23 – प्रेम
हे सर्वशक्तिमान देवाचे पवित्र शब्द आहेत.
माणसांच्या बोलण्यात आपल्याला रस नसतो.
देवावर प्रेम करणार् या प्रत्येकासाठी... याबद्दल देव असे म्हणतो: प्रेम.
हे सर्वशक्तिमान देवाचे पवित्र शब्द आहेत.
माणसांच्या बोलण्यात आपल्याला रस नसतो.
देवावर प्रेम करणार् या प्रत्येकासाठी... याबद्दल देव असे म्हणतो: प्रेम.
परंतु तुम्हा ऐकणाऱ्यांस मी सांगतो, तुमच्या शत्रूंवर प्रीती करा. जे तुमचा व्देष करतात, त्यांचे चांगले करा. जे तुम्हास शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या. जे तुमचा अपमान करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. जर कोणी तुमच्या एका गालावर मारतो तर त्याच्यासमोर दुसराही गाल करा. जर कोणी तुमचा अंगरखा घेतो तर त्यास तुमची बंडी ही घेऊन जाण्यास मना करू नका.
”प्रियांनो, आपण एकमेकांवर प्रीती करावी कारण प्रीती देवाकडून आहे आणि जो कोणी प्रीती करतो तो प्रत्येकजण देवापासून जन्मला आहे आणि देवाला ओळखतो. जो प्रीती करीत नाही, तो देवाला ओळखत नाही कारण देव प्रीती आहे. देवाने आपला एकुलता एक पुत्र या जगात पाठविला यासाठी की त्याच्याद्वारे आम्हास जीवन मिळावे. अशाप्रकारे त्याने त्याची आम्हावरील प्रीती दाखवली आहे. आम्ही देवावर प्रीती केली असे नाही तर त्याने आम्हावर प्रीती केली व आपल्या एकुलत्या एका पुत्राला आमच्या पापांकरिता प्रायश्चित्त म्हणून पाठवले; यातच खरी प्रीती आहे. प्रियांनो, जर देवाने आमच्यावर अशाप्रकारे प्रीती केली तर आम्ही एकमेकांवर प्रीती केलीच पाहिजे.
”“एखाद्यावर संकट आले तर त्याच्या मित्रांनी त्याला दया दाखवावी आणि आपला मित्र सर्वशक्तीमान देवापासून दूर गेला तरी माणसाने मित्राशी निष्ठा ठेवली पाहिजे.
”म्हणून मनुष्य आपल्या आईबापांस सोडून आपल्या बायकोला जडून राहील आणि ते दोघे एक देह होतील.
”म्हणून मग याकोब आपल्या मामापाशी राहिला आणि त्याने सात वर्षे त्याची सेवाचाकरी केली; परंतु राहेलीवरील गाढ प्रेमामुळे ती वर्षे त्याला फार थोड्या दिवसासारखी वाटली.
”“तू आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख म्हणजे त्यामुळे परमेश्वर तुझा देव जो देश तुला देत आहे त्या देशात तुला दीर्घायुष्य लाभेल.
”“तू आपल्या शेजाऱ्याच्या घराचा लोभ धरु नकोस; त्याच्या बायकोचा लोभ धरु नकोस; त्याचा गुलाम, त्याची स्त्री गुलाम, बैल, गाढव किंवा त्याच्या मालकीचे जे काही असेल त्या कशाचाही लोभ धरु नकोस.”
”“जर तुम्हाला एखादा हरवलेला बैल किंवा एखादे गाढव दिसले तर त्याचा मालक तुमचा शत्रू असला तरी तुम्ही ते त्याच्या मालकाकडे नेऊन सोडावे. “जास्त ओझ्याच्या भारामुळे एखाद्या जनावराला चालता येत नसल्याचे तुम्ही पाहिले तर ते जनावर तुमच्या शत्रुचे असले तरी तुम्ही थांबून त्या जनावराला मदत करावी.
”परमेश्वर मोशेपुढून गेला व म्हणाला, “मी याव्हे म्हणजे प्रभु आहे; मी दयाळू, कनवाळू, मंदक्रोध (लवकर राग न येणारा,) महान प्रेमाने पुरेपूर भरलेला व विश्वास ठेवण्यास पात्र असा देव आहे.
”“आपल्या मनात आपल्या भावाचा द्वेष बाळगूं नका; आपल्या शेजाऱ्याने चुकीचे काही कृत्य केल्यास त्याची कान उघाडणी करावी, परंतु त्याच्या अपराधामध्ये सहभागी होऊ नये. लोकांनी तुमचे वाईट केलेले विसरुन जावे, त्याबद्दल सूड घेण्याचा प्रयत्न करु नका तर आपल्या शेजाऱ्यावर स्वत: सारखी प्रीती करा. मी परमेश्वर आहे!
”तुमच्याबरोबर राहणाऱ्या परदेशीय माणसाला स्वदेशीय माणसासारखेच माना; आणि त्याच्यावर स्वत: सारखीच प्रीती करा; कारण तुम्हीही एके काळी मिसरदेशात परदेशीय होता. मी तुमचा देव परमेश्वर आहे!
”“तुझा एखादा भाऊबंद, त्याचे स्वत:चेपोट देखील भरता येऊ नये, इतका कंगाल झाला तर तू त्याला परक्या किंवा उपऱ्याप्रमाणे तुझ्याजवळ राहू द्यावे; त्याला तू पैसे देशील तर त्यावर व्याज घेऊ नको. परमेश्वरदेवाचे भय धर व आपल्या भाऊबंदालाआपल्यापाशी राहू दे. तू त्याला उसने दिलेल्या पैशावर व्याज घेऊ नको आणि त्याला विकलेल्या अन्न धान्यावर नफा काढण्याचा प्रयत्न करु नको.
”(मोशे फार नम्र माणूस होता. त्याने कधी अभिमान धरला नाही किंवा बढाई मारली नाही पृथ्वीवरील कोणत्याही माणसापेक्षा मोशे अधिक नम्र होता.)
”आणि आपला देव परमेश्वर ह्यावर संपूर्ण अंत:करणाने, संपूर्ण मनाने व संपूर्ण शक्तीने प्रेम करा.
”“तेव्हा लक्षात ठेवा तुमचा देव परमेश्वर हाच एक देव आहे. त्यावर विश्वास ठेवा. तो आपला करार पाळतो. त्याच्यावर प्रेम करणाऱ्या आणि त्याच्या आज्ञा पाळणाऱ्या लोकांवर व त्यांच्या पुढच्या हजार पिढ्यांवर तो दया करतो. पण त्याचा द्वेष करणाऱ्यांना तो शासन करतो. तो त्यांचा नाश करील. त्याचा द्वेष करणाऱ्यांना शासन करण्यास तो विलंब करणार नाही.
”अनाथांना, विधवांना इतकेच काय शहरात आलेल्या नवख्यांनाही साहाय्य करतो. त्यांना अन्न वस्त्र पुरवतो. म्हणून तुम्ही परक्यांशी प्रेमाने वागले पाहिजे. कारण मिसर देशात तुम्हीही उपरेच होतात.
”“म्हणून तुमचा देव परमेश्वर ह्यावर प्रेम करा. त्याच्या आज्ञेप्रमाणे वागा. त्याने घालून दिलेल्या नियमांचे, आज्ञांचे पालन करा.
”“परमेश्वर म्हणतो, ‘ज्या आज्ञा मी आज तुम्हांला देत आहे त्यांचे तुम्ही काटेकोरपणे पालन करा. मन:पूर्वक तुमचा देव परमेश्वर याची सेवा करा. त्याच्यावर प्रेम करा.
”पण त्याचे ऐकू नका. कारण तुमचा देव परमेश्वर तुमची परीक्षा पाहात असेल. हे लोक आपल्यावर मनापासून प्रेम करतात की नाही हे परमेश्वराला पाहायचे असेल.
”“तेव्हा तुम्हांला शक्य आहे ते त्यांना द्या. उदार अंत:करणाने द्या. या सत्कृत्याबद्दल तुम्हांला परमेश्वर देवाचा आशीर्वाद मिळेल. तुम्ही जे काम हाती घ्याल त्यात तुम्हांला यश मिळेल. गरीब लोक तर देशात नेहमीच असणार म्हणून मी म्हणतो की त्यांना मदत करायला तयार राहा. आपल्या देशातील गरजवंतांना सढळ हाताने मदत करा.
”प्रत्येकाने यथाशक्ति दिले पाहिजे परमेश्वराने आपल्याला काय दिले याचा विचार करुन आपण काय द्यायचे ते ठरवावे.
”तुमचा देव परमेश्वर तुम्हाला व तुमच्या पूर्वजांना आपल्याकडे वळवील आणि त्याच्यावर तुम्ही मन:पूर्वक प्रेम कराल व सुखाने जगाल.
”तुमचा देव परमेश्वर ह्याजवर प्रेम करा. त्याच्या आज्ञा पाळा. त्याला सोडू नका. कारण परमेश्वर म्हणजेच जीवन. तसे केलेत तर अब्राहाम, इसहाक, व याकोब या तुमच्या पूर्वजांना वचन दिल्याप्रमाणे परमेश्वर तुम्हांला त्या प्रदेशात दीर्घायुष्य देईल.”
”परतुं ज्या आज्ञा आणि जें शास्त्र परमेश्वराचा सेवक मोशे याने आज्ञेकरून तुम्हास सांगितलें, त्याप्रमाणें तुम्ही चालावें, म्हणजे तुम्ही आपला देव परमेश्वर यावर प्रीती करावी, आणि त्याच्या सर्व मार्गात चालावें, आणि त्याच्या आज्ञा पाळाव्या, आणि त्यासीं जडून राहावें, आणि आपल्या संपूर्ण अंतःकरणाने व आपल्या संपूर्ण जिवाने त्याची सेवा करावी म्हणून फार संभाळा.''
”.अति गर्विष्टपणाने आणखी बोलूं नका;तुमच्या रोंडातून बढाई न निघो,कारण यहोवा ज्ञानाचा देव आहे;त्याच्याकडून कृत्यें तोललीं जातात.
”तेव्हा असे झाले कि दाविदाने शाउलाशी बोलणे समाप्त केले असता योनाथानाचा जीव दाविदाच्या जीवाशी जडला होता,आणि योनाठान आपल्या जीव सारखी त्याझ्वर प्र्रीती करीत होता. आणि त्या दिवशी शौलाने त्याला ठेविले,आणि त्याला त्याच्या बापाच्या घरास माघारी जाऊ दिले नाही. मग योनाथानाने दाविदास करार केला कारण तो आपल्या जिवासारखी त्याजवर प्रीती करीत होता. आणि योनाथानाने आपल्या अंगात जो झगा होता तो कडून दाविदाला दिला आणि आपले अंग वस्त्रे आणि आपली तरवार व आपले धनुष्य व आपला कमरबंद हीहि दिली.
”आणि पोर गेल्यावर दावीद दक्षिणेकडील एका ठिकाणातून उठून भूमीवर उपढा पडला व तीन वेळां नमला;तेव्हां ते एकमेकांचें चुंबन घेऊन एकमेकांसाठी रडले, पण दावीद अदिक रडला. आणि योनाथान दावीदाला म्हणाला, शांतीनें जा, कारण आपण दोघांनी यहोवाच्या नांवाने शपथ वाहून म्हटले आहे की, माझ्यामध्यें व तुझ्यामध्ये आणि माझ्या संतानामध्यें व तुझ्या संतानामध्यें यहोवा सर्वकाळ असो, मग तो उठून निघून गेला व योनाथान नगरांत गेला.
”“एखाद्यावर संकट आले तर त्याच्या मित्रांनी त्याला दया दाखवावी आणि आपला मित्र सर्वशक्तीमान देवापासून दूर गेला तरी माणसाने मित्राशी निष्ठा ठेवली पाहिजे.
”परमेश्वरा, माझ्याशी दयाळू राहायचे लक्षात असू दे तुझ्याजवळचे नेहमीचे कोवळे प्रेम मला दाखव. माझे पाप आणि तरुणपणी मी ज्या वाईट गोष्टीकेल्या त्या लक्षात ठेवू नकोस परमेश्वरा, तुझ्या चांगल्या कीर्तीसाठी माझी प्रेमाने आठण ठेव.
”तो दीन माणसांना त्यांचे मार्ग दाखवतो तो त्यांचे न्यायीपणाने नेतृत्व करतो.
”जे लोक परमेश्वराचे करार आणि वचने पाळतात त्यांच्याशी तो सच्चा आणि दयाळू असतो.
”देवाच्या भक्तांनो, तुम्ही परमेश्वरावर प्रेम करा. परमेश्वर त्याच्यावर विश्वास टाकणाऱ्या लोकांचे रक्षण करतो. परंतु जे लोक स्वतच्या सामर्थ्याचा गर्व करतात त्यांना तो शिक्षा करतो. परमेश्वर त्यांना योग्य अशीच शिक्षा देतो.
”परमेश्वरा, तुझे खरे प्रेम आकाशापेक्षाही उत्तुंग आहे. तुझी इमानदारी ढगांपेक्षा उंच आहे. परमेश्वरा तुझा चांगुलपणा सर्वात उंचपर्वतापेक्षाही उंच आहे तुझा न्यायीपणा सर्वात खोल, समुद्रापेक्षाही खोल आहे. परमेश्वरा तू मनुष्याला आणि प्राण्यांना वाचवतोस. तुझा प्रेमळ दयाळूपणा सगळ्यांत किंमती आहे. माणसे आणि देवदूत तुझ्याकडे संरक्षणासाठी येतात.
”म्हणून परमेश्वरा तुझी करुणा माझ्यापासून लपवून ठेवू नकोस. तुझा दयाळूपणा आणि निष्ठा माझे सतत रक्षण करो.”
”जो माणूस गरीबांना यशस्वी होण्यासाठी मदत करतो त्याला अनेक आशीर्वाद मिळतील. संकट येईल तेव्हा परमेश्वर त्याला वाचवेल. परमेश्वर त्या माणसाचे रक्षण करेल आणि त्याचा जीव वाचवेल. पृथ्वीवर त्या माणसाला आशीर्वाद मिळेल. देव त्या माणसाचा त्याच्या शत्रूकडून नाश होऊ देणार नाही. तो माणूस जेव्हा आजारी पडून अंथरुणावर असेल तेव्हा परमेश्वर त्याला शक्ती देईल. तो आजारात अंथरुणावर पडला तरी परमेश्वर त्याला बरे करील.
”देवा, माझ्यावर दया कर, तुझ्या अतिशय प्रेमळ दयाळूपणाने आणि तुझ्या कृपेने माझी पापे पुसून टाक.
”परमेश्वरा, तुझे प्रेम चांगले आहे. मला तुझ्या खऱ्या प्रेमाने उत्तर दे. तुझ्यातल्या सगळ्या दया बुध्दीने तू माझ्याकडे वळ आणि मला मदत कर.
”प्रभु, तू चांगला आणि दयाळू आहेस. तुझी माणसे तुला मदतीसाठी हाका मारतात, तू त्या माणसांवर खरोखरच प्रेम करतो.
”प्रभु, तू दयाळू आणि कृपाळू देव आहेस. तू सहनशील निष्ठावान आणि प्रेमपूर्ण आहेस.
”जर एखादा माणूस त्याच्या शेजाऱ्याबद्दल गुप्तपणेवाईट गोष्टी बोलत असेल तर मी त्या माणसाला थांबवेन. मी लोकांना गर्विष्ठ होऊ देणार नाही आणि ते इतरांपेक्षा चांगले आहेत असे त्यांना वाटू देणार नाही.
”परमेश्वर सहानुभूतिपूर्ण आणि दयाळू आहे. देव सहनशील आणि प्रेमाचा सागर आहे. परमेश्वर नेहमीच टीका करीत नाही. परमेश्वर आमच्यावर सदैव रागावलेला राहात नाही. आम्ही देवाविरुध्द पाप केले पण त्याने आम्हाला त्या पापाला साजेशी शिक्षा केली नाही. देवाचे त्याच्या भक्तांबद्दलचे प्रेम हे स्वर्ग पृथ्वीव रजितक्या उंचीवर आहे तितके आमच्यावर आहे. आणि देवाने आमची पापे पूर्व आणि पश्चिम एकमेकींपासून जितक्या अंतरावर आहेत तितक्या अंतरावर नेऊन ठेवली.
”परंतु परमेश्वराने त्याच्या भक्तांवर नेहमीच प्रेम केले आणि तो सदैव त्याच्या भक्तांवर प्रेम करीत राहाणार आहे. देव त्यांच्या मुलांशी आणि मुलांच्या मुलांशीदेखील चांगला वागणार आहे.
”परमेश्वराला धन्यावाद द्या. कारण तो चांगला आहे. त्याचे प्रेम कायम राहाणार आहे.
”परमेश्वराला त्याच्या प्रेमाबद्दल आणि तो ज्या अद्भुत गोष्टी लोकांसाठी करतो त्याबद्दल धन्यवाद द्या. देव तान्हेल्या आत्म्याचे समाधान करतो. देव भुकेल्या आत्म्याला चांगल्या वस्तूंनी भरतो.
”देव आपल्यावर खूप प्रेम करतो आणि देव आपल्याशी सदैव खरा वागतो. परमेश्वराचा जयजयकार करा!
”जेव्हा देवाचे लोक शांततेने एकत्र नांदतात, तेव्हा ते खरोखरच खूप चांगले आणि आल्हाददायक असते.
”स्रवर्गातल्या देवाची स्तुती करा. त्याचे खरे प्रेम सदैव असते.
”परमेश्वर दयाळू आणि कृपाळू आहे. परमेश्वर सहनशील आणि प्रेमळ आहे. परमेश्वर प्रत्येक मनुष्याशी चांगला वागतो. तो त्याने निर्माण केलेल्या प्रत्येक गोष्टीवर दया करतो.
”परमेश्वर नम्र लोकांना मदत करतो. परंतु तो वाईट लोकांना अडचणीत टाकतो.
”प्रेम करणे कधी सोडू नकोस. नेहमी इमानदार आणि प्रामाणिक राहा. या गोष्टी तुझाच एक घटक बनव. त्यांना तुझ्या मानेभोवती बांध. त्या गोष्टी तुझ्या हृदयावर कोर.
”तुझ्या विहिरीतून वाहणारे पाणीच फक्त पी. आणि तुझे पाणी रस्त्यावर वाहून जाऊ देऊ नकोस. तू फक्त तुझ्या बायको बरोबरच लैगिक संबंध ठेवायला हवेस. तुझ्या घराबाहेरच्या मुलांचा बाप होऊ नकोस. तुझी मुले फक्त तुझीच असायला हवीत. घराबाहेरच्या इतर लोकांबरोबर त्यांची भागीदारी असायला नको. म्हणून तुझ्या बायकोबरोबर सुखी राहा. तरुणपणी जिच्याबरोबर लग्न केलेस तिलाच उपभोग. ती सुंदर हरिणीसारखी आहे. गोजिरवाण्या हरिणाच्या पाडसासारखी आहे. तिचे प्रेम तुझे समाधान करो. तू तिच्या प्रेमात बंदीवान हो. दुसऱ्याच्या बायकोकडून तू असा बंदीवान होऊ नकोस. तुला दुसऱ्याच्या बायकोच्या प्रेमाची गरज नाही.
”परमेश्वर या सहा, नाही सात गोष्टींचा तिरस्कार करतो. डोळे, जे माणूस गर्विष्ठ आहे हे दाखवतात. जीभ, जी खोटे बोलते, हात, जे निरपराध्यांना ठार मारतात. ह्रदय जे वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखते. पाय जे वाईट गोष्टी करायला धाव घेतात. माणूस जो खोटे बोलतो आणि कोर्टात खऱ्या नसलेल्या गोष्टी सांगतो. माणूस जो वादविवादाला सुरुवात करतो आणि दुसऱ्यांमध्ये भांडणे लावून देतो.
