30 – द रॅप्चर
हे सर्वशक्तिमान देवाचे पवित्र शब्द आहेत.
माणसांच्या बोलण्यात आपल्याला रस नसतो.
देवावर प्रेम करणार् या प्रत्येकासाठी... याबद्दल देव असे म्हणतो: द रॅप्चर.
हे सर्वशक्तिमान देवाचे पवित्र शब्द आहेत.
माणसांच्या बोलण्यात आपल्याला रस नसतो.
देवावर प्रेम करणार् या प्रत्येकासाठी... याबद्दल देव असे म्हणतो: द रॅप्चर.
त्या दिवसातल्या छळानंतर लगेच असे घडेल; सूर्य अंधकारमय होईल व चंद्र प्रकाश देणार नाही, आकाशातील तारे व नक्षत्रे गळून पडतील, आकाशातील सर्व बळे डळमळतील, आकाश गुंडाळीसारखे गुंडाळले जाईल. तेव्हा मनुष्याच्या पुत्राच्या येण्याचे चिन्ह आकाशात दिसेल. तेव्हा जगातील सर्व वंश आपले ऊर बडवून घेतील. मनुष्याच्या पुत्राला आकाशांतल्या मेघांवर आरूढ होऊन सामर्थ्याने आणि मोठ्या गौरवाने येताना पाहतील. मनुष्याचा पुत्र कर्ण्याच्या मोठ्या नादात आपले देवदूत पृथ्वीभोवती पाठवून देईल. ते पृथ्वीच्या चारही कोपऱ्यातून, आकाशाच्या एका सीमेपासून दुसऱ्या सीमेपर्यंत निवडलेल्यांना गोळा करतील.
”कारण आज्ञा करणाऱ्या गर्जणेने, आद्यदेवदूतांची वाणी आणि देवाच्या कर्ण्याचा आवाज येईल, तेव्हा प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तात मरण पावलेले प्रथम उठतील. मग आपण जे जिवंत आहोत व मागे राहू, ते प्रभूला अंतराळात भेटण्यासाठी ढगात उचलले जाऊ आणि सर्वकाळ प्रभूबरोबर राहू.
”बंधूनो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे येणे व त्याच्याजवळ आपले एकत्र होणे ह्यासंबंधाने आम्ही तुम्हास अशी विनंती करतो की, तुम्ही एकदम दचकून भांबावून जाऊ नका व घाबरू नका; प्रभूचा दिवस येऊन ठेपला आहे असे सांगणाऱ्या आत्म्याने किंवा जणू काय आम्हाकडून आलेल्या वचनाने अथवा पत्राने घाबरू नका; कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसू नका; कारण त्या दिवसाच्या अगोदर विश्वासाचा त्याग होऊन तो अनीतिमान पुरूष, नाशाचा पुत्र प्रकट होईल; तो नाशाचा पुत्र, विरोधी व ज्याला देव किंवा उपासनीय म्हणून म्हणतात त्या सर्वापेक्षा स्वतःला उंच करणारा, म्हणजे मी देव आहे, असे स्वतःचे प्रदर्शन करीत देवाच्या भवनात बसणारा असा आहे.
”तू व स्त्री, यांस मी एकमेकांचे शत्रु करीन. तुझी संतती आणि तिची संतती एकमेकाचे शत्रू होतील तिच्या संततीच्या पायाची तू टाच फोडशील पण तो तुझे डोके ठेचील
”माझा बचाव करणारा कोणी तरी आहे याची मला खात्री आहे. तो हयात आहे हे मला माहीत आहे. आणि शेवटी तो या पृथ्वीतलावर येऊन उभा राहील आणि माझा बचाव करील. मी जेव्हा माझे शरीर सोडून जाईन तेव्हा आणि माझी कातडी नष्ट होईल तेव्हा सुध्दा मी देवाला पाहू शकेन. मी देवाला माझ्या डोळ्यांनी बघेन. अन्य कुणी नाही, तर मी स्वत:च त्याला पाहीन. आणि त्यामुळे मी किती हुरळून गेलो आहे ते मी सांगू शकत नाही.
”शेवटच्या दिवसात, परमेश्वराचे मंदिर असलेला डोंगर सर्व डोंगरांपेक्षा उंच होईल. तो टेकड्यांपेक्षा उंच उचलला जाईल. सर्व देशांतील लोक तेथे जातील. पुष्कळ लोक तेथे जातील. ते म्हणतील, “आपण परमेश्वराच्या डोंगरावर जाऊ या. आपण याकोबच्या देवाच्या मंदिरात जाऊ या. मग देव, त्याचा जगण्याचा मार्ग आपल्याला दाखवील. आणि आपण त्या मार्गाने जाऊ.”देवाच्या शिकवणुकीची सुरूवात, परमेश्वराच्या संदेशाचा आरंभ यरूशलेममधील सीयोनच्या डोंगरात होईल. व तो सर्व जगात पोहोचेल. नंतर सर्व देशांतील लोकांचा न्याय देवच करील. देव माणसा-माणसांतील वाद मिटवील. लोक लढण्यासाठी शस्त्र वापरणार नाहीत. लोक भाल्यांचे कोयते करतील. लोक एकमेकांविरूध्द लढणार नाहीत. इत:पर युध्दाचे शिक्षण दिले जाणार नाही.
”येथून चालते व्हा. कडेकपारीमागे धुळीत लपून बसा. तुम्ही परमेश्वराची भीती बाळगली पाहिजे आणि त्याच्या महान सामर्थ्यापासून लपून राहिले पाहिजे. गर्विष्ठांचा गर्व गळून पडेल आणि ते शरमिंदे होऊन माना खाली घालतील. अशा वेळी फक्त परमेश्वरच ताठ मानेने उभा असेल. परमेश्वराने एक दिवस निश्चित केला आहे. त्या दिवशी परमेश्वर गर्विष्ठ व फुशारक्या मारणाऱ्या लोकांना शिक्षा करील. मग त्या लोकांचे महत्व कमी होईल. जरी हे लोक लबानोनामधील उंच गंधसरूप्रमाणे वा बाशानमधील मोठ्या एला वृक्षांप्रमाणे असले तरी देव त्यांना शिक्षा करील. हे गर्विष्ठ लोक उतुंग पर्वत उंच टेकड्या व उंच मनोरे आणि उंच भक्कम भिंतीप्रमाणे असले तरी देव त्यांना शिक्षा करील. हे गर्विष्ठ लोक तार्शीशहूनयेणाऱ्या प्रचंड मालवाहू जहाजांप्रमाणे (ह्या जहाजांत महत्वाचा माल भरलेला असतो.) असले तरीसुध्दा देव त्यांना शिक्षा करील. त्या वेळी गर्विष्ठांचा गर्व गळून पडेल. ते माना खाली घालतील व फक्त परमेश्वरच ताठ मानेने उभा राहील. सर्व मूर्ती (खोटे देव) नाहीशा होतील. लोक कडेकपारीच्या मागे व जमिनीच्या भेगांत लपून बसतील. लोकांना परमेश्वर व त्याचे सामर्थ्य ह्यांचे भय वाटेल. जेव्हा परमेश्वर भूकंप घडवून आणील तेव्हा हे असे घडेल. त्या वेळी लोक आपल्याजवळील सोन्याचांदीच्या मूर्ती फेकून देतील. (लोकांनी ह्या मूर्ती पूजेसाठी घडविल्या होत्या.) वटवागुळे व चिचुंद्र्या राहतात अशा बिळांत लोक त्या मूर्ती टाकून देतील. मग परमेश्वराला व त्याच्या सामर्थ्याला भिऊन सर्व कडेकपारीत लपतील. हे सर्व परमेश्वराने घडवून आणलेल्या भूकंपाच्या वेळी घडून येईल.
”सीयोनमधील स्त्रियांचे रक्त परमेश्वर धुवून टाकील. यरूशलेमलाही परमेश्वर निर्मळ करील. देव न्यायीपणाचा आत्मा वापरून योग्य न्याय करील आणि प्रत्येक गोष्ट जळणाऱ्या आत्म्याद्वारे शुध्द करील. ह्यावेळी आपण आपल्या लोकांच्या पाठीशी उभे आहोत हे देव सिध्द करील. दिवसा तो धुराचा ढग तयार करील व रात्री अग्नीचा झगझगीत प्रकाश निर्माण करील. प्रत्येक इमारतीवरच्या आकाशात आणि सीयोनच्या डोंगरावरील मेळाव्याच्या जागेवर देवाच्या कृपेच्या ह्या निशाण्या दिसतील. संरक्षणासाठी प्रत्येक माणसावर आच्छादन असेल.
”असामान्य बालकाच्या जन्माच्यावेळी ह्या गोष्टी घडतील. देव आम्हाला पुत्र देईल. हा पुत्र लोकांच्या नेतृत्वाची जबाबदारी घेईल. त्याचे नाव असेल “अदभुत सल्लागार, सामर्थ्यशाली देव, चिरंजीव पिता, शांतीचा राजपुत्र.” त्याच्या राज्यात सामर्थ्य आणि शांती नांदेल. आणि दाविदच्या वंशाच्या ह्या राजाच्या काळात ती वाढतच जाईल. हा राजा सदासर्वकाळ सदाचार आणि प्रामाणिक न्यायबुध्दीने राज्य करील.सर्वशक्तिमान परमेश्वराला त्याच्या लोकांबद्दल अतिशय प्रेम आहे. ह्या प्रेमापोटीच ह्या सर्व गोष्टी घडून येतील.
”परमेश्वराने ठरविलेला खास दिवस जवळ आला आहे. तेव्हा आक्रोश करा व शोक करा शत्रूकडून तुमची लूट होण्याची वेळ जवळ येत आहे. सर्व शक्कितमान देव हे घडवून आणील. लोकांचे धैर्य गळेल. त्यांची भीतीने गाळण उडेल. प्रत्येक माणूस भेदरलेला असेल. बाळंत होत असलेल्या स्त्रीप्रमाणे भितीने त्यांच्या पोटात गोळा उठेल. त्यांची तोंडे अग्रीप्रमाणे लाल होतील. सर्वांच्याच तोंडावर ही कळा पाहून ते आश्चर्यचकीत होतील. पाहा परमेश्वराचा खास दिवस येत आहे. तो फारच भयानक दिवस असेल. देव फारच संतप्त होईल. आणि तो देशाचा नाश करील. ह्या देशातील पापी लोकांना देश सोडण्यास तो भाग पाडील. आकाश अंधकारमय होईल. सूर्य, चंद्र, तारे प्रकाश देणार नाहीत. देव म्हणतो, “मी जगात वाईट गोष्टी घडवून आणीन. पाप्यांना त्यांच्या पापांबद्दल मी शिक्षा करीन. मी गर्विष्ठांचे गर्वहरण करीन. दुसऱ्यांशी क्षुद्र वृत्तीने वागणाऱ्या बढाईखोरांचा तोरा उतरवीन. तेव्हा थोडेच लोक शिल्लक राहतील. दुर्मिळ सोन्याप्रमाणे चांगले लोकही थोडेच राहतील आणि शुध्द सोन्याहून त्यांची किंमत जास्त असेल. माझ्या रागाने मी आकाशाला हलवेन व पृथ्वी तिच्या स्थानावरून ढळविली जाईल.”हे सर्व, सर्वशक्तिमान परमेश्वर रागावेल तेव्हा घडून येईल.
”पण मृत्यूवर पूर्णपणे मात करता येईल आणि परमेश्वर माझा प्रभू, प्रत्येक चेहऱ्यावरचा, प्रत्येक अश्रू पुसून टाकील. पूर्वी त्याच्या लोकांनी दु:ख भोगले पण देव पृथ्वीवरचे दु:ख दूर करील. परमेश्वराने सांगितले असल्यामुळेच हे सर्व घडून येईल.
”परमेश्वर सर्व राष्ट्रांवर व त्यांच्या सैन्यांवर रागावला आहे. परमेश्वर त्या सर्वांचा नाश करील. तो त्या सर्वाना मरायला भाग पाडील. त्यांची प्रेते बाहेर टाकली जातील. त्यातून दुर्गंधी येईल व त्यातील रक्त डोंगरावरून ओघळेल. आकाश कागदाच्या गुंडाळीप्रमाणे गुंडाळले जाईल. द्राक्षाच्यावेलीवर ची सुकलेलीपाने वा सुकलेलीअंजिरे अंजिराच्या झाडावरून गळून पडावीत त्या प्रमाणे तारे गळून पडतील. आकाशातील सर्व तारे वितळून जातील. परमेश्वर म्हणतो, “माझी आकाशातील तलवार रक्ताने माखेल तेव्हा हे सर्व घडेल.” पाहा! परमेश्वराची तलवार अदोमला आरपार कापील. परमेश्वराने तेथील लोकांना अपराधी ठरविले आहे आणि त्यांना मेलेच पाहिजे. बळींच्या रक्ताने परमेश्वराची तलवारमाखली आहे. मेंढ्या आणि बकरे ह्यांच्या रक्तानेभरली आहे. एडक्याच्या मूत्र पिंडाच्या चरबीचे तिला वंगण मिळाले आहे. कारण देवाने बस्रा मध्ये नाशकरण्याची आणि अदोम मध्ये कत्तल करण्याची वेळ निश्चित केली आहे. म्हणून मेंढे, गुरेढोरे व मस्त बैल मारले जातील. त्यांच्या रक्ताने जमीन माखेल. त्यांच्या चरबीने माती झाकली जाईल. देवाने शिक्षेची वेळ ठरवली असल्याने ह्या गोष्टी घडून येतील. लोकांनी सियोनवर केलेल्या अन्यायाची भरपाई करण्याचे वर्ष परमेश्वराने निश्चित केले आहे. अदोमच्या नद्या उकळत्या डांबराप्रमाणे होतील. तेथील भूमी उकळत्या गंधकाप्रमाणे होईल. आग रात्रंदिवस पेटत राहील. कोणीही ती विझविणार नाही. अदोममधून निघणारा धूर कायमचा राहील. ती भूमी कायमची नाश पावेल. कोणीही, त्या भूमीतून, पुन्हा कधीही प्रवास करणार नाही.
”दूरदूरच्या ठिकाणी राहणाऱ्या लोकांनी देवाचे अनुसरण करणे थांबवले. तुम्ही मला अनुसरावे व स्वत:चे रक्षण करून घ्यावे. मीच देव. दुसरा देव नाही. मीच फक्त देव आहे. “मी माझ्या सामर्थ्याच्या जोरावर वचन देईन. आणि जेंव्हा मी एखादी गोष्ट व्हावी म्हणून मी हूकूम देतो तेंव्हा ती होतेच. मी वचन देतो की प्रत्येकजण माझ्यापुढे (देवापुढे) नमन करेल. प्रत्येकजण मला अनुसरण्याचे वचन देईल.
”अखेरीला काय होणार हे मी तुम्हाला आरंभीच सांगितले, फार वर्षांपूर्वी, ज्या गोष्टी घडल्या नव्हत्या, त्या मी तुम्हाला सांगितल्या म्हणजेच त्या गोष्टी घडण्यापूर्वी अनेक वर्षे मी त्या घडणार असल्याचे तुम्हाला सांगितले. मी योजतो, तसेच घडते मला पाहिजे ते मी घडवून आणतो.
”टेहळणी करणारेआरडाओरडा करतात. ते सर्व मिळून आनंद व्यक्त करीत आहेत का? कारण त्यांच्यातील प्रत्येकाने परमेश्वराला सियोनला परत येताना पाहिले आहे.
”“मी नवा स्वर्ग आणि नवी पृथ्वी निर्माण करीन. लोक भूतकाळाची आठवण ठेवणार नाहीत. त्यांना त्यातील एकही गोष्ट आठवणार नाही.
”“मी नवे जग निर्माण करीन आणि नवा स्वर्ग व नवी पृथ्वी अक्षय राहतील. त्याचप्रमाणे तुमची नावे आणि मुले नेहमी माझ्याबरोबर असतील.
”“याकोबाच्या दृष्टीने हा फार महत्वाचा काळ आहे. हा अतिशय संकटाचा काळ आहे. पुन्हा असा काळ कधीच येणार नाही. पण याकोबाचे रक्षण होईल.
”परमेश्वर, माझा प्रभू, म्हणतो, “मी स्वत:च त्यांचा मेंढपाळ होईन. मी माझ्या मेंढ्यांचा शोध घेईन. मी त्यांच्यावर लक्ष ठेवीन. मेंढपाळ जर मेंढ्यांबरोबर असेल, तर त्या भरकटू लागताच, तो त्यांचा शोध घेईल, त्याचप्रमाणे, मी करीन. मी माझ्या मेंढ्यांना वाचवीन. त्या अंधाऱ्या व ढगाळ दिवशी, त्या जेथे जेथे विखुरल्या असतील, तेथून तेथून मी त्यांना परत आणीन. त्या त्या राष्ट्रांतून मी त्यांना परत आणीन. निरनिराळ्या देशांतून मी त्यांना एकत्र आणीन. मी त्यांना त्यांच्या भूमीत परत आणीन. मी त्यांना इस्राएलच्या डोंगरांवर, झऱ्यांकाठी आणि लोक राहत असलेल्या सर्व ठिकाणी चरु देईन.
”म्हणून त्यांच्याशी माझ्यावतीने बोल. त्यांना सांग की परमेश्वर, माझा प्रभू म्हणतो ‘माझ्या माणसांनो, मी कबरी उघडून तुम्हाला कबरीतून बाहेर काढीन. मग मी तुम्हाला इस्राएलच्या भूमीत आणीन. माझ्या माणसांनो, मी कबरी उघडून तुम्हाला त्यातून बाहेर काढल्यावर त्यांना कळेल की मीच परमेश्वर आहे.
”पण अशा रहस्यमय गोष्टी स्वर्गातील देवच सांगतो. पुढे काय घडणार हे दाखविण्यासाठीच नबुखद्नेस्सर राजाला देवाने स्वप्नात पाडले. तू झोपला असताना पुढील गोष्टी स्वप्नात पाहिल्यास.
”राजा, तू स्वप्नात तुझ्यासमोर एक प्रचंड, चकचकीत, मनावर छाप पाडणारा पुतळा पाहिलास. त्याच्याकडे बघताच कोणाचेही डोळे आश्चर्याने विस्फारावे असा तो होता. पुतव्व्याचे डोके शुध्द सोन्याचे होते. छाती आणि हात चांदीचे होते पोट व वरील पायाच्या बाकीचा भाग काशाचा होता. खालील पायाचा भाग लोखंडाचा होता. ह्या पुतव्व्याची पावले लोखंड व माती यांची होती. तू पुतव्व्याकडे बघत असतानाच एक कापलेला दगड तुला दिसला. तो दगड कोणा माणसाने छेदलेला नव्हता. मग तो दगड (हवेतून गेला) आणि पुतव्व्याच्या लोखंड व माती यांनी बनेलेल्या पायावर आदळला.त्याने पावलांचा चक्काचूर केला. त्यानंतर एकदमचलोखंड माती, काशे, चांदी, सोने ह्यांचा चुरा झाला तो चुरा उन्हाळ्यातील खळ्यातील फोलकटाप्रमाणे वाऱ्याने दूरवर उडवला गेला. मागे काहीच उरले नाही. तेथे पुतळा होता हे कोणलाही खरे वाटले नसते. मग पुतव्व्यावर आदळणाऱ्या दगडाचा मोठा पर्वत झाला व त्याने सर्व पृथ्वी व्यापली.
”हेच तुझे स्वप्न होते. आता आम्ही राजाला त्या स्वप्नाचा अर्थ सांगतो. राजा तू सर्वांमध्ये मोठा राजा आहेस. स्वर्गातल्या देवाने तुला राज्य, सत्ता, सामर्थ्य व वैभव दिले आहे. देवाने तुझ्याहाती नियंत्रण दिले आहे. म्हणून तू माणसे, हिंस्र प्राणी, पक्षी ह्यावर काबू ठेवतोस. ते जेथे कोठे असतील तेथे त्यांच्यावर देवाने तुझी सत्ता ठेवली आहे. नबुखद्नेस्सर राजा, तूच त्या पुतव्व्याचे सोन्याचे डोके आहेस. तुझ्यानंतर येणारे राज्य म्हणजेच पुतव्व्याचा चांदीचा भाग, हे राज्य तुझ्या राज्याएवढे श्रेष्ठ नसेल. नंतर, तिसरे राज्य पृथ्वीवर सत्ता गाजवेल हा काशाचा भाग होय.
”मग चौथे राज्य येईल ते लोखंडाप्रमाणे मजबुत असेल. ज्याप्रमाणे लोखंड वस्तूचे तुकडे करते, चुरा करते, त्याप्रमाणे ते इतर सर्व राज्यांचा चक्काचूर करील. पुतव्व्याच्या पावलांचा काही भाग लोखंडाचा व काही मातीचा बनलेला होता, असे तुला दिसले. ह्याचा अर्थ चौथ्या राज्यात भाग असतील. तू लोखंड मातीत मिसळलेले पाहिलेस. म्हणजेच त्या राज्याला थोडे लोखंडासारखे बळ असेल. पुतव्व्याच्या पावलांचा काही भाग लोखंडाचा व काही मातीचा होता. म्हणजेच चौथे राज्य काही प्रमाणात लोखंडासारखे बळकट तर काही प्रमाणात मातीसारखे दुर्बळ, कच्चे असेल. तू लोखंडात माती मिसळलेली पाहिलेस पण लोखंड व माती यांचे एकजीव मिश्रण होऊ शकत नाही त्याचप्रमाणे चौथ्या राज्यात वेगवेगळे लोक असतील त्यांची एकी होणार नाही.
”चौथ्या राजाच्या कारकिर्दीत, स्वर्गातला देव आणखी एक राज्य निर्माण करील. ते कायमचे राहील. त्याचा कधीही नाश होणार नाही. ते दुसऱ्या घराण्याकडे सोपविता येणार नाही. हे राज्य इतर राज्यांना चिरडून टाकील, त्यांचा शेवट करील पण ते राज्य सदासर्वकाळ टिकून राहील. राजा तू पर्वेंतातून एक दगड छेदलेला पाहिलास. पण तो कोणा माणसाने छेदलेला नव्हता. त्या दगडाने लोखंड, मैंती, काशे चांदी सोने यांचा चुराडा केला. ह्यातून देवाने तुला भविष्यात घडणाऱ्या घटनाच दाखविल्या आहेत. स्वप्न खरे आहे व त्याच्या अर्थावरही तू विश्वास ठेऊ शकतोस.
”दानीएल म्हणाला “मला रात्री दृष्टान्त झाला.दृष्टान्तत दानीएलने चारी दिशांनी वारा वाहात होता. त्या वाऱ्याने समुद्र खवळला. समुद्रात चार प्राणी बाहेर येताना मला दिसले. ते आकाराने मोठे होते व एकमेकांपेक्षा वेगळे होते. पहिला प्राणी सिंहासारखा होता व त्याला गरुडासारखे पंख होते. मी त्या प्राण्याचे निरीक्षण केले. त्यानंतर त्याचे पंख कापण्यात आले. तो जमिनीपासून वर उचलला गेला होता. त्यामुळे तो माणसारसाखा जमिनीवर दोन पायांवर उभा राहिला होता. त्याला मानवी हदय (मन) देण्यात आले होते. “मग मी माझ्यासमोर दुसरा प्राणी पाहिला. तो अस्वलासारखा दिसत होता. तो त्याच्या एका अंगाने उचलला गेला होता. त्याच्या तोंडात त्याच्या दातांच्यामध्ये तीन फासव्व्या होत्या, “ऊठ आणि तुला पाहिजे तिकडे मांस खा” असे त्याला सांगितले गेले. “ह्यानंतर मी पाहिले मला माझ्यासमोर तिसरा प्राणी दिसला. तो चित्याप्रमाणे होता. त्याच्या पाठीवर चार पंख होते. ते पक्ष्यांच्या पंखासारखे होते. त्याला चार डोकी होती. त्याला सत्ता गाजवायचा अधिकार दिला होता. “त्यानंतर, मला दृष्टान्तात चौथा प्राणी दिसला. तो फारच नीच व भयंकर दिसत होता. तो फारच बलवान होता. त्याला लोखंडाचे मोठे दात होते, तो त्याच्या बळींना चिरडून खात होता आणि बळींचे उरलेले अवशेष तुडवीत होता. हा चौथा प्राणी मी पाहिलेल्या सर्व प्राण्यांपेक्षा भिन्न होता. त्याला दहा शिंगे होती. “मी त्या शिंगाबद्दल विचार करीत असतानाच, त्या शिंगामध्ये आणखी एक शिंग उगवले. ते लहान होते, त्या शिंगावर माणसाच्या डोव्व्याप्रमाणे डोळे व तोंड होते. ते तोंड प्रौढी मिरवीत होते. त्या लहान शिंगाने तीन इतर शिंगे उपटून टाकली.चवथ्या प्राण्याचा न्यायनिवाडा
”“मी पाहतो तर आपापल्या जागी सिंहासने मांडली गेली व त्यावर प्राचीन राजा त्याच्या सिंहासनावर बसला. त्याचे कपडे व केस कापसाप्रमाणे सफेद होते. त्याचे सिंहासन अग्नीचे होते. व सिंहासनाची चाके ज्वालांची केलेली होती. प्राचीन राजाच्या समोरून अग्नीची नदी वाहत होती करोडो लोक त्याची सेवा करीत होते. कोट्यावधी लोक त्याच्यासमोर उभे होते. हे दृश्य, न्यायालय सुरू होण्याच्या तयारीत आहे व सर्वांची खाती आत्म उघडली जाणार आहेत, अशा प्रकारचे होते.
”“मी पुन्हा पाहात होतो. लहान शिंग प्रौढी मिरवीतच होते. चौथ्या प्राण्याला मारेपर्यंत मी निरीक्षण केले. त्याच्या शरीराचा नाश करून ते आगीत फेकून देण्याच आले. इतर प्राण्यांची सत्ता व अधिकार काढून घेण्यात आले. पण काही निशिचत काळापर्यंत जगण्याची परवानगी त्यांना देण्यात आली.
