01 – पवित्र बायबल
हे सर्वशक्तिमान देवाचे पवित्र शब्द आहेत.
माणसांच्या बोलण्यात आपल्याला रस नसतो.
देवावर प्रेम करणार् या प्रत्येकासाठी... याबद्दल देव असे म्हणतो: पवित्र बायबल.
हे सर्वशक्तिमान देवाचे पवित्र शब्द आहेत.
माणसांच्या बोलण्यात आपल्याला रस नसतो.
देवावर प्रेम करणार् या प्रत्येकासाठी... याबद्दल देव असे म्हणतो: पवित्र बायबल.
प्रत्येक शास्त्रलेख देवाच्या प्रेरणेने लिहिला असल्यामुळे तो शिकवण्यास, वाईटाचा निषेध करण्यास, चुका सुधारण्यास व योग्य जीवन जगण्याचे मार्गदर्शन करण्यास उपयुक्त आहे.
”कारण मी तुम्हास खरे सांगतो, आकाश व पृथ्वी ही नाहीशी होतील, परंतु सर्वकाही पूर्ण झाल्याशिवाय, नियमशास्त्रातील एकही काना किंवा मात्रा रद्द होणार नाही.
”जो माझा अवमान करतो आणि माझी वचने स्वीकारीत नाही त्याचा न्याय करणारे कोणी आहे. जे वचन मी सांगितले, तेच शेवटल्या दिवशी, त्याचा न्याय करील.
”देवाने प्रकाश पाहिला आणि त्याला कळले की तो चांगला आहे. नंतर देवाने अंधारापासून प्रकाश वेगळा केला.
”परमेश्वर देवाने निर्माण केलेल्या सर्व वन्य प्राण्यांमध्ये सर्प हा अतिशय धूर्त आणि हुषार होता. त्याला स्त्रीची फसवणूक करायची होती. त्यावेळी सर्प त्या स्त्रीशी बोलला व तो तिला म्हणाला, “स्त्रिये, बागेतल्या कोणत्याही झाडाचे फळ खाऊ नको असे देवाने तुला खरोखरच सांगितले आहे काय?”
”परमेश्वराने पाहिले की पृथ्वीवरील लोक दुष्ट आहेत; त्यांचे विचार नेहमी वाईट असतात.
”परमेश्वर महान योद्धा आहे; त्याचे नांव याव्हे आहे.
”मोशेने लोकांना परमेश्वराचे सर्व नियम व आज्ञा सांगितल्या; मग सर्व लोक एकमुखाने म्हणाले, “परमेश्वराने सांगितलेल्या सर्व आज्ञा आम्ही पाळू.” तेव्हा मोशेने सर्व आज्ञा लिहून काढल्या दुसऱ्या दिवशी सकाळी मोशेने उठून पर्वताच्या पायथ्याशी एक वेदी बांधली व त्याने इस्राएलच्या बारा वंशासाठी, प्रत्येक वंशास एक याप्रमाणे बारा दगड तेथे रोवून स्तंभ उभे केले.
”देव माणूस नाही. तो खोटे बोलणार नाही. देव म्हणजे काही माणूस नाही. त्याचे निर्णय बदलणार नाहीत. जर परमेश्वराने सांगितले की तो एखादी गोष्ट करील. तर तो ती करीलच. जर परमेश्वराने वचन दिले तर तो ते वचन दिलेली गोष्ट करीलच.
”माझ्या आज्ञांमध्ये तुम्ही अधिक - ऊणे करु नका. या तुमचा देव ह्याच्या आज्ञा मी तुम्हाला देत आहे. त्या तुम्ही पाळा.
”“परमेश्वराने आज्ञा दिली त्याप्रमाणे विधी आणि नियम मी तुम्हाला शिकवले. तुम्ही जो देश ताब्यात घ्यायला जात आहात तेथे तुम्ही ते पाळावेत म्हणून मी ते सांगितले. त्यांचे काटेकोरपणे पालन करा. म्हणजे तुम्ही सूज्ञ व समजूतदार आहात हे इतर देशवासियांना कळेल. ते हे नियम ऐकून म्हणतील, ‘खरंच, हे महान राष्ट्र (इस्राएल) बुद्धिमान व समंजस लोकांचे आहे.’
”तुम्ही सर्व होरेब पर्वतापाशी परमेश्वरासमोर उभे होतात तो दिवस आठवा. परमेश्वर मला म्हणाला होता, ‘मला काही सांगायचे आहे तेव्हा सर्वांना एकत्र बोलाव. म्हणजे आयुष्यभर ते माझ्याबद्दल आदर बाळगतील. आपल्या मुलबाळांनाही तशीच शिकवण देतील.’
”कारण मूर्तीपूजेचा त्याला तिटकारा आहे. परमेश्वर देव ईर्ष्यावान् असून तो क्षणात भस्म करणारा अग्नी आहे.
”“तेव्हा परमेश्वराच्या आज्ञेप्रमाणे आपले आचरण राहील याची खबरदारी घ्या. त्यालाच अनुसरा.
”आणि आपला देव परमेश्वर ह्यावर संपूर्ण अंत:करणाने, संपूर्ण मनाने व संपूर्ण शक्तीने प्रेम करा. मी आज दिलेल्या आज्ञा तुमच्या कायम लक्षात असू द्या. त्या आपल्या मुलाबाळांनाही शिकावा. घरी, दारी, झोपता-उठताना, त्याविषयी बोलत राहा. त्या लिहून आठवणीसाठी हाताला बांधा व कपाळावर चिकटवा. दरवाजाच्या खांबांवर व फाटकांवर त्या लिहून ठेवा.
”परमेश्वराने तुम्हाला लीन केले, तुमची उपासमार होऊ दिली आणि मग, तुम्ही अन् तुमचे पूर्वज यांना माहीत नसलेला मान्ना तुम्हाला खाऊ घातला. माणूस फक्त भाकरीवर जगत नाही तर परमेश्वराच्या मुखातील वचनाने जगतो हे तुम्हाला कळावे म्हणून त्याने हे सर्व केले.
”“तुमचा देव परमेश्वर ह्याच्या आज्ञा पाळा, त्याला अनुसरा आणि त्याच्याबद्दल आदर बाळगा.
”“तो असेही म्हणाला, ‘त्यांचे मी एक पाहून ठेवले आहे. ते फार हट्टी आहेत.
”“आता, हे इस्राएल लोकांहो तुमच्या परमेश्वराची तुमच्याकडून काय अपेक्षा आहे ते आता ऐका. परमेश्वराची अशी इच्छा आहे की तुम्ही त्याचा मान राखावा आणि तो म्हणतो त्याप्रमाणे करावे तुम्ही त्याच्यावर प्रेम करावे आणि संपूर्ण अंत:करणाने व जीवाने त्याची सेवा करावी. तेव्हा तुमच्या भल्यासाठीच मी आज परमेश्वराचे नियम आणि आज्ञा सांगतो, ते ऐका व पाळा.
”“म्हणून तुमचा देव परमेश्वर ह्यावर प्रेम करा. त्याच्या आज्ञेप्रमाणे वागा. त्याने घालून दिलेल्या नियमांचे, आज्ञांचे पालन करा.
”“म्हणून सांगतो या आज्ञा लक्षात ठेवा. त्या ह्दयात साठवून ठेवा. त्या लिहून ठेवा. आणि लक्षात राहण्यासाठी हातावर बांधा व कपाळावर लावा. आपल्या मुलाबाळांना हे नियम शिकवा. घरीदारी, झोपताना, झोपून उठताना त्याविषयी बोलत राहा. घराच्या फाटकांवर, आणि दारांच्या खांबांवर ही वचने लिहा.
”“आज मी तुमच्यापुढे आशीर्वाद आणि शाप हे पर्याय ठेवत आहे. त्यातून निवड करा. आज मी तुमचा देव परमेश्वर ह्याचा ज्या आज्ञा तुम्हाला सांगितल्या त्या नीट लक्षपूर्वक पाळल्यात तर तुम्हाला आशीर्वाद मिळेल. पण या आज्ञा न ऐकता भलतीकडे वळलात तर शाप मिळेल. तेव्हा आज मी सांगितल्या मार्गानेच जा. इतर दैवतांच्या मागे लागू नका. परमेश्वराला तुम्ही ओळखता पण इतर दैवतांची तुम्हाला ओळख नाही.
”“तेव्हा मी सांगतो तेच कटाक्षाने करा. त्यात अधिक उणे करु नका.
”“स्वप्नांचे अर्थ सांगणारा एखादा भोंदू संदेष्टा तुमच्याकडे एखाद्या वेळी येईल. आपण काही चिन्ह, किंवा चमत्कार दाखवतो असे तो म्हणेल. कदाचित् त्या चिन्हाचा तुम्हाला पडताळा येईल किंवा चमत्कार खराही ठरेल. मग तो, तुम्हाला अपरिचित अशा इतर दैवतांची सेवा करायला सुचवेल. पण त्याचे ऐकू नका. कारण तुमचा देव परमेश्वर तुमची परीक्षा पाहात असेल. हे लोक आपल्यावर मनापासून प्रेम करतात की नाही हे परमेश्वराला पाहायचे असेल. तेव्हा तुम्ही आपल्या परमेश्वर देवालाच अनुसरा. त्याच्याविषयी आदर बाळगा. त्याच्या आज्ञा पाळा. आणि त्याने सांगितलेले ऐका. त्याची सेवा करा. त्याचा त्याग करु नका.
”नियमशास्त्रातील सर्व आज्ञांचे त्याने पालन करावे व अशा रीतीने परमेश्वर देवाचा आदर ठेवावा.
”“तुम्ही हे सर्व नियम व विधी पाळावे अशी तुमचा देव परमेश्वर ह्याची तुम्हाला आज आज्ञा आहे. ते सर्व तुम्ही मन:पूर्वक पाळा.
”“लेवींनी म्हणावे, “जो ही नियमशात्राची वचने मान्य करीत नाही, आचरणात आणत नाही तो शापित असो.’ “तेव्हा सर्व लोकांनी म्हणावे ‘आमेन.’
”“आज, मी दिलेल्या सर्व आज्ञा तुम्ही काळजीपूर्वक पाळल्यात तर तुमचा देव परमेश्वर तुम्हाला पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपेक्षा उच्चस्थानी नेईल.
”“पण तुमचा देव परमेश्वर ह्याचे ऐकले नाहीत, त्याच्या ज्या आज्ञा आणि विधी मी आज सांगत आहे त्यांचे पालन केले नाहीत तर पुढील सर्व वाईट गोष्टी तुमच्याबाबतीत घडतील.
”“काही गोष्टी आमचा देव परमेश्वर ह्याने गुप्त ठेवलेल्या आहेत. त्या फक्त त्यालाच माहीत. पण हे बाकी सर्व त्याने उघड केले आहे. आपल्याला व आपल्या पुढील पिढ्यांसाठी शिकवण देऊन ती नित्य पाळायला सांगितले आहे.
”पण तुम्ही तुमचा देव परमेश्वर ह्याने सांगितल्याप्रमाणे आचरण ठेवले पाहिजे. नियमशास्त्रातील ग्रंथात सांगितलेल्या आज्ञा व नियम यांचे कसोशीने पालन केले पाहिजे. संपूर्ण अंत:करणाने व संपूर्ण जीवाने तुमचा देव परमेश्वर ह्याला अनुसरले पाहिजे. तर तुमचे कल्याण होईल.
”“आज स्वर्ग आणि पृथ्वीच्या साक्षीने मी तुम्हाला जीवन आणि मृत्यू या दोहोतून एकाची निवड करायला सांगत आहे. जीवनाचा पर्याय स्वीकारलात तर आशीर्वाद मिळेल. दुसऱ्याची निवड केलीत तर शाप मिळेल. तेव्हा जीवनाची निवड करा म्हणजे तुम्ही व तुमची मुलेबाळे जिवंत राहातील.
”पुरुष, बायका, लहान मुले, गावातील परकीय अशा सर्वांना यावेळी एकत्र आणावे. त्यांनी ही शिकवण ऐकावी, परमेश्वर देवाचा आदर करावा. शिकवणीचे जीवनात आचरण करावे.
”“हा नियमशास्त्राचा ग्रंथ घ्या आणि परमेश्वराच्या कराराच्या कोशात ठेवा. तुमच्याविरुद्ध हा साक्ष राहील. तुम्ही फार ताठर आहात हे मला माहीत आहे. तुम्ही आपलाच ठेका चालवता. मी तुमच्याबरोबर असतानाही तुम्ही परमेश्वराविरुद्ध बंड केले आहे. तेव्हा माझ्यामागेही तुम्ही तेच कराल.
”नियमशास्ञाचा हा ग्रंथ तुझ्या मुखी सदैव असूं दे, त्यांत जे काही लिहीलें आहे तें तूं काळजीपूर्वक पाळ आणि राञंदिवस त्याचें मनन कर, म्हणजे तुझा मार्ग सुखाचा होईल व तुला यशःप्राप्ति घडेल.
”केवळ यहोवाला भ्या, आणि खरेपणांत वागून आपल्या संपूर्ण ह्रदयाने तुम्ही त्याची सेवा करा, काऱण त्यानें तुम्हासाठी केवढीमोठई कृत्ये केली आहेत हें तुम्ही ध्यानांत आणा.
”शमुवेल म्हणाला, यहोवाला आपलें वचन मानण्यानें जितका संतोष होतो तितका संतोष यहोवाला होमार्पणांनी व यज्ञांनी होईल काट? हापा, यज्ञापेक्षां आज्ञा मानणें आणि मेंढराच्या मांद्यांपेक्षां वचन ऐकणें अधिक चांगले आहें. कारण अवज्ञा जादुगिरीच्या पापासारखी आहे, आणि हट्ट हा मूर्तिपूजा व मूर्ति करणे यासारखा आहे; तूं यहोवाचें वचन धिक्कारलें, यामुळें राज्य करण्याविषयी त्यानें तुला धिक्कारलें आहे. मग शौल शमुवेलाला म्हणाला, मी पाप केलें आहे कारण मी यहोवाची आज्ञा व तुझी वचनें यांचे उल्ल्घन केलें; ते यामुळें कीं लोकांचे भय धरून मी त्यंचें वचन मानलें.
”कारण मी परमेश्वराचे आज्ञापालन केले. देवाविरुध्द कोणताही आपराध मी केला नाही. परमेश्वराचे निर्णय मी नेहमी ध्यानात ठेवतो. त्याच्या नियमांचे पालन करतो.
”पण लोकांनी या सांगण्याकडे दुर्लक्ष केले. आपल्या पूर्वजांसारखाच आडमुठेपणा त्यांनी केला. त्यांच्या पूर्वजांचा देव परमेश्वरा ह्यावर त्यांचा विश्वास नव्हता.
”“माझ्या आणि इस्राएल व यहूदा येथे आता शिल्लक असलेल्या लोकांच्या वतीने परमेश्वराला जाऊन विचारा. या पुस्तकातील वचनांविषयी त्याला विचारा. आपल्या पूर्वजांनी परमेश्वराचे म्हणणे न जुमानल्यामुळे परमेश्वराचा आपल्यावर कोप झाला आहे. आपल्या पूर्वजांचे वर्तन या पुस्तकातील वचनांना अनुसरुन नव्हते.”
”पण या परमेश्वराच्या प्रजेने मात्र संदेष्ट्यांची टर उडवली. त्यांनी देवाच्या संदेष्ट्यांच्या सांगण्याकडे दुर्लक्ष केले. देवाच्या संदेशांची हेटाळणी केली. अखेर देवाचा क्रोध अनावर झाला. आता त्याचा संताप थोपवता येणे अशक्य झाले.
”एज्राने परमेश्वराच्या नियमशास्त्राचे सर्व वेळ मन:पूर्वक अध्ययन आणि पालन केले. त्याला (परमेश्वराचे) हे आदेश आणि नियम इस्राएल लोकांनी शिकवायचे होते, तसेच त्यांच्याकडून तसे आचरण करुन घ्यायचे होते.
”तेव्हा देवाच्या आज्ञा मानणाऱ्या सर्व लोकांचा भीतीने थरकाप झाला. बंदिवासातून आलेले इस्राएली लोक देवावर निष्ठा असणारे नव्हते म्हणून ते घाबरले; मला ही धक्का बसला; संध्याकाळच्या होमार्पणांची वेळ होईपर्यंत मी तिथे बसून राहिलो; सर्वजण माझ्याभोवती जमले.
”परंतु दुष्ट लोक ‘आम्हाला एकटे सोड. तू आम्हाला जे करायला सांगतोस त्याची आम्हाला पर्वा नाही’ असे देवाला सांगतात.
”मी त्याच्या आज्ञेचे पालन केले. मी माझ्या अन्नापेक्षा देवाच्या मुखातून बाहेर पडणाऱ्या शब्दांवर अधिक प्रेम करतो.