”जर एखादा माणूस परमेश्वराला मान देत असला तर तो वाईटाचा तिरस्कार करेल. मी (ज्ञान) गर्वाचा आणि जे लोक इतरांपेक्षा स्वत:ला मोठे समजतात अशा लोकांचा तिरस्कार करते. मी वाईट मार्ग आणि खोटे बोलणाऱ्या तोंडांचा तिरस्कार करते.
”मी (ज्ञान), माझ्यावर जे प्रेम करतात त्यांच्यावर प्रेम करते. आणि जे लोक मला शोधायचा खूप प्रयत्न करतात त्यांना मी हटकून सापडते.
”मत्सरमुळे वादविवाद होतात. पण प्रेम लोकांनी केलेल्या प्रत्येक चुकीच्या गोष्टीला क्षमा करते.
”जे लोक गर्विष्ठ आहेत ते बिनमहत्वाचे ठरतील. पण जे लोक विनम्र आहेत ते शहाणेही होतील.
”दयाळू माणसाला लाभ होईल. पण जो माणूस उलट्या काळजाचा असतो तो स्वत:वर संकटे ओढवून घेतो.
”जर एखादा माणूस उदारहस्ते देत असेल तर त्याला अधिक मिळेल. पण एखाद्याने द्यायला नकार दिला तर तो गरीब होईल. जो उदार होऊन देतो त्याला लाभ होतो. जर तुम्ही दुसऱ्याना मदत केली तर तुम्हाला अधिक फायदा होईल.
”जर एखाद्याचे आपल्या मुलांवर खरोखच प्रेम असेल तर तो त्यांचे चुकल्यावर त्यांना काठीने मारायलाही कमी करणार नाही. ते चुकीने वागल्यावर तो त्यांना शिस्त लावेल. जर तुमचे तुमच्या मुलावर प्रेम असेल तर तुम्ही त्याला योग्य वेळी काळजीपूर्वक शिकवाल.
”जो शेजाऱ्याला पाण्यात पाहातो, तो पाप करतो. जर सुखी व्हायचे असेल तर त्या गरीबांशी दयाळू राहा.
”जो माणूस गरीबांवर संकटे आणतो तो आपण देवाचा आदर करीत नाही हे दाखवतो. देवानेच दोघांनाही निर्माण केले आहे. पण जर एखादा गरीबांशी कनवाळूपणे वागला तर तो देवाचा आदर करतो हे दिसून येते.
”शांतपणे दिलेल्या उत्तरामुळे राग निघून जातो. पण तिखट उत्तरामुळे राग वाढतो.
”गर्विष्ठ माणसाकडे असलेल्या सगळ्या गोष्टींचा परमेश्वर नाश करील. पण विधवेकडे असलेल्या गोष्टीचे परमेश्वर रक्षण करतो.
”जो माणूस आपण इतरांपेक्षा चांगले आहोत, असा विचार करतो त्याचा परमेश्वर तिरस्कार करतो. परमेश्वर त्या सर्व गर्विष्ठ लोकांना नक्कीच शिक्षा करील. खरे प्रेम आणि इमानदारी तुम्हाला शुध्दकरील. परमेश्वराचा आदर करा म्हणजे तुम्ही वाईटापासून खूप दूर राहाल.
”जर माणूस गर्विष्ठ असला तर तो सर्वनाशाच्या संकटात असतो. जर एखादा माणूस आपण इतरांपेक्षा चांगले आहोत, असा विचार करत असला तर तो पराभवाच्या संकटात असतो. विनम्र राहून गरीब लोकांबरोबर राहणे हे जे लोक स्वत:ला इतरांपेक्षा चांगले समजतात, त्यांच्याबरोबर राहून श्रीमंतीचे वाटेकरी होण्यापेक्षा चांगले असते.
”मायेच शब्द मद्यासारखे असतात. त्यांचा स्वीकार करणे सोपे असते आणि ते प्रकृतीसाठी चांगले असतात.
”एखाद्याने तुमचे काही वाईट केल्यानंतर जर तुम्ही त्याला क्षमा करु शकला तर तुम्ही मित्र बनू शकता. पण जर तुम्ही त्याची करणी सतत मनात ठेवली तर त्यामुळे मैत्रीत बाधा येईल.
”मित्र नेहमी प्रेम करतो. खरा भाऊ संकटाच्या वेळीसुध्दा मदत करतो.
”जीवन किंवा मरणही देणारे शब्द जीभ बोलू शकते. आणि ज्यांना बोलायला आवडते त्यांनी त्यांच्या बोलण्याच्या परिणामाचा स्वीकार करायची तयारी ठेवली पाहिजे.
”काही मित्रांबरोबर असणे आनंददायी असते. पण जवळचा मित्र भावापेक्षाही चांगला असतो.
”गरीब माणसांना पैसे देणे हे परमेश्वराला कर्ज देण्यासारखे आहे. त्यांच्याशी दयेने वागल्याबद्दल परमेश्वर परतफेड करील.
”लोक खरे आणि प्रामाणिक असावेत अशी इच्छा केली जाते, म्हणून खोटे असण्यापेक्षा गरीब असणे चांगले.
”ज्या गोष्टी योग्य व न्यायी आहेत त्याच करा. बळी अर्पण करण्यापेक्षा अशा गोष्टीच परमेश्वराला आवडतात. गर्विष्ठ दृष्टी व गर्विष्ठ विचार पापरुप आहेत. माणूस पातकी आहे हेच ते दर्शवितात.
”जर एखाद्याने गरीब लोकांना मदत करायला नकार दिला तर जेव्हा त्याला मदतीची गरज भासेल तेव्हा त्याला ती मिळणार नाही.
”जो माणूस नेहमी प्रेम आणि दया दाखवायचा प्रयत्न करतो त्याला चांगले आयुष्य, संपत्ती आणि मान मिळेल.
”माणसाने जर आपण काय बोलतो याची काळजी घेतली तर तो बऱ्याच संकटांतून सुटू शकेल. गर्विष्ठ माणसाला आपण इतरांपेक्षा चांगले आहोत असे वाटत असते. तो वाईट आहे हे तो आपल्या करणीने दाखवतो.
”जो मनुष्य स्वखुशीने आनंदाने देतो त्याला आशीर्वाद मिळेल. कारण तो आपले अन्न गरिबांबरोबर वाटून खातो.
”जर एखादा माणूस स्वत:ला इतरांपेक्षा चांगला समजत असेल तर त्याला जबरदस्तीने जायला भाग पाडा. जेव्हा तो माणूस जाईल तेव्हा त्याच्याबरोबर संकटही जाईल. नंतर वाद आणि फुशारक्याही बंद होतील. जर तुम्ही शुध्द मनावर आणि प्रेमळ शब्दांवर प्रेम करीत असाल तर राजाही तुमचा मित्र होईल.
”तुमचा शत्रू जर भुकेला असला तर त्याला खायला अन्न द्या. तो जर तहानेला असला तर त्याला प्यायला पाणी द्या. तुम्ही जर असे केलेत तर त्याला लाज वाटेल. त्याच्या डोक्यावर जळते निखारे टाकल्यासारखे ते असेल. आणि परमेश्वर तुम्हाला बक्षीस देईल कारण तुम्ही तुमच्या शत्रूशी चांगले वागलात.
”जर एखाद्याने गरीब लोकांना दिले तर त्याच्या सगळ्या गरजा पूर्ण होतील. पण जर एखाद्याने गरीबांना मदत करायला नकार दिला तर त्याच्यावर खूप संकटे येतील.
”रागावलेला माणूस संकटे आणतो आणि जो माणूस पटकन् रागावतो तो अनेक पापांचा अपराधी असतो.
”माणसाचा गर्व त्याला खाली आणतो. जर एखाद्याला तो इतरापेक्षा चांगला आहे असे वाटत असेल तर त्यामुळे त्याचा नाश होईल. पण जर एखादा माणूस विनम्र असेल तर इतर लोक त्याचा आदर करतील.
”तीन गोष्टी माझ्या समजण्यापलिकडे आहेत, खरं म्हणजे चार गोष्टी, ज्या मी समजू शकत नाही. आकाशात उडणारा गरुड, दगडावर चालणारा साप, समुद्रात जाणारे जहाज आणि स्त्रीच्या प्रेमात पडलेला पुरुष
”जर एखादा माणूस स्वत:ला मदत करु शकत नसेल तर तुम्ही त्याला मदत करा. जे लोक संकटात आहेत त्या सर्वांना तुम्ही मदत केली पाहिजे. ज्या गोष्टी योग्य आहेत हे तुम्हाला माहीत आहे त्या गोष्टीसाठी लढा आणि सर्वांना योग्य रीतीने न्याय द्या. गरीबांच्या आणि ज्या लोकांना तुमची गरज आहे अशा लोकांच्या न्यायाचे रक्षण करा.
”चटकन राग येऊ देऊ नका. का? कारण रागावणे हा मूर्खपणा आहे.
”शलमोनाचे सर्वांत सुंदर गीत चुंबनांनी मला झाकून टाक कारण तुझे प्रेम द्राक्षरसापेक्षा चांगले आहे. तुझ्या अत्तराचा खूप चांगला वास येत आहे, पण तुझे नाव मात्र उत्तम अत्तरापेक्षाही गोड आहे. त्यामुळेच तरुणी तुझ्यावर प्रेम करतात. मला तुझ्याबरोबर ने. आपण पळून जाऊ.राजाने मला त्याच्या खोलीत नेले.आम्ही आनंदोत्सव करु आणि तुझ्यासाठी आनंदित होऊ. तुझे प्रेम द्राक्षारसापेक्षा चांगले आहे हे लक्षात ठेव. तरुणी तुझ्यावर योग्य कारणासाठी प्रेम करतात.
”फारोचा रथ ओढणाऱ्या घोड्यांना घोडीजशी उद्दीपित करते त्यापेक्षाही जास्त तू मला उद्दीपित करतेस.त्या घोडड्यांच्या चेहेऱ्यांच्या बाजूंवर आणि गळ्यात सुंदर अलंकार आहेत. हे तुझ्यासाठी केलेले अलंकार: डोक्याभोवतीचा सोन्याचा पट्टा आणि चांदीच्या हार. तुझे सुंदर गाल सोन्याने अलंकृत केले आहेत. तुझा गळा चांदीच्या अलंकारांनी सुंदर दिसत आहे. माझ्या अत्तराचा वास बिछान्यावर लवंडलेल्या राजापर्यंत जातो. माझ्या वक्षस्थळांमध्ये रात्रभर विसावलेला माझा प्रियकर माझ्या गळ्यात असलेल्या सुंगधी द्रव्याच्या पिशवीसारखा आहे माझा प्रियकर एन - गेदीमधील द्राक्षाच्या मळ्याजवळील मेंदीच्या फुलांच्या गुच्छा सारखा आहे. प्रिये, तू किती सुंदर आहेस! तू फारच सुंदर आहेस. तुझे डोळे कबुतरासारखे आहेत. प्रियकरा, तू सुध्दा सुस्वरुप आहेस आणि मोहक आहेस. आपला बिछाना किती आल्हाददायक आणि सुखावह आहे.
”मी शारोनाचे कुंकुमपुष्य (गुलाबपुष्प) आहे. दरीतले कमलपुष्प आहे. प्रिये इतर स्त्रियांमध्ये तू काट्यांतल्या कमलीपुष्पासाखी आहेस. प्रियकरा इतर पुरुषांमध्ये तू रानटी झाडांमध्ये असलेल्या सफरचंदाच्या झाडासारखा आहेस.मला माझ्या प्रियकराच्या सावलीत बसायला आवडते. त्याचे फळ मला गोड लागते. माझ्या सख्याने मला द्राक्षारसाच्या घरात आणले. माझ्यावर प्रेम करायची त्याची इच्छा होती. मनुका देऊन माझ्यात शक्ती आणा. सफरचंद खाऊ घालून मला ताजेतवाने करा. कारण मी प्रेमज्वराने अशक्त झाले आहे. माझ्या सख्याचा डावा बाहू माझ्या मस्तकाखाली आहे आणि त्याच्या उजव्या बाहूने त्याने मला धरले आहे. यरुशलेमच्या स्त्रियांनो मला वचन द्या. तुम्हाला वनातील हरिणींची आणि रानमृगांची शपथ घालून विनवते की माझी तयारी होईयर्पंतप्रेम जागृत करु नका. मी माझ्या सख्याचा आवाज ऐकते. तो येत आहे डोंगरावरुन उड्या मारत, टेकड्यांवरुन बागडत येत आहे. माझा प्रियकर मृगासारखा, हरिणाच्या पाडसासारखा आहे. आमच्या भिंतीच्या पलिकडे उभ्या असलेल्या, खिडकीतून डोकावणाऱ्या, झरोक्यातूनपहाणाऱ्या माझ्या प्रियकराला बघा.
”माझा प्रियकर माझ्याशी बोलतो, “प्रिये, हे सुंदरी ऊठ आपण दूर जाऊ या!” बघ आता हिवाळा संपला आहे. पाऊस आला आणि गेला. शेतात फुले उमलली आहेत, आता गाण्याचे दिवस आले आहेत. ऐक कबूतरे परतली आहेत. अंजिराच्या झाडावर अंजिर लागले आहेत व वाढत आहेत. बहरलेल्या द्राक्षवेलींचा गंध येत आहे. प्रिये, सुंदरी, ऊठ आपण आता दूर जाऊ या.” माझ्या कबुतरा, उंच कड्यावरच्या गुहेत लपलेल्या, पर्वतात लपलेल्या माझ्या कबुतरा, मला तुला बघू दे. तुझा आवाज ऐकू दे. तुझा आवाज अतिशय गोड आहे आणि तू खूप सुंदर आहेस. आमच्यासाठी कोल्ह्यांना पकडा. लहान कोल्ह्यांनी द्राक्षाच्या मळ्यांचा नाश केला आहे. आता आमचे द्राक्षाचे मळे फुलले आहेत. माझा प्रियकर माझा आहे आणि मी त्याची. माझा सखा कमलपुष्पांवर जगतो. जेव्हा दिवस शेवटची घटका मोजतो आणि सावल्या लांब पळून जातात प्रियकरा पर्वताच्या कड्यावरच्याहरिणासारखा किंवा लहान हरिणासारखा परत फीर.
”यरुशलेमच्या स्त्रियांनो, रानहरिणी आणि मृगी यांच्या साक्षीने मला वचन द्या. मी जो पर्यंत तयार होत नाही तो पर्यंत प्रेम जागवू नका, प्रेम जागृत करु नका. खूप लोकांच्या समूहाबरोबर वाळवंटातूनयेणारी ही स्त्री कोण आहे? गंधरस व ऊद आणि इतर धूवासिक द्रव्ये गाळल्यानंतर होणाऱ्या घुरासारखे त्यांच्या मागे धुळीचे लोट उडत आहेत.
”प्रिये, तू किती सुंदर आहेस! सखे, तू खूप सुंदर आहेस. तुझ्या बुरख्याआड तुझे डोळे कपोतासारखे दिसतात. तुझे केस लांब आणि गिलाद पर्वताच्या उतारावरुन धावत जाणाऱ्या मेंढ्यांच्या कळपाप्रमाणे हेलकावणारे आहेत. तुझे दात तुकतीच आंघोळ करुन आलेल्या बकऱ्या सारखे आहेत. त्या सर्व जुळ्यांना जन्म देतात आणि त्यांच्या पैकी कुणीही आपले बाळ गमावलेले नाही. तुझे ओठ लाल रंगाच्या रेशमाच्या धाग्याप्रमाणे आहेत. तुझे मुख सुंदर आहे. घुंगटाखाली तुझ्या कपाळाच्या दोन बाजू डाळिंबाच्या दोन फोडींप्रमाणे आहेत. तुझी मान दाविदाच्या मनोऱ्याप्रमाणे बारीक आणि लांब आहे. त्या मनोऱ्यांच्या भिंती बलशाली सैनिकांच्या एक हजार ढालींनी शोभिंवंत केल्या होत्या. तुझी वक्षस्थळे कमलपुष्पांत चरत असलेल्या जुळ्या हरिणश्रावकासारखी आहेत, मृगीच्या जुळ्या पाडसासारखी आहेत. दिवस शेवटच्या घटका मोजत आहेत आणि सावल्या दूर पळत आहेत. तेवढ्या वेळात मी त्या गंधरसाच्या उदाच्या पर्वतावर जाईन. प्रिये, तू सगळीच फार सुंदर आहेस. तुझ्यात कुठेही काहीही दोष नाही.
”माझ्या प्रिये, माझ्या वधू, तू मला उद्दीपित बनवतेस. फक्त तुझ्या एका डोळ्याने, तुझ्या गळ्यातल्या हारातील एका रत्नाने तू माझे हृदय चोरले आहेस. माझ्या प्रिये, माझ्या वधू तुझे, प्रेम फार सुंदर आहे. तुझे प्रेम द्राक्षारसापेक्षा चांगले आहे. तुझ्या अत्तराचा वास इतर सुगंधी द्रव्यापेक्षा चांगला आहे. माझ्या वधू, तुझ्या ओठातून मध गळतो. तुझ्या जिभेखाली मध आणि दूध आहे. तुझ्या कपड्यांना अत्तरासारखा गोड सुवास आहे. माझ्या प्रिये, माझ्या वधू, तू कुलुपबंद केलेल्या बागेसारखी शुध्द आहेस. तू बंदिस्त तळ्यासारखी, कारंज्यासारखी आहेस. तुझे अवयव डाळिंबाने आणि इतर फळांनी सर्व प्रकारच्या सुगंधी पदार्थांनी, मेंदी, जटामासी, केशर, वेखंड व दालचिनी इत्यादींनी भरलेल्या बागेसारखे आहेत. तुझे अवयव उदाची झाडे, गंधरस व अगरु व इतर सुगंधी झाडांनी भरलेल्या बागेसारखे आहेत. तू बागेतल्या कारंज्यासाखी, ताज्या पाण्याच्या विहिरीसारखी, लबानोनच्या पर्वतावरुन वाहात जाणाऱ्या पाण्यासारखी आहेस. उत्तरेकडच्या वाऱ्या, ऊठ! दक्षिणवाऱ्या ये, माझ्या बागेवरुन वाहा. तिचा गोड सुगंध सर्वत्र पसरव. माझ्या सख्याला त्याच्या बागेत प्रवेश करु दे आणि तिथली गोड फळे चाखू दे.
”माझ्या प्रिये, माझ्या वधू, मी माझ्या बागेत गेलो. मी माझा गंधरस व माझी सुगंधी द्रव्ये घेतली. मी माझा मध व मधाचे पोळे खाल्ले. मी माझा द्राक्षारस व दूध प्यालो.प्रिय मित्रांनो, खा, प्या. प्रेमाने धुंद व्हा. मी झोपलेली आहे. पण माझे हृदय जागे आहे. माझा प्रियकर दार वाजवतो ते मी ऐकते. “प्रिये माझ्यासाठी दार उघड माझ्या प्रेमा, माझ्या कबुतरा, माझ्या सर्वोत्कृष्टा! माझे डोके दवाने ओले झाले आहे. माझे केस रात्रीच्या धुक्याने ओले झाले आहेत.” “मी माझा पोषाख काढून टाकला आहे. मला तो पुन्हा घालायचा नाही. मी माझे पाय धुतले आहेत. मला ते पुन्हा घाण करायचे नाहीत.” पण माझ्या प्रियकराने फटीतून हात घातलाआणि माझे हृदय त्याच्यासाठी हेलावले.
”यरुशलेमच्या स्त्रियांनो! मी तुम्हाला सांगते, जर तुम्हाला माझा प्रियकर दिसला, तर त्याला सांगा की मी प्रेमविव्हळ झाले आहे. सुंदर स्त्रिये! तुझा प्रियकर इतर प्रियकरांहून वेगळा कसा? तो इतर प्रियकरांपेक्षा चांगला आहे का? म्हणूनच तू आम्हाला वचन द्यायला सांगत आहेस का?
