24 – कुटुंब
हे सर्वशक्तिमान देवाचे पवित्र शब्द आहेत.
माणसांच्या बोलण्यात आपल्याला रस नसतो.
देवावर प्रेम करणार् या प्रत्येकासाठी... याबद्दल देव असे म्हणतो: कुटुंब.
हे सर्वशक्तिमान देवाचे पवित्र शब्द आहेत.
माणसांच्या बोलण्यात आपल्याला रस नसतो.
देवावर प्रेम करणार् या प्रत्येकासाठी... याबद्दल देव असे म्हणतो: कुटुंब.
मी आज दिलेल्या आज्ञा तुमच्या कायम लक्षात असू द्या. त्या आपल्या मुलाबाळांनाही शिकावा. घरी, दारी, झोपता-उठताना, त्याविषयी बोलत राहा.
”“म्हणून याकारणास्तव पुरूष त्याचे वडील व आई यांना सोडील व त्याच्या पत्नीशी जडून राहील आणि ते दोघे एकदेह होतील.” हे गुढ सत्य फार महत्त्वाचे आहे आणि मी हे सांगत आहे की ते ख्रिस्त व मंडळीला लागू पडते. तरीही, तुमच्यातील प्रत्येकाने त्याच्या स्वतःच्या पत्नीवर प्रेम केले पाहिजे व पत्नीनेही पतीचा मान राखला पाहिजे.
”मुलांनो, प्रभूमध्ये आपल्या आई-वडीलांच्या आज्ञा पाळा कारण हे योग्य आहे. “आपल्या वडिलांचा व आईचा मान राख, यासाठी की तुझे सर्वकाही चांगले व्हावे व तुला पृथ्वीवर दीर्घ आयुष्य लाभावे.” अभिवचन असलेली हीच पहिली आज्ञा आहे. आणि वडिलांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिडीस आणू नका पण तुम्ही त्यांना प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात वाढवा.
”तेव्हा देवाने आपल्या प्रतिरुपाचा मनुष्य निर्माण केला; देवाचे प्रतिरुप असा तो निर्माण केला; नर व नारी अशी ती निर्माण केली. देवाने त्यांना आशीर्वाद दिला; देव त्यांना म्हणाला, “फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा आणि पृथ्वी व्यापून टाका; ती आपल्या सत्तेखाली आणा; समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी आणि पृथ्वीवर फिरणारा प्रत्येक सजीव प्राणी यांवर सत्ता चालवा.”
”नंतर परमेश्वर बोलला, “मनुष्याने एकटे असावे हे बरे नाही; मी त्याच्यासाठी योग्य मदतनीस निर्माण करीन.” परमेश्वराने मातीतून शेतातील सर्व जातीचे प्राणी आणि आकाशातील सर्वजातीचे पक्षी उत्पन्न केले आणि त्यांना मनुष्याकडे नेले आणि मनुष्याने म्हणजे आदामाने त्या सर्वांना नावे दिली. आदामाने सर्व पाळीव प्राणी, आकाशातील सर्वपक्षी आणि सर्व वनपशू म्हणजे जंगलातील, रानावनातील जनावरे यांना नावे दिली. आदामाने हे सर्व पशू - पक्षी पाहिले परंतु त्याला त्यांच्यात आपणासाठी योग्य असा मदतनीस सापडला नाही.
”तेव्हा परमेश्वर देवाने आदामाला गाढ झोप लागू दिली. आणि तो झोपला असता परमेश्वराने आदामाच्या शरीरातून एक फासळी काढली व ती जागा चमडचाने बंद केली. तेव्हा ती मांसाने भरुन आली. परमेश्वराने आदामाची फासळी काढून तिची स्त्री बनवली आणि तिला आदामाकडे नेले. 2तेव्हा आदाम म्हणाला,“आता ही मात्र माझ्यासारखी आहे. तिची हाडे माझ्या हाडा पासून व तिचे शरीर माझ्या शरीरापासून बनवले आहे. मी तिला स्त्री म्हणजे नारी असे नाव देतो. कारण ती नरापासून बनवलेली आहे.”
”म्हणून मनुष्य आपल्या आईबापांस सोडून आपल्या बायकोला जडून राहील आणि ते दोघे एक देह होतील. एदेन बागेत आदाम व त्याची बायको ही दोघे नग्न होती. परंतु त्यांना कसलीच लाज वाटत नव्हती.
”आदाम म्हणाला, “तू ही स्त्री माझ्यासाठी मदतनीस म्हणून दिलीस. तिने त्या झाडाचे फळ मला दिले आणि म्हणून मी ते खाल्ले.” मग परमेश्वर त्या स्त्रीला म्हणाला, “तू हे काय केलेस?”ती स्त्री म्हणाली, “सर्पाने मला भुरळ घालून फसविले व म्हणून मी ते फळ खाल्ले.”
”तू व स्त्री, यांस मी एकमेकांचे शत्रु करीन. तुझी संतती आणि तिची संतती एकमेकाचे शत्रू होतील तिच्या संततीच्या पायाची तू टाच फोडशील पण तो तुझे डोके ठेचील नंतर परमेश्वर स्त्रीला म्हणाला,“तू गरोदर असताना तुला त्रास होईल आणि मुलांना जन्म देते वेळी तुला खूप वेदना होतील. तरी तुझी ओढ तुझ्या नवऱ्याकडे राहील; आणि तो तुझ्यावर अधिकार चालवील.” नंतर परमेश्वर देव आदामाला म्हणाला,“त्या विशेष झाडाचे फळ खाऊ नको अशी मी तुला आज्ञा दिली होती परंतु तू तुझ्या बायकोने सांगितलेल्या गोष्टी ऐकल्यास आणि त्या झाडाचे फळ खाल्लेस. तेव्हा मी तुझ्यामुळे भूमीला शाप देत आहे. तू तिजपासून अन्न मिळविण्यासाठी जन्मभर अतिशय कष्ट करशील;
”आदामाने आपल्या बायकोचे नाव हव्वा ठेवले. या जगात जन्म घेणाऱ्या सर्व माणसांची ती आई आहे म्हणून आदामाने तिला हे नाव दिले.
”आदाम आणि त्याची बायको हव्वा यांचा लैगिक संबंध आला; हव्वा गर्भवती होऊन तिने एका बाळाला जन्म दिला. त्या मुलाचे नाव काइन असे ठेवले.तेव्हा हव्वा म्हणाली, “परमेश्वराच्या सहाय्याने मला पुरुषसतांन लाभले आहे.” त्यानंतर हव्वेने आणखी एका बाळाला जन्म दिला. हा मुलगा म्हणजे काइनाचा भाऊ हाबेल होता. हाबेल मेंढपाळ झाला; काइन शेतकरी झाला. काही काळानंतर हंगामाचे वेळी काइनाने परमेश्वराला आदराने दान देण्यासाठी आपल्या शेतातील उत्पन्नातून काही अर्पण आणले. हाबेलानेही आपल्या कळपातील काही मेंढरे देवाला अर्पण म्हणून आणली. त्याने मेंढरांचे सर्वात उत्तम भाग आणले.परमेश्वराने हाबेलाचे अर्पण स्वीकारले. परतुं काइन आणि त्याचे अर्पण स्वीकारले नाही. यामुळे काइन फार दु:खी झाला व त्याला फार राग आला परमेश्वराने काइनाला विचारले, “तू का रागावलास? तुझा चेहरा दु:खी का दिसत आहे? तू जर चांगल्या गोष्टी करशील तर तुझे माझे संबंध चांगले राहतील, मग मी तुझा स्वीकार करीन; परंतु तू जर वाईट रीतीने चालशील तर ते पाप तुझ्यात राहील व ते पाप तुझ्यावर सत्ता चालवू पाहील; पण तू त्या पापावर सत्ता चालवली पाहिजेस.” काइन आपला भाऊ हाबेल यास म्हणाला, “चल, आपण जरा शेतात जाऊ या. “तेव्हा काइनाने हाबेलाला बाहेर शेतात नेले. तेव्हा काइनाने आपला भाऊ हाबेल यावर हल्ला केला व त्याला ठार मारले. काही वेळाने परमेश्वर काइनास म्हणाला, “तुझा भाऊ हाबेल कोठे आहे?”काइनाने उत्तर दिले, “मला माहीत नाही; माझ्या भावावर नजर ठेवणे व त्याची काळजी घेणे हे माझे काम आहे काय?” नंतर परमेश्वर म्हणाला, “तू हे काय केलेस? तू तुझ्या भावाला ठार केलेस. त्याचे रक्त मला जमिनीतून हाका मारीत आहे; त्याचे रक्त तुझ्या हातातून घेण्यास भूमीने आपले तोंड उघडले आहे. ह्याच कारणाने तू शापित आहेस. भूमी तुला नकारेल.
”आदामाच्या वंशावळीची नोंद अशी आहे. देवाने मनुष्य आपल्या प्रतिरुपाचा म्हणजे आपल्या सारखा निर्माण केला. देवाने त्यांस नर व नारी असे उत्पन्न केले. देवाने त्यांस ज्या दिवशी उत्पन्न केले त्याच दिवशी देवाने त्यांस आशीर्वाद दिला व त्यांस “आदाम” म्हणजे मनुष्य हे नाव दिले.
”आदाम एकशेतीस वर्षांचा झाल्यावर त्याला त्याच्या प्रतिरुपाचा म्हणजे हुबेहूब त्याच्या सारखा दिसणारा मुलगा झाला. त्याने त्याचे नाव शेथ ठेवले; शेथ जन्मल्यानंतर आदाम आठशें वर्षे जगला आणि या काळात त्याला आणखी मुलगे व मुली झाल्या. अशा रीतीने आदाम एकंदर नऊशेतीस वर्षे जगला; नंतर तो मरण पावला.
”पृथ्वीवरील मनुष्यांची संख्या वाढतच राहिली आणि त्यांना मुली झाल्या;
”नंतर परमेश्वर नोहाला म्हणाला, “या काळातील दुष्ट लोकात माझ्यासमोर तूच एक नीतिमान माणूस आहेस असे मला आढळले आहे; तेव्हा तुझ्या कुटुंबातील सर्वांना घेऊन तारवात जा.
”देवाने नोहाला व त्याच्या मुलांना
”परमेश्वर अब्रामाला म्हणाला,“तू आपला देश, आपले गणगोत व आपल्या बापाचे घर सोड; आणि मी दाखवीन त्या देशात जा. मी तुला आशीर्वाद देईन; तूझ्या पासून मोठे राष्ट्र निर्माण करीन; मी तुझे नाव मोठे करीन, लोक तुझ्या नावाने इतरांना आशीर्वाद देतील, जे लोक तुला आशीर्वाद देतील त्यांना मी आशीर्वाद देईन, आणि जे लोक तुला शाप देतील त्यानां मी शाप देईन. तुझ्यामुळे पृथ्वीवरील सर्वलोक आशीर्वादित होतील.”
”“आपल्या करारातील माझा भाग हा असा; मी तुला अनेक राष्ट्रांचा महान पिता करीन; मी तुझे नाव बदलतो; तुझे नाव अब्राम असणार नाहीं तर तुझे नाव अब्राहाम होईल; मी तुला हे नाव देत आहे कारण तू अनेक राष्ट्रांचा पिता होशील. मी तुला भरपूर संतती देईन; तुझ्यापासून नवीन राष्ट्रे उदयास येतील, आणि राजे उत्पन्न होतील. आणि मी तुझ्यामध्ये व माझ्यामध्ये एक करार करतो हा करार तुझ्या वंशजानांही पिढ्यानपिढ्या कायम लागू राहिल; मी तुझा व तुझ्या वंशजांचा देव होईन.
”देव अब्राहामाला म्हणाला, “तुझी बायको साराय हिला मी नवीन नाव देतो, तिचे नाव सारा असे होईल. मी तिला आशीर्वादीत करीन; मी तिला मुलगा देईन आणि तू बाप होशील. सारा अनेक राष्ट्रांची माता होईल राष्ट्रांचे राजे तिच्या पासून निपजतील.” अब्राहामाने देवाला लवून नमन केले, परंतु स्वत:शीच हसून तो म्हणाला, “मी शंभर वर्षांचा आहे; मला मुलगा होणे शक्य नाहीं; आणि सारा नव्वद वर्षांची आहे; तिला मूल होऊ शकणार नाहीं.”
”मी अब्राहामाबरोबर एक विशेष करार केलेला आहे, तो यासाठी की त्याने आपल्या मुलांना व वंशजाना देवाच्या इच्छेप्रमाणे चालण्याची आज्ञा करावी आणि त्यांनी न्यायनीतीने चालावे; मग मी परमेश्वर त्याला मी दिलेल्या वचनाप्रमाणे जे द्यायचे ते देईन.”
”परमेश्वराने साराला दिलेले वचन पाळले व पूर्ण केले. सारा गरोदर राहिली आणि अब्राहामाच्या म्हातारपणी तिने त्याला मुलगा दिला. ह्या सगळ्या गोष्टी परमेश्वराने वचन दिल्याप्रमाणे अगदी जशाच्या तशाच घडून आल्या. अब्राहामापासून साराला मुलगा झाला आणि त्याने त्याचे नाव इसहाक ठेवले.
”6मग इसहाकाने मुलीला आपल्या आईच्या तंबूत आणले; त्या दिवशी रिबका त्याची बायको झाली; इसहाकाचे रिबकेवर फार प्रेम जडले; त्यामुळे आपल्या आईच्या मरणानंतर रिबकेमुळे त्याला समाधान मिळाले.
”तसेच मी तुला भरपूर वंशज देईन; तुझे वंशज पृथ्वीवरील मातीच्या कणाइतके अगणित होतील; ते उत्तर व दक्षिण, पूर्व व पश्चिम या दिशांकडील देशात पसरतील; तुझ्यामुळे व तुझ्या वंशजांमुळे पृथ्वीवरील सर्व लोक आशीर्वादित होतील.
”याकोबाचे राहेलीवर प्रेम जडले होते; म्हणून याकोब लाबानमामास म्हणाला, “तुम्ही मला तुमच्या धाकट्या मुलीशी राहेलीशी लग्न करण्याची परवानगी देणार असाल तर मी तुमच्या घरी सात वर्षे तुमची सेवाचाकरी करीन.” लाबान म्हणाला, “परक्या कोणापेक्षा तिने तुझ्याशी लग्न करावे हे तिच्यासाठी चांगले आहे; म्हणून तू आता माझ्यापाशी राहा.” म्हणून मग याकोब आपल्या मामापाशी राहिला आणि त्याने सात वर्षे त्याची सेवाचाकरी केली; परंतु राहेलीवरील गाढ प्रेमामुळे ती वर्षे त्याला फार थोड्या दिवसासारखी वाटली.
”याकोबापासून आपल्याला मुले होत नाहीन हे पाहिल्यावर राहेल आपली बहीण लेआ हिचा मत्सर करु लागली; तेव्हा राहेल याकोबला म्हणाली, “मला मुले देणारी करा नाही तर मी मरेन.” याकोब राहेलीवर रागावला; तो म्हणाला, “तुला पुत्रवती करायला मी काय देव आहे? देवानेच तुला मुले होऊ नयेत असे करुन ठेवले आहे.”
”परमेश्वर याकोबाला म्हणाला, “तुझे पूर्वज ज्या देशात राहिले त्या तुझ्या देशास तू परत जा, आणि मी तुझ्याबरोबर असेन.”
”तेव्हा याकोब आपल्या घरच्या मंडळीस व आपल्याबरोबरच्या सगळ्या दासांना म्हणाला, “तुमच्या जवळ असलेले लाकडांचे व धातूंचे परके देव फोडून तोडून टाका; तुम्ही स्वत:ला शुद्ध करा; स्वच्छ कपडे घाला;
”आता मात्र अधिक वेळपर्यंत योसेफाला आपले दु:ख रोखून धरता येईना. तेव्हा तेथे हजर असलेल्या सर्व लोकां देखत तो मोठ मोठयाने रडू लागला. तो म्हणाला, “येथील इतर सर्व लोकांना येथून निघून जाण्यास सांगा.” तेव्हा तेथील सर्वजण निघून गेले; केवळ त्याचे भाऊच त्याच्यापाशी राहिले; मग योसेफाने आपली ओळख दिली. तो एकसारखा रडत होता. फारोच्या वाडयातील मिसरच्या लोकांनी व फारोच्या घराण्यातील लोकांनीही त्याचे रडणे ऐकले. मग योसेफ हूंदके देत आपल्या भावांना म्हणाला, “प्रिय भावांनो! तुमचा भाऊ योसेफ -- मीच आहे!” मग गहिंवर आवरुन योसेफ पुढे म्हणाला, “माझा बाप खुशाल आहे ना!” परंतु त्याचे भाऊ आश्चर्याने चकित झाले; ते एवढे घाबरले व गोंधळले की त्यांच्या तोंडून शब्द फुटेना!
”आपला बाप जवळ येत आहे असे योसेफास समजले; तेव्हा तो आपला रथ तयार करुन आपला बाप इस्राएल याच्या भेटीस गोशेन प्रांतात त्याला सामोरा गेला. योसेफाने आपल्या बापास पाहिले तेव्हा त्याने त्याच्या गळ्यास मिठी मारली व त्याच्या गळ्यातगळ घालून तो बराच वेळ रडला.
”योसेफाने फारोचे म्हणणे मानले व त्याने आपल्या बापाला व भावांना मिसरमधील सर्वात उत्तम भूमीचा रामसेस नगरजवळील प्रांत त्यांना राहावयास दिला. आणि त्याने आपला बाप, आपले भाऊ व त्यांच्या घरचे सर्व यांना भरपूर अन्नसामग्री पुरवली.
”त्यांची उपासना करू नको; किंवा त्यांची सेवा करु नकोस; कारण मी परमेश्वर तुझा देव आहे;मी ईर्ष्यावान देव आहे, जे माझ्याविरुद्ध पाप करतात, माझा द्वेष करतात ते माझे शत्रू बनतात; मी त्यांना शिक्षा करीन; मी त्यांच्या मुलांना तिसऱ्या चौथ्या पिढीपर्यंत वडिलांच्या अपराधाबद्दल शिक्षा करतो;
”“तू आपल्या बापाचा व आपल्या आईचा मान राख म्हणजे त्यामुळे परमेश्वर तुझा देव जो देश तुला देत आहे त्या देशात तुला दीर्घायुष्य लाभेल.
”“जो माणूस आपल्या आईबापास मारहाण करील त्याला अवश्य ठार मारावे.
”विधवा किंवा अनाथ यांना तुम्ही कधीही त्रास देऊ नये;
”परमेश्वर हजारो लोकांवर दया करतो; तो लोकांच्या वाईट कर्माची त्यांना क्षमा करतो; परंतु तो दोषी लोकांना शिक्षा करावयास विसरत नाही; परमेश्वर फक्त लोकांनाच शिक्षा करतो असे नाही परंतु त्यांची मुले, त्यांची नातवंडे व पतवंडे ह्यांना म्हणजे त्यांच्या तिसऱ्या चौथ्या पिढीपर्यंत, त्यांच्या पूर्वजाच्यां अपराधाबद्दल शिक्षा भोगावयास लावतो.”
”त्या लोकातील मुलींची तुम्ही आपल्या मुलांसाठी बायका म्हणून कदाचित् निवड कराल; त्या मुली तर खोट्या दैवतांची उपासना करत असतील तर, त्या कदाचित् तुमच्या मुलांना देखील त्यांची उपासना करावयास लावतील.
”तुमच्यातील प्रत्येकाने आपली आई व आपला बाप ह्यांचा मान राखलाच पाहिजे आणि माझे शब्बाथ पाळलेच पाहिजेत; मी तुमचा देव परमेश्वर आहे!”
”“आपल्या मनात आपल्या भावाचा द्वेष बाळगूं नका; आपल्या शेजाऱ्याने चुकीचे काही कृत्य केल्यास त्याची कान उघाडणी करावी, परंतु त्याच्या अपराधामध्ये सहभागी होऊ नये.
”“जो माणूस आपल्या बापाला किंवा आपल्या आईला शिव्याशाप देईल त्याला अवश्य जिवे मारावे;त्याने आपल्या बापाला व आपल्या आईला शिव्याशाप दिला आहे म्हणून त्याच्या रक्तपाताची जबाबदारी त्याच्याच माथी राहील.
”याजक पवित्रपणे देवाची सेवा करतात म्हणून त्यांनी भ्रष्ट झालेल्या स्त्रीला, वेश्येला, किंवा नवऱ्याने टाकलेल्या स्त्रीला आपली बायको करुन घेऊ नये.
