22 – चमत्कार

हे सर्वशक्तिमान देवाचे पवित्र शब्द आहेत.
माणसांच्या बोलण्यात आपल्याला रस नसतो.
देवावर प्रेम करणार् या प्रत्येकासाठी... याबद्दल देव असे म्हणतो: चमत्कार.

शीर्ष 3 सर्वात महत्वाचे श्लोक

येशूने आपल्या बारा शिष्यांना आपल्याजवळ एकत्र बोलावले आणि त्याने त्यांना अशुद्ध आत्म्यांवर प्रभुत्त्व दिले व तसेच त्या अशुद्ध आत्म्यांना घालवण्यासाठी, प्रत्येक प्रकारचे आजार व प्रत्येक प्रकारचे व्याधी बरे करण्यासाठी अधिकार दिला.

येशूने उत्तर दिले, “देवावर विश्वास ठेवा. मी तुम्हास खरे सांगतो की, जो कोणी या डोंगराला ‘उपटून समुद्रात टाकाला जा’ असे म्हणेल व तो आपल्या मनात संशय धरणार नाही आपण जे म्हणतो तसे घडेलच असा विश्वास धरील तर त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. म्हणून मी तुम्हास सांगतो तो जे काही तुम्ही प्रार्थनेत मागाल ते मिळालेच आहे असा विश्वास धरा आणि ते तुम्हास मिळेल.

तेव्हा प्रेषितांच्या हातून लोकांमध्ये पुष्कळ चमत्कार व अद्भूते घडत असत. आणि ते सर्व एकचित्ताने शलमोनाच्या द्वारमंडपात जमत असत. आणि अविश्वासी लोकांतला कोणी त्यांच्याशी मिळण्यास धजत नसे; तरी लोक त्यांना थोर मानीत असत, इतकेच नव्हे तर विश्वास धरणारे पुष्कळ पुरूष व स्त्रिया यांचे समुदाय प्रभूला मिळत असत. इतके चमत्कार घडले की लोकांनी दुखणेकऱ्यास उचलुन रस्त्यामध्ये आणले, आणि पेत्र जवळून येत असता त्याची सावली तरी त्यांच्यातील कोणावर पडावी म्हणून त्यांना बाजांवर व पलंगावर ठेवले. आणखी यरुशलेम शहराच्या, आसपासच्या चहूकडल्या गावांतील लोकांचे समुदाय रोग्यास व अशुद्ध आत्म्यांनी पिडलेल्यांस घेउन येत असत.

कॅनोनिकल क्रमातील प्रत्येक श्लोक - 266 परिच्छेद

देवाने आकाश व पृथ्वी निर्माण केली. सुरुवातीला पृथ्वी पूर्णपणे रिकामी होती; पृथ्वीवर काहीही नव्हते. अंधाराने जलाशय झाकलेले होते; आणि देवाचा आत्मा पाण्यावर पाखर घालीत होता नंतर देव बोलला, “प्रकाश होवो” आणि प्रकाश चमकू लागला.

नंतर परमेश्वर देवाने जामिनीतील मातीचा मनुष्य घडवला व त्याच्या नाकपुड्यात जीवनाचा श्वास फुंकला आणि मनुष्य जीवधारी म्हणजे जीवंत प्राणी झाला.

मग फारो योसेफास म्हणाला, “मला स्वप्न पडले आहे, परंतु त्याचा अर्थ सांगणारा कोणी नाही. मी तुझ्याविषयी ऐकले की जो कोणी तुला स्वप्न सांगतो तेव्हा तू लगेच स्वप्नांचा अर्थ सांगतोस.” योसेफ म्हणाला, “मी माझ्या कौशल्याने किंवा हुशारीने स्वप्नांचा अर्थ सांगतो असे नाही, तर केवळ देवालाच हे सामर्थ्थ आहे आणि तो देवच फारोच्या स्वप्नांचा अर्थ सांगेल.”

त्या डोंगरावर त्याने एका जळत्या झुडूपात परमेश्वरच्या दूताला पाहिले. मोशेन असे पाहिले की झुडूप जळत होते परंतु ते जळून खाक होत नव्हते तर जसेच्या तसेच होते. तेव्हा मोशे स्वत:शी म्हणाला, “हे झुडूप जळत असून जळून नष्ट का होत नाही हे मी जरा जवळ जाऊन पाहातो.” मोशे झुडूपाजवळ येत होता हे परमेश्वराने पाहिले. तेव्हा झुडूपातून देवाने मोशेला हाक मारून म्हटले, “मोशे मोशे!”आणि मोशे म्हणाला, “मी इथे आहे.” तेव्हा परमेश्वर म्हणाला, “तू आहेस तेथून झुडूपाजवळ येऊनकोस, तर तुझ्या पायातले पायतण काढ; कारण तू पवित्र भूमिवर उभा आहेस.

परंतु देव मोशेला म्हणाला, “तुझ्या हातात ते काय आहे?”मोशेने उत्तर दिले, “ती माझी काठी आहे.” मग देव म्हणाला, “तुझ्या हातातली तुझी काठी जमिनीवर टाक.”तेव्हा मोशेन तसे केले; आणि त्या काठीचा साप झाला. तेव्हा मोशे घाबरला व त्यापासून बाजूला पळाला. परंतु परमेश्वर मोशेला म्हणला, “तुझा हात पुढे कर व त्या सापाची शेपटी धर.”तेव्हा मोशेने तसे केल्यावर त्या सापाची पुन्हा काठी झाली. मग देव म्हणाला, “ह्याप्रमाणे तुझ्या काठीचा उपयोग कर म्हणजे मग तू इस्राएली पूर्वजांच्या परमेश्वराला म्हणजेच अब्राहामाचा देव, इसहाकाचा देव व याकोबाचा देव. याला भेटलास असा ते लोक विश्वास धरतील.”

मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “मी तुला आणखी एक चिन्ह किंवा पुरावा देतो. तू तुझा हात झग्याच्या आत तुझ्या छातीवर ठेव” तेव्हा मोशेने आपला हात झाग्याच्या आत आपल्या छातीवर ठेवला; मग त्याने आपला हात बाहेर काढला तेव्हा त्यावर बफर्सारखे पांढरे डाग दिसले;असा त्याचा हात बदलून गेला. मग देव म्हणाला, “आता पुन्हा तुझा हात झग्याच्या आत तुझ्या छातीवर ठेव.” तेव्हा मोशेने तसे केले. मग त्याने आपला हात तेथून काढला तेव्हा त्याच्यात बदल होऊन तो पुन्हा पूर्वी सारखा चांगला झाला. मग देव बोलला, “तू तुझ्या काठीचा चमत्कार दाखवल्यावरही जर त्या लोकांनी तुझ्यावर विश्वास ठेवला नाही. तर मग हा हाताचा चमत्कार दाखवल्यावर ते तुझ्यावर विश्वास ठेवतील. हे दोन्ही चमत्कार दाखवल्यावरही त्यांनी जर तुझ्यावर विश्वास ठेवला नाही तर मग नाईल नदीचे थोडे पाणी घे आणि ते जमिनीवर ओत; ओतल्याबरोबर त्याचे रक्त होईल.”

नंतर परमेश्वराने मोशेला सांगितलेल्या सर्व गोष्टी अहरोनाने लोकांस कळवल्या; त्यानंतर मोशेने लोकांसमक्ष चमत्कार करून दाखवले. तेव्हा देवानेच मोशेला पाठवले असल्याबद्दल त्यांची खात्री झाली. देवाने त्यांच्या हालअपेष्टा पाहिल्या आहेत व तो त्याना भेटण्यास आला आहे हे त्यांना माहीत झाले. तेव्हा त्यांनी नमन करून देवाची उपासना केली.

परंतु मी फारोचे मन कठोर करीन. मग मी मिसरमध्ये अनेक चमत्कार दाखवीन. तरीही फारो ऐकणार नाही.

“फारो तुम्हाला मी पाठविल्याचा पुरावा म्हणून एखादा चमत्कार करून तुमचे सामर्थ्य दाखविण्या विषयी विचारील तेव्हा अहरोनाला आपली काठी जमिनीवर टाकण्यास सांग म्हणजे फारोच्या देखत त्या काठीचा साप होईल. तेव्हा मोशे व अहरोन परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे फारोकडे गेले. अहरोनाने आपली काठी जमिनीवर टाकली. तेव्हा फारो व त्याचे सेवक यांच्या देखत त्या काठीचा साप झाला. तेव्हा फारो राजाने आपले जाणते व मांत्रिक बोलावले; तेव्हा मिसरच्या त्या जादूगारांनी आपल्या मंत्रतंत्राच्या जोरावर अहरोनाप्रमाणे केले. त्यांनीही आपल्या काठ्या जमिनीवर टाकल्या तेव्हा त्यांचेही साप झाले परंतु अहरोनाच्या काठीच्या सापाने त्यांचे साप गिळून टाकले.

तेव्हा मोशे व अहरोन यांनी परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे केले. अहरोनाने आपली काठी उगारली नाईल नेदीवर मारली. त्याने हे फारो व त्याचे अधिकारी यांच्यासमोर केले. तेव्हा नदीतल्या सर्व पाण्याचे रक्त झाले. नदीतले मासे मेले व तिला घाण सुटली. त्यामुळे मिसराचे लोक नदीचे पाणी पिऊ शकेनात. अवघ्या मिसरभर रक्तच रक्त झाले. मिसरच्या जादूगारांनी आपल्या मंत्रतंत्राच्या जोरावर तसेच केले. तेव्हा परमेश्वराने संगितल्याप्रमाणे फारोचे मन कठीण झाले. मोशे व अहरोन यांनी केलेल्या चमत्काराकडे फारोने लक्ष दिले नाही; तो मागे फिरला व आपल्या घरी निघून गेला.

मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “जा आणि फारोला सांग, परमेश्वर म्हणतो, ‘माझ्या लोकांना माझी उपासना करण्याकारिता जाऊ दे! जर तू माझ्या लोकांना जाऊ दिले नाहीस तर मी सारा देश बेडकांनी भरून टाकीन व सगळया देशाला पीडीन. नाईल नदीत बेडकांचा सुळसुळाट होईल. बेडूक नदीतून तुझ्या वाड्यात झोपण्याच्या खोलीत. बिछान्यात तसेच तुझ्या सेवकांच्या व अधिकाऱ्यांच्या घरात, भट्ट्यात पाण्यांच्या भांड्यात येतील. ते तुझ्या, तुझ्या सेवकांच्या व लोकांच्या अंगावर चढतील.”‘ मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “अहरोनाला त्याच्या हातातील काठी नद्या, नाले तलाव यांच्यावर उगारण्यास सांग म्हणजे मग बेडूक मिसर देशावर चढून येतील.” मग अहरोनाने मिसरमधील जलाशयांवर आपला हात उगारला तेव्हा बेडूक बाहेर आले आणि त्यांनी अवघा मिसर देश व्यापून टाकला. तेव्हा जादूगारांनी मंत्रतंत्राच्या योगे तसेच केले आणि मिसर देशावर आणखी बेडूक आणले.

मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “अहरोनाला त्याची काठी जमिनीवरील धुळीवर मारण्यास सांग म्हणजे मग अवघ्या मिसर देशभर धुळीच्या उवा बनतील.” त्यांने तसे केले. अहरोनाने आपल्या हातातली काठी जमिनीवरील धुळीवर मारली, आणि त्यामुळे सगव्व्या मिसर देशात धुळीच्या उवा बनल्या; त्या पशूवर व माणसांवर चढल्या. जादुगारांनी त्यांच्या मंत्रतत्रांच्या जोरावर तसेच करण्याचा प्रयत्न केला परंतु धुळीतून त्यांना उवा बनविता आल्या नाहीत; त्या उवा पशूवर व लोकांच्या अंगावर राहिल्या. तेव्हा जादुगारांनी फारोला सांगितले की हा चमत्कार देवाच्या सामर्थ्यानेच झाला आहे. परंतु फारोने मन कठीण केले व त्यांचे म्हणणे ऐकायचे नाकारले आणि परमेश्वराने सांगितल्याप्रमाणेच हे झाले.

मग परमेश्वर मोशेला म्हणाला, “सकाळी लवकर ऊठ; आणि फारो नदीवर जाईल तेव्हा त्याच्याकडे जा. त्याला असे सांग की परमेश्वर म्हणतो, ‘माझी उपासना करण्यासाठी माझ्या लोकांना जाऊ दे! जर तू त्यांना जाऊ देणार नाहीस तर मग तुझ्या घरात, तुझ्यावर, तुझ्या सेवकांवर गोमाशा येतील. अवघ्या मिसर देशातील घरे गोमाशांच्या थव्यांनी भरून जातील. गोमाशांचे थवे अंगणात व जमिनीवरही येतील. परंतु मी इस्राएल लोकांशी मिसरच्या लोकांप्रमाणे वागणार नाही. तर ज्या गोशेन प्रातांत माझे लोक राहतात तेथे एकही गोमाशी असणार नाही. अशा प्रकारे तुम्हाला समजेल की मी परमेश्वर या पृथ्वीवर आहे. तेव्हा उद्या माझ्या लोकांशी वागताना आणि तुमच्या लोकांशी वागताना मी भेद करीन आणि तोच माझा पुरावा असेन.”‘ अशा रीतीने परमेश्वराने जे सांगितले होते त्याप्रमाणे त्याने केले. मिसर देशात गोमाशांचे थवेच्या थवे आले. ते फारोच्या वाड्यात व त्याच्या सेवकांच्या घरात शिरले; ते सगव्व्या देशात पसरले. गोमाशाच्या त्या थव्यांनी देशाची नासाडी केली.

नंतर परमेश्वराने मोशेला फारोकडे जाऊन असे बोलाण्यास सांगितले, “इस्राएलांचा देव परमेश्वर म्हणतो, ‘माझी उपासना करण्याकरिता माझ्या लोकांना जाऊ दे!’ तू जर त्याना जाण्यापासून सतत असाच अडवीत राहशील व त्यांना जाऊ देणार नाहीस. तर शेतावरील पशूंविरुद्ध परमेश्वर आपल्या सामर्थ्याचा वापर करील. परमेश्वर तुझे घोडे, गाढवे, उंट, गुरेढोरे व शेरडेमेंढरे यांना भयंकर आजाराने त्रस्त करील. परंतु तो इस्राएल लोकांच्या व मिसरच्या लोकांच्या पशूत भेद करील; इस्राएल लोकांच्या पशूपैकी एकही पशू मरणार नाही. याकरिता परमेश्वराने वेळही नेमलेली आहे. ह्या देशात उद्या हे सर्व घडून येईल.” दुसऱ्या दिवशी सकाळी मिसरमधील शेतीवरील सर्व पशू मेले. परंतु इस्राएल लोकांच्या मालकीच्या पशूंपैकी एकही मेला नाही. इस्राएल लोकांच्या पशूपैकी एखादा मेला काय हे पाहण्यासाठी फारोने माणसे पाठवली. परंतु त्यांच्या पशूपैकी एकही मेला नाही. तरीपण फारो हट्ट व कठीण मनाचाच राहिला. त्याने इस्राएल लोकांना जाऊ दिले नाही.

नंतर परमेश्वर मोशे व अहरोन यांना म्हणाला, “मोशेने ओंजळभर भट्टीची राख घेऊन फारो देखत आकाशाकडे उधळावी. त्या राखेचा धुरळा बनेल व तो सगव्व्या मिसरभर पसरेल आणि त्याच्या स्पर्शाने माणसांना व गुरांना फोड येऊन गव्ववे होतील.” तेव्हा मोशे व अहरोन यांनी भट्टीतून राख घेतली व ते फारो राजासमोर उभे राहिले. मोशेने ती राख हवेत उधळली आणि त्यामुळे माणसांना व जनावरांना फोड व गळवे येऊ लागली. जादूगार मोशेला तसे करण्यापासून अडवू शकले नाहीत कारण त्यांनाही गळवे आली होती. सर्व मिसरभर ही गळवे आली. परंतु परमेश्वराने फारोचे मन कठीण केले आणि त्याने मोशे व अहरोन यांचे ऐकले नाही, व लोकांना जाऊ दिले नाही. परमेश्वराने पूर्वीच सांगितले होते त्याप्रमाणे हे झाले.

परमेश्वराने मोशेला सांगितले, “तू आपले हात आकाशाकडे उगार आणि मग सर्व मिसरभर गारांच्या वर्षावाला सुरवात होईल. गारांचा मारा सर्व लोकांवर, गुराढोरावर आणि मिसर देशातील सर्व शेतांवर होईल.” तेव्हा मोशेन आपली काठी आकाशकडे उगारली आणि मग परमेश्वराने मेघगर्जना, लखलखणाऱ्या विजा व गारा यांचा पृथ्वीवर वर्षाव केला. अशा प्रकारे परमेश्वराने मिसर देशावर भडीमार केला. गारांचा मारा व त्यासोबत विजांच्या अग्नीचा लोळ जमिनीवर आला. मिसर राष्ट्राची स्थापना झाल्यापासून गारांचे असे भयंकर व वाईट वादळ मिसरवर कधी आले नव्हते. त्या गारांच्या वादळाच्या माऱ्याने मिसरमधील शेतात जे होते ते सर्व नष्ट केले. तसेच माणसे, जनावरे व झाडे झुडपे नष्ट केली; आणि मोठमोठी झाडे मोडून पडली. गारांच्या वर्षावाच्या तडाख्यापासून वाचलेला भाग एकच आणि तो म्हणजे इस्राएली लोक राहात असलेला गोशेन प्रांत; तेथे गारांचा वर्षाव झाला नाही. फारोने मोशे व अहरोन यांना बोलावून आणले व त्यांना सांगितले, “ह्यावेळी मी पाप केले आहे. परमेश्वराचे खरे आहे; मी व माझे लोक, आम्ही चुकलो आहोत.

मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “आपली काठी मिसर देशावर उगार म्हणजे मग मिसरवर टोळ धाड येईल! ते टोळ मिसर देशभर पसरतील आणि पाऊस व गारा यांच्या सपाट्यातून वाचलेल्या वनस्पती खाऊन टाकतील.” मग मोशेने आपल्या हातातील काठी मिसर देशावर उगारली तेव्हा परमेश्वराने एक दिवसभर व रात्रभर पूर्वेकडून वारा वाहविला, तेव्हा सकाळी वाऱ्याबरोबर टोळच टोळ आले. ते उडत आले व अवघ्या मिसर देशभर जमिनीवर पसरले. इतके टोळ ह्यापूर्वी मिसर देशावर कधी आले नव्हते व इतके येथून पुढेही कधी येणार नाहीत. त्या टोळांनी सर्व जमीन झाकून टाकली, आणि त्यांच्या आकाशात उडण्यामुळे सर्व देशभर अंधार पडला. गारांच्या तडाख्यातून वाचलेल्या वनस्पती आणि झाडावरील वाचलेली फळे त्यांनी खाऊन फस्त केली; आणि मिसरमधील कुठल्याच झाडांझुडपांवर एकही पान राहिले नाही. फारोने तातडीने मोशे व अहरोन यांना बोलावून आणले. तो म्हणाला, “मी तुमचा देव परमेश्वर ह्याच्या विरुद्ध व तुमच्या विरुद्ध पाप केले आहे.

मग परमेश्वराने मोशेला सांगितले, “तू आपला हात आकाशात उंच कर म्हणजे अवघा मिसर देश अंधारात गडप होईल तो अंधार इतका दाट असेल की तुम्हाला चाचपडत जावे लागेल.” तेव्हा मोशेने तसे कले आणि अंधाऱ्याढगाने अवघ्या मिसरदेशाला तीन दिवस गडप केले. कोणालाही दुसरे काहीही दिसेना आणि म्हणून कोणीही उठून तीन दिवस कोठेह गेले नाही; परंतु इस्राएल लोक जेथे राहात होते त्या सर्व भागावर म्हणजे गोशेन प्रांतात सर्वत्र भरपूर प्रकाश होता.

मध्यरात्री परमेश्वराने मिसरमधील सर्व प्रथम जन्मलेले मुलगे. म्हणजे मिसरदेशाचा राजा फारो याच्या थोरल्या मुलापासून तर तुरुंगात पडलेल्या कैद्याच्या थोरल्या मुलापर्यत सर्व मुलांना तसेच पशूंच्या प्रथम जन्मलेल्या सर्व नरांना मारून टाकले. त्या रात्री अवघ्या मिसर देशातील अगदी प्रत्येक घरातून एक ना एकजण तरी मरण पावला. फारो राजा, त्याचे सेवक आणि मिसरचे लोक मोठमोठ्याने रडून शोक करु लागले. तेव्हा रात्रीच्या रात्रीच फारोने मोशे व अहरोन यांना बोलावून आणले, फारो त्यांना म्हणाला, “आता उठा आणि आमचे लोक सोडून निघा, तुम्ही म्हटल्याप्रमाणे तुम्ही व तुमचे लोक निघून जा आणि तुमच्या परमेश्वराची उपासना करा. आणि तुम्ही म्हणल्याप्रमाणे तुमची शेरमेढरे, व गुरेढोरे ही तुमच्या बरोबर घेऊन जा. येथून निघा! आणि जाताना मलाही आशीर्वाद द्या!” मिसरच्या लोकांनी सुद्धा इस्राएल लोकांना घाईकरून लवकर निघून जाण्यास सांगितले; कारण ते म्हणाले, “तुम्ही जर येथून निघून जाणार नाही तर आम्ही सर्वजण मरून जाऊ!”

इस्राएल लोकांना घेऊन जाण्यासाठी नेहमीप्रमाणे त्यांच्या पुढे चालणारा परमेश्वराचा दूत इस्राएल लोकांच्या मागे जाऊन उभा राहिला, तेव्हा तो उंच मेघस्तंभ इस्राएल लोकांच्या आघाडीवरून त्यांच्या पिछाडीस गेला. अशा रीतीने तो उंच ढग मिसरचे लोक व इस्राएल लोक यांच्यामध्ये उभा राहिला; तेव्हा इस्राएल लोकांना प्रकाश मिळाला परंतु मिसरच्या लोकांभोंवती अंधार राहिला; त्यामुळे त्या रात्री मिसरचे लोक इस्राएल लोकांना गाठण्यासाठी जराही त्यांच्या जवळ जाऊ शकले नाहीत. मग मोशेने तांबड्या समुद्रावर आपला हात उगारला व परमेश्वराने पूर्वेकडून जोराचा वारा वाहावयास लाविला. तो रात्रभर वाहिला. तेव्हा समुद्र दुभंगला आणि त्यातील मार्ग वाऱ्यामुळे सुकून कोरडा झाला. आणि इस्राएल लोक कोरड्या वाटेवरून भर समुद्रातून पार गेले. समुद्राचे पाणी त्यांच्या उजव्या व डाव्या बाजूला भिंती सारखे उभे राहिले. त्यानंतर फारोचे सर्व घोडे, रथ व स्वार यांनी समुद्रातून इस्राएल लोकांचा पाठलाग केला. तेव्हा त्या दिवशी भल्या पहाटे परमेश्वराने मेघस्तंभातून व अग्नीस्तंभातून खाली मिसरच्या सैन्याकडे पाहिले आणि त्यांचा गोंधळ उडवून त्यांचा पराभव केला. रथांची चाके रुतल्यामुळे रथावर ताबा ठेवणे मिसरच्या लोकांना कठीण झाले; तेव्हा ते मोठ्याने ओरडून म्हणाले, “आपण येथून लवकर निघून जाऊ या! कारण परमेश्वर इस्राएलच्या बाजूने आम्हाविरुद्ध लढत आहे.” नंतर परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुझा हात समुद्रावर उगार म्हणजे भिंतीसारखे उभे राहिलेले पाणी खाली पडून एकत्र होईल व ते फारोचे घोडे, रथ व स्वार यांना बुडवून टाकील.” म्हणून दिवस उजाडण्याच्या आत मोशेने आपला हात समुद्रावर उगारला तेव्हा पाणी पहिल्यासारखे समान पातळीवर आले; तेव्हा मिसरच्या लोकांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला परंतु परमेश्वराने त्यांना पाण्यात बुडवून टाकले. पाणी पूर्ववत झाले व त्याने घोडे, रथ व स्वारांना गडप केले आणि इस्राएल लोकांचा पाठलाग करणाऱ्या सर्व सैन्याचा नाश झाला, त्यातले कोणीही वाचले नाही. परंतु इस्राएली लोक कोरड्या भूमिवरुन भरसमुद्र ओलांडून पार गेले. ते पाणी त्यांच्या उजव्या व डाव्या हाताला भिंतीप्रमाणे उभे राहिले.

परमेश्वर म्हणाला, “तुम्ही तुमचा देव परमेश्वर ह्याच्या आज्ञा पाळा; ज्या गोष्टी चांगल्या आहेत असे तो म्हणतो त्या तुम्ही करा; जर तुम्ही तुमच्या परमेश्वराच्या आज्ञा व विधी पाळाल तर तुम्हाला मिसरच्या लोकाप्रमाणे पीडा भोगाव्या लागणार नाहीत आणि मी जो परमेश्वर त्या मी मिसरच्या लोकांवर जे रोग पाठवले ते तुम्हांवर पाठविणार नाही; मी परमेश्वर आहे; तुम्हाला बरे करणारा मीच आहे.”

परमेश्वर म्हणाला, “माझे ऐका!” तुमच्यातील संदेष्ट्यांना मी परमेश्वर दृष्टांतातून दर्शन देतो, मी त्यांच्याशी स्वप्नात बोलतो

मी मिसर देशातून ज्या लोकांना बाहेर काढले त्यांच्यापैकी कोणीही कनान देश कधीही बघणार नाही. त्या लोकांनी मिसर देशात माझा पराक्रम आणि मी केलेल्या महान गोष्टी पाहिल्या. आणि वाळवंटात ज्या महान गोष्टी मी केल्या त्याही त्यांनी बघितल्या. परंतु त्यांनी माझी आज्ञा पाळली नाही आणि माझी दहादा परीक्षा पाहिली.

मग तुम्ही जवळ आलात व पर्वताच्या पायथ्याशी उभे राहिलात. तेव्हा डोंगर उभा पेटला होता व त्याच्या ज्वाळा आकाशाला भिडल्या होत्या. सर्वत्र काळेकुट्ठ ढग आणि अंधार पसरला होता. परमेश्वर त्या अग्नीतून तुमच्याशी बोलला. तुम्हाला आवाज ऐकू आला पण दिसले काहीच नाही. फक्त वाणी ऐकू आली. परमेश्वराने आपला पवित्र करार तुम्हाला सांगितला. त्याने तुम्हाला दहा आज्ञा सांगितल्या व त्यांचे पालन करण्याविषयी तुम्हाला आज्ञा दिली. त्याने त्या आज्ञा दोन दगडी पाट्यांवर लिहून दिल्या.

साक्षात अग्नीमधून देव तुमच्याशी बोलला, ते तुम्ही ऐकले आणि तरीही तुम्ही जिवंत आहात. असे कधी दुसऱ्या राष्ट्राच्या बाबतील घडले आहे? दुसऱ्या राष्ट्रात जाऊन त्यातून एक राष्ट्र आपलेसे करायचे असा दुसऱ्या कुठल्या परमेश्वराने प्रयत्न तरी केला आहे का? नाही ना? पण आपल्या परमेश्वर देवाने या महान गोष्टी केल्याचे तुम्ही स्वत: पाहिले आहे. त्याने आपले सामर्थ्य व प्रताप तुम्हाला दाखवले आहेत. कसोटी पाहणाऱ्या प्रसंगांतून तुम्ही गेलात. तुम्ही अनेक चमत्कार व नवलपूर्ण गोष्टी पाहिल्यात. तसेच युद्ध आणि भयानक घटनाही पाहिल्यात.

