32 – हुतात्मा
हे सर्वशक्तिमान देवाचे पवित्र शब्द आहेत.
माणसांच्या बोलण्यात आपल्याला रस नसतो.
देवावर प्रेम करणार् या प्रत्येकासाठी... याबद्दल देव असे म्हणतो: हुतात्मा.
हे सर्वशक्तिमान देवाचे पवित्र शब्द आहेत.
माणसांच्या बोलण्यात आपल्याला रस नसतो.
देवावर प्रेम करणार् या प्रत्येकासाठी... याबद्दल देव असे म्हणतो: हुतात्मा.
मी तुम्हास खरे खरे सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मरण पावला नाही, तर तो एकटाच राहतो; आणि मरण पावला तर तो पुष्कळ पीक देतो. जो आपल्या जीवावर प्रीती करतो तो त्यास मुकेल आणि जो या जगांत आपल्या जीवाचा व्देष करतो तो त्याचे सार्वकालिक जीवनासाठी रक्षण करील. जर कोणी माझी सेवा करतो तर त्याने मला अनुसरावे, म्हणजे जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल. जर कोणी माझी सेवा करतो तर पिता त्यास मान करील.
”ते तुम्हास सभास्थानाच्या बाहेर घालवतील; इतकेच काय पण तुमचा जीव घेणाऱ्या प्रत्येकाला आपण देवाला सेवा सादर करीत आहोत असे वाटेल, अशी वेळ येत आहे. त्यांनी पित्याला आणि मलाही ओळखले नसल्यामुळे ते असे करतील. मी तुम्हास या गोष्टी अशासाठी सांगून ठेवल्या आहेत की, ती घडण्याची वेळ आली म्हणजे त्या मी तुम्हास सांगितल्या होत्या याची आठवण व्हावी. या गोष्टी मी तुम्हास, प्रारंभापासून, सांगितल्या नाहीत, कारण मी तुमच्याबरोबर होतो.
”जेव्हा कोकऱ्याने पाचवा शिक्का उघडला तेव्हा मी, वेदीखाली आत्मे पाहिले, ते आत्मे देवाच्या वचनामुळे व त्यांनी जी साक्ष दिली होती तिच्यामुळे जिवे मारलेल्या लोकांचे आत्मे होते. ते मोठ्याने ओरडून म्हणाले, हे “स्वामी तू पवित्र व सत्य आहेस तू ‘कोठपर्यंत न्यायनिवाडा करणार’ नाहीस आणि पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांपासून आमच्या ‘रक्ताचा सूड घेणार’ नाहीस?” तेव्हा त्या प्रत्येकास एकएक शुभ्र झगा देण्यात आला आणि त्यास असे सांगण्यात आले की, तुमच्या सोबतीचे दास व तुमचे बंधू तुम्हासारखे जिवे मारले जाणार, त्यांची संख्यापूर्ण होईपर्यंत तुम्ही आणखी थोडा वेळ विसावा घ्या.
”काही काळानंतर हंगामाचे वेळी काइनाने परमेश्वराला आदराने दान देण्यासाठी आपल्या शेतातील उत्पन्नातून काही अर्पण आणले. हाबेलानेही आपल्या कळपातील काही मेंढरे देवाला अर्पण म्हणून आणली. त्याने मेंढरांचे सर्वात उत्तम भाग आणले.परमेश्वराने हाबेलाचे अर्पण स्वीकारले. परतुं काइन आणि त्याचे अर्पण स्वीकारले नाही. यामुळे काइन फार दु:खी झाला व त्याला फार राग आला परमेश्वराने काइनाला विचारले, “तू का रागावलास? तुझा चेहरा दु:खी का दिसत आहे? तू जर चांगल्या गोष्टी करशील तर तुझे माझे संबंध चांगले राहतील, मग मी तुझा स्वीकार करीन; परंतु तू जर वाईट रीतीने चालशील तर ते पाप तुझ्यात राहील व ते पाप तुझ्यावर सत्ता चालवू पाहील; पण तू त्या पापावर सत्ता चालवली पाहिजेस.” काइन आपला भाऊ हाबेल यास म्हणाला, “चल, आपण जरा शेतात जाऊ या. “तेव्हा काइनाने हाबेलाला बाहेर शेतात नेले. तेव्हा काइनाने आपला भाऊ हाबेल यावर हल्ला केला व त्याला ठार मारले. काही वेळाने परमेश्वर काइनास म्हणाला, “तुझा भाऊ हाबेल कोठे आहे?”काइनाने उत्तर दिले, “मला माहीत नाही; माझ्या भावावर नजर ठेवणे व त्याची काळजी घेणे हे माझे काम आहे काय?” नंतर परमेश्वर म्हणाला, “तू हे काय केलेस?
”या गोष्टी घडल्यानंतर देवाने अब्राहामाच्या विश्वासाची कसोटी घेण्याचे ठरवले. देवाने अब्राहामाला हाक मारली, “अब्राहाम”,आणि अब्राहाम म्हणाला, “मी येथे आहे” देव म्हणाला, “तुझा एकुलता एक प्रिय पुत्र इसहाक याला घेऊन तू मोरिया देशात जा आणि तेथे, मी सांगेन त्या डोंगरावर माझ्यासाठी त्याचे होमार्पण कर.” तेव्हा अब्राहाम पहाटेस उठला, त्याने खोगीर घालून आपले गाढव तयार केले; इसहाकाला व दोन सेवकांना आपल्या बरोबर घेतले तसेच होमार्पणाकरिता लाकडे घेतली आणि मग ते सर्व देवाने सांगितलेल्या ठिकाणी गेले. तीन दिवस प्रवास केल्यानंतर अब्राहामाने वर पाहिले तेव्हा काही अंतरावर त्याला जेथे जायचे होते ते ठिकाण दिसले. मग अब्राहाम आपल्या सेवकांना म्हणाला, “तुम्ही येथे गाढवा जवळ थांबा; मी माझ्या मुलाला घेऊन त्या समोरच्या जागी जातो, व देवाची उपासना करुन आम्ही माघारी येतो.” अब्राहामाने लाकडे घेऊन मुल्याच्या खांद्यावर ठेवली; एक खास सुरा (बळी देण्याकरिता) आणि विस्तव घेतला. मग तो व त्याचा मुलगा असे दोघे जण देवाची उपासना करण्यासाठी होमार्पणाच्या जागेकडे संगती निघाले. इसहाकाने आपल्या बापास हाक मारली, “बाबा!”अब्राहामाने उत्तर दिले, “काय माझ्या प्रिय मुला?”इसहाक म्हणाला, “मला लाकडे व विस्तव दिसतात, परंतु होमार्पणासाठी कोंकरु? ते कोठे आहे?” अब्राहामाने उत्तर दिले, “माझ्या लाडक्या बाळा, होमार्पणासाठी लागणारे कोंकरु देव आपल्याला योग्यवेळी देईल.”तेव्हा अब्राहाम व त्याचा मुलगा संगती निघाले व देवाने सांगिलेल्या ठिकाणी ते जाऊन पोहोंचले, तेथे अब्राहामाने एक वेदी बांधली, त्याने वेदीवर लाकडे रचली; नंतर त्याने आपला पुत्र इसहाक याला बांधून वेदीवरील लाकडावर ठेवले; मग अब्राहामाने आपल्या मुलाचा बळी देण्यासाठी हातातील सुरा उंचावला. परंतु तेवढ्यात, त्याच क्षणाला परमेश्वराच्या दूताने त्याला थांबवले; तो स्वर्गातून ओरडून त्याला म्हणाला,“अब्राहामा! अब्राहामा!”अब्राहामाने उत्तर दिले, “मी येथे आहे.” देवदूत म्हणाला, “तू आपल्या मुलाला मारु नकोस, किंवा त्याला कोणत्याही प्रकारची इजा करु नकोस; कारण आता मला खात्रीने समजले की तू देवाला घाबरतोस आणि त्याचा आदर करतोस; कारण तू माझ्यासाठी आपल्या एकुलत्या एका लाडक्या पुत्रालाही, अर्पण करावयास मागेपुढे न पाहता तयार झालास.” आणि मग अब्राहामाने वर दृष्टि करुन सभोंवार पाहिले तेव्हा त्याला एका झुडपात शिंगे अडकलेला एक एडका दिसला; मग त्याने जाऊन तो घेतला व परमेश्वराला होमार्पणासाठी त्याचा बळी दिला. अशा रीतीने अब्राहामाचा मुलगा इसहाक वांचला.
”तो कोकरा, एक वर्षाचा नर असावा व तो पूर्णपणे निरोगी असावा तो कोकरा मेंढ्यातला किंवा बकऱ्यातला असावा.
”“कोणाचाही खून करु नकोस.
”मीं तुला आज्ञा केली आहे ना, खंबीर हो, हिंमत धर, घाबरू नको, कचरूं नको, कारण तूं जाशील तिकडे तुझा देव परमेश्वर तुझ्याबरोबर असेल.
”मग राजा आपणाजवळ जे शिपाई उभे होते त्यांना म्हणाला,यहोवाच्या याजकांच्या अंगावर जाऊन त्यांना मारा, कारण त्यांनीही दावीदाचा पक्ष धरला आहे; आणि तो पळाला असें त्यांना कळलें असतां त्यांनी मला कळवले नाही. करंतु राजाचे चाकर यहोवाच्या याजकांवर तुचून पडायला आपले हात पुढे करीनात. मग राजानें दवेगाला म्हटलें, तूं याजकांच्या अंगावर जा. तेव्हां दवेग अदोमी याजकांच्या अंगावर जाऊन तुटून पडला. आणि त्या दिवशीं त्यानें तागाचें एफोद नेसलेल्या पंचायशीं मनुष्यांना जिवे मारले. आणि त्यानेंयाजकांचें नोब नगर याचा तरवारीच्या धारेनें केला;पुरुष,बायका,बाळकें व तान्हीं गुरें, गाढवें व मेंढरे ही त्यानें तरवारीच्या धारेनें जिवे मारली.
”एकदा ईजबेल परमेश्वराच्या सर्व संदेष्ट्यांना ठार करायला निघाली होती. तेव्हा ओबद्याने शंभर संदेष्ट्यांचे जीव वाचवले. पन्नास जण एका गुहेत, असे दोन गुहांमध्ये त्याने त्यांना लपवले. त्यांच्या अन्नपाण्याची तरतूद केली.)
”एलीया म्हणाला, “सर्व शक्तिमान परमेश्वर देवा, मी आतापर्यंत तुझीच सेवा करत आलेलो आहे. माझ्याकडून होईल तितके मी केले पण इस्राएलच्या लोकांनी तुझ्याशी केलेल्या कराराचा भंग केलेला आहे. त्यांनी तुझ्या वेदीचा विध्वंस केला. तुझ्या संदेष्ट्यांना मारले. मीच एकटा काय तो अजून जिवंत आहे. पण आता ते माझ्याही जिवावर उठले आहेत.”
”परमेश्वराकडे पाहा त्याचे सामर्थ्य बघा. मदतीसाठी त्याला शरण जा.
”तेव्हा जखऱ्यामध्ये परमेश्वराच्या आत्म्याचा संचार झाला. जखऱ्या हा यहोयादा या याजकाचा मुलगा. जखऱ्या लोकांपुढे उभा राहून म्हणाला, “देव म्हणतो, ‘तुम्ही परमेश्वराच्या आज्ञांचे उल्लंघन का करता? तुम्हाला यश येणार नाही. तुम्ही परमेश्वराचा त्याग केलात. आता परमेश्वरही तुम्हाला सोडून देत आहे.”‘ पण लोकांनी जखऱ्याविरुध्द कट केला. राजाने लोकांना जखऱ्याचा वध करण्याचा हुकूम दिला. तेव्हा लोकांनी त्याला दगडफेक करुन मारले. हे त्यांनी मंदिराच्या आवारातच केले.
”आणि मग ते तुझ्यावर उलटले. तुझ्या शिकवणीचा त्यांनी त्याग केला, त्यांनी तुझ्या संदेष्ठ्यांचा वध केला. या संदेष्ट्यांनी लोकांना सावध केले होते. त्यांना ते परत तुझ्या मार्गावर आणू पाहात होते. पण आमच्या पूर्वजांनी मात्र तुझ्याविरुद्ध भयंकर दुराचरण केले.
”ईयोबने जेव्हा हे ऐकले तेव्हा आपल्याला खुप दु:ख झाले आहे हे दाखविण्यासाठी त्याने आपले कपडे फाडले, डोक्यावरचे केस काढले व जमिनीवर पडून त्याने देवाची आराधना सुरु केली. तो म्हणाला:“मी जेव्हा या पृथ्वीवर आलो तेव्हा नागवाच होतो व माझ्याजवळ काहीही नव्हते. मी जेव्हा मरेन व हे जग सोडून जाईल तेव्हाही मी नागवाच असेन आणि माझ्याजवळ काहीही नसेल. परमेश्वर देतो व तोच ते परतही घेतो. परमेश्वराचे नाव धन्य असो.”
”देवाने मला मारुन टाकले तरी मी देवावरच विश्वास ठेवीन. पण मी त्याच्या समोर माझा बचाव करीन.
”माझा बचाव करणारा कोणी तरी आहे याची मला खात्री आहे. तो हयात आहे हे मला माहीत आहे. आणि शेवटी तो या पृथ्वीतलावर येऊन उभा राहील आणि माझा बचाव करील. मी जेव्हा माझे शरीर सोडून जाईन तेव्हा आणि माझी कातडी नष्ट होईल तेव्हा सुध्दा मी देवाला पाहू शकेन. मी देवाला माझ्या डोळ्यांनी बघेन. अन्य कुणी नाही, तर मी स्वत:च त्याला पाहीन. आणि त्यामुळे मी किती हुरळून गेलो आहे ते मी सांगू शकत नाही.
”परंतु देवाला मी माहीत आहे. तो माझी परीक्षा घेत आहे. आणि मी सोन्यासारखा शुध्द असेन याकडे तो लक्ष पुरवेल. मी नेहमीच देवाच्या इच्छेनुसार जगत आलो आहे. आणि मी त्याचा मार्ग चोखाळणे कधीच थांबवले नाही.
”इतर राष्ट्रांचे लोक इतके का रागावले आहेत? ती राष्ट्रे अशा मूर्खासारख्या योजना का आखीत आहेत? त्यांचे राजे आणि पुढारी एकत्र येऊन परमेश्वराशी आणि त्याने निवडलेल्या राजांशी भांडले. ते पुढारी म्हणाले, “आपण देवाविरुध्द आणि त्याने निवडलेल्या राजाविरुदध्द उभे राहू आपण त्यांच्यापासून स्वतंत्र होऊ.” परंतु माझे स्वामी स्वर्गातील राजा त्या लोकांना हसतो.
”परंतु जे लोक देवावर विश्वास ठेवतात त्यांना सुखी राहू दे. त्यांना कायमचे सुखी कर. देवा, ज्या लोकांना तुझे नांव आवडते त्यांचे रक्षण कर त्यांना शक्ती दे.
”मी परमेश्वराला नेहमी माझ्या पुढे ठेवतो आणि मी त्याची उजवी बाजू कधीही सोडणार नाही. त्यामुळे माझे ह्दय आणि माझा आत्मा आनंदीत राहील माझे शरीरही सुरक्षित असेल. का? कारण परमेश्वरा, तू माझ्या आत्म्याला मृत्युलोकात राहू देणार नाहीस. तुझ्याशी इमानदार असणाऱ्याला तू थडग्यात सडू देणार नाहीस. तू मला नीट कसे जगावे ते शिकवशील परमेश्वरा, केवळ तुझ्या सान्निध्यात असणेही संपूर्ण समाधान देणारे असेल. तुझ्या उजव्या बाजूला राहण्याने कायमचे समाधान लाभेल.
”मी न्यायासाठी प्रार्थना केली. म्हणून परमेश्वरा, मी तुझा चेहरा बघेन आणि तुला बघून मी पूर्ण समाधानी होईन.
”तो त्याच्या नावाच्या भल्यासाठी माझ्या आत्म्याला नवी शक्ती देतो. तो खरोखरच चांगला आहे हे दाखवण्यासाठी तो मला, चांगुलपणाच्या मार्गाने नेतो. मी जरी थडग्यासारख्याभयाण अंधकाराने भरलेल्या दरीतून गेलो तरी मला कसल्याही संकटाचे भय वाटणार नाही का? कारण परमेश्वरा, तू माझ्याबरोबर आहेस. तुझी काठी आणि आकडी माझे सांत्वन करतात.
”परमेश्वरा, तू माझा प्रकाश आहेस आणि माझा तारणारा आहेस. मला कुणाचीही भीती बाळगायला नको. परमेश्वरच माझी आयुष्यभराची सुरक्षित जागा आहे. म्हणून मी कुणालाही भीत नाही. माझे शत्रू जेव्हा माझ्यावर कदाचित् हल्लाकरतील ते कदाचित् माझ्या शरीराचा नाशकरायचा प्रयत्न करतील. माझे शत्रू माझ्यावर हल्ला करुन माझा नाश करण्याचा प्रयत्न करतील. परंतु माझ्या सभोवती सैन्य असले तरी मी घाबरणार नाही. युध्दात लोकांनी माझ्यावर हल्ला केला तरी मी घाबरणार नाही. का? कारण माझा परमेश्वरावर विश्वास आहे. मला परमेश्वराजवळ फक्त एकाच गोष्टीची मागणी करायची आहे. मला हे मागायचे आहे, “मला आयुष्यभर परमेश्वराच्या मंदिरात बसू द्या म्हणजे मी परमेश्वराचे सौंदर्य बघेन आणि त्याच्या राजवाड्याला भेट देईनं.” मी संकटात सापडलो की परमेश्वर माझे रक्षण करील. तो मला त्याच्या तंबूत लपवेल तो मला त्याच्या सुरक्षित जागी नेईल.
”चांगल्या लोकांनो! परमेश्वराच्या ठायी आपला आनंद व सुख व्यक्त करा. शुध्द मनाच्या सर्व लोकांनो आनंदी व्हा!
”दुष्ट लोक चांगल्या माणसांविरुध्द वाईट गोष्टी करण्याच्या योजना आखतात. दुष्ट लोक चांगल्या माणसांसमोर आपल्या रागाचे प्रदर्शन दात ओठ खाऊन करतात. परंतु आपला देव त्या दुष्टांना हसतो. त्यांचे काय होणार आहे ते त्याला माहीत आहे. दुष्ट लोक त्यांचे धनुष्य बाण घेऊन सरसावतात. त्यांना गरीब, लाचार लोकांना मारायचे आहे. परंतु त्यांचे धनुष्य मोडेल व त्यांच्या तलवारी त्यांच्याच छातीत घुसतील.
”देवा आम्ही रोज तुझ्यासाठी मारले जात आहोत. मारण्यासाठी नेल्या जाणाऱ्या मेंढ्यांप्रमाणे आम्ही आहोत.
”देव आमचे सामर्थ्य साठवण्याचे भांडार आहे. आम्ही संकटकाळी त्याच्याजवळ नेहमीमदत शोधू शकतो. म्हणून जेव्हा भूकंप होतात आणि पर्वत समुद्रात पडतात तेव्हा आम्हाला भीती वाटत नाही.
”देव खरोखरच नेहमी आपला देव असेल. तो आपल्याला सदैव मार्गदर्शन करेल.
”माझे शत्रू गोड बोलण्यात पटाईत आहेत. ते शांतीविषयी बोलतात आणि प्रत्यक्षात मात्र युध्दाच्या योजना आखतात. त्यांचे शब्द लोण्यासारखे मऊ असतात परंतु ते सुरीसारखे कापतात.
”परमेश्वरा, त्यांना हास, त्या सर्वांचा उपहास कर. देवा, तू माझी शक्ती आहेस. मी तुझी वाट पाहात आहे देवा, तू माझी उंच पर्वातावरील सुरक्षित जागा आहेस. देव माझ्यावर प्रेम करतो. आणि तो मला जिंकण्यासाठी मदत करतो. तो मला माझ्या शत्रूंचा पराभव करण्यासाठी मदत करील.
”अंथरुणावर झोपल्यावर मला तुझी आठवण येईल, मध्यरात्री मी तुझी आठवण काढेन. तू मला खरोखरच मदत केली आहेस. तू माझे रक्षण केलेस म्हणून मी आनंदी आहे. माझा आत्मा तुला धरुन ठेवतो आणि तू माझा हात धरतोस. काही लोक मला मारण्याचा प्रयत्न करीत आहेत. परंतु त्यांचा नाश होईल. ते खाली त्यांच्या थडग्यात जातील.
”परंतु चांगले लोक आनंदात आहेत. चांगल्या लोकांचा देवाबरोबर आनंदात वेळ जातो. चांगले लोक आनंदात जगतात आणि सुखी होतात. देवासाठी गाणे म्हणा त्याच्या नावाचे गुणगान करा, देवासाठी रस्ता तयार करा. तो त्याच्या रथात बसून वाळवंटातून जातो त्याचे नाव यादे आहे. त्याच्या नावाची स्तुती करा.
”मला जे जे लागेल ते सर्व माझ्याजवळ आहे. मी नेहमी तुझ्या जवळ असतो. देवा, तू नेहमी माझा हात धरतोस. देवा, तू मला मार्ग दाखव तू मला चांगला उपदेश कर आणि नंतर तू मला गौरवाप्रत नेशील. देवा, स्वर्गातही तू माझ्याजवळ असशील आणि जेव्हा तू जवळ असशील तेव्हा या पृथ्वीवरचे मला आणखी काय हवे असणार? कदचित् माझ्या शरीराचा आणि मनाचा नाश होईल परंतु माझ्याजवळ मला आवडत असलेला खडक आहे. देव सदैव माझ्याजवळ असतो.
”देवा, तुझे इमानी भक्त खरोखरच सुखी आहेत. ते तुझ्या दयेच्या प्रकाशात जगतात. तुझे नाव त्यांना नेहमी आनंद देते. ते तुझ्या चांगलुपणाची स्तुती करतात.
”तुम्ही लपण्यासाठी परात्पर देवाकडे जाऊ शकता. तुम्ही संरक्षणासाठी सर्वशक्तिमान देवाकडे जाऊ शकता.
