो, तो स्वतःला फसवतो.
”ज्याला वचनाचे शिक्षण मिळते त्याने शिक्षण देणार्याला सर्व प्रकारच्या चांगल्या पदार्थांचा वाटा द्यावा. फसू नका, देवाचा उपहास होणार नाही कारण मनुष्य जे काही पेरतो तेच पीक त्यास मिळेल. कारण जो आपल्या देहाकरता पेरतो त्यास देहाकडून नाशाचे पीक मिळेल, पण जो देवाच्या आत्म्याकरता पेरतो त्यास आत्म्याकडून सार्वकालिक जीवनाचे पीक मिळेल.
”ह्यासाठी की आपण यापुढे लहान मुलांसारखे नसावे. म्हणजे मनुष्यांच्या कपटाने, फसवणाऱ्या मार्गाने नेणाऱ्या युक्तीने अशा प्रत्येक नव्या शिकवणरूपी वाऱ्याने तुमचे मार्ग लाटांनी इकडेतिकडे हेलकावणाऱ्या बोटीसारखे होऊ नये; त्याऐवजी आपण प्रेमाने सत्य बोलावे आणि प्रत्येक मार्गाने त्याच्यामध्ये वाढावे जो आमचा मस्तक आहे, ख्रिस्त
”म्हणून मी हे म्हणतो व प्रभूच्या नावात आग्रहाने विनंती करतोः ज्याप्रमाणे परराष्ट्रीय भ्रष्ट मनाच्या व्यर्थतेप्रमाणे चालतात तसे चालू नका. त्यांचे विचार अंधकारमय झालेले आहेत आणि त्यांच्या अंतःकरणातील हट्टीपणामुळे त्यांच्यात अज्ञान असून देवाच्या जीवनापासून ते वेगळे झाले आहेत.
”‘म्हणून खोटे सोडून द्या. प्रत्येकाने त्याच्या शेजाऱ्याबरोबर खरे तेच बोलावे कारण आपण एकमेकांचे अवयव आहोत.
”तुमच्या तोंडून कोणतीही वाईट भाषा न निघो, त्याऐवजी गरजेनुसार त्यांची चांगली उन्नती होणारे उपयोगी शब्द मात्र निघो. यासाठी जे ऐकतील त्यांना कृपा प्राप्त होईल.
”पोकळ भाषणाने कोणी तुम्हास फसवू नये कारण या कारणामुळे आज्ञा मोडणाऱ्या मुलांवर देवाचा क्रोध येणार आहे.
”कारण एकेकाळी तुम्ही पूर्णपणे अंधारात होता पण आता तुम्ही प्रभूच्या प्रकाशात आहात. तर आता प्रकाशात चालणाऱ्या लेकरांसारखे व्हा. कारण प्रकाशाची फळे चांगुलपणा, नीतिमत्त्व आणि सत्यात दिसून येतात. प्रभूला कशाने संतोष होईल हे पारखून घ्या.
”आणि अंधाराची जी निष्फळ कार्ये आहेत त्याचे भागीदार होऊ नका. त्याऐवजी, ती उघडकीस आणा.
”कारण आपले झगडणे रक्त आणि मांसाबरोबर नाही, तर सत्ताधीशांविरुद्ध, अधिकाऱ्याविरुद्ध, या अंधकारातील जगाच्या अधिपतीबरोबर आणि आकाशातील दुष्ट आत्म्याविरुद्ध आहे.
”तर मग स्थिर उभे राहा, सत्याने आपली कंबर बांधा, नीतिमत्त्वाचे उरस्त्राण धारण करा. शांतीच्या सुवार्तेसाठी तयार केलेल्या वहाणा पायात घाला. नेहमी विश्वासाची ढाल हाती घ्या, जिच्यायोगे त्या दुष्टाचे सगळे जळते बाण विझवू शकाल, ती हाती घेऊन उभे राहा. आणि तारणाचे शिरस्राण व आत्म्याची तलवार, जी देवाच वचन आहे, ती घ्या,
”मी अशी प्रार्थना करतो की, तुमची प्रीती ज्ञानात व पूर्ण सारासार विचारात आणखी अधिकाधिक वाढत जावी, यासाठी की जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे आणि तुम्ही ख्रिस्ताच्या दिवसासाठी निर्मळ व निर्दोष असावे.
”तुम्ही अशी काळजी घ्या की, कोणी मनुष्यांच्या संप्रदायास अनुसरून, जगाच्या मूलतत्त्वांस अनुसरून असणार्या तत्त्वज्ञानाने व त्याच्या पोकळ फसवेपणाने तुम्हास ताब्यात घेऊ नये; ते ख्रिस्ताला अनुसरून नाही.
”लीन म्हणवून घेण्याच्या इच्छेने व देवदूतांची उपासना करणाऱ्या, स्वतःला दिसलेल्या गोष्टीवर अवलंबून राहणाऱ्या व दैहिक मनाने विनाकारण गर्वांने फुगणाऱ्या कोणा मनुष्यास तुम्हास तुमच्या बक्षिसास मुकवू देऊ नका;
”म्हणून जगाच्या मूलतत्त्वांना तुम्ही ख्रिस्ताबरोबर मरण पावला आहात, तर जगात जगत असल्याप्रमाणे तुम्ही नियमाधीन का होता? शिवू नको, चाखू नको, हातात घेऊ नको अशा नियमांतील सर्व गोष्टी या उपभोगाने नष्ट होणार्या गोष्टी आहेत. या गोष्टींत स्वेच्छेची उपासना, मनाची लीनता व शरीराची उपेक्षा असल्यामुळे ह्यात खरोखर ज्ञानीपणाची भाषा आहे, पण देहाच्या लालसेला प्रतिबंध करण्याची योग्यता नाही.
”एकमेकांशी खोटे बोलू नका कारण तुम्ही जुन्या मनुष्यास त्याच्या कृतींसहित काढून टाकले आहे आणि जो नवा मनुष्य, आपल्या निर्माण करणार्याच्या प्रतिरूपानुसार पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे, त्यास तुम्ही परिधान केले आहे.
”सर्व गोष्टींची पारख करा. जे चांगले आहे ते मजबूत धरा.
”कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसू नका; कारण त्या दिवसाच्या अगोदर विश्वासाचा त्याग होऊन तो अनीतिमान पुरूष, नाशाचा पुत्र प्रकट होईल;
”सैतानाच्या कृतीमुळे त्याचे येणे होईल; तो सर्व प्रकारे खोटे सामर्थ्य, तशीच चिन्हे व अद्भूते करीत येईल ज्यांचा नाश होत चालला आहे त्यांनी आपले तारण साधावे म्हणून सत्याविषयीची प्रीती धरली नाही; त्यामुळे त्याच्यांसाठी सैतानाच्या कृतीप्रमाणे सर्व प्रकारची खोटी महत्कृत्ये, चिन्हे, अद्भूते आणि सर्वप्रकारचे अनीतिजनक कपट ह्यांनी युक्त असे त्या अनीतिमानाचे येणे होईल. त्यांनी असत्यावर विश्वास ठेवावा म्हणून देव त्यांच्याठायी भ्रांतीचे कार्य चालेल असे करतो; ज्यांनी सत्यावर विश्वास ठेवला नाही, तर अनीतीत संतोष मानला त्या सर्वांचा न्यायनिवाडा व्हावा म्हणून असे होईल.
”तर मग बंधूनो, स्थिर राहा आणि तोंडी किंवा आमच्या पत्राद्वारे जे संप्रदाय तुम्हास शिकविले ते बळकट धरून राहा.
”बंधूनो, आम्ही आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने तुम्हास आज्ञा करतो की, अव्यवस्थितपणे वागणाऱ्या व चालणाऱ्या संप्रदायाप्रमाणे प्रत्येक बंधुपासून तुम्ही दूर व्हावे.
”मासेदोनियास जातांना जशी मी तुला कळकळीने विनंती केली होती तशी आताही करतो की, तू इफिसात रहावे, जेणेकरून तू कित्येकास निक्षून सांगावे की, त्यांनी अन्य शिकवण शिकवू नये. आणि जी दैवी व्यवस्था विश्वासाच्याद्वारे आहे तिच्या उपयोगी न पडणाऱ्या पण वाद मात्र उत्पन्न करणाऱ्या कहाण्यांकडे व अनंत वंशावळ्यांकडे लक्ष देऊ नका. तेच मी आतांही सांगतो. आणि या आज्ञेचे उद्दिष्ट प्रीती आहे, जी शुद्ध अंतःकरणातून, चांगल्या विवेकभावातून व निष्कपट विश्वासातील असावी. या गोष्टी सोडून कित्येकजण व्यर्थ बोलण्याकडे वळले आहेत. त्यांना नियमशास्त्राचे शिक्षक व्हायचे होते पण ते ज्या गोष्टीविषयी मोठ्या आत्मविश्वासाने बोलतात व सांगतात त्या त्यांनाच कळत नाहीत.
”त्याची इच्छा आहे की सर्व लोकांचे तारण व्हावे आणि त्यांनी खरेपणाच्या पूर्ण ज्ञानास पोहचावे. कारण एकच देव आहे आणि देव व मनुष्य यांच्यामध्ये ख्रिस्त येशू हा मनुष्य एकच मध्यस्थ आहे. त्याने सर्वांच्या खंडणीकरिता स्वतःला दिले. याविषयीची साक्ष योग्यवेळी देणे आहे. आणि या साक्षीचा प्रसार करण्यासाठी मला घोषणा करणारा आणि प्रेषित मी खरे सांगतो; खोटे सांगत नाही, असा परराष्ट्रीय लोकांमध्ये विश्वास आणि सत्याचा शिक्षक म्हणून नेमलेला आहे.
”स्त्रीने शांतपणे व पूर्ण अधीनतेने शिकावे. मी स्त्रीला शिकविण्याची परवानगी देत नाही किंवा पुरुषावर अधिकार गाजवण्यास परवानगी देत नाही. त्याऐवजी तिने शांत रहावे. कारण प्रथम आदाम निर्माण करण्यात आला त्यानंतर हव्वा. आणि आदाम फसवला गेला नाही तर स्त्री फसवली गेली आणि ती पापात पडली.
”देवाचा आत्मा स्पष्ट म्हणतो की, नंतरच्या काळात काहीजण विश्वास सोडतील, ते भविष्य सांगणारे आत्मे, जे फसविणारे आहेत त्यांच्याकडे लक्ष देतील, ज्या मनुष्यांची सद्सदविवेकबुद्धी तर डाग दिल्यासारखीच आहे आणि भूतापासून येणाऱ्या शिक्षणाकडे आणि ढोंगी फसवीणाऱ्यांकडे लक्ष देतील.
”जर तू या गोष्टी ख्रिस्ती बंधूना शिकविल्या, तर तू जो सत्यात व विश्वासात वाढलास व चांगल्या शिक्षणाला अनुसरलास तो तू ख्रिस्त येशूचा चांगला सेवक होशील. परंतु वृद्ध स्त्रियांच्या आवडत्या अमंगळपणाच्या कथांचा स्वीकार करू नकोस, तू स्वतःला देवाच्या सुभक्तीविषयी तयार कर.
”या गोष्टी आज्ञारूपाने सांग आणि शिकव. कोणीही तुझे तरुणपण तुच्छ मानू नये, तर बोलण्यात, वर्तणुकीत, प्रीतीत, (आत्म्यात) विश्वासात, शुद्धपणांत, विश्वास ठेवणाऱ्यांचा आदर्श हो. मी येईपर्यंत वाचणे, बोध करणे व शिकवणे, याकडे लक्ष्य लाव. तुझ्यावर वडीलवर्ग हात ठेवण्याचा वेळेस संदेशाच्या द्वारे देण्यात आलेले असे जे कृपादान तुझ्यामध्ये आहे, त्याकडे दुर्लक्ष करू नको. या सर्व गोष्टींकडे पूर्ण लक्ष दे, त्यामध्ये पूर्ण गढून जा. यासाठी की तुझी प्रगती सर्व लोकांस दिसून यावी. आपणाकडे व आपल्या शिक्षणाकडे लक्ष दे. त्यामध्ये टिकून राहा कारण असे केल्याने तू स्वतःचे व जे तुझे ऐकतात, त्यांचे चुकीच्या शिक्षणापासून बचाव करशील.