त्याने मिसरी लोक, फारो व त्याचे कुटुंब यांच्याविरुद्ध मोठे प्रभावी चमत्कार करुन दाखवले ते आम्ही प्रत्यक्ष पाहिले आहेत.

परमेश्वर सर्व आजार काढून टाकील. मिसर देशात तुम्हाला माहीत असलेली कोणतीही भयंकर रोगराई इथे होणार नाही. हे रोग परमेश्वर तुमच्या शत्रूंवर आणील.

त्यांच्यावर कशी भयंकर संकटे आणली, काय चमत्कार केले हे तुम्ही पाहिलेले आहे. तुम्हाला मिसरबाहेर काढतानाचे त्याचे प्रताप व सामर्थ्य तुम्हाला माहीत आहेत. ज्या लोकांची तुम्हाला भीती वाटते आहे त्यांच्याविरुध्द तुमचा देव परमेश्वर असेच सामर्थ्य वापरील.

परमेश्वराने तुम्हाला लीन केले, तुमची उपासमार होऊ दिली आणि मग, तुम्ही अन् तुमचे पूर्वज यांना माहीत नसलेला मान्ना तुम्हाला खाऊ घातला. माणूस फक्त भाकरीवर जगत नाही तर परमेश्वराच्या मुखातील वचनाने जगतो हे तुम्हाला कळावे म्हणून त्याने हे सर्व केले. गेल्या चाळीस वर्षात तुमचे कपडे झिजले-फाटले नाहीत की तुमचे पाय सुजले नाहीत. का बरे? कारण परमेश्वराने तुमचे रक्षण केले.

इस्राएलला मोशे सारखा दुसरा संदेष्टा मिळाला नाही. परमेश्वराला मोशेचा प्रत्यक्ष परिचय होता. मिसरमध्ये महान चमत्कार करुन दाखवायला परमेश्वराने मोशेला पाठवले. मिसरमध्ये फारो, त्याचे सेवक व सर्व लोकांनी हे चमत्कार पाहिले. मोशेने करुन दाखवले तसे चमत्कार व आश्चर्यकारक गोष्टी दुसऱ्या कोणा संदेष्ट्याने करुन दाखवल्या नाहीत. इस्राएलच्या सर्व लोकांनी त्याची ही कृत्ये पाहिली.

लोक यार्देनेपलीकडे जाण्यासाठी आपल्या डेऱ्यांतून निघाले तेव्हा कराराचा कोश वाहणारे याजक लोकांपुढे चालले. कोश वाहणारे यार्देनेपाशी येऊन पोहचले आणि कोश वाहणाऱ्या याजकांचे पाय कडेच्या पाण्यात बुडाले. (सुगीच्या दिवसात यार्देन नदी दुथडी भरून वाहत असते). तेव्हा जे पाणी वरून वाहत येत होते ते बऱ्याच अंतरावर म्हणजे सारतानाजवळील आदाम नगरापाशी साठून चडलें व त्याची राम झाली, आणि जे पाणी अराबाचा समुद्र म्हणजे क्षारसमुद्र ह्याकडे जात होतें तें अगदीं वाहून गेलें; मग ते लोक यरीहोसमोर पार उतरून गेले. परमेश्वराच्या कराराचा कोश वाहणारे याजक यार्देनेच्या मध्यभागी कोरड्या जमिनीवरून पार निघून गेले. अशा प्रकारें सारे राष्ट्र यार्देनेपलीकडे गेलें

सातवा दिवशी अगदी पहाटेस उठून त्यांनी अशाच प्रकारें त्या नगरला सात प्रदेक्षिणा घातल्या; त्या दिवशी मात्र त्यांनी त्या नगरला सात प्रदेक्षिणा घातल्या. सातव्या वेळी याजक रणशिंगें फुंकीत असताना यहोशवा लोकांना म्हणाला, जय घोष करा, कारण परमेश्वराने हे नगर तुमच्या हाती दिले आहे; हे नगर व ह्यांत जें काही असेल तें सर्व परमेश्वराला समर्पित करावे; मात्र राहाब वेश्येला आणि जे कोणी तीच्याबरोबर तिच्या घरी असतील त्यांना जिवंत ठेवावें, कारण आपण पाठविलेल्या जासुदांना तिनें लपवून ठेवलें होतें. तुम्ही मात्र समर्पित वस्तूंपासून सर्वथा दूरच राहा; त्या समर्पित झाल्यावर त्यातली एखादी वस्तू तुम्ही घ्याल तर इस्राएलाच्या छावणीवर शाप आणून तिला संकटांत घालाल. पण सर्व सोनें, रूपें आणि तांब्याची व लोखंडाचीं पात्रें परमेश्वराप्रीत्यर्थ पवित्र होत; ती परमेश्वराच्या भांडारात जमा केली पाहिजेत. तेव्हां लोकांनी जयघोष केला आणि रणशिंगें वाजत राहिलीं रणशिंगांचा आवाज ऐकतांच लोकांनी मोठ्याने जयघोष केला आणि तट जागच्याजागी कोसळला; लगेच लोकांनी आपआपल्यासमोर त्या नगरात सरळ चालून जाऊन तें हस्तगत केलें.

परमेश्वराने अमोऱ्यांना इस्राएल लोकांच्या हातीं दिलें त्या दिवशी यहोशवा परमेश्वराशी बोलला; इस्राएलासमक्ष तो असें म्हणाला. हे सूर्या, तूं गीबोनावर स्थिर हो; हे चंद्रा, तूं अयालोनाच्या खोऱ्यावर स्थिर हो. तेव्हा राष्ट्रानें आपल्या शत्रूंचे पुरें उसनें फेडीपर्यंत सूर्य स्थिर झाला आणि चंद्र थांबला. याशाराच्या ग्रंथात हि कथा लिहिली आहे ना? सूर्य आकाशाच्या मधोमध सुमारें एक संपूर्ण दिवस थांबला; त्यानें अंस्तास जाण्याची घाई केली नाहीं.

यानंतर शामशोन आणि त्याचे आईबाप खालीं तिमनाथास जात होते, आणि तिमनाथांतल्या द्राक्षमळ्यांपर्यंत पोहंचले असतां पाहा, सिंहांतला तरणा सिंह त्याजवर येऊन गर्जला. तेव्हां परमेश्वराच्या आत्माने त्याला व्यापिलें, यास्तव त्याच्या हातीं काहीं नसतांहि त्याने जसें करडूं फाडावें, तसें त्याला फाडून टाकिलें; परंतु आपण जे केलें होतें तें त्याने आपल्या आईबापांस सांगितलें नाहीं.

नंतर ज्या दोन मधला खांबांवर घर राहिलेलें, आणि ज्यांचा आधार पावलेलें होतें, त्यांतला एक शाम्शोनाने आपल्या उजव्या हाताने आणिं दुसरा आपल्या डाव्या हाताने घरीला. तेव्हां शाम्शोन बोलला, "पालिष्ट्यांच्यासंगतीं माझा जीव जावो;" मग तो वळाने लवला, आणि तें घर त्या अधिकाऱ्यांवर व त्यांतल्या सर्व लोकांवर पडलें; असें तो जिवंत असतांना त्याने जे मारिले होते, त्यांपेक्षा आपल्या मरणकाळीं जे मारिले ते अधिक झाले.

आणि पलिष्टयांनीं देवाचा कोश घेतला, तो त्यांनी दागोनाच्या देवळात नेऊन दागोनाच्याजवळ ठेवला. मग अस्दोदकर दुसऱ्या दिवशी पहाटेस उठले तेव्हां पाहा, यहोवाच्या कोशापुढें दागोन भूमीवर पालथा पडला आहे. तेव्हा त्यांनी दागोन उचलून घेउन त्याच्या ठिकाणी परत ठेवला. मग ते दुसऱ्या दिवशी पहाटेस उठल्यावर पाहा, यहोवाच्या कोशापुढे दागोन भूमीवर पालथा पडला आहे,आणि दागोनाचें डोकें व त्याच्या हाताचे दोन्ही पंजे तोडलेले उंबऱ्यावर पडले आहेत;दागोनाचे धड तेवढें त्याला राहिले होतें.

मग अश्दोदकरेवर यहोवाचा भारी हात ढाला व त्यानें त्यांचा नाश केला, म्हणजे अश्दोदाला म त्याच्या सीमेला मूळव्याधीकडून हाणलें. तेव्हां अश्दोदकर हें पाडून म्हणाले,इस्त्राएलाच्या देवाचा कोश आम्हामध्यें राहू नये, कारण त्याचा हात आम्हांवर व आमच्या दागोन देवावर भारी झाला आहे. मग त्यांनीं माणसे पाठवून पलिष्ट्यांच्या सर्व सरदारांना आपणाकडे एकवट करून म्हटलें, इस्त्राएलाच्या देवाच्या कोशाचे आम्दी काय करावे? ते बोलले,इस्त्राएलाच्या देवाचा कोश गथाला न्यावा,मग त्यांना इस्त्राएलाच्या देवाचा कोश तेथे नेला. मग असें झाले कीं, त्यामनी तो तेथें नेल्यावर, त्या नगरातीलीं सहान मोठीं माणसें हाणली आणि त्यांना मूलव्याधी सागला. मग त्यांनी देवाचा कोश एक्रोनाला पाठवला; आणि असें झालें की, देवाचा कोश एक्रोन येथें आला तेव्हा एक्रोनकर ओरडून बोलले, आम्हांला व आमच्या लोकांना मारायला इस्त्रालाच्या देवाचा कोश त्यांनी आमच्याकडे आणला आहे. मग त्यांनी माण, पाठवून पलिष्ट्यांच्या सर्व सरदांना एकवट करून म्हटलें, इस्त्रेलाच्या देवाचा कोश पाठवून द्या;त्यानें आम्हाला व आमच्या लोकांना मारू नये म्हणून त्यानें आपल्या ठिकाणीं परत जावें.कारण सर्व नगरास मारक उपद्रव झाला होता;तेथें देवाचा हात फार भारी झाला होता. आणि जी माणसें मेली नाहीत त्यांस मूळव्याधीनं हाणलें, आणि नगराचा आकांत वर आकाशाकडे गेला.

मग त्यानें बेथ-शेमेशाच्या मनुष्यांना मारलें, कारण त्यांनी यहोवाच्या कोशाच्या आंत पाहिलें होतें; त्याने लोकांतील पन्नास हजार आणि सत्तर जण हाणले, आणि यहोवानें लोकांना मोठ्या वधानें हाणलें, यामुळे लोकांनी शोक केला. तेव्हा बेथ-शेमेशाची माणसे बोलली, हा पवित्र देव यहोवा याच्यासमोर कोणाच्यानें उभे राहवेल? त्याने आम्हांपासून वरती कोणाकडेजावे?

मग शा उलाला म्हटले तुझा सेवक त्याच्या बापाची बकरे राखत होता,तेव्हा एक सिंह व एक अस्वल यांनी येऊन एक बक्रू एक कळपातून घेतले. मग मी त्यःच्या पाठीस लागून त्याला मारले आणि ते बक्रू त्याच्या मुखातून काढले,आणि जेव्हां तो माज्या अंगावर आला तेव्हां मी त्याची दाढी धरून त्याला ठार मारले. तुझ्या चाकाराने सिंह व अस्वल यांसही जीवे मारिले,आणि हा असुंती पालीष्टी त्यांतील एकासारीखा होईल,कारण की त्यांनी जिवंत देवाच्या सैन्याची निंदा केली आहे. आणखी दाविदाने म्हटले की पर्मेह्स्वार त्याने तो सिंह व अस्वल यांच्या पंज्यापासून मला राखिले तो या पालीष्ट्याच्या हातापासून मला राखील. मग शाउलने म्हटले जा परमेश्वर तुझ्या संगती असो.

दाविदाने पालीष्ट्याला म्हटले तू तरवार व भला व ढाल यास घेऊन मजपाशी येतोस परंतु मी सैन्यांचा परमेश्वर इस्रायेलच्या सैन्यांचा देव ज्याची निंदा तू केली त्याच्या नामाने तुझ्याजवळ येतो. परमेश्वर ह्या दिवशी तुला माझ्या हाती देईल. आणि मी तुला जीवे मारील आणि तुझा मस्तक छेदिल आणि पालीष्ट्यांच्या सैन्यांची प्रेते आकांशातील पाखरे व रानातील श्वापदे यास मी या दिवशी देईल. तेव्हा अवघी पृथ्वी जाणेल कि इराएल मधेय देव आहे. आणि हा सर्व समुदाय जाणेल कि तरवार व भाला यान कडून परमेश्वर संरक्षण करीत नाही, कारण कि लढाई परमेश्वराकडे आहे आणि तो तुम्हास आमच्या हाती देईल. मग असे झाले कि तो पालीष्टी उठून दाविदा जवळ पोहंचला असता दावीद उताविळी करून पलीष्टीयाला भिडयास सैन्याकडे धावला. आणि दाविदाने आपला हात पिशवीत घालून तेथून एक धोंडा काढून गोफणीने मारिला, आणि तो धोण त्याच्या कपाळात बुडून तो झामिनीवर पालथा पडला. तसे दविडने गोफण व धोंडा या कडून पलीष्ट्याला जिंकले,आणि त्याचा पराभव करून त्याला मारिले.परंतु दाविदाच्या हाती तरवार नव्हती. तेव्हा दावीद धावून त्या पलीष्ट्यापाशी उभा राहिला आणि त्याची तरवार धरून तिच्या मेनातून काढिली,आणि तीज्कडून त्याचे डोके कापून त्याला ठार मारले. मग आपला युध्वीर मेला आहेद हे पाहून पालीष्टी पळाले.

ते सर्व नाखोनच्या खळ्यापाशी आले तेव्हा बैल अडखळल्याने कोश गाडीतून पडायला लागला. तेव्हा उज्जाने तो सावरला. पण परमेश्वराचा त्याच्यावर कोप होऊन उज्जाला मरण आले. पवित्र कोशाला स्पर्श करुन त्याने देवाविषयी अनादर दाखवला. तेव्हा करार कोशाशेजारीच उज्जा गतप्राण झाला.

गिलादमधील तिश्बी या गावात एलीया हा संदेष्टा होता. एलीया अहाब राजाला म्हणाला, “मी इस्राएलच्या परमेश्वर देवाचा सेवक आहे. त्याच्या सामर्थ्यावर मी हे सांगतो की येती काही वर्षे पाऊसच काय दंवसुध्दा पडणार नाही. पाऊस पडलाच तर माझ्या आज्ञेने पडेल.”

तेव्हा ती बाई म्हणाली, “परमेश्वर देवाची शपथ सांगते, माझ्याकडे भाकर अजिबात नाही. थोडेसे पीठ शिल्लक आहे. आणि बरणीच्या तळाला थोडेसे तेल आहे. इथे मी सरपण गोळा करायला आले. ते घेऊन मी घरी जाईन, स्वयंपाक करीन तो शेवटचाच. माझा मुलगा आणि मी जेवू आणि मग भुकेने मरु.” तेव्हा एलीया तिला म्हणाला, “काही काळजी करु नकोस. घरी जा आणि आत्ता म्हणालीस त्याप्रमाणे स्वयंपाक कर. पण आधी जे पीठ शिल्लक आहे त्याची लहानशी भाकर करुन मला आणून दे मग तुमच्या दोघांचा स्वयंपाक कर. इस्राएलचा परमेश्वर देव म्हणाला आहे, “तुझ्या डब्यातील पीठ कधी सरणार नाही. तुझ्या बरणीत नेहमीच तेल असेल. पुन्हा परमेश्वर पृथ्वीवर पाऊस पाडेपर्यंत असे चालेल.” तेव्हा ती घरी गेली. एलीयाच्या सांगण्याप्रमाणे तिने केले. एलीया, ती आणि तिचा मुलगा यांना बरेच दिवसपर्यंत पुरेसे खायला मिळत गेले. पीठ आणि तेल कधीच संपले नाही. एलीयाला परमेश्वराने जे सांगितले त्याप्रमाणेच हे घडत गेले.

काही दिवसांनंतर या बाईचा मुलगा आजारी पडला. त्याचे दुखणे वाढत गेले शेवटी त्याचा श्र्वास थांबला. तेव्हा ती बाई म्हणाली, “एलीया, तू तर संदेष्टा आहेस मला तुझी काही मदत होईल का? की माझ्या पापांची आठवण द्यायलाच तू आला आहेस? की माझ्या मुलाला मारायला आला आहेस?” एलीया तिला म्हणाला, “तुझ्या मुलाला माझ्याकडे आण.” मग त्याने त्या मुलाला घेतले आणि वरच्या मजल्यावर तो गेला. आपल्या खोलीत, आपल्या बिछान्यावर त्याने त्याला ठेवले. एलीयाने मग प्रार्थना केली, “परमेश्वर देवा, या विधवेने मला तिच्या घरी आश्रय दिला आहे. तिच्यावर ही वेळ का आणतोस? तिच्या मुलाला तू मारणार का?” मग एलीयाने तीनदा त्याच्यावर पाखार घातल्यासारखे करुन प्रार्थना केली, “परमेश्वर देवा याला वाचव.” एलीयाच्या हाकेला परमेश्वराने उत्तर दिले. मुलाचा श्र्वासेच्छवास पुन्हा झाला तो जिवंत झाला. एलीयाने मुलाला खाली आणले. त्याच्या आईकडे त्याला सोपवून एलीया म्हणाला, “बघ, तुझा मुलगा जिवंत आहे.” ती बाई म्हणाली, “तू खरोखरच देवाचा माणूस आहेस हे मला पटले. खरोखरच परमेश्वर तुझ्यामार्फत बोलतो हे आता मला कळले.”-

परमेश्वराच्या सन्मानार्थ हे दगड वेदीच्या डागडुजीसाठी एलीयाने वापरले. मग त्याने वेदीभोवती एक चर खणला. सात गंलन पाणी मावण्याइतकी त्याची खोली आणि रुंदी होती. एलीयाने मग वेदीवर लाकडे रचली. गोऱ्हा कापला. त्याचे तुकडे लाकडावर ठेवले. मग तो म्हणाला, “चार घागरी भरुन पाणी घ्या आणि ते मांसाच्या तुकड्यावर आणि खालच्या लाकडांवर ओता.” ते झाल्यावर दुसऱ्यांदा आणि मग तिसऱ्यांदा त्याने तसेच करायला सांगितले. वेदीवरुन वाहात जाऊन ते पाणी खालच्या चरात साठले. दुपारच्या यज्ञाची वेळ झाली. तेव्हा संदेष्टा एलीया वेदीपाशी गेला आणि त्याने प्रार्थना केली, “परमेश्वरा, अब्राहाम, इसहाक आणि याकोब यांच्या देवा, तूच इस्राएलचा देव आहेस हे तू आता सिध्द करुन दाखवावेस अशी माझी तुला विनंती आहे. हे सर्व तूच माझ्याकडून करवून घेतलेस हे यांना कळू दे. मी तुझा सेवक आहे हे ही कळू दे. हे परमेश्वरा, माझ्या विनवणीकडे लक्ष दे. तूच खरा परमेश्वर देव आहेस हे यांना दाखव. म्हणजे तू त्यांना पुन्हा स्वत:जवळ घेत आहेस हे त्यांना पटेल.” तेव्हा परमेश्वराने अग्री पाठवला. यज्ञ, लाकडे, दगड, वेदीभोवतीची जमीन हे सर्व पेटले. भोवतीच्या चरातले पाणी सुध्दा त्या अग्नीने सुकून गेले. सर्वांच्या देखतच हे घडले. तेव्हा लोकांनी जमीनीवर पालथे पडून “परमेश्वर हाच देव आहे, परमेश्वर हाच देव आहे” असे म्हटले.

एलीयाने आपला अंगरखा अंगातून काढला त्याची घडी घातली आणि पाण्यावर आपटली. त्याबरोबर पाणी मधोमध उजवीकडे आणि डावीकडे दुंभगले. अलीशा आणि एलीया मधल्या कोरडया वाटेने नदी पार करुन गेले.

एलीया आणि अलीशा बोलत बोलत पुढे चालले होते. तेवढयात अचानक काही घोडे आणि एक रथ तेथे अवतीर्ण झाले आणि त्यांनी एलीया आणि अलीशाला एकमेकांपासून दूर केले. तो रथ आणि घोडे अग्नीप्रमाणे होते नंतर एका वावटळीमधून एलीया स्वर्गात गेला. अलीशाने ते पाहिले आणि तो ओरडू लागला, “माझ्या बापा! माझ्या बापा! काय हा इस्राएलचा रथ आणि हे स्वर्गीय घोडे स्वार!”अलीशाला एलीयाचे पुन्हा कधीच दर्शन झाले नाही. अलीशाने दु:खाच्या भरात आपले कपडे फाडले. एलीयाचा अंगरखा जमिनीवर पडला होता तो अलीशाने उचलला. अलीशाने पाण्यावर तडाका देऊन म्हटले, “एलीयाचा परमेश्वर देव कुठे आहे?” अलीशाने पाण्यावर वार केल्याबरोबर पाणी डावीउजवीकडे दुभंगले. मग अलीशा नदी पार करुन गेला.

अलीशा मग त्या नगरातून बेथेलला आला. तो डोंगर चढून जात होता आणि काही मुले गावातून डोंगर उतरत होती. त्यांनी अलीशाची टिंगल करायला सुरुवात केली. ती म्हणाली, “अरे टकल्या वर जा, ए टकल्या, वर जा.” अलीशाने मागे वळून त्यांच्याकडे पाहिले आणि शापवाणी उच्चारली. त्याबरोबर जंगलातून दोन अस्वले बाहेर आली आणि त्यांनी या मुलांवर हल्ला केला. बेचाळीस मुलांच्या त्या अस्वलांनी चिंधडया केल्या.

अलीशा म्हणाला, “मी तुला काय मदत करु? घरात तुझ्या जवळ काय आहे ते सांग.”तेव्हा ती बाई म्हणाली, “एका तेलाचा बुधला सोडला तर माझ्याजवळ काहीही नाही.” यावर अलीशाने तिला सांगितले, “आता जा आणि सगळ्या शेजाऱ्यांकडून रिकामी भांडी मागून आण. चांगली बरीचशी आण. मग घराचे दार आतून लावून घे. फक्त तू आणि तुझी मुलेच घरात राहा. ते सगळे तेल या रिकाम्या भांड्यामध्ये ओत आणि ती सगळी भरलेली भांडी एका बाजूला ठेव.” मग ती बाई अलीशाकडून निघून आपल्या घरी आली आणि तिने दार आतून लावून घेतले. फक्त ती आणि तिची मुलेच काय ती घरात होती. मुलांनी रिकामी भांडी आणली आणि ती त्यात तेल ओतत गेली. अशी अनेक भांडी भरली शेवटी ती आपल्या मुलाला म्हणाली, “आणखी एक भांडे घेऊन ये.”पण एकही भांडे शिल्लक नव्हते तिचा एक मुलगा तिला म्हणाला, “आता एकही भांडे उरले नाही” त्यावेळी बुधल्यातले तेल संपले. मग ती अलीशाकडे आली आणि तिने त्या परमेश्वराच्या माणसाला हे सांगितले. अलीशा तिला म्हणाला, “आता हे तेल वीक आणि कर्जफेड कर. उरेल त्या पैशावर तुझा आणि तुझ्या मुलांचा निर्वाह चालेल.”

अलीशा घरात आला. ते मूल त्याच्या अंथरुणावर मृतावस्थेत पडले होते. अलीशाने खोलीत शिरुन दार लावून घेतले. आता खोलीत ते मूल आणि अलीशा अशी दोघंच होती. अलीशाने मग परमेश्वराची प्रार्थना केली. अलीशा पलंगाजवळ आला आणि मुलाच्या अंगावर पालथा पडला. त्याने आपले तोंड मुलाच्या तोंडावर आणि डोळे मुलाच्या डोळ्यावर टेकवले. आपले हात त्याच्या हातावर ठेवले. अशा प्रकारे अलीशाने त्याला अंगाशी घेतल्यावर त्या मुलाच्या अंगात ऊब निर्माण झाली. अलीशा मग खोलीतून बाहेर पडला आणि घरातल्या घरात एक चक्कर मारली. मग पुन्हा खोलीत शिरुन मुलाच्या अंगावर पालथा पडला. मुलाला एकापाठोपाठ सात शिंका आल्या आणि त्याने डोळे उघडले.

मग ही शाकभाजी सर्वाना खायला दिली. खायला लागल्यावर सर्वजण अलीशाला ओरडून सांगायला लागले. “परमेश्वराच्या माणसा, या भांड्यात तर विष आहे.” शाकभाजी अपायकारक असल्याने त्यांना ते खाता येईना. तेव्हा अलीशा म्हणाला, “थोडे पीठ आणा.” पीठ आणून दिल्यावर अलीशाने ते मोठ्या भांड्यात घातले. मग अलीशा म्हणाला, “आता हे सगळ्यांना वाढा.”आता त्या शाक भाजीत काही दोष राहिला नव्हता. बाल-शालीश येथून एकदा एक माणूस आपल्या नव्या पिकाची भाकर परमेश्वराच्या माणसासाठी घेऊन आला. त्याने सातूच्या वीस भाकऱ्या आणि पोतेभरुन कोवळी कणसे आणली होती. तेव्हा अलीशा म्हणाला, “हे सर्व या लोकांना खायला दे.” अलीशाचा सेवक म्हणाला, “काय? इथे तर शंभर माणसे आहेत. एवढ्या सगळ्यांना हे कसे पुरेल?”पण अलीशाने त्याला सांगितले, “तू खुशाल ते आहे तेवढे या सर्वांना दे. ‘ते पोटभर खातील आणि शिवाय त्यातून उरेल,’ असे परमेश्वर म्हणतो.” मग अलीशाच्या नोकराने त्या संदेष्ट्यांसमोर सर्व अन्न ठेवले. त्यांनी ते पोटभर खाल्यावरही काही अन्न शिल्लक उरलेच. परमेश्वर म्हणाला तसेच झाले.

अलीशाने नोकरा मार्फत नामानला निरोप पाठवला, “तू जाऊन यार्देन नदीच्या प्रवाहात सात वेळा स्नान कर म्हणजे तुझी त्वचा रोगमुक्त होईल. तू निर्मळ, नितळ होशील.” नामान हे ऐकून खूप रागावला आणि निघून गेला. तो म्हणाला, “मला वाटले, अलीशा निदान बाहेर येईल, माझ्या समोर येऊन उभा राहील. त्याच्या परमेश्वर देवाचे नाव घेऊन आपला हात माझ्या अंगावरुन फिरवील आणि मला बरे करील. अबाना आणि परपर या दिमिष्कातील नरुा इस्राएलमधील पाण्यापेक्षा निश्चितच चांगल्या आहेत. मग त्यातच स्नान करुन मी शुध्द का होऊ नये?” एवढे बोलून संतापाने नामान तोंड फिरवून निघून गेला. पण नामानचे नोकर त्याच्या पाठोपाठ गेले आणि त्यांनी त्याला समजावले. ते म्हणाले. “स्वामी, संदेष्ट्याने तुम्हाला एखादी मोठी गोष्ट करायला सांगितली असती तर तुम्ही ती केली असती नाही का? मग एखादी साधीशी बाब तुम्ही ऐकायलाच हवी नाही का? ‘आंघोळ कर.’ त्याने तू स्वच्छ, निर्दोष होशील एवढेच तर त्याने सांगितले.” तेव्हा नामानने अलीशाच्या म्हणण्याप्रमाणे केले. यार्देन नदीत त्याने सात वेळा बुडी मारुन स्नान केले. त्याने तो स्वच्छ, नितळ झाला. त्याची त्वचा लहान बाळासारखी कोमल झाली.