”नंतर परमेश्वर वावटळींतून ईयोबशी बोलला. तो म्हणाला: “जो मूर्खासारखा बोलत आहे तो हा अज्ञानी मनुष्य कोण आहे? ईयोब, स्वत:ला सावरआणि मी जे प्रश्र विचारतो त्याची उत्तरे द्यायला तयार हो. “ईयोब, मी पृथ्वी निर्माण केली तेव्हा तू कुठे होतास? तू स्वत:ला इतका शहाणा समजत असशील तर मला उत्तर दे.
”चांगल्या माणसाला परमेश्वराची शिकवण आवडते तो त्याबद्दल रात्रंदिवस विचार करत असतो.
”परमेश्वराचे शब्द खरे आणि शुध्द आहेत. ते अग्रीत वितळवलेल्या चांदी सारखे शुध्द आहेत. ते सात वेळा वितळवलेल्या चांदी सारखे शुध्द आहेत. परमेश्वरा, त्या अगतिक लोकांची काळजी घे. त्यांचे आता आणि पुढेही कायम रक्षण कर.
”का? कारण मी परमेश्वराची आज्ञा पाळली मी माझ्या देवाविरुध्द पाप केले नाही.
”देवाची शक्ती परिपूर्ण आहे. परमेश्वराच्या शब्दांची परीक्षा घेतली गेली आहे. जे त्याच्यावर विश्वास टाकतात त्यांचे तो रक्षण करतो.
”परमेश्वराची शिकवण अतिशय योग्य आहे. ती देवाच्या लोकांना शक्ती देते. परमेश्वराच्या करारावर विश्वास ठेवणे शक्य आहे. त्यामुळे मूर्ख लोकांना शहाणे बनण्यास मदत होते. परमेश्वराचे नियम योग्य आहेत ते लोकांना सुखी करतात परमेश्राच्या आज्ञा चांगल्या आहेत त्या लोकांना जीवन जगण्याचा योग्य मार्ग दाखवतात. परमेश्वराची भीती शुध्द आहे. ती अखंड सहन करावी लागेल. परमेश्वराचे निर्णय चांगले आणि योग्य आहेत. ते संपूर्णत बरोबर आहेत. परमेश्वराची शिकवण अतिशय शुध्द अशा सोन्यापेक्षा ही किंमती आहे. ती मधाच्या पोळ्यातून मिळणाऱ्या, शुध्द मधापेक्षाही गोड आहे. परमेश्वराच्या शिकवणी नेत्याच्या सेवकाला इशारा दिला. चांगल्या गोष्टींचे पालन केल्यामुळे चांगले फळ मिळते.
”मी नेहमीच तुझे कोवळे प्रेम बघतो. मी तुझ्या सत्याच्या आधाराने जगतो.
”परमेश्वराच्या आवाजातून त्याची शक्ती कळते. त्याचा आवाज त्याचे गौरव दाखवते.
”परमेश्वरा आम्ही विश्वास ठेवू शकू असा देव तूच आहेस. मी माझे आयुष्य तुझ्या हाती सोपवले. मला तार!
”परमेश्वर म्हणतो, “मी तुला आयुष्य कसे जगायचे याविषयी मार्गदर्शन करीन. मी तुझे रक्षण करीन आणि तुझा मार्गदर्शक होईन. म्हणून घोड्यासारखा वा गाढवासारखा मूर्ख होऊनकोस, त्या प्राण्यांना आवरण्यासाठी लगाम वापरायलाच हवा. या गोष्टीशिवाय ते प्राणी तुमच्या जवळ येणार नाहीत.”
”पृथ्वीवरील प्रत्येकाने परमेश्वराची भीती बाळगली पाहिजे आणि त्याला मान दिला पाहिजे या जगात राहणाऱ्या प्रत्येकाने त्याला भ्यायला पाहिजे.
”परंतु परमेश्वराचा उपदेश सदैव चांगला असतो त्याच्या योजना पिढ्यान्पिढ्या चांगल्या असतात.
”मुलांनो माझे ऐका आणि मी तुम्हाला परमेश्वराला कसा मान द्यायचा ते शिकवीन.
”म्हणून मी म्हणालो “बघ, मी येत आहे. माझ्याविषयी पुस्तकात हे लिहिले होते. माझ्या देवा, तुझे मानस पूर्ण करण्यात मला आनंद आहे मी तुझी शिकवण अभ्यासली आहे. मी विजयाची चांगली बातमी मोठ्यासभेत सांगितली. मी माझे तोंड बंद ठेवले नाही. परमेश्वरा, तुला ते माहीत आहे. परमेश्वरा, मी तुझ्या चांगुलपणाबद्दल सांगितले. मी त्या गोष्टी मनात लपवून ठेवल्या नाही. परमेश्वरा, मी लोकांना सांगितले की ते रक्षणासाठी तुझ्यावर अवलंबून राहू शकतात. मी तुझा दयाळूपणा आणि तुझी निष्ठा सभेतल्या लोकांपासून लपवून ठेवली नाही.
”देव दुष्ट लोकांना म्हणतो, “तुम्ही लोक माझ्या कायद्यांबद्दल बोलता. तुम्ही माझ्या कराराबद्दल बोलता. मी तुम्हाला योग्य ते बोला असे सांगतो तेव्हा तुम्ही त्याचा तिरस्कार का करता? मी सांगितलेल्या गोष्टींकडे तुम्ही दुर्लक्ष का करता?
”देवा माझ्यात पवित्र ह्दय निर्माण कर. माझा आत्मा पुन्हा बलशाली कर.
”देवाने आज्ञा केली आणि बरेच लोक चांगली बातमी सांगण्यासाठी गेले.
”त्यांनी देवाबरोबर झालेला त्यांचा करार पाळला नाही. त्यांनी त्याची शिकवण आचरायला नकार दिला.
”“परंतु माझ्या लोकांनी माझे ऐकले नाही. इस्राएलने माझी आज्ञा पाळली नाही. म्हणून मी त्यांना जे करायची इच्छा होती ते करु दिले. इस्राएलने सुध्दा त्याला हवे ते केले. जर माझ्या लोकांनी माझे ऐकले, जर इस्राएल माझ्या इच्छे प्रमाणे राहिला, तर मी त्यांच्या शत्रूंचा पराभव करीन. जे लोक इस्राएलवर संकटे आणतात त्यांना मी शिक्षा करीन. परमेश्वराचे शत्रू भीतीने थरथर कापतील. त्यांना कायमची शिक्षा होईल.
”परमेश्वरा, मला तुझे मार्ग शिकव. मी तुझी सत्ये जाणे, तुझी सत्ये पाळीन. तुझ्या नावाचा जप ही माझ्या आयुष्यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट करायला मला मदत कर.
”देव पवित्र लोकांना भोटतो. ते देवदूत त्याच्या सभोवती असतात. ते देवाला घाबरतात आणि त्याला मान देतात. ते भयग्रस्त होऊन त्याच्या भोवती उभे राहातात.
”देवाने अतिशय दाट काळोख पाठवला, पण मिसरमधल्या लोकांनी त्याचे ऐकले नाही.
”का? कारण ते देवाने सांगितलेल्या गोष्टीं विरुध्द भांडले. त्यांनी परात्पर देवाचा उपदेश ऐकायला नकार दिला. त्या लोकांनी केलेल्या गोष्टींबद्दल देवाने त्यांचे आयुष्य कठीण केले. ते अडखळले आणि पडले. त्यांना मदत करायला तेथे कुणीही नव्हते.
”देवाने आज्ञा केली आणि त्यांना बरे केले, म्हणून ते लोक थडग्यात जाण्यापासून बचावले.
”देव जे करतो ते चांगले आणि न्यायी असते. त्याच्या सर्व आज्ञांवर विश्वास ठेवणे शक्य असते. देवाच्या आज्ञा सर्वकाळ असतात. त्या आज्ञा देण्यामागची देवाची कारणे खरी आणि शुध्द होती.
”शहाणपणाची सुरुवात देवाबद्दलच्या भीतीने आणि आदराने होते. जे लोक देवाचे आज्ञाधारक असतात ते शहाणे असतात. देवाला सदैव स्तुतिगीते गायली जातील.
”परमेश्वराची स्तुती करा. जो माणूस परमेश्वराला भितो आणि त्याचा आदर करतो तो आनंदी राहील. त्या माणसाला देवाच्या आज्ञा आवडतात.
”परमेश्वरावर विश्वास ठेवणे हे लोकांवर विश्वास ठेवण्यापेक्षा अधिक चांगले. परमेश्वरावर विश्वास ठेवणे हे तुमच्या नेत्यावर विश्वास ठेवण्यापेक्षा अधिक चांगले.
”शुध्द आयुष्य जगणारे लोक सुखी आहेत. ते लोक परमेश्वराची शिकवण पाळतात.
”तर मी जेव्हा तुझ्या आज्ञांचा अभ्यास करीन तेव्हा मला कधीही लाज वाटणार नाही.
”तरुण माणूस शुध्द आयुष्य कसे जगू शकेल? तू दिलेली शिकवण आचरणात आणून.
”मी मनापासून देवाची सेवा करायचा प्रयत्न करतो. देवा, तुझ्या आज्ञा पाळण्यासाठी मला मदत कर.
”मी काळजीपूर्वक तुझी शिकवण अभ्यासतो. का? म्हणजे मी तुझ्याविरुध्द पाप करणार नाही.
”मी तुझ्या सगळ्या शहाणपणाच्या निर्णयांबद्दल बोलेन.
”परमेश्वरा, माझे डोळे उघड मला तुझ्या शिकवणीकडे बघू दे आणि तू केलेल्या अद्भुत गोष्टीबद्दल वाचू दे.
”तू घेतलेल्या निर्णयांचा मला सतत अभ्यास करावासा वाटतो.
”परमेश्वरा, तू गर्विष्ठ लोकांवर सदैव टीका करतोस. त्यांचे वाईट होईल ते तुझ्या आज्ञा पाळायचे नाकारतात.
”परमेश्वरा, मला खोटं जगू देऊ नकोस. मला तुझ्या शिकवणीने मार्गदर्शन कर.
”परमेश्वरा, मी तुझ्याशी इमानदार राहायचे ठरवले. मी अगदी काळजीपूर्वक तू शहाणपणाने घेतलेल्या निर्णयांचा अभ्यास करतो.
”मला तुझी शिकवण समजून घ्यायला मदत कर आणि मी ती पूर्णपणे पाळीन.
”परमेश्वरा, मी सदैव तुझ्या शिकवणुकी प्रमाणे चालेन.
”मला तुझ्या आज्ञांचा अभ्यास करायला आवडते. परमेश्वरा, मला त्या आज्ञा आवडतात.
”दुष्ट लोक तुझी शिकवण आचरणे सोडून देतात ते पाहिले की मला राग येतो.
”अजिबात उशीर न करता मी तुझ्या आज्ञा पाळायला धावत आलो.
”ख सोसले ते चांगले झाले. त्यामुळेच मला तुझे नियम समजले.
”परमेश्वरा, तूझी शिकवण माझ्यासाठी फार चांगली आहे. ती सोन्याच्या व चांदीच्या हजार तुकड्यांपेक्षा चांगली आहे.
”परमेश्वरा, तुझा शब्द सदैव चालू असतो. तुझा शब्द स्वर्गात सदैव चालू असतो.
”परमेश्वरा, मला तुझी शिकवण खूप आवडते. मी सतत तिच्याबद्दल बोलत असतो.
”माझ्या तोंडात तुझे शब्द मधापेक्षाही गोड आहेत.
”तुझी शिकवण मला शहाणा करते. त्यामुळे मी चुकीच्या शिकवणीचा तिरस्कार करतो.
”परमेश्वरा, तुझे शब्द दिव्याप्रमाणे माझा मार्ग उजळतात.
”मी अगदी नेहमी प्रयत्नपूर्वक तुझे नियमपाळायचा प्रयत्न करीन.
”परमेश्वरा, वाईट लोकांना माझ्याजवळ फिरकू देऊ नकोस आणि मी माझ्या देवाच्या आज्ञा पाळीन.
”परमेश्वरा, तुझे नियम मोडणाऱ्या पत्येकाला तू परत पाठव. का? कारण जेव्हा त्यांनी तुझ्यासांगण्या प्रमाणे वागायचे कबूल केले तेव्हा ते खोटे बोलले.
”परमेश्वरा, आता काही तरी करायची तुझी वेळ आली आहे. लोकांनी तुझे नियम मोडले आहेत.
”लोक तुझ्या शिकवणुकी प्रमाणे वागत नाहीत म्हणून मी अश्रूंच्या नद्या वाहवल्या आहेत.
”माझ्या तीव्र भावना माझा नाश करीत आहेत. माझे शत्रू तुझ्या आज्ञा विसरले म्हणून मी फारच अस्वस्थ झालो आहे.
”मी एक तरुण आहे आणि लोक मला मान देत नाहीत. पण मी तुझ्या आज्ञा विसरत नाही.
”परमेश्वरा, तुझा चांगलुपणा सदैव राहो आणि तुझ्या शिकवणुकीवर विश्वास ठेवणे शक्य आहे.
”तुझ्या वचनाचा अभ्यास करण्यासाठी रात्रभर मी जागा राहिलो.
”परमेश्वरा, अगदी सुरुवाती पासून तुझे सर्व शब्द विश्वसनीय होते आणि तुझे चांगले नियम सदैव राहातील.
”शक्तिमान पुढाऱ्यांनी माझ्यावर विनाकारण हल्ला केला. पण मी फक्त तुझ्या नियमांना भितो आणि मान देतो.
”परमेश्वरा, तुझा शब्द मला आनंदी करतो, नुकताच एखादा खजिना सापडलेल्या माणसासारखा मी आनंदित होतो.
”परमेश्वरा, तू माझा उध्दार करावास असे मला वाटते. पण तुझी शिकवण मला आनंद देते.
”देवा, मी तुझ्या पवित्र मंदिरासमोर नतमस्तक होतो. मी तुझ्या नावाची, तुझ्या खऱ्या प्रेमाची आणि तुझ्या इमानदारीची स्तुती करतो. तू तुझ्या शब्द सामर्थ्याबद्दल प्रसिध्द आहेस. आता तर तू ते अधिकच वाढवले आहेस.
”पहिली गोष्ट म्हणजे माणसाने परमेश्वराला मान दिला पाहिजे आणि त्याची आज्ञा पाळली पाहिजे. नंतर त्याला खरे ज्ञान मिळायला सुरुवात होईल. पण ज्या लोकांना पाप आवडते ते शहाणपणाचा आणि योग्य शिकवणीचा तिरस्कार करतात.
”“तुम्ही लोक मूर्ख आहात. तुम्ही आणखी किती काळ मूर्ख गोष्टी करीत राहाणार आहात? तुम्ही ज्ञानाची थट्टा किती काळ करीत राहाणार आहात? तुम्ही ज्ञानाचा किती काळ तिरस्कार करणार आहात?
”मी मदत करणार नाही कारण तुम्हाला माझे ज्ञान नको होते. तुम्ही परमेश्वराची भीती बाळगायला आणि त्याला मान द्यायला नकार दिला. तुम्ही माझा सल्ला ऐकायला नकार दिलात. मी तुम्हाला योग्य मार्ग दाखवला तेव्हा तुम्ही माझे ऐकले नाही. म्हणून आता तुम्ही तुमच्या मार्गाने चला. तुम्ही तुमच्या वाईट मार्गाने जीवन जगलात म्हणून तुम्ही तुमचा सर्वनाश करुन घेणार आहात.
”ज्ञानाचे ऐक. आणि ते समजून घेण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा कर. ज्ञानासाठी ओरड आणि समजून घेण्यासाठी आवाज चढव. ज्ञानाचा चांदीसारखा शोध घे. गुप्तधनाप्रमाणे त्याचा शोध घे. जर तू या गोष्टी केल्यास तर तू परमेश्वराला मान द्यायला शिकशील. तू खरोखरच देवाविषयी शिकशील.
”प्रेम करणे कधी सोडू नकोस. नेहमी इमानदार आणि प्रामाणिक राहा. या गोष्टी तुझाच एक घटक बनव. त्यांना तुझ्या मानेभोवती बांध. त्या गोष्टी तुझ्या हृदयावर कोर.
”परमेश्वरावर संपूर्ण विश्वास ठेव. तुझ्या स्वत:च्या ज्ञानावर अवलंबून राहू नकोस.
”ज्ञान आणि समजूतदारपणा मिळव. माझे शब्द विसरु नकोस. माझ्या शिकवणुकीप्रमाणे वाग. ज्ञानापासून दूर जाऊ नकोस. ज्ञान तुझे रक्षण करील. ज्ञानावर प्रेम कर म्हणजे ते तुझे रक्षण करील.”
