12 – लैंगिक अनैतिकता

हे सर्वशक्तिमान देवाचे पवित्र शब्द आहेत.
माणसांच्या बोलण्यात आपल्याला रस नसतो.
देवावर प्रेम करणार् या प्रत्येकासाठी... याबद्दल देव असे म्हणतो: लैंगिक अनैतिकता.

शीर्ष 3 सर्वात महत्वाचे श्लोक

मी तर तुम्हास सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामवासनेने पाहतो त्याने आपल्या अंतःकरणात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे;

जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी देहाच्या भावना व वासनांसहित देहस्वभावाला वधस्तंभावर खिळले आहे.

मी तुम्हास सांगतो, जो मनुष्य आपली पत्नी सोडून देतो आणि दुसरीशी लग्न करतो तो व्यभिचार करतो. आपल्या पत्नीला सूटपत्र देण्याचे एकच कारण आहे, ते म्हणजे पहिल्या पत्नीने परपुरुषांशी व्यभिचार करणे होय.”

कॅनोनिकल क्रमातील प्रत्येक श्लोक - 177 परिच्छेद

म्हणून मनुष्य आपल्या आईबापांस सोडून आपल्या बायकोला जडून राहील आणि ते दोघे एक देह होतील.

मग परमेश्वर म्हणाला, “सदोम व गमोरा येथील लोक फार दुष्ट आहेत असे मी पुष्कळ वेळा ऐकले आहे. म्हणून मी स्वत: प्रत्यक्ष जाऊन परिस्थीती पाहीन व मग त्यांची दुष्ट करणी ऐकल्याप्रमाणे खरोखर आहे की काय हे मला नक्की समजेल.” मग ते पुरुष सदोमाकडे वळून चालू लागले, परंतु अब्राहाम परमेश्वरा पुढे तसाच उभा राहिला. मग अब्राहामाने परमेश्वराजवळ जाऊन विचारले, “परमेश्वर तू दुष्ट लोकांचा नाश करताना चांगल्या लोकांचाही नाश करणार काय? आणि जर कदाचित त्या नगरात पन्नास लोक चांगले व नीतिमान असतील तर? तरी ही त्या नगराचा तू नाश करणार काय? तू खात्री ने नगरात राहाणाऱ्या पन्नास नीतिमान लोकांसाठी नगराचा बचाव करशील. तू नक्की नगराचा नाश करणार नाहीस; दुष्ट लोकांना मारण्यासाठी तू पन्नास नीतिमान लोकंना मारणार नाहीस; आणि जर तसे झाले तर मग चांगले व वाईट अशा लोकांची गत सारखीच होणार; त्या दोन्ही प्रकारच्या लोकांना शिक्षा होणार; तू सर्व पृथ्वीचा न्यायाधीश आहेस, तू योग्य तेच करशील हे मला माहीत आहे.” नंतर परमेश्वर बोलला, “या सदोम शहरात मला पन्नास चांगले लोक आढळले तर त्यांच्यासाठी मी संपूर्ण शहराची गय करीन, व सर्व शहर वाचवीन.” मग अब्राहाम म्हणाला, “हे प्रभु, तुझ्या तुलनेने मी केवळ धूळ व राख आहे, तरी तुला एक प्रश्न विचारु दे; समजा कदाचित् जर पाच लोक कमी असतील म्हणजे फक्त पंचेचाळीसच चांगले लोक असतील तर? त्या पाच कमी असलेल्या लोकांकरिता तू सर्व नगराचा नाश करशील काय?”परमेश्वर म्हणाला, “मला पंचेचाळीस लोक चांगले आढळले तर मी नगराचा नाश करणार नाही.” पुन्हा अब्राहाम परमेश्वराला म्हणाला, “आणि जर तेथे तुला चाळीसच चांगले लोक आढळले तर? संपूर्ण शहराचा तू नाश करशील काय?”परमेश्वर म्हणाला, “जर मला चाळीसच लोक चांगले आढळले तर मी शहराचा नाश करणार नाही.” मग अब्राहाम म्हणाला, “प्रभु, कृपा करुन माझ्या बोलण्याचा तुला राग न यावा; मला आणखी विचारण्याची परवानगी असावी; तेथे फक्त तीसच लोक चांगले असतील तर? तू त्या नगराचा नाश करशील काय?”परमेश्वर म्हणाला, “जर तीस चांगले लोक असतील तर मी तसे करणार नाही.” मग अब्राहाम म्हणाला, “प्रभु, थोडा त्रास देऊन पुन्हा विचारु का? समजा तेथे कदचित् वीसच लोक चांगले असतील तर?परमेश्वराने उत्तर दिले, “जर तेथे वीसच लोक चांगले असतील तर त्या वीसा करिता मी नगराचा नाश करणार नाही.” अब्राहाम म्हणाला, “प्रभु, कृपा करुन माझ्यावर रागावू नकोस, परंतु शेवटी एकदाच थोडा त्रासदायक प्रश्न विचारण्यास परवानगी असावी, कदाचित् तुला तेथे दहाच लोक चांगले आढळले तर तू काय करशील?”परमेश्वर म्हणाला, “जर मला नगरात दहाच लोक चांगले आढळले तर त्या दहाकरिता मी नगराचा नाश करणार नाहीं.”

त्या दिवशी संध्याकाळी ते दोन देवदूत सदोम नगरात आले. नगराच्या वेशी जवळ बसलेल्या लोटाने त्यांस पाहिले; लोट उठून त्यांस सामोरा गेला आणि त्याने त्यांस आदराने लवून नमल केले. लोट त्यांस म्हणाला, “माझे स्वामी महाराज, कृपया माझ्या घरी या; मला आपली सेवा करु द्या; तेथे तुम्ही आपले पाय धुवा, आजची रात्र रहा; मग उद्या तुमच्या पुढील प्रवासास निघा.”त्या देवदूतांनी उत्तर दिले, “नाही नाही, आम्ही रात्री वेशीजवळील चौकात मुक्काम करु.” परंतु लोट त्यांना पुन्हा पुन्हा विनंती करीतच राहिला; तेव्हा देवदूतांनी त्याची विनंती मान्य केली व ते त्याच्या घरी मुक्कामास गेले. लोट याने त्यास पिण्यास पाणी दिले, त्याने त्यांच्यासाठी भाकरी केल्या व ते जेवले. त्या रात्री झोपण्याच्या वेळेपूर्वी त्या नगराच्या सर्व भागातून पुरुष तरुण आणि वृध्द असे सर्वच पुरुष लोटाच्या घरी आले; त्या सदोमकर पुरुषांनी लोटाच्या घराला गरडा घातला व त्यांनी लोटाला हाक मारत म्हटले. “आज रात्री तुझ्या घरी आलेले ते दोन पुरुष (देवदूत) कोठे आहेत? त्यांना आमच्याकडे बाहेर आण; म्हणजे आम्ही त्यांच्याशी समागम करु.” लोट घरातून बाहेर आला व त्याने आपल्यामागे घराचे दार बंद केले. लोट त्या सदोमकर लोकांना म्हणाला, “नाही, नाही, माझ्या बंधूनो! मी तुम्हाला हात जोडून विनंती करतो की तुम्ही असे भयंकर वाईट काम करु नका. पाहा, माझ्या दोन मुली आहेत; त्यांचा अद्याप कोणाही पुरुषाशी संबंध आला नाही; त्या शुद्ध कुमारी आहेत; मी त्यांना तुमच्या स्वाधीन करतो. तुमच्या मर्जीस येईल तसे तुम्ही त्यांच्याशी वागा; परंतु ह्या पुरुषांना (देवदूतांना) काहीही करु नका; ते माझ्या घरी पाहुणे म्हणून आले आहेत आणि त्यांचे रक्षण करणे माझे प्रथम कर्तव्य आहे.” तेव्हा सभोंवतालचे घेरा टाकलेले लोक म्हणाले, “चल हो बाजूला.” नंतर ते आपापसात म्हणू लागले, “हा लोट आमच्या नगरात पाहुणा म्हणून आला आणि आता आम्ही काय करावे हे हा उपरा आम्हाला शिकवू पाहतो काय?” मग ते लोक लोटाला म्हणाले, “अरे, आम्ही त्या पाहुण्यांशी जेवढे दुष्टपणे वागूं त्यापेक्षा अधिक दुष्टतेने व वाईट रीतीने तुझ्याशी वागू, समजलास!” तेव्हा ते लोक लोटाच्या अधिक जवळ जवळ येऊ लागले व घराचा दरवाजा तोडण्यास ते पुढे सरसावले. परंतु लोटाच्या घरातील त्या दोन पाहुण्यांनी दार उघडले व लोटाला मागे ओढून घरात घेतले, आणि दार बंद केले. त्या दोन पुरुषांनी दारा बाहेरील लोकांस आंधळे केले; म्हणून घरात घुसण्याचा प्रयत्न करणारे ते सर्व तरुण व म्हातारे आंधळे झाले, त्यामुळे अखेर पर्यंत त्यांना घराचे दार सापडलेच नाहीं.

ते दोन पुरुष लोटाला म्हणाले, “तुझ्या कुटुंबातील व नात्यातील इतर कोणी लोक म्हणजे तुझे जांवई, मुलगे, मुली किवां इतर नातेवाईक या नगरात आहेत काय? तसे कोणी असतील तर त्यांना आता ताबडतोब हे शहर सोडून बाहेर पडण्यास सांग; कारण आम्ही या नगराचा नाश करणार आहोत. हे नगर किती वाईट आहे ते परमेश्वराने ऐकले आहे आणि म्हणून त्याने आम्हाला या नगराचा नाश करण्यासाठी पाठवले आहे.” म्हणून मग लोट बाहेर गेला व आपल्या जावयांस भेटला. तो त्यांना म्हणाला, “चला उठा, त्वरा करा, व हे शहर सोडून लवकर बाहेर पडा; कारण परमेश्वर या नगराचा नाश करणार आहे.” परंतु लोट गंमत करीत आहे असे त्याच्या जावयांस वाटले. दुसऱ्या दिवशी पहाटे ते दूत लोटाला घाईकरुन म्हणालें, “उठ, ह्या नगराला ताडण होणार आहे; तेव्हा तू तुझी बायको व तुझ्या जवळ असलेल्या तुझ्या दोन मुली यांस घेऊन ताबडतोब येथून नीघ; म्हणजे मग या नगराबरोबर तुमचा नाश होणार नाही, तर तुम्ही आपले जीव वाचवाल.” परंतु लोट एकदम गोंधळून गेला व दिरंगाई करु लागला; तेव्हा त्या दोन पुरुषांनी (देवदूतांनी) लोट, त्याची बायको आणि त्याच्या दोन मुली यांचे हात धरुन त्यांस सुरक्षितपणे नगराबाहेर नेले. परमेश्वराने अशा रीतीने लोट व त्याच्या कुटुंबियावर दया केली. नगराबाहेर आल्यावर त्या देवदूतापैकी एक जण म्हणाला, “आता पळा व तुमचे जीव वांचवा, नगराकडे मागे वळून पाहू नका आणि या खोऱ्यात कोणत्याही ठिकाणी थांबू नका; पर्वतावर जाईपर्यंत पळत राहा जर का मधे कोठे थांबला, तर नगराबरोबर तुमचाही नाश होईल.”

आणि परमेश्वराने सदोम व गमोरा या नगरांचा नाश करायला सुरुवात केली; त्याने आकाशातून त्या नगरावर गंधक व अग्नी यांचा वर्षाव केला;

लोट व त्याचे कुटुंबीय नगरातून पळून जात असताना लोटाच्या बायकोने मागे वळून जळणाऱ्या नगराकडे पाहिले तेव्हा तत्काळ ती मिठाचा खांब झाली.

परंतु रात्री देव अबीमलेखाच्या स्वप्नात येऊन म्हणाला, “तू आता नक्की मरशील कारण तू आणलेली स्त्री विवाहित आहे.”

तेव्हा त्या देशाचा राजा हमोर याचा मुलगा शखेम याने दीनाला पाहिले आणि तो तिला बळजबरीने घेऊन गेला व तिच्या बरोबर निजून त्याने तिला भ्रष्ट केले.

नगरात जे काही घडले त्या विषयीची बातमी याकोबाच्या मुलांनी शेतात ऐकली तेव्हा त्यांचा राग भयंकर भडकला, इतका की ते रागाने वेडे झाले, कारण याकोबाच्या मुलीशी केलेल्या वाईट कर्मामुळे शखेमाने इस्त्राएलाची अब्रू घेतली होती; म्हणून मग ते सगळे भाऊ शेतातून घरी आले.

दीनाच्या त्या दोन भावांनी शिमोन आणि लेवी यांनी हमोर व त्याचा मुलगा शखेम यांनाही ठार मारले. नंतर दीनाला शखेमाच्या घरातून बाहेर काढून ते तिला घेऊन तेथून निघाले. नंतर याकोबाची सर्व मुले नगरात गेली आणि त्यांनी तेथील सर्व चीज वस्तू लुटल्या, कारण त्यांच्या बहिणीला शखेमाने भ्रष्ट केल्याने त्यांच्या रागाचा पारा अद्याप खूपच चढलेला होता.

परंतु ते भाऊ म्हणाले, “आम्ही त्या लोकांना आमच्या बहिणीशी एखाद्या वेश्येप्रमाणे वागू द्यावे काय? नाही, कदापि नाही! त्या लोकांनी आमच्या बहिणीशी असे वागणे चुकीचे व अनीतीचे होते!”