झाड पाडत असताना एकाचे लोखंडी कुऱ्हाडीचे पाते निसटले आणि पाण्यात पडले. तेव्हा तो ओरडला, “स्वामी, मी तर ही कुऱ्हाड उसनी मागून आणली होती.” अलीशाने विचारले, “ती पडली कुठे?”तेव्हा त्याने, लोखंडी कुऱ्हाडीचे पाते पडले ती जागा दाखवली. अलीशाने मग एक काठी घेतली आणि ती त्या जागी पाण्यात टाकली. त्याबरोबर ते पाते काठीबरोबर तरंगत वर आले. अलीशा म्हणाले, “घे ते पाते उचलून.” मग त्या माणसाने पुढे होऊन पाते उचलले.

अरामच्या राजाची इस्राएलशी लढाई चाललेली असताना त्याने आपल्या सैन्याच्या अधिकाऱ्यांची एक सभा बोलावली. राजा म्हणाला, “अमुक ठिकाणी दबा धरुन बसा आणि इस्राएली लोक येतील तेव्हा त्यांच्यावर हल्ला करा.” पण संदेष्टा अलीशा याने इस्राएलच्या राजाला निरोप पाठवून सांगितले, “सावधगिरीने वागा. त्या ठिकाणी जाऊ नका. येथे अरामी सैन्य लपून बसले आहे. ज्या जागेबद्दल अलीशाने सावधगिरीचा इषारा दिला त्या ठिकाणच्या आपल्या माणसांना इस्राएलच्या राजाने तसा निरोप पाठवला आणि बऱ्याच जणांचे प्राण वाचवले.” या गोष्टीचा अरामच्या राजाला धक्का बसला. त्याने पुन्हा आपल्या अधिकाऱ्यांना बोलवून घेतले आणि त्यांना तो म्हणाला, “इस्राएलच्या राजासाठी कोण हेरगिरी करत आहे ते सांगा.” तेव्हा त्या अधिकाऱ्यांपैकी एकजण म्हणाला, “स्वामी, आमच्यापैकी कोणीही हेर नाही. इस्राएलचा तो संदेष्टा अलीशाच त्यांच्या राजाला अनेक गुपिते सांगतो. अगदी तुमच्या शयनगृहात चाललेले बोलणे देखील!”

अलीशाचा सेवक पहाटे उठला आणि बाहेर येऊन पाहतो तो, रथघोडे यांसह नगराभोवती सैन्य पसरलेले.अलीशाचा सेवक अलीशाला म्हणाला, “स्वामी, आता आपण काय करायचे?” अलीशा म्हणाला, “घाबरु नको! अरामच्या सैन्यापेक्षा आपले सैन्य किती तरी मोठे आहे!” आणि अलीशाने प्रार्थना केली. तो म्हणाला, “परमेश्वर, माझ्या सेवकाचे डोळे उघड म्हणजे त्याला नीट दिसेल.”परमेश्वराने त्या सेवकाचे डोळे उघडले. तेव्हा त्याला अलीशाच्या भोवती अग्रीचे घोडे आणि रथ डोंगरावर पसरलेले दिसले. हे अग्नीरथ आणि अग्रीचे घोडे खाली अलीशाजवळ उतरले. अलीशाने परमेश्वराची प्रार्थना करुन म्हटले, “तू या लोकांना आंधळे करुन टाकावेस अशी मी तुला विनंती करतो.”अलीशाच्या या विनंतीनुसार परमेश्वराने अरामी सैन्याला आंधळे केले. अलीशा त्या अरामी सैन्याला म्हणाला, “हा रस्ता बरोबर नाही तसेच तुम्हाला हवे ते नगरही हे नव्हे. माझ्या मागोमग या म्हणजे तुम्ही ज्याच्या मागावर आहात तो माणूस मी तुम्हाला दाखवतो.” अलीशाने मग त्या अरामी सैन्याला शोमरोनला नेले. ते शोमरोन येथे आले तेव्हा अलीशा म्हणाला, “परमेश्वरा, आता यांना दिसू दे. त्यांचे डोळे उघड.”परमेश्वराने मग त्यांचे डोळे उघडले. तेव्हा त्या सैन्याला आपण शोमरोनमध्ये असल्याचे कळले.

काही इस्राएली लोक एका मृताला पुरत असताना त्यांनी या सैनिकांना पाहिले. तेव्हा त्या लोकांनी अलीशाच्या कबरीतच तो मृतेदेह टाकला आणि पळ काढला. अलीशाच्या अस्थींना त्या देहाचा स्पर्श होताच तो मृत पुन्हा जिवंत झाला आणि आपल्या पायावर उभा राहिला.

यशया म्हणाला, “तुला काय हवे बोल. सावली दहा पावले पुढे जाऊ देकी मागे येऊ दे? परमेश्वराने तुझ्या बाबतीत जे घडेल असे कबूल केले आहे त्याची ही खूण आहे.” हिज्कीया म्हणाला, “सावली दहा पावले पुढे जाणे स्वाभाविक आहे. तेव्हा तसं नको, ती दहा पावले मागे यावी.” मग यशयाने परमेश्वराची प्रार्थना केली आणि परमेश्वराने सावली दहा पावले मागे घेतली. जिथून ती पुढे गेली होती तिथेच ती पूर्ववत आली.

आपल्या राज्याच्या एकोणचाळीसाव्या वर्षी तो पायाच्या दुखण्याने बेजार झाला. त्याचा आजार खूप बळावला तरी त्याने दुखण्यात परमेश्वराचा धावा केला नाही. त्याने वैद्यांकरवी इलाज करुन घेतला.

पण सामर्थ्य वाढल्यावर तो गर्विष्ठ झाला आणि त्यामुळे त्याचा नाश ओढवला. परमेश्वरावर त्याची निष्ठा राहिली नाही. धूप जाळण्यासाठी असलेल्या वेदीवर धूप जाळण्यासाठी तो परमेश्वराच्या मंदिरात गेला. तेव्हा याजक अजऱ्या आणि आणखी ऐंशी शूर याजक त्याच्यापाठोपाठ तिथे गेले. त्यांनी उज्जीयाची चूक दाखवून दिली. ते त्याला म्हणाले, “उज्जीया, परमेश्वराला धूप जाळणे हे तुझे काम नव्हे. तू ते करु नयेस. अहरोनचे वंशज आणि याजक यांचेच ते काम आहे. धूप जाळण्याच्या या पवित्र कामासाठी ते नेमलेले आहेत. तेव्हा या पवित्र गाभाऱ्यातून तू बाहेर ये. परमेश्वराच्या आज्ञेचे तू उल्लंघन केले आहेस. परमेश्वर देवाकडून तुझा गौरव होणार नाही.” पण उज्जीयाला या बोलण्याचा राग आला. त्याच्या हाती धूपपात्र होते. याजकांवर तो संतापला असताना पाहता पाहता त्याच्या कपाळावर कोड उठले. परमेश्वराच्या मंदिरात धूप जाळण्याच्या वेदीच्या जवळ याजकांसमक्षच हे घडले. मुख्य याजक अजऱ्या आणि इतर याजक उज्जीयाकडे बघतच राहिले. त्याच्या कपाळावरचे कोड त्यांनी पाहिले. त्याबरोबर त्यांनी उज्जीयाला तातडीने मंदिराबाहेर घालवले. परमेश्वराने शासन केल्यामुळे उज्जीयाही लगेचच चालता झाला.

फारोला तू चमत्कार दाखवलेस. त्याचे अधिकारी आणि त्याची प्रजा यांच्यासाठी आश्चर्यकारक कृत्ये केलीस. आमच्या त्या पूर्वजांपेक्षा आपण चांगले आहोत असे मिसरचे लोक समजत होते, हे तू जाणून होतास. पण तुझी थोरवी तू सिध्द करून दाखवलीस. अजूनही त्यांना त्या गोष्टीचे स्मरण आहे.

पण ईयोब, मी जर तुझ्या जागी असतो तर देवाकडेच गेलो असतो. त्याला माझे गान्हाणे सांगितले असते. देव ज्या आश्र्चर्यकारक गोष्टी करतो त्या माणसाला समजत नाहीत. त्याच्या अद्भुत गोष्टींची सीमा नाही.

तुम्ही तिघेजण खोटे बोलून तुमचे अज्ञान लपवीत आहात. ज्या वैद्याला कुणालाही बरे करता येत नाही अशा निरुपयोगी वैद्यासारखे तुम्ही आहात.

परमेश्वरा, माझ्या देवा मी तुझी प्रार्थना केली आणि तू मला बरे केलेस.

तो माणूस जेव्हा आजारी पडून अंथरुणावर असेल तेव्हा परमेश्वर त्याला शक्ती देईल. तो आजारात अंथरुणावर पडला तरी परमेश्वर त्याला बरे करील. मी म्हणालो, “परमेश्वरा, माझ्यावर दया कर. मी तुझ्या विरुध्द पाप केले, पण मला क्षमा कर आणि मला बरे कर.”

अद्भुत गोष्टी करणारा देव तूच आहेस. तू लोकांना तुझी महान शक्ती दाखवलीस.

देवा, आम्ही केलेल्या सर्व पापांबद्दल क्षमा कर. तो आमचे सर्व आजार बरे करतो. देव थडग्यापासून आमचे आयुष्य वाचवतो आणि तो आम्हांला प्रेम आणि सहानुभूती देतो. देव आम्हाला खूप चांगल्या गोष्टी देतो. तो आम्हाला गरुडासारखे परत तरुण बनवतो.

देव त्यांच्या विदीर्ण ह्दयावर फुंकर घालतो आणि त्यांच्या जखमांना मलम पटी् करतो.

तेव्हा देव माझा प्रभु तुला स्वत:हून चिन्ह देईल.”त्या कुमारिकेकडे पाहाती गर्भवती आहे. ती मुलाला जन्म देईल. ती त्याचे नाव इम्मानुएल ठेवील.

पण आमच्या दुष्कृत्यांबद्दल त्याला दु:ख भोगावे लागले. आमच्या अपराधांमुळे तो भरडला गेला. आमचे कर्ज, आमची शिक्षा, त्याच्यावर लादली गेली. त्याने दु:ख सहन केले. म्हणून आम्ही बरे झालो.

मी तुम्हाला पुन्हा तंदुरस्त करीन. तुमच्या जखमा मी बऱ्या करीन. हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “का? कारण दुसरे लोक म्हणतात तू बहिष्कृत आहेस. ते म्हणतात, सियोनची काळजी करणारे कोणीही नाही.”

परमेश्वरा, तू मिसर देशात अद्भुत चमत्कार केलास. आजपावेतोसुद्धा तू अद्भूत चमत्कार केले आहेस. तू हे चमत्कार इस्राएलमध्ये तर केलेच पण जेथे जेथे लोक आहेत तेथे तेथे केलेस. त्यामुळेच तुझी कीर्ती झाली. परमेश्वरा, अद्भूत चमत्कारांच्याआधारे तू इस्राएलच्या लोकांना मिसरमधून बाहेर आणलेस. ह्या गोष्टी तू स्वत:च्या सामर्थ्यवान हाताच्या बळावर केल्यास. तुझे सामर्थ्य विस्मयकारक आहे.!

परमेश्वराचे सामर्थ्य माझ्यावर आले. परमेश्वराच्या आत्म्याने मला गावातून उचलून दरीच्या मध्यभागी आणून ठेवले. ती दरी मृतांच्या हाडांनी भरलेली होती. दरीत जमिनीवर पुष्कळ हाडे पडलेली होत. त्यामधून परमेश्वराने मला चालायला लावले. ती हाडे अगदी सुकलेली असल्याचे मी पाहिले. मग, परमेश्वर, माझा प्रभू, मला म्हणाला, “मानवपुत्रा, ही हाडे जिवंत होऊ शकतील का?”मी उत्तरलो, “परमेश्वर देवा, ह्याचे उत्तर फक्त तुलाच माहीत आहे.” परमेश्वर, माझा प्रभू, मला म्हणाला, “माझ्यावतीने त्या हाडांशी बोल. त्यांना सांग ‘सुक्या हाडांनो, परमेश्वराचे म्हणणे ऐका. परमेश्वर, माझा प्रभू, तुम्हाला पुढील गोष्टी सांगतो: मी तुमच्यात प्राण निर्माण करीन मग तुम्ही जिवंत व्हाल. मी तुमच्यावर स्नायू आणि मांस चढवीन आणि त्यावर कातडे ओढीन. मग तुमच्यात प्राण ओतीन. म्हणजे तुम्ही पुन्हा जिवंत व्हाल. मग तुम्हाला समजून चुकेल की मीच परमेश्वर व प्रभू आहे.” मग मी परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे, त्याच्यावतीने हाडांशी बोललो. माझे बोलणे सुरु असतानाच, मला मोठा आवाज ऐकू आला. हाडांचा खुळखुळाट झाला. ती एकमेकांना जोडली गेली. माझ्या डोळ्यासमोर हाडांवर स्नायू, मांस व कातडे चढले. पण ती शरीरे हालली नाहीत. कारण त्यांत प्राण नव्हता. मग परमेश्वर, माझा प्रभू, मला म्हणाला, “माझ्यावतीने वाऱ्याशी बोल. त्याला पुढील गोष्टी माझ्यावतीने सांग: ‘सर्व बाजूंनी येऊन तू ह्या शरीरात स्पंदन निर्माण कर त्यांच्यात प्राण घाल, म्हणजे ती पुन्हा जिवंत होतील.” मग मी परमेश्वराने सांगितल्याप्रमाणे वाऱ्याशी बोललो. मग मृत शरीरांत जीव आला. ती जिवंत होऊन उभी राहिली ते पुष्कळ लोक होते. ते मोठे सैन्यच होते.

राजाने दानीएलला (बेलशटस्सरला) प्रश्न केला, तू मला माझे स्वप्न व त्याचा अर्थ सागू शक तोस का? दानीएलने उत्तर दिले राजा, नबुखद्नेस्सर, तू विचारलेली गुप्त गोष्ट ज्ञानी किवा मांत्रिक अथवा खास्दी कोणीच सांगू शकणार नाही. पण अशा रहस्यमय गोष्टी स्वर्गातील देवच सांगतो. पुढे काय घडणार हे दाखविण्यासाठीच नबुखद्नेस्सर राजाला देवाने स्वप्नात पाडले. तू झोपला असताना पुढील गोष्टी स्वप्नात पाहिल्यास. राजा, तू तुझ्या शय्येवर झोपला होतास. मग तू भविष्यात घडणाऱ्या गोष्टीबंद्दल विचार करायला लागलास. देव लोकांना रहस्ये सांगू शकतो त्याने तुला भविष्यात काय घडणार ते दाखविले. देवाने मलाही ते रहस्य सांगितले. का? मी इतरांपेक्षा ज्ञानी आहे म्हणून नव्हे, तर तुला त्याचा अर्थ कळावा आणि तुझ्या मनात काय विचार येऊन गेले ते तुला समजावे, म्हणूनच देवाने मला हे रहस्य सांगितले.

मग नबुखद्नेस्सराला खूप राग आला. त्याने शद्रख मेशख व अबेद्नगो यांच्याकडे तुच्छतेने पाहिले. त्याने भट्टी नेहमीपेक्षा सातपट तापविण्याची आज्ञा दिली. मग नबुखद्नेस्सरने त्याच्या सैन्यातील काही बलवान सैनिकांना शद्रख,मेशख व अबेद्नगो यांना बांधण्याचा हुकूम केला आणि त्यांना त्या तिघांना तापलेल्या भट्टीत टाकायला सांगितले. मग त्या तिघाना बांधून भट्टीत टाकण्यात आले. त्यानी अंगरखे,विजारी,टोप्या आणि इतर कपडे घातलेले होते. राजा हुकूम देतेवेळी अतिशय रागावला असल्याने त्यांनी घाईघाईन भट्टी तापविली भट्टीची आच एवढी होती की तिच्या ज्वाळांनी बलवान सैनिक मेले. शद्रख मेशख, व अबेद्नगो यांना टाकण्यासाठी ते भट्टीजवळ गेले तेव्हाच ते ज्वाळांनी भाजून मेले. शद्रख, मेशख, अबेद्नगो भट्टीत पडले. त्यांना अगदी घट्ट बांधले होते. मग नबुखद्नेस्सरने एड्ढदम उडी मारली. तो आश्चर्यचकीत झाला. त्याने आपल्या सल्लागारांना विचारले “आपण तिघांनाच बांधले आणि तिघांनाच भट्टीत टाकले खरे ना?” सल्लागार उत्तरले,” हो महाराज!” मग राजा म्हणाला,” पाहा! मला अग्नीमध्ये चार माणसे चालताना दिसतात. ते बांधलेले नाहीत व जळलेलेही नाहीत. चौथा देवदूताप्रमाणेदिसत आहे.” मग नबुखद्नेस्सर तापलेल्या भट्टीच्या तोंडाजवळ गेला. तो ओरडला,’ शद्रख, मेशख, अबेद्नगो, बाहेर या. परात्पर देवाच्या सेवकांनो, इकडे या. मग ती तिघे आगीतून बाहेर आले. ते बाहेर येताच, प्रांताधिकारी, मुलकी अधिकारी, राजाचे सल्लागार राज्यपाल ह्यांनी त्यांच्याभोवती गर्दो केली. आगीने शद्रख, मेशख व अबेद्नगो जळाले नाही हे त्यांनी पाहिले होते. त्याचे अंग,केस किंवा वस्त्रे काहीच जळाले नव्हते. एवढेच नव्हे तर ते आगीत असूनसुध्दा त्यांच्या अंगाला जळकट वास येत नव्हता. मग नबुखद्नेस्सर म्हणाला शद्रख मेशख व अबेद्नगो यांच्या देवाचे स्तवन करा.त्याने देवदूताला पाठवून आपल्या सेवकांचे आगीपासून रक्षण केले. ह्या तिघांनी आपल्या देवावर निष्ठा ठेवली त्यांनी माझा हुकूम मानला नाही आणि दुसऱ्या दैवताला भजण्या-पूजण्याऐवजी ते मरण्यास तयार झाले. म्हणून मी आता असा नियम करतो की शद्रख, मेशख व अबेद्नगो यांच्या देवाच्याविरुध्द बोलणाऱ्याचे मग तो कोठल्याही राष्ट्राचा वा कोठलीही भाषा बोलणारा असो, तुक़डे तुकडे करण्यात येतील. व त्याच्या घराची राखरांगोळी करण्यात येईल. दुसरा कोठलेही दैवत आपल्या माणसांना असे वाचवू शकणार नाही. मग राजाने त्या तिघांना बाबेल परगण्यात आणखी महत्वाची पदे दिली.

नबुखद्नेस्सर राजाने पुष्कळ राष्ट्रांना निरनिराव्व्या भाषा बोलणाऱ्या लोकांना आणि जगात वेगवेगव्व्या ठिकाणी राहणाव्या लोकांना पुढील पत्र लिहिले:अभिवादन, परात्पर देवाने माझ्यासाठी केलेले चमत्कार व विस्मयड्ढारक गोष्टी आपल्याला सांगताना मला आनंद होत आहे. देवाने आश्चर्यकारक चमत्कार केले आहेत. क्ष्याने प्रभावी चमत्कार केले आहेत. देवाचे राज्य चिरंतन आहे. आणि त्याचे प्रभत्व पिढ्यान्पिढ्या राहील.

मग अचानक एक मानवी हात भिंतीवर लिहिताना दिसू लागला. भिंतीच्या गिलाव्यावर बोंटांनी शब्द कोरले गेले, राजवाड्याच्या दिवठाणा जवळच्या भिंतीवर हाताने लिहीले जात असताना राजाने पाहिले. बेलशस्सर राजा खूप घाबरला त्याचा चेहरा भीतीने पांढराफटक पडला व त्याचे हातपाय थरथर कापू लागले, पायातला जोर गेल्याने तो उभा राहू शकत नव्हता.

अखेर दारयावेश राजाने हुकूम दिला. मग त्यांनी दानीएलला आणून सिंहाच्या गुहेत (पिजंऱ्यात) टाकले. राजा दानीएलला म्हणाला “तू ज्या देवाची उपासना करतोस तो तुझा देव तूला वाचवील अशी मी आशा करतो”. गुहेच्या तोंडावर एक मोठी शिळा आणून बसविण्यात आली. मग राजाने त्या शिळेवर आपल्या अंगठीने आपली मुद्रा उमटविली. तसेच इतर दहबाऱ्यांच्या अंगठ्यांनी त्याने त्यांच्याही मुद्रा उमटविल्या. ह्याचा अर्थ कोणीही शिळा सरकवून दानीएलला सिंहाच्या गुहेच्या (पिजऱ्यांच्या) बाहेर काढू शत नव्हता. मग दारयावेश राजवाड्यात परतला. त्या रात्री त्याने अन्नाला स्पर्श केला नाही. कोणी येऊन आपले मनोरंजन करावे असे त्याला वाटले नाही, त्याला त्या रात्री झोपही आली नाही. दुसऱ्या दिवशी फटफटताच दारयावेश राजा उठला आणि त्याने सिंहाच्या गुहेकडे (पिंजऱ्याकडे) धाव घेतली. राजा खूप काळजीत होता. सिंहाच्या गुहेजवळ जाताच, त्याने दानीएलला हाक मारली. राजा ओरडला, दानीएला जिवंत देवाच्या सेवका तुला तुझ्या देवाने, सिंहांपासून वाचविले का? तू नेहमीच देवाची सेवा करीत आलास.” दानीएल उत्तरला,”राजा चिरायु असो! माझ्या देवाने मला वाचविण्यासाठी, देवदूताला पाठविले देवदूताने सिंहाची तोंडे बंद केली. मी निरपराधी आहे,” हे माझ्या देवाला माहीत आहे म्हणूनच सिंहानी मला मारले नाही. राजा, मी तुझे कधीही काहीही वाईट केले नाही. दारयावेश राजाला खूप आनंद झाला त्याने आपल्या सेवकांना दानीएलला सिंहाच्या गुहेतून (पिंजऱ्यातून) बाहेर उचलून आणण्यास सांगितले. दानीएलला बाहेर आणले तेव्हा त्याच्या शरीरावर एकही जखम नव्हती. दानीएलचा त्याच्या देवावर विश्वास असल्याने त्याला सिंहानी काहीही इजा केली नाही. मग राजाने दानीएलला सिंहाच्या गुहेत (पिंजऱ्यात) टाकण्यासाठी त्याच्यावर दोषारोप ठेवणाऱ्या लोकांना आणण्याचा हुकूम दिला. त्या लोकांना बायकामुलांसट सिंहांच्या गुहेत टाकण्यात आले. गुहेच्या जमिनीला त्यांनी स्पर्श करण्याआधीच सिंहांनी त्यांना पकडले आणि त्यांना खाऊन टाकले.

मग दारयावेश राजाने पृथ्वीवर सर्वत्र पसरलेल्या, निरनिराव्व्या भाषा बोलणाऱ्या राष्ट्रांतील लोकांना पुढील पत्र पाठविले.अभिवादन. “मी नवीन कायदा करीत आहे. हा कायदा राज्याच्या सर्व भागातील सर्व लोकांना लागू आहे. तुम्ही सर्वांनी दानीएलच्या देवाला भ्यायला पाहिजे आणि त्याचा मान राखला पाहिजे. दानीएलचा देव हा जिंवत देव आहे, साक्षात देव आहे. तो सनातन आहे. क्ष्याच्या राज्याचा कधीच नाश होत नाही. क्ष्याचा प्रभाव कधीच नाहीसा होत नाही. देव माणसांना मदत करतो व त्याचे रक्षण करतो. स्वर्गात व पृथ्वीवर तो विस्मयकारक चमत्कार करतो. देवानेच सिंहांपासून दानीएलाला वाचविले.”

“ह्यांनंतर मी माझा आत्मा सर्व लोकांत ओतीन (घालीन). तुमची मुले-मुली भविष्य सांगतील तुमच्यातील वृध्द स्वप्न पाहतील. तुमच्यातील तरूणांना दृष्टांन्त होतील. त्या वेळी, मी माझा आत्मा पुरूष व स्त्री सेवकांमध्येसुध्दा ओतीन. मी आकाशात आणि पृथ्वीवर आश्चर्यकारक खुणा दाखवीन तेथे रक्त, आग व दाट धूर दिसेल. सूर्याऐवजी अंधार होईल. चंद्राचे रूपांतर रक्तात होईल. मग परमेश्वराचा महान आणि भयंकर दिवस उगवेल.

गालील प्रांतात सगळीकडे फिरत, येशूने त्यांच्या सभास्थानात जाऊन शिकविले, देवाच्या राज्याची सुवार्ता सांगितली आणि लोकांचे सर्व प्रकारचे रोग व सर्व प्रकारचे विकार बरे केले. येशूविषयीची बातमी सर्व सिरीया प्रांतभर पसरली; मग जे आजारांनी व अनेक प्रकारच्या रोगांनी पीडीत होते, ज्यांना भूतबाधा झाली होती, जे फेफरेकरी व पक्षघात झाला होता अशा सर्वांना लोकांनी त्याच्याकडे आणले आणि येशूने त्यांना बरे केले.

तेव्हा पाहा, एक कुष्ठरोगी त्याच्याकडे आला व त्यास नमन करून म्हणाला, “प्रभूजी, आपली इच्छा असल्यास आपण मला शुद्ध करायला समर्थ आहात.” तेव्हा येशूने आपला हात पुढे करून त्यास स्पर्श केला व म्हटले, “माझी इच्छा आहे, शुद्ध हो”; आणि लगेचच त्याचा कुष्ठरोग जाऊन तो बरा झाला.

नंतर येशू पेत्राच्या घरात गेला आणि त्याची सासू तापाने आजारी पडली आहे असे त्याने पाहिले. तेव्हा त्याने तिच्या हाताला स्पर्श केला व तिचा ताप निघाला; मग ती उठून त्याची सेवा करू लागली.

मग संध्याकाळ झाल्यावर लोकांनी असंख्य दुष्ट आत्म्याने ग्रासलेल्यांना त्याच्याकडे आणले; तेव्हा त्याने भूते केवळ शब्दाने घालवली व सर्व आजाऱ्यांना बरे केले. “त्याने स्वतः आमचे विकार घेतले आणि आमचे रोग वाहिले,” असे जे यशया संदेष्ट्याच्याद्वारे सांगितले होते ते पूर्ण व्हावे म्हणून असे झाले.