”देवा, स्वार्गाच्याही वर उंच जा. सर्व जगाला तुझे वैभव पाहू दे.
”परमेश्वर असहाय्य लोकांची काळजी घेतो. मला कोणाची मदत नव्हती आणि परमेश्वराने माझा उध्दार केला. माझ्या आत्म्या शांत हो! परमेश्वर तुझी काळजी घेतो आहे. देवा, तू माझ्या आत्म्याला मृत्यूपासून वाचवलेस तू माझे अश्रू थोपविलेस. तू मला पतनापासून वाचविलेस. मी सजीवांच्या भूमीत परमेश्वराची सेवा करणे चालूच ठेवीन.
”परमेश्वराच्या एखाद्या भक्ताचा मृत्यू परमेश्वराच्या दृष्टीने महत्वपूर्ण असतो. परमेश्वरा, मी तुझा सेवक आहे.
”देवाच्या भक्तांनो तुमच्या विजयाबद्दल आनंदी व्हा. झोपी गेल्यावरही आनंदी राहा.
”परमेश्वरावर संपूर्ण विश्वास ठेव. तुझ्या स्वत:च्या ज्ञानावर अवलंबून राहू नकोस.
”चांगले नाव (मान मरातब) असणे हे चांगले अत्तर जवळ असण्यापेक्षा अधिक चांगले असते. ज्या दिवशी माणूस मरतो तो दिवस, ज्या दिवशी तो जन्मतो त्या दिवसापेक्षा चांगला असतो.
”पण मृत्यूवर पूर्णपणे मात करता येईल आणि परमेश्वर माझा प्रभू, प्रत्येक चेहऱ्यावरचा, प्रत्येक अश्रू पुसून टाकील. पूर्वी त्याच्या लोकांनी दु:ख भोगले पण देव पृथ्वीवरचे दु:ख दूर करील. परमेश्वराने सांगितले असल्यामुळेच हे सर्व घडून येईल.
”परंतु परमेश्वर म्हणतो, “तुझे लोक मेले असले तरी जिवंत होतील. आमच्या माणसांचे मृतदेह सजीव होतील. मृतांनो, थडग्यातून उठा आणि आनंदित व्हा. तुमच्यावर पडलेले दव हे जणू नव्या दिवसाचा प्रकाश आहे. तो प्रकाश नवाकाळ येत आहे हे दाखवितो. मृत लोकांना आता जमिनीत पुरले आहे पण त्यांना नवजीवन मिळेल.”
”देव त्याच्या लोकांना मुक्त करील आणि ते लोक त्याला शरण येतील. सियोनमध्ये येताना लोक गात येतील. त्यांना कायमचा आनंद मिळेल. तो आनंद त्यांच्या डोक्यावरील मुकुटाप्रमाणे असेल. ते आनंदाने व हर्षांने भारून जातील. दु:ख आणि शोक दूर सरेल.
”हे स्वर्गा आणि हे पृथ्वी, आनंदित व्हा. डोंगरांनो, आनंदाचा कल्लोळ करा. का? कारण परमेश्वर लोकांचे दु:ख हलके करतो. गरिबांवर तो दया करतो.
”मी त्या लोकांना मला मारू देईन. मी माझ्या दाढीचे केस त्यांना ओढू देईन. ते जेव्हा माझी निंदा करतील आणि माझ्या तोंडावर थुकंतील तेव्हा मी माझे तोंड लपविणार नाही. परमेश्वर माझा प्रभु मला मदत करील. म्हणूनच लोकांनी माझी निंदा केली तरी मला त्रास होणार नाही. मी भक्कम होईन. माझी निराशा होणार नाही हे मला माहीत आहे.
”परमेश्वर त्याच्या लोकांचे रक्षण करील. ते आनंदाने सियोनला परततील. ते खूप खूप सुखी होतील. त्यांचे सुख त्यांच्या डोक्यांवरील मुकुटांप्रमाणे निरंतर राहील. ते आनंदाने गात राहतील. सर्व दु:ख कायमचे नाहीसे होईल.
”लोकांनी त्याची चेष्टा केली. आणि त्याचे मित्र त्याला सोडून गेले. तो खूप दु:खी व व्यथित माणूस होता. घृणा व दु:ख म्हणजे काय हे त्याला चांगले समजले होते. लोक त्याच्याकडे साधे पाहण्याचेही कष्ट घेत नव्हते. तो आमच्या लक्षातही आला नाही. पण त्याने आमचा त्रास स्वत:चा मानला. त्याने आमचे दु:ख आणि वेदना स्वत: भोगल्या आम्हाला वाटले की देव त्यालाच शिक्षा करीत आहे, त्याने केलेल्या कर्मांबद्दल त्याला ताडन करीत आहे. पण आमच्या दुष्कृत्यांबद्दल त्याला दु:ख भोगावे लागले. आमच्या अपराधांमुळे तो भरडला गेला. आमचे कर्ज, आमची शिक्षा, त्याच्यावर लादली गेली. त्याने दु:ख सहन केले. म्हणून आम्ही बरे झालो. पण त्याने एवढे सगळे केल्यानंतरही आपण मेंढ्यांप्रमाणे भरकटत गेलो. आम्ही प्रत्येकजण स्वत:च्या मार्गाने गेलो परमेश्वराने आपल्याला अपराधातून मुक्त केल्यावर आणि आपले अपराध त्याच्या नावावर केल्यावर आपण असे वागलो. त्याला इजाही झाली आणि शिक्षाही झाली. पण त्याने कधीही तक्रार केली नाही. ठार मारायला नेणाऱ्या मेंढीप्रमाणे तो अगदी गप्प राहिला. मेंढ्यांची लोकर कापताना तो जसा शांत असतो तसा तो शांत होता. स्वत:चा बचाव करण्यासाठी त्याने कधीही तोंड उघडले नाही. लोकांनी बळजबरीने त्याला नेले आणि त्याला योग्य न्याय दिला नाही. त्याला मृत्युलोकातून उचलून आणल्यामुळे त्याच्या वारसांविषयी कोणी काहीही सांगू शकत नाही. माझ्या लोकांच्या पापाची किंमत मोजण्यासाठी त्याला शिक्षा केली गेली. तो मेल्यावर त्याला श्रीमंताबरोबर पुरले. त्याने काहीही चूक केली नव्हती. तो कधीही खोटे बोलला नाही पण तरीही त्याच्या बाबतीत हे घडून आले. परमेश्वराने त्याला चिरडून टाकण्याचे ठरविले आणि परमेश्वराने दु:ख भोगलेच पाहिजे असे निश्चित केले. म्हणून सेवक स्वत:चा बळी देण्यास तयार झाला. पण त्याला नवे जीवन मिळेल आणि तो खूप खूप जगेल. तो त्याच्या लोकांना पाहील. परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे, सेवकाने करायच्या, सर्व गोष्टी तो पूर्ण करील. त्याच्या आत्म्याला खूप क्लेश होतील. पण चांगल्या गोष्टी घडताना तो पाहील. तो जे शिकेल त्याबद्दल तो समाधान पावेल. माझा सज्जन सेवक, अनेक लोकांना त्यांच्या अपराधांतून, मुक्त करील. आणि त्यांच्या पापांचे ओझे स्वत:च्या खांद्यावर घेईल. ह्यामुळेच मी त्याला सर्व लोकांत श्रेष्ठ बनवीन. बलवान माणसांबरोबर त्याला प्रत्येक गोष्टीत वाटा मिळेल. मी त्याच्यासाठी हे सर्व करीन कारण तो लोकांसाठी जगला आणि मेला. लोकांनी त्याला गुन्हेगार म्हटले. पण त्याने पुष्कळ लोकांच्या पापांचे ओझे स्वत: वाहिले. आणि तो पापी लोकांकरीता बोलतो आहे.”
”माझे शब्द आनंदाने बाहेर जातील आणि शांती घेऊन येतील. डोंगर आणि टेकड्या आनंदाने नाचू लागतील. शेतांतील झाडे आनंदाने टाळ्या वाजवतील.
”सर्व सज्जन माणसे नष्ट झाली. ह्याची कोणी साधी दखलही घेतली नाही. सज्जन लोक एकत्र जमले पण का ते त्यांना कळत नाही, तेव्हा संकटापासून वाचविण्यासाठी सज्जनांना दूर नेले गेले हे कोणालाही समजले नाही. पण शांती येईल, लोक स्वत:च्या खाटल्यावर विश्रांती घेतील. आणि देवाच्या इच्छेप्रमाणे ते जीवन जगतील.
”सियोनच्या दु:खी लोकांकडे देवाने मला पाठविले. मी त्यांना उत्सवासाठी तयार करीन. त्यांच्या डोक्यांवरची राख मी झटकून टाकीन आणि मी त्यांना मुकुट देईन. मी त्याचे दु:ख दूर करीन. त्यांना सुखाचे तेल देईन. मी त्यांचा शोक नाहीसा करीन आणि त्यांना सणासुदीची वस्त्रे घालायला देईन. देवाने मला त्या लोकांना ‘चांगले वृक्ष’ आणि ‘परमेश्वराची सुंदर रोपटी’ अशी नावे ठेवण्यासाठी पाठविले आहे.
”“परमेश्वर मला अत्यंत सुखी ठेवतो. देवामुळे मी सर्वस्वी सुखी आहे. परमेश्वर मला तारणाचे कपडे घालतो. हे कपडे स्वत:च्या लग्नात घालायच्या कपड्यांप्रमाणे सुंदर आहेत. परमेश्वर चांगुलपणाचा अगंरखा मला घालतो. वधूवेशाप्रमाणे हा अंगरखा सुंदर आहे.
”लोकांपुढे अनेक संकटे होती. पण परमेश्वर त्यांच्याविरूध्द नव्हता. परमेश्वराला त्यांच्याबद्दल प्रेम आणि सहानुभूती वाटत होती. म्हणूनच त्याने त्यांचे रक्षण केले, त्याने त्याचा खास देवदूत त्यांचे रक्षण करण्यासाठी पाठविला. त्याने त्यांना उचलले व नेले आणि सर्वकाळ तो त्यांची काळजी घेईल.
”पण राजा काही यहूद्यांनी तुझ्या आज्ञांकडे दुर्लक्ष केले. त्यांना तू बाबेल परगण्याचे मुख्य अधिकारी म्हणून नेमलेस, शद्रख, मेशख,अबेद्नगो हेच ते यहूदी होत. ते तुझ्या दैवताला पूजत नाहीत. तू स्थापलेल्या मर्तोपुढे नतमस्तक होऊन, त्यांनी मूर्तोची पूजा केली नाही. नबुखद्नेस्सरला राग आला. त्याने शद्रख, मेशख व अबेद्नगो यांना बोलविणे पाठविले. मग त्यांना राजापुढे आणण्यात आले. नबुखद्नेस्सर त्यांना म्हणाला, शद्रख, मेशख, अबेद्नगो, तुम्ही माझ्या दैवताला पूजत नाही हे खरे आहे का? मी स्थापलेल्या सोन्याच्या मूर्तोची नतमस्तक होऊन तुम्ही पूजा केली नाही, हेही खरे का? तुम्ही शिंगे, बासरी, सतार,अलगुजे,वीणा,तंबोरा ह्यांचा व इतर वाद्यांचा आवाज ऐकताच नतमस्तक होऊन सोन्याच्या मूर्तोची पूजा केली पाहिजे. मी घडविलेल्या मूर्तोची पूजा करण्यास तुम्ही तयार असाल तर चांगलेच आहे. पण तुम्ही पूजा केली नाही तर तुम्हाला ताबडतोब तापलेल्या भट्टीत टाकण्यात येईल. मग माझ्या हातून कोणताच देव तुमची सुटका करू शकणार नाही.
”शद्रख, मेशख व अबेद्नगो राजाला म्हणाले,”नबुखद्नेस्सर, ह्या गोष्टींचे स्पष्टीकरण करण्याची आम्हाला गरज वाटत नाही. जर तू आम्हाला भट्टीत टाकलेस, तर आम्ही उपासना करीत असलेला देव आमचे रक्षण करू शकतो आणि त्याची इच्छा असल्यास तो तुझ्यापासून आमचा बचावही करू शकतो. पण जरी देवाने आम्हाला वाचविले नाही, तरी हे राजा,आम्ही तुझ्या दैवतांना आम्ही भजणार नाही, हे लक्षात ठेव तू स्थापलेल्या सोन्याच्या मूर्तोची आम्ही पूजा करणार नाही.”
”मग नबुखद्नेस्सराला खूप राग आला. त्याने शद्रख मेशख व अबेद्नगो यांच्याकडे तुच्छतेने पाहिले. त्याने भट्टी नेहमीपेक्षा सातपट तापविण्याची आज्ञा दिली. मग नबुखद्नेस्सरने त्याच्या सैन्यातील काही बलवान सैनिकांना शद्रख,मेशख व अबेद्नगो यांना बांधण्याचा हुकूम केला आणि त्यांना त्या तिघांना तापलेल्या भट्टीत टाकायला सांगितले. मग त्या तिघाना बांधून भट्टीत टाकण्यात आले. त्यानी अंगरखे,विजारी,टोप्या आणि इतर कपडे घातलेले होते. राजा हुकूम देतेवेळी अतिशय रागावला असल्याने त्यांनी घाईघाईन भट्टी तापविली भट्टीची आच एवढी होती की तिच्या ज्वाळांनी बलवान सैनिक मेले. शद्रख मेशख, व अबेद्नगो यांना टाकण्यासाठी ते भट्टीजवळ गेले तेव्हाच ते ज्वाळांनी भाजून मेले. शद्रख, मेशख, अबेद्नगो भट्टीत पडले. त्यांना अगदी घट्ट बांधले होते.
”मग नबुखद्नेस्सरने एड्ढदम उडी मारली. तो आश्चर्यचकीत झाला. त्याने आपल्या सल्लागारांना विचारले “आपण तिघांनाच बांधले आणि तिघांनाच भट्टीत टाकले खरे ना?” सल्लागार उत्तरले,” हो महाराज!” मग राजा म्हणाला,” पाहा! मला अग्नीमध्ये चार माणसे चालताना दिसतात. ते बांधलेले नाहीत व जळलेलेही नाहीत. चौथा देवदूताप्रमाणेदिसत आहे.” मग नबुखद्नेस्सर तापलेल्या भट्टीच्या तोंडाजवळ गेला. तो ओरडला,’ शद्रख, मेशख, अबेद्नगो, बाहेर या. परात्पर देवाच्या सेवकांनो, इकडे या. मग ती तिघे आगीतून बाहेर आले. ते बाहेर येताच, प्रांताधिकारी, मुलकी अधिकारी, राजाचे सल्लागार राज्यपाल ह्यांनी त्यांच्याभोवती गर्दो केली. आगीने शद्रख, मेशख व अबेद्नगो जळाले नाही हे त्यांनी पाहिले होते. त्याचे अंग,केस किंवा वस्त्रे काहीच जळाले नव्हते. एवढेच नव्हे तर ते आगीत असूनसुध्दा त्यांच्या अंगाला जळकट वास येत नव्हता. मग नबुखद्नेस्सर म्हणाला शद्रख मेशख व अबेद्नगो यांच्या देवाचे स्तवन करा.त्याने देवदूताला पाठवून आपल्या सेवकांचे आगीपासून रक्षण केले. ह्या तिघांनी आपल्या देवावर निष्ठा ठेवली त्यांनी माझा हुकूम मानला नाही आणि दुसऱ्या दैवताला भजण्या-पूजण्याऐवजी ते मरण्यास तयार झाले.
”दानीएल दररोज तीन वेळा देवाची प्रार्थना करीत असे. दिवसातून तीन वेळा गुडघे टेकून तो देवाची प्रार्थना करी व स्तुतिस्तोत्र गाईर् नव्या कायद्याविषयी ऐकताच, दानीएल आपल्या घरी गेला. त्याने छतावरच्या त्याच्या खोलीची यरुशलेमच्या बाजूची खिडकी उघडली आणि नेहमीप्रमाणे गुडघे टेकून प्रार्थना केली. मग ते सगळे लोक एकत्र जमले व त्यांनी दानीएलला देवाची प्रार्थना करताना आणि करूणा भाकताना पकडले. मग ते राजाकडे गेले. राजाशी त्याने केलेल्या कायद्याविषयी ते बोलले. ते म्हणाले दारयावेश राजा पुढील 30 दिवसात,तुझ्याशिवाय, देवताची वा माणसाची जो कोणी प्रार्थना करील, त्याला सिंहाच्या गुहेत (पिजंऱ्यात) टाकण्यात येईल, असा लेखी कायदा करून त्यावर तू सही केलीस हे खरे की नाही?राजा म्हणाला “हो! मी त्यावर सही केली आणि मेदी व पारसी यांचे कायदे रद्द होऊ शकत नाहीत वा त्यात बदल होऊ शकत नाही.” मग ते लोक राजाला म्हणाले,”दानीएल तुझ्याकडे दुर्लक्ष करीत आहे राजा! तो यहूदाच्या कैद्यांपैकी एक आहे, तो तु केलेल्या कायद्याकडे लक्ष देत नाही अजूनही दिवसातून तीन वेळा तो त्याच्या देवाची प्रार्थना करतो.” हे ऐकून राजा फार दु:खी व अस्वस्थ झाला. राजाने दानीएलला वाचवायचे ठरविले. सुर्यांस्तापर्यंत राजाने दानीएलला वाचाविण्यासाठी काही मार्ग निघतो का ह्याचा विचार केला मग ते लोक एकत्र जमून राजाकडे गेले व त्याला म्हणाले,” हे राजा मेदी व पारसी यांनी शिक्कामोर्तब केलेला कायदा किंवा हुकूम कधीही रद्द होत नाही किंवा बदलू शकत नाही हे लक्षात ठेव.”
”अखेर दारयावेश राजाने हुकूम दिला. मग त्यांनी दानीएलला आणून सिंहाच्या गुहेत (पिजंऱ्यात) टाकले. राजा दानीएलला म्हणाला “तू ज्या देवाची उपासना करतोस तो तुझा देव तूला वाचवील अशी मी आशा करतो”. गुहेच्या तोंडावर एक मोठी शिळा आणून बसविण्यात आली. मग राजाने त्या शिळेवर आपल्या अंगठीने आपली मुद्रा उमटविली. तसेच इतर दहबाऱ्यांच्या अंगठ्यांनी त्याने त्यांच्याही मुद्रा उमटविल्या. ह्याचा अर्थ कोणीही शिळा सरकवून दानीएलला सिंहाच्या गुहेच्या (पिजऱ्यांच्या) बाहेर काढू शत नव्हता. मग दारयावेश राजवाड्यात परतला. त्या रात्री त्याने अन्नाला स्पर्श केला नाही. कोणी येऊन आपले मनोरंजन करावे असे त्याला वाटले नाही, त्याला त्या रात्री झोपही आली नाही. दुसऱ्या दिवशी फटफटताच दारयावेश राजा उठला आणि त्याने सिंहाच्या गुहेकडे (पिंजऱ्याकडे) धाव घेतली. राजा खूप काळजीत होता. सिंहाच्या गुहेजवळ जाताच, त्याने दानीएलला हाक मारली. राजा ओरडला, दानीएला जिवंत देवाच्या सेवका तुला तुझ्या देवाने, सिंहांपासून वाचविले का? तू नेहमीच देवाची सेवा करीत आलास.” दानीएल उत्तरला,”राजा चिरायु असो! माझ्या देवाने मला वाचविण्यासाठी, देवदूताला पाठविले देवदूताने सिंहाची तोंडे बंद केली. मी निरपराधी आहे,” हे माझ्या देवाला माहीत आहे म्हणूनच सिंहानी मला मारले नाही. राजा, मी तुझे कधीही काहीही वाईट केले नाही. दारयावेश राजाला खूप आनंद झाला त्याने आपल्या सेवकांना दानीएलला सिंहाच्या गुहेतून (पिंजऱ्यातून) बाहेर उचलून आणण्यास सांगितले. दानीएलला बाहेर आणले तेव्हा त्याच्या शरीरावर एकही जखम नव्हती. दानीएलचा त्याच्या देवावर विश्वास असल्याने त्याला सिंहानी काहीही इजा केली नाही.
”हा राजा परात्पर देवाच्या विरुद्ध बोलेल. तो देवाच्या खास माणसांना दुखवेल व ठार मारील. आधीचे कायदे या काळ बदलायचा तो प्रयत्न करील. देवाचे खास लोक एक वेळ, अनेक वेळा व अर्धा वेळ.त्याच्या सत्तेखाली राहातील.
”“दुष्टान्तातील माणूस म्हणाला, ‘त्या वेळी, महान राजपुत्र (देवदूत) मिखाएल उभा राहील. मिखाएल तुझ्या लोकांचा, यहूद्यांचा प्रमुख आहे, तेव्हा खूप संकटाचा काळ असेल. पृथ्वीवर राष्ट्र निर्माण झाल्यापासून असा काळ कधी आला नसेल, पण दानीएल, त्या वेळी तुझ्या लोकांपैकी ज्यांची नावे जीवनाच्या ग्रंथात नोंदविली गेली असतील, ते सर्व वाचतील. पृथ्वीवरील खूप मृत व पुरलेले उठतील. काहींना चिरंजीवित्व लाभेल पण काहींना कायमची अप्रतिष्ठा व तिरस्कार लाभेल. ज्ञानी आकाशाप्रमाणे तेजाने चमकून उठतील ज्या ज्ञानी लोकांनी इतरांना योग्य जीवनमार्ग शिकविला, ते सदासर्वकाळ ताऱ्यांप्रमाणे चमकतील.
”परमेश्वर फार चांगला आहे. संकटसमयी तो सुरक्षित आश्रयस्थान आहे त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांची तो काळजी घेतो
”तरी मी परमेश्वराठयी आनंद करीन. माझ्या तारणहाराजवळ, देवाजवळ मला सुख मिळेल.