”जे उपदेश करण्याचे व शिकविण्याचे काम करतात त्यांना व वडील मंडळीची चांगली सेवा करतात त्यांना दुप्पट मान देण्याच्या विशेष योग्यतेचे समजावे. कारण शास्त्रलेखात लिहिल्याप्रमाणे, “धान्याची मळणी करताना बैलाला मुसक्या बांधू नको” आणि “मजुराचा त्याच्या मजुरीवर हक्क आहे.”
”दोन किंवा तीन साक्षीदारांनी पाठिंबा दिल्याशिवाय सेवकावरील आरोप दाखल करू नकोस. जे पाप करीत राहतात त्यांचा जाहीरपणे निषेध कर. यासाठी की, इतरांनाही भय वाटावे. देव, येशू ख्रिस्त व निवडलेले देवदूत यांच्यासमोर मी निक्षून आज्ञा करतो की, तू कोणताही पूर्वग्रह न ठेवता या गोष्टी पाळ व पक्षपाताने काहीही करू नको. घाईने कोणावर हात ठेऊ नको आणि इतरांच्या पापांत वाटेकरी होऊ नको. नेहमी स्वतःला शुद्ध राख.
”जर कोणी काही वेगळे शिकवितो व ख्रिस्त येशू आपला प्रभू याची जी सुवचने आणि देवाच्या सेवेचे शुद्ध शिक्षण मान्य करीत नाही तर तो गर्वाने फुगलेला आहे व त्यास काही समजत नाही. त्याऐवजी तो भांडणे व शब्दकलह यांनी वेडापिसा झालेला आहे. या गोष्टींपासून हेवा, भांडण, निंदा, दुष्ट तर्क ही होतात. मन बिघडलेल्या व खरेपण विरहित झालेल्या भक्ती ही कमाईचे साधन आहे अशी कल्पना करणाऱ्या मनुष्यांची सतत भांडणे होतात, त्यांच्यापासून दूर राहा.
”तीमथ्या, तुझ्याजवळ विश्वासाने सांभाळावयास दिलेल्या ठेवीचे रक्षण कर. अधर्माच्या रिकाम्या वटवटीपासून आणि चुकीने ज्याला तथाकथित “विद्या” म्हणतात त्याच्याशी संबंधित असलेल्या परस्परविरोधी मतांपासून दूर जा. ती विद्या स्वीकारून कित्येक विश्वासापासून बहकून गेले आहेत देवाची कृपा तुम्हाबरोबर असो.
”लोकांस या गोष्टीची आठवण करून देत राहा. देवासमोर त्यांना निक्षून ताकीद दे की, शब्दयुद्ध करू नका. असे भांडण कोणत्याही फायद्याचे नाही. जे कोणाच्याही उपयोगी न पडता ऐकणाऱ्यांच्या नाशास कारण होते.
”तू सत्याचे वचन योग्य रीतीने सांगणारा असा आणि जे काम करतोस त्यामध्ये लाज वाटण्यासारखे काहीही कारण नसलेला देवास स्वीकृत असा कामकरी होण्याचा प्रयत्न कर. पण अमंगळपणाचा रिकामा वादविवाद टाळ कारण तो लोकांस देवापासून अधिकाधिक दूर नेतो.
”आणि अशाप्रकारे वादविवाद करणाऱ्यांची शिकवण कर्करोगासारखी पसरते. या लोकांमध्ये हूमनाय आणि फिलेत आहेत, ते सत्यापासून दूर गेले आहेत. पुनरुत्थान होऊन गेले आहे असे ते म्हणतात आणि कित्येकांच्या विश्वासाचा नाश करीतात. तथापि देवाने घातलेला पाया स्थिर राहीला आहे, त्यास हा शिक्का आहे की, “प्रभू जे त्याचे आहेत त्यांना ओळखतो,” आणि “जो कोणी प्रभूचे नाव घेतो त्याने अनीतीपासून दूर रहावे.”
”परंतु मूर्खपणाच्या व अज्ञानाच्या वादविवादापासून दूर राहा कारण तुला माहीत आहे की, त्यामुळे भांडणे निर्माण होतात. देवाच्या सेवकाने भांडू नये, तर सर्व लोकांशी सौम्यतेने वागावे, तसेच शिक्षणात कुशल व सहनशील असावे. जे त्यास विरोध करतात, त्यांना लीनतेने शिक्षण द्यावे कदाचित त्यांनी खरेपण जाणावे म्हणून देव त्यांना पश्चात्ताप करण्याची बुद्धी देईल. आणि सैतानाने आपल्या इच्छेप्रमाणे पकडून नेलेले त्याच्या फासातून सुटून शुद्धीवर येतील.
”लोक स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ठ, निंदा करणारी, आई-वडीलांची आज्ञा न मानणारी, अनुपकारी, अधार्मिक इतरांवर प्रीती न करणारी, क्षमा न करणारी, चहाडखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी. विश्वासघातकी, उतावीळ, गर्वाने फुगलेली, देवावर प्रीती करण्यापेक्षा चैनीची अधिक आवड धरणारी अशी होतील; ते देवाच्या सेवेचे बाहेरचे स्वरूप चांगले राखतील परंतु त्याचे सामर्थ्य नाकारतील. त्यांच्यापासून नेहमी दूर राहा.
”मी हे म्हणतो कारण त्यांच्यांपैकी काही घरात शिरकाव करतात व पापाने भरलेल्या, सर्व प्रकारच्या वाईट अभिलाषांनी भरलेल्या, कमकुवत स्त्रियांवर ताबा मिळवतात. अशा स्त्रिया नेहमी शिकण्याचा प्रयत्न करतात. पण सत्याच्या पूर्ण ज्ञानापर्यंत त्या कधीही जाऊ शकत नाहीत.
”यान्नेस व यांब्रेस यांनी जसा मोशेला विरोध केला तसा, ही माणसे सत्याला विरोध करतात. ज्यांची मने भ्रष्ट आहेत व विश्वास अनुसरण्यात अयशस्वी ठरलेली अशी माणसे आहेत. ते पुढे अधिक प्रगती करणार नाहीत कारण जसा त्यांचा मूर्खपणा प्रकट झाला तसा यांचा मूर्खपणा सर्वांना प्रकट होईल.