”“त्याने कुमारिकेशीच लग्न करावे, भ्रष्ट झालेली स्त्री, वेश्या किंवा टाकलेली स्त्री अथवा विधवा स्त्री ह्यापैकी कोणाही स्त्रीला त्याने बायको करुन घेऊ नये; तर त्याने आपल्या लोकांतील एखाद्या कुमारिकेशीच लग्न करावे.
”तेव्हा द्वेषासंबंधी हा नियम आहे. एखाद्या स्त्रीने आपल्या नवऱ्याविरुद्ध जर पाप केले तर तू ही अशी कारवाई करावी. किंवा एखाद्या पुरुषाने आपल्या बायकोने आपल्या विरुद्ध पाप केले आहे असा संशय व द्वेष, धरला तर त्या माणसाने अशी कारवाई करावी; याजकाने त्या स्त्रीला परमेश्वरासमोर उभे करावे व सांगितलेल्या नियमाप्रमाणे तिच्याविरुद्ध कारवाई करावी. मग नवरा अधर्म करण्यापासून मुकत होईल परंतु जर स्त्रीनेपाप केले असेल तर तिला त्रास भोगावा लागेल.”
”“सलाफहादच्या मुलींचे म्हणणे बरोबर आहे. त्यांच्या वडिलांच्या भावांना मिळणाऱ्या जमिनीत त्यांचाही वाटा असायला पाहिजे. म्हणून त्यांच्या वडिलांना जी जमीन मिळाली असती ती त्यांना दे.” “इस्राएल लोकांसाठी हा नियम कर: ‘जर एखाद्याला मुलगा नसला आणि तो मेला तर त्याच्या मुलींना त्याचे सर्व काही मिळावे. जर त्याला मुलीही नसल्या तर त्याची मिळकत त्याच्या भावांना मिळावी. जर त्याला भाऊही नसला तर त्याच्या वस्तू त्याच्या वडिलांच्या भावाला मिळाव्या. जर त्याच्या वडिलांना भाऊ नसेल तर त्याची सगळी मिळकत घरातल्या सगव्व्यात जवळच्या नातेवाईकाला मिळावी.”‘ इस्राएल लोकांमध्ये हा कायदा असावा अशी आज्ञा परमेशवराने मोशेला केली. हा इस्राएली लोकांचा कायदा व्हावा.
”सलाफहादच्या मुलींसाठी परमेश्वराची ही आज्ञा आहे: “जर तुम्हाला कोणशी लग्न करायचे असेल तर तुम्ही तुमच्या कुळातील कोणाशी तरी लग्न करा. यामुळे इस्राएल लोकांमध्ये जमीन एका कुळाकडून दुसऱ्या कुळाकडे जाणार नाही. आणि प्रत्येक इस्राएली माणसाला त्याच्या पूर्वजांकडून मिळालेली जमीन ठेवता येईल. आणि जर एखाद्या स्त्रीला तिच्या वडिलांकडून जमीन मिळाली तर तिने तिच्या कुळातील एखाद्याशीच लग्न केले पाहिजे. यामुळे प्रत्येकाला पूर्वजांकडून मिळालेली जमीन ठेवता येईल. तेव्हा इस्राएल लोकांमध्ये जमीन एक कुळाकडून दुसऱ्या कुळाकडे जाऊ शकणार नाही. प्रत्येक इस्राएली माणूस त्याच्या पूर्वजांकडून मिळालेली जमीन जवळ बाळगू शकेल.”
”पण तुम्ही हे डोळ्यांत तेल घालून जपले पाहिजे. नाही तर तुम्ही ज्या गोष्टी पाहिल्या आहेत त्या विसरुन जाल. आपल्या मुला नातवंडांना त्याची माहिती द्या. तुम्ही सर्व होरेब पर्वतापाशी परमेश्वरासमोर उभे होतात तो दिवस आठवा. परमेश्वर मला म्हणाला होता, ‘मला काही सांगायचे आहे तेव्हा सर्वांना एकत्र बोलाव. म्हणजे आयुष्यभर ते माझ्याबद्दल आदर बाळगतील. आपल्या मुलबाळांनाही तशीच शिकवण देतील.’
”“आपल्या आईवडलांचा आदर ठेवा. ही तुमचा देव परमेश्वर ह्याची आज्ञा आहे. हिचे पालन केले तर तुम्हाला दीर्घायुष्य मिळेल. तुम्हाला दिलेल्या प्रदेशात तुमचे कल्याण होईल.
”मी आज दिलेल्या आज्ञा तुमच्या कायम लक्षात असू द्या. त्या आपल्या मुलाबाळांनाही शिकावा. घरी, दारी, झोपता-उठताना, त्याविषयी बोलत राहा.
”त्यांच्याशी सोयरीक जुळवू नका. आपल्या मुली त्यांना देऊ नका. त्याच्या मुली आपल्या मुलांना करुन घेऊ नका. कारण हे लोक तुमच्या मुलांना माझ्यापासून विचलीत करतील. त्यामुळे तुमची मुले अन्य दैवतांचे भजनपूजन करतील. अशाने परमेश्वराचा तुमच्यावर कोप होईल व तो तात्काळ तुमचा नाश करील.खोट्या देवांचा नाश करा
”अनाथांना, विधवांना इतकेच काय शहरात आलेल्या नवख्यांनाही साहाय्य करतो. त्यांना अन्न वस्त्र पुरवतो.
”आपल्या मुलाबाळांना हे नियम शिकवा. घरीदारी, झोपताना, झोपून उठताना त्याविषयी बोलत राहा.
”मी दिलेल्या या सर्व आज्ञांचे पालन काळजीपूर्वक करा. जे तुमचा देव परमेश्वर ह्याच्या दृष्टिने चांगले व उचित आहे ते केल्याने तुमचे व तुमच्या मुलाबाळांचे निरंतर कल्याण होईल.
”हा सणही मुलंबाळं, नोकरचाकर, लेवी, शहरातील वाटसरु, अनाथ, विधवा, यांच्यासह साजरा करा.
”तसेच त्याला बऱ्याच बायका असू नयेत. कारण त्याने तो परमेश्वरापासून परावृत होईल. सोन्या-रुप्याचाही फार साठा त्याने करु नये.
”तसेच, वाडग निश्चय होऊन अजून लग्न झालेले नाही असा कोणी असल्यास त्याने परत जावे. कारण तो युद्धात कामी आल्यास त्याच्या वाग्दत्त वधूशी दुसरा कोणी लग्न करील.’
”“एखाद्याला दोन बायका असतील आणि त्याचे एकीवर दुसरीपेक्षा जास्त प्रेम असेल. दोघींना मुले असतील. पण नावडतीचा मुलगा सगळ्यात मोठा असेल. अशा परिस्थितीत, आपल्या मालमत्तेची वाटणी करताना ज्येष्ठ मुलाच्या वाटणीचे, आवडतीच्या मुलाला देऊ नये. त्याने आपल्या ज्येष्ठ पुत्राचा नावडतीचा मुलगा असला तरी स्वीकार केला पाहिजे. तसेच आपल्या एकंदर मालमत्तेतील दुप्पट वाटा त्याला दिला पाहिजे. कारण तो ज्येष्ठ पुत्र आहे. व त्यालाच जेष्ठपणाचा हक्क आहे.
”“एखाद्याचा मुलगा हट्ठी अजिबात न ऐकणारा, आईबापांना न जुमानणारा निघतो. शिक्षा केली तरी काही फरक पडत नाही. अशावेळी आईवडलांनी त्याला गावच्या चावडीवर वडीलधाऱ्यांपुढे न्यावा. त्यांनी सांगावे की, हा उद्दाम आहे. आमचे ऐकत नाही. तसेच तो खादाड व मद्यपी आहे. यावर त्या गावातील माणसांनी या मुलाला दगडांनी मरेपर्यंत मारावे. असे केल्याने तुम्ही हे पाप आपल्यामधून काढून टाकाल. इस्राएलमधील इतर लोकांच्या कानावर ही गोष्ट गेली की ते घाबरुन राहतील.
”“एखाद्या माणसाला लग्न केल्यावर बायकोशी शरीरसंबंध ठेवल्यावर काही काळानंतर बायको आवडेनाशी झाली आणि “मी या बाईशी लग्र केले पण ती कुमारी नसल्याचे आमच्या शरीरसंबंधाच्या वेळी मला आढळून आले’ असा खोटा आरोप त्याने तिच्यावर ठेवला तर लोकांमध्ये तिची बदनामी होईल. अशा वेळी त्या मुलीच्या आईवडिलांनी तिच्या कौमार्याचा पुरावा घेऊन गावच्या चावडीवर वडीलधाऱ्या पंचाकडे जावे. ‘मी या पुरुषाशी माझ्या मुलीचे लग्न लावून दिले आहे. पण आतां ती त्याला नकोशी झाली आहे. त्याने तिच्यावर भलते सलते आरोप केले आहेत. आणि हा म्हणतो की कौमार्याची लक्षणे तिच्या ठायी आढळली नाहीत. पण हा घ्या माझ्या मुलीच्या कौमार्याचा पुरावा,’ असे मुलीच्या वडलांनी नेथे सांगून, त्या मंडळींना ती चादर दाखववावी. यावर गावच्या पंचानी त्या नवऱ्याला धरुन शिक्षा करावी. त्याला चाळीस औंस चांदीदंड करावा. एका इस्राएल कन्येवर ठपका ठेवून तिची बदनामी केल्याबद्दल ही रक्कम त्याने मुलीच्या वडीलांना द्यावी. त्याने बायको म्हणून तिचा स्वीकार केला पाहिजे. तसेच जन्मभर त्याने तिचा त्याग करता कामा नये. पण बायकोबद्दल नवऱ्याने केलेला आरोप खराही असू शकतो. तिच्या कौमार्याचा पुरावा तिचे आईवडील दाखवू शकले नाहीत तर गावातील ज्येष्ठ मंडळींनी तिला आपल्या वडिलांच्या घराच्या दारापाशी आणावी आणि गावकऱ्यांनी तिला मरेपर्यंत दगडांनी मारावे. कारण तिने इस्राएलमध्ये ही लाजिरवाणी गोष्ट केली आहे. आपल्या वडलांच्या घरी असतानाचे तिचे वर्तन वेश्येसमान आहे. हा कलंक आपल्यामधून तुम्ही धुवून काढलाच पाहिजे. “एखाद्या पुरुषाचे दुसऱ्या विवाहित स्त्री बरोबर लैंगिक संबंध असतील तर दोघांनाही मृत्युदंड द्यावा. आणि इस्राएलमधून या दुराचाराचे निमूर्लन करावे.
”ज्यांच्या आईवडीलांचा रीतसर विवाह झालेला नाही त्यानेही उपासनेत सहभागी होऊ नये. त्याच्या दहाव्या पिढीपर्यंत ही मनाई आहे.
”“एखाद्याला लग्नानंतर आपल्या बायकोच्या संबंधाने एखादी न आवडणारी गुप्त गोष्ट कळली व ती त्याला आवडेनाशी झाली तर त्याने तिला घटस्फोट लिहून द्यावा. मग तिला घराबाहेर काढावे. त्याच्या घरातून बाहेर पडल्यावर हवे तर तिने दुसरे लग्न करावे. त्यातून समजा असे झाले की या नवऱ्याचीही तिच्यावर इतराजी झाली आणि त्याने तिला घटस्फोट दिला तर मात्र त्याने तिला सोडल्यावर पुन्हा पहिल्या नवऱ्याने तिच्याशी लग्न करु नये. किंवा हा दुसरा नवरा वारला तरी पहिल्या नवऱ्याने पुन्हा तिच्याशी लग्न करु नये. कारण ती आता भ्रष्ट झालेली आहे. तिच्याशी पहिल्या नवऱ्याने पुन्हा लग्न करणे हे तुमचा देव परमेश्वर ह्याच्या दुष्टीने निंद्य आहे. तुमचा देव परमेश्वर तुम्हाला देणार असलेल्या या प्रदेशात असे पाप करु नका.
”“एखाद्याचे नुकतेच लग्न झाले असेल तर त्याला सैन्यात मोहिमेवर पाठवू नये. तसेच त्याच्यावर विशेष कामगिरी सोपवू नये. नववधूला सुखी ठेवण्यासाठी वर्षभर घरीच राहण्याची मोकळीक त्याला द्यावी.
”“नंतर लेवींनी लोकांना सांगावे ‘आपल्या आईवडीलांचा अनादर दाखवणारी कृत्ये करतो तो शापित असो.’ “तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे.
”“लेवींनी म्हणावे ‘परकीय, अनाथ, आणि विधवा यांच्याबाबतीत न्यायीपणाने न वागणारे शापित असो.’ “तेव्हा सर्व लोकांनी ‘आमेन’ म्हणावे.
”“काही गोष्टी आमचा देव परमेश्वर ह्याने गुप्त ठेवलेल्या आहेत. त्या फक्त त्यालाच माहीत. पण हे बाकी सर्व त्याने उघड केले आहे. आपल्याला व आपल्या पुढील पिढ्यांसाठी शिकवण देऊन ती नित्य पाळायला सांगितले आहे.
”पुरुष, बायका, लहान मुले, गावातील परकीय अशा सर्वांना यावेळी एकत्र आणावे. त्यांनी ही शिकवण ऐकावी, परमेश्वर देवाचा आदर करावा. शिकवणीचे जीवनात आचरण करावे. ज्या पुढच्या पिढीला ही शिकवण माहीत नव्हती त्यांना ती माहीत होईल. लौकरच तुम्ही जो देश आपलासा करायला चालला आहात तेथे ही मुलेबाळेही तुमचा देव परमेश्वर ह्यच विषयी आदर बाळगतील.”
”मी तुमच्यावर द्या केली आहे, म्हणून आता माझ्यासमोर परमेश्वराच्या नांवाने शपथ घ्या की, आम्हीहि तुझ्या बापाच्या घराण्यावर द्या करू, आणि ह्याबद्दल मला खाञीलायक खूण द्या, तसेच तुझे आईबाप, भाऊबहिणी आणि त्यांचे सर्वस्व ह्यांचा आम्ही बचाव करू आणि तुम्हां सर्वाचे प्राण वाचवू, अशीहि शपथ घ्या,
”सकाळीं तुम्हाला आपआपळ्या वंशाच्या क्रमाने पुढे आणण्यात येईल; मग ज्या वंशाला परमेश्वर पकडील त्या वंशाच्या एकाएका कुळाने पुढे यावें; नंतर ज्या कुळाला परमेश्वर पकडील त्या कुळांतील एकाएका घराण्यानें पुढें यावे; मग ज्या घराण्याला परमेश्वर पकडील त्या घराण्यातील एकाएका पुरुषाला पुढे यावें;
”कारण कीं जर तुम्ही मार्ग किंचितहि सोडाल, आणि जीं तुमच्याजवळ उरलेलीं राष्ट्रें यांसीं म्हणजे या शेषासीं जडून राहाल आणि त्यांसीं सोयरीक करून त्यांच्यामध्यें जाल, आणि ते तुमच्यामध्यें येतील; तर तुम्ही जाणाच जाणा कीं तुमचा देव परमेश्वर या राष्ट्रांस तुमच्यापुढून वतनांतून अणखी घालविणार नाहीं; आणि जी ही चांगली भूमि तुमचा देव परमेश्वर याने तुम्हास दिल्ही, तिजवरून तुम्ही नाश पावून जाल तोंपर्यंत तीं तुम्हास सांपळा व फांस व तुमच्या कुसींवर छडी व तुमच्या डोळ्यांत काटे असे होतील.
”किंवा परमेश्र्वराची सेवा करणें हें जर तुम्हास वाईट वाटतें, तर तुम्ही ज्याची सेवा कराल, त्याला आज आपल्यासाठीं निवडून घ्या; नदीच्या पलिकडे तुमच्या पूर्वजानी ज्या देवांची सेवा केली, त्यांची सेवा करा, किंवा ज्या अमोऱ्यांच्या देशांत तुम्ही राहतां त्यांच्या देवांची सेवा करा, परंतु मी व माझ्या घरचीं माणसें आम्ही परमेश्र्वराची सेवा करूं."
”ते त्या वेळेस इस्त्राएलाचीं संतानें तेथून आपापल्या वंशाकडे व आपापल्या वतनावर गेला.
”आणि रूथ म्हणाली मला सोडून जा आणि माझ्यापासून दूर जा अस मला सांगू नका तुम्ही जिथे जाल तिथे मी येईल, तुम्ही जिथे राहाल तिथे मी राहीलतुमचे लोक ते माझे लोक,तुमचा देव तो माझा देव.
”याखेरीज महलोनाची स्त्री मवाबी रूथ माझी पत्नी म्हणून तिचा स्विकार करतो.ते यासाठी की मयताचे नाव त्याच्या वतनाच कायम रहावे,मयताचे नाव त्याच्या भाऊबंदातून व गावच्या वेशीतून नष्ट होऊ नये.
”.तेव्हा तिचा नवरा एलकाना तिला म्हणे,हन्ना,तू कां रडतेस?कां खात नाहीस? आणि तुझे ह्रदय कां दुखित आहे?मी तुला दहा मुलांपेक्षा बरा नाही काय?
”आण नवस करून बोलली,हे सैन्याच्या यहोवा, जर तू आपल्या दासीचे दुख पाहशीलच व माझी आठवण करशील,व तुझ्या दासीला विसरणार नाहीस वदोसीला पुरूष संतान देशील,तर मी त्याला त्याच्या आयुष्याच्या सर्व दिवसात यहोवाला देईल, आणि वस्तरा त्याच्या डोक्यावर फिरणार नाही.
”यामुलासाठीं मी प्रार्थना केली आणि जी माझी मागणी मीं यहोवापाशीं मागितली होता ती त्यानें मला दिली आहे. म्हणूनच मी तो यहोवाला उसना दिला आहे,तो वांचेल तोपर्यत तो यहोवाला उसना दिलेला आहे,तेव्हां तेथें त्यानें यहोवाचें भजनपूजन केलें.
”एलीते मुलगे नीच माणसें होतें;ते यहोवाला ओळखत नव्हते.
”शमुवेल मूल तर तागाचें एफोद कमरेस वेष्टिलेला असतां यहोवाचीं सेवा करीत होता.
”आणि शमुवेल मुलगा मोठा होत चालला,आणि यहोवाच्या व मनुष्यांच्याहि कृपेत चांगला वाढत होता.
”मी त्याचा पिता आणि तो माझा पुत्र असेल. त्याच्या हातून पाप घडले तर लोकाकडून मी त्याला शासन घडवीन. तेच माझे चाबूक
”स्त्रियांबद्दल शलमोनाला आकर्षण होते. इस्राएल देशाच्या बाहेरच्याही अनेक स्त्रिया त्याच्या आवडत्या होत्या. फारोच्या मुलीखेरीज, हिती, मवाबी, अम्मोनी, अदोमी, सिदोनी अशा परक्या देशातील स्त्रियांनाही त्याने आपलेसे केले. परमेश्वराने पूर्वीच इस्राएल लोकांना सांगितले होते “परक्या देशातील लोकांशी विवाह संबंध ठेवू नका. तसे केलेत तर ते तुम्हाला त्यांच्या दैवतांच्या भजनी लावतील.” असे असूनही शलमोन या बायकांच्या प्रेमात पडला. त्याला सातशे बायका होत्या. (त्या सर्व इतर देशांच्या प्रमुखांच्या मुली होत्या) उपपत्नी म्हणून त्याला आणखी तीनशे दासीही होत्या. ह्या बायकांनी त्याला देवापासून दूर जाण्यास भाग पाडले. तो वृध्द झाला तेव्हा त्याच्या बायकांनी त्याला इतर दैवतांकडे वळवले. आपले वडील दावीद याच्या प्रमाणे शलमोन परमेश्वराशी एकनिष्ठ राहिला नाही.
”तेव्हा इस्राएल लोकांनो, तुमच्या मुलांशी त्यांच्या ऐश्वर्याची इच्छा करु नका. माझ्या आदेशांचे पालन करा म्हणजे तुम्ही बलशाली व्हाल आणि या भूमीवर चांगल्या गोष्टी भोगाल. हा प्रदेश आपल्या मुलाबाळांना सुपूर्द कराल.”