”माझ्या रात्रीच्या दृष्टान्तात मला मनुष्यप्राण्याच्या आकृतीसारखे काहीतरी दिसले. तो ढगांवरून येत होता. तो प्राचीन राजाकडे आला. त्याला राजासमोर आणण्यात आले. “मग त्या मनुष्यप्राण्याप्रमाणे दिसणाऱ्याला अधिकार, वैभव व संपूर्ण सत्ता देण्यात आली सर्व लोक राष्ट्रे व निरनिराळे भाषा बोलणारे सर्व त्याची सेवा करणार होते. त्याची सत्ता चिरंतन होती. त्याचे राज्य कायमचे होते. त्याचा कधीही नाश होणार नव्हता.
”तो म्हणाला, ‘चार मोठे प्राणी म्हणजे चार राज्ये: ती पृथ्वीतून उदयास येतील पण देवाच्या खास लोकांनाच राज्य मिळेल आणि ते सदासर्वकाळ राहील.’
”“मला चौथा प्राणी म्हणजे त्याचा अर्थ काय हे जाणुन घ्यायची इच्छा होती.तो चौथा प्राणी इतर प्राण्यांपेक्षा वेगळा होता. तो फार भयंकर होता. त्याला लोखंडाचे हात व काशाची नखे होती. त्याच्या बळीला व शिकारीला तो संपपूर्णपणे चिरडडून टाकून खात होता व राहिलेले बळींचे अवशेष पायाखाली तुडवीत होता. त्याच्या डोक्यावरील दहा शिंगाबद्दलही मला जाणून घ्यायचे होते. उगवलेल्या लहान शिंगाबद्दलही मला उत्सुकता होती. त्या लहान शिंगाने इतर दहा शिंगातील तीन उपटून टाकली. ते इतर शिंगातील तीन उपटून टाकली. ते इतर शिंगाच्या मानाने क्षुद, होते त्याला डोळे होते, तोंड होते, आणि ते तोंड सतत बढाया मारीत होते. “मी पाहत असतानाच, त्या लहान शिंगाने देवाच्या खास माणसांवर हल्ला करून लढण्यास सुरवात केली. ते शिंग लोकांना ठार करू लागले. प्राचीन राजाने येऊन, त्याचा न्यायनिवाडा करीपर्यंत त्या लहान शिंगाने देवाच्या खास माणसांना ठार मारणे चालूच ठेवले. प्राचीन राजाने लहान शिंगाचा निकाल घोषित केला. त्याचा देवाच्या खास माणसांना फायदा झाला त्यांना राज्य मिळाले.
”“त्याने मला पुढीलप्रमाणे स्पष्टीकरण दिले: “चौथा प्राणी म्हणजे पृथ्वीवर येणारे चौथे राज्य. ते इतर राज्यांपेक्षा भिन्न असेल. ते सर्व पृथ्वीवरच्या माणसांचा नाश करील, ते सर्व राष्ट्रांना तुडवून चिरडून टाकील. ती दहा शिंगे म्हणजे ह्या चौथ्या राज्याचे दहा राजे आहेत. ह्या दहा राजानंतर आणखी एक राजा येईल त्याच्या आधीच्या राज्य करणाऱ्या राज्यांपेक्षा हा भिन्न असेल. तो तीन राजांचा पराभव करील. हा राजा परात्पर देवाच्या विरुद्ध बोलेल. तो देवाच्या खास माणसांना दुखवेल व ठार मारील. आधीचे कायदे या काळ बदलायचा तो प्रयत्न करील. देवाचे खास लोक एक वेळ, अनेक वेळा व अर्धा वेळ.त्याच्या सत्तेखाली राहातील. “पण न्यायालय काय घडावे ते ठरवील.मग त्या राजाची सत्ता काढून घेण्यात येईल. त्याच्या राज्याचा पूर्णपणे अंत होईल. मग देवाचे खास लोक राज्य करतील. ते पृथ्वीवरच्या सर्व राज्यांतील सर्व लोकांवर राज्य करतील. हे राज्य कायम राहील. व इतर राज्यातील लोक त्याला मान देतील, त्याची सेवा करतील.”
”मग त्या चार शिंगातील एकातून एक लहान शिंग उगवले आणि खूप मोठे झाले. ते नैऋ त्या दिशेने वाढले. ते सुंदर प्रदेशांच्या दिशेने वाढले. ते लहान शिंग खूप मोठे झाले. ते आकाशाला भिडेपर्यंत वाढले. एवढेच नाही. तर त्याने काही ताऱ्यांना जमिनीवर फेकले व त्यावर ते नाचले. ते खूप शक्तिशाली झाले. मग ते ताऱ्यांच्या राजाच्या (देवाच्या) विरुद्ध गेले. त्याने राजाला (देवाला) दररोज ठरलेले बळी देण्याचे बंद केले. लोक जेथे राजाची उपासना करीत ती जागा त्याने पाडून टाकली. लहान शिंगाने पाप केले. रोजचे बळी देण्याची पध्दत मोडली. त्याने चांगुलपणा धुळीला मिळविला. लहान शिंगाने असे करून चांगले यश मिळविले. मग मी एक पवित्र आवाज बोलताना ऐकला. त्याला दुसऱ्या पवित्र आवाजाने उत्तर दिले. पहिला आवाज म्हणाला, “नित्याच्या बळींचे काय होणार हे ह्या दृष्टान्तावरून दिसते. सर्वनाश करणाव्या पापाबद्दल हा दृष्टान्त आहे. राजाला लोक जेथे पूजतात, त्या जागेचा नाश झाल्यास काय होईल, हेच ह्याव ताऱ्रून दिसते. लोकांनी ती जागा पायाखाली तुडविल्यावर काय होईल हे ह्यावरून समजते. लोक यांवरून चालल्यावर. काय होईल, हेही कळून येते. पण हे किती वेळ चालेल?” दूसरा पवित्र आवाज म्हणाला “हे 2300 दिवस चालेल मग पवित्र जागा परत उभी केली जाईल.”
”मी, दानीएलने, हा दृष्टान्त पाहून, त्याचा अर्थ समजावून घेण्याचा प्रयत्न केला. मी ह्या दृष्चान्ताबद्दल विचार करीत असतानाच एक माणसाप्रमाणे दिसणारी आकृती माझ्यासमोर येऊन उभी राहिली. मग मला माणसाचा आवाज ऐकू आला. तो उलई नदीवरून आला, तो आवाज मोठ्याने म्हणाला, गाब्रीएल ह्या माणसाला दृष्टान्ताचा अर्थ स्पष्ट कर.” मग माणसाप्रमाणे दिसणारा गाब्रीएल देवदूत माझ्याजवळ आला. मी खूप घाबरलो. मी जमिनीवर पडलो. पण गाब्रीएल मला म्हणाला,” मुला हा दृष्टान्त क्रोधाच्या शेवटच्या वेळेसंबंधी आहे हे समजून घे.” गाब्रीएल बोलत असताना मी जमिनीवर पडलो व झोपी गेलो. मला अगदी गाढ झोप लागली. मग गाब्रीएलने मला स्पर्श केला व माझ्या पायावर उभे केले. गाब्रीएल म्हणाला, “आता मी तुला दृष्टान्ताचा अर्थ सांगतो. भविष्यात काय घडणार हे मी तुला सांगतो. तुझा दृष्टान्त क्रोधाच्या शेवटच्या वेळेसंबंधी आहे.
”“त्य़ा राज्यांचा शेवट जवळ आला असताना,एक उध्दट व क्रूर राजा होईल. तो फार लबाड असेल. पातकी लोकांची दृष्कृत्ये पूर्णतेला पोहोंचल्यावर हे घडेल “हा राजा खूप शक्तिशाली होईल पण स्वत:च्या बळावर नव्हे, तो भयंकर संहाराला कारण होईल तो करील त्या प्रत्येक गोष्टीत त्याला यश मिळेल. तो सामर्थ्यवान लोकांचा, देवाच्या खास लोकांचासुध्दा नाश करील. हा राजा फार चलाख व लबाड असेल.तो आपल्या धूर्तपणाच्या आणि खोटेपणाच्या बळावर यश मिळवील तो स्वत:ला खूप महत्वाचा समजेल. तो खूप लोकांचा अनपेक्षितपणे घात करील राजपत्रांच्या राजपुत्राशी (देवाशी) लढण्याचा तो प्रयत्न करील. पण त्या क्रूर राजाच्या सत्तेचा नाश होईल. पण त्याचा नाश करणारा हात मानवाचा नसेल. त्या काळासंबंधीचा व मी सांगितलेल्या गोष्टींसंबंधीचा दृष्टान्त खरा आहे. पण दृष्टान्त मोहोरबंद करून ठेव. (दृष्टान्त गुप्त ठेव) ह्या गोष्टी खूप काळांनंतर घडणार आहेत.”
”दानीएला, देवाने तुझ्या लोकांसाठी आणि तुझ्या पवित्र नगरीसाठी 70 आठवडे दिले आहेत. हे 70 आठवडे, वाईट गोष्टी व पाप करावयाचे सोडून द्यावे, लोकांना पवित्र करावे कायम राहाणारा चांगुलपणा आणावा,दुष्टान्त व संदेष्टे यांच्यावर शिक्कामोर्तब करावे, आणी पवित्र स्थान देवासाठी अर्पण केले जावे म्हणून दिले आहेत. दानीएल, ह्या गोष्टी शिकून, समजावून घे. परत जा व यरुशलेम वसवा,” हा संदेश मिळाल्यापासून निवडलेला राजायेईपर्यंतचा काळ सात आठवड्यांचा असेल मग यरुशलेम पुन्हा वसविली जाईल. यरुशलेममध्ये पुन्हा लोकांना एकत्र येण्यासाठी जागा बांधल्या जातील. नगरीच्या संरक्षणासाठी नगरीभोवती चर असेल. आठवड्यांत यरुशलेम वसविली जाईल पण ह्या काळात खूप संकटे येतील. 62आठवड्यानंतर निवडलेला माणूस ठार मारला जाईल तो गेलेला असेल. मग भावी नेत्याचे लोक नगरीचा आणि पवित्र स्थानाचा नाश करली हा शेवट पुराप्रमाणे येईल अखेरपर्यंत युध्द चालू राहील त्या जागेचा संपूर्ण नाश करण्याची आज्ञा देवाने दिली आहे. मग भावी नेता पुष्कळ लोकांबरोबर एक करार करील. तो करार एक आठवड्याचा असेल आठवड्याच्या मध्येच अर्पणे व बळी देणे बंद होईल. मग विध्वंसक येईल तो भयानक विध्वंसक कृत्ये करीलपण देवानेच त्याला संपूर्ण विनाशाची आज्ञा केलेली आहे.”
”भविष्यात तुझ्या लोकांच्या बाबतीत काय घडणार आहे, हे तुला समजावून सांगायला मी येथे आलो आहे. दानीएला, हा दृष्टान्त भविष्यकाळासंबंधी आहे.’
”त्या दोन राजांनी एकमेकांना दुखविण्याचा चंगच बांधला असेल. ते एकाच टेबलावर बसून एकमेकांशी खोटे बोलतील. पण यातून कोणाचाच फायदा होणार नाही. का? कारण देवाने त्यांच्या शेवटाची वेळ निशिचत केली आहे. पुष्कळ संपत्तीसह उत्तरेचा राजा आपल्या देशात परत जाईल मग पवित्र कराराच्याविरुध्द वाईट गोष्टी करण्याचे तो ठरवील.त्याच्या बेताप्रमा सर्व गोष्टी करील व मग आपल्या देशात परत जाईल.
”योग्य वेळ येताच पुन्हा, उत्तरेचा राजा, दक्षिणेच्या राजावर, स्वारी करील.पण या वेळि?,पूर्वप्रमाणे,त्याला यश मिळ? णार नाह? कित्तीमची गलबते येऊन उत्तरेच्या राजाविरुध्द लढतील. ती गलबते येताना पाहून तो घाबरेल मग तो मागे वळेल व आपला राग पवित्र करारावर काढील तो मागे फिरेल व ज्या लोकांना पवित्र कराराला अनुसरायचे सोजडून दिले आहे, त्यांना तो मदत करील. यरुशलेमच्या मंदिरात भयानक कृत्ये करण्यासाठी उत्तरेचा राजा सैन्या पाठवील ते सैन्य लोकांना नित्याचे होमार्पण अर्पणे करू देणार नाहीत.मग तो काह?तरी खरखरच भयंकर कत्य करतील विनाशास कारणीभत हणारी भयंकर गोष्ट ते स्थापन करतील. “पवित्र कराराला अनुसरण्याचे सोडून दिलेल्या यहुद्यांना उत्तरेचा राजा खोटे नाटे सांगून आणि गोड बोलून फसवील. ते यहूदी तर त्याहून वाईट पाप करतील.पण जे यहूदी देवाला जाणतात व देवाच्या आज्ञा पाळ?तात ते यहूदी वलवान ह?तील.ते ह?ल्ला परतवितील. सुज्ञ यहूदी पुष्कळ लोकाना शिकवतील आणि इतर लोकांना घडणाऱ्या गोष्टी समजावून सांगतील पण त्यांच्यापैकी काहीजणांना सुध्दा छळ सोसावा लागेल.अशा काह?ना तलवारीने मारले जाईल,काह?ना जाळ?ण्यात येईल,किंवा तूरूंगात टाकण्यात येईल.काहिं?ची घरे आणि वस्तु काढून घेण्यात येनील. ह्या यहुद्यांचा पाडाव होत असताना त्यांना फारच थोडी मदत मिळेल.पण अशा सुज्ञ यहूद्यांना भेटायला येणारे पुष्कळ यहुदी हे ढोंगीच असतील.
”काही सुज्ञ यहूदी चुका करतील व पडतील पण छळ झालाच पाहिजे.का? कारण त्यामुळे ते अखेरच्या क्षणापर्यंत अधिक सामर्थ्यशाली, अधिक शुद्ध आणि निर्दोष होतील मग, योग्य वेळी, अंताचा काळ येईल।”
”उत्तरेचा राजा त्याला पाहिजे ते करील. तो स्वत:बद्दल बढाया मारील. तो स्वत: करील. व स्वत:ला देवापेक्षा सुध्दा चांगले समजेल कोणीही ऐकल्या नसतील अशा गोष्टी तो सांगेल. देवांच्या देवाविरुध्द तो अशा गोष्टी सांगेल.सर्व वाईट घडेपर्यंत त्याला यश मिळेल.देवाने घडविण्याचे ठराविलेले घडेलच. उत्तरेचा राजा त्याच्या वडिलांनी पूजलेल्या देवांची पर्वा करणार नाही. बायका पूजत असलेल्या देवताच्या मूर्तीचीही तो तमा बाळगणार नाही. तो कोणत्याच देवाला मानणार नाही. त्याउलट, तो स्वत:ची स्तुती करील आणि स्वत:चे महत्व देवतांपेक्षा जास्त वाढवील. उत्तरेचा राजा कोणत्याच देवताची पूजा करणार नाही पण तो सत्तेची पूजा करील. सत्ता आणि बळ हेच त्याचे देव असतील. त्याच्या वाडवडिलांना त्याच्याप्रमाणे सत्तेचा लोभ नव्हता. तो सत्तेच्या देवाची सोने चांदी किंमती रत्ने आणि नजराणे ह्यांनी पूजा करतो. हा उत्तरेचा राजा ह्या परक्या देवाच्या साहाय्याने भक्कम गडावर हल्ला करील. त्याला साथ देणाऱ्या परकीय राजांना तो जास्त मान देईल. पुष्कळ लोकांवर तो राज्य करतील. त्या बदल्यात तो त्यांच्याकडून पैसा वसूल करील.
”अंतकाळी, दक्षिणेचा राजा उत्तरेच्या राजाशी लढेल. उत्तरेचा राजा त्याच्यावर चढाई करील. तो रथ घोडेस्वार आणि मोठमोठी गलबते घेऊन येईल व चढाई करील. तो पुराच्या लोढ्यांप्रमाणे येईल. उत्तरेच्या राजा सुंदर देशावर हल्ला करील. तो खूप देशांचा पराभव करील. पण अदोम, मवाब व अम्मोनचे नेते त्याच्या तावडीतून सुटतील. पुष्कळ देशांना तो आपले बळ दाखवील. तो किती बलवान आहे, हे मिसरलासुध्दा कळेल. मिसरचा सोन्या चांदीचा खजिना व सर्व संपत्ती त्याला मिळेल. लूबी व कूशी त्याला मानतील (त्याची आज्ञा पाळतील). पण उत्तरेच्या राजाला पूर्व व उत्तर दिशेकडून ऐकलेल्या बातम्यांनी भीती वाटेल व रागही येईल. व तो अनेक राष्ट्रांचासंपूर्ण नाश करण्यासाठी निघेल. तो आपला तंबू संदर पवित्र पर्वत आणि समुद्र यांच्यामध्ये उभा करील. पण अखेर, वाईट राजा मरेल त्याच्या अतंकाळी त्याला मदत करायला त्याच्याजवळ कोणीही नसेल.
”“दुष्टान्तातील माणूस म्हणाला, ‘त्या वेळी, महान राजपुत्र (देवदूत) मिखाएल उभा राहील. मिखाएल तुझ्या लोकांचा, यहूद्यांचा प्रमुख आहे, तेव्हा खूप संकटाचा काळ असेल. पृथ्वीवर राष्ट्र निर्माण झाल्यापासून असा काळ कधी आला नसेल, पण दानीएल, त्या वेळी तुझ्या लोकांपैकी ज्यांची नावे जीवनाच्या ग्रंथात नोंदविली गेली असतील, ते सर्व वाचतील. पृथ्वीवरील खूप मृत व पुरलेले उठतील. काहींना चिरंजीवित्व लाभेल पण काहींना कायमची अप्रतिष्ठा व तिरस्कार लाभेल. ज्ञानी आकाशाप्रमाणे तेजाने चमकून उठतील ज्या ज्ञानी लोकांनी इतरांना योग्य जीवनमार्ग शिकविला, ते सदासर्वकाळ ताऱ्यांप्रमाणे चमकतील. “पण, दानीएला, तू हा संदेश गुप्त ठेव तू खाते बंद करून टाक अंतकाळापर्यंत हे तू गुप्त ठेवले पाहिजेस. खूप लोक इकडे तिकडे सत्यज्ञानाचा शोध घेतील आणि सत्यज्ञान वाढेल.’
”मग मला, दानीएलला दोन दुसरी माणसे दिसली एक नदीकाठी माझ्याजवळ उभा होता आणि दुसरा पैलथडीला उभा होता. तागाची वस्त्रे परिधान केलेला माणस नदीच्या पाण्यावर उभा होता. त्या दोघांतला एक त्याला म्हणाला, “ह्या विस्मयकारक गोष्टी खऱ्या व्हायला किती काळ लागेल?” “तागाचे कपडे परिधान केलेल्या व नदीच्या पाण्यावर उभ्या राहिलेल्या माणसाने आपले, उजवा व डावा दोन्ही हात स्वर्गाकडे उंचावले आणि त्याने चिरंतर देवाची शपथ घेऊऩ वचन देताना मी ऐकले, तो म्हणाला तो काळ, एक वेळ, अनेक वेळा, (अ) आणि अर्धावेळेचा असेल. पवित्र लोकांच्या शक्तीचा बीमोड केला जाईल आणि मग या सर्व गोष्टी अखेरीला खऱ्या ठरतील.”
”“मी उत्तर ऐकले पण मला त्याचा अर्थ खरोखरच कळला नाही म्हणून मी विचारले “महाराज, ह्या सर्व गोष्टी खऱ्या ठरल्यावर काय होईल.?” “तो म्हणाला, दानीएला तू तुझ्या जीवनाकडे लक्ष दे. संदेश गुप्त ठेवलेला आहे. अंताच्या क्षणापर्यंत तो गुप्तच राहील. पुष्कळ लोकांना शुध्द केले जाईल ते स्वत:ला स्वच्छ करतील. पण दुष्ट दुष्टच राहातील. त्यांना ह्या गोष्टी समजणार नाहीत पण सुज्ञांना सर्व समजेल.
”“‘नित्याची होमार्पणे करणे बंद होईल. ह्या वेळेपासून ती भयंकर नाश करणारी गोष्टी घेडेपर्यंतचा काळ हा 1290 दिवसांचा असेल. जो वाट पाहील आणि 1335दिवसांच्या अखेरपर्यंत पोहोचेल,तो खूप सुखी होईल. “दानीएल, तुझ्याबद्दल सांगायचे झाले तर, जा आणि शेवटपर्यंत तुझे जीवन जग. तुला विश्रांती मिळेल आणि अखेरील तू मृत्युलोकांतून उठशील आणि तुला तुझा हिस्सा मिळेल.”‘
”परमेश्वरच असे म्हणतो. “त्या वेळेला ‘तू मला माझ पती’ म्हणून संबोधशील. मला ‘माझा बआलअसे म्हणणार नाहीस.
”सियोन वरुन रणशिंग फुंका! माझ्या पवित्र पर्वतावरून मोठ्याने इषारा द्या. ह्या देशात राहणाऱ्या लोकांचा भीतीने थरकाप उडू द्या. परमेश्वराचा खास दिवस येत आहे. परमेश्वराचा खास दिवस अगदी जवळ आला आहे. तो काळोखा, विषण्ण दिवस असेल. तो अंधकारमय व ढगाळ दिवस असेल. सूर्याेदयाच्या वेळी, तुम्हाला पर्वतावर सैन्य पसरलेले दिसेल. ते सैन्य प्रचंड न शक्तिशाली असेल. यापूर्वाे कधी झाले नाही आणि यापुढे पुन्हा असे कधी होणार नाही. धगधगती आग जसा नाश करते, तसा देशाचा नाश हे सैन्य करील. त्यांच्यासमोरची भूमी एदेनच्या बागेसारखी असेल, पण त्यांच्या मागे निर्जन वाळवंट असेल.त्यांच्या तावडीतून काहीही सुटणार नाही. ते घोड्यांप्रमाणे दिसतात सैन्यातील घोड्याप्रमाणे ते धावतात. त्यांचा आवाज ऐका. तो आवाज, पर्वतावर चढणाऱ्या रथांच्या खडखडाटाप्रमाणे आहे. फोलकटे जाळणाऱ्या आगीप्रमाणे तो आवाज आहे. ते बलवान आहेत. ते युध्दासाठी सज्ज आहेत. ह्या सैन्यापुढे लोक भीतीने थरथर कापतात आणि त्यांचे चेहेरे पांढरेफटक पडतात. सैनिक जोरात पळतात. ते तटांवर चढतात. प्रत्येक सैनिक सरळ पुढे कूच करतो. ते आपला मार्ग सोडीत नाहीत. ते एकमेकांना रेटीत नाहीत. प्रत्येकजण आपल्या वाटेने जातो. जरी एकावर वार होऊन तो पडला, तरी दुसरे कूच करीतच राहतात. ते नगरीकडे धाव घेतात. ते त्वरेने तटावर चढतात. ते घरात शिरतात. चोराप्रमाणे ते खिडक्यांतून शिरतात. त्यांच्यापुढे धरणी व आकाश कापते, चंद्र-सूर्य काळे पडतात आणि तारे तळपत नाहीत. परमेश्वर त्याच्या सैन्याला मोठ्याने हाक मारतो. त्याचा तळ फार मोठा आहे. सैन्य त्याच्या आज्ञा पाळते. ते सैन्य खूप बलशाली आहे. परमेश्वराचा खास दिवस हा विलक्षण आणि भयंकर आहे. तो कोण सहन करू शकेल?
”“ह्यांनंतर मी माझा आत्मा सर्व लोकांत ओतीन (घालीन). तुमची मुले-मुली भविष्य सांगतील तुमच्यातील वृध्द स्वप्न पाहतील. तुमच्यातील तरूणांना दृष्टांन्त होतील. त्या वेळी, मी माझा आत्मा पुरूष व स्त्री सेवकांमध्येसुध्दा ओतीन.
”मी आकाशात आणि पृथ्वीवर आश्चर्यकारक खुणा दाखवीन तेथे रक्त, आग व दाट धूर दिसेल. सूर्याऐवजी अंधार होईल. चंद्राचे रूपांतर रक्तात होईल. मग परमेश्वराचा महान आणि भयंकर दिवस उगवेल. आणि तेव्हा, परमेश्वराचे नाव घेणारा प्रत्येकजण वाचेल. वाचवले गेलेले लोक सियोन पर्वतावर व यरुशलेममध्ये असतील. परमेश्वराने सांगितलेयाप्रमाणेच हे घडेल. परमेश्वराने ज्यांना बोलावलेले होते असेच लोक वाचलेल्यात असतील.
”विळा आणा, कारण पीक तयार झाले आहे. या आणि द्राक्षे तुडवा. कारण द्राक्षकुंड भरून गेले आहे. पिंप भरून वाहत आहेत. कारण त्यांचे पाप मोठे आहे. निर्णयाच्यादरीत पुष्कळशी माणसे आहेत. परमेश्वराचा विशेष दिवस जवळ आला आहे. चंद्र-सूर्य काळवंडतील. तारे निस्तेज होतील. परमेश्वर देव सियोनेहून गर्जना करील तो यरुशलेमहून ओरडेल. आणि आकाश व पृथ्वी कापेल पण परमेश्वराच्या लोकांना तो सुरक्षित स्थान असेल. इस्राएलच्या लोकांना तो सुरक्षित जागा असेल.
”“मगय तुम्हाला कळेल की मीच तुमचा परमेश्वर देव आहे. माझ्या पवित्र पर्वतावर म्हणजे सियोनावर मी राहतो. यरुशलेम पवित्र होईल. त्या नगरीतून पुन्हा कधीही परके जाणार नाहीत. त्या दिवशी, पर्वत गोड द्राक्षरसाने पाझरतील, टेकड्यांवरून दूध वाहील, आणि यहूदाच्या कोरड्या पडलेल्या नद्यांमधून पाणी वाहील, परमेश्वराच्या मंदिरातून कारंजे उडतील आणि शिट्टीमाच्या दरीला पाणी पुरवतील. मिसर उजाड होईल. अदोमाचे रान होईल. का? कारण ते यहूद्यांशी क्रूरपणे वागले. त्यांनी त्यांच्या देशातील निष्पाप लोकांना मारले परंतु, यहूदामध्ये नेहमीच लोक राहतील. ते यरुशलेममध्ये पिढ्यान्पिढ्या वास करतील. त्या लोकांनी माझ्या लोकांना ठार केले. म्हणून मी त्यांना खरोखरच शिक्षा करीन.” कारण परमेश्वर देव सियोनमध्ये वस्ती करील.