”मुला, मी जे सांगितले त्याक़डे लक्ष दे. माझे शब्द लक्षपूर्वक ऐक. तू माझ्या शब्दांना तुला सोडून जायला लावू नकोस. मी सांगतो ते लक्षात ठेव.
”तुझ्या समोर असलेल्या चांगल्या आणि शहाण्या ध्येयांपासून दूर जाऊ नकोस. तू जे करशील त्या बाबतीत सावध राहा. चांगले आयुष्य जग. सरळ मार्ग सोडू नकोस. चांगला आणि योग्य मार्ग धर पण वाईटा पासून नेहमी दूर राहा.
”तुझ्या आईवडिलांची शिकवण आणि आज्ञा प्रकाशाप्रमाणे असून त्या तुला योग्य मार्ग दाखवतात. ते तुला योग्य मार्ग दाखवतात आणि जीवनाचा मार्ग आचरायला शिकवतात.
”जर एखादा माणूस परमेश्वराला मान देत असला तर तो वाईटाचा तिरस्कार करेल. मी (ज्ञान) गर्वाचा आणि जे लोक इतरांपेक्षा स्वत:ला मोठे समजतात अशा लोकांचा तिरस्कार करते. मी वाईट मार्ग आणि खोटे बोलणाऱ्या तोंडांचा तिरस्कार करते.
”म्हणून जर एखादा माणूस तो इतरांपेक्षा चांगला आहे असे म्हणत असेल तर त्याला तो चुकतो आहे असे सांगू नका. तो त्या बद्दल तुमचा तिरस्कार करेल. पण जर तुम्ही शहाण्या माणसाला मदत करण्याचा प्रयत्न केलात तर तो तुमचा आदर करेल.
”परमेश्वराचा आदर करणे ही ज्ञान मिळवण्याची पहिली पायरी आहे. परमेश्वराविषयी ज्ञान मिळवणे ही समजूतदारपणा मिळवणाची पहिली पायरी आहे.
”परमेश्वराबद्दलची आदर युक्त भीती खरे जीवन देते. त्यामुळे माणूस मरणाच्या जाळ्यातून वाचतो.
”ज्ञान हे सोन्यापेक्षा अधिक किंमती आहे. समजुतदारपणा चांदीपेक्षा अधिक मौल्यवान आहे.
”मूर्खाला शिकवायचा प्रयत्न करु नका. तो तुमच्या शहाणपणाच्या शब्दांची थट्टा करील.
”जर एखाद्याने देवाच्या शिकवणुकीकडे लक्ष द्यायला नकार दिला तर देव त्याची प्रार्थना ऐकायला नकार देईल.
”देवाने म्हटलेला प्रत्येक शब्द परिपूर्ण असतो. जे लोक देवाकडे जातात त्यांच्यासाठी देव म्हणजे एक सुरक्षित जागा असते. म्हणून देव ज्या गोष्टी सांगतो त्या बदलण्याचा प्रयत्न करु नका. तुम्ही जर तसे केलेत तर तो तुम्हाला शिक्षा करेल आणि तुम्ही खोटे बोलता हे सिध्द करेल.
”आता या पुस्तकांतलिहिलेल्या सर्व गोष्टींकडून तुम्ही काय शिकणार आहात? माणसाला करता येण्यासारखी सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे देवाला मान देणे आणि त्याच्या आज्ञा पाळणे. का?
”अशा लोकांचे वाईट होईल. ज्याप्रमाणे आगीमध्ये पाने आणि गवत जळून भस्मसात होते त्याप्रमाणे त्यांच्या वंशजांचा पूर्णपणे नाश होईल. अंकुर मरून धुळीला मिळावा अथवा आगीत फूल जळून त्याची राख वाऱ्यावर कोठल्या कोठे उडून जावी तसाच त्यांच्या वंशजांचा समूळ नाश होईल.त्या लोकांनी, सर्वशक्तिमान परमेश्वराची आज्ञा मानण्यास, नकार दिला. इस्राएलच्या पवित्र देवाच्या संदेशाचा त्यांनी तिरस्कार केला.
”नंतर परमेश्वर म्हणाला, “जा आणि ह्या लोकांना सांग: ‘काळजीपूर्वक ऐका पण समजून घेऊ नका. काळजीपूर्वक पाहा पण शिकू नका.’
”तुम्ही शिकवणुकीप्रमाणे वागा व कराराचे पालन करा. तुम्ही ह्या आज्ञांचे पालन केले नाही तर तुम्ही चुकीच्या आज्ञांचे पालन कराल. (चुकीच्या आज्ञा म्हणजे ज्योतिषी व जादूटोणा करणारे ह्यांनी दिलेल्या आज्ञा होत. त्या आज्ञांना काही अर्थ नाही. त्या आज्ञांचे पालन करून तुम्हाला काहीही मिळणार नाही.)
”आता तू हे पाटीवर लिही म्हणजे सर्व लोकांना ते दिसेल आणि हे तू पुस्तकातही लिही म्हणजे भविष्यात दूर असलेल्या शेवटच्या दिवसांसाठी ते उपयोगी पडेल. पालकांचे न ऐकणाऱ्या मुलांसारखे हे लोक आहेत. ते खोटे बोलतात आणि परमेश्वराच्या शिकवणुकीकडे लक्ष देण्यास नकार देतात. ते संदेष्ट्यांना म्हणतात, “आम्ही काय करावे हे तुम्ही दिव्य दृष्टीने पाहू नका. आम्हाला सत्य सांगू नका. आम्हाला बऱ्यावाटतील, आवडतील अशाच गोष्टी सांगा, आमच्यासाठी फक्त चागंल्याच गोष्टी तुमच्या दिव्य दृष्टीने बघा. खऱ्या घडणाऱ्या गोष्टी बघायचे टाळा. आमच्या रस्त्यातून दूर व्हा. इस्राएलच्या पवित्र देवाबद्दल आमच्याशी बोलू नका.” इस्राएलचा पवित्र देव म्हणतो, “परमेश्वराने दिलेला संदेश तुम्ही स्वीकारायचे नाकारले आहे. तुम्ही लोक जुलूम व कपट यांवर विसंबून राहता. लढाया व खोटेपणा करून तुम्ही अपराध केला आहे म्हणून तडे गेलेल्या उंच भिंतीप्रमाणे तुमची स्थिती होईल ही भिंत पडेल व तिचे तुकडे तुकडे होतील.
”“गवत सुकते आणि फुले कोमेजतात पण आमच्या देवाची वाणी सदासर्वकाळ राहते.”
”“आम्ही जाहीर केलेल्या गोष्टींवर खरा विश्वास कोणी ठेवला? परमेश्वराने केलेली शिक्षा खरोखरी कोणी स्वीकारली?
”परमेश्वर म्हणतो, “तुमचे विचार माझ्यासारखे नाहीत. तुमचे मार्ग माझ्या मार्गांसारखे नाहीत. स्वर्ग पृथ्वीपेक्षा उंच आहे. त्याचप्रमाणे माझे मार्ग आणि विचार तुमच्यापेक्षा उच्च आहेत.” परमेश्वर स्वत: असे म्हणाला.
”तसेच माझ्या तोंडातून निघालेले शब्द परत येत नाहीत तर त्या शब्दाप्रमाणे गोष्टी घडतात. म्हणजेच माझे शब्द मला पाहिजे असलेल्या गोष्टी घडवून आणतात. मी त्यांना ज्या गोष्टी करण्यासाठी पाठविलेले असते त्या गोष्टी करण्यात ते यशस्वी होतात.
”जेव्हा तुम्हाला मदतीची जरूर असते, तेव्हा तुम्ही तुमच्याभोवती जमविलेल्या खोट्या देवांची करूणा भाकता. पण मी तुम्हाला सांगतो की वाऱ्याची फुंकर सुध्दा त्या देवाना दूर उडवून देईल. झंझावात त्यांना तुमच्यापासून दूर नेईल. पण माझ्यावर विसंबणाऱ्याला जमीन मिळेल. माझा पवित्र डोंगर त्याचा होईल.
”परमेश्वर म्हणतो, “मी त्या लोकांबरोबर एक करार करीन. मी तुमच्यात घातलेला माझा आत्मा आणि तुमच्या तोंडात घातलेले माझे शब्द कधीही तुम्हाला सोडून जाणार नाहीत, असे मी तुम्हाला वचन देतो. ते पिढ्यान् पिढ्या तुमच्याबरोबर राहतील ते आताही तुमच्याबरोबर असतील आणि चिरकाल तुमच्याबरोबर राहतील.”
”मी स्वत:च सर्व गोष्टी निर्माण केल्या. मी घडविल्या म्हणून या सर्व गोष्टी येथे आहेत.” परमेश्वर असे म्हणाला, “मला सांगा, मी कोणत्या लोकांची काळजी घेतो? मी गरीब आणि नम्र लोकांची काळजी घेतो. हे लोक फार दु:खी आहेत. माझ्या शब्दांचे पालन करणाऱ्या लोकांची मी काळजी घेतो.
”म्हणून मी त्यांच्याच युक्त्या वापरायचे ठरविले आहे. ह्याचाच अर्थ ते ज्या गोष्टींना फार भितात, त्या वापरून मी त्यांना शिक्षा करीन. मी त्या लोकांना बोलाविले पण त्यांनी ऐकले नाही. मी त्यांच्याशी बोललो, पण त्यांना ते ऐकू आले नाही म्हणून मी त्यांच्यासाठी तीच गोष्टी करीन. मी ज्यांना पापे म्हटले, त्या गोष्टी त्यांनी केल्या. मला न आवडणाऱ्या गोष्टी त्यांनी निवडल्या.” परमेश्वराच्या आज्ञा पाळणाऱ्या लोकहो तुम्ही परमेश्वर ज्या गोष्टी सांगतो त्या ऐकाव्या. “तुमच्या भावांनी तुमचा तिरस्कार केला. ते तुमच्याविरूध्द गेले, कारण तुम्ही मला अनुसरलात. तुमचे भाऊ म्हणाले, ‘परमेश्वराचा सन्मान केला गेल्यावर आम्ही परत तुमच्याकडे येऊ. मग आम्हाला तुमच्याबरोबर राहण्यात आनंद होईल.’त्या वाईट लोकांना शिक्षा केली जाईल.”
”हे परमेश्वरा, मला माहीत आहे की तुझ्या लोकांनी तुझ्याशी एकनिष्ठपणे वागायला हवे आहे. तू यहूदातील लोकांना चोपलेस पण त्यांना काही वेदना झाल्या नाहीत. तू त्यांचा नाश केलास, पण त्यांनी धडा शिकण्यास नकार दिला. ते फार दुराग्रही झालेत. त्यांनी केलेल्या वाईट कृत्यांबद्दल त्यांना खेद वाटला नाही. पण मी (यिर्मया) मनाशी म्हणालो, “गरीब लोकच एवढे मूर्ख असले पाहिजेत. परमेश्वराच्या चालीरिती ते शिकलेले नाहीत. त्यांना, त्यांच्या देवाची शिकवण माहीत नाही.
”पृथ्वीवरच्या लोकांनो, ऐका! यहुदातील लोकांवर मी अरिष्ट आणणार आहे. का? कारण त्यांनी हेतूपूर्वक दुष्कृत्ये केली. माझ्या संदेशाकडे दुर्लक्ष केले, माझ्या आज्ञांचे पालन करण्याचे नाकारले.”
”मी त्यांना फक्त पुढील आज्ञा दिली. ‘माझी आज्ञा पाळा मग मी तुमचा देव होईन व तुम्ही माझी माणसे व्हाल. मी आज्ञा करीन ते करा म्हणजे तुमचे भले होईल.’ “पण तुमच्या पूर्वजांनी माझे ऐकले नाही. त्यांनी माझ्याकडे लक्ष दिले नाही. ते दुराग्रही होते आणि त्यांना पाहिजे त्याच गोष्टी त्यांनी केल्या. ते सज्जन झाले नाहीत. उलट जास्तच दुष्ट झाले. पुढे येण्याऐवजी ते मागे गेले.
”त्या ‘शहाण्या लोकांनी’ परमेश्वराची शिकवण ऐकण्याचे नाकारले म्हणूनच ते अजिबात खरे शहाणे नाहीत. ते ‘शहाणे लोक’ सापळ्यात सापडले गेले. त्यांना धक्का बसला. त्यांची अप्रतिष्ठा झाली.
”यहूदाच्या लोकांनो, तुम्ही जर परमेश्वराचे ऐकणार नसाल, तर मी एकांतात आक्रोश करीन. तुमचा उन्मत्तपणा मला आक्रोश करायला भाग पाडेल. मी दारुण आकांत करीन. माझे डोळे अश्रूंनी डबडबतील. का? कारण परमेश्वराच्या मेंढरांचा कळप (यहूदाचे लोक) पकडला जाईल.
”मला तुझा संदेश मिळाला व मी तो खाल्ला (आत्मसात केला.) तुझ्या संदेशाने मला खूप आनंद झाला. तुझ्या नावाने ओळखले जाण्यात मला आनंद वाटतो कारण तुझे नावच ‘सर्वशक्तिमान परमेश्वर’ असे आहे.
”परमेश्वर म्हणतो, “जे दुसऱ्या लोकांवर विश्वास ठेवतात, त्यांचे वाईट होईल. सामर्थ्यासाठी जे दुसऱ्यावर विसंबतात, त्याचे भले होणार नाही. का? कारण त्यांनी परमेश्वरावर विश्वास ठेवणे सोडून दिले.
”पण त्यांनी ती पाळली नाही. त्यांनी माझ्याकडे लक्ष दिले नाही. तुमचे पूर्वज हटवादी होते. मी त्यांना शिक्षा केली, पण त्याचा काहीच फायदा झाला नाही. त्यांनी माझे ऐकले नाही.
”“सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव काय म्हणतो पाहा: ‘मी यरुशलेमवर आणि त्याच्या आजूबाजूच्या खेड्यांवर खूप अरिष्टे आणीन. लवकरच मी हे घडवून आणीन. का? कारण लोक फार हट्टी झाले आहेत. ते माझे ऐकत नाहीत आणि माझ्या आज्ञा पाळण्याचे नाकारतात.”
”सर्वशक्तिमान परमेश्वर ह्या गोष्टी सांगतो: “हे संदेष्टे तुम्हाला जे काय सांगतात त्याकडे लक्ष देऊ नका. ते तुम्हाला मूर्ख बनविण्याचा प्रयत्न करतात. ते दृष्टांन्ताबद्दल बोलतात. पण हे दृष्टांन्त त्यांना माझ्याकडून घडत नाहीत, तर ते त्यांच्या मनाचेच असतात.
”माझा संदेश अग्नीप्रमाणे आहे.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “तो खडक फोडणाऱ्या हातोड्याप्रमाणे आहे.
”परमेश्वराने, त्याच्या सेवकांना संदेष्ट्यांना पुन्हा पुन्हा तुमच्याकडे पाठविले पण तुम्ही त्यांचे ऐकले नाही. तुम्ही त्यांच्याकडे लक्षसुद्धा दिले नाही.
”तू त्यांना सांग ‘परमेश्वर काय म्हणतो ते ऐका: मी तुम्हाला माझी शिकवण दिली. तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्याच पाहिजेत आणि माझ्या शिकवणुकीप्रमाणे वागलेच पाहिजे. माझ्या सेवकांनी तुम्हाला सांगितलेल्या गोष्टी तुम्ही ऐकल्याच पाहिजेत. (संदेष्टे माझे सेवक आहेत) मी पुन्हा पुन्हा माझे सेवक पाठविले. पण तुम्ही त्यांचे ऐकले नाही. तुम्ही माझे ऐकले नाही तर मी माझे यरुशलेममधील मंदिर शीलोमधील माझ्या पवित्र तंबूप्रमाणेकरीन दुसऱ्या शहरांवर अरिष्ट यावे असे वाटणाऱ्या लोकांना यरुशलेम जरुर आठवेल.”
”तुम्ही तुमची वागणूक बदला. तुम्ही सत्कृत्ये करायला सुरवात केलीच पाहिजे. तुम्ही परमेश्वराचे, तुमच्या देवाचे ऐकलेच पाहिजे. तुम्ही असे वागलात, तर परमेश्वराचे हृदयपरिवर्तन होईल. त्याने सांगितलेल्या वाईट गोष्टी तो करणार नाही.
”सर्वशक्तिमान परमेश्वर, इस्राएलचा देव म्हणतो, “तुमचे संदेष्टे आणि जादू करणारे लोक ह्यांच्याकडून फसू नका. त्यांना पडलेली स्वप्ने ऐकू नका. ते खोटा उपदेश करीत आहेत, व तो संदेश असून तो मी पाठविल्याचे सांगत आहेत. पण मी त्यांना पाठविलेला नाही.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे.