”न्यायीपणाकरता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य आहेत, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जेव्हा लोक माझ्यामुळे तुमचा अपमान करतात व छळ करतात आणि तुमच्याविरुध्द सर्वप्रकारचे वाईट लबाडीने बोलतात तेव्हा तुम्ही धन्य आहात. आनंद व उल्लास करा, कारण तुम्हास स्वर्गात मोठे प्रतिफळ आहे कारण तुमच्यापूर्वी जे संदेष्टे होऊन गेले त्यांचाही लोकांनी अशाचप्रकारे छळ केला.
”मी तर तुम्हास सांगतो, तुम्ही आपल्या वैऱ्यांवर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा.
”तुम्ही पृथ्वीवर स्वतःसाठी संपत्ती साठवू नका कारण येथे कसर व जंग लागून तिचा नाश होईल आणि चोर घर फोडून ती चोरून नेतील. म्हणून त्याऐवजी स्वर्गात आपणासाठी संपत्ती साठवा.
”मनुष्यांविषयी सावध असा कारण ते तुम्हास न्यायसभेच्या स्वाधीन करतील आणि त्यांच्या सभास्थानामध्ये ते तुम्हास फटके मारतील. माझ्यामुळे ते तुम्हास राज्यपाल व राजे यांच्यासमोर आणतील. तुम्ही त्यांच्यापुढे व परराष्ट्रीय लोकांस माझ्याविषयी सांगाल. जेव्हा तुम्हास अटक करतील तेव्हा काय बोलावे किंवा कसे बोलावे याविषयी काळजी करू नका. तेव्हा तुम्ही काय बोलायचे ते सांगितले जाईल. कारण बोलणारे तुम्ही नसून तुमच्या देवाचा आत्मा तुमच्याद्वारे बोलेल.
”भाऊ आपल्या भावाविरूद्ध व पिता आपल्या मुलाविरूद्ध उठेल आणि त्यास विश्वासघाताने मारण्यास सोपवून देईल. मुले आईवडिलांवर उठून त्यांना जिवे मारण्यास देतील. माझ्या नावामुळे सर्व तुमचा व्देष करतील. पण शेवटपर्यंत जो टिकेल तोच तरेल. एका ठिकाणी जर तुम्हास त्रास दिला जाईल, तर दुसरीकडे जा. मी तुम्हास खरे सांगतो मनुष्याचा पुत्र येईपर्यंत इस्राएलच्या सर्व गावामध्ये तुमचे असे फिरणे संपणार नाही.
”जे शरीराला वधतात पण आत्म्याचा वध करू शकत नाहीत त्यांना भिऊ नका, तर त्यापेक्षा आत्म्याला व शरीराला जो मारू शकतो व नरकात टाकू शकतो त्यास भ्या.
”जो आपला वधस्तंभ घेऊन माझ्यामागे येण्याचे नाकारतो, तो मला योग्य नाही. जो आपला जीव मिळवतो तो त्यास गमवील पण जो माझ्याकरिता आपला जीव गमावतो तो त्यास मिळवील.
”अहो जे थकलेले व ओझ्याने लादलेले असे सर्व तुम्ही मजकडे या आणि मी तुम्हास विसावा देईन. मी अंतःकरणाने लीन व नम्र आहे, म्हणून माझे जू आपणावर घ्या, माझ्यापासून शिका, म्हणजे तुमच्या जीवास विसावा मिळेल. कारण माझे जू सोपे आहे आणि माझे ओझे हलके आहे.
”नंतर परूश्यांनी बाहेर जाऊन त्यास कसे मारावे याविषयी मसलत केली.
”खडकावरील पेरलेला तो हा आहे की, तो वचन ऐकतो व ते लगेच आनंदाने स्वीकारतो; परंतु त्यास मूळ नसल्याकारणाने तो थोडाच वेळ टिकतो आणि वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे तो लागलाच अडखळतो.
”स्वर्गाचे राज्य शेतात लपवलेल्या धनासारखे आहे, ती कोणाएका मनुष्यास सापडली आणि त्याने ती लपवून ठेवली. मग आनंदाच्या भरात त्याने जाऊन, आपले सर्वस्व विकले आणि ते शेत विकत घेतले. आणखी, स्वर्गाचे राज्य चांगल्या मोत्याचा शोध करणाऱ्या कोणाएका व्यापारासारखे आहे; त्यास एक अति मोलवान् मोती आढळला; मग त्याने जाऊन आपले सर्वस्व विकले आणि ते विकत घेतला.
”तेव्हा त्याने आपल्या चाकरांना म्हटले, “येशू हा बाप्तिस्मा करणारा योहान आहे. त्यास मरण पावलेल्यातून उठविण्यात आले आहे म्हणून याच्याठायी सामर्थ्य कार्य करीत आहे.” हेरोदाने आपला भाऊ फिलिप्प याची पत्नी हेरोदिया हिच्यामुळे योहानाला अटक करून तुरूंगात टाकले होते. कारण योहान त्यास सांगत होता, “तू तिला पत्नी बनवावे हे देवाच्या नियमशास्त्राच्या योग्य नाही.” हेरोद त्यास मारावयास पाहत होता, पण तो लोकांस भीत होता कारण लोकांचा असा विश्वास होता की, योहान संदेष्टा आहे. हेरोदाच्या वाढदिवशी हेरोदियाच्या मुलीने दरबारात नाच करून हेरोदाला खूश केले. त्यामुळे त्याने शपथ वाहून ती जे काही मागेल ते देण्याचे अभिवचन तिला दिले. तिच्या आईच्या सांगण्यावरून ती म्हणाली, “बाप्तिस्मा करणारा योहानाचे शीर तबकात घालून मला इथे आणून द्या.” हेरोद राजाला फार वाईट वाटले. तरी त्याने आपल्या शपथपूर्वक दिलेल्या वचनामुळे व आमंत्रित लोकांमुळे ते द्यावयाची आज्ञा केली. आणि त्याने तुरुंगात माणसे पाठवून योहानाचे शीर उडवले. मग त्यांनी त्याचे शीर तबकात घालून त्या मुलीला आणून दिले. तिने ते आपल्या आईकडे आणले. मग त्याच्या शिष्यांनी येऊन त्याचे प्रेत उचलून नेले व त्यास पुरले आणि त्यांनी जाऊन जे घडले ते येशूला सांगितले.
”तेव्हापासून येशू ख्रिस्त आपल्या शिष्यांना सांगू लागला की, आपण यरुशलेम शहराला जाऊन वडील, यहूदी नेते व मुख्य याजक लोक आणि नियमशास्त्राच्या शिक्षक यांच्याकडून पुष्कळ दुःखे सोसावी व जिवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी पुन्हा उठवले जावे याचे अगत्य आहे.
”तेव्हा येशूने आपल्या शिष्यांना म्हटले, जर कोणी माझ्यामागे येऊ इच्छित असेल तर त्याने स्वतःला नाकारावे आणि आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व माझ्यामागे यावे. कारण जो कोणी आपला जीव वाचवू इच्छितो तो त्यास गमावील पण जो माझ्याकरिता आपला जीव गमावील तो त्यास मिळवील.
”पेत्र येशूला म्हणाला, “पाहा, आम्ही सर्वकाही सोडले आणि तुमच्यामागे आलो आहोत; मग आम्हास काय मिळेल?”
”“पाहा, आपण यरुशलेम शहराकडे जात आहोत. मनुष्याच्या पुत्राला धरून मुख्य याजक लोक व नियमशास्त्राचे शिक्षक यांच्या हाती धरुन देण्यात येईल. ते त्यास मरणदंड ठरतील. आणि थट्टा करावयास, फटके मारावयास व वधस्तंभावर खिळावयास त्यास परराष्ट्रीयांच्या हाती देतील. परंतु तिसऱ्या दिवशी तो परत जीवनात येईल.”
”“हा दुसरा दाखला ऐकाः एक मनुष्य होता, त्याचे शेत होते. त्याने आपल्या शेतात द्राक्षे लावली. त्याभोवती कुंपण घातले आणि द्राक्षरसाकरिता कुंड तयार केले आणि माळा बांधला, मग त्याने आपला मळा काही शेतकऱ्यांना खंडाने करायला दिला, मग तो दुसऱ्यादेशी निघून गेला. जेव्हा द्राक्षे तोडणीचा हंगाम जवळ आला, तेव्हा त्या मनुष्याने आपला वाटा आणण्याकरिता काही चाकर शेतकऱ्याकडे पाठवले. परंतु शेतकऱ्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. एकाला मार दिला तर दुसऱ्या चाकराला जिवे मारले. नंतर तिसऱ्याला दगडमार करून ठार केले. मग शेतकऱ्यांकडे त्या मनुष्याने आणखी एकदा चाकर पाठवले. पहिल्यापेक्षा त्याने जास्त चाकर पाठवले पण त्या शेतकऱ्यांनी त्यांना तशीच वागणूक दिली. नंतर, त्याने त्याच्या स्वतःच्या मुलाला त्यांच्याकडे पाठवले, तो म्हणाला, ‘निश्चितच ते माझ्या मुलाचा मान राखतील.’ पण जेव्हा शेतकऱ्यांनी त्याच्या मुलाला पाहिले तेव्हा ते एकमेकास म्हणू लागले, ‘हा तर मालकाचा मुलगा आहे. तो वारस आहे. चला आपण त्यास ठार करू व त्याचे वतन घेऊ.’ त्यांनी त्यास धरले व द्राक्षमळ्याच्या बाहेर फेकले व त्यास ठार मारले.
”मी तुम्हास सांगतो की मी तुमच्याकडे संदेष्टे, ज्ञानी लोक आणि शिक्षक पाठवत आहे. त्यांच्यातील काहींना तुम्ही जिवे माराल. त्यांपैकी काहींना वधस्तंभावर खिळाल. त्यांच्यातील काहींना तुमच्या सभास्थानात फटके माराल आणि एका नगरातून दुसऱ्या नगरात तुम्ही त्यांचा पाठलाग कराल. म्हणजे नीतिमान हाबेल याच्या रक्तापासून तुम्ही ज्याला वेदी आणि पवित्रस्थान यांच्यामध्ये ठार मारले तो बरख्याचा पुत्र जखऱ्या याच्या रक्तापर्यंत, सर्व नीतिमान लोकांचे रक्त पृथ्वीवर पाडण्यात आले आहे त्यांचा दोष तुमच्यावर यावा.
”ते तुम्हास छळणुकीसाठी धरून देतील आणि तुम्हास जिवे मारतील आणि माझ्या नावाकरता सर्व राष्ट्रे तुमचा व्देष करतील. मग पुष्कळांना अडथळा होईल. ते एकमेकांविरुद्ध उठतील आणि एकमेकांचा व्देष करतील.
”पण जो मनुष्य शेवटपर्यंत टिकून राहिल तोच तारला जाईल.
”कारण जगाच्या आरंभापासून कधीही झाली नाही आणि पुन्हा कधी होणार नाही अशी मोठी संकट त्याकाळी येतील. आणखी, देवाने ते दिवस जर थोडेच ठेवले नसते तर कोणीही मनुष्य वाचला नसता. परंतु त्याच्या निवडलेल्यांसाठी तो ते दिवस थोडे करील.
”सभेत त्यांनी मिळून मसलत केली की, येशूला कपटाने अटक करून आणि जिवे मारावे.
”पेत्र म्हणाला, “मला तुझ्याबरोबर मरावे लागले तरी मी तुला नाकारणार नाही.” आणि इतर शिष्यसुद्धा तसेच म्हणाले.
”येशूला मरणदंड द्यावा म्हणून मुख्य याजक लोक आणि सर्व यहूदी अधिकारी सभा त्याच्याविरुध्द काही खोटे दोषारोप करता येईल काय याचा प्रयत्न करू लागले. खोटी साक्ष देणारे लोक सापडतात काय याचा शोध घेऊ लागले.
”तेव्हा ते त्याच्यावर थुंकले, त्यांनी त्यास मारले. दुसऱ्यांनी चपराका मारल्या.
”जेव्हा सकाळ झाली तेव्हा सर्व मुख्य याजक लोक व वडीलजन यांनी येशूविरूद्ध कट केला आणि कशा प्रकारे येशूला ठार मारायचे याचा विचार केला. त्यांनी येशूला साखळदंडानी बांधून दूर नेले व शाषक पिलाताच्या स्वाधीन केले.
”मग पिलाताने बरब्बाला सोडून दिले. पण येशूला चाबकाचे फटके मारले व त्यास वधस्तंभावर खिळून मारावे म्हणून त्याच्याहाती सोपवून दिले.
”आणि शिपाई त्याच्यावर थुंकले. त्याच्या हातातील त्यांनी तो वेत घेऊन त्याच्या डोक्यावर मारले. येशूची थट्टा करण्याचे संपविल्यावर त्यांनी त्याचा झगा काढून घेतला आणि त्याचे कपडे त्यास घातले. मग ते त्यास वधस्तंभावर खिळायला घेऊन गेले.
”त्यांनी त्यास वधस्तंभावर खिळले. नंतर त्यांनी चिठ्ठ्या टाकून येशूचे कपडे आपसात वाटून घेतले.
”तसेच खडकाळ जमिनीत पेरलेले हे आहेत की, वचन ऐकताच ते आनंदाने ग्रहण करतात; तथापि त्यांच्यामध्ये मूळ नसल्याकारणाने ते थोडा काळच टिकाव धरतात; मग वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे ते लगेच अडखळतात.
”हेरोद राजाने येशूविषयी ऐकले कारण येशूचे नाव सगळीकडे गाजले होते. काही लोक म्हणत होते, “बाप्तिस्मा करणारा योहान मरण पावलेल्यातून उठला आहे, म्हणून त्याच्याठायी चमत्कार करण्याचे सामर्थ्य आहे.” इतर लोक म्हणत, “येशू एलीया आहे.” तर काहीजण म्हणत, “हा संदेष्टा फार पूर्वीच्या संदेष्ट्यापैकी एक आहे.” परंतु हेरोदाने जेव्हा ऐकले तेव्हा तो म्हणाला, “ज्या योहानाचा मी शिरच्छेद केला तोच उठला आहे.” हेरोदाने स्वतः योहानाला पकडून तुरूंगात टाकण्याची आज्ञा दिली होती कारण त्याचा भाऊ फिलिप्प याची पत्नी हेरोदीया हिच्याबरोबर हेरोदाने लग्न केले होते. व योहान हेरोदाला सांगत असे की, “तू आपल्या भावाची पत्नी ठेवावीस हे शास्त्रानुसार नाही.” याकरिता हेरोदीयेने योहानाविरूद्ध मनात अढी धरली. ती त्यास ठार मारण्याची संधी पाहात होती. परंतु ती त्यास मारू शकली नाही, कारण योहान नीतिमान आणि पवित्र मनुष्य आहे हे जाणून हेरोद त्याचे भय धरीत असे व त्याचे संरक्षण करी. हेरोद योहानाचे बोलणे ऐके तेव्हा, फार गोंधळून जाई, तरी तो त्याचे म्हणणे आनंदाने ऐकून घेत असे. मग एके दिवशी अशी संधी आली की हेरोदिया काहीतरी करू शकेली. आपल्या वाढदिवशी हेरोदाने आपले महत्त्वाचे अधिकारी, सैन्यातील सरदार व गालील प्रांतातील प्रमुख लोकांस मेजवानी दिली. हेरोदीयाच्या मुलीने स्वतः आत जाऊन नाच करून हेरोद व आलेल्या पाहुण्यांना आनंदित केले. तेव्हा हेरोद राजा मुलीला म्हणाला, “तुला जे पाहिजे ते माग म्हणजे मी ते तुला देईन.” तो शपथ वाहून तिला म्हणाला, “माझ्या अर्ध्या राज्यापर्यंत जे काही तू मागशील ते मी तुला देईन.” ती बाहेर गेली आणि तिच्या आईला म्हणाली, “मी काय मागू?” आई म्हणाली, “बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शीर.” आणि ती मुलगी लगेच आत राजाकडे गेली आणि म्हणाली, “मला तुम्ही या क्षणी बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाचे शीर तबकात घालून द्यावे अशी माझी इच्छा आहे.” राजाला फार वाईट वाटले, परंतु त्याच्या शपथेमुळे व भोजनास आलेल्या पाहुण्यांमुळे त्यास तिला नकार द्यावा असे वाटले नाही. तेव्हा राजाने लगेच वध करणाऱ्याला पाठवले व योहानाचे शीर घेऊन येण्याची आज्ञा केली. मग तो गेला व तुरूंगात जाऊन त्याने योहानाचे शीर कापले. ते शीर तबकात घालून मुलीला दिले व मुलीने ते आईला दिले. हे ऐकल्यावर, योहानाचे शिष्य आले आणि त्यांनी त्याचे शरीर उचलले आणि कबरेत नेऊन ठेवले.
”तो त्यांना शिकवू लागला, मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे भोगावी. वडील, मुख्य याजक लोक, नियमशास्त्राचे शिक्षक यांजकडून नाकारले जावे, त्यास जिवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी त्याने पुन्हा उठावे हे होणे अगत्याचे आहे.
”नंतर त्याने आपल्या शिष्यांसह लोकांस बोलावले व त्यांना म्हणाला, “जर कोणाला माझ्यामागे यायचे आहे तर त्याने स्वतःला नाकारावे. आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व माझ्यामागे यावे. जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो जीवाला मुकेल व जो कोणी माझ्यासाठी व सुवार्तेसाठी जिवाला मुकेल तो आपला जीव वाचवील.
”कारण तो आपल्या शिष्यांना शिकवीत होता. तो त्यांना म्हणाला, “मनुष्याचा पुत्र विश्वासघाताने धरून मनुष्यांच्या हाती दिला जाणार आहे. ते त्यास ठार मारतील. परंतु मारला गेल्यानंतर तो तिसऱ्या दिवशी उठेल.”
”“पाहा! आपण वर यरुशलेम शहरास जात आहोत आणि मनुष्याचा पुत्र धरून मुख्य याजक लोक आणि नियमशास्त्राचे शिक्षक यांच्या हाती दिला जाईल. ते त्यास मरणाची शिक्षा देतील आणि ते त्यास परराष्ट्रीय लोकांच्या हाती देतील. ते त्याची थट्टा करतील, त्याच्यावर थुंकतील, त्यास फटके मारतील, ठार करतील आणि तीन दिवसानी तो पुन्हा उठेल.”
”येशू त्यांना दाखले सांगून शिकवू लागला, एका मनुष्याने द्राक्षाचा मळा लावला व त्याच्याभोवती कुंपण घातले. त्याने द्राक्षारसासाठी कुंड खणले आणि टेहळणीसाठी माळा बांधला. त्याने तो शेतकऱ्यास खंडाने दिला व तो दूर प्रवासास गेला. हंगामाच्या योग्यवेळी शेतकऱ्याकडून द्राक्षमळ्यातील फळांचा योग्य हिस्सा मिळावा म्हणून त्याने एका नोकरास पाठवले. परंतु त्यांनी नोकरास धरले, मारले आणि रिकामे पाठवून दिले. नंतर त्याने दुसऱ्या नोकरास पाठवले. त्यांनी त्याचे डोके फोडले आणि त्यास अपमानकारक रीतीने वागविले. मग धन्याने आणखी एका नोकराला पाठवले. त्यांनी त्यास जिवे मारले त्याने इतर अनेकांना पाठवले. शेतकऱ्यांनी काहींना मारहाण केली तर काहींना ठार मारले. धन्याजवळ पाठवण्यासाठी आता फक्त त्याचा प्रिय मुलगा उरला होता. तो म्हणाला, “खात्रीने ते माझ्या मुलाला मान देतील.” तो त्याचा आवडता मुलगा होता म्हणून शेवटी त्याने त्यास त्या शेतकऱ्यांकडे पाठवले. परंतु ते शेतकरी एकमेकांस म्हणाले, “हा तर वारीस आहे. चला, आपण याला जिवे मारू म्हणजे वतन आपलेच होईल!” मग त्यांनी त्यास धरले, जिवे मारले आणि द्राक्षमळ्याबाहेर फेकून दिले.
”तुम्ही सावध असा. ते तुम्हास न्यायसभांच्या स्वाधीन करतील आणि सभास्थानात तुम्हास मार देतील. त्यांना साक्ष व्हावी म्हणून तुम्हास राज्यकर्ते व राजे यांच्यासमोर उभे रहावे लागेल. या गोष्टी घडण्यापूर्वी सर्व राष्ट्रांमध्ये सुवार्तेची घोषणा झालीच पाहिजे. ते तुम्हास अटक करून चौकशीसाठी आणतील तेव्हा अगोदरच तुम्ही काय बोलावे याची काळजी करू नका, तर त्या घटकेला जे काही सुचवले जाईल ते बोला, कारण बोलणारे तुम्ही नाही तर पवित्र आत्मा तुम्हासाठी बोलेल. भाऊ भावाला व वडील आपल्या मुलाला ठार मारण्यासाठी विश्वासघात करून धरून देतील, मुले आपल्या आईवडीलांवर उठतील आणि ते त्यांना ठार करतील. आणि माझ्या नावामुळे सर्वजण तुमचा व्देष करतील, पण जो शेवटपर्यंत टिकेल तोच तारला जाईल.
”वल्हांडण व बेखमीर भाकरीच्या सणाच्या दोन दिवस अगोदर मुख्य याजक लोक आणि नियमशास्त्राचे शिक्षक कपटाने त्यास धरून जिवे मारण्याचा मार्ग शोधीत होते.
”तरीही पेत्र अधिक आवेशाने म्हणाला, “जरी मला आपणाबरोबर मरावे लागले तरीसुद्धा मी आपणाला नाकारणार नाही.” आणि इतर सर्वजण तसेच म्हणाले.
”मुख्य याजक लोक आणि सर्व यहूदी सभा येशूला जिवे मारण्यासाठी पुरावा गोळा करण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु त्यांना काही मिळेना.
”तुम्ही निंदा ऐकली आहे. तुम्हास काय वाटते?” सर्वांनी त्यास मरणदंड योग्य आहे अशी शिक्षा फर्मावली. काहीजण त्याच्यावर थुंकू लागले. त्याचे तोंड झाकून बुक्क्या मारू लागले व त्यास म्हणू लागले, “ओळख बरे, तुला कोणी मारले?” कामदारांनी त्यास ताब्यात घेतले आणि मारले.