”एज्रा याजक त्यांच्यासमोर उभा राहून म्हणाला, “तुम्ही देवाचे वचन पाळले नाही. परक्या स्त्रियांशी तुम्ही विवाह केलेत. या कृत्यामुळे इस्राएलच्या पापात तुम्ही भर टाकली आहे आता देवासमोर आपले अपराध कबूल करा. आपल्या पूर्वजांच्या देवाची आज्ञा तुम्ही पाळली पाहिजे. तुमच्या मध्ये राहणारे लोक आणि आपल्या परक्या बायका यांच्यापासून वेगळे व्हा.” यावर त्या जमावाने एज्राला खणखणीत आवाजात उत्तर दिले की, “एज्रा, तू म्हणतोस ते खरे आहे. तुझ्या सांगण्याप्रमाणे आम्हाला वागले पाहिजे.
”ईयोबची बायको त्याला म्हणाली, “तू अजूनही देवाशी निष्ठावान आहेस का? तू देवाला शाप देऊन मरुन का जात नाहीस?” ईयोबने बायकोला उत्तर दिले, “तू एखाद्या मूर्ख बाईसारखी बोलत आहेस. देव जेव्हा आपल्याला चांगल्या गोष्टी देतो तेव्हा आपण त्यांचा स्वीकार करतो. तसाच आपण संकटांचाही स्वीकार तक्रार न करता केला पाहिजे.” त्याच्या संकटकाळातसुध्दा ईयोबने पाप केले नाही. तो देवाच्याविरुध्द बोलला नाही.
”मुला बाळांच्या मुखातून तुझे गुणगान ऐकू येते तुझ्या शंत्रूना गप्प बसवण्यासाठी तू हे सारे करतोस.
”परमेश्वरा आई बाप नसलेल्या पोरक्या मुलांचे रक्षण कर. दुखी लोकांना आणखी कष्ट सोसायला लावू नकोस. दुष्टांना इथे राहायला भीती वाटेल इतके त्यांना घाबरवून
”देवा, हे सत्य आहे की मी ज्याच्यावर अवलंबून राहावे असा फक्त तूच आहेस. मी जन्मल्यापासून तू माझी काळजी घेत आला आहेस. मी माझ्या आईचे दूध पीत होतो तेव्हापासून तू मला आश्वासन दिले आहेस. आणि माझे सांत्वन केले आहेस. मी जन्माला आलो त्या दिवसापासून तू माझा देव आहेस मी माझ्या आईच्या शरीरातून बाहेर आलो तेव्हापासून तू मला तुझ्या छत्राखाली आणले आहेस.
”माझे आईवडील मला सोडून गेले. परंतु परमेश्वराने मला घेतले आणि त्याचे बनवले.
”मी तरुण होतो आणि आता म्हातारा झालो आहे. आणि देवाने चांगल्या माणसांचा त्याग केल्याचे मी कधी पाहिले नाही चांगल्या माणसांची मुले अन्नासाठी भीक मागताना मी कधी पाहिली नाहीत. चांगला माणूस दुसऱ्यांना सढळ हाताने देतो आणि चांगल्या माणसाची मुले म्हणजे जणू ईश्वरी कृपाच असते.
”मी पापातच जन्मलो आणि पापातच माझ्या आईने माझा गर्भ धारण केला. देवा, मी खरोखरच प्रामणिक व्हावे असे वाटत असेल तर शहाणपण माझ्या आत खोलवर ठेव.
”देव त्याच्या पवित्र मंदिरात अनाथांचा बाप होतो. तो विधवांची काळजी घेतो. देव एकाकी लोकांना घर देतो, देव त्याच्यामाणसांना तुंरुगातून बाहेर काढतो, ते फार आनंदी आहेत. परंतु जे लोक देवाच्या विरुध्द जातात ते त्याच्या आगीसारख्या तुरुंगात राहातील.
”मी तुम्हांला ही गोष्ट सांगेन. मी तुम्हांला ही जुनी गोष्ट सांगेन. आम्ही ती गोष्ट ऐकली आणि आम्हाला ती चांगली माहीत आहे. आमच्या वाडवडिलांनी आम्हाला ती गोष्ट सांगितली होती. आणि आम्ही ती विसरणार नाही. आमचे लोक शेवटच्या पिढीपर्यंत ती गोष्ट सांगत राहातील. आम्ही परमेश्वराची स्तुती करु आणि त्याने केलेल्या अद्भुत गोष्टीबद्दल सांगत राहू. परमेश्वराने याकोबा बरोबर करार केला. देवाने इस्राएलला कायदा दिला. देवाने आमच्या पूर्वजांना आज्ञा दिल्या. त्याने आमच्या पूर्वजांना त्यांच्या वंशजांना नियम शिकवायला सांगितला. नवीन मुले जन्माला येतील, तीच पुढे मोठी होतील आणि ती त्यांच्या मुलांना गोष्टी सांगतील या प्रमाणे लोकांना अगदी शेवटच्या पिढीपर्यंत नियम समजेल. म्हणून ते सगळे लोक देवावर विश्वास ठेवतील. देवाने जे केले ते ते विसरणार नाहीत. ते अत्यंत सावधगिरीने त्याच्या आज्ञा पाळतील. जर लोकांनी त्यांच्या देवाच्या आज्ञा त्यांच्या मुलांना शिकविल्या तर ती मुले त्यांच्या पूर्वजांसारखी होणार नाहीत. त्यांचे पूर्वज देवाविरुध्द गेले. त्यानी देवाच्या आज्ञा पाळायचे नाकारले. ते लोक फार हटी् होते ते देवाच्या आत्म्याशी प्रामाणिक नव्हते.
”“गरीबांना आणि अनाथांना संरक्षण दे. त्या गरीब लोकांच्या हक्कांचे रक्षण कर.
”वडील मुलांच्या बाबतीत जितके दयाळू असतात तितकाच दयाळू परमेश्वर त्याच्या भक्तांच्या बाबतीत असतो.
”परंतु परमेश्वराने त्याच्या भक्तांवर नेहमीच प्रेम केले आणि तो सदैव त्याच्या भक्तांवर प्रेम करीत राहाणार आहे. देव त्यांच्या मुलांशी आणि मुलांच्या मुलांशीदेखील चांगला वागणार आहे.
”तुम्ही त्याचा सेवक अब्राहाम याचे वंशज आहात. तुम्ही याकोबाचे, देवाने निवडलेल्या माणसाचे वंशज आहात. परमेश्वर आपला देव आहे. परमेश्वर सर्व जगावरराज्य करतो. परमेश्वर देवाच्या कराराची सदैव आठवण ठेवा. हजारो पिढ्या त्याच्या आज्ञांची आठवण ठेवा.
”स्त्रीला मूळ होत नसेल तर देव तिला मुले देईल आणि तिला आनंदी करेल. परमेश्वराची स्तुती करा.
”परमेश्वर तुला आणि तुझ्या मुलांना अधिकाधिक आशीर्वाद देईल. अशी मी आशा करतो.
”मुले म्हणजे परमेश्वराने दिलेले नजराणे आहेत. आईच्या शरीरातून मिळालेले ते फळ आहे. तरुण माणसाची मुले सैनिकाच्या भात्यातील बाणांसारखी आहेत. जो माणूस त्याचा भाता मुलांनी भरुन टाकेल तो सुखी होईल. [6] त्या माणसाचा कधीही पराभव होणार नाही त्याची मुले सार्वजानिक ठिकाणीत्याच्या शत्रूंविरुध्द त्याचे रक्षण करतील.
”घरी तुझी बायको सुफलीत द्राक्षवेलीसारखी असेल. मेजाभोवती तुझी मुले तू लावलेल्या जैतूनाच्या झाडांसारखी असतील.
”आणि तू तुझी नातवंडे पाही पर्यंत जगशील अशी मी आशा करतो. इस्राएलमध्ये शांती नांदू दे.
”जेव्हा देवाचे लोक शांततेने एकत्र नांदतात, तेव्हा ते खरोखरच खूप चांगले आणि आल्हाददायक असते.
”परमेश्वरा, तू माझे संपूर्ण शरीर निर्माण केलेस मी माझ्या आईच्या गर्भात होतो तेव्हाच तुला माझ्याबद्दल सर्वकाही माहीत होते. परमेश्वरा, मी तुझी स्तुती करतो. तू मला अद्भुत आणि अतिशय सुंदररीतीने निर्मिलेस तू जे केलेस ते खूपच अद्भुत आहे हे मला चांगलेच माहीत आहे. तुला माझ्याबद्दल सारे माहीत आहे माझे शरीर आईच्या गर्भात लपून आकार घेत होते तेव्हा तू माझी हाडे वाढत असताना पाहिलीस. माझे अवयव वाढत असताना तू पाहिलेस तू तुझ्या पुस्तकात त्यांची यादी केलीस. तू माझी रोज पाहणी केलीस. त्यातला एकही अवयव हरवलेला नाही.
”देवाने तरुण आणि तरुणी निर्मिल्या. देवाने वृध्द आणि तरुण माणसे निर्माण केली. परमेश्वराच्या नावाचा गुणगौरव करा. त्याच्या नावाला सदैव मान द्या. स्वर्गातल्या आणि पृथ्वीवरच्या सर्वांनो त्याची स्तुती करा.
”मुला,तू तुझ्या वडिलांची शिकवण पाळली पाहिजेस. आणि तू तुझ्या आईची शिकवणही पाळायला हवीस.
”मुला, परमेश्वर तुला कधी कधी तू चूक करीत आहेस हे दाखवून देईल. पण या शिक्षेमुळे तू रागावू नकोस. त्यापासून शिकायचा प्रयत्न कर. का? कारण परमेश्वर ज्यांच्यावर प्रेम करतो त्यांनाच सुधारतो. होय, मुलावर प्रेम करणाऱ्या व त्याला शिक्षा करणाऱ्या बापासारखा देव आहे.
”मुलांनो, तुमच्या वडिलांच्या शिकवणुकीकडे लक्ष द्या. लक्ष दिले की तुम्हाला कळेल. का? कारण मी जे सांगतो ते महत्वाचे आहे आणि चांगले आहे. म्हणून माझी शिकवण कधीही विसरु नका. एकेकाळी मी सुध्दा लहान होतो. मी माझ्या वडिलांचा लहान मुलगा होतो. आणि माझ्या आईचा एकुलता एक. आणि माझ्या वडिलांनी मला शिकवले. ते मला म्हणाने, “मी जे सांगतो ते लक्षात ठेव. माझ्या आज्ञा पाळ. म्हणजे तू जिवंत राहाशील.
”मुला, माझे ऐक. मी जे सांगतो ते कर म्हणजे तू खूप जगशील. मी तुला ज्ञानाविषयी शिकवत आहे. मी तुला सरळ मार्गाने नेत आहे.
”मुला, मी जे सांगितले त्याक़डे लक्ष दे. माझे शब्द लक्षपूर्वक ऐक. तू माझ्या शब्दांना तुला सोडून जायला लावू नकोस. मी सांगतो ते लक्षात ठेव. जे माझी शिकवण ऐकतील त्यांना जीवन मिळेल. माझे शब्द शरीराला आरोग्यासारखे आहेत. तुझ्या हृदयाला काळजीपूर्वक जप. कारण तेथूनच जीवनप्रवाह वाहतात.
”म्हणून तुझ्या बायकोबरोबर सुखी राहा. तरुणपणी जिच्याबरोबर लग्न केलेस तिलाच उपभोग. ती सुंदर हरिणीसारखी आहे. गोजिरवाण्या हरिणाच्या पाडसासारखी आहे. तिचे प्रेम तुझे समाधान करो. तू तिच्या प्रेमात बंदीवान हो.
”माझ्या मुला, तुझ्या वडिलांची आज्ञा लक्षात ठेव. आणि तुझ्या आईची शिकवण विसरु नकोस.
”ही शलमोनाची नीतिसूत्रे (शहाणपणाच्या गोष्टी) आहेत शहाणा मुलगा त्याच्या वडिलांना सुखी करतो. पण मूर्ख मुलगा त्याच्या आईला अतिशय दु:खी करतो.
”जर एखाद्याने त्याच्या कुटुंबावर संकटे आणली तर त्याला काहीही मिळणार नाही आणि शेवटी मूर्खाला शहाण्या माणसाची जबरदस्तीने सेवा करावी लागेल.
”नवरा चांगल्या बायकोबद्दल आनंदी आणि अभिमानी असतो. पण जर बाई आपल्या नवऱ्याला लाज आणत असेल. तर ती त्याच्या शरीरातल्या आजारा सारखी असते.
”शहाण्या माणसाला त्याचे वडील काही सांगत असले तर तो लक्षपूर्वक ऐकतो. पण अभिमानी माणूस लोक त्याला योग्य ते सांगायला लागले तर तो ते ऐकत नाही.
”चांगल्या माणसाकडे त्याच्या मुलांना आणि नातवंडांना द्यायला संपत्ती असेल. आणि शेवटी चांगल्या माणसाला दुष्ट लोकांकडचे सर्व काही मिळेल.
”जर एखाद्याचे आपल्या मुलांवर खरोखच प्रेम असेल तर तो त्यांचे चुकल्यावर त्यांना काठीने मारायलाही कमी करणार नाही. ते चुकीने वागल्यावर तो त्यांना शिस्त लावेल. जर तुमचे तुमच्या मुलावर प्रेम असेल तर तुम्ही त्याला योग्य वेळी काळजीपूर्वक शिकवाल.
”शहाणी स्त्री तिच्या शहाणपणाचा उपयोग तिचे घर जसे असायला हवे तसे करण्यासाठी करते. पण मूर्ख बाई तिच्या मूर्खपणामुळे घराचा सत्यानाश करते.
”मूर्ख माणूस त्याच्या वडिलांच्या उपदेशाकडे लक्ष देत नाही. पण जेव्हा लोक शहाण्या माणसाला शिकवण्याचा प्रयत्न करतात तेव्हा तो लक्षपूर्वक ऐकतो.
”शहाणा मुलगा त्याच्या वडिलांना सुखी करतो. पण मूर्ख माणूस त्याच्या आईला लाज आणतो.
”सेवकाचा हुशार मुलगा मालकाच्या आळशी मुलावर ताबा मिळवील. तो हुशार मुलगा मालकाचे सर्व काही घेईल.
”नातवंडे म्हाताऱ्या माणसांना आनंदी बनवतात. आणि मुलांना त्यांच्या आईवडिलांचा अभिमान असतो.
”मित्र नेहमी प्रेम करतो. खरा भाऊ संकटाच्या वेळीसुध्दा मदत करतो.
”मूर्ख मुलगा वडिलांसाठी दु:ख आणतो आणि जिने त्याला जन्म दिला त्या आईसाठी वेदना आणतो.
”जर तुम्हाला बायको मिळाली, तर तुम्हाला चांगली गोष्ट मिळाली असे होईल. परमेवर तुमच्यावर खुश आहे असे ते दर्शवते.
”मूर्ख मुलगा त्याच्या वडिलांचा सर्वनाश करु शकतो आणि वाद घालणारी बायको सतत टपटप पडणाऱ्या पाण्यासारखी चीड आणणारी असते. लोकांना त्यांच्या आई-वडिलांकडून घरे आणि पैसा मिळतो. पण चांगली बायको परमेश्वराकडून मिळालेला नजराणा आहे.
”तुमच्या मुलाला शिकवा व तो चुकत असेल तर त्याला शिक्षा करा. तीच एक आशा आहे. तुम्ही जर हे करायला नकार दिला तर तुम्ही त्याला स्वत:चा नाश करायला मदत करीत आहात.
”एखाद्याने वडिलांची चोरी केली आणि आईला घर सोडायला लावले तर तो खूप वाईट आहे. तो माणूस स्वत:ला लाज आणतो आणि स्वत:चा अनादर करतो.
”चांगला माणूस चांगले आयुष्य जगतो आणि त्याच्या मुलांना आशीर्वाद मिळतात.
”लहान मूल सुध्दा आपल्या कृतीने आपण चांगले आहोत की वाईट ते दाखवू शकते. त्या मुलाकडे लक्षपूर्वक पाहून तो प्रामाणिक आणि चांगला आहे की नाही ते तुम्ही समजू शकता.
”जर एखादा माणूस त्याच्या आईविरुध्द किंवा वडिलांविरुध्द बोलला तर तो अंधार होणारा प्रकाश आहे.
”जर तुम्हाला सहज संपत्ती मिळाली असेल तर तिची तुम्हाला किंमत नसते.
”सतत वाद घालणाऱ्या बायकोबरोबर घरात राहाण्यापेक्षा घराच्या छतावर राहाणे अधिक चांगले.
”वाद घालणाऱ्या रागीट बायकोबरोबर राहाण्यापेक्षा वाळवंटात राहाणे अधिक चांगले.
”लहान मुलाला जगण्याचा योग्य मार्ग लहानपणीच शिकवा. मग तो जेव्हा मोठा होईल तेव्हा त्याच मार्गांने जगेल.
”मुले मूर्खपणाच्या गोष्टी करीत असतात. पण तुम्ही जर त्यांना शिक्षा केली तर त्या गोष्टी न करायलाही ते शिकतील.
”गरज पडेल तेव्हा मुलाला नेहमी शिक्षा करा. तुम्ही त्याला चापट मारली तर त्याला ती लागणार नाही. चापटी मारुन तुम्ही त्याला मृत्यूपासून वाचवू शकाल. मुला, तू जर शहाणा झालास तर मी खूप आनंदी होईन. तू योग्य गोष्टी बोलू लागलास, तू योग्य गोष्टी बोलताना मी ऐकले तर मला खूप आनंद होईल.
”तुझे वडील तुला ज्या गोष्टी सांगतात त्या ऐक. तुझ्या वडिलांशिवाय तू कधीही जन्माला आला नसतास. तुझी आई म्हातारी झाली तरी तिचा आदर कर. सत्य, शहाणपण, शिक्षण आणि समजूतदारपणा या गोष्टी पैसे मोजून घेण्याइतक्या मौल्यवान आहेत. आणि त्यांचे मूल्य त्या विकून टाकता न येण्याइतके अधिक आहे. चांगल्या माणसाचे वडील खूप आनंदी असतात. एखाद्याचे मूल जर शहाणे असेल तर ते खूप आनंद देते. म्हणून तुमच्या आई - वडिलांना तुमच्याबरोबर आनंदी होऊ द्या. तुमच्या आईला आनंद घेऊ द्या. मुला, मी जे सांगतो ते लक्षपूर्वक ऐक. माझे आयुष्य तुझ्यासमोर उदाहरणादाखल राहू दे.
”वाद घालणाऱ्या बायकोबरोबर घरात राहाण्यापेक्षा छपरावर राहाणे अधिक चांगले.
”सतत वाद घालण्याची इच्छी धरणारी बायको पावसाळ्याच्या दिवसात सतत गळणाऱ्या दिवसात सतत गळणाऱ्या पाण्यासारखी असते.
”जो माणूस कायद्याचे पालन करतो तो हुशार असतो. पण जो माणूस क्षुल्लक माणसांशी मैत्री करतो तो त्याच्या वडिलांना लाज आणतो.
”काही लोक त्यांच्या आई वडिलांची चोरी करतात. “ह्यात काही चूक नाही” असे ते म्हणतात. पण तो माणूस घरात येऊन सगळ्याचा नाश करणाऱ्या माणसाइतकाच दोषी आहे.
”मार आणि शिकवण मुलासाठी चांगली असते. जर आईवडिलांनी मुलांना त्यांना हवे ते करु दिले तर तो त्याच्या आईला लाज आणेल.
”तुमचा मुलगा जर चुकत असेल तर त्याला शिक्षा करा नंतर तुम्हाला त्याच्याबद्दल गर्व वाटेल. तो तुम्हाला कधीही लाज आणणार नाही.
”काही लोक त्यांच्या वडिलांविरुध्द बोलतात आणि ते त्यांच्या आईबद्दल आदर दाखवीत नाहीत. काही लोकांना आपण चांगले आहोत असे वाटत असते पण ते खरोखरच वाईट असतात. काही लोक स्वत:ला फार चांगले समजतात. आपण दुसऱ्यांपेक्षा खूप चांगले आहोत असे त्यांना वाटते.
”जो माणूस त्याच्या वडिलांची चेष्टा करतो वा त्याचा आईचे ऐकत नाही त्याला शिक्षा होईल. त्याचे डोळे गिधाडाने वा एखाद्या रानटी पक्ष्याने खाण्याइतके वाईट त्याच्या बाबतीत घडेल.