”खरे पाहता, जे जे ख्रिस्त येशूमध्ये शुद्ध जीवन जगू इच्छितात, त्या सर्वांचा छळ होईल. पण दुष्ट लोक व भोंदू लोक इतरांना वरचेवर फसवत राहतील आणि स्वतःही फसून अधिक वाईटाकडे जातील.
”पण तुझ्याबाबतीत, ज्या गोष्टी तू शिकलास व ज्यावर तुझा विश्वास आहे त्या तू तशाच धरून राहा. तुला माहीत आहे की, तू आपल्या बाल्यावस्थेत असल्यापासूनच तुला पवित्र शास्त्राची माहिती आहे. ते ख्रिस्त येशूमधील विश्वासाच्याद्वारे तुला शहाणे बनवण्याचे व तारणाकडे घेऊन जाण्याचे सामर्थ्य आहे. प्रत्येक शास्त्रलेख देवाच्या प्रेरणेने लिहिला असल्यामुळे तो शिकवण्यास, वाईटाचा निषेध करण्यास, चुका सुधारण्यास व योग्य जीवन जगण्याचे मार्गदर्शन करण्यास उपयुक्त आहे. यासाठी की, देवाचा मनुष्य तरबेज होऊन पूर्णपणे प्रत्येक चागंल्या कामासाठी सज्ज व्हावा.
”वचनाची घोषणा कर सुवेळी अवेळी तयार राहा, सर्व प्रकारच्या सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखीव, निषेध कर व बोध कर. मी असे म्हणतो कारण अशी वेळ येईल जेव्हा लोक चांगले शिक्षण सहन करणार नाहीत. त्याऐवजी त्यांच्या स्वतःच्या इच्छांना पूरक असे शिक्षक ते त्यांच्यासाठी जमा करतील. सत्यापासून ते आपले कान दुसरीकडे वळवतील व आपले लक्ष ते काल्पनिक कथांकडे लावतील.
”आणि दिलेल्या शिक्षणाप्रमाणे जे विश्वसनीय वचन त्यास धरुन राहणारा असा असावा; यासाठी की त्याने सुशिक्षणाने बोध करावयास व उलट बोलणाऱ्यास कुंठित करावयासही शक्तिमान व्हावे. हे महत्त्वाचे आहे कारण पुष्कळ लोक बंड करणारे आहेत. जे व्यर्थ गोष्टीविषयी बडबड करतात व लोकांस फसवितात. मी विशेषेकरून, जे सुंता झालेले आहेत त्यांना संबोधून बोलत आहे. त्यांची तोंडे बंद केली पाहिजेत; त्यांनी शिकवू नयेत त्या गोष्टी ते अयोग्य लाभासाठी शिकवतात आणि संपूर्ण घराची उलथापालथ करतात. त्यांच्यामधील एका संदेष्ट्याने म्हणले आहे की, ‘क्रेती लोक हे नेहमीच लबाड, पशुंसारखे खतरनाक, आळशी व खादाड आहेत.’ ही साक्ष खरी आहे. तर त्यांनी विश्वासात स्थिर व्हावे म्हणून तू त्यांचा निषेध कर. यासाठी की, त्यांनी यहूदी कहाण्यांकडे आणि सत्याकडून वळविणार्या, मनुष्यांच्या आज्ञांकडे लक्ष देऊ नये. विश्वासात खंबीर व्हावे. जे शुद्ध आहेत अशा लोकांस सर्व गोष्टी शुद्ध आहेत पण जे विटाळलेले आहेत आणि विश्वास ठेवत नाहीत अशांना काहीच शुद्ध नाही पण त्यांचे मन आणि विवेक हेही मलीन आहेत. ते लोक ‘आम्ही देवाला ओळखतो’ असे उघड सांगतात, पण ते कृतीत त्यास नाकारतात. ते अमंगळ व अवमान करणारे आणि कोणत्याही चांगल्या कामात कसोटीस न उतरलेले आढळतात.
”तू तर सुशिक्षणास शोभणार्या गोष्टी बोलत जा. त्या अशा की, वृद्ध पुरुषांनी संयमशील, गंभीर व समंजस व्हावे आणि विश्वास, प्रीती व सहनशीलता ह्यात दृढ व्हावे.
”वृद्ध स्त्रियांनी, त्याचप्रमाणे, आपल्या आचरणात पवित्रेस शोभणाऱ्या असाव्या; चुगलखोर, मद्य पिणाऱ्या नसाव्या; चांगले शिक्षण देणार्या असाव्या; आणि आपल्यातील तरुण स्त्रियांना असे शिक्षण द्यावे की, त्यांनी आपल्या पतींवर व मुलांवर प्रेम करावे. आणि त्यांनी समंजस, शुद्धाचरणी, घर संभाळणार्या, ममताळू व पतीच्या अधीन राहणार्या व्हावे; म्हणजे देवाच्या वचनाची निंदा होणार नाही.
”आणि तसेच तरुण पुरुषांनी समंजस मनाचे व्हावे म्हणून, तू त्यांना बोध कर. तू सर्व गोष्टींत चांगल्या कामांचे उदाहरण असे स्वतःला दाखव; तुझ्या शिक्षणात निर्मळपणा, गंभीरता, आणि निरपवाद चांगली शिकवण दिसू दे, म्हणजे तुझ्यावर टिका करणार्याला तुझ्याविषयी बोलण्यास काही वाईट न मिळून तो लज्जित व्हावा.
”आणि दासांनी सर्व गोष्टींत त्यांच्या स्वामीच्या आज्ञेत रहावे, त्यांना संतोष देणारे व्हावे आणि उलट बोलू नये; त्यांनी चोर्या करू नयेत तर सर्व गोष्टींत चांगला विश्वासूपणा दाखवावा; आणि आपल्या तारक देवाच्या शिकवणीस, सर्व लोकात, त्यांनी शोभा आणावी; असा तू त्यांना बोध कर.
”पण मूर्खपणाचे वाद, वंशावळी, कलह आणि नियमशास्त्राविषयीची भांडणे टाळीत जा कारण या गोष्टी निरुपयोगी आणि व्यर्थ आहेत. तुमच्यामध्ये फुट पडणाऱ्या मनुष्यास एकदा व दोनदा बोध केल्यावर आपल्यापासून दूर ठेव. तू जाणतोस की, असा मनुष्य बहकलेला असतो व स्वतः पाप करीत राहिल्याने त्याच्याकडून त्याचा स्वतःचा न्याय होतो.