”ते पुन्हा मोठ्याने ओरडले, त्यास वधस्तंभावर खिळा! पिलाताने पुन्हा विचारले, का? त्याने कोणता गुन्हा केला आहे? ते सर्व अधिकच मोठ्याने ओरडले, त्यास वधस्तंभावर खिळा! पिलाताला लोकांस खूश करायचे होते म्हणून त्याने त्यांच्यासाठी बरब्बाला सोडले आणि येशूला फटके मारून वधस्तंभावर खिळण्यासाठी शिपायांच्या स्वाधीन केले.
”त्यांनी त्याची थट्टा केल्यावर त्याच्या अंगावरून जांभळा झगा काढून घेतला व त्याचे स्वतःचे कपडे त्यास घातले. नंतर वधस्तंभावर खिळणे शक्य व्हावे म्हणून ते त्यास बाहेर घेऊन गेले.
”त्यांनी त्यास वधस्तंभावर खिळले, कोणी कोणते कपडे घ्यावे यासाठी त्यांनी चिठठ्या टाकल्या व त्याचे कपडे वाटून घेतले. त्यांनी त्यास वधस्तंभावर खिळले तेव्हा दिवसाचा तिसरा तास (सकाळचे नऊ) झाला होता.
”मग मोठ्याने आरोळी मारून येशूने प्राण सोडला.
”आणि देव जो माझा तारणारा याच्या ठायी माझा आत्मा आनंदीत झाला आहे.
”जेव्हा मनुष्याच्या पुत्रामुळे लोक तुमचा व्देष करतील आणि जेव्हा ते आपल्या समाजातून तुम्हास दूर करतील व तुमची निंदा करतील व तुमचे नाव ते वाईट म्हणून टाकून देतील आणि मनुष्याच्या पुत्रामुळे तुम्हास नाकारतील, तेव्हा तुम्ही धन्य आहात. त्यादिवशी आनंद करून उड्या मारा, कारण खरोखर स्वर्गात तुमचे प्रतिफळ मोठे आहे! कारण त्यांच्या पूर्वजांनी संदेष्ट्यांना सुद्धा तसेच केले.
”परंतु तुम्हा ऐकणाऱ्यांस मी सांगतो, तुमच्या शत्रूंवर प्रीती करा. जे तुमचा व्देष करतात, त्यांचे चांगले करा. जे तुम्हास शाप देतात त्यांना आशीर्वाद द्या. जे तुमचा अपमान करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा.
”परंतु तुम्ही आपल्या शत्रूंवर प्रीती करा व त्यांचे बरे करा आणि निराश न होता उसने द्या म्हणजे तुमचे प्रतिफळ मोठे होईल व तुम्ही परात्पराचे पुत्र व्हाल कारण तो अनुपकारी व वाईट यांच्यावर तो दया करणारा आहे.
”घडत असलेल्या सर्व गोष्टी ऐकून हेरोद राजा फार घोटाळ्यात पडला, कारण “योहान मरण पावलेल्यांमधून उठला आहे.” असे कित्येक म्हणत होते; आणि कित्येक म्हणत होते की “एलिया प्रकट झाला आहे” आणि दुसरे म्हणत होते की “पुरातन संदेष्ट्यातील कोणीएक उठला आहे.” तेव्हा हेरोद म्हणाला, “योहानाचे शीर मी तोडले, पण ज्याच्याविषयी अशा गोष्टी मी ऐकतो तो हा कोण आहे?” आणि तो त्यास भेटायला पाहत होता.
”आणि म्हटले, “मनुष्याच्या पुत्राने पुष्कळ दुःखे सोसावी आणि वडील व मुख्य याजक लोक व नियमशास्त्र शिक्षक यांच्याकडून नाकारले जावे व जीवे मारले जावे व तिसऱ्या दिवशी पुन्हा उठवले जावे, याचे अगत्य आहे.”
”आणि तो सर्वांना म्हणाला, “जर कोणी माझ्यामागे येऊ इच्छितो तर त्याने स्वतःला नाकारावे व दररोज आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व माझ्यामागे चालावे. कारण जो कोणी आपला जीव वाचवू इच्छितो तो त्यास गमावील, परंतु जो कोणी माझ्याकरिता आपला जीव गमावील तो त्यास वाचवील.
”तुमचा धिक्कार असो, कारण तुमच्या पूर्वजांनी ठार केलेल्या संदेष्ट्यासाठी तुम्ही कबरा बांधता. असे करून तुमच्या पूर्वजांनी केलेल्या कृत्यांचे समर्थन करता. यामुळे देवाचे ज्ञानसुद्धा असे म्हणाले, ‘मी प्रेषित व संदेष्टे त्यांच्याकडे पाठवील. त्यांपैकी काही जणांना ते ठार मारतील व काही जणांचा ते छळ करतील!’ तर, संदेष्ट्याचे जे रक्त जगाच्या प्रारंभापासून सांडले गेले त्याबद्दलचा दंड या पिढीस भरून द्यावा लागेल. होय, मी तुम्हास खरोखर सांगतो की हाबेलाच्या रक्तापासून ते देवाचे भवन व वेदी यांच्यामध्ये मारल्या गेलेल्या जखऱ्या याच्या रक्तापर्यंत या पिढीला जबाबदार धरण्यात येईल.
”“परंतु माझ्या मित्रांनो, मी तुम्हास सांगतो, जे शरीराला मारतात त्यांना तुम्ही भिऊ नका, कारण त्यानंतर त्यापेक्षा जास्त त्यांना काही करता येत नाही. तुम्ही कोणाची भीती बाळगावी हे मी तुम्हास सांगतो. तुम्हास ठार मारल्यांनतर तुम्हास नरकात टाकून देण्यास ज्याला अधिकार आहे, त्याची भीती धरा. होय, मी तुम्हास सांगतो, त्याचेच भय धरा.
”हे लहान कळपा भिऊ नको, कारण तुम्हास त्याचे राज्य द्यावे यामध्ये स्वर्गीय पित्याला संतोष वाटतो. तुमची मालमत्ता विका आणि गरिबांमध्ये वाटा. जुन्या न होणाऱ्या व न झिजणाऱ्या अशा थैल्या स्वतःसाठी स्वर्गात बनवा. तेथे चोरही जाऊ शकणार नाही व कसरही त्याचा नाश करणार नाही.
”जर कोणी माझ्याकडे येतो आणि आपले वडील, आई, पत्नी, मुले, भाऊ, बहिणी एवढेच नव्हे, तर स्वतःच्या जीवाचासुद्धा द्वेष करीत नाही, तर तो माझा शिष्य होऊ शकत नाही. जो कोणी स्वतःचा वधस्तंभ घेऊन माझ्यामागे येणार नाही, तो माझा शिष्य होऊ शकणार नाही.
”त्याच प्रकारे तुमच्यापैकी जो कोणी सर्वस्वाचा त्याग करीत नाही त्यास माझा शिष्य होता येणार नाही.
”जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो आपला जीव गमवेल आणि जो कोणी आपला जीव गमावील तो त्यास वाचवील.
”म्हणजे त्यास परराष्ट्रीयांच्या स्वाधीन करतील, त्याची थट्टा होईल, त्याची निंदा करतील, त्याच्यावर थुंकतील त्यास फटके मारतील, त्याचा जीव घेतील आणि तो तिसऱ्या दिवशी पुन्हा उठेल.”
”मग तो लोकांस हा दाखला सांगू लागला, “एका मनुष्याने द्राक्षमळा लावला व तो काही शेतकऱ्यांना मोलाने देऊन बऱ्याच दिवसांसाठी दूरदेशी गेला. हंगामाच्या वेळी त्याने नोकराला शेतकऱ्यांकडे पाठवले. यासाठी की, त्यांनी द्राक्षमळ्यातील काही फळे द्यावित. पण शेतकऱ्यांनी त्या नोकराला मारले व रिकाम्या हाताने परत पाठवले. नंतर त्याने दुसऱ्या नोकराला पाठवले, पण त्यालासुद्धा त्यांनी मारले. त्या नोकराला त्यांनी लज्जास्पद वागणूक दिली आणि रिकाम्या हाताने परत पाठवले. तेव्हा त्याने तिसऱ्या नोकराला पाठवले. पण त्यालाही त्यांनी जखमी करून बाहेर फेकून दिले. द्राक्षमळ्याचा मालक म्हणाला, ‘मी काय करू? मी माझा स्वतःचा प्रिय पुत्र पाठवतो. कदाचित ते त्यास मान देतील.’ पण जेव्हा शेतकऱ्यांनी मुलाला पाहिले, तेव्हा त्यांनी आपसात चर्चा केली आणि म्हणाले, ‘हा तर वारस आहे, आपण त्यास ठार मारू, म्हणजे वतन आपले होईल.’ त्यांनी त्यास द्राक्षमळ्याच्या बाहेर फेकले व ठार मारले. तर मग द्राक्षमळ्याचा मालक काय करील?
”परंतु जे लोक त्या येणाऱ्या युगामध्ये व मृतांच्या पुनरुत्थानामध्ये भाग घेण्यासाठी पात्र ठरतील, ते लग्न करून घेणार नाहीत आणि लग्न करून देणार नाहीत आणि ते मरणार नाहीत, कारण ते देवदूतासारखे आहेत. ते पुनरुत्थानाचे पुत्र असल्यामुळे ते देवाचे पुत्रही आहेत.
”परंतु हे सर्व होण्यापूर्वी ते तुमच्यावर हात टाकतील आणि तुमचा छळ करतील. चौकशीसाठी ते तुम्हास सभास्थानासमोर उभे करतील आणि तुरुंगात टाकतील. माझ्या नावासाठी ते तुम्हास राजे व राज्यपाल यांच्यासमोर नेतील. यामुळे तुम्हास माझ्याविषयी साक्ष देण्याची संधी मिळेल. तेव्हा उत्तर कसे द्यावे याविषयी आधीच विचार करायचा नाही अशी मनाची तयारी करा, कारण मी तुम्हास असे शब्द व अशी बुद्धी देईन की ज्यामुळे त्यांना तुमचा विरोध करायला किंवा तुमच्याविरुध्द बोलायला मुळीच जमणार नाही. परंतु आईवडील, भाऊ, नातेवाईक आणि मित्र तुमचा विश्वासघात करतील आणि तुम्हापैकी काही जणांना ठार मारतील. माझ्या नावामुळे सर्वजण तुमचा व्देष करतील.
”तुम्ही आपल्या धीराने आपले जीव मिळवून घ्याल.
”मुख्य याजक लोक आणि नियमशास्त्राचे शिक्षक, येशूला कसे मारता येईल या बाबतीत चर्चा करीत होते कारण त्यांना लोकांची भीती वाटत होती.
”परंतु माझ्या परीक्षेमध्ये माझ्या पाठीशी उभे राहिलेले असे तुम्हीच आहात.
”परंतु शिमोन पेत्र त्यास म्हणाला, “प्रभू, मी तुझ्याबरोबर तुरुंगात जाण्यासाठी व मरण्यासाठी तयार आहे.”
”येशूवर पहारा देणाऱ्या लोकांनी त्याचा उपहास करायला व त्यास मारायला सुरुवात केली. त्यांनी त्याचे डोळे बांधले व त्यास प्रश्न विचारु लागले. ते म्हणाले, “ओळख बघू! तुला कोणी मारले?”
”पण ते ओरडतच राहिले, “त्याला वधस्तंभावर खिळा, त्यास वधस्तंभावर खिळा!” पिलात तिसऱ्यांदा त्यांना म्हणाला, “का? या मनुष्याने असा कोणता गुन्हा केला आहे? मरणाची शिक्षा देण्यायोग्य असे मला याच्याविरुद्ध काहीही आढळले नाही. यास्तव मी याला फटक्याची शिक्षा सांगून सोडून देतो.” पण याला वधस्तंभावर खिळाच असा त्यांनी मोठ्याने ओरडून आग्रह चालविला आणि त्यांच्या ओरडण्याला यश आले.
”आणि जेव्हा ते गुन्हेगारांसमवेत “कवटी” म्हटलेल्या ठिकाणी आले, तेथे त्यांनी त्यास व त्या अपराध्यांस, एकाला त्याच्या उजवीकडे व एकाला डावीकडे असे वधस्तंभावर खिळले. नंतर येशू म्हणाला, “हे पित्या, त्यांची क्षमा कर, कारण ते काय करतात हे त्यांना समजत नाही.” त्यांनी चिठ्ठ्या टाकून त्याचे कपडे वाटून घेतले.
”येशू त्यास म्हणाला, “मी तुला खरे सांगतो, आज तू मजबरोबर सुखलोकात असशील.”
”येशू मोठ्या आवाजात ओरडला, “पित्या, मी आपला आत्मा तुझ्या हाती सोपवून देतो.” असे बोलून त्याने प्राण सोडून दिला.
”आणि आम्ही चर्चा करीत होतो की, कसे आमच्या मुख्य याजकांनी आणि अधिकाऱ्यांनी त्यास मरणदंड भोगण्यासाठी स्वाधीन केले आणि त्यांनी त्यास वधस्तंभी खिळले.
”मी तुम्हास खरे खरे सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्यास सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही; तो मरणातून जीवनात पार गेला आहे. मी तुम्हास खरे खरे सांगतो की, मरण पावलेले लोक देवाच्या पुत्राचा आवाज ऐकतील व जे ऐकतील ते जिवंत होतील, अशी वेळ येत आहे, किंबहुना आता आलीच आहे.
”त्याचे आश्चर्य करू नका; कारण जेव्हा कबरात असलेले सर्व त्याचा आवाज ऐकतील अशी घटका येत आहे, आणि ज्याने सत्कर्मे केली ते जीवनाच्या पुनरुत्थानासाठी व ज्यांनी दुष्कर्मे केली ते न्यायाच्या पुनरुत्थानासाठी बाहेर येतील.
”पण स्वर्गातून उतरणारी भाकर अशी आहे की ती जर कोणी खाल्ली तर तो मरणार नाही. स्वर्गातून उतरलेली जिवंत भाकर मीच आहे. या भाकरीतून जो कोणी खाईल तो सर्वकाळ जगेल. जी भाकर मी देईन ती माझा देह असून ती जगाच्या जीवनासाठी आहे.”
”मोशेने तुम्हास नियमशास्त्र दिले की नाही? तर तुम्ही कोणीही नियमशास्त्र पाळीत नाही. तुम्ही मला ठार मारायला का पाहता?”
”मी तुम्हास खरे खरे सांगतो, जर कोणी माझे वचने पाळील तर त्यास मरणाचा अनुभव कधीही येणार नाही.”
”मी उत्तम मेंढपाळ आहे; उत्तम मेंढपाळ मेंढरांकरिता आपला जीव देतो.
”या मेंढवाड्यातली नाहीत अशी माझी दुसरी मेंढरे आहेत; तीही मला आणली पाहिजेत आणि ती माझी वाणी ऐकतील. मग एक कळप आणि एक मेंढपाळ असे होईल. मी आपला जीव परत घेण्याकरिता देतो म्हणून पिता माझ्यावर प्रीती करतो. कोणी तो माझ्यापासून घेत नाही. तर मी होऊनच तो देतो. मला तो देण्याचा अधिकार आहे आणि मला तो परत घेण्याचा अधिकार आहे. ही आज्ञा मला माझ्या पित्यापासून मिळाली आहे.”
”येशूने तिला म्हटले, “पुनरुत्थान व जीवन मीच आहे. जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो मरण पावला असला तरी जगेल. आणि जिवंत असलेला प्रत्येकजण जो माझ्यावर विश्वास ठेवतो तो कधीही मरणार नाही, यावर तू विश्वास ठेवतेस काय?”
”यावरुन त्या दिवसापासून, त्यांनी त्यास जीवे मारण्याचा आपसात निश्चय केला.
”पण मुख्य याजकांनी आपण लाजरालाही ठार मारावे असा विचार केला.
”मी तुम्हास खरे खरे सांगतो, गव्हाचा दाणा जमिनीत पडून मरण पावला नाही, तर तो एकटाच राहतो; आणि मरण पावला तर तो पुष्कळ पीक देतो. जो आपल्या जीवावर प्रीती करतो तो त्यास मुकेल आणि जो या जगांत आपल्या जीवाचा व्देष करतो तो त्याचे सार्वकालिक जीवनासाठी रक्षण करील. जर कोणी माझी सेवा करतो तर त्याने मला अनुसरावे, म्हणजे जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल. जर कोणी माझी सेवा करतो तर पिता त्यास मान करील.
”पेत्र त्यास म्हणाला, “प्रभूजी, मला आपल्यामागे आताच का येता येणार नाही? मी आपल्यासाठी माझा जीव देईन.”
”आपल्या मित्रांसाठी आपला जीव द्यावा यापेक्षा कोणाची प्रीती मोठी नाही.
”जग जर तुमचा व्देष करते तर तुमचा व्देष करण्याच्यापूर्वी त्याने माझाही केला आहे. जर तुम्ही जगाचे असता तर जगाने स्वकीयांवर प्रीती केली असती. पण तुम्ही जगाचे नाही, मी तुम्हास जगांतून निवडले आहे, म्हणून जग तुमचा व्देष करते, ‘दास धन्यापेक्षा मोठा नाही’ हे जे वचन मी तुम्हास सांगितले त्याची आठवण करा. ते माझ्या पाठीस लागले तर ते तुमच्याही पाठीस लागतील; त्यांनी माझे वचन पाळले तर ते तुमचेही पाळतील. पण ते माझ्या नावाकरता हे सर्व तुम्हास करतील; कारण ज्याने मला पाठवले त्यास ते ओळखीत नाहीत.
”ते तुम्हास सभास्थानाच्या बाहेर घालवतील; इतकेच काय पण तुमचा जीव घेणाऱ्या प्रत्येकाला आपण देवाला सेवा सादर करीत आहोत असे वाटेल, अशी वेळ येत आहे. त्यांनी पित्याला आणि मलाही ओळखले नसल्यामुळे ते असे करतील. मी तुम्हास या गोष्टी अशासाठी सांगून ठेवल्या आहेत की, ती घडण्याची वेळ आली म्हणजे त्या मी तुम्हास सांगितल्या होत्या याची आठवण व्हावी. या गोष्टी मी तुम्हास, प्रारंभापासून, सांगितल्या नाहीत, कारण मी तुमच्याबरोबर होतो.
”आणि म्हणून, आता तुम्हास दुःख झाले आहे; तरी मी तुम्हास पुन्हा भेटेन आणि तुमचे अंतःकरण आनंदित होईल आणि तुमच्यापासून तुमचा आनंद कोणीही हिरावून घेणार नाही.
”माझ्याठायी तुम्हास शांती मिळावी म्हणून मी या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हास क्लेश होतील; तरी धीर धरा, मी जगाच्या शक्तीला जिकले आहे.”
”मी त्यांना तुझे वचन दिले आहे, जगाने त्यांचा व्देष केला आहे; कारण जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत.
”नंतर पिलाताने येशूला नेऊन फटके मारवले. तेव्हा शिपायांनी एक काट्यांचा मुकुट गुंफून त्याच्या डोक्यात घातला आणि त्यास एक जांभळा झगा घातला. आणि ते त्याच्यापुढे येऊन म्हणाले, “हे यहूद्यांच्या राजा, तुझा जयजयकार असो!” मग त्यांनी त्यास चापटा मारल्या.
”मुख्य याजक लोक व त्यांचे कामदार त्यास बघून ओरडून म्हणाले, याला “वधस्तंभावर खिळा, वधस्तंभावर खिळा.” पिलात त्यांना म्हणाला, “तुम्हीच त्यास नेऊन, वधस्तंभावर खिळा; कारण मला त्याच्यात काही अपराध दिसत नाही.”
”येशूने उत्तर दिले, “आपणाला तो अधिकार वरून दिलेला नसता तर माझ्यावर मुळीच चालला नसता, म्हणून ज्याने मला आपल्या हाती दिले त्याचे पाप अधिक आहे.”
”यावरुन ते ओरडले, “ह्याला संपवून टाका, त्यास वधस्तंभावर खिळा.” पिलात त्यांना म्हणाला, “मी तुमच्या राजाला वधस्तंभावर खिळावे काय?” मुख्य याजकांनी उत्तर दिले, “आम्हास कैसराशिवाय राजा नाही.” मग, त्याने येशूला वधस्तंभावर खिळण्याकरिता त्यांच्या हाती दिले. तेव्हा त्यांनी येशूला आपल्या ताब्यात घेतले आणि तो आपला वधस्तंभ स्वतः वाहत ‘कवटीचे’ स्थान म्हटलेल्या जागी गेला. या जागेला इब्री भाषेत गुलगुथा म्हणतात. तेथे त्यांनी त्यास व त्याच्याबरोबर दुसर्या दोघांना, एकाला एका बाजूस व दुसऱ्याला दुसऱ्या बाजूस आणि येशूला मध्ये असे वधस्तंभांवर खिळले.
”येशूने आंब घेतल्यानंतर म्हटले, “पूर्ण झाले आहे.” आणि आपले मस्तक लववून आपला आत्मा समर्पण केला.
”“मी तुला खरे खरे सांगतो, तू जेव्हा तरुण होतास तेव्हा आपली कंबर बांधून तुझी इच्छा असेल तिकडे जात होतास; पण तू म्हातारा होशील तेव्हा हात पुढे करशील, दुसरा तुझी कंबर बांधील आणि तुझी इच्छा नसेल तिकडे तुला नेईल.” तो कोणत्या मरणाने देवाचे गौरव करणार होता हे प्रकट करायला तो हे बोलला आणि हे बोलल्यावर तो त्यास म्हणतो, “माझ्यामागे ये.”
”येशूने त्यास म्हटले, “मी येईपर्यंत त्याने रहावे अशी जर माझी इच्छा असेल तर त्याचे तुला काय? तू माझ्यामागे ये.” तेव्हा बांधवांत हे बोलणे पसरले की, तो शिष्य मरणार नाही. पण येशू त्यास म्हणाला नव्हता की, तो मरणार नाही, पण ‘मी येईपर्यंत त्याने रहावे अशी जर माझी इच्छा असेल तर तुला काय?’