तेव्हा पाहा, सरोवरात एवढे मोठे वादळ उठले की ते तारू लाटांनी झाकू लागले; तेव्हा येशू तर झोपेत होता. तेव्हा ते त्याच्याजवळ येऊन त्यास जागे करून म्हणाले, प्रभूजी, वाचवा. आम्ही बुडत आहोत. तो त्यांना म्हणाला, “अहो अल्पविश्वासी, तुम्ही का घाबरला?” मग तो उठला आणि त्याने वारा व सरोवर यास धमकावले. मग सर्व अगदी शांत झाले. तेव्हा त्या मनुष्यांना फार आश्चर्य वाटले व ते म्हणाले, “हा कोणत्या प्रकारचा मनुष्य आहे की वारे व लाटा ही याचे ऐकतात.”

मग तो पलीकडे गदरेकरांच्या देशात गेल्यावर त्यास दोन भूतग्रस्त कबरांतून निघून येत असतांना भेटले; ते भयंकर हिंसक होते म्हणून त्या वाटेने कोणालाही जाणे शक्य नव्हते. तेव्हा पाहा, ते ओरडून म्हणाले, “हे देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? नेमलेल्या समयापूर्वी तू आम्हास पीडा द्यायला येथे आलेला आहेस काय?” तेथे त्यांच्यापासून दूर अंतरावर डुकरांचा मोठा कळप चरत होता. मग ती दुष्ट आत्मे त्यास विनंती करू लागली की, तू जर आम्हास काढीत असलास तर त्या डुकरांच्या कळपात आम्हास पाठवून दे. त्याने त्यास म्हटले, “जा,” मग ती निघून डुकरांत शिरली; आणि पाहा, तो संपुर्ण कळप कड्यावरून धडक धावत जाऊन समुद्रात पाण्यात बुडून मरण पावला. मग त्या डुकरांना चारणारे नगरांत पळाले आणि त्यांनी जाऊन भूतग्रस्तांच्या गोष्टीसकट सर्व वर्तमान जाहीर केले. तेव्हा पाहा, सर्व नगर येशूला भेटावयास निघाले आणि त्यास सीमेबाहेर जाण्याची विनंती केली.

तेव्हा काही लोकांनी पक्षघात झालेल्या कोणाएका मनुष्यास येशूकडे आणले. तो मनुष्य बाजेवर पडून होता. येशूने त्यांचा विश्वास पाहून त्या पक्षघाती मनुष्यास म्हटले, “मुला, धीर धर. तुझी पापे क्षमा करण्यात आली आहेत.” काही नियमशास्त्राच्या शिक्षकांनी हे ऐकले आणि ते आपसात म्हणाले, “हा मनुष्य तर देवाविरुद्ध दुर्भाषण करीत आहे.” येशूला त्यांचे विचार कळाले व तो त्यांना म्हणाला, “तुमच्या अंतःकरणात तुम्ही वाईट विचार का करता? कारण, तुझी पापे क्षमा करण्यात आली आहे, असे म्हणणे किंवा उठ व चालू लाग, असे म्हणणे यातून कोणते सोपे आहे? परंतु, मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे, हे तुम्ही जाणावे म्हणून,” मग येशू त्या पक्षघाती मनुष्यास म्हणाला, “ऊठ! आपली बाज उचलून घेऊन घरी जा.” मग तो उठून आपल्या घरी गेला. हे पाहून लोकसमुदाय थक्क झाला आणि ज्या देवाने मनुष्यास एवढा अधिकार दिला त्याचे त्यांनी गौरव केले.

मग पाहा, वाटेत बारा वर्षापासून रक्तस्राव होत असलेली एक स्त्री येशूच्या मागे येऊन त्याच्या वस्त्राच्या काठाला शिवली. कारण ती आपल्या मनात म्हणत होती, “मी केवळ त्याच्या वस्त्राला शिवले तरी बरी होईन.” तेव्हा येशूने मागे वळून तिला पाहून म्हणाला, “बाई धीर धर! तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.” आणि ती स्त्री त्याच क्षणी बरी झाली.

मग येशू त्या यहूदी सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घरात आला. तेव्हा त्याने बासरी वाजविणाऱ्या व रडून गोंधळ करणाऱ्या जमावाला पाहीले, तो म्हणाला, “वाट सोडा, कारण मुलगी मरण पावलेली नाही; ती झोपेत आहे.” तेव्हा ते त्यास हसू लागले. मग त्या जमावाला बाहेर पाठवल्यावर त्याने आत जाऊन तिचा हात आपल्या हातात घेतला आणि ती मुलगी उठली. आणि ही बातमी त्या सर्व प्रांतात पसरली.

तेव्हा येशू तेथून जात असता दोन आंधळे त्याच्यामागे ओरडत चालले. म्हणू लागले, “हे दाविदाच्या पुत्रा, आम्हावर दया कर.” येशू त्या घरात गेला तेव्हा ते आंधळेही त्याच्याकडे त्याच्यामागे आत आले. त्याने त्यांना विचारले, “मी तुम्हास दृष्टी देऊ शकेन असा तुमचा विश्वास आहे का?” “होय, प्रभू,” त्यांनी उत्तर दिले. मग त्याने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला आणि म्हणाला, “तुमच्या विश्वासाप्रमाणे तुमच्यासोबत घडो.” आणि त्यांना पुन्हा दृष्टी आली. येशूने त्यांना सक्त ताकीद दिली, “पाहा, हे कोणाला कळू देऊ नका.” परंतु ते बाहेर गेले आणि त्यांनी त्या सर्व प्रदेशात त्याची किर्ती गाजवली.

मग ते दोघे तेथून निघून जात असताना लोकांनी एका मुक्या, भूतबाधा झालेल्या मनुष्यास येशूकडे आणले. जेव्हा येशूने भूत काढून टाकले तेव्हा पूर्वी मुका असलेला तो मनुष्य बोलू लागला. लोकांस याचे आश्चर्य वाटले व ते म्हणाले, “इस्राएलामध्ये यापुर्वी असे घडलेले कधीही पाहण्यात आले नव्हते.”

येशू त्यांच्या सभास्थानामध्ये शिक्षण देत व राज्याच्या सुवार्तेची घोषणा करत आणि सर्वप्रकारचे रोग व सर्वप्रकारचे आजार बरे करत, प्रत्येक नगरातून व प्रत्येक गावातून फिरला.

येशूने आपल्या बारा शिष्यांना आपल्याजवळ एकत्र बोलावले आणि त्याने त्यांना अशुद्ध आत्म्यांवर प्रभुत्त्व दिले व तसेच त्या अशुद्ध आत्म्यांना घालवण्यासाठी, प्रत्येक प्रकारचे आजार व प्रत्येक प्रकारचे व्याधी बरे करण्यासाठी अधिकार दिला.

रोग्यांना बरे करा, मरण पावलेल्यांना जीवंत करा, कुष्ठरोग्यांना शुद्ध करा आणि भूते काढा. तुम्हास फुकट मिळाले आहे म्हणून फुकट द्या.

आंधळे पाहतात. पांगळे चालतात. कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मरण पावलेले उठवले जातात व गरिबांना सुवार्ता सांगण्यात येते.

सभास्थानात हात वाळलेला एक मनुष्य होता. काही यहूद्यांनी येशूवर काही दोषारोप करता यावा या हेतूने त्यास विचारला, “शब्बाथ दिवशी रोग बरे करणे योग्य आहे काय?” येशूने त्यांना उत्तर दिले, “जर तुमच्यापैकी एखाद्याकडे मेंढरू असले व शब्बाथ दिवशी ते खड्ड्यात पडले, तर तो त्यास वर काढणार नाही काय? तर मग मनुष्य मेंढरापेक्षा कितीतरी अधिक मौल्यवान आहे. म्हणून नियमशास्त्र लोकांस शब्बाथ दिवशी चांगले करण्याची मोकळीक देते.” मग येशू त्या वाळलेल्या हाताच्या मनुष्यास म्हणाला, “तुझा हात पुढे सरळ कर.” त्या मनुष्याने हात लांब केला व तो हात बरा झाला आणि दुसऱ्या हातासारखाच चांगला झाला.

परूशी काय करीत आहेत ते येशूला माहीत होते. म्हणून येशू तेथून गेला. पुष्कळ लोक येशूच्या मागे निघाले व त्याने जे कोणी रोगी होते, त्या सर्वाना बरे केले.

मग काही मनुष्यांनी एकाला येशूकडे आणले. तो मनुष्य आंधळा व मुका होता व त्याच्यामध्ये भूत होते. येशूने त्या मनुष्यास बरे केले व तो बोलू लागला व पाहू लागला. सर्व लोक चकित झाले, ते म्हणाले, “हा दाविदाचा पुत्र असेल काय?”

परंतु मी जर देवाच्या आत्म्याच्या साहाय्याने भूते काढतो तर देवाचे राज्य तुमच्यावर आले आहे.

तेथे त्यांच्या अविश्वासामुळे त्याने फारशी अद्भूत कृत्ये केली नाहीत.

मग जेव्हा त्याने मोठा लोकसमुदाय पाहिला. तेव्हा त्यास त्यांच्याविषयी कळवळा आला व जे आजारी होते त्यांना त्याने बरे केले.

मग संध्याकाळ झाल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे आले आणि म्हणाले, “ही अरण्यातील जागा आहे आणि भोजनाची वेळ होऊन गेली आहे. लोकांनी गावामध्ये जाऊन स्वतःकरता अन्न विकत घ्यावे म्हणून त्यांना पाठवून द्या.” परंतु येशू त्यांना म्हणाला, “त्यांना जाण्याची गरज नाही. तुम्हीच त्यांना काही खायला द्या.” ते त्यास म्हणाले, आमच्याजवळ केवळ “पाच भाकरी व दोन मासे आहेत.” तो म्हणाला, “ते माझ्याकडे आणा.” मग लोकांस गवतावर बसण्याची आज्ञा केली. त्याने त्या पाच भाकरी व दोन मासे घेऊन वर आकाशाकडे पाहून त्यावर आशीर्वाद मागितला. नंतर त्याने भाकरी मोडून शिष्यांना दिल्या व शिष्यांनी लोकांस दिल्या. ते सर्व जेवून तृप्त झाले. मग त्या उरलेल्या तुकड्यांच्या त्यांनी बारा टोपल्या भरून घेतल्या. जेवणारे सुमारे पाच हजार पुरूष होते. शिवाय स्त्रिया व मुले होतीच.

तेव्हा रात्रीच्या चवथ्या प्रहरी (म्हणजे पहाटे तीन वाजता) येशू त्याच्याकडे आला. तो पाण्यावरून चालत होता. शिष्य त्यास पाण्यावरून चालताना पाहून घाबरून गेले व म्हणाले, हे “भूत आहे.” आणि ते भिऊन ओरडले पण येशू लगेच त्यांना म्हणाला, धीर धरा, मी आहे; भिऊ नका.

पेत्र म्हणाला, प्रभूजी जर आपण असाल तर मला पाण्यावरून आपणाकडे येण्यास सांगा. येशू म्हणाला, “ये.” मग पेत्र तारवातून उतरून व पाण्यावर चालत येशूकडे जाऊ लागला. पण तो पाण्यावर चालत असताना जोराचा वारा पाहून तो भ्याला आणि बुडू लागला असता ओरडून म्हणाला “प्रभूजी, मला वाचवा.” आणि लगेच येशूने आपला हात पुढे करून त्यास धरले व म्हटले, “अरे अल्पविश्वासी, तू संशय का धरलास?” मग येशू व पेत्र होडीत गेल्यावर वारा थांबला. तेव्हा जे शिष्य होडीत होते ते त्यास नमन करून म्हणाले, “तुम्ही खरोखर देवाचे पुत्र आहात.”

तेथील लोकांनी येशूला ओळखून व सभोवतालच्या सर्व प्रदेशात निरोप पाठवला व त्यांनी सर्व प्रकारच्या आजाऱ्यांस त्याच्याकडे आणले. आणि आम्हास आपल्या वस्त्राच्या काठाला स्पर्श करू द्यावा, अशी विनंती केली, तेव्हा जितक्यांनी स्पर्श केला तितके बरे झाले.

तेव्हा एक कनानी स्त्री त्या भागातून येशूकडे आली. ती स्त्री ओरडून म्हणाली, “प्रभू, दाविदाच्या पुत्रा, माझ्यावर दया करा. माझी मुलगी भूताने फार पिडलेली आहे.” पण येशूने तिला एका शब्दानेही उत्तर दिले नाही, तेव्हा त्याच्या शिष्यांनी येऊन त्यास विनंती केली, “तिला पाठवून द्या, कारण ती आमच्या मागे ओरडत येत आहे.” पण येशूने उत्तर दिले, “मला देवाने फक्त इस्राएलाच्या हरवलेल्या मेंढरांकडे पाठवले आहे.” मग ती स्त्री पुन्हा येशूकडे आली, ती येशूच्या पाया पडली व म्हणाली, “प्रभूजी, मला मदत करा.” परंतु त्याने म्हटले, “मुलाची भाकर घेऊन कुत्र्यास टाकणे योग्य नाही.” ती स्त्री म्हणाली, “होय प्रभूजी, परंतु तरीही कुत्रीही आपल्या धन्याच्या मेजावरून पडलेला चूरा खातात.” तेव्हा येशूने तिला उत्तर दिले, “बाई, तुझा विश्वास मोठा आहे. तुझ्या इच्छेप्रमाणे तुला प्राप्त होवो.” आणि त्याचवेळी तिची मुलगी बरी झाली.

मग पुष्कळ लोक त्याच्याकडे आले, त्यांनी आपल्याबरोबर लुळे, पांगळे, आंधळे, बहिरे व इतर अनेक लोकांस आणले होते आणि त्यांनी त्या आजाऱ्यांना येशूच्या पायावर ठेवले. तेव्हा त्याने त्यांना बरे केले. मुके बोलू लागले, व्यंग असलेले चांगले झाले, लंगडे चालू लागले, आंधळे पाहू लागले. हे पाहून लोक थक्क झाले आणि त्यांनी इस्राएलाच्या देवाचे गौरव केले.

मग येशूने आपल्या शिष्यांना आपल्याजवळ बोलावून म्हटले, “मला लोकांचा कळवळा येतो कारण ते आज तीन दिवसांपासून माझ्याबरोबर राहिले आहेत आणि त्यांच्याकडे खायला काही नाही आणि त्यांना उपाशी पाठवावे अशी माझी इच्छा नाही कारण ते वाटेत कदाचित कासावीस होतील.” शिष्य त्यास म्हणाले, “एवढ्या मोठ्या लोकसमुदायाला तृप्त करावे इतक्या भाकरी या दूर रानात आमच्याजवळ कोठून असणार?” तेव्हा येशू म्हणाला, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?” ते म्हणाले, “आमच्याकडे सात भाकरी आहेत व काही लहान मासे आहेत.” मग त्याने लोकांस जमिनीवर बसविण्याची आज्ञा केली. मग त्या सात भाकरी व मासे घेऊन त्याने देवाचे उपकार मानले व त्या भाकरी मोडल्या व शिष्यांना दिल्या व शिष्यांनी लोकांस दिल्या. तेव्हा ते सर्व जेवून तृप्त झाले आणि त्यांनी उरलेल्या तुकड्यांनी भरलेल्या सात टोपल्या गोळा केल्या. आणि जेवणारे, स्त्रिया व लेकरे सोडून चार हजार पुरूष होते.

तेव्हा त्यांच्यादेखत त्याचे रूप पालटले. त्याचे तोंड सूर्यासारखे प्रकाशले आणि त्याची वस्त्रे प्रकाशासारखी पांढरी शुभ्र झाली.

नंतर येशू व शिष्य लोकसमुदायाजवळ आल्यावर एक मनुष्य त्याच्याकडे आला आणि त्याच्यापुढे गुडघे टेकून म्हणाला, “प्रभूजी, माझ्या मुलावर दया करा. त्यास फेफरे येतात व त्याचे फार हाल होतात कारण तो सारखा विस्तवात आणि पाण्यात पडतो. मी त्यास आपल्या शिष्यांकडे आणले पण त्यांना त्यास बरे करता येईना.” येशूने उत्तर दिले, “अहो अविश्वासू व विपरीत पिढीच्या लोकांनो, मी तुमच्याबरोबर आणखी कोठवर राहू? मी तुमचे किती सहन करू? त्यास माझ्याकडे आणा.” येशूने त्या भूताला धमकावले, तेव्हा ते भूत त्याच्यातून निघून गेले आणि त्याच घटकेला तो मुलगा बरा झाला.

नंतर शिष्य एकांती येशूजवळ येऊन म्हणाले, “आम्हास (त्याच्यातील भूत) का काढता आले नाही?” तेव्हा तो म्हणाला, “तुमच्या अल्पविश्वासामुळे. मी तुम्हास खरे सांगतो, तुमच्यात जर मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असेल तर तुम्ही या डोंगराला येथून निघून तेथे जा, असे तुम्ही म्हटल्यास तर तो डोंगर जाईल. तुमच्यासाठी काहीही अशक्य असणार नाही.”

तरी आपण त्यांना अडखळण आणू नये, म्हणून सरोवराकडे जाऊन पाण्यात गळ टाक आणि पहिल्याने वर येईल तो मासा धरून त्याचे तोंड उघड म्हणजे तुला चांदीचे एक नाणे सापडेल. ते घेऊन माझ्याबद्दल व तुझ्याबद्दल त्यांना दे.”

मी तुम्हास खरे सांगतो, जे काही तुम्ही पृथ्वीवर बांधाल ते स्वर्गात बांधले जाईल. पृथ्वीवर मोकळे कराल ते स्वर्गात मोकळे केले. तसेच मी तुम्हास खरे सांगतो की, जर पृथ्वीवर तुमच्यापैकी दोघांचे कोणत्याही गोष्टीविषयी एकमत झाले तर त्याकरता एकत्रित होऊन विनंती करतील तर ती. माझ्या स्वर्गातील पित्याकडून त्यांच्यासाठी केली जाईल; कारण जिथे दोघे किंवा तिघे जर माझ्या नावाने एकत्र जमले असतील तेथे त्यांच्यांमध्ये मी आहे.

येशूने आपल्या शिष्यांकडे पाहिले आणि तो म्हणाला, “मनुष्यांना हे अशक्य आहे, पण देवासाठी सर्व गोष्टी शक्य आहेत.”

रस्त्याच्या कडेला दोन आंधळे बसले होते आणि जेव्हा त्यांनी ऐकले की, येशू तेथून जात आहे, तेव्हा ते मोठ्याने ओरडले, “प्रभू येशू, दाविदाच्या पुत्रा. आमच्यावर दया करा.” जमावाने त्यांना दटावले व त्यांना शांत राहण्यास सांगितले. पण ते अधिकच मोठ्याने ओरडू लागले, “प्रभू, दाविदाच्या पुत्रा, आमच्यावर दया करा.” मग येशू थांबला आणि त्यांच्याशी बोलला, त्याने विचारले, “मी तुमच्यासाठी काय करावे अशी तुमची इच्छा आहे?” त्या आंधळ्या मनुष्यांनी उत्तर दिले, “प्रभूजी, आम्हास दिसावे अशी आमची इच्छा आहे.” येशूला त्यांच्यांबद्दल कळवळा आला आणि त्याने त्यांच्या डोळ्यांना स्पर्श केला. त्याच क्षणी त्यांना दिसू लागले आणि ते त्याच्यामागे गेले.

मग आंधळे आणि पांगळे लोक त्याच्याकडे परमेश्वराच्या भवनात आले आणि त्यांना त्याने बरे केले.

रस्त्याच्या कडेला त्यास अंजिराचे एक झाड दिसले. ते पाहून तो जवळ गेला. पण पानाशिवाय त्यास एकही अंजीर दिसले नाही. येशू त्या झाडाला म्हणाला, “यापुढे तुला, सर्वकाळ फळ न येवो!” आणि ते झाड लगेच वाळून गेले. शिष्यांनी हे पाहिले, तेव्हा त्यांना फार आश्चर्य वाटले. त्यांनी विचारले, “हे अंजिराचे झाड इतक्या लवकर वाळून कसे गेले?” येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हास खरे सांगतो, जर तुम्हास विश्वास असेल आणि तुम्ही संशय धरला नाही तर मी जे अंजिराच्या झाडाबाबतीत केले तेच नव्हे, तर या डोंगराला उपटून समुद्रात पड असे म्हणालात तरी ते घडेल. जर तुमचा विश्वास असेल तर जे काही तुम्ही प्रार्थनेत विश्वासाने मागाल ते तुम्हास मिळेल.”

त्यावेळी पाहा, तेथे मोठा भूकंप झाला. परमेश्वराचा दूत स्वर्गातून उतरून तेथे आला. त्याने कबरेच्या तोंडावरची धोंड बाजूला लोटली व तो तीवर बसला.

पण तो इथे नाही कारण तो म्हणाला होता, त्याप्रमाणे त्यास मरणातून उठविण्यात आले आहे. या आणि जेथे त्यास ठेवले होते ती जागा पाहा. आता लवकर जा आणि त्याच्या शिष्यांना सांगा, तो मरणातून उठला आहे आणि बघा, तो तुमच्यापुढे गालील प्रांतात जात आहे आणि तुम्ही त्यास तेथे पाहाल. पाहा, मी तुम्हास सांगितले आहे.”

तेव्हा येशू त्यांच्याकडे आला आणि म्हणाला, “स्वर्गात आणि पृथ्वीवर मला सर्व अधिकार देण्यात आला आहे.

त्याचवेळी त्यांच्या सभास्थानात अशुद्ध आत्मा लागलेला एक मनुष्य होता, तो एकदम मोठ्याने ओरडला, आणि म्हणाला, “नासरेथच्या येशू, तू आमच्यामध्ये का पडतोस? तू आमचा नाश करावयास आला आहेस काय? तू कोण आहेस हे मला माहीत आहे, जो देवाचा पवित्र तो तूच.” परंतु येशूने त्यास धमकावून म्हटले, “शांत राहा व याच्यातून नीघ.” “नंतर अशुद्ध आत्म्याने त्यास पिळले व तो मोठ्याने ओरडून त्याच्यातून बाहेर निघून गेला.” लोक आश्चर्यचकित झाले व एकमेकांस विचारू लागले, “येथे काय चालले आहे? हा मनुष्य काहीतरी नवीन आणि अधिकाराने शिकवीत आहे. तो अशुद्ध आत्म्यांनाही आज्ञा करतो आणि ते त्याचे ऐकतात!” येशूविषयीची ही बातमी ताबडतोब गालील प्रांतात सर्वत्र पसरली.

येशू व त्याच्या शिष्यांनी सभास्थान सोडले आणि लगेच तो योहान व याकोब यांच्याबरोबर शिमोन व अंद्रिया यांच्या घरी गेला. शिमोनाची सासू तापाने बिछान्यावर पडली होती. तेव्हा त्यांनी ताबडतोब येशूला तिच्याविषयी सांगितले. तेव्हा त्याने जवळ जाऊन तिच्या हाताला धरून तिला उठवले आणि तिचा ताप निघून गेला व ती त्यांची सेवा करू लागली.

संध्याकाळी म्हणजे सूर्यास्त झाल्यावर लोकांनी सर्व आजारी आणि भूतांनी पछाडलेल्यास त्याच्याकडे आणले. सर्व नगर दरवाजापुढे जमा झाले. त्याने निरनिराळ्या रोगांनी आजारी असलेल्यांना बरे केले व अनेक लोकांतून भूते काढली. पण त्याने भूतांना बोलू दिले नाही कारण ती त्यास ओळखत होती.

मग तो सर्व गालील प्रांतातून, त्यांच्या सभास्थानातून उपदेश करीत आणि भूते काढीत फिरला.

एक कुष्ठरोगी येशूकडे आला व त्याच्यापुढे गुडघे टेकून त्याने स्वतःला बरे करण्याची त्यास विनंती केली. तो येशूला म्हणाला, “आपली इच्छा असली तर मला शुद्ध करण्यास आपण समर्थ आहात.” येशूला त्याचा कळवळा आला, त्याने हात पुढे करून त्यास स्पर्श केला व म्हटले, “माझी इच्छा आहे, शुद्ध हो.” आणि लगेच त्याचे कुष्ठ गेले व तो शुद्ध झाला. येशूने त्यास सक्त ताकीद दिली व लगेच लावून दिले. आणि म्हणले “पाहा, याविषयी कोणाला काहीही सांगू नकोस, तर जाऊन स्वतःला याजकाला दाखव आणि त्यांना साक्ष व्हावी म्हणून तू आपल्या शुद्धीकरता मोशेने नेमलेले अर्पण कर.” परंतु तो तेथून गेला व घोषणा करून ही बातमी इतकी पसरवली की येशूला उघडपणे शहरात जाता येईना, म्हणून तो बाहेर अरण्यातच राहिला आणि तरी चोहोबाजूंनी लोक त्याच्याकडे येत राहण्याचे थांबले नाही.

मग काही लोक त्याच्याकडे पक्षघाती मनुष्यास घेऊन आले. त्यास चौघांनी उचलून आणले होते. परंतु गर्दीमुळे त्यांना त्या मनुष्यास येशूजवळ नेता येईना, मग तो जेथे उभा होता त्याच्यावरचे छप्पर त्यांनी काढले व ज्या खाटेवर तो मनुष्य होता, ती खाट त्यांनी छप्परातून खाली त्याच्यापुढे सोडली. त्यांचा विश्वास पाहून येशू पक्षघाती मनुष्यास म्हणाला, “मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.” तेथे काही नियमशास्त्राचे शिक्षक बसले होते. ते आपल्या मनात विचार करू लागले की, “हा मनुष्य असे का बोलत आहे? हा दुर्भाषण करीत आहे! देवाशिवाय कोण पापांची क्षमा करू शकतो?” आणि तेव्हा ते आपल्या अंतःकरणात असे विचार करीत आहेत, हे येशूने त्याच क्षणी आपल्या आत्म्यात ओळखून त्यांना म्हटले, “तुम्ही आपल्या मनात असले विचार का करता? तुझ्या पापांची क्षमा झाली आहे, असे या पक्षघाती मनुष्यास म्हणणे किंवा ऊठ आपला बाज उचलून घेऊन चाल असे म्हणणे; यातील कोणते सोपे आहे? परंतु मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे हे त्यांना समजावे म्हणून, तो पक्षघाती मनुष्यास म्हणाला मी तुला सांगतो, ऊठ, तुझी खाट उचलून घेऊन आपल्या घरी जा.” मग तो लगेच उठला. त्याने आपली खाट उचलून घेऊन सर्वाच्या देखत तो घराच्या बाहेर निघाला; यामुळे ते सर्व आश्चर्यचकित झाले व देवाचे गौरव करत म्हणाले, “आम्ही असे कधीच पाहिले नव्हते.”

मग येशू पुन्हा एका सभास्थानात गेला, तेथे वाळलेल्या हाताचा एक मनुष्य होता. येशूवर आरोप करण्यासाठी कारण मिळावे म्हणून तो शब्बाथ दिवशी त्या मनुष्यास बरे करतो की काय हे पाहण्यासाठी ते त्याच्यावर बारकाईने नजर ठेवून होते. येशू वाळलेल्या हाताच्या मनुष्यास म्हणाला, “ऊठ आणि लोकांच्या समोर उभा राहा.” नंतर तो त्यांना म्हणाला, “शब्बाथ दिवशी चांगले करणे किंवा वाईट करणे, जीव वाचवणे किंवा जीवे मारणे यांतील कोणते योग्य आहे?” पण ते गप्प राहीले. मग त्याने त्यांच्या मनाच्या कठीणपणामुळे खिन्न होऊन त्या सर्वांकडे रागाने पहिले व त्या मनुष्यास म्हणाला, “तुझा हात लांब कर,” त्याने हात लांब केला आणि तो बरा झाला.