”तीन गोष्टी माझ्या समजण्यापलिकडे आहेत, खरं म्हणजे चार गोष्टी, ज्या मी समजू शकत नाही. आकाशात उडणारा गरुड, दगडावर चालणारा साप, समुद्रात जाणारे जहाज आणि स्त्रीच्या प्रेमात पडलेला पुरुष
”तू माझा मुलगा आहेस. मी प्रेम करत असलेला मुलगा. ज्यासाठी मी प्रार्थना केली होती तोच मुलगा तू आहेस. तुझी शक्ती स्त्रियांवर खर्च करु नकोस. स्त्रियामुळेच राजांचा नाश होतो त्यांच्यापायी स्वत:चा नाश करु नकोस.
”सर्वगुणसंपन्न स्त्री शोधणे खूप कठीण आहे. पण तिचे मोल जड-जवाहिऱ्यापेक्षा अधिक आहे. तिचा नवरा तिच्यावर अवलंबून असतो. तो कधीही गरीब होणार नाही. ती तिच्या आयुष्यभर नवऱ्याचे कल्याण करते. ती त्याच्यावर कधीही संकटे आणीत नाही. ती नेहमी लोकर आणि कापड तयार करण्यात मग्न असते. ती दूरच्या प्रदेशातील मेंढीसारखी असते. ती सर्व ठिकाणाहून घरी अन्न आणते. ती भल्या पहाटे उठते तिच्या कुटुंबासाठी अन्न शिजवते आणि नोकर मुलींना काय करायचे ते सांगते. ती जमिनी बघते आणि विकत घेते. तिने साठवलेल्या पैशांचा उपयोग करुन ती द्राक्षाचे मळे लावते. ती खूप काम करते. ती खूप शक्तिवान आहे. आणि सर्व काम करण्यात तरबेज आहे. तिने केलेल्या गोष्टी जेव्हा ती विकते तेव्हा तिला नेहमी नफा होतो. आणि ती रात्री उशीरापर्यंत काम करते. ती स्वत:चे सूत स्वत: कातते आणि स्वत:चे कपडे विणते. ती नेहमी गरीबांना देते आणि ज्यांना गराज असते अशांना मदत करते. जेव्हा बर्फ पडतो (म्हणजेच फार थंडी असते) तेव्हा ती आपल्या कुटुंबाची काळजी करत नाही. तिने त्या सर्वाना चांगले, गरम कपडे दिलेले असतात. ती अंथरुणावर टाकायला चादरी आणि पांघरायला पांघरुणे तयार करते. चांगल्या कापडापासून केलेले कपडे ती वापरते. लोक तिच्या नवऱ्याचा आदर करतात. तो देशाचा एक नेता असतो. ती खूप चांगली उद्योगी - स्त्री असते. ती कपडे आणि पट्टे तयार करते आणि ती त्या वस्तू त्या व्यापाऱ्यांना विकते. ती खूप ताकतवान आहे आणि लोक तिला मान देतात ती भविष्याबद्दल विश्वास आहे. ती शहाणपणाचे बोल बोलते. ती लोकांना प्रेमळ व दयाळू असावे असे शिकविते. ती कधीही आळशी नसते. ती तिच्या घरातील गोष्टींची काळजी घेते. तिची मुले तिच्याबद्दल चांगले बोलतात. तिचा नवरा तिच्याबद्दल अभिमान बाळगतो आणि म्हणतो, “चांगल्या स्त्रिया खूप आहेत. पण तू सर्वांत चांगली आहेस.” मोहकता आणि सौंदर्य तुम्हाला फसवू शकेल. पण जी स्त्री परमेश्वराचा आदर करते तिची प्रशांसा केली पाहिजे. तिला साजेसे बक्षीस तिला द्या. लोकांमध्ये तिची प्रशंसा करा. तिने ज्या गोष्टी केल्या आहेत त्याबद्दल तिची स्तुती करा.
”एकापेक्षा दोन माणसे बरी. दोन माणसे एकत्र काम करीत असली तर त्यांना त्यापासून अधिक मिळते. जर एखादा माणूस पडला तर दुसरा त्याला मदत करू शकतो. पण जर माणूस एकटा असताना पडला तर ते वाईट असते. त्याला मदत करायला तिथे कुणीही नसते. जर दोन माणसे एकत्र झोपली तर त्यांना ऊब मिळेल. पण जो माणूस एकटाच झोपतो त्याला उबदार वाटणार नाही. त्याला ऊब मिळणार नाही. शत्रू एकाच माणसाचा पराभव करू शकतो. पण त्याला दोघांचा पराभव करता येत नाही. आणि तीन माणसे तर आधिकच भारी असतात. ते तीन भाग वळून केलेल्या दोरीसारखे असतात. ती दोरी तोडणे कठीण असते.
”प्रेम असलेल्या पत्नीबरोबर आयुष्य आनंदात घालवा. तुमच्या छोट्याशा आयुष्यातील प्रत्येक दिवसाचा आनंद लुटा. देवाने तुम्हाला पृथ्वीवर छोटे आयुष्य दिले आहे आणि फक्त तेव्हढेच तुमच्याकडे आहे हे जाणून या आयुष्यात तुम्हाला जे काम करायचे आहे त्याचा आनंद लुटा.
”वाऱ्याची दिशा तुम्हाला माहीत नसते. आणि आईच्या शरीरात तिचे बाळ कसे वाढते ते आपल्याला माहीत नसते. त्याच प्रमाणे देव काय करील तेही तुम्हाला माहीत नसते. सर्व गोष्टी तोच घडवून आणतो.
”तरुणपणीच वृध्दापकाळाचे वाईट दिवस येण्याआधी, “मी माझे आयुष्य वाया घालवले”असे तुम्ही म्हणण्याचे दिवस येण्याआधी आपल्या निर्मात्याची आठवण ठेवा.
”सियोनेच्या स्त्रियांनो, बाहेर या, आणि राजा शलमोनाला पाहा. ज्या दिवशी त्याचे लग्र झाले, ज्या दिवशी तो खूप आनंदी होता, त्या दिवशी त्याच्या आईने त्याच्या मस्तकावर ठेवलेला मुकुट पाहा.
”तेव्हा देव माझा प्रभु तुला स्वत:हून चिन्ह देईल.”त्या कुमारिकेकडे पाहाती गर्भवती आहे. ती मुलाला जन्म देईल. ती त्याचे नाव इम्मानुएल ठेवील.
”असामान्य बालकाच्या जन्माच्यावेळी ह्या गोष्टी घडतील. देव आम्हाला पुत्र देईल. हा पुत्र लोकांच्या नेतृत्वाची जबाबदारी घेईल. त्याचे नाव असेल “अदभुत सल्लागार, सामर्थ्यशाली देव, चिरंजीव पिता, शांतीचा राजपुत्र.”
”परमेश्वरा, आम्ही तुझ्याबरोबर नाही. प्रसूति वेदना होऊन रडणाऱ्या स्त्रीसारखे आम्ही आहोत. ती वेदनेने विव्हळते. त्याचप्रमाणे आम्हाल वेदना आहेत. आम्ही जन्म देतो पण तो फक्त वाऱ्याला. आम्ही जगासाठी नवीन लोक तयार करत नाही. आम्ही देशासाठी तारण आणत नाही.
”माझ्याप्रमाणे जिवंत असणारी माणसे तुझी स्तुती करतात. म्हणून वडिलांनी मुलांना तुझ्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही असे सांगावे.
”दूरदूरच्या ठिकाणी राहणाऱ्या सर्व लोकांनो, माझे म्हणणे ऐका. जगातील सर्व लोकांनो, माझे ऐका माझ्या जन्मापूर्वीच परमेश्वराने त्याची सेवा करण्यासाठी मला निवडले मी आईच्या गर्भात असतानाच त्याने माझी निवड केली.
”पण मी म्हणतो, “आई आपल्या बाळाला विसरू शकते का? नाही. आपल्या गर्भातून जन्मलेल्या मुलाला विसरू शकते का? नाही. आई आपल्या मुलाला विसरू शकत नाही आणि मी (परमेश्वर) तुला विसरू शकत नाही.
”कारण तुझा पती हा तुझा निर्माता म्हणजेच देव आहे. त्याचे नाव सर्वशक्तिमान परमेश्वर आहे. इस्राएलला वाचविणारा एक तोच आहे तो इस्राएलचा पवित्र देव आहे. आणि त्याला सर्व पृथ्वीचा पवित्र देव म्हटले जाईल. तू परित्यक्ता स्त्रीप्रमाणे होतीस. तू मनातून फार दु:खी होतीस. पण देवाने तुला आपली मानले. पतीने तरूणपणीच सोडून दिलेल्या स्त्रीप्रमाणे तुझी अवस्था होती. पण परमेश्वराने तुला आपली मानले.
”तुझी मुले देवाला अनुसरतील. आणि तो त्यांना शिक्षण देईल. मग तुझ्या मुलांना खरोखरच शांतता मिळेल.
”“परमेश्वर मला अत्यंत सुखी ठेवतो. देवामुळे मी सर्वस्वी सुखी आहे. परमेश्वर मला तारणाचे कपडे घालतो. हे कपडे स्वत:च्या लग्नात घालायच्या कपड्यांप्रमाणे सुंदर आहेत. परमेश्वर चांगुलपणाचा अगंरखा मला घालतो. वधूवेशाप्रमाणे हा अंगरखा सुंदर आहे.
”एखादा तरूण एखाद्या स्त्रीवर प्रेम करतो. मग तो तिच्याशी लग्न करतो व ती त्याची पत्नी होते. त्याचप्रमाणे ही भूमी तुझ्या मुलांची होईल. नवविवाहित माणूस खूप सुखी असतो, तसाच देव तुझ्याबरोबर सुखी होईल.”
”तुम्ही यरूशलेममध्ये आरामात राहाल. आई जशी मुलाला आराम देते, तसा मी तुम्हाला देईन.”
”“तू आईच्या गर्भात जन्म घेण्यापूर्वीपासून मला माहीत होतास. तू जन्माला येण्यापूर्वीच मी तुझी विशेष कामगिरीसाठी निवड केली. राष्ट्रांचा संदेष्टा म्हणून मी तुझी निवड केली.”
”“एखाद्याने बायकोशी घटस्फोट घेतल्यास ती त्याला सोडते आणि दुसऱ्याशी लग्न करते. मग तो माणूस परत आपल्या बायकोकडे जाऊ शकतो का? नाही. जर तो माणूस त्या बाईकडे परत गेलातर तो देश ‘भ्रष्ट’ होतो. यहूदा, खूप प्रियकर (खोटे देव) असलेल्या वारांगनेप्रमाणे तू वागलीस आणि आता तुला माझ्याकडे परत यायचे आहे.” हा परमेश्वराचा संदेश होता.
”इस्राएल विश्वासघातकी आहे आणि तिला मी दूर का पाठविले ते तिला माहीत आहे. तिने व्यभिचाराचे पाप केले म्हणून मी तिला घटस्फोट दिला हे तिला कळले आहे. पण ह्यामुळे तिची विश्वासघातकी बहीण भयभीत झाली नाही. यहूदाला भीती वाटली नाही. यहूदाने सुध्दा बाहेर जाऊन वारांगनेप्रमाणे व्यवहार केला.
”“तुम्ही लोक विश्वासघातकी आहात. पण माझ्याकडे परत या.” हा परमेश्वराचा संदेश होता.“मी तुमचा प्रभू आहे मी प्रत्येक नगरातील एक आणि प्रत्येक कुटुंबातील दोन माणसे घेईन आणि तुम्हाला सियोनला आणीन.
”तुम्ही अपरिचिताशीसुध्दा प्रामाणिकपणे वागले पाहिजे. विधवांसाठी आणि अनाथांसाठी तुम्ही योग्य गोष्टी केल्या पाहिजेत. निरपराध्यांना मारु नका. दुसऱ्या देवांना अनुसरु नका. का? कारण ह्या गोष्टी तुमच्या आयुष्याचा नाश करतील. तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्यात, तर मी तुम्हाला येथे राहू देईन. मी ही भूमी कायमची तुमच्या पूर्वजांना दिली.
”लग्न करा. तुम्हाला मुलेबाळे होऊ द्या. तुमच्या मुलांचीही लग्ने होऊ द्या. म्हणजे त्यांनाही संतती होईल. तुम्हाला खूप संतती होऊ द्या. तुमची संख्या बाबेलमध्ये वाढू द्या. तुम्ही अल्पसंख्यक राहून नका.
”हे सर्व का घडलं? कारण बालपणी काय घडले ह्याचे तुला विस्मरण झाले. तू वाईट गोष्टीबद्दल मला तुला शिक्षा करावी लागली. पण तू त्याहून भयंकर गोष्टी करण्याचा बेत केलास.” परमेश्वर, माझा प्रभू, असे म्हणाला. “तुझ्याबद्दल बोलणाऱ्या सर्व लोकांना आता आणखी एक गोष्ट सांगायला मिळेल. ‘ती म्हणजे, खाण तशी माती (जशी आई, तशी लेक)’
”पाप्यालाच मरण येईल. वडिलांच्या पापांबद्दल मुलाला शिक्षा होणार नाही. तसेच मुलाच्या पापांबद्दल वडिलांना शिक्षा होणार नाही. सज्जनाचा चांगुलपणा फक्त त्याच्या स्वत:चाच असतो. आणि वाईट माणसाचा वाईटपणा त्याच्या एकट्याचाच असतो.
”मी त्यांच्या मुलांशी वाळवंटात बोललो. मी त्यांना सांगितले, “तुमच्या आई-वडिलासारखे होऊ नका. त्यांच्या गलिच्छ मूर्तीबरोबर तुम्हीही गलिच्छ होऊ नका. नियम पाळू नका. त्यांच्या आज्ञा पाळू नका. त्यांच्या त्या गलिच्छ गोष्टीबरोबर तुम्हीही गलिच्छ होऊ नका.
”यरुशलेमचे लोक आई - वडिलांचा मान ठेवीत नाहीत. राहणाऱ्या परदेशींयांना ते त्रास देतात. ते विधवांना व अनाथांना फसवितात.
”कोणत्याही याजकाने विधवेशी वा घटस्फोटितेशी लग्न करु नये. त्यांनी इस्राएली कुमारिकेशी लग्न करावे. अथवा याजकाच्या विधवेशी लग्न केले तरी चालेल.
”आणि मी (परमेश्वर) तुला माझी चिरंतन वधू करीन. मी चांगुलपणा, न्याय,प्रेम व दया यांच्यासह तुला वधू करून घेईन. मी तुला माझी विश्वासू वधू बनवीन. मग तू परमेश्वराला खरोखर जाणशील.
”तुम्ही तुमच्या मुलांना ह्या गोष्टी सांगाल. तुमची मुले, त्यांच्या मुलांना व तुमची नातवंडे त्यांच्या पुढच्या पिढीला ह्या गोष्टी सांगतील.
”एखाद्या तरुण वाग्दत्त वधूचा भावी पती मारला गेल्यावर ती जशी रडते, तसे रडा!
”“ह्यांनंतर मी माझा आत्मा सर्व लोकांत ओतीन (घालीन). तुमची मुले-मुली भविष्य सांगतील तुमच्यातील वृध्द स्वप्न पाहतील. तुमच्यातील तरूणांना दृष्टांन्त होतील.
”दोन माणसांचे एकमत झाल्याशिवाय ते एकमेकांबरोबर चालू शकणार नाहीत.
”स्वत:च्या घरातील माणसेच वैरी होतील. मुलगा वडिलांना मान देणार नाही. मुलगी आईविरुध्द जाईल. सून सासूच्या विरोधात जाईल.
”सर्व शक्तिमान परमेश्वर असे म्हणतो की “जे योग्य व न्याय्य आहे तेच तुम्ही करा. एकमेकांवर दया करा. एकमेकांना करुणा दाखवा. विधवा, अनाथ, परके व गरीब यांना दुखवू नका. एकमेकांचे वाईट करण्याचे मनातसुध्दा आणू नका.”
”तुम्ही विचारता “परमेश्वर आमच्या भेटी का स्वीकारत नाही?” का? कारण तुम्ही केलेली दुष्कृत्ये त्याने पाहिली आहेत. परमेश्वर तुमच्याविरुध्दचा साक्षीदार आहे. तुम्ही तुमच्या पत्नीची फसवणूक करताना त्याने पाहिले. तरुण असताना तिच्याशी विवाह केलास. ती तुमची मैत्रीण होती. नंतर तुम्ही एकमेकांजवळ शपथा घेतल्या व ती तुझी पत्नी झाली. पण तू तिला फसविलेस. पती-पत्नींनी शरीरांनी व मनांनी एक व्हावे अशी देवाची इच्छा आहे. का? मग त्यांची मुलेही पवित्र होतील. म्हणून आध्यात्मिक ऐक्याचे रक्षण करा. तुमच्या पत्नीला फसवू नका. तुमच्या तारुण्यापासून ती तुमची अधार्गांगिती आहे. इस्राएलचा परमेश्वर देव म्हणतो, “घटस्फोटाचा मला तिटकारा आहे. आणि पुरुष करीत असलेल्या दुष्ट कर्मांची मला घृणा वाटते. म्हणून तुमच्या आध्यात्मिक ऐक्याचे रक्षण करा. तुमच्या पत्नीला फसवू नका.”
”एलीया पालकांना त्यांच्या मुलांजवळ व मुलांना त्यांच्या पालकांजवळ येण्यास मदत करील. हे घडलेच पाहिजे नाहीतर मी (देव) येईन आणि तुमच्या देशाचा संपूर्ण नाश करीन.”
”अब्राहामाचा पुत्र दावीद याचा पुत्र जो येशू ख्रिस्त याची वंशावळी. अब्राहामास इसहाक झाला, इसहाकास याकोब, याकोबास यहूदा व त्याचे भाऊ झाले. यहूदास तामारेपासून पेरेस व जेरह झाले, पेरेसास हेस्रोन, हेस्रोनास अराम झाला. अरामास अम्मीनादाब, अम्मीनादाबास नहशोन, नहशोनास सल्मोन, सल्मोनास राहाबेपासून बवाज, बवाजास रूथपासून ओबेद, ओबेदास इशाय झाला. आणि इशायास दावीद राजा झाला. उरीयाच्या पत्नीपासून दावीदास शलमोन झाला. शलमोनास रहबाम, रहबामास अबीया, अबीयास आसा झाला, आसास यहोशाफाट, यहोशाफाटास योराम आणि योरामास उज्जीया, उज्जीयास योथाम, योथामास आहाज, आहाजास हिज्कीया, हिज्कीयास मनश्शे, मनश्शेस आमोन, आमोनास योशीया, आणि बाबेलास देशांतर झाले त्यावेळी योशीयास यखन्या व त्याचे भाऊ झाले. बाबेलास देशांतर झाल्यानंतर यखन्यास शल्तीएल झाला, शल्तीएलास जरूब्बाबेल झाले. जरूब्बाबेलास अबीहूद, अबीहूदास एल्याकीम, एल्याकीमास अज्जुर झाला. अज्जुरास सादोक, सादोकास याखीम, याखीमास एलीहूद झाला. एलीहूदास एलाजार झाला. एलाजारास मत्तान, मत्तानास याकोब, याकोबास योसेफ झाला; जो मरीयेचा पती होता जिच्यापासून ख्रिस्त म्हटलेला येशू जन्मास आला.
”अशाप्रकारे अब्राहामापासून दावीदापर्यंत सर्व मिळून चौदा पिढ्या, दावीदापासून बाबेलास देशांतर होईपर्यंत चौदा पिढ्या आणि बाबेलास देशांतर झाल्यापासून ख्रिस्तापर्यंत चौदा पिढ्या.
”येशू ख्रिस्ताचा जन्म याप्रकारे झाला; त्याची आई मरीया, हिची योसेफाशी मागणी झालेली होती, पण त्यांचा सहवास होण्यापूर्वी ती पवित्र आत्म्यापासून गर्भवती झालेली दिसून आली. मरीयेचा पती योसेफ हा नीतिमान होता परंतु समाजामध्ये तिचा अपमान होऊ नये अशी त्याची इच्छा होती म्हणून त्याने गुप्तपणे तिच्यासोबतची मागणी मोडण्याचा निर्णय घेतला. तो या गोष्टींविषयी विचार करीत असता, त्यास स्वप्नात प्रभूच्या दूताने दर्शन देऊन म्हटले, “योसेफा, दावीदाच्या पुत्रा, तू मरीयेला आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास घाबरू नकोस, कारण जो गर्भ तिच्या पोटी राहीला आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. ती पुत्राला जन्म देईल आणि तू त्याचे नाव येशू ठेव, तो आपल्या लोकांस त्यांच्या पापांपासून तारील.” प्रभूने संदेष्ट्यांच्याद्वारे जे सांगितले होते ते परिपूर्ण व्हावे यासाठी हे सर्व झाले, ते असे, “पाहा कुमारी गर्भवती होईल व पुत्राला जन्म देईल, आणि त्यास इम्मानुएल हे नाव देतील.” या नावाचा अर्थ, “आम्हाबरोबर देव.” तेव्हा झोपेतून उठल्यावर प्रभूच्या दूताने आज्ञा दिली होती तसे योसेफाने केले, त्याने तिचा आपली पत्नी म्हणून स्वीकार केला, (तरी मुलाचा जन्म होईपर्यंत त्याने तिच्याशी सहवास ठेवला नाही.) आणि त्याने त्याचे नाव येशू ठेवले.