”माझा प्रियकर उन्हाने काळवंडला आहे व तेजस्वी दिसतो. तो दहा हजार माणसात उठून दिसेल. त्याचे मस्तक शुध्द सोन्याप्रमाणे आहे. त्याचे केस कुरळे आहेत आणि डोंबकावळ्यासारखे काळे आहेत. त्याचे डोळे झऱ्याजवळच्या कबुतरासारखे आहेत, दुधाच्या थारोळ्यातील कबुतरासारखे आहेत कोदंणातल्या हिऱ्यासारखे आहेत. त्याचे गाल मसाल्याच्या पदार्थांच्या बागेप्रमाणे आहेत, अत्तरासाठी वापरण्यात येणाऱ्या फुलांसारखे आहेत. त्याचे ओठ सुंगध गळणाऱ्या कमलपुष्पाप्रमाणे आहेत. त्याचे बाहू रत्नांनी जडवलेल्या सोन्याच्या कांबीप्रमाणे आहेत. त्याचे शरीर नीलमणी जडवलेल्या मऊ हस्तिदंतासारखे आहे. त्याचे पाय सोन्याचा पाया असलेल्या संगमरवरी खांबासारखे आहेत. तो लबानोनमधल्या गंधसरुच्या झाडासारखा उंच उभा राहतो. होय, यरुशलेमच्या स्त्रियांनो, माझा प्रियकर खूप हवाहवासा वाटणारा आहे. त्याचे तोंड सर्वांत गोड आहे. तोच माझा प्रियकर, तोच माझा सखा आहे.
”मी माझ्या प्रियकराची आहे. तो माझा आहे. कमलपुष्पात खाऊ घालणारा तोच माझा प्रियकर आहे.
”माझ्याकडे बघू नकोस! तुझे डोळे मला उद्दीपित करतात. लहान बकऱ्या गिलाद पर्वताच्या उतरावरुन नाचत खाली जातात तसे तुझे केस लांब आणि मोकळे आहेत.
”राजाकन्ये, त्या चपलांमधे तुझे पाय सुंदर दिसतात. कलाकाराने केलेल्या दागिन्यासारखा तुझ्या माड्यांचा बांक आहे. तुझी बेंबी गोल कपासारखी आहे, ती द्राक्षारसाशिवाय कधीही रिकामी नसो. तुझे पोट सभोवती कमलपुष्ये ठेवलेल्या गव्हाच्या राशीसारखे आहे. तुझी वक्षस्थळे तरुण हरिणीच्या जुळ्या पाडसांसारखी आहेत. तुझी मान हस्तिदंती मनोऱ्यासारखी आहे. तुझे डोळे बाथ रब्बिमच्या प्रवेशद्वाराजवळ असलेल्या हेशबोनच्या तळ्यांसारखे आहेत. तुझे नाक दमास्कसकडे बघणाऱ्या लबानोनच्या मनोऱ्यासारखे आहे. तुझे मस्तक कार्मेलसारखे आहे आणि तुझ्या मस्तकावरचे तुझे केस रेशमासारखे आहेत. तुझे लांब मोकळे केस राजालासुध्दा बांधून ठेवतात. तू किती सुंदर आहेस! किती आल्हाददायक आहेस! सुंदर, आनंद देणारी तरुण स्त्री! तू उंच आहेस, नारळाच्या झाडासारखी उंच आहेस. आणि तुझे वक्ष त्या झाडावर लागलेल्या फळांच्या घोसासारखे आहेत. मला त्या झाडावर चढून त्याच्या फांद्यांना धरायला आवडेल.तुझी वक्षस्थळे द्राक्षाच्या घोसासारखी आणि तुझ्या श्वासाचा सुगंध सफरचंदासारखा असू दे. तुझे तोंड सर्वात उंची द्राक्षारसाप्रमाणे सरळ माझ्या प्रेमाकडे वाहणाऱ्या, झोपलेल्याच्या ओठांत जाणाऱ्या द्राक्षारसाप्रमाणे असू दे.
”मी माझ्या प्रियकराची आहे आणि मी त्याला हवी आहे. प्रियकरा, ये आपण शोतावर जाऊ. आपण खेड्यात रात्र घालवू. आपण सकाळी लवकर उठून द्राक्षाच्या मळ्यात जाऊ. द्राक्षाच्या वेली फुलल्या आहेत की नाहीत ते पाहू. आणि जर डाळींब बहरत असतील तर प्रियकरा, तेथे मी तुला माझे प्रेम अर्पण करीन. पुत्रदात्रीचा वास घे आणि आपल्या दाराजवळ असलेल्या इतर सुंदर फुलांचाही वास घे. होय, प्रियकरा, मी तुझ्यासाठी अनेक चांगल्या आनंददायी नव्या आणि जुन्या, गोष्टी राखून ठेवल्या आहेत.
”त्याचा डावा बाहू माझ्या डोक्याखाली आहे आणि त्याचा उजवा बाहू मला धरत आहे.
”यरुशलेमच्या स्त्रियांनो, मला वचन द्या. माझी तयारी होईपर्यंत प्रेमाला जागवू नका, चेतवू नका. वाळवंटातून, प्रियकराच्या अंगावर रेलत येणारी ही स्त्री कोण आहे?मी तुला सफरचंदाच्या झाडाखाली उठवले, जिथे तुझ्या आईने तुला प्रसवले, जिथे तुझा जन्म झाला तेथे.
”तू तुझ्या हृदयावर जी मोहोर धारण करतोस, किंवा तुझ्या बोटात तुझा शिक्का असलेली अंगठी घालतोस त्याप्रमाणे तू मला तुझ्या अगदी जवळ ठेव. प्रेम मृत्यूसारखेच शक्तिशाली आहे. वासना थडग्यासारखी शक्तिमान आहे. त्याच्या ठिणग्या ज्वाला बनतात आणि त्याची खूप मोठी आग होते. प्रेमाला पूर नष्ट करु शकत नाही, नद्या प्रेमाला बुडवू शकत नाहीत. जर एखाद्याने आपल्या जवळचे सर्वकाही प्रेमासाठी उधळून दिले तर त्याला बोल लावला जाईल. त्याचा तिरस्कार होईल.
”गर्विष्ठांचा गर्व गळून पडेल आणि ते शरमिंदे होऊन माना खाली घालतील. अशा वेळी फक्त परमेश्वरच ताठ मानेने उभा असेल. परमेश्वराने एक दिवस निश्चित केला आहे. त्या दिवशी परमेश्वर गर्विष्ठ व फुशारक्या मारणाऱ्या लोकांना शिक्षा करील. मग त्या लोकांचे महत्व कमी होईल.
”परंतु भला नेता चांगल्या गोष्टींच्या योजना आखतो आणि ह्या चांगल्या गोष्टीच त्याला भला नेता बनवितात.
”मी त्या लोकांना मला मारू देईन. मी माझ्या दाढीचे केस त्यांना ओढू देईन. ते जेव्हा माझी निंदा करतील आणि माझ्या तोंडावर थुकंतील तेव्हा मी माझे तोंड लपविणार नाही.
”लोकांनी त्याची चेष्टा केली. आणि त्याचे मित्र त्याला सोडून गेले. तो खूप दु:खी व व्यथित माणूस होता. घृणा व दु:ख म्हणजे काय हे त्याला चांगले समजले होते. लोक त्याच्याकडे साधे पाहण्याचेही कष्ट घेत नव्हते. तो आमच्या लक्षातही आला नाही. पण त्याने आमचा त्रास स्वत:चा मानला. त्याने आमचे दु:ख आणि वेदना स्वत: भोगल्या आम्हाला वाटले की देव त्यालाच शिक्षा करीत आहे, त्याने केलेल्या कर्मांबद्दल त्याला ताडन करीत आहे. पण आमच्या दुष्कृत्यांबद्दल त्याला दु:ख भोगावे लागले. आमच्या अपराधांमुळे तो भरडला गेला. आमचे कर्ज, आमची शिक्षा, त्याच्यावर लादली गेली. त्याने दु:ख सहन केले. म्हणून आम्ही बरे झालो. पण त्याने एवढे सगळे केल्यानंतरही आपण मेंढ्यांप्रमाणे भरकटत गेलो. आम्ही प्रत्येकजण स्वत:च्या मार्गाने गेलो परमेश्वराने आपल्याला अपराधातून मुक्त केल्यावर आणि आपले अपराध त्याच्या नावावर केल्यावर आपण असे वागलो. त्याला इजाही झाली आणि शिक्षाही झाली. पण त्याने कधीही तक्रार केली नाही. ठार मारायला नेणाऱ्या मेंढीप्रमाणे तो अगदी गप्प राहिला. मेंढ्यांची लोकर कापताना तो जसा शांत असतो तसा तो शांत होता. स्वत:चा बचाव करण्यासाठी त्याने कधीही तोंड उघडले नाही.
”भुकेलेल्यांना तुम्ही आपल्या घासातील घास द्यावा, बेघरांना शोधून तुमच्या घरात त्यांना आसरा द्यावा, उघड्या माणसाला तुम्ही तुमचे कपडे द्यावे अशी माझी इच्छा आहे. अशा लोकांना मदत करताना मागे-पुढे पाहू नका. ती तुमच्यासारखीच माणसे आहेत.”
”भुकेलेल्यांची तुम्हाला दया यावी व त्यांना तुम्ही अन्न द्यावे. संकटात असलेल्यांना तुम्ही मदत करावी. त्यांच्या गरजा भागवाव्या. मग अंधकारातून तुमचे भाग्य चमकून उठेल. तुम्हाला कसलेही दु:ख होणार नाही. मध्यान्हीच्या सूर्यप्रकाशाप्रमाणे तुमचे भाग्य तळपेल.
”परमेश्वर कृपाळू आहे ह्याचे मी स्मरण ठेवीन. परमेश्वराची स्तुती करण्याचे स्मरण मी ठेवीन. इस्राएलच्या घराण्याला परमेश्वराने खूप चांगल्या गोष्टी दिल्या. परमेश्वर आमच्यावर कृपा करीत आला आहे. परमेश्वराने आमच्यावर दया केली.
”खूप लांबून परमेश्वर लोकांना दर्शन देईल. परमेश्वर म्हणतो, “लोकांनो, मी तुमच्यावर प्रेम करतो आणि ते चिरंतर राहील. तुमची निष्ठ मी कायमची सांभाळीन.
”परमेश्वराच्या प्रेम व दयेला अंत नाही. परमेश्वराची करुणा चिरंतन आहे. ती प्रत्येक दिवशी नवीन, ताजी असते. परमेश्वरा, तुझी विश्वासार्हता महान आहे.
”मी परमेशवराची, माझ्या देवाची, प्रार्थना केली मी त्याच्याजवळ माझ्या पापांचा पाढा वाचला मी म्हणालो परमेशवरा तू महान आणि भीतिदायक देव आहेस. तुझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांवर दया व प्रेम करून तू तुझा करार पाळतोस तुझ्या आज्ञा पाळणाऱ्या लोकांबरोबरही तू कराराचे पालन करतोस.
”आणि मी (परमेश्वर) तुला माझी चिरंतन वधू करीन. मी चांगुलपणा, न्याय,प्रेम व दया यांच्यासह तुला वधू करून घेईन. मी तुला माझी विश्वासू वधू बनवीन. मग तू परमेश्वराला खरोखर जाणशील.
”हे माणसा, चांगुलपणा म्हणजे काय हे परमेश्वराने तुला सांगितले. परमेश्वर तुमच्याकडून पुढील गोष्टींची अपेक्षा करतो. दुसऱ्यांशी न्यायाने वागा. दया व निष्ठा ह्यावर प्रेम करा. तुमच्या परमेश्वरापुढे नम्र होऊन राहा. भेटी देऊन त्याच्यावर छाप पाडण्याचा प्रयत्न करु नता
”सर्व दीन लोकांनो, परमेश्वराला शरण या! त्याचे विधिनियम पाळा. सत्कृत्य करायला शिका. नम्र होण्यास शिका. मग कदचित् परमेश्वर जेव्हा क्रोध प्रकट करील, तेव्हा तुम्ही सुरक्षित राहाल.
”परमेश्वर तुझा देव, तुमच्याबरोबर आहे. तो बलवान वीराप्रमाणे आहे. तो तुला वाचवील. तो तुझ्यावर किती प्रेम करतो, हे तो तुला दाखवून देईल. तुझ्याबरोबर तो किती सुखी आहे, हेही तुला दिसेल.
”सर्व शक्तिमान परमेश्वर असे म्हणतो की “जे योग्य व न्याय्य आहे तेच तुम्ही करा. एकमेकांवर दया करा. एकमेकांना करुणा दाखवा. विधवा, अनाथ, परके व गरीब यांना दुखवू नका. एकमेकांचे वाईट करण्याचे मनातसुध्दा आणू नका.”
”“जे आत्म्याने ‘दीन’ ते धन्य आहेत, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. ‘जे शोक करतात’, ते धन्य आहेत, कारण ‘त्यांचे सांत्वन करण्यात येईल.’ ‘जे सौम्य’ ते धन्य आहेत, कारण ‘त्यांना पृथ्वीचे वतन मिळेल.’ जे न्यायीपणाचे भुकेले व तान्हेले ते धन्य आहेत, कारण ते संतुष्ट होतील. जे दयाळू ते धन्य आहेत, कारण त्यांच्यावर दया करण्यात येईल. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य आहेत, कारण ते देवाला पाहतील. जे शांती करणारे ते धन्य आहेत, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील. न्यायीपणाकरता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य आहेत, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जेव्हा लोक माझ्यामुळे तुमचा अपमान करतात व छळ करतात आणि तुमच्याविरुध्द सर्वप्रकारचे वाईट लबाडीने बोलतात तेव्हा तुम्ही धन्य आहात. आनंद व उल्लास करा, कारण तुम्हास स्वर्गात मोठे प्रतिफळ आहे कारण तुमच्यापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचाही लोकांनी अशाचप्रकारे छळ केला.
”मी तर तुम्हास सांगतो, जो कोणी आपल्या भावावर (उगाच) रागावेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल; जो कोणी आपल्या भावाला, ‘अरे वेडगळा,’ असे म्हणेल तो वरिष्ठ सभेच्या पात्र होईल आणि जो कोणी त्याला, ‘अरे मूर्खा,’ असे म्हणेल, तो नरकाग्नीच्या शिक्षेस पात्र होईल. यास्तव तू आपले अर्पण वेदीवर अर्पिण्यास आणीत असता आपल्या भावाच्या मनात आपल्याविरूद्ध काही आहे अशी तुला तेथे आठवण झाली, तर आपले अर्पण तसेच वेदीसमोर ठेव आणि आपल्या मार्गाने परत जा व प्रथम आपल्या भावासोबत समेट कर आणि मग येऊन आपले अर्पण वेदीवर अर्पण कर.
”‘डोळ्याबद्दल डोळा’ व ‘दाताबद्दल दात’ असे सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे परंतु मी तर तुम्हास सांगतो, दुष्टाला अडवू नका. जो कोणी तुझ्या उजव्या गालावर मारतो, त्याच्याकडे दुसरा गाल कर; जो तुझ्यावर आरोप करून तुझी बंडी घेऊ पाहतो त्यास तुझा अंगरखाही घेऊ दे; आणि जो कोणी तुला बळजबरीने धरून एक कोस नेईल त्याच्याबरोबर दोन कोस जा. जो कोणी तुझ्याजवळ काही मागतो त्यास दे आणि जो तुझ्यापासून उसने घेऊ पाहतो त्यास पाठमोरा होऊ नको.
”‘आपल्या शेजार्यावर प्रीती कर व आपल्या वैऱ्याचा द्वेष कर’, असे सांगितले होते, हे तुम्ही ऐकले आहे. मी तर तुम्हास सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. अशासाठी की, तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे; कारण तो दुष्टांवर व चांगल्यांवर आपला सूर्य उगवतो आणि नीतिमानांवर व अनीतिमानांवर पाऊस पाडतो. कारण जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर तुम्हास काय प्रतिफळ मिळावे? जकातदारही तसेच करतात की नाही? आणि तुम्ही आपल्या बंधुजनांना मात्र सलाम करीत असला तर त्यामध्ये विशेष ते काय करता? परराष्ट्रीय लोकही तसेच करीतात ना? यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता परिपूर्ण आहे तसे तुम्ही परिपूर्ण व्हा.
”लोकांनी आपले न्यायीपण पाहावे म्हणून तुम्ही तुमची न्यायीपणाची कृत्ये त्यांच्यासमोर करु नये याविषयी जपा, अन्यथा तुम्हास तुमच्या स्वर्गातील पित्याकडून प्रतिफळ मिळणार नाही. म्हणून ज्यावेळेस तू दानधर्म करतोस तेव्हा लोकांनी आपली स्तुती करावी म्हणून ढोंगी जसे सभास्थानात व रस्त्यात आपणापुढे कर्णा वाजवतात तसे करू नको. मी तुम्हास खरे सांगतो त्यांना आपले प्रतिफळ मिळालेच आहे. म्हणून जेव्हा तुम्ही दान कराल, तेव्हा ते गुप्तपणे करा. तुमचा उजवा हात काय करतो हे तुमच्या डाव्या हाताला कळू देऊ नका. जेणेकरून तुझे दान देणे गुप्तपणे व्हावे, कारण तुझा स्वर्गीय पिता जो गुप्तदर्शी आहे, तो त्याचे प्रतिफळ तुला देईल.
”कारण जर तुम्ही इतरांचे अपराध क्षमा कराल तर तुमचा स्वर्गातील पिता तुम्हासही क्षमा करील; पण जर तुम्ही इतरांच्या अपराधांची क्षमा करणार नाही, तर तुमचा पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही.
”कोणालाही दोन धन्यांची चाकरी एकावेळी करणे शक्य नाही. तो एकाचा तिरस्कार करील तर दुसऱ्यावर प्रीती करील किंवा तो एका धन्याशी एकनिष्ठ राहील व दुसऱ्याला तुच्छ लेखेल. तसेच तुम्हास देवाची आणि पैशाची (धनाची) सेवा एकाच वेळी करता येणार नाही.
”इतरांचे दोष काढू नका म्हणजे तुमचे दोष काढण्यात येणार नाहीत. कारण ज्या प्रकारे तुम्ही इतरांचे दोष काढता त्याच न्यायाने तुमचेही दोष काढले जातील आणि ज्या मापाने तुम्ही मोजून देता त्याच मापाने तुम्हास परत मोजून देण्यात येईल. तू आपल्या डोळ्यातील मुसळ लक्षात न घेता आपल्या भावाच्या डोळ्यातील कुसळ का पाहतोस? अथवा ‘तुझ्या डोळ्यांतले कुसळ मला काढू दे’ असे तू आपल्या भावाला कसे म्हणशील? पाहा, तुझ्या स्वतःच्या डोळ्यात तर मुसळ आहे. अरे ढोंग्या, पहिल्याने आपल्या डोळ्यांतले मुसळ काढून टाक म्हणजे आपल्या भावाच्या डोळयांतले कुसळ काढण्यासाठी तुला स्पष्टपणे पाहता येईल.
”यासाठी ज्या गोष्टी लोकांनी तुमच्यासाठी कराव्यात असे तुम्हास वाटते त्या सर्व गोष्टी तुम्हीही त्यांच्यासाठी करा, कारण नियमशास्त्राच्या व संदेष्टयांच्या शिकवणीचे सार हेच आहे.
”अहो जे थकलेले व ओझ्याने लादलेले असे सर्व तुम्ही मजकडे या आणि मी तुम्हास विसावा देईन. मी अंतःकरणाने लीन व नम्र आहे, म्हणून माझे जू आपणावर घ्या, माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवास विसावा मिळेल. कारण माझे जू सोपे आहे आणि माझे ओझे हलके आहे.