कारण त्याने अनेक लोकांस बरे केले होते म्हणून ज्यांना रोग होते ते त्यास स्पर्श करण्यासाठी त्याच्या अंगावर पडत होते. जेव्हा अशुद्ध आत्मे येशूला पाहत तेव्हा ते त्याच्यासमोर खाली पडून मोठ्याने ओरडत की, “तू देवाचा पुत्र आहेस!” पण तो त्यांना सक्त ताकीद देत होता, की मला प्रकट करू नका.

तेव्हा त्याने बारा जणांची नेमणूक केली त्यांना त्याने प्रेषित हे नाव दिले. त्याने त्यांची यासाठी निवड केली की, त्यांनी त्याच्यासोबत असावे व त्यांना दुसऱ्या ठिकाणी उपदेश करण्यासाठी त्यास पाठवता यावे. व त्यांना भूते काढण्याचा अधिकार असावा.

तेव्हा वाऱ्याचे मोठे वादळ सुटले आणि लाटा तारवावर अशा आदळू लागल्या की, ते पाण्याने भरू लागले. परंतु येशू मागच्या बाजूस वरामावर उशास घेऊन झोपी गेला होता. ते त्यास जागे करून म्हणाले, “गुरुजी, आपण बुडत आहोत तरी आपणास काळजी वाटत नाही काय?” मग तो उठला आणि त्याने वाऱ्याला धमकावले आणि समुद्राला म्हणाला, “शांत हो! स्तब्ध राहा.” मग वारा थांबला व तेथे मोठी शांतता पसरली. तो त्यांना म्हणाला, “तुम्ही का भिता? तुमच्याकडे अजूनही विश्वास कसा काय नाही?” परंतु ते अतिशय घाबरले आणि एकमेकास म्हणाले, “हा आहे तरी कोण, वारा आणि समुद्रदेखील याचे ऐकतात.” असा हा आहे तरी कोण?

तो तारवातून उतरताच अशुद्ध आत्मा लागलेला एक मनुष्य कबरांतून निघून त्यास भेटला. तो कबरांमध्ये राहत असे व त्यास साखळदंडाने आणखी बांधून ठेवणे आता कोणाला शक्य नव्हते. कारण त्यास पुष्कळ वेळा बेड्यांनी व साखळदंडांनी बांधले असताही, त्याने साखळदंड तोडून टाकले होते व बेड्यांचे तुकडे तुकडे केले होते आणि त्यास ताब्यात ठेवण्याचे सामर्थ्य कोणालाही नव्हते. तो नेहमी रात्रंदिवस कबरांमध्ये व डोंगरांमध्ये राहून ओरडत असे व टोकदार दगडांनी आपले अंग ठेचून घेत असे. येशूला दुरून पाहताच, तो धावत आला व त्याच्या पाया पडला. आणि मोठ्याने ओरडून म्हणाला, “हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? मी तुला देवाची शपथ घालतो, मला छळू नकोस.” कारण येशू त्यास म्हणत होता, “अरे अशुद्ध आत्म्या, या मनुष्यातून निघ.” त्याने त्यास विचारले, “तुझे नाव काय?” त्याने उत्तर दिले, “माझे नाव सैन्य, कारण आम्ही पुष्कळ आहोत. आणि आम्हास या देशातून घालवू नकोस” अशी तो त्यास आग्रहाने विनंती करत होता. तेथे डोंगराच्या कडेला डुकरांचा एक मोठा कळप चरत होता. तेव्हा अशुद्ध आत्म्यांनी त्यास विनंती केली की, “आम्ही त्या डुकरांत शिरावे, म्हणून त्यांच्याकडे आम्हास लावून दे.” मग त्याने त्यास परवानगी दिली. तेव्हा ते अशुद्ध आत्मे निघून डुकारात शिरले आणि तो सुमारे दोन हजार डुकरांचा कळप तडक धावत जाऊन कड्यावरून सरोवरात पडला व पाण्यात गुदमरून मरण पावला. डुकरे राखणारे पळाले व त्यांनी गावात व शेतमळ्यांत हे वर्तमान सांगितले, तेव्हा काय झाले हे पाहण्यास लोक आले. ते येशूजवळ आल्यावर तो भूतग्रस्त, म्हणजे ज्यात सैन्य होते तो, कपडे घातलेला आणि शुद्धीवर आलेला त्यांच्या दृष्टीस पडला आणि त्यांना भीती वाटली. ज्यांनी ते पाहिले होते त्यांनी भूतग्रस्ताला काय झाले ते व डुकरांविषयीची हकीकत इतरांना सांगितली. तेव्हा आपण आमच्या प्रांतातून निघून जावे असे ते त्यास विनवू लागले.

आणि तेथे रक्तस्रावाने बारा वर्षे पीडलेली एक स्त्री होती. तिने बऱ्याच वैद्यांच्या हातून पुष्कळ हाल सोसून आपल्याजवळ जे काही होते ते सर्व खर्च केले होते तरी तिला काही गुण न येता तिचे दुखणे अधिकच झाले होते. येशूविषयीच्या गोष्टी ऐकून ती त्या गर्दीत शिरली आणि त्याच्यामागे येऊन त्याच्या वस्त्राला स्पर्श केला. कारण ती म्हणत होती, “केवळ याच्या वस्त्रांना स्पर्श जरी केला तरी मी बरी होईन.” तेव्हा लगेचच तिचा रक्तस्राव थांबला आणि आपण त्या पीडेपासून बरे झालो आहोत असा तिला शरीरात अनुभव आला. आपणामधून शक्ती निघाली आहे हे येशूने आपल्याठायी लगेच ओळखले आणि गर्दीमध्ये वाळून म्हटले, “माझ्या वस्त्रांना कोणी स्पर्श केला?” त्याचे शिष्य त्यास म्हणाले, “लोकसमुदाय आपणाभोवती गर्दी करत आहे हे आपण पाहत आहा, तरी आपण म्हणता, मला कोणी स्पर्श केला?” मग जिने हे केले होते तिला पाहण्यास त्याने सगळीकडे बघितले. तेव्हा ती स्त्री आपल्या बाबतीत जे काही घडले, ते जाणून भीत भीत व कापत कापत त्याच्याकडे आली व त्याच्या पाया पडून तिने त्यास सर्वकाही सत्य सांगितले. तो तिला म्हणाला, “मुली, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे. शांतीने जा आणि तुझ्या पीडेपासून मुक्त हो.”

येशू हे बोलत आहे इतक्यात सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घराकडून काही माणसे येऊन त्यास म्हणाली, “आपली मुलगी मरण पावली, आता गुरुजींना त्रास कशाला देता?” परंतु येशू त्यांच्या बोलण्याकडे लक्ष्य न देता, सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, “भिऊ नकोस. विश्वास मात्र धर.” त्याने पेत्र, याकोब व याकोबाचा भाऊ योहान, यांच्याशिवाय कोणालाही आपल्याबरोबर येऊ दिले नाही. मग ते सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या घराजवळ आले, तेव्हा रडत असलेल्या व फारच आकांत करीत असलेल्या लोकांची गडबड त्याने पाहिली. तो आत जाऊन त्यास म्हणाला, “तुम्ही कशाला रडता व गडबड करता? मूल मरण पावले नाही, झोपेत आहे.” तेव्हा ते त्यास हसू लागले. पण त्याने त्या सर्वांना बाहेर काढून दिले आणि मुलीचे आई-वडील व आपल्याबरोबरचे शिष्य यांना घेऊन मुलगी होती तेथे तो आत गेला. नंतर मुलीच्या हातास धरून तो म्हणाला, “तलीथा कूम,” याचा अर्थ, “मुली, मी तुला सांगतो, ऊठ.” आणि लगेच ती मुलगी उठून चालू लागली; (ती बारा वर्षाची होती.) ते अत्यंत आश्चर्यचकित झाले.

शब्बाथ दिवशी तो सभास्थानात शिकवीत होता. पुष्कळ लोकांनी त्याची शिकवण ऐकली तेव्हा ते थक्क झाले. ते म्हणाले, “या मनुष्यास ही शिकवण कोठून मिळाली? त्यास देवाने कोणते ज्ञान दिले आहे आणि याच्या हातून हे केवढे चमत्कार होतात?

थोड्याशाच रोग्यांवर हात ठेवून त्याने त्यास बरे केले, याशिवाय दुसरे कोणतेही महत्कृत्य त्यास तेथे करता आले नाही.

नंतर येशूने बारा शिष्यांना आपणाकडे बोलावून घेतले व त्यांना जोडीजोडीने पाठवू लागला, त्याने त्यास अशुद्ध आत्म्यावरचा अधिकार दिला.

त्यांनी पुष्कळ भूते काढली आणि अनेक रोग्यांना तैलाभ्यंग करून त्यांना बरे केले.

दिवस बराच उतरल्यावर त्याचे शिष्य त्याच्याकडे येऊन म्हणाले, “ही अरण्यातली जागा आहे व आता दिवस फार उतरला आहे. लोकांस जाऊ द्या म्हणजे ते भोवतालच्या शेतात व खेड्यात जाऊन त्यांच्यासाठी काहीतरी खायला विकत आणतील.” परंतु त्याने त्यास उत्तर दिले, “तुम्हीच त्यांना काहीतरी खावयास द्या.” ते त्यास म्हणाले, “आम्ही जाऊन त्यांना खाण्यासाठी दोनशे चांदीच्या नाण्याच्या भाकरी विकत आणाव्या काय?” तो त्यांना म्हणाला, “जा आणि पाहा की तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?” पाहिल्यावर ते म्हणाले, “आमच्याजवळ पाच भाकरी आणि दोन मासे आहेत.” येशूने सर्व लोकांस आज्ञा केली की गटागटाने हिरवळीवर बसावे. तेव्हा ते शंभर शंभर व पन्नास पन्नास असे पंक्तीपंक्तीने बसले. येशूने पाच भाकरी आणि दोन मासे घेऊन वर स्वर्गाकडे पाहून, आशीर्वाद दिला आणि भाकरी मोडल्या व त्या लोकांस वाढण्यासाठी आपल्या शिष्यांजवळ दिल्या आणि दोन मासेसुद्धा वाटून दिले. मग ते सर्व जेवन करून तृप्त झाले. आणि त्यांनी उरलेल्या तुकड्यांच्या बारा टोपल्या भरून घेतल्या आणि माशांचेही तुकडे नेले. भाकरी खाणारे पाच हजार पुरूष होते.

मग त्यांना वल्ही मारणे अवघड जात आहे असे त्यास दिसले, कारण वारा त्यांच्या विरुद्धचा होता. नंतर पहाटे तीन ते सहाच्या दरम्यान येशू सरोवरावरून चालत त्यांच्याकडे आला, त्यांच्याजवळून पुढे जाण्याचा त्याचा बेत होता. पण त्यास सरोवरातील पाण्यावरून चालतांना पाहिले, तेव्हा त्यांना ते भूत आहे असे वाटले व ते ओरडले. (कारण त्या सर्वांनी त्यास पाहिले व ते घाबरून गेले.) तो लगेच त्यांना म्हणाला, “धीर धरा, भिऊ नका, मी आहे.” नंतर तो त्यांच्याकडे तारवात गेला तेव्हा वारा शांत झाला. ते अतिशय आश्चर्यचकित झाले.

ते तारवातून उतरताच लोकांनी येशूला ओळखले. आणि ते आसपासच्या सर्व भागात चोहोकडे धावपळ करीत फिरले व जेथे कोठे तो आहे म्हणून त्यांच्या कानी आले, तेथे तेथे लोक दुखणेकऱ्यांना बाजेवर घालून नेऊ लागले. तो गावात किंवा शेतमळ्यात कोठेही जावो, तेथे लोक दुखणेकऱ्यांना भर बाजारात आणून ठेवत आणि आपल्या वस्त्राच्या गोंड्याला तरी स्पर्श करू द्या अशी त्यास विनंती करीत आणि जितक्यांनी त्यास स्पर्श केला तितके बरे झाले.

येशू त्या ठिकाणाहून निघून सोर आणि सिदोन प्रांतात गेला. तेथे तो एका घरात गेला व हे कोणाला कळू नये अशी त्याची इच्छा होती. तरी त्यास गुप्त राहणे शक्य नव्हते. पण जिच्या लहान मुलीला अशुद्ध आत्मा लागला होता अशा एका स्त्रीने त्याच्याविषयी लगेच ऐकले व ती येऊन त्याच्या पाया पडली. ती स्त्री ग्रीक होती व सिरीयातील फिनीशिया येथे जन्मली होती. तिने येशूला आपल्या मुलीतून भूत काढण्याची विनंती केली. तो तिला म्हणाला, “प्रथम मुलांना तृप्त होऊ दे कारण मुलांची भाकरी घेऊन कुत्र्याला टाकणे योग्य नव्हे.” परंतु ती त्यास म्हणाली, “प्रभू, कुत्रीसुद्धा मुलांच्या हातून मेजाखाली पडलेला चुरा खातात.” तो त्या स्त्रीला म्हणाला, “तुझ्या या बोलण्यामुळे जा, तुझ्या मुलीतून भूत निघून गेले आहे.” मग ती घरी आली तेव्हा तिची मुलगी अंथरूणावर पडली आहे व तिच्यातून भूत निघून गेले आहे. असे तिने पाहिले.

तेथे काही लोकांनी एका बहिऱ्या-तोतऱ्या मनुष्यास येशूकडे आणले व आपण त्याच्यावर हात ठेवावा अशी विनंती केली. येशूने त्यास लोकांपासून एका बाजूस घेऊन त्याच्या कानात आपली बोटे घातली व थुंकून त्याच्या जीभेला स्पर्श केला. त्याने स्वर्गाकडे पाहून उसासा टाकला व तो म्हणाला, “इफ्फाथा.” म्हणजे मोकळा हो. आणि त्याच क्षणी त्याचे कान मोकळे झाले आणि जीभेचा बंद सुटला व त्यास बोलता येऊ लागले. तेव्हा हे कोणाला सांगू नका असे त्याने त्यांना निक्षून सांगितले. परंतु तो त्यांना जसजसे सांगत गेला, तसतसे ते अधिकच जाहीर करत गेले. ते लोक फारच आश्चर्यचकित झाले व म्हणाले, “त्याने सर्वकाही चांगले केले आहे. तो बहिऱ्यांना ऐकण्यास आणि मुक्यांना बोलावयास लावतो.”

त्यादिवसात पुन्हा लोकांचा मोठा समुदाय जमला व त्यांच्याजवळ खावयास काही नव्हते. येशूने आपल्या शिष्यांना बोलावले आणि त्यांना म्हणाला, “मला या लोकांचा कळवळा येतो, कारण आज तीन दिवस ते माझ्याबरोबर आहेत आणि त्यांच्याजवळ खावयास काही नाही. मी जर त्यांना उपाशी घरी पाठवले तर ते रस्त्यातच कासावीस होऊन पडतील आणि त्यांच्यातील काही तर दुरून आले आहेत.” त्याच्या शिष्यांनी उत्तर दिले, “येथे अरण्यात हे तृप्त होतील इतक्या भाकरी कोठून आणाव्यात?” त्याने त्यांना विचारले, “तुमच्याजवळ किती भाकरी आहेत?” ते म्हणाले, “सात.” त्याने लोकांस जमिनीवर बसण्याची आज्ञा केली. त्याने सात भाकरी घेतल्या, आभार मानले व त्या मोडल्या व आपल्या शिष्यांजवळ त्या वाढण्यास दिल्या आणि त्यांनी त्या लोकांस वाढल्या. त्यांच्याजवळ थोडे लहान मासे होते, त्यास त्याने आशीर्वाद देऊन तेही वाढावयास सांगितले. ते जेवून तृप्त झाले व उरलेल्या तुकड्यांच्या सात टोपल्या त्यांनी भरल्या. तेथे सुमारे चार हजार पुरूष होते. मग येशूने त्यांना घरी पाठवले.

ते बेथसैदा येथे आले. तेव्हा लोकांनी त्याच्याकडे एका आंधळ्याला आणले व आपण त्यास स्पर्श करावा अशी विनंती केली. मग त्याने आंधळ्याचा हात धरून त्यास गावाबाहेर नेले मग येशू त्या आंधळ्याच्या डोळ्यांवर थुंकून व त्याच्यावर हात ठेवून त्यास विचारले, “तुला काही दिसते काय?” त्याने वर पाहिले आणि म्हणाला, “मला माणसे दिसत आहेत असे वाटते कारण ती मला झाडांसारखी दिसत आहेत, तरीही ती चालत आहेत.” नंतर येशूने पुन्हा आपले हात त्या मनुष्याच्या डोळ्यावर ठेवले. त्याने डोळे उघडले तेव्हा त्यास दृष्टी आली आणि त्यास सर्वकाही स्पष्ट दिसू लागले.

सहा दिवसानंतर येशूने पेत्र, याकोब आणि योहान यांना आपल्याबरोबर एका उंच डोंगरावर नेले आणि तेथे त्यांच्यासमोर त्याचे रूपांतर झाले. त्याची वस्त्रे चमकदार, अत्यंत पांढरी शुभ्र, इतकी की तशी पृथ्वीवरील कोणत्याही परिटाला शुभ्र करता येणार नाहीत, अशी झाली होती.

तेव्हा समुदायातील एकाने त्यास उत्तर दिले, “गुरुजी, मी माझ्या मुलाला आपणाकडे आणले. त्यास दुष्ट आत्मा लागला असून तो बोलू शकत नाही. आणि जेव्हा तो त्यास धरतो तेव्हा त्यास खाली आपटतो व तोंडाला फेस आणतो, दात चावतो व नंतर ताठ होतो. मी आपल्या शिष्यांना त्यास काढावायास सांगितले परंतु ते काढू शकले नाहीत.” येशू त्यांना म्हणाला, “हे विश्वासहीन पिढी, मी कोठवर तुमच्याबरोबर असणार? मी तुमच्याबरोबर कोठवर सहन करू? मुलाला इकडे आणा.” नंतर त्यांनी मुलाला येशूकडे आणले आणि जेव्हा त्या दुष्ट आत्म्याने येशूकडे पाहिले तेव्हा लगेच त्या मुलाला पिळून टाकले आणि तो जमिनीवर पडून तोंडाला फेस आणून लोळू लागला. नंतर येशूने त्याच्या वडिलांना विचारले, “किती काळ हा असा आहे?” वडीलांनी उत्तर दिले, “बाळपणापासून हा असा आहे. पुष्कळदा ठार करण्यासाठी त्याने त्यास अग्नीत किंवा पाण्यात टाकले. जर आपल्या हातून काही होणे शक्य असेल तर आम्हावर दया करा व आम्हास मदत करा.” येशू त्यास म्हणाला, “शक्य असेल तर, असे कसे म्हणतोस? विश्वास ठेवणाऱ्याला सर्वकाही शक्य आहे.” तेव्हा लागलेच मुलाचे वडील मोठ्याने ओरडून म्हणाले, “मी विश्वास करतो, माझा अविश्वास घालवून टाका.” येशूने लोकसमुदाय त्याच्याकडे धावत येत आहे असे पाहिले तेव्हा येशू त्या दुष्ट आत्म्याला धमकावून म्हणाला, “अरे मुक्या बहिऱ्या आत्म्या, मी तुला आज्ञा करतो की, याच्यातून बाहेर नीघ आणि पुन्हा कधीही याच्यात शिरू नको.” नंतर तो ओरडून व त्यास अगदी पिळून बाहेर निघाला व मुलगा मृतासारखा झाला आणि लोकांस वाटले, तो मरण पावला. परंतु येशूने त्यास हातास धरून त्यास उठवले आणि तो उभा राहिला.

त्यांच्याकडे पाहून येशू म्हणाला, “मनुष्यांना हे अशक्य आहे पण देवाला नाही कारण देवाला सर्व गोष्टी शक्य आहेत.”

मग ते यरीहो शहरास आले. येशू आपले शिष्य व लोकसमुदायासह यरीहो सोडून जात असता तीमयाचा मुलगा बार्तीमय हा एक आंधळा भिकारी रस्त्याच्या कडेला बसला होता. जेव्हा त्याने ऐकले की, नासरेथकर येशू जात आहे तेव्हा तो मोठ्याने ओरडून म्हणू लागला, “येशू, दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा.” तेव्हा त्याने गप्प बसावे म्हणून अनेकांनी त्यास दटावले. पण तो अधिक मोठ्याने ओरडून म्हणू लागला, “येशू दाविदाचे पुत्र मजवर दया करा.” मग येशू थांबला आणि म्हणाला, “त्याला बोलवा,” तेव्हा त्यांनी आंधळ्या मनुष्यास बोलावून म्हटले, “धीर धर, येशू तुला बोलवत आहे.” त्या आंधळ्याने आपला झगा टाकला, उडी मारली व तो येशूकडे आला. येशू त्यास म्हणाला, “मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे?” आंधळा मनुष्य त्यास म्हणाला, “रब्बी, मला पुन्हा दृष्टी प्राप्त व्हावी.” मग येशू त्यास म्हणाला, “जा! तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.” लगेचच तो पाहू लागला (त्याला दृष्टी आली) आणि रस्त्याने तो येशूच्या मागे चालू लागला.

येशूने उत्तर दिले, “देवावर विश्वास ठेवा. मी तुम्हास खरे सांगतो की, जो कोणी या डोंगराला ‘उपटून समुद्रात टाकाला जा’ असे म्हणेल व तो आपल्या मनात संशय धरणार नाही आपण जे म्हणतो तसे घडेलच असा विश्वास धरील तर त्याच्या शब्दाप्रमाणे घडून येईल. म्हणून मी तुम्हास सांगतो तो जे काही तुम्ही प्रार्थनेत मागाल ते मिळालेच आहे असा विश्वास धरा आणि ते तुम्हास मिळेल.

तो त्यांना म्हणाला, भयभीत होऊ नका, तुम्ही नासरेथकर येशू जो वधस्तंभावर खिळला होता त्याचा शोध करीत आहात. पण तो उठला आहे. येथे नाही. त्यांनी त्यास ठेवले होते ती जागा पाहा.

परंतु जो विश्वास धरतील त्यांच्याबरोबर ही चिन्हे असतील, ते माझ्या नावाने भूते काढतील, ते नव्या नव्या भाषा बोलतील. ते आपल्या हातांनी साप उचलतील आणि ते कोणतेही विष पितील तेव्हा ते त्यांना बाधणार नाही. ते आजाऱ्यांवर हात ठेवतील आणि ते बरे होतील.

मग प्रभू येशू त्यांच्याबरोबर बोलल्यानंतर तो स्वर्गात घेतला गेला आणि देवाच्या उजव्या बाजूस जाऊन बसला.

शिष्य बाहेर गेले आणि त्यांनी प्रत्येक ठिकाणी सुवार्तेची घोषणा केली. प्रभूने त्यांच्याबरोबर कार्य केले व त्याने वचनाबरोबर असणाऱ्या चिन्हांनी त्याची खात्री केली.

कारण देवाला कोणतीही गोष्ट अशक्य नाही.

त्यादिवशी सभास्थानात, अशुद्ध आत्मा लागलेला एक मनुष्य होता आणि तो मोठ्याने ओरडून म्हणाला, हे नासरेथकर येशू, तू आमच्यामध्ये का पडतोस? तू आमचा नाश करण्यासाठी आला आहेस काय? तू कोण आहेस हे मला माहीत आहे! देवाचा पवित्र! तो तूच आहेस. येशूने त्यास धमकावून म्हटले, शांत राहा आणि त्याच्यातून नीघ! तेव्हा त्या अशुद्ध आत्म्याने त्या मनुष्यास जमिनीवर खाली पाडले व त्या मनुष्यास काहीही इजा न करता तो त्याच्यातून बाहेर निघाला. तेव्हा सर्वजण आश्चर्यचकित झाले व एकमेकांशी बोलू लागले, हे कोणत्या प्रकारचे शब्द आहेत? अधिकाराने आणि सामर्थ्याने तो अशुद्ध आत्म्याना देखील आज्ञा करतो व ते बाहेर येतात. अशाप्रकारे त्याच्याविषयीची किर्ती चहुकडील प्रदेशात पसरत गेली.

येशू सभास्थानातून निघून शिमोनाच्या घरी गेला. शिमोनाची सासू तापाने आजारी होती. त्यांनी तिला बरे करण्याविषयी त्यास विनंती केली. येशू तिच्याजवळ उभा राहिला व त्याने तापाला धमकावले आणि तिच्यातून ताप निघाला. ताबडतोब उठून ती त्यांची सेवा करू लागली.

सूर्य मावळत असतांना, निरनिराळ्या रोगांनी आजारी असलेल्या सर्व मनुष्यांना त्याच्याकडे आणले. त्याने प्रत्येकाच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना बरे केले. कित्येकांमधून अशुद्ध आत्मे बाहेर आले. ते अशुद्ध आत्मे ओरडत होते आणि म्हणत होते, तू देवाचा पुत्र आहेस. परंतु तो ख्रिस्त आहे हे त्यांना माहिती असल्याने त्याने त्यांना दटावले व काही बोलू दिले नाही.

त्याने बोलणे संपविल्यावर तो शिमोनाला म्हणाला, होडी खोल पाण्यात घेऊन चल आणि मासे पकडण्यासाठी तुझे जाळे खाली सोड. शिमोनाने उत्तर दिले, “साहेब, संपूर्ण रात्र आम्ही खूप कष्ट घेतले पण काहीच मासे पकडू शकलो नाही. तरी तुझ्या शब्दावरून मी जाळी खाली सोडतो.” मग त्यांनी तसे केल्यावर त्यांच्या जाळ्यात माश्यांचा मोठा घोळका सापडला आणि त्यांची जाळी फाटू लागली तेव्हा त्यांनी दुसऱ्या होडीतील आपल्या सहकाऱ्यांना मदत करण्यासाठी बोलावले. ते आले आणि त्या दोन्ही होड्या माश्यांनी इतक्या भरल्या की, त्या बुडू लागल्या. हे पाहून शिमोन पेत्र येशूच्या पाया पडून म्हणाला, “प्रभू, माझ्यापासून दूर जा कारण मी पापी मनुष्य आहे.” कारण त्यांनी धरलेल्या माश्यांचा घोळका पाहून तो व त्याच्याबरोबर असलेले सर्वजण आश्चर्यचकित झाले होते.

आणि असे झाले की, येशू कोणाएका गावात असता तेथे कुष्ठाने भरलेला एक मनुष्य होता, जेव्हा त्याने येशूला पाहिले तेव्हा तो पालथा पडला आणि त्यास विनंती केली, “प्रभूजी, जर तुमची इच्छा असेल तर मला शुद्ध करण्यास आपण समर्थ आहात.” तेव्हा येशूने आपला हात लांब करून त्यास स्पर्श केला आणि म्हटले, “माझी इच्छा आहे शुद्ध हो!” आणि ताबडतोब त्याचे कुष्ठ नाहीसे झाले. मग येशूने त्यास निक्षून सांगितले की, “कोणालाही सांगू नकोस, पण जाऊन स्वतःला याजकाला दाखव आणि त्यांच्यासाठी ही साक्ष व्हावी म्हणून मोशेने आज्ञा केल्याप्रमाणे शुद्धीकरणासाठी अर्पण कर.” परंतु येशूविषयीच्या बातम्या अधिक पसरतच गेल्या आणि मोठे जमाव त्याचे ऐकण्यासाठी व आपल्या रोगांपासून बरे होण्यासाठी जमू लागले.