”शेवटल्या दिवसांत, देवाचे मंदिर ज्या पर्वतावर आहे, तो पर्वत सर्व पर्वतांत उंच असेल. टेकड्यांपेक्षा तो उंच होईल. आणि तिथे जाणाऱ्या लोकांचा प्रवाह सतत वाहत राहील. तेथे पुष्कळ देशातले लोक जातील. ते म्हणतील, “या! आपण परमेश्वराच्या पर्वतावर जाऊ या. याकोबच्या देवाच्या मंदिरात आपण जाऊ या. मग परमेश्वर आपल्याला त्याचा आचारधर्म शिकवील व आपण त्याचे अनुसरण करु.” परमेश्वराच्या शिकवणुकीचा आणि परमेश्वराच्या संदेशाचा प्रारंभ यरुशलेममधून सियोन पर्वतावरुन होईल. मग तो सर्व जगात पसरेल. तेव्हा सर्व राष्ट्रांतील लोकांचा परमेश्वर न्यायाधीश असेल. दूरच्या देशातील पुष्कळ लोकांमधील वाद परमेश्वर मिटवील. ते लोक लढण्यासाठी शस्त्रे वापरण्याचे सोडून देतील. ते त्यांच्या तलवारीपासून नांगर बनवतील आणि भाल्यांचा उपयोग झाडे छाटण्यासाठी करतील. लोक एकमेकांशी लढाई करणार नाहीत. लोकांना कधीही युध्दाचे शिक्षा दिले जाणार नाही. प्रत्येकजण आपल्या द्राक्षवेलीखाली व अंजिराच्या झाडाखाली बसेल. त्यांना कोणीही घाबविणार नाही. का? कारण सर्व शक्तिमान परमेश्वराने असे घडेल म्हणून सांगितले आहे.
”परमेश्वराने ठरविलेला न्यायदानाचा दिवस लवकरच येत आहे तो दिवस जवळच आहे, आणि वेगाने येत आहे. देवाच्या न्यायदानाच्या दिवशी. लोकांना मोठा आक्रांत ऐकू येईल. वीरसुध्दा रडतील. देव तेव्हा आपला क्रोध प्रकट करील. तो भयंकर संकटाचा काळ असेल. ती विद्ध्वंसाची वेळ असेल. ती अंधाकाराची वेळ असेल. तो काळा, ढगाळ व वादळी दिवस असेल. तो काळ युध्दकाळासारखा असेल. युध्दकाळात लोक सुरक्षित गावांतून व संरक्षक बुरुजांवरुन शिंग आणि तुतारी फुंकल्याचे आवाज ऐकतात. परमेश्वर म्हणाला, “मी लोकांना जगणे कठीण करीन. अंधळ्यांना ज्याप्रमाणे आपण कोठे जात आहोत हे कळत नाही, तशी लोकांची स्थिती होईल का? कारण त्यांनी परमेश्वराविरुध्द पाप केले. खूप लोक मारले जातील. त्याचे रक्त जमिनीवर सांडेल. त्यांची प्रेते शेणासारखी जमिनीवर पडतील. त्यांच्या सोन्या-चांदीची त्यांना मदत होणार नाही. त्या वेळी, परमेश्वर खूपच कोपलेला व रागावलेला असेल. परमेश्वर सर्व जगाचा नाश करील. परमेश्वर पृथ्वीवरील सर्व गोष्टींचा संपूर्ण नाशकरील. “
”परमेश्वर म्हणाला, “थोडे थांब मी ऊभा राहून तुझा न्यायनिवाडा करण्याची वाट बघ! अनेक राष्ट्रांतील लोकांना गोळा करुन, तुला सजा देण्यासाठी त्यांचा वापर करण्याचा मला हक्क आहे. माझा तुझ्यावरचा राग दाखविण्यासाठी मी त्या लोकांचा उपयोग करीन. मी किती चिडलो आहे हे त्यावरुन कळेल. संपूर्ण देशाचा नाश होईल.
”त्यानंतर इतर देशातील लोकांना मी बदलून टाकीन. मग ते स्पष्ट भाषा बोलतील आणि परमेश्वराचे नाव घेतील. ते सर्वजण खांद्याला खांदा लावून एक होऊन. माझी उपासना करतील.
”का? कारण सर्वशक्तिमान परमेश्वर हे सांगत आहे. अगदी थोड्या वेळात मी पुन्हा एकदा सर्व गोष्टी हलवून सोडीन आकाश आणि पृथ्वी कंपित करीन समुद्र आणि कोरडी जमीन यांना कंपित करीन. मी राष्ट्रांना धक्का देईन आणि मग प्रत्येक राष्ट्र तुमच्याकडे संपत्ती घेऊन येईल मग हे मंदिर वैभवाने भरुन टाकीन. सर्वशक्तिमान परमेश्वर हे सांगत आहे. त्यांच्याकडील सर्व सोने-चांदी माझ्या मालकीची आहे सर्वशक्तिमान परमेश्वर ह्या गोष्टी सांगत आहे. आणि सर्वशक्तिमान परमेश्वर असे म्हणतो की आताचे मंदिर हे आधीच्या मंदिरापेक्षा सुंदर असेल. मी ह्या ठिकाणी शांतता प्रस्थापित करीन. लक्षात ठेवा, सर्वशक्तिमान परमेश्वर ह्या गोष्टी सांगत आहे.”
”पाहा! परमेश्वराचा न्यायदानाचा ठराविक दिवस आहे. तुम्ही लुटलेली संपत्ती तुमच्या शहरात वाटली जाईल. यरुशलेमशी लढण्यासाठी मी सर्व राष्ट्रांना एकत्र करीन. ते नगरी ताब्यात घेतील आणि घरांचा नाश करतील. स्त्रियांवर बलात्कार करतील व अर्धे - अधिक लोक कैद केले जातील. पण उरलेल्या लोकांना नगरीतून नेले जाणार नाही. मग परमेश्वर त्या राष्ट्रांविरुध्द युध्द पुकारेल ते खरोखरीचे युध्द असेल.
”त्यावेळी, तो यरुशलेमच्या पूर्वेला असलेल्या जैतून पर्वतावर उभा राहील. जैतुन पर्वत दुभंगेल पर्वताचा काही भाग उत्तरेकडे व काही दक्षिणेकडे सरकेल. पूर्वेकडून पश्चिमेपर्यंत एक खोल दरी निर्माण होईल. दरी जसजशी रुंदावून तुमच्याकडे सरकेल, तसतसे तुम्ही दूर पळायचा प्रयत्न कराल यहूदाचा राजा उज्जीया ह्याच्या काळात झालेल्या भूकंपाच्या वेळी तुम्ही जसे पळाला तसे पळाल. पण माझा परमेश्वर, देव तेथे अवतरेल आणि त्याच्याबरोब त्याचे सर्व पवित्र अनुयायी असतील. तो एक विशेष दिवस असेल त्यावेळी प्रकाश, गारठा वा कडाक्याची थंडी नसेल. कसे ते परमेश्वरालाच ठाऊक. पण तेव्हा दिवसही नसेल वा रात्र. त्यामुळे, नेहमीच्या अंधाराच्या वेळीही प्रकाश असेल. तेव्हा यरुशलेममधून सतत जिवंत पाण्याचा झरा वाहीलत्याला दोन पाट फुटतील. एक पाट पूर्वेकडे वाहत जाईल तर दुसरा पश्चिमेकडे वाहत जाऊन भूमध्य समुद्राला मिळेल. तो संपूर्ण वर्षभर - हिवाळ्यात व उन्हाळ्यात वाहील.
”त्यावेळी, परमेश्वर सर्व पृथ्वीचा राजा असेल. परमेश्वर एकच आहे व त्याचे नावही “एक”च आहे.
”तेव्हा यरुशलेमभोवतालचा सर्व प्रदेश अराबाच्या वाळवटासारखा ओसाड होईल. निगेवमधील गेबापासून रिम्मोनपर्यंत पसरलेल्या वाळवंटासारखा तो देश होईल. पण सर्व यरुशलेम मात्र पुन्हा उभारले जाईल - अगदी बन्यामीनच्या प्रवेशद्वारापासून ते पाहिल्या प्रवेशद्वारापर्यंत (कोपऱ्यावरच्या द्वारापर्यंत) आणि हनानेलच्या मनोऱ्यापासून राजाच्या द्राक्षकुंडापर्यंत) लोक तेथे वस्ती करण्यास जातील. यापुढे कोणीही शत्रू त्यांचा नाश करायला येणार नाही. यरुशलेम अगदी सुरक्षित असेल. पण यरुशलेमविरुध्द लढलेल्या राष्ट्रांना परमेश्वर शिक्षा करील. तो त्या राष्ट्रांना रोगराईने पछाडेल. जिवंतपणीच लोकांची कातडी कुजू लागेल. त्याचे डोळे त्यांच्या खाचांत आणि जिभा तोंडांत सडतील. तेव्हा लोकांना खरोखरच परमेश्वरच परमेश्वराची भीती वाटेल प्रत्येकजण आपल्या शेजाऱ्याचा हात धरील आणि शेजारी एकमेकांशी भांडतील.यहूदाचे लोक यरुशलेममध्ये लढतील. पण नगरीभोवतीच्या सर्व राष्ट्रांकडून त्यांना संपत्ती मिळेल त्यांना भरपूर सोने, चांदी आणि कपडालता मिळेल. हा भयंकर रोग शत्रू - सैन्याच्या छावणीत पसरेल. त्यांच्या घोड्यांना, खेचरांना, उंटाना आणि गाढवांनाही हा भयंकर रोग होईल.
”यरुशलेमशी लढण्यास आलेल्यापैकी काही वाचतील. आणि सर्व शक्तिमान परमेश्वराची उपासना करण्यासाठी ते दरवर्षी येतील. मंडपाचा सण साजरा करायला ते यरुशलेमला येतील. पृथ्वीवरील कोणत्याही कुटुंबातील लोक यरुशलेमला प्रभुराजाची, सर्व शक्तिमान परमेश्वराची उपासना करायला गेले नाहीत तर परमेश्वर त्यांच्या प्रदेशात पाऊस पाडणार नाही. जर मिसरमधील एखादे घराणे मंडपाचा सण साजरा करण्यासठी आले नाही, तर शत्रूंच्या राष्ट्रांत परमेश्वराने जो भयंकर रोग पसरविला होता, तो रोग त्यांना होईल. “मंडपाच्या साणा”लान आल्याबद्दल मिसरला व इतर राष्ट्रांना ही शिक्षा असेल.
”त्यावेळी, सर्व गोष्टी देवाच्या मालकीच्या असतील अगदी घोड्यांच्या सरंजामावरसुध्दा परमेश्वरासाठी पवित्र अशी चिठ्ठी असेल. परमेश्वराच्या मंदिरात वापरली जाणारी भांडी, वेदीवर वापरल्या जाणाऱ्या कटोऱ्यांइतकीच महत्वाची असतील. खरे, म्हणजे, यरुशलेममधील व यहूदातील प्रत्येक ताटावर सर्व शक्तिमान परमेश्वरास पवित्र असे लिहिलेले असेल. परमेश्वराची उपासना करणारा प्रत्येकजण या भांड्यांमध्ये अन्न शिजवून खाऊ शकेल.त्यावेळी सर्व शक्तिमान परमेश्वराच्या मंदिरात वस्तूंची खरेदी - विक्री करणारे कोणीही व्यापारी नसतील.
”“त्यावेळेची तयारी कोणीही करु शकत नाही. तो येताच, कोणीही त्याच्यासमोर उभा राहू शकणार नाही. तो धगधगत्या अग्नीसारखा असेल. वस्तू अगदी स्वच्छ व्हाव्या म्हणून वापरण्यात येणाऱ्या तीव्र साबणासारखा असेल. तो लेवीच्या लोकांना स्वच्छ करील. विस्तवात चांदी ज्याप्रमाणे शुध्द केली जाते. तसा तो त्यांना शुध्द करील. तो त्यांना चांदी सोन्याप्रमाणे शुध्द करील. मग ते परमेश्वराला अर्पण करण्यासाठी भेटी आणतील आणि सर्व गोष्टी योग्यरीतीने करतील.
”शेत हे जग आहे; चांगले बी हे राज्याचे पुत्र आहेत; निदण हे त्या दुष्टाचे पुत्र आहेत; ते पेरणारा शत्रू हा सैतान आहे; कापणीही युगाची समाप्ती आहे; आणि कापणारे हे देवदूत आहेत; तेव्हा जसे निदण गोळा करून अग्नीत जाळतात तसे युगाच्या समाप्तीस होईल. मनुष्याचा पुत्र आपल्या देवदूतांना पाठवील आणि त्याच्या राज्यातून अडखळण करणाऱ्या सर्व वस्तू व अन्याय करणार्यांना जमा करील, आणि त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील; तेथे रडणे व दात खाणे चालेल. तेव्हा नीतिमान आपल्या पित्याच्या राज्यात सूर्यासारखे प्रकाशतील. ज्याला कान आहेत तो ऐको.
”आणखी, स्वर्गाचे राज्य समुद्रात टाकलेल्या एखाद्या जाळ्यात सर्वप्रकारचे जीव एकत्र सापडतात त्यासारखे आहे; ते भरलेल्या मनुष्यानी ते किनार्याकडे ओढले आणि बसून जे चांगले ते भांड्यात जमा केले, वाईट ते फेकून दिले. तसे युगाच्या समाप्तीस होईल; देवदूत येऊन नीतिमानातून दुष्टांना वेगळे करतील. आणि त्यांना अग्नीच्या भट्टीत टाकतील; तेथे रडणे व दात खाणे चालेल.
”परंतु येशूने त्यांना उत्तर दिले, “तुम्ही संध्याकाळ झाली असता म्हणता आजचे हवामान चांगले असेल कारण आकाश तांबूस आहे, आणि तुम्ही सकाळी म्हणता, आज वादळ होईल कारण आभाळ तांबूस व गडद आहे. तुम्हास आकाशाचे स्वरूप ओळखता येते, पण काळाची लक्षणे ओळखता येत नाहीत काय?
”कारण मनुष्याचा पुत्र आपल्या पित्याच्या वैभवात आपल्या स्वर्गदूतांसहित येईल त्यावेळी आणि तेव्हा तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कामाप्रमाणे मोबदला देईल. मी तुम्हास खरे सांगतो की, येथे उभे राहणाऱ्यातले काहीजण असे आहेत की, ते मनुष्याच्या पुत्राला त्याच्या राज्यात येताना पाहतील तोपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही.
”येशू म्हणाला, “मी तुम्हास खरे सांगतो, नव्या युगात जेव्हा मनुष्याचा पुत्र त्याच्या गौरवी राजासनावर बसेल तेव्हा तुम्ही जे सर्व माझ्यामागे आलात ते सर्व बारा राजासनावर बसाल आणि इस्राएलाच्या बारा वंशाचा न्याय कराल.
”मग तो जैतूनाच्या डोंगरावर बसला असताना, त्याचे शिष्य त्याच्याशी एकांतात येऊन म्हणाले, “आम्हास सांगा की या गोष्टी कधी होतील? आपल्या येण्याचा आणि युगाचा शेवट होण्याचा समय जवळ आला आहे हे आम्ही कोणत्या चिन्हावरून ओळखावे?” येशूने त्यांना उत्तर दिले, सांभाळ कोणीही तुम्हास फसवू नये. कारण माझ्या नावाने पुष्कळजण येतील आणि म्हणतील, मी ख्रिस्त आहे आणि ते पुष्कळ लोकांस फसवतील. तुम्ही लढायांबद्दल आणि लढायांच्या अफवांबद्दल ऐकाल पण त्यामुळे तुम्ही त्यांना भिऊ नका. या गोष्टी घडल्याच पाहिजेत. तरी इतक्यात शेवट जवळ येणार नाही. कारण, एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर उठेल. अनेक ठिकाणी भूकंप व दुष्काळ येतील. पण या सर्व गोष्टी प्रसूतीवेदनांची सुरूवात अशा आहेत.
”ते तुम्हास छळणुकीसाठी धरून देतील आणि तुम्हास जिवे मारतील आणि माझ्या नावाकरता सर्व राष्ट्रे तुमचा व्देष करतील. मग पुष्कळांना अडथळा होईल. ते एकमेकांविरुद्ध उठतील आणि एकमेकांचा व्देष करतील. अनेक खोटे संदेष्टे उठतील आणि, ते पुष्कळांना फसवतील. सतत वाढणाऱ्या दुष्टाईमुळे पुष्कळांची प्रीती थंडावेल. पण जो मनुष्य शेवटपर्यंत टिकून राहिल तोच तारला जाईल. सर्व राष्ट्रांना साक्ष व्हावी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगभर गाजवली जाईल आणि मग शेवट होईल.
”तर “दानीएल संदेष्ट्याने सांगितले होते, ओसाड करणारी अमंगळ गोष्ट, पवित्र जागी परमेश्वराच्या भवनामध्ये उभी असलेली तुम्ही पाहाल.” (वाचकाने हे ध्यानात घ्यावे.) त्यावेळी यहूदीया प्रांतातील लोकांनी डोंगरावर पळून जावे. जो कोणी छतावर असेल त्याने घरातील सामान घेण्यासाठी खाली येऊ नये. जर कोणी शेतात असेल तर त्याने आपला सदरा घेण्यासाठी माघारी परत जाऊ नये. त्याकाळी गर्भवती असलेल्या किंवा अंगावर पाजीत असतील अश्या स्त्रियांना फार कठीण जाईल. जेव्हा या गोष्टी होतील तेव्हा थंडीचे दिवस अथवा शब्बाथ दिवस नसावा यासाठी प्रार्थना करा. कारण जगाच्या आरंभापासून कधीही झाली नाही आणि पुन्हा कधी होणार नाही अशी मोठी संकट त्याकाळी येतील. आणखी, देवाने ते दिवस जर थोडेच ठेवले नसते तर कोणीही मनुष्य वाचला नसता. परंतु त्याच्या निवडलेल्यांसाठी तो ते दिवस थोडे करील.
”त्यावेळी जर एखाद्याने तुम्हास म्हटले, पाहा! ख्रिस्त येथे आहे किंवा तो तेथे आहे, तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. खोटे ख्रिस्त आणि खोटे संदेष्टे उदयास येतील. ते महान आश्चर्यकारक चिन्हे दाखवतील. देवाच्या निवडलेल्या लोकांस ते चिन्हे दाखवतील व लोकांस एवढेच नव्हे तर देवाच्या निडवलेल्यांना फसविण्याचा प्रयत्न करतील. या गोष्टी होण्याअगोदरच मी तुम्हास सावध केले आहे. एखादा मनुष्य तुम्हास सांगेल, पाहा, ख्रिस्त अरण्यात आहे. तर तेथे जाऊ नका. किंवा जर ते म्हणाले, पाहा, तो आतल्या खोलीत आहे, तर त्याच्यावर विश्वास ठेवू नका. मी हे म्हणतो कारण वीज जशी पूर्वेकडून पश्चिमेकडे चमकताना सर्वाना दिसते तसेच मनुष्याच्या पुत्राचे येणे देखील होईल. जेथे कोठे प्रेत असेल तेथे गिधाडेही जमतील.
”त्या दिवसातल्या छळानंतर लगेच असे घडेल; सूर्य अंधकारमय होईल व चंद्र प्रकाश देणार नाही, आकाशातील तारे व नक्षत्रे गळून पडतील, आकाशातील सर्व बळे डळमळतील, आकाश गुंडाळीसारखे गुंडाळले जाईल. तेव्हा मनुष्याच्या पुत्राच्या येण्याचे चिन्ह आकाशात दिसेल. तेव्हा जगातील सर्व वंश आपले ऊर बडवून घेतील. मनुष्याच्या पुत्राला आकाशांतल्या मेघांवर आरूढ होऊन सामर्थ्याने आणि मोठ्या गौरवाने येताना पाहतील. मनुष्याचा पुत्र कर्ण्याच्या मोठ्या नादात आपले देवदूत पृथ्वीभोवती पाठवून देईल. ते पृथ्वीच्या चारही कोपऱ्यातून, आकाशाच्या एका सीमेपासून दुसऱ्या सीमेपर्यंत निवडलेल्यांना गोळा करतील.
”अंजिराच्या झाडापासून शिका अंजिराच्या झाडाच्या फांद्या जेव्हा हिरव्या आणि कोवळ्या असतात आणि पाने फुटू लागतात तेव्हा उन्हाळा जवळ आला हे तुम्हास कळते. त्याचप्रमाणे तुम्ही या सर्व गोष्टी पाहाल तेव्हा हे जाणा की, तो दरवाजाजवळ आहे. मी तुम्हास खरे सांगतो, या सर्व गोष्टी पूर्ण होईपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही. आकाश आणि पृथ्वी नाहीशी होतील पण माझी वचने कधीही नष्ट होणार नाहीत. पण त्या दिवसाविषयी आणि त्या घटकेविषयी पित्यशिवाय कोणीही काही जाणत नाही. स्वर्गातील देवदूतही जाणत नाही किंवा खुद्द पुत्रही जाणत नाही. नोहाच्या काळी घडले तसे मनुष्याच्या पुत्राच्या येण्याच्या वेळेसही होईल. तेव्हा जसे महापूर येण्याअगोदर लोक खातपीत होते. लोक लग्न करीत होते. लग्न करून देत होते. नोहा तारवात जाईपर्यंत लोक या गोष्टी करीत होते. आणि महापूर येऊन त्यांना घेऊन गेला तोपर्यंत त्यांना कळल नाही. तसच मनुष्याच्या पुत्राचे येणे होईल.
”दोघे जण शेतात एकत्र काम करत असतील तर त्यातला एकजण वर घेतला जाईल आणि दुसरा तेथेच राहील. दोन स्त्रिया जात्यावर दळीत असतील तर त्या दोघीतील एक वर घेतली जाईल आणि दुसरी तेथेच राहील. म्हणून तुम्ही जागृत असा, कारण तुम्हास माहीत नाही की कोणत्या दिवशी तुमचा प्रभू येत आहे, हे लक्षात ठेवा, चोर केव्हा येईल हे जर घराच्या मालकाला माहीत असते तर तो त्यासाठी तयारीत राहिला असता आणि त्याने चोराला घर फोडू दिले नसते. या कारणासाठी तुम्हीसुद्धा तयार असले पाहिजे. जेव्हा तुम्हास अपेक्षा नसेल तेव्हा मनुष्याचा पुत्र येईल.
”तर ज्याला त्याच्या धन्याने आपल्या परिवाराला, त्यांना त्याचे अन्न वेळेवर द्याव म्हणून नेमल आहे तो विश्वासू आणि विचारी दास कोण आहे? जो दास त्याच्या धन्याला तो येईल तेव्हा तसे करताना आढळेल तो धन्य आहे! मी तुम्हास खरे सांगतो की, मालक आपल्या सर्व मालमत्तेवर त्या चाकराची नेमणूक करील. पण जर तो दुष्ट दास आपल्या मनात अस म्हणेल की, माझा धनी विलंब करीत आहे, तो चाकर इतर चाकरांना मारहाण करील आणि आपल्यासारख्या लोकांबरोबर जेवण करील आणि दारू पिऊन मस्त होईल. आणि तो चाकर तयारीत नसेल तेव्हा मालक येईल. मग मालक त्या चाकराचे तुकडे करील. त्या चाकराला मालक ढोंगी लोकांबरोबर राहायला पाठवील आणि त्याठिकाणी रडणे व दात खाणे चालेल.
”तेव्हा त्यादिवसात स्वर्गाचे राज्य दहा कुमारींसारखे असेल, त्यांनी त्यांचे दिवे घेतले व वराला भेटण्यास गेल्या. त्यांच्यातल्या पाच मूर्ख होत्या आणि पाच शहाण्या होत्या. मूर्ख कुमारींनी आपले दिवे घेतले, पण दिव्यासाठी तेल घेतले नाही. शहाण्या कुमारींनी दिव्याबरोबर आपल्या भांड्यात तेल घेतले. आता वराला उशीर झाल्याने त्या सर्वांना डुलक्या लागल्या व त्या झोपी गेल्या मध्यरात्री कोणीतरी घोषणा केली, वर येत आहे! बाहेर जाऊन त्यास भेटा! सर्व कुमारिका जाग्या झाल्या आणि त्यांनी आपले दिवे तयार केले. तेव्हा मूर्ख शहाण्यांना म्हणाल्या, तुमच्या तेलातून आम्हास द्या. आमचे दिवे विझत आहेत. पण शहाण्यांनी उतर देऊन म्हणले ते तुम्हास आणि आम्हास कदाचित पुरणार नाही; त्यापेक्षा तुम्ही विकणाऱ्यांकडे जा आणि तुमच्यासाठी विकत घ्या. त्या तेल विकत घ्यायला गेल्या तेव्हा वर आला. तेव्हा ज्या तयार होत्या त्या मेजवानीसाठी त्याच्याबरोबर आत गेल्या. मग दरवाजा बंद झाला. नंतर दुसऱ्या कुमारींकाही आल्या आणि म्हणाल्या, प्रभूजी प्रभूजी आमच्यासाठी दरवाजा उघडा पण त्यांने उत्तर देऊन म्हटले, मी तुम्हास खरे सांगतो मी तुम्हास ओळखत नाही. म्हणून नेहमी तयार असा, कारण मनुष्याचा पुत्र कधी येणार तो दिवस व ती वेळ तुम्हास माहीत नाही.