”नंतर ते त्या घरात गेले आणि ते बाळक आपली आई मरीया हिच्याजवळ असलेले त्यांनी पाहीले व खाली वाकून त्यांनी त्यास नमन केले. त्यांनी आपल्या द्रव्यांच्या थैल्या उघडून सोने, ऊद व गंधरस ही दाने अर्पण केली.
”मी तर तुम्हास सांगतो, जो कोणी आपल्या भावावर (उगाच) रागावेल तो न्यायसभेच्या शिक्षेस पात्र होईल; जो कोणी आपल्या भावाला, ‘अरे वेडगळा,’ असे म्हणेल तो वरिष्ठ सभेच्या पात्र होईल आणि जो कोणी त्याला, ‘अरे मूर्खा,’ असे म्हणेल, तो नरकाग्नीच्या शिक्षेस पात्र होईल. यास्तव तू आपले अर्पण वेदीवर अर्पिण्यास आणीत असता आपल्या भावाच्या मनात आपल्याविरूद्ध काही आहे अशी तुला तेथे आठवण झाली, तर आपले अर्पण तसेच वेदीसमोर ठेव आणि आपल्या मार्गाने परत जा व प्रथम आपल्या भावासोबत समेट कर आणि मग येऊन आपले अर्पण वेदीवर अर्पण कर.
”‘कोणी आपली पत्नी सोडून देतो तर त्याने तिला सूटपत्र द्यावे’ हे सांगितले होते. मी तर तुम्हास सांगतो की, जो कोणी आपल्या पत्नीला व्यभिचाराच्या कारणाशिवाय टाकतो, तो तिला व्यभिचारिणी करतो आणि जो कोणी अशा टाकलेल्या पत्नीबरोबर लग्न करतो तो व्यभिचार करतो.
”तुमच्यामध्ये कोण मनुष्य असा आहे, जो आपल्या मुलाने भाकर मागितली तर त्यास दगड देईल? किंवा त्याने मासा मागितला असता, त्याऐवजी त्यास साप देईल? वाईट असूनही जर तुम्हास आपल्या मुलांना चांगल्या गोष्टी देण्याचे कळते तर तुमच्या स्वर्गातील पित्याकडे जे मागतात, त्यांच्या गरजा तो किती चांगल्या प्रकारे भागवील?
”असे समजू नका की मी पृथ्वीवर शांतता करायला आलो आहे. मी शांतता स्थापित करायला आलो नाही तर तलवार चालवायला आलो आहे. मी फूट पाडायला आलो आहे, म्हणजे मुलाला त्याच्या पित्याविरुद्ध आणि मुलीला तिच्या आईविरुद्ध सुनेला तिच्या सासूविरुद्ध उभे करायला आलो आहे. सारांश मनुष्याच्या घरचीच माणसे त्याचे शत्रू होतील. जो माझ्यापेक्षा स्वतःच्या पित्यावर किंवा आईवर अधिक प्रीती करतो, तो मला योग्य नाही. जो माझ्यापेक्षा आपल्या मुलावर, मुलीवर अधिक प्रीती करतो, तो मला योग्य नाही.
”परूशी कसला विचार करीत आहेत ते येशूला जाणवत होते. म्हणून येशू त्यांना म्हणाला, “आपसात लढणारी राज्ये नाश पावतात व फूट पडलेले शहर किंवा घर टिकत नाही.
”मग तो लोकसमुदायाबरोबर बोलत असता, त्याची आई व त्याचे भाऊ त्याच्याशी बोलण्यासाठी बाहेर वाट पाहत उभे होते. तेव्हा कोणीतरी त्यास म्हणाले, “तुमची आई व भाऊ बाहेर उभे आहेत. ते तुमच्याशी बोलण्याची वाट पाहत आहेत.” त्याच्याशी बोलणाऱ्याला त्याने उत्तर दिले, “कोण माझी आई? कोण माझा भाऊ?” मग तो आपल्या शिष्यांकडे हात करून म्हणाला, “पाहा, माझी आई व माझे भाऊ हे आहेत. कारण माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेनुसार जे वागतात, तेच माझे भाऊ, बहीण आणि आई.”
”हा सुताराचा पुत्र ना? याच्या आईला मरीया म्हणतात ना? याकोब, योसे, शिमोन व यहूदा, हे याचे भाऊ ना? याच्या बहिणी, त्या सर्व आपणाबरोबर नाहीत काय? मग ते सर्व याला कोठून? असे ते त्याच्याविषयी अडखळले. येशूने त्यास म्हटले, संदेष्ट्याला आपला देश व आपले घर यामध्ये मात्र सन्मान मिळत नाही.
”कारण देवाने सांगितले आहे की, तुझ्या आई-वडीलांचा मान राख आणि जो कोणी आपल्या आई-वडीलांबद्दल वाईट बोलतो, त्यास जिवे मारावे. पण तुम्ही म्हणता, जो कोणी पित्याला किंवा आईला म्हणेल की, मला तुझ्यासाठी जे काही देणे भाग होते, ते मी देवाला अर्पण केले आहे ते देवाचे नियमशास्त्र मोडीत आहेत की आपल्या वडिलांचा व आईचा सन्मान करू नये. याप्रकारे तुम्ही आपल्या अशा परंपरेने देवाचे वचन रद्द केले आहे.
”तेव्हा त्याने एका लहान बालकाला आपल्याजवळ बोलावून त्यांच्यामध्ये उभे केले, आणि म्हटले, “मी तुम्हास खरे सांगतो, तुमच्यात बदल होऊन तुम्ही बालकासारखे झाल्याशिवाय स्वर्गाच्या राज्यात तुमचा प्रवेश होणारच नाही. म्हणून जो कोणी आपणाला या बालकासारखे लीन करतो तोच स्वर्गाच्या राज्यात सर्वाहून महान आहे. आणि जो कोणी अशा एका लहान बालकाला माझ्या नावाने स्वीकारतो, तो मला स्वीकारतो. परंतु जो कोणी माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या या लहानातील एकाला अडखळण आणील त्याच्या गळ्यात जात्याची मोठी तळी बांधून त्यास समुद्राच्या खोल पाण्यात बुडविणे हे त्याच्या हिताचे आहे.
”सावध असा. ही लहान मुले यांना कमी समजू नका कारण मी तुम्हास सांगतो की, स्वर्गात त्यांचे देवदूत माझ्या स्वर्गातील पित्याचे मुख नेहमी पाहतात.
”जर तुझा भाऊ तुझ्यावर अन्याय करील, तर जा अणि त्यास तुझ्यावर काय अन्याय झाला ते एकांतात सांग. जर त्यांने तुझे ऐकले तर त्यास आपला बंधू म्हणून परत मिळवला आहेस.
”नंतर पेत्र येशूकडे आला आणि त्याने विचारले, “प्रभू, जर माझा भाऊ माझ्यावर अन्याय करीत राहिला तर मी त्यास किती वेळा क्षमा करावी? मी त्यास सात वेळा क्षमा करावी काय?” येशूने उत्तर दिले, “मी तुला सांगतो, फक्त सातच वेळा नाही तर उलट त्याने तुझ्यावर साताच्या सत्तरवेळा अन्याय केला तरी तू त्यास क्षमा करीत राहा.”
”काही परूशी येशूकडे आले. येशूने चुकीचे काही बोलावे असा प्रयत्न त्यांनी चालविला. त्यांनी येशूला विचारले, कोणत्याही कारणास्तव एखाद्या मनुष्याने आपल्या पत्नीला सूटपत्र द्यावे काय? येशूने उत्तर दिले, “पवित्र शास्त्रात असे लिहिलेले तुमच्या वाचनात निश्चितच आले असेल की, जेव्हा देवाने जग उत्पन्न केले, आणि देव म्हणाला, ‘म्हणून पुरूष आपल्या आई-वडीलांना सोडून व आपल्या पत्नीला जडून राहील. ती दोघे एकदेह होतील.’ म्हणून दोन व्यक्ति या दोन नाहीत तर एक आहेत. देवाने त्या दोघांना एकत्र जोडले आहे. म्हणून कोणाही व्यक्तिने त्यांना वेगळे करू नये.” परुश्यांनी विचारले, “असे जर आहे, तर मग पुरूषाने सूटपत्र लिहून देण्याची आणि आपल्या पत्नीला सोडून देण्याची मोकळीक देणारी आज्ञा मोशेने का दिली?” येशूने उत्तर दिले, “तुमच्या अंतःकरणाच्या कठोरपणामुळे मोशेने तुम्हास आपल्या स्त्रिया सोडून देण्याची मोकळीक दिली. पण सुरुवातीला सूटपत्र देण्याची मोकळीक नव्हती. मी तुम्हास सांगतो, जो मनुष्य आपली पत्नी सोडून देतो आणि दुसरीशी लग्न करतो तो व्यभिचार करतो. आपल्या पत्नीला सूटपत्र देण्याचे एकच कारण आहे, ते म्हणजे पहिल्या पत्नीने परपुरुषांशी व्यभिचार करणे होय.” मग त्याचे शिष्य त्यास म्हणाले, “जर पती व पत्नीमधील परिस्थिति अशी असेल तर मग लग्न न करणे जास्त योग्य ठरेल.”
”नंतर येशूने आपल्या मुलांवर हात ठेवून प्रार्थना करावी यासाठी काही लोकांनी आपली मुले त्याच्याकडे आणली. येशूच्या शिष्यांनी त्यांना पाहिल्यावर ते बालकांना घेऊन येशूकडे येण्यास मना करू लागले. परंतु येशू म्हणाला, “लहान मुलांना मजकडे येऊ द्या, त्यांना मना करू नका, कारण स्वर्गाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे.”
”ज्याने ज्याने माझ्यामागे येण्याकरता आपले घर, भाऊ, बहीण, आईवडील, मुले, शेतीवाडी सोडली असेल तर त्यास त्यापेक्षा कितीतरी जास्तपटीने लाभ होईल व त्यास सार्वकालिक जीवन मिळेल.
”त्यांनी त्यास विचारले, “ही मुले काय म्हणत आहे हे तुम्ही ऐकता ना?” येशूने त्यांना उत्तर दिले, “होय परंतु तू बालके व तान्हुली यांच्या मुखातून स्तुती पूर्ण करवली आहे. हे तुमच्या वाचण्यात कधी आले नाही काय?”
”स्वर्गाचे राज्य एका राजासारखे आहे, त्याने त्याच्या मुलाच्या लग्नानिमित्त भोजनाचे आमंत्रण दिले. त्याने त्याच्या चाकरांना पाठवून, ज्यांना लग्नाचे आमंत्रण होते अशांना बोलाविण्यास सांगितले. पण लोकांनी राजाच्या मेजवानीस येण्यास नकार दिला. नंतर राजाने आणखी काही चाकरांना पाठवून दिले, राजा चाकरांना म्हणाला, मी त्या लोकांस अगोदरच आमंत्रण दिले आहे म्हणून आता जा आणि त्यांना सांगा, पाहा, मेजवानी तयार आहे, मी माझे चांगल्यातील चांगले बैल आणि वासरे कापली आहेत आणि सगळे तयार आहे, लग्नाच्या मेजवानीस या.
”म्हणून रस्त्यांच्या कोपऱ्यावर जा आणि तेथे तुम्हास जे भेटतील त्यांना लग्नाच्या मेजवानीला बोलवा. मग ते चाकर रस्त्यावर गेले. त्यांना जे जे लोक भेटले त्यांना जमा केले. ज्याठिकाणी लग्नाची मेजवानी तयार होती तेथे चाकरांनी चांगल्या आणि वाईट लोकांस जमा केले आणि लग्नाचा मंडप पाहुण्यांनी भरून गेला. मग त्या सर्वांना भेटण्यास राजा तेथे आला. लग्नाचा पोशाख न केलेला एक मनुष्य राजाला तेथे आढळला. राजा त्यास म्हणाला, मित्रा, तू लग्नाचा पोशाख न घालता तू येथे कसा आलास? पण त्यास काही उत्तर देता येईना.
”पुनरुत्थान होत नाही, असे म्हणणाऱ्या काही सदूक्यांनी त्याच दिवशी त्याच्याकडे येऊन त्यास विचारले, ते म्हणाले, “गुरूजी, मोशेने शिकविले की, जर एखादा मनुष्य मरण पावला आणि त्यास मूलबाळ नसेल, तर त्याच्या भावाने त्याच्या पत्नीशी लग्न करावे, म्हणजे मरण पावलेल्या भावाचा वंश चालेल. आता, आमच्यामध्ये सात भाऊ होते. पहिल्याने लग्न केले आणि नंतर तो मरण पावला आणि त्यास मूल नसल्याने त्याच्या भावाने त्याच्या पत्नीशी लग्न केले. असेच दुसऱ्या व तिसऱ्या भावाच्या बाबतीतही घडले व सातही भावांनी तिच्याशी लग्न केले आणि मरण पावले. शेवटी ती स्त्री मरण पावली. आता प्रश्न असा आहे की, पुनरुत्थानाच्या वेळेस ती कोणाची पत्नी असेल, कारण सर्व सातही भावांनी तिच्याशी लग्न केले होते.” येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, तुम्ही चुकीची समजूत करून घेत आहात, कारण तुम्हास शास्त्रलेख व देवाचे सामर्थ्य माहीत नाही. तुम्हास समजले पाहिजे की, पुनरुत्थानानंतरच्या जीवनात लोक लग्न करणार नाहीत किंवा करून देणार नाहीत, उलट ते स्वर्गात देवदूतासारखे असतील. तरी, मरण पावलेल्यांच्या पुनरुत्थानाविषयी देवाने तुम्हास जे सांगितले ते तुम्ही अजूनपर्यंत वाचले नाही काय? ते असे की, मी अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव आणि याकोबाचा देव आहे, तो मरण पावलेल्यांचा देव नाही तर जिवंताचा देव आहे.
”आणि जगातील कोणालाही पिता म्हणू नका कारण तुमचा पिता एकच आहे व तो स्वर्गात आहे.
”तेव्हा जसे महापूर येण्याअगोदर लोक खातपीत होते. लोक लग्न करीत होते. लग्न करून देत होते. नोहा तारवात जाईपर्यंत लोक या गोष्टी करीत होते.
”तेव्हा त्यादिवसात स्वर्गाचे राज्य दहा कुमारींसारखे असेल, त्यांनी त्यांचे दिवे घेतले व वराला भेटण्यास गेल्या.
”जब्दीचा मुलगा याकोब व याकोबाचा भाऊ योहान त्यांना त्याने बोआनेर्गेश, ज्याचा अर्थ गर्जनेचे पुत्र असा होतो हे नाव दिले.
”आपापसात फूट पडलेले घरही टिकू शकत नाही.
”तेव्हा येशूची आई व भाऊ आले आणि बाहेर उभे राहून त्यांनी निरोप पाठवून त्यास बोलावले. लोकसमुदाय येशूभोवती बसला होता, ते त्यास म्हणाले, “तुझी आई व तुझे भाऊ बाहेर तुझी वाट पाहात आहेत.” त्याने त्यांना उत्तर दिले, “माझे आई व माझे भाऊ कोण आहेत?” मग तो आपल्या सभोवताली बसलेल्यांकडे सभोवती पाहून म्हणाला, “पाहा माझी आई आणि माझे भाऊ. जे कोणी देवाच्या इच्छेप्रमाणे वागतात तेच माझे भाऊ, माझी बहीण व माझी आई.”
”जो सुतार, मरीयेचा मुलगा आणि याकोब, योसे, यहूदा व शिमोन यांचा जो भाऊ तोच हा आहे ना?” आणि या आपल्याबरोबर आहेत त्या याच्या बहिणी नव्हेत काय? त्याचा स्वीकार करण्याविषयी त्यांना प्रश्न पडला. मग येशू त्यांना म्हणाला, “संदेष्ट्याचा सन्मान होत नाही असे नाही; मात्र त्याच्या नगरात, त्याच्या नातेवाईकात आणि त्याच्या कुटुंबात त्याचा सन्मान होत नसतो.”
”मोशेने सांगितले आहे की, ‘तू आपल्या आई-वडीलांचा सन्मान कर आणि जो मनुष्य आपल्या वडिलांबद्दल किंवा आईबद्दल वाईट बोलतो, त्यास ठार मारलेच पाहिजे.’ परंतु तुम्ही शिकविता, एखादा मनुष्य आपल्या वडिलांना व आईला असे म्हणू शकतो की, ‘तुम्हास मदत करण्यासाठी माझ्याकडे थोडे फार आहे, परंतु तुम्हास मदत करण्यासाठी मी ते वापरणार नाही, मी ते देवाला अर्पण करण्याचे ठरवले आहे.’ तर तुम्ही त्यास त्याच्या वडिलांसाठी किंवा आईसाठी पुढे काहीच करू देत नाही. अशाप्रकारे तुम्ही आपला संप्रदाय चालू ठेवून देवाचे वचन रद्द करता आणि यासारख्या पुष्कळ गोष्टी करता.”
”मग येशूने एक बालकास घेऊन त्यांच्यामध्ये उभे केले व त्यांना म्हणाला? “जो कोणी या लहान बालकाला माझ्या नावाने स्वीकारतो तो मला स्वीकारतो आणि जो कोणी मला स्वीकारतो तो केवळ माझाच स्वीकार करतो असे नाही तर ज्याने मला पाठवले त्याचाही स्वीकार करतो.”
”माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या या लहानातील एकाला जो कोणी देवापासून परावृत्त करील, त्याच्या गळ्यात जात्याची तळी बांधून त्यास समुद्रात फेकून देणे हे त्याच्यासाठी बरे आहे.
”काही परूशी येशूकडे आले. त्यांनी त्यास विचारले, “पतीने पत्नी सोडावी हे कायदेशीर आहे काय?” हे तर त्यांनी त्याची परीक्षा पाहण्यासाठी विचारले. येशूने त्यांना उत्तर दिले, “मोशेने तुम्हास काय आज्ञा दिली आहे?” ते म्हणाले, “मोशेने पुरुषाला सूटपत्र लिहिण्याची व असे करून आपल्या पत्नीला सोडण्याची परवानगी दिली आहे.” येशू म्हणाला, “केवळ तुमच्या अंतःकरणाच्या कठीणपणामुळे मोशेने ही आज्ञा तुमच्यासाठी लिहून ठेवली. परंतु उत्पत्तीच्या आरंभापासून देवाने त्यांना पुरूष व स्त्री असे निर्माण केले. या कारणामुळे पुरूष आपल्या आई-वडीलांना सोडून आपल्या पत्नीशी जडून राहील. आणि ती दोघे एकदेह होतील. म्हणून यापुढे ती दोन नाहीत तर एकदेह आहेत. यासाठी देवाने जे जोडले आहे, ते मनुष्याने तोडू करू नये.” नंतर येशू व शिष्य घरात असता, शिष्यांनी या गोष्टीविषयी पुन्हा त्यास विचारले. तो त्यांना म्हणाला, “जो कोणी आपली पत्नी टाकतो व दुसरीबरोबर लग्न करतो तो आपल्या पत्नीविरुद्ध व्यभिचार करतो. आणि जर पत्नी आपल्या पतीला सोडते आणि दुसऱ्याबरोबर लग्न करते, तर तीही व्यभिचार करते.”
”मग त्याने बालकांस हात ठेवावा? करावा आणि आशीर्वाद द्यावा म्हणून लोकांनी त्यांना त्याच्याकडे आणले, परंतु शिष्यांनी आणणाऱ्यांना दटावले. येशूने हे पाहिले तेव्हा तो रागवला आणि त्यांना म्हणाला, “लहान बालकांना माझ्याकडे येऊ द्या. त्यांना मना करू नका कारण देवाचे राज्य यांच्यासारख्यांचेच आहे. मी तुम्हास खरे सांगतो, जो कोणी बालकासारखा देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही त्याचा प्रवेश त्यामध्ये मुळीच होणार नाही.” तेव्हा त्याने बालकांना उचलून जवळ घेतले. आपले हात त्यांच्यावर ठेवले आणि त्यांना आशीर्वाद दिला.