”परमेश्वराने पुढील गोष्टी सांगितल्या: “मी इस्राएलच्या व यहूदाच्या घराण्याशी नवा करार करण्याची वेळ येत आहे. मी त्यांच्या पूर्वजांशी केलेल्या कराराप्रमाणे तो असणार नाही. जेव्हा मी त्यांना हाताला धरुन मिसरच्या बाहेर आणले होते, तेव्हा तो करार केला होता. तेव्हा मी त्यांचा स्वामी होतो. पण त्यांनी त्या कराराचा भंग केला.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “भविष्यात, मी इस्राएलच्या लोकांबरोबर पुढीलप्रमाणे करार करीन.” हा परमेश्वराकडून आलेला संदेश आहे. “मी माझी शिकवण त्यांच्या मनावर बिंबवीन आणि त्यांच्या हृदयावर कोरीन. मी त्यांचा देव असेन व ते माझे लोक असतील. लोकांना, त्यांच्या शेजाऱ्यांना आणि नातेवाईकांना परमेश्वराची ओळख करुन द्यावी लागणार नाही. का? कारण सर्वजण, लहानापासून थोरापर्यंत राजापासून रंकापर्यंत, मला ओळखत असतील.” हा परमेश्वराचा संदेश आहे. “त्यांनी केलेल्या दुष्कृत्यांबद्दल मी त्यांना क्षमा करीन. मी त्यांच्या पापांचे स्मरण ठेवणार नाही.”
”देव म्हणाला, “तुम्ही कदाचित् म्हणाला, ‘देव, आमचा प्रभू न्यायी नाही’ पण इस्राएलच्या लोकांनो, ऐका. तुम्हीच न्यायी नाही आहात.
”“तसेच याजाक लोकांना पवित्र व सामान्य ह्यातील भेद शिकवितील. ते लोकांना शुद्ध व अशुद्ध ह्यातील फरक समजवण्यास मदत करतील.
”“माझ्या लोकांचा अज्ञानामुळे नाश झाला. तुम्ही शिकण्याचे नाकारले आहे. म्हणून मी तुम्हाला माझ्या सेवेत याजक होण्यास नकार देईन. तुम्ही तुमच्या देवाचा नियम विसरलात, म्हणून मी तुमच्या मुलांना विसरेन.
”ते त्यांच्या दृष्टीने वाईट आहे. त्यांनी माझा त्याग केला. त्यांनी माझी आज्ञा पाळण्यांस नकार दिला म्हणून त्यांचा नाश होईल. मी त्या लोकांचे रक्षण केले. पण ते माझ्याविरुध्द खोटे बोलतात.
”परमेश्वर म्हणतो, “पाहा! मी देशात उपासमार आणीन. ते दिवस येतच आहेत लोकांना भाकरीची भूक नसेल. ते पाण्यासाठी तहानेले नसतील परमेश्वराच्या वचनांचे ते भूकेले असतील.
”पण त्या लोकांनी ऐकण्याचे नाकारले. देवाला पाहिजे ते करण्यास नकार दिला. देवाची वाणी ऐकू येऊ नये म्हणून त्यांनी आपले कान झाकून घेतले. ते अतिशय दुराग्रही बनले. ते नियम पाळीनान. सर्व शक्तिमान परमेश्वराने आपल्या आत्म्याचा उपयोग करुन संदेष्ट्यांमार्फत त्याच्या लोकांना संदेश पाठविले. पण लोक ऐकेनात. तेव्हा सर्व शक्तिमान परमेश्वर कोपला. मग तो म्हणाला, “मी त्यांना आवाहन केले पण त्यांनी प्रतिसाद दिला नाही. आता, त्यांनी माझा धावा केल्यास, मी ओ देणार नाही.
”परंतु येशूने उत्तर दिले, असे लिहिले आहे की, “मनुष्य केवळ भाकरीने जगेल असे नाही तर देवाच्या मुखातून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल.”
”नियमशास्त्र किंवा संदेष्ट्यांचे ग्रंथ रद्द करावयास मी आलो आहे असा विचार करु नका; मी ते रद्द करावयास नव्हे तर ते पूर्ण करावयास आलो आहे. कारण मी तुम्हास खरे सांगतो, आकाश व पृथ्वी ही नाहीशी होतील, परंतु सर्वकाही पूर्ण झाल्याशिवाय, नियमशास्त्रातील एकही काना किंवा मात्रा रद्द होणार नाही. यास्तव जो कोणी या लहान आज्ञातील एखादी आज्ञा रद्द करील व त्याप्रमाणे लोकांस शिकवील त्यास स्वर्गाच्या राज्यात अगदी लहान म्हणतील; पण जो कोणी त्या पाळील व शिकवील त्यास स्वर्गाच्या राज्यात महान म्हणतील.
”कोणालाही दोन धन्यांची चाकरी एकावेळी करणे शक्य नाही. तो एकाचा तिरस्कार करील तर दुसऱ्यावर प्रीती करील किंवा तो एका धन्याशी एकनिष्ठ राहील व दुसऱ्याला तुच्छ लेखेल. तसेच तुम्हास देवाची आणि पैशाची (धनाची) सेवा एकाच वेळी करता येणार नाही.
”अरुंद दरवाजाने आत जा कारण नाशाकडे जाण्याचा दरवाजा रूंद व मार्ग प्रशस्त आहे आणि त्यातून आत जाणारे पुष्कळ लोक आहेत. पण जीवनाकडे जाण्याचा दरवाजा अरुंद व मार्ग अडचणीचा आहे आणि ज्यांस तो सापडतो ते फारच थोडके आहेत.
”मला प्रभू, प्रभू म्हणणारा प्रत्येकजण स्वर्गाच्या राज्यात जाईलच असे नाही; तर माझ्या स्वर्गातील पित्याच्या इच्छेप्रमाणे जो वागतो त्याचाच प्रवेश स्वर्गाच्या राज्यात होईल. त्यादिवशी मला अनेक जण म्हणतील, हे प्रभू, आम्ही तुझ्या नावाने संदेश दिले, तुझ्या नावाने भूते काढली व तुझ्या नावाने पुष्कळ चमत्कार केले नाहीत काय? तेव्हा मी त्यांना स्पष्ट सांगेन की, मी तुम्हास ओळखत नाही. अहो दुराचार करणाऱ्यांनो, माझ्यापासून चालते व्हा.
”जो कोणी माझ्या सांगण्याप्रमाणे आचारण करतो तो शहाण्या मनुष्यासारखा आहे, अशा शहाण्या मनुष्याने आपले घर खडकावर बांधले. मग जोराचा पाऊस झाला आणि पूर आला. जोराचा वारा आला. वादळात घर सापडले, पण ते पडले नाही कारण त्याचा पाया खडकावर बांधला होता. जो कोणी माझीही वचने ऐकून त्याप्रमाणे आचरण करीत नाही तो कोणाएका मूर्ख मनुष्यासारखा आहे, त्याने आपले घर वाळूवर बांधले. मग जोराचा पाऊस आला आणि पूर आला. जोराचा वारा सुटला. वादळवाऱ्यात ते घर सापडले आणि कोसळून पडले.”
”आणि जो कोणी तुम्हास स्वीकारणार नाही किंवा तुमचे शब्द ऐकणार नाही तेव्हा त्याच्या घरातून किंवा नगरातून बाहेर पडताना तुम्ही आपल्या पायाची धूळ झटकून टाका. मी तुम्हास खरे सांगतो. न्यायाच्या दिवशी त्या नगरापेक्षा सदोम आणि गमोराला अधिक सोपे जाईल.
”जो कोणी मनुष्यांसमोर मला स्वीकारील त्यास मीसुद्धा माझ्या स्वर्गातील पित्यासमोर स्वीकारीन. पण जो कोणी मनुष्यांसमोर मला नाकारील त्यास मीसुद्धा माझ्या स्वर्गातील पित्यासमोर नाकारीन.
”जो माझ्यापेक्षा स्वतःच्या पित्यावर किंवा आईवर अधिक प्रीती करतो, तो मला योग्य नाही. जो माझ्यापेक्षा आपल्या मुलावर, मुलीवर अधिक प्रीती करतो, तो मला योग्य नाही. जो आपला वधस्तंभ घेऊन माझ्यामागे येण्याचे नाकारतो, तो मला योग्य नाही. जो आपला जीव मिळवतो तो त्यास गमवील पण जो माझ्याकरिता आपला जीव गमावतो तो त्यास मिळवील. जी व्यक्ति तुम्हास स्वीकारते ती व्यक्ति मला स्वीकारते आणि ज्या पित्याने मला पाठवले त्यालाही स्वीकारते.
”त्याने त्यास उत्तर दिले, स्वर्गाच्या राज्याची गुपीते जाणण्याचे दान तुम्हास दिले आहे, परंतु त्यांना दिलेले नाही.
”यास्तव मी त्याच्याबरोबर दाखल्यांनी बोलतो; कारण ते पाहत असता पाहत नाहीत आणि ऐकत असता ऐकत नाहीत व त्यांना समजतही नाही. यशयाचा संदेश त्याच्याविषयी पूर्ण होत आहे, तो असा की, तुम्ही ऐकाल तर खरे, परंतु तुम्हास समजणारच नाही, व पाहाल तर खरे, परंतु तुम्हास दिसणारच नाही; कारण या लोकांचे अंतःकरण जड झाले आहे, ते कानानी मंद ऐकतात आणि त्यांनी डोळे मिटून घेतले आहेत; यासाठी की, त्यानी डोळ्यांनी पाहू नये, कानांनी ऐकू नये, अंतःकरणाने समजून नये आणि पुन्हा मागे फिरू नये आणि मी त्यांना बरे करू नये. पण तुमचे डोळे धन्य आहेत, कारण ते पाहत आहे; आणि तुमचे कान, कारण ते ऐकत आहेत. मी तुम्हास खरे सांगतो की, तुम्ही जे पाहत आहात ते पाहावयास पुष्कळ संदेष्टे व नीतिमान जन उत्कंठित होते, तरी त्यांना पाहण्यास मिळाले नाही; आणि तुम्ही जे ऐकता ते ऐकावयास ते उत्कंठित होते, तरी त्यांना ऐकण्यास मिळाले नाही. आता तुम्ही पेरणाऱ्याचा दाखला ऐकून घ्या. वाटेवर पेरलेला तो हा आहे की, कोणी राज्याचे वचन ऐकतो पण ते त्यास समजत नाही, तेव्हा तो दुष्ट येऊन त्याच्या अंतःकरणात पेरलेले ते हिरावून घेतो; खडकावरील पेरलेला तो हा आहे की, तो वचन ऐकतो व ते लगेच आनंदाने स्वीकारतो; परंतु त्यास मूळ नसल्याकारणाने तो थोडाच वेळ टिकतो आणि वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे तो लागलाच अडखळतो. काटेरी झाडामध्ये पेरलेला तो हा आहे की, तो वचन ऐकतो, परंतु संसाराची चिंता व द्रव्याचा मोह ही वचनाची वाढ खुंटवतात आणि तो निष्फळ होतो. चांगल्या जमिनीत पेरलेला तो हा आहे की, तो वचन ऐकून ते समजतो; तो फळ देतोच देतो; कोणी शंभरपट, कोणी साठपट, तर कोणी तीसपट असे देतो.
”पण त्याने उत्तर देऊन म्हटले, “प्रत्येक रोप जे माझ्या स्वर्गातील पित्याने लावले नाही ते उपटले जाईल.
”येशूने त्यांना उत्तर देऊन म्हटले, तुम्ही चुकीची समजूत करून घेत आहात, कारण तुम्हास शास्त्रलेख व देवाचे सामर्थ्य माहीत नाही.
”येशूने उत्तर दिले, प्रभू आपला देव याजवर तू आपल्या पूर्ण अंतःकरणाने, आपल्या पूर्ण जिवाने, आपल्या पूर्ण मनाने प्रीती कर. ही पहिली आणि मोठी आज्ञा आहे. हिच्यासारखी दुसरी एक आहे जशी आपणावर तशी आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर. सर्व नियमशास्त्र आणि संदेष्ट्यांचे लिखाण या दोन आज्ञांवरच अवलंबून आहे.
”सर्व राष्ट्रांना साक्ष व्हावी म्हणून राज्याची ही सुवार्ता सर्व जगभर गाजवली जाईल आणि मग शेवट होईल.
”आकाश आणि पृथ्वी नाहीशी होतील पण माझी वचने कधीही नष्ट होणार नाहीत.
”तेव्हा येशू त्यांच्याकडे आला आणि म्हणाला, “स्वर्गात आणि पृथ्वीवर मला सर्व अधिकार देण्यात आला आहे.
”योहानाला अटक झाल्यानंतर, येशू गालील प्रांतास आला व देवाकडून आलेली सुवार्ता त्याने गाजवली. तो म्हणाला, “आता योग्य वेळ आली आहे, देवाचे राज्य जवळ आले आहे, पश्चात्ताप करा आणि सुवार्तेवर विश्वास ठेवा.”
”तो त्यांना म्हणाला, “देवाच्या राज्याचे रहस्यदान तुम्हास दिले आहे, परंतु बाहेरच्यांना सर्वकाही दाखल्यांनी सांगण्यात येते. यासाठी की त्यांनी पाहत असता पाहावे परंतु त्यांना दिसणार नाही? आणि ऐकत असता त्यांनी ऐकावे, पण समजू नये. नाही तर कदाचित ते फिरतील आणि देव त्यांना क्षमा करील.” तो म्हणाला, “हा दाखला तुम्हास समजला नाही काय तर मग इतर बाकीचे दाखले तुम्हास कसे समजतील? पेरणारा वचन पेरतो. वाटेवर वचन पेरले जाते तेथील लोक हे आहेत की, त्यांनी ऐकल्याबरोबर सैतान येऊन त्यांच्यातले पेरलेले वचन हिरावून घेतो. तसेच खडकाळ जमिनीत पेरलेले हे आहेत की, वचन ऐकताच ते आनंदाने ग्रहण करतात; तथापि त्यांच्यामध्ये मूळ नसल्याकारणाने ते थोडा काळच टिकाव धरतात; मग वचनामुळे संकट आले किंवा छळ झाला म्हणजे ते लगेच अडखळतात. काटेरी झुडपांमध्ये पेरलेले हे आहेत की, ते वचन ऐकून घेतात, परंतु संसाराची चिंता, संपत्तीचा मोह व इतर गोष्टींचा लोभ ही त्यांच्यामध्ये शिरून वचनाची वाढ खुंटवतात आणि ते निष्फळ होते. चांगल्या जमिनीत पेरलेले हे आहेत की, ते वचन ऐकून ते स्वीकारतात मग कोणी तीसपट, कोणी साठपट, कोणी शंभरपट असे पीक देतात.”
”परंतु येशू त्यांच्या बोलण्याकडे लक्ष्य न देता, सभास्थानाच्या अधिकाऱ्याला म्हणाला, “भिऊ नकोस. विश्वास मात्र धर.”
”अशाप्रकारे तुम्ही आपला संप्रदाय चालू ठेवून देवाचे वचन रद्द करता आणि यासारख्या पुष्कळ गोष्टी करता.”
”नंतर त्याने आपल्या शिष्यांसह लोकांस बोलावले व त्यांना म्हणाला, “जर कोणाला माझ्यामागे यायचे आहे तर त्याने स्वतःला नाकारावे. आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व माझ्यामागे यावे. जो कोणी आपला जीव वाचवू पाहतो तो जीवाला मुकेल व जो कोणी माझ्यासाठी व सुवार्तेसाठी जिवाला मुकेल तो आपला जीव वाचवील. मनुष्याने सर्व जग मिळविले व आपल्या जीवाचा नाश करून घेतला तर त्यास काय लाभ? जीवाच्या मोबदल्यात मनुष्य काय देऊ शकेल? देवाशी अप्रामाणिक आणि पापी पिढीत जो कोणी माझी व माझ्या वचनांची लाज धरतो तर मनुष्याचा पुत्रही जेव्हा तो आपल्या पित्याच्या गौरवात पवित्र दूतांसह येईल तेव्हा त्यांची लाज धरील.”
”येशू त्यांना म्हणाला, “खात्रीने, शास्त्रलेख आणि देवाचे सामर्थ्य तुम्हास माहीत नाही म्हणून तुम्ही अशी चूक करीत आहात.
”या गोष्टी घडण्यापूर्वी सर्व राष्ट्रांमध्ये सुवार्तेची घोषणा झालीच पाहिजे.
”स्वर्ग आणि पृथ्वी नाहीशी होतील पण माझी वचने नाहीशी होणारच नाहीत.