”मनुष्याचा पुत्र जेव्हा त्याच्या स्वर्गीय गौरवाने आपल्या देवदूतांसह येईल तेव्हा तो त्याच्या गौरवी राजासनावर बसेल. मग सर्वं राष्ट्रे त्याच्यासमोर एकत्र जमतील. त्यांना तो एकमेकांपासून विभक्त करील. ज्याप्रमाणे मेंढपाळ मेंढरे शेरडांपासून वेगळी करतो. तो मेंढरांना आपल्या उजवीकडे बसवील पण शेरडांना तो डावीकडे बसवील.
”मग राजा जे त्याच्या उजवीकडे आहेत त्यांना म्हणेल, या, जे तुम्ही माझ्या पित्याचे धन्यवादित आहात! हे राज्य जगाच्या स्थापनेपासून तुमच्यासाठी तयार केले आहे त्या राज्याचे वतनदार व्हा. हे तुमचे राज्य आहे कारण जेव्हा मी भुकेला होतो तेव्हा तुम्ही मला खायला दिले. मी तहानेला होतो तेव्हा तुम्ही मला प्यावयास दिले. मी परका होतो आणि तुम्ही मला आत घेतले मी उघडा होतो तेव्हा तुम्ही मला कपडे दिलेत. मी आजारी होतो, तेव्हा तुम्ही माझी काळजी घेतलीत. मी तुरूंगात होतो तेव्हा तुम्ही माझ्याकडे आलात. मग जे नीतिमान आहेत ते उत्तर देतील, प्रभू आम्ही तुला केव्हा भुकेला व तहानेला पाहिला आणि तुला खायला आणि प्यायला दिले? आम्ही तुला परका म्हणून कधी पाहिले आणि तुला आत घेतले किंवा आम्ही तुला केव्हा उघडे पाहिले व कपडे दिले? आणि तू आजारी असताना आम्ही तुला कधी भेटायला आलो? किंवा तुरूंगात असताना कधी तुझ्याकडे आलो? मग राजा त्यांना उत्तर देईल, मी तुम्हास खरे सांगतो येथे असलेल्या माझ्या बांधवातील अगदी लहानातील एकाला तुम्ही केले, तर ते तुम्ही मलाच केले.
”मग राजा आपल्या डाव्या बाजूच्यांना म्हणेल, माझ्यापासून दूर जा, तुम्ही शापित आहात, सार्वकालिक अग्नीत जा, हा अग्नी सैतान व त्याच्या दूतांसाठी तयार केला आहे. ही तुमची शिक्षा आहे कारण मी भुकेला होतो पण तुम्ही मला काही खायला दिले नाही, मी तहानेला होतो पण तुम्ही मला काही प्यावयास दिले नाही. मी प्रवासी असता माझा पाहुणचार केला नाही. मी वस्त्रहीन होतो. पण तुम्ही मला कपडे दिले नाहीत. मी आजारी आणि तुरूंगात होतो पण तुम्ही माझी काळजी घेतली नाही. मग ते लोकसुद्धा त्यास उत्तर देतील, प्रभू आम्ही कधी तुला उपाशी अगर तहानेले पाहिले किंवा प्रवासी म्हणून कधी पाहिले? किंवा वस्त्रहीन, आजारी किंवा तुरूंगात कधी पाहिले आणि तुला मदत केली नाही? मग राजा त्यांना उत्तर देईल, मी तुम्हास खरे सांगतोः माझ्या अनुयायांतील लहानातील लहानाला काही करण्याचे जेव्हा जेव्हा तुम्ही नाकारले, तेव्हा तेव्हा ते तुम्ही मला करण्याचे नाकारले. “मग ते अनीतिमान लोक सार्वकालिक शिक्षा भोगण्यास जातील, पण नीतिमान सार्वकालिक जीवन उपभोगण्यास जातील.”
”येशू त्यांना म्हणाला, “होय, मी आहे. जसे तू म्हणालास. तरी मी तुम्हास सांगतोः यापुढे मनुष्याच्या पुत्राला तुम्ही सामर्थ्याच्या उजवीकडे बसलेले व आकाशातून येताना पाहाल.”
”देवाशी अप्रामाणिक आणि पापी पिढीत जो कोणी माझी व माझ्या वचनांची लाज धरतो तर मनुष्याचा पुत्रही जेव्हा तो आपल्या पित्याच्या गौरवात पवित्र दूतांसह येईल तेव्हा त्यांची लाज धरील.”
”येशू त्या लोकांस म्हणाला, “मी तुम्हास खरे सांगतो की, येथे उभे असलेले काही असे आहेत की, ज्यांना देवाचे राज्य सामर्थ्यानिशी आलेले दिसेपर्यंत मरणाचा अनुभव येणार नाही.”
”“या गोष्टी केव्हा घडतील हे आम्हास सांगा आणि या गोष्टी पूर्ण होण्याची वेळ येईल तेव्हा कोणते चिन्ह घडेल?” नंतर येशू त्यांना सांगू लागला, “तुम्हास कोणी फसवू नये म्हणून सावध राहा. पुष्कळ लोक माझ्या नावाने येतील व म्हणतील की, ‘मी तोच आहे’ आणि ते पुष्काळांना फसवतील. जेव्हा तुम्ही लढायाविषयी आणि लढायांच्या अफवाविषयी ऐकाल तेव्हा घाबरू नका. हे निश्चितपणे घडणारच आहे. पण एवढ्याने शेवट होणार नाही. एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर उठेल, एक राज्य दुसऱ्या राज्यावर उठेल, निरनिराळ्या ठिकाणी भूकंप होतील आणि दुष्काळ पडतील. पण या गोष्टी म्हणजे केवळ नाशाची सुरूवात आहे.
”तुम्ही सावध असा. ते तुम्हास न्यायसभांच्या स्वाधीन करतील आणि सभास्थानात तुम्हास मार देतील. त्यांना साक्ष व्हावी म्हणून तुम्हास राज्यकर्ते व राजे यांच्यासमोर उभे रहावे लागेल. या गोष्टी घडण्यापूर्वी सर्व राष्ट्रांमध्ये सुवार्तेची घोषणा झालीच पाहिजे. ते तुम्हास अटक करून चौकशीसाठी आणतील तेव्हा अगोदरच तुम्ही काय बोलावे याची काळजी करू नका, तर त्या घटकेला जे काही सुचवले जाईल ते बोला, कारण बोलणारे तुम्ही नाही तर पवित्र आत्मा तुम्हासाठी बोलेल. भाऊ भावाला व वडील आपल्या मुलाला ठार मारण्यासाठी विश्वासघात करून धरून देतील, मुले आपल्या आईवडीलांवर उठतील आणि ते त्यांना ठार करतील. आणि माझ्या नावामुळे सर्वजण तुमचा व्देष करतील, पण जो शेवटपर्यंत टिकेल तोच तारला जाईल.
”जेव्हा तुम्ही नाशाला कारण अशी भयंकर गोष्ट, दानीएल संदेष्ट्याने सांगितलेला ‘ओसाडीचा अमंगळ पदार्थ’ जो जिथे नको तेथे पाहाल. (वाचकाने याचा अर्थ काय तो समजावून घ्यावा) तेव्हा जे यहूदीया प्रांतात आहेत त्यांनी डोंगरांकडे पळून जावे. जो मनुष्य आपल्या घराच्या छतावर असेल त्याने घरातून काही आणण्यासाठी खाली उतरू नये. आणि जर एखादा मनुष्य शेतात असेल तर त्याने आपला झगा आणण्यासाठी माघारी जाऊ नये. त्यादिवसात ज्या स्त्रियांची मुले तान्ही असतील व अंगावर पाजत असतील त्यांच्यासाठी हे अती भयंकर होईल. हे हिवाळ्यात होऊ नये म्हणून प्रार्थना करा. कारण त्या दिवासात जो त्रास होईल तो देवाने जग निर्माण केले त्या आरंभापासून तो आजपर्यंत कधीही झाला नसेल व पुन्हा त्यासारखा कधीही होणार नाही, असा असेल. परमेश्वराने जर ते दिवस कमी केले नसते तर कोणीही वाचला नसता. परंतु ज्यांना त्याने निवडले आहे अशा निवडलेल्या मनुष्यांसाठी ते दिवस त्याने कमी केले आहेत.
”आणि जर कोणी तुम्हास म्हणेल की ‘पाहा, ख्रिस्त येथे आहे किंवा तेथे आहे,’ तर त्यावर विश्वास ठेवू नका. कारण काही लोक आपण खोटे ख्रिस्त किंवा खोटे संदेष्टे असल्याचा दावा करतील आणि शक्य झाले तर ते निवडलेल्या लोकांस फसवण्यासाठी चिन्हे व आश्चर्यकर्म करतील. पहा, तेव्हा तुम्ही सावध राहा. मी काळापूर्वीच तुम्हास सर्वकाही सांगून ठेवले आहे.
”परंतु त्यादिवसात ही संकटे येऊन गेल्यावर, ‘सूर्य अंधकारमय होईल, चंद्र प्रकाश देणार नाही.’ ‘आकाशातून तारे पडतील आणि आकाशातील बळे डळमळतील.’ आणि लोक मनुष्याचा पुत्राला मेघांरूढ होऊन मोठ्या सामर्थ्यानिशी आणि वैभवाने येताना पाहतील. नंतर तो आपल्या देवदूतास पाठवील व चार दिशातून, पृथ्वीच्या सीमेपासून ते आकाशाच्या सीमेपर्यंत त्याच्या निवडलेल्या लोकांस एकत्र करील.
”अंजिराच्या झाडापासून शिका. जेव्हा त्याच्या डहाळ्या कोमल होतात आणि त्यावर पाने फुटतात तेव्हा तुम्हास उन्हाळा जवळ आला हे समजते. त्याचप्रमाणे तुम्ही जेव्हा या गोष्टी घडताना पाहाल तेव्हा तुम्हास समजेल की, तो काळ अगदीच दाराशी येऊन ठेपला आहे. मी तुम्हास खरे सांगतो की, या सर्व गोष्टी घडण्यापूर्वी ही पिढी खात्रीने नाहीशी होणार नाही. स्वर्ग आणि पृथ्वी नाहीशी होतील पण माझी वचने नाहीशी होणारच नाहीत. त्या दिवसाविषयी किंवा त्या घटकेविषयी कोणालाही ठाऊक नाही. स्वर्गातील देवदूतांनाही नाही व पुत्रासही नाही. फक्त पित्याला ठाऊक आहे. सावध असा, प्रार्थनेत जागृत असा कारण ती वेळ केव्हा येईल हे तुम्हास ठाऊक नाही. ती वेळ अशी आहे की, एक मनुष्य प्रवासास निघते वेळी घर सोडतो आणि त्याच्या प्रत्येक नोकराला काम नेमून देतो. तो पहारेकऱ्यास जागरूक राहण्याची आज्ञा करतो. तसे हे आहे. म्हणून तुम्ही जागे असा, कारण घरधनी केव्हा येईल हे तुम्हास ठाऊक नाही. तो संध्याकाळी, मध्यरात्री, पहाटे कोंबडा आरवण्यापूर्वी किंवा सकाळी केव्हा येईल हे तुम्हास माहीत नाही. जर तो अचानक आला तर तुम्हास झोपेत असताना पाहील. मी तुम्हास सांगतो, ते सर्वांना सांगतो, जागृत राहा.”
”येशू म्हणाला, “मी आहे, आणि तुम्ही मनुष्याच्या पुत्राला सर्वसमर्थ देवाच्या उजवीकडे बसलेले व आकाशातील मेघांसह येताना पाहाल.”
”जो कोणी माझ्याविषयीची व माझ्या वचनाविषयी लाज धरील त्यांच्याविषयीची लाज मनुष्याचा पुत्र जेव्हा आपल्या स्वतःच्या, पित्याच्या व पवित्र दूतांच्या गौरवाने येईल तेव्हा धरील. आणि मी तुम्हास खरे सांगतो की, येथे उभे राहणाऱ्यांतले काही असे आहेत की, ते देवाचे राज्य पाहतील तोपर्यंत त्यांना मरणाचा अनुभव येणारच नाही.”
”तुमच्या कंबरा बांधलेल्या आणि दिवे लागलेले असू द्या. लग्नाच्या मेजवानीवरुन परतणाऱ्या मालकाची वाट पाहणाऱ्या लोकांसारखे व्हा जेणेकरून, तो परत येतो व दरवाजा ठोकावतो तेव्हा त्याच्यासाठी त्यांनी ताबडतोब दरवाजा उघडावा. मालक परत आल्यावर जे नोकर त्यास जागे व तयारीत असलेले आढळतील ते धन्य. मी तुम्हास खरे सांगतो, तो स्वतः त्यांची सेवा करण्यासाठी कंबर कसेल, त्यांना मेजावर बसायला सांगून त्यांची सेवा करील. तो मध्यरात्री किंवा त्यानंतर येवो, जर ते नोकर त्यास तयारीत आढळतील तर ते धन्य. परंतु याविषयी खात्री बाळगा; चोर केव्हा येणार हे जर घराच्या मालकाला माहीत असते तर त्याने आपले घर त्यास फोडू दिले नसते. तुम्हीही तयार असा कारण तुम्हास वाटत नाही अश्या क्षणी? मनुष्याचा पुत्र येईल.
”त्याचा मालक येईल त्यावेळी असे करतांना जो नोकर त्यास आढळेल तो धन्य. मी तुम्हास खरे सांगतो, मालक त्यास त्याच्या सर्व मालमत्तेवर अधिकारी म्हणून नेमील. पण जर तो नोकर मनात म्हणतो, ‘माझा मालक येण्यास फार उशीर करत आहे,’ आणि मग तो त्याच्या स्त्री व पुरूष नोकरांना मारहाण करायला व खाण्यापिण्यास सुरुवात करतो व झिंगतो, तर तो नोकर वाट पाहत नाही त्यादिवशी आणि त्यास माहीत नाही तेव्हा त्याचा मालक येईल व त्यास कापून त्याचे तुकडे करील आणि अविश्वासू लोकांबरोबर त्याचा वाटा ठेवील. आपल्या मालकाची इच्छा माहीत असूनही जो नोकर तयार राहत नाही किंवा जो आपल्या मालकाच्या इच्छेप्रमाणे करीत नाही, त्या नोकराला खूप मार मिळेल.
”तो लोकसमुदायाला म्हणाला, जेव्हा पश्चिमेकडून ढग येताना पाहता तेव्हा तुम्ही लगेच म्हणता की, पाऊस पडेल आणि तसेच घडते. जेव्हा दक्षिणेकडचा वारा वाहतो, तेव्हा तुम्ही म्हणता उकाडा होईल आणि तसेच घडते. अहो ढोंग्यांनो! तुम्हास पृथ्वीवरील व आकाशातील चिन्हांची लक्षणे पारखता येतात, पण सध्याच्या काळाचा अर्थ तुम्हास का काढता येत नाही काय?
”शिष्यांना तो म्हणाला, “मनुष्याच्या पुत्राच्या येण्याच्या दिवसापैकी एका दिवसाची तुम्ही आतुरतेने वाट पाहाल. पण तो दिवस तुम्ही पाहू शकणार नाही, असे दिवस येतील. आणि लोक तुम्हास म्हणतील, पाहा, तो तर येथे आहे किंवा पाहा, तो तेथे आहे, तेव्हा तुम्ही मला पाहाण्यासाठी त्यांच्यामागे जाऊ नका. कारण जशी वीज आकाशाच्या एका सिमेपासुन दुसऱ्या सिमेपर्यंत चमकते तसेच मनुष्याच्या पुत्राचे येणे त्याच्या दिवसात होईल.
”पण पहिल्याने त्याने खूप दुःख भोगावे व या पिढीकडून नाकारले जावे याचे अगत्य आहे. जसे नोहाच्या दिवसात झाले, तसेच मनुष्याच्या पुत्राच्या दिवसात पण होईल. नोहाने तारवात प्रवेश केला आणि मग महापूर आला व त्या सर्वांचा नाश झाला त्या दिवसापर्यंत ते खात होते, पीत होते, लग्न करून घेत होते आणि लग्न करुनही देत होते. त्याचप्रमाणे, लोटाच्या दिवसात झाले तसे होईलः ते खात होते, पीत होते. विकत घेत होते. विकत देत होते. लागवड करीत होते. बांधीत होते. पण ज्या दिवशी लोट सदोम सोडून बाहेर निघाला त्यादिवशी आकाशातून आग व गंधक यांचा पाऊस पडला आणि सर्वांचा नाश केला. मनुष्याचा पुत्र प्रकट होण्याच्या दिवशीही असेच घडेल
”त्यादिवशी जर एखादा छतावर असेल व त्याचे सामान घरात असेल, तर त्याने ते बाहेर काढण्यासाठी घरात जाऊ नये. त्याचप्रमाणे जो शेतात असेल त्याने परत जाऊ नये. लोटाच्या पत्नीची आठवण करा. जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो आपला जीव गमवेल आणि जो कोणी आपला जीव गमावील तो त्यास वाचवील.
”मी तुम्हास सांगतो, त्या रात्री बिछान्यावर दोघे असतील, त्यांच्यामधून एक घेतला जाईल व दुसरा ठेवला जाईल. दोन स्त्रिया दळण करत असतील, तर त्यांपैकी एक घेतली जाईल व दुसरी ठेवली जाईल.” शेतात दोघे असतील एकाला घेतले जाईल व दुसऱ्यायाला ठेवले जाईल. शिष्यांनी त्यास विचारले, कोठे प्रभू? येशूने उत्तर दिले, जेथे प्रेत असेल तेथे गिधाडे जमतील.
”आणि मग जे देवाचे निवडलेले लोक दिवसरात्र त्याचा धावा करतात त्यांचा तो न्याय करणार नाही काय? तो त्यांना मदत करण्यास वेळ लावेल का? मी तुम्हास सांगतो, तो त्यांचा न्याय लवकर करील, तरीही जेव्हा मनुष्याचा पुत्र येईल, तेव्हा त्यास पृथ्वीवर विश्वास आढळेल काय?”
”मग तो त्यांना म्हणाला, “एक राष्ट्र दुसऱ्या राष्ट्रावर उठेल, एक राज्य दुसऱ्या राज्यावर उठेल. मोठे भूकंप होतील, दुष्काळ पडतील आणि वेगवेगळ्या ठिकाणी पीडा उद्भवतील, भितीदायक घटना घडतील आणि आकाशात मोठी चिन्हे घडतील.
”परंतु हे सर्व होण्यापूर्वी ते तुमच्यावर हात टाकतील आणि तुमचा छळ करतील. चौकशीसाठी ते तुम्हास सभास्थानासमोर उभे करतील आणि तुरुंगात टाकतील. माझ्या नावासाठी ते तुम्हास राजे व राज्यपाल यांच्यासमोर नेतील. यामुळे तुम्हास माझ्याविषयी साक्ष देण्याची संधी मिळेल. तेव्हा उत्तर कसे द्यावे याविषयी आधीच विचार करायचा नाही अशी मनाची तयारी करा, कारण मी तुम्हास असे शब्द व अशी बुद्धी देईन की ज्यामुळे त्यांना तुमचा विरोध करायला किंवा तुमच्याविरुध्द बोलायला मुळीच जमणार नाही. परंतु आईवडील, भाऊ, नातेवाईक आणि मित्र तुमचा विश्वासघात करतील आणि तुम्हापैकी काही जणांना ठार मारतील. माझ्या नावामुळे सर्वजण तुमचा व्देष करतील. परंतु तुमच्या डोक्यावरील एक केसही नाहीसा होणार नाही. तुम्ही आपल्या धीराने आपले जीव मिळवून घ्याल.
”तुम्ही जेव्हा यरुशलेम शहरास सैन्यानी वेढा घातलेला पाहाल, तेव्हा तुम्हास कळून येईल की, तिचा नाश होण्याची वेळ आली आहे. जे यहूदीया प्रांतात आहेत त्यांनी डोंगरांमध्ये पळून गेले पाहिजे. जे रानात आहेत त्यांनी शहरात जाऊ नये. ज्या सर्व गोष्टी लिहिलेल्या आहेत त्या पूर्ण होण्यासाठी हे शिक्षेचे दिवस आहेत. त्यादिवसात ज्या गरोदर स्त्रिया आहेत व ज्या बाळाचे पोषण करणाऱ्या स्त्रिया आहेत, त्यांच्यासाठी ते किती भयंकर होईल. अशा स्त्रियांची खरोखर दुर्दशा होईल कारण देशावर मोठे संकट येईल आणि लोकांवर क्रोध येईल. ते तरवारीच्या धारेने पडतील आणि त्यांना कैद करून राष्ट्रांत नेतील आणि परराष्ट्रीय लोकांचा काळ संपेपर्यंत परराष्ट्रीय यरुशलेम शहरास पायाखाली तुडवतील.
”सूर्य, चंद्र, तारे यांच्यात चिन्हे होतील, पृथ्वीवरील राष्ट्रे हतबल होतील व समुद्राच्या गर्जणाऱ्या लाटांनी ते घाबरुन जातील. भीतीमुळे व जगावर कोसळणाऱ्या गोष्टींची वाट पाहण्याने मनुष्य मरणोन्मुख होतील व आकाशातील बळे डळमळतील. नंतर ते मनुष्याच्या पुत्राला सामर्थ्याने आणि वैभवाने ढगांत येताना पाहतील. परंतु या गोष्टी घडण्यास आरंभ होईल, तेव्हा सरळ उभे राहा आणि तुमचे डोके वर करा, कारण तुमच्या सुटकेची वेळ जवळ येत आहे.”
”नंतर त्याने त्यास एक दाखला सांगितला, अंजिराचे झाड व इतर दुसऱ्या झाडांकडे पाहा. त्यांना पालवी येऊ लागली की, तुमचे तुम्हीच समजता की, उन्हाळा अगदी जवळ आला आहे. त्याचप्रमाणे या गोष्टी घडताना तुम्ही पाहाल तेव्हा ओळखा की देवाचे राज्य जवळ आले आहे. मी तुम्हास खरे सांगतो की, या सर्व गोष्टी घडून येईपर्यंत ही पिढी नाहीशी होणार नाही. आकाश व पृथ्वी नाहीशी होतील पण माझी वचने मुळीच नाहीशी होणार नाही. परंतु तुम्ही स्वतःला सांभाळा, दारुबाजी आणि अधाशीपणा व या हल्लीच्या जीवनासंबंधीच्या चिंता यांनी तुमची अंतःकरणे भारावून जाऊ नये, तो दिवस पाशासारखा अकस्मात तुमच्यावर येईल. खरोखर, तो पृथ्वीवर असणाऱ्या सर्व लोकांवर येईल. यास्तव तुम्ही या सर्व होणाऱ्या गोष्टी चुकवायला व मनुष्याच्या पुत्रासमोर उभे राहायला सबळ असावे म्हणून सर्व प्रसंगी प्रार्थना करीत जागे राहा.
”मी तुम्हास खरे खरे सांगतो की, मरण पावलेले लोक देवाच्या पुत्राचा आवाज ऐकतील व जे ऐकतील ते जिवंत होतील, अशी वेळ येत आहे, किंबहुना आता आलीच आहे. कारण पित्याच्या ठायी जसे स्वतःचे जीवन आहे तसे पुत्राच्या ठायीही स्वतःचे जीवन असावे असे त्याने त्यास दिले. आणि तो मनुष्याचा पुत्र आहे, या कारणास्तव न्यायनिवाडा करण्याचा अधिकारही त्यास दिला. त्याचे आश्चर्य करू नका; कारण जेव्हा कबरात असलेले सर्व त्याचा आवाज ऐकतील अशी घटका येत आहे, आणि ज्याने सत्कर्मे केली ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी व ज्यांनी दुष्कर्मे केली ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील.
”माझ्या पित्याच्या घरात राहण्याच्या जागा पुष्कळ आहेत. नसत्या तर मी तुम्हास तसे सांगितले असते; मी तुमच्यासाठी जागा तयार करावयास जातो आणि, मी जाऊन तुम्हासाठी जागा तयार केली म्हणजे पुन्हा येऊन तुम्हास आपल्याजवळ घेईन; यासाठी जेथे मी आहे तेथे तुम्हीही असावे.
”असे सांगितल्यावर त्यांच्या डोळ्यासमोर तो वर घेतला गेला, आणि मेघांनी त्यास दृष्टीआड केले. नंतर तो जात असता ते आकाशाकडे निरखून पाहत होते, तेव्हा पाहा, शुभ्र वस्त्रे परिधान केलेले दोन पुरूष त्यांच्याजवळ उभे राहिले. आणि ते असे बोलले, “अहो गालीलकारांनो, तुम्ही आकाशाकडे का पाहत उभे राहिले आहात? हा जो येशू तुम्हापासून वर आकाशात घेतला गेला आहे? तुम्ही त्यास जसे आकाशात जातांना पाहता तसाच तो परत येईल.”
”कारण मी मानतो की, या चालू काळातील दुःखे ही आपल्यासाठी जे गौरव प्रकट होईल, त्याच्यापुढे काही किमतीची नाहीत. कारण, सृष्टीची उत्कट अपेक्षा देवाच्या पुत्रांच्या प्रकट होण्याची प्रतीक्षा करीत आहे.
”कारण असे लिहिले आहे की, ‘प्रभू म्हणतो, मी जिवंत आहे म्हणून, प्रत्येक गुडघा मला नमन करील, आणि प्रत्येक जीभ देवाचे स्तवन करील.’
”आणि शांतीचा देव सैतानाला तुमच्या पायांखाली लवकरच तुडवील. आपला प्रभू येशू ख्रिस्त याची कृपा तुमच्याबरोबर असो. आमेन.
”जर कोणी त्या पायावर सोने, चांदी, मौल्यवान दगड, लाकूड, गवत किंवा पेंढा यांनी बांधतो, तर बांधणाऱ्या प्रत्येकाचे काम उघड होईल कारण तो दिवस ते उघडकीस आणील, तो दिवस अग्नीने प्रकट होईल व तोच अग्नी प्रत्येकाचे काम कसे आहे याची परीक्षा करील. ज्या कोणाचे त्या पायावर बांधलेले काम टिकेल, त्यास प्रतिफळ मिळेल. पण एखाद्याचे काम जळून जाईल व त्याचे नुकसान होईल तथापि तो स्वतः तारला जाईल परंतु जणू काय अग्नीतून बाहेर पडलेल्यासारखा तारला जाईल.