”तुला आज्ञा माहीत आहेतच; खून करू नको, व्यभिचार करू नको, चोरी करू नको, खोटी साक्ष देऊ नको, फसवू नको, आपल्या वडिलांचा व आपल्या आईचा सन्मान कर.”
”येशू म्हणाला, “मी तुम्हास खरे सांगतो, ज्याने ज्याने माझ्याकरिता व सुवार्तेकरता घरदार, बहिण, भाऊ, आईवडील, मुलेबाळे किंवा शेतीवाडी सोडली आहे अशा प्रत्येकाला शेवटच्या काळी छळणुकीबरोबर शंभरपटीने घरे, भाऊ, बहिणी, आया, मुले, शेते आणि येणाऱ्या युगात सार्वकालिक जीवन मिळाल्याशिवाय राहणार नाही.
”“गुरुजी. मोशेने आमच्यासाठी असे लिहिले आहे की, जर कोणा मनुष्याचा भाऊ मरण पावला व त्याची पत्नी मागे राहिली, परंतु त्यांना मूलबाळ नसले तर आपल्या भावाच्या वंश पुढे चालावा म्हणून त्या मनुष्याने तिच्याबरोबर लग्न करावे आणि मरण पावलेल्या भावाचा वंश वाढवावा. तर असे कोणी सात भाऊ होते. पहिल्याने पत्नी केली व तो मूलबाळ न होता मरण पावला. दुसऱ्याने तिच्याबरोबर लग्न केले, तोसुध्दा मूलबाळ न होता मरण पावला. तिसऱ्याने तसेच केले. त्या सात भावांपैकी एकालाही त्या स्त्रीपासून, मूलबाळ झाले नाही. शेवटी ती स्त्रीही मरण पावली. सातही भावांनी तिच्याबरोबर लग्न केले तर पुनरुत्थानाच्या वेळी जेव्हा लोक मरण पावलेल्यातून उठतील तेव्हा ती कोणाची पत्नी असेल? कारण सातही जणांनी तिच्याबरोबर लग्न केले होते.” येशू त्यांना म्हणाला, “खात्रीने, शास्त्रलेख आणि देवाचे सामर्थ्य तुम्हास माहीत नाही म्हणून तुम्ही अशी चूक करीत आहात. कारण जेव्हा लोक मरण पावलेल्यातून उठतील तेव्हा ते लग्न करणार नाहीत व करून देणार नाहीत त्याऐवजी ते स्वर्गातील देवदूताप्रमाणे असतील. परंतु मरण पावलेल्यांच्या पुन्हा उठण्याविषयी तुम्ही मोशेच्या पुस्तकातील जळत्या झुडपाविषयी वाचले नाही काय? तेथे देव मोशाला म्हणाला, मी अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव आणि याकोबाचा देव आहे.
”भाऊ भावाला व वडील आपल्या मुलाला ठार मारण्यासाठी विश्वासघात करून धरून देतील, मुले आपल्या आईवडीलांवर उठतील आणि ते त्यांना ठार करतील.
”परंतु देवदूत त्यास म्हणाला, जखऱ्या भिऊ नको, कारण तुझी प्रार्थना ऐकण्यात आली आहे आणि तुझी पत्नी अलीशिबा हिच्याकडून तुला पुत्र होईल, तू त्याचे नाव योहान ठेव. तेव्हा तुला आनंद व उल्लास होईल आणि त्याच्या जन्माने पुष्कळ लोक हर्षित होतील. कारण तो परमेश्वराच्या दृष्टीने महान होईल आणि तो द्राक्षारस किंवा मद्य कधीच पिणार नाही व तो आईच्या गर्भात असतांनाच पवित्र आत्म्याने भरलेला असेल. तो इस्राएलाच्या संतानांतील अनेकांना, प्रभू त्यांचा देव याच्याकडे वळविण्यास कारणीभूत ठरेल. आणि देवासाठी सिद्ध झालेले असे लोक तयार करायला, वडिलांची अंतःकरणे मुलांकडे आणि आज्ञा न मानणार्यांना नीतिमानांच्या ज्ञानाकडे वळवून प्रभूसाठी तयार केलेली प्रजा उभी करावयाला तो एलियाच्या आत्म्याने आणि सामर्थ्याने त्यांच्यापुढे चालेल.
”अलीशिबेच्या गरोदरपणाच्या सहाव्या महिन्यात देवाने गब्रीएल दूताला गालील प्रांतातील नासरेथ नावाच्या गावी, एका कुमारीकडे पाठवले. तिची दाविदाच्या घराण्यातील योसेफ नावाच्या मनुष्याशी मागणी झाली होती आणि त्या कुमारीचे नाव मरीया होते. देवदूत तिच्याकडे येऊन म्हणाला, अभिवादन! तुझ्यावर कृपा झालेली आहे. प्रभू तुझ्याबरोबर आहे. परंतु ती त्याच्या शब्दाने अस्वस्थ झाली आणि या अभिवादनाचा अर्थ काय असावा याचे ती नवल करू लागली. देवदूत तिला म्हणाला, “मरीये, भिऊ नकोस, देवाने तुझ्यावर कृपा केली आहे. पाहा! तू गरोदर राहशील आणि तुला मुलगा होईल त्याचे नाव तू येशू ठेव. तो महान होईल व त्यास थोर देवाचा पुत्र म्हणतील आणि प्रभू देव त्यास त्याचा पिता दावीद याचे राजासन देईल. तो याकोबाच्या घराण्यावर सर्वकाळासाठी राज्य चालवील आणि त्याच्या राज्याचा अंत होणार नाही.” तेव्हा मरीया दूताला म्हणाली, हे कसे होईल? कारण मला पुरूष ठाऊक नाही. देवदूत तिला म्हणाला, पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि थोर देवाचे सामर्थ्य तुझ्यावर सावली करील आणि म्हणून जे पवित्र बाळ जन्मास येईल, त्यास देवाचा पुत्र म्हणतील.
”जसे मरीयेचे अभिवादन अलीशिबेने ऐकले तिच्या उदरातील बाळाने उडी मारली आणि अलीशिबा पवित्र आत्म्याने भरली. ती उंच स्वर काढून मोठ्याने म्हणाली, “स्त्रियांमध्ये तू धन्यवादित आहेस आणि तुझ्या पोटचे फळ धन्य आहे. माझ्या प्रभूच्या मातेने मजकडे यावे हा मान मला कोठून?” जेव्हा तुझ्या अभिवादनाची वाणी माझ्या कानी पडली, तेव्हा माझ्या उदरातील बाळाने आनंदाने उडी मारली
”मग योसेफसुद्धा गालील प्रांतातील नासरेथ गांवाहून यहूदीया प्रांतातील दाविदाच्या बेथलेहेम या गावी गेला कारण तो दाविदाच्या घराण्यातील व कुळातील होता. व नावनिशी लिहून देण्यासाठी, जिच्याशी त्याची मागणी झालेली होती त्या गरोदर मरीयेला त्याने बरोबर नेले. आणि असे झाले, ते तेथे असताच तिचे प्रसूतीचे दिवस पूर्ण होऊन, तिने तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला आणि तिने त्यास कापडात गुंडाळले व गव्हाणींत ठेवले कारण धर्मशाळेत उतरण्यासाठी त्यांना जागा मिळाली नाही.
”आठवा दिवस म्हणजे सुंतेचा दिवस आल्यावर त्याचे नाव येशू ठेवण्यात आले. हे नाव तो उदरात संभवण्यापूर्वीच देवदूताने ठेवले होते. पुढे मोशेच्या नियमशास्त्राप्रमाणे त्यांचे शुद्धीकरणाचे दिवस भरल्यावर ते त्यास वर यरुशलेम शहरास घेऊन आले; ते अशासाठी की, त्याचे प्रभूला समर्पण करावे. म्हणजे प्रत्येक प्रथम जन्मलेला नर प्रभूसाठी पवित्र म्हटला जावा असे जे प्रभूच्या नियमशास्त्रात लिहिले आहे त्याप्रमाणे करावे.
”जेव्हा त्यांनी त्यास पाहिले तेव्हा ते आश्चर्यचकित झाले. त्याची आई त्यास म्हणाली, “मुला, तू आमच्याबरोबर असे का वागलास? ऐक, तुझा पिता व मी कष्टी होऊन तुझा शोध करीत आलो.” येशू त्यांना म्हणाला, “तुम्ही माझा शोध का करीत होता? मी माझ्या पित्याच्या घरात असावे, हे तुम्हास माहीत नव्हते काय?” परंतु तो जे शब्द त्यांच्याशी बोलला ते त्यांना समजले नाही. मग तो त्यांच्याबरोबर नासरेथास गेला आणि तो त्यांच्या आज्ञेत राहिला. त्याच्या आईने या सर्व गोष्टी आपल्या अंतःकरणात जपून ठेवल्या.
”जेव्हा येशूने त्याच्या कार्यास सुरुवात केली तेव्हा तो सुमारे तीस वर्षांचा होता. लोक त्यास योसेफाचा मुलगा समजत. योसेफ एलीचा मुलगा होता एली मत्ताथाचा, मत्ताथ लेवीचा, लेवी मल्खीचा, मल्खी यन्रयाचा, यन्रया योसेफाचा मुलगा होता. योसेफ मत्तिथ्याचा मुलगा होता. मत्तिथ्य अमोसाचा, अमोस नहूमाचा, नहूम हेस्लीचा, हेस्ली नग्गयाचा, नग्गय महथाचा, महथ मत्तिथ्याचा, मत्तिथ्य शिमयीचा, शिमयी योसेखाचा, योसेख योदाचा मुलगा होता. योदा योहानानाचा मुलगा होता. योहानान रेशाचा, रेशा जरूब्बाबेलाचा, जरूब्बाबेल शल्तीएलाचा, शल्तीएल नेरीचा, नेरी मल्खीचा, मल्खी अद्दीचा, अद्दी कोसोमाचा, कोसोम एल्मदामाचा, एल्मदाम एराचा, एर येशूचा, येशू अलिएजराचा, अलिएजर योरीमाचा, योरीम मत्ताथाचा, मत्ताथ लेवीचा मुलगा होता. लेवी शिमोनाचा मुलगा होता. शिमोन यहूदाचा, यहूदा योसेफाचा, योसेफ योनामाचा, योनाम एल्याकीमाचा, एल्याकीम मल्लयाचा, मल्लया मिन्नाचा, मिन्ना मत्ताथाचा, मत्ताथ नाथानाचा, नाथान दाविदाचा, दावीद इशायाचा, इशाय ओबेदाचा, ओबेद बवाजाचा, बवाज सल्मोनाचा, सल्मोन नहशोनाचा मुलगा होता. नहशोन अम्मीनादाबाचा मुलगा होता. अम्मीनादाब अदामीनचा, अदामीन अर्णयाचा, अर्णय हेस्रोनाचा, हेस्रोन पेरेसाचा, पेरेस यहूदाचा, यहूदा याकोबाचा, याकोब इसहाकाचा, इसहाक अब्राहामाचा, अब्राहाम तेरहाचा, तेरह नाहोराचा, नाहोर सरुगाचा, सरुग रऊचा, रऊ पेलेगाचा, पेलेग एबराचा, एबर शेलहाचा मुलगा होता. शेलह केनानाचा मुलगा होता. केनान अर्पक्षदाचा, अर्पक्षद शेमाचा, शेम नोहाचा, नोहा लामेखाचा, लामेख मथुशलहाचा, मथुशलह हनोखाचा, हनोख यारेदाचा, यारेद महललेलाचा, महललेल केनानाचा, केनान अनोशाचा, अनोश शेथाचा, शेथ आदामाचा, आदाम देवाचा पुत्र होता.
”तेव्हा त्याची आई व भाऊ त्याच्याकडे आली आणि दाटीमुळे त्यांना त्याच्याजवळ जाता येईना. तेव्हा कोणी त्यास सांगितले, तुझी आई व तुझे भाऊ तुला भेटायला पाहत असून बाहेर उभे राहिले आहेत. आणि त्याने त्यांना उत्तर देऊन म्हटले, देवाचे वचन ऐकणारे व पाळणारे हेच माझे आई व भाऊ.
”तुम्हामध्ये असा कोण पिता आहे की, त्याच्या मुलाने त्यास मासा मागितला असता त्यास माशाऐवजी साप देईल? किंवा जर मुलाने अंडे मागितले तर कोणता पिता त्यास विंचू देईल? जर तुम्ही वाईट असतांनाही तुम्हास तुमच्या मुलांना चांगल्या देणग्या देण्याचे कळते, तर मग स्वर्गीय पित्याजवळ जे मागतात त्यांना तो किती विशेषकरून पवित्र आत्मा देईल?”
”त्यांच्यात पित्याविरुद्ध मुलगा व मुलाविरुद्ध पिता अशी फूट पडेल, आईविरुद्ध मुलगी व मुलीविरुद्ध आई अशी फूट पडेल, सासूविरुद्ध सून व सुनेविरुद्ध सासू अशी त्यांच्यात फूट पडेल.”
”जर कोणी माझ्याकडे येतो आणि आपले वडील, आई, पत्नी, मुले, भाऊ, बहिणी एवढेच नव्हे, तर स्वतःच्या जीवाचासुद्धा द्वेष करीत नाही, तर तो माझा शिष्य होऊ शकत नाही. जो कोणी स्वतःचा वधस्तंभ घेऊन माझ्यामागे येणार नाही, तो माझा शिष्य होऊ शकणार नाही.
”मग येशू म्हणाला, एका मनुष्यास दोन पुत्रहोते. त्या दोघांपैकी धाकटा पुत्र म्हणाला, “बाबा, मालमत्तेतला माझा वाटा मला द्या.” आणि मग त्यांच्या वडिलांनी आपली संपत्ती दोघा मुलांमध्ये वांटून दिली. त्यानंतर काही दिवसानंतर लागलीच धाकट्या मुलाने आपले सर्व गोळा केले आणि तो दूरदेशी निघून गेला. तेथे त्याने त्याची सर्व संपत्ती चैनीत व मौजमजेचे जीवन जगून उधळून टाकली. त्याने सर्व पैसे खर्चून टाकले आणि मग त्या देशात भयंकर दुष्काळ पडला व त्यास गरज भासू लागली. त्या देशातील एका नागरिकाजवळ तो गेला आणि त्याचा आश्रय धरुन राहीला. त्या नागरीकाने त्यास आपल्या शेतात डुकरे चारावयास पाठवले. तेव्हा कोणी त्यास काहीही न दिल्याने, डुकरे ज्या शेंगा खातात त्या खाऊन तरी आपले पोट भरावे अशी त्यास फार इच्छा होई. नंतर तो शुद्धीवर आला व स्वतःशीच म्हणाला, “माझ्या पित्याच्या घरी कितीतरी नोकरांना पुरुन उरेल इतके अन्न आहे आणि पाहा मी तर येथे भूकेने मरत आहे! आता, मी उठून आपल्या पित्याकडे जाईन आणि त्यास म्हणेन, बाबा, मी स्वर्गाविरुद्ध (देवाविरुद्ध) आणि तुमच्याविरुध्द पाप केले आहे. तुमचा मुलगा म्हणवून घेण्याच्या योग्यतेचा मी राहीलो नाही. मला आपल्या रोजंदारीवरील एखाद्या नोकरासारखे ठेवून घ्या.” मग तो धाकटा मुलगा उठला व आपल्या पित्याकडे गेला. तो त्याच्या घरापासून दूर असतांनाच, त्याच्या पित्याने त्यास पाहिले आणि त्यास त्याचा कळवळा आला आणि धावत जाऊन त्याच्या गळ्यात पडला व त्याचे पुष्कळ मुके घेतले. मुलगा त्यास म्हणाला, “बाबा, मी स्वर्गाविरुद्ध व तुमच्याविरुध्द पाप केले आहे. आता तुमचा मुलगा म्हणवून घेण्याचा मला अधिकार नाही.” परंतु पिता आपल्या नोकरांस म्हणाला, “त्वरा करा, चांगला झगा आणून त्यास घाला. त्याच्या हातात अंगठी आणि पायात जोडे घाला. आणि मोठी मेजवानी करा, आपण खाऊ आणि आनंद करू! कारण हा माझा मुलगा मरण पावला होता पण जिवंत झाला आहे! तो हरवला होता, पण आता सापडला आहे व ते आनंद करू लागले.”
”“जो कोणी आपल्या पत्नीला सोडून देतो व दुसरीबरोबर लग्न करतो तो व्यभिचार करतो आणि जो कोणी, पतीने सोडून दिलेल्या स्त्री सोबत लग्न करतो तो व्यभिचार करतो.”
”स्वतःकडे लक्ष द्या! जर तुमचा भाऊ पाप करतो तर त्यास धमकावा आणि जर तो पश्चात्ताप करतो तर त्यास माफ करा. जर तो दिवसातून सात वेळा तुझ्याविरुद्ध पाप करतो आणि सात वेळा तुझ्याकडे येतो व म्हणतो, मी पश्चात्ताप करतो, तरीही तू त्यास माफ कर.
”आणि लोक आपल्या मुलांनाही त्याच्याकडे स्पर्श करण्यास आणत असता हे शिष्यांनी पहिल्यावर त्यांनी लोकांस धमकावले. पण येशू बालकांना स्वतःकडे बोलवून म्हणाला, “बालकांना माझ्याकडे येऊ द्या. त्यांना अडवू नका कारण देवाचे राज्य त्यांच्यासारख्यांचेच आहे. मी तुम्हास खरे सांगतो, जो कोणी बालकाप्रमाणे देवाच्या राज्याचा स्वीकार करणार नाही, त्याचा स्वर्गात प्रवेश होऊ शकणार नाही.”
”येशूने त्यांना म्हटले, “मी तुम्हास खरे सांगतो, देवाच्या राज्याकरता ज्याने आपले घर, पत्नी, भाऊ, आई-वडील किंवा मुलेबाळ सोडली त्यांना या काळी पुष्कळ पटीने व येणाऱ्या युगात सार्वकालिक जीवन मिळणार नाही असा कोणी नाही.”
”मग पुनरुत्थान नाही असे म्हणणारे काही सदूकी त्याच्याकडे आले. त्यांनी त्यास प्रश्न विचारला. ते म्हणाले, “गुरुजी मोशेने आमच्यासाठी लिहून ठेवले आहे की जर एखाद्याचा भाऊ मरण पावला व त्या भावाला पत्नी आहे पण मूल नाही, तर त्याच्या भावाने त्या विधवेशी लग्न करावे आणि भावासाठी त्यास मुले व्हावीत. सात भाऊ होते. पहिल्या भावाने लग्न केले व तो मूल न होता मरण पावला. नंतर दुसऱ्या भावाने तिच्याशी लग्न केले. नंतर तिसऱ्याने तिच्याशी लग्न केले. सातही भावांबरोबर तीच गोष्ट घडली. कोणालाही मुले न होता ते मरण पावले. नंतर ती स्त्रीही मरण पावली. तर मग पुनरुत्थानाच्या वेळी ती कोणाची पत्नी होईल? कारण त्या सातांनीही तिच्याबरोबर लग्न केले होते.” तेव्हा येशू त्यांना म्हणाला, “या युगातले लोक लग्न करून घेतात व लग्न करून देतात. परंतु जे लोक त्या येणाऱ्या युगामध्ये व मृतांच्या पुनरुत्थानामध्ये भाग घेण्यासाठी पात्र ठरतील, ते लग्न करून घेणार नाहीत आणि लग्न करून देणार नाहीत
”पण जितक्यांनी त्याचा स्वीकार केला, म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवला, तितक्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. त्यांचा जन्म रक्त किंवा देहाची इच्छा किंवा मनुष्याची इच्छा यापासून झाला नाही, तर देवापासून झाला.
”नंतर तिसर्या दिवशी गालील प्रांतातील काना नगरात एक लग्न होते आणि येशूची आई तेथे होती.
”ज्याला वधू आहे तो वर आणि जो वराचा मित्र उभा राहून त्याचे बोलणे ऐकतो, त्यास वराच्या वाणीने अत्यानंद होतो. तसा हा माझा आनंद पूर्ण झाला आहे. त्याची वृद्धी व्हावी व माझा ऱ्हास व्हावा हे अवश्य आहे.