”या कारणास्तव ज्या सत्याविषयी आपण ऐकलेले आहे त्याकडे आपण अधिक काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे. यासाठी की, आपण त्यापासून भरकटून जाऊ नये. कारण नियमशास्त्र जे देवदूतांकरवी सांगितले गेले ते इतके प्रभावी होते आणि जर प्रत्येक आज्ञाभंगाच्या व प्रत्येक अवमानाच्या कृत्याला योग्य ती शिक्षा होते. तर आपण अशा महान तारणाकडे दुर्लक्ष केल्यास, मग आपण शिक्षेपासून कसे सुटू? या तारणाची पहिली घोषणा प्रभूने केली. ज्यांनी प्रभूचे ऐकले त्यांच्याकडून याची खात्री पटली
”बंधुजनहो, जिवंत देवाला सोडून देण्याइतके अविश्वासाचे दुष्ट मन तुम्हातील कोणाचेही असू नये म्हणून जपा.
”कोणाविषयी देवाने अशी शपथ वाहिली की ते माझ्या विसाव्याच्या ठिकाणी प्रवेश करणार नाहीत? ज्यांनी त्याच्या आज्ञा मोडल्या तेच नव्हते काय? ह्यावरून आपण पाहतो की, ते लोक देवाच्या विसाव्याच्या ठिकाणी त्यांच्या अविश्वासामुळे येऊ शकले नाहीत.
”कारण देवाचे वचन सजीव, सक्रीय कोणत्याही दुधारी तरवारीपेक्षा अधिक धारदार असून जीव, सांधे व मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू ह्यांची पारख करणारे असे आहे. आणि कोणतीही निर्मित गोष्ट त्याच्यापासून लपलेली नाही आणि ज्याच्यापाशी आम्हास सर्व गोष्टींचा हिशोब द्यावयाचा आहे, देवासमोर सर्व गोष्टी उघड व स्पष्ट अशा आहेत.
”कारण ज्यांना एकदा प्रकाश मिळाला, ज्यांनी स्वर्गीय दानांचा अनुभव घेतला आहे व जे पवित्र आत्म्याचे भागीदार झाले आहेत, आणि ज्यांनी देवाच्या वचनाची व येणाऱ्या युगाच्या सामर्थ्याची रुची अनुभवली आहे, त्यानंतर ख्रिस्तापासून जर ते दूर गेले तर त्यांना पश्चात्तापाकडे वळवणे अशक्य आहे, कारण त्यांच्या स्वतःच्या हानिकरता ते देवाच्या पुत्राला पुन्हा वधस्तंभावर खिळतात व लोकांच्या अवकृपेच्या समोर त्यास आणतात.
”सत्याचे ज्ञान प्राप्त झाल्यानंतरसुद्धा जर आपण जाणूनबुजून पाप करीत राहिलो, तर मग पापांसाठी यापुढे आणखी अर्पण करण्याचे बाकी राहिले नाही. पण जे देवाला विरोध करतात त्यांना भयंकर अशा न्यायनिवाड्याशिवाय व भयंकर अशा भस्म करणाऱ्या अग्नीशिवाय दुसरे काही शिल्लक राहिले नाही. जो कोणी मोशेचे नियमशास्त्र नाकारतो त्यास दोघा किंवा तिघांच्या साक्षीच्या आधारे कसलीही दया न दाखविता मरणदंड होतो. तर मग ज्याने देवाच्या पुत्राला पायाखाली तुडवले, कराराच्या ज्या रक्ताने त्यास पवित्र केले त्या रक्ताला अपवित्र ठरवले आणि ज्याने कृपेच्या आत्म्याचा अपमान केला, तो मनुष्य किती अधिक दंडास पात्र ठरेल म्हणून तुम्हास वाटते?
”तुम्ही सांभाळून राहा, यासाठी की देवाच्या कृपेला कोणी अंतरू नये, ज्यामुळे पुष्कळ जण बिघडून जातील अशा कोणा कडूपणाच्या मुळाने अंकुरीत होऊन तुम्हास उपद्रव देऊ नये, कोणीही व्यभिचारी असू नये किंवा एका जेवणासाठी आपला वडील हक्क विकून टाकणाऱ्या एसावासारखे जगिक विचाराचे असू नये याकडे लक्ष द्या. नंतर तुम्हास माहीत आहे जेव्हा त्यास वारसाहक्काने आशीर्वाद अपेक्षित होता, तेव्हा तो नाकारण्यात आला. जरी त्याने रडून आशीर्वाद मिळविण्याचा प्रयत्न केला, तरी पश्चात्तापाने आपल्या वडिलांचे मन तो बदलू शकला नाही.
”विवीध आणि विचित्र शिक्षणाने बहकून जाऊ नका कारण ज्यांकडून आचणाऱ्यांना लाभ नाही अशा अन्नाच्या विधीने नव्हे, तर देवाच्या कृपेने आपली अंतःकरण स्थिर केलेले असणे चांगले.
”तुम्हास माहीत आहे की, तुमच्या विश्वासाच्या परीक्षेमुळे सहनशीलता निर्माण होते. आणि त्या सहनशीलतेला आपले कार्य पूर्ण करू द्या. यासाठी की तुम्ही प्रौढ, परिपूर्ण व कोणत्याही बाबतीत कमतरता नसलेले असे पूर्ण व्हावे. म्हणून जर तुमच्यातील कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने देवाकडे मागावे म्हणजे ते त्यास मिळेल कारण तो दोष न लावता सर्वांस उदारपणे देतो.
”वचनाप्रमाणे आचरण करणारे असा व फक्त ऐकणारेच असू नका तर त्याप्रमाणे करा कारण जर तुम्ही फक्त ऐकता तर तुम्ही स्वतःची फसवणूक करता. जो कोणी देवाचे वचन ऐकतो परंतु त्यानुसार वागत नाही, तो आरशामध्ये आपले शारीरिक तोंड पाहणाऱ्या मनुष्यासारखा आहे. तो मनुष्य स्वतःकडे लक्षपूर्वक पाहतो. नंतर निघून जातो आणि आपण कसे होतो ते लगेच विसरून जातो.