”म्हणून योग्य समय येईपर्यंत म्हणजे प्रभू येईपर्यंत न्यायनिवाडा करुच नका. तो अंधारामध्ये दडलेल्या गोष्टींवर प्रकाश टाकील व अंतःकरणातील हेतू उघडकीस आणील, त्यावेळी देवाकडून प्रत्येकाची प्रशंसा होईल.
”तुम्ही अशा मनुष्यास देहाच्या नाशाकरता सैतानाच्या स्वाधीन करावे; म्हणजे, प्रभूच्या दिवशी त्याच्या आत्म्याचे तारण व्हावे. तुमचा अभिमान चांगला नाही. थोडेसे खमीर सगळा गोळा फुगवते, हे तुम्हास माहित आहे ना?
”आता बंधूंनो मी हे सांगतो की, मांस व रक्त ह्यांना देवाच्या राज्याचे वतन मिळू शकत नाही आणि विनाशीपणाला अविनाशीपणाचे वतन मिळत नाही. पाहा! मी तुम्हास एक रहस्यमय सत्य सांगत आहे. आपण सर्व मरणार नाही. आपण सर्व बदलून जाऊ. क्षणात, डोळ्यांचे पाते लवते न लवते तोच, शेवटचा कर्णा वाजेल तेव्हा, कारण कर्णा वाजेल आणि मरण पावलेले अविनाशीपणात उठवले जातील आणि आपण बदलून जाऊ.
”ह्यात हेतू हा की, स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वीखाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा, आणि हे देवपिताच्या गौरवासाठी प्रत्येक जीभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे.
”आपले जीवन जो ख्रिस्त तो प्रकट केला जाईल तेव्हा तुम्हीही त्याच्याबरोबर गौरवात प्रकट केले जाल.
”आणि त्याचा पुत्र येशू याची स्वर्गांतून येण्याची वाट पाहण्यास, तो पुत्र म्हणजे येशू ज्याला देवाने मरण पावलेल्यातून उठवले व तो आपल्याला भावी क्रोधापासून सोडविणारा आहे.
”पण बंधूंनो, मी इच्छीत नाही की, जे मरण पावलेत त्यांच्याविषयी तुम्ही अज्ञानी असावे, म्हणजे ज्यांना आशा नाही अशा इतरांप्रमाणे तुम्ही दुःख करू नये. कारण येशू मरण पावला व पुन्हा उठला असा जर आपण विश्वास ठेवतो, तर येशूमध्ये जे मरतात त्यांनाही देव त्याच्याबरोबर आणील. कारण प्रभूच्या वचनावरून आम्ही तुम्हास हे सांगतो की, आपण जे जिवंत आहोत व जे प्रभूच्या येण्यापर्यंत मागे राहू, ते आपण तोपर्यंत मरण पावलेल्यांच्या पुढे जाणार नाही.
”कारण आज्ञा करणाऱ्या गर्जणेने, आद्यदेवदूतांची वाणी आणि देवाच्या कर्ण्याचा आवाज येईल, तेव्हा प्रभू स्वतः स्वर्गातून उतरेल आणि ख्रिस्तात मरण पावलेले प्रथम उठतील. मग आपण जे जिवंत आहोत व मागे राहू, ते प्रभूला अंतराळात भेटण्यासाठी ढगात उचलले जाऊ आणि सर्वकाळ प्रभूबरोबर राहू.
”बंधूनो, काळ व समय ह्यांविषयी तुम्हास काही लिहिण्याची गरज नाही. कारण तुम्हा स्वतःला पक्के माहीत आहे की जसा रात्री चोर येतो, तसाच प्रभूचा दिवस येतो. “शांती आहे, सुरक्षितता आहे” असे ते म्हणतात, तेव्हा गरोदर स्त्रीला ज्याप्रमाणे अचानक वेदना सुरु होतात त्याप्रमाणे त्यांचा अचानक नाश होईल आणि ते निभावणारच नाहीत. बंधुनो, त्या दिवसाने चोरासारखा तुम्हास गाठावे असे तुम्ही अंधारात नाही.
”कारण आपल्यावर क्रोध व्हावा म्हणून नव्हे तर आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे आपले तारण व्हावे म्हणून देवाने आपल्याला नेमले आहे. प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी याकरिता मरण पावला की, आपण जरी मागे राहिलो किंवा मरण पावलो तरी आपण त्याच्याबरोबर जिवंत रहावे.
”ह्यावरून तुमच्या सर्व छळांत व तुम्ही जी सहनशीलता व जो विश्वास दाखविता त्याबद्दल देवाच्या मंडळ्यांतून आम्ही स्वतः तुमचा अभिमान बाळगतो. ते देवाच्या योग्य न्यायाचे प्रमाण आहे; तो न्याय हा की, ज्यासाठी तुम्ही दुःख सोशीत आहात त्या देवाच्या राज्याला तुम्ही योग्य ठरले जावे. तुम्हावर संकट आणणाऱ्या लोकांची संकटाने परतफेड करणे आणि संकट सोसणाऱ्या तुम्हास आम्हाबरोबर विश्रांती देणे, हे देवाच्या दृष्टीने न्याय्य आहे, म्हणून प्रभू येशू प्रकट होण्याच्या समयी ते होईल; तो आपल्या सामर्थ्यवान देवदूतांसह स्वर्गातून अग्निज्वालेसहित प्रकट होईल. तेव्हा जे देवाला ओळखत नाहीत व आपल्या प्रभू येशूची सुवार्ता मानीत नाहीत त्यांचा तो सूड उगवील. तेव्हा त्यांना प्रभूच्या समोरून व त्याच्या सामर्थ्याच्या गौरवापासून दूर करण्यांत येऊन सर्वकाळचा नाश ही शिक्षा त्यांना मिळेल. आपल्या पवित्रजनांच्या ठायी गौरव मिळावे म्हणून आणि त्यादिवशी पवित्रजनांच्या ठायी आश्चर्यपात्र व्हावे म्हणून तो येईल कारण आम्ही दिलेल्या साक्षीवर तुम्ही विश्वास ठेवला आहे.
”बंधूनो, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे येणे व त्याच्याजवळ आपले एकत्र होणे ह्यासंबंधाने आम्ही तुम्हास अशी विनंती करतो की, तुम्ही एकदम दचकून भांबावून जाऊ नका व घाबरू नका; प्रभूचा दिवस येऊन ठेपला आहे असे सांगणाऱ्या आत्म्याने किंवा जणू काय आम्हाकडून आलेल्या वचनाने अथवा पत्राने घाबरू नका; कोणत्याही प्रकारे कोणाकडून फसू नका; कारण त्या दिवसाच्या अगोदर विश्वासाचा त्याग होऊन तो अनीतिमान पुरूष, नाशाचा पुत्र प्रकट होईल; तो नाशाचा पुत्र, विरोधी व ज्याला देव किंवा उपासनीय म्हणून म्हणतात त्या सर्वापेक्षा स्वतःला उंच करणारा, म्हणजे मी देव आहे, असे स्वतःचे प्रदर्शन करीत देवाच्या भवनात बसणारा असा आहे.
”मी तुमच्याबरोबर असतांना हे तुम्हास सांगत असे याची तुम्हास आठवण नाही काय? त्याने नेमलेल्या समयीच प्रकट व्हावे, अन्य वेळी होऊ नये, म्हणून जे आता प्रतिबंध करीत आहे ते तुम्हास ठाऊक आहे. कारण अनीतीचे रहस्य आताच आपले कार्य चालवीत आहे, परंतु जो आता अडथळा करीत आहे तो मधून काढला जाईपर्यंत अडथळा करीत राहील; मग तो अनीतिमान पुरूष प्रकट होईल, त्यास प्रभू येशू आपल्या मुखातील श्वासाने मारून टाकिल आणि तो येताच आपल्या दर्शनाने त्यास नष्ट करील; सैतानाच्या कृतीमुळे त्याचे येणे होईल; तो सर्व प्रकारे खोटे सामर्थ्य, तशीच चिन्हे व अद्भूते करीत येईल ज्यांचा नाश होत चालला आहे त्यांनी आपले तारण साधावे म्हणून सत्याविषयीची प्रीती धरली नाही; त्यामुळे त्याच्यांसाठी सैतानाच्या कृतीप्रमाणे सर्व प्रकारची खोटी महत्कृत्ये, चिन्हे, अद्भूते आणि सर्वप्रकारचे अनीतिजनक कपट ह्यांनी युक्त असे त्या अनीतिमानाचे येणे होईल. त्यांनी असत्यावर विश्वास ठेवावा म्हणून देव त्यांच्याठायी भ्रांतीचे कार्य चालेल असे करतो; ज्यांनी सत्यावर विश्वास ठेवला नाही, तर अनीतीत संतोष मानला त्या सर्वांचा न्यायनिवाडा व्हावा म्हणून असे होईल.
”आपला प्रभू येशू ख्रिस्त प्रकट होईपर्यंत निष्कलंक आणि निर्दोष रहावे म्हणून ही आज्ञा पाळ. जो धन्यवादीत, एकच सार्वभौम, राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू, ज्या एकालाच अमरत्व आहे, जो अगम्य प्रकाशात राहतो ज्याला कोणा मनुष्याने पाहिले नाही आणि कोणाच्याने पाहवत नाही, तो ते त्याचे प्रकट होणे यथाकाली दाखवील, त्यास सन्मान व सार्वकालिक सामर्थ्य आहे. आमेन.
”परंतु शेवटच्या काळामध्ये संकटाचा दिवस आपल्यावर येईल हे समजून घे. लोक स्वार्थी, धनलोभी, बढाईखोर, गर्विष्ठ, निंदा करणारी, आई-वडीलांची आज्ञा न मानणारी, अनुपकारी, अधार्मिक इतरांवर प्रीती न करणारी, क्षमा न करणारी, चहाडखोर, असंयमी, क्रूर, चांगल्याबद्दल प्रेम न बाळगणारी. विश्वासघातकी, उतावीळ, गर्वाने फुगलेली, देवावर प्रीती करण्यापेक्षा चैनीची अधिक आवड धरणारी अशी होतील; ते देवाच्या सेवेचे बाहेरचे स्वरूप चांगले राखतील परंतु त्याचे सामर्थ्य नाकारतील. त्यांच्यापासून नेहमी दूर राहा.
”देवासमोर आणि जो ख्रिस्त येशू जिवंतांचा व मृतांचा न्याय करील त्याच्यासमक्ष त्याच्या प्रकट होण्याला व त्याच्या राज्याला स्मरून मी निक्षून सांगतो की, वचनाची घोषणा कर सुवेळी अवेळी तयार राहा, सर्व प्रकारच्या सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखीव, निषेध कर व बोध कर. मी असे म्हणतो कारण अशी वेळ येईल जेव्हा लोक चांगले शिक्षण सहन करणार नाहीत. त्याऐवजी त्यांच्या स्वतःच्या इच्छांना पूरक असे शिक्षक ते त्यांच्यासाठी जमा करतील. सत्यापासून ते आपले कान दुसरीकडे वळवतील व आपले लक्ष ते काल्पनिक कथांकडे लावतील. पण तू सर्व परीस्थितीत सावधानतेने वाग, दुःख सहन कर; सुवार्तेची घोषणा करण्याचे काम कर; देवाने दिलेली सेवा पूर्ण कर.
”आता पुढे माझ्यासाठी जो नितीमत्वाचा मुकुट ठेवला आहे, तो त्यादिवशी नीतिमान न्यायाधीश प्रभू मला देईल आणि केवळ मलाच नव्हे, तर त्याचे प्रकट होणे ज्यांना प्रिय आहे त्या सर्वांनाही देईल.
”आणि आपल्या धन्य आशेची, म्हणजे आपला महान देव व तारणारा येशू ख्रिस्त ह्याच्या गौरवी आगमनाची प्रतीक्षा करावी;
”आणि हे प्रभू, सुरुवातीला तू पृथ्वीचा पाया घातलास, आणि आकाश तुझ्या हातचे काम आहे. ती संपुष्टात येतील पण तू सतत राहशील ते कापडासारखे जुने होतील. तू त्यांना अंगरख्यासारखे गुंडाळशील, तू त्यांना कपड्यासारखे बदलशील, पण तू नेहमी सारखाच राहशील, आणि तुझी वर्षे कधीही संपणार नाहीत.
”म्हणून स्वर्गातील गोष्टींच्या नमुन्याप्रमाणे असलेल्या वस्तू यज्ञाच्या द्वारे शुद्ध करणे जरुरीचे होते. पण त्याहूनही अधिक चांगल्या यज्ञाने स्वर्गीय गोष्टीच्या प्रतिमा शुद्ध केल्या जातात. कारण ख्रिस्ताने मानवी हातांनी केलेल्या पवित्रस्थानात पाऊल ठेवले असे नाही, तर ते स्थान खऱ्या वस्तूची केवळ प्रतिमाच आहे. देवाच्या समोर हजर होण्यासाठी खुद्द स्वर्गात त्याने प्रवेश केला. जसा महायाजक दरवर्षी स्वतःचे नसलेले रक्त घेऊन परमपवित्रस्थानात जातो तसे त्यास पुन्हा पुन्हा स्वतःचे अर्पण करायचे नव्हते. तसे असते तर ख्रिस्ताला जगाच्या स्थापनेपासून स्वतःचे अर्पण पुष्कळ वेळा करावे लागले असते. परंतु आता युगाच्या शेवटी आपल्या स्वतःला अर्पण करून पाप नाहीसे करण्यासाठी तो एकदाच प्रकट झाला आहे. ज्याअर्थी लोकांस एकदाच मरणे व नंतर न्याय होणे नेमून ठेवले आहे, तसाच ख्रिस्त हि, पुष्कळांची पापे वाहून नेण्यास एकदाच अर्पिला गेला आणि त्याची वाट पाहणाऱ्यांस पापासंबंधात नव्हे तर तारणासाठी दुसऱ्याने दिसेल.
”आपण कित्येकाच्या चालीप्रमाणे आपले एकत्र मिळणे न सोडता एकमेकास बोध करावा आणि देवाचा दिवस जवळ येत असताना अधीकाधीक उत्तेजन द्यावे.
”कित्येक स्त्रियांना त्यांचे मरण पावलेले, पुन्हा जिवंत होऊन, परत मिळाले आणि कित्येकांनी अधिक चांगले पुनरुत्थान मिळवण्यास आपली सुटका न पतकरल्यामुळे त्यांचे हाल हाल करण्यात आले.
”धनवान लोकहो ऐका, तुमच्यावर जी संकटे येत आहेत त्याबद्दल रडा व आक्रोश करा. तुमची संपत्ती नाश पावली आहे व तुमच्या कपड्यांना कसर खाऊन टाकीत आहेत. तुमचे सोनेचांदी मातीमोल झाले आहे. त्याच्यावर चढलेला थर तुमच्याविरुध्द साक्ष देईल आणि तुमचे शरीर अग्नीसारखे खाऊन टाकील. तुम्ही शेवटल्या दिवसांसाठी धन साठवून ठेवले आहे.
”यासाठी बंधूंनो, प्रभूच्या येण्यापर्यंत धीर धरा, लक्षात ठेवा की, शेतकरी आपल्या शेतातील मोलवान पिकाची वाट पाहतो. तो धीराने त्याची वाट पाहतो. पहिला व शेवटचा पाऊस मिळेपर्यंत वाट पाहतो. तुम्हीसुद्धा धीराने वाट पाहिली पाहिजे. तुमचे अंतःकरण बळकट करा कारण प्रभूचे दुसरे आगमन जवळ आले आहे.
”प्रथम हे ध्यानात ठेवा की, स्वतःच्या वासनेप्रमाणे चालणारे, थट्टाखोर लोक शेवटल्या दिवसात थट्टा करीत येऊन म्हणतील, त्याच्या येण्याचे वचन कोठे आहे? कारण पूर्वज निजले तेव्हापासून सर्व गोष्टी जश्या उत्पत्तीच्या प्रारंभापासून होते तसेच चालू आहे. कारण ते हे जाणूनबुजून विसरतात की, देवाच्या शब्दाने आकाश आणि पाण्यातून पाण्याच्या योगे घडलेली अशी पृथ्वी ही झाली. त्याच्यायोगे, तेव्हाच्या जगाचा पाण्याने बुडून नाश झाला. पण, आताचे आकाश व पृथ्वी ही त्याच शब्दाने अग्नीसाठी राखलेली असून, ती न्यायानिवाडाच्या व भक्तीहीन लोकांच्या नाशाचा दिवस येईपर्यंत राखून ठेवलेली आहेत.
”पण प्रियजनहो, ही एक गोष्ट तुम्ही विसरू नये की, प्रभूला एक दिवस हजार वर्षांसमान आणि हजार वर्षे एका दिवसासमान आहेत. कित्येक लोक ज्याला उशीर म्हणतात तसा उशीर प्रभू आपल्या वचनाविषयी करीत नाही. तर तो तुमच्याविषयी फार सहनशील आहे. कोणाचा नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सर्वांनी पश्चात्ताप करावा अशी आहे.
”तरी चोर येतो तसा प्रभूचा दिवस येईल; त्यादिवशी आकाश मोठा नाद करीत नाहीसे होईल, सृष्टितत्त्वे तापून विरघळतील आणि पृथ्वी तिच्यावरील कामे जळून जातील. या सर्व गोष्टी जर लयास जाणार आहेत म्हणून तुम्ही पवित्र आचरणात व सुभक्तीत राहून देवाचा दिवस येण्याची वाट पाहत व तो दिवस लवकर यावा म्हणून खटपट करीत तुम्ही कशा प्रकारचे लोक असावे बरे? देवाच्या त्या दिवसामुळे आकाश जळून लयास जाईल आणि सृष्टितत्त्वे अत्यंत तापून वितळतील. तरी ज्यामध्ये नीतिमत्त्व राहते, असे नवे आकाश व नवे पृथ्वी त्याच्या वचनाप्रमाणे आपण वाट पाहत आहोत.
”जग व जगातील वासना नाहीशा होत आहेत. पण जो देवाच्या इच्छेप्रमाणे करतो तो सर्वकाळपर्यंत जगेल. मुलांनो, शेवट जवळ आला आहे व तुम्ही ऐकल्याप्रमाणे ख्रिस्तविरोधी येत आहेत आणि आताच पुष्कळ ख्रिस्तविरोधक उठले आहेत; ह्यावरून आपल्याला दिसून येते की, ही शेवटली घटका आहे. आपल्यातूनच ते निघाले तरी ते आपले नव्हते; ते आपले असते तर आपल्याबरोबर राहिले असते; त्यांच्यातील कोणीही आपला नाही हे प्रकट व्हावे म्हणून ते निघाले.
”प्रियांनो, प्रत्येक आत्म्यावर विश्वास ठेवू नका परंतु ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाहीत याची परीक्षा करा कारण जगात पुष्कळ खोटे संदेष्टे निघाले आहेत. अशाप्रकारे तुम्ही देवाचा आत्मा ओळखा “येशू ख्रिस्त देह धारण करून आला.” हे जो प्रत्येक आत्मा कबूल करतो तो देवापासून आहे. आणि जो प्रत्येक आत्मा येशूला कबूल करत नाही, तो देवापासून नाही. हाच ख्रिस्तविरोधकाचा आत्मा आहे; तो येणार हे तुम्ही ऐकले आहे. तो जगात आताही आहे. माझ्या प्रिय मुलांनो, तुम्ही देवाचे आहात आणि त्यांना तुम्ही जिंकले आहे कारण जगामध्ये जो आहे त्याच्यापेक्षां जो तुमच्यामध्ये आहे; तो महान देव आहे. ते आत्मे जगाचे आहेत म्हणून ते जगाच्या गोष्टी बोलतात व जग त्यांचे ऐकते. पण आम्ही देवाचे आहोत. जो देवाला ओळखतो तो आपले ऐकतो. परंतु जो देवाचा नाही तो आपले ऐकत नाही. अशा रीतीने सत्य प्रकट करणारा आत्मा कोणता आणि फसवणारा आत्मा कोणता हे आपण ओळखतो.
”कारण फसवणूक करणारी, म्हणजे देहाने येणारा येशू ख्रिस्त ह्याला कबूल न करणारी पुष्कळ माणसे जगात उठली आहेत. फसवणूक करणारा व ख्रिस्तविरोधक असलाच आहे. आम्ही केलेले काम तुम्ही निष्फळ होऊ देऊ नका तर त्याचे पूर्ण प्रतिफळ तुम्हास मिळावे, म्हणून खबरदारी घ्या. ख्रिस्ताच्या शिक्षणाला चिकटून न राहता जो पुढेपुढेच जातो त्यास देव प्राप्त झाला नाही. जो ख्रिस्ताच्या शिक्षणाला धरून राहतो त्यास पिता व पुत्र या दोघांची प्राप्ती झाली आहे. हे शिक्षण न देणारा कोणी तुम्हाकडे आला तर त्यास घरात घेऊ नका किंवा त्यास सलामही करू नका. कारण जो कोणी त्याचे स्वागत करतो तो त्याच्या दुष्कर्मांचा भागीदार होतो.
”आणि आदामापासून सातवा, हनोख, ह्यानेही यांच्याविषयी संदेश देऊन म्हणले आहे की, “बघा, प्रभू आपल्या लाखो पवित्र जनांसहित आला. तो सर्वांचा न्यायनिवाडा करावयास व त्यांच्यातील सर्व भक्तिहीन लोकांस, त्यांनी भक्तिहीनपणे केलेल्या भक्तिहीन कृतीविषयी आणि भक्तिहीन पाप्यांना, त्याच्याविरुध्द त्यांनी म्हटलेल्या सर्व कठोर गोष्टींविषयी दोषी ठरविण्यास येत आहे.”
”हे येशू ख्रिस्ताचे प्रकटीकरण आहे. ते देवाने ‘ज्या गोष्टी लवकरच घडणे आवश्यक आहेत,’ त्या आपल्या दासांना दाखविण्यासाठी ख्रिस्ताला दिले, आणि ख्रिस्ताने त्याच्या देवदूताला पाठवून या सर्व गोष्टी योहानाला कळविण्यास सांगितले.
”‘पहा, येशू ढगांसह येत आहे’ प्रत्येक डोळा त्यास ‘पाहील’ ज्यांनी त्यास ‘भोकसले तेसुध्दा त्यास पाहतील पृथ्वीवरील सर्व वंश त्याच्यामुळे आकांत करतील होय’ असेच होईल, आमेन.
”धीराने सहन करण्याविषयी तुम्ही माझी आज्ञा पाळली आहे. म्हणून सर्व जगावर जो संकटाचा समय येणार आहे त्यापासून मी तुम्हास राखीन. हा त्रास जे लोक या पृथ्वीवर राहतात त्यांची परीक्षा होण्यासाठी येईल. मी लवकर येत आहे, जे तुझ्याकडे आहे त्यास घट्ट धरून राहा यासाठी की कोणीही तुझा मुकुट घेऊ नये. जो विजय मिळवतो त्यास मी माझ्या देवाच्या भवनाचा खांब बनवीन आणि तो कधीही बाहेर जाणार नाही, मी त्याच्यावर माझ्या देवाचे नाव व माझ्या देवापासून स्वर्गातून उतरणारे नवे यरुशलेम, म्हणजे माझ्या देवाची ‘नगरी हिचे नाव’ आणि माझे ‘नवे नाव’ लिहीन.
”मला तुझी कामे माहीत आहेत, ती अशी की, तू थंड नाहीस व गरमही नाहीस. तू थंड किंवा गरम असतास तर बरे झाले असते. पण, तू तसा नाहीस, कोमट आहेस, तू थंड नाहीस किंवा गरम नाहीस. म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे. तू म्हणतो मी सधन आहे, मी ‘संपत्ती मिळविली आहे,’ आणि मला कशाची गरज नाही, पण तू कष्टी, दयनीय, गरीब, आंधळा व नग्न आहेस हे तुला कळत नाही. मी तुम्हास सल्ला देतो की, अग्नीत शुद्ध केलेले सोने माझ्याकडून विकत घे. म्हणजे तू श्रीमंत होशील आणि तुमची लज्जास्पद नग्नता दिसू नये म्हणून नेसावयाला शुभ्र वस्त्रे विकत घे आणि स्पष्ट दिसावे म्हणून डोळ्यांत घालण्यास अंजन विकत घे. ज्यांच्यावर मी प्रेम करतो, त्यांना शिकवण देतो व त्यांनी कसे रहावे याची शिस्त लावतो, म्हणून झटून प्रयत्न करा आणि पश्चात्ताप करा.
”ह्यानंतर मी पाहिले तो पाहा, स्वर्गात एक दरवाजा माझ्यासमोर उघडलेला दिसला आणि अगोदर जसा आवाज मी माझ्याशी बोलताना ऐकला होता तसाच आवाज मी ऐकला. तो आवाज ‘कर्ण्याच्या’ आवाजासारखा होता. तो म्हणाला, “इकडे वर ये आणि मी तुला यानंतर जे घडणार आहे ते दाखवितो.”