असे झाले की, एके दिवशी तो शिक्षण देत असता तेथे परूशी व नियमशास्त्राचे शिक्षक बसले होते ते गालील आणि यहूदीया प्रांत व यरुशलेम शहर या भागातील कित्येक ठिकाणाहून आले होते. प्रभूचे सामर्थ्य त्याच्याठायी होते त्यामुळे तो रोग बरे करत असे. काही लोक एका पक्षघात झालेल्या मनुष्यास बाजेवर घेऊन आले आणि त्यांनी त्यास आत आणण्याचा व येशूसमोर खाली ठेवण्याचा प्रयत्न केला. परंतु गर्दीमुळे आत आणण्याचा मार्ग त्यांना सापडेना, म्हणून त्यांनी घराच्या छतावर चढून त्यास बाजे सकट कौलारातून येशूच्या समोर खाली सोडले. त्यांचा विश्वास पाहून, येशू म्हणाला, “मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहेत.” नियमशास्त्राचे शिक्षक आणि परूशी स्वतःशी विचार करू लागले, “हा दुर्भाषण करणारा कोण? देवाशिवाय कोण पापांची क्षमा करू शकतो?” पण येशूने त्यांचे विचार जाणून त्यांना उत्तर देऊन म्हटले, “तुम्ही आपल्या अंतःकरणात असा विचार का करता? तुझ्या पापांची क्षमा झाली आहे किंवा ऊठ आणि चालू लाग यांतील कोणते म्हणणे सोपे आहे? पण तुम्हास हे कळावे की मनुष्याच्या पुत्राला पृथ्वीवर पापांची क्षमा करण्याचा अधिकार आहे, म्हणून तो पक्षघात झालेल्या मनुष्यास म्हणाला, मी तुला सांगतो ऊठ, आपली बाज उचलून घेऊन आपल्या घरी जा.” ताबडतोब तो उभा राहिला व ज्या बाजेवर तो झोपला होता ती उचलून घेऊन देवाचे गौरव करीत आपल्या घरी गेला. ते सर्व आश्चर्यचकित झाले आणि देवाची स्तुती करू लागले, ते फार भयभीत होऊन म्हणाले, आम्ही आज विलक्षण गोष्टी पाहिल्या आहेत.

असे झाले की, दुसऱ्या एका शब्बाथ दिवशी येशू सभास्थानात गेला आणि शिकवू लागला. ज्याचा उजवा हात वाळलेला होता असा एक मनुष्य तेथे होता. येशू शब्बाथ दिवशी कोणाला बरे करतो की काय हे पाहण्यासाठी नियमशास्त्राचे शिक्षक व परूशी त्याच्यावर लक्ष ठेवून होते. यासाठी की त्यांना आरोप ठेवण्यासाठी काहीतरी कारण मिळावे. परंतु तो त्यांचे विचार जाणून वाळलेल्या हाताच्या मनुष्यास म्हणाला, “ऊठ आणि सर्वांसमोर उभा राहा,” आणि तो मनुष्य उठून तेथे उभा राहिला. येशू त्यांना म्हणाला, “मी तुम्हास विचारतो, शब्बाथ दिवशी कोणत्या गोष्टी करायला परवानगी आहे? चांगले करणे की वाईट करणे? कोणते कायदेशीर आहे, एखाद्याचा जीव वाचवणे का त्याचा नाश करणे?” मग त्याने सभोवती त्या सर्वांकडे पाहीले आणि म्हणाला, तू “आपला हात लांब कर.” तेव्हा त्याने तसे केले आणि त्याचा हात बरा झाला.

तो त्यांच्याबरोबर डोंगरावरून खाली उतरला व सपाट जागेवर उभा राहिला आणि त्याच्या अनुयायांचा मोठा समुदाय तेथे आला व यहूदीया प्रांत, यरुशलेम शहर, सोर आणि सिदोनच्या समुद्रकिनाऱ्याकडचे असे पुष्कळसे लोक तेथे आले होते. ते तेथे त्याचे ऐकण्यास व आपल्या रोगांपासून बरे होण्यास आले व ज्यांना अशुद्ध आत्म्यांची बाधा होती त्यांनाही त्यांच्या व्याधीपासून मुक्त करण्यात आले. सगळा लोकसमुदाय त्यास स्पर्श करू पाहत होता, कारण त्याच्यामधून सामर्थ्य येत होते आणि सर्वांना ते बरे करत होते.

तेव्हा कोणाएका शताधीपतीचा आवडता दास आजारी होऊन मरणास टेकला होता. मग त्याने येशूविषयी ऐकून यहूद्यांच्या वडिलांना त्याच्याकडे पाठवून, तू येऊन माझ्या दासास वाचवावे, अशी त्यास विनंती केली. जेव्हा ते येशूजवळ आले तेव्हा त्यांनी त्यास आग्रहाने विनंती केली, ज्याच्यासाठी तू हे करावे, तो योग्य आहे. कारण तो आमच्या राष्ट्रावर प्रीती करतो आणि त्याने आमच्यासाठी आमचे सभास्थान बांधून दिले. त्यामूळे येशू त्यांच्याबरोबर मार्गात चालत गेला आणि तो घरापासून फार दूर नव्हता, तोच त्या शताधीपतीने मित्रांना त्यांच्याकडे पाठवून म्हटले, प्रभू, आपण त्रास करून घेऊ नका, कारण तुम्ही माझ्या घरी यावे असा मी योग्य नाही. त्यामुळे तुमच्याकडे येण्यासही मी स्वतःला योग्य मानले नाही, परंतु तुम्ही फक्त शब्द बोला, म्हणजे माझा सेवक बरा होईल. कारण मीही दुसऱ्याच्या अधिकाराखाली असलेला मनुष्य असून माझ्या हाताखाली शिपाई आहेत; आणि याला मी म्हणतो, जा, म्हणजे हा जातो व दुसऱ्याला ये म्हणतो, म्हणजे तो येतो आणि माझ्या दासास म्हणतो, हे कर, म्हणजे तो ते करतो. जेव्हा येशूने हे ऐकले तेव्हा त्यास त्याच्याविषयी आश्चर्य वाटले, तो त्याच्यामागे येणाऱ्या जमावाकडे वळून म्हणाला, “मी तुम्हास सांगतो, एवढा मोठा विश्वास मला इस्राएलात देखील आढळला नाही.” आणि जे पाठवलेले होते, ते घरी परतले, तेव्हा त्यांना आढळून आले की, तो सेवक बरा झाला आहे.

जसा तो गावाच्या वेशीजवळ आला तेव्हा पाहा कोणाएका मरण पावलेल्या मनुष्यास बाहेर घेऊन जात होते. तो आपल्या आईचा एकुलता एक मुलगा होता व ती विधवा होती; आणि गावातील बरेच लोक तिच्याबरोबर होते. तेव्हा तिला पाहून प्रभूला तिचा कळवळा आला व तो तिला म्हणाला “रडू नकोस” मग जवळ जाऊन त्याने तिरडीस स्पर्श केला; तेव्हा खांदेकरी स्थिर उभे राहीले आणि तो म्हणाला, मुला, मी तुला सांगतो, उठ! आणि तो मरण पावलेला उठून बसला व बोलू लागला; मग येशूने त्यास त्याच्या आईजवळ दिले. तेव्हा सर्वांना भय वाटले आणि ते देवाला गौरव करीत म्हणाले, “आमच्यामध्ये मोठा संदेष्टा उदयास आला आहे आणि देवाने आपल्या लोकांची भेट घेतली आहे” येशूविषयीची ही बातमी सर्व यहूदीया प्रांतात आणि सभोवतालच्या परिसरात पसरली.

त्याच घटकेस येशूने अनेक लोकांचे रोग, आजार बरे केले, पुष्कळांमधील दुष्ट आत्मे काढली, आंधळ्यांना दृष्टी दिली. येशूने त्यांना उत्तर दिले, “जा आणि तुम्ही जे ऐकले व पाहिले आहे ते योहानाला सांगा, आंधळे पाहतात, लंगडे चालतात, कुष्ठरोगी शुद्ध होतात, बहिरे ऐकतात, मरण पावलेले जिवंत केले जातात आणि गरीब लोक सुवार्ता ऐकतात.

दुष्ट आत्मे व दुखणी यांपासून मुक्त केलेल्या अशा कित्येक स्त्रिया त्याच्याबरोबर होत्या, म्हणजे मग्दालीया नगराची मरीयेतून सात भूते निघाली होती, ती,

आणि त्यादिवसात असे झाले की, तो आपल्या शिष्यांबरोबर होडीत बसला आणि आपण सरोवराच्या पलीकडे जाऊ, असे तो त्यांना म्हणाला आणि त्यांनी होडी हाकारली. नंतर ते जहाज हाकारत असता येशू झोपी गेला. मग सरोवरात वाऱ्याचे वादळ सुटले आणि होडी पाण्याने भरू लागले व ते संकटात पडले. तेव्हा ते त्याच्याजवळ येऊन त्यास जागे करून म्हणाले, गुरुजी, आम्ही बुडत आहोत. तेव्हा त्याने झोपेतून उठून वाऱ्याला व खवळलेल्या पाण्याला धमकावले; मग ते बंद होऊन अगदी निवांत झाले. तेव्हा तो त्यांना म्हणाला, तुमचा विश्वास कोठे आहे? आणि ते भयभीत होऊन थक्क झाले व एकमेकांना म्हणाले, हा आहे तरी कोण? की, वारा व पाणी यांना देखील हा आज्ञा करतो व ती यांचे ऐकतात.

आणि तो जमिनीवर उतरला, तेव्हा नगरातील कोणीएक मनुष्य त्यास भेटला; त्यास पुष्कळ भूते लागली होती व त्याने बऱ्याच काळापासून कपडे घातली नव्हती व घरात न राहता तो थडग्यांमध्ये राहत होता. तेव्हा तो येशूला पाहून फार ओरडला व त्याच्यापुढे पडून मोठ्याने म्हणाला, हे येशू, परात्पर देवाच्या पुत्रा, माझा तुझा काय संबध? मी तुला विनंती करतो, मला पिडू नकोस. कारण तो त्या अशुद्ध आत्म्याला त्या मनुष्यांतून निघून जाण्याची आज्ञा करीत होता; कारण त्याने त्यास पुष्कळ वेळा धरले होते; आणि लोक त्यास पहाऱ्यात ठेवून साखळ्यांनी व बेड्यांनी बांधीत असत पण तो ती बंधने तोडून भूताकडून रानांमध्ये हाकून लावला जात असे. आणि येशूने त्यास विचारले, तुझे नाव काय? तेव्हा त्याने म्हटले, सैन्य, कारण त्याच्यामध्ये पुष्कळ भूते शिरली होती. आणि तू आम्हास अगाधकूपात जाण्याची आज्ञा करू नको, अशी ती भूते त्यास विनंती करीत होती. तेव्हा तेथे पुष्कळ डुकरांचा कळप डोंगरावर चरत होता; आणि त्यांमध्ये शिरायला तू आम्हास परवानगी द्यावी, अशी त्यांनी विनंती केली. मग त्याने त्यांना परवानगी दिली. तेव्हा ती भूते त्या मनुष्यांतून निघून त्या डुकरांमध्ये शिरली आणि तो कळप कड्यावरून धडक धावंत जाऊन खाली सरोवरात पडला व गुदमरून मरण पावला. मग कळप चारणारे जे घडले ते पाहून पळाले व त्यांनी ते नगरांमध्ये व शेतांमध्ये जाऊन सांगितले. तेव्हा जे झाले ते पाहायला ते लोक बाहेर निघाले आणि येशूकडे आले आणि ज्या मनुष्यांतून भूते निघाली होती तो वस्त्र पांघरलेला व शुद्धीवर आलेला असा येशूच्या पायांजवळ बसलेला त्यांना आढळला; आणि ते भ्याले. मग ज्यांनी ते पाहिले होते त्यांनी तो भूतग्रस्त कसा बरा झाला हे त्यांना सांगितले. तेव्हा गरसेकरांच्या चहूकडल्या भागांतील सर्व लोकांनी त्यास विनंती केली की तू आमच्यापासून जावे कारण ते मोठ्या भयाने व्याप्त झाले होते. मग तो मचव्यात बसून माघारी आला.

आणि बारा वर्षे रक्तस्राव होत असलेली कोणीएक स्त्री, जी (आपली सर्व उपजीविका वैद्यांवर खर्ची घालून) कोणाकडूनही निरोगी होईना, तिने त्याच्या पाठीमागे येऊन त्याच्या वस्त्राच्या काठाला स्पर्श केला आणि लागलीच तिचा रक्तस्राव बंद झाला. मग येशू म्हणाला, मला कोणी स्पर्श केला? तेव्हा सर्वजण नाकारीत असता पेत्र व जे त्याच्याबरोबर होते ते त्यास म्हणाले, हे गुरूजी, समुदाय दाटी करून तुम्हास चेंगरीत आहेत. तेव्हा येशू म्हणाला, कोणीतरी मला स्पर्श केला, कारण माझ्यातून सामर्थ्य निघाले हे मला समजले. मग ती स्त्री, आपण गुप्त राहिलो नाही असे पाहून, थरथर कांपत आली आणि त्याच्यापुढे उपडी पडून आपण कोणत्या कारणासाठी स्पर्श केला व लागलीच आपण कसे बरे झालो, हे तिने सर्व लोकांच्या देखत सांगितले. तेव्हा त्याने तिला म्हटले, मुली, तुझ्या विश्वासाने तुला तारले आहे. शांतीने जा.

तो अजून बोलत आहे इतक्यात सभास्थानाच्या अधिकाऱ्याच्या येथून कोणी आला व म्हणाला, तुझी मुलगी मरण पावली आहे; गुरूजीला आणखी श्रम देऊ नका. पण येशूने ते ऐकून त्यास उत्तर दिले, भिऊ नको, विश्वास मात्र धर, म्हणजे ती बरी केली जाईल. मग घरात आल्यावर पेत्र व योहान व याकोब आणि मुलीचा पिता व तिची आई यांच्यावाचून कोणालाही आपणाबरोबर आत येऊ दिले नाही. आणि सर्व तिच्यासाठी रडत व शोक करीत होते, पण तो म्हणाला, रडू नका, कारण ती मरण पावली नाही, तर झोपेत आहे. तरी ती मरण पावली आहे हे जाणून ते त्यास हसू लागले. पण त्याने तिचा हात आपल्या हातात घेऊन तिला हाक मारून म्हटले, मुली, ऊठ. तेव्हा तिचा आत्मा परत आला व ती लागलीच उठली; मग तिला खायला द्यावे अशी त्याने आज्ञा केली. आणि तिचे आई-वडील थक्क झाले; परंतु जे झाले ते कोणाला सांगू नका असे त्याना निक्षून सांगितले.

मग त्याने त्या बारा शिष्यांस एकत्र बोलावून त्यांना सर्व भूतांवर आणि रोग बरे करायला, सामर्थ्य व अधिकार दिला, आणि त्याने त्यांना देवाच्या राज्याविषयीचा संदेश जाहीर करायला व रोग्यांना बरे करायला पाठवले.

तेव्हा ते निघाले आणि सर्व ठिकाणी सुवार्ता सांगत व रोग बरे करीत गांवोगांवी फिरत गेले.

परंतु याविषयी लोकांनी ऐकल्यावर ते त्याच्यामागे गेले. तेव्हा तो त्यांचे स्वागत करून त्यांच्याशी देवाच्या राज्याविषयी बोलू लागला आणि ज्यांना बरे होण्याची गरज होती त्यांना त्याने बरे केले.

दिवस संपत आला, तेव्हा बारा जण जवळ येऊन त्यास म्हणाले, “समुदायाला निरोप दे, म्हणजे ते आसपासच्या गावांत व खेड्यांत जाऊन उतरतील व खाण्याची सोय करतील; कारण आपण येथे रानातल्या ठिकाणी आहो.” पण तो त्यांना म्हणाला, “तुम्हीच त्यांना खायला द्या.” ते म्हणाले, “आम्ही जाऊन या लोकांसाठी अन्न विकत आणले नाही, तर पाच भाकरी व दोन मासे एवढ्याशिवाय आम्हाजवळ काही नाही.” कारण ते सुमारे पाच हजार पुरूष होते. तेव्हा त्याने आपल्या शिष्यांना सांगितले, “पन्नास पन्नास जणांच्या पंक्ती करून त्यास बसवा,” मग त्यांनी सांगितल्याप्रमाणे करून सर्वांस बसवले. त्याने त्या पांच भाकरी व ते दोन मासे घेतले आणि वर स्वर्गाकडे पाहून त्यास आशीर्वाद दिला आणि त्यांचे तुकडे करून ते लोकसमुदायाला वाढण्याकरता शिष्यांजवळ दिले. तेव्हा ते सर्व जेवून तृप्त झाले; आणि त्यांनी मोडलेल्या तुकड्यांतले उरले ते बारा टोपल्या भरून त्यांनी उचलून घेतले.

तेव्हा तो प्रार्थना करीत असता त्याच्या मुखाचे रूप पालटले व त्याचे वस्त्र पांढरे शुभ्र लखलखीत झाले.

तेव्हा पाहा, समुदायातील एक मनुष्य मोठ्याने ओरडून म्हणाला, हे गुरु, मी तुला विनंती करतो, माझ्या मुलाकडे पाहा, कारण तो माझे एकुलते मूल आहे. आणि पाहा, कोणी आत्मा त्यास धरतो आणि हा एकाएकी ओरडतो, मग तो याला असा पिळतो की त्याच्या तोंडाला फेस येतो, तो याला पुष्कळ त्रास देतो व याला मोठ्या प्रयासाने सोडून जातो. आणि तो काढावा म्हणून मी तुझ्या शिष्यांना विनंती केली, परंतु त्यांच्याने तो निघेना. तेव्हा येशूने उत्तर देऊन म्हटले, हे अविश्वासी व विपरीत पिढी, मी कोठेपर्यंत तुमच्याबरोबर राहू व तुमचे सोसू? तू आपल्या मुलाला इकडे आण. मग तो जवळ येत आहे इतक्यात भूताने त्यास खाली आपटले व भारी पिळून टाकले, पण येशूने त्या अशुद्ध आत्म्याला धमकावले व मुलाला बरे करून त्याच्या पित्याजवळ परत दिले. मग देवाचे हे महान सामर्थ्य पाहून सर्व लोक थक्क झाले आणि तो जी कामे करीत होता त्या सर्वांवरून सर्वजण आश्चर्य करीत असता तो आपल्या शिष्यांना म्हणाला,

आणि तुम्ही ज्या कोणत्याही नगरांत जाल आणि ते तुम्हास स्वीकारतो, त्यामध्ये ते जे तुमच्यापुढे वाढतील ते खा, आणि त्यामध्ये जे दुखणाईत असतील त्यांना बरे करा व त्यांना सांगा की, देवाचे राज्य तुमच्याजवळ आले आहे.

पाहा, मी तुम्हास साप आणि विंचू यांना तुडविण्याचा व शत्रूच्या सर्व सामर्थ्यावर अधिकार दिला आहे आणि कशानेच तुम्हास अपाय होणार नाही. तथापि तुम्हास दुष्ट आत्मे वश होतात याचा आनंद मानू नका तर तुमची नावे स्वर्गात लिहिली आहेत याचा आनंद माना.”

येशू एक भूत काढीत होता. ते मुके होते. मग असे झाले की, जो मनुष्य बोलू शकत नव्हता ते, भूत बाहेर आल्यावर, तो बोलू लागला व लोकांचा जमाव आश्चर्यचकित झाला.

आणि शब्बाथ दिवशी येशू एका सभास्थानात शिकवीत होता. तेथे एक स्त्री होती, तिला दुष्ट आत्म्याने अठरा वर्षांपासून अपंग केले होते. ती कुबडी होती व तिला सरळ उभे राहता येत नव्हते. येशूने तिला पाहून तिला बोलावले आणि तो तिला म्हणाला, “बाई, तुझ्या आजारापासून तू मुक्त झाली आहेस.” नंतर त्याने आपले हात तिच्यावर ठेवले आणि ती तत्काळ नीट झाली आणि ती देवाची स्तुती करू लागली. नंतर, येशूने तिला बरे केले होते तो शब्बाथाचा दिवस होता म्हणून सभास्थानाचा अधिकारी त्याच्यावर रागावला शब्बाथ दिवशी कोणतेही काम करू नये असा यहूद्यांचा नियम आहे. तो लोकांस म्हणाला, “काम करण्यासाठी सहा दिवस आहेत म्हणून या सहा दिवसांमध्ये या व बरे व्हा. पण शब्बाथ दिवशी येऊन बरे होऊ नका.” येशूने त्यास उत्तर दिले आणि म्हणाला, “ढोंग्यांनो, तुम्हापैकी प्रत्येकजण त्याच्या बैलाला व गाढवाला शब्बाथ दिवशी त्याच्या ठिकाणाहून सोडून पाणी पाजायला घेऊन जात नाही का? ही तर अब्राहामाची कन्या आहे. सैतानाने हिला अठरा वर्षे बांधून ठेवले होते. त्या बंधनातून तिला शब्बाथ दिवशी सोडविणे चूक होते काय?” तो असे म्हणाल्यावर त्याचा विरोध करणाऱ्यांना लाज वाटली व त्याने ज्या अद्भूत गोष्टी केल्या होत्या त्यामुळे सगळा समुदाय आनंद करू लागला.

येशू त्यांना म्हणाला, “जा आणि त्या कोल्ह्याला सांगा, ‘ऐक, मी लोकांतून भूते काढीन, आज व उद्या रोग बरे करीन आणि तिसऱ्या दिवशी माझे काम संपवीन.’

आणि तेथे त्याच्यासमोर जलोदर झालेला एक मनुष्य होता. येशूने नियमशास्त्र शिक्षकांना व परूश्यांना विचारले, “शब्बाथ दिवशी बरे करणे नियमशास्त्राला धरुन आहे की नाही?” परंतु ते गप्पच राहिले. तेव्हा येशूने त्या आजारी मनुष्यास धरुन त्यास बरे केले व त्यास पाठवून दिले.

मग प्रेषित प्रभू येशूला म्हणाले, आमचा विश्वास वाढव.” प्रभू येशू म्हणाला, “जर तुमचा विश्वास मोहरीच्या दाण्याएवढा असेल तर तुम्ही या तुतीच्या झाडाला म्हणू शकता, मुळासकट उपटून समुद्रात लावली जा. तर ते झाड तुमचे ऐकेल.

तो कोणाएका खेड्यात जात असताना तेथे त्यास कुष्ठरोगाने ग्रस्त दहा पुरूष भेटले आणि ते दूर उभे राहून मोठमोठ्याने ओरडून म्हणाले “येशू, स्वामी, आमच्यावर दया करा,” असे बोलून त्यांनी त्याच्याकडे आरोळी केली. जेव्हा येशूने कुष्ठरोग्यांना पाहिले, तेव्हा तो त्यांना म्हणाला, “जा आणि स्वतःला याजकांना दाखवा.” ते याजकाकडे जात असतांनाच शुद्ध झाले, जेव्हा त्यांच्यातील एकाने पाहिले की आपण बरे झालो आहोत तेव्हा तो परत आला व तो मोठ्याने ओरडून देवाचे गौरव करू लागला. तो येशूच्या पायाजवळ खाली पडला व त्याने त्यास नमन केले. तसेच त्याने त्याचे उपकार मानले. तो एक शोमरोनी होता. येशू त्यास म्हणाला, “दहाजण शुद्ध झाले नाहीत काय? बाकीचे नऊजण कोठे आहेत? या विदेशी मनुष्याशिवाय कोणीही देवाचे गौरव करण्यासाठी परत आला नाही काय?” तो त्यास म्हणाला, “ऊठ आणि जा, तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे.”

तो म्हणाला, “ज्या गोष्टी मनुष्यांना अशक्य आहेत त्या देवाला शक्य आहेत.”

येशू यरीहोजवळ येत असतांना एक आंधळा रस्त्यावर बसून भीक मागत होता. जेव्हा त्या आंधळ्या मनुष्याने जवळून जाणाऱ्या लोकांचा आवाज ऐकला तेव्हा त्याने विचारले, ही कशाची गडबड चालली आहे. लोकांनी त्यास सांगितले, “नासरेथकर येशू जवळून जात आहे.” तो ओरडून म्हणाला, “अहो येशू, दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा.” जे पुढे चालले होते त्यांनी त्यास शांत राहण्यास सांगितले. पण तो अजून मोठ्याने ओरडून म्हणाला, “दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा!” येशू थांबला आणि त्याने आंधळ्याला स्वतःकडे आणण्याची आज्ञा केली, तो आंधळा जवळ आल्यावर येशूने त्यास विचारले, “मी तुझ्यासाठी काय करावे म्हणून तुझी इच्छा आहे? तो म्हणाला, प्रभू मला पुन्हा दृष्टी यावी.” येशू त्यास म्हणाला, “तुला दृष्टी येवो, तुझ्या विश्वासाने तुला चांगले केले आहे.” ताबडतोब त्यास दिसू लागले आणि तो देवाचे गौरव करीत येशूच्या मागे गेला. सर्व लोकांनी हे पाहिले आणि देवाची स्तुती केली.

त्यांच्यापैकी एकाने महायाजकाच्या नोकरावर वार केला आणि त्याचा उजवा कान कापला. येशूने उत्तर दिले, “हे पुरेसे असू द्या.” आणि त्याने त्याच्या कानाला स्पर्श केला व त्यास बरे केले.

तो येथे नाही; तो उठला आहे! तो गालील प्रांतात असताना त्याने तुम्हास काय सांगितले याची आठवण करा.

मग द्राक्षारस संपला तेव्हा, येशूची आई त्यास म्हणाली, “त्यांच्याजवळ द्राक्षारस नाही.” येशू तिला म्हणाला, “बाई, याच्याशी तुझा माझा काय संबंध आहे? माझी वेळ अजून आली नाही.” त्याची आई नोकरांना म्हणाली, “हा तुम्हास जे काही सांगेल ते करा.” तेथे पाण्याचे सहा दगडी रांजण, यहूद्यांच्या शुद्धीकरणाच्या रीतीप्रमाणे ठेवलेले होते, त्यामध्ये दोन दोन, तीन तीन मण पाणी मावेल असे ते होते. येशू त्यांना म्हणाला, “रांजण पाण्याने भरा.” आणि त्यांनी ते काठोकाठ भरले. मग त्याने नोकरांना सांगितले, “आता आता त्यातले काढून भोजनकारभार्‍याकडे घेऊन जा,” तेव्हा त्यांनी ते नेले. द्राक्षारस बनलेले पाणी? भोजनकारभार्‍याने जेव्हा चाखले आणि तो कुठला होता हे त्यास माहीत नव्हते, (पण ज्या नोकरांनी पाणी काढले त्यांना माहीत होते) तेव्हा भोजनकारभारी वराला बोलावून, त्यास म्हटले, “प्रत्येक मनुष्य अगोदर चांगला द्राक्षारस वाढतो आणि लोक यथेच्छ प्याले मग बेचव वाढतो, पण तू तर चांगला द्राक्षारस आतापर्यंत ठेवला आहेस.” येशूने गालील प्रांतातील काना नगरात आपल्या अद्भुत चिन्हांचा हा प्रारंभ करून आपले गौरव प्रकट केले आणि त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.