”आणि म्हटले, “मी तुम्हास खरे सांगतो, तुमच्यात बदल होऊन तुम्ही बालकासारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. म्हणून जो कोणी आपणाला या बालकासारखे लीन करतो तोच स्वर्गाच्या राज्यात सर्वाहून महान आहे.
”जर एखाद्या मनुष्याजवळ शंभर मेंढरे आहेत आणि त्यांच्यापैकी एक मेंढरू हरवले तर तो नव्याण्णव मेंढरे टेकडीवर सोडून देईल आणि ते हरवलेले एक मेंढरू शोधायला जाईल की नाही? आणि जर त्या मनुष्यास हरवलेले मेंढरू सापडले तर त्यास कधीही न हरवलेल्या नव्याण्णव मेंढरांबद्दल वाटणाऱ्या आनंदापेक्षा त्या एकासाठी जास्त आनंद होईल. असे मी तुम्हास खरे सांगतो, तशाच प्रकारे, या लहान मुलांपैकी एकाचा अगदी लहानातील लहानाचा ही नाश व्हावा अशी तुमच्या स्वर्गीय पित्याची इच्छा नाही.
”जर तुझा भाऊ तुझ्यावर अन्याय करील, तर जा अणि त्यास तुझ्यावर काय अन्याय झाला ते एकांतात सांग. जर त्यांने तुझे ऐकले तर त्यास आपला बंधू म्हणून परत मिळवला आहेस.
”नंतर पेत्र येशूकडे आला आणि त्याने विचारले, “प्रभू, जर माझा भाऊ माझ्यावर अन्याय करीत राहिला तर मी त्यास किती वेळा क्षमा करावी? मी त्यास सात वेळा क्षमा करावी काय?” येशूने उत्तर दिले, “मी तुला सांगतो, फक्त सातच वेळा नाही तर उलट त्याने तुझ्यावर साताच्या सत्तरवेळा अन्याय केला तरी तू त्यास क्षमा करीत राहा.”
”आपल्या आई-वडीलांना मान दे आणि जशी स्वतःवर प्रीती करतोस तशी इतरावर प्रीती कर.”
”येशूने उत्तर दिले, “तुला जर परिपूर्ण व्हायचे असेल तर जा आणि तुझे जे काही आहे ते विकून टाक आणि ते पैसे गरीबांना वाटून दे. म्हणजे स्वर्गात तुला मोठी संपत्ती मिळेल आणि चल, माझ्यामागे ये.”
”म्हणून आता जे शेवटचे आहेत ते पहिले होतील आणि पहिले ते शेवटचे होतील.”
”पण तुमचे वागणे तसे नसावे. जर तुमच्यातील कोणाला मोठे व्हायचे असेल तर त्याने तुमचा सेवक झाले पाहिजे. आणि ज्याला पहिला व्हावयाचे आहे त्याने दास झाले पाहिजे. म्हणजे तुम्ही मनुष्याच्या पुत्रासारखे असले पाहिजे. जसा तो इतरांकडून सेवा करून घ्यायला आला नाही तर इतरांची सेवा करायला आणि अनेकांचे तारण व्हावे यासाठी आपला जीव खंडणी म्हणून देण्यासाठी आला.”
”येशूने उत्तर दिले, प्रभू आपला देव याजवर तू आपल्या पूर्ण अंतःकरणाने, आपल्या पूर्ण जिवाने, आपल्या पूर्ण मनाने प्रीती कर. ही पहिली आणि मोठी आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी एक आहे जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर.
”तुमच्यातील जो सेवक बनून तुमची सेवा करतो तो तुमच्यात सर्वात मोठा होय. जो स्वतःला मोठा समजेल त्यास कमी लेखले जाईल. स्वतःला लहान समजणारा प्रत्येकजण मोठा गणला जाईल.
”मग राजा जे त्याच्या उजवीकडे आहेत त्यांना म्हणेल, या, जे तुम्ही माझ्या पित्याचे धन्यवादित आहात! हे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुमच्यासाठी तयार केले आहे त्या राज्याचे वतनदार व्हा. हे तुमचे राज्य आहे कारण जेव्हा मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले. मी तहानेला होतो तेव्हा तुम्ही मला प्यावयास दिले. मी परका होतो आणि तुम्ही मला आत घेतले मी उघडा होतो तेव्हा तुम्ही मला कपडे दिलेत. मी आजारी होतो, तेव्हा तुम्ही माझी काळजी घेतलीत. मी तुरूंगात होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आलात. मग जे नीतिमान आहेत ते उत्तर देतील, प्रभू आम्ही तुला केव्हा भुकेला व तहानेला पाहिला आणि तुला खायला आणि प्यायला दिले? आम्ही तुला परका म्हणून कधी पाहिले आणि तुला आत घेतले किंवा आम्ही तुला केव्हा उघडे पाहिले व कपडे दिले? आणि तू आजारी असताना आम्ही तुला कधी भेटायला आलो? किंवा तुरूंगात असताना कधी तुझ्याकडे आलो? मग राजा त्यांना उत्तर देईल, मी तुम्हास खरे सांगतो येथे असलेल्या माझ्या बांधवातील अगदी लहानातील एकाला तुम्ही केले, तर ते तुम्ही मलाच केले.
”मग राजा आपल्या डाव्या बाजूच्यांना म्हणेल, माझ्यापासून दूर जा, तुम्ही शापित आहात, सार्वकालिक अग्नीत जा, हा अग्नी सैतान व त्याच्या दूतांसाठी तयार केला आहे. ही तुमची शिक्षा आहे कारण मी भुकेला होतो पण तुम्ही मला काही खायला दिले नाही, मी तहानेला होतो पण तुम्ही मला काही प्यावयास दिले नाही. मी प्रवासी असता माझा पाहुणचार केला नाही. मी वस्त्रहीन होतो. पण तुम्ही मला कपडे दिले नाहीत. मी आजारी आणि तुरूंगात होतो पण तुम्ही माझी काळजी घेतली नाही. मग ते लोकसुद्धा त्यास उत्तर देतील, प्रभू आम्ही कधी तुला उपाशी अगर तहानेले पाहिले किंवा प्रवासी म्हणून कधी पाहिले? किंवा वस्त्रहीन, आजारी किंवा तुरूंगात कधी पाहिले आणि तुला मदत केली नाही? मग राजा त्यांना उत्तर देईल, मी तुम्हास खरे सांगतोः माझ्या अनुयायांतील लहानातील लहानाला काही करण्याचे जेव्हा जेव्हा तुम्ही नाकारले, तेव्हा तेव्हा ते तुम्ही मला करण्याचे नाकारले.
”येशू तेथे असताना एक स्त्री त्याच्याकडे आली. अतिमोलवान सुवासिक तेलाची अलाबास्त्र कुपी तिच्याजवळ होती आणि तो जेवणास टेकून बसला असता तिने ते त्याच्या डोक्यावर ओतले.
”तो थोडे अंतर पुढे गेला आणि जमिनीवर ओणवून प्रार्थना करू लागला, “हे माझ्या पित्या, शक्य झाले तर हा दुःखाचा प्याला माझ्यापुढून जाऊ दे, तथापि, माझ्या इच्छेप्रमाणे नको तर तुझ्या इच्छेप्रमाणे होऊ दे.”
”मग येशू खाली बसला, त्याने बाराजणांना बोलावून त्यांना म्हटले, “जर कोणाला पहिले व्हावयाचे असेल तर त्याने सर्वात शेवटला व सर्वांचा सेवक झाले पाहिजे.”
”परंतु तुमच्याबाबतीत तसे नाही. तुमच्यातील जो कोणी मोठा होऊ पाहतो त्याने तुमचा सेवक झाले पाहिजे. आणि जो कोणी पाहिला होऊ इच्छितो त्याने सर्वांचा सेवक झाले पाहिजे. कारण मनुष्याचा पुत्रही सेवा करून घ्यावयास नाही तर तो सेवा करावयास आला आहे पुष्कळांच्या खंडणीकरिता आपला जीव देण्यासाठी आला आहे.”
”जेव्हा तुम्ही प्रार्थना करीत उभे राहता तेव्हा तुमच्या मनात जर कोणाच्या विरुद्ध काही असेल तर त्याची क्षमा करा यासाठी की, तुमच्या स्वर्गातील पित्याने तुमच्या पापांची क्षमा करावी. परंतु तुम्ही जर क्षमा करणार नाही तर तुमचा स्वर्गातील पिताही तुमच्या अपराधांची क्षमा करणार नाही.”
”तू आपल्या संपूर्ण अंतःकरणाने, संपूर्ण जिवाने, संपूर्ण मनाने आणि संपूर्ण शक्तीने तुझा देव प्रभू याच्यावर प्रीती कर.’ दुसरी आज्ञा ही आहे, ‘जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर.’ यापेक्षा दुसरी कोणतीही आज्ञा मोठी नाही.” तो मनुष्य उत्तरला, “देव एकच आहे, गुरूजी आणि त्याच्याशिवाय कोणीही नाही असे आपण म्हणता ते खरे बोललात. त्याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण बुद्धीने, पूर्ण शक्तीने आणि जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती करणे हे सर्व यज्ञ व अर्पणे, जी आपणास करण्याची आज्ञा दिली आहे, त्यापेक्षाही अधिक महत्त्वाचे आहे.”
”येशू बेथानी येथे शिमोन कुष्ठरोगी याच्या घरी मेजावर जेवायला बसला असता कोणीएक स्त्री वनस्पतीपासून बनवलेल्या शुद्ध सुगंधी तेलाची फार मौल्यवान अलाबास्त्र कुपी घेऊन आली. तिने अलाबास्त्र कुपी फोडली आणि सुगंधी तेल येशूच्या डोक्यावर ओतले.
”त्याने उत्तर दिले, “ज्याच्याकडे दोन अंगरखे असतील त्याने ज्याला नाही त्यास एक द्यावा आणि ज्याच्याकडे अन्न आहे त्यानेही तसेच करावे.”
”परंतु तुम्हा ऐकणाऱ्यांस मी सांगतो, तुमच्या शत्रूंवर प्रीती करा. जे तुमचा व्देष करतात, त्यांचे चांगले करा. जे तुम्हास शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या. जे तुमचा अपमान करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा. जर कोणी तुमच्या एका गालावर मारतो तर त्याच्यासमोर दुसराही गाल करा. जर कोणी तुमचा अंगरखा घेतो तर त्यास तुमची बंडी ही घेऊन जाण्यास मना करू नका. जे तुम्हास मागतात त्या प्रत्येकाला द्या आणि जो तुमची वस्तु हिरावून घेतो त्याच्यापाशी ते परत मागू नको. आणि जसे मनुष्यांनी तुमच्याशी वागावे म्हणून तुमची इच्छा असेल तसेच तुम्हीही त्यांच्याशी वागा.
”तुमच्यावर जे प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती करा, तर त्यामध्ये तुमचा उपकार तो काय? कारण पापी लोकही आपणावर प्रीती करणाऱ्यांवर प्रीती करतात. तुमचे जे चांगले करतात, त्यांचे जर तुम्ही चांगले करता तर तुम्हास काय लाभ? पापीसुद्धा असेच करतात. ज्यांच्याकडून तुम्हास परत मिळेल अशी आशा असते, त्यांना जर उसने देता तर तुम्हास काय लाभ? पापीसुद्धा परत मिळावे या उद्देशाने दुसऱ्या पाप्याला उसने देतात.
”परंतु तुम्ही आपल्या शत्रूंवर प्रीती करा व त्यांचे बरे करा आणि निराश न होता उसने द्या म्हणजे तुमचे प्रतिफळ मोठे होईल व तुम्ही परात्पराचे पुत्र व्हाल कारण तो अनुपकारी व वाईट यांच्यावर तो दया करणारा आहे. जसा तुमचा स्वर्गीय पिता दयाळू आहे तसे तुम्हीही दयाळू व्हा. दुसऱ्यांचा न्याय करू नका, म्हणजे तुमचाही न्याय होणार नाही. दुसऱ्यांना दोषी ठरवू नका म्हणजे तुम्हास दोषी ठरवले जाणार नाही. दुसऱ्यांची क्षमा करा म्हणजे तुमचीही क्षमा केली जाईल. द्या म्हणजे तुम्हास दिले जाईल. चांगले माप दाबून, हालवून व शीग भरून तुमच्या पदरी घालतील कारण ज्या मापाने तुम्ही मापून द्याल त्याच मापाने तुम्हास परत मापून देण्यात येईल.
”आणि पाहा, कोणीएक पापी स्त्री त्या नगरांत होती; येशू परूश्यांच्या घरात जेवायला बसला आहे हे ऐकू ती सुगंधी तेलाची अलाबास्त्र कुपी घेऊन आली. आणि ती मागे त्याच्या पायांजवळ रडत उभी राहून आसवांनी त्याचे पाय भिजवू लागली व तिने ते आपल्या डोक्याच्या केसांनी पुसून, त्याच्या पायांचे पुष्कळ मुके घेतले व त्यांना सुगंधी तेल लावले.
”येशूने म्हटले, “एका सावकाराचे दोन कर्जदार होते; एकाला चांदीचे पाचशे नाणे व दुसऱ्याला पन्नास असे देणे होते. परंतु कर्ज फेडायला त्यांच्याजवळ काही नव्हते म्हणून त्याने दोघांना क्षमा केली. तर त्यांच्यापैकी कोणता त्याच्यावर अधिक प्रीती करील?” तेव्हा शिमोनाने उत्तर देऊन म्हटले, “ज्याला अधिक माफ केले तो, असे मला वाटते.” मग येशू त्यास म्हणाला, “ठीक ठरवलेस.” तेव्हा त्याने त्या स्त्रीकडे वळून शिमोनाला म्हटले, “ही स्त्री तुला दिसते ना? मी तुझ्या घरात आलो, तू माझ्या पायांसाठी पाणी दिले नाही; परंतु हिने आसवांनी माझे पाय भिजवले आणि आपल्या केसांनी ते पुसले. तू माझा मुका घेतला नाही, परंतु मी आत आल्यापासून हिने माझ्या पायांचे मुके घेण्याचे थांबवले नाही, तू माझ्या डोक्याला तेल लावले नाही, परंतु हिने माझ्या पायांना सुगंधी तेल लावले आहे. या कारणासाठी मी तुला सांगतो, हिची जी पुष्कळ पापे त्यांची क्षमा झाली आहे; कारण हिने पुष्कळ प्रीती केली; परंतु ज्याला थोडक्याची क्षमा होते तो थोडकी प्रीती करतो.”
”तो म्हणाला, “तू तुझा देव प्रभू याच्यावर पूर्ण अंतःकरणाने, पूर्ण आत्म्याने, पूर्ण शक्तिने प्रीती कर.” व स्वतःवर जशी प्रीती करतोस तशी तू आपल्या शेजाऱ्यावरही प्रीती कर.
”येशूने उत्तर दिले, एक मनुष्य यरुशलेम शहराहून यरीहोस निघाला होता आणि तो लुटारुंच्या हाती सापडला. त्यांनी त्याचे कपडे काढून घेऊन त्यास मारले व त्यास अर्धमेला टाकून ते निघून गेले. तेव्हा त्याचवेळी एक याजक त्या रस्त्याने जात होता. याजकाने त्यास पाहिले, पण तो रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने निघून गेला. त्याच रस्त्याने एक लेवी त्याठिकाणी आला. लेव्याने त्यास पाहिले व तो सुद्धा रस्त्याच्या दुसऱ्या बाजूने निघून गेला. मग एक शोमरोनी त्याच रस्त्याने प्रवास करीत असता तो होता तेथे आला त्या मनुष्यास पाहून त्यास त्याचा कळवळा आला तो त्याच्याजवळ आला त्याच्या जखमांवर तेल व द्राक्षारस ओतून त्या बांधल्या आणि त्यास आपल्या गाढवावर बसवून त्यास उतारशाळेत आणले व त्याची देखभाल केली. दुसऱ्या दिवशी त्याने दोन चांदीचे नाणे काढले आणि उतारशाळेच्या मालकाला दिले व म्हणाला, “याची चांगली देखभाल कर म्हणजे यापेक्षा जे तू अधिक खर्च करशील ते मी परत आल्यावर तुला देईन.” लुटारुंच्या तावडीत जो मनुष्य सापडला होता, त्याचा त्या तिघांपैकी कोण खरा शेजारी होता असे तुला वाटते? तो नियमशास्त्राचा शिक्षक म्हणाला, “ज्याने त्याच्यावर दया केली तो.” तेव्हा येशू त्यास म्हणाला, “जा आणि तूही तसेच कर.”
”जेव्हा एखादा तुम्हास लग्नाच्या मेजवानीला आमंत्रित करील, तेव्हा मानाच्या आसनावर बसू नका कारण तुमच्यापेक्षा अधिक महत्त्वाच्या मनुष्यास त्याने कदाचित आमंत्रण दिले असेल. मग ज्याने तुम्हा दोघांना आमंत्रित केले आहे तो येईल आणि तुम्हास म्हणेल, या मनुष्यास तुझी जागा दे. मग अपमानित होऊन तुम्हास खालच्या जागी बसावे लागेल. पण जेव्हा तुम्हास आमंत्रित केलेले असेल, तेव्हा जा आणि अगदी खालच्या (शेवटच्या) जागी जाऊन बसा. यासाठी की, जेव्हा यजमान येईल, तेव्हा तो तुम्हास म्हणेल, मित्रा, वरच्या आसनावर येऊन बस. तेव्हा तुझ्या पाहुण्यांसमोर तुझे गौरव होईल. कारण जो कोणी स्वतःला उंच करतो तो नमवला जाईल व जो स्वतःला नमवतो तो उंच केला जाईल.
”मग ज्याने आमंत्रण दिले होते त्यास तो म्हणाला, “तू जेव्हा दुपारी किंवा संध्याकाळी भोजनास बोलावशील तेव्हा तुझ्या मित्रांना, भावांना, तुझ्या नातेवाईकांना किंवा श्रीमंत शेजाऱ्यांना बोलावू नको, कारण तेही तुला परत आमंत्रण देतील व अशा रीतीने तुझ्या आमंत्रणाची परतफेड केली जाईल. पण जेव्हा तू मेजवानी देशील, तेव्हा गरीब, लंगडे, पांगळे, आंधळे यांना आमंत्रण दे. म्हणजे तू धन्य होशील, कारण तुझी परतफेड करण्यासाठी त्यांच्याकडे काहीही नाही. तर नीतिमानांच्या पुनरुत्थानाच्या वेळी तुझी परतफेड होईल.”
”मग तो धाकटा मुलगा उठला व आपल्या पित्याकडे गेला. तो त्याच्या घरापासून दूर असतांनाच, त्याच्या पित्याने त्यास पाहिले आणि त्यास त्याचा कळवळा आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात पडला व त्याचे पुष्कळ मुके घेतले. मुलगा त्यास म्हणाला, “बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्याविरुध्द पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणवून घेण्याचा मला अधिकार नाही.” परंतु पिता आपल्या नोकरांस म्हणाला, “त्वरा करा, चांगला झगा आणून त्यास घाला. त्याच्या हातात अंगठी आणि पायात जोडे घाला. आणि मोठी मेजवानी करा, आपण खाऊ आणि आनंद करू! कारण हा माझा मुलगा मरण पावला होता पण जिवंत झाला आहे! तो हरवला होता, पण आता सापडला आहे व ते आनंद करू लागले.”
”कोणत्याही नोकराला दोन मालकांची सेवा करता येत नाही. एकाचा तो राग करील व दुसऱ्यावर तो प्रीती करील किंवा एकाला तो धरून राहील व दुसऱ्याला तुच्छ मानील. तुम्ही एकाच वेळी देवाची व पैशाची सेवा करू शकत नाही.”