”मग मी, ‘जो राजासनावर बसला होता’ त्याच्या उजव्या हातात मी एक गुंडाळी पाहिली. गुंडाळीवर दोन्ही बाजूंनी लिहिले होते आणि ती गुंडाळी सात शिक्के ‘मारून बंद केली होती.’ आणि मी एक सामर्थ्यशाली देवदूत पाहिला. तो देवदूत मोठ्या आवाजात म्हणाला, “गुंडाळीचे शिक्के तोडून ती उघडण्यास कोण योग्य आहे?” परंतु स्वर्गात, पृथ्वीवर किंवा पृथ्वीखाली कोणीही ती गुंडाळी उघडावयास किंवा तिच्यांत पाहावयास समर्थ नव्हता. ती गुंडाळी उघडण्यास किंवा तिच्यात पाहण्यास योग्य असा कोणी आढळला नाही म्हणून मला फार रडू आले. परंतु वडीलांपैकी एकजण मला म्हणाला, “रडू नकोस! पहा, ‘यहूदा’ वंशाचा सिंह, दाविदाचा अंकुर हा विजयी झाला आहे. तो गुंडाळी उघडण्यास व तिचे सात शिक्के उघडण्यास समर्थ आहे.” राजासनाच्या आणि चार जिवंत प्राण्यांच्या व त्या वडीलांच्या मध्यभागी ‘कोकरा’ उभा असलेला मी पाहिला, तो वधलेल्यासारखा होता, त्यास सात शिंगे आणि सात डोळे होते आणि हे ते सर्व पृथ्वीवर पाठविण्यात आलेले देवाचे सात आत्मे होते. तो गेला आणि त्याने जो, ‘राजासनावर बसला होता’, त्याच्या उजव्या हातातून ती गुंडाळी घेतली. आणि जेव्हा त्याने ती गुंडाळी घेतली तेव्हा चार जिवंत प्राणी व चोवीस वडीलजन कोकऱ्यासमोर उपडे पडले, प्रत्येकाजवळ वीणा व प्रत्येकाच्या हातात सुवासिक ‘धूपाने’ भरलेल्या सोन्याच्या वाट्या होत्या, त्या वाट्या म्हणजे पवित्रजनांच्या ‘प्रार्थना’ होत्या. आणि त्यांनी ‘नवे गाणे गाईलेः’ “तू गुंडाळी घेण्यास आणि तिचे शिक्के उघडण्यास योग्य आहेस, कारण तुला वधण्यात आले आणि तू आपल्या रक्ताने खंडणी भरून प्रत्येक वंशातून, वेगवेगळ्या भाषा बोलणारे लोक आणि राष्ट्रांतून ‘देवासाठी’ माणसे विकत घेतली आहेत. तू त्यांना आमच्या देवासाठी एक ‘राज्य’ आणि ‘याजक’ बनविले आणि नंतर ते पृथ्वीवर राज्य करतील.”
”मग मी पाहिले राजासन आणि, चार जिवंत प्राणी व वडीलजन यांच्यासभोवती अगणित देवदूतांची वाणी ऐकली, त्यांची संख्या ‘अयुतांची अयुते व हजारो हजार होती.’ देवदूत मोठ्या आवाजात म्हणाले, जो वधलेला कोकरा, सामर्थ्य, धन, ज्ञान, बल, सन्मान, गौरव व उपकारस्तुती ही घेण्यास योग्य आहे. प्रत्येक निर्माण केलेली वस्तु आकाशात व पृथ्वीवर, पृथ्वीखाली व समुद्रातील अवघ्याना मी असे गाताना ऐकले की, “जो राजासनावर बसतो त्यास व कोकऱ्याला स्तुती, सन्मान, गौरव आणि सामर्थ्य युगानुयुगापर्यंत असो!” चार जिवंत प्राणी म्हणाले, “आमेन!” मग वडीलजनांनी खाली पडून त्यास अभिवादन केले.
”मग कोकऱ्याने सात शिक्क्यांपैकी एक शिक्का फोडला ते मी पाहिले आणि त्या चार प्राण्यातील एकाने मेघगर्जनेसारख्या वाणीने ‘ये’ असे म्हणताना ऐकले. मी एक ‘पांढरा घोडा’ पाहिला, त्यावर जो बसला होता त्याच्याजवळ धनुष्य होते आणि त्यास मुकुट देण्यात आला. तो जिंकीत विजयावर विजय मिळविण्यास निघाला.
”जेव्हा कोकऱ्याने दुसरा शिक्का उघडला, तेव्हा दुसऱ्या जिवंत प्राण्याला ‘ये’ असे म्हणताना ऐकले. नंतर दुसरा ‘घोडा’ निघाला, तो ‘अग्निज्वालेप्रमाणे’ लाल होता. त्यावर जो बसलेला होता त्यास पृथ्वीवरील शांती नाहीशी करण्याचा अधिकार दिला होता. यासाठी की, लोकांनी एकमेकास वधावे. त्यास मोठी तरवार देण्यात आली होती.
”जेव्हा कोकऱ्याने तिसरा शिक्का उघडला, तिसऱ्या जिवंत प्राण्याला “ये” असे म्हणतांना ऐकले तेव्हा मी ‘काळा घोडा’ पाहिला आणि त्यावर जो बसलेला होता त्याच्या हातात तराजू होते. मी चार प्राण्यांच्यामधून निघालेली वाणी ऐकली, ती म्हणत होती, एका चांदीच्या नाण्याला शेरभर गहू आणि एका चांदीच्या नाण्याला तीन शेर जव. परंतु तेल व द्राक्षारस यांची हानी करू नकोस.
”कोकऱ्याने जेव्हा चौथा शिक्का उघडला, तेव्हा मी चौथ्या जिवंत प्राण्याची वाणी “ये” म्हणताना ऐकली. नंतर मी फिकट रंगाचा घोडा पाहिला. त्यावर जो बसलेला होता त्याचे नाव मरण होते; आणि मृतलोक त्याच्या पाठीमागून त्याच्याबरोबर चालला होता. त्यांना तरवारीने, दुष्काळाने, रोगाने व पृथ्वीवरील श्वापदांकडून मनुष्यांना जिवे मारण्याचा अधिकार पृथ्वीच्या चौथ्या भागावर देण्यात आला होता.
”जेव्हा कोकऱ्याने पाचवा शिक्का उघडला तेव्हा मी, वेदीखाली आत्मे पाहिले, ते आत्मे देवाच्या वचनामुळे व त्यांनी जी साक्ष दिली होती तिच्यामुळे जिवे मारलेल्या लोकांचे आत्मे होते. ते मोठ्याने ओरडून म्हणाले, हे “स्वामी तू पवित्र व सत्य आहेस तू ‘कोठपर्यंत न्यायनिवाडा करणार’ नाहीस आणि पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांपासून आमच्या ‘रक्ताचा सूड घेणार’ नाहीस?” तेव्हा त्या प्रत्येकास एकएक शुभ्र झगा देण्यात आला आणि त्यास असे सांगण्यात आले की, तुमच्या सोबतीचे दास व तुमचे बंधू तुम्हासारखे जिवे मारले जाणार, त्यांची संख्यापूर्ण होईपर्यंत तुम्ही आणखी थोडा वेळ विसावा घ्या.
”त्याने सहावा शिक्का फोडला, ते मी पाहिले; तेव्हा मोठा भूमिकंप झाला, ‘सूर्य’ केसांच्या बनवलेल्या तरटासारखा काळा झाला; व सगळा चंद्र रक्तासारखा झाला; ‘अंजिराचे झाड’ मोठ्या वाऱ्याने हालले म्हणजे त्याची कच्ची फळे जशी खाली पडतात तसे ‘आकाशातील तारे’ पृथ्वीवर ‘पडले’ ‘एखाद्या गुंडाळीसारखे’ आकाश गुंडाळले जाऊन निघून गेले आणि सर्व डोंगर व बेटे आपआपल्या ठिकाणांवरून ढळून गेली. ‘पृथ्वीवरील राजे व मोठे अधिकारी,’ सरदार, श्रीमंत व बलवान लोक, सर्व दास व स्वतंत्र माणसे, ‘गुहात’ व डोगरांतील ‘खडकातून लपली;’ आणि ते डोंगरास व खडकास म्हणाले, आम्हावर पडून राजासनावर जो बसलेला आहे, त्याच्या नजरेपासून व कोकऱ्याच्या क्रोधापासून आम्हास ‘लपवा,’ कारण त्यांच्या ‘क्रोधाचा मोठा दिवस’ आला आहे, ‘आणि त्याच्यापुढे कोण टिकेल?’
”आणि त्यानंतर मी चार देवदूत ‘पृथ्वीच्या चार कोनावर’ उभे राहीलेले पाहीले, त्यांनी पृथ्वीतील चार वाऱ्यास असे घट्ट धरून ठेवले होते की पृथ्वीवर व समुद्रावर आणि कोणत्याही झाडावर वारा वाहू नये. मी दुसरा एक देवदूत पूर्वेकडून वर चढताना पाहिला, त्याच्याजवळ जिवंत देवाचा शिक्का होता; ज्या चार देवदूतांकडे पृथ्वीला व समुद्राला नुकसान करण्याचे सोपवून दिले होते त्यांना तो मोठ्याने ओरडून म्हणाला, “आमच्या देवाचे दास यांच्या कपाळावर आम्ही शिक्का मारीपर्यंत पृथ्वीला व समुद्राला आणि झाडासही नुकसान करू नका.”
”ज्यांच्यावर शिक्का मारण्यात आला त्यांची संख्या मी ऐकली; इस्राएल लोकांच्या सर्व वंशातील एकशे चव्वेचाळीस हजांरावर शिक्का मारण्यात आला. यहूदा वंशातील बारा हजारांवर शिक्का मारण्यात आला रऊबेन वंशापैकी बारा हजारांवर; गाद वंशापैकी बारा हजारांवर; आशेर वंशापैकी बारा हजारांवर; नफताली वंशापैकी बारा हजारांवर; मनश्शे वंशापैकी बारा हजारांवर; शिमोन वंशापैकी बारा हजारांवर; लेवी वंशापैकी बारा हजारांवर; इस्साखार वंशापैकी बारा हजारांवर; जबुलून वंशापैकी बारा हजारांवर; योसेफ वंशापैकी बारा हजारांवर; बन्यामीन वंशापैकी बारा हजारांवर; शिक्का मारण्यात आला.
”या यानंतर मी पाहिले, तो प्रत्येक राष्ट्र, वंश, लोक व भाषा यांच्यातील कोणाच्याने मोजला जाऊ शकणार नाही एवढा मोठा समुदाय, तो राजासनापुढे व कोकऱ्याच्यापुढे उभा होता. शुभ्र झगे घातलेले आणि त्यांच्या हातात झावळ्या होत्या. ते मोठ्याने ओरडून म्हणत होतेः ‘राजासनावर बसलेल्या’ आमच्या देवाकडून व कोकऱ्याकडून, तारण आहे. तेव्हा राजासन व वडील आणि चार जिवंत प्राणी यांच्यासभोवती सर्व देवदूत उभे होते आणि ते राजासनासमोर पालथे पडून देवाला नमन करीत म्हणाले, आमेन; स्तुती, गौरव, ज्ञान, उपकारस्तुती, सन्मान, सामर्थ्य व बळ ही युगानुयुग आमच्या देवाची आहेत; आमेन. तेव्हा वडिलातील एकाने मला विचारले हे “शुभ्र झगे घातलेले हे कोण आहेत आणि ते कोठून आले आहेत?” मी त्यास म्हटले, “प्रभू, तुला माहित आहे.” आणि तो मला म्हणाला जे मोठ्या ‘संकटातून’ येतात ते हे आहेत; त्यांनी ‘आपले झगे’ कोकऱ्याच्या समर्पणाच्या ‘रक्तात धुऊन’ शुभ्र केले आहेत. म्हणून ते देवाच्या राजासनासमोर आहेत आणि ते रात्रंदिवस त्याच्या भवनात सेवा करतात. जो ‘राजासनावर बसलेला’ आहे तो आपला मंडप त्यांच्यावर घालील. ते आणखी भुकेले आणि आणखी तान्हेले होणार नाहीत, त्यास सूर्य किंवा कोणतीही उष्णता बाधणार नाही. कारण राजासनाच्या मध्यभागी असलेला कोकरा स्वतः त्यांचा मेंढपाळ होईल, आणि तो त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झऱ्यांजवळ नेईल; आणि देव स्वतः त्यांच्या डोळ्यातील ‘सर्व अश्रू पुसून टाकील.’
”जेव्हा कोकऱ्याने सातवा शिक्का उघडला, तेव्हा सुमारे अर्ध्या तासापर्यंत स्वर्गात शांतता होती. नंतर देवासमोर सात देवदूत उभे राहिलेले मी पाहिले आणि त्यांना सात कर्णे देण्यात आले. दुसरा एक देवदूत येऊन, ‘वेदीपुढे उभा राहिला.’ त्याच्याजवळ सोन्याचे धुपाटणे होते; राजासनासमोरच्या सोन्याच्या वेदीवर सर्व पवित्रजनांच्या ‘प्रार्थनांसह धुप’ ठेवण्याकरिता त्याच्याजवळ पुष्कळ ‘धूप’ दिला होता. देवदूताच्या हातातून ‘धूपाचा’ धूर पवित्रजनांच्या ‘प्रार्थनांसह’ देवासमोर वर चढला. तेव्हा देवदूताने ‘धुपाटणे’ घेऊन त्यामध्ये ‘वेदीवरचा अग्नी भरून’ पृथ्वीवर टाकला आणि ‘मेघांचा गडगडाट व गर्जना’ झाल्या, ‘विजा’ चमकल्या व भूमिकंप झाला. ज्या सात देवदूतांजवळ सात कर्णे होते ते आपआपले कर्णे वाजवण्यास तयार झाले.
”पहिल्या देवदूताने कर्णा वाजवताच ‘रक्तमिश्रित गारा व अग्नी ही आली. ती पृथ्वीवर’ टाकण्यात आली यासाठी की, पृथ्वीचा तिसरा भाग व झाडांचा तिसरा भाग जळून गेला; आणि सर्व हिरवे गवत जळून गेले.
”दुसऱ्या देवदूताने कर्णा वाजवला आणि तेव्हा अग्नीने पेटलेल्या मोठ्या डोंगरासारखे काहीतरी समुद्रात टाकले गेले आणि समुद्राच्या तिसऱ्या भागाचे रक्त झाले. समुद्रातील तिसरा भाग जिवंत प्राणी मरण पावले आणि तसेच तिसरा भाग जहाजांचा नाश झाला.
”तिसऱ्या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा मशालीसारखा पेटलेला मोठा ‘तारा आकाशातून खाली पडला.’ तो नद्यांच्या व झऱ्यांच्या तिसऱ्या भाग पाण्यावर पडला; त्या ताऱ्याचे नाव कडूदवणा आणि पाण्याच्या तिसऱ्या भागाचा कडूदवणा झाला; आणि त्या पाण्याने मनुष्यांपैकी पुष्कळ माणसे मरण पावली; कारण ते पाणी कडू झाले होते.
”चौथ्या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा सूर्याचा तिसरा भाग, चंद्राचा तिसरा भाग व ताऱ्यांचा तिसरा हिस्सा मारला गेला; त्यांचा तिसरा भाग अंधकारमय झाला आणि दिवसाचा व रात्रीचाही तिसरा भाग प्रकाशित झाला नाही. आणि मी पाहिले, तेव्हा एक गरूड आकाशाच्या मध्यभागी उडत होता; आणि मी त्यास मोठ्याने असे म्हणताना ऐकले की, जे तीन देवदूत कर्णे वाजवणार आहेत त्यांच्या कर्ण्याच्या होणाऱ्या आवाजाने पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांवर अनर्थ, अनर्थ, अनर्थ येणार!
”मग पाचव्या देवदूताने कर्णा वाजवला, तेव्हा एक तारा आकाशातून पृथ्वीवर पडलेला मला दिसला; त्या ताऱ्याला अगाधकूपाची किल्ली दिली होती. त्याने अगाधकूप उघडला, ‘तेव्हा’ मोठ्या ‘भट्टीच्या धुरासारखा धूर कूपातून निघून वर चढला;’ आणि कूपाच्या धुराने ‘सूर्य’ आणि अंतराळ ही ‘अंधकारमय’ झाली. त्या धुरातून ‘टोळ निघून पृथ्वीवर’ आले आणि जशी पृथ्वीवरील विंचवास शक्ती आहे तशी त्यांना शक्ती दिली होती. यांना असे सांगितले होते की, ‘पृथ्वीवरील गवत व कोणतीही हिरवळ व झाडे’ यांना हानी करू नका; परंतु ज्या मनुष्यांच्या ‘कपाळांवर देवाचा शिक्का नाही’ त्यांना मात्र इजा करा. त्या लोकांस जिवे मारण्याची परवानगी त्यांना दिलेली नव्हती, तर फक्त पाच महिने यातना देण्यास सांगितले. विंचू मनुष्यास नांगी मारतो तेव्हा त्यास जी वेदना होते त्या वेदनेसारखी ती होती. त्यादिवसात माणसे ‘मरण शोधतील, परंतु ते त्यांना मिळणार’ ‘नाही,’ ते मरणासाठी अती उत्सुक होतील, परंतु मरण त्यांच्यापासून दूर पळेल. टोळांचे आकार लढाईसाठी तयार केलेल्या ‘घोड्यांसारखे’ होते; त्यांच्या डोक्यावर जणू काय सोन्यासारखे मुकुट होते आणि त्यांचे चेहरे मनुष्यांच्या चेहऱ्यासारखे होते. त्यांचे केस स्त्रियांच्या केसांसारखे होते आणि ‘त्यांचे दात सिंहाच्या दातांसारखे’ होते. त्यांना उरस्त्राणे होती, ती लोखंडी उरस्त्राणांसारखी होती आणि त्यांच्या पंखाचा आवाज लढाईस धावणाऱ्या पुष्कळ घोड्यांच्या रथांच्या आवाजासारखा होता; त्यांना विंचवांसारखी शेपटे व नांग्या आहेत आणि मनुष्यांस पाच महिने हानी करण्याची त्यांची शक्ती त्यांच्या शेपटात आहे. अगाधकूपाचा दूत तो त्यांच्यावर राजा आहे; त्याचे नाव इब्री भाषेत अबद्दोन आहे आणि ग्रीक भाषेत त्याचे नाव अपल्लूओन आहे. पहिला अनर्थ होऊन गेला; पाहा, यापुढे आणखी दोन अनर्थ येणार आहेत.
”मग सहाव्या देवदूताने कर्णा वाजवला, तेव्हा देवासमोरच्या सोन्याच्या वेदीच्या चार कोपऱ्यांच्या शिंगांमधून आलेली एक वाणी मी ऐकली. ज्या सहाव्या देवदूताजवळ कर्णा होता त्यास ती वाणी म्हणाली, मोठ्या ‘फरात नदीजवळ’ बांधून ठेवलेले जे चार दूत त्यांना मोकळे सोड. तेव्हा मनुष्यांपैकी तिसरा भाग जिवे मारायला तो नेमलेला तास व दिवस व महिना व वर्ष यासाठी जे चार दूत तयार केलेले होते ते सोडण्यात आले. घोडदळांची संख्या वीस कोटी होती; ही त्यांची संख्या मी ऐकली. त्या दृष्टांतात घोडे व त्यावर बसलेले स्वार मला दिसले ते असे; त्यांना अग्नी व नीळ व गंधक यासारखी उरस्राणे होती आणि त्या घोड्यांची डोकी सिंहाच्या डोक्यांसारखी होती आणि त्यांच्या तोंडातून अग्नी, धूर व गंधक ही निघत होती. त्यांच्या तोंडातून निघणाऱ्या धूर, अग्नी व गंधक या तीन पीडांनी मनुष्यांचा तिसरा हिस्सा जिवे मारला गेला, कारण त्या घोड्यांची शक्ती त्यांच्या तोंडात व शेपटात आहे; त्यांची शेपटे सापासारखी असून त्यांनाही डोकी आहेत आणि त्यांनी ते मनुष्यांना जखमा करून पीडा देतात. त्या पीडांमुळे जे जिवे मारले गेले नाहीत अशा बाकीच्या मनुष्यांनी ‘आपल्या हातच्या कृत्यांविषयी’ पश्चात्ताप केला नाही; म्हणजे, ‘भूतांची व ज्यास पाहता, ऐकता व चालता येत नाही अशा सोन्याच्या, रूप्याच्या, पितळेच्या, दगडाच्या व लाकडाच्या मूर्तीची’ पूजा करणे त्यांनी सोडले नाही आणि त्यांनी केलेल्या खुनाविषयी ‘जादूटोणा, व्यभिचार व चोऱ्या’ ह्यांबद्दलहि पश्चात्ताप केला नाही.
”मी आणखी एक बलवान देवदूत स्वर्गातून उतरतांना पाहिला; तो मेघ पांघरलेला असून त्याच्या डोक्यावर मेघधनुष्य होते, त्याचे तोंड सूर्यासारखे व त्याचे, पाय अग्निस्तंभासारखे होते, त्याच्याहाती एक उघडलेली लहानशि गुंडाळी होती; त्याने आपला उजवा पाय समुद्रावर व डावा पाय भूमीवर ठेवला; आणि सिंहगर्जनेप्रमाणे तो मोठ्याने ओरडला; आणि जेव्हा तो ओरडला तेव्हा सात मेघगर्जनांनी आपआपले शब्द काढले. त्या सात मेघगर्जनांनी शब्द काढले तेव्हा मी लिहिणार होतो; इतक्यात स्वर्गातून झालेली वाणी मी ऐकली; ती म्हणालीः सात मेघगर्जनांनी काढलेले ‘शब्द गुप्त ठेव,’ ते लिहू नको. ज्या देवदूताला समुद्रावर व भूमीवर उभे राहिलेले मी पाहिले, त्याने ‘आपला उजवा हात स्वर्गाकडे वर केला, आणि जो युगानुयुग जिवंत आहे, ज्याने आकाश व त्यामध्ये जे आहेत, पृथ्वी व तिच्यावर जे आहे ते आणि समुद्र व त्यामध्ये जे आहे ते निर्माण केले, त्याची शपथ वाहून म्हटलेः’ आणखी उशीर होणार नाही; परंतु सातव्या देवदूताची वाणी होईल त्यादिवसात म्हणजे तो देवदूत कर्णा वाजविण्याच्या व बेतात असेल, तेव्हा देवाने ‘आपले दास संदेष्टे’ ह्यांना जाहीर केल्यानुसार ‘त्याचे गूज’ पूर्ण होईल.
”स्वर्गातून झालेली जी वाणी मी ऐकली होती ती माझ्याबरोबर पुन्हा बोलताना मी ऐकली. ती म्हणाली, जा आणि समुद्रावर व भूमीवर उभे राहिलेल्या देवदूताच्या हातातली उघडलेली गुंडाळी जाऊन घे. तेव्हा मी त्या देवदूताकडे जाऊन, “ती लहान गुंडाळी” मला दे असे म्हटले. तो म्हणाला, “हि घे आणि खाऊन टाक; ती तुझे पोट कडू करील तरी तुझ्या तोंडाला मधासारखे गोड लागेल.” तेव्हा मी देवदूताच्या हातातून ‘ती लहान गुंडाळी’ घेतली व खाऊन टाकली, ती माझ्या तोंडाला मधासारखी गोड लागली, तरी खाल्ल्यावर माझे पोट कडू झाले. तेव्हा ते मला म्हणाले, अनेक लोक, राष्ट्रे, निरनिराळ्या भाषा बोलणारे व राजे यांच्याविषयी तू पुन्हा ‘संदेश दिला पाहिजे.’
”मग मला मोजमाप करण्यासाठी काठीसारखा ‘बोरू’ देण्यात आला आणि मला सांगण्यात आले, “ऊठ आणि देवाचे भवन, वेदी आणि त्यामध्ये जे उपासना करतात त्यांचे मोजमाप घे. पण भवना बाहेरचे अंगण सोड, त्याचे मोजमाप घेऊ नकोस; कारण ते ‘परराष्ट्रीयांना’ दिलेले आहे. बेचाळीस महिने ते पवित्र नगर पायाखाली ‘तुडवतील.’ आणि मी माझ्या दोन साक्षीदारांना अधिकार देईन. ते तरटाची वस्त्रे घालून, एक हजार दोनशे साठ दिवस देवाचा संदेश देतील.” हे साक्षीदार म्हणजे ‘पृथ्वीच्या प्रभूसमोर उभे असणारी जैतुनाची दोन झाडे’ व दोन ‘समया’ ही ते आहेत. जर एखादी व्यक्ती त्या साक्षीदारांना अपाय करू इच्छीत असल्यास ‘त्यांच्या तोंडातून अग्नी निघून त्यांच्या शत्रूंना खाऊन टाकतो.’ जो कोणी त्यांना इजा करण्याची इच्छा धरील त्यास ह्याप्रकारे अवश्य मारावे. या साक्षीदारांना ते संदेश सांगण्याच्या दिवसांमध्ये पाऊस पडू नये म्हणून त्यांना आकाश बंद करण्याचा अधिकार दिला आहे. त्यांना पाण्याचे रक्त करण्याचा अधिकार दिला आहे आणि त्यांची इच्छा असेल तितकेदा पृथ्वीला प्रत्येक प्रकारच्या पीडांनी पिडण्याचा अधिकार दिलेला आहे.
”त्यांची साक्ष पुरी झाल्यावर अगाधकूपातून जो पशू वर येईल तो त्यांच्याबरोबर लढाई करील, त्यांच्यावर विजय मिळवील आणि त्यांना ठार मारील. तेथे मोठ्या नगराच्या रस्त्यावर त्यांची प्रेते पडून राहतील (आत्मिक अर्थाने, ‘सदोम’ आणि ‘मिसर’ म्हणले आहे) व जेथे त्यांच्या प्रभूलाही वधस्तंभावर खिळले होते. आणि प्रत्येक समाजातले, वंशांतले, भाषेचे व राष्ट्रांतले लोक साडेतीन दिवस त्यांची प्रेते पाहतील आणि ते त्यांची प्रेते थडग्यांत ठेवू देणार नाहीत. त्यांच्यावरून पृथ्वीवर राहणारे आनंद व उत्सव करतील व एकमेकांना भेटी पाठवतील कारण त्या दोन संदेष्ट्यांनी पृथ्वीवर राहणार्यांस अतोनात पीडले होते.
”आणि साडेतीन दिवसानंतर देवाकडील जीवनाच्या आत्म्याने त्यांच्यामध्ये प्रवेश केला आणि ते त्यांच्या पायांवर उभे राहिले; आणि त्यांना पाहणार्यांना मोठे भय वाटले. आणि त्यांनी स्वर्गातून एक मोठा आवाज ऐकला, तो त्यांना म्हणाला, “इकडे वर या” मग ते एका ढगातून स्वर्गात वर जात असताना त्यांच्या वैर्यांनी त्यांना पाहिले. आणि त्याच घटकेस मोठा भूकंप झाला; तेव्हा नगराचा दहावा भाग पडला आणि भूकंपात सात हजार लोक ठार झाले. तेव्हा वाचलेले भयभीत झाले व त्यांनी स्वर्गाच्या देवाला गौरव दिले. दुसरी आपत्ती येऊन गेली; बघा, तिसरी आपत्ती लवकरच येत आहे.