आता वल्हांडण सणाच्या वेळी, तो यरुशलेम शहरात असता, त्याने केलेली चिन्हे पाहून पुष्कळ जणांनी त्याच्या नावावर विश्वास ठेवला.

तो रात्रीचा त्याच्याकडे येऊन म्हणाला, “रब्बी, आपण देवाकडून आलेले शिक्षक आहात हे आम्ही जाणतो; कारण आपण जी चिन्हे करीत आहात ती कोणीही मनुष्य, त्याच्याबरोबर देव असल्याशिवाय करू शकणार नाही.”

नंतर तो गालील प्रांतातील काना नगरात पुन्हा आला. तेथे त्याने पाण्याचा द्राक्षारस केला होता. त्या स्थळी कोणीएक अंमलदार होता, त्याचा मुलगा कफर्णहूमात आजारी होता. येशू यहूदीया प्रांतातून गालील प्रांतात आला आहे हे ऐकून तो त्याच्याकडे गेला आणि त्याने खाली येऊन आपल्या मुलाला बरे करावे अशी त्याने विनंती केली कारण तो मरायला टेकला होता. त्यावर येशू त्यास म्हणाला, “तुम्ही चिन्हे आणि अद्भूते बघितल्याशिवाय विश्वास ठेवणारच नाही.” तो अंमलदार त्यास म्हणाला, “प्रभूजी, माझे मूल मरण्यापूर्वी आपण खाली येण्याची कृपा करा.” येशू त्यास म्हणाला, “जा, तुमचा मुलगा वाचला आहे.” तेव्हा तो मनुष्य, त्यास येशूने म्हटलेल्या वचनावर विश्वास ठेवून, आपल्या मार्गाने निघून गेला. आणि तो खाली जात असता त्याचे दास त्यास भेटून म्हणाले, “आपला मुलगा वाचला आहे.” तेव्हा केव्हापासून त्याच्यात सुधारणा होऊ लागली म्हणून त्याने त्यांना प्रश्न केला आणि ते त्यास म्हणाले, “काल, दुपारी एक वाजता त्याचा ताप गेला.” यावरुन ज्या ताशी येशूने त्यास सांगितले होते की, “तुमचा मुलगा वाचला आहे,” त्याच ताशी हे झाले असे पित्याने ओळखले आणि त्याने स्वतः व त्याच्या सर्व घराण्याने विश्वास ठेवला.

यरुशलेम शहरास, ‘मेंढरे’ दरवाज्याजवळ एक तळे आहे, ज्याला इब्री भाषेत बेथेसदा म्हणतात, त्याच्याजवळ पाच पडव्या आहेत. त्यामध्ये रोगी, आंधळे, लंगडे, लुळे यांचा मोठा समुदाय पडलेला असे. कारण की देवदूत वेळोवेळी तळ्यांत उतरून पाणी हलवत असे आणि पाणी हलवल्यानंतर त्यामध्ये प्रथम जो जाईल त्यास कोणताही रोग असला तरी तो बरा होत असे. तेथे अडतीस वर्षांपासून आजारी असलेला कोणीएक मनुष्य होता. येशूने त्यास पडलेले पाहिले व त्यास तसे पडून आता बराच काळ लोटला हे ओळखून त्यास म्हटले, “तुला बरे होण्याची इच्छा आहे काय?” त्या आजारी मनुष्याने त्यास उत्तर दिले, “साहेब, पाणी हालविले जाते तेव्हा मला तळ्यात सोडायला माझ्याजवळ कोणी नाही; आणि मी जातो न जातो तोच दुसरा कोणीतरी माझ्या आधी उतरतो.” येशू त्यास म्हणाला, “ऊठ, आपली बाज उचलून घेऊन चालू लाग.” लगेच तो मनुष्य बरा झाला व आपली बाज उचलून चालू लागला; तो दिवस शब्बाथ दिवस होता.

तेव्हा मोठा लोकसमुदाय त्याच्या मागोमाग चालला, कारण आजारी असलेल्यांवर तो जी चिन्हे करीत होता ती त्यांनी पाहिली होती.

तेव्हा येशू दृष्टी वर करून व लोकांचा जमाव आपल्याकडे येत आहे असे पाहून फिलिप्पाला म्हणाला, “आपण या लोकांस खायला भाकरी कोठून विकत आणणार?” हे तर त्याने त्याची परीक्षा पाहण्याकरता म्हटले; कारण आपण काय करणार आहोत हे त्यास ठाऊक होते. फिलिप्पाने त्यास उत्तर दिले, “त्यांच्यातल्या प्रत्येकाने थोडे थोडे घेतले तरी दोनशे चांदीच्या नाण्याच्या भाकरी पुरणार नाहीत.” त्याच्या शिष्यांतला एकजण, शिमोन पेत्राचा भाऊ अंद्रिया त्यास म्हणाला, “येथे एक लहान मुलगा आहे. त्याच्याजवळ पाच जवाच्या भाकरी आणि दोन मासळ्या आहेत; परंतु इतक्यांना त्या कशा पुरणार?” येशू म्हणाला, “लोकांस बसवा.” त्या जागी पुष्कळ गवत होते, तेव्हा तेथे जे सुमारे पाच हजार पुरूष होते ते बसले. येशूने त्या पाच भाकरी घेतल्या आणि त्याने उपकार मानल्यावर त्या बसलेल्याना वाटून दिल्या. तसेच त्या मासळ्यांतून त्यांना हवे होते तितके दिले. ते तृप्त झाल्यावर त्याने आपल्या शिष्यांना सांगितले, “उरलेले तुकडे गोळा करा, म्हणजे काही वाया जाऊ नये.” मग जेवणार्‍यांना पुरे झाल्यावर त्यांनी जवाच्या पाच भाकरींचे उरलेले तुकडे गोळा करून बारा टोपल्या भरल्या. तेव्हा त्याने केलेले चिन्ह पाहून ती माणसे म्हणू लागली, “जगात जो संदेष्टा येणार आहे तो खरोखर हाच आहे.”

मग त्यांनी सुमारे सहा किलोमीटर वल्हवून गेल्यावर येशूला पाण्यावरून तारवाजवळ चालत येताना पाहिले आणि त्यांना भय वाटले. पण तो त्यांना म्हणाला, “मी आहे, भिऊ नका.” म्हणून त्यास तारवात घेण्याची त्यांना इच्छा झाली. तेवढ्यात त्यांला जायचे होते त्याठिकाणी तारू किनाऱ्यास लावले.

यावरुन त्यांनी त्यास मारायला दगड उचलले, पण येशू परमेश्वराच्या भवनामधून गुप्तपणे निघून गेला.

तो तिकडून पुढे जात असता एक जन्मपासूनचा आंधळा मनुष्य त्याच्या दृष्टीस पडला. तेव्हा त्याच्या शिष्यांनी त्यास विचारले, “रब्बी, कोणाच्या पापामुळे हा असा आंधळा जन्मास आला? याच्या की याच्या आई-वडीलांच्या?” येशूने उत्तर दिले, “ह्याने किंवा याच्या आई-वडीलाने पाप केले असे नाही, तर याच्याठायी देवाची कार्ये प्रकट व्हावीत म्हणून हा असा जन्मास आला. ज्याने मला पाठवले त्याची कामे दिवस आहे तोपर्यंत आपल्याला केली पाहिजेत. रात्र येणार आहे. तिच्यात कोणालाही काम करता येणार नाही. मी जगात आहे तोपर्यंत मी जगाचा प्रकाश आहे.” असे बोलून तो जमिनीवर थुंकला व थुंकीने त्याने चिखल केला, तो चिखल त्याच्या डोळ्यांस लावला. आणि त्यास म्हटले, “जा, शिलोहाच्या तळ्यात धू.” (याचा अर्थ पाठवलेला) म्हणून त्याने जाऊन धुतले आणि तो डोळस होऊन पाहू लागला. म्हणून त्याचे शेजारी व ज्यांनी त्यास भीक मागताना पूर्वी पाहिले होते ते म्हणाले, “तो जो बसून भीक मागत असे तो हाच ना?”

आंधळा जन्मलेल्या कोणाचे डोळे उघडल्याचे युगाच्या आरंभापासून कधी कोणाच्या ऐकण्यात आले नव्हते. हा जर देवापासून नसता तर याला काही करता आले नसते.”

येशूने म्हटले, “धोंड काढा.” मृताची बहीण मार्था त्यास म्हणाली, “प्रभूजी, आता त्यास दुर्गंधी येत असेल; कारण त्यास मरून चार दिवस झाले आहेत.” येशूने तिला म्हटले, “तू विश्वास ठेवशील तर तू देवाचे गौरव पाहशील असे मी तुला सांगितले नव्हते काय?” तेव्हा त्यांनी धोंड काढली; आणि येशूने डोळे वर करून म्हणाला, “हे पित्या, तू माझे ऐकले म्हणून मी तुझे उपकार मानतो. मला माहीत आहे की, तू माझे नेहमी ऐकतोस, तरी जे लोक सभोवती उभे आहेत त्यांच्याकरिता मी बोललो, यासाठी की, तू मला पाठवले आहे असा त्यांनी विश्वास धरावा.” असे म्हटल्यावर त्याने मोठ्याने हाक मारली, “लाजरा, बाहेर ये.” तेव्हा जो मरण पावलेला होता तो बाहेर आला; त्याचे हातपाय प्रेतवस्त्रांनी बांधलेले व तोंड रुमालाने गुंडाळलेले होते. येशूने त्यांना म्हटले, “ह्याला मोकळे करून जाऊ द्या.”

मग मुख्य याजकांनी व परूश्यांनी सभा भरवून म्हटले, “आपण काय करीत आहो? कारण तो मनुष्य पुष्कळ चमत्कार करीत आहे.

त्याने त्यांच्यासमोर इतकी चिन्हे केली असतांही त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही;

मी पित्यामध्ये व पिता माझ्यामध्ये आहे यावर तुम्ही विश्वास ठेवा; नाही तर माझ्या कृत्यांमुळे तरी माझ्यावर विश्वास ठेवा. मी तुम्हास खरे खरे सांगतो, मी जी कामे करतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करील आणि त्यापेक्षा अधिक मोठी करील, कारण मी पित्याकडे जातो.

पुत्राच्या ठायी पित्याचे गौरव व्हावे म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करीन. तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर मी ते करीन.

तुम्ही माझ्यामध्ये राहीला आणि माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हास पाहिजे असेल ते मागा म्हणजे ते तुम्हास मिळेल.

त्या दिवशी, म्हणजे आठवड्याच्या पहिल्या दिवशी संध्याकाळी, शिष्य जेथे जमले होते तेथील दरवाजे यहूद्यांच्या भीतीमुळे बंद असता, येशू आत आला व मध्यभागी उभा राहून म्हणाला, “तुम्हास शांती असो.” आणि हे बोलल्यावर त्याने त्यांना आपले हात आणि कूस दाखवली; आणि शिष्यांनी प्रभूला बघितले तेव्हा ते आनंदित झाले

म्हणून दुसऱ्या शिष्यांनी त्यास सांगितले, “आम्ही प्रभूला पाहिले.” तेव्हा तो त्यांना म्हणाला, “मी त्याच्या हातात खिळ्यांची खूण बघितल्याशिवाय, खिळ्यांच्या जागी माझे बोट घातल्याशिवाय आणि त्याच्या कुशीत माझा हात घातल्याशिवाय मी विश्वास ठेवणारच नाही.” आणि पुन्हा, आठ दिवसानी, त्याचे शिष्य घरात होते आणि थोमा त्यांच्याबरोबर होता; आणि दरवाजे बंद असताना येशू आला व मध्यभागी उभा राहिला आणि म्हणाला, “तुम्हास शांती असो.” मग तो थोमाला म्हणाला, “तुझे बोट पुढे कर आणि माझे हात बघ; तुझा हात पुढे कर आणि माझ्या कुशीत घाल; आणि विश्वासहीन होऊ नकोस पण विश्वास ठेवणारा हो.” आणि थोमाने त्यास म्हटले, “माझा प्रभू आणि माझा देव!”

आणि या पुस्तकात लिहिली नाहीत अशी दुसरीही पुष्कळ चिन्हे येशूने आपल्या शिष्यांसमोर केली.

शिमोन पेत्र त्यांना म्हणाला, “मी मासे धरावयला जातो.” ते त्यास म्हणतात, “आम्ही पण तुझ्याबरोबर येतो.” तेव्हा ते निघून तारवात चढले आणि त्या रात्री त्यांनी काहीही धरले नाही. पण आता पहाट होते वेळी येशू समुद्र किनार्‍याजवळ उभा होता, पण तो येशू होता हे शिष्यांना समजले नाही. तेव्हा येशूने त्यांना म्हटले, “मुलांनो, तुमच्याजवळ काही खावयाला आहे काय?” ते त्यास म्हणाले, “नाही.” आणि तो त्यांना म्हणाला, “तारवाच्या उजवीकडे जाळे टाका आणि तुम्हास मिळेल.” म्हणून त्यांनी टाकले आणि माशांच्या घोळक्यामुळे ते त्यांना आता ओढवेना. तेव्हा ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती तो पेत्राला म्हणाला, “तो प्रभू आहे.” शिमोन पेत्राने ऐकले की, तो “प्रभू आहे, प्रभू आहे” तेव्हा तो उघडा असल्यामुळे (त्याने बाहेरील वस्त्र, झगा, न घातल्यामुळे) त्याने कमरेला झगा गुंडाळला आणि सरोवरात उडी घेतली. आणि दुसरे शिष्य त्या लहान मचव्याने ते माशांचे जाळे ओढीत ओढीत आले कारण ते किनार्‍यापासून फार दूर नव्हते, पण सुमारे दोनशे हातावर होते. तेव्हा ते किनार्‍यावर बाहेर आल्यावर तेथे कोळशांचा विस्तव आणि त्यावर ठेवलेली मासळी आणि भाकरी पाहिली. येशूने त्यांना म्हटले, “तुम्ही आता धरलेल्या मासळीमधून काही आणा.” तेव्हा शिमोन पेत्राने मचव्यावर चढून एकशे त्रेपन्न मोठ्या माशांनी भरलेले जाळे किनार्‍यावर ओढून आणले. ते तितके असतानाही जाळे फाटले नाही.

तेव्हा पेत्र मागे वळला आणि पाहतो की, ज्या शिष्यावर येशूची प्रीती होती जो भोजनाच्या वेळी त्याच्या छातीशी टेकला असता मागे लवून ‘प्रभू, तुला धरून देणारा तो कोण आहे?’ असे म्हणाला होता, त्यास त्याने मागे चालतांना पाहिले. म्हणून, त्यास बघून, पेत्र येशूला म्हणाला, “प्रभू, ह्याचे काय?” येशूने त्यास म्हटले, “मी येईपर्यंत त्याने रहावे अशी जर माझी इच्छा असेल तर त्याचे तुला काय? तू माझ्यामागे ये.” तेव्हा बांधवांत हे बोलणे पसरले की, तो शिष्य मरणार नाही. पण येशू त्यास म्हणाला नव्हता की, तो मरणार नाही, पण ‘मी येईपर्यंत त्याने रहावे अशी जर माझी इच्छा असेल तर तुला काय?’

आणि ह्याशिवाय येशूने केलेली पुष्कळ कृत्ये आहेत; ती एकएक लिहिली तर लिहिलेली पुस्तके या जगात देखील मावणार नाहीत असे मला वाटते.

मरण सोसल्यानंतरही येशूने त्यांना पुष्कळ प्रमाणांनी आपण जिवंत आहोत. हे दाखवून चाळीस दिवसपर्यंत तो त्यांना दर्शन देत असे, व देवाच्या राज्याच्या गोष्टी सांगत असे.

परंतु पवित्र आत्मा तुम्हांवर येईल, तेव्हा तुम्ही सामर्थ्य प्राप्त कराल, आणि यरुशलेम शहरात सर्व यहूदीया आणि शोमरोन प्रांतात, व पृथ्वीच्या शेवटापर्यंत तुम्ही माझे साक्षी व्हाल.” असे सांगितल्यावर त्यांच्या डोळ्यासमोर तो वर घेतला गेला, आणि मेघांनी त्यास दृष्टीआड केले.

अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला, व ज्या घरात ते वसले होते ते सर्व त्याने भरले. आणि वेगवेगळ्या होत असलेल्या अग्नीच्या जीभांसारख्या जीभा त्यांना दिसल्या, व प्रत्येकावर त्या एकएक अशा बसल्या. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली, तसतसे ते निरनिराळ्या भाषांतून बोलू लागले. त्यावेळेस आकाशाखालच्या प्रत्येक राष्ट्रातील भक्तिमान यहूदी यरुशलेम शहरात राहत होते. तो नाद झाल्यावर लोकसमुदाय एकत्र होऊन गोंधळून गेला, कारण प्रत्येकाने त्यांना आपआपल्या भाषेत बोलताना ऐकले.

देव म्हणतो, ‘शेवटच्या दिवसात असे होईल,’ मी मनुष्यमात्रावर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन, तेव्हा तुमचे पुत्र व तुमच्या कन्या संदेश देतील. तुमच्या तरूणांस दृष्टांत होतील व तुमच्या वृद्धास स्वप्ने पडतील. आणखी त्यादिवसात मी आपल्या दासांवर व आपल्या दासींवर आपल्या आत्म्याचा वर्षाव करीन, म्हणजे ते संदेश देतील. आणि वर आकाशात अद्भूते व खाली पृथ्वीवर चिन्हे, म्हणजे रक्त, अग्नी व धूम्ररूप वाफ अशी मी दाखवीन. परमेश्वराचा महान व प्रसिद्ध दिवस येण्यापूर्वी सूर्य अंधकारमय व चंद्र रक्तमय होईल.

अहो इस्राएल लोकांनो, या गोष्टी ऐका: नासोरी येशूच्या द्वारे देवाने जी महत्कृत्ये, अद्भूते व चिन्हे तुम्हास दाखविली त्यावरून देवाने तुम्हाकरिता मान्यता दिलेला असा तो मनुष्य होता, याची तुम्हास माहिती आहे.

तेव्हा प्रत्येक मनुष्यास भय वाटले, आणि प्रेषितांच्या हातून पुष्कळ अद्भूत कृत्ये व चिन्हे घडत होती.

आणि जन्मापासून पांगळा असा एक मनुष्य होता, भवनाच्या सुंदर नावाच्या दाराजवळ भवनात जाणाऱ्याकडे भीक मागण्यास दररोज त्यास कोणीतरी नेऊन ठेवत असत. पेत्र व योहान हे परमेश्वराच्या भवनात जात आहेत, असे पाहून त्याने त्यांच्याकडे भीक मागितली. तेव्हा पेत्र, योहानाबरोबर त्यास निरखून पाहत, म्हणाला, “आमच्याकडे पाह.” तेव्हा त्यांच्यापासून काही मिळेल, अशी आशा धरून त्याने त्यांच्याकडे लक्ष लावले. आणि पेत्र म्हणाला, “रूपे व सोने माझ्याजवळ काहीच नाही; पण जे माझ्याजवळ आहे. ते मी तुला देतो, नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने उठून चालू लाग.” आणि त्याने त्याचा उजवा हात धरून त्यास उठवले: तेव्हा लागलेच त्याची पावले व त्याचे घोटे यांत बळ आले. आणि तो उडी मारून उभा राहिला व चालू लागला, आणि तो चालत व उड्या मारत व देवाची स्तुती करत त्याच्याबरोबर परमेश्वराच्या भवनात गेला. आणि सर्व लोकांनी त्यास चालताना व देवाची स्तुती करताना पाहिल. आणि जो भवनाच्या सुंदर दाराजवळ भीक मागण्यासाठी बसत असे; तो हाच आहे असे त्यांनी त्यास ओळखले तेव्हा त्यास जे झाले होते त्यावरून ते आश्चर्याने व विस्मयाने व्याप्त झाले. तेव्हा तो पेत्राला व योहानाला धरून राहिला असता, सर्व लोक फार आश्चर्य करीत शलमोनाचा द्वारमंडप म्हटलेल्या ठिकाणी, त्याच्याकडे धावत आले.

हे पाहून पेत्राने त्या लोकांस उत्तर दिले, तो म्हणाला, “अहो इस्राएल मनुष्यांनो, यावरुन तुम्ही आश्चर्य का करता? अथवा आम्ही आपल्या सामर्थ्याने किंवा सुभक्तीने याला चालायला लावले आहे, असे समजून आम्हाकडे का न्याहाळून पाहता?

आणि त्याच्या नावाने त्याच्या नावावरील विश्वासाकडून ज्याला तुम्ही पाहता, व ओळखता त्या या मनुष्यास शक्तिमान केले आहे. आणि, त्याच्याद्वारे प्राप्त झालेल्या विश्वासानेच तुम्ही सर्वांच्यादेखत याला हे पूर्ण आरोग्य दिले आहे.

तेव्हा पेत्राचे व योहानाचे धैर्य पाहून, आणि ही निरक्षर व अशिक्षित माणसे आहेत, हे जाणून त्यांनी आश्चर्य केले, आणि हे येशूच्या संगतीत होते असे त्यांनी ओळखले. तेव्हा तो बरा झालेला मनुष्य त्यांच्याजवळ उभा असलेला पाहून, यहूदी पुढाऱ्यांना त्यांच्याविरुद्ध काही बोलता येईना. मग त्यांना सभेच्या बाहेर जाण्याची आज्ञा करून ते आपसात विचार करू लागले. ते म्हणाले, “या मनुष्यांस आपण काय करावे? कारण खरोखर यांच्याकडून प्रसिद्ध चमत्कार घडला आहे यरुशलेम शहरात राहणाऱ्या सर्वास माहित आहे; व ते आपण नाकारू शकत नाही.

तर हे प्रभू, आता तू त्यांच्या धमकावण्याकडे पाहा आणि तुझ्या दासांनी पूर्ण धैर्याने तुझे वचन बोलावे असे दान दे. तू आपला हात लोकांस निरोगी करण्यास पुढे करीत असता असे कर तुझा पवित्र सेवक येशू याच्या नावाने चमत्कार व अद्भूते घडावी असे ही कर.” आणि त्यांनी प्रार्थना केल्यावर ज्या जागेमध्ये ते एकत्र जमले होते ती हालली, आणि ते सर्व पवित्र आत्म्याने पूर्ण होऊन, देवाचे वचन धैर्याने बोलू लागले.

तेव्हा हनन्या नावाचा कोणी एक मनुष्य व त्याची पत्नी सप्पीरा यांनी आपली मालमत्ता विकली, मग त्याने त्या किंमतीतून काही भाग पत्नीच्या संमतीने ठेवून घेतला, आणि काही भाग आणून प्रेषितांच्या पायाशी ठेवला. तेव्हा पेत्र म्हणाला, हनन्या, तू पवित्र आत्म्याशी लबाडी करावी आणि जमिनीच्या किंमतीतून काही ठेवून घ्यावे म्हणून सैतानाने तुझे मन का भरले आहे? ती होती तोपर्यंत तुझी स्वतःची नव्हती काय? आणि ती विकल्यानंतर त्याची आलेली किंमत तुझ्याच स्वाधीन नव्हते काय? ही गोष्ट तू आपल्या मनात का आणली? तू मनुष्याशी नाही, तर देवाशी लबाडी केली आहे. तेव्हा हनन्याने हे शब्द ऐकताच खाली पडून प्राण सोडला. आणि हे ऐकणाऱ्या सर्वाना मोठे भय प्राप्त झाले. तेव्हा काही तरूणांनी उठून त्यास गुंडाळले, व बाहेर नेऊन पुरले. त्यानंतर सुमारे तीन तासांनतर त्याची पत्नी आत आली, पण जे झाले होते ते तिला समजले नव्हते. तेव्हा पेत्राने तिला म्हटले, “मला सांग तुम्ही एवढ्यालाच जमीन विकली काय.” आणि तिने म्हटले, “होय, एवढ्यालाच.” पण पेत्र तिला म्हणाला, “प्रभूच्या आत्म्याची परीक्षा पाहण्यास तुम्ही एकोपा का केला? पाहा ज्यांनी तुझ्या पतीला पुरले त्यांचे पाय दारापाशी आहेत, ते तुलाही उचलून बाहेर नेतील.” तेव्हा लागलेच तिने त्यांच्या पायाजवळ पडून प्राण सोडला, आणि तरूण आत आले तेव्हा ती मरण पावलेली; अशी आढळली आणि त्यांनी तिला बाहेर नेऊन तिच्या पतीजवळ पुरले. आणि सर्व मंडळीला व ज्यांनी या गोष्टी ऐकल्या त्या सर्वांना मोठे भय प्राप्त झाले.

तेव्हा प्रेषितांच्या हातून लोकांमध्ये पुष्कळ चमत्कार व अद्भूते घडत असत. आणि ते सर्व एकचित्ताने शलमोनाच्या द्वारमंडपात जमत असत. आणि अविश्वासी लोकांतला कोणी त्यांच्याशी मिळण्यास धजत नसे; तरी लोक त्यांना थोर मानीत असत, इतकेच नव्हे तर विश्वास धरणारे पुष्कळ पुरूष व स्त्रिया यांचे समुदाय प्रभूला मिळत असत. इतके चमत्कार घडले की लोकांनी दुखणेकऱ्यास उचलुन रस्त्यामध्ये आणले, आणि पेत्र जवळून येत असता त्याची सावली तरी त्यांच्यातील कोणावर पडावी म्हणून त्यांना बाजांवर व पलंगावर ठेवले. आणखी यरुशलेम शहराच्या, आसपासच्या चहूकडल्या गावांतील लोकांचे समुदाय रोग्यास व अशुद्ध आत्म्यांनी पिडलेल्यांस घेउन येत असत.

परंतु त्यारात्री प्रभूच्या दूताने तुरुंगाचे दरवाजे उघडले व त्यांना बाहेर आणून म्हटले, “जा, आणि परमेश्वराच्या भवनात उभे राहून या जीवनाचा सर्व संदेश लोकांस सांगा.” हे ऐकून उजाडताच ते परमेश्वराच्या भवनामध्ये जाऊन शिक्षण देऊ लागले, इकडे महायाजक व त्यांच्याबरोबर जे होते त्यांनी येऊन न्यायसभा व इस्राएल लोकांचे संपूर्ण वडीलमंडळ एकत्र बोलावले, आणि त्यांना आणण्यास बंदिशाळेकडे पाठवले. पण तिकडे गेलेल्या शिपायांना ते तुरुंगात सापडले नाहीत, म्हणून त्यांनी परत येऊन सांगितले, “बंदिशाळा चांगल्या व्यवस्थेने बंद केलेली आणि दरवाजांपाशी पहारेकरी उभे राहिलेले आम्हास आढळले, परंतु तुरुंग उघडल्यावर आम्हास आत कोणी सापडले नाही.” हे वर्तमान ऐकून याचा काय परिणाम होईल, ह्याविषयी परमेश्वराच्या भवनाचा सरदार व मुख्य याजक लोक घोटाळ्यात पडले. इतक्यात कोणीतरी येऊन त्यांना असे सांगितले, पाहा, “ज्या मनुष्यास तुम्ही तुरुंगात ठेवले होते ते तर परमेश्वराच्या भवनात उभे राहून लोकांस शिक्षण देत आहेत.”

स्तेफन कृपा व सामर्थ्य ह्यांनी पूर्ण होऊन, लोकात मोठी अद्भूते व चिन्हे करत असे.