यहूदा रस्त्याने चालला होता. त्याने तिला पाहिले परंतु ती एक वेश्या असावी असे त्याला वाटले; (कारण वेश्या जसे आपले तोंड झाकतात तसे तिने आपले तोंड बुरख्याने झाकले होते.) तेव्हा यहूदा तिच्या जवळ जाऊन म्हणाला, “मला तुझ्यापाशी निजू दे.” (ती तामार आहे, म्हणजे आपली सून आहे हे यहूदाला माहीत नव्हते.)ती म्हणाली, “तुम्ही मला त्याबद्दल काय मोबदला द्याल?” यहूदा म्हणाला, “मी तुला माझ्या कळपातून एक चांगला तरणाबांड बकरा पाठवून देईन.”ती म्हणाली, “ठीक आहे, मी मान्य करिते, परंतु तो पाठवून देई पर्यंत प्रथम माझ्याजवळ काय हडप ठेवाल?” यहूदा म्हणाला, “मी तुला बकरा पाठवून देईन त्यासाठी पुरावा म्हणून तुझ्यापाशी मी काय हडप ठेवावे अशी तुझी इच्छा आहे?”तामार म्हणाली, “तुम्ही कागदपत्रे, करार वगैरेवर उमटवयासाठी व सीलबंद करण्यासाठी जो शिक्का व जी दोरी वापरता ती मला द्या.” तेव्हा यहूदाने त्या वस्तू तिला दिल्या. मग तो तिजपाशी जाऊन निजला. आणि त्यामुळे ती गरोदर राहिली. मग घरी गेल्यावर तामारने आपले तोंड झाकण्याचा बुरखा काढून टाकला आणि पुन्हा पहिल्या सारखी विधवेची वस्त्रे घातली. आपण कबूल केल्याप्रमाणे त्या वेश्येला बकरा देण्यासाठी यहुदाने आपला मित्र हीरा याला एनाईम गांवाला त्या वेश्येकडे पाठवले. त्याचप्रमाणे आपण तिला दिलेल्या, शिक्का, दोरी व काही वस्तू तिजकडून घेऊन येण्यास सांगितले, परंतु हीराला ती वेश्या सांपडली नाही. त्याने एनाईम गांवातील काही लोकांना विचारले, “येथे ह्या रस्त्याच्या बाजूला होती ती वेश्या कोठे आहे?”तेव्हा लोकांनी उत्तर दिले, “येथे कधीच कोणीही वेश्या नव्हती.” तेव्हा यहूदाचा मित्र त्याच्याकडे परत गेला व म्हणाला, “ती वेश्या मला काही सांपडली नाही, तेथे राहाणारे लोक म्हणाले की तेथे कोणीही वेश्या कधीच नव्हती.” तेव्हा यहूदा म्हणाला, “जाऊ दे, त्या वस्तू तिला ठेवून घेऊ दे. अधिक चौकशी केल्यास लोकांकडून आपलीच नालस्ती होईल आणि लोकांकडून आपले हंसे व्हावे अशी माझी इच्छा नाही. मी कबूल केल्याप्रमाणे तिला बकरा देण्याचा प्रयत्न केला, परंतु ती आपणांस सापडली नाही. झाले एवढे पुरे आहे.” या नंतर जवळ तीन महिन्यांनी कोणीतरी यहूदाला सांगितले, “तुझ्या सुनेने वेश्येप्रमाणे पापकर्म केले आणि त्या जारकर्मामुळे ती आता गरोदर राहिली आहे.”तेव्हा मग यहूदा रागाने म्हणाला, “तिला खेचून बाहेर काढा व जाळून टाका.” त्याप्रमाणे काही लोक तामारला ठार मारण्याकरिता तिजकडे गेले, परंतु तिने आपल्या सासऱ्यासाठी एक निरोप पाठवला. तामार म्हणाली, “मला गर्भवती करणारा पुरुष ह्या वस्तूंचा मालक आहे. या वस्तूंकडे नीट पाहा; कोणाच्या आहेत या वस्तू? कोणाची आहे ही मोहोर व ही दोरी? कोणाची आहे ही काठी? सांगा;” यहूदाने त्या वस्तू ओळखल्या आणि तो म्हणाला, “तिचे बोलणे अगदी बरोबर आहे; माझेच चुकले आहे; मी तिला वचन दिल्याप्रमाणे तिचे माझ्या मुलाशी लग्न लावून दिले नाही.” आणि त्यानंतर मात्र त्याने तिच्याशी पुन्हा कधीच शरीर संबंध केला नाही.

काही काळानंतर पोटीफराच्या बायकोला तो आवडू लागला. एके दिवशी ती त्याला म्हणली, “माझ्याबरोबर नीज” परंतु तसे करण्यास योसेफाने तिला नकार दिला. तो म्हणाला, “पाहा, या घराच्या सर्व कारभाराबद्दल माझ्या स्वामीचा माझ्यावर पूर्ण विश्वास आहे आणि तुम्हा खेरीज येथील सर्व गोष्टी त्याने माझ्या ताब्यात देऊन त्यांची सर्व जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे. माझ्या स्वामीने मला या घरात जवळ जवळ त्याच्या समान मोठपणा दिला आहे; असे असताना अशा उदार स्वामीच्या बायकोपाशी निजणे मला योग्य नाही. ते चुकीचे आहे; ते परमेश्वराच्या विरुद्ध घोर पाप आहे!” पोटीफराची बायको दररोज योसफाबरोबर बोलत असे परंतु त्याने तिच्याबरोबर निजण्यास स्पष्ट पणे नकार दिला. एके दिवशी योसेफ आपले काही काम करण्याकरिता आतल्या घरात गेला. तो तेथे अगदी एकटाच होता व घरात दुसरे कोणीही नव्हते. अशावेळी त्याच्या स्वामीच्या बायकोने त्याचे वस्त्र धरुन त्याला म्हटले “तू माझ्यापाशी नीज.” परंतु योसेफ ते वस्त्र तिच्या हातात सोडून आतल्या घरातून बाहेर पळून गेला.

तेव्हा योसेफ आपले वस्त्र आपल्या हाती सोडून पळून गेला हे तिने पाहिले. खोटे बोलून या घटनेचा अर्थ उलट करायचा असे तिने ठरवले. आणि तिने आरडा ओरडा करुन बाहेरील माणसांना बोलावले. ती म्हणाली, “पाहा, हा इब्री तरुण गुलाम आमच्या घरच्या माणसांची अब्रू घेण्यासाठी येथे आणून ठेवला आहे. त्याने आत येऊन माझ्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु मी मोठयाने आरडा ओरडा केला; त्यामुळे घाबरुन हे त्याचे वस्त्र माइयापाशी टाकून तो पळून गेला.” तेव्हा तिने आपला नवरा, योसेफाचा स्वामी घरी येईपर्यंत ते वस्त्र आपल्याजवळ सांभाळून ठेवले. आणि आपला नवरा घरी आल्यावर तिने त्याला तीच गोष्ट सांगितली. ती म्हणाली, “तुम्ही हा जो इब्री तरुण गुलाम घरी आणून ठेवला आहे त्याने माझ्यावर बळजबरी करण्याचा प्रयत्न केला. परंतु तो माझ्याजवळ आल्यावर मी आरडा ओरडा केला म्हणून तो घाबरून आपले वस्त्र टाकून पळून गेला;” आपल्या बायकोचे बोलणे एकल्यावर योसेफाच्या स्वामीचा राग खूप भडकला. राजाच्या शत्रूंना डांबण्यासाठी एक तुरुंग होता. तेव्हा पोटीफराने योसेफाला त्या तुरुंगात टाकले. योसेफ त्या तुरुंगात राहिला.

“व्यभिचार करु नकोस.

“तू आपल्या शेजाऱ्याच्या घराचा लोभ धरु नकोस; त्याच्या बायकोचा लोभ धरु नकोस; त्याचा गुलाम, त्याची स्त्री गुलाम, बैल, गाढव किंवा त्याच्या मालकीचे जे काही असेल त्या कशाचाही लोभ धरु नकोस.”

“कोणालाही पशूबरोबर शारीरिक संबंध ठेवू देऊ नयेत पशुगमन करणाऱ्यास अवश्य जिवे मारावे.

“तुम्ही कधीही आपल्या जवळच्या नातलगाशी शरीरसंबंध करु नये! मी परमेश्वर आहे: “तुम्ही तुमच्या आईवडिलांबरोबर शारीरिक संबंध ठेवू नयेत. ती तुमची आई आहे. म्हणून तिच्याबरोबर शारीरिक संबंध असता कामा नये. तू तुझ्या सावत्र आईशी शारीरिक संबंध ठेवू नको, त्यामुळे तुझ्या बापाचीलाज जाईल. “तू तुझ्या बहिणीशी शारीरिक संबंध ठेवू नको, ती बहीण सख्खी असो किंवा सावत्र असो; ती तुझ्या घरात जन्मलेली असो किंवा तुझ्या घराबाहेर दुसऱ्याच्या घरी जन्मलेली असो,तू तिच्यापाशी जाऊ नको. “तू तुझ्या नातीशी शारीरिक संबंध ठेवू नको, मग ती तुझ्या मुलाची मुलगी असो किंवा मुलीची मुलगी असो; त्यामुळे तुझीच लाज जाईल! “जर तुझ्या बापाच्या बायकोला तुझ्या बापापासून मुलगी झाली असेल तर ती तुझी बहीणच आहे; म्हणून तू तिच्याशी शारीरिक संबंध ठेवू नको. “तुझ्या आत्याशी शारीरिक संबंध ठेवू नको. ती तुझ्या बापाची जवळची नातलग आहे. तुझ्या मावशीशी शारीरिक संबंध ठेवू नको, ती तुझ्या आईची जवळची नातलग आहे. तू तुझ्या चुलत्याची लाज उघडी करु नको, म्हणजे त्याच्या बायकोशी शारीरिक संबंध ठेवू नको; ती तुझी चुलती आहे. “तुझ्या सुनेशी शारीरिक संबंध ठेवू नको, ती तुझ्या मुलाची बायको आहे. “तुझ्या भावजयीशी शारीरिक संबंध ठेवू नको, त्यामुळे तुझ्या भावाची लाज जाईल. “एखाद्या स्त्रीशी व तिच्या मुलीशी म्हणजेच दोघींशी अथवा तिच्या नातीशी मग ती तिच्या मुलाची मुलगी असो किंवा मुलीची मुलगी असो शारीरिक संबंध ठेवू नको. कारण त्या तिच्या जवळच्या नातलग आहेत; असे करणे अति दुष्टपणाचे आहे. “तुझी बायको जिवंत असताना तिच्या बहिणीला बायको करुन तिला सवत करुन घेऊ नको; त्यामुळे त्या एकमेकींच्या शत्रू होतील; तू तिच्या बहिणीशी शारीरिक संबंध ठेवू नको.

“स्त्री ऋ तुमती झाली असताना तिच्यापाशी जाऊ नको; कारण ऋ तुकालात ती अशुद्ध असते. “तू आपल्या शेजाऱ्याच्या बायकोशी शारीरिक संबंध ठेवू नको. त्यामुळे तू अमंगळ होशील! “तू तुझ्या लहान मुलांमुलीपैकी कोणाचाही मौलख दैवतासाठी होम करु नको; असे करशील तर तू आपल्या देवाच्या नांवाचा अवमान करुन त्याच्या नांवाला कलंक लावशील! मी परमेश्वर आहे. “स्त्रीगमनाप्रमाणे पुरुषगमन करु नको! ते भयंकर पाप आहे! “कोणत्याही पशूशी गमन करु नको! त्यामुळे तू मात्र अमंगळ होशील! त्याचप्रमाणे स्त्रीने पशूशी गमन करावयासाठी त्याच्यापाशी जाऊ नये; ते कृत्य निसर्गविरुद्ध आहे!

“तू आपल्या मुलीला वेश्या बनून भ्रष्ट होऊ देऊ नको, त्यामुळे तू तिच्या पावित्र्याचा मान राखीत नाहीस असे दिसेल. तुमच्या देशात वेश्या होऊ देऊ नका त्या प्रकारच्या पापाने तुमचा देश भ्रष्ट होऊ देऊ नका.

“जो माणूस आपल्या शेजाऱ्याच्या बायकोपाशी जातो तो माणूस व ती स्त्री, ती दोघेही व्यभिचाराच्या पापाचे अपराधी आहेत; त्या जाराला व जारिणीला अवश्य जिवे मारावे. जो आपल्या बापाच्या बायकोपाशी जातो तो आपल्या बापाची लाज उघडी करतो! तो माणूस व त्याच्या बापाची बायको त्या दोघांनाही अवश्य जिवे मारावे; त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील. “एखादा पुरुष आपल्या सुनेशी शारीरिक संबंध ठेवेल तर त्या दोघांनाही अवश्य जिवे मारावे; त्यांनी शरीरसंबंधाचे भयंकर पाप केले आहे! त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील. “एखाद्या पुरुषाने स्त्रीगमनाप्रमाणे पुरुषगमन केले तर ते भयंकर पाप त्या दोघांनी केले आहे म्हणून त्या दोघांनाही अवश्य जिवे मारावे; त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्याच्याच माथीं राहील. “कोणा पुरुषाने एखादी स्त्री व तिची मुलगी ह्या दोघींबरोबर विवाह केला तर तो अतिदुष्टपणा होय. त्या पुरुषाला व त्या दोन्ही स्त्रीयांना अग्नीत जाळून टाकावे! तुमच्यामध्ये असे अतिदुष्टपणाचे पाप होऊ देऊ नये! कोणा पुरुषाने पशूगमन केले तर त्याला अवश्य जिवे मारावे आणि त्या पशूलाही मारुन टाकावे. कोणी स्त्री पशूगमन करील तर त्या स्त्रीला व त्या पशूला जिवे मारावे; त्यांना अवश्य मारुन टाकावे; त्यांच्या रक्तपाताची जबाबदारी त्यांच्याच माथी राहील.

“कोणी आपल्या बहिणीला, मग ती त्याच्या बापाची मुलगी असो किंवा त्याच्या आईची मुलगी असो, आपली बायको करुन घेईल व ती दोघे शरीरसंबंध करतील तर ते लाजीरवाणे कर्म आहे! त्या दोघांना आपल्या भाऊबंदादेखत शिक्षा व्हावी! त्यांना आपल्या लोकांतून बाहेर टाकावे. त्याने आपल्या बहिणीबरोबर केलेल्या वाईट कर्माबद्दल शिक्षा भोगावी. “ऋतुमती स्त्रीशी कोणी पुरुषाने शरीर संबंध केला तर तो पुरुष व ती स्त्री ह्या दोघांनाही त्यांच्या लोकांतून बाहेर टाकावे; कारण त्यांने तिच्या रक्ताचा झरा उघडा करुन पाप केले आहे. आपली मावशी किंवा आपली आत्या ह्याच्याशी शारीरिक संबंध ठेवू नयेत व तसे करणाऱ्याच्या हातून मात्रागमनाचे पाप घडेल, त्यांनी आपल्या दुष्कर्माबद्दल शिक्षा भोगावी. “कोणी आपल्या चुलतीशी शारीरिक संबंध ठेवेल तर त्याने आपल्या चुलत्याची लाज उघडी केली असे होईल; ते आपल्या पापाची शिक्षा भोगतील व संतती न होता मरतील. आपल्या भावजयीशी शारीरिक संबंध ठेवणे हे पापी कृत्य आहे; जो कोणी असे करील त्याने आपल्या भावाची लाज उघडी केली असे होईल! त्यांना संततीहोणार नाही.

याजक पवित्रपणे देवाची सेवा करतात म्हणून त्यांनी भ्रष्ट झालेल्या स्त्रीला, वेश्येला, किंवा नवऱ्याने टाकलेल्या स्त्रीला आपली बायको करुन घेऊ नये. याजक पवित्रपणे देवाला अन्नार्पण करतो म्हणून तुम्ही त्याला पवित्र मानावे; कारण तो पवित्र वस्तू देवाकडे घेऊन जातो! तो देवाला पवित्र अन्नार्पण करतो आणि मी पवित्र आहे. “एखाद्या याजकाची मुलगी वेश्याक्रम करील तर ती भ्रष्ट होईल, व आपल्या पावित्र्याचा नाश करुन घेईल; आणि त्यामुळे ती आपल्या बापाच्या पावित्र्याला काळिमा लावील; तिला अग्नीत जाळून टाकावे.