”माझ्या बंधूंनो, तुमच्यापैकी पुष्कळजण शिक्षक होऊ नका कारण आपल्याला अधिक दंड होईल हे तुम्हास माहीत आहे. कारण पुष्कळ गोष्टीत आपण सर्वजण अडखळतो. कोणी जर बोलण्यात चुकत नसेल तर तो पूर्ण मनुष्य आहे; तो आपले सर्व शरीरही नियंत्रणात ठेवण्यास समर्थ आहे.
”त्याचप्रमाणे जीभ एक लहान अवयव आहे आणि मोठ्या गोष्टींची फुशारकी मारते. पहा, लहानशी आग किती मोठे रान पेटवते. आणि जीभ एक आग आहे, एक अनीतीचे भुवन आहे. जीभ ही सर्व अवयवात अशी आहे की, ती सर्व शरीराला अमंगळ करते, सृष्टिक्रमाला आग लावते; आणि नरकाने पेटलेली अशी आहे.
”म्हणून विश्वास ठेवणार्या तुम्हास तो मोलवान आहे; पण, जे विश्वास ठेवत नाहीत त्यांना ‘बांधणार्यांनी जो दगड नाकारला तोच कोपर्याचा मुख्य कोनशिला झाला आहे.’ असा देखील शास्त्रलेख आहे, “अडखळण्याचा दगड व अडथळ्याचा खडक झाला आहे.” ते वचन मानीत नसल्यामुळे अडखळतात आणि त्यासाठीच ते नेमलेले होते.
”कारण, “जो जीविताची आवड धरतो व चांगले दिवस बघावेत अशी इच्छा करतो त्याने वाईटापासून आपली जीभ कपटी भाषणापासून, आपले ओठ आवरावेत
”पण ख्रिस्ताला प्रभू म्हणून आपल्या अंतःकरणात पवित्र माना व तुमच्या आशेचे कारण विचारणार्या प्रत्येक मनुष्यास सौम्यतेने व आदराने प्रत्युत्तर देण्यास तुम्ही नेहमी तयार असा. आणि चांगला विवेक ठेवा; म्हणजे, तुमच्याविषयी वाईट बोलत असता, ख्रिस्तातील तुमच्या चांगल्या आचरणावर खोटे आरोप करणार्यांना लाज वाटावी.
”सावध रहा; जागृत रहा कारण तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहाप्रमाणे, कोणाला गिळावे म्हणून शोधीत फिरतो. तुम्ही विश्वासात स्थिर राहून त्याच्याविरुध्द उभे रहा कारण तुम्ही जाणता की, जगात असलेल्या तुमच्या बांधवांवर तशीच दुःखे आणली जात आहेत.
”तुम्ही प्रथम हे जाणा की, शास्त्रलेखातील कोणताही संदेश स्वतः अर्थ लावण्यासाठी झाला नाही. कारण कोणत्याही काळात मनुष्यांच्या इच्छेने संदेश झाला नाही, तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्यांनी देवाकडून आलेला संदेश दिला आहे.
”पण त्या लोकात खोटे संदेष्टे झाले होते, तसे तुमच्यात खोटे शिक्षकही होतील; ते आपली विघातक मते चोरून लपवून आत आणतील आणि त्यांना ज्याने विकत घेतले आहे त्या स्वामीला ते नाकारतील व तसे करून ते आपल्या स्वतःवर शीघ्र नाश ओढवून घेतील. पुष्कळजण त्यांच्या कामातुरपणाचे अनुकरण करतील व सत्याच्या मार्गाची त्यामुळे निंदा होईल. आणि बनावट गोष्टी रचून ते लोभाने तुमच्यावर पैसे मिळवतील. त्यांच्याकरिता ठरलेला दंड पहिल्यापासूनच विलंब करीत नाही, अणि त्यांचा नाश डुलक्या घेत नाही.
”कारण त्यांना आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्याचे ज्ञान होऊन, ते जगाच्या घाणीतून बाहेर निघाल्यावर त्यांनी पुन्हा त्या घाणीत अडकून, जर स्वतःला असहाय्य करून घेतले, तर त्यांची शेवटची स्थिती त्यांच्या पहिल्या स्थितीहून अधिक वाईट होते. कारण त्यांना नीतिमत्त्वाचा मार्ग समजल्यावर, त्यांनी दिलेली पवित्र आज्ञा सोडून देऊन त्यांनी मागे फिरावे, हे होण्यापेक्षा, त्यांना त्याचे ज्ञान झाले नसते तर त्यांच्यासाठी ते बरे झाले असते.
”आणि त्याने आपल्या सर्व पत्रांत या गोष्टींचा उल्लेख केला आहे. त्यामध्ये समजण्यास कठिण अशा काही गोष्टी आहेत आणि जे अशिक्षित व अस्थिर माणसे इतर शास्त्रलेखांचा जसा विपरीत अर्थ करतात तसा ह्यांचाहि करतात; अशाने आपल्या स्वतःच्या नाशाला कारणीभूत होतात.
”तर प्रियजनहो, तुम्हास या गोष्टी तुम्हास पूर्वीपासून कळत आहेत, म्हणून तुम्ही अनीतिमान लोकांच्या भ्रांतीप्रवाहात सापडून आपल्या स्थिरतेतून ढळू नये ह्यासाठी जपून राहा. आणि आपला प्रभू व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या कृपेत व ज्ञानात वाढत जा. त्यास आता आणि सर्वकाळपर्यंत गौरव असो. आमेन.
”जो संदेश आम्ही त्याच्यापासून ऐकला आहे तोच आम्ही तुम्हास सांगत आहोत, देव प्रकाश आहे आणि त्याच्याठायी मुळीच अंधार नाही. जर आम्ही म्हणतो की, आमची देवाबरोबर सहभागिता आहे पण पापाच्या अंधारामध्ये आम्ही जगतो तर आम्ही खोटे बोलत आहोत व सत्याला अनुसरत नाही.
”जर आम्ही त्याच्या आज्ञा पाळतो तर आम्ही त्यास खऱ्या अर्थाने ओळखले आहे. जो कोणी असे म्हणतो, “मी देवाला ओळखतो!” परंतु त्याच्या आज्ञा पाळत नाही तर तो खोटे बोलत आहे; आणि त्याच्याठायी सत्य नाही. पण जर कोणी त्याच्या वचनाप्रमाणे चालतो, तर त्यांच्यामध्ये देवाची प्रीती पूर्णत्वास गेली आहे. ह्यावरून आपल्याला कळून येते की, आपण त्याच्याठायी आहोत. मी देवामध्ये राहतो असे म्हणणाऱ्याने, जसा येशू ख्रिस्त चालला तसे चालले पाहिजे.