”तो त्यांना म्हणाला, सर्व जगात जा आणि सर्व सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा. जो कोणी विश्वास धरतो आणि बाप्तिस्मा घेतो त्याचे तारण होईल, परंतु जो विश्वास ठेवत नाही तो शिक्षेस पात्र होईल.
”शिष्य बाहेर गेले आणि त्यांनी प्रत्येक ठिकाणी सुवार्तेची घोषणा केली. प्रभूने त्यांच्याबरोबर कार्य केले व त्याने वचनाबरोबर असणाऱ्या चिन्हांनी त्याची खात्री केली.
”यासाठी की, पुष्कळ लोकांच्या अंतःकरणातील विचार उघडकीस यावे आणि तुझ्या स्वतःच्याही जिवांतून तलवार भोसकून जाईल.
”येशूने त्यास उत्तर दिले, पवित्र शास्त्रात असे लिहिले आहे की, मनुष्य फक्त भाकरीनेच जगेल असे नाही.
”ते त्याच्या शिकवणीने आश्चर्यचकित झाले, कारण त्याचे बोलणे अधिकारयुक्त असे.
”तुम्ही मला ‘प्रभू, प्रभू,’ म्हणता, पण जे मी सांगतो ते तुम्ही का करीत नाही? प्रत्येकजण जो माझ्याकडे येतो व माझी वचने ऐकून त्या आज्ञा पाळतो तो कसा आहे हे मी तुम्हास दाखवितो. तो एका घर बांधणाऱ्या मनुष्यासारखा आहे. त्याने खोल खोदले आणि खडकावर पाया बांधला. मग पूर आला आणि पाण्याचा लोंढा घरावर आदळला, पण पाण्याने ते हलले नाही, कारण ते चांगले बांधले होते. पण जो कोणी माझी वचने ऐकतो पण ती पाळीत नाही तो ज्याने आपले घर पाया न घालता जमिनीवर बांधले त्या मनुष्यासारखा आहे, त्या घरावर पाण्याचा लोंढा आदळला आणि ते लागलेच पडले व त्या घराचा मोठा नाश झाला.”
”मग तो म्हणाला, देवाच्या राज्याची गुजे जाणण्याची देणगी तुम्हास दिली आहे, परंतु बाकीच्या लोकांस ती दाखल्यांनी सांगितली आहेत, यासाठी की त्यांनी दिसत असता पाहू नये व त्यांनी ऐकत असता समजू नये. तर दाखला हा आहे बी हे देवाचे वचन आहे. आणि जे वाटेवरचे ते ऐकणारे आहेत, पण त्यानंतर सैतान येतो आणि त्यांनी विश्वास धरून तारण पावू नये म्हणून त्यांच्या अंतःकरणातून वचन काढून घेतो. आणि जे खडकाळीवरचे हे आहेत की, ते ऐकतात तेव्हा वचन आनंदाने घेतात, पण त्यांना मूळ नसते; ते काही वेळेपर्यंत विश्वास धरतात व परीक्षेच्या वेळी गळून पडतात. आणि काटेरी झाडांमध्ये पडणारे बी हे ऐकणारे आहेत, पण पुढे जाता जाता चिंता व धन व या जीवनातली सुखे यांनी गुदमरून जातात व भरदार फळ देत नाहीत. पण चांगल्या जमिनीत पडणारे बी हे असे आहेत, की ते वचन ऐकून ते भल्या व चांगल्या अंतःकरणात घट्ट धरून ठेवतात आणि धीराने पीक देत जातात.
”आणि त्याने त्यांना उत्तर देऊन म्हटले, देवाचे वचन ऐकणारे व पाळणारे हेच माझे आई व भाऊ.
”आणि तो सर्वांना म्हणाला, “जर कोणी माझ्यामागे येऊ इच्छितो तर त्याने स्वतःला नाकारावे व दररोज आपला वधस्तंभ उचलून घ्यावा व माझ्यामागे चालावे. कारण जो कोणी आपला जीव वाचवू इच्छितो तो त्यास गमावील, परंतु जो कोणी माझ्याकरिता आपला जीव गमावील तो त्यास वाचवील. कारण मनुष्याने सगळे जग मिळवून स्वतःला गमावले किंवा स्वतःचा नाश करून घेतला तर त्यास काय लाभ होईल? जो कोणी माझ्याविषयीची व माझ्या वचनाविषयी लाज धरील त्यांच्याविषयीची लाज मनुष्याचा पुत्र जेव्हा आपल्या स्वतःच्या, पित्याच्या व पवित्र दूतांच्या गौरवाने येईल तेव्हा धरील.
”मग त्याने दुसऱ्या एकाला म्हटले, “माझ्यामागे ये,” परंतु तो म्हणाला, “हे प्रभू, पहिल्याने मला जाऊ दे आणि माझ्या पित्याला पुरू दे,” तेव्हा येशूने त्यास म्हटले, मरण पावलेल्यांना आपल्या मरण पावलेल्यांस पुरू दे, परंतु तू जाऊन देवाच्या राज्याची घोषणा कर. तेव्हा आणखी एकजण म्हणाला, हे प्रभू, मी तुझ्यामागे येईन, परंतु पहिल्याने मला माझ्या घरात जे आहे त्यांचा निरोप घेऊ दे. पण येशूने त्यास म्हटले, जो कोणी नांगराला आपला हात घातल्यावर मागील गोष्टींकडे पाहत राहतो असा कोणीही देवाच्या राज्याला उपयोगी नाही.
”परंतु तो म्हणाला, “जे देवाचे वचन ऐकतात आणि पाळतात तेच खरे धन्य आहेत!”
”कोणीतरी त्यास विचारले, “प्रभू, अगदी थोड्याच लोकांचे तारण होईल का?” तो त्यांना म्हणाला, अरुंद दरवाजाने आत जाण्याचा प्रयत्न करा, कारण मी तुम्हास सांगतो की, पुष्कळजण आत येण्याचा प्रयत्न करतील, पण त्यांना ते शक्य होणार नाही.
”जर कोणी माझ्याकडे येतो आणि आपले वडील, आई, पत्नी, मुले, भाऊ, बहिणी एवढेच नव्हे, तर स्वतःच्या जीवाचासुद्धा द्वेष करीत नाही, तर तो माझा शिष्य होऊ शकत नाही. जो कोणी स्वतःचा वधस्तंभ घेऊन माझ्यामागे येणार नाही, तो माझा शिष्य होऊ शकणार नाही.
”योहानापर्यंत नियमशास्त्र व संदेष्टे हे होते आणि तेव्हापासून देवाच्या राज्याची सुवार्ता गाजवली जात आहे व प्रत्येकजण त्यामध्ये शिरण्याचा जोराने प्रयत्न करीत आहे. नियमशास्त्राचा एकही काना किंवा मात्रा नाहीसा होण्यापेक्षा आकाश व पृथ्वीचे नाहीसे होणे सोपे आहे.
”पण अब्राहाम म्हणाला, तुझ्या भावांजवळ मोशे आणि संदेष्टये आहेत त्यांचे त्यांनी ऐकावे. तो श्रीमंत मनुष्य म्हणाला, नाही, हे पित्या अब्राहामा, मरण पावलेल्यामधून कोणी माझ्या भावांकडे गेला तर ते पश्चात्ताप करतील. अब्राहाम त्यास म्हणाला, जर ते मोशेचे आणि संदेष्टयांचे ऐकत नाहीत तर मरण पावलेल्यातून जर कोणी उठला तरी त्यांची खात्री होणार नाही.
”आकाश व पृथ्वी नाहीशी होतील पण माझी वचने मुळीच नाहीशी होणार नाही.
”मग येशू त्यांना म्हणाला, “संदेष्ट्यांनी सांगितलेल्या सर्व गोष्टींवर विश्वास ठेवण्यास तुम्ही अति मूर्ख आणि मंद आहात.
”आणि म्हणून त्याने मोशेपासून सुरुवात करून आणि सर्व संदेष्टयापर्यंत सांगून, शास्त्रलेखात त्याच्याविषयी काय लिहिले आहे ते सर्व त्याने त्यांना स्पष्ट करून सांगितले.
”तो त्यांना म्हणाला, “याच त्या गोष्टी ज्या मी तुम्हाबरोबर असताना सांगितल्या होत्या की, मोशेचे नियमशास्त्र, संदेष्टे आणि स्तोत्रे यामध्ये माझ्याविषयी जे सांगितले आहे ते सर्व पूर्ण झालेच पाहिजे.” नंतर शास्त्रलेख समजण्यासाठी त्याने त्यांची मने उघडली.
”प्रारंभी शब्द होता, शब्द देवासह होता आणि शब्द देव होता.
”कारण नियमशास्त्र मोशेच्याद्वारे देण्यात आले होते; कृपा व सत्य ही येशू ख्रिस्ताच्या द्वारे झाली.
”म्हणून तो असे म्हणत असे हे तो मरण पावलेल्यातून उठल्यावर त्याच्या शिष्यांना आठवले आणि त्यांनी शास्त्रलेखावर व येशूने उच्चारलेल्या वचनावर विश्वास ठेवला.
”मी पृथ्वीवरच्या गोष्टी तुम्हास सांगितल्या असता तुम्ही विश्वास ठेवत नाही; मग, मी स्वर्गातील गोष्टी जर तुम्हास सांगितल्या तर तुम्ही कसा विश्वास ठेवाल?
”कारण देवाने जगावर एवढी प्रीती केली की, त्याने आपला एकुलता एक पुत्र दिला यासाठी की, जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्यास सार्वकालिक जीवन मिळावे. कारण देवाने पुत्राला जगात पाठवले ते जगाचा न्याय करायला नाही, पण त्याच्याद्वारे जगाचे तारण व्हावे म्हणून पाठवले. जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा न्याय होणार नाही, पण जो विश्वास ठेवत नाही त्याचा न्याय झालेलाच आहे; कारण, त्याने देवाच्या एकुलत्या एक पुत्राच्या नावावर विश्वास ठेवला नाही.
”कारण ज्याला देवाने पाठवले आहे तो देवाची वचने बोलतो कारण तो आत्मा मोजून मापून देत नाही.
”जो पुत्रावर विश्वास ठेवतो त्यास सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे; परंतु जो पुत्राचे ऐकत नाही त्याच्या दृष्टीस जीवन पडणार नाही, पण देवाचा क्रोध त्याच्यावर राहतो.”
”देव आत्मा आहे; आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना आत्म्याने व खरेपणाने केली पाहिजे.”
”मी तुम्हास खरे खरे सांगतो, जो माझे वचन ऐकतो आणि ज्याने मला पाठवले त्याच्यावर विश्वास ठेवतो त्यास सार्वकालिक जीवन प्राप्त झाले आहे आणि त्याच्यावर न्यायाचा प्रसंग येणार नाही; तो मरणातून जीवनात पार गेला आहे. मी तुम्हास खरे खरे सांगतो की, मरण पावलेले लोक देवाच्या पुत्राचा आवाज ऐकतील व जे ऐकतील ते जिवंत होतील, अशी वेळ येत आहे, किंबहुना आता आलीच आहे.
”त्याचे वचन तुम्ही आपणांमध्ये दृढ राखले नाही, कारण ज्याला त्याने पाठवले त्याच्यावर तुम्ही विश्वास ठेवला नाही? तुम्ही शास्त्रलेख शोधता, कारण तुम्ही असे मानता की, त्याद्वारे आपल्याला सार्वकालिक जीवन मिळेल आणि तेच शास्त्रलेख माझ्याविषयी साक्ष देणारे आहेत.
”आत्मा जीवन देणारा आहे, देहापासून काही लाभ घडवीत नाही. मी तुमच्याशी बोललो ती वचने आत्मा आणि जीवन अशी आहेत.
”म्हणून मी तुम्हास सांगितले की, तुम्ही तुमच्या पापात मराल; कारण, मी तो आहे असा तुम्ही विश्वास न धरल्यास तुम्ही आपल्या पापात मराल.”
”ज्या यहूद्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला त्यांना येशू म्हणाला, “तुम्ही माझ्या वचनात राहिला तर खरोखर माझे शिष्य आहात. तुम्हास सत्य समजेल आणि सत्य तुम्हास बंधनमुक्त करील.”
”तुम्ही माझे बोलणे का समजून घेत नाही? याचे कारण हेच की, तुमच्याकडून माझे वचन ऐकवत नाही. तुम्ही आपला पिता सैतान यापासून झाला आहात आणि तुमच्या पित्याच्या वासनांप्रमाणे करू पाहता. तो प्रारंभापासून मनुष्य घात करणारा होता आणि तो सत्यात टिकला नाही, कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो जेव्हा खोटे बोलतो तेव्हा तो स्वतःचे बोलतो, कारण तो लबाड व लबाडीचा पिता आहे. पण मी तुम्हास खरे सांगतो म्हणून तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवत नाही. तुमच्यातला कोण मला पापी ठरवतो? मी खरे सांगत असता तुम्ही माझ्यावर का विश्वास ठेवत नाही? देवापासून असणारा देवाची वचने ऐकतो. तुम्ही देवापासून नाही म्हणून तुम्ही ऐकत नाही.”
”मी तुम्हास खरे खरे सांगतो, जर कोणी माझे वचने पाळील तर त्यास मरणाचा अनुभव कधीही येणार नाही.”
”तरी तुम्ही विश्वास ठेवत नाही, कारण तुम्ही माझ्या मेंढरांपैकी नाही. माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात, मी त्यांना ओळखतो आणि ती माझ्यामागे येतात.
”ज्यांना देवाचे वचन प्राप्त झाले त्यांना जर त्याने देव म्हणले आणि शास्त्रलेखाचा भंग होत नाही,
”जो आपल्या जीवावर प्रीती करतो तो त्यास मुकेल आणि जो या जगांत आपल्या जीवाचा व्देष करतो तो त्याचे सार्वकालिक जीवनासाठी रक्षण करील. जर कोणी माझी सेवा करतो तर त्याने मला अनुसरावे, म्हणजे जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल. जर कोणी माझी सेवा करतो तर पिता त्यास मान करील.
”त्याने त्यांच्यासमोर इतकी चिन्हे केली असतांही त्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला नाही; हे यासाठी झाले की, यशया संदेष्ट्याने जे वचन सांगितले होते ते पूर्ण व्हावे, ते असेः ‘प्रभू, आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे? परमेश्वराचा भूज कोणास प्रकट झाला आहे?’ म्हणून त्यांना विश्वास ठेवता आला नाही; या कारणाने यशया पुन्हा म्हणाला, ‘त्यांनी डोळ्यांनी पाहू नये, अंतःकरणाने समजू नये, वळू नये व मी त्यांना बरे करू नये म्हणून त्याने त्यांचे डोळे आंधळे केले व अंतःकरण कठीण केले आहे.’ यशयाने त्याचे गौरव पाहिले म्हणून त्याने या गोष्टी सांगितल्या आणि तो त्याच्याविषयी बोलला. तरी यहूदी अधिकार्यांतूनही पुष्कळांनी त्याच्यावर विश्वास ठेवला, परंतु आपणांस सभास्थानाच्या बाहेर घालवू नये म्हणून परूश्यांमुळे ते तसे कबूल करीत नव्हते. कारण त्यांना देवाकडील गौरवापेक्षा मनुष्याकडील गौरव अधिक प्रिय वाटले.
”जो माझा अवमान करतो आणि माझी वचने स्वीकारीत नाही त्याचा न्याय करणारे कोणी आहे. जे वचन मी सांगितले, तेच शेवटल्या दिवशी, त्याचा न्याय करील.
”कारण मी आपल्या मनाचे बोललो नाही, तर मी काय सांगावे आणि काय बोलावे याविषयी ज्या पित्याने मला पाठवले त्यानेच मला आज्ञा दिली आहे. त्याची आज्ञा सार्वकालिक जीवन आहे. हे मला ठाऊक आहे. म्हणून जे काही मी बोलतो ते पित्याने मला सांगितल्याप्रमाणे बोलतो.”
”येशूने त्यास म्हटले, “मार्ग, सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्याशिवाय पित्याकडे कोणी येत नाही.
”माझ्यावर तुमची प्रीती असली तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळाल.
”ज्याच्याजवळ माझ्या आज्ञा आहेत आणि जो त्या पाळतो तोच माझ्यावर प्रीती करणारा आहे; आणि जो माझ्यावर प्रीती करतो त्याच्यावर माझा पिता प्रीती करील; मीही त्याच्यावर प्रीती करीन व स्वतः त्यास प्रकट होईन.”
”येशूने त्यास उत्तर दिले, “ज्याची माझ्यावर प्रीती असेल तो माझे वचन पाळील; माझा पिता त्याच्यावर प्रीती करील आणि आम्ही त्याच्याकडे येऊन, त्याच्याबरोबर वस्ती करून राहू. जो माझ्यावर प्रीती करीत नाही तो माझी वचने पाळीत नाही आणि तुम्ही जे वचन ऐकता ते माझे नाही तर ज्याने मला पाठवले त्या पित्याचे आहे.