भ्रष्ट झालेली स्त्री, वेश्या किंवा टाकलेली स्त्री अथवा विधवा स्त्री ह्यापैकी कोणाही स्त्रीला त्याने बायको करुन घेऊ नये; तर त्याने आपल्या लोकांतील एखाद्या कुमारिकेशीच लग्न करावे.

“इस्राएल लोकांना असे सांग की एखाद्या माणसाच्या बायकोने त्याचा विश्वासघात केला. म्हणजे तिने दुसऱ्या माणसाशी कुकर्म केले व ही गोष्ट तिने आपल्या नवऱ्यापासून लपवून ठेविली तर कोणी साक्षीदार नसल्यामुळे हे कुकर्म तिच्या नवऱ्याला कधीच कळणार नाही; ती स्वत: तर आपल्या नवऱ्याला ही गोष्ट सांगणारच नाही;

तेव्हा द्वेषासंबंधी हा नियम आहे. एखाद्या स्त्रीने आपल्या नवऱ्याविरुद्ध जर पाप केले तर तू ही अशी कारवाई करावी.

त्यावेळी मोशे आणि इस्राएलची वडीलधारी मंडळी (पुढारी) दर्शन मंडपाच्या प्रवेशद्वाराशी जमले होते. एका इस्राएली माणसाने एक मिद्यानी स्त्री त्यांच्यासमोर आपल्या भाऊंच्या घरी आणली. मोशे आणि इतर वडील धारी (पुढारी) यांनी ते पाहिले आणि ते खूप दु:खी झाले.

“व्यभिचार करु नका.

“दुसऱ्याच्या पत्नीची अभिलाषा बाळगू नका. दुसऱ्याचे घर, शेत, दास दासी, गुरे-गाढवे, कशाचीही हाव बाळगू नका.”

“बायकांनी पुरुषांचा किंवा पुरुषांनी बायकोचा पेहेराव करु नये. तुमचा देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने ते निंद्य आहे.

पण बायकोबद्दल नवऱ्याने केलेला आरोप खराही असू शकतो. तिच्या कौमार्याचा पुरावा तिचे आईवडील दाखवू शकले नाहीत तर गावातील ज्येष्ठ मंडळींनी तिला आपल्या वडिलांच्या घराच्या दारापाशी आणावी आणि गावकऱ्यांनी तिला मरेपर्यंत दगडांनी मारावे. कारण तिने इस्राएलमध्ये ही लाजिरवाणी गोष्ट केली आहे. आपल्या वडलांच्या घरी असतानाचे तिचे वर्तन वेश्येसमान आहे. हा कलंक आपल्यामधून तुम्ही धुवून काढलाच पाहिजे.

“एखाद्या पुरुषाचे दुसऱ्या विवाहित स्त्री बरोबर लैंगिक संबंध असतील तर दोघांनाही मृत्युदंड द्यावा. आणि इस्राएलमधून या दुराचाराचे निमूर्लन करावे.

“एखाद्या कुमारिकेचा वाङनिश्चय झालेला असताना गावातील दुसऱ्या एखाद्या पुरुषाने तिच्याशी लैंगिक संबंध ठेवलेले आढळले तर त्या दोघांना गावाच्या वेशीपाशी भर चौकात आणून दगडांनी मरेपर्यंत मारावे-ती दुसऱ्याची बायको होणार होती. तिच्याशी शरीरसंबधं ठेवल्याबद्दल पुरुषाला आणि गावांत असून मदतीसाठी आरडाओरडा केला नाही म्हणून त्या मुलीला मरेपर्यंत दगडांनी मारावे. अशाप्रकारे आपल्या लोकांमधून हा दुराचार निपटून टाकवा.

“पण अशा वाग्दत्त मुलीला एखाद्याने रानात गाठले आणि तिच्यावर बलात्कार केला तर मात्र फक्त त्या पुरुषाला मारावे. त्या मुलीला काही करु नये. देहान्तशासन व्हावे असे तिने काही एक केले नाही. कोणी आपल्या शेजाऱ्यावर चालून जाऊन त्याचा जीव घ्यावा तसेच हे झाले. त्याला ही मुलगी रानात आढळली. त्याने तिच्यावर हात टाकला. कदाचित् तिने मदतीसाठी हाका मारल्याही असतील पण तिच्या बचावासाठी तिथे कोणी नव्हते. तेव्हा तिला शिक्षा करु नये.

“जिचा वाङनिश्चय झालेला नाही अशी कुमारिका कोणाला आढळली आणि त्याने तिच्यावर बलात्कार केला हे लोकांनी पाहिल्यास त्याने मुलीच्या वडीलांना वीस औंस चांदीद्यावी. आता ती त्याची बायको झाली. कारण त्याने तिच्याशी शरीरसंबंध ठेवल्याचे पाप केले आहे. तो आता तिचा जन्मभर त्याग करु शकत नाही.

“आपल्या वडलांच्या बायकोशी गमन करुन कोणी त्यांच्या तोंडाला काळे फासू नये.”

ज्यांच्या आईवडीलांचा रीतसर विवाह झालेला नाही त्यानेही उपासनेत सहभागी होऊ नये. त्याच्या दहाव्या पिढीपर्यंत ही मनाई आहे.

“इस्राएलच्या स्त्रीपुरुषांपैकी कोणीही देवळातील वेश्या होऊ नये. पुरुष किंवा स्त्रीवेश्येच्या कमाईचा पैसा तुमचा देव परमेश्वर ह्याच्या पवित्र निवासस्थानी, नवस फेडण्याच्या कामासाठी वापरला जाणार नाही याची दक्षात घ्या. कारण तुमचा देव परमेश्वर ह्याच्या दृष्टीने अशा व्यक्ती तिरस्करणीय आहेत.

“लेवींनी म्हणावे ‘वडीलांच्या बायकोशी (सख्ख्या किंवा सावत्र आईशी) शरीरसंबंध ठेवून वडीलांच्या तोंडाला काळे फासणारा शापित असो.’ “तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे.

“लेवींनी म्हणावे ‘पशूशी लैंगिक संबंध ठेवणारा शापित असो.’ “तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे.

“लेवींनी म्हणावे, ‘सख्क्या अथवा सावत्र बहिणीशी लैंगिक संबंध ठेवणारा शापित असो.’ “तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे.

“लेवींनी म्हणावे, ‘सासूशी लैंगिक संबंध ठेवणारा शापित असो.’ “तेव्हा सर्व लोकांनी म्हणावे ‘आमेन.’

यानंतर शाम्शोन गाजांत गेला. तेव्हां तेथें एक वेश्या पाहून तो तिच्याजवळ गेला.

आणि त्या दिवसांत जेव्हां इस्राएलावर कोणी राजा नव्हता, तेव्हां असें झालें कीं कोणी लेवी एफ्राइमच्या डोंगराच्या बाजूजवळं प्रवास करीत होता; आणि त्याने आपल्याला बेथलेहेम यहूद्दांतून उपपत्ती असी स्त्री करून घेतली. नंतर त्याच्या उपपत्तीने त्यावर व्यभिचार केला, आणि ती त्याला सोडून बेथलेहेम यहुद्दांत आपल्या बापाच्या घरीं जाऊन तेथें चार महिने इतके दिवस राहिली.

त्यानी आपलें मन स्वस्थ केलें तेव्हां पाहा, त्या नगरांतल्या माणसानी म्हणजे कोणी दुष्ट लोक, अशा माणसानी घराला वेढून दारावर धक्के दिल्हे, आणि घरधनी तो म्हातारा माणूस याला असें सांगितलें कीं, " जो माणूस तुझ्या घरांत आला आहे, त्याल तूं बाहेर काढ, म्हणजे आम्ही त्याल जणूं" मग तो घरधनी माणूस बाहेर त्यांजवळ बाऊन त्यांस बोलला, "अहो, माझे भाऊ नका, मी मागतों, तुम्ही दुष्टाई करूं नका; हा माणूस माझ्या घरीं आल, तर तुम्ही हे मूर्खपण करूं नका. पाहा, माझी तरुण कन्या व याची उपपत्ती यांस मी बाहेर आणीन; मग तुम्ही त्यांस भंगून तुमच्या दिसण्यांत जे बरें, तें त्यांसीं करा; परंतु या पुरुषाला अशा दुष्टाईचें कृत्य करूं नका." तथापि तीं माणसें त्याचें ऐकायाला मान्य झालीं महींत; तेव्हां त्या माणसाने आपली उपपत्ती घेऊन बाहेर त्यांजवळ आणिली, मग त्यानी तिचा अनुभव घेतां तिजसीं सारी रात्र सकाळपर्यंत कुकर्म केलें; नंतर पाहाट झाली असतां तिला सोडिलें. तेव्हां सकाळच्या वेळेस ती स्त्रीयेऊन जेथे आपला धनी होता, त्या मागसाच्या घराच्या दाराजवळ उजेड होई तोपर्यंत पडून राहिली. तेव्हां सकाळीं तिच्या ज्ञाने उठून घराचीं दारें उघडलीं, आणि आपल्या मार्गाने बायाला तो बाहेर निघाला; तर पाहा, ती स्त्री त्याची उपपत्ती घराच्या दाराजवळ पडलेली आणि तिचे हात उंब्रऱ्यावर होते. तेव्हां त्याने तिला म्हटलें, "उठ, म्हणजे आपण बाऊं." परंतु कोणी उत्तर दिल्हें नाहीं; नंतर तो पुरुष तिला गाढवावर घालून निघाला आणि आपल्या ठिकाणीं गेला. मग आपल्या घरीं पोहचल्यावर त्याने सुरी घेतली, आणि आपली उपपत्ती घेऊन तिला तिच्या हाडांसुद्धां कापली बारा तुकडे केले, मग ती इस्राएलाच्या अवघ्या स्वानांत पाठविली. नंतर असें झलें कीं त्या प्रत्येकाने पहिलें, त्यानी म्हटलें, "मिसर देशांतून इस्राएलाचीं संतानें आलीं, त्या दिवसापासून आजपर्यंत यासारिखें झालें नाहीं, आणि दृष्टीस पडलें नाहीं; यावर तुम्ही आपलें चित्त देवून विचार करा, आणि बोला."

आणि इस्राएलाच्या सर्व वंशांतल्या शंभरांतून दाहा, व हजारांतून शंभर, व आयुतांतून हजार, इतकीं माणसें लोकांसाठी शिधा आणायला घेऊं; म्हणजे त्यानी जाऊन बन्यामीनाच्या गिब्याने इस्राएलांत जें मर्खपण केलें, त्या अवघ्याप्रमाणें त्यासीं करावें." मग इस्राएलांतलीं सर्व माणसें एका माणसासारिखी जोडलेलीं असतां त्या नगराजवळ मिळालीं.

आणि एली फार म्हातारा होत,आणि आपले मुलगे सर्व इस्त्रेलांशीं कसे वागले आमि सभामंडपाच्या दाराजवळ ज्या बाया सेवा करीत त्यांच्यांपाशीं ते कसे निजले,हें सर्व त्यानें ऐकलें.

संध्याकाळी तो आपल्या पलंगावरुन उठला आणि राजमहालाच्या छतावरुन फिरु लागला. तिथून त्याला एक बाई स्नान करताना दिसली. ती अतिशय रुपवान होती. तेव्हा दावीदाने आपल्या सेवकवर्गाला बोलवून तिची माहिती काढली. सेवकाने सांगितले, “ती अलीयमची मुलगी बथशेबा उरीया हित्ती याची ती पत्नी.” तिला आपल्याकडे घेऊन यायला दावीदाने निरोप्याला पाठवले. ती आल्यावर दावीदाने तिच्याशी शरीरसंबंध केला. नंतर स्नान करुन शुध्द होऊन ती पुन्हा आपल्या घरी परतली. पण बथशेबा गर्भवती राहिली. दावीदाला तिने निरोप पाठवला. तिने सांगितले, “मी गरोदर आहे.”

असे असताना तू परमेश्वराची आज्ञा का मोडलीस? त्याच्या दृष्टीने वाईट असे कृत्य का केलेस? उरीया हित्तीला तू तलवारीने मारलेस आणि त्याच्या बायकोचा स्वत:ची बायको म्हणून स्वीकार केलास. होय, अम्मोन्यांच्या तलवारीने तू त्याचा वध करवलास. तेव्हा आता ही तलवार तुझ्या कुटुंबाचा पिच्छा सोडणार नाही. तू उरीया हित्तीच्या बायकोचे हरण केलेस. तुला माझी पर्वा नाही हेच यातून दिसते.’ “परमेश्वर म्हणतो, “आता तुझ्यावर संकटे कोसळतील. अडचणींना सुरुवात तुझ्या घरातूनच होईल. तुझ्या बायका तुझ्यापासून मी हिरावून घेऊन त्या तुझ्या एका आप्ताच्याच हवाली करीन. तो तुझ्या बायका बरोबर झोपेल आणि ही गोष्ट सर्वांसमक्ष घडेल. बथशेबाचा उपभोग तू गुपचूप घेतलास पण हे मात्र सूर्याच्या साक्षीने, सर्व इस्राएलां देखत होईल.”’

त्याला ती भरवू लागली तोच त्याने तिचा हात धरला. तिला तो म्हणाला, “हे बाहिणी, ये आणि माझ्याजवळ झोप.” तामार त्याला म्हणाली, “भाऊ नको! अशी बळजबरी तू माझ्यावर करु नकोस. ही मोठी शरमेची गोष्ट आहे. असल्या भयंकर गोष्टी इस्राएलमघ्ये कदापि घडता कामा नयेत. मला कायम या लाजिरवाण्या गोष्टीचा कलंक लागेल. लोकांच्या दृष्टीने तू इस्राएलामधल्या अनेक मूर्खांपैकी एक ठरशील. तू कृपा करुन राजाशी बोल. तो तुला माझ्याशी लग्न करायला अनुमती देईल.” पण अम्नोनने तिच्या बोलण्याकडे साफ दुर्लक्ष केले. शारीरिक दृष्ट्याही तो तिच्यापेक्षा शकतीवान होता. तिला न जुमानता त्याने तिच्यावर बलात्कार केला.