”येशू तिला म्हणाला, “जा, तुझ्या नवर्याला बोलावून आण.” ती स्त्री म्हणाली, “मला पती नाही.” येशूने तिला म्हटले, “तू ठीक बोललीस की, ‘मला पती नाही;’ कारण तुला पाच नवरे होते आणि तुझ्याजवळ आता आहे तो तुझा पती नाही, हे तू खरे बोललीस.”
”यावरुन ज्या ताशी येशूने त्यास सांगितले होते की, “तुमचा मुलगा वाचला आहे,” त्याच ताशी हे झाले असे पित्याने ओळखले आणि त्याने स्वतः व त्याच्या सर्व घराण्याने विश्वास ठेवला.
”तेव्हा ते म्हणाले, “हा येशू योसेफाचा मुलगा नाही काय? याच्या पित्याला आणि आईला आम्ही ओळखतो. आता हा कसे म्हणतो, मी स्वर्गातून उतरलो आहे?”
”तो तिकडून पुढे जात असता एक जन्मपासूनचा आंधळा मनुष्य त्याच्या दृष्टीस पडला. तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्यास विचारले, “रब्बी, कोणाच्या पापामुळे हा असा आंधळा जन्मास आला? याच्या की याच्या आई-वडीलांच्या?” येशूने उत्तर दिले, “ह्याने किंवा याच्या आई-वडीलाने पाप केले असे नाही, तर याच्याठायी देवाची कार्ये प्रकट व्हावीत म्हणून हा असा जन्मास आला.
”मी तुम्हास अनाथ असे सोडणार नाही; मी तुम्हाकडे येईन.
”स्त्री प्रसूत होते तेव्हा तिला वेदनांचे दुःख होते, कारण तिची प्रसूतीची घटका आलेली असते; पण बालक जन्मल्यावर जगात एक मनुष्य जन्मल्याचा जो आनंद होतो त्यामुळे तिला त्या क्लेशाची आठवण होत नाही.
”पण येशूच्या वधस्तंभाजवळ त्याची आई, त्याची मावशी व क्लोपाची पत्नी मरीया आणि मग्दालीया नगराची मरीया या उभ्या होत्या. येशूने जेव्हा आपल्या आईला व तो ज्या शिष्यावर त्याची प्रीती होती त्यास जवळ उभे राहिलेले पाहून तेव्हा तो आपल्या आईला म्हणाला, “आई, पाहा, हा तुझा मुलगा.” मग तो त्या शिष्याला म्हणाला, “पाहा, ही तुझी आई!” आणि त्या शिष्याने तिला तेव्हापासून आपल्याकडे घेतले.
”हे सर्वजण आणि त्यांच्यासह कित्येक स्त्रिया, येशूची आई मरीया, व त्याचे भाऊ एकचित्ताने एकसारखे प्रार्थना करत होते.
”देव म्हणतो, ‘शेवटच्या दिवसात असे होईल,’ मी मनुष्यमात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन, तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील. तुमच्या तरूणांस दृष्टांत होतील व तुमच्या वृद्धास स्वप्ने पडतील.
”कारण हे वचन तुम्हास तुमच्या मुलाबाळांना व जे दूर आहेत, त्या सर्वांना म्हणजे जितक्यांना परमेश्वर आपला देव स्वतःकडे बोलावील तितक्यांना दिले आहे.”
”कर्नेल्य हा भक्तीमान असून आपल्या कुटुंबासह देवाचे भय बाळगणारा होता; तो गोरगरिबांना पुष्कळसा दानधर्म करीत असे आणि तो नेहमी देवाची प्रार्थना करीत असे.
”तो तुझ्याशी बोलेल, तो ज्या गोष्टी तुला सांगेल, त्यामुळे तुझे व तुझ्या कुटुंबाचे तारण होईल.”
”मग तिचा व तिच्या घराण्याचा बाप्तिस्मा झाल्यावर तिने अशी विनंती केली की, “मी प्रभूवर विश्वास ठेवणारी आहे असे जर तुम्ही मानीत आहात तर माझ्या घरी येऊन राहा.” तिच्या आग्रहास्तव ती विंनती आम्हास मान्य करावी लागली.
”ते म्हणाले, “प्रभू येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल.” त्यांनी त्यास व त्याच्या घरांतील सर्वांना प्रभूचे वचन सांगितले. मग रात्रीच्या त्याच घटकेस त्याने त्यांना जवळ घेऊन त्यांच्या जखमा धुतल्या; आणि तेव्हांच त्याने व त्याच्या घरच्या सर्व मनुष्यांनी बाप्तिस्मा घेतला. मग त्याने त्यास घरी नेऊन जेवू घातले आणि देवावर विश्वास ठेवून त्याने व त्याच्या घरच्या मंडळीने आनंदोत्सव केला.
”कारण ज्या स्त्रीला पती आहे, ती पती जिवंत आहे तोपर्यंत त्यास नियमशास्त्राने बांधलेली असते; पण तिचा पती मरण पावला, तर पतीच्या नियमातून ती मुक्त होते. म्हणून पती जिवंत असताना, जर ती दुसर्या पुरुषाची झाली तर तिला व्यभिचारिणी हे नाव मिळेल. पण तिचा पती मरण पावला तर ती त्या नियमातून मुक्त होते. मग ती दुसर्या पुरुषाची झाली तरी ती व्यभिचारिणी होत नाही.
”कारण देवाचा आत्मा जितक्यांना चालवतो ते देवाचे पुत्र आहेत. कारण तुम्हास पुन्हा भय धरण्यास दासपणाचा आत्मा मिळाला नाही; पण आपण ज्यायोगे ‘अब्बा-पित्या’ अशी हाक मारतो असा दत्तकपणाचा आत्मा तुम्हास मिळाला आहे. तो पवित्र आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की, आपण देवाची लेकरे आहोत. आणि, जर मुले तर वारीस, देवाचे वारीस, ख्रिस्ताबरोबर जोडीचे वारीस आहोत. म्हणजे, त्याच्याबरोबर आपले गौरवही व्हावे, म्हणून त्याच्याबरोबर आपण दुख तर सोसले वारीस आहोत.
”कारण, सृष्टीची उत्कट अपेक्षा देवाच्या पुत्रांच्या प्रकट होण्याची प्रतीक्षा करीत आहे. कारण सृष्टी व्यर्थतेच्या अधीन राहिली ती स्वेच्छेने नाही, पण ज्याने तिला आशेने अधीन ठेवले त्याच्यामुळे राहिली; कारण सृष्टीदेखील नाशाच्या दास्यातून मुक्त केली जाऊन देवाच्या मुलांच्या गौरवी स्वातंत्र्यात आणली जाईल. कारण आपण जाणतो की, सर्व सृष्टी आतापर्यंत कण्हत व यातना सोशीत आहे.
”कारण आपल्याला एका शरीरात जसे पुष्कळ अवयव आहेत आणि सर्व अवयवांचे काम एक नाही, तसे आपण पुष्कळ असून ख्रिस्तात एक शरीर आहोत; आणि आपण एकमेकांचे अवयव आहोत.
”आता तुम्ही मला लिहिलेल्या गोष्टींविषयी मी लिहित आहे; स्त्रीला स्पर्श न करणे हे पुरुषासाठी बरे आहे. तरीही व्यभिचार होत आहेत म्हणून प्रत्येक पुरुषाला आपली स्वतःची पत्नी असावी आणि प्रत्येक स्त्रीला आपला स्वतःचा पती असावा. पतीने पत्नीला तिचा हक्क द्यावा; आणि त्याचप्रमाणे पत्नीनेही पतीला द्यावा. पत्नीला तिच्या स्वतःच्या शरीरावर अधिकार नसतो, पण पतीला असतो; आणि त्याचप्रमाणे पतीलाही त्याच्या स्वतःच्या शरीरावर अधिकार नसतो, पण पत्नीला असतो. विषयसुखासाठी एकमेकाला वंचित करू नका, तुम्हास प्रार्थनेला वेळ देता यावा म्हणून एकमेकांच्या संमतीने ठराविक वेळेकरीता दूर राहा आणि मग पुन्हा एक व्हा यासाठी की, सैतानाने तुमच्या असंयमामुळे तुम्हास मोहात पाडू नये. पण मी हे संमती म्हणून सांगतो, आज्ञा म्हणून नाही. माझी इच्छा अशी आहे की, सर्व लोक माझ्यासारखे असावेत पण प्रत्येक व्यक्तीला त्याचे स्वतःचे असे देवापासून दान आहे. एकाला एका प्रकारे राहण्याचे आणि दुसऱ्याला दुसऱ्या प्रकारे राहण्याचे.
”म्हणून मी सर्व अविवाहितांना आणि विधवांना असे म्हणतो की, तुम्ही माझ्याप्रमाणे राहिलात तर ते तुमच्यासाठी बरे आहे. तथापि जर त्यास संयम करता येत नसेल तर त्यांनी लग्न करावे; कारण वासनेनी जळण्यापेक्षा लग्न करणे बरे. आणि विवाहितांना मी आज्ञा देत आहे, मी नाही पण प्रभू देत आहे की पत्नीने पतीला सोडू नये. पण, जर तिने सोडले तर लग्न न करता तसेच रहावे किंवा आपल्या पतीबरोबर समेट करावा आणि पतीने पत्नीला सोडू नये.
”पण इतरांना हे प्रभू सांगत नाही, पण मी सांगतो की, जर एखाद्या बंधूची पत्नी विश्वास ठेवणारी नसेल आणि त्याच्याबरोबर राहण्यास तिची संमती असेल तर त्याने तिला सोडू नये. आणि एखाद्या स्त्रीचा पती विश्वास ठेवणारा झाला नसेल आणि तिच्याबरोबर राहण्यास त्याची संमती असेल तर तिने त्यास सोडू नये. कारण, विश्वास न ठेवणारा पती पत्नीमुळे पवित्र होतो आणि विश्वास न ठेवणारी पत्नी पतीमुळे पवित्र होते. नाही तर तुमची मुले अशुद्ध असती पण ती आता पवित्र आहेत. पण स्वतः विश्वास ठेवत नसल्यामुळे कोणी सोडून जात असेल तर जाऊ द्या; कारण कोणी बंधू किंवा बहीण अशा बाबतीत बंधनात नाही. पण देवाने आपल्याला शांतीत राहण्याकरिता बोलावले आहे. कारण पत्नी, तू हे कशावरून जाणतेस की, तू आपल्या पतीला तारशील की नाही? किंवा तू, पती, हे कशावरून जाणतोस की, तू आपल्या पत्नीला तारशील की नाही?
”आता कुमारिकांविषयी मला प्रभूकडून काही आज्ञा नाही; पण, विश्वासू राहता येण्यास ज्याच्यावर प्रभूने दया केली आहे असा मी एक असल्यामुळे मी माझे मत देतो. म्हणून मला वाटते की, आताच्या परिस्थीतीत हे चांगले आहे; म्हणजे जो ज्या स्थितीत असेल तसेच त्याने रहावे हे त्याच्यासाठी चांगले आहे. तू पत्नीला विवाहाच्या वचनाने बांधलेला आहेस काय? तर तू स्वतः मुक्त होण्याचा प्रयत्न करू नकोस. तू पत्नीपासून सोडविला गेलास का? तर तू पत्नी मिळवण्यास पाहू नकोस. पण तू जर लग्न केलेस तर तू पाप केले नाहीस; आणि कुमारिकेने लग्न केले तर तिने पाप केले नाही; पण अशांना संसारात हालअपेष्टा भोगाव्या लागतील आणि अशा हालअपेष्टा तुम्हास भोगाव्या लागू नयेत अशी माझी इच्छा आहे. पण बंधूंनो मी हे सांगतो की, हा काळ थोडका आहे. आता, ज्यांना स्त्रिया आहेत त्यांना स्त्रिया नसल्यासारखे त्यांनी जगावे;
”पण तुम्ही निश्चित असावे अशी माझी इच्छा आहे. जो अविवाहित आहे तो प्रभूच्या गोष्टींची, म्हणजे आपण प्रभूला कसे संतुष्ट करावे याची काळजी करतो; पण जो विवाहित आहे तो जगातल्या गोष्टींची, म्हणजे पत्नीला कसे संतुष्ट करावे याची काळजी करतो. जी अविवाहित किंवा कुमारी आहे ती आपण शरीराने व आत्म्यानेहि पवित्र व्हावे, अशी प्रभूच्या गोष्टींविषयी चिंता करते; पण जी विवाहित आहे ती जगातल्या गोष्टींची, म्हणजे आपल्या पतीला कसे संतुष्ट करावे याची काळजी करते. हे मी तुमच्याच हितासाठी सांगतो, तुमच्यावर बंधन टाकावे म्हणून नाही; पण तुम्ही विचलित न होता प्रभूची सेवा करावी म्हणून सांगतो.
”जर एखाद्याला असे वाटते की, तो त्याच्या कुमारिकेच्या अपमानास कारण होत आहोत, ती उपवर झाली आहे आणि तसे अगत्यच आहे, तर जशी इच्छा असेल तसे त्याने करावे, तो पाप करीत नाही, त्याने लग्न करून घ्यावे. पण ज्याने लग्न न करण्याचा निर्णय घेतला, ज्याला कशाची निकड नाही व ज्याची इच्छेवर सत्ता आहे आणि असे ज्याने मनात ठरवले आहे तो चांगले करतो. म्हणून जो लग्न करून देतो तो चांगले करतो; पण लग्न करून देत नाही तो अधिक चांगले करतो. विवाहित स्त्रीचा पती जिवंत आहे तोपर्यंत ती नियमाने बांधलेली आहे, पण जर तिचा पती मरण पावला तर, केवळ प्रभूमध्ये विश्वासी असल्यास, तिची इच्छा असेल त्याच्याशी विवाहित होण्यास ती स्वतंत्र आहे. पण ती जर अविवाहित राहील तर, माझ्या मते, ती अधिक आशीर्वादित होईल आणि मी मानतो की, माझ्यातही देवाचा आत्मा आहे.
”परंतु तुम्हास हे माहीत व्हावे असे मला वाटते की, ख्रिस्त हा प्रत्येक पुरुषाचे मस्तक आहे आणि प्रत्येक पुरूष हा स्त्रीचे मस्तक आहे आणि देव ख्रिस्ताचे मस्तक आहे प्रत्येक पुरुष जो प्रार्थना करताना किंवा संदेश देताना आपले मस्तक आच्छादितो तो आपल्या मस्तकाचा अपमान करतो. परंतु प्रत्येक स्त्री जी आपले मस्तक न झाकता प्रार्थना करते आणि लोकांमध्ये देवाचा संदेश सांगते ती मस्तकाचा अपमान करते कारण ती स्त्री मुंडलेल्या स्त्री सारखीच आहे. जर स्त्री आपले मस्तक आच्छादित नाही तर तिने आपले केस कापून घ्यावेत परंतु केस कापणे किंवा मुंडण करणे स्त्रीस लज्जास्पद आहे. तर तिने आपले मस्तक झाकावे. ज्याअर्थी मनुष्य देवाची प्रतिमा आणि वैभव प्रतिबिंबित करतो त्याअर्थी त्याने मस्तक झाकणे योग्य नाही. परंतु स्त्री पुरुषाचे वैभव आहे. पुरूष स्त्रीपासून नाही परंतु स्त्री पुरुषापासून आली आहे. आणि पुरूष स्त्रीकरिता निर्माण केला गेला नाही, तर स्त्री पुरुषासाठी निर्माण केली गेली. ह्याकारणामुळे देवदूतांकरिता स्त्रीने आपल्यावर असलेल्या अधिकाराचे चिन्ह मस्तकावर धारण करावे हे योग्य आहे. तरीही प्रभूमध्ये स्त्री पुरुषापासून स्वतंत्र नाही व पुरूष स्त्रीपासून स्वतंत्र नाही. कारण स्त्री जशी पुरुषापासून आहे, तसा पुरुषही स्त्रीपासून जन्माला येतो. परंतु सर्व गोष्टी देवापासून आहेत. हे तुम्हीच ठरवा की, मस्तक न आच्छादिता देवाची प्रार्थना करणे स्त्रीसाठी योग्य आहे का? पुरुषांनी लांब केस वाढविणे हे त्याच्यासाठी लज्जास्पद आहे. असे निसर्गसुद्धा तुम्हास शिकवीत नाही काय? परंतु स्त्रीने लांब केस राखणे हे तिला गौरव आहे कारण तिला तिचे केस आच्छादनासाठी दिले आहेत. जर कोणाला वाद घालायचा असेल तर मला दाखवून द्या की, आमची अशी रीत नाही व देवाच्या मंडळ्यांचीही नाही.
”प्रीती सहनशील आहे, उपकारशील आहे, प्रीती हेवा करीत नाही; प्रीती बढाई मारीत नाही, फुगत नाही. प्रीती गैरशिस्तपणे वागत नाही, स्वहित पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही. प्रीती अनीतीत आनंद मानीत नाही. परंतु सत्याविषयी ती आनंद मानते. प्रीती सर्व गोष्टी सहन करते, सर्व गोष्टींवर विश्वास ठेवते, सर्व गोष्टींची आशा करते, सर्व गोष्टी सहन करते.
”जेव्हा मी मूल होतो, तेव्हा मूलासारखा बोलत असे, मी मूलासारखा विचार करीत असे. मुलासारखा समजत असे. परंतु जेव्हा मी मोठा झालो, तेव्हा मी लहानपणाच्या गोष्टी सोडून दिल्या आहेत.
”स्त्रियांनी मंडळीत शांत रहावे, कारण त्यांना मंडळीत बोलण्याची परवानगी देण्यात आलेली नाही, कारण नियमशास्त्रसुद्धा असेच म्हणते. त्यांना जर काही शिकायचे असेल तर त्यांनी स्वतःच्या पतीला घरी विचारावे कारण स्त्रीने मंडळीत बोलणे हे तिला लज्जास्पद आहे. देवाचे वचन तुम्हांपासून निघाले आहे काय? किंवा ते फक्त तुमच्यापर्यंतच आले आहे काय? एखादा जर स्वतःला संदेष्टा समजत असेल किंवा जर तो आत्मिक मनुष्य असेल तर त्याने हे ओळखले पाहिजे की, जे मी तुम्हास लिहित आहे ती परमेश्वराकडून देण्यात आलेली आज्ञा आहे. परंतु जर कोणी हे मानत नसेल, तर न मानो.
”विश्वास न ठेवणार्यांबरोबर संबंध जोडून विजोड होऊ नका; कारण नीतिमान व अनाचार ह्यांची भागी कशी होणार? प्रकाश व अंधकार ह्यांचा मिलाप कसा होणार? ख्रिस्ताची बलियालाशी एकवाक्यता कशी होणार? किंवा विश्वास ठेवणारा व विश्वास न ठेवणारा हे वाटेकरी कसे होणार? आणि देवाच्या निवासस्थानाचा मूर्तीबरोबर मेळ कसा बसणार? कारण तुम्ही जिवंत देवाचे निवास्थान आहात कारण देवाने म्हणले आहे की, ‘मी त्यांच्यात राहीन आणि त्यांच्यात वावरेन; मी त्यांचा देव होईन आणि ते माझी प्रजा होतील.’ आणि म्हणून ‘प्रभू म्हणतो की, त्यांच्यामधून बाहेर या आणि वेगळे व्हा; अशुद्ध त्यास शिवू नका; म्हणजे मी तुम्हास स्वीकारीन. आणि मी तुम्हास पिता होईन आणि तुम्ही माझे पुत्र व्हाल, असे सर्वसमर्थ प्रभू म्हणतो.’
”कारण मी देवाच्या आवेशाने तुम्हाविषयी आवेशी आहे, मी एका पतीबरोबर तुमची मागणी केली आहे, अशा हेतूने की, तुम्हास शुद्ध कुमारी असे ख्रिस्ताला सादर करावे.
”आता मी म्हणतो की, वारीस लहान बाळ आहे, तोपर्यंत तो सर्वांचा धनी असूनही त्याच्यामध्ये व दासामध्ये काही फरक नसतो. पण पित्याने ठरवलेल्या मुदतीपर्यंत तो शिक्षकांच्या व कारभाऱ्याच्या स्वाधीन असतो.