”तुम्ही माझ्यामध्ये राहीला आणि माझी वचने तुम्हामध्ये राहिली तर जे काही तुम्हास पाहिजे असेल ते मागा म्हणजे ते तुम्हास मिळेल.
”पण तो सत्याचा आत्मा येईल तेव्हा तो तुम्हास मार्ग दाखवून सर्व सत्यात नेईल, कारण तो आपल्या स्वतःचे सांगणार नाही; तर जे ऐकेल तेच सांगेल आणि होणार्या गोष्टी तुम्हास कळवील.
”मी त्यांना तुझे वचन दिले आहे, जगाने त्यांचा व्देष केला आहे; कारण जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत.
”तू त्यांना सत्यात पवित्र कर. तुझे वचन हेच सत्य आहे.
”म्हणून पिलात त्यास म्हणाला, “तर तू राजा आहेस काय?” येशूने उत्तर दिले, “मी राजा आहे असे आपण म्हणता. मी यासाठी जन्मलो आहे आणि यासाठी मी जगात आलो आहे. मी सत्याची साक्ष द्यावी. जो कोणी सत्याचा आहे तो माझी वाणी ऐकतो.”
”परंतु पेत्राने व इतर प्रेषितांनी उत्तर दिले, “आम्ही मनुष्यांपेक्षा देवाची आज्ञा मानली पाहिजे,
”पण पौल व बर्णबा फार धैर्याने बोलले, ते म्हणाले, “देवाचे वचन तुम्हा यहूद्यांना प्रथम आम्हास सांगितलेच पाहिजे, पण तुम्ही ऐकण्यास नकार देत आहात, तुम्ही तुमचे स्वतःचेच नुकसान करून घेत आहात व अनंतकाळचे जीवन प्राप्त करून घेण्यासाठी अपात्र ठरत आहात! म्हणून आम्ही आता दुसऱ्या देशांतील परराष्ट्रीय लोकांकडे जाऊ.
”तेथील लोक थेस्सलनीकातल्या लोंकापेक्षा मोठया मनाचे होते; त्यांनी मोठ्या उत्सुकतेने वचनाचा स्वीकार केला आणि या गोष्टी अशाच आहेत की काय ह्याविषयी ते शास्त्रलेखात दररोज शोध करीत गेले.
”परंतु त्यांच्यातील काही कठीण मनाचे झाले व त्यांनी विश्वास ठेवण्यास नकार दिला आणि देवाच्या मार्गाविषयी वाईट बोलले, मग पौल त्यांच्यातून निघून गेला व शिष्यांनाही त्यांच्यातून वेगळे केले आणि तुरन्नाच्या शाळेत दररोज त्यांच्याशी चर्चा केली.
”मला माहीत आहे की, मी गेल्यावर तुमच्यामध्ये भयंकर असे दुष्ट लांडगे येतील, ते कळपाला सोडणार नाहीत. तुमच्यामधूनसुद्धा लोक उठून शिष्यांना, चुकीचे असे शिकवून आपल्यामागे घेऊन जातील. यासाठी सावध राहा, तुम्हातील प्रत्येकाला गेले तीन वर्षे डोळ्यांत अश्रू आणून सावध करण्याचे मी कधीच थांबविले नाही हे आठवा.
”या लोकांकडे (यहूदी) तुम्ही जा आणि त्यांना सांगाः तुम्ही ऐकाल तर खरेपण तुम्हास समजणार नाही, तुम्ही पहाल तुम्हास दिसेल पण तुम्ही काय पाहात ते तुम्हास कळणार नाही. कारण या लोकांचे अंतःकरण जड झाले आहेत त्याच्या कानांनी त्यांना ऐकू येत नाही आणि त्यांनी आपले डोळे बंद केले आहेत नाही तर त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिले असते आणि आपल्या कानांनी ऐकले असते आणि माझ्याकडे वळले असते आणि मी त्यांना बरे केले असते.
”प्रेषित होण्यास बोलावलेला, येशू ख्रिस्ताचा दास, देवाच्या सुवार्तेसाठी वेगळा केलेला, पौल ह्याजकडून; देवाने सुवार्तेविषयी आपल्या संदेष्ट्यांद्वारे पवित्र शास्त्रलेखात अगोदरच अभिवचन दिले होते;
”कारण मला सुवार्तेची लाज वाटत नाही कारण विश्वास ठेवणार्या प्रत्येकाला तारणासाठी, ती देवाचे सामर्थ्य आहे; प्रथम यहूद्याला आणि ग्रीकालाही. कारण तिच्या द्वारे देवाचे नीतिमत्त्व विश्वासाने विश्वासासाठी प्रकट होते कारण असा शास्त्रलेख आहे की, “नीतिमान विश्वासाने जगेल.” वास्तविक जी माणसे अभक्ती, सत्य दाबतात अशा लोकांच्या अनीतीवर देवाचा क्रोध स्वर्गातून प्रकट होतो. कारण देवाविषयी प्राप्त होणारे ज्ञान त्यांच्यात दिसून येते; कारण देवाने स्वतः त्यांना ते प्रकट केले आहे. कारण जगाच्या उत्पत्तीपासून करण्यात आलेल्या गोष्टींवरून त्याचे सर्वकाळचे सामर्थ्य व देवपण या त्याच्या अदृश्य गोष्टी समजत असल्याने स्पष्ट दिसतात, म्हणून त्यांना काही सबब नाही. कारण त्यांनी देवाला ओळखले असता त्यांनी त्याचे देव म्हणून गौरव केले नाही किंवा उपकार मानले नाहीत. पण ते स्वतःच्या कल्पनांत विचारहीन झाले आणि त्यांचे निर्बुद्ध मन अंधकारमय झाले. स्वतःला ज्ञानी म्हणता म्हणता ते मूर्ख बनले.
”मग यहूदी असण्यात फायदा तो काय? किंवा सुंताविधीकडून काय लाभ? सर्वबाबतीत पुष्कळच आहे. प्रथम हे की, त्यांच्यावर देवाची वचने सोपवली होती. पण काहींनी विश्वास ठेवला नाही म्हणून काय झाले? त्यांचा अविश्वास देवाचा विश्वासूपणा व्यर्थ करील काय? कधीच नाही! देव खरा व प्रत्येक मनुष्य खोटा ठरो. शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘तुझ्या बोलण्यात तू नीतिमान ठरावेस, आणि तुझा न्याय होत असता विजयी व्हावेस.’
”शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘नीतिमान कोणी नाही, एकही नाही. ज्याला समजते असा कोणी नाही, जो झटून देवाचा शोध करतो असा कोणी नाही,
”तर मग आपण विश्वासाद्वारे नियमशास्त्र व्यर्थ करतो काय? तसे न होवो. उलट आपण नियमशास्त्र प्रस्थापित करतो.
”पण आपण ज्याच्या बंधनात होतो त्यास आपण मरण पावलो असल्यामुळे आपण आता नियमशास्त्रापासून मुक्त झालो आहोत, ते ह्यासाठी की, आपण आत्म्याच्या नवेपणाने सेवा करावी, शास्त्रलेखाच्या जुनेपणाने नाही.
”म्हणून नियमशास्त्र पवित्र आहे, तशीच आज्ञा पवित्र, न्याय्य आणि चांगली आहे.
”मी आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याच्याद्वारे देवाचे उपकार मानतो. म्हणजे मग मी स्वतः मनाने देवाच्या नियमाचे दास्य करतो पण देहाने पापाच्या नियमाचे दास्य करतो.
”कारण देहस्वभावाचे चिंतन हे देवाशी वैर आहे; कारण ते देवाच्या नियमाला अंकित होत नाही आणि त्यास खरोखर, होता येत नाही.
”आणि त्यांना पाठविल्याशिवाय ते कशी घोषणा करतील? कारण असे लिहिले आहे की, ‘जे चांगल्या गोष्टींची सुवार्ता सांगतात त्यांचे पाय किती सुंदर आहेत!’ पण सर्वांनीच सुवार्तेचे आज्ञापालन केले नाही, कारण यशया म्हणतो की, ‘प्रभू, आमच्याकडून ऐकले त्यावर कोणी विश्वास ठेवला आहे?’ तर मग ऐकण्यामुळे विश्वास होतो आणि ख्रिस्ताच्या वचनामुळे ऐकणे होते.
”कारण नियमशास्त्रात असे लिहिले आहे की, ‘देवाने त्यांना या दिवसापर्यंत सुस्तीचा आत्मा दिला आहे; त्यांनी पाहू नये असे डोळे आणि त्यांनी ऐकू नये असे कान दिले आहेत.’
”कारण ज्या गोष्टी पूर्वी लिहिण्यात आल्या त्या आपल्या शिक्षणासाठी लिहिण्यात आल्या; म्हणजे आपण धीराने व शास्त्रलेखाकडून मिळणार्या उत्तेजनाने आशा धरावी.
”आता, बंधूंनो, मी तुम्हास विनंती करतो की, तुम्ही शिकलेल्या शिकवणीविरुद्ध जे फुटी व अडथळे निर्माण करतात त्यांच्यावर लक्ष ठेवून त्यांना टाळा. कारण असे लोक जो ख्रिस्त आपला प्रभू आहे त्याची सेवा करीत नाहीत पण आपल्या पोटाची सेवा करतात आणि गोड भाषणे व प्रशंसा करून भोळ्या मनुष्यांची मने बहकवतात;
”कारण ज्यांचा नाश होत आहे अशांसाठी वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे, परंतु ज्यांचे तारण होत आहे, अशांसाठी तो देवाचे सामर्थ्य आहे.
”तरीपण, जे आत्मिक परीपक्व आहेत त्यांना आम्ही ज्ञान सांगतो परंतु ते ज्ञान या जगाचे नाही आणि या युगाचे नाहीसे होणारे जे अधिकारी त्यांचेही नाही. तर देवाचे रहस्यमय ज्ञान आम्ही सांगतो ते गुप्त ठेवलेले होते, ते देवाने युगाच्या पूर्वी तुमच्याआमच्या गौरवासाठी नेमले होते.
”मानवी ज्ञानाने शिकवलेल्या शब्दांनी आम्ही या गोष्टी सांगत नाही, तर आत्म्याने शिकवलेल्या शब्दांनी, आत्मिक शब्द उपयोगात आणून आध्यात्मिक गोष्टींचे स्पष्टीकरण करतो. स्वाभाविक मनुष्य देवाच्या आत्म्याच्या गोष्टी स्वीकारत नाही कारण त्या त्यास मूर्खपणाच्या वाटतात आणि तो त्या मानीत नाही, कारण त्या आत्म्याने समजायच्या असतात. जो आत्मिक आहे तो तर सर्व गोष्टी समजतो तरी त्याची स्वतःची पारख कोणाकडूनही होत नाही.
”कारण सुंता झालेला असणे काही नाही किंवा बेसुंता असणे काही नाही; पण देवाच्या आज्ञांचे पालन करणे हे सर्वकाही आहे.
”आता बंधूंनो मी तुम्हास आठवण करून देतो, की जे शुभवर्तमान मी तुम्हास गाजवले व जे तुम्ही स्वीकारलेत व ज्याच्यात तुम्ही स्थिरही आहात. ज्याच्या द्वारे तुम्हास तारण मिळाले आहे तेच शुभवर्तमान मी तुम्हास कळवतो. ज्या वचनाने तुम्हासही शुभवर्तमान सांगितले त्या वचनानुसार ते तुम्ही दृढ धरले असल्यास त्याच्या योगे तुमचे तारणही होत आहे; नसल्यास तुमचा विश्वास व्यर्थ आहे.
”जर कोणी प्रभूवर प्रीती करीत नाही, तर तो शापित होवो, “मारानाथा; हे प्रभू ये”
”कारण ज्यांचे तारण होत आहे अशा लोकात आणि ज्यांचा नाश होत आहे अशा लोकात आम्ही देवाला ख्रिस्ताचा सुवास आहोत. ज्या लोकांचा नाश होत आहे, मृत्युचा मरणसूचक वास आणि जे तारले गेले आहेत, जीवनाकडे नेणारा जीवनाचा वास आहोत आणि या गोष्टींसाठी कोण लायक आहे?
”त्याने आम्हास नव्या कराराचे सेवक होण्यास पात्र केले. तो लेखाद्वारे केलेला नाही, पण पवित्र आत्म्याद्वारे केलेला आहे कारण लेख मारून टाकतो पण पवित्र आत्मा जिवंत करतो. पण दगडावर कोरलेल्या अक्षरात लिहिलेली मरणाची सेवा इतकी गौरवी झाली की, इस्राएल लोक मोशेच्या तोंडावरील तेज, जे नाहीसे होत चालले होते, त्या तेजामुळे त्याच्या तोंडाकडे दृष्टी लाववत नव्हती. तर तिच्यापेक्षा पवित्र आत्म्याची सेवा अधिक गौरवयुक्त कशी होणार नाही? कारण ज्या सेवेचा परिणाम दंडाज्ञा ती जर तेजोमय होती, तर जिचा परिणाम नीतिमत्त्व ती तिच्यापेक्षा किती विशेषकरून अधिक तेजोमय असणार.
”आम्ही लज्जास्पद गुप्त गोष्टी आम्ही सोडल्यात; आम्ही कपटाने वागत नाही किंवा आम्ही देवाचे वचन फसवेपणाने हाताळीत नाही तर देवाच्या दृष्टीसमोर खरेपण प्रकट करण्यास आम्ही आपणांसमोर सर्व लोकांच्या सद्सदविवेकबुद्धीला पटवितो. पण आमची सुवार्ता आच्छादली गेली असेल तर ज्यांचा नाश होत आहे त्यांच्यासाठी ती आच्छादली गेली आहे. जो ख्रिस्त देवाचे प्रतिरूप आहे त्याच्या गौरवाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांना प्रकाशमान होऊ नये म्हणून, असे जे विश्वास ठेवत नाहीत, त्यांची मने या युगाच्या दुष्ट दैवताने आंधळी केलीली आहेत.
”पण मला भीती वाटते की जसे हव्वेला सर्पाने कपट करून फसवले तसे तुमचे विचार कसे तरी बिघडून ती ख्रिस्ताची शुद्ध भक्ती व सरळपण ह्यापासून भ्रष्ट होतील.
”कारण असे लोक खोटे प्रेषित आहेत, ते फसविणारे कामगार आहेत, ख्रिस्ताच्या प्रेषितांचे सोंग घेणारी अशी आहेत. आणि यामध्ये आश्चर्य नाही कारण सैतानदेखील तेजस्वी दूताचे रुप धारण करतो.
”कारण आम्ही सत्याविरुद्ध काही करत नाही, तर सत्यासाठी करतो.
”मला आश्चर्य वाटते की, ज्याने तुम्हास ख्रिस्ताच्या कृपेत पाचारण केले त्याच्यापासून, इतक्या लवकर, तुम्ही दुसर्या शुभवर्तमानाकडे वळला आहात. दुसरे कोणतेही शुभवर्तमान नाही; पण तुम्हास घोटाळ्यात पाडणारे आणि ख्रिस्ताचे शुभवर्तमान विपरीत करण्याची इच्छा असणारे असे कित्येक आहेत. तर जे शुभवर्तमान आम्ही तुम्हास सांगितले त्याच्याहून निराळे शुभवर्तमान जर आम्ही सांगितले किंवा स्वर्गातील आलेल्या देवदूतानेही सांगितले, तरी तो शापित असो. आम्ही अगोदर सांगितले आहे तसेच आता मी पुन्हा सांगतो की, कोणी तुम्हास, जे तुम्ही स्वीकारले त्याच्यापेक्षा, निराळे शुभवर्तमान कोणी तुम्हास सांगितल्यास तो शापित असो.
”शुभवर्तमानाचे सत्य तुमच्याकडे रहावे म्हणून आम्ही त्यांना घटकाभरही वश होऊन त्यांच्या अधीन झालो नाही.
”कारण नियमशास्त्रातील कृत्यांवर जितके अवलंबून राहणारे आहेत तितके शापाच्या अधीन आहे कारण शास्त्रात असे लिहिले आहे की, ‘नियमशास्त्राच्या पुस्तकात जे लिहिलेले आहे ते सर्व पाळण्यास जो टिकून राहत नाही तो शापित आहे.’
”आपल्याबद्दल ख्रिस्त शाप झाला आणि त्याने आपणाला नियमशास्त्राच्या शापापासून खंडणी भरून सोडविले; असा शास्त्रलेख आहे ‘जो कोणी झाडावर टांगलेला आहे तो शापित आहे’, असा शास्त्रलेख आहे. ह्यात उद्देश हा की, अब्राहामाला दिलेला आशीर्वाद ख्रिस्त येशूच्या द्वारे परराष्ट्रीयांना मिळावा, म्हणजे आपल्या विश्वासाद्वारे आत्म्याविषयीचे अभिवचन मिळावे.