स्त्रियांबद्दल शलमोनाला आकर्षण होते. इस्राएल देशाच्या बाहेरच्याही अनेक स्त्रिया त्याच्या आवडत्या होत्या. फारोच्या मुलीखेरीज, हिती, मवाबी, अम्मोनी, अदोमी, सिदोनी अशा परक्या देशातील स्त्रियांनाही त्याने आपलेसे केले. परमेश्वराने पूर्वीच इस्राएल लोकांना सांगितले होते “परक्या देशातील लोकांशी विवाह संबंध ठेवू नका. तसे केलेत तर ते तुम्हाला त्यांच्या दैवतांच्या भजनी लावतील.” असे असूनही शलमोन या बायकांच्या प्रेमात पडला. त्याला सातशे बायका होत्या. (त्या सर्व इतर देशांच्या प्रमुखांच्या मुली होत्या) उपपत्नी म्हणून त्याला आणखी तीनशे दासीही होत्या. ह्या बायकांनी त्याला देवापासून दूर जाण्यास भाग पाडले. तो वृध्द झाला तेव्हा त्याच्या बायकांनी त्याला इतर दैवतांकडे वळवले. आपले वडील दावीद याच्या प्रमाणे शलमोन परमेश्वराशी एकनिष्ठ राहिला नाही. सिदोनी लोकांच्या अष्टोरेथ देवाची त्याने पूजा केली. तसेच अम्मोन्यांचे अमंगळ दैवत मिलकोम यालाही त्याने भजले. अशाप्रकारे त्याने परमेश्वराचा अपराथ केला. आपले वडील दावीद यांच्याप्रमाणे तो परमेश्वराला पूर्णपणे अनुसरला नाही.

परमेश्वराच्या पूजेचा एक भाग म्हणून लैंगिक उपभोगासाठी शरीरविक्रय करणारेही होते. अशी अनेक दुष्कृत्ये यहूदाच्या लोकांनी केली. या प्रदेशात याआधी जे लोक राहात असत तेही अशाच गोष्टी करत. म्हणून देवाने त्यांच्याकडून तो प्रदेश काढून घेऊन इस्राएलच्या लोकांना दिला होता.

त्याकाळी दैवतांच्या नावाखाली शरीरविक्रय करणारे पुरुष होते. आसाने त्यांना देशत्याग करायला लावले. तसेच त्याने आपल्या वाडवडीलांनी केलेल्या मूर्तीही हलवल्या.

धर्माच्या नावाखाली देह विक्रय करणाऱ्या स्त्रीपुरुषांना यहोशाफाटने प्रार्थनास्थळांमधून हाकलून लावले. यहोशाफाटचे वडील आसा राज्या करीत असताना हे लोक त्या ठिकाणी होते.

परमेश्वराच्या मंदिरातील पुरुषवेश्यांची घरे योशीयाने उद्ध्वस्त केली. बायकाही या घरांचा वापर करत आणि अशेरा या देवतेच्या सन्मानार्थ लहान तंबू आच्छादने करत असत.

“रस्त्यातल्या मुलीकडे अभिलाषेने न बघण्याचा करार मी माझ्या डोळ्यांशी केला आहे.

ज्ञान तुला अनोळखी स्त्रीपासून वाचवील. दुसऱ्या देशातली एखादी स्त्री गोड शब्दांनी तुला तिच्याबरोबर पाप करायला प्रवृत्त करेल. त्या स्त्रीने तरुणपणी लग्न केले. पण तिने नवऱ्याला सोडले. तिने देवासमोर तिचे लग्नाचे वचन पाळले नाही. पण ज्ञान तुला तिला ‘नाही’ म्हणायला मदत करील.

दुसन्या माणसाची बायको खूप मोहक असेल. तीच्या मुखातून बाहेर पडणारे शब्द खूप गोड व आकर्षक असतील. पण शेवटी त्यामुळे कटुता व दु:खच मिळेल. ते दु:ख विषापेक्षाही कडवट असले. आणि तलवारीपेक्षी धारदार असेल.

दुसऱ्याच्या बायकोकडून तू असा बंदीवान होऊ नकोस. तुला दुसऱ्याच्या बायकोच्या प्रेमाची गरज नाही.

त्यांची शिकवण तुला दुष्ट स्त्रीकडे जाण्यापासून परावृत्त करते. नवऱ्याला सोडून आलेल्या बाईच्या भुरळ पाडणाऱ्या बोलण्यापासून ते शब्द तुझे रक्षण करतात. ती स्त्री सुंदर असेल. पण ते सौंदर्य तुझ्यात जळू देऊ नकोस आणि तुला त्याची भुरळ पडू देऊ नकोस. तू तिच्या डोळ्यांनी जायबंदी होऊ नकोस. वेश्येचा मोबदला एक भाकरीचा असेल. पण दुसऱ्याच्या बायकोची किंमत म्हणून तुला तुझे जीवित द्यावे लागेल. जर एखाद्याने स्वत:वर निखारे ओतले तर त्याचे कपडेसुध्दा जळतील. जरा एखादा माणूस निखाऱ्यांवर चालला तर त्याचे पाय भाजतील. दुसऱ्या माणसाच्या बायकोबरोबर झोपणाऱ्याचेही असेच होते. त्या माणसाला दु:ख भोगावे लागते.

पण जो माणूस व्यभिचाराचे पाप करतो तो मूर्ख असतो. तो स्वत:चा नाश करीत असतो. तो स्वत:च त्याच्या नाशाला कारणीभूत असतो.

नंतर ते तुझा दुसऱ्या स्त्रीपासून बचाव करतील. ते तुला तिच्या पापाकडे नेणाऱ्या गोड शब्दांपासून वाचवतील. एक दिवस मी माझ्या खिडकीतून पाहिले आणि मला बरेच मूर्ख तरुण दिसले. मला एक तरुण दिसला जो खूपच मूर्ख होता. त्याने वाईट स्त्रीच्या घराचा रस्ता धरला. त्याला भेटण्यासाठी ती घरातून बाहेर आली. तेव्हा अंधार होत होता - सूर्य मावळत होता व रात्र पडायला सुरुवात झाली होती. ती स्त्री त्याला भेटायला घरातून बाहेर आली. तिने वेश्येसारखा पोशाख केला होता. तिने त्याच्याबरोबर पाप करायचे ठरवले.

त्या बाईने त्या तरुणाला भुलविण्यासाठी हे शब्द वापरले. तिच्या गोड बोलण्याला तो भुलला. आणि तो तरुण तिच्या मागोमाग जाळ्यात गेला. तो कत्तलखान्यात नेल्या जाणाऱ्या बैलाप्रमाणे होता. शिकारी ज्याच्या हृदयात बाण सोडायला. तयार आहेत अशा हरिणाप्रमाणे तो होता. तो ज्या संकटात होता ते त्याला कळले नाही. मुलांनो आता माझे ऐका. माझ्या शब्दांकडे लक्ष द्या. दुष्ट स्त्रीला तुमचा कब्जा घेऊ देऊ नका. तिच्या मार्गावरुन जाऊ नका. तिने खूप माणसांना पाडले आहे. तिने खूप जणांचा नाश केला आहे. तिचे घर म्हणजे मृत्यूचा सापळा आहे. तिचा मार्ग सरळ मरणातच जातो.

इमानी माणसाला चांगुलपणा वाचवतो. पण दुष्ट मात्र त्यांनी केलेल्या वाईट गोष्टींच्या सापळ्यात अडकतात.

व्यभिचाराचे पाप हा एक सापळा आहे. जो माणूस या सापळ्यात अडकतो त्याच्यावर परमेश्वर खूप रागावतो.

वेश्या आणि वाईट स्त्रिया म्हणजे सापळे आहेत. त्या खोल विहिरीसारख्या आहेत. त्यातून कधीही बाहेर पडता येत नाही. वाईट स्त्री चोरासारखी तुमची वाट बघत असते. आणि ती पुष्कळ पुरुषांना पाप करायला लावते.

जर एखाद्या माणसाला शहाणपण आवडत असेल तर त्याच्या वडिलांना आनंद वाटतो. पण जर एखादा माणूस वेश्येवर पैसा खर्च करत असेल तर तो त्याची संपत्ती गमावून बसेल.

जी स्त्री नवऱ्याशी एकनिष्ठ नसते ती तिने काहीही चूक केलेली नाही असे वागते. ती खाते, आंघोळ करते आणि तिने काहीही चूक केली नाही असे म्हणते.

मला हे सुध्दा कळले की काही स्त्रिया सापव्व्यासारख्या धोकादायक असतात. त्यांची हृदये जाळ्यासारखी असतात आणि त्यांचे बाहू साखव्व्यांसारखे असतात. या स्त्रियांकडून पकडले जाणे मरणापेक्षाही भयंकर असते. जो माणूस देवाची भक्ती करतो तो अशा स्त्रियांपासून दूर राहातो. पण पापी माणूस मात्र त्यांच्या कडून पकडला जाईल.

देव म्हणतो, “यरूशलेमेकडे पाहा. ही नगरी माझ्यावर श्रध्दा ठेवणारी आणि माझ्या मताप्रमाणे वागणारी होती. आताच तिला असे वारांगनेप्रमाणे वागायला काय झाले? आता ती माझ्या म्हणण्याप्रमाणे वागत नाही. यरूशलेमला प्रामणिक बनवली पाहिजे. यरूशलेममध्ये राहणाऱ्या लोकांनी देवाच्या इच्छेप्रमाणे राहिले पाहिजे. पण सध्या तेथे खुनी लोक राहतात.

“चेटकिणीच्या मुलांनो, इकडे या. तुमच्या वडिलांनी व्यभिचार केला. त्यामुळे ते अपराधी आहेत. तुमची आई देहविक्रय करते. तुम्ही इकडे या.

“एखाद्याने बायकोशी घटस्फोट घेतल्यास ती त्याला सोडते आणि दुसऱ्याशी लग्न करते. मग तो माणूस परत आपल्या बायकोकडे जाऊ शकतो का? नाही. जर तो माणूस त्या बाईकडे परत गेलातर तो देश ‘भ्रष्ट’ होतो. यहूदा, खूप प्रियकर (खोटे देव) असलेल्या वारांगनेप्रमाणे तू वागलीस आणि आता तुला माझ्याकडे परत यायचे आहे.” हा परमेश्वराचा संदेश होता. यहूदा, टेकड्यांच्या उजाड माथ्यांकडे पाहा. अशी एक तरी जागा आहे का की जेथे तू तूझ्या प्रियकराबरोबर (खोट्या देवांबरोबर) समागम केला नाहीस? वाळवंटात वाट पाहाणाऱ्या अरबांप्रमाणे, तू प्रियकराची वाट बघत रस्त्याच्या कडेला बसलीस. तू देश ‘भ्रष्ट’ केलास. कसा? तू खूप वाईट गोष्टी केल्यास. तू माझा विश्वासघात केलास. पाप केलेस म्हणून पाऊस पडला नाही. वळवाचा पाऊस तर अजिबात पडला नाही. पण तरी तुला लाज वाटत नाही. वारांगनेप्रमाणे तुझ्या तोंडावर निर्लज्जपणाचे भाव आहेत. तू तुझ्या कृत्यांबद्दल शरमिंदी होत नाहीस.

योशीया यहुदावर राज्य करीत असताना, परमेश्वर माझ्याशी बोलला. परमेश्वर म्हणाला, “यिर्मया, इस्राएलने केलेली दुष्कृत्ये तू पाहिलीस ना? तिने माझा कसा विश्वासघात केले ते तू पाहिलेस. तिने प्रत्येक टेकडीवर आणि प्रत्येक हिरव्या झाडाखाली मूर्तींबरोबर व्यभिचार करुन पाप केले. मी स्वत:शीच म्हणालो, ‘ही दुष्कृत्ये करुन झाल्यावर तरी इस्राएल माझ्याकडे परत येईल.’ पण ती माझ्याकडे परत आली नाही. इस्राएलने काय केले हे इस्राएलच्या विश्वासघातकी बहिणीने यहूदाने पाहिले. इस्राएल विश्वासघातकी आहे आणि तिला मी दूर का पाठविले ते तिला माहीत आहे. तिने व्यभिचाराचे पाप केले म्हणून मी तिला घटस्फोट दिला हे तिला कळले आहे. पण ह्यामुळे तिची विश्वासघातकी बहीण भयभीत झाली नाही. यहूदाला भीती वाटली नाही. यहूदाने सुध्दा बाहेर जाऊन वारांगनेप्रमाणे व्यवहार केला.

पण तुम्ही पतीशी विश्वासघात करणाऱ्या पत्नीप्रमाणे आहात. इस्राएलच्या घराण्यातील लोकांनो, तुम्ही माझा विश्वासघात करीत आहात.” हा देवाचा संदेश होता.

देव म्हणाला, “यहूदा, मी तुला क्षमा करावी म्हणून तू मला एक तरी सबळ कारण सांग. तुझ्या मुलांनी माझा त्याग केला. त्यांनी मूर्तींपुढे शपथा वाहिल्या. पण त्या मूर्ती म्हणजे खरे देव नव्हेत. तुझ्या मुलांना पाहिजे ते सर्व मी दिले. पण तरी त्यांनी माझा विश्वासघात केला. त्यांनी आपला बराच वेळ वारांगनेबरोबर घालविला. ते लोक, भरपूर खाद्य खाणाऱ्या व समागमाला तयार असणाऱ्या घोड्यांप्रमाणे आहेत. शेजाऱ्याच्या बायकोला वासनेने हाका मारणाऱ्या घोड्यांप्रमाणे ते आहेत.

तुम्ही चोरी आणि खून कराल का? तुम्ही व्यभिचाराचे पाप कराल का? तुम्ही दुसऱ्यांवर खोटे आरोप कराल का? तुम्ही बआल देवाची पूजा कराल का? तुम्हाला माहीत नसणाऱ्या इतर दैवतांना अनुसराल का?

मी तू केलेली भयानक कृत्ये पाहिली आहेत.जारांशी हसताना आणि संभोग करताना मी तुला पाहिले आहे. वेश्या बनायचेच तुझ्या मनात दिसते आहे. मी तुला डोंगरकपारीत आणि मैदानात पाहिले आहे. यरुशलेम, हे तुझ्या दृष्टीने वाईट आहे. या घृणास्पद पापें तू किती काळ करणार याचे मला नवल वाटते.”

आता मी यहूदाच्या संदेष्ट्यांना यरुशलेममध्ये भयंकर गोष्टी करताना पाहिले आहे. ते व्यभिचाराचे पाप करतात. ते खोट्या गोष्टी एकतात आणि खोट्या शिकवणुकीचे पालन करतात. ते दुष्टांना दुष्कृत्ये करायला प्रोत्साहन देतात. म्हणून लोक पाप करीतच राहतात. ते सदोममधील माणसाप्रमाणे आहेत. यरुशलेम आता मला गमोऱ्यासारखे वाटते.”

त्या दोघा संदेष्ट्यांनी इस्राएलमध्ये फार वाईट कृत्ये केली. शेजाऱ्यांच्या बायकांबरोबर त्यांनी व्यभिचार केला. त्यांनी खोटे सांगितले आणि माझा संदेश खोटे असल्याचे लोकांना सांगितले मी त्यांना ह्या गोष्टी करायला सांगितल्या नव्हत्या त्यांनी काय केले आहे, ते मला माहीत आहे मी त्याला साक्षी आहे.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.