”जे तुम्हास फसविण्याचा प्रयत्न करीत आहेत त्यांच्याविषयी मी तुम्हास या गोष्टी लिहीत आहे. पण तुम्हाविषयी म्हणावयाचे तर, त्याच्याकडून तुमचा अभिषेक झाला तो तुम्हामध्ये राहतो, तेव्हा तुम्हास कोणी शिकविण्याची गरज नाही, त्याचा अभिषेक तो सत्य आहे, खोटा नाही तुम्हास सर्व गोष्टींविषयी शिकवितो त्याप्रमाणे व त्याने तुम्हास शिकविल्याप्रमाणे तुम्ही त्यांच्यामध्ये राहा.
”प्रियांनो, प्रत्येक आत्म्यावर विश्वास ठेवू नका परंतु ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाहीत याची परीक्षा करा कारण जगात पुष्कळ खोटे संदेष्टे निघाले आहेत. अशाप्रकारे तुम्ही देवाचा आत्मा ओळखा “येशू ख्रिस्त देह धारण करून आला.” हे जो प्रत्येक आत्मा कबूल करतो तो देवापासून आहे. आणि जो प्रत्येक आत्मा येशूला कबूल करत नाही, तो देवापासून नाही. हाच ख्रिस्तविरोधकाचा आत्मा आहे; तो येणार हे तुम्ही ऐकले आहे. तो जगात आताही आहे.
”ते आत्मे जगाचे आहेत म्हणून ते जगाच्या गोष्टी बोलतात व जग त्यांचे ऐकते. पण आम्ही देवाचे आहोत. जो देवाला ओळखतो तो आपले ऐकतो. परंतु जो देवाचा नाही तो आपले ऐकत नाही. अशा रीतीने सत्य प्रकट करणारा आत्मा कोणता आणि फसवणारा आत्मा कोणता हे आपण ओळखतो.
”आणि त्याच्या आज्ञेत चालणे म्हणजेच प्रीती करणे होय. हीच आज्ञा आहे जी तुम्ही प्रारंभापासून ऐकले आहे तसे तुम्ही तिच्याप्रमाणे चालावे.
”कारण फसवणूक करणारी, म्हणजे देहाने येणारा येशू ख्रिस्त ह्याला कबूल न करणारी पुष्कळ माणसे जगात उठली आहेत. फसवणूक करणारा व ख्रिस्तविरोधक असलाच आहे. आम्ही केलेले काम तुम्ही निष्फळ होऊ देऊ नका तर त्याचे पूर्ण प्रतिफळ तुम्हास मिळावे, म्हणून खबरदारी घ्या.
”ख्रिस्ताच्या शिक्षणाला चिकटून न राहता जो पुढेपुढेच जातो त्यास देव प्राप्त झाला नाही. जो ख्रिस्ताच्या शिक्षणाला धरून राहतो त्यास पिता व पुत्र या दोघांची प्राप्ती झाली आहे. हे शिक्षण न देणारा कोणी तुम्हाकडे आला तर त्यास घरात घेऊ नका किंवा त्यास सलामही करू नका. कारण जो कोणी त्याचे स्वागत करतो तो त्याच्या दुष्कर्मांचा भागीदार होतो.
”मी मंडळीला काही लिहिले, पण दियत्रेफस ज्याला त्यांचा पुढारी व्हायचे आहे व तो आमचा स्वीकार करीत नाही. या कारणामुळे जेव्हा मी येतो तेव्हा तो जो करीत आहे ते दाखवून देईन. तो वाईट शब्दांनी खोटेपणाने माझ्याविरुद्ध बोलत आहे व एवढ्यावरच तो समाधान मानीत नाही, तर त्यामध्ये भर म्हणून बंधूंचा तो स्वीकार करत नाहीच उलट मंडळीतील जे लोक त्यांचा स्वीकार करू इच्छितात त्यांना अडथळा करतो आणि त्यांना मंडळीबाहेर घालवितो!
”प्रियांनो, मी आपल्या सामाईक तारणाविषयी तुम्हास लिहिण्याचा प्रयत्न करीत असता, मला हे आवश्यक वाटले की, जो विश्वास पवित्रजनांना सर्वकाळसाठी एकदा दिला, तो राखण्याविषयी मी तुम्हास लिहून उत्तेजन द्यावे. कारण, जे या दंडासाठी पूर्वीपासून नेमलेले, असे कित्येकजण चोरुन आत आले आहेत; ते भक्तिहीन लोक आहेत, त्यामुळे ते आपल्या देवाची कृपा पालटून तिला कामातुरपणाचे स्वरूप देवून आपला एकच स्वामी व प्रभू येशू ख्रिस्त ह्याला नाकारतात.
”तू काय करतोस ते मला माहीत आहे. तुझे काम, कष्ट व सहनशीलता हे मी जाणतो. मला हे माहीत आहे की दुष्ट तुला सहन होत नाहीत आणि जे स्वतःला प्रेषित समजतात पण जे तसे नाहीत त्यांची तू परीक्षा केली आणि ते खोटे आहेत हे तुला दिसून आले.
”मला तुमचे दुःख आणि गरीबी माहीत आहे. (परंतु तुम्ही धनवान आहात!) ज्या वाईट गोष्टी लोक बोलतात त्याविषयी मला माहीत आहे, ते म्हणतात आम्ही यहूदी आहोत, पण ते तसे नाहीत, ते सैतानाचे सभास्थान आहेत.
”पण तुझ्याविरुद्ध माझ्याजवळ काही गोष्टी आहेत कारण मूर्तींना वाहिलेली अर्पणे खाणे व व्यभिचार करणे, हा अडथळा इस्राएलाच्या संतानापुढे ठेवण्यास बालाकाला ज्याने शिकविले, त्या बलामाची शिकवण ज्यांनी स्वीकारली आहे असे लोक तुझ्याजवळ आहेत. त्याचप्रमाणे निकलाइतांची शिकवण आचरणारे सुद्धा काहीजण तुमच्यामध्ये आहेत. म्हणून पश्चात्ताप करा! नाही तर मी लवकरच तुमच्याकडे येईन आणि आपल्या तोंडातील तरवारीने त्यांच्याशी लढेन.