”आता, जी वचने अब्राहामाला व त्याच्या संतानाला दिली होती. तो ‘संतानांना’ असे अनेकाविषयी म्हणत नाही, पण ‘तुझ्या संतानाला’ असे एकाविषयी म्हणतो आणि तो एक ख्रिस्त आहे.
”ह्यांवरून आपण विश्वासाने नीतिमान ठरविले जावे म्हणून नियमशास्त्र आपल्याला ख्रिस्ताकडे पोहचवणारे बालरक्षक होते.
”मग मी तुम्हास खरे सांगतो म्हणून मी तुमचा वैरी झालो आहे काय?
”मी अशी प्रार्थना करतो की, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव, गौरवी पिता, ह्याने तुम्हास आपल्या ओळखीच्या ज्ञानाचा व प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा; म्हणजे तुमच्या मनाचे डोळे प्रकाशित होऊन तुम्हास हे समजावे की, त्याच्या बोलवण्याच्या आशेची निश्चितता काय आहे, त्याच्या वतनाच्या गौरवाची संपत्ती पवित्र लोकात किती आहे,
”ह्यासाठी की आपण यापुढे लहान मुलांसारखे नसावे. म्हणजे मनुष्यांच्या कपटाने, फसवणाऱ्या मार्गाने नेणाऱ्या युक्तीने अशा प्रत्येक नव्या शिकवणरूपी वाऱ्याने तुमचे मार्ग लाटांनी इकडेतिकडे हेलकावणाऱ्या बोटीसारखे होऊ नये;
”यासाठी की, त्याने तिला देवाच्या वचनरुपी पाण्याने धुऊन स्वच्छ करून पवित्र करावे.
”आणि तारणाचे शिरस्राण व आत्म्याची तलवार, जी देवाच वचन आहे, ती घ्या,
”मी अशी प्रार्थना करतो की, तुमची प्रीती ज्ञानात व पूर्ण सारासार विचारात आणखी अधिकाधिक वाढत जावी, यासाठी की जे श्रेष्ठ ते तुम्ही पसंत करावे आणि तुम्ही ख्रिस्ताच्या दिवसासाठी निर्मळ व निर्दोष असावे.
”जीवनाच्या वचनास दृढ धरुन राहा, असे झाले तर माझे धावणे व्यर्थ झाले नाही व माझे श्रमही व्यर्थ झाले नाहीत असा अभिमान मला ख्रिस्ताच्या दिवशी बाळगण्यास कारण होईल.
”कारण, तुम्ही विश्वासात पाया घातलेले व स्थिर असे राहिला आहात आणि तुम्ही ऐकलेल्या व आकाशाखालच्या सर्व सृष्टीला गाजविण्यांत आलेल्या सुवार्तेच्या आशेपासून तुम्ही ढळला नाही; आणि मी पौल तिचा सेवक झालो आहे.
”तुम्ही अशी काळजी घ्या की, कोणी मनुष्यांच्या संप्रदायास अनुसरून, जगाच्या मूलतत्त्वांस अनुसरून असणार्या तत्त्वज्ञानाने व त्याच्या पोकळ फसवेपणाने तुम्हास ताब्यात घेऊ नये; ते ख्रिस्ताला अनुसरून नाही.
”आणखी आम्हासाठी देखील प्रार्थना करा; अशी की, कारण ख्रिस्ताच्या ज्या रहस्यामुळे मी बंधनातही आहे ते सांगावयास देवाने आम्हांसाठी वचनाकरिता द्वार उघडावे.
”तुम्ही फार संकटात असताना पवित्र आत्म्याच्या आनंदाने वचन अंगीकारुन आमचे व प्रभूचे अनुकरण करणारे झाला;
”परंतु पूर्वी फिलिप्पैत आम्ही दुःख भोगून व अपमान सोसून, हे तुम्हास माहीतच आहे, मोठा विरोध असता, देवाची सुवार्ता तुम्हास सांगण्याचे धैर्य आपल्या देवाकडून आम्हास मिळाले.
”या कारणांमुळे आम्ही सुद्धा देवाची निरंतर उपकारस्तुती करितो की, तुम्ही आम्हापासून ऐकलेले देवाचे वचन स्वीकारले ते मनुष्यांचे म्हणून नव्हे तर देवाचे म्हणून स्वीकारले आणि खरे पहाता ते असेच आहे; ते तुम्हा विश्वास ठेवणाऱ्यात कार्य करीत आहे.
”म्हणून प्रभू येशू प्रकट होण्याच्या समयी ते होईल; तो आपल्या सामर्थ्यवान देवदूतांसह स्वर्गातून अग्निज्वालेसहित प्रकट होईल. तेव्हा जे देवाला ओळखत नाहीत व आपल्या प्रभू येशूची सुवार्ता मानीत नाहीत त्यांचा तो सूड उगवील. तेव्हा त्यांना प्रभूच्या समोरून व त्याच्या सामर्थ्याच्या गौरवापासून दूर करण्यांत येऊन सर्वकाळचा नाश ही शिक्षा त्यांना मिळेल.
”मग तो अनीतिमान पुरूष प्रकट होईल, त्यास प्रभू येशू आपल्या मुखातील श्वासाने मारून टाकिल आणि तो येताच आपल्या दर्शनाने त्यास नष्ट करील; सैतानाच्या कृतीमुळे त्याचे येणे होईल; तो सर्व प्रकारे खोटे सामर्थ्य, तशीच चिन्हे व अद्भूते करीत येईल ज्यांचा नाश होत चालला आहे त्यांनी आपले तारण साधावे म्हणून सत्याविषयीची प्रीती धरली नाही; त्यामुळे त्याच्यांसाठी सैतानाच्या कृतीप्रमाणे सर्व प्रकारची खोटी महत्कृत्ये, चिन्हे, अद्भूते आणि सर्वप्रकारचे अनीतिजनक कपट ह्यांनी युक्त असे त्या अनीतिमानाचे येणे होईल. त्यांनी असत्यावर विश्वास ठेवावा म्हणून देव त्यांच्याठायी भ्रांतीचे कार्य चालेल असे करतो; ज्यांनी सत्यावर विश्वास ठेवला नाही, तर अनीतीत संतोष मानला त्या सर्वांचा न्यायनिवाडा व्हावा म्हणून असे होईल.
”परंतु आम्हास हे माहीत आहे की, कोणी नियमशास्त्राचा खरोखरच यथार्थ उपयोग केल्यास ते चांगले आहे. आणि आपल्याला हे ठाऊकच आहे की, नियमशास्त्र हे नीतिमान लोकांसाठी केलेले नाही तर आज्ञाभंग करणाऱ्या आणि विद्रोही, पापी, भक्तिहीन, अधर्मी, अशुद्ध, वडिलांना ठार मारणारे व आईला ठार मारणारे, मनुष्यघातक जारकर्मी, समलैंगीक, मनुष्यांचा व्यापार करणारे, खोटारडे, खोटी शपथ वाहणारे यांच्यासाठी आहे आणि शुद्ध शिकवणीविरुद्ध जर काही दुसरे असेल तर त्यासाठीही आहे. गौरवी सुवार्ता जी धन्यवादित देवाकडून येते आणि जी माझ्यावर सोपवली आहे, तिला हे अनुसरून आहे.
”कारण हे आपल्या तारणाऱ्या देवाच्या दृष्टीने चांगले व स्वीकार करण्यास योग्य आहे, त्याची इच्छा आहे की सर्व लोकांचे तारण व्हावे आणि त्यांनी खरेपणाच्या पूर्ण ज्ञानास पोहचावे.
”तरी मला उशीर लागल्यास, देवाचे घर म्हणजे जिवंत देवाची मंडळी जी सत्याचा खांब व पाया आहे, त्या देवाच्या घरात तुला कसे वागले पाहिजे, हे तुला समजावे.
”देवाचा आत्मा स्पष्ट म्हणतो की, नंतरच्या काळात काहीजण विश्वास सोडतील, ते भविष्य सांगणारे आत्मे, जे फसविणारे आहेत त्यांच्याकडे लक्ष देतील,
”जर तू या गोष्टी ख्रिस्ती बंधूना शिकविल्या, तर तू जो सत्यात व विश्वासात वाढलास व चांगल्या शिक्षणाला अनुसरलास तो तू ख्रिस्त येशूचा चांगला सेवक होशील.
”मी येईपर्यंत वाचणे, बोध करणे व शिकवणे, याकडे लक्ष्य लाव.
”आपणाकडे व आपल्या शिक्षणाकडे लक्ष दे. त्यामध्ये टिकून राहा कारण असे केल्याने तू स्वतःचे व जे तुझे ऐकतात, त्यांचे चुकीच्या शिक्षणापासून बचाव करशील.
”म्हणून आपल्या प्रभूविषयी साक्ष देण्यासाठी लाज धरु नको किंवा मी जो त्याच्यासाठी कैदी झालो त्या माझी लाज धरू नको. तर सुवार्तेसाठी देवाच्या सामर्थ्याप्रमाणे तू माझ्याबरोबर दुःखाचा वाटा घे.
”जर आम्ही दुःख सहन केले तर आम्ही त्याच्याबरोबर राज्यसुद्धा करू जर आम्ही त्यास नाकारले, तर तोसुध्दा आम्हास नाकारील
”तू सत्याचे वचन योग्य रीतीने सांगणारा असा आणि जे काम करतोस त्यामध्ये लाज वाटण्यासारखे काहीही कारण नसलेला देवास स्वीकृत असा कामकरी होण्याचा प्रयत्न कर.
”देवाच्या सेवकाने भांडू नये, तर सर्व लोकांशी सौम्यतेने वागावे, तसेच शिक्षणात कुशल व सहनशील असावे. जे त्यास विरोध करतात, त्यांना लीनतेने शिक्षण द्यावे कदाचित त्यांनी खरेपण जाणावे म्हणून देव त्यांना पश्चात्ताप करण्याची बुद्धी देईल.
”अशा स्त्रिया नेहमी शिकण्याचा प्रयत्न करतात. पण सत्याच्या पूर्ण ज्ञानापर्यंत त्या कधीही जाऊ शकत नाहीत.
”तुला माहीत आहे की, तू आपल्या बाल्यावस्थेत असल्यापासूनच तुला पवित्र शास्त्राची माहिती आहे. ते ख्रिस्त येशूमधील विश्वासाच्याद्वारे तुला शहाणे बनवण्याचे व तारणाकडे घेऊन जाण्याचे सामर्थ्य आहे. प्रत्येक शास्त्रलेख देवाच्या प्रेरणेने लिहिला असल्यामुळे तो शिकवण्यास, वाईटाचा निषेध करण्यास, चुका सुधारण्यास व योग्य जीवन जगण्याचे मार्गदर्शन करण्यास उपयुक्त आहे. यासाठी की, देवाचा मनुष्य तरबेज होऊन पूर्णपणे प्रत्येक चागंल्या कामासाठी सज्ज व्हावा.
”वचनाची घोषणा कर सुवेळी अवेळी तयार राहा, सर्व प्रकारच्या सहनशीलतेने व शिक्षणाने दोष दाखीव, निषेध कर व बोध कर. मी असे म्हणतो कारण अशी वेळ येईल जेव्हा लोक चांगले शिक्षण सहन करणार नाहीत. त्याऐवजी त्यांच्या स्वतःच्या इच्छांना पूरक असे शिक्षक ते त्यांच्यासाठी जमा करतील. सत्यापासून ते आपले कान दुसरीकडे वळवतील व आपले लक्ष ते काल्पनिक कथांकडे लावतील.
”आणि दिलेल्या शिक्षणाप्रमाणे जे विश्वसनीय वचन त्यास धरुन राहणारा असा असावा; यासाठी की त्याने सुशिक्षणाने बोध करावयास व उलट बोलणाऱ्यास कुंठित करावयासही शक्तिमान व्हावे.
”ही साक्ष खरी आहे. तर त्यांनी विश्वासात स्थिर व्हावे म्हणून तू त्यांचा निषेध कर.
”तू तर सुशिक्षणास शोभणार्या गोष्टी बोलत जा.
”या कारणास्तव ज्या सत्याविषयी आपण ऐकलेले आहे त्याकडे आपण अधिक काळजीपूर्वक लक्ष दिले पाहिजे. यासाठी की, आपण त्यापासून भरकटून जाऊ नये. कारण नियमशास्त्र जे देवदूतांकरवी सांगितले गेले ते इतके प्रभावी होते आणि जर प्रत्येक आज्ञाभंगाच्या व प्रत्येक अवमानाच्या कृत्याला योग्य ती शिक्षा होते. तर आपण अशा महान तारणाकडे दुर्लक्ष केल्यास, मग आपण शिक्षेपासून कसे सुटू? या तारणाची पहिली घोषणा प्रभूने केली. ज्यांनी प्रभूचे ऐकले त्यांच्याकडून याची खात्री पटली
”म्हणून, पवित्र आत्मा शास्त्रामध्ये म्हणतो, त्याप्रमाणे, “आज, जर तुम्ही देवाची वाणी ऐकाल, तर आपली अंतःकरणे कठीण करू नका. ज्याप्रमाणे इस्त्राइल लोकांनी अरण्यामध्ये देवाची परीक्षा पाहण्यासाठी देवाविरुद्ध बंडखोरी केली, जेथे तुमच्या वाडवडिलांनी माझी परीक्षा पाहिली व मला कसोटीस लावले, तेथे त्यांनी चाळीस वर्षे माझी कृत्ये पाहिली.” त्यामुळे मी या पिढीवर रागावलो आणि मी म्हणालो, “या लोकांच्या अंतःकरणात नेहमी चुकीचे विचार येतात, या लोकांनी माझे मार्ग कधीही जाणले नाहीत.” म्हणून मी रागाने शपथ वाहून म्हणालो, “हे लोक मी देऊ केलेल्या विसाव्याच्या ठिकाणी कधीच प्रवेश करणार नाहीत.” बंधुजनहो, जिवंत देवाला सोडून देण्याइतके अविश्वासाचे दुष्ट मन तुम्हातील कोणाचेही असू नये म्हणून जपा.
”कारण आम्हास सुद्धा सुवार्ता सांगितली गेली आहे ज्याप्रमाणे ती इस्राएल लोकांस सांगण्यात आली होती. परंतु जो संदेश त्यांनी ऐकला त्यापासून त्यांना फायदा झाला नाही कारण तो संदेश त्यांनी ऐकला पण त्यांनी विश्वासाने स्वीकारला नाही. ज्या आपण विश्वास ठेवला ते पवित्र शास्त्रात लिहिल्याप्रमाणे त्या विसाव्याच्या ठिकाणी प्रवेश करणार आहोत. असे देवाने म्हणले आहे. “म्हणून मी माझ्या रागाच्या भरात अशी शपथ वाहून म्हणालो, ‘ते माझ्या विसाव्याच्या ठिकाणी कधीच प्रवेश करणार नाहीत” जगाच्या निर्मितीपासूनचे त्याचे काम संपलेले होते तरी तो असे म्हणाला.
”कारण देवाचे वचन सजीव, सक्रीय कोणत्याही दुधारी तरवारीपेक्षा अधिक धारदार असून जीव, सांधे व मज्जा यांना भेदून आरपार जाणारे आणि मनातील विचार व हेतू ह्यांची पारख करणारे असे आहे. आणि कोणतीही निर्मित गोष्ट त्याच्यापासून लपलेली नाही आणि ज्याच्यापाशी आम्हास सर्व गोष्टींचा हिशोब द्यावयाचा आहे, देवासमोर सर्व गोष्टी उघड व स्पष्ट अशा आहेत.
”कारण ज्यांना एकदा प्रकाश मिळाला, ज्यांनी स्वर्गीय दानांचा अनुभव घेतला आहे व जे पवित्र आत्म्याचे भागीदार झाले आहेत, आणि ज्यांनी देवाच्या वचनाची व येणाऱ्या युगाच्या सामर्थ्याची रुची अनुभवली आहे, त्यानंतर ख्रिस्तापासून जर ते दूर गेले तर त्यांना पश्चात्तापाकडे वळवणे अशक्य आहे, कारण त्यांच्या स्वतःच्या हानिकरता ते देवाच्या पुत्राला पुन्हा वधस्तंभावर खिळतात व लोकांच्या अवकृपेच्या समोर त्यास आणतात.
”त्या दिवसानंतर मी इस्राएल लोकांबरोबर असा करार करीन; तो हा मी माझे नियम त्यांच्या अंतःकरणात घालीन, त्यांच्या हृदयांवर ते लिहीन, मी त्यांचा देव होईन, ते माझे लोक होतील.