शत्रूंनी सियोनमधील स्त्रियांवर बलात्कार केला. यहुदातील गावांमधील स्त्रियांवर त्यांनी बलात्कार केले.

देव म्हणाला, “पण तू आपल्या सौंदर्यावरच विश्वास ठेवायला सुरवात केलीस. तू तुझ्या चांगल्या नावाचा उपयोग करुन माझा विश्वासघात केलास. येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाबरोबर तू वेश्येप्रमाणे वागलीस. त्या सर्वांच्या तू स्वाधीन झालीस. तुझ्या सुंदर वस्त्रांचा उपयोग तू तुझी पूजास्थाने सजविण्यासाठी केलास. आणि तेथे तू वेश्येसारखे वर्तन केलेस. तुझ्याजवळ येणाऱ्या प्रत्येकाच्या तू स्वाधीन झालीस. मग मी तुला दिलेल्या सोन्या चांदीच्या अलंकाराचा उपयोग तू पुरुषांचे पुतळे बनविण्यासाठी केलास आणि त्या पुतळ्यांशीही व्यभिचार केलास.

देव म्हणाला, “आपल्याला मुले झाली. पण तू आपली मुले घेतलीस व त्यांना ठार करुन खोट्या देवांना अर्पण केलेस. मला फसवून त्या खोट्या देवांकडे जाताना तू जी दुष्कृत्ये केलीस त्यातील ही फक्त काहीच होत. “तू माझ्या मुलांचा वध केलास आणि अग्निद्वारा त्यांना त्या खोट्या देवापर्यंत पोहोचविलेस. तू माझा त्याग केलास आणि अशी दुष्कृत्ये केलीस. तुला तुझ्या बालपणाचे विस्मरण झाले. मला तू सापडलीस तेव्हा तू नग्नावस्थेत रक्तात लोळत होतीस हे तुला आठवले नाही.

प्रत्येक रस्त्याच्या सुरवातीला तू मातीचे ढिगारे रचलेस. तू तुझ्या सौंदर्याला कमीपणा आणलास, तुझ्या सौंदर्याचा उपयोग तू तुझ्या जवळून जाणाऱ्या प्रत्येकाला पकडण्यासाठी केलास. त्यांना तुझे पाय दिसावे म्हणून तू तुझी वस्त्रे वर उचललीस आणि त्यांच्याबरोबर वेश्येसारखी वागलीस. मग मोठे लिंग असलेल्या शेजाऱ्याकडे, मिसरकडे तू गेलीस व मला संतापविण्यासाठी त्याच्याबरोबर अनेकदा व्यभिचार केलास. म्हणून मी तुला शिक्षा केली. तुझ्या भत्तयातील काही भाग (जमीन) मी काढून घेतला. तुझ्या शत्रूंना म्हणजेच पलिष्ट्यांच्या मुलींना (शहरांना) त्यांना पाहिजे तसे तुझ्याशी वागू दिले. तुझी दुष्कृत्ये पाहून त्यांनासुध्दा धक्काबसला. मग तू अश्शूरकडे व्यभिचार करण्यासाठी गेलीस. पण तुझे समाधान होऊ शकले नाही. तुझी कधीच तृप्ती झाली नाही. म्हणून मग तू कनानकडे वळलीस व तेथून खास्द्यांकडे गेलीस. पण अजूनही तू तृप्त नाहीस.

तू खूपच दुर्बल आहेस. म्हणूनच सर्व पुरुषांनी (देशांनी) तुला पापे करायला लावले. तू निर्दयपणे हुकमत चालवणाऱ्या वेश्येप्रमाणे वागलीस.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला. देव म्हणाला, “पण तू पूर्णपणे वेश्यावृत्ती पत्करली नाहीस. तू प्रत्येक रस्त्याच्या टोकाला मातीचे ढिगारे रचलेस व प्रत्येक रस्त्याच्या कोपऱ्यावर पूजास्थाने बांधलीस. तू सर्व पुरुषांबरोबर व्यभिचार केलास.पण तू, वेश्येप्रमाणे, त्यांच्याजवळ मोबदला मागितला नाहीस. “व्यभिचारिणी, तुला स्वत:च्या पतीऐवजी परक्यांबरोबर व्यभिचार करायला आवडतो. बहुतेक वेश्या पुरुषांना पैसे देण्यास भाग पाडतात. पण तूच सर्व प्रियकरांना पैसे दिलेस. तू व्यभिचारासाठी तुझ्याकडे बोलविलेल्या सर्व पुरुषांना पैसे दिलेस. तू बहुतेक वेश्यांच्या अगदी उलट वागलीस. त्या पुरुषांकडून सक्तीने पैसे घेतात, तर तू तुझ्याबरोबर व्यभिचार करण्यासाठी उलट पुरुषांनाच पैसे देतेस.”

वारांगने, परमेश्वराकडून आलेला संदेश ऐक. परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणतो, “तू पैसा खर्च केलास आणि तुझ्या प्रियकरांना आणि घाणेरड्या देवांना तुझे नग्न शरीर पाहू दिलेस, तुझ्याबरोबर व्याभिचार करु दिलास. तुझ्या मुलाना ठार मारुन त्यांचे रक्त खोट्या देवांना भेट म्हणून दिलेस. म्हणून मी तू ज्यांच्यावर प्रेम केलेस, त्या तुझ्या सर्व प्रियकरांना आणि ज्यांचा तू तिरस्कार करतेस त्यांना, एकत्र आणीन आणि तुझे नग्न शरीर पाहू देईन.तुझे संपूर्ण नग्न शरीर ते पाहतील. मग मी तुला शिक्षा करीन. खुनी व व्यभिचाराचे पाप केलेल्या स्त्रीप्रमाणे मी तुला शिक्षा करीन. क्रोधाविष्ट व मत्सरी पतीकडून व्हावी, तशी शिक्षा तुला होईल.

ते तुझे घर (मंदिर) जाळतील. इतर स्त्रियांना कळावे म्हणून ते तुला शिक्षा करतील. मी तुला वेश्येप्रमाणे वागू देणार नाही. तुझ्या प्रियकरांना पैसे देऊ देणार नाही. मग माझा राग व मत्सर निवळेल मी शांत होईन. पुन्हा कधीही रागावणार नाही. हे सर्व का घडलं? कारण बालपणी काय घडले ह्याचे तुला विस्मरण झाले. तू वाईट गोष्टीबद्दल मला तुला शिक्षा करावी लागली. पण तू त्याहून भयंकर गोष्टी करण्याचा बेत केलास.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला.

यरुशलेमचे लोक दुसऱ्यांबद्दल खोटेनाटे सांगतात. निष्पाप लोकांना ठार माण्यासाठी ते असे करतात. लोक, डोंगरावर, खोट्या देवांची पूजा करण्यासाठी जातात व सहभोजन करण्यासाठी यरुशलेमला येतात. “यरुशलेममध्ये, लोक पुष्कळ लैंगिक पापे करतात. ह्या नगरीत, ते वडिलांच्या पत्नीबरोबर व्यभिचार करतात. रजस्वला स्त्रीवरही ते बलात्कार करतात. कोणी आपल्या शेजाऱ्याच्या बायकोबरोबर व्यभिचार करतो, कोणी स्वत:च्या सुनेबरोबर संबंध ठेऊन तिला अपवित्र करतो, तर कोणी त्यांच्या वडिलांच्या मुलीशी म्हणजेच स्वत:च्या बहिणीवरच बलात्कार करतो.

मला परमेश्वराचे शब्द ऐकू आले. तो म्हणाला, “मानवपुत्रा, शोमरोन व यरुशलेम ह्यांची गोष्ट ऐक, दोन 1बहिणी होत्या. त्यांनी एकाच आईच्या पोटी जन्म घेतला होता. त्या अगदी तारुण्याच्या उंबरठ्यावर असतानाच, मिसरमध्ये, वेश्या झाल्या. मिसरमध्ये, त्यांनी प्रथम प्रियाराधन केले आणि पुरुषांना स्तनाग्रांना स्पर्श करु दिला व आपली स्तने त्यांच्या हाती दिली. त्यातील थोरल्या बहिणीचे नाव अहला व धाकटीचे अहलीबा असे होते. त्या व वाहिणी माझ्या पत्नी झाल्या आम्हाला मुले झाली. (खरे म्हणजे अहला म्हणजेच शोमरोन व अहलीबा म्हणजे यरुशलेम होय.) “मग अहलाने माझा विश्वासघात केला - ती वेश्येसारखी वागू लागली. तिला प्रियकर हवेसे वाटू लागले. ‘तिने अश्शूरच्या सैनिकांना निळ्या गणवेषांत पाहिले. ते सर्व तरुण, हवेसे वाटणारे. घोडेस्वार होते. ते नेते व अधिकारी होते. अहलाने स्वत:त्या सर्वांच्याबरोबर व्यभिचार केला. ते सर्व अश्शूरच्या सैन्यातील निवडक सैनिक होते. तिला ते सर्व हवे होते. त्यांच्या अंमगळ मूर्तींबरोबर तीही अमंगळ झाली. ह्या व्यतिरिक्त, तिने आपले मिसरबरोबरचे प्रेम प्रकाश चालूच ठेवले. ती अगदी तरुण असतानाच मिसरने तिच्याबरोबर प्रियाराधन केले होते. तिच्या कोवळ्या स्तनांना स्पर्श करणारा पहिला प्रियकर मिसरच होय. मिसरने आपले खोटे प्रेम तिच्यावर ओतले. मी तिच्या प्रियकरांना तिच्या बरोबर व्यभिचार करु दिला. तिला अश्शुरी पाहिजे होते, म्हणून मी तिला त्यांच्या स्वाधीन केले. त्यांनी तिच्यावर बलात्कार केला. त्यांनी तिची मुले घेतली. आणि तलवारीने तिला ठार केले. त्यांनी तिला शिक्षा केली. तिचे नाव सर्व स्त्रियांच्या तोंडी अजूनही आहे. “तिच्या धाकट्या बहिणीने अहलीबाने हे सर्व पाहिले, पण तिने आपल्या बहिणीपेक्षा जास्त पापे केली. ती अहलापेक्षा जास्त विश्वासघातकी होती. तिलाही अश्शुरी नेते व अधिकारी हवे होते. निळ्या गणवेषातील ते घोडेस्वार तिला हवेसे वाटले. ते कामना करण्यास योग्य असेच तरुण होते. सारख्याच चुका करुन, दोन्ही स्त्रिया, स्वत:च्या आयुष्याचा नाश करुन घेत आहेत, हे मला दिसले. “अहलीबा माझा विश्वासघात करीतच राहिली. बाबेलमध्ये, भिंतीवर कोरलेली पुरुषांची चित्रे तिने पाहिली. ती लाल गणवेष घातलेल्या खास्दी पुरुषांची चित्रे होती. त्यांनी कमरेला पट्टे बांधले होते आणि डोक्याला लांब फेटे बांधले होते. ते सर्व अतीरथीप्रमाणे दिसत होते. ते सर्व मूळच्या खास्द्यांप्रमाणे दिसत होते. अहलीबा त्यांच्यावर आसक्त झाली. म्हणून ते बाबेलचे पुरुष समागम करण्यासाठी तिच्या शृंगारलेल्या शय्येवर गेले. त्यांनी तिला भोगले आणि इतकी घाणेरडी, अमंगळ केले की तिला त्यांची घृणा वाटू लागली. “अहलीबाने आपली बेईमानी सर्वांना पाहू दिली. तिने आपल्या नग्न शरीराशी अनेक पुरुषांना मौज करु दिली. त्यामुळे तिच्या बहिणीप्रमाणे मला तिचीही अतिशय घृणा वाटू लागली. तिने पुन्हा पुन्हा माझा विश्वासघात केला. मग तिला मिसर बोररच्या तिच्या ऐन तारुण्यातील प्रेम प्रकरणाची आठवण झाली. गाढवासारखे इंद्रिय व घोड्यासारखा वीर्यसाठा असलेल्या प्रियकराची तिला आठवण झाली. “अहलीबा, तू तरुण होतीस तेव्हा तुझा प्रियकर तुझ्या स्तनाग्रांना स्पर्श करी व तुझे स्तन हातात धरी, त्याची तुला स्वप्ने पडू लागली.

मिसरबरोबरच्या प्रेम प्रकराणाच्या स्वप्नांचा मी चुराडा करीन. तू पुन्हा त्याच्याकडे ढुंकून पाहणार नाहीस. तू पुन्हा कधीही मिसरची आठवण काढणार नाहीस.” परमेश्वराने, माझ्या देवाने, पुढील गोष्टी सांगितल्या. “तू ज्यांची घृणा करतेस, त्यांच्याच ताब्यात मी तुला देत आहे. तुला ज्यांची किळस वाटते, त्यांच्याच स्वाधीन मी तुला करीत आहे. ते तुझा किती तिरस्कार करतात हे ते तुला दाखवून देतील. तू मिळविलेली प्रत्येक गोष्ट ते काढून घेतील. ते तुला उघडी नागडी करतील. लोकांना तुझी पापे स्पष्ट दिसतील. तू वेश्येप्रमाणे वागलीस आणि दुष्ट स्वप्ने पाहिलीस हे त्यांना कळेल. दुसऱ्या राष्ट्रांच्या मागे लागून तू माझा त्याग केलास आणि ह्या वाईट गोष्टी केल्यास. त्या अमंगळ मूर्तींना पूजायाला तू सुरवात केलीस तेव्हाच ही दुष्कृत्ये तू केलीस.

“म्हणून, परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणतो ‘यरुशलेम, तू मला विसरलीस. तू मला दूर ढकललेस. मला मागे ठेवले तेव्हा माझा त्याग केल्याबद्दल आणि वेश्येप्रमाणे वागल्याबद्दल तुला शिक्षा झालीच पाहिजे. तुझ्या दुष्ट स्वप्नांमुळे आणि दुराचारामुळे तुला भोग भोगलेच पाहिजेत.” परमेश्वर, माझा प्रभू, मला म्हणाला, “मानवपुत्रा, तू अहला व अहलीबा यांचा न्यायनिवाडा करशील का? मग त्यांनी केलेल्या भयंकर गोष्टीबद्दल त्यांना सांग. त्यांनी व्याभिचाराचे पाप केले आहे. खुनाचा अपराध त्यांनी केला आहे. त्या वेश्येप्रमाणे राहिल्या. त्या अमंगळ मूर्तीसाठी त्यांनी माझा त्याग केला. त्यांना माझ्यापासून झालेल्या मुलांना त्यांनी बळजबरीने आगीतून जायला लावले. त्यांच्या घाणेरड्या मूर्तींना अन्न देण्यासाठी त्यांनी हे सर्व केले. त्यांनी माझे मंदिर अशुद्ध केले आणि माझ्या सुटृ्यांचे खास दिवस भ्रष्ट केले. त्यांच्या मूर्तींना बळी देण्यासाठी त्यांनी त्यांच्या मुलांना ठार मारले. ते माझ्या पवित्र स्थळी गेले आणि ते स्थळ त्यांनी अपवित्र केले. त्यांनी हे कृत्य माझ्या मंदिरात केले.