”जर तो दिवसातून सात वेळा तुझ्याविरुद्ध पाप करतो आणि सात वेळा तुझ्याकडे येतो व म्हणतो, मी पश्चात्ताप करतो, तरीही तू त्यास माफ कर.
”मी तुम्हास सांगतो हा मनुष्य त्या दुसऱ्या मनुष्यापेक्षा न्यायी ठरुन घरी गेला कारण जो कोणी स्वतःला उंच करतो त्यास कमी केले जाईल आणि जो कोणी स्वतःला कमी करतो त्यास उंच केले जाईल.”
”तेव्हा जक्कय उभा राहून प्रभूला म्हणाला, “प्रभूजी, पाहा, मी आपले अर्धे धन गरिबांस देतो आणि मी अन्यायाने कोणाचे काही घेतले असले तर ते चौपट परत करतो.”
”तेव्हा तो म्हणाला, “मी तुम्हास खरे सांगतो, या गरीब विधवेने इतर सर्वांपेक्षा अधिक टाकले. कारण या सर्वांनी आपल्या भरपूर संपत्तीमधून काही भाग दान म्हणून टाकले. परंतु हिने गरीब असूनही आपल्या उपजीविकेतील सर्वच टाकले.”
”परंतु तुम्ही तसे नाही. त्याऐवजी तुमच्यातील सर्वांत मोठा असलेल्याने सर्वांत लहान व्हावे व जो अधिकारी आहे त्याने सेवक व्हावे. तेव्हा मोठा कोण जो मेजावर बसतो तो की जो सेवा करतो तो? जो मेजावर बसतो तो नाही का? परंतु मी तुम्हामध्ये सेवा करणाऱ्यासारखा आहे.
”परंतु शिमोन पेत्र त्यास म्हणाला, “प्रभू, मी तुझ्याबरोबर तुरुंगात जाण्यासाठी व मरण्यासाठी तयार आहे.”
”नंतर येशू म्हणाला, “हे पित्या, त्यांची क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही.” त्यांनी चिठ्ठ्या टाकून त्याचे कपडे वाटून घेतले.
”कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्यास सार्वकालिक जीवन मिळावे. कारण देवाने पुत्राला जगात पाठवले ते जगाचा न्याय करायला नाही, पण त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवले.
”त्याची वृद्धी व्हावी व माझा ऱ्हास व्हावा हे अवश्य आहे.
”मी आपला जीव परत घेण्याकरिता देतो म्हणून पिता माझ्यावर प्रीती करतो.
”येशू रडला. यावरुन यहूदी लोक म्हणाले, “पाहा, याची त्याच्यावर कितीतरी प्रीती होती!”
”तेव्हा मरीयेने अर्धा शेर, शुद्ध जटामांसीचे, अतिमोलवान सुवासिक तेल घेऊन येशूच्या पायांना लावून आपल्या केसांनी त्याचे पाय पुसले; आणि तेलाच्या सुवासाने घर भरून गेले.
”आता, वल्हांडण सणाअगोदर असे झाले की, येशूने आता या जगांतून पित्याकडे निघून जाण्याची वेळ आली आहे, हे जाणून, या जगातील स्वकीयांवर त्याची जी प्रीती होती, ती त्याने शेवटपर्यंत केली.
”त्यानंतर येशू एका गंगाळात पाणी ओतून आणि तो शिष्यांचे पाय धुऊ लागला व कमरेला बांधलेल्या कापडाने पुसू लागला.
”मग मी जर तुमचा प्रभू आणि गुरू असता तुमचे पाय धुतले तर तुम्हीपण एकमेकांचे पाय धुवावेत. कारण मी तुम्हास केले तसे तुम्हीही करावे म्हणून मी तुम्हास उदाहरण दिले आहे. मी तुम्हास खरे खरे सांगतो, दास आपल्या धन्यापेक्षा मोठा नाही; आणि पाठवलेला पाठवणाऱ्यापेक्षा मोठा नाही. या गोष्टी तुम्हास समजतात तर त्याप्रमाणे वागल्याने तर तुम्ही धन्य आहात.
”तेव्हा ज्याच्यावर येशूची प्रीती होती असा त्याच्या शिष्यांतील एकजण येशूच्या उराशी टेकलेला होता.
”मी एक नवी आज्ञा तुम्हास देतो; तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी. जशी मी तुमच्यावर प्रीती केली तशी तुम्हीही एकमेकांवर प्रीती करावी. तुमची एकमेकांवर प्रीती असली म्हणजे यावरुन सर्व ओळखतील की, तुम्ही माझे शिष्य आहात.”
”माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल.
”ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत आणि जो त्या पाळतो तोच माझ्यावर प्रीती करणारा आहे; आणि जो माझ्यावर प्रीती करतो त्याच्यावर माझा पिता प्रीती करील; मीही त्याच्यावर प्रीती करीन व स्वतः त्यास प्रकट होईन.”
”येशूने त्यास उत्तर दिले, “ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळील; माझा पिता त्याच्यावर प्रीती करील आणि आम्ही त्याच्याकडे येऊन, त्याच्याबरोबर वस्ती करून राहू. जो माझ्यावर प्रीती करीत नाही तो माझी वचने पाळीत नाही आणि तुम्ही जे वचन ऐकता ते माझे नाही तर ज्याने मला पाठवले त्या पित्याचे आहे.
”जशी पित्याने माझ्यावर प्रीती केली तशीच मीही तुम्हावर प्रीती केली आहे; तसेच तुम्हीही माझ्या प्रीतीत रहा. जसा मी माझ्या पित्याच्या आज्ञा पाळून त्याच्या प्रीतीत राहतो, तसेच तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल तर तुम्ही माझ्या प्रीतीत रहाल. माझा आनंद तुम्हामध्ये असावा आणि तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा म्हणून मी हे तुम्हास या गोष्टी सांगितल्या आहेत. जशी मी तुम्हावर प्रीती केली तशीच तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी अशी माझी आज्ञा आहे. आपल्या मित्रांसाठी आपला जीव द्यावा यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही. मी तुम्हास जे काही सांगतो ते तुम्ही कराल तर तुम्ही माझे मित्र आहात. मी तुम्हास आतापासून दास म्हणत नाही, कारण धनी काय करतो ते दासास कळत नाही; पण मी तुम्हास मित्र म्हणले आहे, कारण मी ज्या गोष्टी पित्याकडून ऐकून घेतल्या त्या सर्व मी तुम्हास कळवल्या आहेत.
”तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी म्हणून मी तुम्हास या आज्ञा करतो.
”कारण पिता स्वतः तुमच्यावर प्रीती करतो, कारण तुम्ही माझ्यावर प्रीती केली आहे आणि मी पित्यापासून आलो असा विश्वास धरला आहे.
”म्हणजे मी त्यांच्यामध्ये आणि तू माझ्यामध्ये; यासाठी की, त्यांनी एक होऊन पूर्ण व्हावे आणि, त्यावरून जगाने समजून घ्यावे की, तू मला पाठवले आणि जशी तू माझ्यावर प्रीती केली तशी त्यांच्यावरही प्रीती केली.
”मी तुझे नाव त्यास कळवले आहे आणि मी कळवीन, यासाठी की, जी प्रीती तू माझ्यावर केली ती त्यांच्यामध्ये असावी आणि मी त्यांच्यामध्ये असावे.”
”मग त्यांची न्याहरी झाल्यावर येशूने शिमोन पेत्राला म्हटले, “योहानाच्या पुत्रा शिमोना, यांच्यापेक्षा तू माझ्यावर अधिक प्रीती करतोस काय?” तो त्यास म्हणाला, “होय, प्रभू, तू जाणतोस की, मी तुझ्यावर प्रीती करतो.” तो त्यास म्हणतो, “माझी कोकरे चार.” तो पुन्हा दुसऱ्यांदा त्यास म्हणाला, “योहानाच्या पुत्रा, शिमोना, तू माझ्यावर प्रीती करतोस काय?” तो त्यास म्हणाला, “होय, प्रभू, तू जाणतोस की, मी तुझ्यावर प्रीती करतो.” तो त्यास म्हणाला, “माझी मेंढरे राख.” तो तिसर्यांदा त्यास म्हणाला, “योहानाच्या पुत्रा, शिमोना, तू माझ्यावर प्रीती करतोस काय?” पेत्र दुःखी होऊन त्यास म्हणाला, “तू माझ्यावर प्रीती करतोस काय?” आणि तो त्यास म्हणाला, “प्रभू, तुला सर्व माहीत आहे, तू जाणतोस की, मी तुझ्यावर प्रीती करतो.” येशू त्यास म्हणतो, “माझी मेंढरे चार.”
”तेव्हा विश्वास ठेवणारे सर्व एकत्र होते आणि त्यांचे सर्वकाही सामाईक होते, ते आपआपली जमीन व मालमत्ता विकून जसजशी प्रत्येकाला गरज लागत असे, तसतसे सर्वांना वांटून देत असत. ते दररोज एकचित्ताने व तत्परतेने परमेश्वराच्या भवनात जमत असत, घरोघरी भाकर मोडीत असत आणि देवाची स्तुती करीत हर्षाने व सालस मनाने जेवत;
”त्यांतील कोणालाही काही उणे नव्हते, कारण जितके जमिनीचे किंवा घरांचे मालक होते तितक्यांनी ती विकली आणि विकलेल्या वस्तूंचे मोल आणले. आणि ते प्रेषितांच्या पायाशी ठेवले, मग जसजशी कोणाला गरज लागत असे, तसतसे ते प्रत्येकाला वाटून देत असत.
”ते दगडमार करीत असता स्तेफन प्रभूचा धांवा करीत म्हणाला, “हे प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर.” मग गुडघे टेकून तो मोठ्याने ओरडला, “हे प्रभू, हे पाप त्यांच्याकडे मोजू नको.” असे बोलून, तो मरण पावला.
”शास्त्रलेखातील जो भाग तो वाचत होता तो भाग पुढीलप्रमाणे होता, “वधावयला घेऊन जात असलेल्या मेंढरासारखा तो होता; लोकर कातरणाऱ्यांपुढे गप्प राहणाऱ्या कोकरांप्रमाणे तो शांत राहिला, त्याने आपले तोंड उघडले नाही: त्यास लज्जित केले गेले त्याच्या लीन अवस्थेत त्यास न्याय मिळाला नाही: त्याच्या पिढीचे वर्णन कोण करील? कारण पृथ्वीवरील त्याचे जीवन संपविले गेले आहे.”
”अशा रीतीने मी तुम्हास उदाहरण घालू दिले आहे की जे दुर्बल आहेत अशांना आपण स्वतः मेहनत करून मदत केली पाहिजे व प्रभू येशूचे शब्द लक्षात ठेवले पाहिजेत, तो स्वतः म्हणाला, “घेण्यापेक्षा देणे अधिक धन्यतेचे आहे.”
”आणि आशा लज्जित करीत नाही; कारण आपल्या अंतःकरणात आपल्याला दिलेल्या पवित्र आत्म्याच्याद्वारे देवाची प्रीती ओतली जात आहे. कारण आपण दुर्बळ असतानाच ख्रिस्त यथाकाळी अभक्तांसाठी मरण पावला. कारण एखाद्या नीतिमान मनुष्यासाठी क्वचित कोणी मनुष्य मरेल कारण एखाद्या चांगल्या मनुष्यासाठी कदाचीत कोणी मरण्याचेही धाडस करील, पण आपण पापी असताना ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला, ह्यात देव त्याची आपल्यावरील प्रीती प्रस्थापित करतो. मग आता आपण त्याच्या रक्ताने नीतिमान ठरवले गेलो आहोत, तर त्याहून अधिक हे आहे की त्याच्याद्वारे आपण देवाच्या क्रोधापासून तारले जाऊ. कारण आपण वैरी होतो, तेव्हा जर आपला देवाबरोबर, त्याच्या पुत्राच्या मरणाने समेट केला गेला, तर त्याहून अधिक हे आहे की, आपला समेट केला गेल्यामुळे त्याच्या जीवनाने आपण निश्चित तारले जाऊ.
”ख्रिस्ताच्या प्रीतीपासून कोण आपल्याला वेगळे करील? संकट किंवा दुःख, पाठलाग, भूक किंवा नग्नता, आपत्ती किंवा तरवार करील काय? कारण असे लिहिले आहे की, ‘तुझ्याकरता आम्ही दिवसभर मारले जात आहोत, आम्ही वधाच्या मेंढराप्रमाणे गणलेले आहोत.’ पण ज्याने आपल्यावर प्रीती केली, त्याच्याद्वारे या सर्व गोष्टींत आपण महाविजयी ठरतो.
”कारण माझी खात्री आहे की, मरण किंवा जीवन, देवदूत किंवा सत्ता, आताच्या गोष्टी किंवा येणार्या गोष्टी किंवा बले, किंवा उंची किंवा खोली किंवा दुसरी कोणतीही निर्मिती आपला प्रभू ख्रिस्त येशू ह्याच्याठायी असलेल्या देवाच्या प्रीतीपासून आपल्याला वेगळे करू शकणार नाही.
”कारण मला दिलेल्या कृपेच्या योगे, मी तुमच्यातील प्रत्येक जणाला असे सांगतो की, त्याने स्वतःला जसे मानावे त्याहून अधिक मोठे मानू नये, पण प्रत्येक जणाला देवाने दिलेल्या विश्वासाच्या परिमाणानुसार त्याने समंजसपणे स्वतःला मानावे.
”प्रीती निष्कपट असावी. वाईटापासून दूर रहा, चांगल्याला बिलगून रहा. बंधुप्रेमात एकमेकांशी सहनशील, मानात एकमेकांना अधिक मानणारे, कामात आळशी न होत, आत्म्यात उत्तेजित होऊन प्रभूची सेवा करणारे व्हा. आशेत आनंद करणारे, संकटात धीर धरणारे, प्रार्थनेत ठाम राहणारे, पवित्रजनांच्या गरजेसाठी भागी देणारे, आतिथ्यात पुढे जाणारे असे व्हा.
”जे तुमचा छळ करतात त्यांना आशीर्वाद द्या; आशीर्वाद द्या, शाप देऊ नका. आनंद करणार्यांबरोबर आनंद करा आणि रडणार्यांबरोबर रडा. एकमेकांशी एकमनाचे व्हा, उंच गोष्टींवर मन ठेवू नका, पण दीन अवस्थेत असलेल्यांकडे ओढले जा. स्वतःला समजते तेवढ्यात शहाणे होऊ नका. वाईटाबद्दल वाईट अशी कोणाची फेड करू नका. सर्व लोकांच्या दृष्टीपुढे चांगल्या गोष्टींवर लक्ष ठेवा. शक्य असल्यास सर्व लोकांशी तुम्ही आपल्याकडून शांतीने रहा.
”प्रियांनो, तुम्ही स्वतः सूड घेऊ नका, पण क्रोधाला वाव द्या कारण असे लिहिले आहे की, ‘सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन, असे परमेश्वर म्हणतो.’ पण तुझा वैरी भुकेला असेल तर त्यास खायला दे; तो तान्हेला असेल तर त्यास प्यायला दे; कारण असे करण्यात तू त्याच्या डोक्यावर विस्तवातल्या इंगळांची रास करशील. वाईटाने जिंकला जाऊ नकोस; पण बऱ्याने वाईटाला जिंक.
”तुम्ही एकमेकांवर प्रीती करावी, ह्याशिवाय कोणाचे देणेकरी असू नका कारण जो दुसर्यावर प्रीती करतो त्याने नियमशास्त्र पूर्ण केले आहे. कारण ‘व्यभिचार करू नको, खून करू नको, चोरी करू नको, लोभ धरू नको’ आणि अशी दुसरी कोणतीही आज्ञा असेल तर ‘तू जशी आपल्यावर तशीच आपल्या शेजार्यावर प्रीती कर’ या एका वचनात ती समावलेली आहे. प्रीती आपल्या शेजार्याचे काही वाईट करीत नाही; म्हणून प्रीती ही नियमशास्त्राची परिपूर्ती आहे.
”जो विश्वासात दुर्बळ आहे त्याचा स्वीकार करा, पण त्याच्या मतभेदाविषयी वाद करण्यास नाही.
”मग तू आपल्या बंधूला दोष का लावतोस? किंवा तू आपल्या बंधूला तुच्छ का लेखतोस? कारण, आपण सगळे जण देवाच्या न्यायासनासमोर उभे राहणार आहोत. कारण असे लिहिले आहे की, ‘प्रभू म्हणतो, मी जिवंत आहे म्हणून, प्रत्येक गुडघा मला नमन करील, आणि प्रत्येक जीभ देवाचे स्तवन करील.’ तर मग आपल्यातला प्रत्येकजण देवाला आपआपला हिशोब देईल.
”तर आपण ह्यापुढे एकमेकांना दोष लावू नये. पण असे ठरवू की, कोणीही आपल्या बंधूच्या मार्गात अडखळण किंवा पडण्यास कारण होईल असे काही ठेवू नये. मी जाणतो व प्रभू येशूमुळे मी मानतो की, कोणतीही गोष्ट मूळची अशुद्ध नाही, पण जो कोणी कोणतीही गोष्ट अशुद्ध मानतो त्यास ती अशुद्ध आहे. पण जर तुझा बंधू तुझ्या अन्नामुळे दुःखी होतो तर तू आता प्रीतीस अनुसरून चालत नाहीस असे झाले. ज्याच्यासाठी ख्रिस्त मरण पावला त्याचा तुझ्या अन्नामुळे तू नाश करू नकोस.
”तर आपण ज्या गोष्टी शांतीसाठी व एकमेकांच्या उभारणीसाठी उपयोगी आहेत त्यांच्यामागे लागू या.
”म्हणून आपण सशक्तांनी जे अशक्त आहेत त्यांच्या अशक्तपणाचा भार वाहावा आणि स्वतःला संतुष्ट करू नये. आपल्यामधील प्रत्येक जणाने शेजार्याला जे चांगले असेल त्यामध्ये त्याच्या उभारणीसाठी संतुष्ट करावे. कारण ख्रिस्तानेही स्वतःला संतुष्ट केले नाही, पण ‘तुझी निंदा करणार्यांची सर्व निंदा माझ्यावर आली’ हे नियमशास्त्रात लिहिले आहे तसे होऊ दिले. कारण ज्या गोष्टी पूर्वी लिहिण्यात आल्या त्या आपल्या शिक्षणासाठी लिहिण्यात आल्या; म्हणजे आपण धीराने व शास्त्रलेखाकडून मिळणार्या उत्तेजनाने आशा धरावी. आता, जो धीर व उत्तेजन देतो तो देव तुम्हास असे देवो की तुम्ही ख्रिस्त येशूप्रमाणे एकमेकांशी एकमनाचे व्हावे; म्हणजे, जो, आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा देव आणि पिता आहे त्याचे तुम्ही एकमनाने व एकमुखाने गौरव करावे. म्हणून देवाच्या गौरवाकरता जसा ख्रिस्तानेही आपला स्वीकार केला तसाच तुम्ही एकमेकांचा स्वीकार करा.
”पवित्र चुंबनाने एकमेकांना सलाम द्या. ख्रिस्ताच्या सर्व मंडळ्या तुम्हास सलाम पाठवत आहेत.
”आता, बंधूंनो, मी तुम्हास विनंती करतो की, तुम्ही शिकलेल्या शिकवणीविरुद्ध जे फुटी व अडथळे निर्माण करतात त्यांच्यावर लक्ष ठेवून त्यांना टाळा. कारण असे लोक जो ख्रिस्त आपला प्रभू आहे त्याची सेवा करीत नाहीत पण आपल्या पोटाची सेवा करतात आणि गोड भाषणे व प्रशंसा करून भोळ्या मनुष्यांची मने बहकवतात;
”परंतु ज्याप्रमाणे पवित्र शास्त्र म्हणते, “डोळ्यांनी पाहिले नाही, कानांनी ऐकले नाही आणि मनुष्याच्या मनात जे आले नाही, ते देवाने त्याच्यावर प्रीती करणाऱ्यांसाठी तयार केले आहे.”