तेव्हा न्यायसभेत बसलेले सर्वजण त्याच्याकडे निरखून पाहत असता त्यांना त्याचे मुख देवदूताच्या मुखासारखे दिसले.

मग चाळीस वर्षे भरल्यावर, सीनाय पर्वताच्या रानात एका झुडपातील अग्निज्वालेत एक देवदूत त्याच्या दृष्टीस पडला.

मिसर देशात, तांबड्या समुद्रात, व रानात चाळीस वर्षे अद्भूत कृत्ये करून व चिन्हे दाखवून त्या लोकांस बाहेर नेले.

फिलिप्प जी चिन्हे करत असे व ज्या गोष्टी त्यांना सांगत असे, ते ती लक्षपूर्वक ऐकत असत. कारण ज्यांना अशुद्ध आत्मे लागले होते त्यांच्यातील पुष्कळांतून ते मोठ्याने ओरडून निघून गेले; तेथे बरेच लंगडे व अर्धांगवायू झालेले लोक बरे झाले. यामुळे शहरातील लोक फार आनंदित झाले.

स्वतः शिमोनाने विश्वास ठेवला: आणि त्याचा बाप्तिस्मा झाल्यावर, तो फिलिप्पबरोबर राहू लागला; आणि झालेले चमत्कार आणि अद्भूत चिन्हे पाहून, शिमोन आश्चर्याने थक्क झाला.

ते जेव्हा पाण्याबाहेर आले, तेव्हा प्रभूच्या आत्म्याने फिलिप्पाला दूर नेले; आणि त्या अधिकाऱ्याला फिलिप्प पुन्हा दिसला नाही, पण तो अधिकारी पुढे तसाच मोठ्या आनंदाने प्रवास करीत घरी गेला. आपण अजोत नगरात आहोत. असे फिलिप्पाला दिसून आले आणि पुढे जात असताना जी जी गावे लागली त्या सर्व गावात त्याने सुवार्ता सांगितली, नंतर तो कैसरीया शहरास गेला.

मग शौल दिमिष्काजवळ आला तेव्हा एकाएकी, आकाशातून फारच प्रखर प्रकाश त्याच्याभोवती चमकला; शौल जमिनीवर पडला आणि एक वाणी त्याच्याशी बोलताना त्याने ऐकली, “शौला, शौला, तू माझा छळ का करतोस?” शौल म्हणाला, “प्रभू तू कोण आहेस?” ती वाणी म्हणाली, “मी येशू आहे, ज्याचा तू छळ करीत आहेस तो मीच आहे; आता ऊठ, आणि नगरात जा, तुला काय करायचे आहे, ते तुला तेथे कोणीतरी सांगेल.” जी माणसे शौलाबोबर प्रवास करीत होती, ती तेथेच स्तब्ध उभी राहिली त्या लोकांनी आवाज ऐकला, पण त्यांना कोणी दिसले नाही. शौल जमिनीवरून उठला, त्याने डोळे उघडले, पण त्यास काहीच दिसेना, म्हणून जे लोक त्याच्याबरोबर होते त्यांनी त्याचा हात धरून त्यास दिमिष्क शहरात नेले. तीन दिवसांपर्यंत शौलाला काहीच दिसत नव्हते, त्याने काही खाल्ले किंवा प्याले नाही.

हनन्या निघाला आणि यहूदाच्या घरी गेला, त्याने शौलाच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हटले, “शौल, भाऊ, प्रभू येशूने तुला इकडे येत असता रस्त्यावर दर्शन दिले त्यानेच मला तुझ्याकडे पाठवले, यासाठी की, तुला पुन्हा दृष्टी यावी व तू पवित्र आत्म्याने परिपूर्ण व्हावे.” लागलीच खपल्यासारखे काहीतरी शौलाच्या डोळ्यावरून खाली पडले, आणि त्यास पुन्हा दृष्टी आली शौल तेथून उठल्यावर त्याचा बाप्तिस्मा करण्यात आला.

लोद येथे त्यास ऐनेयास नावाचा मनुष्य आढळला, त्याच्या अंगातून वारे गेल्याने तो पंगू झाला होता व आठ वर्षे अंथरुणाला खिळून होता. पेत्र त्यास म्हणाला, “ऐनेयास, येशू ख्रिस्त तुला बरे करीत आहे; ऊठ, आपले अंथरुण नीट कर.” ऐनेयास ताबडतोब उभा राहिला. लोद येथे राहणाऱ्या सर्व लोकांनी आणि शारोनात राहणाऱ्यांनी त्यास पाहिले, तेव्हा ते सर्व प्रभूकडे वळले.

जेव्हा पेत्र लोदमध्ये होता, तेव्हा तबिथा आजारी पडली व मरण पावली; लोकांनी तिला आंघोळ घालून व माडीवरच्या एका खोलीत ठेवले. यापो येथील शिष्यांनी ऐकले की, पेत्र लोदमध्ये आहे, लोद हे यापोजवळ आहे, म्हणून त्यांनी दोन माणसे पाठविली, त्यांनी त्यास विनंती केली, ते म्हणाले, “त्वरा करा, आमच्याकडे लवकर या.” पेत्र तयार झाला व त्यांच्याबरोबर गेला, जेव्हा तो तेथे पोहोचला तेव्हा त्यांनी त्यास माडीवरच्या एका खोलीत नेले, सर्व विधवा स्त्रिया पेत्राभोवती उभ्या राहिल्या, त्या रडत होत्या, दुर्कस (तबीथा) जिवंत असताना जे कपडे व झगे तिने तयार केले होते ते त्यांनी पेत्राला दाखवले. पेत्राने खोलीतील सर्वांना बाहेर काढले त्याने गुडघे टेकून प्रार्थना केली आणि दुर्कसच्या शरीराकडे वळून तो म्हणाला, “तबिथा ऊठ” तेव्हा तिने डोळे उघडले, जेव्हा तिने पेत्राला पाहीले तेव्हा ती उठून बसली. त्याने तिला आपला हात देऊन उभे राहण्यास मदत केली, नंतर त्याने पवित्रजनांना आणि विधवा स्त्रियांना खोलीमध्ये बोलावले, त्याने तबिथाला त्यांना दाखवले, ती जिवंत होती. यापोमधील सर्व लोकांस हे समजले, यातील पुष्कळ लोकांनी प्रभूवर विश्वास ठेवला.

नासरेथच्या येशूविषयी तुम्हास माहिती आहे, देवाने त्यास पवित्र आत्म्याचा व सामर्थ्याचा अभिषेक केला (ख्रिस्त), येशू सगळीकडे लोकांसाठी चांगल्या गोष्टी करीत गेला, जे लोक दुष्ट आत्म्याने पछाडले होते त्यांना येशूने बरे केले, कारण देव त्याच्याबरोबर होता.

हेरोदाने पेत्राला अटक करून तुरुंगात टाकले, त्याच्या रखवालीकरिता त्यास शिपायांच्या चार चौकड्यांच्या स्वाधीन केले, वल्हांडण सण झाल्यावर पेत्राला लोकांसमोर आणण्याची योजना होती. म्हणून पेत्राला तुंरूगात ठेवण्यात आले, पण मंडळी सातत्याने पेत्रासाठी देवाकडे प्रार्थना करीत होती. पेत्र दोन शिपायांच्यामध्ये झोपला होता, त्यास दोन साखळ्यांनी बांधले होते, तुरुंगाच्या दाराजवळ आणखी काही शिपाई पहारा देत होते, ती रात्रीची वेळ होती व हेरोदाने असा विचार केला की, दुसऱ्या दिवशी पेत्राला लोकांसमोर आणावे. तेव्हा पाहा, अचानक परमेश्वराचा दूत तेथे उभा राहिला, तुरुंगाच्या खोलीत एकदम प्रकाश पडला, देवदूताने पेत्राच्या कुशीला स्पर्श करून त्यास उठवले, देवदूत म्हणाला, “लवकर ऊठ!” तेव्हा पेत्राच्या हातातील साखळ्या गळून पडल्या. देवदूत पेत्राला म्हणाला, “कपडे घाल व तुझ्या वहाणा घाल,” मग पेत्राने कपडे घातले, मग देवदूत म्हणाला, “तुझा झगा अंगात घाल व माझ्यामागे ये.” मग देवदूत बाहेर पडला व पेत्र त्याच्यामागे चालला, पेत्राला कळत नव्हते की, हे खरोखर काय करीत आहे, त्यास वाटले आपण दृष्टांत पाहत आहोत. पहिल्या व दुसऱ्या फेऱ्यातील पहारेकऱ्यांना ओलांडून पेत्र व देवदूत लोखंडी दाराजवळ येऊन पोहोचले, ते त्यांच्यासाठी आपोआप उघडले, पेत्र व देवदूत दरवाजामधून बाहेर पडले, त्यांनी एक रस्ता पार केला आणि अचानक देवदूत पेत्राला सोडून निघून गेला. पेत्राला मग कळले की नक्की काय घडले आणि तो म्हणाला, “आता मला समजले की प्रभूने खरोखर त्याचा दूत माझ्याकडे पाठविला व त्याने मला हेरोदाच्या हातातून व यहूदी लोकांचा संपूर्ण अपेक्षाभंग करून मला सोडवले आहे.”

परंतु अलीम “जादूगार” (त्याच्या नावाचा अर्थ हाच आहे) हा बर्णबा व शौल यांच्याविरुद्ध होता, राज्यपालाने विश्वास ठेवू नये म्हणून अलीमने त्याचे मन वळविण्याचा प्रयत्न केला. पण शौल, ज्याला पौलहि म्हणत, तो पवित्र आत्म्याने भरला होता, पौलाने त्याच्याकडे रोखून पाहिले व म्हणाला. “सैतानाच्या पुत्रा तू दुष्टाईने व खोटेपणाने भरलेला आहेस, अवघ्या नीतिमानाच्या वैऱ्या, तू प्रभूचे सरळ मार्ग विपरीत करण्याचे सोडून देणार नाहीस काय? तर आता पाहा, प्रभूचा हात तुझ्यावर आहे, तू आंधळा होशील व काही वेळपर्यंत तुला सूर्य दिसणार नाही,” मग लागलेच अलीमावर धुके व अंधार पडला आणि तो आपल्याला कोणी हाती धरून चालवावे म्हणून इकडेतिकडे फिरुन मनुष्यांचा शोध करू लागला. तेव्हा जे झाले ते पाहून राज्यपालाने विश्वास ठेवला, प्रभूच्या शिक्षणाने तो चकित झाला.

म्हणून पौल व बर्णबाने त्याठिकाणी बरेच दिवस मुक्काम केला आणि परमेश्वराच्या बलाने येशूविषयी धैर्याने सांगत राहीले, पौल व बर्णबाने देवाच्या कृपेविषयी साक्ष दिला, परमेश्वराने त्यांना पौल व बर्णबाला चमत्कार व अद्भूते कृत्ये करण्यास मदत करून ते जे काही सांगत होते ते खरे ठरवले.

लुस्र येथे एक मनुष्य होता त्याचे पाय अधू होते तो जन्मतःच पांगळा जन्मला होता व कधीच चालला नव्हता. पौल भाषण करीत असताना हा मनुष्य ऐकत होता, पौलाने त्याच्याकडे दृष्टि लावून व त्यास आपण बरे होऊ असा त्या मनुष्याचा विश्वास आहे असे पाहून. मोठ्याने म्हणाला, “तुझ्या पायांवर नीट उभा राहा!” तेव्हा त्या मनुष्याने उडी मारली आणि चालू लागला.

तेव्हा सर्व लोक गप्प राहीले आणि बर्णबा व पौल ह्यांनी आपल्या द्वारे देवाने परराष्ट्रीयामध्ये जी चिन्हे व अद्भूते केली त्यांचे केलेले वर्णन त्यांनी ऐकून घेतले.

मध्यरात्रीच्या सुमारास पौल व सीला हे प्रार्थना करीत असता व गाणे गाऊन देवाची स्तुती करीत असता बंदिवान त्यांचे ऐकत होते. तेव्हा एकाएकी असा मोठा भूमिकंप झाला की बंदिशाळेचे पाये डगमगले, सर्व दरवाजे लागलेच उघडले व सर्वांची बंधने तुटली. तेव्हा बंदिशाळेच्या नायकाने जागे होऊन बंदिशाळेचे दरवाजे उघडे पाहिले; आणि बंदिवान पळून गेले आहेत असा तर्क करून तो तरवार उपसून आपला घात करणार होता.

देवाने पौलाच्या हातून असामान्य चमत्कार घडविले. पौलाच्या शरीरावरून रुमाल आणि कपडेही आणून काही, लोक या गोष्टी आजारी लोकांवर ठेवत असत, जेव्हा ते असे करीत तेव्हा आजारी लोक बरे होत आणि दुष्ट आत्मे त्यांना सोडून जात.

युतुख नावाचा एक तरुण खिडकीत बसला होता, पौल बोलत असताना त्याच्यावर झोपेचा इतका अंमल चढला की, तो तिसऱ्या मजल्यावरून खाली पडला, जेव्हा त्यास उचलले, तेव्हा तो मरण पावलेला आढळला. पौल खाली गेला व त्याच्यावर ओणवा पडला आणि त्यास आपल्या हातांनी कवेत धरून म्हणाला, “चिंता करू नका! त्याच्यात अजून जीव आहे.” मग पौल वर गेला, त्यांने भाकर मोडली व ती खाल्ली, पहाट होईपर्यंत तो त्यांच्याशी बोलला, मग तो गेला. त्या तरुणाला त्यांनी जिवंत असे घरी नेले, त्या सर्वांना फार समाधान झाले.

पौलाने काटक्या गोळा केल्या आणि ते त्या शेकोटीत टाकू लागला, उष्णतेमुळे तेथून एक साप निघाला आणि त्याने पौलाच्या हाताला विळखा घातला. ते पाहून तेथील रहिवाशी एकमेकांना म्हणू लागले, “हा मनुष्य खुनी असला पाहिजे, समुद्रातून जरी हा वाचला असला तरी न्यायदेवताही याला जगू देत नाही.” परंतु पौलाने तो प्राणी शेकोटीत झटकून टाकला आणि पौलाला काही अपाय झाला नाही. त्या बेटावरील लोकांस पौलाचे अंग सुजून येईल किंवा पौल एकाएकी मरून पडेल असे वाटत होते, बराच वेळ वाट पाहूनही पौलाला काहीही विकार झाल्याचे दिसेना, तेव्हा त्या लोकांचे विचार पालटले आणि पौल देवच आहे असे ते म्हणू लागले.

तेथून जवळच पुब्ल्य नावाच्या मनुष्याची शेती होती, पुब्ल्य हा त्या बेटाचा मुख्य अधिकारी होता, त्याने आम्हा सर्वांचे त्याच्या घरी स्वागत केले आणि तीन दिवस आमचा चांगला पाहुणचार केला. पुब्ल्याचे वडील तापाने व पोट खराब असल्यामुळे आजारी होते, त्यामुळे अंथरुणाला खिळून होते, पौल त्या आजारी व्याक्तिला भेटायला गेला प्रार्थना करून पौलाने आपला हात त्याच्यावर ठेवला आणि त्या मनुष्यास बरे केले. हे घडलेले पाहिल्यावर त्या बेटावरील इतर आजारी लोक पौलाकडे आले आणि बरे झाले.

तर मग ऐकण्यामुळे विश्वास होतो आणि ख्रिस्ताच्या वचनामुळे ऐकणे होते.

चिन्हांच्या व अद्भूतांच्या सामर्थ्याने, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने; अशाप्रकारे मी यरुशलेम शहरापासून सभोवताली इल्लूरिकम प्रांतापर्यंत ख्रिस्ताची सुवार्ता पसरवली आहे.

कारण अनेक यहूदी लोक चमत्काराची चिन्हे विचारतात आणि ग्रीक लोक ज्ञानाचा शोध घेतात, परंतु आम्ही वधस्तंभावर खिळलेला ख्रिस्त गाजवितो. हा संदेश यहूदी लोकांसाठी अडखळण आणि ग्रीकांसाठी मूर्खपणा असा आहे. परंतु ज्यांना बोलावलेले आहे, अशा यहूदी व ग्रीक दोघांसही ख्रिस्त हा संदेश आहे तो देवाचे सामर्थ्य व देवाचे ज्ञान असाही आहे.

बंधूनो, जेव्हा मी तुमच्याकडे आलो तेव्हा मी देवाविषयीचे सत्य रहस्य मानवी ज्ञानाने किंवा उत्कृष्ट भाषण करून सांगत आलो असे नाही. कारण तुमच्यामध्ये असताना फक्त येशू ख्रिस्त आणि तोसुध्दा वधस्तंभावर खिळलेला, याशिवाय कशाचेही ज्ञान मला असू नये असा मी ठाम निश्चय केला आहे. आणि मी तुमच्याकडे अशक्त, भयभीत व थरथर कापत आलो. माझे भाषण व घोषणा हे मन वळविणाऱ्या मानवी ज्ञानाद्वारे दिलेले नव्हते पण ते आत्मा आणि त्याचे सामर्थ्य यांच्या द्वारे होते. जेणेकरून तुमचा विश्वास मानवी ज्ञानावर नव्हे तर देवाच्या सामर्थ्यावर असावा.

पण आत्म्याचे प्रकटीकरण हे सर्वांस उपयोगी होण्यास एकेकाला दिले आहे. कारण एकाला आत्म्याच्याद्वारे ज्ञानाचे वचन मिळते, आणखी एकाला त्याच आत्म्याच्या इच्छेप्रमाणे विद्येचे वचन दिले जाते. दुसर्‍याला त्याच आत्म्याच्या योगे विश्वास, आणखी एकाला त्याच आत्म्याच्या योगे निरोगी करण्याची कृपादाने, आणखी एकाला चमत्कार करण्याची शक्ती व दुसऱ्याला भविष्य सांगण्याची शक्ती, तर दुसऱ्याला आत्म्या आत्म्यातील फरक ओळखण्याची, आणखी एकाला विविध प्रकारच्या भाषा बोलण्याची, आणखी एकाला भाषांतर करून अर्थ सांगण्याची शक्ती दिली आहे. पण या सर्वात तोच एक आत्मा कार्य करतो. तो आपल्या इच्छेप्रमाणे प्रत्येक जणाला कृपादान वाटून देतो.

आणि देवाने मंडळीत असे काही नेमले आहेत प्रथम प्रेषित, दुसरे संदेष्टे, तिसरे शिक्षक; त्यानंतर चमत्कार, त्यानंतर रोग काढण्याची कृपादाने, सहाय्यक सेवा, व्यवस्था आणि विविध प्रकारच्या भाषा बोलणारे असे नेमले आहेत. सगळेच प्रेषित आहेत काय? सगळेच संदेष्टे आहेत काय? सगळेच शिक्षक आहेत काय? सगळेच चमत्कार करणारे आहेत काय? सगळ्यांनाच रोग काढण्याची कृपादाने मिळालीत काय? सगळेच अन्य भाषा बोलतात काय? सगळेच अर्थ सांगतात काय? पण तुम्ही अधिक मोठी कृपादाने मिळवण्याची इच्छा बाळगा आणि शिवाय, मी तुम्हास एक अधिक चांगला मार्ग दाखवतो.

मी मनुष्यांच्या आणि देवदूतांच्या भाषेत बोललो पण माझ्याठायी प्रीती नसली, तर मी वाजणारी थाळी किंवा झणझणणारी झांज असा आहे. आणि माझ्यात संदेश देण्याची शक्ती असली, मला सर्व रहस्ये कळली व सर्व ज्ञान अवगत झाले आणि मला डोंगर हलवता येतील इतका माझ्यात पूर्ण विश्वास असला पण माझ्याठायी प्रीती नसली, तर मी काही नाही.

प्रीती हे तुमचे ध्येय असू द्या आणि आत्मिक दानांची विशेषतः तुम्हास संदेश देता यावा याची मनापासून इच्छा बाळगा. ज्याला इतर भाषांमध्ये बोलण्याचे दान आहे तो खरे पाहता मनुष्यांबरोबर बोलत नाही तर देवाबरोबर बोलतो कारण तो काय बोलतो हे कोणालाही कळत नाही. पवित्र आत्म्याच्याद्वारे तो गुढ गोष्टी बोलतो. परंतु जो संदेश देतो तो लोकांशी बोध, उन्नती व सांत्वन याविषयी बोलतो, ज्याला दुसऱ्या भाषेत बोलण्याचे दान आहे, तो स्वतःचीच आध्यात्मिकदृष्ट्या उन्नती करून घेतो, पण ज्याला संदेश देण्याचे दान आहे तो संपूर्ण मंडळीची उन्नती करतो. तुम्ही सर्वांनी अन्य भाषेत बोलावे, पण विशेषतः तुम्ही संदेश द्यावेत अशी माझी इच्छा आहे कारण जो कोणी अन्य भाषांत बोलतो, त्याच्यापेक्षा जो संदेश देतो तो मोठा आहे. यासाठी की, मंडळीची उन्नती व्हावी. आता, बंधूनो, जर मी तुमच्याकडे अन्य भाषा बोलण्यासाठी आलो तर तुमचा कसा फायदा होईल? तुमचा फायदा होण्यासाठी मी तुमच्याकडे प्रकटीकरण, दैवी ज्ञान, देवाकडून संदेश किंवा शिकवणूक आणायला नको का?

म्हणून इतर भाषांमध्ये बोलण्याचे दान हे विश्वास ठेवणाऱ्यांसाठी नसून अविश्वासणाऱ्यांसाठी चिन्हादाखल आहे. म्हणून जर संपूर्ण मंडळी एकत्र येते व प्रत्येकजण दुसऱ्या भाषेत बोलत असेल आणि जर एखादा बाहेरचा किंवा अविश्वासणारा आत आला, तर तुम्ही वेडे आहात असे ते तुम्हास म्हणणार नाही का? परंतु जर प्रत्येकजण संदेश देऊ लागला आणि जर अविश्वासणारा किंवा बाहेरचा आत आला, तर सर्वजण जे बोलत असतील त्यामुळे त्या ऐकणाऱ्याला त्याच्या पापाची जाणीव होते, ते सर्व त्याचा न्याय करतात; त्याच्या अंतःकरणातील गुपिते माहीत होतात आणि मग तो पालथा पडतो आणि देवाची उपासना करतो व म्हणतो “खरोखर देव तुमच्यामध्ये आहे” तुमच्या भेटींनी मंडळीला मदत व्हावी.

म्हणून माझ्या बंधूनो संदेश देण्यासाठी उत्सुक असा, अन्य भाषेत बोलणाऱ्याला मना करू नका.

चिन्हे, अद्भूते व सामर्थ्याची कृत्ये यांच्या योगाने खऱ्या प्रेषितांची चिन्हे खरोखरच सर्व सहनशीलतेने तुम्हामध्ये घडविण्यात आली.

आणि आता देव जो आपल्या सामर्थ्यानुसार आपल्यामध्ये कार्य करतो इतकेच नव्हे तर आम्ही मागणी किंवा आमच्या कल्पनेपेक्षा अधिक काम करण्यास तो समर्थ आहे,

देवानेसुद्धा चिन्हांद्वारे, अद्भूत कृत्यांद्वारे आणि निरनिराळ्या चमत्कारांद्वारे, त्यांच्या साक्षीची भर व त्याच्या इच्छेनुसार पवित्र आत्म्याची दाने वाटून दिली.

विश्वास हा आशा धरलेल्या गोष्टींविषयीचा भरवसा आणि न दिसणाऱ्या गोष्टीबद्दलची खात्री असा आहे.

पण विश्वासाशिवाय त्यास संतोषवणे अशक्य आहे, कारण जो त्याच्याकडे येतो त्याने विश्वास ठेवला पाहिजे की, तो आहे आणि जे त्यास झटून शोधतात त्यांना प्रतिफळ देणारा आहे.

पण त्याने विश्वासाने मागावे व संशय धरू नये कारण जो संशय धरतो तो वाऱ्यामुळे लोटलेल्या व उचबंळलेल्या समुद्रातील लाटेसारखा आहे.

तुमच्यापैकी कोणी आजारी आहे काय? त्याने मंडळीतील वडीलांना बोलवावे व त्यांना त्याच्यासाठी प्रार्थना करण्यास सांगावे आणि प्रभूच्या नावाने त्याच्यावर तेल लावावे विश्वासाने केलेली प्रार्थना आजारी मनुष्यास बरे करील व प्रभू त्यास उठवील. जर त्याने पापे केली असतील तर प्रभू त्याची क्षमा करील. म्हणून एकमेकांकडे आपल्या पापांची कबुली द्या आणि एकमेकांसाठी प्रार्थना करा. यासाठी की, तुम्ही बरे व्हावे. नीतिमान मनुष्याची प्रार्थना सामर्थ्ययुक्त व परिणामकारक असते.

एलीया हा आपल्यासारख्या स्वभावाचा मनुष्य होता. पाऊस पडू नये म्हणून त्याने कळकळीने प्रार्थना केली आणि नंतर साडेतीन वर्षे देशात पाऊस पडला नाही. मग त्याने पुन्हा प्रार्थना केली व आकाशाने पाऊस दिला आणि पृथ्वीने आपले धान्य उपजवले.

माझ्याबरोबर बोलत असलेली वाणी पाहण्यासाठी मी मागे वळलो, मागे वळून पाहतो, तो सोन्याच्या सात दीपसमया पाहिल्या. त्या समयांच्या मध्यभागी ‘मनुष्याच्या पुत्रासारखा’ व लांब पायघोळ झगा घातलेला, छातीवर ‘सोन्याचा’ ‘पट्टा बांधलेला’, असा कोणीएक माझ्या दृष्टीस पडला. ‘त्याचे डोके’ आणि ‘केस बर्फासारख्या पांढऱ्या लोकरीप्रमाणे’ शुभ्र होते त्याचे डोळे अग्नीच्या ज्वालेसारखे होते; ‘त्याचे पाय’ जणू काय भट्टीतून काढलेल्या जळजळीत ‘सोनपितळेसारखे होते आणि त्याची वाणी अनेक जलप्रवाहांच्या ध्वनीसारखी होती.’ त्याच्या उजव्या हातात सात तारे होते; त्याच्या तोंडातून दोन्ही बाजूंनी तीक्ष्ण धार असणारी तरवार निघाली होती. त्याचा चेहरा दिवसाच्या अतिशय प्रखर ‘तेजाने’ प्रकाशणाऱ्या ‘सूर्यासारखा’ दिसत होता.

आणि मी नवे आकाश आणि नवी पृथ्वी ही बघितली कारण पहिले आकाश व पहिली पृथ्वी ही निघून गेली होती आणि समुद्रही राहिला नव्हता. आणि मी ती ‘पवित्र नगरी, नवे यरुशलेम,’ देवाकडून स्वर्गातून खाली येत असलेली बघितली. ती वरासाठी साज चढवून ‘सजविलेल्या वधूप्रमाणे’ दिसत होती;

Marathi - मराठी - MR

MRIRV'17 - Marathi Indian Revised Version - 2017

This Bible text is from Marathi Indian Revised Version IRV 2019
https://open.bible/bibles/marathi-bridge-text-bible/
provided by: Bridge Connectivity Solutions Pvt Ltd, available by Creative Commons CC-BY-SA-4.0,
and this new compilation is shared as www.creativecommons.org/licenses/by-sa/4.0.
Languages are made available to you by www.ipedge.net