“निरोपे पाठवून त्यांनी दूरदूरच्या पुरुषांना बोलाविले, ते पुरुष त्यांना भेटायला आले. त्यांच्यासाठी तुम्ही स्नान केले, डोळ्यात काजळ घातले, अलंकार घातले. तुम्ही सुंदर शय्येवर बसलात व पुढे टेबल ठेवून त्यावर माझा धूप व तेल ठेवलेत. “पुष्कळ लोकांची मेजवानी सुरु असल्याप्रमाणे यरुशलेममधून आवाज आला. मेजवानीस खूप लोक जमले. वाळवंटाकडून येणारे आधीपासूनच मद्य प्राशन करीत होते. त्यांनी स्त्रियांना बांगड्या व मुकुट दिले. तेव्हा व्यभिचाराच्या पापाने कंटाळलेल्या एका स्त्रीशी मी बोललो. मी तिला विचारले, ‘ते तुझ्याशी व तू त्यांच्याशी असेच व्यभिचाराचे पाप करीत राहणार का?’ पण वेश्येकडे जावे, तसे ते तिच्याकडे जातच राहिले. खरेच! ते पुन्हा पुन्हा अहला व अहलीबा या दुष्ट स्त्रियांकडे जातच राहिले. “पण सज्जन लोक त्यांना अपराधी ठरवितील. त्या स्त्रियांचा व्यभिचार व खून या अपराधांबद्दल ते त्यांचा न्यायनिवाडा करतील. का? कारण अहला व अहलीबा यांनी व्याभिचार तर केला आहेच, पण त्यांनी मारलेल्या लोकांचे रक्त अजून त्यांच्या हाताला लागले आहे.”

अशा रीतीने, ह्या देशावरचा कलंक मी घालवतो. तुमच्यासारख्या लज्जास्पद गोष्टी न करण्याचा इशारा इतर स्त्रियांना मिळेल. तुम्ही केलेल्या दुष्कृत्यांबद्दल ते तुम्हाला शिक्षा करतील. तुमच्या अमंगळ मूर्तींची पूजा केल्याबद्दल तुम्हाला शिक्षा होईल. मग तुम्हाला मीच परमेश्वर व प्रभू असल्याचे कळेल.”

हा होशेययला आलेला परमेश्वराचा पहिलाच संदेश होता. परमेश्वर म्हणाला, “जा आणि वेश्येशी लग्न कर. तिला मुले होऊ देत. का? कारण ह्या देशातील लोक वेश्येप्रमाणेच वागले आहेत. त्यांनी परमेश्वराचा विश्वासघात केला आहे.”

“तुम्ही आपल्या आईशी वाद घाला. खुशाल वाद घाला.कारण ती माझी पत्नी नाही व मी तिचा पती नाही. वेश्येप्रमाणे वागण्याचे सोडून देण्यास तिला सांगा. तिच्या स्तनापासून तिला तिच्या प्रियकरांना दूर करण्यास सांगा. तिने जर व्यभिचार करण्याचे सोडण्यास नकार दिला तर मी तिला नग्न करीन. तिला मी तिच्या जन्माच्या वेळच्या अवस्थेप्रमाणे टाकीन. मी तिचे लोक काढून घेईन मग ती ओसाड रूक्ष वाळवंटाप्रमाणे होईल, मी तिला तहानेने मारीन. तिची मुले ही वेश्येची मुले असल्याने मला त्यांची कीव येणार नाही. त्यांची आई वेश्येप्रमाणे वागली. तिला तिच्या कर्मांची लाज वाटली पाहिजे. ती म्हणाली, ‘मी माझ्या प्रियकराकडे जाईन ते मला अन्नपाणी देतील. ते मला लोकर, कापड, मद्या व जैतूनेचे तेल देतील.’

लोक शपथ घेतात, खोटे बोलतात, ठार मारतात आणि चोरी करतात ते व्यभिचाराचे पाप करतात आणि त्यांना मुले होतात ते पून्हा पून्हा खून करतात.

माझी माणसे लाकडाच्या तकड्यांना सल्ला विचारीत आहेत. त्यांना वाटते की त्या काटक्या त्यांना उत्तर देतील. का? कारण ते वेश्यांप्रमाणे त्या खोट्या देवाच्या मागे धावले. त्यांनी त्यांच्या देवाचा त्याग केला व ते वेश्येप्रमाणे वागले. पर्वतमाथ्यांवर ते बळी द्तात आणि डोंगरांवर अल्लोन लिबने व एला या वृक्षांखाली धूप जाळतात. ह्या वृक्षांची छाया चांगली असते. म्हणून तुमच्या मुली त्या वृक्षांखाली वेश्यांप्रमाणे झोपतात, आणि तुमच्या सुना व्यभिचाराचे पाप करतात. “मी तुमच्या मुलींनी वेश्या झाल्याबद्दल वा तुमच्या सुंनाना व्यभिचाराचे पाप केल्याबरोबर झोपतात. ते मंदिरातील कलावंतिणीबरोबर बळी अर्पण करतात. म्हणजेच ते मूर्ख लोक स्वत:चाच नाश करून घेत आहेत.

एफ्राईमला मी ओळखून आहे. इस्राएलची कृत्ये मला महीम आहेत. एफ्राईम, आता, यावेळी तू वश्येप्रमाणे वागत आहेस. इस्राएल पापाने बरबटली आहे. इस्राएलच्या लोकांनी खूप वाईट गोष्टी केल्या आहेत, त्या वाईट गोष्टी त्यांना परमेश्वराकडे परत येण्यास अडथळा करतात. ते नेहमी दुसऱ्या दैवतांच्या मागे मागे जाण्याच्या मार्गाचाच विचार करतात. ते परमेश्वराला ओळखत नाहीत.

इस्राएल, इतर राष्ट्राप्रमाणे आनंदोत्सव करू नकोस! तू वेश्येप्रमाणे वागलास आणि देवाचा त्याग केलास. प्रत्येक खव्व्यावर तू व्यभिचाराचे पाप केलेस.

त्यांनी माझ्या लोकांकरिता चिठ्या टाकल्या. वेश्या खरीदण्यासाठी त्यांनी मुलगा विकला आणि मद्य खरीदण्यासाठी मुलगी विकली.

हे सर्व निनवेमुळे झाले निनवे अतिशय हाव असलेल्या वेश्येप्रमाणे आहे तिला आणखी हवे होते तिने स्वत:ला पुष्कळ राष्ट्रांना विकळे आणि आपल्या जादने त्यांना गुलाम बनविले.

तुम्ही विचारता “परमेश्वर आमच्या भेटी का स्वीकारत नाही?” का? कारण तुम्ही केलेली दुष्कृत्ये त्याने पाहिली आहेत. परमेश्वर तुमच्याविरुध्दचा साक्षीदार आहे. तुम्ही तुमच्या पत्नीची फसवणूक करताना त्याने पाहिले. तरुण असताना तिच्याशी विवाह केलास. ती तुमची मैत्रीण होती. नंतर तुम्ही एकमेकांजवळ शपथा घेतल्या व ती तुझी पत्नी झाली. पण तू तिला फसविलेस. पती-पत्नींनी शरीरांनी व मनांनी एक व्हावे अशी देवाची इच्छा आहे. का? मग त्यांची मुलेही पवित्र होतील. म्हणून आध्यात्मिक ऐक्याचे रक्षण करा. तुमच्या पत्नीला फसवू नका. तुमच्या तारुण्यापासून ती तुमची अधार्गांगिती आहे. इस्राएलचा परमेश्वर देव म्हणतो, “घटस्फोटाचा मला तिटकारा आहे. आणि पुरुष करीत असलेल्या दुष्ट कर्मांची मला घृणा वाटते. म्हणून तुमच्या आध्यात्मिक ऐक्याचे रक्षण करा. तुमच्या पत्नीला फसवू नका.”

मग मी तुमच्याकडे न्याय निवाडा करण्यासाठी येईन. लोकांनी केलेल्या वाईट गोष्टी न्यायाधीशाला सांगणाऱ्या माणसाप्रमाणे मी असेन काही लोक दुष्टपणे जादूटोणा करतात. काही व्यभिचाराचे पाप करतात. काही खोटी वचने देतात. काही आपल्या मजुरांना फसवितात. ते मजुरांना कबूल केल्याप्रमाणे मजुरी देत नाहीत. लोक विधवांना व अनाथांना मदत करीत नाहीत. परक्याला कोणी मदत करीत नाही. माझा लोक मान राखत नाहीत.” सर्वशक्तिमान परमेश्वराने ह्या गोष्टी सांगितल्या.

‘व्यभिचार करू नको,’ म्हणून सांगितले होते हे तुम्ही ऐकले आहे मी तर तुम्हास सांगतो, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामवासनेने पाहतो त्याने आपल्या अंतःकरणात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे;

मी तर तुम्हास सांगतो की, जो कोणी आपल्या पत्नीला व्यभिचाराच्या कारणाशिवाय टाकतो, तो तिला व्यभिचारिणी करतो आणि जो कोणी अशा टाकलेल्या पत्नीबरोबर लग्न करतो तो व्यभिचार करतो.

कारण वाईट विचार, खून, व्यभिचार, जारकर्मे, खोट्या साक्षी, निंदा ही अंतःकरणातून बाहेर निघतात.

मी तुम्हास सांगतो, जो मनुष्य आपली पत्नी सोडून देतो आणि दुसरीशी लग्न करतो तो व्यभिचार करतो. आपल्या पत्नीला सूटपत्र देण्याचे एकच कारण आहे, ते म्हणजे पहिल्या पत्नीने परपुरुषांशी व्यभिचार करणे होय.”

तुम्ही परीक्षेत पडू नये म्हणून जागे राहा आणि प्रार्थना करीत राहा. आत्मा खरोखर उत्सुक आहे खरा पण देह अशक्त आहे.”

कारण आतून म्हणजे अंतःकरणातून वाईट विचार बाहेर पडतात. जारकर्म, चोरी, खून, व्यभिचार, लोभ, वाईटपणा, कपट, असभ्यता, मत्सर, शिव्यागाळी, अहंकार आणि मूर्खपणा, या सर्व वाईट गोष्टी आतून बाहेर पडतात आणि मनुष्यास अशुद्ध करतात.”

तो त्यांना म्हणाला, “जो कोणी आपली पत्नी टाकतो व दुसरीबरोबर लग्न करतो तो आपल्या पत्नीविरुद्ध व्यभिचार करतो. आणि जर पत्नी आपल्या पतीला सोडते आणि दुसऱ्याबरोबर लग्न करते, तर तीही व्यभिचार करते.”

तुला आज्ञा माहीत आहेतच; खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, फसवू नको, आपल्या वडिलांचा व आपल्या आईचा सन्मान कर.”

“जो कोणी आपल्या पत्नीला सोडून देतो व दुसरीबरोबर लग्न करतो तो व्यभिचार करतो आणि जो कोणी, पतीने सोडून दिलेल्या स्त्री सोबत लग्न करतो तो व्यभिचार करतो.”

तुला आज्ञा माहीत आहेत ‘व्यभिचार करू नको, खून करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, तुझ्या आई-वडीलांचा मान राख.’

तेव्हा व्यभिचार करत असतांना धरलेल्या एका स्त्रीला नियमशास्त्राचे शिक्षक व परूशी यांनी त्याच्याकडे आणले व तिला मध्यभागी उभे करून ते त्यास म्हणाले, “गुरूजी, ही स्त्री व्यभिचार करीत असताना धरण्यात आली. मोशेने नियमशास्त्रात आम्हास अशी आज्ञा दिली आहे की, अशांना दगडमार करावी, तर आपण हिच्याविषयी काय म्हणता?” त्यास दोष लावायला आपणास काहीतरी मिळावे म्हणून त्याची परीक्षा पाहण्याकरता ते असे म्हणाले. पण येशू खाली आणून आपल्या बोटाने जमिनीवर लिहू लागला. आणि ते त्यास एकसारखे विचारत असता तो उठून त्यांना म्हणाला, “तुमच्यात जो कोणी निष्पाप असेल त्याने प्रथम तिच्यावर एक दगड टाकावा.” मग तो पुन्हा खाली ओणवून जमिनीवर लिहू लागला. हे शब्द ऐकून वृद्धातल्या वृद्धापासून तो सरळ शेवटल्या मनुष्यापर्यंत ते सर्व एकामागून एक निघून गेले, येशू एकटा राहिला आणि ती स्त्री मध्यभागी उभी होती. नंतर येशू उठला व त्या स्त्रीशिवाय तेथे कोणीही नाही असे पाहून तिला म्हणाला, “बाई, तुला दोष देणारे कोठे आहेत? तुला कोणी दंड ठरवला नाही काय?” ती म्हणाली, “प्रभूजी, कोणी नाही.” तेव्हा येशू तिला म्हणाला, “मी देखील तुला दोषी ठरवीत नाही; जा, यापुढे पाप करू नको.”

तर त्यांना असे लिहून पाठवावे की, मूर्तीचे अमगंळपण, जारकर्म, गळा दाबून मारलेले प्राणी व रक्त ह्याच्यापासून तुम्ही अलिप्त असा.

त्या म्हणजे मूर्तीला अर्पीलेले पदार्थ, रक्त, गळा दाबुन मारलेले प्राणी व जारकर्म ही तुम्ही वर्ज्य करावी; ह्यापासून स्वतःला जपाल तर तुमचे हित होईल, क्षेमकुशल असो.”

जे परराष्ट्रीय विश्वास ठेवणारे आहेत त्यांना आम्ही पत्र लिहिले आहे, ते असे, मूर्तीला वाहिलेले अन्न त्यांनी खाऊ नये, रक्त अगर गुदमरून मारलेले प्राणी त्यांनी खाऊ व जारकर्म करू नये.”

म्हणून त्यांना आपल्या शरीराचा त्यांचा त्यांच्यातच दुरुपयोग करण्यास देवानेदेखील त्यांना त्यांच्या अंतःकरणातील वासनांद्वारे अमंगळपणाच्या स्वाधीन केले. त्यांनी देवाच्या सत्याच्या ऐवजी असत्य घेतले आणि निर्माणकर्त्याच्या जागी निर्मितीची उपासना व सेवा केली. तो निर्माणकर्ता तर युगानुयुग धन्यवादित देव आहे. आमेन. या कारणामुळे देवाने त्यांना दुर्वासनांच्या स्वाधीन केले; कारण त्यांच्या स्त्रियांनीही आपला नैसर्गिक उपभोग सोडून अनैसर्गिक प्रकार स्वीकारले; आणि तसेच पुरुषांनीही स्त्रियांचा नैसर्गिक उपभोग सोडून ते आपल्या वासनांत एकमेकांविषयी कामसंतप्त होऊन पुरुषांनी पुरुषांशी अयोग्य कर्म केले आणि त्यांनी आपल्या संभ्रमाचे योग्य प्रतिफळ आपल्याठायी भोगले.