”तो देवाच्या ठाम संकल्पानुसार व पूर्वज्ञानानुसार तुमच्या स्वाधीन झाल्यावर, तुम्ही त्यास धरून अधर्म्यांच्या हातांनी वधस्तंभावर खिळून मारले; त्यास देवाने मरणाच्या वेदनांपासून सोडवून उठवले, कारण त्यास मरणाच्या स्वाधीन राहणे अशक्य होते.
”आणि त्यांनी आपले हात प्रेषितांवर टाकून त्यांना सार्वजनिक बंदिशाळेत ठेवले.
”हे ऐकून ते चिडून गेले आणि त्यांना जिवे मारण्याचा विचार करू लागले.
”तेव्हा त्यांनी त्याचे सांगणे मान्य केले, त्यांनी प्रेषितांना बोलावून त्यांना मारहाण केली आणि येशूच्या नावाने बोलू नका असे निक्षून सांगून त्यांना सोडून दिले. ते तर त्या नावासाठी आपण अपमानास पात्र ठरविण्यांत आलो म्हणून आनंद करीत न्यायसभेपुढून निघून गेले.
”अहो ताठ मानेच्या आणि हृदयांची व कानांची सुंता न झालेल्या, लोकांनो तुम्ही तर पवित्र आत्म्याला; सर्वदा विरोध करता जसे तुमचे पूर्वज तसेच तुम्हीही. ज्याचा पाठलाग तुमच्या पूर्वजांनी केला नाही असा संदेष्ट्यांमध्ये कोणी झाला का? ज्यांनी त्या नीतिमान पुरूषाच्या आगमनाविषयी पूर्वी सांगितले त्यांना त्यांनी जिवे मारले; आणि आता त्यास धरून देणारे व जिवे मारणारे तुम्ही निघाला आहात. अशा तुम्हास देवदूतांच्या योगे योजलेले नियमशास्त्र प्राप्त झाले होते, पण तुम्ही ते पाळले नाही.” त्याचे भाषण ऐकणाऱ्या सभेतील सभासदांच्या अंतःकरणास इतके झोंबले, ते दातओठ खाऊ लागले. परंतु पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन त्याने आकाशाकडे निरखून पाहिले, तेव्हा देवाचे तेज व देवाच्या उजवीकडे येशू उभा असलेला त्याच्या दृष्टीस पडला. आणि त्याने म्हटले, “पाहा, आकाश उघडलेले व मनुष्याचा पुत्र देवाच्या उजवीकडे उभा असलेला मला दिसत आहे.”
”तेव्हा ते मोठ्याने ओरडून, व कान बंद करीत, एकजुटीने त्याच्या अंगावर धावून गेले; मग ते त्यास शहराबाहेर घालवून दगडमार करू लागले: आणि साक्षीदारांनी आपली वस्त्रे शौल नावाच्या एका तरूणाच्या पायाजवळ ठेवली. ते दगडमार करीत असता स्तेफन प्रभूचा धांवा करीत म्हणाला, “हे प्रभू येशू, माझ्या आत्म्याचा स्वीकार कर.” मग गुडघे टेकून तो मोठ्याने ओरडला, “हे प्रभू, हे पाप त्यांच्याकडे मोजू नको.” असे बोलून, तो मरण पावला.
”स्तेफनाचा जो खून झाला त्यास शौलाची संमति होती. त्या दिवसापासून यरुशलेम शहर; येथील ख्रिस्ताच्या मंडळीचा मोठा छळ सुरू झाला, प्रेषितांशिवाय इतर सर्व विश्वास ठेवणारे शिष्य यहूदीया व शोमरोन प्रांताच्या, कानाकोपऱ्यात पांगून गेले. काही धार्मिक मनुष्यांनी स्तेफनाला पुरले आणि त्याच्यासाठी त्यांनी फार शोक केला. शौलाने ख्रिस्ताच्या मंडळीचा छळ करण्यास सुरुवात केली; तो घरोघर जाई विश्वास ठेवणारे पुरूष व स्त्रिया यांना धरून खेचून नेई, व तुरुंगात टाकीत असे.
”शास्त्रलेखातील जो भाग तो वाचत होता तो भाग पुढीलप्रमाणे होता, “वधावयला घेऊन जात असलेल्या मेंढरासारखा तो होता; लोकर कातरणाऱ्यांपुढे गप्प राहणाऱ्या कोकरांप्रमाणे तो शांत राहिला, त्याने आपले तोंड उघडले नाही: त्यास लज्जित केले गेले त्याच्या लीन अवस्थेत त्यास न्याय मिळाला नाही: त्याच्या पिढीचे वर्णन कोण करील? कारण पृथ्वीवरील त्याचे जीवन संपविले गेले आहे.”
”शौल यरुशलेम शहरामध्ये प्रभूच्या अनुयायांना अजूनही धमकावण्याचा व जिवे मारण्याचा प्रयत्न करीत होता, म्हणून तो महायाजकाकडे गेला. शौलाने दिमिष्क येथील सभास्थानातील महायाजकाकडून ख्रिस्ताच्या अनुयायांना पकडण्यासाठी अशी अधिकारपत्रे मागितली की, जर त्यास तेथे कोणी विश्वास ठेवणारा, मग तो पुरूष असो अथवा स्त्री, सापडले तर त्याने त्यांना बांधून यरुशलेम शहरास आणावे. मग शौल दिमिष्काजवळ आला तेव्हा एकाएकी, आकाशातून फारच प्रखर प्रकाश त्याच्याभोवती चमकला; शौल जमिनीवर पडला आणि एक वाणी त्याच्याशी बोलताना त्याने ऐकली, “शौला, शौला, तू माझा छळ का करतोस?” शौल म्हणाला, “प्रभू तू कोण आहेस?” ती वाणी म्हणाली, “मी येशू आहे, ज्याचा तू छळ करीत आहेस तो मीच आहे;
”काही दिवसानंतर, यहूदी लोकांनी शौलाला जिवे मारण्याचा कट रचला. यहूदी रात्रंदिवस शहराच्या वेशीवर पहारा देत होते व शौलाला पकडण्याची वाट पाहत होते. त्यांना शौलाला ठार मारायचे होते, पण त्यांचा हा बेत शौलास समजला.
”शौल नेहमी ग्रीक भाषा बोलणाऱ्या यहूदी लोकांशी बोलत असे तो त्यांच्याशी वादविवाद करीत असे, पण ते त्यास मारण्याचा प्रयत्न करीत होते.
”त्या वेळेच्या सुमारास हेरोद राजाने मंडळीतील काही जणांस छळावे म्हणून त्यांच्यावर हात टाकला. योहानाचा भाऊ याकोबा ह्याला त्याने तलवारीने जिवे मारले. हेरोदाने पाहिले की, यहूदी अधिकाऱ्यांना हे आवडले आहे, म्हणून त्याने पेत्रालासुद्धा अटक करण्याचे ठरवले, ते बेखमीर भाकरीचे दिवस होते. हेरोदाने पेत्राला अटक करून तुरुंगात टाकले, त्याच्या रखवालीकरिता त्यास शिपायांच्या चार चौकड्यांच्या स्वाधीन केले, वल्हांडण सण झाल्यावर पेत्राला लोकांसमोर आणण्याची योजना होती.
”काही परराष्ट्रीय लोक, काही यहूदी लोक व त्यांचे पुढारी यांनी पौल व बर्णबाला बांधले व इजा करण्याचा प्रयत्न केला, त्यांना पौल व बर्णबा यांना दगडमार करून मारावयाचे होते. पौल व बर्णबा यांना जेव्हा त्याविषयी कळले तेव्हा त्यांनी ते शहर सोडले, ते लुस्र व दर्बे या लुकवनिया देशाच्या नगरात गेले आणि त्या शहरांच्या सभोवतालच्या परिसरात गेले.
”आणि त्यांनी तेथील शिष्यांना येशूवरील विश्वासात बळकट केले, त्यांनी आपल्या विश्वासांत अढळ रहावे म्हणून उत्तेजन दिले, ते म्हणाले, “अनेक दुःखांना तोंड देत आपण देवाच्या राज्यात प्रवेश केला पाहिजे.”
”आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाकरिता जीवावर उदार झालेले आपले प्रिय बंधू बर्णबा व पौल ह्यांच्याबरोबर काही निवडलेले माणसे तुम्हाकडे पाठवावी.
”तेव्हा लोक त्यांच्यावर उठले आणि अधिकाऱ्यांनी त्यांची वस्त्रे फाडून काढली व त्यांना छड्या मारावयाची आज्ञा दिली. मग पुष्कळ फटके मारल्यावर त्यांना बंदिशाळेत टाकून त्यांनी बंदिशाळेचे नायकाला त्यांना बंदोबस्तात ठेवण्याचा हुकूम केला. त्यास असा हुकूम मिळाल्यावर त्यांने त्यांना आतल्या बंदिखान्यात घालू त्यांचे पाय खोडयात अडकवले.
”आणि त्याने एकापासुन मनुष्यांची सर्व राष्ट्रे निर्माण करून त्यांनी पृथ्वीच्या संबध पाठीवर रहावे असे केले आहे; आणि त्याचे नेमलेले समय व त्यांच्या वस्तीच्या सीमा त्याने ठरविल्या आहेत. यासाठी की, त्यांनी देवाचा शोध या आशेने करावा आणि त्यास कसे तरी प्राप्त करून घ्यावे, तो आपल्यापैकी कोणापासूनही दूर नाही. कारण आपण त्याच्याठायी जगतो, वागतो व आहोत तसेच तुमच्या कवीपैकीही कित्येकांनी म्हणले आहे की, आपण वास्तविक त्याचा वंश आहोत.
”आणि आता आत्म्याच्या आज्ञेने यरुशलेम शहरास चाललो आहे आणि तेथे माझ्याबाबतीत काय घडेल हे माहीत नाही. मला फक्त एकच गोष्ट माहीत आहे की प्रत्येक शहरात पवित्र आत्मा मला सावध करतो, तुरुंगवास व संकटे माझी वाट पाहत आहेत हे तो मला सांगतो. मी माझ्या जीवनाविषयी काळजी करीत नाही, सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी माझे काम पूर्ण करणे, प्रभू येशूने जे काम मला दिले ते मला पूर्ण करायला पाहिजे ते काम म्हणजे देवाच्या कृपेबद्दल (दयाळूपणबद्दल) ची सुवार्ता लोकांस सांगितली पाहिजे.
”पण पौल म्हणाला, “तुम्ही हे काय करीत आहा, असे रडून तुम्ही माझे मन खचवीत आहात काय? मी फक्त बांधून घेण्यासाठी नव्हे तर प्रभू येशूच्या नावासाठी यरुशलेम शहरामध्ये मरायलादेखील तयार आहे.” यरुशलेम शहरापासून दूर राहण्यासाठी आम्ही त्याचे मन वळवू शकलो नाही, म्हणून आम्ही त्यास विनंती करायची सोडली आणि म्हटले, “प्रभूच्या इच्छेप्रमाणे होवो.”
”ते त्यास ठार मारण्याचा प्रयत्न करीत असतानाच रोमी सैन्याच्या सरदाराकडे बातमी गेली की, सगळ्या यरुशलेम शहरात सगळीकडे गोंधळ उडालेला आहे.
”पुरूष व स्त्रिया ह्यांना बांधून तुरुंगात घालू देहान्त शिक्षा देऊन सुद्धा मी या पंथाचा पाठलाग केला. त्याविषयी महायाजक व सगळा वडिलवर्गहि माझा साक्षी आहे; मी त्यांच्यापासून बंधुजनांस पत्रे घेऊन दिमिष्कास चाललो होतो; ह्यासाठी की, जे तेथे होते त्यांनाही बांधून यरुशलेम शहरात शासन करावयास आणावे.
”तेव्हा मी म्हणालो, प्रभू, त्यांना ठाऊक आहे की, तुझ्यावर विश्वास ठेवणाऱ्याना मी बंदीत टाकून प्रत्येक सभास्थानात त्यांना मारहाण करीत असे. तुझा साक्षी स्तेफन याचा रक्तपात झाला तेव्हा मी स्वतः जवळ उभा राहून मान्यता दर्शवित होतो आणि त्याचा घात करणाऱ्याची वस्त्रे सांभाळीत होतो.
”मग दिवस उगवल्यावर, कित्येक यहूदी एकजूट करून शपथबद्ध होऊन म्हणाले, पौलाचा जीव घेईपर्यंत आम्ही खाणार पिणार नाही. हा कट रचणारे इसम चाळीसांहून अधिक होते. ते मुख्य याजक लोक व वडील ह्यांच्याकडे येऊन म्हणाले, “पौलाचा जीव घेईपर्यंत आम्ही अन्नाला शिवणार नाही, अशा कडकडीत शपथेने आम्ही आपणास बद्ध करून घेतले आहे. तर आता त्याच्याविषयी आणखी काही बारकाईने विचारपूस करावयाची आहे, या निमित्ताने त्यास आपणाकडे आणावे असे तुम्ही न्यायसभेतही सरदाराला समजवावे; म्हणजे तो जवळ येतो न येतो तोंच त्याचा जीव घेण्यास आम्ही तयार आहोत.”
”नासरेथच्या येशूच्या नावाविरुद्ध जे जे काही करता येईल ते ते मी करावे असे मलादेखील वाटत होते. आणि नक्की हेच मी यरुशलेम शहरात केले, कारण मुख्य याजकांकडून मला तसा अधिकार मिळाला होता, म्हणून मी देवाच्या अनेक संतांना तुरुंगात टाकले आणि हे जे संतगण जिवे मारले गेले, त्यांच्याविरुद्ध मी माझे मत नोंदविले. अनेक सभास्थानात मी त्यांना शिक्षा केली आणि देवाविरुद्ध जबरीने वाईट भाषण करायला लावण्याचा मी प्रयत्न केला, या लोकांवरील माझा राग इतक्या पराकोटीला गेला होता की, मी त्यांचा छळ करण्याकरता इतर शहरांमध्ये देखील जात असे.
”या कारणांमुळे मी परमेश्वराच्या भवनात असताना काही यहूदी लोकांनी मला धरले आणि जिवे मारण्याचा प्रयत्न केला.
”म्हणजे जे धीराने सत्कर्मे करीत राहून गौरव, सन्मान व अक्षयता ही मिळवू पाहतात त्यांना तो सार्वकालिक जीवन देईलच;
”आणि इतकेच नाही तर आपण संकटांतही अभिमान मिरवतो; कारण आपण जाणतो की संकट धीर उत्पन्न करते,
”कारण आपण दुर्बळ असतानाच ख्रिस्त यथाकाळी अभक्तांसाठी मरण पावला. कारण एखाद्या नीतिमान मनुष्यासाठी क्वचित कोणी मनुष्य मरेल कारण एखाद्या चांगल्या मनुष्यासाठी कदाचीत कोणी मरण्याचेही धाडस करील, पण आपण पापी असताना ख्रिस्त आपल्यासाठी मरण पावला, ह्यात देव त्याची आपल्यावरील प्रीती प्रस्थापित करतो. मग आता आपण त्याच्या रक्ताने नीतिमान ठरवले गेलो आहोत, तर त्याहून अधिक हे आहे की त्याच्याद्वारे आपण देवाच्या क्रोधापासून तारले जाऊ. कारण आपण वैरी होतो, तेव्हा जर आपला देवाबरोबर, त्याच्या पुत्राच्या मरणाने समेट केला गेला, तर त्याहून अधिक हे आहे की, आपला समेट केला गेल्यामुळे त्याच्या जीवनाने आपण निश्चित तारले जाऊ.
”किंवा आपण जितक्यांनी ख्रिस्त येशूमध्ये बाप्तिस्मा घेतला, त्या आपण त्याच्या मरणात बाप्तिस्मा घेतला हे तुम्ही जाणत नाही काय? म्हणून आपण त्याच्या मरणातील बाप्तिस्म्याने त्याच्याबरोबर पुरले गेलो, ते ह्यासाठी की जसा ख्रिस्त पित्याच्या गौरवामुळे मरण पावलेल्यांमधून उठवला गेला तसेच आपणही जीवनाच्या नवेपणात चालले पाहिजे. कारण जर त्याच्या मरणाच्या रूपात आपण त्याच्याशी जोडलेले आहोत तर त्याच्या पुन्हा उठण्याच्या रूपात आपण त्याच्याशी जोडलेले होऊ. आपण जाणतो की आपल्यामधील जुना मनुष्य त्याच्याबरोबर वधस्तंभावर खिळला गेला आहे, म्हणजे पापाचे शरीर नष्ट होऊन आपण पुढे पापाचे दास्य करू नये. कारण जो मरण पावला आहे तो पापापासून मुक्त होऊन न्यायी ठरवलेला आहे.
”पण आपण जर ख्रिस्ताबरोबर मरण पावलो असलो, तर आपण त्याच्याबरोबर जिवंतही राहू असा आपण विश्वास ठेवतो. कारण आपण हे जाणतो की, मरण पावलेल्यांमधून उठलेला ख्रिस्त पुन्हा मरणार नाही. त्याच्यावर मरणाची सत्ता अजिबात राहिली नाही. कारण तो मरण पावला तो पापासाठी एकदाच मरण पावला, पण जिवंत आहे तो देवासाठी जिवंत आहे. तसेच आपण ख्रिस्त येशूमध्ये खरोखर पापाला मरण पावलेले पण देवाला जिवंत आहोत असे तुम्ही स्वतःला माना.
”कारण तुम्ही जर देहानुसार जगाल तर तुम्ही मराल, पण तुम्ही आत्म्याच्या योगे शरीराच्या कृती मारून टाकल्या तर तुम्ही जिवंत रहाल. कारण देवाचा आत्मा जितक्यांना चालवतो ते देवाचे पुत्र आहेत.
”आणि, जर मुले तर वारीस, देवाचे वारीस, ख्रिस्ताबरोबर जोडीचे वारीस आहोत. म्हणजे, त्याच्याबरोबर आपले गौरवही व्हावे, म्हणून त्याच्याबरोबर आपण दुख तर सोसले वारीस आहोत. कारण मी मानतो की, या चालू काळातील दुःखे ही आपल्यासाठी जे गौरव प्रकट होईल, त्याच्यापुढे काही किमतीची नाहीत.
”कारण आपण जाणतो की, सर्व सृष्टी आतापर्यंत कण्हत व यातना सोशीत आहे. आणि केवळ इतकेच नाही, पण ज्यांना आत्म्याचे प्रथमफळ मिळाले आहे असे जे आपण ते आपणही, स्वतः दत्तक घेतले जाण्याची, म्हणजे आपले शरीर मुक्त केले जाण्याची प्रतीक्षा करीत असता, अंतर्यामी कण्हत आहोत.
”कारण आपण हे जाणतो की, जे देवावर प्रीती करतात, जे त्याच्या योजनेप्रमाणे बोलावलेले आहेत त्यांच्यासाठी सर्व गोष्टी मिळून, त्यांच्या चांगल्यासाठी, सहकार्य करतात. कारण त्यास ज्यांच्याविषयी पूर्वज्ञान होते ते आपल्या पुत्राच्या प्रतिरूपात प्रकट व्हावेत म्हणून त्याने त्यांना पूर्वनियोजितही केले. म्हणजे त्याने अनेक बंधुंमध्ये ज्येष्ठ व्हावे. आणि त्याने ज्यांना पूर्वनियोजित केले त्यांना त्याने पाचारणही केले आणि त्याने ज्यांना पाचारण केले त्यांना त्याने नीतिमानही ठरवले आणि त्याने ज्यांना नीतिमान ठरवले त्यांचे त्याने गौरवही केले.
”मग या गोष्टींविषयी आपण काय म्हणावे? जर देव आपल्या बाजूला आहे, तर मग आपल्या विरुद्ध कोण? आणि ज्याने आपल्या स्वतःच्या पुत्राला राखले नाही, पण आपल्या सर्वांसाठी त्यास दिले, तो आपल्याला त्याच्याबरोबर सर्व गोष्टीही का देणार नाही?
”ख्रिस्ताच्या प्रीतीपासून कोण आपल्याला वेगळे करील? संकट किंवा दुःख, पाठलाग, भूक किंवा नग्नता, आपत्ती किंवा तरवार करील काय? कारण असे लिहिले आहे की, ‘तुझ्याकरता आम्ही दिवसभर मारले जात आहोत, आम्ही वधाच्या मेंढराप्रमाणे गणलेले आहोत.’ पण ज्याने आपल्यावर प्रीती केली, त्याच्याद्वारे या सर्व गोष्टींत आपण महाविजयी ठरतो. कारण माझी खात्री आहे की, मरण किंवा जीवन, देवदूत किंवा सत्ता, आताच्या गोष्टी किंवा येणार्या गोष्टी किंवा बले, किंवा उंची किंवा खोली किंवा दुसरी कोणतीही निर्मिती आपला प्रभू ख्रिस्त येशू ह्याच्याठायी असलेल्या देवाच्या प्रीतीपासून आपल्याला वेगळे करू शकणार नाही.
”‘प्रभू, त्यांनी तुझ्या संदेष्ट्यांना मारले आहे आणि तुझ्या वेद्या खणून पाडल्या आहेत; आणि मी एकटा राहिलो आहे आणि ते माझ्या जीवावर टपले आहेत.’ पण देवाचे उत्तर त्यास काय मिळाले? ‘ज्यांनी बआलाच्या मूर्तीपुढे गुडघा टेकला नाही, असे एकंदर सात हजार लोक मी माझ्यासाठी राखले आहेत.’ मग त्याचप्रमाणे या चालू काळातही त्या कृपेच्या निवडीप्रमाणे एक अवशेष आहे.
”म्हणून बंधूंनो देवाची दया स्मरून मी तुम्हास विनंती करतो की, तुम्ही आपली शरीरे ‘पवित्र व देवाला संतोष देणारे जिवंत ग्रहणीय’ यज्ञ म्हणून सादर करावीत; ही तुमची आध्यात्मिक सेवा आहे. आणि या जगाशी समरूप होऊ नका पण तुमच्या मनाच्या नविनिकरणाने तुमचे रूपांतर होऊ द्या; म्हणजे देवाची उत्तम व त्यास संतोष देणारी परिपूर्ण इच्छा काय आहे ती तुम्ही ओळखावी.