”तुम्ही एकमेकांवर खटले भरता ह्यात सर्व प्रकारे तुमचीच हानी आहे, त्यापेक्षा तुम्ही अन्याय का सहन करीत नाही? त्यापेक्षा तुम्ही आपली फसवणूक का होऊ देत नाही?
”आता तुम्ही मला लिहिलेल्या गोष्टींविषयी मी लिहित आहे; स्त्रीला स्पर्श न करणे हे पुरुषासाठी बरे आहे. तरीही व्यभिचार होत आहेत म्हणून प्रत्येक पुरुषाला आपली स्वतःची पत्नी असावी आणि प्रत्येक स्त्रीला आपला स्वतःचा पती असावा. पतीने पत्नीला तिचा हक्क द्यावा; आणि त्याचप्रमाणे पत्नीनेही पतीला द्यावा. पत्नीला तिच्या स्वतःच्या शरीरावर अधिकार नसतो, पण पतीला असतो; आणि त्याचप्रमाणे पतीलाही त्याच्या स्वतःच्या शरीरावर अधिकार नसतो, पण पत्नीला असतो. विषयसुखासाठी एकमेकाला वंचित करू नका, तुम्हास प्रार्थनेला वेळ देता यावा म्हणून एकमेकांच्या संमतीने ठराविक वेळेकरीता दूर राहा आणि मग पुन्हा एक व्हा यासाठी की, सैतानाने तुमच्या असंयमामुळे तुम्हास मोहात पाडू नये.
”कारण मी सर्वांपासून स्वतंत्र असलो तरी अधिक लोक मिळवावेत म्हणून मी सर्वाचा दास झालो.
”कोणीही स्वतःचेच हित पाहू नये तर दुसऱ्यांचेही पाहावे.
”यहूदी लोक, ग्रीक लोक किंवा देवाच्या मंडळीला अडखळण होऊ नका. जसा मी प्रत्येक बाबतीत सर्वांना संतुष्ट करण्याचा प्रयत्न करतो आणि माझ्यासाठी काय हितकारक आहे हे न पाहता इतर प्रत्येकासाठी काय हितकारक आहे ते पाहतो यासाठी की त्यांचे तारण व्हावे.
”म्हणजे शरीरात कोणेतेही मतभेद नसावे तर अवयवांनी एकमेकांची सारखीच काळजी घ्यावी. आणि एक अवयव दुखत असला तर त्याच्याबरोबर सर्व अवयव दुख सोसतात आणि एका अवयवाचे गौरव झाले तर त्याच्याबरोबर सर्व अवयव आनंद करतात.
”मी मनुष्यांच्या आणि देवदूतांच्या भाषेत बोललो पण माझ्याठायी प्रीती नसली, तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज असा आहे. आणि माझ्यात संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व रहस्ये कळली व सर्व ज्ञान अवगत झाले आणि मला डोंगर हलवता येतील इतका माझ्यात पूर्ण विश्वास असला पण माझ्याठायी प्रीती नसली, तर मी काही नाही. आणि जरी मी माझे सर्व धन गरजवंताच्या अन्नदानासाठी दिले आणि माझे शरीर होमार्पणासाठी दिले पण जर माझ्याठायी प्रीती नसली तर मला काही लाभ नाही. प्रीती सहनशील आहे, उपकारशील आहे, प्रीती हेवा करीत नाही; प्रीती बढाई मारीत नाही, फुगत नाही. प्रीती गैरशिस्तपणे वागत नाही, स्वहित पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही. प्रीती अनीतीत आनंद मानीत नाही. परंतु सत्याविषयी ती आनंद मानते. प्रीती सर्व गोष्टी सहन करते, सर्व गोष्टींवर विश्वास ठेवते, सर्व गोष्टींची आशा करते, सर्व गोष्टी सहन करते. प्रीती कधीच संपत नाही; भविष्यवाण्या असतील त्या निरुपयोगी होतील, भाषा असतील त्या नाहीशा होतील, ज्ञान असेल ते नाहीसे होईल;
”सारांश, विश्वास, आशा आणि प्रीती ही तिन्ही कायम राहतात. पण यामध्ये प्रीती श्रेष्ठ आहे.
”प्रीती हे तुमचे ध्येय असू द्या आणि आत्मिक दानांची विशेषतः तुम्हास संदेश देता यावा याची मनापासून इच्छा बाळगा.
”प्रत्येक गोष्ट जी तुम्ही कराल ती प्रीतीत करा.
”कारण ख्रिस्ताची प्रीती आम्हास आवरते कारण आम्ही असे मानतो की एक सर्वांसाठी मरण पावला तर सर्व मरण पावले, आणि सर्वांसाठी तो ह्यासाठी मरण पावला की, ह्यापुढे जे जगतील त्यांनी आपल्या स्वतःसाठी नाही, पण त्यांच्यासाठी जो स्वतः मरण पावला आणि पुन्हा उठला त्याच्यासाठी त्यांनी जगावे.
”उलट सर्व स्थितीत देवाचे सेवक म्हणून, आम्ही आमच्याविषयीची खातरी पटवून देतो; आम्ही पुष्कळ सोशिकपणाने संकटात, आपत्तीत व दुःखात; फटक्यांत, बंदिवासांत व दंगलीत; कष्टांत, जागरणांत व उपासांत; शुद्धतेने व ज्ञानाने, सहनशीलतेने व ममतेने, पवित्र आत्म्याने व निष्कपट प्रीतीने; खरेपणाच्या वचनाने व देवाच्या सामर्थ्याने, उजव्या हातात व डाव्या हातात नीतिमत्त्वाची शस्त्रे बाळगून, गौरवाने व अपमानाने, अपकीर्तीने व सत्कीर्तीने, आम्ही आपली लायकी पटवून देतो. आमच्याविषयी खातरी पटवतो. फसव्या आणि तरी खरे आहोत, अपरिचित आहोत आणि सुपरीचित आहोत, मरत आहोत आणि बघा, आम्ही जिवंत आहोत. जणू शिक्षा भोगीत होतो आणि तरी मरण पावलो नाही. आम्ही दुःखीत, तरी सदोदित आनंद करणारे, आम्ही दरिद्री, तरी पुष्कळांना धनवान करणारे, आमच्याजवळ काही नसलेले आणि तरी सर्व असलेले असे आढळतो.
”ती अशी की, संकटाच्या बिकट परीक्षेत त्यांचा आत्यंतिक आनंद व त्यांचे कमालीचे दारिद्र्य ह्यांमध्ये त्यांची औदार्यसंपदा विपुल झाली. कारण मी साक्ष देतो की, त्यांना जितके शक्य होते तितके त्यांनी दिले आणि त्यांच्या क्षमतेपेक्षाही जास्त दिले. त्यांनी उत्सफूर्तपणे आपण होऊन दिले. पवित्रजनांच्या सेवेमुळे मिळणाऱ्या आशीर्वादामध्ये सहभागी होण्याची कृपा मिळावी म्हणून त्यांनी आस्थेवाईकपणे आम्हास विनंती केली. आम्हास आशा होती त्याप्रमानेच केवळ नव्हे, तर त्यांनी प्रथम स्वतःस प्रभूला दिले आणि देवाच्या इच्छेने आपणास आम्हासही दिले.
”म्हणून जसे तुम्ही सर्व गोष्टीत, म्हणजे विश्वासात, बोलण्यात ज्ञानात व सर्व आस्थेत व आम्हावरील आपल्या प्रीतीत वाढला आहा, तसे तुम्ही या कृपेच्या कार्यातही फार वाढावे. हे मी आज्ञा म्हणून सांगत नाही, तर दुसऱ्यांच्या आस्थेवरून तुमच्याही प्रीतीचा खरेपणा पडताळून पाहतो. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा तुम्हास माहीत आहे, तो धनवान असता तुमच्याकरता दरिद्री झाला, अशा हेतूने की, त्याच्या दारिद्र्याने तुम्ही धनवान व्हावे.
”कारण उत्सुकता असली म्हणजे ज्याच्या त्याच्याजवळ जसे असेल तसे ते मान्य होते, नसेल तसे नाही.
”म्हणून या लोकांस तुमच्या प्रीतीचा पुरावा द्या आणि आम्हास तुमच्याबद्दल वाटत असलेल्या अभिमानबद्दलचे समर्थन करा. यासाठी की, मंडळ्यांनी ते पाहावे.
”प्रत्येक मनुष्याने आपल्या मनात जे ठरवले असेल त्याप्रमाणे त्याने द्यावे; दुःखी मनाने किंवा देणे भाग पडते म्हणून देऊ नये कारण ‘संतोषाने देणारा देवाला’ आवडतो.
”पण जो मी, पौल, तुमच्याबरोबर असताना तुमच्याशी लीनपणे वागतो पण दूर असताना तुमच्याबरोबर कडकपणे वागतो. तो मी तुम्हास ख्रिस्ताच्या सौम्यतेने व नम्रतेने विनंती करतो.
”आणि म्हणून ख्रिस्तासाठी आजारात, अपमानात, आपत्तीत, पाठलागात आणि दुःखात मी संतुष्ट असतो कारण मी जेव्हा अशक्त असतो तेव्हाच सशक्त आहे.
”शेवटी, बंधूंनो, आनंद करा तुम्ही आपली अधिकाधिक सुधारणा करा. तुमचे सांत्वन होवो. तुम्ही एकमनाचे व्हा व शांतीने रहा आणि प्रीतीचा व शांतीचा देव तुमच्याबरोबर राहील. पवित्र अभिवादनाने एकमेकांना सलाम करा.
”प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.
”यहूदी किंवा ग्रीक, दास किंवा स्वतंत्र नाही, पुरूष किंवा स्त्री हा भेदच नाही कारण ख्रिस्त येशूमध्ये तुम्ही सर्वजण एकच आहात.
”ख्रिस्त येशूमध्ये सुंता काही कामाची नाही आणि सुंता न होण्यात काही सामर्थ्य आहे असे नाही; तर प्रीतीच्या द्वारे कार्य करणारा विश्वास त्याच्यात सामर्थ्य आहे.
”कारण बंधूंनो, तुम्हास स्वातंत्र्यतेकरिता बोलावले गेले आहे. तरी त्या स्वतंत्रतेने देह वासनांना संधी देऊ नका. पण प्रीतीने एकमेकांची सेवा करा. कारण, ‘जशी आपणावर तशीच आपल्या शेजार्यावर प्रीती करा.’ हे एकच वचन पाळल्याने सर्व नियमशास्त्र पूर्णपणे पाळण्यात आले आहे. पण तुम्ही जर एकमेकांना चावता आणि खाऊन टाकता, तर तुम्ही एकमेकांचा नाश करू नये म्हणून जपा.
”आता देहाची कामे उघड आहेत आणि ती हीः व्यभिचार, अमंगळपणा, कामातुरपणा, मूर्तिपूजा, जादूटोणा, वैर, कलह, ईर्ष्या, राग, विरोध, फुटी, गट, मत्सर, धुंदी, दंगल आणि ह्यांसारखी आणखी; ह्यांविषयी मी जसे पूर्वी सांगितले होते तसे आता आधी सांगतो की, या गोष्टी करणार्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही.
”पवित्र आत्म्याच्याद्वारे निष्पन्न होणारे फळही आहेत प्रीती, आनंद, शांती, सहनशीलता, ममता, चांगुलपणा, विश्वासूपणा, सौम्यता, इंद्रियदमन हे आहे; अशांविरूद्ध नियमशास्त्र नाही.
”बंधूंनो, कोणी मनुष्य एखाद्या अपराधात सापडला, तर तुम्ही जे आत्मिक आहात ते त्यास सौम्यतेच्या आत्म्याने पुनःस्थापित आणा; तू स्वतःही परीक्षेत पडू नये म्हणून स्वतःकडे लक्ष दे. तुम्ही एकमेकांची ओझी वाहा म्हणजे अशाने ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल.
”कारण आपण कोणी नसता कोणीतरी आहोत असे मानतो, तो स्वतःला फसवतो. पण प्रत्येकाने स्वतःच्या कामाची परीक्षा करावी आणि मग, त्यास दुसर्याच्या संबंधात नाही, पण केवळ आपल्यात अभिमानाला जागा मिळेल.
”आणि चांगले करण्याचा आपण कंटाळा करू नये; कारण आपण खचलो नाही, तर नियोजित समयी कापणी करू. म्हणून आपल्याला संधी असेल तसे आपण सर्वांचे बरे करावे व विशेषतः विश्वासाने एका घराण्यात एकत्र आलेल्या विश्वास ठेवणाऱ्यांचे बरे करावे.
”देवाने ख्रिस्तामध्ये विश्वास ठेवणाऱ्यांना जगाच्या रचनेपूर्वीच निवडले यासाठी की आम्ही त्याच्या समक्षतेत पवित्र आणि निर्दोष असावे.
”म्हणून तुमच्यामधील असलेला प्रभू येशूवरचा विश्वास व तुमची पवित्रजनांवरची प्रीती विषयी ऐकून मीही तुमच्यासाठी देवाला धन्यवाद देण्याचे आणि माझ्या प्रार्थनेत तुमची आठवण करण्याचे थांबवले नाही.
”पण देव खूप दयाळू आहे कारण त्याच्या महान प्रीतीने त्याने आमच्यावर प्रेम केले. आम्ही आमच्या अपराधामुळे मरण पावलेले असता त्याने आम्हास ख्रिस्ताबरोबर नवीन जीवन दिले. तुमचे तारण कृपेने झाले आहे.
”कारण आम्ही देवाच्या हाताची कृती आहोत जी ख्रिस्तामध्ये आहे जेणेकरूण आम्ही जीवनात चांगली कामे करावी जे देवाने आरंभीच योजून ठेवले होते.
”विश्वासाद्वारे ख्रिस्ताने तुमच्या अंतःकरणात रहावे ह्यासाठी की, तुम्ही प्रीतीत मुळावलेले व खोलवर पाया घातलेले असावे यासाठी की, जे पवित्रजन आहेत त्यांच्यासह ख्रिस्ताच्या प्रीतीची रुंदी, लांबी, उंची आणि खोली किती आहे हे तुम्ही समजून घ्यावे. म्हणजे तुम्हास समजावे ख्रिस्ताची महान प्रीती जी सर्वांना मागे टाकते, यासाठी की तुम्ही देवाच्या पूर्णत्वाने परिपूर्ण भरावे.
”म्हणून मी, जो प्रभूमधील बंदीवान, तो तुम्हास विनंती करतो, देवाकडून तुम्हास जे बोलावणे झालेले आहे, त्यास योग्य तसे जगावे. सर्व नम्रतेने, सौम्यतेने आणि एकमेकांना सहन करुन प्रेमाने स्वीकारा. शांतीच्या बंधनाने आत्म्याचे ऐक्य राखण्यासाठी प्रत्येक गोष्टीत चांगले ते करा.
”जो कोणी चोरी करीत असेल तर त्याने यापुढे चोरी करू नये. उलट त्याने आपल्या हातांनी काम करावे यासाठी की जो कोणी गरजू असेल त्यास त्यातून वाटा देण्यासाठी त्याच्याकडे काहीतरी असावे. तुमच्या तोंडून कोणतीही वाईट भाषा न निघो, त्याऐवजी गरजेनुसार त्यांची चांगली उन्नती होणारे उपयोगी शब्द मात्र निघो. यासाठी जे ऐकतील त्यांना कृपा प्राप्त होईल. आणि देवाच्या पवित्र आत्म्याला दुःखी करू नका कारण तुम्हास खंडणी भरून मुक्तीच्या दिवसासाठी त्याच्याकडून तुम्हास शिक्का मारलेले असे आहात. सर्व प्रकारची कटूता, संताप, राग, ओरडणे, देवाची निंदा ही सर्व प्रकारच्या दुष्टाईबरोबर तुम्हामधून दूर करावी. एकमेकांबरोबर दयाळू आणि कनवाळू व्हा आणि देवाने ख्रिस्तामध्ये मुक्तपणे क्षमा केली तशी एकमेकांना क्षमा करा.
”तर मग देवाच्या प्रिय मुलांसारखे अनुकरण करणारे व्हा, आणि ख्रिस्तानेही जशी आपल्यावर प्रीती केली आणि देवाला संतुष्ट करणारा सुवास मिळावा म्हणून, आपल्यासाठी ‘अर्पण व बलिदान’ असे स्वतःला दिले, तसे तुम्ही प्रीतीत चाला.
”ख्रिस्ताच्या भयात राहून एकमेकांचा आदर करून स्वतःला नम्रपणे त्याच्या अधीन करा.
”पतीनो, ज्याप्रमाणे ख्रिस्त मंडळीवर प्रीती करतो, तशी तुम्ही आपल्या पत्नीवर निस्वार्थी प्रीती करा. त्याने तिच्यासाठी स्वतःला दिले,
”याप्रकारे पतींनी सुद्धा आपल्या पत्नीवर असेच प्रेम करावे, जसे ते स्वतःच्या शरीरावर प्रेम करतात, जो कोणी त्याच्या स्वतःच्या पत्नीवर प्रेम करतो, तो स्वतःवर प्रेम करतो. कारण आतापर्यंत कोणीही आपल्या शरीराचा व्देष केला नाही. उलट तो त्याचे पोषण करतो, त्याची काळजी घेतो. ज्याप्रमाणे ख्रिस्त मंडळीचे पोषण करतो व काळजी घेतो. कारण आपण त्याच्या शरीराचे अवयव आहोत.
”“म्हणून याकारणास्तव पुरूष त्याचे वडील व आई यांना सोडील व त्याच्या पत्नीशी जडून राहील आणि ते दोघे एकदेह होतील.” हे गुढ सत्य फार महत्त्वाचे आहे आणि मी हे सांगत आहे की ते ख्रिस्त व मंडळीला लागू पडते. तरीही, तुमच्यातील प्रत्येकाने त्याच्या स्वतःच्या पत्नीवर प्रेम केले पाहिजे व पत्नीनेही पतीचा मान राखला पाहिजे.
”मुलांनो, प्रभूमध्ये आपल्या आई-वडीलांच्या आज्ञा पाळा कारण हे योग्य आहे. “आपल्या वडिलांचा व आईचा मान राख, यासाठी की तुझे सर्वकाही चांगले व्हावे व तुला पृथ्वीवर दीर्घ आयुष्य लाभावे.” अभिवचन असलेली हीच पहिली आज्ञा आहे. आणि वडिलांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिडीस आणू नका पण तुम्ही त्यांना प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात वाढवा. दासांनो, तुमच्या अंतःकरणाच्या प्रामाणिकतेने जशी ख्रिस्ताची आज्ञा पाळता तशी पूर्ण आदराने व थरथर कांपत जे देहानुसार पृथ्वीवरील मालकांशी आज्ञाधारक असा.
”देवपिता आणि प्रभू येशू ख्रिस्तापासून आता बंधूंना विश्वासासह प्रीती आणि शांती लाभो. जे सर्वजण आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर अविनाशी प्रीती करतात, त्या सर्वाबरोबर देवाची कृपा असो.
”देव माझा साक्षी आहे की, मला ख्रिस्त येशूच्या कळवळ्यात सर्वांविषयी किती उत्कंठा लागली आहे, मी अशी प्रार्थना करतो की, तुमची प्रीती ज्ञानात व पूर्ण सारासार विचारात आणखी अधिकाधिक वाढत जावी, यासाठी की जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे आणि तुम्ही ख्रिस्ताच्या दिवसासाठी निर्मळ व निर्दोष असावे.