आणि त्यांना देवाला स्मरणात ठेवणेही न आवडल्यामुळे देवाने त्यांना अनुचित गोष्टी करीत राहण्यास विपरीत मनाच्या स्वाधीन केले. ते सर्व प्रकारच्या अनीतीने, दुष्टतेने, लोभाने आणि कुवृत्तीने भरलेले असून मत्सर, खून, कलह, कपट, दुष्ट भाव, ह्यांनी पूर्ण भरलेले; कानगोष्टी करणारे,

आणि या गोष्टी करणारे मरणाच्या शिक्षेस पात्र आहेत हा देवाचा न्याय त्यांना कळत असून ते त्या करतात एवढेच केवळ नाही, पण अशा गोष्टी करणार्‍यांना ते संमतीही देतात.

म्हणून तुम्ही आपल्या मरणाधीन शरीरात त्याच्या वासनांच्या अधीन होण्यास पापाला राज्य चालवू देऊ नका. आणि तुम्ही आपले अवयव अनीतीची साधने म्हणून पापाला समर्पण करू नका. पण तुम्ही आपल्या स्वतःला मरण पावलेल्यातून जीवंत झालेले असे देवाला समर्पण करा आणि आपले स्वतःचे अवयव नीतिमत्त्वाची साधने म्हणून तुम्ही देवाला समर्पण करा.

मी तुमच्या देहाच्या अशक्तपणामुळे मनुष्यांच्या व्यवहारास अनुसरून बोलतो कारण जसे तुमचे अवयव अमंगळपणाला व अनाचाराला अनाचारासाठी दास होण्यास समर्पित केलेत तसेच आता तुमचे अवयव नीतिमत्त्वाला पवित्रीकरणासाठी दास होण्यास समर्पण करा.

म्हणून पती जिवंत असताना, जर ती दुसर्‍या पुरुषाची झाली तर तिला व्यभिचारिणी हे नाव मिळेल. पण तिचा पती मरण पावला तर ती त्या नियमातून मुक्त होते. मग ती दुसर्‍या पुरुषाची झाली तरी ती व्यभिचारिणी होत नाही. आणि म्हणून, माझ्या बंधूंनो, तुम्हीपण ख्रिस्ताच्या शरीराद्वारे नियमशास्त्राला मरण पावलेले झाला आहात; म्हणजे तुम्ही दुसर्‍याचे, जो मरण पावलेल्यातून उठवला गेला त्याचे व्हावे; म्हणजे आपण देवाला फळ द्यावे. कारण आपण देहाधीन असताना नियमशास्त्रामुळे उद्भवलेल्या आपल्या पापांच्या भावना आपल्या अवयवात, मरणाला फळ देण्यास कार्य करीत होत्या.

पण मला माझ्या अवयवात दुसरा एक असा नियम दिसतो; तो माझ्या मनातील नियमाशी लढून, मला माझ्या अवयवात असलेल्या पापाच्या नियमाच्या स्वाधीन करतो.

म्हणून ख्रिस्त येशूमध्ये असणाऱ्यांना दंडाज्ञा नाही. ते देहाप्रमाणे नाही तर आत्म्याप्रमाणे चालतात. कारण, ख्रिस्त येशूतील जीवनाच्या पवित्र आत्म्याच्या नियमाने मला पापाच्या व मरणाच्या नियमातून मुक्त केले. कारण देहामुळे नियमशास्त्र दुर्बळ झाल्याने त्यास जे अशक्य झाले, त्यासाठी देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राला पापासाठी पापमय देहाचे रूप देऊन पाठवले व पापाला देहात दंडाज्ञा ठरविली. म्हणजे आपण जे देहाला अनुसरून नाही पण आत्म्याला अनुसरून चालणारे आहोत त्या आपल्यात नियमशास्त्राची आज्ञा पूर्ण व्हावी. कारण देहाला अनुसरून चालणारे दैहिक गोष्टींवर मन ठेवतात; पण आत्म्याला अनुसरून चालणारे आत्मिक गोष्टींवर मन ठेवतात. देहस्वभावाचे चिंतन हे मरण आहे पण आत्मिक मनाचे होणे म्हणजे जीवन व शांती. कारण देहस्वभावाचे चिंतन हे देवाशी वैर आहे; कारण ते देवाच्या नियमाला अंकित होत नाही आणि त्यास खरोखर, होता येत नाही. म्हणून जे देहाचे आहेत ते देवाला संतोषवू शकत नाहीत.

म्हणून बंधूंनो आपण देणेकरी आहोत; पण देहानुसार जगण्यास देहाचे नाही कारण तुम्ही जर देहानुसार जगाल तर तुम्ही मराल, पण तुम्ही आत्म्याच्या योगे शरीराच्या कृती मारून टाकल्या तर तुम्ही जिवंत रहाल.

म्हणून बंधूंनो देवाची दया स्मरून मी तुम्हास विनंती करतो की, तुम्ही आपली शरीरे ‘पवित्र व देवाला संतोष देणारे जिवंत ग्रहणीय’ यज्ञ म्हणून सादर करावीत; ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे.

कारण ‘व्यभिचार करू नको, खून करू नको, चोरी करू नको, लोभ धरू नको’ आणि अशी दुसरी कोणतीही आज्ञा असेल तर ‘तू जशी आपल्यावर तशीच आपल्या शेजार्‍यावर प्रीती कर’ या एका वचनात ती समावलेली आहे.

दिवसा शोभेल असे चालू या. दंगलीत व धुंदीत किंवा अमंगळपणात व कामातुरपणात किंवा कलहात व ईर्ष्येत राहू नये. तर तुम्ही प्रभू येशू ख्रिस्त परिधान करा आणि देहवासनांसाठी काही तरतुद करू नका.

मी अशी बातमी ऐकली आहे की, तुमच्यामध्ये व्यभिचार चालू आहे. ते असे की, आपणामध्ये कोणी आपल्या पित्याच्या दुसऱ्या पत्नीशी अनैतिक संबंध ठेऊन आहे. वास्तविक असले दुष्कृत्य परराष्ट्रीय लोकांमध्येही आढळणार नाही.

मी तुम्हास माझ्या पत्रात लिहिले होते की व्यभिचाऱ्याशी संबंध ठेवू नका. तथापी जगातले व्यभिचारी, लोभी, लुबाडणारे किंवा मूर्तिपुजक ह्यांची संगत मुळीच धरू नये असे माझे म्हणणे नाही; कारण मग तुम्हास जगातून बाहेर जावे लागेल. पण आता, मी तुम्हास लिहिले आहे की, ख्रिस्तात बंधू म्हणलेला असा कोणी जर व्यभिचारी, लोभी किंवा मूर्तिपुजक, निंदक, पिणारा किंवा लुबाडणारा असेल तर त्याच्याशी संबंध ठेवू नका; अशा मनुष्यांबरोबर जेवूही नका. (कारण जे मंडळीच्या बाहेर आहेत त्यांचा न्याय करण्याचा माझा काय संबंध?) त्याऐवजी जे मंडळीत आहेत त्यांचा न्याय तुम्ही करीत नाही काय? पण देव बाहेरच्यांचा न्याय करतो म्हणून ‘तुम्ही आपल्यामधून त्या दुष्ट मनुष्यास बाहेर काढा.’

अनीतिमानास देवाचे राज्य वतन मिळणार नाही, हे तुम्ही जाणत नाही काय? फसू नका; कोणीही व्यभिचारी, मूर्तिपुजक किंवा व्यभिचारी, विपरीत संभोग करू देणारे किंवा विपरीत संभोग करणारे, चोर, लोभी, दारूबाज, निंदा करणारे किंवा लुबाडणारे ह्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही. आणि तुम्ही कित्येकजण तसे होता; पण तुम्ही धुतले गेला आहा, तुम्ही पवित्र केले गेला आहात आणि प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने व आपल्या देवाच्या आत्म्याकडून तुम्ही नीतिमान ठरवले गेला आहात.

अन्न पोटासाठी आहे आणि पोट अन्नासाठी आहे पण देव त्या दोघांचाही नाश करील. पण व्यभिचारासाठी शरीर नाही, तर शरीर प्रभूसाठी आहे आणि शरीरासाठी प्रभू आहे.

तुमची शरीरे ख्रिस्ताचे अवयव आहेत, हे तुम्हास माहित नाही काय? मग मी ख्रिस्ताचे अवयव घेऊन ते वेश्येचे अवयव करू काय? तसे न होवो. तुम्ही हे जाणत नाही का की, जो वेश्येशी जोडला जातो तो तिच्याशी शरीराने एक होतो? कारण तो म्हणतो की, ती दोघे एकदेह होतील. पण जो प्रभूशी जोडला जातो तो त्याच्याशी आत्म्याने एकरूप होतो. व्यभिचारापासून दूर पळा. जे दुसरे कोणतेही पाप मनुष्य करतो ते त्याच्या शरीराबाहेर होते पण व्यभिचार करणारा आपल्या स्वतःच्या शरीराविरुद्ध पाप करतो.

आता तुम्ही मला लिहिलेल्या गोष्टींविषयी मी लिहित आहे; स्त्रीला स्पर्श न करणे हे पुरुषासाठी बरे आहे. तरीही व्यभिचार होत आहेत म्हणून प्रत्येक पुरुषाला आपली स्वतःची पत्नी असावी आणि प्रत्येक स्त्रीला आपला स्वतःचा पती असावा. पतीने पत्नीला तिचा हक्क द्यावा; आणि त्याचप्रमाणे पत्नीनेही पतीला द्यावा. पत्नीला तिच्या स्वतःच्या शरीरावर अधिकार नसतो, पण पतीला असतो; आणि त्याचप्रमाणे पतीलाही त्याच्या स्वतःच्या शरीरावर अधिकार नसतो, पण पत्नीला असतो. विषयसुखासाठी एकमेकाला वंचित करू नका, तुम्हास प्रार्थनेला वेळ देता यावा म्हणून एकमेकांच्या संमतीने ठराविक वेळेकरीता दूर राहा आणि मग पुन्हा एक व्हा यासाठी की, सैतानाने तुमच्या असंयमामुळे तुम्हास मोहात पाडू नये.

तथापि जर त्यास संयम करता येत नसेल तर त्यांनी लग्न करावे; कारण वासनेनी जळण्यापेक्षा लग्न करणे बरे.

जर एखाद्याला असे वाटते की, तो त्याच्या कुमारिकेच्या अपमानास कारण होत आहोत, ती उपवर झाली आहे आणि तसे अगत्यच आहे, तर जशी इच्छा असेल तसे त्याने करावे, तो पाप करीत नाही, त्याने लग्न करून घ्यावे.

ज्याप्रमाणे त्यांच्यातील काहीजणांनी केले तसे व्यभिचार आपण करू नये. त्याचा परिणाम असा झाला की, एका दिवसात तेवीस हजार लोक मरण पावले.

म्हणून मी खंबीरपणे उभा आहे असा जो विचार करतो त्याने आपण पडू नये म्हणून जपावे. जे मनुष्यास सामान्य नाही अशा कोणत्याही परीक्षेने तुम्हास घेरले नाही. परंतु देव विश्वसनीय आहे. तुम्हास सहन करता येते त्यापलीकडे तो तुमची परीक्षा घेणार नाही. परंतु त्या परीक्षेबरोबर, त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही तयार करील. म्हणजे तुम्हास सहन करणे शक्य होईल.

कारण आपल्याला, प्रत्येक जणाला, ख्रिस्ताच्या न्यायासनापुढे प्रकट झाले पाहिजे; ह्यासाठी की, शरीरात केलेल्या गोष्टींबद्दल प्रत्येक मनुष्यास त्याने जे जे केले असेल त्याचे प्रतिफळ मिळावे. ते चांगले असेल किंवा वाईट असेल.

प्रियांनो, आपल्यालाही अभिवचने मिळाली आहेत, म्हणून आपण देहाच्या व आत्म्याच्या प्रत्येक अशुद्धतेपासून स्वतःला शुद्ध करू आणि देवाच्या भयात राहून आपल्या पवित्र्याला पूर्ण करावे.

किंवा मी पुन्हा येईन तेव्हा माझा देव तुमच्यासमोर मला लीन करील आणि ज्यांनी पाप केले असून आपण केलेल्या अमंगळपणाचा, व्यभिचाराचा व कामातुरपणाचा ज्यांनी पश्चात्ताप केलेला नाही अशा पुष्कळ जणांसाठी मला शोक करावा लागेल.

म्हणून मी म्हणतो, आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देहाची वासना पूर्ण करणारच नाही. कारण देहवासना देवाच्या आत्म्याविरुद्ध आहे आणि आत्मा देहवासनेविरुद्ध आहे; हे परस्परांस विरूद्ध आहेत, यासाठी की जे काही तुम्ही इच्छिता ते तुम्ही करू नये. तुम्ही देवाच्या आत्म्याच्या प्रेरणेने चालवलेले आहात तर तुम्ही नियमशास्त्राच्या अधीन नाही. आता देहाची कामे उघड आहेत आणि ती हीः व्यभिचार, अमंगळपणा, कामातुरपणा, मूर्तिपूजा, जादूटोणा, वैर, कलह, ईर्ष्या, राग, विरोध, फुटी, गट, मत्सर, धुंदी, दंगल आणि ह्यांसारखी आणखी; ह्यांविषयी मी जसे पूर्वी सांगितले होते तसे आता आधी सांगतो की, या गोष्टी करणार्‍यांना देवाच्या राज्याचे वतन मिळणार नाही.

जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी देहाच्या भावना व वासनांसहित देहस्वभावाला वधस्तंभावर खिळले आहे.

फसू नका, देवाचा उपहास होणार नाही कारण मनुष्य जे काही पेरतो तेच पीक त्यास मिळेल. कारण जो आपल्या देहाकरता पेरतो त्यास देहाकडून नाशाचे पीक मिळेल, पण जो देवाच्या आत्म्याकरता पेरतो त्यास आत्म्याकडून सार्वकालिक जीवनाचे पीक मिळेल.

आम्ही सर्व यापूर्वी या अविश्वासणाऱ्यांमध्ये आपल्या शारीरिक वासनेने वागत होतो, शरीर आणि मनाच्या इच्छेप्रमाणे करत होतो व आम्ही स्वभावाने इतरांप्रमाणे राग येणारे लोक होतो.

त्यांनी स्वतःला कामातुरपणाला वाहून घेतले आहे व प्रत्येक प्रकारच्या अशुद्धतेला हावरेपणाला वाहून घेतले आहे.