”मग सातव्या देवदूताने कर्णा वाजवला तेव्हा स्वर्गात मोठ्याने आवाज झाला, त्यांचे शब्द असे होतेः ‘जगाचे राज्य हे आमच्या प्रभूचे आणि त्याच्या ख्रिस्ताचे झाले आहे; तो युगानुयुग राज्य करील.’ तेव्हा देवासमोर आपल्या आसनांवर बसलेले चोवीस वडील उपडे पडून देवाला नमन करून म्हणाले ‘हे प्रभू देवा, हे सर्वसमर्था, जो तू आहेस आणि होतास, त्या तुझे आम्ही उपकार मानतो, कारण तुझे महान सामर्थ्य तू आपल्याकडे घेतले आहेस आणि राज्य चालविण्यास सुरूवात केलीस. राष्ट्रे रागावली आहेत परंतु तुझा क्रोधाग्नी आला आहे आणि मरण पावलेल्यांचा न्याय करण्याची वेळ आली आहे आणि तू आपल्या दासांना, तुझ्या संदेष्ट्यांना, पवित्रजनांना आणि जे तुझ्या नावाचे भय धरतात अशा लहानथोरांना वेतन देण्याची वेळ आली आहे. आणि ज्यांनी पृथ्वीचा नाश केला त्यांचा नाश करण्याची वेळ आली आहे.’ तेव्हा देवाचे स्वर्गातील भवन उघडले व त्याच्या भवनात त्याच्या कराराचा कोश दिसला; आणि विजांचे लखलखाट, गर्जना आणि गडगडाट होऊन भूकंप झाला व गारांचे मोठे वादळ झाले.
”आणि स्वर्गात एक महान चिन्ह दिसले; सूर्य परिधान केलेली एक स्त्री, तिच्या पायाखाली चंद्र होता आणि तिच्या डोक्यावर बारा तार्यांचा मुकुट होता. ती स्त्री गरोदर होती व बाळंतपणाच्या वेदनांनी ती ओरडत होती. आणि स्वर्गात दुसरे एक चिन्ह दिसले. पाहा! तेथे एक मोठा, लाल अजगर; त्यास सात डोकी व ‘दहा शिंगे’ होती आणि त्याच्या डोक्यांवर सात मुकुट होते. त्याच्या शेपटाने ‘आकाशातील तिसरा हिस्सा तारे’ खाली ओढून काढले आणि त्यांना ‘पृथ्वीवर पाडले;’ आणि जी स्त्री प्रसूत होणार होती तिचे मूल जन्मताच गिळून घ्यावे म्हणून अजगर तिच्यापुढे उभा राहिला. आणि सर्व ‘राष्ट्रांवर लोहदंडाने अधिकार चालवील’ अशा मुलास म्हणजे पुसंतानास तिने जन्म दिला; त्या मुलाला देवाकडे व त्याच्या राजासनाकडे उचलून नेण्यात आले. आणि ती स्त्री रानात पळाली; तेथे तिची एक हजार दोनशे साठ दिवस काळजी घेण्यात यावी म्हणून तिच्यासाठी देवाने तयार केलेले ठिकाण आहे.
”आणि स्वर्गात युद्ध झाले; ‘मिखाएल’ व त्याचे दूत हे अजगराबरोबर लढले आणि अजगर व त्याचे दूत हे सुद्धा त्यांच्याशी लढले. पण अजगर जिंकण्यास तितका बलवान नव्हता आणि त्यापुढे स्वर्गात त्यास व त्याच्या दूतांना स्थान उरले नाही. तो मोठा अजगर, ‘सैतान’ म्हटलेला तोच तो जुनाट साप होय. तो संपूर्ण जगाला फसवतो. त्या सापाला त्याच्या दूतांसह पृथ्वीवर टाकण्यात आले. आणि मी स्वर्गात एक मोठा आवाज ऐकला; त्याचे शब्द असे होते, आता आमच्या देवाचे तारण आणि सामर्थ्य आणि राज्य आले आहे. आणि त्याच्या ख्रिस्ताचा अधिकार हे प्रकट झाले आहेत; कारण आमच्या भावांना दोष देणारा आमच्या देवापुढे स्वर्गात जो त्यांच्यावर रात्रंदिवस आरोप करीत असे, तो खाली टाकण्यात आला आहे. त्यांनी कोकर्याच्या रक्ताद्वारे, आपल्या साक्षीच्या वचनाद्वारे, त्याच्यावर विजय मिळवला आहे. आणि त्यांना मरावे लागले तरी त्यांनी आपल्या जीवावर प्रीती केली नाही. म्हणून ‘स्वर्गांनो’ आणि त्यामध्ये राहणाऱ्यांनो, ‘आनंद’ करा पृथ्वी आणि समुद्र ह्यावर अनर्थ ओढवला आहे, कारण सैतान खाली तुमच्याकडे मोठ्या रागाने आला आहे. कारण आपणाला थोडकाच काळ राहिला आहे, हे तो जाणतो.
”आणि अजगराने बघितले की, त्यास पृथ्वीवर टाकण्यात आले आहे, तेव्हा जिने एका मुलाला जन्म दिला होता त्या स्त्रीचा त्याने पाठलाग केला. परंतु स्त्रीने सापाच्या पुढून तिच्या रानातल्या ठिकाणी उडून जावे म्हणून तिला मोठ्या गरुडाचे दोन पंख देण्यात आले; आणि तेथे ती सर्पापासून सुरक्षित राहत असताना एक काळ, दोन ‘काळ आणि अर्धकाळ’ तिचे पोषण केले जाईल. आणि ती स्त्री पुराने वाहून जाईल असे करावे म्हणून, त्या सर्पाने तिच्या मागोमाग आपल्या तोंडातून नदीसारखे पाणी ओतले. पण भूमीने स्त्रीला मदत केली; आणि अजगराने तोंडातून सोडलेली नदी भूमीने तोंड उघडून ‘गिळून घेतली.’ तेव्हा अजगर स्त्रीवर रागावला व जे तिच्या संतानातून उरलेले, देवाच्या आज्ञा पाळणारे आणि येशूची साक्ष देणारे त्यांच्याशी लढाई करायला गेला; आणि तो अजगर समुद्राच्या वाळूवर उभा राहिला.
”आणि मी बघितले की, एक पशू समुद्रातून वर आला. त्यास दहा शिंगे आणि सात डोकी होती. त्याच्या शिंगांवर दहा मुकुट होते व त्याच्या डोक्यांवर देवाचा अपमान करणारी नावे होती. आणि मी पाहिलेला पशू तो ‘चित्त्यासारखा’ होता, त्याचे पाय ‘अस्वलाच्या’ पायासारखे व त्याचे तोंड ‘सिंहाच्या’ तोंडासारखे होते; त्यास अजगराने आपली शक्ती आणि राजासन दिले आणि मोठा अधिकार दिला. त्या पशूच्या डोक्यापैकी, त्याच्या एका डोक्याला जीवघेणी जखम झाली होती, त्यामुळे तो मरून जाईल असे वाटले. पण त्याची ती जखम बरी झाली; आणि सर्व पृथ्वी आश्चर्य करीत त्या पशूच्यामागे गेली. आणि त्यांनी अजगराला नमन केले, कारण त्याने आपला अधिकार त्या पशूला दिला होता; आणि त्यांनी त्या पशूलाही नमन करून म्हटले, “या पशूसारखा कोण आहे? ह्याच्याशी कोण लढू शकेल?” आणि, त्या पशूला मोठ्या गर्विष्ठ गोष्टी व अपमानास्पद ‘शब्द बोलणारे तोंड’ दिले होते; आणि त्यास हे करायला बेचाळीस महिने अधिकार दिला होता. त्या पशूने देवाविरुद्ध त्याच्या नावाविषयी, त्याच्या मंडपाविषयी आणि स्वर्गात राहणार्यांविषयी निंदा करायला आपले तोंड उघडले.
”आणि पवित्र जनांशी लढाई करण्यास व त्यांच्यावर विजय मिळवण्यास त्या पशूला परवानगी देण्यात आली; आणि त्यास प्रत्येक वंश, लोक, भाषा बोलणार्यांवर आणि राष्ट्रांवर अधिकार दिलेला होता. आणि ज्यांची नावे जगाच्या स्थापनेपासून ‘वधलेल्या कोकर्याच्या जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली’ नाहीत असे पृथ्वीवर राहणारे सर्वजण त्या पशूला नमन करतील. जर कोणाला कान असेल तर तो ऐको. जो ‘कैदेत जायचा तो कैदेत’ जातो; ‘जो तलवारीने’ जीवे मारील त्यास ‘तलवारीने’ मरणे भाग आहे. ह्यात पवित्र जनांची सहनशिलता आणि विश्वास दिसून येतो.
”आणि मी बघितले की, आणखी एक पशू भूमीतून वर येत आहे. त्यास कोकर्यासारखी दोन शिंगे होती; आणि तो अजगरासारखा बोलत होता. तो पहिल्या पशूची सर्व सत्ता त्याच्यासमक्ष स्वतः चालवतो; ज्या पहिल्या पशूची जीवघेणी जखम बरी झाली होती त्यास पृथ्वीने व तीवर राहणार्यांनी नमन करावे असे तो करतो. तो मोठी चिन्हे करतो; लोकांच्या दृष्टीपुढे आकाशातून पृथ्वीवर अग्नी उतरेल असे तो करतो, आणि त्यास त्या पशूच्या देखत जी चिन्हे करायची मुभा आहे ती करून दाखवून तो पृथ्वीवर राहणार्यांना फसवतो आणि ज्या पशूला तरवारीचा घाव लागला असताही जो जिवंत आहे त्याची त्यांनी मूर्ती करावी असे तो पृथ्वीवर राहणार्यांस सांगतो. दुसऱ्या पशूला, पहिल्या पशूच्या मूर्तीला जीवन देण्याची परवानगी होती. म्हणजे त्या पशूच्या मूर्तीने बोलावे आणि असे करावे की, जितके लोक त्या पशूच्या मूर्तीला नमन करणार नाहीत तितक्यांना जिवे मारले जावे.
”आणि तो असे करतो की, लहान व मोठे, धनवान व दरिद्री, स्वतंत्र व दास, अशा सर्वांनी आपल्या उजव्या हातावर किंवा कपाळांवर एक खूण घ्यावी, आणि ती खूण म्हणजे त्या पशूचे नाव किंवा त्याच्या नावाची संख्या आहे, त्याच्यावाचून इतर कोणाला काही विकत घेता येऊ नये किंवा विकता येऊ नये. येथे ज्ञानीपणच आहे; ज्याला बुद्धी असेल त्याने पशूच्या संख्येचा हिशोब करावा कारण, ती एका मनुष्याची संख्या आहे आणि त्याची संख्या सहाशे सहासष्ठ आहे.
”नंतर मी बघितले, पाहा, सियोन डोंगरावर एक कोकरा उभा होता; आणि ज्यांच्या ‘कपाळांवर’ त्याचे व त्यांच्या पित्याचे नाव लिहिलेले होते, असे एक लक्ष चौवेचाळीस हजार जण तेथे त्याच्याबरोबर होते. आणि ‘अनेक जलप्रवाहांच्या ध्वनीसारखी’ व मेघ गडगडाटाच्या ध्वनीसारखी स्वर्गातून निघालेली वाणी मी ऐकली आणि जसे वीणावादक आपल्या वीणा वाजवत आहेत अशी ती होती. ते राजासनासमोर आणि त्या चार प्राणी व वडिलांसमोर जणू ‘एक नवे गीत गात होते;’ पृथ्वीवरून विकत घेतलेले जे एक लक्ष चौवेचाळीस हजार जण तेथे होते त्यांच्याशिवाय कोणीही मनुष्य ते गीत शिकू शकला नाही. स्त्रीसंगाने विटाळले न गेलेले ते हेच आहेत, ते शुद्ध आहेत. जेथे कोठे कोकरा जातो तेथे त्याचे अनुसरण करणारे ते आहेत. मानवजातीतून खंडणी भरून मुक्त केलेले, हे देवाला व कोकर्याला प्रथमफळ असे आहेत. त्यांच्या ‘मुखात काही असत्य आढळले नाही;’ ते निष्कलंक आहेत.
”यानंतर मला आणखी एक देवदूत आकाशाच्या मध्यभागी उडताना दिसला. त्याच्याजवळ, पृथ्वीवर राहणार्या प्रत्येक राष्ट्र, वंश, भाषा बोलणार्यांना व प्रत्येक समाजाला सुवार्ता सांगायला, सार्वकालिक सुवार्ता होती. तो मोठ्या आवाजात म्हणत होता, देवाचे भय धरा आणि त्यास गौरव करा; कारण न्यायाची वेळ आली आहे आणि ‘ज्याने आकाश, पृथ्वी आणि समुद्र आणि पाण्याचे झरे हे उत्पन्न केले त्यास नमन करा.’ मग आणखी एक देवदूत त्याच्या मागोमाग आला आणि म्हणाला, “पडली, मोठी बाबेल पडली! कारण तिने सर्व राष्ट्रांना तिच्या व्यभिचाराचा क्रोधरूपी द्राक्षारस पाजला आहे.”
”आणि तिसरा देवदूत दुसऱ्या दोन देवदूतांच्या मागोमाग आला आणि म्हणाला, जर कोणी त्या पशूला किंवा त्याच्या मूर्तीला नमन करील आणि आपल्या कपाळावर किंवा हातावर त्याची खूण करून घेईल तोसुध्दा ‘देवाच्या क्रोधाचा प्याल्यात निरा घातलेला,’ त्याचा क्रोधरुपी ‘द्राक्षारस पिईल’ आणि पवित्र दूतांसमोर आणि कोकर्यासमोर त्यास ‘अग्नी आणि गंधक’ ह्यापासून पीडला जाईल. त्यांच्या पीडेचा ‘धूर युगानुयुग वर चढत राहतो;’ त्या पशूला आणि त्याच्या मूर्तीला नमन करणार्यांना आणि त्याच्या नावाचे चिन्ह करून घेणार्या कोणालाही ‘रात्रंदिवस’ विसावा मिळणार नाही. जे देवाच्या आज्ञा व येशूचा विश्वास धीराने पालन करतात त्या पवित्र जनांची सहनशीलता येथे आहे.
”आणि मी स्वर्गातून एक वाणी ऐकली; ती मला म्हणाली, हे लिहीः ‘आतापासून, प्रभूमध्ये मरणारे धन्य आहेत.’ आत्मा म्हणतो, “हो, म्हणजे त्यांना आपल्या कष्टांपासून सुटून विसावा मिळावा कारण त्यांची कामे तर त्यांच्याबरोबर त्यांच्यामागे जातात.”
”तेव्हा मी बघितले आणि पाहा, एक पांढरा ढग आणि ‘मनुष्याच्या पुत्रासारखा’ कोणी त्या ढगावर बसला होता. त्याच्या मस्तकावर सोन्याचा मुकुट आणि त्याच्या हातात एक धारदार विळा होता. मग परमेश्वराच्या भवनातून आणखी एक देवदूत बाहेर आला आणि जो ढगावर बसला होता त्यास त्याने मोठ्या आवाजात म्हटले, “विळा चालव आणि कापणी कर कारण तुझ्या कापणीची वेळ आली आहे; कारण पृथ्वीचे पीक पिकून गेले आहे.” मग जो ढगावर बसला होता त्याने पृथ्वीवर विळा चालवला आणि पृथ्वीची कापणी झाली.
”मग आणखी एक देवदूत स्वर्गातील परमेश्वराच्या भवनामधून बाहेर आला; त्याच्याजवळही एक धारदार विळा होता. मग आणखी एक देवदूत वेदीतून बाहेर आला; त्यास अग्नीवर अधिकार होता; आणि ज्याच्याजवळ धारदार विळा होता त्यास त्याने मोठ्या आवाजात ओरडून म्हटले, “तुझा धारदार विळा घे आणि पृथ्वीवरील द्राक्षवेलीचे घड गोळा कर; कारण तिची द्राक्षे पिकली आहेत.” तेव्हा त्या देवदूताने पृथ्वीवर विळा चालवला आणि पृथ्वीच्या द्राक्षवेलीचे पीक गोळा करून ते देवाच्या क्रोधाच्या मोठ्या द्राक्षकुंडात टाकले. यानंतर ते ‘द्राक्षकुंड नगराबाहेर तुडवले गेले;’ व द्राक्षकुंडामधून रक्त वर आले; ते घोड्याच्या लगामापर्यंत चढले आणि शंभर कोसांच्या परिसरात पसरले.
”यानंतर मी स्वर्गात आणखी एक महान व आश्चर्यकारक चिन्ह बघितले; ज्यांच्याजवळ ‘सात पीडा’ होत्या, असे सात देवदूत मी पाहिले त्या शेवटल्या पीडा होत्या, कारण देवाचा क्रोध त्यानंतर पूर्ण होणार होता.
”मग मी बघितले की, जणू एक अग्निमिश्रित काचेचा समुद्र आहे आणि ज्यांनी त्या पशूवर व त्याच्या मूर्तीवर आणि त्याच्या नावाच्या संख्येवर विजय प्राप्त केला होता ते त्या काचेच्या समुद्राजवळ, देवाने दिलेली वीणा घेऊन उभे होते. ‘देवाचा दास मोशे ह्याचे गीत व कोकर्याचे गीत गात होते.’ सर्वसमर्थ देवा, परमेश्वरा, तुझ्या कृती महान आणि आश्चर्यकारक आहेत. हे ‘प्रभू’ देवा, तू सर्वांवर राज्य करतो तुझे मार्ग योग्य आणि खरे आहेत. ‘हे प्रभू, तुला कोण भिणार नाही? आणि तुझ्या नावाचे गौरव कोण करणार नाही?’ कारण तू एकच ‘पवित्र’ आहेस; कारण ‘सगळी राष्ट्रे येऊन तुझ्यापुढे नमन करतील. कारण तुझ्या नीतिमत्त्वाची कृत्ये प्रकट झाली आहेत.’
”नंतर मी बघितले आणि ‘साक्षीच्या मंडपाचे’ परमेश्वराचे स्वर्गातील भवन उघडले गेले. आणि त्या भवनातून सात देवदूत बाहेर आले; त्यांच्याजवळ सात पीडा होत्या. त्यांनी स्वच्छ, शुभ्र तागाची वस्त्रे परिधान केली होती आणि आपल्या छातीभोवती सोन्याचे पट्टे बांधले होते. तेव्हा त्या चार प्राण्यांतील एकाने त्या सात देवदूतांना, जो युगानुयुग जिवंत आहे त्या देवाच्या रागाने भरलेल्या, सात सोन्याच्या वाट्या दिल्या. आणि देवाच्या सामर्थ्यापासून व तेजापासून जो धूर निघाला, त्याने परमपवित्रस्थान भरून गेले आणि त्या सात देवदूतांच्या ‘सात पीडा’ पूर्ण होईपर्यंत कोणीही आत जाऊ शकला नाही.
”मी परमपवित्रस्थानातून एक मोठी ‘वाणी’ ऐकली; ती त्या सात देवदूतांना म्हणाली, “जा आणि देवाच्या रागाच्या या सात वाट्या पृथ्वीवर ओता.”
”मग पहिला देवदूत गेला आणि त्याने आपली वाटी पृथ्वीवर ओतली आणि ज्या लोकांवर त्या पशूचे चिन्ह होते व जे त्याच्या मूर्तीला नमन करीत असत त्यांना अतिशय कुरूप आणि त्रासदायक फोड आले.
”नंतर, दुसर्या देवदूताने आपली वाटी समुद्रात ओतली आणि त्याचे मरण पावलेल्या मनुष्याच्या रक्तासारखे रक्त झाले आणि समुद्रात जगणारे सर्व जिव मरण पावले.
”तिसर्या देवदूताने आपली वाटी नद्यांवर व पाण्याच्या झर्यांवर ओतली, “आणि त्यांचे रक्त झाले” आणि माझ्या कानी आले की, जलाशयांचा देवदूत म्हणाला, ‘तू’ ‘जो पवित्र आहेस’ आणि होतास तो तू नीतिमान आहेस, कारण तू असा न्याय केलास. कारण त्यांनी पवित्रजनांचे आणि संदेष्ट्यांचे ‘रक्त पाडले,’ आणि तू ‘त्यांना रक्त प्यायला’ दिलेस; कारण ते याच लायकीचे आहेत. वेदीने उत्तर दिले, ते मी ऐकले की, ‘हो, हे सर्वसमर्थ देवा, परमेश्वरा, तुझे न्याय खरे आणि नीतीचे आहेत.’
”चौथ्या देवदूताने आपली वाटी सूर्यावर ओतली आणि त्यास लोकांस अग्नीने जाळून टाकण्याची परवानगी देण्यात आली होती. लोक भयंकर उष्णतेने जळाले व त्यांनी या पीडांवर ज्याला अधिकार आहे त्या देवाच्या नावाची निंदा केली आणि त्यास गौरव द्यायला त्यांनी पश्चात्ताप केला नाही.
”पाचव्या देवदूताने आपली वाटी त्या पशूच्या राजासनावर ओतली आणि त्याचे राज्य ‘अंधकारमय झाले,’ आणि त्या क्लेशांत लोकांनी आपल्या जीभा चावल्या; त्यांनी आपल्या क्लेशांमुळे आणि आपल्या फोडांमुळे ‘स्वर्गीय देवाची’ निंदा केली आणि आपल्या कृतींचा पश्चात्ताप केला नाही.
”सहाव्या देवदूताने आपली वाटी महान फरात नदीवर ओतली आणि पूर्वेकडील राजांचा मार्ग तयार व्हावा म्हणून तिचे ‘पाणी आटवले गेले.’
”आणि मी बघितले की, त्या अजगराच्या मुखातून, त्या पशूच्या मुखातून आणि त्या खोट्या संदेष्ट्यांच्या मुखातून ‘बेडकांसारखे’ तीन अशुद्ध आत्मे बाहेर आले. कारण हे चमत्कार करणारे दुष्ट आत्मे आहेत; ते सर्वसमर्थ देवाच्या, त्या महान दिवसाच्या लढाईसाठी सर्व जगातल्या राजांना एकत्र जमवायला त्यांच्याकडे जात आहेत. (‘पाहा, मी चोरासारखा येतो; जो जागृत राहतो आणि आपली वस्त्रे संभाळतो तो धन्य होय! नाही तर, तो उघडा फिरेल आणि ते त्याची लज्जा पाहतील’) आणि त्यांनी त्यांना हर्मगिदोन असे इब्री भाषेत नाव असलेल्या एका ठिकाणी एकत्र जमवले.
”सातव्या देवदूताने आपली वाटी अंतराळात ओतली व परमेश्वराच्या भवनामधून, राजासनाकडून एक मोठा आवाज आला; तो म्हणाला, “झाले.” आणि विजांचे लखलखाट, आवाज व गडगडाट होऊन मोठा भूकंप झाला, ‘पृथ्वीवर’ लोक ‘झाल्यापासून’ कधी झाला नव्हता इतका मोठा भूकंप झाला, त्या महान नगरीचे तीन भाग झाले; राष्ट्रांची नगरे पडली आणि ती महान बाबेल, तिला त्याच्या कोपाच्या संतापाचा द्राक्षारसाचा प्याला द्यावा, म्हणून देवासमोर स्मरणात आणली गेली. आणि प्रत्येक बेट पळून गेले व डोंगर कोठेच आढळले नाहीत. आणि एक मण वजनाच्या ‘मोठ्या गारा’ आकाशातून खाली लोकांवर पडल्या; आणि त्या गारांच्या पीडेमुळे लोकांनी देवाची निंदा केली; कारण त्यांची पीडा फार मोठी होती.
”मग त्या सात वाट्या घेणारे जे सात देवदूत होते त्यांच्यातला एक येऊन माझ्याशी बोलला आणि म्हणाला, “ये, त्या अनेक जलांवर जी बसली आहे त्या महावेश्येचा न्यायनिवाडा मी तुला दाखवतो. पृथ्वीच्या राजांनी ‘तिच्याबरोबर जारकर्म केले’ आणि पृथ्वीवर राहणारे ‘तिच्या’ जारकर्माच्या द्राक्षारसाने मस्त झाले.” तेव्हा दूताने मला पवित्र आत्म्यामध्ये अरण्यात नेले; आणि मला एका किरमिजी रंगाच्या पशूवर बसलेली एक स्त्री दिसली. तो देवनिंदात्मक नावांनी भरलेला होता आणि त्यास सात डोकी व ‘दहा शिंगे’ होती. त्या स्त्रीने जांभळी व किरमिजी वस्त्रे नेसून, सोन्याचा व मोलवान रत्नांचा, मोत्ये ह्यांचा साज घातला होता. तिच्या हातात, अमंगळ गोष्टींनी व व्यभिचाराने भरलेला एक ‘सोन्याचा प्याला’ होता; तिच्या कपाळावर लिहिलेले नाव एक रहस्य होते, ‘महान बाबेल, पृथ्वीवरील वेश्यांची व अमंगळ गोष्टींची आई.’ आणि मी बघितले की, ती स्त्री पवित्रजनांच्या रक्ताने व येशूसाठी (साक्षीचे रक्त) हुतात्मे झालेल्यांचे रक्त पिऊन मस्त झाली होती आणि तिला बघताच मी मोठा आश्चर्यचकित झालो. तेव्हा तो देवदूत मला म्हणाला, “तू आश्चर्यचकित का झालास? मी तुला या स्त्रीचे आणि जो पशू तिला पाठीवर वाहतो, (ज्याला सात डोकी आणि दहा शिगे आहेत) त्या पशूचे रहस्य सांगतो.