”आशेत आनंद करणारे, संकटात धीर धरणारे, प्रार्थनेत ठाम राहणारे, पवित्रजनांच्या गरजेसाठी भागी देणारे, आतिथ्यात पुढे जाणारे असे व्हा. जे तुमचा छळ करतात त्यांना आशीर्वाद द्या; आशीर्वाद द्या, शाप देऊ नका.
”शक्य असल्यास सर्व लोकांशी तुम्ही आपल्याकडून शांतीने रहा. प्रियांनो, तुम्ही स्वतः सूड घेऊ नका, पण क्रोधाला वाव द्या कारण असे लिहिले आहे की, ‘सूड घेणे माझ्याकडे आहे, मी फेड करीन, असे परमेश्वर म्हणतो.’ पण तुझा वैरी भुकेला असेल तर त्यास खायला दे; तो तान्हेला असेल तर त्यास प्यायला दे; कारण असे करण्यात तू त्याच्या डोक्यावर विस्तवातल्या इंगळांची रास करशील.
”प्रत्येक मनुष्याने आपल्यावर असलेल्या अधिकाराऱ्यांच्या अधीन रहावे, कारण देवाकडून नाही असा अधिकारी नाही; आणि जे आहेत ते देवाकडून नेमलेले आहेत. म्हणून जो अधिकाऱ्याला विरोध करतो तो देवाच्या योजनेला विरोध करतो आणि जे प्रतिकार करतील ते स्वतःवर दोष आणवतील. कारण चांगल्या कामात अधिकार्यांची भीती नाही पण वाईट कामात असते; मग तुला अधीकाराऱ्यांची भीती वाटू नये अशी तुझी इच्छा आहे काय? चांगले ते कर आणि तुला त्यांच्याकडून प्रशंसा मिळेल. कारण तुझ्या चांगल्यासाठी तो देवाचा सेवक आहे; पण तू जर वाईट करीत असलास तर भय धर, कारण तो विनाकारण तरवार धरीत नाही कारण तो वाईट करणार्यांवर क्रोध व्यक्त करण्यास सूड घेणारा देवाचा सेवक आहे.
”कारण आपण जगलो तरी प्रभूकरता जगतो आणि आपण मरण पावलो तरी प्रभूकरता मरतो म्हणून आपण जगलो किंवा मरण पावलो तरी प्रभूचे आहोत. कारण ख्रिस्त मरण पावला आणि पुन्हा जिवंत झाला तो ह्यासाठी की, त्याने मृतांचा व जिवंतांचाही प्रभू असावे.
”तर देवाचे रहस्यमय ज्ञान आम्ही सांगतो ते गुप्त ठेवलेले होते, ते देवाने युगाच्या पूर्वी तुमच्याआमच्या गौरवासाठी नेमले होते. हे ज्ञान या युगाच्या कोणाही अधिकाऱ्याला माहीत नव्हते कारण जर त्यांना कळले असते, तर त्यांनी गौरवी प्रभूला वधस्तंभावर खिळले नसते. परंतु ज्याप्रमाणे पवित्र शास्त्र म्हणते, “डोळ्यांनी पाहिले नाही, कानांनी ऐकले नाही आणि मनुष्याच्या मनात जे आले नाही, ते देवाने त्याच्यावर प्रीती करणाऱ्यांसाठी तयार केले आहे.”
”तुम्ही देवाचे निवासस्थान आहात आणि देवाचा आत्मा तुमच्यामध्ये निवास करतो हे तुम्हास माहीत नाही काय?
”कारण मला वाटते की देवाने आम्हास मरण्यासाठी शिक्षा दिलेल्या अशा लोकांसारखे शेवटचे प्रेषित केले कारण आम्ही जगाला, देवदूतांना तसेच मनुष्यांना जणू तमाशा असे झालो आहोत.
”अगदी या क्षणापर्यंत आम्ही भुकेले आणि तहानलेले, उघडे आहोत, अमानुषपणे मारलेले, आम्ही बेघर असे आहोत. आणि आम्ही श्रम करतो, आम्ही स्वतःच्या हातांनी काम करतो, आमची निंदा होत असता आम्ही आशीर्वाद देतो. जेव्हा आमची निंदा होते, तेव्हा आम्ही आशीर्वाद देतो. जेव्हा आमचा छळ होतो तेव्हा आम्ही सहन करतो. जेव्हा आमची निंदा होते, आम्ही दयाळूपणे त्यांच्याशी बोलतो, या क्षणापर्यंत आम्ही जगासाठी गाळ आणि कचरा असे झालो आहोत.
”किंवा तुम्ही हे जाणत नाही का की, तुमचे शरीर हे देवाकडून मिळालेल्या व तुमच्यात असलेल्या पवित्र आत्म्याचे निवासस्थान आहे? आणि तुम्ही आपले स्वतःचे नाही? कारण तुम्हास मोल देऊन विकत घेतले आहे; म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा.
”कारण जितक्यांदा तुम्हीही भाकर खाता व हा प्याला पिता, तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करीता.
”आणि जरी मी माझे सर्व धन गरजवंताच्या अन्नदानासाठी दिले आणि माझे शरीर होमार्पणासाठी दिले पण जर माझ्याठायी प्रीती नसली तर मला काही लाभ नाही. प्रीती सहनशील आहे, उपकारशील आहे, प्रीती हेवा करीत नाही; प्रीती बढाई मारीत नाही, फुगत नाही. प्रीती गैरशिस्तपणे वागत नाही, स्वहित पाहत नाही, चिडत नाही, अपकार स्मरत नाही. प्रीती अनीतीत आनंद मानीत नाही. परंतु सत्याविषयी ती आनंद मानते. प्रीती सर्व गोष्टी सहन करते, सर्व गोष्टींवर विश्वास ठेवते, सर्व गोष्टींची आशा करते, सर्व गोष्टी सहन करते.
”परंतु आता प्रत्यक्षात ख्रिस्त मरणातून उठविला गेला आहे. जे मरण पावलेले आहेत त्यांच्यातील तो प्रथमफळ आहे.
”जो शेवटचा शत्रू मृत्यु तो नष्ट केला जाईल.
”बंधूंनो ख्रिस्त येशू आपला प्रभू ह्याच्याठायी, मला तुमच्याविषयी असलेल्या अभिमानाची शपथ घेऊन मी हे म्हणतो की, मी रोज रोज मरतो.
”तू इतका अज्ञानी आहेस काय? तू जे पेरतोस ते प्रथम मरण पावल्याशिवाय जिवंत होत नाही.
”म्हणून मृतांच्या पुनरुत्थानाबाबत असे असेल, शरीर जे जमिनीत पुरले गेले आहे ते नाश पावणारे आहे, जे शरीर उठविण्यात येते ते अविनाशी आहे. जे अपमानात पुरले जाते ते गौरवात उठवले जाते जे अशक्तपणात पुरले जाते ते सामर्थ्यात उठते. जे जमिनीत पुरले जाते ते नैसर्गिक शरीर आहे जे उठवले जाते ते आत्मिक शरीर आहे. जर नैसर्गिक शरीरे आहेत तर आध्यात्मिक शरीरेसुद्धा असतात.
”कारण हे जे विनाशी आहे त्याने अविनाशीपण परिधान करावे आणि हे जे मरणाधीन आहे त्याने अमरपण परिधान करावे हे आवश्यक आहे. हे जे विनाशी त्याने अविनाशीपण धारण करावे व हे जे मरणाधीन आहे त्याने अमरत्व धारण करावे, असे जेव्हा होईल तेव्हा, पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे; “विजयात मरण गिळले गेले आहे.” “अरे मरणा तुझा विजय कोठे आहे? मरणा, तुझी नांगी कोठे आहे?”
”आपला प्रभू येशू ख्रिस्ताचा देव आणि पिता, जो दयाळू पिता व सर्व सांत्वन करणारा देव तो धन्यवादित असो. तो आमच्या सर्व संकटात आमचे सांत्वन करतो; यासाठी की, ज्या सांत्वनाने आमचे स्वतःचे देवाकडून सांत्वन होते. त्या सांत्वनाने आम्ही, जे कोणी कोणत्याही संकटात आहेत त्यांचे सांत्वन करण्यास समर्थ व्हावे. कारण ख्रिस्ताची दुःखे जशी आमच्यावर पुष्कळ येतात तसे ख्रिस्ताकडून आमचे सांत्वनही पुष्कळ होते. आणि आम्हावर संकट येते ते तुमचे सांत्वन व तारण व्हावे म्हणून येते आणि आम्हास सांत्वन मिळते ते तुमचे सांत्वन व्हावे म्हणून मिळते; म्हणजे असे की, जी दुःखे आम्ही सोशीत आहोत, ती धीराने सहन करण्यास तुम्हास सामर्थ्य मिळते. आणि तुमच्याविषयीची आमची आशा बळकट आहे कारण आम्ही हे जाणतो की, तुम्ही दुःखांचे भागीदार आहात तसेच सांत्वनाचेही भागीदार आहात.
”बंधूंनो, आमच्यावर आशियात जे संकट आले त्याविषयी तुम्ही अजाण असावे अशी आमची इच्छा नाही; ते असे की, आम्ही इतके, शक्तिपलीकडे, अतिशयच दडपले गेलो की, आम्ही आमच्या जिवंत राहण्याविषयीची आशासुद्धा सोडून दिली होती. खरोखर आम्हास वाटत होते की, आम्ही मरणारच, पण आम्ही स्वतःवर विश्वास ठेवू नये, तर जो देव मरण पावलेल्यांना उठवतो त्याच्यावर आम्ही विश्वास ठेवावा, म्हणून हे घडले. त्याने आम्हास मरणाच्या मोठ्या संकटातून सोडवले, तो आता सोडवत आहे आणि तो आम्हास ह्यापुढेही सोडवील, अशी त्याच्याविषयी आमची आशा आहे.
”पण आमचे हे धन आमच्याजवळ मातीच्या भांड्यात आहे, याचा अर्थ हा की, सामर्थ्याची पराकाष्ठा आमची नाही पण देवाची आहे. आम्हावर चारी दिशांनी संकटे येतात पण आम्ही अजून चिरडले गेलो नाही, आम्ही गोधळलेलो आहोत पण निराश झालो नाही. आमचा पाठलाग केला गेला, पण त्याग केला गेला नाही, आम्ही खाली पडलेले आहोत तरी आमचा नाश झाला नाही. आम्ही निरंतर आमच्या शरीरात येशूचे मरण घेऊन जात असतो; यासाठी की, आमच्या शरीरात येशूचे जीवनही प्रकट व्हावे. कारण आम्ही जे जिवंत आहोत ते येशूकरता मरणाच्या सतत स्वाधीन केले जात आहोत; म्हणजे आमच्या मरणाधीन देहात येशूचे जीवनही प्रकट व्हावे. म्हणून, आमच्यात मरण, पण तुमच्यात जीवन हे कार्य करते.
”म्हणून आम्ही खचत नाही. पण जरी आमचे हे बाहेरील देहपण नाश पावत आहे, तरी आमचे अंतर्याम हे दिवसानुदिवस नवीन होत आहे. कारण हे जे हलके दुःख केवळ तात्कालिक आहे ते आमच्यासाठी फार अधिक मोठ्या अशा सार्वकालिक गौरवाचा भार तयार करते. आता आम्ही दिसणार्या गोष्टींकडे पाहत नाही पण न दिसणार्या गोष्टींकडे पाहतो कारण दिसणार्या गोष्टी क्षणिक आहेत पण न दिसणार्या गोष्टी सार्वकालिक आहेत.
”कारण आम्ही हे जाणतो की, आमचे हे जगिक घर ज्यामध्ये आम्ही राहतो, नष्ट झाले तर आम्हास देवापासून मिळालेले सर्वकालचे घर स्वर्गात आहे. या तंबूत आम्ही कण्हत आहोत आणि आमच्या स्वर्गातील घराचा पोशाख करण्यास आम्ही आतुर झालो आहोत. आम्ही अशाप्रकारे वस्त्र परिधान केलेले असलो म्हणजे आम्ही उघडे सापडणार नाही. कारण या मंडपात असलेले आम्ही आमच्यावर भार पडल्यामुळे कण्हतो पण आमचे वस्त्र काढले जावे असे इच्छीत नाही, तर आमचा स्वर्गीय पोशाख घातला जावा म्हणजे हे मरणाधीनपण जीवनात गिळले जावे. आणि याच एका गोष्टीसाठी ज्याने आम्हास तयार केले तो देव आहे आणि त्यानेच आम्हास पवित्र आत्मा हा विसार दिला आहे.
”म्हणून आम्ही सतत धैर्य धरणारे आहोत कारण आम्ही हे जाणतो की आम्ही शरीरात रहात असताना प्रभूपासून दूर आहोत. कारण आम्ही विश्वासाने चालतो, डोळ्यांनी दिसते त्याप्रमाणे चालत नाही; आम्ही धैर्य धरतो आणि शरीरापासून दूर होऊन प्रभूजवळ राहण्यास आम्ही तयार आहोत. म्हणून आम्ही झटत आहोत, म्हणजे आम्ही येथे किंवा तेथे असलो, तरी देवाला संतोष देणारे असे असावे.
”कारण ख्रिस्ताची प्रीती आम्हास आवरते कारण आम्ही असे मानतो की एक सर्वांसाठी मरण पावला तर सर्व मरण पावले, आणि सर्वांसाठी तो ह्यासाठी मरण पावला की, ह्यापुढे जे जगतील त्यांनी आपल्या स्वतःसाठी नाही, पण त्यांच्यासाठी जो स्वतः मरण पावला आणि पुन्हा उठला त्याच्यासाठी त्यांनी जगावे.
”म्हणून ह्यामुळे, आम्ही कोणाला देहावरून ओळखीत नाही; हो, आम्ही ख्रिस्ताला देहावरून ओळखले आहे तरी आता ह्यापुढे ओळखीत नाही. म्हणून कोणी मनुष्य ख्रिस्तात असेल तर तो नवी उत्पत्ती आहे; जुने होऊन गेले आहे, बघा, ते नवे झाले आहे;
”या सेवेला दोष लावला जाऊ नये म्हणून आम्ही, कशात कोणाला, अडखळण्यास कारण होत नाही. उलट सर्व स्थितीत देवाचे सेवक म्हणून, आम्ही आमच्याविषयीची खातरी पटवून देतो; आम्ही पुष्कळ सोशिकपणाने संकटात, आपत्तीत व दुःखात; फटक्यांत, बंदिवासांत व दंगलीत; कष्टांत, जागरणांत व उपासांत; शुद्धतेने व ज्ञानाने, सहनशीलतेने व ममतेने, पवित्र आत्म्याने व निष्कपट प्रीतीने; खरेपणाच्या वचनाने व देवाच्या सामर्थ्याने, उजव्या हातात व डाव्या हातात नीतिमत्त्वाची शस्त्रे बाळगून, गौरवाने व अपमानाने, अपकीर्तीने व सत्कीर्तीने, आम्ही आपली लायकी पटवून देतो. आमच्याविषयी खातरी पटवतो. फसव्या आणि तरी खरे आहोत, अपरिचित आहोत आणि सुपरीचित आहोत, मरत आहोत आणि बघा, आम्ही जिवंत आहोत. जणू शिक्षा भोगीत होतो आणि तरी मरण पावलो नाही. आम्ही दुःखीत, तरी सदोदित आनंद करणारे, आम्ही दरिद्री, तरी पुष्कळांना धनवान करणारे, आमच्याजवळ काही नसलेले आणि तरी सर्व असलेले असे आढळतो.
”दोषी ठरवण्यासाठी मी हे म्हणत आहे असे नाही. मी अगोदरही सांगितले आहे की, तुमच्याबरोबर आम्ही जगावे आणि मरावे एवढे तुम्ही आमच्या अंतःकरणात आहात. मला तुमचा मोठा विश्वास आहे व मला तुमच्याविषयी फार अभिमान आहे; माझे पूरेपूर समाधान झाले आहे आणि आपल्या सर्व दुःखात मी अतिशय आनंदीत आहे.
”ती अशी की, संकटाच्या बिकट परीक्षेत त्यांचा आत्यंतिक आनंद व त्यांचे कमालीचे दारिद्र्य ह्यांमध्ये त्यांची औदार्यसंपदा विपुल झाली.
”ते ख्रिस्ताचे सेवक आहेत काय? मी अधिक प्रमाणात आहे (मी हे वेडगळासारखे बोलतो) मी पुष्कळ कठीण काम केले आहे. सारखा तुरुंगात जात होतो, बेसुमार फटके खाल्ले, पुष्कळ वेळा मरणाला सामोरे गेलो, म्हणून मीही अधिक आहे. पाच वेळेला यहूद्यांकडून मला (“चाळीस चाबकाचे फटके वजा एक”) एकोणचाळीस फटके बसले. तीन वेळा काठीने मारण्यात आले, एकदा मला दगडमार करण्यात आला, तीन वेळा माझे जहाज फुटले, खुल्या समुद्रात मी एक रात्र व दिवस घालविला. मी सातत्याने फिरत होतो, नदीच्या प्रवासात धोका होता. लुटारुंकडून धोका होता. माझ्या स्वतःच्या देशबांधवांकडून धोका होता. परराष्ट्रीय लोकांकडून, शहरांमध्ये धोका होता. डोंगराळ प्रदेशात धोका होता. समुद्रातील धोके होते, विश्वास ठेवणाऱ्या खोटया बंधूंकडून आलेले धोके होते. मी कष्ट केले आणि घाम गाळला व पुष्कळ वेळा जागरण केले. मला भूक व तहान माहीत आहे. पुष्कळ वेळा मी उपाशी राहिलो, थंडीत उघडा असा मी राहिलो, या सर्व गोष्टीशिवाय दररोज माझ्यावर येणार दबाव म्हणजे सर्व मंडळ्यांविषयीची चिंता.
”आणि प्रकटीकरणांच्या विपुलतेमुळे मी मर्यादेबाहेर चढून जाऊ नये म्हणून माझ्या देहात एक काटा दिलेला आहे, तो मला ठोसे मारणार्या सैतानाचा दूत आहे; म्हणजे मी मर्यादेबाहेर चढून जाऊ नये. म्हणून तो ठेवण्यात आला आहे. माझ्यामधून तो निघावा म्हणून मी प्रभूला ह्याविषयी तीनदा विनंती केली. आणि त्याने मला म्हणले की, ‘माझी कृपा तुला पुरे आहे, कारण अशक्तपणात माझे सामर्थ्य पूर्ण होते.’ म्हणून, फार आनंदाने, मी माझ्या अशक्तपणात अभिमान मिरवीन, म्हणजे ख्रिस्ताचे सामर्थ्य माझ्यावर रहावे; आणि म्हणून ख्रिस्तासाठी आजारात, अपमानात, आपत्तीत, पाठलागात आणि दुःखात मी संतुष्ट असतो कारण मी जेव्हा अशक्त असतो तेव्हाच सशक्त आहे.
”तुम्ही माझ्या, यहूदी धर्मातील, पूर्वीच्या आचरणाविषयी ऐकले आहे की, मी देवाच्या मंडळीचा अत्यंत छळ करून तिचा नाश करीत असे.
”मी ख्रिस्ताबरोबर वधस्तंभावर खिळलेला आहे आणि ह्यापुढे मी जगतो असे नाही तर ख्रिस्त माझ्याठायी जगतो आणि आता देहामध्ये जे माझे जगणे आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासाच्याद्वारे आहे. त्याने माझ्यावर प्रीती केली व स्वतःला माझ्याकरिता दिले.
”परंतु त्यावेळेस देहस्वभावानुसार जो जन्मला होता, त्याने जो आत्म्यानुसार जन्मलेल्या मुलाचा छळ केला, तसा आताही होत आहे.
”जे ख्रिस्त येशूचे आहेत त्यांनी देहाच्या भावना व वासनांसहित देहस्वभावाला वधस्तंभावर खिळले आहे.
”कारण जो आपल्या देहाकरता पेरतो त्यास देहाकडून नाशाचे पीक मिळेल, पण जो देवाच्या आत्म्याकरता पेरतो त्यास आत्म्याकडून सार्वकालिक जीवनाचे पीक मिळेल.
”आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्या वधस्तंभाच्या अभिमानाशिवाय कशाचाही अभिमान बाळगणे माझ्यापासून दूर राहो पण ज्याच्या द्वारे जग मला आणि मी जगाला वधस्तंभावर खिळलेला आहे.
”या कारणासाठी मी पौल तुम्हा परराष्ट्रीयांसाठी ख्रिस्त येशूचा बंदिस्थ आहे.
”म्हणून, मी विनंती करतो, तुमच्यासाठी मला होणाऱ्या यातनेमुळे तुम्ही माघार घेऊ नये कारण हि यातना आमचे गौरव आहे. या कारणासाठी मी पित्यासमोर गुडघे टेकतो, ज्याच्यामुळे प्रत्येक वंशाला स्वर्गात आणि पृथ्वीवर निर्माण करून नाव देण्यात आले आहे.
”म्हणून मी, जो प्रभूमधील बंदीवान, तो तुम्हास विनंती करतो, देवाकडून तुम्हास जे बोलावणे झालेले आहे, त्यास योग्य तसे जगावे. सर्व नम्रतेने, सौम्यतेने आणि एकमेकांना सहन करुन प्रेमाने स्वीकारा.
”आणि ख्रिस्तानेही जशी आपल्यावर प्रीती केली आणि देवाला संतुष्ट करणारा सुवास मिळावा म्हणून, आपल्यासाठी ‘अर्पण व बलिदान’ असे स्वतःला दिले, तसे तुम्ही प्रीतीत चाला.