जारकर्म, कोणत्याही प्रकारची अशुद्धता किंवा अधाशीपणा याचे तुमच्यामध्ये नाव व विचार येऊ नये, हे पवित्र जनासांठी योग्य नाही. तसेच कोणतेही लाजिरवाणे भाषण, मूर्खपणाचे बोलणे किंवा घाणेरडे विनोद तुमच्यात असू नयेत. ते योग्य नाही. परंतु त्याऐवजी उपकारस्तुती असावी. कारण तुम्ही हे समजा की, जो कोणी मनुष्य जारकर्मी, अशुद्ध किंवा लोभी म्हणजे मूर्तिपुजक आहे त्यास ख्रिस्ताच्या व देवाच्या राज्यात वतन नाही.

तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जारकर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ ह्याला मूर्तिपूजा म्हणावे, हे जिवे मारा.

कारण देवाची इच्छा ही आहे की, तुमचे पवित्रीकरण व्हावे, म्हणजे तुम्ही जारकर्मापासून दूर रहावे आणि तुमच्यातील प्रत्येकाला समजावे की, ज्याने त्याने आपल्या देहाला पवित्रतेने व आदरबुद्धीने आपल्या स्वाधीन कसे करून घ्यावे. देवाला न ओळखऱ्या परराष्ट्रीयांप्रमाणे वासनेच्या लोभाने करू नये.

कारण देवाने आपल्याला अशुद्धपणासाठी नव्हे तर पवित्रेतेसाठी पाचारण केले आहे. म्हणून जो कोणी नाकार करतो तो मनुष्याचा नव्हे तर तुम्हास आपला पवित्र आत्मा देणारा देव याचा नाकार करतो.

आणि आपल्याला हे ठाऊकच आहे की, नियमशास्त्र हे नीतिमान लोकांसाठी केलेले नाही तर आज्ञाभंग करणाऱ्या आणि विद्रोही, पापी, भक्तिहीन, अधर्मी, अशुद्ध, वडिलांना ठार मारणारे व आईला ठार मारणारे, मनुष्यघातक जारकर्मी, समलैंगीक, मनुष्यांचा व्यापार करणारे, खोटारडे, खोटी शपथ वाहणारे यांच्यासाठी आहे आणि शुद्ध शिकवणीविरुद्ध जर काही दुसरे असेल तर त्यासाठीही आहे.

पण तरुणपणाच्या वासनांपासून दूर पळ आणि जे प्रभूला शुद्ध अंतःकरणाने हाक मारतात व प्रभूवर विश्वास ठेवतात, अशांच्या बरोबर, नीतिमत्त्व, विश्वास, प्रीती आणि शांती यांच्यामागे लाग.

लोक स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ठ, निंदा करणारी, आई-वडीलांची आज्ञा न मानणारी, अनुपकारी, अधार्मिक इतरांवर प्रीती न करणारी, क्षमा न करणारी, चहाडखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी. विश्वासघातकी, उतावीळ, गर्वाने फुगलेली, देवावर प्रीती करण्यापेक्षा चैनीची अधिक आवड धरणारी अशी होतील; ते देवाच्या सेवेचे बाहेरचे स्वरूप चांगले राखतील परंतु त्याचे सामर्थ्य नाकारतील. त्यांच्यापासून नेहमी दूर राहा. मी हे म्हणतो कारण त्यांच्यांपैकी काही घरात शिरकाव करतात व पापाने भरलेल्या, सर्व प्रकारच्या वाईट अभिलाषांनी भरलेल्या, कमकुवत स्त्रियांवर ताबा मिळवतात.

ती आपल्याला असे शिकवते की, अभक्तीचा व जगीक वासनांचा त्याग करून, आपण या आताच्या युगात संयमाने, नीतिने व सुभक्तीने वागले पाहिजे.

कोणीही व्यभिचारी असू नये किंवा एका जेवणासाठी आपला वडील हक्क विकून टाकणाऱ्या एसावासारखे जगिक विचाराचे असू नये याकडे लक्ष द्या.

सर्वांनी लग्नाचा आदर करावा व अंथरूण निर्दोष असावे कारण जे व्यभिचारी व जारकर्मी आहेत अशा लोकांचा देव न्याय करील.

जो परीक्षा सोसतो तो धन्य आहे कारण परीक्षेत उतरल्यावर जो जीवनाचा मुकुट प्रभूने आपल्यावर प्रीती करणाऱ्यांस देऊ केला आहे तो त्यास मिळेल. कोणाची परिक्षा होत असता, तेव्हा त्याने असे म्हणू नये की “देवाने मला मोहात घातले.” कारण देवाला वाईट गोष्टींचा मोह पडणार नाही आणि तो कोणालाही मोहात पाडत नाही. तर प्रत्येकजण त्याच्या स्वतःच्या इच्छेनुसार मोहात पडतो व भुलवला जातो. मग इच्छा गर्भवती होऊन पापाला जन्म देते व पापाची पूर्ण वाढ झाल्यावर मरणाला उपजवते.

तुम्ही मागता आणि तुम्हास मिळत नाही; कारण तुम्ही वाईट वासना बाळगून मागता, म्हणजे आपण आपल्या चैनीसाठी खर्चावे म्हणून मागता. हे देवाशी अप्रामाणिक पिढी! जगाशी मैत्री म्हणजे देवाशी वैर हे तुम्ही जाणत नाही काय? म्हणून जो कोणी जगाचा मित्र होऊ इच्छितो तो देवाचा वैरी आहे.

तुम्ही आज्ञांकित मुले होऊन, तुमच्या पूर्वीच्या अज्ञानातील वासनांप्रमाणे स्वतःला वळण लावू नका.

माझ्या प्रियांनो, तुम्ही उपरी व प्रवासी असल्यामुळे मी तुम्हास विनंती करतो की, आत्म्याबरोबर लढाई करणार्‍या दैहिक वासनांपासून दूर रहा.

म्हणून ख्रिस्ताने देहाने दुःख सोसले आणि तुम्हीही त्याच्या वृत्तीची शस्त्रसामग्री परिधान करा कारण ज्याने देहात सोसले आहे तो पापापासून दूर झाला आहे. म्हणून अशा मनुष्याने आपल्या देहातील पुढील आयुष्य, मनुष्यांच्या वासनांसाठी नाही, पण देवाच्या इच्छेसाठी जगावे. कारण परराष्ट्रीयांच्या इच्छेप्रमाणे करण्यास गेलेला काळ पुरे झाला. तेव्हा तुम्ही कामातुरपणात, वासनांत, दारूबाजीत, दंगलीत, तसेच बदफैली व अमंगळ मूर्तिपूजेत आपल्या मार्गाने गेलात.

कारण जर देवाने पाप करणार्‍या देवदूतांनाही राखले नाही पण नरकात लोटून, गडद काळोखाच्या खाडयात न्यायासाठी अटकेत ठेवले; जर त्याने पहिले जग राखले नाही पण अभक्तांच्या त्या जगावर जलप्रलय आणून, नीतिमत्त्वाचा उपदेशक नोहा ह्यालाच केवळ इतर सात जणांसहित सुरक्षित ठेवले; जर त्याने सदोम व गमोरा या नगरांची राख करून त्यांना नाशाची शिक्षा दिली व पुढे जे लोक अभक्तीने वागतील त्यांच्यासाठी त्यांचे उदाहरण ठेवले, आणि तेथील दुराचार्‍यांचे, कामातुरपणाचे वागणे पाहून त्रस्त झालेल्या नीतिमान लोटाला त्याने सोडवले; कारण तो नीतिमान मनुष्य त्यांच्यात राहून पाहत असता व ऐकत असता, त्यांच्या स्वैराचाराची कृत्ये पाहून, दिवसानुदिवस, त्याच्या नीतिमान जिवाला यातना होत होत्या; तर जे धार्मिकांना त्यांच्या परीक्षेतून कसे सोडवावे व जे अनीतिमान लोकांस शिक्षा भोगत न्यायाच्या दिवसासाठी कसे राखून, ठेवावे हे प्रभूला कळते. विशेषतः अमंगळपणाच्या वासनेने देहोपभोगाच्या पाठीस लागणारे व अधिकार तुच्छ मानणारे ह्यांना कसे राखून ठेवावे हे प्रभूला कळते. स्वैर, स्वच्छंदी असे हे लोक, सत्तांविषयी वाईट बोलण्यात हे कचरत नाहीत.

त्यांच्या डोळ्यांत व्यभिचारिणी सदाची भरली आहे; त्यांना पापापासून दूर राहवत नाही. ते अस्थिर मनाच्या लोकांस मोह घालतात; त्यांचे जीव लोभाला सबकलेले आहे. ते शापग्रस्त लोक आहेत;

कारण जेव्हा, चुकीने वागणार्‍या लोकांमधून कोणी बाहेर निघाले असतील, तेव्हा हे लोक मूर्खपणाच्या, मोठ्या, फुगीर गोष्टी बोलून, त्यांना देहाच्या वासनांद्वारे कामातुरपणाने भूरळ घालतात.

प्रथम हे ध्यानात ठेवा की, स्वतःच्या वासनेप्रमाणे चालणारे, थट्टाखोर लोक शेवटल्या दिवसात थट्टा करीत येऊन म्हणतील,

कारण जगात जे सर्व आहे ते, म्हणजे देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराविषयीची फुशारकी ही पित्यापासून नाहीत, तर जगापासून आहेत. जग व जगातील वासना नाहीशा होत आहेत. पण जो देवाच्या इच्छेप्रमाणे करतो तो सर्वकाळपर्यंत जगेल.

कारण, जे या दंडासाठी पूर्वीपासून नेमलेले, असे कित्येकजण चोरुन आत आले आहेत; ते भक्तिहीन लोक आहेत, त्यामुळे ते आपल्या देवाची कृपा पालटून तिला कामातुरपणाचे स्वरूप देवून आपला एकच स्वामी व प्रभू येशू ख्रिस्त ह्याला नाकारतात.

आणि ज्या देवदूतांनी आपले अधिकारपद न सांभाळता आपले स्वतःचे योग्य वस्तीस्थान सोडले त्यांना त्याने सर्वकाळच्या बंधनामध्ये निबीड काळोखामध्ये महान दिवसाच्या न्यायाकरिता राखून ठेवले आहे; सदोम व गमोरा आणि त्यांच्या आसपासची इतर नगरे, ह्यांनी त्यांच्याप्रमाणेच जारकर्मे केली व परदेहाच्या मागे लागली आणि ती उदाहरण म्हणून, सर्वकाळच्या अग्नीची शिक्षा भोगीत ठेवली आहेत. तसेच हे, स्वप्न पाहणारेही देहाला विटाळवतात, ते अधिकार तुच्छ मानतात व स्वर्गदुतांची निंदा करतात.

पण तुझ्याविरुद्ध माझ्याजवळ काही गोष्टी आहेत कारण मूर्तींना वाहिलेली अर्पणे खाणे व व्यभिचार करणे, हा अडथळा इस्राएलाच्या संतानापुढे ठेवण्यास बालाकाला ज्याने शिकविले, त्या बलामाची शिकवण ज्यांनी स्वीकारली आहे असे लोक तुझ्याजवळ आहेत.

परंतु तुमच्याविरुध्द माझे म्हणणे आहेः ईजबेल नावाची स्त्री जी स्वतःला संदेष्टी म्हणविते आणि ती तिच्या शिकवणीने माझ्या दासांना अनैतिक व्यभिचाराचे पाप व मूर्तींना वाहिलेले अन्न खावयास भूलविते. तरी तुम्ही तिला खुशाल तसे करू देता. मी तिला पश्चात्ताप करण्यासाठी वेळ दिला आहे परंतु ती आपल्या व्यभिचाराचा पश्चात्ताप करू इच्छीत नाही. पाहा, म्हणून मी तिला अंथरूणावर खिळून टाकीन आणि जे तिच्याबरोबर व्यभिचार करतात ते जर आपल्या कामांचा पश्चात्ताप करणार नाहीत तर मी त्यांना मोठ्या संकटात पाडीन.

आणि त्यांनी केलेल्या खुनाविषयी ‘जादूटोणा, व्यभिचार व चोऱ्या’ ह्यांबद्दलहि पश्चात्ताप केला नाही.

मग आणखी एक देवदूत त्याच्या मागोमाग आला आणि म्हणाला, “पडली, मोठी बाबेल पडली! कारण तिने सर्व राष्ट्रांना तिच्या व्यभिचाराचा क्रोधरूपी द्राक्षारस पाजला आहे.”

मग त्या सात वाट्या घेणारे जे सात देवदूत होते त्यांच्यातला एक येऊन माझ्याशी बोलला आणि म्हणाला, “ये, त्या अनेक जलांवर जी बसली आहे त्या महावेश्येचा न्यायनिवाडा मी तुला दाखवतो. पृथ्वीच्या राजांनी ‘तिच्याबरोबर जारकर्म केले’ आणि पृथ्वीवर राहणारे ‘तिच्या’ जारकर्माच्या द्राक्षारसाने मस्त झाले.”

कारण ‘तिच्या’ व्यभिचाराचे मद्य जे वेड लावणारे आहे ते ‘सर्व राष्ट्रे प्याली आहेत आणि पृथ्वीच्या राजांनी तिच्याबरोबर व्यभिचार केला आहे; तिच्या शक्तीशाली संपत्तीने व ऐषोआरामाने पृथ्वीचे व्यापारी श्रीमंत झाले आहेत.’

“आणि ज्यांनी तिच्याबरोबर जारकर्म केले,” जे तिच्याबरोबर विलासात राहिले, ते पृथ्वीचे राजे तिच्या जळण्याचा धूर पाहतील, तेव्हा तिच्याकरता ‘रडतील आणि ऊर बडवतील.’

कारण त्याचे न्याय खरे आणि ‘नीतीचे’ आहेत; कारण ज्या महावेश्येने आपल्या व्यभिचारी वागण्याने पृथ्वी भ्रष्ट केली तिचा त्याने न्यायनिवाडा केला आहे. आणि आपल्या ‘दासांच्या रक्ताबद्दल तिचा सूड घेतला आहे.’

पण भेकड, अविश्वासू, अमंगळ, खुनी, जारकर्मी, चेटकी, मूर्तिपुजक आणि सगळे लबाड ह्यांना अग्नीने आणि गंधकाने जळणार्‍या सरोवरात वाटा मिळेल; हे दुसरे मरण होय.”

Marathi - मराठी - MR

MRIRV'17 - Marathi Indian Revised Version - 2017

This Bible text is from Marathi Indian Revised Version IRV 2019
https://open.bible/bibles/marathi-bridge-text-bible/
provided by: Bridge Connectivity Solutions Pvt Ltd, available by Creative Commons CC-BY-SA-4.0,
and this new compilation is shared as www.creativecommons.org/licenses/by-sa/4.0.
Languages are made available to you by www.ipedge.net