”परमेश्वर म्हणतो, “त्या दिवसानंतर त्यांच्याशी मी करार करीन तो हा; मी माझे नियम त्यांच्या मनात घालीन आणि ते त्यांच्या हृदयपटांवर लिहीन.”
”सत्याचे ज्ञान प्राप्त झाल्यानंतरसुद्धा जर आपण जाणूनबुजून पाप करीत राहिलो, तर मग पापांसाठी यापुढे आणखी अर्पण करण्याचे बाकी राहिले नाही. पण जे देवाला विरोध करतात त्यांना भयंकर अशा न्यायनिवाड्याशिवाय व भयंकर अशा भस्म करणाऱ्या अग्नीशिवाय दुसरे काही शिल्लक राहिले नाही. जो कोणी मोशेचे नियमशास्त्र नाकारतो त्यास दोघा किंवा तिघांच्या साक्षीच्या आधारे कसलीही दया न दाखविता मरणदंड होतो. तर मग ज्याने देवाच्या पुत्राला पायाखाली तुडवले, कराराच्या ज्या रक्ताने त्यास पवित्र केले त्या रक्ताला अपवित्र ठरवले आणि ज्याने कृपेच्या आत्म्याचा अपमान केला, तो मनुष्य किती अधिक दंडास पात्र ठरेल म्हणून तुम्हास वाटते?
”पण विश्वासाशिवाय त्यास संतोषवणे अशक्य आहे, कारण जो त्याच्याकडे येतो त्याने विश्वास ठेवला पाहिजे की, तो आहे आणि जे त्यास झटून शोधतात त्यांना प्रतिफळ देणारा आहे.
”मोशे जो बोलतो आहे त्याचा अवमान करू नये म्हणून जपा कारण पृथ्वीवर आज्ञा सांगणाऱ्याचा अवमान करणारे इस्राएल लोक जर निभावले नाहीत, तर स्वर्गातून आज्ञा सांगणाऱ्या ख्रिस्तापासून बहकल्यास आपण विशेषेकरून निभावणार नाही.
”कारण आपला “देव भस्म करणारा अग्नी आहे.”
”म्हणून जर तुमच्यातील कोणी ज्ञानाने उणा असेल तर त्याने देवाकडे मागावे म्हणजे ते त्यास मिळेल कारण तो दोष न लावता सर्वांस उदारपणे देतो.
”म्हणून तुमच्यासभोवतीच्या सर्व अमंगळ गोष्टींपासून पूर्णपणे स्वतःची सुटका करून घ्या आणि जी तुमच्या आत्म्याचे तारण करण्यास समर्थ आहे ती देवाची शिकवण तुमच्या अंतःकरणात मुळावलेली आहे ती लीनतेने स्वीकारा. वचनाप्रमाणे आचरण करणारे असा व फक्त ऐकणारेच असू नका तर त्याप्रमाणे करा कारण जर तुम्ही फक्त ऐकता तर तुम्ही स्वतःची फसवणूक करता. जो कोणी देवाचे वचन ऐकतो परंतु त्यानुसार वागत नाही, तो आरशामध्ये आपले शारीरिक तोंड पाहणाऱ्या मनुष्यासारखा आहे. तो मनुष्य स्वतःकडे लक्षपूर्वक पाहतो. नंतर निघून जातो आणि आपण कसे होतो ते लगेच विसरून जातो.
”हे देवाशी अप्रामाणिक पिढी! जगाशी मैत्री म्हणजे देवाशी वैर हे तुम्ही जाणत नाही काय? म्हणून जो कोणी जगाचा मित्र होऊ इच्छितो तो देवाचा वैरी आहे. किंवा ‘आपल्यात राहणारा पवित्र आत्मा ईर्षावान’, असे शास्त्रलेख व्यर्थ म्हणतो, असे तुम्हास वाटते काय? पण तो अधिक कृपा करतो, म्हणून शास्त्रलेख असे म्हणतो की, “देव गर्विष्ठांना विरोध करतो, पण लीनांवर कृपा करतो.” म्हणून देवाच्या अधीन रहा; आणि सैतानाला आडवा, म्हणजे तो तुमच्यापासून दूर पळून जाईल. तुम्ही देवाच्या जवळ या म्हणजे तो तुमच्याजवळ येईल. अहो पाप्यांनो, तुम्ही हात शुद्ध करा; अहो द्विमनाच्या मनुष्यांनो, अंतःकरणे शुद्ध करा. दुःखी व्हा, शोक करा आणि रडा; तुमच्या हसण्याचा शोक होवो; तुमच्या आनंदाची खिन्नता होवो. परमेश्वरासमोर नम्र व्हा, म्हणजे तो तुम्हास उच्च करील.
”तुम्ही जर आत्म्याच्याद्वारे, सत्याचे आज्ञापालन करून, निष्कपट बंधुप्रेमासाठी आपले जीव शुद्ध केले आहे, तर तुम्ही आस्थेने एकमेकांवर मनापासून प्रीती करा. कारण तुम्ही नाशवंत बीजाकडून नाही पण अविनाशी बीजाकडून, म्हणजे देवाच्या, जिवंत टिकणार्या वचनाच्याद्वारे तुमचा पुन्हा जन्म पावलेले आहात. कारण पवित्रशास्त्रात असे लिहिले आहे, “सर्व मानवजाती गवतासारखी आहे व तिचे सर्व वैभव गवताच्या फुलासारखे आहे गवत वाळते व त्याचे फूल गळते, परंतु परमेश्वराचे वचन सर्वकाळ टिकते.” तुम्हास त्याच वचनाचे शुभवर्तमान तुम्हास सांगण्यात आले ते तेच आहे.
”परमेश्वर कृपाळू आहे, असा तुम्ही अनुभव घेतला आहे तर तुम्ही त्याद्वारे तारणासाठी तुमची वाढ व्हावी म्हणून नूतन जन्मलेल्या बालकांसारखे आध्यात्मिक निऱ्या दुधाची इच्छा धरा.
”म्हणून विश्वास ठेवणार्या तुम्हास तो मोलवान आहे; पण, जे विश्वास ठेवत नाहीत त्यांना ‘बांधणार्यांनी जो दगड नाकारला तोच कोपर्याचा मुख्य कोनशिला झाला आहे.’ असा देखील शास्त्रलेख आहे, “अडखळण्याचा दगड व अडथळ्याचा खडक झाला आहे.” ते वचन मानीत नसल्यामुळे अडखळतात आणि त्यासाठीच ते नेमलेले होते.
”कारण देवाच्या घराण्यापासून न्यायनिवाड्यास आरंभ होण्याची वेळ आता आली आहे आणि तो जर प्रथम आपल्यापासून झाला, तर जे देवाचे शुभवर्तमान मानीत नाहीत त्यांचा शेवट काय होईल?
”त्याच्याबरोबर पवित्र डोंगरावर असताना आकाशातून आलेली ही वाणी आम्ही स्वतः ऐकली. शिवाय अधिक निश्चित असे संदेष्ट्याचे वचन आम्हाजवळ आहे; ते काळोख्या जागी प्रकाशणार्या दिव्याप्रमाणे आहे म्हणून, तुमच्या अंतःकरणात दिवस उजाडेपर्यंत व प्रभाततारा उगवेपर्यंत तुम्ही त्याकडे लक्ष द्याल तर चांगले कराल. तुम्ही प्रथम हे जाणा की, शास्त्रलेखातील कोणताही संदेश स्वतः अर्थ लावण्यासाठी झाला नाही. कारण कोणत्याही काळात मनुष्यांच्या इच्छेने संदेश झाला नाही, तर पवित्र आत्म्याने प्रेरित झालेल्या मनुष्यांनी देवाकडून आलेला संदेश दिला आहे.
”पण त्या लोकात खोटे संदेष्टे झाले होते, तसे तुमच्यात खोटे शिक्षकही होतील; ते आपली विघातक मते चोरून लपवून आत आणतील आणि त्यांना ज्याने विकत घेतले आहे त्या स्वामीला ते नाकारतील व तसे करून ते आपल्या स्वतःवर शीघ्र नाश ओढवून घेतील. पुष्कळजण त्यांच्या कामातुरपणाचे अनुकरण करतील व सत्याच्या मार्गाची त्यामुळे निंदा होईल. आणि बनावट गोष्टी रचून ते लोभाने तुमच्यावर पैसे मिळवतील. त्यांच्याकरिता ठरलेला दंड पहिल्यापासूनच विलंब करीत नाही, अणि त्यांचा नाश डुलक्या घेत नाही.
”आणि त्याने आपल्या सर्व पत्रांत या गोष्टींचा उल्लेख केला आहे. त्यामध्ये समजण्यास कठिण अशा काही गोष्टी आहेत आणि जे अशिक्षित व अस्थिर माणसे इतर शास्त्रलेखांचा जसा विपरीत अर्थ करतात तसा ह्यांचाहि करतात; अशाने आपल्या स्वतःच्या नाशाला कारणीभूत होतात. तर प्रियजनहो, तुम्हास या गोष्टी तुम्हास पूर्वीपासून कळत आहेत, म्हणून तुम्ही अनीतिमान लोकांच्या भ्रांतीप्रवाहात सापडून आपल्या स्थिरतेतून ढळू नये ह्यासाठी जपून राहा.
”जर आम्ही त्याच्या आज्ञा पाळतो तर आम्ही त्यास खऱ्या अर्थाने ओळखले आहे. जो कोणी असे म्हणतो, “मी देवाला ओळखतो!” परंतु त्याच्या आज्ञा पाळत नाही तर तो खोटे बोलत आहे; आणि त्याच्याठायी सत्य नाही. पण जर कोणी त्याच्या वचनाप्रमाणे चालतो, तर त्यांच्यामध्ये देवाची प्रीती पूर्णत्वास गेली आहे. ह्यावरून आपल्याला कळून येते की, आपण त्याच्याठायी आहोत. मी देवामध्ये राहतो असे म्हणणाऱ्याने, जसा येशू ख्रिस्त चालला तसे चालले पाहिजे.
”प्रियांनो, प्रत्येक आत्म्यावर विश्वास ठेवू नका परंतु ते आत्मे देवापासून आहेत किंवा नाहीत याची परीक्षा करा कारण जगात पुष्कळ खोटे संदेष्टे निघाले आहेत.
”पण आम्ही देवाचे आहोत. जो देवाला ओळखतो तो आपले ऐकतो. परंतु जो देवाचा नाही तो आपले ऐकत नाही. अशा रीतीने सत्य प्रकट करणारा आत्मा कोणता आणि फसवणारा आत्मा कोणता हे आपण ओळखतो.
”देवावर प्रीती करण्याने व त्याच्या आज्ञा पाळण्याने आम्ही ओळखतो की आम्ही देवाच्या मुलांवर प्रीती करतो.
”जो कोणी देवाच्या पुत्रावर विश्वास ठेवतो त्याच्या स्वतःमध्ये ही साक्ष आहे. जो देवाच्या साक्षीवर विश्वास ठेवत नाही, त्याने देवाला लबाड ठरवले आहे कारण देवाने आपल्या स्वतःच्या पुत्राबाबत दिलेल्या साक्षीवर त्याने विश्वास ठेवला नाही.
”आणि त्याच्या आज्ञेत चालणे म्हणजेच प्रीती करणे होय. हीच आज्ञा आहे जी तुम्ही प्रारंभापासून ऐकले आहे तसे तुम्ही तिच्याप्रमाणे चालावे.
”ख्रिस्ताच्या शिक्षणाला चिकटून न राहता जो पुढेपुढेच जातो त्यास देव प्राप्त झाला नाही. जो ख्रिस्ताच्या शिक्षणाला धरून राहतो त्यास पिता व पुत्र या दोघांची प्राप्ती झाली आहे. हे शिक्षण न देणारा कोणी तुम्हाकडे आला तर त्यास घरात घेऊ नका किंवा त्यास सलामही करू नका. कारण जो कोणी त्याचे स्वागत करतो तो त्याच्या दुष्कर्मांचा भागीदार होतो.
”जरी तुम्हास हे पूर्वीपासून माहीती आहे तरी मी तुम्हास हे आठवून घावे अशी माझी इच्छा आहे की, परमेश्वराने त्या लोकांस मिसर देशातून वाचवल्यावर ज्यांनी विश्वास ठेवला नाही त्यांना त्याने नंतर नष्ट केले;
”त्याच्या उजव्या हातात सात तारे होते; त्याच्या तोंडातून दोन्ही बाजूंनी तीक्ष्ण धार असणारी तरवार निघाली होती. त्याचा चेहरा दिवसाच्या अतिशय प्रखर ‘तेजाने’ प्रकाशणाऱ्या ‘सूर्यासारखा’ दिसत होता.
”तू काय करतोस ते मला माहीत आहे. तुझे काम, कष्ट व सहनशीलता हे मी जाणतो. मला हे माहीत आहे की दुष्ट तुला सहन होत नाहीत आणि जे स्वतःला प्रेषित समजतात पण जे तसे नाहीत त्यांची तू परीक्षा केली आणि ते खोटे आहेत हे तुला दिसून आले.
”म्हणून पश्चात्ताप करा! नाही तर मी लवकरच तुमच्याकडे येईन आणि आपल्या तोंडातील तरवारीने त्यांच्याशी लढेन.
”पण, तू तसा नाहीस, कोमट आहेस, तू थंड नाहीस किंवा गरम नाहीस. म्हणून मी तुला आपल्या तोंडातून ओकून टाकणार आहे. तू म्हणतो मी सधन आहे, मी ‘संपत्ती मिळविली आहे,’ आणि मला कशाची गरज नाही, पण तू कष्टी, दयनीय, गरीब, आंधळा व नग्न आहेस हे तुला कळत नाही.
”तेव्हा अजगर स्त्रीवर रागावला व जे तिच्या संतानातून उरलेले, देवाच्या आज्ञा पाळणारे आणि येशूची साक्ष देणारे त्यांच्याशी लढाई करायला गेला; आणि तो अजगर समुद्राच्या वाळूवर उभा राहिला.
”यानंतर मला आणखी एक देवदूत आकाशाच्या मध्यभागी उडताना दिसला. त्याच्याजवळ, पृथ्वीवर राहणार्या प्रत्येक राष्ट्र, वंश, भाषा बोलणार्यांना व प्रत्येक समाजाला सुवार्ता सांगायला, सार्वकालिक सुवार्ता होती. तो मोठ्या आवाजात म्हणत होता, देवाचे भय धरा आणि त्यास गौरव करा; कारण न्यायाची वेळ आली आहे आणि ‘ज्याने आकाश, पृथ्वी आणि समुद्र आणि पाण्याचे झरे हे उत्पन्न केले त्यास नमन करा.’
”‘हे प्रभू, तुला कोण भिणार नाही? आणि तुझ्या नावाचे गौरव कोण करणार नाही?’ कारण तू एकच ‘पवित्र’ आहेस; कारण ‘सगळी राष्ट्रे येऊन तुझ्यापुढे नमन करतील. कारण तुझ्या नीतिमत्त्वाची कृत्ये प्रकट झाली आहेत.’
”‘त्याचे डोळे अग्नीच्या’ ज्वालेसारखे होते व त्याच्या डोक्यावर पुष्कळ मुकुट होते आणि त्याचे एक नाव लिहिलेले होते; ते त्याच्याशिवाय कोणी जाणत नाही. त्याने एक, रक्तात भिजवीलेला झगा घातला होता; आणि ‘देवाचा शब्द’ हे नाव त्यास देण्यात आले आहे;
”आणि त्याने राष्ट्रांवर प्रहार करावा म्हणून त्याच्या तोंडामधून एक धारदार तरवार निघते, ‘तो त्यांच्यावर लोहदंडाने सत्ता चालवील;’ तो सर्वसमर्थ देवाच्या अतीकोपाचे द्राक्षकुंड तुडवील.
”बाकीचे लोक जो घोड्यावर बसला होता त्याच्या तोंडातून बाहेर येणार्या तरवारीने मारले गेले आणि त्यांच्या ‘मांसाने सगळे पक्षी तृप्त झाले.’
”या पुस्तकात भविष्यकाळाबाबत नमूद केलेली वचने जो ऐकतो, त्यास मी गंभीरपणे सावधान करतोः जर कोणी ‘ह्यामध्ये भर घालील, तर या पुस्तकात लिहिलेल्या’ पीडा देव त्याच्यावर आणील; ‘आणि’ जो कोणी भविष्यकाळाबाबत संदेश देणाऱ्या या पुस्तकामधून काही ‘काढून टाकील’ त्याचा ज्यांच्याबाबत या पुस्तकात लिहिले आहे, त्या जीवनाच्या झाडाचा आणि पवित्र नगराचा वाटा देव काढून घेईल.
”