”आणि तू जो पशू बघितलास, जो होता आणि नाही, जो अगाधकूपात येईल आणि नाशात जाईल आणि जगाच्या स्थापनेपासून ज्यांची नावे जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली नाहीत असे पृथ्वीवर राहणारे त्या पशूला पाहतील तेव्हा आश्चर्य करतील कारण तो होता, नाही आणि येणार आहे. इथे ज्ञानी मनाचे काम आहे. ती सात डोकी, ही ती स्त्री ज्यांवर बसली आहे. ते सात डोंगर आहेत; आणि सात राजे आहेत, पाच पडले आहेत, एक आहे आणि दुसरा अजून आलेला नाही; आणि तो आल्यावर त्यास फारच थोडा वेळ रहावे लागेल. आणि तो जो पशू होता आणि नाही, तो आठवा राजा आहे; तो सातांपासून झालेला आहे; आणि नाशात जात आहे. आणि तू बघितलीस ती ‘दहा शिंगे’ दहा राजे आहेत. त्यांना अजून राज्य मिळाले नाही; पण त्यांना त्या पशूबरोबर, एक घटका राजांसारखा अधिकार मिळतो. ते एकमताचे आहेत, ते आपले सामर्थ्य आणि आपला अधिकार पशूला देतात.
”ते कोकर्याशी युद्ध करतील आणि कोकरा त्यांना जिंकील कारण तो ‘प्रभूंचा प्रभू आणि राजांचा राजा आहे;’ आणि जे त्याच्याबरोबर आहेत ते बोलावलेले, निवडलेले आणि विश्वासू आहेत.” आणि तो मला म्हणतो, तू जे पाण्याचे प्रवाह बघत आहेस, ज्यांवर ती वेश्या बसली आहे, ते निरनिराळे समाज, समुदाय आणि राष्ट्रे आणि निरनिराळ्या भाषा बोलणारे लोक आहेत. आणि तू बघितलीस ती दहा शिंगे आणि तो पशू त्या वेश्येचा व्देष करतील. तिला ओसाड आणि नग्न करतील, तिचे मांस खातील आणि तिला अग्नीत जाळतील. कारण त्यांनी एकमनाचे होऊन देवाची वचने पूर्ण होईपर्यंत, त्याची इच्छा पूर्ण करायला आपले राज्य पशूला द्यावे हे देवाने त्यांच्या मनात घातले आहे. आणि जी स्त्री तुला दिसली ती ‘पृथ्वीच्या राजांवर’ राज्य करणारी मोठी नगरी आहे.
”ह्यानंतर मी दुसऱ्या एका देवदूताला स्वर्गातून खाली उतरतांना पाहिले. त्यास मोठा अधिकार होता; ‘आणि त्याच्या तेजाने पृथ्वी प्रकाशित झाली.’ तो जोरदार आवाजात ओरडून म्हणाला, “पडली, ती महान बाबेल पडली आहे!” ती ‘भूतांना वस्ती’ झाली आहे, सर्व अशुद्ध आत्म्यांना आणि सर्व अशुद्ध आणि तिरस्करणीय पक्ष्यांना आसरा झाली आहे. कारण ‘तिच्या’ व्यभिचाराचे मद्य जे वेड लावणारे आहे ते ‘सर्व राष्ट्रे प्याली आहेत आणि पृथ्वीच्या राजांनी तिच्याबरोबर व्यभिचार केला आहे; तिच्या शक्तीशाली संपत्तीने व ऐषोआरामाने पृथ्वीचे व्यापारी श्रीमंत झाले आहेत.’
”मग मी स्वर्गातून आणखी एक वाणी ऐकली; ती म्हणाली, अहो ‘माझ्या लोकांनो,’ तिच्यामधून बाहेर या. म्हणजे तुम्ही तिच्या पापात भागीदार होऊ नये आणि यासाठी की, तिच्या कोणत्याही पीडा तुमच्यावर येऊ नयेत. कारण तिची पापे आकाशापर्यंत पोहोचलीत आणि तिच्या वाईट कृतीची देवाने आठवण केली. तिने तुम्हास दिले तसे तिला परत द्या; तिने जे काही केले आहे त्याच्या दुप्पट तुम्ही तिच्यासाठी करा; आणि तिने प्याल्यात जितके ओतले त्याच्या दुप्पट तुम्ही त्यामध्ये तिच्यासाठी ओता. तिने स्वतःला जेवढे गौरव व ऐषोआराम दिला, तितक्या प्रमाणात तिला छळ आणि दुःख द्या; कारण ती स्वतःच्या मनात म्हणते, ‘मी राणी होऊन बसले आहे, मी विधवा नाही, मी दुःख बघणार नाही.’ या कारणांमुळे, तिच्यावर एकाच दिवसात पीडा येतील, मरी, शोक आणि दुष्काळ. ती अग्नीने पुरी जळून जाईल; कारण तिचा न्याय करणारा, परमेश्वर देव ‘सामर्थ्यशाली’ आहे.
”“आणि ज्यांनी तिच्याबरोबर जारकर्म केले,” जे तिच्याबरोबर विलासात राहिले, ते पृथ्वीचे राजे तिच्या जळण्याचा धूर पाहतील, तेव्हा तिच्याकरता ‘रडतील आणि ऊर बडवतील.’ ते तिच्या पीडांच्या भयामुळे दूर उभे राहून म्हणतील, ‘हाय! ही मोठी नगरी, ही पराक्रमी नगरी बाबेल; कारण एका घटकेत तुझा न्याय करण्यात आला आहे!’ आणि पृथ्वीचे ‘व्यापारी’ तिच्याकरता ‘रडतील आणि शोक करतील;’ कारण आता त्यांचा माल कोणीही विकत घेणार नाही. सोन्याचा, रुप्याचा, हिर्यांचा आणि मोत्यांचा माल, तसेच तलम तागाचे कापड, जांभळे कापड, रेशमी कापड आणि किरमिजी कापड आणि सर्व प्रकारची सुवासिक लाकडे आणि सर्व प्रकारची हस्तिदंती पात्रे, तशीच सर्व प्रकारची फार किमती लाकडी, पितळी, लोखंडी व संगमरवरी पात्रे; दालचिनी व उटण्याचे मसाले, धूप, सुवासिक तेल व ऊद, द्राक्षारस, तेल, सपीठ आणि गहू आणि जनावरे, मेंढरे, घोडे व रथ आणि दास व ‘मनुष्यांचे जीव,’ हा त्यांचा माल कोणी विकत घेत नाही. आणि ज्या फळांची तुझ्या जीवाला वासना होती ती तुझ्यापुढून गेली आहेत; सर्व स्वादिष्ट आणि विलासाचे पदार्थ तुझ्यापासून नाहीसे झाले आहेत; ते यापुढे कोणाला पुन्हा मिळणारच नाहीत. आणि तिच्यामुळे सधन झालेले त्यांचे व्यापारी हे तिच्या पीडेच्या भयामुळे दूरवर उभे राहून रडतील, शोक करतील आणि म्हणतील, हाय! ही मोठी नगरी! ही जांभळी आणि किरमिजी पोशाख नेसून सोन्याचा आणि हिर्यामोत्यांचा साज घालीत असे. एवढ्या प्रचंड संपत्तीची एका तासात नासाडी झाली आहे. आणि सगळे ‘तांडेल,’ गलबतावरचे सगळे लोक आणि ‘खलाशी आणि जितके समुद्रावर’ पोट भरणारे होते ते सर्व लोक दूरवर ‘उभे राहिले,’ आणि त्यांनी तिच्या जळण्याचा धूर पाहिला, तेव्हा ते ओरडून म्हणाले, “कोणती नगरी या मोठ्या नगरीसारखी आहे?” आणि त्यांनी आपल्या डोक्यांत धूळ घातली व ते रडत आणि शोक करीत ओरडून म्हणाले, ‘हाय! ही महान नगरी! समुद्रावर ज्यांची गलबत होती ते सर्व हिच्या संपत्तीवर सधन झालेत! कारण ही एका घटकेत उजाड झाली.’ ‘हे स्वर्गा,’ अहो पवित्रजनांनो, प्रेषितांनो आणि संदेष्ट्यांनो, तिच्यावरून ‘आनंद करा,’ कारण देवाने तिला दंड देवून तुम्हास ‘न्याय दिला आहे.’ मग एका बलवान देवदूताने मोठ्या जात्याच्या तळीसारखा एक दगड घेतला, तो समुद्रात फेकला आणि तो म्हणाला, अशीच ती मोठी नगरी बाबेल जोरात खाली टाकण्यात येईल, आणि पुन्हा मुळीच सापडणार नाही. तुझ्यात वीणा वाजविणार्यांचा आवाज, संगीतकार, बासरी आणि कर्णे वाजविणार्यांचा आवाज ह्यापुढे कधी ऐकू येणार नाही. तुझ्यात कोणत्याही धंद्याचा कारागीर ह्यापुढे कधी आढळणार नाही; आणि तुझ्यात जात्याचा आवाज ह्यापुढे कधी ऐकू येणार नाही.
”आणि तुझ्यात ‘दिव्याचा उजेड.’ ह्यापुढे कधी दिसणार नाही; तुझ्यात वराचा आणि वधूचा आवाज ह्यापुढे ऐकू येणार नाही. कारण तुझे व्यापारी हे पृथ्वीचे मोठे लोक होते; आणि तुझ्या जादूटोण्यांनी सर्व राष्ट्रे फसवली गेली. आणि तिच्यात संदेष्ट्यांचे, पवित्रजनांचे आणि पृथ्वीवर जे वधलेले त्या सर्वाचे रक्त सापडले.
”या गोष्टींनंतर मी जणू एक, विशाल समुदायाची मोठी वाणी स्वर्गात ऐकली; ती म्हणाली ‘हालेलूया,’ तारण, गौरव आणि सामर्थ्य आमच्या देवाचीच आहेत, कारण त्याचे न्याय खरे आणि ‘नीतीचे’ आहेत; कारण ज्या महावेश्येने आपल्या व्यभिचारी वागण्याने पृथ्वी भ्रष्ट केली तिचा त्याने न्यायनिवाडा केला आहे. आणि आपल्या ‘दासांच्या रक्ताबद्दल तिचा सूड घेतला आहे.’ आणि ते दुसऱ्यांदा म्हणाले, ‘हालेलूया तिचा धूर युगानुयुग वर चढत आहे.’ तेव्हा ते चोवीस वडील व चार जिवंत प्राणी पालथे पडले, त्यांनी ‘राजासनावर बसलेल्या’ देवाला नमन केले आणि ते म्हणालेः आमेन; ‘हालेलूया.’ आणि राजासनाकडून एक वाणी आली; ती म्हणालीः ‘तुम्ही सर्व त्याचे दास, दोन्ही लहानमोठे आणि सामर्थ्यवान त्यास भिणारे, आपल्या देवाची स्तुती करा.’ आणि, मी जणू एका, विशाल समुदायाची वाणी, ऐकली; ती वाणी महापूराच्या आणि मेघांच्या मोठ्या गडगडाटांच्या आवाजासारखी होती. ती म्हणाली, ‘हालेलूया; कारण,’ आमचा ‘प्रभू’ सर्वसत्ताधारी देव हा ‘राज्य करीत आहे.
”या, आपण आनंद’ करू, ‘हर्ष करू,’ आणि त्यास गौरव देऊ; कारण कोकर्याचे लग्न निघाले आहे, आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजविले आहे. आणि तिला नेसायला, स्वच्छ, शुभ्र, चमकणारे तलम तागाचे वस्त्र दिले आहे. (हे तलम वस्त्र म्हणजे पवित्रजनांच्या नीतिमत्त्वाची कामे होत.) आणि तो देवदूत मला म्हणाला, “लिहीः ‘कोकर्याच्या लग्नाच्या भोजनाला बोलावलेले धन्य होत.’” आणि तो मला म्हणाला, “ही देवाची खरी वचने आहेत.” आणि, मी त्यास नमन करायला त्याच्या पायाशी पालथा पडलो, परंतु तो मला म्हणाला, “असे करू नको; मी तुझ्या सोबतीचा आणि येशूची साक्ष ज्यांच्याजवळ आहे त्या तुझ्या बंधूंच्या सोबतीचा दास आहे. देवाला नमन कर कारण येशूविषयीची साक्ष हा भविष्यवानीचा आत्मा आहे.”
”तेव्हा मी बघितले की, स्वर्ग उघडला आणि पाहा, एक पांढरा घोडा आणि त्यावर जो बसला होता त्याचे नाव ‘विश्वासू आणि खरा’ आहे, ‘तो नीतीने न्याय करतो,’ आणि युद्ध करतो, ‘त्याचे डोळे अग्नीच्या’ ज्वालेसारखे होते व त्याच्या डोक्यावर पुष्कळ मुकुट होते आणि त्याचे एक नाव लिहिलेले होते; ते त्याच्याशिवाय कोणी जाणत नाही. त्याने एक, रक्तात भिजवीलेला झगा घातला होता; आणि ‘देवाचा शब्द’ हे नाव त्यास देण्यात आले आहे; आणि स्वर्गातल्या सेना पांढर्या घोड्यांवर बसून शुभ्र, स्वच्छ, तलम तागाची वस्त्रे परिधान करून त्याच्या मागोमाग जात होत्या. आणि त्याने राष्ट्रांवर प्रहार करावा म्हणून त्याच्या तोंडामधून एक धारदार तरवार निघते, ‘तो त्यांच्यावर लोहदंडाने सत्ता चालवील;’ तो सर्वसमर्थ देवाच्या अतीकोपाचे द्राक्षकुंड तुडवील. त्याच्या झग्यावर व त्याच्या मांडीवर ‘राजांचा राजा आणि प्रभूंचा प्रभू’ असे नाव लिहिलेले आहे.
”आणि मी बघितले की, एक देवदूत सूर्यात उभा होता; तो आकाशात ‘उडणार्या सर्व पक्ष्यांना’ मोठ्या आवाजात ओरडून म्हणालाः या आणि देवाच्या मोठ्या ‘भोजनासाठी जमा व्हा; म्हणजे तुम्ही राजांचे’ सेनापतीचे मांस खाल आणि ‘बलवान पुरुषांचे मांस खाल; घोड्यांचे’ आणि त्यावर बसणार्यांचे मांस खाल, स्वतंत्र आणि दास, लहान आणि मोठे अशा सर्वांचे मांस ‘खाल.’
”आणि मी बघितले की, तो जो घोड्यावर बसला होता त्याच्याबरोबर आणि त्याच्या सेनेबरोबर लढाई करायला तो पशू व ‘पृथ्वीचे राजे’ आणि त्यांच्या सेना ‘एकत्र आल्या’ होत्या. मग त्या पशूला व त्याच्याबरोबर त्या खोट्या संदेष्ट्याला धरण्यात आले; त्याने त्याच्यासमोर चिन्हे करून, त्या पशूने शिक्का घेणार्यांस व त्याच्या मूर्तीला नमन करणार्यांस फसवले होते. या दोघांनाही ‘गंधकाने जळणार्या’ अग्नीच्या सरोवरात जिवंत टाकण्यात आले; बाकीचे लोक जो घोड्यावर बसला होता त्याच्या तोंडातून बाहेर येणार्या तरवारीने मारले गेले आणि त्यांच्या ‘मांसाने सगळे पक्षी तृप्त झाले.’
”आणि मी बघितले की, एक देवदूत आकाशामधून खाली आला; त्याच्या हातात अगाधकूपाची किल्ली व एक मोठी साखळी होती. आणि ज्याला ‘दियाबल’ आणि ‘सैतान’ म्हणतात त्या पुरातन ‘सर्पाला’ म्हणजे त्या अजगराला त्याने धरले, एक हजार वर्षांसाठी त्यास बांधले, आणि अगाधकूपात टाकले; आणि त्यामध्ये बंद करून वर शिक्का लावला; म्हणजे ती हजार वर्षे पूर्ण होईपर्यंत त्याने राष्ट्रांना आणखी फसवू नये. त्यानंतर त्यास पुन्हा थोडा वेळ सोडणे जरूर होते.
”तेव्हा ‘मी राजासने बघितली’ व त्यावर जे ‘कोणी बसले होते;’ त्यांच्याकडे ‘न्यायनिवाडा देण्यात आला’ आणि येशूच्या साक्षीसाठी व देवाच्या वचनासाठी ज्यांचा शिरच्छेद झाला होता आणि त्या पशूला किंवा त्याच्या मूर्तीला ज्यांनी नमन केले नव्हते आणि आपल्या कपाळावर किंवा हातावर त्याचा शिक्का मारलेला नव्हता, त्यांचे आत्मे मला दिसले. ते परत जिवंत झाले व त्यांनी ख्रिस्ताबरोबर एक हजार वर्षे राज्य केले. पण ती हजार वर्षे पूर्ण होईपर्यंत बाकीचे मरण पावलेले पुन्हा जिवंत झाले नाहीत. हे पहिले पुनरुत्थान होय. ज्याला पहिल्या पुनरुत्थानात भाग आहे, तो धन्य आणि पवित्र आहे; अशांवर दुसर्या मरणाची सत्ता नाही, तर ते देवाचे आणि ख्रिस्ताचे ‘याजक’ होतील; आणि त्याच्याबरोबर एक हजार वर्षे राज्य करतील.
”जेव्हा ती हजार वर्षे संपतील तेव्हा सैतानाला त्याच्या कैदेतून सोडण्यात येईल; आणि तो ‘पृथ्वीच्या चारी कोपर्यांतील गोग’ व ‘मागोग’ या राष्ट्रांना, लढाईसाठी एकत्र करावे म्हणून तो त्यांना फसवायला बाहेर निघेल; त्यांची संख्या समुद्राच्या वाळूइतकी आहे. ते ‘पृथ्वीच्या विस्तारावर’ गेले आणि त्यांनी पवित्र जनांची छावणी व ‘प्रिय’ नगरी वेढली; ‘तेव्हा स्वर्गातून अग्नी उतरला आणि त्याने’ त्यांना ‘गिळून घेतले;’
”आणि त्यांना फसविणार्या सैतानाला ‘अग्नीच्या व गंघकाच्या’ सरोवरात टाकण्यात आले; तो पशू व तो खोटा संदेष्टा हे; तेथेच असून ते रात्रंदिवस सदासर्वकाळ पीडा भोगतील.
”तेव्हा मी एक, मोठे, शुभ्र ‘राजासन’ आणि त्यावर जो ‘बसला’ होता त्यास बघितले. त्याच्या उपस्थितीतून पृथ्वी व आकाशही ‘पळून गेली; आणि त्यांना कोठेच जागा मिळाली नाही.’ मग मी मृतांना, लहान व मोठे ह्यांना राजासनासमोर उभे राहिलेले बघितले; तेव्हा ‘पुस्तके उघडली गेली;’ नंतर आणखी एक ‘पुस्तक’ उघडले गेले. ते ‘जीवनाचे’ पुस्तक होते; आणि त्या पुस्तकात लिहिलेल्या गोष्टींवरून ज्यांच्या त्यांच्या कामांप्रमाणे मृतांचा न्याय करण्यात आला. समुद्राने आपल्यामधील मरण पावलेले होते ते दिले आणि मृत्यु व मृतलोक ह्यांनीही आपल्यामधील मरण पावलेले होते ते दिले; आणि ‘त्यांच्या कामांप्रमाणे’ त्यांचा प्रत्येकाचा न्याय करण्यात आला. आणि मरण व मृतलोक अग्नीच्या सरोवरात टाकले गेले. हे दुसरे मरण होय. हे अग्नीचे तळे म्हणजे दुसरे मरण. आणि ज्या कोणाचे नाव ‘जीवनाच्या’ पुस्तकात लिहिलेले आढळले नाही त्यास अग्नीच्या सरोवरात टाकण्यात आले.
”आणि मी नवे आकाश आणि नवी पृथ्वी ही बघितली कारण पहिले आकाश व पहिली पृथ्वी ही निघून गेली होती आणि समुद्रही राहिला नव्हता. आणि मी ती ‘पवित्र नगरी, नवे यरुशलेम,’ देवाकडून स्वर्गातून खाली येत असलेली बघितली. ती वरासाठी साज चढवून ‘सजविलेल्या वधूप्रमाणे’ दिसत होती;
”आणि मी राजासनातून एक मोठी वाणी ऐकली; ती म्हणालीः “पाहा, देवाचा ‘मंडप’ मनुष्यांत आहे, तो त्यांच्याबरोबर वस्ती करील; ते त्याचे लोक होतील आणि देव स्वतः ‘त्यांच्याबरोबर राहील’ ‘तो त्यांच्या डोळ्यांतले सर्व अश्रू पुसेल;’ आणि ह्यापुढे मरण राहणार नाही; ‘दुःख, आक्रोश,’ किंवा क्लेशही होणार नाहीत; कारण ‘पहिल्या गोष्टी’ होऊन गेल्या आहेत.” ‘तेव्हा राजासनावर बसलेला’ म्हणालाः पाहा, मी सर्वकाही नवीन करतो आणि तो मला म्हणाला, लिही; कारण ही वचने विश्वसनीय आणि खरी आहेत. आणि तो मला म्हणालाः “या गोष्टी झाल्या आहेत. मी अल्फा आणि ओमेगा, आरंभ आणि शेवट आहे. जो ‘तान्हेला असेल त्यास मी जीवनाच्या’ झर्याचे ‘पाणी फुकट’ देईन. जो विजय मिळवतो तो या सर्व गोष्टी वारशाने मिळवील; ‘मी त्यांचा देव होईन आणि तो माझा पुत्र होईल.’ पण भेकड, अविश्वासू, अमंगळ, खुनी, जारकर्मी, चेटकी, मूर्तिपुजक आणि सगळे लबाड ह्यांना अग्नीने आणि गंधकाने जळणार्या सरोवरात वाटा मिळेल; हे दुसरे मरण होय.” मग ज्या सात देवदूतांनी त्या सात शेवटल्या पीडांनी भरलेल्या, सात वाट्या घेतल्या होत्या त्यांच्यातला एक येऊन माझ्याशी बोलला आणि मला म्हणाला, “इकडे ये, मी तुला वधू, कोकर्याची नवरी दाखवतो.”
”तेव्हा त्याने ‘मला’ आत्म्याने एका मोठ्या ‘उंच डोंगरावर नेले आणि त्याने मला ती पवित्र नगरी यरुशलेम’ देवाकडून स्वर्गातून खाली उतरतांना दाखवली. यरुशलेमेच्या ठायी ‘देवाचे तेज’ होते; आणि तिचे तेज अतिमोलवान खड्यासारखे; स्फटिकाप्रमाणे चमकणार्या यास्फे रत्नासारखे होते. तिला मोठा आणि उंच तट होता; त्यास बारा ‘वेशी’ होत्या आणि वेशींपुढे बारा देवदूत होते आणि त्यावर ‘नावे’ लिहिलेली होती; ती इस्राएलाच्या बारा ‘वंशजांची’ नावे होती, ‘पूर्वेकडे तीन वेशी; उत्तरेकडे तीन वेशी; दक्षिणेकडे तीन वेशी आणि पश्चिमेकडे तीन वेशी होत्या.’ आणि नगरीच्या तटाला बारा पाये होते; त्यावर कोकर्याच्या बारा प्रेषितांची नावे होती. आणि जो माझ्याशी बोलत होता त्याच्याजवळ त्या नगरीचे, तिच्या वेशींचे व तिच्या तटाचे माप घ्यायला एक सोन्याचा ‘बोरू’ होता. ती नगरी चौकोनी बांधलेली होती; आणि तिची लांबी जितकी होती तितकीच तिची रुंदी होती; आणि त्याने बोरूने माप घेतले ते साडेसातशे कोस भरले; तिची लांबी, रुंदी आणि उंची या समसमान होत्या. आणि त्याने ‘तटाचे माप घेतले’ ते मनुष्याच्या म्हणजे त्या दूताच्या हाताप्रमाणे एकशे चव्वेचाळीस हात भरले; तिच्या तटाचे बांधकाम यास्फे रत्नाचे होते; आणि नगरी स्वच्छ काचेप्रमाणे, शुद्ध सोन्याची होती. आणि नगरीच्या तटाचे ‘पाये’ अनेक प्रकारचे ‘मोलवान पाषाण’ लावून सजविले होते. पहिला पाया यास्फे, दुसरा नीलमणी, तिसरा शिवधातू चवथा पाचू, पाचवा गोमेद, सहावा सार्दि, सातवा लसण्या, आठवा वैडूर्य, नववा पुष्कराज, दहावा सोनलसणी, अकरावा याकीथ आणि बारावा पद्मंराग. आणि बारा वेशी बारा मोत्यांच्या होत्या; प्रत्येक वेस एका मोत्याची केली होती. नगरीचा रस्ता शुद्ध सोन्याचा, पारदर्शक काचेसारखा होता.
”आणि मी तेथे भवन बघितले नाही; कारण सर्वसमर्थ प्रभू देव आणि कोकरा हेच तिचे भवन आहेत. आणि त्या नगरीला प्रकाश द्यायला सूर्याची किंवा चंद्राची गरज नव्हती; कारण ‘देवाचे तेज’ तिला प्रकाश देते आणि कोकरा तिचा दिवा आहे, ‘राष्ट्रे’ तिच्या ‘प्रकाशात चालतील; आणि पृथ्वीचे राजे’ आपले ‘वैभव’ तिच्यात आणतील. तिच्या ‘वेशी दिवसा कधीही बंद केल्या जाणार नाहीत; आणि तेथे रात्र’ होणारच नाही. त्या ‘राष्ट्रांकडून वैभव’ आणि मान तिच्यात आणतील; तेथे कोणतीही अशुद्ध गोष्ट किंवा अमंगळपणाची कृती करणारा अथवा लबाडी करणारा कोणीही मनुष्य, कोणत्याही प्रकारे ‘प्रवेश करणार नाही’ पण कोकर्याच्या ‘जीवनाच्या पुस्तकात ज्यांची नावे लिहिण्यात आली आहेत त्यांनाच’ प्रवेश करता येईल.
”‘पाहा, मी’ लवकर ‘येत’ आहे आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कामाप्रमाणे देण्यास माझ्याजवळ वेतन आहे,
”