”माझ्या बंधूंनो, माझ्याविषयी ज्या गोष्टी घडल्या त्यांच्यापासून शुभवर्तमानाला अडथळा न होता त्या तिच्या प्रगतीला साधनीभूत झाल्या हे तुम्ही समजावे अशी माझी इच्छा आहे. म्हणजे कैसराच्या हुजुरातीच्या राजवाड्याचे रक्षक व इतर सर्व जणांत, त्यामुळे माझे बंधने ख्रिस्तासंबंधाने आहेत हे सर्वांना प्रसिद्ध झाले; आणि माझ्या बंधनामुळे प्रभूमधील पुष्कळ बंधूंची खातरी होऊन, ते निर्भयपणे वचन सांगण्यात अधिक धीट झाले आहेत.
”कारण माझी उत्कट अपेक्षा व आशा आहे की, मी कशानेही लाजणार नाही तर पूर्ण धैर्याने, नेहमीप्रमाणे आतादेखील जगण्याने किंवा मरण्याने माझ्या शरीराद्वारे ख्रिस्ताचा महिमा होईल.
”कारण मला तर जगणे हे ख्रिस्त आणि मरणे हे लाभ आहे. पण जर मी देहात जगणे हे माझ्या कामाचे फळ आहे; तर, कोणते निवडावे हे मला समजत नाही. कारण मी दोघासंबंधाने पेचात आहे; येथून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असण्याची मला उत्कंठा आहे कारण देहात राहण्यापेक्षा हे अधिक चांगले आहे;
”आणि विरोध करणार्या लोकांकडून कशाविषयीही भयभीत झाला नाही, हे त्यांना त्यांच्या नाशाचे पण तुमच्या तारणाचे प्रमाण आहे व हे देवापासून आहे. कारण त्याच्यावर विश्वास ठेवावा इतकेच केवळ नव्हे, तर ख्रिस्ताच्या वतीने त्याच्याकरता तुम्हास दुःख ही सोसावे अशी कृपा तुमच्यावर झाली आहे.
”आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रकट होऊन त्याने स्वतःला लीन केले आणि त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसले; येथपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले.
”तुमच्या विश्वासाचा यज्ञ व सेवा, होतांना जरी मी अर्पिला जात आहे तरी मी त्याबद्दल आनंद मानतो व तुम्हा सर्वांबरोबर आनंद करतो;
”कारण माझी सेवा करण्यांत तुमच्या हातून जी कसूर झाली ती भरून काढावी म्हणून ख्रिस्त सेवेसाठी त्याने स्वतःचा जीव धोक्यात घातला व तो मरता मरता वाचला.
”कारण आपण जे देवाच्या आत्म्याने देवाची उपासना करतो, जे ख्रिस्त येशूविषयी अभिमान बाळगणारे आणि देहावर विश्वास न ठेवणारे ते आपण सुंता झालेलेच आहोत.
”तरी मला ज्या गोष्टी लाभाच्या होत्या त्या मी ख्रिस्तामुळे हानीच्या अशा समजलो आहे. इतकेच नाही, तर ख्रिस्त येशू माझा प्रभू ह्याच्याविषयीच्या ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे मी सर्वकाही हानी समजतो. त्याच्यासाठी मी सर्व गोष्टींची हानी सोसली आणि मी त्या केरकचरा लेखतो, ह्यासाठी की, मला ख्रिस्त येशू हा लाभ प्राप्त व्हावा. आणि मी त्याच्याठायी आढळावे आणि माझे नीतिमत्त्व माझे स्वतःचे नव्हे म्हणजे नियमशास्त्राच्या योगे मिळणारे नीतिमत्त्व नव्हे तर ते ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे, म्हणजे देवाकडून विश्वासाद्वारे मिळणारे नीतिमत्त्व असे असावे. हे अशासाठी आहे की, तो व त्याच्या पुनरुत्थानाचे सामर्थ्याचे व त्याच्या दुःखांची सहभागिता ह्यांची, त्याच्या मरणाशी एकरूप होऊन, मी ओळख करून घ्यावी. म्हणजे कसेहि करून मी मृतांमधून पुनरुत्थान मिळवावे.
”आपले नागरिकत्व तर स्वर्गात आहे; तेथून प्रभू येशू ख्रिस्त हा तारणारा येणार आहे; त्याची आपण वाट पाहात आहोत. तो ज्या सामर्थ्याने तो सर्वकाही आपल्या स्वाधीन करण्यास समर्थ आहे त्या सामर्थ्यांने तो तुमचे आमचे नीच स्थितीचे शरीर आपल्या गौरवीच्या शरीरासारखे व्हावे म्हणून त्यांचे रूपांतर करील.
”प्रभूमध्ये सर्वदा आनंद करा; पुन्हा सांगतो, आनंद करा.
”कशा हि विषयाची काळजी करू नका पण प्रार्थना आणि विनंती करून आभारप्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा; म्हणजे सर्व बुद्धीसामर्थ्याच्या पलीकडे असलेली देवाची दिलेली शांती तुमची अंतःकरणे व तुमचे विचार ख्रिस्त येशूच्या ठायी राखील.
”तुमच्यासाठी या माझ्या दुःखात मी आनंद करीत आहे आणि आता, ख्रिस्ताच्या दुःखात त्याच्या शरीराकरता जे उणे आहे ते माझ्या देहात मी पुरे करीत आहे आणि त्याचे शरीर मंडळी आहे.
”म्हणून तुम्ही ख्रिस्ताबरोबर उठवले गेला आहात तर ख्रिस्त देवाच्या उजवीकडे जेथे बसला आहे तेथल्या वरील गोष्टी मिळविण्याचा प्रयत्न करा. वरील गोष्टींकडे मन लावा, पृथ्वीवरील गोष्टींकडे लावू नका; कारण तुम्ही मृत झला आहात आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. आपले जीवन जो ख्रिस्त तो प्रकट केला जाईल तेव्हा तुम्हीही त्याच्याबरोबर गौरवात प्रकट केले जाल. तर पृथ्वीवरील तुमचे अवयव म्हणजे जारकर्म, अमंगळपणा, कामवासना, कुवासना व लोभ ह्याला मूर्तिपूजा म्हणावे, हे जिवे मारा.
”प्रभूपासून वतनरूप प्रतिफळ तुम्हास मिळेल तुम्ही हे तुम्हास माहित आहे. प्रभू ख्रिस्ताची सेवा करीत जा.
”तुम्ही फार संकटात असताना पवित्र आत्म्याच्या आनंदाने वचन अंगीकारुन आमचे व प्रभूचे अनुकरण करणारे झाला;
”त्या यहूद्यांनी प्रभू येशूला व संदेष्ट्यांनाही जिवे मारिले आणि आमचा छळ करून आम्हास बाहेर घालविले; ते देवाला संतोषवीत नाहीत व सर्व मनुष्यांचेही विरोधी झाले आहेत;
”तो असा की, या संकटात कोणी घाबरू नये; कारण आपण ह्यासाठीच नेमिलेले आहोत. हे तुम्ही स्वतः जाणून आहात. कारण आम्ही तुम्हाजवळ होतो तेव्हा आम्ही तुम्हास सांगून ठेवले की, आपल्याला संकटे भोगावयाची आहेत आणि त्याप्रमाणे घडलेही, हे तुम्हास माहीतच आहे.
”पण बंधूंनो, मी इच्छीत नाही की, जे मरण पावलेत त्यांच्याविषयी तुम्ही अज्ञानी असावे, म्हणजे ज्यांना आशा नाही अशा इतरांप्रमाणे तुम्ही दुःख करू नये. कारण येशू मरण पावला व पुन्हा उठला असा जर आपण विश्वास ठेवतो, तर येशूमध्ये जे मरतात त्यांनाही देव त्याच्याबरोबर आणील. कारण प्रभूच्या वचनावरून आम्ही तुम्हास हे सांगतो की, आपण जे जिवंत आहोत व जे प्रभूच्या येण्यापर्यंत मागे राहू, ते आपण तोपर्यंत मरण पावलेल्यांच्या पुढे जाणार नाही.
”प्रभू येशू ख्रिस्त आपल्यासाठी याकरिता मरण पावला की, आपण जरी मागे राहिलो किंवा मरण पावलो तरी आपण त्याच्याबरोबर जिवंत रहावे.
”सदोदित आनंद करा. नित्य प्रार्थना करा. प्रत्येक गोष्टींत उपकार माना कारण तुमच्यासंबधी ख्रिस्त येशूमध्ये देवाची इच्छा हीच आहे.
”ह्यावरून तुमच्या सर्व छळांत व तुम्ही जी सहनशीलता व जो विश्वास दाखविता त्याबद्दल देवाच्या मंडळ्यांतून आम्ही स्वतः तुमचा अभिमान बाळगतो. ते देवाच्या योग्य न्यायाचे प्रमाण आहे; तो न्याय हा की, ज्यासाठी तुम्ही दुःख सोशीत आहात त्या देवाच्या राज्याला तुम्ही योग्य ठरले जावे. तुम्हावर संकट आणणाऱ्या लोकांची संकटाने परतफेड करणे आणि संकट सोसणाऱ्या तुम्हास आम्हाबरोबर विश्रांती देणे, हे देवाच्या दृष्टीने न्याय्य आहे, म्हणून प्रभू येशू प्रकट होण्याच्या समयी ते होईल; तो आपल्या सामर्थ्यवान देवदूतांसह स्वर्गातून अग्निज्वालेसहित प्रकट होईल. तेव्हा जे देवाला ओळखत नाहीत व आपल्या प्रभू येशूची सुवार्ता मानीत नाहीत त्यांचा तो सूड उगवील. तेव्हा त्यांना प्रभूच्या समोरून व त्याच्या सामर्थ्याच्या गौरवापासून दूर करण्यांत येऊन सर्वकाळचा नाश ही शिक्षा त्यांना मिळेल. आपल्या पवित्रजनांच्या ठायी गौरव मिळावे म्हणून आणि त्यादिवशी पवित्रजनांच्या ठायी आश्चर्यपात्र व्हावे म्हणून तो येईल कारण आम्ही दिलेल्या साक्षीवर तुम्ही विश्वास ठेवला आहे.
”जे खरे जीवन ते बळकट धरण्यास पुढील काळी चांगला आधार होईल असा साठा स्वतःसाठी करावा.
”कारण देवाने आम्हास भित्रेपणाचा आत्मा दिला नाही तर सामर्थ्याचा, प्रीतीचा व संयमनाचा आत्मा दिला आहे. म्हणून आपल्या प्रभूविषयी साक्ष देण्यासाठी लाज धरु नको किंवा मी जो त्याच्यासाठी कैदी झालो त्या माझी लाज धरू नको. तर सुवार्तेसाठी देवाच्या सामर्थ्याप्रमाणे तू माझ्याबरोबर दुःखाचा वाटा घे. त्याने आम्हास तारले आणि पवित्र पाचारण केले. आम्ही काही सत्कृत्ये केली म्हणून नाही तर त्याच्या स्वतःच्या हेतूने व कृपेने केले. ही कृपा युगाच्या सुरुवातीलाच देवाने ख्रिस्त येशूमध्ये आम्हास दिली होती. पण जी आता आम्हास आमचा तारणारा ख्रिस्त येशू याच्या प्रकट होण्याने दाखवली गेली आहे. ख्रिस्ताने मरणाचा नाश केला आणि सुवार्तेद्वारे अविनाशीपण व जीवन प्रकाशात आणले.
”आणि या कारणामुळे मीसुद्धा दुःख भोगीत आहे. परंतु मी लाजत नाही कारण ज्याच्यावर मी विश्वास ठेवला आहे त्यास मी ओळखतो आणि माझी खात्री पटली आहे की, तो दिवस येईपर्यंत त्याने जे माझ्याकडे सोपवले आहे त्याचे तो रक्षण करील.
”ख्रिस्त येशूचा चांगला सैनिक या नात्याने माझ्याबरोबर दुःख सोस. सैनिकाचे काम करणारा कोणीही जीवनातील संसाराच्या कामकाजात अडकत नाही. यासाठी की त्यास आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्याला संतुष्ट करता यावे.
”माझ्या सुवार्तेप्रमाणे जो मरण पावलेल्यातून उठविलेला दाविदाच्या वंशातला येशू ख्रिस्त, याची आठवण कर. कारण त्या सुवार्तेमुळे मी दुःख सहन करत आहे, येथपर्यंत की गुन्हेगाराप्रमाणे साखळदंडानी मला बांधण्यात आले, पण देवाचे वचन बांधले गेले नाही. ह्यामुळे देवाच्या निवडलेल्यांसाठी मी सर्वकाही धीराने सोशीत आहे, म्हणजे त्यांनाही ख्रिस्त येशूद्वारे मिळणारे तारण व सर्वकाळचे गौरव प्राप्त व्हावे. हे वचन विश्वसनीय आहे की, जर आम्ही त्याच्यासह मरण पावलो, तर त्याच्याबरोबर जिवंतही राहू जर आम्ही दुःख सहन केले तर आम्ही त्याच्याबरोबर राज्यसुद्धा करू जर आम्ही त्यास नाकारले, तर तोसुध्दा आम्हास नाकारील
”तरीही तू माझी शिकवण, वागणूक, जीवनातील माझे ध्येय, माझा विश्वास, माझा धीर, माझी प्रीती, माझी सहनशीलता, माझा झालेला छळ, माझ्यावर आलेली संकटे, ही ओळखून आहेस, अंत्युखिया, इकुन्या आणि लुस्र या शहरांमध्ये ज्या गोष्टी माझ्याबाबतीत घडल्या, जो भयंकर छळ मी सोसला ते माझे दुःख तुला माहीत आहे, परंतु प्रभूने या सर्व त्रासांपासून मला सोडविले. खरे पाहता, जे जे ख्रिस्त येशूमध्ये शुद्ध जीवन जगू इच्छितात, त्या सर्वांचा छळ होईल.
”पण तू सर्व परीस्थितीत सावधानतेने वाग, दुःख सहन कर; सुवार्तेची घोषणा करण्याचे काम कर; देवाने दिलेली सेवा पूर्ण कर. कारण आता माझे अर्पण होत आहे व माझी या जगातून जाण्याची वेळ आली आहे. मी सुयुद्ध केले आहे. मी माझी धाव संपवली आहे. मी विश्वास राखला आहे. आता पुढे माझ्यासाठी जो नितीमत्वाचा मुकुट ठेवला आहे, तो त्यादिवशी नीतिमान न्यायाधीश प्रभू मला देईल आणि केवळ मलाच नव्हे, तर त्याचे प्रकट होणे ज्यांना प्रिय आहे त्या सर्वांनाही देईल.
”पौल, ख्रिस्त येशूचा बंदिवान आणि भाऊ तीमथ्य यांच्याकडून; आमचा प्रिय आणि सोबतीचा कामकरी फिलेमोन ह्यास,
”तरी प्रीतीस्तव विनंती करून सांगणे मला बरे वाटते. मी वृद्ध झालेला पौल आणि आता ख्रिस्त येशूसाठी बंदिवान.
”परंतु आपण येशूला पाहतो, ज्याला काही काळासाठी देवदूतांपेक्षा किंचीत कमी केले होते. आता आम्ही त्याला, त्याने सहन केलेल्या मरणामुळे, गौरव व सन्मान यांचा मुकुट घातल्याचे पाहत आहोत कारण देवाच्या कृपेमुळे येशूने सर्व मानवजातीसाठी मरण सोसले. देव, ज्याने सर्व गोष्टी निर्माण केल्या आणि ज्याच्या गौरवासाठी सर्व गोष्टी आहेत, त्याच्या गौरवाचे भागीदार होण्यासाठी पुष्कळ पुत्र व कन्या आणाव्यात म्हणून देवाने येशूला दुःखसहनाद्वारे परिपूर्ण करून लोकांचा तारणारा बनविले.
”म्हणून मुले रक्त व मांस यांची बनलेली असल्याने तोहि त्यांच्यासारखा रक्तमांसाचा झाला, येशूने हे यासाठी केले की, ज्याच्याकडे मरणाची सत्ता आहे, अशा सैतानाचा मरणाने नाश करावा. आणि जे लोक त्यांच्या सर्व आयुष्यात मरणाचे भय ठेवून त्याचे दास असल्यासारखे जगत होते त्यांना मुक्त करावे.
”म्हणून देवाच्या लोकांसाठी अजूनही विसाव्याचा (शब्बाथ) दिवस आहे. कारण जो कोणी देवाच्या विसाव्याच्या ठिकाणी प्रवेश करतो, तो त्याच्या स्वतःच्या कामापासून विसावा घेतो. ज्याप्रमाणे देवाने त्याच्या कामापासून विसावा घेतला होता. म्हणून त्या विसाव्याच्या ठिकाणी प्रवेश करण्यासाठी आपण होईल तितका प्रयत्न करावा. यासाठी की, कोणीही इस्राएल लोकांनी आज्ञाभंग केल्याप्रमाणे त्यांचे अनुकरण करू नये.
”येशूने आपल्या देहाच्या दिवसात देवाकडे मोठ्याने ओरडून आणि रडून प्रार्थना व विनंत्या केल्या. जो देव त्यास मृत्युपासून वाचवू शकत होता आणि देवाविषयीच्या त्याच्या सदभक्तीमुळे येशूच्या प्रार्थना ऐकण्यात आल्या. जरी तो देवाचा पुत्र होता, तरी त्याने जे दुःख सोसले त्यापासून तो आज्ञाधारकपणा शिकला. आणि नंतर त्यास परिपूर्ण केल्यावर. जे त्याच्या आज्ञा पाळतात त्यांच्यासाठी सार्वकालिक तारणाकर्ता तो झाला
”ते पूर्व काळचे दिवस आठवा, जेव्हा नुकताच तुम्हास सुवार्तेचा प्रकाश प्राप्त होत असता, तेव्हा तुम्ही भयंकर दुःखे सोसली. काही वेळा जाहीरपणे तुमचा अपमान करण्यात आला आणि वाईट शब्द वापरण्यात आले, तर काही वेळा ज्यांना अशा रीतीने वागणूक मिळाली त्यांचे सहभागी व्हावे लागले. जे तुरूंगात होते त्यांना तुम्ही समदुःखी झाला आणि जे तुमच्याकडे होते ते तुमच्याकडून घेण्यात आले तरी तुम्ही आनंदी होता कारण तुमच्याजवळ अधिक चांगली व सर्वकाळ टिकणारी संपत्ती आहे, हे तुम्ही जाणून होता. म्हणून धैर्य सोडू नका, त्याचे प्रतिफळ मोठे आहे.
”हे सगळे विश्वासात टिकून मरण पावले; त्यांना वचनांची प्राप्ती झाली नव्हती. पण त्यांनी ती दुरून बघून त्यांना वंदन केले आणि त्यांनी मानले की, आपण पृथ्वीवर परके आणि प्रवासी आहोत. कारण, असे जे म्हणतात ते स्वतःचा देश मिळवू पाहत आहेत हे ते दाखवतात. आणि खरोखर, ते ज्या देशातून निघाले होते त्याचा ते विचार करीत असते, तर तिकडे परत जाण्याची संधी त्यांना मिळाली असती. पण आता, ते अधिक चांगल्या देशाची म्हणजे स्वर्गीय देशाची इच्छा धरतात, ह्यामुळे आपणाला त्यांचा देव म्हणून घेण्यास देवाला त्यांची लाज वाटत नाही कारण त्याने त्यांच्यासाठी एक नगर तयार केले आहे.
”पापांची क्षणिक सुखे भोगण्यापेक्षा देवाच्या लोकांबरोबर दुःख सोसणे त्याने पसंत केले, आणि ख्रिस्ताप्रीत्यर्थ विटंबना सोसणे हे मिसरातील भांडारापेक्षा मोठे धन मानले; कारण श्रमांबद्दल मिळणाऱ्या वेतनावर त्याची दृष्टी होती. विश्वासाने राजाच्या क्रोधाला न भिता त्याने मिसर देश सोडला; कारण जो अदृश्य आहे त्यास पाहत असल्याप्रमाणे तो ठाम राहिला.
”आता मी अधिक काय सांगू? गिदोन, बाराक, शमशोन आणि इफ्ताह, तसेच दावीद व शमुवेल आणि संदेष्टे यांच्याविषयी मी सांगू लागलो तर मला वेळ अपुरा पडेल. विश्वासाने त्यांनी राज्ये जिंकली, नीतिमत्त्व आचरली, वचने मिळवली, सिंहाची तोंडे बंद केली. त्यांनी अग्नीची शक्ती संपवली, तरवारीच्या धारेपासून ते निभावले, अशक्तपणात सशक्त झाले, युद्धात पराक्रमी झाले, त्यांनी परक्यांची सैन्ये पळवली. कित्येक स्त्रियांना त्यांचे मरण पावलेले, पुन्हा जिवंत होऊन, परत मिळाले आणि कित्येकांनी अधिक चांगले पुनरुत्थान मिळवण्यास आपली सुटका न पतकरल्यामुळे त्यांचे हाल हाल करण्यात आले. आणखी दुसर्यांनी टवाळक्यांचा व तसाच फटक्यांचा, शिवाय बेड्यांचा व बंदिवासाचा अनुभव घेतला. त्यांना दगडमार केला गेला, त्यांना करवतीने कापले, त्यांची परीक्षा केली गेली, ते तरवारीने मारले गेले आणि दुरावलेले, नाडलेले व पीडलेले होऊन ते मेंढरांची व शेरड्यांची कातडी पांघरून भटकले. जग त्यांच्यासाठी लायक नव्हते ते रानांमधून, डोंगरांमधून, गुहांमधून व जमिनीमधील खंदकामधून फिरत राहिले.
”म्हणून, आपण एवढया मोठया साक्षीरुपी मेघाने वेढलेले आहोत म्हणून आपणही सर्व भार व सहज अडवणारे पाप टाकून, आपल्याला नेमून दिलेल्या धावेवरून धीराने धावावे.
”जो आमचे विश्वासात नेतृत्व करतो आणि पूर्णत्वास नेतो त्या येशूवर आपले लक्ष केद्रित करू या. जो आनंद त्याच्यासमोर होता त्यासाठी येशूने वधस्तंभ सहन केला होता. वधस्तंभावरील निंदास्पद मरणाला त्याने तुच्छ मानले आणि आता त्याने देवाच्या राजासनाजवळील उजवीकडे जागा घेतली आहे. तुम्ही खचून जाऊ नये आणि धीर सोडू नये म्हणून ज्याने पापी लोकांचा इतक्या मोठ्या प्रमाणातील विरोध सहन केला, त्याचा विचार करा. तुम्ही पापाविरुद्ध झगडत असता रक्त सांडेपर्यंत अजून प्रतिकार केला नाही.