”ह्यावरून ख्रिस्ताच्या ठायी काही आश्वासन, प्रीतीचे काही सांत्वन, आत्म्याची काही सहभागिता, काही कळवळा व करूणा ही जर आहेत, तर तुम्ही समचित्त व्हा, एकमेकांवर सारखीच प्रीती करा आणि एकजीव होऊन एकमनाचे व्हा. अशाप्रकारे माझा आनंद पूर्ण करा. आणि तुम्ही विरोधाने किंवा पोकळ अभिमानाने काही करू नका, पण मनाच्या लीनतेने आपल्यापेक्षा एकमेकांना मोठे मानावे. तुम्ही कोणीही आपलेच हित पाहू नका, तर दुसर्यांचेहि पाहा.
”अशी जी चित्तवृत्ती ख्रिस्त येशूच्या ठायी होती ती तुमच्याठायीही असो. तो देवाच्या स्वरूपाचा असूनही, त्याने आपण देवाच्या बरोबरीचे असणे हा लाभ आहे असे त्याने मानले नाही, तर स्वतःला रिकामे केले, म्हणजे मनुष्याच्या प्रतिरूपाचे होऊन दासाचे स्वरूप धारण केले, आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने स्वतःला लीन केले आणि त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले; येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले.
”म्हणून माझ्या प्रियजनहो, मी ज्यांच्यासाठी उत्कंठित आहे ते तुम्ही माझा आनंद व मुकुट आहात म्हणून माझ्या प्रिय बंधूंनो, तुम्ही प्रभूमध्ये तसेच स्थिर राहा.
”आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करतो, तेव्हा आम्ही नित्य देवाचे, म्हणजे आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या पित्याचे उपकार मानतो कारण ख्रिस्त येशूमधील तुमच्या विश्वासाविषयी आणि सर्व पवित्र जनांविषयी तुमच्यात असलेल्या प्रीतीविषयी आम्ही ऐकले आहे.
”तुमच्यासाठी या माझ्या दुःखात मी आनंद करीत आहे आणि आता, ख्रिस्ताच्या दुःखात त्याच्या शरीराकरता जे उणे आहे ते माझ्या देहात मी पुरे करीत आहे आणि त्याचे शरीर मंडळी आहे.
”ते परिश्रम ह्यांसाठी की, त्यांच्या मनास उत्तेजन प्राप्त व्हावे आणि तुम्ही प्रीतीत एकत्र जोडले जावे. बुद्धीची पूर्ण खातरी विपुलतेने मिळावी व देवाचे रहस्य म्हणजे ख्रिस्त ह्यांचे पूर्ण ज्ञान त्यास व्हावे.
”परंतु आता तुमच्यातील क्रोध, राग व दुष्टपण, निंदा आणि तुमच्या मुखाने शिवीगाळ करणे, हे सर्व आपणापासून दूर करा. एकमेकांशी खोटे बोलू नका कारण तुम्ही जुन्या मनुष्यास त्याच्या कृतींसहित काढून टाकले आहे आणि जो नवा मनुष्य, आपल्या निर्माण करणार्याच्या प्रतिरूपानुसार पूर्ण ज्ञानात नवा केला जात आहे, त्यास तुम्ही परिधान केले आहे. ह्यात ग्रीक व यहूदी, सुंता झालेला व न झालेला, बर्बर व स्कुथी, दास व स्वतंत्र हा भेदच नाही, तर ख्रिस्त सर्वकाही आहे व सर्वांत आहे.
”तेव्हा तुम्ही देवाचे पवित्र व प्रिय असे निवडलेले लोक आहात, म्हणून करूणायुक्त हृदय, दया, सौम्यता, लीनता व सहनशीलता धारण करा. एकमेकांचे सहन करा आणि कोणाचे कोणाशी भांडण असल्यास एकमेकांची क्षमा करा; प्रभूने तुमची क्षमा केली तशी एकमेकांची क्षमा करा. पूर्णता करणारे बंधन अशी जी प्रीती ती या सर्वांवर धारण करा. ख्रिस्ताची शांती तुमच्या अंतःकरणात राज्य करो. तिच्याकरिता एक शरीर असे पाचारण्यांत आले आहे; आणि तुम्ही कृतज्ञ असा. ख्रिस्ताचे वचन तुम्हांमध्ये भरपूर राहो. तुम्ही सर्व ज्ञानीपणाने एकमेकांस शिकवा व बोध करा; आपल्या अंतःकरणात देवाला स्तोत्रे, गीते व आत्मिक गीते कृपेच्या प्रेरणेने गा. आणि बोलणे किंवा करणे जे काही तुम्ही कराल, ते सर्व प्रभू येशूच्या नावाने करा; आणि त्याच्याद्वारे देव जो पिता त्याचे उपकारस्तुती करा.
”स्त्रियांनो, जसे प्रभूमध्ये योग्य आहे त्याप्रमाणे तुम्ही आपआपल्या पतीच्या अधीन असा. पतींनो, आपआपल्या पत्नीवर प्रीती करा; तिच्याशी निष्ठूरतेने वागू नका. मुलांनो, तुम्ही सर्व गोष्टींत आपल्या आई-वडीलांच्या आज्ञा पाळा कारण हे प्रभूला संतोष देणारे आहे. वडिलांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिडीस आणू नका; नाही तर, कदाचित ती निरुत्साही होतील.
”दासांनो, दैहिक दृष्ट्या जे तुमचे मालक आहेत त्यांचे सर्व गोष्टींत आज्ञापालन करा. मनुष्यांना खुश करणार्या नोकरासारखे तोंडदेखल्या चाकरीने नका; तर सालस मनाने प्रभूची भीती बाळगून पाळा. आणि जे काही तुम्ही करता ते मनुष्यांसाठी म्हणून करू नका तर प्रभूसाठी म्हणून जिवेभावे करा.
”बाहेरच्या लोकांबरोबर सुज्ञानीपणाने वागा. संधी साधून घ्या. तुमचे बोलणे नेहमी कृपायुक्त, मिठाने रूचकर केल्यासारखे असावे, म्हणजे प्रत्येकाला कसकसे उत्तर द्यावयाचे हे तुम्ही समजावे.
”आणि जशी आमची प्रीती तुम्हावर आहे, तशी प्रभू तुमची प्रीती एकमेकांवर व सर्वांवर वाढवून विपुल करो; ह्यासाठी की, आपला प्रभू येशू आपल्या सर्व पवित्र जनांसह येईल त्यावेळेस त्याने तुमची अंतःकरणे देव आपला पिता ह्याच्यासमोर पवित्रतेत निर्दोष होण्यासाठी स्थिर करावी.
”बंधुप्रेमाविषयी आम्ही तुम्हास लिहावे याची तुम्हास गरज नाही; कारण एकमेकांवर प्रीती करावी, असे तुम्हास देवानेच शिकविले आहे; आणि अखिल मासेदोनियांतील सर्व बंधुवर्गावर तुम्ही ती करीतच आहात. तरी बंधूंनो, आम्ही तुम्हास बोध करतो की, ती अधिकाधिक करावी.
”म्हणून तुम्ही एकमेकांचे सांत्वन करा आणि एकमेकांची उभारणी करा; हे तुम्ही करतही आहात. आणि बंधूंनो, आम्ही तुम्हास विनंती करतो की, जे तुमच्यांत परिश्रम करतात, जे प्रभूमध्ये तुमच्यांवर आहेत आणि तुम्हास बोध करतात त्यांच्याकडे लक्ष द्या; आणि त्यांना त्यांच्या कामावरून प्रीतीने फार थोर माना आणि एकमेकांशी शांतीने रहा. आता बंधूंनो, आम्ही तुम्हास बोध करतो की, जे अव्यवस्थीत आहेत त्यांना तुम्ही इशारा द्या, जे अल्पधीराचे आहेत त्यांना धीर द्या, अशक्त आहेत त्यांना आधार द्या; सर्वांबरोबर सहनशील असा. आणि तुम्ही हे पाहा की, कोणी कोणाला वाईटाबद्दल वाईट असे भरून देऊ नये; पण तुमच्यात एकमेकांसाठी व सर्वसाठी जे चांगले आहे त्याच्या सतत मागे लागा.
”बंधूनो, आम्ही सर्वदा तुम्हाविषयी देवाची उपकारस्तुती केली पाहिजे आणि हे योग्यच आहे कारण तुमचा विश्वास अतिशय वाढत आहे आणि तुम्हा सर्वांमधील प्रत्येकांची एकमेकांवरील प्रीती विपुल होत आहे; ह्यावरून तुमच्या सर्व छळांत व तुम्ही जी सहनशीलता व जो विश्वास दाखविता त्याबद्दल देवाच्या मंडळ्यांतून आम्ही स्वतः तुमचा अभिमान बाळगतो. ते देवाच्या योग्य न्यायाचे प्रमाण आहे; तो न्याय हा की, ज्यासाठी तुम्ही दुःख सोशीत आहात त्या देवाच्या राज्याला तुम्ही योग्य ठरले जावे.
”प्रभूही तुमची मने देवावरच्या प्रीतीकडे व ख्रिस्ताच्या सहनशीलतेकडे लावो.
”आणि या आज्ञेचे उद्दिष्ट प्रीती आहे, जी शुद्ध अंतःकरणातून, चांगल्या विवेकभावातून व निष्कपट विश्वासातील असावी.
”परंतु विश्वास आणि प्रीती जी ख्रिस्त येशूमध्ये सापडते ती आपल्या प्रभूच्या कृपेने ओसंडून वाहिली.
”कोणीही तुझे तरुणपण तुच्छ मानू नये, तर बोलण्यात, वर्तणुकीत, प्रीतीत, (आत्म्यात) विश्वासात, शुद्धपणांत, विश्वास ठेवणाऱ्यांचा आदर्श हो.
”पण जर कोणी त्याच्या स्वतःच्या नातेवाईकासाठी आणि विशेषतः त्याच्या कुटुंबातील जवळच्यांसाठी तरतूद करीत नाही, तर त्याने विश्वास नाकारलेला आहे व तो अविश्वासू मनुष्यापेक्षा वाईट आहे.
”हे देवाच्या मनुष्या, तू या गोष्टींपासून दूर राहा. न्यायीपणा, सुभक्ती, विश्वास आणि प्रीती, सहनशीलता आणि लीनता यांच्या पाठीस लाग.
”माझ्या पूर्वजांप्रमाणे ज्या देवाची मी शुद्ध विवेकभावाने सेवा करतो, त्या देवाचे मी उपकार मानतो आणि रात्रंदिवस माझ्या प्रार्थनेत तुझी नेहमी आठवण करतो. तुझी आसवे आठवून तुला भेटण्याची उत्कंठा धरतो ह्यासाठी की मी आनंदाने पूर्ण व्हावे.
”कारण देवाने आम्हास भित्रेपणाचा आत्मा दिला नाही तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमनाचा आत्मा दिला आहे. म्हणून आपल्या प्रभूविषयी साक्ष देण्यासाठी लाज धरु नको किंवा मी जो त्याच्यासाठी कैदी झालो त्या माझी लाज धरू नको. तर सुवार्तेसाठी देवाच्या सामर्थ्याप्रमाणे तू माझ्याबरोबर दुःखाचा वाटा घे.
”देवाच्या सेवकाने भांडू नये, तर सर्व लोकांशी सौम्यतेने वागावे, तसेच शिक्षणात कुशल व सहनशील असावे. जे त्यास विरोध करतात, त्यांना लीनतेने शिक्षण द्यावे कदाचित त्यांनी खरेपण जाणावे म्हणून देव त्यांना पश्चात्ताप करण्याची बुद्धी देईल.
”लोक स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ठ, निंदा करणारी, आई-वडीलांची आज्ञा न मानणारी, अनुपकारी, अधार्मिक इतरांवर प्रीती न करणारी, क्षमा न करणारी, चहाडखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी. विश्वासघातकी, उतावीळ, गर्वाने फुगलेली, देवावर प्रीती करण्यापेक्षा चैनीची अधिक आवड धरणारी अशी होतील; ते देवाच्या सेवेचे बाहेरचे स्वरूप चांगले राखतील परंतु त्याचे सामर्थ्य नाकारतील. त्यांच्यापासून नेहमी दूर राहा.
”तरीही तू माझी शिकवण, वागणूक, जीवनातील माझे ध्येय, माझा विश्वास, माझा धीर, माझी प्रीती, माझी सहनशीलता, माझा झालेला छळ, माझ्यावर आलेली संकटे, ही ओळखून आहेस,
”तू तर सुशिक्षणास शोभणार्या गोष्टी बोलत जा. त्या अशा की, वृद्ध पुरुषांनी संयमशील, गंभीर व समंजस व्हावे आणि विश्वास, प्रीती व सहनशीलता ह्यात दृढ व्हावे. वृद्ध स्त्रियांनी, त्याचप्रमाणे, आपल्या आचरणात पवित्रेस शोभणाऱ्या असाव्या; चुगलखोर, मद्य पिणाऱ्या नसाव्या; चांगले शिक्षण देणार्या असाव्या; आणि आपल्यातील तरुण स्त्रियांना असे शिक्षण द्यावे की, त्यांनी आपल्या पतींवर व मुलांवर प्रेम करावे. आणि त्यांनी समंजस, शुद्धाचरणी, घर संभाळणार्या, ममताळू व पतीच्या अधीन राहणार्या व्हावे; म्हणजे देवाच्या वचनाची निंदा होणार नाही. आणि तसेच तरुण पुरुषांनी समंजस मनाचे व्हावे म्हणून, तू त्यांना बोध कर. तू सर्व गोष्टींत चांगल्या कामांचे उदाहरण असे स्वतःला दाखव; तुझ्या शिक्षणात निर्मळपणा, गंभीरता, आणि निरपवाद चांगली शिकवण दिसू दे, म्हणजे तुझ्यावर टिका करणार्याला तुझ्याविषयी बोलण्यास काही वाईट न मिळून तो लज्जित व्हावा.
”त्यांना असे सुचव की त्यांनी सरकारी सत्ताधीश व अधिकारी ह्यांच्या अधीन रहावे. त्यांच्या आज्ञा पाळाव्या, प्रत्येक चांगल्या कामाला तयार असावे. कोणाची निंदा करू नये, भांडखोर नसावे पण सहनशील होऊन सर्वांना सर्व गोष्टींत सौम्यता दाखवावी, अशी त्यांना आठवण दे. कारण आपणही अगोदर अविचारी, अवमान करणारे व बहकलेले होतो; नाना वासनांचे व सुखांचे दास होतो, कुवृत्तीत व मत्सरात होतो. आपण अमंगळ मानले गेलो व एकमेकांचा द्वेष करणारे होतो; पण आपल्या तारक देवाची दया व मानवजातीवरील प्रीती प्रकट झाली, तेव्हा आपण केलेल्या, नीतिमत्त्वाच्या कामांमुळे नाही, पण त्याने आपल्याला त्याच्या दयेमुळे, नव्या जन्माचे स्नान घालून पवित्र आत्म्याच्या नविनिकरणाने तारले.
”मी आपल्या प्रार्थनांमध्ये सर्वदा तुझी आठवण करून, माझ्या देवाची उपकारस्तुती करतो; कारण प्रभू येशूवर तुझा जो विश्वास आहे आणि सर्व पवित्रजनांवर तुझी जी प्रीती आहे, त्यांविषयी मी ऐकले आहे.
”कारण तुझ्या प्रीतीमुळे मला फार आनंद व सांत्वन झाले आहे कारण हे बंधू, तुझ्याकडून पवित्र जनांची अंतःकरणे समाधान पावली आहेत. याकरिता जे योग्य ते तुला आज्ञा करून सांगण्याचे जरी मला ख्रिस्ताद्वारे पूर्ण धैर्य आहे. तरी प्रीतीस्तव विनंती करून सांगणे मला बरे वाटते. मी वृद्ध झालेला पौल आणि आता ख्रिस्त येशूसाठी बंदिवान.
”कारण तुम्ही केलेली पवित्र जनांची सेवा, त्या सेवेत तुम्ही अजूनही दाखवीत असलेले सातत्य, तुमचे काम व त्याच्या लोकांस दानाद्वारे व इतर मदत करण्याद्वारे तुम्ही त्याच्या नावावर केलेली प्रीती ही सर्व विसरण्याइतका देव अन्यायी नाही.
”कारण मी त्यांच्या अनीतीच्या कृत्यांविषयी दयाशील होईन. आणि त्यांची पापे मी ह्यापुढे आठवणारच नाही.
”आपण एकमेकांस समजून घेऊ व प्रीती आणि चांगली कामे करण्याकरिता एकमेकांना उत्तेजन देऊ. आपण कित्येकाच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकास बोध करावा आणि देवाचा दिवस जवळ येत असताना अधीकाधीक उत्तेजन द्यावे.
”कारण ज्याच्यावर परमेश्वर प्रीती करतो, त्यास तो शिक्षा करतो आणि ज्यांना तो आपले पुत्र म्हणून स्वीकारतो, त्या प्रत्येकांना तो शिक्षा करतो. हा कठीण समय आहे म्हणून शिस्त सहन करा. ते असे दर्शवते की, देव तुम्हास मुलांसारखी वागणूक देत आहे; कारण असा कोणता मुलगा आहे ज्याला वडील शिस्त लावीत नाहीत? परंतु ज्या शिक्षेचे सर्व भागीदार झाले आहेत अशा शिक्षेवाचून जर तुम्ही आहा, तर तसे तुम्ही दासीपुत्र आहात आणि तुम्ही खरे पुत्र नाही. याशिवाय आम्हा सर्वांना जगिक पिता असताना त्यांनी आम्हास शिस्त लावली आणि त्याबद्दल आम्ही त्यांचा आदर राखला. तर मग आम्ही आमच्या आध्यात्मिक पित्याच्या कितीतरी अधिक प्रमाणात अधीन होऊन जगले पाहिजे बरे?
”बंधुजनांवरील प्रीती निरंतर राहो. लोकांचा पाहुणचार करण्याचे विसरू नका. असे करण्याने काहींनी त्यांच्या नकळत देवदूतांचे स्वागत केले आहे. तुम्ही स्वतः त्यांच्याबरोबर तुरुंगात होता असे समजून जे तुरुंगात आहेत त्यांची आठवण करा. तुम्हीही शरीरात असल्याने जे दुःख भोगीत आहेत त्यांची आठवण ठेवा.
”आणि इतरांसाठी चांगले ते करण्यास आणि दानधर्म करण्यास विसरू नका कारण अशा अर्पणाने देवाला संतोष होतो.
”दीन असलेल्या बंधूने, आपल्या उच्चपणाविषयी अभिमान बाळगावा.
”माझ्या प्रिय बंधूंनो, हे लक्षात ठेवा प्रत्येक मनुष्य ऐकण्यास तत्पर असावा, बोलण्यात सावकाश असावा आणि रागास मंद असावा. कारण मनुष्याच्या रागामुळे देवाचे नीतिमत्त्वाचे कार्य घडत नाही. म्हणून तुमच्यासभोवतीच्या सर्व अमंगळ गोष्टींपासून पूर्णपणे स्वतःची सुटका करून घ्या आणि जी तुमच्या आत्म्याचे तारण करण्यास समर्थ आहे ती देवाची शिकवण तुमच्या अंतःकरणात मुळावलेली आहे ती लीनतेने स्वीकारा.
”जर एखादा मनुष्य स्वतःला धार्मिक समजतो आणि तरी स्वतःच्या जीभेवर ताबा ठेवत नाही, तर तो स्वतःच्या अंतःकरणाला फसवतो. त्या व्यक्तीची धार्मिकता निरर्थक आहे.