”परंतु तुमच्याविरुध्द माझे म्हणणे आहेः ईजबेल नावाची स्त्री जी स्वतःला संदेष्टी म्हणविते आणि ती तिच्या शिकवणीने माझ्या दासांना अनैतिक व्यभिचाराचे पाप व मूर्तींना वाहिलेले अन्न खावयास भूलविते. तरी तुम्ही तिला खुशाल तसे करू देता.
”मला तुझी कामे माहीत आहेत, ती अशी की, तू थंड नाहीस व गरमही नाहीस. तू थंड किंवा गरम असतास तर बरे झाले असते. पण, तू तसा नाहीस, कोमट आहेस, तू थंड नाहीस किंवा गरम नाहीस. म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे. तू म्हणतो मी सधन आहे, मी ‘संपत्ती मिळविली आहे,’ आणि मला कशाची गरज नाही, पण तू कष्टी, दयनीय, गरीब, आंधळा व नग्न आहेस हे तुला कळत नाही.
”ज्यांच्यावर मी प्रेम करतो, त्यांना शिकवण देतो व त्यांनी कसे रहावे याची शिस्त लावतो, म्हणून झटून प्रयत्न करा आणि पश्चात्ताप करा.
”तो मोठा अजगर, ‘सैतान’ म्हटलेला तोच तो जुनाट साप होय. तो संपूर्ण जगाला फसवतो. त्या सापाला त्याच्या दूतांसह पृथ्वीवर टाकण्यात आले. आणि मी स्वर्गात एक मोठा आवाज ऐकला; त्याचे शब्द असे होते, आता आमच्या देवाचे तारण आणि सामर्थ्य आणि राज्य आले आहे. आणि त्याच्या ख्रिस्ताचा अधिकार हे प्रकट झाले आहेत; कारण आमच्या भावांना दोष देणारा आमच्या देवापुढे स्वर्गात जो त्यांच्यावर रात्रंदिवस आरोप करीत असे, तो खाली टाकण्यात आला आहे. त्यांनी कोकर्याच्या रक्ताद्वारे, आपल्या साक्षीच्या वचनाद्वारे, त्याच्यावर विजय मिळवला आहे. आणि त्यांना मरावे लागले तरी त्यांनी आपल्या जीवावर प्रीती केली नाही.
”मग मी स्वर्गातून आणखी एक वाणी ऐकली; ती म्हणाली, अहो ‘माझ्या लोकांनो,’ तिच्यामधून बाहेर या. म्हणजे तुम्ही तिच्या पापात भागीदार होऊ नये आणि यासाठी की, तिच्या कोणत्याही पीडा तुमच्यावर येऊ नयेत.
”आणि तुझ्यात ‘दिव्याचा उजेड.’ ह्यापुढे कधी दिसणार नाही; तुझ्यात वराचा आणि वधूचा आवाज ह्यापुढे ऐकू येणार नाही. कारण तुझे व्यापारी हे पृथ्वीचे मोठे लोक होते; आणि तुझ्या जादूटोण्यांनी सर्व राष्ट्रे फसवली गेली.
”मग त्या पशूला व त्याच्याबरोबर त्या खोट्या संदेष्ट्याला धरण्यात आले; त्याने त्याच्यासमोर चिन्हे करून, त्या पशूने शिक्का घेणार्यांस व त्याच्या मूर्तीला नमन करणार्यांस फसवले होते. या दोघांनाही ‘गंधकाने जळणार्या’ अग्नीच्या सरोवरात जिवंत टाकण्यात आले;
”आणि ज्याला ‘दियाबल’ आणि ‘सैतान’ म्हणतात त्या पुरातन ‘सर्पाला’ म्हणजे त्या अजगराला त्याने धरले, एक हजार वर्षांसाठी त्यास बांधले, आणि अगाधकूपात टाकले; आणि त्यामध्ये बंद करून वर शिक्का लावला; म्हणजे ती हजार वर्षे पूर्ण होईपर्यंत त्याने राष्ट्रांना आणखी फसवू नये. त्यानंतर त्यास पुन्हा थोडा वेळ सोडणे जरूर होते.
”आणि त्यांना फसविणार्या सैतानाला ‘अग्नीच्या व गंघकाच्या’ सरोवरात टाकण्यात आले; तो पशू व तो खोटा संदेष्टा हे; तेथेच असून ते रात्रंदिवस सदासर्वकाळ पीडा भोगतील.
”पण भेकड, अविश्वासू, अमंगळ, खुनी, जारकर्मी, चेटकी, मूर्तिपुजक आणि सगळे लबाड ह्यांना अग्नीने आणि गंधकाने जळणार्या सरोवरात वाटा मिळेल; हे दुसरे मरण होय.”
”तेथे कोणतीही अशुद्ध गोष्ट किंवा अमंगळपणाची कृती करणारा अथवा लबाडी करणारा कोणीही मनुष्य, कोणत्याही प्रकारे ‘प्रवेश करणार नाही’ पण कोकर्याच्या ‘जीवनाच्या पुस्तकात ज्यांची नावे लिहिण्यात आली आहेत त्यांनाच’ प्रवेश करता येईल.
”परंतु ‘कुत्रे’ चेटकी, जादूटोणा करणारे, व्यभिचारी, मूर्तिपूजा करणारे आणि निरनिराळ्या रीतीने लबाडीची आवड धरणारे व लबाड बोलणारे बाहेर राहतील.
”या पुस्तकात भविष्यकाळाबाबत नमूद केलेली वचने जो ऐकतो, त्यास मी गंभीरपणे सावधान करतोः जर कोणी ‘ह्यामध्ये भर घालील, तर या पुस्तकात लिहिलेल्या’ पीडा देव त्याच्यावर आणील; ‘आणि’ जो कोणी भविष्यकाळाबाबत संदेश देणाऱ्या या पुस्तकामधून काही ‘काढून टाकील’ त्याचा ज्यांच्याबाबत या पुस्तकात लिहिले आहे, त्या जीवनाच्या झाडाचा आणि पवित्र नगराचा वाटा देव काढून घेईल.
”