”आणि तुम्ही पुत्र आहात म्हणून, देवाने अब्बा-पिता, अशी हाक मारणाऱ्या आपल्या पुत्राच्या आत्म्याला तुमच्याआमच्या अंतःकरणात पाठवले आहे; म्हणून तू आतापासून दास नाही तर पुत्र आहेस; आणि पुत्र आहेस, तर देवाच्याद्वारे वारीसही आहेस.
”ह्यासाठी की आपण यापुढे लहान मुलांसारखे नसावे. म्हणजे मनुष्यांच्या कपटाने, फसवणाऱ्या मार्गाने नेणाऱ्या युक्तीने अशा प्रत्येक नव्या शिकवणरूपी वाऱ्याने तुमचे मार्ग लाटांनी इकडेतिकडे हेलकावणाऱ्या बोटीसारखे होऊ नये;
”पत्नींनो, जशा तुम्ही प्रभूच्या अधीन होता, तशा आपल्या पतीच्या अधीन असा. कारण ख्रिस्त जसा मंडळीचे मस्तक आहे, तसा पती पत्नीचे मस्तक आहे आणि ख्रिस्त विश्वास ठेवणाऱ्या शरीराचा तारणारा आहे. ज्याप्रमाणे मंडळी ख्रिस्ताला शरण जाते, त्याचप्रमाणे पत्नीने प्रत्येक बाबतीत आपल्या पतीच्या अधीन असावे. पतीनो, ज्याप्रमाणे ख्रिस्त मंडळीवर प्रीती करतो, तशी तुम्ही आपल्या पत्नीवर निस्वार्थी प्रीती करा. त्याने तिच्यासाठी स्वतःला दिले, यासाठी की, त्याने तिला देवाच्या वचनरुपी पाण्याने धुऊन स्वच्छ करून पवित्र करावे. यासाठी की, तो मंडळीला स्वतःसाठी गौरवी वधू म्हणून सादर करील, तिला कोणताही डाग नसेल किंवा सुरकुती किंवा कोणत्याही प्रकारची अपूर्णता नसेल तर ती पवित्र व निर्दोष असेल. याप्रकारे पतींनी सुद्धा आपल्या पत्नीवर असेच प्रेम करावे, जसे ते स्वतःच्या शरीरावर प्रेम करतात, जो कोणी त्याच्या स्वतःच्या पत्नीवर प्रेम करतो, तो स्वतःवर प्रेम करतो. कारण आतापर्यंत कोणीही आपल्या शरीराचा व्देष केला नाही. उलट तो त्याचे पोषण करतो, त्याची काळजी घेतो. ज्याप्रमाणे ख्रिस्त मंडळीचे पोषण करतो व काळजी घेतो. कारण आपण त्याच्या शरीराचे अवयव आहोत. “म्हणून याकारणास्तव पुरूष त्याचे वडील व आई यांना सोडील व त्याच्या पत्नीशी जडून राहील आणि ते दोघे एकदेह होतील.” हे गुढ सत्य फार महत्त्वाचे आहे आणि मी हे सांगत आहे की ते ख्रिस्त व मंडळीला लागू पडते. तरीही, तुमच्यातील प्रत्येकाने त्याच्या स्वतःच्या पत्नीवर प्रेम केले पाहिजे व पत्नीनेही पतीचा मान राखला पाहिजे.
”मुलांनो, प्रभूमध्ये आपल्या आई-वडीलांच्या आज्ञा पाळा कारण हे योग्य आहे. “आपल्या वडिलांचा व आईचा मान राख, यासाठी की तुझे सर्वकाही चांगले व्हावे व तुला पृथ्वीवर दीर्घ आयुष्य लाभावे.” अभिवचन असलेली हीच पहिली आज्ञा आहे. आणि वडिलांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिडीस आणू नका पण तुम्ही त्यांना प्रभूच्या शिस्तीत व शिक्षणात वाढवा.
”स्त्रियांनो, जसे प्रभूमध्ये योग्य आहे त्याप्रमाणे तुम्ही आपआपल्या पतीच्या अधीन असा. पतींनो, आपआपल्या पत्नीवर प्रीती करा; तिच्याशी निष्ठूरतेने वागू नका. मुलांनो, तुम्ही सर्व गोष्टींत आपल्या आई-वडीलांच्या आज्ञा पाळा कारण हे प्रभूला संतोष देणारे आहे. वडिलांनो, तुम्ही आपल्या मुलांना चिडीस आणू नका; नाही तर, कदाचित ती निरुत्साही होतील.
”तर आपल्या मुलांबाळांचे पालनपोषण करणाऱ्या आईसारखे आम्ही तुम्हामध्ये सौम्य वृत्तीचे होतो.
”तुम्हास ठाऊकच आहे की, पिता आपल्या मुलांना करतो तसे आम्ही तुम्हापैकी प्रत्येकाला बोध करीत, धीर देत व आग्रहपूर्वक विनंती करीत सांगत होतो की,
”त्याचप्रमाणे, माझी अशी इच्छा आहे की, स्त्रियांनी स्वतःला केस गुंफणे, सोने किंवा मोती किंवा महाग कपडे यांनी नव्हे तर सभ्य वेशाने विनयाने व मर्यादेने सुशोभित करावे. तसेच देवासाठी समर्पित जीवन जगणाऱ्या स्त्रियांना जसे शोभते, तसे स्वतःला चांगल्या कृत्यांनी सुशोभित करावे. स्त्रीने शांतपणे व पूर्ण अधीनतेने शिकावे. मी स्त्रीला शिकविण्याची परवानगी देत नाही किंवा पुरुषावर अधिकार गाजवण्यास परवानगी देत नाही. त्याऐवजी तिने शांत रहावे. कारण प्रथम आदाम निर्माण करण्यात आला त्यानंतर हव्वा. आणि आदाम फसवला गेला नाही तर स्त्री फसवली गेली आणि ती पापात पडली. तथापि मुलांना जन्म देण्याच्या वेळेस तिचे रक्षण होईल, ती मर्यादेने विश्वास, प्रीती व पवित्रपण यांमध्ये राहिल्यास हे होईल.
”तर अध्यक्ष हा निर्दोष, एका पत्नीचा पती, मिताचारी, सावधान, मर्यादशील, पाहुणचार करणारा, शिकवण्यात निपुण, असा असावा. तो मद्य पिणारा किंवा मारका (किंवा घाणेरड्या लाभाची आवड धरणारा) नसावा तर तो सौम्य, न भांडणारा, पैशाचा लोभ न धरणारा. आपल्या स्वतःच्या घरावर चांगल्या प्रकारचा अधिकार चालवणारा, पूर्ण गंभीरपणे आपल्या मुलांना स्वाधीन राखणारा असा तो असावा. जर एखाद्याला स्वतःच्या कुटुंबाची देखभाल करता येत नसेल तर तो देवाच्या मंडळीची काळजी कशी घेईल?
”त्याचप्रमाणे, स्त्रियांनीही गंभीर असावे, त्या चहाडखोर नसाव्यात. तर सभ्य व प्रत्येक बाबतीत विश्वसनीय असाव्यात. प्रत्येक सेवक एका पत्नीचा पती असावा आणि त्यांनी त्यांच्या मुलांची व कुटुंबाची चांगल्या प्रकारे काळजी घ्यावी.
”वडील मनुष्यास कठोरपणे बोलू नको, उलट पित्याप्रमाणे त्यास बोध कर. तरुणांना भावासारखे, वृद्ध स्त्रियांना आईसारखे, तरुण स्त्रियांना बहिणीसारखे पूर्ण शुद्ध भावाने वागव. ज्या विधवा खरोखरीच्या गरजवंत आहेत त्यांचा सन्मान कर. पण जर एखाद्या विधवेला मुले किंवा नातवंडे असतील तर त्यांनी प्रथम आपल्या घरच्यांशी धार्मिकतेने वागायला व आपल्या वडिलांचे उपकार फेडायला शिकावे कारण हे देवाच्या दृष्टीने चांगले आहे.
”पण जर कोणी त्याच्या स्वतःच्या नातेवाईकासाठी आणि विशेषतः त्याच्या कुटुंबातील जवळच्यांसाठी तरतूद करीत नाही, तर त्याने विश्वास नाकारलेला आहे व तो अविश्वासू मनुष्यापेक्षा वाईट आहे.
”जी विधवा साठ वर्षाच्या आत असून एकाच पतीची स्त्री झाली असेल. जी चांगल्या कृत्यांसाठी नावाजलेली असेल म्हणजे जिने मुलाबाळांना वाढवले असेल, जिने अनोळखी लोकांचे स्वागत केले असेल, पवित्रजनांचे पाय धुतले असतील, त्रासात असलेल्यांना मदत केली असेल व सर्व चांगले काम करण्यात स्वतःला वाहून घेतले असेल, अश्या विधवांचा यादीत समावेश करावा. पण तरुण विधवांची यादीत नोंद करण्याचे टाळावे कारण जेव्हा त्या ख्रिस्ताला सोडून अविचारी होतात, तेव्हा त्यांना पुन्हा लग्न करावेसे वाटते. आणि त्या दोषी धरल्या जातील, कारण त्यांनी त्यांचा पहिला विश्वास टाकून दिला. आणखी त्या घरोघरी फिरून आळशी बनतात व एवढेच नाही तर वटवट्या व लुडबुड्या होऊन ज्या गोष्टी बोलू नयेत, त्या गोष्टी बोलतात. यासाठी माझी अशी इच्छा आहे की, तरुण विधवा स्त्रियांनी लग्न करावे. मुलांचे संगोपन करावे व आपले घर चालवावे. आपल्या विरोधकाला आपली निंदा करण्यास वाव मिळू देऊ नये. मी तर असे म्हणतो कारण काही विधवा सैतानामागे जाण्यासाठी वळल्यादेखील आहेत. जर एखाद्या विश्वास ठेवणाऱ्या स्त्रीच्या घरात विधवा असतील तर तिने त्यांची काळजी घ्यावी व मंडळीवर भार टाकू नये. यासाठी की ज्या विधवा खरोखरच गरजवंत आहेत त्यांना ते मदत करू शकतील.
”पण तुझ्याबाबतीत, ज्या गोष्टी तू शिकलास व ज्यावर तुझा विश्वास आहे त्या तू तशाच धरून राहा. तुला माहीत आहे की, तू आपल्या बाल्यावस्थेत असल्यापासूनच तुला पवित्र शास्त्राची माहिती आहे. ते ख्रिस्त येशूमधील विश्वासाच्याद्वारे तुला शहाणे बनवण्याचे व तारणाकडे घेऊन जाण्याचे सामर्थ्य आहे.
”ज्याला नेमावयाचे तो निर्दोष असावा, एका स्त्रीचा पती असावा, त्याची मुले विश्वास ठेवणारी असून त्यांच्यावर बेतालपणा केल्याचा आरोप आलेला नसून ती अनावर नसावी.
”आणि आपल्यातील तरुण स्त्रियांना असे शिक्षण द्यावे की, त्यांनी आपल्या पतींवर व मुलांवर प्रेम करावे. आणि त्यांनी समंजस, शुद्धाचरणी, घर संभाळणार्या, ममताळू व पतीच्या अधीन राहणार्या व्हावे; म्हणजे देवाच्या वचनाची निंदा होणार नाही.
”जरी तो देवाचा पुत्र होता, तरी त्याने जे दुःख सोसले त्यापासून तो आज्ञाधारकपणा शिकला.
”विश्वासाने, नोहाने, पूर्वी कधी न दिसलेल्या गोष्टींविषयी त्यास सूचना मिळाल्याप्रमाणे, आदराने भय धरून, आपले कुटुंब तारण्यासाठी विश्वासाने तारू बांधले; आणि त्याद्वारे त्याने जगाला दोषी ठरवले आणि विश्वासाने प्राप्त होणार्या नीतिमत्त्वाचा तो वारीस झाला.
”आणि तुम्हास पुत्राप्रमाणे केलेला हा बोध तुम्ही विसरून गेला आहात काय? माझ्या मुला, प्रभूच्या शिक्षेचा अनादर करू नको, आणि त्याच्याकडून दोष पदरी पडला असता खचू नको. कारण ज्याच्यावर परमेश्वर प्रीती करतो, त्यास तो शिक्षा करतो आणि ज्यांना तो आपले पुत्र म्हणून स्वीकारतो, त्या प्रत्येकांना तो शिक्षा करतो. हा कठीण समय आहे म्हणून शिस्त सहन करा. ते असे दर्शवते की, देव तुम्हास मुलांसारखी वागणूक देत आहे; कारण असा कोणता मुलगा आहे ज्याला वडील शिस्त लावीत नाहीत? परंतु ज्या शिक्षेचे सर्व भागीदार झाले आहेत अशा शिक्षेवाचून जर तुम्ही आहा, तर तसे तुम्ही दासीपुत्र आहात आणि तुम्ही खरे पुत्र नाही. याशिवाय आम्हा सर्वांना जगिक पिता असताना त्यांनी आम्हास शिस्त लावली आणि त्याबद्दल आम्ही त्यांचा आदर राखला. तर मग आम्ही आमच्या आध्यात्मिक पित्याच्या कितीतरी अधिक प्रमाणात अधीन होऊन जगले पाहिजे बरे?
”सर्वांनी लग्नाचा आदर करावा व अंथरूण निर्दोष असावे कारण जे व्यभिचारी व जारकर्मी आहेत अशा लोकांचा देव न्याय करील.
”अनाथ व विधवा यांच्या संकटात जो त्यांची काळजी घेतो व स्वतःला जगातील बिघडलेल्या वातावरणापासून दूर ठेवतो, अशा मनुष्याची धार्मिकता देवासमोर शुद्ध व निर्दोष ठरते.
”जर कोणी भाऊ उघडा असेल किंवा कोणी बहीण उघडी असेल आणि रोजच्या अन्नाच्या अडचणीत असेल, आणि तुमच्यातील कोणी त्यांना म्हणेल की, “शांतीने जा, ऊब घ्या आणि तृप्त व्हा,” पण शरीरासाठी लागणार्या गोष्टी जर तुम्ही त्यांना पुरवीत नाही, तर काय लाभ? म्हणून कृतींशिवाय विश्वास निर्जीव आहे.
”आणि तुम्ही विवाहित स्त्रियांनो, आपल्या पतीच्या अधीन रहा; म्हणजे कोणी वचनाला अमान्य असेल, तरी तुमचे भीडस्तपणाचे निर्मळ वर्तन पाहून ते वचनांवाचून आपल्या स्त्रियांच्या वर्तनाने मिळवून घेतले जावे कारण ते तुमचे शुद्ध, आदराचे आचरण पाहतील. तुमची शोभा ही केस गुंफणे, सोन्याची दागिने घालणे आणि उंची वस्त्रे वापरणे ह्यांची बाहेरची शोभा असू नये; पण अंतःकरणात गुप्त राहणार्या मानवी स्वभावात, म्हणजे देवाच्या दृष्टीने बहुमोल असलेल्या, सौम्य आणि शांत आत्म्याच्या अविनाशी भूषणात ती असावी. कारण देवावर आशा ठेवणार्या, प्राचीन काळच्या, पवित्र स्त्रियांनीही अशाप्रकारे आपल्या पतीच्या अधीन राहून स्वतःला शोभवत असत. उदाहरणार्थ, सारेनेही अब्राहामाला धनी म्हणून त्याच्या आज्ञा पाळल्या. तुम्ही चांगले करीत असाल आणि कोणत्याही भयाला भीत नसाल तर तुम्ही तिच्या मुली झाला आहात. पतींनो, तुम्हीही आपल्या पत्नीला अधिक नाजूक पात्राप्रमाणे, आपल्या ज्ञानानुसार, मान द्या आणि जीवनाच्या कृपेचे जोडीचे वारीस म्हणून एकत्र रहा, म्हणजे तुमच्या प्रार्थनेत व्यत्यय येवू नये. शेवटी सर्वजण एकमनाचे व्हा आणि एकभावाचे होऊन बंधुप्रेम बाळगणारे, कनवाळू व प्रेमळ मनाचे व्हा.
”तसेच तरुणांनो, तुम्ही वडिलांच्या अधीन रहा आणि तसेच तुम्ही सगळे जण एकमेकांची सेवा करण्यास नम्रतारूप वस्त्र घेऊन कमरेस गुंडाळा; कारण देव गर्विष्ठांना विरोध करतो पण लीनांना कृपा पुरवतो.
”आपल्याला माहीत आहे की, आपण मरणातून जीवनात गेलो आहोत कारण आपण आपल्या बंधूवर प्रीती करतो. जो प्रीती करत नाही तो मरणात राहतो. जो कोणी आपल्या भावाचा व्देष करतो, तो खुनी आहे आणि तुम्हास माहीत आहे की, खुनी मनुष्याच्या ठायी सार्वकालिक जीवन राहत नाही. ख्रिस्ताने आपल्यासाठी स्वतःचा जीव दिला. यामुळे प्रीती काय आहे ते आपल्याला समजते. म्हणून आपणदेखील आपल्या भावासाठी जीव दिला पाहिजे. जर कोणाजवळ जगिक संपत्ती आहे आणि त्याचा भाऊ गरजवंत आहे हे पाहूनही त्याच्यावर दया करीत नाही तर त्याच्यामध्ये देवाची प्रीती राहते कसे म्हणू शकतो?
”पित्याने आपल्याला दिलेल्या आज्ञेप्रमाणे तुझी काही मुले सत्यात चालतात असे मला दिसून आले यावरुन मला फार आनंद झाला.
”माझी मुले सत्यात चालतात, हे ऐकून मला आनंद होतो तितका दुसऱ्या कशानेहि होत नाही.
”आणि स्वर्गात एक महान चिन्ह दिसले; सूर्य परिधान केलेली एक स्त्री, तिच्या पायाखाली चंद्र होता आणि तिच्या डोक्यावर बारा तार्यांचा मुकुट होता. ती स्त्री गरोदर होती व बाळंतपणाच्या वेदनांनी ती ओरडत होती. आणि स्वर्गात दुसरे एक चिन्ह दिसले. पाहा! तेथे एक मोठा, लाल अजगर; त्यास सात डोकी व ‘दहा शिंगे’ होती आणि त्याच्या डोक्यांवर सात मुकुट होते. त्याच्या शेपटाने ‘आकाशातील तिसरा हिस्सा तारे’ खाली ओढून काढले आणि त्यांना ‘पृथ्वीवर पाडले;’ आणि जी स्त्री प्रसूत होणार होती तिचे मूल जन्मताच गिळून घ्यावे म्हणून अजगर तिच्यापुढे उभा राहिला. आणि सर्व ‘राष्ट्रांवर लोहदंडाने अधिकार चालवील’ अशा मुलास म्हणजे पुसंतानास तिने जन्म दिला; त्या मुलाला देवाकडे व त्याच्या राजासनाकडे उचलून नेण्यात आले. आणि ती स्त्री रानात पळाली; तेथे तिची एक हजार दोनशे साठ दिवस काळजी घेण्यात यावी म्हणून तिच्यासाठी देवाने तयार केलेले ठिकाण आहे.
”या, आपण आनंद’ करू, ‘हर्ष करू,’ आणि त्यास गौरव देऊ; कारण कोकर्याचे लग्न निघाले आहे, आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजविले आहे. आणि तिला नेसायला, स्वच्छ, शुभ्र, चमकणारे तलम तागाचे वस्त्र दिले आहे. (हे तलम वस्त्र म्हणजे पवित्रजनांच्या नीतिमत्त्वाची कामे होत.) आणि तो देवदूत मला म्हणाला, “लिहीः ‘कोकर्याच्या लग्नाच्या भोजनाला बोलावलेले धन्य होत.’” आणि तो मला म्हणाला, “ही देवाची खरी वचने आहेत.”
”आणि मी ती ‘पवित्र नगरी, नवे यरुशलेम,’ देवाकडून स्वर्गातून खाली येत असलेली बघितली. ती वरासाठी साज चढवून ‘सजविलेल्या वधूप्रमाणे’ दिसत होती;
”मग ज्या सात देवदूतांनी त्या सात शेवटल्या पीडांनी भरलेल्या, सात वाट्या घेतल्या होत्या त्यांच्यातला एक येऊन माझ्याशी बोलला आणि मला म्हणाला, “इकडे ये, मी तुला वधू, कोकर्याची नवरी दाखवतो.”
”आत्मा आणि नवरी असे म्हणतात की, “ये,” आणि जो कोणी हे ऐकतो, तो असे म्हणो की, “ये,” आणि जो तहानेला आहे, तो येवो, ज्या कोणाला पाहिजे, तो ‘फुकट दिले जाणारे जीवनी पाणी घेवो.’
”