”म्हणून येशूने सुद्धा स्वतःच्या रक्ताने लोकांस पवित्र करावे यासाठी नगराच्या वेशीबाहेर मरण सोसले, म्हणून आपण छावणीच्या बाहेर जाऊ आणि येशूच्या अपमानाचे वाटेकरी होऊ. कारण स्थायिक असे नगर आपल्याला येथे नाही तरी भविष्यकाळात येणारे जे नगर आहे त्याच्याकडे आपण पाहत आहोत.
”माझ्या बंधूंनो, ज्या ज्या वेळी तुमच्यावर निरनिराळया परीक्षा येतात तेव्हा तुम्ही आनंदच माना. तुम्हास माहीत आहे की, तुमच्या विश्वासाच्या परीक्षेमुळे सहनशीलता निर्माण होते. आणि त्या सहनशीलतेला आपले कार्य पूर्ण करू द्या. यासाठी की तुम्ही प्रौढ, परिपूर्ण व कोणत्याही बाबतीत कमतरता नसलेले असे पूर्ण व्हावे.
”जो परीक्षा सोसतो तो धन्य आहे कारण परीक्षेत उतरल्यावर जो जीवनाचा मुकुट प्रभूने आपल्यावर प्रीती करणाऱ्यांस देऊ केला आहे तो त्यास मिळेल.
”बंधूंनो, जे संदेष्टे प्रभूच्या नावाने बोलले त्यांचे दुःख सहन व धीराविषयी उदाहरण घ्या. त्यांनी दुःखसहन केले म्हणून आपण त्यांना धन्य म्हणतो, हे लक्षात ठेवा. तुम्ही ईयोबाच्या सहनशीलतेविषयी ऐकले आहे आणि प्रभूकडून जो त्याचा शेवट झाला तोसुध्दा पाहिला आहे, तो असा की प्रभू फार दयाळू आणि कनवाळू आहे.
”आणि त्याद्वारे मिळणारे अविनाशी, निर्मळ व अक्षय वतन स्वर्गात तुमच्यासाठी राखून ठेवले आहे, आणि शेवटच्या काळात प्रकट करण्याकरता सिद्ध केलेल्या तारणासाठी तुम्ही देवाच्या सामर्थ्याने विश्वासाद्वारे, राखलेले आहात.
”मनुष्यांनी नाकारलेल्या पण देवाने निवडलेल्या मोलवान अशा जिवंत दगडाकडे तुम्ही येत असता, तुम्हीही जिवंत दगडांप्रमाणे, आत्मिक भवन असे, रचले जात आहात देवाला आवडणारे आध्यात्मिक यज्ञ, येशू ख्रिस्ताद्वारे, अर्पण करण्यासाठी एक पवित्र याजकगण असे उभारले जात आहात.
”कारण ह्यासाठीच तुम्हास पाचारण करण्यात आले आहे; कारण ख्रिस्तानेही तुमच्यासाठी दुःख सोसले आहे; आणि तुम्ही त्याच्या पावलांवरून मागोमाग जावे म्हणून त्याने तुमच्यासाठी कित्ता ठेवला आहे. त्याने पाप केले नाही व त्याच्या मुखात काही कपट आढळले नाही. त्याची हेटाळणी होत असता त्याने फिरून हेटाळले नाही, आणि सोशीत असता त्याने धमकावले नाही; पण देव जो नीतीने न्याय करतो त्याच्या हातात त्याने स्वतःस सोपवले.
”पण, नीतिमत्त्वाकरता तुम्ही सोसले तर तुम्ही धन्य! त्यांच्या भयाने भिऊ नका किंवा अस्वस्थ होऊ नका.
”कारण, आपल्याला देवाकडे आणण्यास ख्रिस्तसुद्धा पापांसाठी, नीतिमान अनीतिमान लोकांसाठी, एकदा मरण पावला. तो देहाने मारला गेला, पण आत्म्याने जिवंत केला गेला.
”प्रियांनो, तुमच्या परीक्षेसाठी, तुमची अग्निपरीक्षा होण्यात तुम्हास काही अपूर्व झाले, असे वाटून त्याचे नवल मानू नका. उलट तुम्ही ख्रिस्ताच्या दुःखात भागीदार होत आहात म्हणून आनंद करा. म्हणजे त्याचे गौरव प्रकट होईल तेव्हाही फार मोठ्या आनंदाने तुम्ही उल्लासित व्हावे. ख्रिस्ताच्या नावाकरता तुमची निंदा होत असेल तर तुम्ही धन्य! आहात कारण गौरवाचा आत्मा म्हणजे देवाचा आत्मा तुमच्यावर येऊन राहिला आहे.
”ख्रिस्ती म्हणून जर कोणाला दुःख सहन करावे लागत असेल तर त्यास लाज वाटू नये; त्या नावामुळे देवाचे गौरव करावे.
”म्हणून जे देवाच्या इच्छेप्रमाणे सोसतात त्यांनी चांगले करीत राहून, जो विश्वासू निर्माणकर्ता आहे त्याच्याहाती आपले जीव सोपवावेत.
”आणि मुख्य मेंढपाळ प्रकट होईल तेव्हा तुम्हास गौरवाचा न कोमेजणारा मुकुट मिळेल.
”म्हणून देवाच्या पराक्रमी हाताखाली लीन व्हा ह्यासाठी की त्याने तुम्हास योग्यवेळी उंच करावे. तुम्ही आपली सर्व चिंता त्याच्यावर टाका, कारण तो तुमची काळजी करतो. सावध रहा; जागृत रहा कारण तुमचा शत्रू सैतान हा गर्जणाऱ्या सिंहाप्रमाणे, कोणाला गिळावे म्हणून शोधीत फिरतो. तुम्ही विश्वासात स्थिर राहून त्याच्याविरुध्द उभे रहा कारण तुम्ही जाणता की, जगात असलेल्या तुमच्या बांधवांवर तशीच दुःखे आणली जात आहेत. पण तुम्हास ज्याने ख्रिस्ताद्वारे, आपल्या सनातन गौरवात बोलावले आहे तो सर्व कृपेचा देव, तुम्ही अल्पकाळ सोसल्यानंतर, स्वतः तुम्हास परिपूर्ण करील, स्थिर करील आणि दृढ करील.
”काईन त्या दुष्टाचा होता व त्याने आपल्या भावाचा वध केला त्याच्यासारखे आपण नसावे. त्याने त्याचा वध कशासाठी केला? कारण काइनाची कृत्ये दुष्ट होती आणि तर त्याच्या भावाची कृत्ये न्यायी होती.
”बंधूनो, जर जग तुमचा व्देष करते तर त्याचे आश्चर्य मानू नका. आपल्याला माहीत आहे की, आपण मरणातून जीवनात गेलो आहोत कारण आपण आपल्या बंधूवर प्रीती करतो. जो प्रीती करत नाही तो मरणात राहतो. जो कोणी आपल्या भावाचा व्देष करतो, तो खुनी आहे आणि तुम्हास माहीत आहे की, खुनी मनुष्याच्या ठायी सार्वकालिक जीवन राहत नाही. ख्रिस्ताने आपल्यासाठी स्वतःचा जीव दिला. यामुळे प्रीती काय आहे ते आपल्याला समजते. म्हणून आपणदेखील आपल्या भावासाठी जीव दिला पाहिजे.
”माझ्या प्रिय मुलांनो, तुम्ही देवाचे आहात आणि त्यांना तुम्ही जिंकले आहे कारण जगामध्ये जो आहे त्याच्यापेक्षां जो तुमच्यामध्ये आहे; तो महान देव आहे.
”कारण प्रत्येकजण जो देवापासून जन्मला आहे तो जगावर विजय मिळवतो आणि ज्याने जगावर जय मिळवला तो म्हणजे आपला विश्वास. येशू हा देवाचा पुत्र आहे असा विश्वास धरणाऱ्याशिवाय जगावर विजय मिळविणारा कोण आहे?
”‘पहा, येशू ढगांसह येत आहे’ प्रत्येक डोळा त्यास ‘पाहील’ ज्यांनी त्यास ‘भोकसले तेसुध्दा त्यास पाहतील पृथ्वीवरील सर्व वंश त्याच्यामुळे आकांत करतील होय’ असेच होईल, आमेन. ‘प्रभू देव जो आहे’, जो होता आणि जो येणार आहे, ‘जो सर्वसमर्थ’ तो म्हणतो ‘मी अल्फा आणि ओमेगा आहे.’
”आणि जो जिवंत तो मी आहे; मी मरण पावलो होतो, पण तरी पाहा, मी युगानुयुग जिवंत आहे! आणि माझ्याजवळ मरणाच्या व मृतलोकाच्या किल्ल्या आहेत.
”आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको! जो विजय मिळवतो त्यास देवाच्या बागेतल्या जीवनाच्या झाडाचे फळ खाण्याचा अधिकार देईन.
”स्मुर्णा येथील मंडळीच्या दूताला हे लिही; जो पहिला आणि शेवटला आहे त्याचे हे शब्द आहेत, जो मरण पावला होता पण पुन्हा जिवंत झाला. तो हे म्हणतो मला तुमचे दुःख आणि गरीबी माहीत आहे. (परंतु तुम्ही धनवान आहात!) ज्या वाईट गोष्टी लोक बोलतात त्याविषयी मला माहीत आहे, ते म्हणतात आम्ही यहूदी आहोत, पण ते तसे नाहीत, ते सैतानाचे सभास्थान आहेत. जे दुःख तुला सहन करायचे आहे त्याविषयी घाबरू नकोस. पहा! मी तुला सांगतो, सैतान तुम्हांपैकी काहींची परीक्षा पाहण्यासाठी तुरुंगांत टाकील आणि तुम्ही दहा दिवस छळ सहन कराल. पण तरीही मरेपर्यंत विश्वासू राहा म्हणजे मी तुम्हास जीवनाचा मुकुट जे आनंत जीवन आहे ते देईन.
”पवित्र आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको, जो विजय मिळवतो त्यास दुसऱ्या मरणाची बाधा होणारच नाही.
”मला माहीत आहे जेथे सैतानाचे राजासन आहे. तेथे तुम्ही राहता. तरीही तुम्ही माझे नाव घट्टपणे धरून राहिला आहात. जेथे सैतान राहतो तेथे माझा विश्वासू साक्षीदार अंतिपा जो तुम्हामध्ये जिवे मारला गेला त्याच्या दिवसातही तू माझ्यावरील विश्वास नाकारला नाहीस.
”पवित्र आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको. जो विजय मिळवतो त्यास मी गुप्त ठेवलेल्या स्वर्गीय्य भोजन म्हणजे मान्न्यातून काही देईन. मी त्यास पांढरा खडा देईन त्यावर नवीन नाव लिहिलेले असेल, ज्याला तो देण्यात येईल त्यालाच ते समजेल.
”जो विजय मिळवतो व शेवटपर्यंत माझी कामे करीत राहतो, त्यास मी ‘राष्ट्रांवर’ अधिकार ‘देईन.’ आणि जसा मातीच्या भांड्यांचा चुराडा करतात तसा तो लोहदंडाने त्यांच्यावर अधिकार गाजवील. जसा पित्याकडून मला अधिकार मिळाला तसा मीसुद्धा त्यास देईल. मी त्यास पहाटेचा तारा देईन. आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको.
”जो विजय मिळवतो, तो अशा रीतीने शुभ्र वस्त्रे परिधान करील, मी त्याचे नाव ‘जीवनाच्या पुस्तकातून’ ‘खोडणारच’ नाही; पण माझ्या पित्यासमोर व त्याच्या दूतांसमोर त्याचे नाव स्वीकारीन, आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको.
”जो विजय मिळवतो त्यास मी माझ्या देवाच्या भवनाचा खांब बनवीन आणि तो कधीही बाहेर जाणार नाही, मी त्याच्यावर माझ्या देवाचे नाव व माझ्या देवापासून स्वर्गातून उतरणारे नवे यरुशलेम, म्हणजे माझ्या देवाची ‘नगरी हिचे नाव’ आणि माझे ‘नवे नाव’ लिहीन. आत्मा मंडळ्यांना काय म्हणतो हे ज्याला कान आहेत तो ऐको.
”ज्याप्रमाणे मी विजय मिळवला आणि माझ्या पित्याच्या राजासनावर बसलो आहे तसा जो विजय मिळवील त्यास मी माझ्या राजासनावर बसण्याचा अधिकार देईन. आत्मा मंडळ्यास काय म्हणतो, हे ज्याला कान आहेत तो ऐको.”
”जेव्हा कोकऱ्याने पाचवा शिक्का उघडला तेव्हा मी, वेदीखाली आत्मे पाहिले, ते आत्मे देवाच्या वचनामुळे व त्यांनी जी साक्ष दिली होती तिच्यामुळे जिवे मारलेल्या लोकांचे आत्मे होते. ते मोठ्याने ओरडून म्हणाले, हे “स्वामी तू पवित्र व सत्य आहेस तू ‘कोठपर्यंत न्यायनिवाडा करणार’ नाहीस आणि पृथ्वीवर राहणाऱ्या लोकांपासून आमच्या ‘रक्ताचा सूड घेणार’ नाहीस?” तेव्हा त्या प्रत्येकास एकएक शुभ्र झगा देण्यात आला आणि त्यास असे सांगण्यात आले की, तुमच्या सोबतीचे दास व तुमचे बंधू तुम्हासारखे जिवे मारले जाणार, त्यांची संख्यापूर्ण होईपर्यंत तुम्ही आणखी थोडा वेळ विसावा घ्या.
”या यानंतर मी पाहिले, तो प्रत्येक राष्ट्र, वंश, लोक व भाषा यांच्यातील कोणाच्याने मोजला जाऊ शकणार नाही एवढा मोठा समुदाय, तो राजासनापुढे व कोकऱ्याच्यापुढे उभा होता. शुभ्र झगे घातलेले आणि त्यांच्या हातात झावळ्या होत्या.
”तेव्हा वडिलातील एकाने मला विचारले हे “शुभ्र झगे घातलेले हे कोण आहेत आणि ते कोठून आले आहेत?” मी त्यास म्हटले, “प्रभू, तुला माहित आहे.” आणि तो मला म्हणाला जे मोठ्या ‘संकटातून’ येतात ते हे आहेत; त्यांनी ‘आपले झगे’ कोकऱ्याच्या समर्पणाच्या ‘रक्तात धुऊन’ शुभ्र केले आहेत. म्हणून ते देवाच्या राजासनासमोर आहेत आणि ते रात्रंदिवस त्याच्या भवनात सेवा करतात. जो ‘राजासनावर बसलेला’ आहे तो आपला मंडप त्यांच्यावर घालील. ते आणखी भुकेले आणि आणखी तान्हेले होणार नाहीत, त्यास सूर्य किंवा कोणतीही उष्णता बाधणार नाही. कारण राजासनाच्या मध्यभागी असलेला कोकरा स्वतः त्यांचा मेंढपाळ होईल, आणि तो त्यांना जीवनाच्या पाण्याच्या झऱ्यांजवळ नेईल; आणि देव स्वतः त्यांच्या डोळ्यातील ‘सर्व अश्रू पुसून टाकील.’
”राष्ट्रे रागावली आहेत परंतु तुझा क्रोधाग्नी आला आहे आणि मरण पावलेल्यांचा न्याय करण्याची वेळ आली आहे आणि तू आपल्या दासांना, तुझ्या संदेष्ट्यांना, पवित्रजनांना आणि जे तुझ्या नावाचे भय धरतात अशा लहानथोरांना वेतन देण्याची वेळ आली आहे. आणि ज्यांनी पृथ्वीचा नाश केला त्यांचा नाश करण्याची वेळ आली आहे.’
”त्यांनी कोकर्याच्या रक्ताद्वारे, आपल्या साक्षीच्या वचनाद्वारे, त्याच्यावर विजय मिळवला आहे. आणि त्यांना मरावे लागले तरी त्यांनी आपल्या जीवावर प्रीती केली नाही.
”तेव्हा अजगर स्त्रीवर रागावला व जे तिच्या संतानातून उरलेले, देवाच्या आज्ञा पाळणारे आणि येशूची साक्ष देणारे त्यांच्याशी लढाई करायला गेला; आणि तो अजगर समुद्राच्या वाळूवर उभा राहिला.
”आणि पवित्र जनांशी लढाई करण्यास व त्यांच्यावर विजय मिळवण्यास त्या पशूला परवानगी देण्यात आली; आणि त्यास प्रत्येक वंश, लोक, भाषा बोलणार्यांवर आणि राष्ट्रांवर अधिकार दिलेला होता.
”दुसऱ्या पशूला, पहिल्या पशूच्या मूर्तीला जीवन देण्याची परवानगी होती. म्हणजे त्या पशूच्या मूर्तीने बोलावे आणि असे करावे की, जितके लोक त्या पशूच्या मूर्तीला नमन करणार नाहीत तितक्यांना जिवे मारले जावे. आणि तो असे करतो की, लहान व मोठे, धनवान व दरिद्री, स्वतंत्र व दास, अशा सर्वांनी आपल्या उजव्या हातावर किंवा कपाळांवर एक खूण घ्यावी, आणि ती खूण म्हणजे त्या पशूचे नाव किंवा त्याच्या नावाची संख्या आहे, त्याच्यावाचून इतर कोणाला काही विकत घेता येऊ नये किंवा विकता येऊ नये. येथे ज्ञानीपणच आहे; ज्याला बुद्धी असेल त्याने पशूच्या संख्येचा हिशोब करावा कारण, ती एका मनुष्याची संख्या आहे आणि त्याची संख्या सहाशे सहासष्ठ आहे.
”जे देवाच्या आज्ञा व येशूचा विश्वास धीराने पालन करतात त्या पवित्र जनांची सहनशीलता येथे आहे. आणि मी स्वर्गातून एक वाणी ऐकली; ती मला म्हणाली, हे लिहीः ‘आतापासून, प्रभूमध्ये मरणारे धन्य आहेत.’ आत्मा म्हणतो, “हो, म्हणजे त्यांना आपल्या कष्टांपासून सुटून विसावा मिळावा कारण त्यांची कामे तर त्यांच्याबरोबर त्यांच्यामागे जातात.”
”आणि मी बघितले की, ती स्त्री पवित्रजनांच्या रक्ताने व येशूसाठी (साक्षीचे रक्त) हुतात्मे झालेल्यांचे रक्त पिऊन मस्त झाली होती आणि तिला बघताच मी मोठा आश्चर्यचकित झालो.
”आणि तुझ्यात ‘दिव्याचा उजेड.’ ह्यापुढे कधी दिसणार नाही; तुझ्यात वराचा आणि वधूचा आवाज ह्यापुढे ऐकू येणार नाही. कारण तुझे व्यापारी हे पृथ्वीचे मोठे लोक होते; आणि तुझ्या जादूटोण्यांनी सर्व राष्ट्रे फसवली गेली. आणि तिच्यात संदेष्ट्यांचे, पवित्रजनांचे आणि पृथ्वीवर जे वधलेले त्या सर्वाचे रक्त सापडले.
”त्याने एक, रक्तात भिजवीलेला झगा घातला होता; आणि ‘देवाचा शब्द’ हे नाव त्यास देण्यात आले आहे; आणि स्वर्गातल्या सेना पांढर्या घोड्यांवर बसून शुभ्र, स्वच्छ, तलम तागाची वस्त्रे परिधान करून त्याच्या मागोमाग जात होत्या.
”तेव्हा ‘मी राजासने बघितली’ व त्यावर जे ‘कोणी बसले होते;’ त्यांच्याकडे ‘न्यायनिवाडा देण्यात आला’ आणि येशूच्या साक्षीसाठी व देवाच्या वचनासाठी ज्यांचा शिरच्छेद झाला होता आणि त्या पशूला किंवा त्याच्या मूर्तीला ज्यांनी नमन केले नव्हते आणि आपल्या कपाळावर किंवा हातावर त्याचा शिक्का मारलेला नव्हता, त्यांचे आत्मे मला दिसले. ते परत जिवंत झाले व त्यांनी ख्रिस्ताबरोबर एक हजार वर्षे राज्य केले. पण ती हजार वर्षे पूर्ण होईपर्यंत बाकीचे मरण पावलेले पुन्हा जिवंत झाले नाहीत. हे पहिले पुनरुत्थान होय. ज्याला पहिल्या पुनरुत्थानात भाग आहे, तो धन्य आणि पवित्र आहे; अशांवर दुसर्या मरणाची सत्ता नाही, तर ते देवाचे आणि ख्रिस्ताचे ‘याजक’ होतील; आणि त्याच्याबरोबर एक हजार वर्षे राज्य करतील.
”‘तो त्यांच्या डोळ्यांतले सर्व अश्रू पुसेल;’ आणि ह्यापुढे मरण राहणार नाही; ‘दुःख, आक्रोश,’ किंवा क्लेशही होणार नाहीत; कारण ‘पहिल्या गोष्टी’ होऊन गेल्या आहेत.” ‘तेव्हा राजासनावर बसलेला’ म्हणालाः पाहा, मी सर्वकाही नवीन करतो आणि तो मला म्हणाला, लिही; कारण ही वचने विश्वसनीय आणि खरी आहेत. आणि तो मला म्हणालाः “या गोष्टी झाल्या आहेत. मी अल्फा आणि ओमेगा, आरंभ आणि शेवट आहे. जो ‘तान्हेला असेल त्यास मी जीवनाच्या’ झर्याचे ‘पाणी फुकट’ देईन.
”जो विजय मिळवतो तो या सर्व गोष्टी वारशाने मिळवील; ‘मी त्यांचा देव होईन आणि तो माझा पुत्र होईल.’
”‘पाहा, मी’ लवकर ‘येत’ आहे आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कामाप्रमाणे देण्यास माझ्याजवळ वेतन आहे, ‘मी’ अल्फा व ओमेगा, ‘पहिला व अखेरचा,’ आरंभ आणि शेवट आहे.
”