”कारण तुमच्या सभास्थानात कोणी सोन्याची अंगठी घालणारा, भपकेदार कपड्यातला मनुष्य आला आणि तेथे मळक्या कपड्यात कोणी गरीबही मनुष्य पण आला, तर भपकेदार झगा घातलेल्या मनुष्याकडे तुम्ही आदराने पाहता व त्यास म्हणता की, “इथे चांगल्या जागी बसा”; आणि गरिबाला म्हणता, “तू तिथे उभा रहा,” किंवा “इथे माझ्या पायाशी बस.” तर, तुम्ही आपसात भेद ठेवता आणि दुष्ट विचार करणारे न्यायाधीश झालात ना? माझ्या प्रिय बंधूंनो, ऐका; देवाने जगात जे गरीब आहेत त्यांना विश्वासात धनवान होण्यास आणि जे त्याच्यावर प्रीती करतात त्यांना त्याने ज्याचे वचन दिले आहे त्या राज्याचे वारीस होण्यास निवडले आहे की नाही? पण तुम्ही गरिबांना तुच्छ मानले आहे. जे श्रीमंत आहेत ते तुम्हास जाचतात आणि न्यायालयात खेचून नेतात की नाही?
”खरोखर, “तू जशी आपल्यावर तशीच आपल्या शेजार्यावर प्रीती कर,” या शास्त्रलेखातील राजमान्य नियम जर तुम्ही पूर्ण करीत असाल तर तुम्ही चांगले करीत आहात. पण तुम्ही पक्षपात बाळगीत असाल तर तुम्ही पाप करता आणि उल्लंघन करणारे म्हणून नियमशास्त्राकडून तुम्ही दोषी ठरवले जाता.
”कारण, ज्याने दया दाखवली नाही त्याचा न्याय दयेवाचून होईल व दया न्यायावर विजय मिळवते.
”जर कोणी भाऊ उघडा असेल किंवा कोणी बहीण उघडी असेल आणि रोजच्या अन्नाच्या अडचणीत असेल, आणि तुमच्यातील कोणी त्यांना म्हणेल की, “शांतीने जा, ऊब घ्या आणि तृप्त व्हा,” पण शरीरासाठी लागणार्या गोष्टी जर तुम्ही त्यांना पुरवीत नाही, तर काय लाभ? म्हणून कृतींशिवाय विश्वास निर्जीव आहे.
”त्याचप्रमाणे जीभ एक लहान अवयव आहे आणि मोठ्या गोष्टींची फुशारकी मारते. पहा, लहानशी आग किती मोठे रान पेटवते. आणि जीभ एक आग आहे, एक अनीतीचे भुवन आहे. जीभ ही सर्व अवयवात अशी आहे की, ती सर्व शरीराला अमंगळ करते, सृष्टिक्रमाला आग लावते; आणि नरकाने पेटलेली अशी आहे.
”तुमच्यात ज्ञानी व समंजस कोण आहे? त्याने चांगल्या आचरणातून, ज्ञानीपणाच्या सौम्यतेने, आपल्या स्वतःची कृती दाखवावी. पण तुमच्या मनात कडवट ईर्ष्या आणि स्वार्थीपणा असेल तर सत्याविरुद्ध अभिमान मिरवून खोटे बोलू नका.
”कारण ईर्ष्या आणि स्वार्थीपणा जेथे आहेत तेथे अव्यवस्था व प्रत्येक वाईट गोष्ट असते. पण जे ज्ञानीपण वरून येते ते प्रथम शुद्ध, त्याशिवाय शांतीशील, सहनशील आणि विचारशील असते. ते दयेने व चांगल्या फळांनी भरलेले असते; ते निःपक्षपाती व निर्दोष असते. आणि शांती करणार्यांसाठी नीतिमत्त्वरूपी फळ देणारे बी शांतीत पेरले जाते.
”तुमच्यामध्ये लढाया व भांडणे कोठून येतात? तुमच्या अवयवात ज्या वाईट वासना लढाई करतात त्यातून की नाही काय? तुम्ही लोभ धरता पण तुम्हास मिळत नाही; तुम्ही घात व हेवा करता, पण तुम्हास मिळवता येत नाही. तुम्ही भांडता व लढाई करता तरी तुम्हास मिळत नाही, कारण तुम्ही मागत नाही. तुम्ही मागता आणि तुम्हास मिळत नाही; कारण तुम्ही वाईट वासना बाळगून मागता, म्हणजे आपण आपल्या चैनीसाठी खर्चावे म्हणून मागता.
”पण तो अधिक कृपा करतो, म्हणून शास्त्रलेख असे म्हणतो की, “देव गर्विष्ठांना विरोध करतो, पण लीनांवर कृपा करतो.” म्हणून देवाच्या अधीन रहा; आणि सैतानाला आडवा, म्हणजे तो तुमच्यापासून दूर पळून जाईल. तुम्ही देवाच्या जवळ या म्हणजे तो तुमच्याजवळ येईल. अहो पाप्यांनो, तुम्ही हात शुद्ध करा; अहो द्विमनाच्या मनुष्यांनो, अंतःकरणे शुद्ध करा. दुःखी व्हा, शोक करा आणि रडा; तुमच्या हसण्याचा शोक होवो; तुमच्या आनंदाची खिन्नता होवो. परमेश्वरासमोर नम्र व्हा, म्हणजे तो तुम्हास उच्च करील. बंधूंनो, एकमेकांविषयी वाईट बोलू नका. जो बंधूविषयी वाईट बोलतो व आपल्या बंधूला दोष लावतो तो नियमशास्त्राविषयी वाईट बोलतो आणि नियमशास्त्राला दोष लावतो. पण तू जर नियमशास्त्राला दोष लावलास तर तू नियम पाळणारा नाहीस पण न्यायाधीश आहेस.
”म्हणून चांगले करणे कळत असून, जो ते करीत नाही त्यास ते पाप आहे.
”तुम्हीसुद्धा धीराने वाट पाहिली पाहिजे. तुमचे अंतःकरण बळकट करा कारण प्रभूचे दुसरे आगमन जवळ आले आहे. बंधूंनो, एकमेकांविरुद्ध कुरकुर करण्याचे थांबवा, यासाठी की तुम्ही दोषी ठरू नये. पहा, न्यायाधीश दाराजवळ आत येण्यासाठी तयारीत उभा आहे. बंधूंनो, जे संदेष्टे प्रभूच्या नावाने बोलले त्यांचे दुःख सहन व धीराविषयी उदाहरण घ्या.
”म्हणून एकमेकांकडे आपल्या पापांची कबुली द्या आणि एकमेकांसाठी प्रार्थना करा. यासाठी की, तुम्ही बरे व्हावे. नीतिमान मनुष्याची प्रार्थना सामर्थ्ययुक्त व परिणामकारक असते.
”तुम्ही जर आत्म्याच्याद्वारे, सत्याचे आज्ञापालन करून, निष्कपट बंधुप्रेमासाठी आपले जीव शुद्ध केले आहे, तर तुम्ही आस्थेने एकमेकांवर मनापासून प्रीती करा.
”म्हणून तुम्ही सर्व दुष्टपणा, सर्व कपट, ढोंग, हेवा व सर्व दुर्भाषणे दूर ठेवून, परमेश्वर कृपाळू आहे, असा तुम्ही अनुभव घेतला आहे तर तुम्ही त्याद्वारे तारणासाठी तुमची वाढ व्हावी म्हणून नूतन जन्मलेल्या बालकांसारखे आध्यात्मिक निऱ्या दुधाची इच्छा धरा.
”सर्वांना मान द्या; बंधुवर्गावर प्रीती करा; देवाचे भय धरा; राजाला मान द्या. घरच्या नोकरांनो, तुम्ही पूर्ण आदराने आपल्या स्वामीच्या आज्ञेत रहा. जे चांगले आणि सहनशील असतील त्यांनाच नव्हे, पण कठोर असतील त्यांनादेखील आज्ञेत रहा
”कारण ह्यासाठीच तुम्हास पाचारण करण्यात आले आहे; कारण ख्रिस्तानेही तुमच्यासाठी दुःख सोसले आहे; आणि तुम्ही त्याच्या पावलांवरून मागोमाग जावे म्हणून त्याने तुमच्यासाठी कित्ता ठेवला आहे. त्याने पाप केले नाही व त्याच्या मुखात काही कपट आढळले नाही. त्याची हेटाळणी होत असता त्याने फिरून हेटाळले नाही, आणि सोशीत असता त्याने धमकावले नाही; पण देव जो नीतीने न्याय करतो त्याच्या हातात त्याने स्वतःस सोपवले.
”शेवटी सर्वजण एकमनाचे व्हा आणि एकभावाचे होऊन बंधुप्रेम बाळगणारे, कनवाळू व प्रेमळ मनाचे व्हा. तर वाईटाबद्दल वाईट आणि निंदेबद्दल निंदा, अशी परतफेड करू नका, पण आशीर्वाद द्या कारण ह्यासाठीच तुम्हास पाचारण करण्यात आले आहे; म्हणजे तुम्हास आशीर्वाद हे वतन मिळावे.
”आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट ही की आपल्यात वाढती प्रीती ठेवा, कारण प्रीतीने पापांची रास झाकली जाते. काही कुरकुर न करता तुम्ही सर्वजण एकमेकांचा पाहुणचार करणारे व्हा. तुम्ही देवाच्या बहुविध कृपेचे चांगले कारभारी या नात्याने, प्रत्येकास मिळालेल्या कृपादानाने एकमेकांची सेवा करा.
”तसेच तरुणांनो, तुम्ही वडिलांच्या अधीन रहा आणि तसेच तुम्ही सगळे जण एकमेकांची सेवा करण्यास नम्रतारूप वस्त्र घेऊन कमरेस गुंडाळा; कारण देव गर्विष्ठांना विरोध करतो पण लीनांना कृपा पुरवतो. म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा ह्यासाठी की त्याने तुम्हास योग्यवेळी उंच करावे. तुम्ही आपली सर्व चिंता त्याच्यावर टाका, कारण तो तुमची काळजी करतो.
”प्रीतीच्या अभिवादनाने एकमेकांना सलाम द्या. ख्रिस्तामधील तुम्हा सर्वांना शांती असो.
”ह्याच्या कारणास्तव तुम्ही होईल तितका प्रयत्न करून आपल्या विश्वासात सात्विकतेची, सात्विकतेत ज्ञानाची ज्ञानात इंद्रियदमनाची, इंद्रियदमनात सहनशीलता आणि सहनशीलतेला सुभक्ती, आणि सुभक्तीत बंधुप्रीतीची व बंधुप्रीती मध्ये प्रीतीची भर जोडा.
”पण जर कोणी त्याच्या वचनाप्रमाणे चालतो, तर त्यांच्यामध्ये देवाची प्रीती पूर्णत्वास गेली आहे. ह्यावरून आपल्याला कळून येते की, आपण त्याच्याठायी आहोत.
”मी प्रकाशात आहे असे म्हणून जो आपल्या भावांचा व्देष करतो तो अजून अंधारांतच आहे. जो आपल्या भावावर प्रेम करतो तो प्रकाशात राहतो आणि त्याच्यामध्ये अडखळण्याचे कारण नसते. पण जो आपल्या भावाचा व्देष करतो तो अंधारात आहे. तो अंधारात जगत आहे व तो कोठे जात आहे हे त्यास कळत नाही कारण अंधाराने त्याचे डोळे आंधळे केलेले आहेत.
”जगावर किंवा जगातील गोष्टींवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करीत असेल तर त्याच्याठायी पित्याची प्रीती नाही.
”आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले ह्यात देव पित्याने आपल्याला केवढे प्रीतीदान दिले आहे पाहा आणि आपण तसे आहोत ह्यामुळे जग आपल्याला ओळखीत नाही कारण त्यांनी त्यास ओळखले नाही.
”आपण एकमेकांवर प्रीती करावी, हा संदेश आपण आरंभापासून ऐकला तो हाच आहे.
”आपल्याला माहीत आहे की, आपण मरणातून जीवनात गेलो आहोत कारण आपण आपल्या बंधूवर प्रीती करतो. जो प्रीती करत नाही तो मरणात राहतो. जो कोणी आपल्या भावाचा व्देष करतो, तो खुनी आहे आणि तुम्हास माहीत आहे की, खुनी मनुष्याच्या ठायी सार्वकालिक जीवन राहत नाही. ख्रिस्ताने आपल्यासाठी स्वतःचा जीव दिला. यामुळे प्रीती काय आहे ते आपल्याला समजते. म्हणून आपणदेखील आपल्या भावासाठी जीव दिला पाहिजे. जर कोणाजवळ जगिक संपत्ती आहे आणि त्याचा भाऊ गरजवंत आहे हे पाहूनही त्याच्यावर दया करीत नाही तर त्याच्यामध्ये देवाची प्रीती राहते कसे म्हणू शकतो? प्रिय मुलांनो, आपण शब्दाने किंवा जीभेने नव्हे, तर कृतीने व खरेपणाने प्रीती करावी.
”तो आम्हास अशी आज्ञा आहे की, त्याचा पुत्र येशू ख्रिस्त ह्याच्या नावावर आम्ही विश्वास ठेवावा आणि त्याने आपल्याला आज्ञा दिल्याप्रमाणे एकमेकांवर प्रीती करावी.
”प्रियांनो, आपण एकमेकांवर प्रीती करावी कारण प्रीती देवाकडून आहे आणि जो कोणी प्रीती करतो तो प्रत्येकजण देवापासून जन्मला आहे आणि देवाला ओळखतो. जो प्रीती करीत नाही, तो देवाला ओळखत नाही कारण देव प्रीती आहे. देवाने आपला एकुलता एक पुत्र या जगात पाठविला यासाठी की त्याच्याद्वारे आम्हास जीवन मिळावे. अशाप्रकारे त्याने त्याची आम्हावरील प्रीती दाखवली आहे. आम्ही देवावर प्रीती केली असे नाही तर त्याने आम्हावर प्रीती केली व आपल्या एकुलत्या एका पुत्राला आमच्या पापांकरिता प्रायश्चित्त म्हणून पाठवले; यातच खरी प्रीती आहे. प्रियांनो, जर देवाने आमच्यावर अशाप्रकारे प्रीती केली तर आम्ही एकमेकांवर प्रीती केलीच पाहिजे. देवाला कोणी कधीही पाहिले नाही पण जर आपण एकमेकांवर प्रीती केली तर देव आपल्यामध्ये राहतो व त्याची प्रीती आपल्यात पूर्ण होते.
”आणि म्हणून आम्ही ओळखतो आणि त्या प्रीतीवर आम्ही विश्वास ठेवतो की, जी देवाने आमच्यावर केली. देव प्रीती आहे आणि जो प्रीतीत राहतो तो देवामध्ये राहतो आणि देव त्यामध्ये राहतो. ह्यात आपल्यामध्ये प्रीती पूर्ण केलेली आहे यासाठी की, न्याय ठरण्याच्या दिवशी आम्हास धैर्य असावे, कारण जसा तो आहे तसेच आपणही या जगात आहोत. प्रीतीच्या ठायी भिती नसते. इतकेच नव्हे तर पूर्ण प्रीती भीती घालवून देते. भीतीमध्ये शासन आहे आणि भीती बाळगणारा प्रीतीमध्ये पूर्ण झालेला नाही. पहिल्याने त्याने आपणावर प्रीती केली, म्हणून आपण प्रीती करतो. “मी देवावर प्रीती करतो,” असे म्हणून जर कोणी आपल्या बंधूचा व्देष करील, तर तो लबाड आहे कारण डोळ्यांपुढे असलेल्या आपल्या बंधूवर जो प्रीती करीत नाही तर त्यास न पाहिलेल्या देवावर प्रीती करता येणे शक्य नाही. जो देवावर प्रीती करतो त्याने आपल्या बंधूवरही प्रीती करावी, ही ख्रिस्ताची आपल्याला आज्ञा आहे.
”येशू हा ख्रिस्त आहे, असा जो कोणी विश्वास धरतो तो देवापासून जन्मलेला आहे आणि जो कोणी जन्म देणाऱ्यावर प्रीती करतो. तो त्याच्यापासून जन्मलेल्यावरही प्रीती करतो. देवावर प्रीती करण्याने व त्याच्या आज्ञा पाळण्याने आम्ही ओळखतो की आम्ही देवाच्या मुलांवर प्रीती करतो. देवावर प्रीती करणे म्हणजे त्याच्या आज्ञापालन करणे आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीत.
”देवपित्यापासून आणि त्याचा पुत्र प्रभू येशू ख्रिस्त याजपासून कृपा, दया व शांती ही सत्यात व प्रीतीत आपणाबरोबर राहोत.
”आणि स्त्रिये, मी तुला आता, विनंती करतो की, आपण एकमेकांवर प्रीती करावी. ही मी तुला नवी आज्ञा करतो असे नाही, तर जी प्रारंभापासून देण्यात आली आहे तीच लिहितो. आणि त्याच्या आज्ञेत चालणे म्हणजेच प्रीती करणे होय. हीच आज्ञा आहे जी तुम्ही प्रारंभापासून ऐकले आहे तसे तुम्ही तिच्याप्रमाणे चालावे.
”तुम्ही सर्वकाळच्या जीवनासाठी आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या दयेची प्रतीक्षा करीत स्वतःला देवाच्या प्रीतीत राखा. जे संशय धरतात त्यांच्यावर तुम्ही दया करा; आणि काहींना अग्नीतून ओढून काढून वाचवा. काही जणांवर तुम्ही भीत भीत दया करा; पण हे करताना देहामुळे डागाळलेल्या वस्त्रांचाही द्वेष करा.
”आणि येशू ख्रिस्त ‘विश्वासू साक्षी’ जो ‘मरण पावलेल्यांमधून प्रथम जन्मलेला’ आणि ‘पृथ्वीवरील राजांचा तो अधिपती’ आहे आणि ज्या येशूने आमच्यावर प्रीती केली आणि ज्याने आपल्या रक्ताने आमच्या ‘पापांतून आम्हास मुक्त केले;’
”तरीही तुझ्याविरुद्ध माझे म्हणणे आहे तू आपली पहिली प्रीती सोडली आहेस.
”मला तुमची कामे तुमची प्रीती आणि विश्वास, तुमची सेवा आणि सहनशीलता माहीत आहे आणि तुझी शेवटली कामे पहिल्यापेक्षा अधिक आहेत हे माहीत आहे.
”ज्यांच्यावर मी प्रेम करतो, त्यांना शिकवण देतो व त्यांनी कसे रहावे याची शिस्त लावतो, म्हणून झटून प्रयत्न करा आणि पश्चात्ताप करा.
”ते आणखी भुकेले आणि आणखी तान्हेले होणार नाहीत, त्यास सूर्य किंवा कोणतीही उष्णता बाधणार नाही. कारण राजासनाच्या मध्यभागी असलेला कोकरा स्वतः त्यांचा मेंढपाळ होईल, आणि तो त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झऱ्यांजवळ नेईल; आणि देव स्वतः त्यांच्या डोळ्यातील ‘सर्व अश्रू पुसून टाकील.’
”आणि मी ती ‘पवित्र नगरी, नवे यरुशलेम,’ देवाकडून स्वर्गातून खाली येत असलेली बघितली. ती वरासाठी साज चढवून ‘सजविलेल्या वधूप्रमाणे’ दिसत होती;
”‘तो त्यांच्या डोळ्यांतले सर्व अश्रू पुसेल;’ आणि ह्यापुढे मरण राहणार नाही; ‘दुःख, आक्रोश,’ किंवा क्लेशही होणार नाहीत; कारण ‘पहिल्या गोष्टी’ होऊन गेल्या आहेत.” ‘तेव्हा राजासनावर बसलेला’ म्हणालाः पाहा, मी सर्वकाही नवीन करतो आणि तो मला म्हणाला, लिही; कारण ही वचने विश्वसनीय आणि खरी आहेत. आणि तो मला म्हणालाः “या गोष्टी झाल्या आहेत. मी अल्फा आणि ओमेगा, आरंभ आणि शेवट आहे. जो ‘तान्हेला असेल त्यास मी जीवनाच्या’ झर्याचे ‘पाणी फुकट’ देईन. जो विजय मिळवतो तो या सर्व गोष्टी वारशाने मिळवील; ‘मी त्यांचा देव होईन आणि तो माझा पुत्र होईल.’
”